श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय २ रा - अन्वयार्थ

भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा
तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती वर्णन -

एवं - याप्रमाणे - धारणया - धारणेच्या योगाने - तुष्टात् - संतुष्ट झालेल्या श्रीहरीपासून - पुरा - प्रलयकाली - नष्टां - नाहीशा झालेल्या - स्मृतिं - बुद्धीला - प्रत्यवरुद्‌ध्य - परत मिळवून - व्यवसायबुद्धिः - निश्चयात्मक आहे बुद्धि ज्याची असा - अमोघदृष्टिः - सत्य आहे ज्ञानदृष्टी असा - आत्मयोनिः - ब्रह्मदेव - इदं - हे जग - अप्ययात् प्राक् - प्रलय होण्याच्या पूर्वी - यथा - जसे होते - तथा - तसे - ससर्ज - उत्पन्न करिता झाला. ॥१॥

शाब्दस्य - शब्दमय अशा - ब्रह्मणः - वेदाचा - एषः - हा - पंथाः - मार्ग - हि - खरोखर - धीः - बुद्धि - अपार्थैः - अर्थशून्य अशा - नामाभिः - स्वर्गादि नावांच्या योगाने - यत् - ज्याला - ध्यायति - चिंतिते - मायामये - मायिक अशा - तत्र - त्या मार्गामध्ये - वासनया - इच्छा उत्पन्न झाल्यामुळे - शयानः - झोपेत जणू स्वप्न पहात आहे असा - परिभ्रमन् - भ्रमण करित असता - अर्थान् - मनोरथांना - न विन्दते - प्राप्त होत नाही. ॥२॥

अतः - यासाठी - तत्र - त्याविषयी - परिश्रमं - मोठे श्रम आहेत असे - समीक्षमाणः - पूर्णपणे जाणणारा - व्यवसायबुद्धिः - निश्चयात्मक आहे बुद्धि ज्याची असा - अप्रमत्तः - सावधान - कविः - विचारवान पुरुष - नामसु - नामधारी भोग्य पदार्थांत - यावदर्थः - कार्यापुरते मात्र - स्यात् - रहावे - अर्थे सिद्धे - कार्य सिद्ध झाले असता - अन्यथा - विनाकारण - तत्र - त्यासाठी - न यतेत - यत्न करू नये. ॥३॥

हि - कारण - क्षितौ सत्यां - पृथ्वी असता - कशिपोः - शय्येची - प्रयासैः किम् - खटपट कशाला - बाहौ - आपले बाहु - स्वसिद्धे - स्वतः सिद्ध असता - उपबर्हणैः किम् - उशा कशाला - अंजलौ - ओंजळ - सति - असता - पुरुधा - पुष्कळ प्रकारची - अन्नपात्र्या किम् - अन्नाची भांडी कशाला - दिग्वल्कलादौ - दिशा, वल्कले इत्यादी - सति - असता - दुकूलैः किम् - रेशमी वस्त्रे काय करावयाची. ॥४॥

पथि - रस्त्यावर - चीराणि - फाटकी वस्त्रे - न संति किम् - नाहीत काय ? - परभृतः - फळे देऊन दुसर्‍यांचे पोषण करणारे - आङ्‌घ्रिपाः - वृक्ष - भिक्षां - भिक्षा - नैव दिशंति - देत नाहीतच काय ? - सरितः - नदया - अपि - सुद्धा - अशुष्यन् - सुकल्या काय ? - गुहाः - पर्वतातील आसर्‍याच्या जागा - रुद्धाः किम् - अडून गेल्या काय ? - अजितः - श्रीहरि - उपसन्नान् - शरण गेलेल्यांना - न अवति किम् - रक्षण करीत नाही काय ? - कवयः - ज्ञाते पुरुष - धनदुर्मदांधान् - धनाच्या योगाने झालेला जो गर्व त्याने अंध झालेल्यांना - कस्मात् - कोणत्या कारणामुळे - भजंति - भजतात. ॥५॥

एवं - याप्रमाणे - स्वचित्ते - आपल्या अंतःकरणात - स्वत एव सिद्धः - स्वतः सिद्ध असलेली - प्रियः अर्थः - प्रिय अशी वस्तू - अनंतः - नाशरहित - भगवान् - परमेश्वर - आत्मा - व्यापक आत्मा - च - आणि - यत्र - ज्या ठिकाणी - संसारहेतूपरमः - संसाराला कारण झालेल्या अविदयेचा नाश - तं - त्या भगवंताचे - नियतार्थः - निश्चित आहे स्वरूप ज्याचे असा होऊन - निर्वृतः - आनंदयुक्त होऊन - भजेत - भजन करावे. ॥६॥

वैतरण्यां - वैतरणीनामक नदीमध्ये - पतितं - पडलेल्या - जनं - प्राण्याला - स्वकर्मजान् - आपल्याच कर्मानी उत्पन्न झालेल्या - परितापान् - क्लेशांना - जुषाणम् - भोगीत असलेला - पश्यन् - पहात असलेला असा - परानुचिंतां - श्रीहरीचे निरंतरचे चिंतन जीत आहे अशा - तां - त्या धारणेला - तु - तर - अनादृत्य - झिडकारून - पशुन् ऋते - पशूंवाचून - कः नाम - कोण बरे - असंतीं - विनाशी असे विषयांचे चिंतन - युंज्यात् - करील. ॥७॥

केचित् - कित्येक - स्वदेहांतर्हृदयावकाशे - आपल्या देहातील हृदयाकाशांत - वसतं - राहणार्‍या - कंजरथांगशंखगदाधरं - कमल, चक्र, शंख व गदा धारण करणार्‍या - चतुर्भुजं - चार ज्याला भुजा आहेत अशा - प्रादेशमात्रं - टीचभर प्रमाणाच्या - पुरुषं - पुरुषाला - धारणया - धारणायोगाने - स्मरंति - स्मरतात. ॥८॥

प्रसन्नवक्त्रं - हसतमुख - नलिनायतेक्षणं - कमलासारखे विस्तृत ज्याचे नेत्र आहेत अशा - कदंबकिंजल्कपिशंगवाससं - कदंबाच्या केसरासारखी पिंगटवर्णाची आहेत वस्त्रे ज्याची अशा - लसन्महारत्नहिरण्मयांगदं - महारत्नांनी सुशोभित केलेली बाहुभूषणे धारण केली आहेत ज्याने अशा - स्फुरन्महारत्नकिरीटकुंडलम् - चकाकणारी मोठी रत्नजडित कुंडले व मुकुट ही धारण केली आहेत ज्याने - उन्निद्रहृत्पंकजकर्णिकालये - जागृत झालेल्या हृदयरूप कमलाच्या कोशामध्ये - योगेश्वरास्थापितपादपल्लवम् - योगेश्वरांनी ज्याचे चरणरूप पल्लव स्थापिलेले आहेत अशा - श्रीलक्ष्मणं - लक्ष्मी हेच ज्याचे चिन्ह आहे अशा - कौस्तुभरत्नकंधरं - कौस्तुभमणि ज्याने कंठात घातलेला आहे अशा - अम्लानलक्ष्म्या - जिची शोभा कधी म्लान होत नाही अशा - वनमालया अञ्चितं - वनमालेने सुशोभित - महाधनैः - मोठया मौल्यवान् अशा - नूपुरकंकणादिभिः - चाळ, कांकणे इत्यादिकांनी - मेखलया - कमरपटटयाने - अंगुलीयकैः - अंगठयांनी - विभूषितं - विशेष शोभणार्‍या - स्निग्धामलाकुंचितनीलकुंतलैः - स्निग्ध, स्वच्छ, कुरळ्या व निळ्या अशा केशांनी - विरोचमानाननहासपेशलं - शोभायमान झालेल्या मुखांतील हास्यामुळे सुंदर शोभणार्‍या - अदीनलीलाहसितेक्षणोल्लसद्‌भ्रूभंग उदार हसणे, खेळणे व कटाक्ष फेकणे, - संसूचितभूर्यनुग्रहं - याच्या योगेच ज्याचा मोठा अनुग्रह सूचित होत आहे अशा - एनं - ह्या - चिंतामयं - ध्यानाने प्रकट होणार्‍या - ईश्वरं - ईश्वराला - ईक्षेत - ध्यानपूर्वक अवलोकावे - मनः - मन - धारणया - धारणायोगाने - अवतिष्ठते - स्थिर होते. ॥९-१२॥

गदाभृतः - गदाधारी ईश्वराच्या - पादादि - पायांपासून - हसितं यावत् - हास्ययुक्त मुखापर्यंत - अंगानि - अवयवांचे - धिया - मनाने - एकैकशः अनुभावयेत् - क्रमाक्रमाने ध्यान करावे - यथायथा - जशीजशी - धीः - बुद्धि - शुद्‌ध्यति - शुद्ध होत जाईल तसतसा - जितंजितं - प्रत्येक जिंकलेल्या - स्थानं - अवयवाला - अपोह्य - सोडून - परंपरं - पुढील पुढील अवयवांचे - धारयेत् - धारणायोगाने स्थिरीकरण करावे. ॥१३॥

परावरे - परा विदया व अपरा विदया यांनी युक्त अशा - द्रष्टरि - साक्षिरूप - अस्मिन् - ह्या - विश्वेश्वरे - जगदात्म्याच्या ठिकाणी - भक्तियोगः - भक्तियोग - यावत् - जोपर्यंत - न जायेत - उत्पन्न होत नाही - तावत् - तोपर्यंत - पुरुषस्य - त्या पुरुषाचे - स्थवीयः - स्थूल - रूपं - रूप - क्रियावसाने - कर्म संपताच - प्रयतः - पवित्रान्तःकरणाने - स्मरेत - स्मरण करावे. ॥१४॥

अंग - हे राजा ! - यदा च - आणि जेव्हा - स्थिरं - अढळ - सुखं - सुखावह - आसनं - आसनाचा - आश्रितः - आश्रय केलेला असा - यतिः - इंद्रियाचे नियमन केलेला योगी - इमं लोकं - या लोकाला - जिहासुः - सोडून जाण्याची इच्छा करणारा होईल - जितासुः - तेव्हा प्राणांचा जय करून - काले देशे च - काळ आणि स्थान याविषयी - मनः - मन - न सज्जयेत् - आसक्त ठेवू नये - प्राणं - प्राणाला - मनसा - मनाने - नियच्छेत् - नियंत्रित करावे. ॥१५॥

अमलया स्वबुद्‌ध्या - निर्मल अशा निश्चयात्मिका बुद्धीने - मनः नियम्य - मनाचे नियमन करून - एतां - ह्या बुद्धीला - क्षेत्रज्ञे - जीवात्म्याकडे - निनयेत् - वळवावे - तम् आत्मनि - त्या जीवात्म्याला परमात्म्याकडे वळवावे - धीरः - गंभीर असा जो योगी त्याने - आत्मानम् आत्मनि अवरुद्‌ध्य - जीवात्म्याचा परमात्म्यात लय करून - लब्धोपशांतिः - शांति प्राप्त करून घेऊन - कृत्यात् विरमेत - कर्मापासून निवृत्त होईल. ॥१६॥

अनिमिषां - देवांहून - परः - श्रेष्ठ असा - कालः - काळ - यत्र - जेथे - न प्रभुः - समर्थ नाही - जगतां - जगाचे - ये ईशिरे - जे स्वामित्व करतात ते - देवाः - देव - कुतो नु - कोठून समर्थ असतील - यत्र - जेथे - सत्त्वं रजः तमः च - सत्त्व, रज आणि तम ही - न - नाहीत - वै - त्याचप्रमाणे - विकारः - सृष्टी - न - नाही - न महान् प्रधानम् - व स्वतः महतत्व आणि प्रकृतिही नाही - यत् - जे - अतत् - ते नव्हे असे - नेति नेति इति - हे नव्हे हे नव्हे असे म्हणून - उत्सिसृक्षवः - टाकून देऊ इच्छिणारे - दौरात्म्यं - मी, माझे अशा अभिमानाला - विसृज्य - सोडून - अर्हपदं - पूज्य अशा परमेश्वराचे चरण - पदेपदे - क्षणोक्षणी - हृदा - हृदयाने - उपगुह्य - धारण करून - अनन्यसौहृदः - दुसर्‍या कोठेही त्यांचा प्रेमभाव नाही असे योगी - तत् - ते - वैष्णवं पदं - विष्णूचे पद - परम आमनन्ति - श्रेष्ठ मानितात. ॥१७-१८॥

इत्थं - याप्रमाणे - व्यवस्थितः - ज्याचे चित्त ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाले आहे - विज्ञानदृक - ज्याची दृष्टी विज्ञानमय झाली आहे असा - सुरंधिताशयः - पूर्ण नष्ट झाली आहे विषयवासना ज्याची असा - मुनिः - योगी - तु - तर - उपरमेत् - विराम पावतो. - स्वपार्ष्णिना - आपल्या पायाच्या टाचेने - गुदं आपीडय - गुदद्वार दाबून - जितक्लमः - श्रमापासून मुक्त झालेल्या योग्याने - ततः - तेथून - षट्‌सु स्थानेषु - सहा चक्रांवर - अनिलं उन्नमयेत् - वायूला चढवीत न्यावे. ॥१९॥

नाभ्यां स्थितं - नाभीत असलेल्या वायूला - हृदि अधिरोप्य - हृदय वर नेऊन - तस्मात् - तेथून - उदानगत्या - उदानवायूच्या गतीने - तं - त्याला - मुनिः - योग्याने - उरसि नयेत् - वक्षःस्थळात न्यावे - ततः - तेथून पुढे - धिया अनुसंधाय - बुद्धीशी तादात्म्य पावून - मनस्वी - योग्याने - शनकैः - क्रमाने - स्वतालुमूलं नयेत - आपल्या टाळूच्या मुळाशी न्यावे. ॥२०॥

निरुद्धसप्तास्वयनः - बंद केले आहे प्राणांचे सात मार्ग ज्याने असा - तस्मात् - तेथून - भ्रुवोः - भुवयांच्या - अंतरं - मध्यभागाला - उन्नयेत - न्यावे - अनपेक्षः - निरिच्छ - मुहूर्तार्धं - एक घटिकापर्यंत - स्थित्वा - स्थिर करून - अकुंठदृष्टिः - अकुंठित ज्ञानदृष्टी होऊन - मूर्धन् - ब्रह्मरंध्राला - निर्भिदय - फोडून - परं - श्रेष्ठपदाला - गतः - पोचलेला होत्साता - विसृजेत् - शरीर-त्याग करावा. ॥२१॥

नृप - हे राजा ! - यदि - जर - पारमेष्ठयं - ब्रह्मपदाला - उत - किंवा - यत् - ज्या - वैहायसानां - आकाशात राहणार्‍या सिद्धादि देवांच्या - विहारं - क्रीडास्थानाला - अष्टाधिपत्य - आठ सिद्धींच्या स्वामित्वाला - गुणसन्निवाये - गुणांनीच उत्पन्न झालेल्या ब्रह्मांडात - प्रयास्यन् - जाण्याची इच्छा करणारा - मनसा - मनाशी - च - आणि - इंद्रियैः - इंद्रियांशी - सहैव - सहवर्तमानच - गच्छेत् - जावे. ॥२२॥

पवनान्तरात्मनां - वायुरूपी लिंग शरीराला धारण करणार्‍या - योगेश्वराणां - योगश्रेष्ठांच्या - त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - अंतः - आत - बहिः - बाहेर - गतिं - गतीला - आहुः - बोलतात. - विदयातपोयोगसमाधिभाजां - विदया, तप, योग व समाधी करणार्‍यांच्या - तां - त्या - गतिं - गतीला - कर्मभिः - कर्मांनी - न आप्नुवन्ति - प्राप्त होत नाहीत. ॥२३॥

नृप - हे राजा - अथ - नंतर - विहायसा - आकाशरूपी - ब्रह्मपथेन - ब्रह्ममार्गाने - गतः - गेलेला - शोचिषा - तेजस्वी - सुषुम्नया - सुषुम्ना नावाच्या नाडीने - वैश्वानरं - अग्निलोकाला - याति - जातो - विधूतकल्कः - निष्पाप असा - उदस्तात् - ऊर्ध्वभागी - हरेः - भगवंताच्या - शैशुमारं - शिशुमार नावाच्या - चक्रं - चक्राला - प्रयाति - जातो. ॥२४॥

तत् - तदनंतर - विष्णोः - विष्णूच्या - विश्वनाभिं - जगाला आश्रयभूत अशा त्या चक्राला - तु - तर - अतिवर्त्य - उल्लंघून - एकः - एकटा - अर्णीयसा - फारच सूक्ष्म - विरजेन - निर्मळ - आत्मना - शरीराने - नमस्कृतं - सर्वांनी वंदन केलेल्या - ब्रह्मविदां - ब्रह्मवेत्त्यांच्या स्थानाला - उपैति - प्राप्त होतो - यत् - ज्यामुळे - कल्पायुषः - कल्पपर्यंत आयुष्य असणारे - विबुधाः - देव - रमन्ते - रममाण होतात. ॥२५॥

अथो - नंतर - सः - तो - अनन्तस्य - शेषाच्या - मुखानलेन - मुखातून उत्पन्न होणार्‍या अग्नीने - दंदह्यमानं - वेगाने जळून जाणार्‍या - विश्वं - जगाला - निरीक्ष्य - पाहून - यत् - जे - सिद्धेश्वरजुष्टधिष्ण्यं - मोठमोठया सिद्धींनी सेवन केलेले स्थान - द्वैपरार्ध्यं - दोन परार्धकालापर्यंत टिकणारे असे - तत् - त्या - पारमेष्ठयं - ब्रह्मपदाला - उ - खरोखर - निर्याति - कायमचा जाऊन राहतो. ॥२६॥

अनिदंविदां - हे ज्ञान नसणार्‍यांच्या - दुरन्तदुःखप्रभवानुदर्शनान् - अत्यंत दुःखदायक जन्मांच्या यातायाती पाहून - कृपया - त्यांच्याबद्दल कृपा उत्पन्न झाल्यामुळे - चित्ततोदः - अंतःकरणाला खेद होतो - यत् - ज्या - ऋते - शिवाय - यत्र - जेथे - कुतश्चित् - कोठूनही - शोकः - शोक - न - नाही - जरा - वृद्धावस्था - न - नाही - मृत्युः - मृत्यु - न - नाही - आर्तिः - पीडा - न - नाही - च - आणि - उद्वेगः - खिन्नता - न - नाही. ॥२७॥

ततः - त्या ठिकाणी - विशेषं - पृथ्वी आदिकरून महाभूतांना - प्रतिपदय - मिळून जाऊन - निर्भयः - भयरहित असा - तेन आत्मना - त्या आपल्या सूक्ष्म शरीराने - अपः - पाण्याला मिळून जाऊन - अनलमूर्तिः - अग्निस्वरूप झालेला - अत्वरन् - घाई न करणारा असा - ज्योतिर्मयः - तेजोरूपी - काले - योग्य काळी - वायुम् उपेत्य - वायूत मिळून जाऊन - वाय्वात्मना - वायुरूपाने - बृहदात्मलिङगं - परमात्म्याचे मोठे लक्षण जे आकाश त्याला जाऊन मिळतो. ॥२८॥

योगी - भक्तियोगाने ईश्वरप्राप्ति करून घेणारा पुरुष - घ्राणेन - घ्राणेंद्रियाने - गंधं - गंधाशी - रसनेन रसं - रसनेंद्रियाने रसाशी - दृष्टया तु रूपं - तसेच चक्षुरिंद्रियाने रूपाशी - त्वचा एव श्वसनं - त्वगिंद्रियाने स्पर्शाशी - श्रोत्रेण च - आणि कर्णेंद्रियाने - नभोगुणत्वं उपेत्य - आकाशाचा गुण जो शब्द त्याशी मिळून जाऊन - प्राणेन च - आणि कर्मेंद्रियांनी - आकूतिं - इंद्रियांच्या क्रियेशी - वै - खरोखर - उपैति - मिळून जातो. ॥२९॥

सः - तो योगी - भूतसूक्ष्मेन्द्रियसन्निकर्षं - सूक्ष्म भूते आणि इंद्रिय यांच्या एकमेकांवर होणार्‍या लयाला - मनोमयं - मनःस्वरूपी - देवमयं - देवस्वरूपी - विकार्यम् - विविध कार्य उत्पन्न करणार्‍या अहंकार तत्त्वाला - संसादय - प्राप्त होऊन - गत्या - आपल्या गतीने - तेन सह - त्या अहंकारासह - विज्ञानतत्वं - महत् नावाच्या तत्वाला - गुणसंनिरोधम् - त्रिगुणांचा जेथे लय होतो त्या प्रकृतीला - याति - जाऊन मिळतो. ॥३०॥

तेन आत्मना - त्या प्रकृतिरूप स्वरूपाने - अवसाने - सरते शेवटी - आनंदमयः - आनंदस्वरूपी होऊन - शान्तम् आनंदम् आत्मानं - अविकार्य, आनंदरूप अशा आत्मस्वरूपास - उपैति - प्राप्त होतो - अंग - अहो - यः - जो - एतां भागवतीं गतिं गतः - या भगवंताच्या स्वरूपाला पोचलेला - सः - तो - वै - खरोखर - पुनः इह न विषज्जते - पुनः या संसारात कधीही येत नाही. ॥३१॥

नृप - हे राजा ! - त्वया अभिपृष्टे - तू विचारलेले - ते एते - ते हे - वेदगीते - वेदांत सांगितलेले - च - आणि - सनातने - पूर्वापार चालत आलेले - सृती - दोन मार्ग होत - ये - जे - वै - खरोखर - पुरा - पूर्वी - आराधितः - आराधिलेला - भगवान् वासुदेवः - भगवान वासुदेव - पृष्टः - विचारला गेलेला - ह - खरोखर - ब्रह्मणे आह - ब्रह्मदेवाला सांगता झाला. ॥३२॥

यतः - ज्यापासून - भगवति वासुदेवे - भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी - भक्तियोगः भवेत् - भक्तियोग होईल - अतः अन्यः - त्याहून दुसरा - शिवः पन्थाः - चांगला मार्ग - इह संसृतौ - या संसारात - विशतः - शिरणाराला - नाहि - नाहीच. ॥३३॥

कूटस्थः भगवान् - निर्विकार असा भगवान् - कार्त्स्न्येन - पूर्णपणे - ब्रह्म - ब्रह्माचा - त्रिः अन्वीक्ष्य - तीन वेळा एकाग्र मनाने विचार करून - यतः - ज्यामुळे - आत्मन् - परमात्म्याच्या ठिकाणी - रतिः भवेत् - प्रेम उत्पन्न होईल - तत् - ते - मनीषया - बुद्धीने - अध्यवस्यत् - निश्चित करता झाला. ॥३४॥

भगवान् द्रष्टा हरिः - साक्षीभूत असलेला असा भगवान परमेश्वर - सर्वभूतेषु दृश्यैः - सर्व भूतांच्या ठिकाणी दिसून येणार्‍या - अनुमापकैः - ज्यांच्यावरुन अनुमान करता येते अशा - बुद्‌ध्‌यादिभिः लक्षणैः - बुद्धि आदिकरून लक्षणांवरून - स्वात्मना - स्वतःच्याच योगाने - लक्षितः - पाहिला जात असतो. ॥३५॥

राजन् - हे राजा - तस्मात् - यास्तव - भगवान् हरिः - भगवान परमेश्वर - सर्वदा - नित्य - सर्वात्मना - सर्वतोपरी - सर्वत्र - सर्व ठिकाणी - नृणां - मनुष्यांना - श्रोतव्यः कीर्तितव्यः स्मर्तव्यः च - श्रवण करण्यास, कीर्तन करण्यास आणि स्मरण करण्यास योग्य आहे. ॥३६॥

ये - जे - श्रवणपुटेषु संभृतं - कानात साठविलेले - सताम् आत्मनः - साधूंच्या अंतर्यामी जो राहतो त्या - भगवतः - भगवंताचे - कथामृतं - मधुर कथारूप अमृत - पिबंति - सेवन करतात - ते - ते - विषयविदूषिताशयं - विषयसेवनाने अत्यंत दूषित झालेल्या अंतःकरणाला - पुनंति - शुद्ध करतात - च - आणि - तच्चरणसरोरुहांतिकं व्रजंति - त्याच्या चरणकमलाजवळ प्राप्त होतात. ॥३७॥

स्कंध दुसरा - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP