श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय १ ला - अन्वयार्थ

ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन - -

नृप - हे राजा ! - पुंसां - मनुष्यांना - श्रोतव्यादिषु - ऐकण्यास योग्य अशा गोष्टीत - यः - जो - परः - श्रेष्ठ - च - आणि - आत्मवित्संमतः - आत्मज्ञानी पुरुषांना मान्य असा - लोकहितं - लोकहितार्थ - कृतः - केलेला - एषः - हा - ते - तुझा - प्रश्नः - प्रश्न - वरीयान् - चांगला आहे. ॥१॥

राजेन्द्र - हे राजश्रेष्ठा ! - आत्मतत्वं - आत्मज्ञान - अपश्यतां - न जाणणार्‍या - गृहेषु गृहमेधिनां - प्रपंचात आसक्त राहून गृहस्थधर्म आचरणार्‍या - नृणां - पुरुषांना - श्रोतव्यादीनि - श्रवणमननादि साधने - सहस्त्रशः - हजारो - संति - आहेत. ॥२॥

राजन् - हे राजा - नक्तं - रात्रीतील - वयः - आयुष्य - निद्रया - झोपेने - वा - अथवा - व्यवायेन - विषयसेवनाने - च - आणि - दिवा - दिवसातील - अर्थेहया - द्रव्य मिळविण्याकरिता केलेल्या उद्योगाने - वा - अथवा - कुटुंबभरणेन - कुटुंबाच्या पालनपोषणाने - च - दुसर्‍याही कारणांनी - ह्रियते - नष्ट होते. ॥३॥

देहापत्यकलत्रादिषु - देह, पुत्र, स्त्री इत्यादि - आत्मसैन्येषु - आपला परिवार - असत्सु अपि - मिथ्या असतानाहि - तेषां - त्या देहादिकांचे - निधनं - मरण - पश्यन् अपि - पहात असूनही - प्रमत्तः - बेसावध राहणारा - न पश्यति - पहात नाही. ॥४॥

भारत - हे भरतवंशीय राजा ! - तस्मात् - म्हणून - अभयं - मोक्ष - इच्छता - इच्छिणाराने - हरिः - भवबंधन तोडणारा - ईश्वरः - जगन्नियंता - सर्वात्मा - सर्वांतर्यामी असा जो - भगवान् - भगवान - श्रोतव्यः - श्रवण करण्यास योग्य - च - आणि - कीर्तितव्यः - कीर्तन करण्यास योग्य - च - आणि - स्मर्तव्यः - स्मरण करण्यास योग्य आहे. ॥५॥

स्वधर्मपरिनिष्ठया - स्वधर्माच्या ठिकाणी पूर्ण निष्ठा ठेवून - सांख्ययोगाभ्यां - आत्मा कोणता, अनात्मा कोणता याचा विचार व अष्टांग योगसाधन यांचाही विचार करून - अंते - मरणसमयी - नारायणस्मृतिः - नारायणाचे स्मरण करणे - एतावान् - एवढेच - पुंसां - पुरुषांचे - परः - मोठे - जन्मलाभः - जन्मास आल्याचे फल होय. ॥६॥

राजन् - हे राजा ! - विधिनिषेधतः - श्रृति-स्मृतींनी अवश्य करण्यास सांगितलेली कर्मे व त्यांनी निषिद्ध ठरवलेली कर्मे यापासून - निवृत्ताः - पराङ्‌मुख झालेले - नैर्गुणस्थाः - निर्गुण ब्रह्मात निमग्न झालेले - मुनयः - मुनिजन - प्रायेण - बहुतकरून - हरेः - श्रीहरीचे - गुणानुकथने - गुणानुवाद वर्णन करण्यात - रमंते स्म - रममाण होतात. ॥७॥

अहं - मी - ब्रह्मसंमितं - वेदांशी तुल्य असे - इदं - हे - भागवत नाम - भगवंतानी सांगितलेले ‘भागवत’ हे नाव असलेले - पुराणं - पुराण - द्वापरादौ - द्वापर आहे आदि ज्याच्या अशा कलियुगाच्या प्रारंभी - पितुः द्वैपायनात् - पिता जो द्वैपायन व्यास त्याच्याकडून - अधीतवान् - शिकलो. ॥८॥

राजर्षे - हे राजश्रेष्ठा परीक्षिता ! - नैर्गुण्ये - निर्गुण परब्रह्मांत - परिनिष्ठितः अपि - निरंतर ध्यानस्थ असा असुनही - उत्तमश्लोकलीलया - भगवंताच्या लीलेने - गृहीतचेताः - आकृष्टचित्त झालेला - यत् - जे - आख्यानं - कथानक - अधीतवान् - शिकलो - तत् - ते - अहं - मी - ते - तुला - अभिधास्यामि - सांगणार आहे. - यस्य - ज्याच्या ठिकाणी - श्रद्दधतां - श्रद्धा करणारांना - मुकुंदे - मुक्ति देणार्‍या परमेश्वराच्या विषयी - सती - उत्तम - मतिः - बुद्धि - आशु - शीघ्र - स्यात् - होत असते - भवान् - आपण - महापौरुषिकः - मोठे भगवद्‌भक्त - अस्ति - आहा. ॥९-१०॥

नृप - हे राजा ! - इच्छतां - सकाम पुरुषांना - योगिनां - निष्काम ज्ञानेच्छूंना - निर्विद्यमानानां - आणि वैराग्यवान मुमुक्षूंना - हरेः - श्रीहरीच्या - नामानुकीर्तनं - नामांचे वारंवार कीर्तन करणे - एतत् - हे - अकुतोभयं - ज्याला कोठूनही भयप्राप्ती नाही असे - निर्णीतं - ठरविलेले आहे. ॥११॥

इह - या नश्वर लोकी - बहुभिः - बहुत - परोक्षैः - न जाणलेल्या - हायनेः - वर्षांनी - प्रमत्तस्य - मूर्खाला - किम् - काय उपयोग होणार आहे - मुहूर्तं - दोन घटकांपर्यंत - विदितं - जाणून केलेले काम - वरम् - चांगले - यतः - कारण - श्रेयसे - कल्याणाला - घटेत - मिळवून देते. ॥१२॥

खट्‌वाङ्गः नाम - खट्‌वांग या नावाचा - राजर्षिः - श्रेष्ठ राजा - इह - या लोकी - आयुषः - आयुष्याच्या - इयत्तां - मर्यादेला - ज्ञात्वा - जाणून - सर्वं - सर्व - मुहूर्तात् - दोन घटकात - उत्सृज्य - सोडून - अभयं - ज्याच्या ठिकाणी भयच नाही अशा - हरिं - श्रीहरीप्रत - गतवान् - गेला. ॥१३॥

कौरव्य - हे कुरुवंशोद्‌भव राजा ! - एतर्हि - आता - तव - तुझी - अपि - सुद्धा - सप्ताहं - सात दिवसांची - जीवितावधिः - आयुष्याची मर्यादा - तावत् - म्हणून तोपर्यंत - यत् - जे - सांपरायिकं - परलोकसंबंधी कर्तव्यकर्म - तत् - ते - सर्वं - सर्व - उपकल्पय - संपादन कर. ॥१४॥

अंतकाले - मरणकाल - आगते - प्राप्त झाला असता - पुरुषः - मनुष्याने - तु - तर - गतसाध्वसः - गेली आहे भिती ज्याची असा होत्साता - असंग-शस्त्रेण - निर्वासनारूप शस्त्राने - देहे - स्वतःच्या देहावर असलेल्या - स्पृहां - इच्छेला - छिन्‌द्यात् - तोडून टाकावे - च - आणि - तम् अनु - त्या देहाच्या मागून आलेले - ये - जे स्त्री पुत्रादिक त्या विषयींचा देखील अभिलाष सोडून दयावा. ॥१५॥

धीरः - धैर्यवान - गृहात् - घरातून - प्रव्रजितः - वैराग्याने निघून गेलेला - पुण्यतीर्थजलाप्लुतः - पवित्र तीर्थाच्या उदकात स्नान केलेला - शुचौ - पवित्र अशा - विविक्ते - एकांत स्थली - विधिवत्कल्पितासने - विधिपूर्वक तयार केलेल्या आसनावर - आसीनः - बसलेला असा - मनसा - मनाने - शुद्धं - उपाधिरहित - परं - सर्वोत्तम - त्रिवृत् - अकार, उकार व मकार यांनी युक्त अशा - ब्रह्माक्षरं - ब्रह्मरूप असल्यामुळे अविनाशी जे ओमकार अक्षर त्याचा - अभ्यसेत् - जप करावा - ब्रह्मबीजं - ओमकाराचे - अविस्मरन् - स्मरण ठेवून - जितश्वासः - श्वासोच्छ्‌वासाचे नियमन करून - मनः - चित्त - यच्छेत् - वश करावे. ॥१६-१७॥

बुद्धिसारथिः - बुद्धि हीच ज्याची सारथी आहे अशा - मनसा - मनाने - विषयेभ्यः - विषयांपासून - अक्षान् - इंद्रियांना - नियच्छेत् - परावृत्त करावे - कर्मभिः - वासनांनी - आक्षिप्तं - व्यग्र झालेल्या - मनः - मनाला - धिया - बुद्धीने - शुभार्थे - मंगल अशा भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी - धारयेत् - स्थिर करावे. ॥१८॥

तत्र - त्या भगवंताच्या रूपात - अव्युच्छिन्नेन - सर्वस्वी संलग्न झालेल्या - चेतसा - चित्ताने - एकावयवं - त्या रूपातील एकएका अवयवाचे - ध्यायेत् - ध्यान करावे - मनः - मन - निर्विषयं - विषयचिंतनरहित - युक्त्वा - ईश्वराच्या ठिकाणी युक्त करून - ततः - त्यानंतर - किंचन - दुसर्‍या कशाचेही - न स्मरेत् - स्मरण करू नये - यत्र - ज्या ठिकाणी - मनः - अंतःकरण - प्रसीदति - प्रसन्न होते - तत् - ते - विष्णोः - विष्णूचे - परमं - श्रेष्ठ - पदं - स्थान होय. ॥१९॥

धीरः - धैर्यवान पुरुष - रजस्तमोभ्यां - रजोगुण व तमोगुण यांनी - आक्षिप्तं - आपल्याकडे ओढून घेतलेल्या - विमूढं - विचारशून्य अशा - मनः - अंतःकरणाला - धारणया - धारणेने - यच्छेत् - आवरून धरावे. - या - जी - आत्मनः - मनाच्या - तत्कृतं - त्यांनी केलेल्या - मलं - दोषाला - हंति - नष्ट करते. ॥२०॥

यतः - कारण - संधार्यमाणाया - धारणा केली असता - भद्रं - सुखानंदरूपी - आश्रयं - विषयाला - ईक्षतः - शोधून पहाणार्‍या - योगिनः - योग्याला - भक्तिलक्षणः - भक्ति उत्पन्न होणे हेच ज्याचे लक्षण आहे असा - योगः - योग - आशु - शीघ्र - संपद्यते - संपादन करिता येतो. ॥२१॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मस्वरूपी शुकाचार्या ! - धारणा - धारणा - यथा - ज्याप्रकाराने - संधार्यते - धारण केली जाते - वा - अथवा - यत्र - ज्या ठिकाणी - संमता - मान्य झालेली आहे - यादृशी - जशी - पुरुषस्य - मनुष्यप्राण्याच्या - मनोमलं - मनाच्या दोषाला - आशु - शीघ्र - हरेत् - हरण करते. ॥२२॥

जितसंगः - सर्वसंगपरित्याग केलेला - जितेन्द्रियः - सर्व इंद्रिये जिंकलेला - जितासनः - दृढ ब्रह्मासन घालून बसलेला - जितश्वासः - श्वासोच्छ्‌वासाचा जय केलेला - धिया - निश्चयात्मक बुद्धीने - मनः - मन - भगवतः - भगवंताच्या - स्थूले - स्थूल - रूपे - स्वरूपावर - संधारयेत् - दृढ धरावे. ॥२३॥

यत्र - ज्या ठिकाणी - भूतं - होऊन गेलेले - च - आणि - भव्यं - होणारे - च - आणि - भवत् - वर्तमान काळचे - सत् - केवळ कार्यरूपी - इदं - हे - विश्वं - जगत् - दृशते - दिसते - अयं - हाच - तस्य - त्या भगवंताचा - स्थवीयसां - अत्यंत मोठयामध्ये - स्थविष्ठः - मोठा असा - विशेषः देहः - विराट देह होय. ॥२४॥

सप्तावरणसंयुते - सात आवरणांनी युक्त अशा - अस्मिन् - ह्या - आंडकोशे - ब्रह्मांडरूप - शरीरे - देहात - यः - जो - असौ - हा - वैराजः - विराट् - पुरुषः - पुरुष - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर - धारणाश्रयः - धारणायोगाला आधारभूत असा आहे. ॥२५॥

हि - खरोखर - एतस्य - या विराट् पुरुषाचे - पादमूलं - पायांचे तळवे - पातालं - पाताळ - पार्ष्णिप्रपदे - पायांचे पूर्वपश्चाद्‌भाग - रसातलं - रसातल - अथ - त्यानंतर - विश्वसृजः - विराट् पुरुषाच्या - गुल्फौ - पायांचा घोटा - महातलं - महातल - वै - खरोखर - पुरुषस्य - विराट् पुरुषाच्या - जंघे - पोटर्‍या - तलातलं - तलातल - पठंति - म्हणतात. ॥२६॥

महीपते - हे राजा ! - विश्वमूर्तेः - विराट पुरुषाचे - द्वे - दोन्ही - जानुनी - गुढगे - सुतलं - सुतल - ऊरुद्वयं - दोन्ही मांडया - वितलं - वितल - च - आणि - अतलं - अतल - तज्जघनं - कंबरेमागील भाग - महीतलं - भूतल - च - आणि - नाभिसरः - नाभिरूप सरोवर - नभस्तलं - आकाश - गृणंति - म्हणतात. ॥२७॥

अस्य - या - आदिपुंसः - आदिपुरुषाची - उरःस्थलं - छाती - ज्योतिरनीकं - तारांगण - ग्रीवा - कंठ - महः - महर्लोक - वदनं - मुख - जनः - जनलोक - रराटीं - ललाट - तपः - तपोलोक - वै - आणि - अस्य सहस्रशीर्ष्णः - या हजारो मस्तकांच्या विराट्‌पुरुषाची - तु - तर - शीर्षाणि - मस्तके - सत्यं - सत्यलोक - विदुः - जाणतात. ॥२८॥

अमुष्य - ह्या - परमस्य - परमेश्वराचे - बाहवः - बाहू - इंद्रादयः - इंद्रादिक - उस्राः - दैदिप्यमान देव - कर्णौ - दोन्ही कान - दिशः - दाही दिशा - श्रोत्रं - कर्णेंद्रिय - शब्दः - कर्णेंद्रियाचा विषय जो शब्द तो - नासे - दोन्ही नाकपुडया - नासत्यदस्रौ - नासत्य व सत्र म्हणजे अश्विनीकुमार हे - घ्राणः - घ्राणेंद्रिय - गंधः - सुवास - अस्य - याचे - मुखं - मुख - इद्धः - प्रदीप्त - अग्निः - अग्नि - आहुः - म्हणतात. ॥२९॥

अस्य - ह्या - विष्णो - सर्वव्यापी विराट्‍पुरुषाचे - अक्षिणी - नेत्रगोलक - द्यौः - अंतरिक्ष - चक्षुः - नेत्रेंद्रिय - पतंगः - सूर्य - पक्ष्माणि - पापण्या - उभे - दोन - अहनी - दिवस व रात्र - तद्‌भ्रूविजृंभः - त्याच्या भ्रुकुटीचा विलास - परमेष्ठिधिष्ण्यं - ब्रह्मदेवाचे स्थान - तालुः - ताळू - आपः - जल - च - आणि - जिव्‍हा - जीभ - रस एव - रसच - अभूत् - होय. ॥३०॥

छंदांसि - वेद - अनंतस्य - त्या विराट्‍पुरुषाचे - शिरः - मस्तक - यमः - यम - दंष्ट्रा - दाढा - स्नेहकलाः - पुत्रांदिकावरील स्नेहलेश - द्विजानि - दात - जनोन्मादकरी - लोकांना उन्मत्त करणारी - माया - माया - हासः - हसणे - च - आणि - दुरंतसर्गः - अपार अशी उत्पत्ति - यदपांगमोक्षः - ज्याचा नेत्रकटाक्ष - गृणंति - म्हणतात. ॥३१॥

अस्य - या विराट् पुरुषाचा - उत्तरोष्ठः - वरचा ओठ - व्रीडा - लज्जा - अधरः एव - खालचा ओठ - लोभः - लोभ - स्तनः - स्तन - धर्मः - धर्म - पृष्ठः - पृष्ठभाग - अधर्मपथः - अधर्माचा मार्ग - तस्य - त्याचे - मेढ्रं - शिस्न - कः - प्रजापति - च - आणि - वृषणौ - अंडकोश - मित्रौ - मित्र व वरुण - कुक्षिः - कूस - समुद्राः - चारी समुद्र - अस्थिसंघाः - अस्थिसमूह - गिरयः - पर्वत ॥३२॥

अथ - आणि - नृपेंद्र - हे राजश्रेष्ठा - विश्वतनोः अस्य - या विराट् पुरुषाच्या - नाडयः - नाडया - नदयः - नदया - तनूरुहाणि - शरीरावरचे केश - महीरुहाः - वृक्ष - श्वसितं - श्वासोच्छ्‌वास - अनंतवीर्यः - अपार आहे बल ज्याचे असा - मातरिश्वा वायु - गतिः - गमन - वयः - काल - कर्म - क्रीडा - गुणप्रवाहः - त्रिगुणात्मक प्राण्यांचा संसार. ॥३३॥

कुरुवर्य - हे कुरुवंशश्रेष्ठा - अंबुवाहान् - मेघांना - भूम्नः - मोठयाहून मोठा अशा - ईशस्य - सर्वनियंत्या परमेश्वराचे - केशान् - केश - वासः - वस्त्राला - तु - तर - संध्यां - संध्याकाळ - विदुः - म्हणतात - अव्यक्तं - प्रकृतीला - हृदयं - हृदय - च - आणि - सः - तो - चंद्रमाः - चंद्र - सर्वविकारत्रकोशः - सर्व विकारांचे भांडारच - मनः - मन - आहुः - म्हणतात. ॥३४॥

महिम् - महत्त्वाला - सर्वात्मनः - सर्वस्वरूपी विराट् पुरुषाची - विज्ञानशक्तिं - चित्त - गिरित्रं - श्रीरुद्राला - अंतःकरणं - अंतःकरण - आमनंति - म्हणतात - अश्वाश्वतर्युष्ट्रगजाः - घोडे, खेचरे, उंट, हत्ती - नखानि - नखे - सर्वे - सर्व - मृगाः - हरिण - पशवः - गाई वगैरे - श्रोणिदेशे - कमरेचे ठायी ॥३५॥

वयांसि - पक्षी - विचित्रं - विचित्र असे - तद्‌व्याकरणं - त्याचे शिल्पकौशल्य - मनुः - स्वायंभुव मनु - मनीषा - बुद्धि - मनुजः - मनुष्य - निवासः - राहण्याचे स्थल - गंधर्वविदयाधरचरणाप्सरः - गंधर्व, विदयाधर, चारण व अप्सरा - स्वरः - ष‌ड्जादि स्वर - असुरानीकवीर्यः - असुरसमूहात श्रेष्ठ असलेला प्रल्हाद - स्मृतीः - स्मृति. ॥३६॥

ब्रह्मा - ब्राह्मण - आननं - मुख - महात्मा - विराट् पुरुष - क्षत्रभुजः - क्षत्रिय आहेत भुज ज्याचे असा - विडूरुः - वैश्य आहेत मांडया ज्याच्या असा - अङ्‌घ्रिश्रतकृष्णवर्णः - ज्याच्या पायांचा शूद्रांनी आश्रय केलेला आहे असा - नानाभिधाभीज्यगणोपपन्नः - अनेक नावाच्या देवगणांनी युक्त असा - द्रव्यात्मकः - हविर्द्रव्य हेच ज्याचे स्वरूप आहे असा - वितानयोगः - यज्ञप्रयोग - कर्म - कर्तव्य ॥३७॥

इयान् - एवढा - असौ - हा - यः - जो - ईश्वरविग्रहस्य - परमेश्वराच्या विराट्‌स्वरूपाचा - सन्निवेशः - अवयवांच्या ठेवणीचा प्रकार - मया - मी - ते - तुला - कथितः - सांगितला - यतः - ज्याहून - किंचित् - काहीसुद्धा - न अस्ति - नाही - अस्मिन् - ह्या - स्थविष्ठे - अत्यंत मोठया अशा - वपुषि विराट् शरीरावर - स्वबुद्‌ध्‌या - आपल्या निश्चयात्मक बुद्धीने - मनः - मन - संधार्यते - धारण करितात. ॥३८॥

यथा - जसा - स्वप्नजनेक्षिता - स्वप्नामध्ये अनेक लोक पहाणारा जीव - सर्वधीवृत्यनुभूतसर्वः - सर्वांच्या बुद्धीच्या वृत्तीच्या योगाने सर्व अनुभव घेतलेला आहे ज्याने असा - सः - तो - एकः - एकटा - आत्मा - सर्वांतर्यामी आत्मा - आनंदनिधिं - आनंदाचा कोश अशा - सत्यं - सत्यस्वरूपी - तं - त्याला - भजेत - भजन करावे - अन्यत्र - दुसर्‍या ठिकाणी - न सज्जेत् - आसक्त होऊ नये - यतः - ज्यापासून - आत्मपातः - आपले अधःपतन. ॥३९॥

स्कंध दुसरा - अध्याय पहिला समाप्त

GO TOP