श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ६ वा - अन्वयार्थ

नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग -

ब्रह्मन् - अहो ब्राह्मण हो ! - भगवान - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा - सत्यवतीसुतः - सत्यवतीचा मुलगा - व्यासः - व्यास - एवं - याप्रमाणे - देवर्षेः - देवर्षि जो त्याचे - जन्म - जन्म - च - आणि - कर्म - कर्म - निशम्य - ऐकून - भूयः - पुनः - तं - त्याला - पप्रच्छ - विचारिता झाला. ॥१॥

तव - तुला - विज्ञानादेष्‌टटभिः - विशिष्ट ज्ञानाचा उपदेश करणार्‍या - भिक्षुभिः - साधूंनी - विप्रवसिते - प्रयाण केले असता - ततः - नंतर - आदये - पहिल्या - वयसि - वयात - वर्तमानः - राहणारा - भवान् - आपण - किं - काय - अकरोत् - केले. ॥२॥

स्वायंभुव - हे ब्रह्मपुत्रा ! - ते - तुझे - परं - पुढील - वयः - वय - कया - कोणत्या - वृत्या - वर्तमाने - वर्तितं - घालविलेस - च - आणि - काले - काळ - प्राप्ते - प्राप्त झाला असता - इदं - हे - कलेवरं - शरीर - कथं - कसे - उद्‌स्राक्षीः - टाकिलेस. ॥३॥

सुरसत्तम - हे देवश्रेष्ठा ! - एषः - हा - कालः - काल - सर्वनिराकृतिः - सर्वांचा नाश करणारा - हि - असे असतासुद्धा - एषः - हा - प्राक्कल्पविषयां - पूर्वीच्या कल्पातील - एतां - ह्या - ते - तुझ्या - स्मृतिं - आठवणीला - न व्यवधात् - आच्छादून टाकता झाला नाही. ॥४॥

मम - माझ्या - विज्ञानादेष्‌टटभिः - विशिष्ट ज्ञानाचा उपदेश करणार्‍या - भिक्षुभिः - साधूंनी - विप्रवसिते - प्रयाण केले असता - ततः - नंतर - आदये - पहिल्या - वयसि - वयात - वर्तमानः - राहणारा - एतत् - हे - अकारषम् - करता झालो. ॥५॥

एकात्मजा - एकच आहे मुलगा जिला अशी - च - आणि - मूढां - अज्ञानी - योषित् - स्त्री - किङ्‌करी - दासी अशी - मे - माझी - जननी - आई - अनन्यगतौ - ज्याला दुसरा आश्रय नाही अशा - आत्मजे - पुत्र अशा - मयि - माझ्यावर - स्नेहानुबन्धनं - प्रेम संबंध - चक्रे - करिती झाली. ॥६॥

अस्वतंत्रा - परस्वाधीन - मम - माझ्या - योगक्षेमं - निर्वाहाला - इच्छती - इच्छिणारी - सा - ती - कल्पा - समर्थ - न आसीत् - झाली नाही; - हि - कारण - यथा - जशी - दारुमयी - लाकडाची बनविलेली - योषा - बाहुली - लोकः - लोक - ईशस्य - ईश्वराच्या - वशे - स्वाधीन. ॥७॥

च - आणि - दिग्देशकालाव्युत्पन्नः - दिशा, देश व काल ह्याचे ज्ञान नसणारा - पञ्चहायनः - पाच वर्षांचा असा - बालकः - लहान - अहं - मी - तदवेक्षया - त्याची वाट पाहत - तद्‌ब्रह्मकुले - त्या ब्राह्मणकुळांत - ऊषिवान् - राहिलो. ॥८॥

एकदा - एके दिवशी - कालचोदितः - कालाने आज्ञा दिलेला - पथि - व रस्त्यात - पदा - पायाने - स्पृष्टः - स्पर्शिलेला असा - सर्पः - साप - कृपणां - दीन - गेहात् - व घरातून - निर्गतां - निघालेल्या - निशि - रात्री - गां - गाईला - दुहन्ती - दोहन करणार्‍या तिला - अदशत् - डसला. ॥९॥

तत् - त्या कारणास्तव - तदा - त्या वेळी - अहं - मी - भक्तानां - भक्तांच्या - शं - कल्याणाला - अभीप्सतः - इच्छिणार्‍या - ईशस्य - ईश्वराच्या - अनुग्रहं - उपकाराला - मन्यमानः - मानणारा होत्साता - उत्तरां - उत्तर - दिशं - दिशेला - प्रातिष्ठम् - गेलो. ॥१०॥

तत्र - तेथे - स्फीतान् - वाढलेल्या - जनपदान् - देशांना - च - आणि - पुरग्रामव्रजाकरान् - नगरे, गावे, गोठे व खाणी यांस - च - आणि - खेटखर्वटवाटीः - मोठी व लहान खेडी, वाडया ह्यांस - वनानि - अरण्यास - उपवनानि - व बागबगिच्यांस. ॥११॥

चित्रधातुविचित्राद्रीन् - अनेक प्रकारच्या चित्रविचित्र धातूंनी चित्रविचित्र दिसणार्‍या अशा पर्वतांना - इभभग्नभुजद्रुमान् - हत्तींनी मोडल्या आहेत फांदया ज्यांच्या अशा वृक्षांना - शिवजलान् - व स्वच्छ आहेत उदके ज्यात अशा - जलाशयान् - सरोवरांना - सुरसेविताः - आणि देवांनी सेविलेल्या - नलिनीः - कमलिनीना. ॥१२॥

चित्रस्वनैः - चित्रविचित्र शब्द करणार्‍या - पत्ररथैः - पंखांच्या योगाने उडणार्‍या पक्ष्यांसह - विभ्रमद्‌भ्रमरश्रियः - उडणार्‍या भुंग्यांच्या शोभांना - नलवेणुशरस्तम्बकुशकीचकगह्‌वरम् - व नल नावाचे गवत, वेळू, दर्भाचे बुंधारे, दर्भ व शब्द करणारे कळक ह्यांनी बनल्या आहेत गुहा ज्यात अशा. ॥१३॥

एकः - एकटा - एव - च - अतियातः - बराच दूर गेलेला - अहं - मी - घोरं - भयंकर - प्रतिभयाकारं - व मूर्तिमंत भयच की काय अशा - व्यालोलूकशिवाजिरम् - व सर्पादि क्रूर प्राणी, घुबड, कोल्हे ह्यांचे वसतिस्थान - महत् - अशा मोठया - विपिनं - अरण्याला - अद्राक्षं - पाहता झालो. ॥१४॥

परिश्रान्तेन्द्रियात्मा - थकली आहे इंद्रिये व आत्मा ज्याचा असा - तृट्‌परीतः - तहानलेला - बुभूक्षितः - व भुकेलेला - अहं - मी - नदयाः - नदीच्या - ह्लदे - डोहात - स्नात्वा - आंघोळ करून - पीत्वा - व पाणी पिऊन - उपस्पृष्टः - आचमनादि केलेला असा - गतश्रमः - श्रमरहित झालो. ॥१५॥

तस्मिन् - त्या - निर्मनुजे - निर्जन अशा - अरण्ये - अरण्यात - पिप्पलोपस्थे - पिंपळाच्या झाडाखाली - आश्रितः - बसलेला - यथाश्रुतं - शास्त्रात सांगितल्याप्रमाणे - आत्मस्थ - हृदयात राहणार्‍या - आत्मानं - आत्म्याबद्दल - आत्मना - आत्म्याच्याच योगाने - अचिन्तयम् - चिंतन करू लागलो. ॥१६॥

भावनिर्जितचेतसा - भक्तीने वश केलेल्या अंतःकरणाने - चरणाम्भोजं - पादकमलाला - ध्यायतः - चिन्तणार्‍या - औत्कण्‌ठयाश्रुकलाक्षस्य - व उत्कंठेने ज्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत अशा - मे - माझ्या - हृदि - अंतःकरणात - हरिः - परमेश्वर - शनैः - हळूहळू - आसीत् - प्रकट झाला. ॥१७॥

- प्रेमातिभरनिर्भिन्नपुलकाङगः - प्रेमाच्या अधिक भारामुळे ज्याच्या अंगातून रोमांच बाहेर पडले आहेत असा - अतिनिर्वृतः - व अत्यंत सुखी झालेला - आनन्दसंप्लवे - आणि आनंदाच्या पुरात - लीनः - गढलेला - उभयं - दोन्ही - न अपश्यम् - न पाहता झालो. ॥१८॥

यत् - जे - मनःकान्तं - मनाला प्रिय वाटणारे - शुचापहं - शोकाचा नाश करणारे - भगवतः - परमेश्वराचे - रूपं - स्वरूप - तत् - ते - अपश्यन् - न पाहणारा - दुर्मनाः - खिन्न - इव - सारखा - सहसा - एकाएकी - वैल्कव्यात् - अस्वस्थ होऊन - उत्तस्थे - उठून उभा राहिलो. ॥१९॥

अवितृप्तः - तृप्त न झालेल्या - आतुरः - भ्रमिष्ट अशा - इव - प्रमाणे - भूयः - पुनः - तत् - ते - दिदृक्षुः - पाहण्यास इच्छिणारा - अहं - मी - हृदि - हृदयात - मनः - मन - प्रणिधाय - स्थिर करून - वीक्षमाणः - पाहत असता - अपि - सुद्धा - न अपश्यम् - पाहता झालो नाही. ॥२०॥

गिरां - वाणीच्या - अगोचरः - संचारास अप्राप्य असा ईश्वर - गंभीरश्लक्ष्णया - गंभीर व मधुर अशा - वाचा - वाणीने - शुचः - शोकाला - प्रशमयन् - दूर करणारा - इव - असाच की काय - एवं - याप्रमाणे - विजने - एकांतामध्ये - यतन्तं - प्रयत्न करणार्‍या - मां - मला - आह - म्हणाला. ॥२१॥

हन्त - अरेरे ! - भवान् - आपण - अस्मिन् - ह्या - जन्मनि - जन्मात - इह - येथे - मां - मला - द्रष्टुं - पाहण्याला - न अर्हति - योग्य नाही. - अहं - मी - अविपक्वकषायाणां - ज्यांची पापे समूळ नाहीशी झाली नाहीत अशा - कुयोगिनां - अपूर्ण योग्यांच्या - दुर्दर्शः - दृष्टीस पडण्यास कठीण. ॥२२॥

अनघ - हे निष्पाप ! - यत् - जे - रूपं - स्वरूप - सकृत् - एकदा - दर्शितं - दाखविले - एतत् - हे - ते - तुझ्या - कामाय - प्रीतीकरिता - मत्कामः - माझ्यावर प्रेम करणारा - साधुः - सत्पुरुष - सर्वान् - संपूर्ण - हृच्छयान् - कामांना - शनकैः - हळूहळू - मुञ्चति - टाकतो. ॥२३॥

अदीर्घया - थोडया - सत्सेवया - साधूंच्या सेवेने - ते - तुझी - मतिः - बुद्धी - मयि - माझ्यावर - दृढा - बळकट - जाता - झाली. - अवदयं - निंदय अशा - इमं - ह्या - लोकं - लोकाला - हित्वा - सोडून - मज्जनतां - माझ्या भक्तपणाला - गन्ता - जाणारा - असि - आहेस. ॥२४॥

मयि - माझ्यावर - निबद्धा - स्थिर झालेली - इयं - ही - मतिः - बुद्धि - कर्हिचित् - कधीही - न विपदयेत - नाश पावणार नाही. - च - आणि - प्रजासर्गनिरोधे - जगाची उत्पत्ति व नाश झाला असता - अपि - सुद्धा - मदनुग्रहात् - माझ्याच कृपेने - स्मृतिः - आठवण राहील. ॥२५॥

एतावत् - एवढेच - उक्त्वा - बोलून - तत् - ते - नभोलिङ्‌गं - आकाशस्वरूप - अलिङ्‌गं - निराकार - ईश्वरं - ऐश्वर्यसंपन्न - महत् - मोठे - भूतं - उत्पन्न झालेले भाषण - उपरराम - बंद झाले. - च - आणि - अनुकम्पितः - दयेस पात्र झालेला - अहं - मी - महतां - मोठयात - महीयसे - मोठया पूज्य अशा - तस्मै - त्याला - शीर्ष्णा - मस्तकाने - अवनामं - नमन - विदधे - केले. ॥२६॥

हतत्रपः - वेडापिसा असा - अनन्तस्य - परमेश्वराची - नामानि - नावे - पठन् - उच्चारणारा - च - आणि - गुह्यानि - गूढ म्हणजे गुप्त - भद्राणि - व कल्याण करणारी अशी - कृतानि - कृत्ये - स्मरन् - स्मरणारा - तुष्टमनाः - आनंदित असा - गतस्पृहः - निरिच्छ - विमदः - गर्वरहित - विमत्सरः - व मत्सररहित असा - कालं - काळाला - प्रतीक्षन् - पाहणारा म्हणजे वाट पाहणारा - गां - पृथ्वीवर - पर्यटन् - फिरणारा झालो. ॥२७॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा ! - एवं - याप्रमाणे - कृष्णमतेः - परमेश्वराचे ठिकाणी ज्याची बुद्धि आहे अशा - असक्तस्य - व आसक्ति न ठेवणार्‍या म्हणजे संगरहित अशा - अमलात्मनः - शुद्धान्तःकरणाच्या - यथा - जशी - काले - योग्य वेळी - सौदामनी - मेघापासून उत्पन्न होणारी - तडित् - वीज - कालः - मृत्यू - प्रादुरभूत् - उत्पन्न झाला. ॥२८॥

मयि - मी - तां - त्या - शुद्धां - शुद्ध अशा - भागवतीं - भगवंतासंबंधी - तनुं - शरीराला - प्रयुज्यमाने - जाऊन मिळालो असता - आरब्धकर्मनिर्वाणः - प्रारब्धविषयक कर्मातच सुख मानणारा - पाञ्चभौतिकः - पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेला देह - न्यपतत् - पडला. ॥२९॥

कल्पान्ते - कल्पाच्या शेवटी म्हणजे प्रलयकाळी - इदं - हे - आदाय - घेऊन - उदन्वतः - समुद्राच्या - अम्भसि - उदकात - शयाने - निद्रावस्थेत - शिशयिषोः - निजण्याची इच्छा करणार्‍या - विभोः - परमेश्वराच्या - अन्तः - आत - अहं - मी - अनुप्राणं - श्वासोच्छ्‌वासाबरोबर - विविशे - शिरलो. ॥३०॥

सहस्रयुगपर्यन्ते - हजार महायुगे गेल्यानंतर - उत्थाय - उठून - इदं - हे - सिसृक्षतः - उत्पन्न करण्याची इच्छा करणार्‍याच्या - प्राणेभ्यः - प्राणांपासून म्हणजे इंद्रियांपासून - मरीचिमिश्राः - मरीचि आहे मुख्य ज्यात असे - ऋषयः - ऋषि - च - आणि - अहं - मी - जज्ञिरे - उत्पन्न झाले. ॥३१॥

महाविष्णोः - मोठया सर्वव्यापी विष्णूच्या - अनुग्रहात् - कृपेने - क्वचित् - कोठेही - अविघातगतिः - अकुंठित गति - अस्कंदितव्रतः - व अस्खलितव्रताचा असा - अंतः - आत - च - आणि - बहिः - बाहेर - त्रीन् - तीन - लोकान् - लोकांना - पर्येमि - जातो. ॥३२॥

अहं - मी - स्वरब्रह्मविभूषितां - नादब्रह्माने शोभणार्‍या - इमां - ह्या - देवदत्तां - परमेश्वराने दिलेल्या म्हणूनच देवदत्त नाव असणार्‍या - वीणां - वीणेला - मूर्च्छयित्वा - मूर्च्छनादिरागाने युक्त करून म्हणजे रागपूर्वक वाजवून - हरिकथां - भगवंताच्या कथा - गायमानः - गातगात - चरामि - भटकतो. ॥३३॥

स्ववीर्याणि - आपले पराक्रम - प्रगायतः - गाणार्‍या - मे - माझ्या - चेतसि - अंतःकरणात - तीर्थपादः - पवित्र आहेत पाय ज्याचे असा - प्रियश्रवाः - व प्रिय आहे कीर्ती ज्याची असा परमेश्वर - आहूतः - बोलावल्या - इव - सारखा - शीघ्रं - लवकर - दर्शनं - दृष्टीला - याति - प्राप्त होतो म्हणजे दिसतो. ॥३४॥

हि - कारण - मात्रास्पर्शेच्छया - विषयवासनेच्या इच्छेने - मुहुः - वारंवार - आतुरचित्तानां - दुःखित अंतःकरणाच्यांस - एतत् - हे - हरिचर्यानुवर्णनम् - भगवत्पराक्रमांचे वर्णन - भवसिन्धुप्लवः - संसारसमुद्रातील नौका - दृष्टः - दर्शित केली आहे. ॥३५॥

मुहुः - वारंवार - कामलोभहतः - कामाने व लोभाने पीडीत झालेला - आत्मा - जीव - यव्दत् - ज्याप्रमाणे - मुकुन्दसेवया - परमेश्वराच्या सेवेने - तथा - त्याप्रमाणे - यमादिभिः - यम आहे मुख्य ज्यात अशा - योगपथैः - योगमार्गांनी - अद्धा - साक्षात् - न शाम्यति - शान्त होत नाही. ॥३६॥

अनघ - हे निष्पापा - यत् - जे - त्वया - तुझ्याकडून - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो - तत् - ते - सर्वं - सर्व - भवतः - आपल्या - आत्मतोषणं - आत्म्याला संतुष्ट करणारे - रहस्यं - गुप्त असे - मे - माझे - इदं - हे - जन्म - जन्म - च - आणि - कर्म - कर्म - आख्यातं - सांगितले. ॥३७॥

एवं - याप्रमाणे - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा - यादृच्छिकः - स्वच्छंदाने फिरणारा - नारदः - नारद - मुनिः - ऋषि - वासवीसुतं - सत्यवतीच्या मुलाला म्हणजे व्यासांना - संभाष्य - सांगून - आमंत्र्य - निरोप घेऊन - वीणां - वीणेला - रणयन् - वाजविणारा असा - ययौ - गेला. ॥३८॥

अहो - काय हो ! - अयं - हा - देवर्षिः - नारद ऋषि - धन्यः - धन्य होय. - यत् - ज्या कारणास्तव - शाङ्‌र्गधन्वनः - परमेश्वराच्या - कीर्तिं - यशाला - गायन् - गाणारा - मादयन् - आनंदित होत्साता - तंत्र्या - वीणेच्या योगाने - आतुरं - पीडीलेल्या - इदं - ह्या - जगत् - जगाला - रमयति - रमवितो. ॥३९॥

अध्याय सहावा समाप्त

GO TOP