|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १४ वा - अन्वयार्थ
अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे - बन्धुदिदृक्षया - बन्धुंना पाहण्याच्या इच्छेने - च - आणि - पुण्यश्लोक - पुण्यकीर्तींच्या - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विचेष्टितं - लीलांना - ज्ञातुं - जाणण्याकरिता - च - आणि - जिष्णौ - अर्जुन - द्वारकायां - द्वारकेत - संप्रस्थिते - गेला असता. ॥१॥ तदा - त्यावेळी - कतिचित् - कित्येक - मासाः - महिने - व्यतीताः - गेले - ततः - तेथून - अर्जुनः - अर्जुन - न आयात् - आला नाही. - कुरुद्वहः - कुरुश्रेष्ठ - घोररूपाणि - भयंकर - निमित्तानि - अपशकुन - ददर्श - पाहता झाला. ॥२॥ विपर्यस्तर्तुधर्मिणः - ऋतुधर्माच्या विपरीत कार्य करणार्या - कालस्य - कालाच्या - रौद्रां - भयंकर - गतिं - गतीला - च - आणि - क्रोधलोभानृतात्मनां - क्रोध, लोभ व असत्य ह्यांनी युक्त अशा - नृणां - मनुष्यांच्या - पापीयसीं - पापरूपी - वार्तां - वर्तनांना - जिह्मप्रायं - बहुतेक कपटयुक्त - व्यवहृतं - व्यवहाराला - च - आणि - शाठयमिश्रं - फसवेगिरीच्या - सौहृदं - मैत्रीला - च - आणि - पितृमातृसुहृद्भातृदम्पतीनां - बाप, आई, मित्र व पतिपत्नि यांच्या - कल्कनं - कलहांना - च - आणि - अनुगते - क्रमप्राप्त - काले - कालात - तु - तर - अत्यरिष्टानि - अत्यंत अशुभ - निमित्तानि - अपशकुनांना - नृणां - मनुष्यांच्या - लोभाद्यधर्मप्रकृतिं - लोभादि अधर्म प्रवृत्तीला - दृष्ट्वा - पाहून - नृपः - धर्मराज - अनुजं - भीमाला - उवाच - म्हणाला. ॥३-५॥ बन्धुदिदृक्षता - बंधूना भेटण्याच्या इच्छेने - च - आणि - पुण्यश्लोकस्य - पुण्यकीर्ति अशा - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विचेष्टितं - लीलांना - ज्ञातुं - जाणण्याकरिता - जिष्णुः - अर्जुन - द्वारकायां - द्वारकेत - संप्रेषितः - पाठविला. ॥६॥ भीमसेन - हे भीमा ! - अधुना - हल्ली - सप्त - सात - मासाः - महिने - गताः - गेले - तव - तुझा - अनुजः - धाकटा भाऊ अर्जुन - कस्य - कोणत्या - हेतोः - कारणास्तव - न आयाति - येत नाही - वा - अथवा - अहं - मी - अञ्जसा - वास्तविक रीतीने किंवा चटकन - न वेद - जाणत नाही. ॥७॥ देवर्षिणा - नारदाने - आदिष्टः - सांगितलेला - सः - तो - अयं - हा - कालः - काल - उपस्थितः - प्राप्त झाला - अपि - काय ? - यत् - ज्यामुळे - भगवान् - श्रीकृष्ण - आत्मनः - स्वतःच्या - आक्रीडं - खेळण्याप्रमाणे असणार्या - अङगं - शरीराला - उत्सिसृक्षति - टाकण्यास इच्छितो. ॥८॥ यस्मात् - ज्याच्यामुळे - नः - आम्हाला - संपदः - संपत्ती - राज्यं - राज्य - दाराः - स्त्री - प्राणाः - प्राण - कुलं - कुल व - प्रजाः - संतति - यदनुग्रहात् - ज्याच्या कृपेने - सपत्नविजयः - शत्रूंना जिंकून विजय - च - आणि - लोकाः - लोक - आसन् - मिळाले. ॥९॥ नरव्याघ्र - नरश्रेष्ठा भीमा ! - दिव्यान् - आकाशोत्पन्न - भौमान् - भूमीवर होणार्या - सदैहिकान् - देहासंबंधी - दारुणान् - भयंकर - बुद्धिमोहनं - बुद्धीला मोहित करणार्या - भयं - भीतीला - अदूरात् - जवळच - नः - आम्हाला - शंसतः - सांगणार्या - उत्पातान् - अपशकुनांना - पश्य - पाहा. ॥१०॥ अङ्ग - हे भीमा - पुनःपुनः - वारंवार - उर्वक्षिबाहवः - मांडया, डोळे व दंड - स्फुरन्ति - फुरफुरतात - च - आणखी - अपि - सुद्धा - हृदये - हृदयात - वेपथुः - कंप - मह्यं - मला - आरात् - जवळ - विप्रियं - अनिष्टाला - दास्यन्ति - दाखवितात. ॥११॥ अङ्ग - अहो - अनलानना - अग्नीप्रमाणे मुख असणारी - एषा - ही - शिवा - भालू - उद्यन्तं - उगवणार्या - आदित्यं - सूर्याला - अभिरौति - सामोरी जाऊन रडते - हि - आणखीही - अयं - हा - सारमेयः - कुत्रा - अभीरुवत् - धिटाईने - मां - मला - अभिरौति - सामोरा येऊन रडतो. ॥१२॥ पुरुषव्याघ्र - हे नरश्रेष्ठा - शस्ताः - पवित्र - पशवः - पशु - मां - मला - सव्यं - डाव्या बाजूने - अपरे - दुसरे - दक्षिणं - उजव्या बाजूने - कुर्वन्ति - करतात - च - आणि - मम - माझ्या - वाहान् - घोडयांना - रुदतः - रडणारे असे - लक्षये - पाहतो. ॥१३॥ अयं - हा - मृत्यूदूतः - यमाचा सेवक - कपोतः - पारवा - मनः - मनाला - कम्पयन् - कापविणारा - उलूकः - घुबड - च - आणि - प्रत्युलूकः - कावळा - अनिद्रौ - दोघेही निद्रा न घेता - कुह्वानैः - वाईट शब्दांनी - शून्यं - शून्य करण्याला - इच्छतः - इच्छितात. ॥१४॥ दिशाः - दिशा - धूम्राः - धुरकटलेल्या - परिधयः - चंद्रसुर्याची खळी - च - आणि - सहाद्रिभिः - पर्वतांसह - भूः - पृथ्वी - कम्पते - कापू लागते - च - आणि - स्तनयित्नुभिः - मेघगर्जनेशी - साकं - सहवर्तमान - महान् - मोठा - निर्घातः - वज्रपात - आसीत - झाला आहे. ॥१५॥ खरस्पर्शः - खरखरीत लागणारा - रजसा - धुळीने - तमः - अंधकाराला - विसृजन् - उत्पन्न करणारा - वायुः - वायु - वाति - वाहतो - जलदाः - मेघ - बीभत्सं - ओंगळ - इव - प्रमाणे - सर्वतः - सर्व प्रकारे - असृक् - रक्ताला - वर्षन्ति - वर्षतात. ॥१६॥ हतप्रभं - निस्तेज - सुर्यं - सुर्याला - दिवि - आकाशात - मिथः - एकमेकांत - ग्रहमर्दं - ग्रहांच्या लठ्ठालठ्ठीला - ससङ्कुलैः - एकमेकांत मिसळलेल्या - भूतगणैः - पंचमहाभूतांच्या समूहांनी - रोदसी - अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी व आकाश ह्यांतील पोकळी - ज्वलिते - पेटलेली - इव - अशा प्रमाणे - पश्य - पाहा. ॥१७॥ नद्यः - नद्या - च - आणि - नदा - नद - सरांसि - सरोवरे - च - आणि - मनांसि - मने - क्षुभिताः - खवळून गेली - अग्निः - अग्नि - आज्येन - तुपाच्या योगे - न ज्वलति - पेट घेत नाही - अयं - हा - कालः - काळ - किं - काय - विधास्यति - करण्याचे योजित आहे. ॥१८॥ वत्साः - बालके - स्तनं - स्तनाला - न पिबन्ति - पीत नाहीत - च - आणि - मातरः - माता - न दुह्यन्ति - दूध देत नाहीत. - व्रजे - गोठयात - गावः - गाई - अश्रुमुखाः - अश्रूंनी युक्त मुखे असणार्या - रुदन्ति - रडतात. - ऋषभाः - बैल - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत. ॥१९॥ दैवतानि - देवता - रुदन्ति - रडतात - इव - प्रमाणे - च - आणि - हि - खरोखर - स्विद्यन्ति - घामाघूम होतात - उच्चलन्ति - चलन पावतात - इमे - हे - जनपदाः - देश - ग्रामाः - खेडीपाडी - पुरोद्यानाकराश्रमाः - नगरे, बागा, खाणी व ॠषींचे आश्रम - भ्रष्टश्रियः - शोभारहित - निरानन्दाः - आनंदरहित - नः - आम्हाला - किं - कोणत्या - अघं - संकटांना व पापांना - दर्शयन्ति - दाखवितात. ॥२०॥ नूनं - खरोखर - एतैः - ह्या - महोत्पातैः - मोठमोठया दुश्चिन्हांनी - अनन्यपुरुषश्रीभिः - अद्वितीय शोभणार्या - भगवतः - श्रीकृष्णाच्या - पदैः - पायांनी - हीना - रहित - भूः - पृथ्वी - हतसौभगा - सौंदर्यरहित - मन्ये - मानितो. ॥२१॥ ब्रह्मन् - शौनक हो - दृष्टारिष्टेन - अपशकुनांना अवलोकन करणार्या - चेतसा - अंतःकरणाने - इति - याप्रमाणे - तस्य - तो - राज्ञः - धर्मराज - चिन्तयतः - विचार करीत असता - कपिध्वजः - अर्जुन - यदुपुर्याः - द्वारकेतून - प्रत्यागमत् - परत आला. ॥२२॥ पादयोः - पायांवर - निपतितं - पडलेल्या - अयथापूर्वं - पूर्वीप्रमाणे नसणार्या - आतुरं - भ्यालेल्या - अधोवदनं - खाली तोंड घातलेल्या - नयनाब्जयोः - दोन नेत्रकमळांतून - अब्बिन्दून् - अश्रुबिंदूना - मुञ्चन्तं - टाकणार्या - विच्छायं - निस्तेज - तं - त्या - अनुजं - कनिष्ठ भाऊ अर्जुनाला - विलोक्य - पाहून - उद्विग्नहृदयः - दुःखित अंतःकरण झालेला - नृपः - राजा धर्मराज - नारदेरितं - नारदाच्या भाषणाला - संस्मरन् - स्मरण करणारा - सुहृन्मध्ये - मित्रमंडळीत - पृच्छतिस्म - विचारू लागला. ॥२३-२४॥ आनर्तपुर्यां - द्वारकेत - नः - आमचे - स्वजनाः - आप्तेष्ट - मधुभोजदशार्हार्हाः - मधु, भोज, दशार्ह, अर्ह - सात्वतान्धकवृष्णयः - सात्वत, अंधक व वृष्णि - सुखं - सुखाने - आसते कच्चित् - राहत आहेत ना ? ॥२५॥ अथवा - किंवा - मारिषः - पूज्य - मातामहः - आईचे वडील म्हणजे आजोबा - शूरः - शूरसेन - स्वस्ति - खुशाल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - मातुलः - मामा - आनकदुन्दुभिः - वसुदेव - सानुजः - भावांसह - कुशली - क्षेम - कच्चित् - आहे काय ? ॥२६॥ तत्पत्न्यः - त्याच्या - देवकीप्रमुखाः - देवकी वगैरे पत्न्या - सप्त - सात - स्वसारः - बहिणी - मातुलान्यः - आमच्या मामी - सहात्मजाः - पुत्रांसह - सस्नुषाः - व सुनांसह - स्वयं - स्वतः - क्षेमं - कुशल - आसते - आहेत ? ॥२७॥ असत्पुत्रः - निपुत्रिक - आहुकः - उग्रसेन - राजा - राजा - जिवति कच्चित् - जिवंत आहे का ? - च - आणि - अस्य - ह्याचा - अनुजः - धाकटा भाऊ - हृदीकः - हृदीक - ससुतः - पुत्रांसह - अक्रूरः - अक्रूर - जयन्तगदसारणाः - जयन्त, गद व सारण - च - आणि - ये - जे - शत्रुजिदादयः - शत्रुजित वगैरे - कुशलं - खुशाल - आसते कच्चित् - आहेत का ? - सात्वतां - यादवात - प्रभुः - श्रेष्ठ - भगवान् - सर्वगुणसंपन्न - रामः - बलराम - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे का ? ॥२८-२९॥ सर्ववृष्णीनां - सर्व यादवात - महारथः - महारथी - प्रद्युम्नः - प्रद्युम्न - सुखं - क्षेम - आस्ते - आहे ? - उत - आणि - गंभीररयः - मोठा वेगवान - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - अनिरुद्धः - अनिरुद्ध - च - आणि - सुषेणः - सुषेण - चारुदेष्णः - चारुदेष्ण - च - आणि - जाम्बवतीसुतः - जांबवतीचा मुलगा - साम्बः - साम्ब - च - आणि - अन्ये - दुसरे - कार्ष्णिप्रवराः - श्रेष्ठ श्रेष्ठ कृष्णपुत्र - सपुत्राः - पुत्रांसह - ऋषभादयः - ऋषभ वगैरे - वर्धते - भरभराटीत आहेत ना ? ॥३०-३१॥ तथैव - त्याचप्रमाणे - शौरेः - श्रीकृष्णाचे - अनुचराः - सेवक - श्रुतदेवोद्धवादयः - श्रुतदेव, उद्धव वगैरे - च - आणि - ये - जे - अन्ये - दुसरे - सात्वतर्षभाः - यादवश्रेष्ठ - सुनन्दनन्दशीर्षण्याः - सुनन्द, नन्द व शीर्षण्य - सर्वे - सगळे - रामकृष्णभुजाश्रयाः - बलराम व श्रीकृष्ण यांच्या बाहुबलावर अवलंबून राहणारे - स्वस्ति - खुशाल - आसते अपि - आहेत का ? - बद्धसौहृदाः - प्रेमबद्ध असे - अस्माकं - आमच्या - कुशलं - खुशालीला - स्मरान्तिअपि - स्मरतात का ? ॥३२-३३॥ भगवान् - सर्वगुणसंपन्न - ब्रह्मण्यः - ज्ञानीजनांचे कल्याण करणारा - भक्त-वत्सलः - भक्तांवर प्रेम करणारा - गोविंदः - श्रीकृष्ण - अपि - सुद्धा - सुहृद्वतः - मित्रांसह - पुरे - द्वारकेत - सुधर्मायां - सुधर्मा नावाच्या सभेमध्ये - सुखं - क्षेमकुशल - आस्ते कच्चित् - आहे का ? ॥३४॥ आद्यः - सर्वांच्या आधी उत्पन्न झालेला - अनन्तसखः - शेषावतारी बलराम आहे मित्र ज्याचा असा - पुमान् - पुरुष श्रीकृष्ण - लोकानां - लोकांच्या - मङगलाय - मंगलाकरिता - च - आणि - क्षेमाय - कल्याणाकरिता - च - आणि - भवाय - उत्कर्षाकरिता - यदुकुलाम्भोधौ - यादवरूपी समुद्रात - आस्ते - आहे. ॥३५॥ अर्चिताः - पूजिलेले - यदवः - यादव - यद्वाहुदण्डगुप्तायां - ज्याच्या बाहुदंडाने रक्षण केलेल्या - स्वपुर्यां - आपल्या द्वारका नगरीत - महापौरुषिकः - विष्णूच्या पार्षदगण - इव - प्रमाणे - परमानन्दं - मोठया आनंदाने - क्रीडन्ति - खेळतात. ॥३६॥ सत्यादयः - सत्यभामा वगैरे - ह्यष्टसहस्त्रयोषितः - सोळा हजार स्त्रिया - यत्पादशुश्रूषणमुख्यकर्मणा - ज्या श्रीकृष्णाच्या चरणसेवारूपी मुख्य कर्माने - संख्ये - युद्धात - त्रिदशान् - देवांना - निर्जित्य - जिंकून - वज्रायुधवल्लभोचिताः - इंद्राच्या स्त्रियांना योग्य अशा - तदाशिषः - त्यांच्या भोग्य वस्तु - हरन्ति - हरितात. ॥३७॥ हि - खरोखर - यद्वाहुदण्डाभ्युदयानुजीविनः - ज्याच्या बाहुदंडाच्या पराक्रमावर अवलंबून राहिलेले - अकुतोभयाः - निर्भय - युदुप्रवीराः - यादवश्रेष्ठ - बलात् - जबरदस्तीने - आहृतां - आणलेल्या - सुरसत्तमोचितां - देवश्रेष्ठांनाच योग्य अशा - सुधर्मां - सुधर्मा नावाच्या - सभां - सभेला - अङ्घ्रिभिः - पायांनी - मुहुः - वारंवार - अधिक्रमन्ति - तुडवितात म्हणजे पादाक्रांत करितात. ॥३८॥ तात - बाबा अर्जुना - ते - तुझे - अनामयं - आरोग्य - कच्चित् - आहे काय - मे - मला - भ्रष्टतेजाः - निस्तेज - विभासि - भासतोस - तात - बाबा - चिरोषितः - फार दिवस राहिलेला - अलब्धमानः - अपमानिलेला - अवज्ञातः - तिरस्कार केलेला - किंवा - काय ? ॥३९॥ अमंगलैः - अशुभ - अभावैः - व प्रेमशून्य अशा - शब्दादिभिः - शब्दादिकांनी - अभिहतः - ताडिलेला - न कच्चित् - नाहीस ना - यत् - जे - आशया - आशा दाखवून - प्रतिश्रुतं - वचनपूर्वक - उक्तं - सांगितलेले - अर्थिभ्यः - याचक लोकांना - न दत्तं - दिले नाहीस काय ? ॥४०॥ शरणप्रदः - शरणागतांचा आश्रय - त्वं - तू - ब्राह्मण - ब्राह्मणाला - बालं - बालकाला - गां - गाईला - वृद्धं - वृद्धाला - रोगिणं - रोग्याला - स्त्रियं - स्त्रीला - शरणोपसृतं - शरणागत - सत्त्वं - प्राण्याला - न अत्याक्षीः - उपेक्षिले नाहीस - कच्चित् - ना ? ॥४१॥ त्वं - तू - अगम्यां - गमनास अयोग्य अशा - स्त्रियं - स्त्रीशी - वा - किंवा - गम्यां - गमनयोग्य स्त्रीला - असत्कृतां - अनादर करून - न अगमः - गमन केले नाहीस - कच्चित् - ना ? - अथवा - किंवा - भवान् - आपण - नोत्तमैः - श्रेष्ठ नव्हे अशा - नासमैः - नीचांनी - पथि - वाटेत - पराजितः - जिंकिला गेलास काय ? ॥४२॥ अपिस्वित् - आणखीही - त्वं - तू - संभोज्यान् - भोजन देण्यास योग्य अशा - वृद्धबालकान् - वृद्ध व मुले ह्यांना - पर्यभुंक्थाः - सोडून भोजन केलेस काय ? - यत् - जे - अक्षमं - अनुचित - किंचित् - थोडे तरी - जुगुप्सितं - निंद्य - कर्म - कृत्याला - म कृतवान् - केले नाहीस ना ? ॥४३॥ अथ कच्चित् - अथवा असे आहे काय ? - प्रेष्टतमेन - अत्यंत प्रिय - आत्मबन्धुना - स्वतःचा बंधु आशा - हृदेन - हृदयाने - रहितः - रहित - शून्यः - शून्य - अस्मि - आहे - नित्यं - नेहमी - मन्यसे - मानतोस - अन्यथा - त्याशिवाय - ते - तुला - रुक् - रोग - न - नाही. ॥४४॥ अध्याय चवदावा समाप्त |