|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १८ वा - अन्वयार्थ
राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप - वै - खरोखर - द्रौण्यस्त्रविप्लुष्टः - अश्वत्थाम्याच्या अस्त्राने दग्ध झालेला - यः - जो - मातुः - आई जी उत्तरा तिच्या - उदरे - पोटात - अद्भुतकर्मणः - आश्चर्यजनक कृत्ये करणार्या - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - अनुग्रहात् - कृपेने - न मृतः - मेला नाही - भगवति - श्रीकृष्णाचे ठिकाणी - अर्पिताशयः - ज्याने आपले अंतःकरण अर्पण केले आहे असा - यः - जो - तु - तर - ब्रह्मकोपोत्थितात् - ब्राह्मणाच्या क्रोधाने उद्युक्त झालेल्या - तक्षकात् - तक्षक नावाच्या नागापासून - प्राणविप्लवात् - प्राणांचा नाश करणार्या - उरुभयात् - मोठया भीतीमुळे - न संमुमोह - घाबरला नाही - वैयासकेः - व्यासपुत्र जे शुकाचार्य त्यांचा - शिष्यः - शिष्य परीक्षित - विज्ञाताजितसंस्थितिः - भगवंताची सर्व मोक्षदायक तत्त्वे ज्याने जाणिली आहेत असा - सर्वतः - सर्व सांसारिक विषयांपासून - सङगं - आसक्तीला - उत्सृज्य - सोडून - स्वं - स्वतःच्या - कलेवरं - शरीराला - गङ्गायां - गंगेत - जहौ - टाकता झाला.॥१-३॥ तत्कथामृतं - भगवच्चरित्ररूपी कथामृताला - जुषतां - सेवन करणार्या - तत्पदाम्बुजं - व भगवंताच्या चरणकमलाला - स्मरतां - स्मरण करणार्या - उत्तमश्लोकवार्तानां - श्रेष्ठकीर्तीच्या भगवंताच्या कथा श्रवण करणार्या भक्तांना - अन्तकाले - मरणकाली - अपि - सुद्धा - सम्भ्रमः - भ्रम - न स्यात् - होत नाही.॥४॥ यावत् - जोपर्यंत - ईशः - ऐश्वर्ययुक्त - महान् - मोठा - आभिमन्यवः - अभिमन्यूचा पुत्र परीक्षित - इह - ह्या - उर्व्या - पृथ्वीवर - एकराट् - एकच सार्वभौम राजा - तावत् - तोपर्यंत - सर्वतः - जिकडेतिकडे - प्रविष्टः - शिरलेला - अपि - सुद्धा - कलिः - कलि - न प्रभवेत् - सत्ता चालवू शकणार नाही.॥५॥ यस्मिन् - ज्या - अहनि - दिवशी - यर्हि - ज्यावेळी - एव - च - भगवान् - सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण - गां - पृथ्वीला - उत्ससर्ज - सोडून गेला - तदा - त्यावेळी - एव - च - इह - ह्या पृथ्वीवर - अधर्मप्रभवः - अधर्मापासून उत्पन्न झालेला - असौ - हा - कलिः - कलि - अनुवृत्तः - संचार करू लागला. ॥६॥ सारङ्गः - सार म्हणजे तत्त्व तेवढयाच वस्तूकडे जाणारा - इव - प्रमाणे - सारभुक् - केवळ सार म्हणजे महत्त्वाचे जे असेल तेवढेच घेणारा - सम्राट् - सार्वभौम परीक्षित - कलिं - कलीला - न अनुद्वेष्टि - शत्रू मानून द्वेष करीत नव्हता - यत् - कारण - कुशलानि - पुण्यकृत्ये - आशु - तत्काळ - सिद्ध्यन्ति - संकल्पानेच फलित होतात - इतराणि - तद्वयतिरिक्त म्हणजे पापकृत्ये - न - नाहीत - कृतानि - आचरण केल्यानंतर फलित होतात.॥७॥ बालेषु - अज्ञानी लोकांवर अंमल चालविणार्या - धीरभीरुणा - ज्ञानी लोकांना भिणार्या - शूरेण - शूर - कलिना - कलीकडून - किंनु - काय नफानुकसान होणार आहे - यः - जसा एखादा - वृकः - लांडगा - अप्रमत्तः - सावधपणाने वागणारा असा होत्साता - प्रमत्तेषु - बेसावध अशा - नृषु - लोकांवर - वर्तते - अंमल गाजवितो. ॥८॥ यत् - जे - अपृच्छत् - विचारलेत - एतत् - हे - वासुदेवकथोपेतं - श्रीकृष्णाच्या चरित्रांनी युक्त असे - पुण्यं - पुण्यकारक - पारीक्षितं - परीक्षितसंबंधी - आख्यानं - कथानक - मया - मी - वः - तुम्हाला - उपवर्णितं - वर्णन करून सांगितले. ॥९॥ कथनीयोरुकर्मणः - वर्णन करण्याजोगी ज्याची मोठमोठी कृत्ये आहेत अशा - भगवतः - श्रीकृष्णाच्या - याः याः - ज्या ज्या - कथाः - कथा - गुणकर्माश्रयाः - गुणांना व कर्माला आश्रय करून राहिलेल्या - ताः - त्या कथा - बुभूषुभिः - उत्कर्षाला इच्छिणार्या - पुम्भिः - पुरुषांनी - संसेव्याः - सेवन करण्याजोग्या आहेत. ॥१०॥ सौम्य - हे शान्त - सूत - सूता - शाश्वतीः - पुष्कळ - समाः - वर्षे - जीव - जग - यः - जो - त्वं - तू - हि - खरोखर - विशदं - निर्मळ - मर्त्यानां - व मृत्यूने ग्रस्त झालेल्या - नः - आम्हाला - अमृतं - मृत्यूला नष्ट करणारे - कृष्णस्य - श्रीकृष्णाचे - यशः - यश - शंससि - कथन करतोस. ॥११॥ भवान् - आपण - अस्मिन् - ह्या - अनाश्वासे - फलांबद्दल विश्वास न ठेविता येणार्या - कर्मणि - कर्मात - धूमधूम्रात्मनां - धुराने धुरकटलेल्या शरीराच्या अशा आम्हास - मधु - गोड - गोविन्दपादपद्मासवं - श्रीकृष्णचरण-कमलापासून उत्पन्न होणार्या रसाला - आपाययति - तृप्ति होईपर्यंत पाजीत आहा. ॥१२॥ भगवत्सङ्गिसङगस्य - भगवंताचे ठिकाणी आसक्ती ठेवणार्या भक्तांच्या समागमाच्या - लवेन अपि - थोडया अंशाशी - स्वर्गं - स्वर्गाला - न तुलयाम - सारखेपणाने मानीत नाही - अपुनर्भवं - मोक्षाला - न - नाही - उत - तर मग - मर्त्यानां - मृत्यूधर्मी मानवांच्या - आशिषः - भोग्य वस्तूंना - किं - कोण विचारतो.॥१३॥ ये - जे - भवपाद्ममुख्याः - शंकर व ब्रह्मदेव हे आहेत मुख्य ज्यामध्ये असे - योगेश्वराः - मोठे योगी - महत्तमैकान्तपरायणस्य - श्रेष्ठ श्रेष्ठ योग्यांनाच एक आश्रय देणार्या - अगुणस्य - निर्गुण परमेश्वराच्या - गुणानां - गुणांच्या - अन्तं - शेवटाला, टोकाला - न जग्मुः - जाऊन पोचू शकले नाहीत - कः - कोणता - रसवित् - रसाची म्हणजे भगवद्गुणांची आवड असलेला पुरुष - कथायां - भगवंताच्या कथेत - तृप्येत् - तृप्त होईल बरे !॥१४॥ विद्वन् - हे विद्वान सूता ! - भगवत्प्रधानः - श्रीकृष्णच आहे मुख्य ज्यास असे - भवान् - आपण - वै - खरोखर - महत्तमैकान्तपरायणस्य - मोठमोठया भक्तांना जो एकच मुख्य आश्रय आहे अशा - हरेः - श्रीकृष्णाचे - उदारं - उत्कृष्ट - विशुद्धं - निर्मळ - तत् - ते - चरितं - चरित्र - शुश्रूषतां - ऐकण्यास इच्छिणार्या - नः - आम्हांस - वितनोतु - विस्तारपूर्वक वर्णन करून सांगावे. ॥१५॥ अदभ्रबुद्धिः - मोठा बुद्धिमान - महाभागवतः - व मोठा भगवद्भक्त - सः - तो - परीक्षित - परीक्षित राजा - वै - खरोखर - वैयासकिशब्दितेन - व्यासपुत्र शुकाचार्याने सांगितलेल्या - येन - ज्या - ज्ञानेन - ज्ञानाने - अपवर्गाख्यं - मोक्ष ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या - खगेन्द्रध्वजपादमूलं - गरुड आहे ध्वज म्हणजे वाहन ज्याचे अशा परमेश्वराच्या चरणाच्या मुळाला - भेजे - प्राप्त झाला. ॥१६॥ तत् - ते - परं - श्रेष्ठ - पुण्यं - पुण्यकारक - असंवृतार्थं - स्पष्ट करून सांगितला आहे अर्थ ज्याचा असे - अत्यद्भुतयोगनिष्ठं - अत्यंत आश्चर्यजनक योगातच प्राधान्याने राहिलेले - अनन्ताचरितोपपन्नं - भगवंताच्या लीलांनी युक्त असे - भागवताभिरामं - भगवद्भक्त जेथे रममाण होत असतात असे - पारीक्षितं - परीक्षित राजासंबंधी - आख्यानं - चरित्र - हि - उत्तम रीतीने - नः - आम्हांला - आख्याहि - सांगा. ॥१७॥ अहो - काय हो - अद्य - आज - विलोमजाताः - विलोम म्हणजे विरुद्ध संकर जातीत उत्पन्न झालेले - अपि - सुद्धा - वयं - आम्ही - वृद्धानुवृत्त्या - वृद्ध पुरुषांच्या सेवेने - जन्मभृतः - सफल जन्म आहे असे - आस्म ह - झालेले आहो - महत्तमानां - मोठमोठया साधूंचा - अभिधानयोगः - समागमप्रसंगी - दौष्कुल्यं - वाईट कुलांत उत्पन्न झाल्याबद्दलच्या - आधिं - मानसिक दुःखाला - शीघ्रं - तत्काळ - विधुनोति - नाहीसे करितो.॥१८॥ यः - जो - अनन्तशक्तिः - अपरिमित शक्ति असलेला - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनन्तः - व ज्याचा अंत नाही असा परमेश्वर - यं - ज्याला - महद्गुणत्वात् - मोठया गुणांनी युक्त असल्यामुळे - अनन्तं - अनन्त असे - आहुः - बोलतात - तस्य - अशा त्या - महत्तमैकान्तपरायणस्य - मोठमोठया योग्यांना एकच आश्रय देणार्या परमेश्वराच्या - नाम - नावाला - गृणतः - वर्णन करणार्याच्या दुःखाला नाहीसे करील असे - पुनः - फिरून - कुतः - काय सांगितले पाहिजे ? ॥१९॥ गुणैः - गुणांनी - असाम्यानतिशायनस्य - ज्याच्याशी बरोबरी किंवा उल्लंघनहि करता येणार नाही अशा परमेश्वराबद्दल - ननु - खरोखर - एतावता - एवढेच - सूचितेन - सुचविणे - अलं - पुरेसा आहे. - विभूतिः - ऐश्वर्यलक्ष्मी - प्रार्थयतः - याचना करणार्या - इतरान् - दुसर्यांना - हित्वा - सोडून - अनभीप्सोः - इच्छा न करणार्या - यस्य - ज्या परमेश्वराच्या - अङ्घ्रिरेणुं - पायधुळीला - जुषते - सेविते.॥२०॥ अथापि - आणखीही - यत्पानखावसृष्टं - ज्याच्या पायाच्या नखापासून उत्पन्न झालेले - विरिञ्चोपहृतार्हणाम्भः - ब्रह्मदेवाने आणलेले अर्घोदक - सेशं - शंकरासह - जगत् - जगाला - पुनाति - पवित्र करते. - लोके - लोकांमध्ये - भगवत्पदार्थः - भगवान ह्या शब्दाला योग्य अशी वस्तु - मुकुन्दात् - श्रीकृष्णाहून - अन्यतमः - दुसरी श्रेष्ठ - कः - कोणती - नाम - बरे ?॥२१॥ यत्र - ज्या परमेश्वराचे ठिकाणी - अनुरक्ताः - प्रेम करणारे - धीराः - ज्ञानी पुरुष - देहादिषु - देहादिकांमध्ये - ऊढं - असलेल्या - सङगं - आसक्तीला - व्यपोह्य - पार दूर सोडून - सहसा एव - एकदमच - अन्त्यं - शेवटल्या - तत् - त्या - पारमहंस्यं - परमहंसाच्या म्हणजे नैष्ठिक विष्णुभक्ति करणार्यांच्या पदाला - व्रजन्ति - जातात - यस्मिन् - जेथे - स्वधर्मः - स्वतःचा धर्म - अहिंसोपशमः - हिंसा न करणे व शांती स्वीकारणे असाच आहे. ॥२२॥ अर्यमणः - अहो सूर्याप्रमाणे तेजस्वी ब्राह्मण हो - हि - खरोखर - भवद्भिः - आपणांकडून - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो आहे - अत्र - ह्या बाबतीत - यावान् - जितका - आत्मावगमः - मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या ज्ञानशक्तीप्रमाणे जितकी म्हणून देता येतील तितके - आचक्षे - सांगतो - पतत्रिणः - पक्षी - आत्मसमं - आपल्या शक्तीप्रमाणे - नभः - आकाशांत - पतन्ति - उडतात - तथा - तसेच - विपश्चितः - विद्वान - समं - शक्त्यनुरूप - विष्णुगतिं - परमेश्वराच्या गतीला ॥२३॥ एकदा - एके दिवशी - धनुः - धनुष्य - उद्यम्य - घेऊन - वने - अरण्यात - मृगयां - मृगयेला म्हणजे भक्ष्य पशूंना मारण्याच्या क्रियेला - विचरन् - करणारा असा परीक्षित - मृगान् - मृगांना म्हणजे सर्वसामान्य भक्ष्य पशूंना किंवा हरिणांना - अनुगतः - अनुसरून मागोमाग धावत जाणारा - श्रान्तः - थकलेला - क्षुधितः - भुकेलेला - भृशं - व फारच - तृषितः - तहानलेला असा होत्साता - जलाशयं - सरोवराला - अचक्षाणः - न पाहणारा - तं - त्या - आश्रमं - आश्रमाला - प्रविवेश - गेला - आसीनं - व बसलेल्या - शान्तं - शांत - मीलितलोचनं - डोळे मिटलेल्या - मुनिं - ऋषीला - ददर्श - पाहता झाला.॥२४-२५॥ विशुष्यत्तालुः - ज्याची ताळू सुकून गेली आहे असा तो राजा - प्रतिरुद्धेंद्रियप्राणमनोबुद्धिं - ज्याने आपली इंद्रिये, प्राण, मन व बुद्धि यांचे योगसामर्थ्याने नियमन केले आहे - उपारतं - शांतपणाला प्राप्त झालेल्या - स्थानत्रयात् - तीनही अवस्थांतून - परं - पलीकडील चौथ्या अवस्थेला - प्राप्तं - पोचलेल्या - ब्रह्मभूतं - ब्रह्मरूप झालेल्या - अविक्रियं - विकारशून्य - विप्रकीर्णजटाच्छन्नं - जिकडेतिकडे विस्कळीत झालेल्या जटांनी आच्छादिलेल्या - च - आणि - रौरवेण - रुरु नावाच्या मृगाच्या - अजिनेन - कातडे पांघरलेल्या - तथाभूतं - तशा तर्हेच्या ऋषीजवळ - उदकं - पाणी - अयाचत - मागू लागला.॥२६-२७॥ अलब्धतृणभूम्यादिः - गवताचे आसन किंवा पृथ्वीवरील कोणतेही आसन न मिळालेला - असंप्राप्तार्घ्यसूनृतः - अर्ध्यपाद्यादिकाने किंवा मधुर भाषणाने ज्याचा सत्कार झाला नाही असा - आत्मानं - स्वतःला - अवज्ञातं - अपमानिलेल्या - इव - प्रमाणे - मन्यमानं - मानणारा - ह - फारच - चुकोप - रागावला.॥२८॥ ब्रह्मन् - शौनक हो ! - क्षुत्तृडभ्यां - भुकेने व तहानेने - अर्दितात्मनः - व्याकुळ झालेल्या राजाचा - ब्राह्मणं - ब्राह्मणाला - प्रति - उद्देशून - अभूतपूर्वः - पूर्वी कधीही अशा रीतीने उत्पन्न न झालेला - मत्सरः - मत्सर - च - आणि - मन्युः - क्रोध - एव - ही - सहसा - एकाएकी - अभूत् - उत्पन्न झाला.॥२९॥ विनिर्गच्छन् - तेथून निघणारा - सः - तो - तु - तर - रुषा - रागावून - धनुष्कोटया - धनुष्याच्या टोकाने - ब्रह्मऋषेः - ब्रह्मर्षींच्या - अंसे - खांद्यावर - गतासुं - मेलेल्या - उरगं - सापाला - निधाय - ठेवून - पुरं - नगराला - आगमत् - आला.॥३०॥ मीलितेक्षणः - डोळे मिटलेला - एषः - हा मुनि - निभृताशेषकरणः - खरोखरच सर्व इंद्रिये ताब्यात ठेविलेला असा - किं - आहे काय ? - आहोस्वित् - किंवा - समाधिः - समाधियोग - मृषा - खोटाच आहे - नु - कारण - क्षत्रबन्धुभिः - ह्या क्षुद्र क्षत्रियांकडून - किं स्यात् - आमचे काय होणार आहे ?॥३१॥ अतितेजस्वी - फारच तपश्चर्येच्या तेजाने युक्त असा - बालकः - लहान - तस्य - त्या मुनीचा - पुत्रः - पुत्र - अर्भकैः - बरोबरीच्या मुलांशी - विहरन् - खेळत असता - राज्ञा - राजाने - अघं - आगळिकेला - प्रापितं - नेलेल्या - तातं - बापाबद्दल - श्रुत्वा - ऐकून - तत्र - त्याच ठिकाणी - इदं - हे - अब्रवीत् - बोलला.॥३२॥ अहो - किती हो ! - बलिभुजा - कावळ्यांच्या - इव - प्रमाणे - शुन - कुत्र्यांच्या - इव - प्रमाणे - पीव्नां - माजलेल्या - पालानां - राजांचा - अधर्मः - अधर्म - यत् - जसे - द्वारपानां - द्वाररक्षक अशा - दासानां - नोकरांचे - स्वामिनि - धन्याविषयी - अघं - वाईट चिंतन. ॥३३॥ हि - खरोखर - क्षत्रबन्धुः - साधारण क्षत्रिय राजा - ब्राह्मणैः - ब्राह्मणांनी - द्वारपालः - द्वाररक्षक असा - निरूपितः - नेमिला आहे - सः - तो - द्वाःस्थः - दरवाजावर उभा राहून - तद्गृहे - त्यांच्या घरात - सभाण्डं - मूळच्या भांडवलासह त्याला - कथं - कसा - भोक्तुं - खाण्याला - अर्हति - योग्य होतो. ॥३४॥ तत् - म्हणून - उत्पथगामिनां - दुर्मार्गानी चालणार्य़ाचा - शास्तरि - शासनकर्ता - भगवति - सर्वगुणसंपन्न भगवान - कृष्णे - श्रीकृष्ण - गते - निजधामाला गेला असता - अद्य - आज - अहं - मी - भिन्नसेतून् - धर्म-मर्यादा उल्लंघणार्या - शास्मि - शिक्षा करितो - मे - माझ्या - बलं - सामर्थ्याला - पश्चत - पाहा.॥३५॥ रोषताम्राक्षः - क्रोधाने लाल डोळे केलेला असा मुनिपुत्र - वयस्यान् - बरोबरीच्या - ऋषिबालकान् - मुनिपुत्रांना - इति - याप्रमाणे - उक्त्वा - बोलून - कौशिक्याः - कौशिकी नावाच्या किंवा विश्वामित्री नदीच्या - अपः - उदकाला - उपस्पृश्य - आचमनादि विधीने स्पर्श करून - ह - खरोखर - वाग्वज्रं - वज्राप्रमाणे तीक्ष्ण व न बदलणार्या वाणीला - विससर्ज - सोडता झाला. ॥३६॥ - इति - याप्रमाणे - लङ्घितमर्यादं - धर्म-मर्यादा उल्लंघिणार्या - कुलाङ्गार - आपल्या कुलाला बट्टा लावणार्या - ततद्रुहं - पित्याशी वैर करणार्याला - मे - माझ्याकडून - चोदितः - प्रेरणा केलेला म्हणजे पाठविलेला - तक्षकः - तक्षक नावाचा साप - सप्तमे - सातव्या - अहनि - दिवशी - दंक्ष्यति स्म - डसेल. ॥३७॥ बालः - मुनिपुत्र - ततः - तेथून - आश्रमं - आश्रमाला - अभ्येत्यः - येऊन - गलेसर्पकलेवरं - ज्याच्या गळ्यात सापाचा मृत देह लोंबत आहे अशा - पितरं - बापाला - वीक्ष्य - पाहून - दुःखार्तः - फारच दुःखाने पीडिलेला होऊन - मुक्तकण्ठः - व अगदी गळा मोकला करून - रुरोद ह - रडू लागला. ॥३८॥ ब्रह्मन् - शौनका - वा सः - आणि तो - आङ्गिरसः - अंगिरसकुळात उत्पन्न झालेला मुनि - सुतविलापनं - पुत्राच्या रडण्याला - श्रुत्वा - ऐकून - शनकैः - हळूहळु - नेत्रे - दोन डोळे - उन्मील्य - उघडून - स्वांसे - आपल्या खांद्यावर - मृतोरगं - मेलेल्या सापाला - दृष्ट्वा - पाहून - विसृज्य - टाकून - पुत्रं - मुलाला - पप्रच्छ - विचारू लागला - वत्स - हे पुत्रा ! - हि कस्मात् - कशाकरिता - रोदिषि - रडतोस - वा - किंवा - केन - कोणी - ते - तुझे - प्रतिकृतं - वाईट केले - इति - याप्रमाणे - उक्तः - बोललेला - सः - तो मुनिपुत्र - न्यवेदयत् - कथन करू लागला. ॥३९-४०॥ सः - तो - ब्राह्मणः - ब्राह्मण - अतदर्ह - त्या शापाला अयोग्य अशा - नरेन्द्रं - राजाला - शप्तं - शापिले असे - निशम्य - ऐकून - आत्मजं - मुलाला - न अभ्यनन्दत् - न प्रशंसिता झाला - बत - अरेरे ! - अज्ञ - हे मूर्ख पुत्रा ! - अहो - किती हो ! - महत् - मोठे - ते - तुझे - अंहः - पाप - कृतं - घडले - अल्पीयसि - लहानशा - द्रोहे - अपराधाबद्दल - उरुः - मोठा - दमः - दंड - धृतः - योजिलास. ॥४१॥ अविपक्वबुद्धे - ज्याची बुद्धी पूर्णत्वाला पोचली नाही अशा हे पुत्रा ! - वै - खरोखर - पराख्यं - पर म्हणजे श्रेष्ठ ह्या नावांनी ओळखिल्या जाणार्या - नरदेवं - राजाला - नृभिः - मनुष्यांशी - सम्मातुं - तुलना करण्यास - न अर्हसि - योग्य नाहीस - दुर्विषहेण - असह्य अशा - यत्तेजसा - ज्याच्या सामर्थ्याने - गुप्ताः - रक्षिलेल्या - प्रजाः - प्रजा - अकुतोभयाः - निर्भय होऊन - भद्राणि - सुखाला - विन्दन्ति - मिळवितात.॥४२॥ अङ्ग - हे पुत्रा ! - नरदेवनाम्नि - राजा नाव धारण करणारा - रथाङ्गपाणौ - चक्रपाणी विष्णू - अलक्ष्यमाणे - दिसत नाहीसा झाला असता - तदा - त्यावेळी - चौरप्रचुरः - चोरांचा पुष्कळ सुळसुळाट असलेला - अरक्ष्यमाणः - रक्षिला न जाणारा - अयं - हा - लोकः - लोक - हि - खरोखर - अविवरूथवत् - मेंढयांच्या कळपाप्रमाणे - क्षणात् - एका क्षणामध्ये - विनंक्ष्यति - नाश पावले. ॥४३॥ नष्टनाथस्य - नाहीसा झाला आहे स्वामी ज्याचा अशा - वसोः - द्रव्याचा - विलुम्पकात् - अपहार करणार्यापासून - यत् - जे - पापं - पाप - तत् - ते - अद्य - आज - अनन्वयं - आमचा काहीएक संबंध नसता - नः - आम्हाला - उपैति - प्राप्त होते - पुरुदस्यवः - ज्यात पुष्कळसे चोर आहेत असे - जनाः - लोक - परस्परं - एकमेकांत - घ्नन्ति - मारामारी करितात - शपन्ति - शिवीगाळी देतात - पशून् - पशूंना - स्त्रियः - बायकांना - अर्थान् - द्रव्यादि मौल्यवान पदार्थांना - वृञ्जते - लुबाडतात. ॥४४॥ तदा - त्यावेळी - वर्णाश्रमाचारयुतः - चार वर्ण व चार आश्रम यांच्या आचरणांनी युक्त - त्रयीमयः - तीनही वेदांनी उपदेशिलेला - आर्यधर्मः - श्रेष्ठ धर्म - विलीयते - नष्ट होतो - च - आणि - ततः - त्यामुळे - अर्थकामाभिनिवेशितात्मनां - द्रव्यादि पदार्थ व वैषयिक उपभोग्य काम त्यातच ज्यांचे मन गढून गेले आहे अशा - नृणां - मनुष्यात - शुनां - कुत्र्यांच्या - कपीनां - वानरांच्या - इव - प्रमाणे - वर्णसङ्करः - अनुलोमप्रतिलोम जातिमिश्रण होते. ॥४५॥ सः - तो - नरपतिः - राजा - तु - तर - धर्मपालः - धर्मरक्षक - सम्राट् - सार्वभौम - बृहच्छ्रवाः - मोठा कीर्तिवान - साक्षात् - प्रत्यक्ष - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - राजर्षिः - राजा असून ऋषिपणाला पोचलेला - हृयमेधयाट् - अश्वमेघ यज्ञ करणारा - क्षुत्तृट्श्रमयुतः - भुकेने व तहानेने व्याकुळ झालेला व थकलेला - दीनः - स्वभावाने गरीब - अस्मच्छापं - आमच्या शापाला - न एव अर्हति - योग्य नाहीच.॥४६॥ सर्वात्मा - सर्वांच्या हृदयात आत्मस्वरूपाने राहणारा - भगवान् - परमेश्वर - अपक्वबुद्धिना - अपूर्णज्ञानी अशा - बालेन - बाळाने - अपापेषु - पुण्यवान् अशा - स्वभृत्येषु - आपल्या भक्ताचे ठिकाणी - कृतं - केलेल्या - तत् - त्या - पापं - शापदानरूप पापाला - क्षन्तुं - क्षमा करण्यास - अर्हति - योग्य आहे.॥४७॥ तिरस्कृताः - तिरस्कार केलेले - विप्रलब्धाः - फसविलेले - शप्ताः - शाप दिलेले - क्षिप्ताः - निंदिलेले किंवा धिक्कार केलेले - अपि वा - किंवा - हताः - मारलेले - तद्भक्ताः - परमेश्वराचे भक्त वैष्णव - प्रभवः - समर्थ - अपिहि - असूनसुद्धा - अस्य - ह्याच्या - तत् - त्या अपकाराला - न प्रतिकुर्वन्ति - प्रतिकार करीत नाहीत. ॥४८॥ सः - तो - महामुनिः - महर्षि - इति - याप्रमाणे - पुत्रकृता - मुलाने केलेल्या - अघेन - पापाने - अनुतप्तः - पश्चात्तापयुक्त झाला - राज्ञा - राजाने - स्वयं - स्वतः - विप्रकृतः - अपमानरूपी पाप केले असताहि - तत् - त्या - अघं - पापाला - न एव अचिन्तयत् - मनात आणिता झाला नाहीच. ॥४९॥ प्रायशः - बहुतकरून - लोके - जगामध्ये - साधवः - सत्पुरुष - द्वंद्वेषु - सुखदुःखादि द्वैतात - परैः - दुसर्यांनी - योजिताः - योजिलेले असता - न व्यथंति - दुःखी होत नाहीत - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत - यतः - कारण - आत्मा - आत्मा - अगुणाश्रयः - त्रिगुणाला सोडून राहणारा आहे. ॥५०॥ अध्याय अठरावा समाप्त |