|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १० वा - अन्वयार्थ
श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन - स्वरिक्थस्पृधः - आपल्या संपत्तीचा हेवा करणार्या - आततायिनः - व शस्त्रास्त्रे हातात धरून तयार झालेल्यांना - हत्वा - मारून - प्रत्यवरुद्ध भोजनः - राज्योपभोग ज्याने परत मिळविले आहेत असा - धर्मभृतां - धार्मिकात - वरिष्ठः - श्रेष्ठ - युधिष्ठिरः - धर्मराज - अनुजैः - कनिष्ठ भावांशी - सह - सहवर्तमान - कथं - कशा रीतीने - प्रवृत्तः - आपल्या उदयोगाला लागला - ततः - नंतर - किं - काय - अकारषीत् - करता झाला. ॥१॥ वंशदवनाग्निनिर्हृतं - वंशरूपी अरण्यात पेटलेल्या अग्नीने बहुतेक नष्ट केलेल्या - कुरोः - कुरूच्या - वंशं - कुळाला - संरोहयित्वा - अंकुरित करून - ह - त्याचप्रमाणे - युधिष्ठिरं - धर्मराजाला - निजराज्ये - स्वतःला राज्यासनावर - निवेशयित्वा - स्थापून - भवभावनाः - संसाराला प्रोत्साहन देणारा - ईश्वरः - सर्वैश्वर्यसंपन्न - हरिः - श्रीकृष्ण - प्रीतमनाः - आनंदित - बभूव - झाला. ॥२॥ भीष्मोक्तं - भीष्माचार्यांनी केलेला उपदेश - अथ - आणि नंतर - अच्युतोक्तं - श्रीकृष्णाचे भाषण - निशम्य - ऐकून - प्रवृत्तविज्ञानविधूतविभ्रमः - उत्पन्न झालेल्या विशिष्ट ज्ञानाने नाहीसा झाला आहे मोह ज्याचा असा - अजिताश्रयः - श्रीकृष्ण आहे आश्रय ज्याचा असा - अनुजानुवर्तितः - कनिष्ठ भावांनी अनुसरलेला - इन्द्रः - इंद्र - इव - प्रमाणे - परिध्युपान्तां - समुद्राच्या मर्यादेने वेढिलेल्या - गां - पृथ्वीला - शशास - पालिता झाला.॥३॥ पर्जन्यः - पाऊस - कामं - पुष्कळ - ववर्ष - वृष्टी करिता झाला - मही - पृथ्वी - सर्वकामदुधा - सर्व इष्ट वस्तु देणारी - ऊधस्वतीः - दुधाने भरलेल्या कांसा आहेत ज्यांच्या अशा - गावः - गाई - मुद्रा - आनंदाने - पयसा - दुधाच्या योगे - व्रजान् - गोठयांना - सिषिचुःस्म - सिंचन करित्या झाल्या. ॥४॥ तस्य - त्याच्या - नदयः - नदया - समुद्राः - समुद्र - गिरयः - पर्वत - सवनस्पतिवीरुधः - वनस्पती व वेली ह्यांसह - सर्वां - सर्व - ओषधयः - औषधी - वै - खरोखर - कामं - पुष्कळ - अन्वृतु - ऋतुपरत्वे - फलन्ति - फल देत असत. ॥५॥ अजातशत्रौ - धर्मराज - राज्ञि - राजा असता - जन्तुनां - प्राण्यांना - कर्हिचित् - कधीही - आधयः - मानसिक काळजी - व्याधयः - किंवा शारीरिक पीडा - दैवभूतात्महेतवः - आणि देवता, भूतप्रेतादि व शरीरादि ह्यांपासून उत्पन्न होणारे - क्लेशाः - त्रास - न अभवन् - झाले नाहीत. ॥६॥ हरिः - श्रीकृष्ण - सुहृदां - मित्रांचा - विशोकाय - शोक दूर करण्याकरिता - च - आणि - स्वसुः - बहिणीचे - प्रियकाम्यया - प्रिय करण्याकरिता - च - आणि - कतिपयान् - कित्येक - मासान् - महिने - हस्तिनपुरे - हस्तिनापुरात - उषित्वा - राहून. ॥७॥ च - आणि - आमन्त्र्य - विचारून - अभ्यनुज्ञातः - परवानगी दिलेला - तं - त्याला - परिष्वज्य - आलिंगन देऊन - अभिवादय - नमस्कार करून - कैश्चित् - कित्येकांनी - परिष्वक्तः - आलिंगन दिलेला - अभिवादितः - नमस्कार केलेला - रथं - रथावर - आरुरोह - चढून बसला. ॥८॥ सुभद्रा - सुभद्रा - द्रौपदी - द्रौपदी - कुन्ती - कुंती - तथा - त्याप्रमाणे - विराटतनया - विराटाची मुलगी उत्तरा - गान्धारी - गांधारी - च - आणि - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - युयुत्सुः - युयुत्सु - गौतमः - कृपाचार्य - यमौ - दोघे नकुल व सहदेव ॥९॥ वृकोदरः - भीम - च - आणि - धौम्यः - धौम्य - च - आणि - मत्स्यसुतादयः - मत्स्यराज विराटाची कन्या उत्तरा आणि इतर - स्त्रियः - स्त्रिया - विमुह्यन्तः - व मोहित झालेले इतरही - शार्ङ्गधन्वनः - श्रीकृष्णाच्या - विरहं - वियोगाला - न सेहिरे - सहन करते झाले नाहीत. ॥१०॥ यस्य - ज्याचे - रोचनं - आवडते - कीर्त्यमानं - वर्णिलेले - यशः - यश - सकृत् - एकदा - आकर्ण्य - ऐकून - सत्सङ्गात् - साधूंच्या समागमामुळे - मुक्तदुःसंगः - सोडिली आहे दुष्टांची संगत ज्याने असा - बुधः - विव्दान - हातुं - टाकण्याला - न उत्सहते - उदयुक्त होत नाही. ॥११॥ तस्मिन् - त्याचे ठिकाणी - दर्शनस्पर्शसंलापशयनासनभोजनैः - अवलोकन, स्पर्श, भाषण, निजणे, बसणे, भोजन वगैरेंनी - न्यस्तधियः - ठेविली आहे बुद्धि ज्यांनी असे - पार्थाः - पांडव - विरहं - वियोग - कथं - कसे - सहेरन् - सहन करितील. ॥१२॥ स्नेहसंबंद्धाः - प्रेमाने बांधले गेलेले - तं - व त्याकडे - अनुद्रुतुचेतसः - मागोमाग धावत गेली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - अनिमिषैः - न मिटण्यार्या - अक्षैः - डोळ्यांनी - वीक्षन्तः - पाहणारे - ते - ते - सर्वे - सगळे - तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - ह - खरोखर - विचेलुः - फिरू लागले. ॥१३॥ देवकीसुते - श्रीकृष्ण - अगारात् - घरांतून - निर्याति - जात असता - बान्धवस्त्रियः - द्रौपदी वगैरे भाऊबंदांच्या स्त्रिया - अभद्रं - अकल्याण - नोस्यात् - होऊ नये - इति - अशा रीतीने - औत्कंठयात् - उत्कंठेने - उद्गलव्दाष्पं - बाहेर पडणार्या अश्रूंना - न्यरुन्धन् - आतल्या आत दाबून धरित्या झाल्या. ॥१४॥ मृदङ्गशङ्खभेर्यः - मृदंग, शंख व नगारे - च - आणि - वीणापणवगोमुखाः - वीणा, पणव, गोमुख - धुन्धुर्यानकघण्टादयाः - धुंधुरी, आनक, घंटा वगैरे - तथा - तसेच - दुन्दुभयः - दुंदुभी - नेदुः - वाजू लागल्या. ॥१५॥ दिदृक्षया - पाहण्याच्या इच्छेने - प्रासादशिखरारूढाः - वाडयांच्या गच्चीवर चढलेल्या - कुरुनार्यः - कुरुस्त्रिया - प्रेमव्रीडास्मितेक्षणाः - प्रेमाने व लज्जेने स्मितयुक्त झाले आहेत नेत्र ज्यांचे अशा - कृष्णे - श्रीकृष्णावर - कुसुमैः - फुलांनी - ववृषुः - वृष्टी करत्या झाल्या. ॥१६॥ प्रियः - आवडता - गुडाकेशः - अर्जुन - रत्नदण्डं - रत्नांचा दांडा असलेले - मुक्तादामविभूषित - व मोत्यांच्या हारांनी सुशोभित असे - प्रियतमस्य - अत्यंत आवडत्या कृष्णावर - सितातपत्रं - पांढरे छत्र - ह - सुद्धा - जग्राह - धरिता झाला. ॥१७॥ च - आणि - एव - सुद्धा - उद्धवः - उद्धव - सात्यकिः - सात्यकि - परमाद्भुते - फारच आश्चर्यजनक - व्यजने - दोन चवर्या - मधुपतिः - श्रीकृष्ण - कुसुमैः - फुलांनी - विकीर्यमाणः - आच्छादिलेला झाल्यामुळे - पथि - मार्गात - रेजे - शोभला.॥१८॥ तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - व्दिजेरिताः - ब्राह्मणांनी उच्चारिलेले - निर्गुणस्य - गुणरहित अशा - गुणात्मनः - सगुणरूप धारण करणार्याच्या - नानुरूपानुरूपाः - योग्य व अयोग्य असे - च - आणि - सत्याः - खरे - आशिषः - आशीर्वाद - अश्रूयन्त - ऐकू येत होते. ॥१९॥ उत्तमश्लोकचेतसां - श्रीकृष्णावर मन ठेवलेल्या - कौरवेन्द्रपुरस्त्रीणां - कौरवस्त्रियांचे - सर्वश्रुतिमनोहरः - सर्वांच्या कानांना गोड लागणारे - अन्योन्यं - एकमेकांत - संजल्पः - भाषण - आसीत् - सुरू झाले. ॥२०॥ यः - जो - एकः - एकटा - गुणेभ्यः - गुणांच्या - अग्रे - पूर्वी - निमीलितात्मन् - ज्या ठिकाणी सर्व आत्मे लीन झाले आहेत अशा - निशि - प्रलयकाळी - सुप्तशक्तिषु - निजलेल्या शक्तीमध्ये - अविशेषे - तुल्यरूपाने राहणार्या - जगदात्मानि - जगात आत्मरूपाने वावरणार्या - ईश्वरे - ऐश्वर्यसंपन्न अशा - आत्मनि - आत्म्यामधे - वै - खरोखर - आसीत् - असतो - सः - तो - किल - च - अयं - हा - पुरातनः - अत्यंत प्राचीन - पुरुषः - पुरुष॥२१॥ शास्त्रकृत् - शास्त्रे निर्माण करणारा - सः - तो - एव - च - अनामरूपात्मनि - नावे व स्वरूप नाहीत अशा आत्म्यावर - रूपनामनी - स्वरूपे व नावे - विधित्समानः - करण्याची इच्छा करणारा - भूयः - पुनः - निजवीर्यचोदितां - स्वसामर्थ्याने आज्ञा दिलेल्या - स्वजीवमायां - आपल्या अंशभूत जीवाला मोहित करणार्या मायेला - सिसृक्षतीं - उत्पन्न करण्यास इच्छिणार्या - प्रकृतिं - प्रकृतीला - अनुससार - अनुसरला. ॥२२॥ सः - तो - वा - च - अयं - हा - अत्र - ह्या ठिकाणी - जितेन्द्रियाः - इंद्रियनिग्रही - निर्जितमातरिश्वनः - प्राणवायू ताब्यात ठेवणारे - सूरयः - ज्ञानी - भक्त्युत्कलितामलात्मना - भक्तीने प्रफुल्लित अशा शुद्ध अंतःकरणाने - यत्पदं - ज्याच्या चरणाला - पश्यन्ति - पाहतात - ननु - खरोखर - एषः - हा - सत्त्वं - सत्त्वाला - परिमार्षुं - शुद्ध करण्याला - अर्हति - योग्य आहे. ॥२३॥ सखि - हे गडे ! - वा - किंवा - यः - जो - गुह्यवादिभिः - रहस्य सांगणार्यांनी - वेदेषु - वेदांमध्ये - च - आणि - गुह्येषु - उपनिषदांमध्ये - अनुगीतसत्कथः - ज्याच्या रम्य कथा गायन केल्या आहेत असा - एकः - एकटा - ईशः - ऐश्वर्यवान - आत्मलीलया - स्वतःच्या लीलेने - जगत् - जगाला - सृजति - उत्पन्न करितो - अवति - रक्षण करितो - अत्ति - व संहरतो - तत्र - परंतु त्या कृत्यात - न सज्जते - सक्त होत नाही - त्तः - तो - अयं - हा ॥२४॥ यदा - जेव्हा - हि - खरोखर - तमोधियः - अज्ञानबुद्धीचे - नृपाः - राजे - अधर्मेण - अधर्माने - जीवन्ति - जगतात - तत्र - तेथे - युगेयुगे - प्रत्येक युगात - भवाय - सृष्टीचे कार्य सुरळित चालण्याकरिता - रूपाणि - रूपे - दधत् - धारण करणारा - एषः - हा - हि - खरोखर - सत्त्वतः - सत्त्वगुणाने - किल - निःसंशय - भगं - ऐश्वर्य - सत्यं - सत्य - ऋतं - यथार्थ आचरण - दयां - दया - यशः - अद्भुत लीला - धत्ते - धारण करतो. ॥२५॥ अहो - काय हो ! - यदोः - यदूचे - कुलं - कुळ - अलं - फारच - श्लाघ्यतमं - स्तुति करण्यास अत्यंत योग्य आहे - अहो - किती हो ! ! - मधोः - मधूचे - वनं - वन - अलं - अत्यंत - पुण्यतमं - सर्वात पुण्यकारक - यत् - कारण - पुंसां - पुरुषांत - ऋषभः - श्रेष्ठ - श्रियः - लक्ष्मीचा - प्रियः - पति - एषः - हा - स्वजन्मना - स्वतः जन्म घेऊन - च - आणि - चङ्क्रमणेन - संचार करून - अञ्चति - पवित्र करितो. ॥२६॥ अहो - काय हो - बत - खरोखर - स्वर्यशसः - स्वर्गाच्या कीर्तीचा - तिरस्करी - तिरस्कार करणारी - भुवः - पृथ्वीच्या - पुण्ययशस्करी - पुण्यकारक कीर्तीला वाढविणारी - कुशस्थली - द्वारका - यत् - ज्या कारणास्तव - प्रजाः - लोक - यदनुग्रहेषितं - ज्याच्या अनुग्रहाला इच्छिणार्या - स्मितावलोकं - स्मितपूर्वक अवलोकन करणार्या - स्वपतिं - स्वतःच्या स्वामीला - नित्यं - नेहमी - पश्यन्ति स्म - पाहतात. ॥२७॥ सखि - गडे ! - नूनं - खरोखर - अस्य - ह्याच्या - गृहीतपाणिभिः - पाणिग्रहण केलेल्यांनी - व्रतस्नानहुतादिना - व्रते, तीर्थस्थाने व हवने इत्यादिकांनी - ईश्वरः - परमेश्वर - समर्चितः - पूजिला आहे - याः - ज्या - व्रजस्त्रियः - गोपी - हि - खरोखर - यदाशयाः - ज्यावर मन बसल्यामुळे - संमुमुहुः - मोहित झाल्या - मुहुः - वारंवार - अधरामृतं - अधरोष्ठाच्या अमृतप्राय मधुर रसाला - पिबन्ति - पितात. ॥२८॥ हि - खरोखर - शुष्मिणः - बलिष्ठ - चैदयप्रमुखान् - शिशुपाल वगैरेंना - प्रमथ्य - जिंकून - याः - ज्या - प्रदयुम्नसाम्बाम्बसुतादयः - प्रद्युम्न, साम्ब व अंब हे आहेत पुत्र ज्यांचे अशा - वीर्यशुल्केन - पराक्रमरूपी मोल देऊन - स्वयंवरे - स्वयंवरांत - हृताः - हरण केल्या - च - आणि - अपराः - दुसर्या - याः - ज्या - भौमवधे - भौमासुराला मारून - सहस्त्रशः - हजारो - आहृताः - आणिल्या. ॥२९॥ पुष्करलोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा - आहृतिभिः - क्रीडांनी - हृदि - हृदयात - स्पृशन् - स्पर्श करणारा - पतिः - पति श्रीकृष्ण - यासां - ज्यांच्या - गृहात् - घरातून - जातु - कधीही - न अपैति - दूर जात नाही - एताः - ह्या - बत - खरोखर - अपास्तपेशलं - परतंत्र - निरस्तशौचं - व अशुद्ध - स्त्रीत्वं - स्त्रीपणाला - परं - फारच - साधु - चांगले - कुर्वते - करतात. ॥३०॥ सः - तो - हरिः - श्रीकृष्ण - गदन्तीनां - बोलणार्या - पुरयोषितां - हस्तिनापुरातील स्त्रियांच्या - एवंविधा - अशा प्रकारच्या - गिरः - भाषणांना - सस्मितेन - मंदहास्यपूर्वक - निरीक्षणेन - पाहण्याने - अभिनन्दन् - अभिनंदन करीत - ययौ - गेला. ॥३१॥ अजातशत्रुः - धर्मराज - परेभ्यः - शत्रूंच्या बाबतीत - शंकितः - शंका घेऊन - मधुव्दिषः - श्रीकृष्णाच्या - गोपीथाय - रक्षणाकरिता - स्नेहात् - प्रेमाने - चतुरङ्गिणीं - चार प्रकारच्या - पृतनां - सेनेला - प्रायुङ्क्त - योजिता झाला. ॥३२॥ अथ - नंतर - शौरिः - श्रीकृष्ण - दुरागतान् - बरेच दूरपर्यंत मागोमाग आलेल्या - विरहातुरान् - श्रीकृष्णविरहाने दुःखी झालेल्या - दृढं - पुष्कळ - स्निग्धान् - प्रेम करणार्या - कौरवान् - कौरवांना - संनिवर्त्य - परतवून - प्रियैः - मित्रांसह - स्वनगरीं - आपल्या नगरीला म्हणजे व्दारकेला - प्रायात् - गेला. ॥३३॥ कुरुजाङ्गलपाञ्चालान् - कुरुदेश, जागल व पांचाल देश ह्यांना - सयामुनान् - यमुनेच्या काठी असणार्या देशांसह - शूरसेनान् - शूरसेन देशांना - ब्रह्मावर्तं - ब्रह्मावर्त देशाला - कुरूक्षेत्रं - कुरुक्षेत्राला - मत्स्यान् - मत्स्य देशांना - अथ - नंतर - सारस्वतान् - सारस्वत देशांना ॥३४॥ भार्गव - शौनक हो ! - मनाक् - थोडेसे - श्रान्तवाहः - ज्याच्या रथाचे घोडे दमले आहे असा - विभुः - श्रीकृष्ण - मरुधन्वं - मारवाड प्रांताला - अतिक्रम्य - ओलांडून - सौवीराभीरयोः - सौवीर व आभीर ह्या दोन देशांच्या - परान् - पलीकडे असणार्या - आनर्तान् - व्दारका देशाला - उपागात् - प्राप्त झाला. ॥३५॥ ह - खरोखर - तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - तत्रत्यैः - तेथील लोकांनी - प्रत्युदयतार्हणः - नजराणे आणून पूजिलेला - हरिः - श्रीकृष्ण - सायं - संध्याकाळी - पश्चात् - पश्चिमेकडील - दिशं - दिशेला - भेजे - प्राप्त झाला - तदा - त्यावेळी - गविष्ठः - सूर्य - गां - उदकाला - गतः - गेला. ॥३६॥ अध्याय दहावा समाप्त |