श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली
भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक -

अथ - नंतर - सकृष्णाः - श्रीकृष्णासह - ते - ते पांडव - स्त्रियः - स्त्रियांना - पुरस्कृत्य - पुढे करून - संपरेतानां - मेलेल्या - इच्छतां - व इच्छिणार्‍या - स्वानां - आपल्या भाऊबंदांना - उदकं - पाणी - दातुं - देण्याकरिता - गङ्‌गायां - गंगेच्या काठी - ययुः - गेले. ॥१॥

ते - ते - सर्वे - सगळे - उदकं - पाणी - निनीय - नेऊन म्हणजे देऊन - च - आणि - पुनः - वारंवार - भृशं - पुष्कळ - विलप्य - शोक करून - हरिपादाब्जरजःपूतसरिज्जले - भगवंताच्या चरणकमलाच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगोदकात - आप्लुताः - स्नान करते झाले. ॥२॥

माधवः - श्रीकृष्ण - तत्र - तेथे - आसीनं - बसलेल्या - सहानुजं - भावांसह - कुरुपतिं - युधिष्ठिराला - च - आणि - धृतराष्ट्रं - धृतराष्ट्राला - पुत्रशोकार्तां - पुत्रांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या - गांधारीं - गांधारीला - पृथां - कुंतीला - कृष्णा - द्रौपदीला ॥३॥

मुनिमिः - ऋषींसह श्रीकृष्ण - हतबन्धून् - ज्यांचे भाऊबंद मेले आहेत अशा - शुचा - व शोकाने - अर्पितान् - व्याकुल झालेल्या युधिष्ठिरादिकांना - भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - कालस्य - कालाच्या - अप्रतिक्रियां - अपरिहार्य - गतिं - गतीला - दर्शयन् - दाखविणारा असा होत्साता - सान्त्वयामास - सांत्वन करिता झाला. ॥४॥

कितवैः - कपटयांनी - हृतं - हरण केलेल्या - अजातशत्रोः - युधिष्ठिराच्या - स्वं - स्वतःच्या - राज्यं - राज्याला - साधयित्वा - मिळवून देऊन - कचस्पर्शक्षतायुषः - व केस धरल्याने अल्पायु झालेल्या - असतः - आणि मिथ्यामार्गाचा अवलंब केलेल्या - राज्ञः - राजांना - घातयित्वा - मारवून ॥५॥

उत्तमकल्पकैः - चांगल्या रीतीच्या साधनांनी संपादलेल्या - त्रिभिः - तीन - अश्वमेधैः - अश्वमेधांनी - तं - त्याला म्हणजे युधिष्ठिराला - याजयित्वा - यज्ञ करवून - शतमन्योः - इंद्राच्या - इव - प्रमाणे - पावनं - पवित्र - तदयशः - त्याचे यश - दिक्षु - दाही दिशांमध्ये - आतनोत् - पसरविता झाला. ॥६॥

च - आणि - शैनेयोद्‌भवसंयुतः - सात्यकि व उद्धव यांच्या सहवर्तमान - पूजितैः - लोकांनी पुजिलेल्या - व्दैपायनादिभिः - व्यासादि - विप्रैः - ब्राह्मणांनी - प्रतिपूजितः - उलट पूजिलेला श्रीकृष्ण - पांडुपुत्रान् - पांण्डवांना - आमन्‌त्र्य - विचारून म्हणजे त्यांची परत जाण्याविषयी परवानगी घेऊन. ॥७॥

ब्रह्मन् - ब्राह्मण हो ! - व्दारकां - व्दारकेला - गन्तुं - जाण्याला - कृतमतिः - विचार केला आहे ज्याने असा व - रथं - रथांत - आस्थितः - बसलेला - भयविह्‌वलां - भयाने व्याकुळ झालेला - अभिधावन्तीं - व धावत येणार्‍या - उत्तरां - उत्तरेला - उपलेभे - पाहता झाला. ॥८॥

महायोगिन् - हे योगिश्रेष्ठा - देव - हे दैदीप्यमान - देव - देवा ! - जगत्पते - हे जगाच्या पालका ! - पाहि पाहि - रक्षण कर, रक्षण कर - त्वत् - तुझ्याहून - अन्यं - दुसर्‍याला - अभयं - भयनाशक असा - न पश्ये - पाहत नाही - यत्र - जेथे - परस्परं - एकमेकांत - मृत्युः - मृत्यु. ॥९॥

विभो - हे सर्वव्यापी - ईश - परमेश्वरा ! - तप्तायसः - तापलेले आहे अग्र ज्याचे असा - शरः - बाण - मां - माझ्याकडे - अभिद्रवति - धावत येत आहे - नाथ - हे स्वामी श्रीकृष्णा ! - मां - मला - कामं - पुष्कळ - दहतु - जाळो - मे - माझा - गर्भः - गर्भ - मा निपात्यताम् - पाडला न जावो. ॥१०॥

भक्तवत्सलः - भक्तांवर प्रेम करणारा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तस्याः - तिचे म्हणजे त्या उत्तरेचे - वचः - भाषण - उपधार्य - ऐकून - इदं - हे - अपाण्डवं - पाण्डवरहित - कर्तुं - करण्याकरिता - द्रौणेः - द्रोणाचार्यांचा पुत्र जो अश्वत्थामा त्याचे - अस्त्रं - अस्त्र असे - अबुद्‌ध्यत - जाणता झाला. ॥११॥

मुनिश्रेष्ठ - हे ऋषिश्रेष्ठा ! - अथ - नंतर - तर्हि - त्यावेळी - एव - च - पाण्डवाः - पांडव - आत्मनः - स्वतःच्या - अभिमुखान् - समोर येणार्‍या - दीप्तान् - प्रज्वलित झालेल्या - पञ्च - पाच - सायकान् - बाणांना - आलक्ष्य - पाहून - अस्त्राणि - अस्त्रे - उपाददुः - घेते झाले. ॥१२॥

विभुः - सर्वव्यापी श्रीकृष्ण - अनन्यविषयात्मनां - दुसरी कोणाचीही भक्ती न करणार्‍या - तेषां - ज्यांचे म्हणजे त्या पांडवांचे - तत् - ते - व्यसनं - दुःख - वीक्ष्य - पाहून - सुदर्शनेन - सुदर्शन नावाच्या - स्वास्त्रेण - स्वतःच्या अस्त्राने - स्वानां - स्वकीय अशा पांडवांचे - रक्षां - रक्षण - व्यधात् - करिता झाला.॥१३॥

सर्वभूतानां - सर्व प्राण्यांच्या - अन्तस्थः - आत राहणारा - आत्मा - व सर्वाला व्यापून राहिलेला - योगेश्वरः - आणि योगश्रेष्ठ असा - हरिः - श्रीकृष्ण - कुरुतन्तवे - कौरववंशाची वाढ होण्याकरिता - स्वमायया - स्वतःच्या मायेने - वैराटयाः - विराट राजाची कन्या जी उत्तरा तिच्या - गर्भं - गर्भाला - आवृणोत् - आच्छादिता झाला. ॥१४॥

भृगुव्दह - हे भृगुकुलोत्पन्न शौनका ! - यदि - जरी - अपि - हि - ब्रह्मशिरः - ब्रह्मशिरोनामक - अस्त्रं - अस्त्र - अमोघं - फुकट न जाणारे - च - आणि - अप्रतिक्रियम् - ज्याचा नाश होणार नाही असे - तु - तरीही - वैष्णवं - विष्णूसंबंधी - तेजः - तेजाला - आसादय - प्राप्त होऊन - समशाम्यत् - शांत झाले. ॥१५॥

हि - खरोखर - सर्वाश्चर्यमये - सर्व आश्चर्यांनी भरलेल्या - अच्युते - श्रीकृष्णाचे ठिकाणी - एतत् - ह्या - आश्चर्यं - आश्चर्याला - मा मंस्थाः - मानू नकोस - यः - जो - अजः - जन्मरहित श्रीकृष्ण - देव्या - प्रकाशमान अशा - मायया - मायेच्या योगे - इदं - ह्या जगाला - सृजति - उत्पन्न करितो - अवति - रक्षितो - हन्ति - व मारतो.॥१६॥

ब्रह्मतेजोविनिर्मुक्तैः - ब्रह्मतेजापासून मुक्त झालेल्या - आत्मजैः - पुत्रांशी - कृष्णया - द्रौपदीशी - सह - सहवर्तमान - सती - पतिव्रता - पृथा - कुंती - प्रयाणाभिमुखं - व्दारकेला जाण्यास निघालेल्या - कृष्णं - श्रीकृष्णाला - इदं - ह्याप्रमाणे - आह - बोलली. ॥१७॥

पुरुषं - सर्वांच्या शरीरात आत्मरूपाने राहणार्‍या - आदयं - सर्वांहून श्रेष्ठ व सर्वांच्या आदि असणार्‍या - ईश्वरं - सर्व जगाचा स्वामी व ऐश्वर्यवान अशा - प्रकृतेः - मायेहून - परं - निराळ्या - अलक्ष्यं - कोणाच्याही दृष्टीस न पडणार्‍या - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांच्या - अन्तः - आत - बहिः - बाहेर - अवस्थितम् - राहिलेल्या - त्वा - तुला - नमस्ये - नमस्कार करिते. ॥१८॥

अज्ञा - अज्ञानी मी - मायाजवनिकाच्छन्नं - मायारूपी पडदयाने आच्छादिलेल्या - अधोक्षजं - व इंद्रियांना अगोचर अशा - अव्ययम् - अविनाशी - यथा - ज्याप्रमाणे - नाटयधरः - सोंग घेणारा - नटः - नाटकी पुरुष - मूढदृशा - अज्ञानी लोकांच्या दृष्टीने - न लक्ष्यसे - तू ओळखिला जात नाहीस. ॥१९॥

स्त्रियः - आम्ही स्त्रिया - तथा - त्याप्रमाणे - परमहंसानां - वैष्णवधर्म स्वीकारलेल्या - अमलात्मनां - निर्मल अंतःकरणाच्या - मुनीनां - ऋषींच्या - भक्तियोगविधानार्थं - भक्तियोगाचे आचरण करण्याकरिता - कथं - कशा - पश्येमहि - पाहू शकू. ॥२०॥

वासुदेवाय - वसुदेवाचा मुलगा किंवा प्रकाशरूपाने सर्वत्र राहणार्‍या - च - आणि - देवकीनन्दनाय - देवकीला आनंद देणारा पुत्र अशा - नन्दगोपकुमाराय - व नन्द नावाच्या गवळ्याच्या घरी पुत्राप्रमाणे वर्तणार्‍या अशा - गोविन्दाय - व सर्वज्ञ अशा - कृष्णाय - आणि सर्व भक्तांची अंतःकरणे आपल्याकडे ओढुन घेणार्‍या श्रीकृष्णाला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥२१॥

पङ्‌कजनाभाय - ज्याच्या नाभीपासून म्हणजे बेंबीपासून कमळ उत्पन्न झाले अशाला - नमः - नमस्कार असो - पङ्‌कजमालिने - ज्याच्या गळ्यात कमळांची माळ आहे अशाला - नमः - नमस्कार असो - पङ्‌कजनेत्राय - कमळाप्रमाणे नेत्र आहेत ज्याचे अशाला - नमः - नमस्कार असो - पङ्‌कजाङ्‌घ्रये - कमळासारखे आहेत पाय ज्याचे अशा - ते - तुला - नमः - नमस्कार असो. ॥२२॥

हृषीकेश - हे जितेन्द्रिय - विभो - सर्वव्यापी श्रीकृष्णा ! - यथा - ज्याप्रमाणे - खलेन - दुष्ट अशा - कंसेन - कंसाने - अतिचिरं - फार दिवस - रुद्‌धा - बंदिखान्यात ठेवलेली अशी - शुचा - व शोकाने - अर्पिता - पीडीलेली अशी - देवकी - देवकी - च - आणि - सहात्मजा - पुत्रांसह - अहं - मी - नाथेन - स्वामी अशा - त्वया - तुझ्याकडून - एव - च - विपद्‌गणात् - संकटसमूहातून - मुहुः - वारंवार - विमोचिता - मुक्त केली. ॥२३॥

हरे - हे श्रीकृष्णा ! - विषात् - विषापासून - महाग्नेः - मोठया अग्नीपासून - पुरुषाददर्शनात् - माणसे खाणार्‍या राक्षसांच्या दर्शनापासून - असत्सभायाः - दुष्टांच्या सभेपासून - वनवासकृच्छ्रतः - वनवासातील दुःखातून - मृधेमृधे - प्रत्येक युद्धात - अनेकमहारथास्त्रताः - पुष्कळ महारथी वीर पुरुषांनी सोडलेल्या अस्त्रांपासून - च - आणि - द्रौण्यस्त्रतः - अश्वत्थाम्याच्या अस्त्रांपासून - अभिरक्षिताः - रक्षिलेले - आस्म - आहो. ॥२४॥

जगद्‌गुरो - हे जगच्चालका श्रीकृष्णा ! - तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - नः - आम्हाला - शश्वत् - नेहमी - विपदः - आपत्ति - सन्तु - असोत. - यत् - ज्यामुळे - अपुनर्भवदर्शनं - पुनर्जन्मादि उत्पन्न न करणारे - भवतः - आपले - दर्शनं - दर्शन - स्यात् - होते. ॥२५॥

जन्मैश्वर्यश्रुतश्रीभिः - जन्म, ऐश्वर्य, ज्ञान, व संपत्ती ह्यांनी - एधमान मदः - ज्याचा मद म्हणजे गर्व वाढलेला आहे असा - पुमान् - पुरुष - वै - खरोखर - अकिंचनगोचरं - दरिद्री लोकांनाच दिसणार्‍या - त्वां - तुला - अभिधातुं - नामादिकाने वर्णन करण्यास - न एव अर्हती - योग्य होतच नाही. ॥२६॥

अकिञ्चनवित्ताय - दारिद्रय हेच आहे ऐश्वर्य ज्याचे अशा - निवृत्तगुणवृत्तये - व सर्व गुणांचे धर्म जेथून परत फिरले आहेत म्हणजे जो निर्गुण अशाला - नमः - नमस्कार असो. - आत्मारामाय - आत्म्यामध्येच रममाण होणार्‍या - शान्ताय - शांत चित्ताच्या अशा - कैवल्यपतये - व मोक्ष देण्यास समर्थ अशाला - नमः - नमस्कार असो. ॥२७॥

त्वां - तुला - कालं - काल - ईशानं - शंकर - अनादिनिधनं - जन्म, मृत्यू-रहित - विभुं - सर्वव्यापी - सर्वत्र - सर्व ठिकाणी - समं - तुल्य भावनेने - चरन्तं - फिरणारा असे - मन्ये - मानिते - यत् - ज्यामुळे - भूतानां - प्राणिमात्रांच्या - मिथः - एकमेकांत - कलिः - कलह. ॥२८॥

भगवन् - हे श्रीकृष्णा ! - कश्चित् - कोणीही - नृणां - मनुष्यांच्या - विडम्बनम् - अनुकरणाला - ईहमानस्य - करण्याची इच्छा करणार्‍या - तव - तुझ्या - चिकीर्षितं - मनांतील हेतूंना - न वेद - जाणत नाही - कश्चित् - कोणीही - यस्य - ज्याच्या - दयितः - प्रीतीतला - च - आणि - कर्हिचित् - कधीही - व्देष्यः - शत्रू - न अस्ति - नाही - नृणां - मनुष्यांची - मतिः - बुद्धि - यस्मिन् - ज्याविषयी - विषमा - विरुद्ध. ॥२९॥

विश्वात्मन् - जगात आत्मरूपाने राहणार्‍या हे श्रीकृष्णा ! - अजस्य - जन्मरहित अशा - अकर्तुः - व कर्तव्यशून्य अशा - आत्मनः - सर्वव्यापी अशा आत्म्याचे - तिर्यङ्‌नृषिषु - पशु, मनुष्य व ऋषि यांत - यादस्सु - जलचरांत - जन्म - जन्म - च - आणि - कर्म - कर्म - तत् - ते - अत्यन्तविडम्बनम् - फार अनुकरणरूप होय. ॥३०॥

गोपी - गोपी अर्थात यशोदा - त्वयि - तू - कृतागसि - अपराध केला असता - दाम - दावे - आददे - घेती झाली - तावत् - तितक्यात - अश्रुकलिलाञ्जनसम्भ्रमाक्षं - अश्रूंनी युक्त अशा काजळाने बरबटून गेले आहेत डोळे ज्याचे अशा - वक्रं - मुखाला - भयभावनया - भीतीचा आविर्भाव दाखवून - निनीय - खाली घालून - स्थितस्य - राहणार्‍या - ते - तुझी - या - जी - दशा - अवस्था - सा - ती - मां - मला - विमोहयति - मोह उत्पन्न करिते - यत् - ज्याला - भीः - भीति - अपि - सुद्धा - बिभेति - भिते. ॥३१॥

केचित् - कित्येक - प्रियस्य - प्रिय अशा - पुण्यश्लोकस्य - धर्मराजाच्या - कीर्तये - कीर्तीकरिता - यदोः - यदूच्या - अन्ववाये - वंशात - मलयस्य - मलयपर्वताच्या - चन्दनं - चन्दनवृक्षा - इव - प्रमाणे - अजं - जन्मरहित - जातं - उत्पन्न झाला असे - आहुः - बोलतात. ॥३२॥

अपरे - दुसरे - अजः - जन्मरहित - याचितः - प्रार्थना केलेला - त्वं - तू - सुरव्दिषां - दैत्यांच्या - वधाय - नाशाकरिता - च - आणि - अस्य - ह्या जगाच्या - क्षेमाय - कल्याणाकरिता - वसुदेवस्य - वसुदेवाच्या - देवक्यां - देवकीचे ठिकाणी - अभ्यगात् - उत्पन्न झाला. ॥३३॥

अन्ये - दुसरे - हि - खरोखर - आत्मभुवा - ब्रह्मदेवाने - अर्थितः - प्रार्थना केलेला - उदधौ - समुद्रातील - नावः - नौके - इव - प्रमाणे - भूरिभारेण - पुष्कळ ओझ्यामुळे - सीदन्त्याः - दुःखी झालेल्या - भुवः - पृथ्वीच्या - भारावतरणाय - ओझ्याला दूर करण्याकरिता - जातः - उत्पन्न झाला. ॥३४॥

केचन - काही लोक - अस्मिन् - ह्या - भवे - संसारात - अविदयाकामकर्मभिः - अज्ञानाने काम्यकर्मे केल्यामुळे - क्लिश्यमानानां - दुःखित झालेल्यांच्या - श्रवणस्मरणार्हाणि - श्रवणास व स्मरण करण्यास योग्य अशी - करिष्यन् - करणारा - इति - असे समजतात. ॥३५॥

जनाः - लोक - तव - तुझे - ईहितं - इष्ट चरित्र - अभीक्ष्णशः - वारंवार - शृण्वन्ति - ऐकतात - गायन्ति - गातात - गृणन्ति - वर्णन करितात - स्मरन्ति - स्मरण करितात - नन्दन्ति - आनन्दित होतात - ते - ते - एव - च - अचिरेण - लवकर - तावकं - तुझ्या - भवप्रवाहोपरमं - संसार प्रवाहाला बंद करणार्‍या - पदाम्बुजं - चरणकमलाला - पश्यन्ति - पाहतात. ॥३६॥

च - आणि - स्वकृतेहित - आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार्‍या - प्रभो - हे श्रीकृष्णा ! - राजसु - राजांचे ठिकाणी - योजितांहसां - पाप करणार्‍या - येषां - ज्याच्या - भवतः - आपल्या - पदाम्बुजात् - चरणकमलाहून - अन्यत् - दुसरे - परायणं - श्रेष्ठ - न - नाही - अदय - आज - त्वं - तू - अनुजीविनः - अवलंबून राहणार्‍या - सुहृदः - मित्र अशा - नः - आम्हाला - अपि - सुद्धा - जिहाससि - टाकतोस - स्वित् - काय ? ॥३७॥

यर्हि - जरी - ल्हषीकाणां - इन्द्रियांचा - ईशितुः - चालक - इव - प्रमाणे - भवतः - आपले - अदर्शनं - दर्शन घडणार नाही - यदुभिः - यादवांशी - सह - सहवर्तमान - पाण्डवाः - पाण्डुपुत्र - वयं - आम्ही - नामरूपाभ्यां - नावरूपांनी - के - कोण ? ॥३८॥

गदाधर - हे गदा धारण करणार्‍या श्रीकृष्णा ! - यथा - जशी - इदानी - हल्ली - स्वलक्षणविलक्षितैः - स्वतःच्या चिन्हांनी शोभणार्‍या - त्वत्पदैः - तुझ्या पायांनी - अड्‌किता - शोभणारी - इयं - ही - भाति - शोभते - तत्र - तेथे - न शोभिष्यते - शोभणार नाही. ॥३९॥

तव - तुझ्या - वीक्षितैः - अवलोकनामुळे - इमे - हे - सुपक्वौषधिवीरुधः - चांगल्या पिकलेल्या औषधी व वेली ज्यात आहेत असे - जनपदाः - देश - हि - खरोखर - स्वृद्धाः - समृद्ध झालेले आहेत - वनाद्रिनदयुदन्वन्तः - अरण्ये, पर्वत, नदया व समुद्र - एधन्ते - वाढतात. ॥४०॥

अथ - म्हणून - विश्वेश - हे जगत्पते ! - विश्वात्मन् - हे जगाच्या आत्मरूपा ! - विश्वमूर्ते - हे जगात अनेक मूर्तींनी वास्तव्य करणार्‍या श्रीकृष्णा ! - स्वकेषु - स्वकीय अशा - पाण्डुषु - पाण्डवांचे ठिकाणी - वृष्णिषु - व यादवांचे ठिकाणी - इमं - ह्या - मे - माझ्या - दृढं - बळकट अशा - स्नेहपाशं - प्रेमपाशाला - छिन्धि - तोडुन टाक. ॥४१॥

मधुपते - मधु दैत्याच्या अधिपते हे श्रीकृष्णा ! - मे - माझी - अनन्यविषया - दुसरीकडे न जाणारी - मतिः - बुद्धि - गंगा - गंगा - उदन्वति - समुद्रात - ओघं - प्रवाह - इव - प्रमाणे - असकृत् - वारंवार - त्वयि - तुझ्या ठिकाणी - अद्धा - चांगल्या रीतीने - रतिं - प्रीतीला - उव्दहतात् - धारण करो.॥४२॥

कृष्णसख - हे अर्जुनाच्या मित्रा ! - वृष्ण्यृष - हे यादवश्रेष्ठा ? - अवनिघ्रुग्राजन्यवीर्यदहन - पृथ्वीला उपद्रव देणार्‍या राजांच्या पराक्रमाला जाळणार्‍या - अनपवर्गवीर्य - क्षीण होणारे नाही वीर्य ज्याचे असा - गोविन्द - पृथ्वीचे रक्षण करणार्‍या - गोव्दिजसुरार्तिहरावतार - गाई, व्दिज व देव यांच्या पीडा दूर करण्याकरिता अवतार घेणार्‍या - योगेश्वर - हे योगांच्या अधिपते ! - अखिलगुरो - हे त्रैलोक्याच्या गुरो ! - भगवन् - हे षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - श्रीकृष्ण - हे श्रीकृष्णा ! - ते - तुला - नमः - नमस्कार असो. ॥४३॥

इत्थं - याप्रमाणे - पृथया - कुंतीने - कलपदैः - मधुर भाषणांनी - परिणूताखिलोदयः - स्तविला आहे संपूर्ण पराक्रम ज्याचा असा - वैकुण्ठः - श्रीकृष्ण - मायया - मायेने - मोहयन् - मोहित करणारा - इव - अशाप्रमाणे - मन्दं - हळूहळू - जहास - हसला. ॥४४॥

गजसाह्ययं - हस्तिनापुरात - प्रविश्य - शिरून - बाढं - बरे - इति - असे - तां - त्या कुंतीला - च - आणि - स्त्रियः - द्रौपदीप्रमुख स्त्रियांना - उपामन्त्‌त्र्य - विचारून - स्वपुरं - आपल्या नगरीला - यास्यन् - जाण्यास तयार असताही - राज्ञा - धर्मराजाने - प्रेम्णा - प्रेमाने - निवारितः - निवारण केले.॥४५॥

ईश्वरेहाज्ञैः - परमेश्वराची इच्छा न ओळखणार्‍या - व्यासादयैः - व्यासादिकांनी - अद्‌भुतकर्मणा - आश्चर्यकारक कर्म करणार्‍या - कृष्णेन - श्रीकृष्णाने - इतिहासैः - अनेक कथांनी - प्रबोधितः - उपदेशिलेला - अपि - सुद्धा - शुचा - शोकाने - अर्पितः - युक्त झालेला - न अबुध्यत - न समजता झाला. ॥४६॥

विप्राः - ब्राह्मण हो ! - धर्मसुतः - युधिष्ठिर - राजा - राजा - सुहृदां - मित्रांच्या - वधं - नाशाला - चिंतयन् - चिंतणारा - प्राकृतेन - स्वभावतः सात्त्विक अशा - आत्मना - मनामुळे - स्नेहमोहवशं - प्रेमाने मोहाच्या स्वाधीन - गतः - झालेला - आह - बोलला. ॥४७॥

अहो - काय हो ! - दुरात्मनः - दुष्ट अशा - मे - माझ्या - हृदि - हृदयात - रूढं - उत्पन्न झालेले - अज्ञानं - अज्ञान - पश्यत - पाहा. - पारक्यस्य - दुसर्‍याच्या हवाली होणार्‍या - एव - च - मे - माझ्या - देहस्य - देहाकरिता - बह्‌व्यः - पुष्कळ - अक्षौहिणीः - अक्षौहिणी - हताः - मारल्या गेल्या. ॥४८॥

हि - खरोखर - बालव्दिजसुहृन्मित्रपितृभ्रातृगुरुद्रुहः - लहान मुले, ब्राह्मण, साधु, मित्र, वडील, भाऊबंद व गुरु ह्या सर्वांशी वैर करणार्‍या - मे - माझी - वर्षायुतायुतैः - कोटयवधि वर्षांनी - अपि - सुद्धा - निरयात् - नरकातून - मोक्षः - मोकळीक - न स्यात् - होणार नाही. ॥४९॥

प्रजाभर्तुः - प्रजापालक - राज्ञः - राजाचे - धर्मयुद्धे - धर्मयुद्धात - व्दिषां - शत्रूंचे - वधः - मारणे - एनः - पाप - न - नाही - इति - असे - शासनं - आज्ञारूप - वचः - शास्त्रवचन - तु - तर - मे - माझ्या - बोधाय - उपदेशाला - न कल्पते - समर्थ होत नाही.॥५०॥

इह - येथे - अहं - मी - मद्धतबन्धूनां - माझ्यामुळे मारले गेलेल्या बांधवांच्या - स्त्रीणां - स्त्रियांचा - उत्थितः - उत्पन्न झालेला - यः - जो - असौ - हा - द्रोहः - वैरभाव - गृहमेधीयैः - गृहस्थाश्रमी पुरुषांनी करण्यास योग्य अशा - कर्ममिः - कृत्यांनी - व्यपोहितुं - दूर करण्यास - कल्पः - समर्थ - न - नाही. ॥५१॥

यथा - ज्याप्रमाणे - पङ्केन - चिखलाने - पङ्काम्भः - गढूळ पाणी - वा - किंवा - सुरया - मदयाने - सुराकृतं - मदय प्यायल्यामुळे लागणारे पाप - तथा - त्याप्रमाणे - एव - च - एकां - एक - भूतहत्यां - प्राण्यांना मारल्याचे पाप - यज्ञैः - यज्ञांनी - मार्ष्टुं - दूर करण्यास - न अर्हती - समर्थ होत नाही. ॥५२॥

अध्याय आठवा समाप्त

GO TOP