श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ

इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्‌भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण -

भवान् - आपण - यत् - जे - मनुष्येषु - मनुष्यांमध्ये - म्रियमाणानां - मृत्यु समीप आहे ज्यांच्या अशा - च - आणि - मनीषिणां - विद्वान् - नृणां - मनुष्यांबद्दल - मम - मला - पृष्टवान् - विचारले - एतत् - हे - एवं- याप्रमाणे - निगदितं - सांगितले ॥१॥

ब्रह्मवर्चसकामः - ब्रह्मतेजाची इच्छा करणाराने - तु - तर - ब्रह्मणस्पतिं - वेदाधिपति ब्रह्मदेवाला - इन्द्रियकामः - इन्द्रियांना बळकटी यावी अशी इच्छा करणाराने - तु - तर - इन्द्रं - इंद्राला - प्रजाकामः - संततीची इच्छा करणाराने - प्रजापतीन् - दक्षादि प्रजापतींना - यजेत - पूजावे ॥२॥

श्रीकामः - ऐश्वर्याची इच्छा असणार्‍याने - तु - तर - मायां - प्रकृतिरूपिणी अशा - देवीं - दुर्गादेवीला - तेजस्कामः - तेजाची इच्छा करणार्‍याने - विभावसुं - अग्नीला - वसुकामः - धनाची इच्छा करणार्‍याने - वसून् - वसूंना - अथ - तसेच - वीर्यकामः - पराक्रमाची इच्छा करणार्‍या - वीर्यवान् - पराक्रमी पुरुषाने - रुद्रान् - अकरा रुद्रांना - अन्नाद्यकामः - अन्नादि भक्ष्य पदार्थांना इच्छिणार्‍याने - तु - तर - अदितिं - अदितीला - स्वर्गकामः - स्वर्गाला इच्छिणार्‍याने - अदितेः - अदितीच्या - सुतान् - पुत्रांना म्हणजे देवांना किंवा बारा सूर्यांना - राज्यकामः - राज्याची इच्छा करणार्‍याने - विश्वान् देवान् - विश्वदेवांना - विशां - मनुष्यांना - संसाधकः - वश करु इच्छिणार्‍याने - साध्यान् - साध्यनामक देवांना - आयुष्कामः - दीर्घायुष्य इच्छिणार्‍याने - अश्विनौ देवौ - अश्विनीकुमारांना - पुष्टिकामः - शरीर धष्टपुष्ट होण्याची इच्छा करणार्‍याने - इलां - पृथ्वीला - प्रतिष्ठाकामः - दृढ असे स्थान प्राप्त होण्याची इच्छा करणार्‍या - पुरुषः - पुरुषाने - लोकमातरौ - सर्व त्रैलोक्याला पोषक अशा - रोदसी - द्यावापृथ्वीनामक देवतांना - यजेत् - पूजावे ॥३-५॥

रूपाभिकामः - सौंदर्यप्राप्तीची इच्छा करणार्‍याने - गन्धर्वान् - गंधर्वांना - स्त्रीकामः - स्त्रीची इच्छा करणार्‍याने - अप्सर‍उर्वशीम् - उर्वशी नावाच्या अप्सरेला - सर्वेषां - सर्वांच्यावर - आधिपत्यकामः - सत्ता चालविण्याची इच्छा करणार्‍याने - परमेष्ठिनं - ब्रह्मदेवाला - यजेत् - पूजावे ॥६॥

यशस्कामः - कीर्तीला इच्छिणार्‍याने - यज्ञं - विष्णूला - कोशकामः - द्रव्यभांडाराला इच्छिणार्‍याने - प्रचेतसम् - वरुणाला - विद्याकामः - विद्येला इच्छिणार्‍याने - तु - तर - गिरिशं - शंकराला - दाम्पत्यार्थ - पतिपत्नीमधील प्रेमाची इच्छा करणार्‍याने - सतीं - साध्वी - उमां - पार्वतीला - यजेत् - पूजावे ॥७॥

धर्मार्थः - धर्माची प्रार्थना करणार्‍याने - उत्तमश्लोकं - उत्तम कीर्तीच्या विष्णूला - तंतुं - पुत्रादिक प्रजातंतूला - तन्वन् - वाढविण्याची इच्छा करणार्‍याने - पितृन् - बर्हिषदादि पितरांना - रक्षाकामः - बाधेपासून रक्षणाची इच्छा करणार्‍याने - पुण्यजनात् - यक्षांना - ओजस्कामः - बलाची इच्छा करणार्‍याने - मरुद्गणान् - मरुत् नामक देवांना - यजेत् - पूजावे ॥८॥

राज्यकामः - राज्याला इच्छिणार्‍याने - देवान् - देदीप्यमान अशा - मनून् - स्वायंभुवप्रमुख चवदा मनूंना - अभिचरन् - जारण मारणादि शत्रुनाशक क्रिया करण्याची इच्छा करणार्‍याने - तु - तर - निऋतिं - राक्षसाला - यजेत् - पूजावे - कामकामः - विषयभोग इच्छिणार्‍याने - सोमं - चंद्राला - अकामः - कोणतीच इच्छा न करणार्‍याने - परं - श्रेष्ठ - पुरुषं - परमेश्वराला - यजेत् - पूजावे. ॥९॥

अकामः - ज्याला इच्छाच नाही असा - सर्वकामः - सर्वच गोष्टींची इच्छा करणारा असा - वा - किंवा - उदारधीः - उदार बुद्धीचा - मोक्षकामः - जो मुमुक्षु त्याने - तीव्रेण - तीक्ष्ण - भक्तियोगेन - भक्तियोगाने - परं - श्रेष्ठ - पुरुषं - परमेश्वराला - यजेत् - पूजावे. ॥१०॥

यत् - जो - भागवतसंगतः - भगवद्‌भक्तांचा समागम घडून - भगवति - परमेश्वराचे ठिकाणी - अचलः - अढळ - भावः - भक्ती - एतावान् - एवढा - एव - च - इह - येथे - यजतां - परमेश्वराच्या उपासकांचा - निःश्रेयसोदयः - आत्यंतिक कल्याणाचा लाभ होय. ॥११॥

यत् - ज्या ठिकाणी - आप्रतिनिवृत्तगुणोर्मिचक्रं - सर्वप्रकारे नष्ट झाला आहे त्रिगुणोत्पन्न कामादि लाटांचा समूह ज्यामुळे असे - ज्ञानं - ज्ञान - उत - आणखी - यत्र - जेथे - गुणेषु - त्रिगुणांमध्ये - असङ्गः - आसक्तीरहित - आत्मप्रसादः - आत्म्याला शांती - अथ - नंतर - तु - तर - कैवल्यसंमतपथः - मोक्षाप्रमाणे मानलेला आहे मार्ग ज्याचा असा - भक्तियोगः - भक्तियोग - निर्वृतः - सुखी - कः - कोण - हरिकथासु - भगवंताच्या कथांमध्ये - रतिं - प्रीतीला - न कुर्यात् - करणार नाही. ॥१२॥

भरतर्षभः - भरतश्रेष्ठ - राजा - परीक्षित राजा - इति - याप्रमाणे - अभिव्याहृतं - भाषणाला - निशम्य - ऐकून - भूयः - पुनः - अन्यत् - दुसरे - कविं - शब्दब्रह्मात निष्णात अशा - ऋषिं - ब्रह्मस्वरूप दाखविणार्‍या - वैयासकिं - व्यासपुत्र शुकाचार्याला - किं - काय - पृष्टवान् - विचारिता झाला. ॥१३॥

विद्वन् - हे ज्ञानसंपन्न - सूत - सूता - एतत् - हे - शुश्रूषतां - ऐकण्याची इच्छा करणार्‍या अशा - नः - आम्हाला - भाषितुं - सांगण्यास - अर्हसि - योग्य आहेस - ध्रुवं - खरोखर - सतां - साधूंच्या - सदसि - सभेत - हरिकथोदर्काः - ज्यांचे पर्यवसान भगवंताच्या कथेतच होणारे आहे अशा - कथाः - गोष्टी - स्युः - चालू असतात. ॥१४॥

वै - खरोखर - सः - तो - भागवतः - भगवद्भक्ति करणारा - पाण्डवेयः - पांडवांच्या कुळात उत्पन्न झालेला - महारथः - महारथी - राजा - परीक्षित राजा - यः - जो - बालक्रीडनकैः - लहानपणाची खेळणी घेऊन - क्रीडन् - खेळत असता सुद्धा - कृष्णक्रीडां - श्रीकृष्णासंबंधीच्या खेळण्याला - आददे - ग्रहण करीत असे. ॥१५॥

च - आणि - भगवान् - सर्वगुणसंपन्न - वैयासकिः - व्यासपुत्र शुकाचार्य - वासुदेवपरायणः - परमेश्वरभजनात तल्लीन - हि - कारण - सतां - साधूंची - समागमे - संगति झाली असता - उरुगायगुणोदाराः - अनंत कीर्ती अशा परमेश्वराच्या गुणांनी मोठेपणाला प्राप्त झालेल्या गोष्टी - स्युः - होतात. ॥१६॥

उद्यन् - उगवणारा - च - आणि - अस्तं - अस्ताला - यन् - जाणारा - असौ - हा सूर्य - यत्क्षणः - जो काळ - उत्तमश्लोकवार्तया - भगवद्रुणानुवादश्रवणाने - नीतः - नेलेला - तस्य - त्या काळाच्या - ऋते - शिवाय - वै - खरोखर - पुंसां - पुरुषांचे - आयुः - आयुष्य - हरति - हिरावून घेतो. ॥१७॥

तरवः - वृक्ष - किं न जीवन्ति - जगत नाहीत काय ? - उत - किंवा - भस्त्राः - भाते - किं न श्वसन्ति - श्वासोच्छ्‌वास करीत नाहीत काय ? - अपरे - दुसरे - ग्रामपशवः - गावात राहणारे गाय, बैल वगैरे पशु - न खादन्ति - खात नाहीत - न मेहन्ति किं - मूत्रोत्सर्ग करीत नाहीत काय ? ॥१८॥

गदाग्रजः - श्रीकृष्ण - जातु नाम - कधीही - यत्कर्णपथोपेतः - ज्याच्या कर्णमार्गात श्रवणद्वारा प्रविष्ट झालेला - न - नाही असा - पशुः - पशुतुल्य - पुरुषः - मनुष्य - श्वविड्‌वराहोष्ट्रखरैः - कुत्रा, डुकर, उंट व गाढव ह्यांच्याशी - संस्तुतः - बरोबरीचा होय. ॥१९॥

सूत - हे सूता - उरुक्रमविक्रमान् - मोठा पराक्रम करणार्‍या परमेश्वराच्या पराक्रमांना - न शृण्वतः - श्रवण न करणार्‍या - नरस्य - मनुष्याची - ये - जी - कर्णपुटे - कानाची दोन पुडे - बत - खरोखर - बिले - बिळे होत - च - आणि - उरुगायगाथाः - अनंत कीर्ती अशा श्रीकृष्णाच्या चरित्रांना - न उपगायति - गात नाही - असती - दुष्ट - जिह्‌वा - जीभ - दार्दुरिका इव - बेडकाच्या जिभेप्रमाणे होय. ॥२०॥

पटटकिरीटजुष्टम् अपि - पागोटे, मुकुट ह्यांनी युक्त असेही - उत्तमाङगं - मस्तक - मुकुन्दं - श्रीकृष्णाला - न नमेत् - नमस्कार करणार नाही तर - परं - केवळ - भारः - ओझ्याप्रमाणे होय - वा - किंवा - लसत्कञ्चनकङकणौ - तेजस्वी सोन्याच्या कंकणांनी शोभणारे - करौ - दोन हात - हरेः - भगवंताच्या - सपर्यां - पूजेला - नो कुरुतः - करणार नाहीत तर - शावौ - प्रेताच्या हाताप्रमाणे होत. ॥२१॥

ये - जे - विष्णोः - श्रीकृष्णाच्या - लिङगानि - मूर्तींना - न निरीक्षतः - पहात नाहीत - ते - ते - नराणां - मनुष्यांचे - नयने - दोन डोळे - बर्हायिते - मोराच्या पिसार्‍यावरील डोळ्याप्रमाणे होत. - यौ - जे - हरेः - भगवंताच्या - क्षेत्राणि - द्वारका, पंढरपूर, जगन्नाथपुरी वगैरे पवित्र स्थानांना - न अनुव्रजतः - गमन करीत नाहीत - तौ - ते - नृणां - मनुष्यांचे - पादौ - दोन पाय - द्रुमजन्मभाजौ - झाडांच्या जन्माप्रमाणे जन्म घेणारे होत. ॥२२॥

यः - जो - मर्त्यः - मनुष्य - तु - तर - जातु - कधीसुद्धा - भागवताङ्‌घ्रिरेणुं - भगवंताच्या पायधुळीला - न अभिलभेत - स्वीकार करणार नाही - जीवन् - जिवंत असूनही - शवः - प्रेताप्रमाणे होय - यः - जो - मनुजः - मनुष्य - तु - तर - श्रीविष्णुपदयाः - श्रीकृष्णाच्या पायावर असणार्‍या - तुलस्याः - तुळशीपत्राच्या - गन्धं - वासाला - न वेद - जाणत नाही तो - श्वसन - श्वासोच्छ्‌वास करीत असूनही - शवः - प्रेत होय. ॥२३॥

तत् - ते - इदं - हे - हृदयं - अंतःकरण - बत - खरोखर - अश्मसारं - दगडाप्रमाणे कठीण होय - यत् - कारण - गृह्यमाणैः - घेतलेल्या - हरिनामधेयैः - श्रीकृष्णाच्या नावांनी - न विक्रियेत - विकारयुक्त होत नाही - अथ - आणि - यदा - जेव्हा - विकारः - परिणाम होतो - नेत्रे - डोळ्यात - जलं - भक्तीने प्राप्त झालेले प्रेमाश्रू - गात्ररुहेषु - शरीरावरील केसांवर - हर्षः - उभे राहण्याची क्रिया म्हणजे रोमांच. ॥२४॥

अङग - हे सूता - मनोनुकूलं - मनाजोगे - प्रभाषसे - बोलतोस - अथ - आता ह्यापुढे - भागवतप्रधानः - भगवद्‌भक्तांत श्रेष्ठ असा - आत्मविदयाविशारदः - व आत्मज्ञानांत पारंगत - वैयासकिः - व्यासपुत्र शुकाचार्य - साधु - चांगल्या रीतीने - पृष्टः - विचारला गेला असता - नृपतिं - परीक्षित राजाला - यत् - जे - आह - बोलला - अभिधेहि - ते सांग. ॥२५॥

स्कंध दुसरा - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP