श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ७ वा - अन्वयार्थ

अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे
आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी -

सूत - हे सूता ! - नारदे - नारद - निर्गते - निघून गेला असता - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - विभुः - व सर्वव्यापी असे - बादरायणः - बदरिकाश्रमात राहणारे व्यास - तदभिप्रेतं - त्याच्या अभिप्रायाला - श्रुतवान् - ऐकणारे असे होत्साते - ततः - नंतर - किम् - काय - अकरोत् - करिते झाले. ॥१॥

ब्रह्मनदयां - जिची देवता ब्रह्मदेव आहे किंवा ज्या नदीवर नेहमी पुष्कळ ब्राह्मण येऊन स्नानसंध्यादि करितात अशा - सरस्वत्यां - सरस्वती नदीच्या ठिकाणी - पश्चिमे - पश्चिम - तटे - तीरावर - ऋषीणां - ऋषींच्या - सत्रवर्धनः - यज्ञाना वाढविणारा - शम्याप्रासः - शम्याप्रास - इति - अशा रीतीने - प्रोक्तः - प्रसिद्ध असलेला असा - आश्रमः - आश्रम आहे. ॥२॥

तस्मिन् - त्या - बदरीखण्डमण्डिते - बोरीच्या झाडांच्या समूहाने शोभणार्‍या - स्वे - स्वतःच्या - आश्रमे - आश्रमात - आसीनः - बसलेले - व्यासः - व्यास - अपः - पाण्याला - उपस्पृश्य - स्पर्श करून म्हणजे आचमन करून - स्वयं - स्वतः - मनः - मनाला - प्रणिदध्यौ - स्थिर करिते झाले. ॥३॥

भक्तियोगेन - भक्तियोगाने - अमले - निर्मळ अशा - सम्यक् - व उत्तम रीतीने - प्रणिहिते - स्थिर केलेल्या - मनसि - मनात - पूर्वं - प्रथम - पुरुषं - परमेश्वराला - च - आणि - तदुपाश्रयां - त्याला धरून राहिलेल्या - मायां - मायेला - अपश्यत् - पाहिले. ॥४॥

जीवः - जीव - परः - परमेश्वररूपी - अपि - असूनहि - यया - जिने - संमोहित - मोहित झालेला असा - आत्मानं - स्वतःला - त्रिगुणात्मकं - तीन गुणाने युक्त असे - मनुते - मानतो - च - आणि - तत्कृतं - तिने केलेल्या - अनर्थं - अनर्थाला - अभिपदयते - प्राप्त होतो. ॥५॥

विद्वान - ज्ञानी व्यास - अनर्थोपशमं - अनर्थ नाहीसा करणार्‍या - अधोक्षजे - परमेश्वराविषयीच्या - साक्षात् - प्रत्यक्ष - भक्तियोगं - भक्तियोगाला - अजानतः - न जाणणार्‍या - लोकस्य - जगासाठी - सात्वतसंहितां - श्रीमद्‌भागवतसंहितेला - चक्रे - करिता झाला. ॥६॥

वै - खरोखर - यस्यां - जी - श्रूयमाणायां - ऐकिली असता - परमपुरुषे - श्रेष्ठ पुरुष अशा - कृष्णे - कृष्णाचे ठिकाणी - पुंसः - पुरुषाची म्हणजे प्राणिमात्रांची - शोकमोहभयापहा - शोक, मोह, व भीती नाहीशी करणारी - भक्तिः - भक्ति - उत्पदयते - उत्पन्न होते. ॥७॥

सः - तो - मुनिः - व्यास महर्षि - भागवतीं - श्रीमद्‌भागवत नावाच्या - संहितां - संहितेला - कृत्वा - तयार करून - च - आणि - अनुक्रम्य - क्रमवार त्याची व्यवस्था लावून - निवृत्तिनिरतं - मोक्षमार्गात आसक्त असणार्‍या - आत्मजं - पुत्र अशा - शुकं - शुकाला - अध्यापयामास - शिकविता झाला. ॥८॥

वै - खरोखर - निवृत्तिनिरतः - मोक्षमार्गात आसक्ति ठेवणारा - सर्वत्र - सर्व गोष्टींविषयी - उपेक्षकः - उदासीन - मुनिः - मननशील असा - आत्मारामः - व आत्म्यांतच रममाण होणारा - सः - तो शुक - कस्य - कोणत्या - वा - कारणास्तव - बृहतीं - मोठया - एतां - ह्या संहितेला - समभ्यसत् - शिकता झाला. ॥९॥

आत्मारामाः - आत्म्यामध्ये रममाण होणारे - च - आणि - निर्ग्रन्थाः - संसाराच्या गाठी ज्यांच्या तुटून गेल्या आहेत असे - अपि - सुद्धा - मुनयः - ऋषि - उरुक्रमे - मोठा आहे पराक्रम ज्याच्या अशा परमेश्वराचे ठिकाणी - अहैतुकीं - निष्काम अशा - भक्तिं - भक्तीला - कुर्वन्ति - करितात. - इत्थंभूतगुणः - अशा गुणाने युक्त - हरिः - परमेश्वर आहे. ॥१०॥

हरेः - परमेश्वराच्या - गुणाक्षिप्तमतिः - गुणांनी आकर्षिली आहे बुद्धि ज्याची असा - नित्यं - व नेहमी - विष्णुजनप्रियः - वैष्णवांवर प्रेम करणारा असा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - बादरायणिः - बोरीच्या जंगलात राहणार्‍या व्यासांचा मुलगा शुकाचार्य - महत् - मोठे - आख्यानं - कथानक - अध्यगात् - शिकता झाला. ॥११॥

अथ - नंतर - राजर्षेः - राजर्षि अशा - परीक्षितः - परीक्षित राजाचे - जन्म - जन्म - कर्म - कर्म - विलापनं - आणि अंत - च - आणि - पाण्डुपुत्राणां - पाण्डवांचे - संस्थां - स्वर्गारोहण - कृष्णकथोदयं - ज्यांत कृष्णचरित्राचे वर्णन येईल अशा रीतीने - वक्ष्ये - सांगणार आहे. ॥१२॥

अथो - नंतर - यदा - जेव्हा - कौरवसृञ्जयानां - कौरवपांडवांच्या - मृधे - युद्धात - वीरेषु - वीर - वीरगतिं - युद्धात मेलेल्या वीरांच्या गतीला म्हणजे स्वर्गाला - गतेषु - गेले असता - धृतराष्ट्रपुत्रे - व धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन - वृकोदराविद्धगदाभिमर्शभग्नोरुदण्डे - भीमाने ताडिलेल्या गदेच्या प्रहाराने मांडी मोडलेला असा झाला असता ॥१३॥

द्रोणिः - द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा - भर्तुः - स्वामीचे - प्रियं - प्रिय - इति - असे - पश्यन् - पाहणारा - स्वपतां - निजलेल्या - कृष्णासुतानां - द्रौपदीच्या पाच मुलांची - शिरांसि - मस्तके - उपाहरत् स्म - हरण करिता झाला म्हणजे तोडिता झाला - तस्य - त्याचे - विप्रियम् - न आवडणारे - एव - च - तत् - ते - जुगुप्सितं - निंदय - कर्म - कृत्य - विगर्हयन्ति - निंदितात. ॥१४॥

तदा - त्यावेळी - शिशूनां - बालकांची - माता - आई - घोरं - भयंकर - सुतानां - पुत्रांच्या - निधनं - मृत्यूला - निशम्य - ऐकून - परितप्यमाना - दुःखित झालेली अशी - बाष्पकलाकुलाक्षी - व अश्रुधारांनी भरून गेले आहेत डोळे जिचे अशी - अरुदत् - रडली - किरीटमाली - मुगुटाने शोभणारा अर्जुन - तां - तिला - सांत्वयन् - सांत्वन करणारा असा - आह - बोलला. ॥१५॥

भद्रे - हे कल्याणि ! - यत् - जेव्हा - ब्रह्मबन्धोः - ब्राह्मणाधम - आततायिनः - व घातकी क्रूर अशाचे - शिरः - मस्तक - गाण्डीवमुक्तैः - गाण्डीवापासून सुटलेल्या - विशिखैः - बाणांनी - उपाहरे - आणीन - दग्धपुत्रा - आणि मेले आहेत मुलगे जिचे अशी तू - तु - तर - यत् - ज्याला - आक्रम्य - उल्लंघून - स्नास्यसि - अंग धुशील - तदा - तेव्हा - ते - तुझ्या - शुचः - शोकाला - प्रमृजामि - दूर करीन. ॥१६॥

अच्युतमित्रसूतः - श्रीकृष्ण आहे मित्र व सारथी ज्याचा असा - सः - तो अर्जुन - इति - याप्रमाणे - प्रियां - प्रिय पत्नीला - वल्गुविचित्रजल्पैः - मधुर व चित्रविचित्र भाषणांनी - सान्त्वयित्वा - सांत्वन करून - दंशितः - सज्ज - उग्रधन्वा - भयंकर धनुष्य धरणारा - कपिध्वजः - आणि मारुती ज्याच्या ध्वजावर आहे असा - रथेन - रथात बसून - गुरुपुत्रं - गुरूचा मुलगा जो अश्वत्थामा त्याचा - अन्वाद्रवत् - पाठलाग करिता झाला. ॥१७॥

कुमारहा - ज्याने लहान मुले मारिली आहेत असा - सः - तो अश्वत्थामा - आपतन्तं - पाठोपाठ धावत येणार्‍या - तं - त्या अर्जुनाला - दुरात् - लांबून - विलक्ष्य - पाहून - उद्विग्नमनाः - दुःखित अंतःकरणाचा - प्राणपरीप्सुः - व प्राण वाचविण्यास इच्छिणारा - यथा - जसे - रुद्रभयात् - शंकराच्या भीतीने - अर्कः - सूर्य - रथेन - रथात बसून - उर्व्यां - जमिनीवर - यावद्‌गमं - जितके लांब जाववेल तितके ! - पराद्रवत् - पळत सुटला. ॥१८॥

यदा - जेव्हा - द्विजात्मजः - ब्रह्मपुत्र अश्वत्थामा - श्रान्तवाजिनं - ज्याचे घोडे थकून गेले आहेत असे - आत्मानं - व स्वतःला - अशरणं - दुसरा कोणीही संरक्षक नाही असे - ऐक्षत - पाहता झाला - ब्रह्मशिरः - तेव्हा ब्रह्मशिर - अस्त्रं - अस्त्राला - आत्मत्राणं - स्वसंरक्षक - मेने - मानिता झाला. ॥१९॥

अथ - नंतर - प्राणकृच्छ्रे - प्राणसंकट - उपस्थिते - प्राप्त झाले असता - उपसंहारं - परत घेण्याच्या विधीला - अजानन् - न जाणणाराही - सलिलं - पाण्याला - उपस्पृश्य - स्पर्श करून म्हणजे आचमन करून - समाहितः - ध्यान करणारा असा होत्साता - तत् - त्या ब्रह्मास्त्राला - सन्दधे - सोडता झाला. ॥२०॥

ततः - नंतर - सर्वतोदिशं - सर्व दिशांकडून - प्रादुष्कृतं - प्रकट झालेले - प्रचण्डं - भयंकर - तेजः - तेजाला - प्राणापदं - व प्राणावर आलेल्या आपत्तीला - अभिप्रेक्ष्य - पाहून - जिष्णुः - अर्जुन - विष्णुं - श्रीकृष्णाला - ह - याप्रमाणे - उवाच - बोलला. ॥२१॥

कृष्ण ! - हे श्रीकृष्णा ! - महाभाग - हे महाभाग्यवान - भक्तानां - भक्तांची - अभयंकर - भीती दूर करणार्‍या - कृष्ण - हे कृष्णा ! ! - त्वं - तू - एकः - एकटाच - संसृतेः - संसारापासून - सह्यमानानां - संतप्त झालेल्यास - अपवर्गः - मोक्षरूप असा - असि - आहेस. ॥२२॥

त्वं - तू - आदयः - सर्वांच्या आदि असणारा - पुरुषः - शरीरात आत्मस्वरूपाने राहणारा - साक्षात् - प्रत्यक्ष - ईश्वरः - ईश्वर - प्रकृतेः - मायेहून - परः - निराळा - चिच्छक्त्या - ज्ञानशक्तीने - मायां - मायेला - व्युदस्य - दूर करून - कैवल्ये - निर्विकार - आत्मनि - आत्म्यामध्ये - स्थितः - राहिला आहेस. ॥२३॥

सः - तो - एव - च - मायामोहितचेतसः - मायेने मोहित झाली आहेत अंतःकरणे ज्यांची अशा - जीवलोकस्य - प्राणिमात्रांच्या - धर्मादिलक्षणं - धर्मादिक आहेत लक्षणे ज्याची अशा - श्रेयः - कल्याणाला - स्वेन - स्वतःच्या - वीर्येण - वीर्याने - विधत्से - करतोस. ॥२४॥

तथा - त्याप्रमाणे - च - हि - भुवः - पृथ्वीचा - भारजिहीर्षया - भार दूर करण्याच्या इच्छेने - च - आणि - अनन्यभावानां - एकाग्र मनाने भक्ति करणार्‍या - स्वानां - स्वकीयांच्या - असकृत् - वारंवार - अनुध्यानाय - चिन्तनाकरिता - अयं - हा - ते - तुझा - अवतारः - अवतार. ॥२५॥

देव - हे प्रकाशमान - देव - परमेश्वरा ! - सर्वतोमुखं - सर्वबाजूने - परमदारुणं - भयंकर असे - तेजः - तेज - आयाति - येत आहे - इदं - हे - किं - काय - स्वित् - बरे - वा - किंवा - कुतः - कोठून - इति - याप्रमाणे - अहं - मी - न वेद्मि - जाणत नाही. ॥२६॥

प्राणबाधे - प्राणांवर संकट - उपस्थिते - प्राप्त झाले असता - प्रदर्शितं - दाखविलेले - इदं - हे - द्रोणपुत्रस्य - द्रोणाचा मुलगा जो अश्वत्थामा त्याचे - ब्राह्मं - ब्रह्मसंबंधी - अस्त्रं - अस्त्र - वेत्थ - जाण - असौ - हा - संहारं - परत घेण्याच्या विधीला - न एव वेद - जाणतच नाही. ॥२७॥

अस्य - ह्याच्या - प्रत्यवकर्शनं - शक्ति नाहीशी करणारे - अन्यतमं - याहून दुसरे - किञ्चित् - कोणतेही - अस्त्रं - अस्त्र - नहि - नाही. - हि - ह्या कारणास्तव - अस्त्रज्ञः - अस्त्र जाणणारा तू - अस्त्रतेजसा - अस्त्राच्या तेजाने - उन्नद्धं - अमर्याद पसरलेल्या - अस्त्रतेजः - अस्त्राच्या तेजाला - जहि - जिंक म्हणजे नाहीसे कर. ॥२८॥

परवीरहा - शत्रुरूपी वीराला ठार मारणारा - फाल्गुनः - अर्जुन - भगवता - श्रीकृष्णाने - प्रोक्तं - सांगितलेले - श्रुत्वा - ऐकून - अपः - पाण्याला - स्पृष्टा - स्पर्श करून - तं - त्याला म्हणजे श्रीकृष्णाला - परिक्रम्य - प्रदक्षिणा करून - ब्राह्माय - ब्रह्मास्त्राकरिता - ब्राह्मं - ब्रह्मास्त्राला - संदधे - सोडिता झाला. ॥२९॥

उभयोः - दोघांच्या - शरसंवृते - बाणांनी वेष्टून राहिलेली - तेजसी - दोन तेजे - अन्योन्यं - एकमेकांत - संहत्य - मिसळून - रोदसी - पृथ्वी व स्वर्ग ह्याला - च - आणि - खं - आकाशाला - आवृत्य - वेढून - अर्कवन्हिवत् - सूर्याग्नीप्रमाणे - ववृधाते - वाढती झाली. ॥३०॥

दह्यमानाः - संतप्त होणार्‍या - सर्वाः - सर्व - प्रजाः - प्रजा - तु - तर - त्रीन् - तीन - लोकान् - लोकांना - प्रदहत् - जाळणारे - महत् - मोठे - तयोः - त्या दोघांच्या - अस्रतेजः - ब्रह्मास्त्राच्या तेजाला - दृष्ट्‌वा - पाहून - सांवर्तकं - प्रलयकाळ जवळ आला असे - अमंसत - मानत्या झाला. ॥३१॥

अर्जुनः - अर्जुन - प्रजोपप्लवं - प्रजेच्या नाशाला - च - आणि - तं - त्या - लोकव्यतिकरं - लोकांच्या नाशाला - च - आणि - वासुदेवस्य - श्रीकृष्णाच्या - मतं - मताला - आलक्ष्य - पाहून - द्वयं - दोन्हीही अस्त्रांना - संजहार - परत घेता झाला. ॥३२॥

ततः - नंतर - आमर्षताम्राक्षः - क्रोधाने डोळे लाल झालेला अर्जुन - तरसा - वेगाने - दारुणं - कठोर वर्तनाच्या - गौतमीसुतं - अश्वत्थाम्याला - आसादय - गाठून - यथा - ज्याप्रमाणे - रशनया - दोरीने - पशुं - पशूला - बबन्ध - बांधिता झाला. ॥३३॥

अंबुजेक्षणः - कमलाप्रमाणे डोळे असणारा - भगवान् - श्रीकृष्ण - दाम्ना - दोरीने - रिपुं - शत्रूला - बध्वा - बांधून - बलात् - जबरदस्तीने - शिबिराय - शिबिराला - निनीषन्तं - नेण्यास इच्छिणार्‍या - अर्जुन - अर्जुनाला - प्रकुपितः - रागावून - प्राह - बोलला. ॥३४॥

पार्थ - हे अर्जुना ! - एनं - ह्याला - त्रातुं - रक्षण करण्याला - मा अर्हसि - योग्य नाहीस - इमं - ह्या - ब्रह्मबन्धुं - दुष्ट ब्राह्मणाला - जहि - मार - यः - जो - असौ - हा - अनागसः - निरपराधी अशा - निशि - रात्री - सुप्तान् - निजलेल्या - बालकान् - मुलांना - अवधीत् - मारिता झाला. ॥३५॥

धर्मवित् - धार्मिक पुरुष - मत्तं - दारू पिऊन गुंग झालेल्या - प्रमत्तं - बेसावध - उन्मत्तं - भूतबाधेने पिडीलेल्या - सुप्तं - निजलेल्या - बालं - बाल्यावस्थेतल्या - स्त्रियं - स्त्री - जडं - आळशी - प्रपन्नं - शरण आलेल्या - विरथं - ज्याचा रथ मोडून गेलेला आहे अशा - भीतं - भ्यालेल्या - रिपुं - शत्रूला - न हन्ति - मारीत नाही. ॥३६॥

अघृणः - निर्दय व - खलः - दुष्ट असा - यः - जो - परप्राणेः - दुसर्‍यांच्या प्राणांनी - स्वप्राणान् - स्वतःच्या प्राणांना - प्रपुष्णाति - पुष्ट करितो - तद्वघः - त्याचा नाश - तस्य - त्याच्या - श्रेयः - कल्याणास कारणीभूत आहे - हि - खरोखर - यद्दोषात् - ज्या दोषामुळे - पुमान् - पुरुष - अधः - अधोगतीला - याति - प्राप्त होतो. ॥३७॥

च - आणि - मानिनि - हे मानवती द्रौपदी ! - यः - जो - ते - तुझ्या - पुत्रहा - पुत्रांना मारणारा - तस्य - त्याचे - शिरः - मस्तक - आहरिष्ये - आणीन असे - मम - मी - शृण्वतः - ऐकत असताना - भवता - आपणाकडून - पाञ्चाल्यै - द्रौपदीला - प्रतिश्रुतं - वचन दिले गेले आहे. ॥३८॥

वीर - हे पराक्रमी अर्जुना ! - तत् - ह्याकरिता - पापः - पापी - आततायी - क्रूर व निंदय कर्म करणारा - आत्मबंधुहा - स्वतःच्या भाऊबंदांचा नाश करणारा - असौ - हा अश्वत्थामा - वध्यतां - मारला जावा - च - आणि - कुलपांसनः - कुलाला काळिमा लावणारा - भर्तुः - स्वामींचे - वित्रियां - अप्रिय - कृतवान् - करता झाला. ॥३९॥

एवं - याप्रमाणे - धर्म - धर्माला - परीक्षिता - सूक्ष्म रीतीने अवलोकन करणार्‍या - कृष्णेन - श्रीकृष्णाने - चोदितः - प्रेरणा केलेला - महान् - मोठा - पार्थः - अर्जुन - यदि - जरा - अपि - सुद्धा - आत्महनं - स्वतःचा नाश करून घेणार्‍या - गुरुसुतं - अश्वत्थाम्याला - हन्तुं - मारण्यास - न ऐच्छत् - न इच्छिता झाला. ॥४०॥

अथ - नंतर - गोविन्दप्रियसारथि - श्रीकृष्ण आहे प्रिय व सारथी ज्याचा असा अर्जुन - स्वशिबिरं - आपल्या शिबिराला - उपेत्य - येऊन - हतान् - मेलेल्या - आत्मजान् - पुत्रांबद्दल - शोचन्त्यै - शोक करणार्‍या - प्रियायै - प्रियपत्नी द्रौपदीपुढे - तं - त्या अश्वत्थाम्याला - न्यवेदयत् - अर्पिता झाला म्हणजे आणता झाला. ॥४१॥

तथा - त्याप्रमाणे - वामस्वभावा - सरळ स्वभावाची - कृष्णा- द्रौपदी - पशुवत् - पशुप्रमाणे - पाशबद्धम् - पाशाने म्हणजे दोरीने बांधलेल्या - च - आणि - आहृतं - आणलेल्या - कर्मजुगुप्सितेन - निंदय कर्मामुळे - अवाङ्‌मुखं - खाली मान घातलेल्या - अपकृतं - अपकार केलेल्या - गुरोः - गुरूच्या - सुतं - पुत्राला - निरीक्ष्य - पाहून - कृपया - दयेने - ननाम - नमस्कार करिती झाली. ॥४२॥

च - आणि - अस्य - ह्याच्या - बंधनानयनं - बांधून आणण्याला - असहन्ती - सहन न करणारी - सती - अशी ती पतिव्रता द्रौपदी - एषः - हा - ब्राह्मणः - ब्राह्मण - नितरां - थोर - गुरुः - गुरु - मुच्यतां - सोडा - उवाच - असे बोलली. ॥४३॥

भवता - आपणांकडून - यदनुग्रहात् - ज्याच्या कृपेने - सविसर्गोप संयमः - सोडणे व परत घेणे ह्या दोन्ही क्रियांसहवर्तमान - अस्त्रग्रामः - अस्त्र समूह - च - आणि - सरहस्यः - रहस्यांसह - धनुर्वेदः शिक्षितः - शिकला गेला. ॥४४॥

सः - तो - एषः - हा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - द्रोणः - द्रोणाचार्य - प्रजारूपेण - पुत्राच्या स्वरूपाने - वर्तते - आहे. - तस्य - त्याच्या - आत्मनः - देहाचा - अर्धं - अर्धा भाग अशी - पत्नी - बायको - कृपी - कृपी - आस्ते - आहे - वीरसूः - पराक्रमी पुत्राला प्रसवणारी असल्यामुळे - न अन्वगात् - सहगमन न करती झाली. ॥४५॥

तत् - म्हणून - धर्मज्ञ - हे धर्म जाणणार्‍या - महाभाग - महाभाग्यवंता - भवद्‌भिः - आपल्याकडून - अभीक्ष्णशः - वारंवार - वंदयं - नमस्कार करण्यास योग्य असे - पूज्यं - व पूजा करण्यास योग्य असे - गौरवं - गुरुच्यासंबंधी - कुलं - कुल - वृजिनं - दुःखाला - प्राप्तुं - प्राप्त होण्यास - न अर्हति - योग्य नाही. ॥४६॥

यथा - ज्याप्रमाणे - मृतवत्सार्ता - लहान बालके मेल्यामुळे दुःखित झालेली - अश्रुमुखी - व जिच्या मुखावर नेत्रांतील अश्रुंचे ओघळ आले आहेत अशी - अहं - मी - मुहुः - वारंवार - रोदिमि - रडते - अस्य - ह्याची - जननी - आई - पतिदेवता - पतिव्रता - गौतमी - कृपी - मा रोदित् - न रडो. ॥४७॥

अकृतात्मभिः - इंद्रिय निग्रह न केलेल्या - यैः - ज्या - राजन्यैः - क्षत्रियांनी - ब्रह्मकुलं - ब्राह्मणवंशाला - कोपितं - क्रोधयुक्त केले - तत् - तो ब्राह्मणवंश - सानुबन्धं - सपरिवार - शुचार्पितम् - शोकाने व्यापिलेल्या - कुलं - कुलाला - आशु - लवकर - प्रदहति - जाळून टाकितो. ॥४८॥

द्विजाः - द्विज हो - धर्मसुतः - धर्मपुत्र - राजा - धर्मराज - धर्म्यं - धार्मिक - न्याय्यं - नीतियुक्त - सकरुणं - दयायुक्त - निर्व्यलीकं - निष्कपट - समं - भेदभावरहित - महत् - व मोठे - राज्ञाः - राणी जी द्रौपदी तिच्या - वचः - बोलण्याला - प्रत्यनन्दत् - अनुमोदन देता झाला. ॥४९॥

नकुलः - नकुल, - च - आणि - सहदेवः - सहदेव, - युयुधानः - सात्यकि, - धनञ्जयः - अर्जुन, - भगवान् - व षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा - देवकीपुत्रः - देवकीचा मुलगा श्रीकृष्ण, - च - आणि - ये - जे - अन्ये - दुसरे - च - आणि - याः - ज्या - योषितः - स्त्रिया - अमर्षितः - रागावलेला - भीमः - भीम - तत्र - तेथे - यः - जो - भर्तुः - स्वामीच्या - अर्थे - करिता - न - नव्हे; - च - आणि - आत्मनः - स्वतःकरिताही - न - नव्हे - वृथा - व्यर्थ - सुप्तान् - निजलेल्या - शिशून् - बालकांना - अहन् - मारिता झाला - तस्य - त्याचा - वधः - नाश - श्रेयान् - कल्याणकारक - स्मृतः - सांगितला आहे - आह - असे बोलला. ॥५०-५१॥

चतुर्भुजः - चार हात असणारा श्रीकृष्ण - भीमगदितं - भीमाच्या भाषणाला - च - आणि - द्रौपदयाः - द्रौपदीच्या - निशम्य - ऐकून - सख्युः - मित्र जो अर्जुन त्याच्या - वदनं - मुखाकडे - आलोक्य - पाहून - हसन् - हसणारा अशा - हव - प्रमाणे - इदं - हे - आह - बोलला. ॥५२॥

ब्रह्मबंधुः - अधम असाहि ब्राह्मण - न हन्तव्यः - ठार मारू नये; - आततायी - क्रूर घातकी - वधार्हणः - ठार मारण्यास योग्य - मया - माझ्याकडून - एव - च - उभयं - दोन्ही - आम्नातं - शास्त्रनियम ठरविले आहेत - अनुशासनं - ह्या आज्ञेला - परिपाहि - पालन कर. ॥५३॥

प्रियां - प्रियपत्नी द्रौपदीला - सान्त्वयता - सांत्वन करणार्‍या तुझ्याकडून - यत् - जे - प्रतिश्रुतं - प्रतिज्ञा केलेले - तत् - ते - सत्यं - खरे - कुरु - कर - च - आणि - भीमसेनस्य - भीमाचे - प्रियं - प्रिय - च - आणि - पाञ्चाल्याः - द्रौपदीचे - मह्यं - मला - एव - सुद्धा. ॥५४॥

अथ - नंतर - अर्जुनः - अर्जुन - सहसा - एकदम - हरेः - श्रीकृष्णाच्या - हार्दं - मनातील अभिप्रायाला - आज्ञाय - जाणून - असिना - तरवारीने - द्विजस्य - द्विज जो अश्वत्थामा त्याच्या - मूर्धन्यं - मस्तकात असणार्‍या - सहमूर्धजं - केसांसह वर्तमान अशा - मणिं - मण्याला - जहार - हरण करता झाला. ॥५५॥

रशनाबद्धं - दोरीने बांधलेल्या त्याला - विमुच्य - सोडून - बालहत्याहतप्रभं - बालकांना मारल्यामुळे काळा ठिक्कर पडलेल्या - तेजसा - व तेजाने - मणिना - आणि मण्याने - हीनं - रहित अशा त्याला - शिबिरात् - शिबिरातून - निरयापयत् - हाकलून देता झाला. ॥५६॥

हि - कारण - वपनं - क्षौर - द्रविणादानं - द्रव्य हरण करणे - तथा - त्याप्रमाणे - स्थानात् - जागेतून - निर्यापणं - घालवून देणे - एषः - हा - ब्रह्मबन्धूनां - अधम ब्राह्मणांचा - वधः - मृत्यू - अन्यः - दुसरा - दैहिकः - देहासंबंधी - नास्ति - नाही. ॥५७॥

कृष्णया - द्रौपदीशी - सह - सहवर्तमान - पुत्रशोकातुराः - बालकांच्या नाशामुळे शोकाकुल असे - सर्वे - सर्व - पांडवाः - पांडव - मृतानां - मेलेल्या - स्वानां - भाऊबंदांच्या - निर्हरणादिकं - अन्त्य दहनादिक - यत् - ज्या - कृत्यं - कृत्याला - चक्रुः - करिते झाले. ॥५८॥

अध्याय सातवा समाप्त

GO TOP