श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १३ वा - अन्वयार्थ

विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे -

विदुरः - विदुर - तीर्थयात्रायां - तीर्थयात्रेत - मैत्रेयात् - मैत्रेयापासून - आत्मनः - आत्म्याच्या - गतिं - गतीला म्हणजे ज्ञानाला - ज्ञात्वा - जाणून - तया - त्या गतीने म्हणजे ज्ञानाने - अवाप्तविवित्सितः - ज्ञानेच्छा पूर्ण झालेला असा - हस्तिनापुरं - हस्तिनापुराला - अगात् - प्राप्त झाला. ॥१॥

क्षत्ता - विदुर - कौषारवाग्रतः - मैत्रेयाजवळ - यावतः - जेवढया - प्रश्नान् - प्रश्नांना - कृतवान् - करिता झाला - ह - खरोखर - गोविंदे - श्रीकृष्णावर - जातैकभक्तिः - भक्ति उत्पन्न झालेला - च - आणि - तेभ्यः - त्यांपासून - उपरराम - विराम पावला. ॥२॥

आगतं - आलेल्या - तं - त्या - बंधुं - बंधु अशा विदुराला - दृष्ट्‌वा - पाहून - सहानुजः - भावांसह - धर्मपुत्रः - धर्मराज - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - च - आणि - युयुत्सुः - युयुत्सु - सूतः - सारथी संजय - शारद्वतः - कृपाचार्य - पृथा - कुंती. ॥३॥

ब्रह्मन् - शौनक हो ! - गान्धारी - गांधारी - द्रौपदी - द्रौपदी - सुभद्रा - सुभद्रा - च - आणि - उत्तरा - उत्तरा - कृपी - कृपी - च - आणि - अन्या - दुसर्‍या - जामयः - नातेवाईकाच्या स्त्रिया - पाण्डोः - पांडूच्या - ज्ञातयः - कुळातील - ससुताः - पुत्रांसह - स्त्रियः - स्त्रिया. ॥४॥

तन्वाः - शरीराचा - प्राणं - प्राण - आगतं - आलेल्या - इव - प्रमाणे - प्रहर्षेण - मोठया आनंदाने - प्रत्युज्जग्मुः - सामोर्‍या गेल्या - विधिवत् - अधिकारपरत्वे - परिष्वङ्गाभिवादनैः - आलिंगन व नमस्कार यायोगे - अभिसङ्गम्य - भेट घेऊन. ॥५॥

विरहौत्कण्‌ठयकातराः - वियोगाने उत्पन्न केलेल्या उत्कंठेमुळे विव्हळ असे - प्रेमबाष्पौघं - प्रेमाश्रूंच्या प्रवाहाला - मुमुचुः - सोडते झाले. - राजा - धर्मराज - कृतासनपरिग्रहं - आसनावर बसलेल्या - तं - त्याला - अर्हयाञ्चक्रे - पूजिता झाला. ॥६॥

राजा - धर्मराज - भुक्तवन्तं - भोजन केलेल्या - विश्वान्तं - विसावा घेतलेल्या - च - आणि - आसने - आसनावर - सुखं - सुखाने - आसीनं - बसलेल्या - तं - त्याला - तेषां - ते - शृण्वतां - ऐकत असता - प्रश्रयावनः - आदराने नम्र झालेला असा - प्राह - बोलला. ॥७॥

यत् - जे - समातृकाः - आईसह - विषाग्न्यादेः - विष, अग्नि वगैरे - विपद्‌गणात् - अनेक विपत्तीतून - मोचिताः - मुक्त केले - युष्मत्पक्षच्छायासमेधितान् - तुमच्या पंखांच्या सावलीखाली वाढलेल्या - नः - आम्हाला - स्मरथ - स्मरता - अपि - काय ? ॥८॥

क्षितिमण्डलं - पृथ्वीतलावर - चरद्‌भिः - फिरणार्‍या आपणाकडून - कया - कोणत्या - वृत्त्या - उद्योगाने - वः - स्वतःचे - वर्तितं - उपजीवन केले - इह - ह्या - भूतले - पृथ्वीतलावर - क्षेत्रमुख्यानि - मुख्य मुख्य क्षेत्रांनी युक्त अशी - तीर्थानि - तीर्थे - सेवितानि - सेवन केली. ॥९॥

विभो - हे समर्थ विदुरा ! - स्वयं - स्वतः - तीर्थीभूताः - तीर्थस्वरूपी - भवद्विधाः - तुमच्यासारखे - भागवताः - भगवद्भक्त - स्वान्तःस्थेन - स्वतःच्या अन्तःकरणात राहणार्‍या - गदाभृता - गदा धारण करणार्‍या परमेश्वरामुळे - तीर्थानि - तीर्थांना - तीर्थीकुर्वन्ति - तीर्थपणा देतात. ॥१०॥

तात - बा विदुरा ! - नः - आमचे - सुहृदः - मित्र - बान्धवा - बंधुवर्ग - कृष्णदेवताः - कृष्णाला देव मानणारे - यदवः - यादव - दृष्टाः - पाहिले - वा - किंवा - श्रुताः - ऐकिले - स्वपुर्यां - स्वतःच्या नगरीत - सुखं - सुखरूप - आसते - आहेत - अपि - काय ? ॥११॥

इति - याप्रमाणे - धर्मराजेन - धर्मराजाने - उक्तः - बोललेला - यथा - ज्याप्रमाणे - अनुभूतं - अनुभव घेतलेले - तत् - ते - सर्वं - सगळे - यदुकुलक्षयं - यादवांच्या वंशाच्या नाशाला - विना - सोडून - क्रमशः - अनुक्रमाने - समवर्णयत् - वर्णिता झाला. ॥१२॥

ननु - खरोखर - दुःखितान् - दुःखयुक्त अशांना - द्रष्टुं - पाहण्याला - अक्षमः - असमर्थ - सकरुणः - दयाळू - नृणां - मनुष्यांना - दुर्विषहं - सहन न होणार्‍या - उपस्थितं - प्राप्त झालेल्या - अप्रियं - प्रिय नव्हे अशाला - स्वयं - स्वतः - न आवेदयत् - सांगता झाला नाही. ॥१३॥

अथ - नंतर - देववत् - देवाप्रमाणे - सत्कृतः - सत्कार केलेला - ज्येष्ठस्य - थोरल्या - भ्रातुः - भावाच्या - श्रेयस्कृत् - कल्याण करणारा - सर्वेषां - सर्वांच्या - प्रीतिं - प्रीतीला - आवहन् - धारण करणारा - कञ्चित् - काही एक - कालं - काळपर्यंत - सुखं - सुखाने - अवात्सीत् - राहिला. ॥१४॥

यावत् - जोपर्यंत - यमः - यमधर्म - शापात् - शापामुळे - वर्षशतं - शंभर वर्षे - शूद्रत्वं - शूद्रपणाला - दधार - धरिता झाला - अर्यमा - सूर्य - अघकारिषु - पापी लोकांवर - यथावत् - पूर्वीप्रमाणे - दंण्डं - दंडाला - अबिभ्रत् - धरिता झाला. ॥१५॥

लब्धराज्यः - राज्यप्राप्ति झालेला - युधिष्ठिरः - धर्मराज - कुलंधरं - कुरुवंशाला धरणार्‍या - पौत्रं - नातवाला - दृष्ट्‌वा - पाहून - लोकापालाभैः - लोकापालांप्रमाणे तेजस्वी अशा - भ्रातृभिः - भीमादि भावांशी - परया - श्रेष्ठ अशा - श्रिया - राज्यश्रीने - मुमुदे - आनंदित झाला. ॥१६॥

एवं - याप्रमाणे - गृहेषु - घरात - सक्तानां - आसक्ति ठेवणार्‍यांचा - तदीहया - त्यांच्या इच्छेने - प्रमत्त्तानां - बेसावध असणार्‍यांचा - परमदुस्तरः - तरून जाण्यास अत्यंत कठीण असा - कालः - काल - अविज्ञातः - न समजतांच - अत्यक्रामत् - निघून गेला. ॥१७॥

विदुरः - विदुर - तत् - ते - अभिप्रेत्य - जाणून - धृतराष्ट्रं - धृतराष्ट्राला - अभाषत - बोलला. - राजन् - हे राजा धृतराष्ट्रा ! - शीघ्रं - लवकर - निर्गम्यतां - बाहेर पडा - इदं - ह्या - आगतं - आलेल्या - भयं - भयाला - पश्य - पाहा. ॥१८॥

प्रभो - हे राजा धृतराष्ट्रा ! - इह - येथे - यस्य - ज्याचा - कुतश्चित् - कोठूनही - कर्हिचित् - केव्हाही - प्रतिक्रिया - प्रतिकार - न - नाही. - सः - तो - एव - च - भगवान् - सर्वगुणसंपन्न - कालः - काल - नः - आमच्या - सर्वेषां - सर्वांकडे - समागतः - प्राप्त झाला. ॥१९॥

च - आणि - येन - ज्याने - अभिपन्नः - पीडिलेला - अयं - हा - जनः - लोक - एव - च - प्रियतमैः - फारच आवडत्या - अपि - सुद्धा - प्राणैः - प्राणांसह - सद्यः - तत्काळ - वियुज्येत - वियोगयुक्त होतो - उत - तर मग - अन्यैः - दुसर्‍या - धनादिभिः - द्रव्यादिकांनी - किं - काय ? ॥२०॥

ते - तुझे - पितृभ्रातृसुहृत्पुत्राः - पितर, भाऊ, मित्र व मुलगे - हताः - मेले - वयः - वय - विगतं - गेले - च - आणि - आत्मा - देह - जरया - वृद्धावस्थेत - ग्रस्तः - पीडिलेला - परगेहं - दुसर्‍याच्या घराला - उपाससे - सेवितोस. ॥२१॥

अहो - किती हो ! - जन्तोः - प्राणिमात्रांची - महीयसी - मोठी - जीविताशा - जगण्याची इच्छा - यया - जिने - भवान् - आपण - गृहपालवत् - कुत्र्याप्रमाणे - भीमेन - भीमाने - आवर्जितं - दिलेल्या - पिण्डं - अन्नाच्या गोळ्याला - आदत्ते - घेत आहा. ॥२२॥

येषां - ज्यांना - अग्निः - अग्नि - निसृष्टः - दिला - गरः - विष - दत्तः - दिले - च - आणि - दाराः - स्त्री - दूषिताः - अपमानिली - क्षेत्रं - राज्य - च - आणि - धनं - द्रव्य - हृतं - हरिले - तद्दत्तैः - त्यांनी दिलेल्या - असुभिः - प्राणांनी - कियत् - काय उपयोग ? ॥२३॥

तस्य - त्या - अपि - सुद्धा - कृपणस्य - दीन अशा - जिजीविषोः - जगण्यास इच्छिणार्‍या - अनिच्छतः - इच्छा न करणार्‍या - तव - तुझा - अयं - हा - जीर्णः - क्षीण झालेला - देहः - देह - वाससी - वस्त्रा - इव - प्रमाणे - जरया - वृद्धावस्थेने - परैति - क्षय पावतो. ॥२४॥

विरक्तः - विषयांवर प्रेम न करणारा - मुक्तबंधनः - सर्व सांसारिक बंधनांपासून मुक्त झालेला - अविज्ञातगतिः - ज्याची गति माहीत नाही असा - गतस्वार्थं - स्वार्थत्याग केलेल्या - इमं - ह्या - देहं - देहाला - जह्यात् - सोडील - वै - खरोखर - सः - तो - धीरः - शहाणा - उदाहृतः - म्हटला आहे. ॥२५॥

इह - येथे - यः - जो - स्वकात् - स्वतःकडून - वा - किंवा - परतः - दुसर्‍याकडून - जातनिर्वेदः - विरक्त झालेला - आत्मवान् - आत्मज्ञानी - हृदि - हृदयात - हरिं - परमेश्वराला - कृत्वा - करून - गेहात् - घरातून - प्रव्रजेत् - बाहेर जाईल - सः - तो - नरोत्तमः - श्रेष्ठ पुरुष. ॥२६॥

अथ - नंतर - स्वैः - स्वकीयांनी - अज्ञातगतिः - न जाणला आहे मार्ग ज्याचा असे - भवान् - आपण - उदीचीं - उत्तर - दिशं - दिशेला - यातु - जावे - इतः - येथून - अर्वाक् - पुढे येणारा - कालः - काल - प्रायशः - बहुतेक - पुंसां - पुरुषांच्या - गुणविकर्षणः - गुणांचा नाश करणारा. ॥२७॥

एवं - ह्याप्रमाणे - हि - खरोखर - अनुजेन - कनिष्ठ भाऊ अशा - विदुरेण - विदुराने - बोधितः - उपदेशिलेला - भ्रातृसंदर्शिताध्वा - भावाने ज्याला सन्मार्ग दाखवून दिला आहे असा - प्रज्ञाचक्षुः - बुद्धीच ज्याचे डोळे, अर्थात आंधळा - आजमीढः - अजमीढ वंशात उत्पन्न झालेला - राजा - राजा धृतराष्ट्र - स्वेषु - नातेवाईक जे धर्मराजादि त्यांचे वरील - द्रढिम्नः - बळकट - स्नेहपाशान् - प्रेमपाशाला - छित्वा - तोडून - निश्चक्राम - निघाला. ॥२८॥

च - आणि - साध्वी - सद्धर्माने वागणारी - पतिव्रता - पतिव्रता - सुबलस्य - सुबलराजाची - पुत्री - मुलगी गांधारी - मनस्विनां - थोर पुरुषांच्या - सत्संप्रहारः - धार्मिक वादविवाद - इव - प्रमाणे - न्यस्तदण्डप्रहर्षं - संन्यासी लोकांना आनंद देणार्‍या - हिमालयं - हिमालय पर्वताला - प्रयान्तं - जाणार्‍या - पतिं - पतीला - अनुजगाम - अनुसरती झाली. ॥२९॥

कृतमैत्रः - सूर्योपासना केलेला - हुताग्निः - अग्निपूजा केलेला - अजातशत्रुः - धर्मराज - तिलगोभूमिरुक्मैः - तीळ गाई पृथ्वी व सोने ह्यायोगे - विप्रान् - ब्राह्मणांना - नत्वा - नमस्कार करून - गुरुवन्दनाय - वडिलांच्या पाया पडण्याकरिता - गृहं - घरात - प्रविष्टः - गेला - च - आणि - पितरौ - दोन वडिलांस म्हणजे विदुर व धृतराष्ट्र यांस - च - आणि - सौबलीं - गांधारीला - न अपश्यत् - न पाहता झाला. ॥३०॥

उद्विग्नमानसः - दुःखितान्तःकरण झालेला - तत्र - तेथे - आसीनं - बसलेल्या - सञ्‌जयं - संजयाला - पप्रच्छ - विचारिता झाला. - गावल्गणे - हे संजया ! - वृद्धः - म्हातारा - च - आणि - नेत्रयोः - दोन नेत्रांच्या - हीनः - न्यून - नः - आमचा - तातः - बाबा - क्व - कोठे ? ॥३१॥

हतपुत्रार्ता - मुलगे मेल्यामुळे पीडिलेली - अम्बा - आई गांधारी - च - आणि - सुहृत् - चांगल्या विचाराने युक्त असा - पितृव्यः - चुलता विदुर - क्व - कोठे - गतः - गेला - हतबन्धुः - ज्याचे बांधव मेले आहेत असा - सः - तो धृतराष्ट्र - भार्यया - बायकोसह - अकृतप्रज्ञे - अपूर्ण ज्ञान असणार्‍या - मयि - माझे ठिकाणी - शमलं - अपराधाला किंवा पापाला - आशंसमानः - शंकित होणारा - दुःखितः - व दुःख करणारा - गङगायां - गंगेत - अपतत् - पडला - अपि - काय ? ॥३२॥

पितरि - बाप - पाण्डौ - पांडु - उपरते - परलोकवासी झाला असता - सुहृदः - सदाचारसंपन्न पांडूचे - शिशून् - मुलगे अशा - सर्वान् - सगळ्या - नः - आम्हाला - व्यसनतः - संकटापासून - अरक्षतां - रक्षिले - पितृव्यौ - चुलता व चुलती अर्थात धृतराष्ट्र व गांधारी - इतः - येथून - क्व - कोठे - गतौ - गेली. ॥३३॥

विरहकर्शितः - वियोगाने कृश झालेला - आत्मेश्वरं - आपल्या धन्याला म्हणजे धृतराष्ट्राला - अचक्षाणः - न पाहणारा - अतिपीडितः - फारच पीडित झालेला - सूतः - संजय - कृपया - दयेने - स्नेहवैक्लव्यात् - प्रेमामुळे विव्हळ होऊन - न प्रत्याह - उत्तर देता झाला नाही. ॥३४॥

पाणिभ्यां - दोन हातांनी - अश्रूणि - डोळ्यांतील अश्रूंना - विमृज्य - पुसून - आत्मना - स्वतः - आत्मानं - स्वतःला - विष्टभ्य - धीर देऊन - प्रभोः - धनी जो धृतराष्ट्र त्याच्या - पादौ - दोन पायांना - अनुस्मरन् - स्मरणारा - अजातशत्रुं - धर्मराजाला - प्रत्यूचे - बोलला. ॥३५॥

कुलनंदन - कुरुकुलाला आनंद देणार्‍या हे धर्मराजा ! - अहं - मी - वः - तुमच्या - पित्रोः - वडिलांच्या म्हणजे धृतराष्ट्र व विदुर यांच्या - वा - अथवा - गान्धार्याः - गांधारीच्या - व्यवसितं - मनातील निश्चयात्मक अभिप्रायाला - न वेद - जाणत नाही - महाबाहो - हे आजानुबाहु धर्मराजा ! - महात्मभिः - थोर मनाच्या पुरुषांनी - मुषितः - फसविलेला - अस्मि - आहे. ॥३६॥

अथ - नंतर - सहतुम्बुरुः - तुम्बुरुसह - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - नारदः - नारद - आजगाम - आला - सानुजः - भावांसह धर्मराज - प्रत्युत्थाय - उठून सामोरे जाऊन - अभिवाद्य - नमस्कार करून - अभ्यर्चयन् - पूजा करणारा - इव - अशाप्रमाणे - आह - बोलला. ॥३७॥

भगवन् - सर्वैश्वर्यसंपन्न नारदा ! - अहं - मी - पित्रोः - वडील धृतराष्ट्र व विदुर यांच्या - गतिं - गमनाला - न वेद - जाणत नाही - इतः - येथून - क्व - कोठे - गतौ - गेले - वा - किंवा - तपस्विनी - तप करणारी - हतपुत्रार्ता - पुत्र मारल्यामुळे पीडिलेली - अम्बा - आई गांधारी - क्व - कोठे - गता - गेली - च - आणि - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न असे आपण - अपारे - अफाट समुद्रात - कर्णधारः - नावाडी - इव - अशाप्रमाणे - पारदर्शकः - परतीर दाखविणारे. ॥३८॥

अथ - नंतर - मुनिसत्तमः - ऋषिश्रेष्ठ - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - नारदः - नारद - आबभाषे - बोलले - राजन् - धर्मराजा - कञ्चन - कोणाबद्दलही - मा शुचः - शोक करू नकोस. - यत् - कारण - जगत् - जग - ईश्वरवशं - परमेश्वराधीन. ॥३९॥

इमे - हे - सपालाः - लोकपालासह - लोकाः - सर्व लोक - यस्य - ज्या - इशितुः - परमेश्वराच्या - बलिं - बलीला - वहन्ति - वाहून नेतात. - सः - तो - भूतानि - प्राणिमात्रांना - संयुनक्ति - जोडतो - च - आणि - सः - तो - एव - च - वियुनक्ति - तोडतो. ॥४०॥

यथा - ज्याप्रमाणे - नसि - नाकात - प्रोताः - वेसण घातलेले - गावः - बैल - तन्त्यां - दावणीत - स्वदामभिः - आपल्या दाव्यांनी - बद्धाः - बांधलेले असतात - वाक्तन्त्यां - वेदवाणीरूप दावणीत - नामभिः - नावांनी - बद्धाः - बांधलेले - ईशितुः - परमेश्वराच्या - बलिं - बलीला - वहन्ति - नेतात. ॥४१॥

यथा - ज्याप्रमाणे - क्रीडितुः - खेळणार्‍याच्या - इच्छया - इच्छेने - क्रीडोपस्कराणां - खेळण्याच्या साधनांचा - तथा - त्याप्रमाणे - एव - च - ईशेच्छया - परमेश्वराच्या इच्छेने - नृणां - मनुष्याचे - इह - येथे - संयोगविगमौ - संयोग व वियोग - स्यातां - होतात. ॥४२॥

यत् - जर - लोकं - लोकाला - ध्रुवं - नेहमी टिकणारे - वा - किंवा - अध्रुवं - क्षणिक - च - आणि - उभयं - दोन्हीही - न - नव्हे - मन्यसे - मानतोस - सर्वथा - सर्वप्रकारे म्हणजे काहीही मानिले तरी - मोहजात् - अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या - स्नेहात् - प्रेमाहून - अन्यत्र - व्यतिरिक्त - ते - ते - शोच्याः - शोक करण्याजोगे - नहि - नाहीत. ॥४३॥

अङग - हे धर्मराजा ! - तस्मात् - म्हणून - अज्ञातकृतं - अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या - आत्मनः - स्वतःच्या - वैल्कव्यं - व्याकुळतेला - जहि - टाक - तु - ते असे की - अनाथाः - निराश्रित - च - आणि - कृपणाः - दीन - ते - ते - मां - मला - विना - सोडून - कथं - कसे - वर्तेरन् - जगतील. ॥४४॥

अयं - हा - पाञ्चभौतिकः - पञ्चमहाभूतांपासून बनलेला - देहः - देह - कालकर्मगुणाधीनः - काल, कर्म व गुण ह्यांच्या स्वाधीन - यथा - जसा - सर्पग्रस्तः - सापाने गिळलेला - परं - दुसर्‍याला - तु - तसा तर - अन्यान् - दुसर्‍यांना - कथं - कसा - गोपायेत् - रक्षील. ॥४५॥

अहस्तानि - हात नाहीत असे - सहस्तानां - हात असणार्‍यांचे - अपदानि - पाय नसणारे - चतुष्पदां - चार पायांच्या पश्वादिकांचे - तत्र - त्यात - फल्गूनि - लहान - महतां - मोठयांचे - जीवः - जीव - जीवस्य - जीवाचे - जीवनं - उपजीविकासाधन. ॥४६॥

राजन् - हे धर्मराजा - तत् - ते - इदं - हे - आत्मनां - प्राणिमात्रांचा - आत्मा - सर्वव्यापी जीवस्वरूपी - स्वदृक् - स्वतःला पाहणारा ज्ञानी - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - अन्तरः - आत - अनन्तरः - बाहेर - एकः - एकरूप - मायया - मायेने - उरुधा - पुष्कळ प्रकाराने - भाति - भासतो - तं - त्याला - पश्य - पाहा. ॥४७॥

महाराज - हे धर्मराजा ! - भूतभावनः - प्राणिमात्राचे उत्पादन करून रक्षण करणारा - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - कालरूपः - काळस्वरूपी - सः - तो - अयं - हा - अद्य - आज - सुरद्विषां - दैत्यांच्या - अभावाय - नाशाकरिता - अस्यां - ह्या पृथ्वीतलावर - अवतीर्णः - उत्पन्न झाला. ॥४८॥

देवकृत्यं - देवांचे कार्य - निष्पादितं - संपविले - अवशेषं - उरलेले - प्रतीक्षते - संपण्याची वाट पाहत आहे - इह - येथे - ईश्वरः - परमेश्वर श्रीकृष्ण - यावत् - जोपर्यंत - भवेत् - असेल - तावत् - तोपर्यंत - यूयं - तुम्ही - अवेक्षध्वं - वाट पाहा. ॥४९॥

भ्रात्रा - भावाशी - च - आणि - स्वभार्यया - स्वस्त्री - गांधार्या - गांधारीशी - सह - सहवर्तमान - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - हिमवतः - हिमालय पर्वताच्या - दक्षिणेन - दक्षिण बाजूने - ऋषीणां - ऋषींच्या - आश्रमं - आश्रमाला - गतः - गेला. ॥५०॥

या - जी - स्वर्धुनी - आकाशगंगा - वै - खरोखर - नाना - अनेक - सप्तभिः - सात - स्त्रोतोभिः - प्रवाहांनी - सप्तानां - सप्तर्षींच्या - प्रीतये - प्रीतीकरिता - सप्तधा - सात प्रकारांनी - व्यधात् - विभागून वाहू लागली - सप्तस्रोतः - सप्तस्रोत - प्रचक्षते - म्हणतात. ॥५१॥

अब्भक्षः - पाणी पिऊन राहिलेला - उपशान्तात्मा - मन शांत व स्थिर केलेला - विगतैषणः - निरिच्छ - सः - तो - तस्मिन् - तेथे - अनुसवनं - सकाळ-संध्याकाळ - स्नात्वा - आंघोळ करून - च - आणि - यथाविधि - यथाशास्त्र - अग्नीन् - अग्नीना - हुत्वा - हविर्भाग देऊन - आस्ते - राहिला आहे. ॥५२॥

जितासनः - आसनविधि ज्याने साध्य करून घेतला आहे असा - जितश्वासः - प्राणायामादि विधी करणारा - प्रत्याहृतषडिन्द्रियः - इंद्रियनिग्रह करणारा - हरिभावनया - परमेश्वरावर भक्ति ठेवून - ध्वस्तरजःसत्त्वतमोमलः - रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण हे जे तीन मळ ते ज्याचे पार नाहीसे झाले आहेत असा. ॥५३॥

आत्मानं - मनाला - विज्ञानात्मनि - बुद्धीचे ठिकाणी - संयोज्य - युक्त करून - तं - त्याला - क्षेत्रज्ञे - जीवात्म्यांत - आधारे - जगाला आश्रयभूत अशा - ब्रह्मणि - ब्रह्मात - अम्बरे - आकाशातील - घटाम्बरं - घटाकाश - इव - प्रमाणे - प्रविलाप्य - लीन करून. ॥५४॥

ध्वस्तमायागुणोदर्कः - मायेच्या तीन गुणांच्या फलांना नाहीसे केलेला - निरुद्धकरणाशयः - इंद्रियाच्या विषयांचा रोध केलेला - निवर्तिताखिलाहारः - सर्व आहारांना टाकलेला - स्थाणुः - खांब - इव - प्रमाणे - अचलः - न हालणारा - आस्ते - आहे. ॥५५॥

राजन् - हे धर्मराजा ! - संन्यस्ताखिलकर्मणः - सर्व कर्मे सोडून दिलेल्या - तस्य - त्याच्यामध्ये - अन्तरायः - विघ्नाला कारण - मा एव अभूः - होऊ नकोस - वा - किंवा - सः - तो - अद्यतनात् - आजपासून - परतः - पुढील - पञ्चमे - पाचव्या - अहनि - दिवशी - स्वं - स्वतःच्या - कलेवरं - शरीराला - हास्यति - टाकील - च - आणि - तत् - ते - भस्मीभविष्यति - भस्म होईल. ॥५६॥

सहोटजे - झोपडीसह - पत्युः - पतीचा - देहे - देह - अग्निभिः - अग्नींनी - दह्यमाने - जळून जात असता - बहिः - बाहेर - स्थिता - उभी असलेली - साध्वी - पतिव्रता - पत्नी - स्त्री - तं - त्या - पतिं - पतीला - अनु - अनुसरून - अग्निं - अग्नीत - वेक्ष्यति - प्रवेश करील. ॥५७॥

कुरुनन्दन - हे धर्मराजा ! - विदुरः - विदुर - तु - तर - तत् - त्या - आश्चर्यं - आश्चर्याला - निशाम्य - पाहून - हर्षशोकयुतः - आनंद व शोक ह्यानी युक्त - तीर्थनिषेवकः - तीर्थांचे सेवन करणारा - तस्मात् - तेथून - गन्ता - जाईल. ॥५८॥

सहतुम्बुरुः - तुंबुरुसह - नारदः - नारद - इति - याप्रमाणे - उक्त्वा - बोलून - अथ - नंतर - स्वर्गं - स्वर्गाला - आरुहत् - जाता झाला. - युधिष्ठिरः - धर्मराज - तस्य - त्याचे - वचः - भाषण - हृदि - हृदयात - कृत्वा - साठवून - शुचः - शोक - अजहात् - सोडिता झाला. ॥५९॥

अध्याय तेरावा समाप्त

GO TOP