|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १७ वा - अन्वयार्थ
महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन - तत्र - तेथे - राजा - परीक्षित राजा - अनाथवत् - अनाथाप्रमाणे - हन्यमानं - मारिल्या जाणार्या - गोमिथुनं - गाईच्या जोडप्याला म्हणजे गोरूपधारी पृथ्वीला व वृषभरूपधारी धर्माला - च - आणि - दण्डहस्तं - हातात दंड धारण करणार्या - नृपलाञ्छनम् - राजचिन्हे धारण केलेल्या - वृषलं - शूद्राला - दृश्ये - पाहता झाला. ॥१॥ कार्तस्वरपरिच्छदं - सुवर्णालंकारांनी मढविलेल्या - रथं - रथात - आरूढः - बसलेला - समारोपितकार्मुकः - धनुष्य सज्ज केलेला - मृणालधवलं - कमलतंतूप्रमाणे पांढर्या - विभ्यतं - भ्यालेल्या - मेहन्तम् इव - म्हणूनच मुतणार्या - वेपमानं - थरथर कापणार्या - एकेन - एका - पदा - पायामुळे - सीदन्तं - दुःख करणार्या - शूद्रताडितम् - शूद्र ज्याला मारीत आहे अशा - वृषं - बैलाला - च - आणि - धर्मदुधां - धर्मरूपी दुधाला देणार्या - दीनां - दीन - भृशं - फारच - शूद्रपदाहतां - जिला शूद्र पायाने लाथा मारीत आहे अशा - विवत्सां - वासरू नसलेल्या - साश्रुवदनां - जिच्या मुखावर अश्रुधारा वाहत आहेत अशा - क्षामां - कृश झालेल्या - यवसं - गवताला - इच्छतीं - इच्छिणार्या - गां - गाईला - मेघगम्भीरया - मेघाप्रमाणे गंभीर अशा - वाचा - वाणीने - पप्रच्छ - विचारू लागला. ॥२-४॥ मच्छरणे - माझ्या आश्रयाखाली असणार्या - लोके - ह्या लोकांत - बलात् - बलात्काराने - अबलान् - निर्बल अशांना - हंसि - मारतोस - बली - बलाढय असा - त्वं - तू - कः - कोण - नटवत् - नाटक्याप्रमाणे - वेषेण - पोषाखाने - नरदेवः - राजा - कर्मणा - व कृतीने - अद्विजः - शूद्र - असि - आहेस. ॥५॥ गांडीवधन्वना - अर्जुनाशी - सह - सहवर्तमान - कृष्णे - श्रीकृष्ण - दूरं - लांब निजधामाला - गते - गेला असता - रहसि - एकांतात - अशोच्यान् - निरपराधी अशांना - प्रहरन् - ताडण करणारा - शोच्यः - असा अपराधी - त्वं - तू - कः - कोण - असि - आहेस - वधं - मरण्याला - अर्हसि - योग्य आहेस. ॥६॥ वा - किंवा - मृणालधवलः - कमलतंतूप्रमाणे पांढरा - पादैः - पायांनी - न्यूनः - कमी - पदा - एका पायाने - चरन् - चालणारा - नः - आम्हांला - परिखेदयन - खिन्नता देणारा - त्वं - तू - वृषरूपेण - बैलाचे रूप घेऊन - कश्चित् - कोणी एक - देवः - देव - किं - काय ? ॥७॥ पौरवेन्द्राणां - पुरुकुलात उत्पन्न झालेल्या राजांच्या - दोर्दण्डपरिरम्भिते - बाहुदंडानी आलिंगलेल्या - अस्मिन् - ह्या - भूतले - पृथ्वीवर - ते - तुझ्या - विना - शिवाय - जातु - कधीही - प्राणिनां - प्राण्यांचे - शुचः - शोकजन्य अश्रू - न अनुपतन्ति - पडत नाहीत. ॥८॥ सौरभेय - हे कामधेनूपासून उत्पन्न झालेल्या वृषभा ! - मा अनुशुचः - शोक करू नकोस - ते - तुझे - वृषलात् - शूद्रापासून उत्पन्न होणारे - भयं - भय - व्येतु - नाश पावो - अम्ब - हे गोमाते ! - मयि - मी - खलानां - दुष्टांचा - शास्तरि - शासनकर्ता असता - मा रोदीः - रडू नकोस - ते - तुझे - भद्रं - कल्याण असो. ॥९॥ साध्वि - हे सदाचारसंपन्न गोमाते ! - यस्य - ज्याच्या - राष्ट्रे - राज्यात - सर्वाः - संपूर्ण - प्रजाः - प्रजा - असाधुभिः - दुष्टांकडून - त्रस्यन्ते - पीडिल्या जातात - मत्तस्य - ऐश्वर्याने धुंद झालेल्या - तस्य - त्या राजाची - कीर्तिः - कीर्ति - आयुः - आयुष्य - भगः - ऐश्वर्य - गतिः - व मोक्षादि परलोक - नश्यन्ति - नाश पावतात. ॥१०॥ आर्तानां - पीडिलेल्यांची - आर्तिनिग्रहः - पीडा दूर करणे - एषः - हा - हि - खरोखर - राज्ञां - राजांचा - परः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म - अतः - म्हणून - असत्तमम् - दुष्ट अशा - भूतद्रुहं - प्राण्यांना पीडा देणार्या - एनं - ह्या शूद्राला - वधिष्यामि - ठार मारीन. ॥११॥ चतुष्पद - वास्तविक चार पाय असणार्या हे पशो ! - सौरभेय - कामधेनुपुत्रा वृषभा - कः - कोण - तव - तुझ्या - त्रीन् - तीन - पादान् - पायांना - अवृश्चत् - तोडिता झाला - कृष्णानुवर्तिनां - श्रीकृष्णाला अनुसरणार्या - राज्ञां - राजांच्या - राष्ट्रे - राज्यात - त्वादृशाः - तुझ्यासारखे दुःखी - मा भूवन् - असू नयेत. ॥१२॥ वृष - हे वृषभा ! - अकृतागसां - निरपराधी - साधूनां - व सदाचरणसंपन्न अशा - वः - तुमचे - भद्रं - कल्याण असो - आत्मवैरूप्यकर्तारं - तुझ्या शरीराला कुरूप करणार्याला - पार्थानां - व पांडवांच्या - कीर्तिदूषणम् - कीर्तीला कलंक लावणार्याला - आख्याही - सांग. ॥१३॥ अनागसि - निरपराधी - जने - लोकांचे ठिकाणी - अघं - पापाचरण - युञ्जन् - करणारा - अस्य - अशास - सर्वतः - सर्वप्रकारे - मद्भयं - माझ्यापासून भीती आहे - च - आणि - असाधुदमने - दुष्टांचा नाश - कृते - केला असता - साधूनां - सज्जनांचे - भद्रम् एव - कल्याणच - स्यात् - होईल. ॥१४॥ यः - जो - निरङ्कुशः - निर्भय होत्साता - इह - येथे - अनागस्सु - निरपराधी - भूतेषु - प्राणिमात्रांचे ठिकाणी - आगस्कृत् - अपराध करणारा - साक्षात् - प्रत्यक्ष - अमर्त्यस्यापि - देवांच्या सुद्धा - साङगदं - बाहूभूषणासह - भुजं - दंडाला - आहर्तास्मि - हरण करीन. ॥१५॥ इह - येथे - अनापदि - संकट नसताना - उत्पथान् - सन्मार्गाला सोडून वागणार्या - अन्यान् - दुसर्यांना - यथाशास्त्रं - शास्त्रनियमाप्रमाणे - शासतः - शिक्षा करणार्या - राज्ञः - राजाचा - स्वधर्मस्थानुपालनं - स्वधर्माचरण करणार्यांचे रक्षण करणे - हि - खरोखर - परमः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म होय. ॥१६॥ पाण्डवेयानां - पांडवकुलात उत्पन्न झालेल्या - वः - तुमचे - एतद् - हे - आर्ताभयं - पीडिलेल्यांना निर्भय करणारे - वचः - भाषण - युक्तं - योग्य - भगवान् - सर्वगुणसंपन्न - कृष्णः - श्रीकृष्ण - येषां - ज्यांच्या - गुणगणैः - गुणसमुदायांनी - दौत्यादौ - दूतादिकर्मात - कृतः - नियोजित केला. ॥१७॥ पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा परीक्षित राजा - वाक्यभेदविमोहिताः - भिन्न भिन्न शास्त्रीय प्रमाणभूत वाक्यांनी मोहित झालेले - वयं - आम्ही - यतः - ज्यापासून - क्लेशबीजानि - पीडेची कारणे - स्युः - उत्पन्न होतात - तं - त्या - पुरुषं - पुरुषाला - न विजानीमः - जाणत नाही. ॥१८॥ विकल्पवसनाः - विविध कल्पनारूपी वस्त्रांनी वेढलेले - केचित् - कित्येक - आत्मनः - आत्म्याच्या सुख-दुःखास कारण - आत्मानं - आत्माच - अन्ये - दुसरे - दैवं - दैव - परे - आणखी त्याहून निराळे - कर्म - कर्म - अपरे - कित्येक दुसरे - स्वभावं - स्वभाव - प्रभुं - परमेश्वर - आहुः - असे बोलतात. ॥१९॥ अप्रतर्क्यात् - अनुमानाचा विषय नसल्यामुळे - अनिर्देश्यात् - व अंगुलीने प्रत्यक्ष दाखवता येणारे नसल्यामुळे - केषु अपि - कोणत्याही वस्तूमध्ये - इति - असा - निश्चयः - निश्चय - राजर्षे - हे परीक्षित राजा - अत्र - या बाबतीत - अनुरूपं - योग्य - मनीषया - बुद्धीने - विमृशस्व - विचार करून ठरव. ॥२०॥ द्विजसत्तम - ब्राह्मणश्रेष्ठा शौनका - धर्मे - वृषभरूप घेतलेला धर्म - एवं - याप्रमाणे - प्रवदति - बोलत असता - सम्राट् - सार्वभौम - सः - तो परीक्षित राजा - विखेदः - खेदरहित होऊन - समाहितेन - शांत अशा - मनसा - अंतःकरणाने - तं - त्याला - पर्यचष्ट - बोलला. ॥२१॥ धर्मज्ञ - हे धर्म जाणणार्या वृषभा - धर्मं - धर्मशास्त्राला - ब्रवीषि - सांगतोस - वृषरूपधृक् - वृषभरूपधारी - धर्मः - धर्म - असि - आहेस - यत् - जे - अधर्मकृतः - अधर्म करणार्याचे - स्थानं - ठिकाण - तत् - ते - सूचकस्य - सुचविणार्याचे - अपि - सुद्धा - भवेत् - होईल. ॥२२॥ अथवा - किंवा - नूनं - खरोखर - देवमायायाः - परमेश्वराच्या मायेची - गतिः - गति - भूतानां - प्राणिमात्रांच्या - चेतसः - मनाला - च - आणि - वचसः - वाणीला - अपि - सुद्धा - अगोचरा - समजण्यास कठीण - इति - असे - निश्चयः - निश्चित समजावे. ॥२३॥ तपः - तपश्चर्या - शौचं - शुद्धता - दया - कृपा - सत्यं - खरे - इति - याप्रमाणे - तव - तुझे - पादाः - पाय - प्रकीर्तिताः - सांगितले आहेत - अधर्माशैः - अधर्माचेच अंश अशा - स्मयसङगमदैः - गर्व, आसक्ती, व उन्माद यांनी - त्रयः - तीन - भग्नाः - मोडून गेले. ॥२४॥ धर्म - हे धर्मा ! - इदानीं - हल्ली - ते - तुझा - सत्यं - सत्यनामक - पादः - पाय - यतः - ज्यामुळे - निर्वर्तयेत् - सुरक्षित राहील - तं - त्याला - अधर्मः - धर्माचा नाश करणारा - अनृतेन - असत्याने - ऐधितः - वाढलेला - अयं - हा - कलिः - कलि - जिघृक्षति - धरण्यास इच्छितो. ॥२५॥ च - आणि - इयं - ही - भगवंता - श्रीकृष्णाने - न्यासितोरुभरा - नाहीसा केला आहे पुष्कळ भार जिचा अशी - श्रीमद्भिः - शोभायमान - तत्पदन्यासैः - भगवंताच्या चरणाच्या ठेवण्याने - सर्वतः - सर्व ठिकाणी - कृतकौतुका - सुशोभित केलेली - सती - सदाचारसंपन्न - साध्वी - पतिव्रतेप्रमाणे असणारी - भूः - पृथ्वी - दुर्भगा - विधवा स्त्री - इव - प्रमाणे - अधुना - हल्ली - उज्झिता - सोडलेली होत्साती - अब्रह्मण्याः - ब्राह्मणांचे रक्षण न करणारे - नृपव्याजाः - राजांची सोंगे घेतलेले - शूद्राः - शूद्र - माम् - मला - भोक्ष्यन्ति - भोगतील - इति - असे म्हणून - अश्रुकला - डोळ्यांतून अश्रुधारा सोडणारी - शोचति - शोक करते. ॥२६-२७॥ महारथः - महारथी परीक्षित - इति - याप्रमाणे - धर्मं - वृषभरूपी धर्माला - च - आणि - महीं - गोरूपधारी पृथ्वीला - एव - सुद्धा - सांत्वयित्वा - सांतवून - अधर्महेतवे - अधर्माला कारणीभूत अशा - कलये - कलीकरिता - निशातं - तीक्ष्ण - खडगं - तरवारीला - आददे - घेता झाला. ॥२८॥ - जिघांसुं - मारण्यास इच्छिणार्या - तं - त्या परीक्षिताला - अभिप्रेत्य - जाणुन - नृपलाञ्छनम् - राजचिन्हाला - विहाय - टाकून - भयविह्वलः - भीतीने विव्हळ झालेला - शिरसा - मस्तकाने - तत्पादमूलं - त्याच्या पायाला - समागात् - शरण गेला. ॥२९॥ दीनवत्सलः - दीनांवर दया करणारा - शरण्यः - शरण आलेल्यांचे रक्षण करणारा - श्लोक्यः - ज्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे असा परीक्षित - पादयोः - दोन्ही पायांवर - पतितं - पडलेल्या अशा त्याला - वीक्ष्य - पाहून - कृपया - दयेने - न अवधीत - न मारिता झाला - च - आणि - हसन् - हसणारा - इव - सारखा - इदं - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३०॥ गुडाकेशयशोधराणां - अर्जुनाच्या कीर्तीला धारण करणार्यांपुढे - बद्धाञ्जलेः - हात जोडून उभा राहिलेल्या - ते - तुला - वै - खरोखर - किंचित् - थोडेसुद्धा - भयं - भय - न अस्ति - नाही - भवता - आपण - कथंचन - कोणत्याही कारणाने - मदीये - माझ्या - क्षेत्रे - भूमीत म्हणजे राज्यात - न वर्तितव्यं - राहू नये - त्वं - तू - अधर्मबन्धुः - अधर्मप्रिय आहेस. ॥३१॥ लोभः - लोभ - अनृतं - मिथ्या भाषण - चौर्यं - चोरी - अनार्यं - क्षुद्रपणा - अंहः - पाप - ज्येष्ठा - लक्ष्मीची वडील बहीण अवदसा - च - आणि - माया - कपट - च - आणि - कलहः - भांडण - दम्भः - दंभ - अयं - हा - अधर्मपूगः - अधर्माचा समूह - नरदेवदेहेषु - राजदेहांत - वर्तमानं - वागणार्या - त्वां - तुला - अनुप्रवृत्तः - अनुसरला आहे. ॥३२॥ तत् - त्यामुळे - अधर्मबन्धो - हे अधर्मप्रिय कले - धर्मेण - धर्माने - च - आणि - सत्येन - सत्याने - वर्तितव्ये - वागण्याजोग्या - ब्रह्मावर्ते - ब्रह्मावर्तक्षेत्रांत - न वर्तितव्यं - राहू नयेस - यत्र - जेथे - यज्ञवितानविज्ञाः - यज्ञाच्या विस्ताराला जाणणारे - यज्ञैः - यज्ञांनी - यज्ञेश्वरं - श्रीकृष्णाला - यजन्ति - पूजितात. ॥३३॥ यस्मिन् - जेथे - इज्यमानः - पूजिला गेलेला - भगवान् - सर्वगुणसंपन्न - इज्यामूर्तिः - यज्ञ हीच ज्याची मूर्ति असा - स्थिरजंगमानां - स्थावर म्हणजे वृक्षादि आणि जंगम म्हणजे मनुष्यादि ह्या सर्वांच्या - अन्तः - आत - बहिः - बाहेर - वायुः - वायु - इव - सारखा - आत्मा - सर्वव्यापी - एषः - हा - हरिः - श्रीकृष्ण - यजतां - यज्ञ करणार्यांचे - शं - कल्याण - अमोघान् - व्यर्थ न जाणार्या - कामान् - इच्छा - तनोति - पूर्ण करतो. ॥३४॥ एवं - याप्रमाणे - परीक्षिता - परीक्षित राजाने - आदिष्टः - आज्ञा दिलेला - जातवेपथुः - थरथर कापणारा - सः - तो - कलिः - कलि - उद्यतासिं - हातात तरवार धारण केलेल्या - दण्डपाणिं - यमधर्म - इव - प्रमाणे - उद्यतं - सिद्ध असलेल्या - तं - त्या परीक्षित राजाला - इदं - याप्रमाणे - आह - बोलला. ॥३५॥ सार्वभौम - हे परीक्षित राजा ! - तव - तुझ्या - आज्ञया - आज्ञेने - यत्र - ज्या - क्वचन - कोठेही - वत्स्यामि - राहीन - तत्रतत्रापि - त्या त्या ठिकाणीसुद्धा - आत्तेषुशरासनं - धनुष्यबाण घेतलेल्या - त्वां - तुला - लक्षये - पाहतो. ॥३६॥ धर्मभृतां - धार्मिकात - श्रेष्ठ - श्रेष्ठ अशा हे राजा ! - ते - तुझ्या - अनुशासनं - आज्ञेला - आतिष्ठन् - पाळणारा - नियतः - नियमांनी बद्ध झालेला - यत्र एव - जेथेच - वत्स्ये - राहीन - तत् - ते - स्थानं - स्थान - मे - मला - निर्देष्टुं - दाखविण्यास - अर्हसि - योग्य आहेस. ॥३७॥ तदा - त्यावेळी - अभ्यर्थितः - कलीने प्रार्थना केलेला राजा - तस्मै - त्या - कलये - कलीला - यत्र - जेथे - द्यूतं - जुगार - पानं - दारू पिणे - स्त्रियः - बायका - सूनाः - हिंसा - चतुर्विधः - चार प्रकारचा - अधर्मः - अधर्म - स्थानानि - ती स्थाने - ददौ - देता झाला. ॥३८॥ प्रभुः - समर्थ परीक्षित राजा - च - आणखी - पुनः - फिरून - याचमानाय - मागणी करणार्या कलीला - जातरूपं - सोने - ततः - त्यामुळे - अनृतं - मिथ्या भाषण - मदं - उन्माद - काम - इच्छा - रजः - हिंसादि दोष - च - आणि - पञ्चमम् - पाचवे - वैरं - शत्रुत्व - अदात् - देता झाला. ॥३९॥ अधर्मप्रभवः - अधर्मापासून उत्पन्न झालेला - तन्निदेशकृत् - व राजाच्या आज्ञेप्रमाणे वागणारा - कलिः - कलि - हि - खरोखर - औत्तरेयेण - उत्तरेच्या मुलाने म्हणजे परीक्षित राजाने - दत्तानि - दिलेल्या - अमूनि - ह्या - पञ्च - पाच - स्थानानि - स्थानांना - न्यवसत् - धरून राहिला. ॥४०॥ अथ - यास्तव - बुभूषुः - उत्कर्षाची इच्छा करणारा - पुरुषः - पुरुष - विशेषतः - विशेषेकरून - धर्मशीलः - धार्मिक - राजा - राजा - लोकपतिः - लोकांचा रक्षक - गुरुः - गुरु - एतानि - ह्यांना - क्वचित् - कधीही - न सेवेत् - सेवू नये. ॥४१॥ वृषस्य - वृषभस्वरूपी धर्माच्या - नष्टान् - नष्ट झालेल्या - तपः - तपश्चर्या - शौचं - शुद्धता - दयां - कृपा - इति - अशा - त्रीन् - तीन - पादान् - पायांना - प्रतिसन्दधे - जोडता झाला - च - आणि - महीं - पृथ्वीला - आश्वास्य - शांतवन करून - समवर्धयत् - वाढविता झाला.॥४२॥ एतर्हि - सांप्रत - सः - तो - एषः - हा - अरण्यं - अरण्याला - विविक्षता - प्रवेशण्यास इच्छिणार्या - पितामहेन - आजोबा - राज्ञा - धर्मराजाने - उपन्यस्तं - दिलेल्या - पार्थिवोचितं - राजाला योग्य अशा - आसनं - आसनावर - अध्यास्ते - बसतो. ॥४३॥ कौरवेन्द्रश्रिया - कुरुकुलातील राजांच्या ऐश्वर्याने - उल्लसन् - शोभणारा - चक्रवर्ती - सार्वभौम - बृहच्छ्रवाः - पुष्कळ पुण्यकारक कीर्ति असलेला - महाभागः - मोठा भाग्यवान - सः - तो - राजर्षिः - राजर्षि परीक्षित - अधुना - हल्ली - गजाह्वये - हस्तिनापुरात - आस्ते - राहतो. ॥४४॥ अयं - हा - अभिमन्युसुतः - अभिमन्यूचा पुत्र परीक्षित - नृपः - राजा - इत्थंभूतानुभावः - अशा तर्हेचा पराक्रम करणारा आहे - यस्य - जो - क्षोणीं - पृथ्वीला - पालयतः - रक्षित असता - यूयं - तुम्ही - सत्राय - यज्ञ करण्याकरिता - दीक्षिताः - दीक्षा घेतलेले आहे.॥४५॥ अध्याय सतरावा समाप्त |