|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ४ था - अन्वयार्थ
महर्षी व्यासांचा असंतोष - व्यासः - व्यास - उवाच - म्हणाले - दीर्घसत्रिणां - पुष्कळ काळपर्यंत यज्ञ करणार्या - मुनीनां - ऋषीमध्ये - वृद्धः - वडील - कुलपतिः - ऋषिसमुदायात मुख्य - बह्वृचः - ऋग्वेदी - शौनकः - शौनक - इति - याप्रमाणे - ब्रुवाणं - बोलणार्या - सूतं - सूताला - संस्तूय - स्तवून - अब्रवीत् - बोलला. ॥१॥ शौनकः - शौनक - उवाच - बोलला - महाभाग - अहो भाग्यवंता ! - वदतां - अहो वक्त्यांच्यांत - वर - श्रेष्ठ ! - सूत सूत - अहो सूत, अहो सूत ! - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - शुकः - शुक - यत् - जे - आह - बोलला अशा - पुण्यां - पुण्यकारक व - भागवतीं - भगवंतासंबंधी - कथां - कथेला - नः - आम्हास - वद - सांगा. ॥२॥ इयं - ही - कस्मिन् - कोणत्या - युगे - युगात - वा - किंवा - स्थाने - ठिकाणी - केन - कोणत्या - हेतुना - कारणास्तव - प्रवृत्ता - सुरू झाली - कुतः - कोणाकडून - संचोदितः - प्रेरणा केलेला - मुनिः - मननशील - कृष्णः - व्यास - संहितां - ग्रंथाला - कृतवान् - करिता झाला. ॥३॥ तस्य - त्याचा - पुत्रः - मुलगा - महायोगी - मोठा योगी - समदृक् - समदृष्टी - निर्विकल्पकः - भेदभावरहित - एकांतमतिः - अव्दैतबुद्धि असणारा - उन्निद्रः - निद्रारहित अर्थात ज्ञानी - गूढः - अप्रसिद्ध - मूढः - मूर्ख - इव - सारखा - ईयते - भासतो. ॥४॥ आत्मजं - पुत्राला - अनुयान्तं - अनुसरणार्या - अनग्नं - नग्न नव्हे अशा - अपि - सुद्धा - ऋषिं - ऋषीला - दृष्ट्वा - पाहून - देव्यः - देवस्त्रिया - ल्हिया - लाजून - परिदधुः - वस्त्रे नेसल्या - सुतस्य - पुत्राच्या पुढे - न - नाही - तत् - ते - चित्रं - आश्चर्य - वीक्ष्य - पाहून - मुनौ - ऋषी - पृच्छति - विचारीत असता - जगदुः - बोलल्या - तव - तुझ्यामध्ये - स्त्रीपुभिदा - स्त्री-पुरुषभेद - अस्ति - आहे - विविक्तदृष्टेः - विचारदृष्टीच्या - सुतस्य - मुलाच्यात - तु - तर - न - नाही. - कुरुजाङ्गलान् - कुरुजांगलदेशांना - संप्राप्तः - प्राप्त झालेला - उन्मत्तमूकजडवत् - दारुडयासारखा, मुक्यासारखा व जडासारखा - गजसाह्यये - हस्तिनापुरात - विचरन् - फिरणारा - पौरैः - शहरवासी लोकांनी - कथं - कसा - आलक्षितः - पाहिला. ॥५-६॥ वा - किंवा - तात - बाबा ! - पाण्डवेयस्य - पांडव कुळात जन्मलेल्या - राजर्षेः - राजर्षि अशाचे - मुनिना - ऋषीशी - सह - सहवर्तमान - संवादः - भाषण - कथ - कसे - समभूत् - झाले. - यत्र - ज्यात - एषा - ही - सात्वती - भागवतविषयक - श्रुतिः - संहिता. ॥७॥ हि - खरोखर - सः - तो - महाभागः - भाग्यशाली - गृहमेधिनां - गृहस्थाश्रम्यांच्या - गृहेषु - घरी - तदाश्रमं - त्यांचे आश्रम - तीर्थीकुर्वन् - पवित्र करीत - गोदोहनमात्रं - गाईची धार काढण्यापर्यंत - अवेक्षते - वाट पाहातो. ॥८॥ सूत - हे सूता ! - अभिमन्युसुतं - अभिमन्यूच्या मुलाला - भागवतोत्तमं - भगवद्भक्तात म्हणजे वैष्णवांत श्रेष्ठ - प्राहुः - बोलतात - तस्य - त्याचे - महाश्चर्यं - मोठे आश्चर्यकारक - जन्म - जन्म - च - आणि - कर्माणि - कृत्ये - नः - आम्हाला - गृणीहि - सांगा. ॥९॥ वा - किंवा - पांडूनां - पाण्डवांच्या - मानवर्धनः - महत्वाला वाढविणारा - सः - तो - सम्राट् - सार्वभौम राजा - कस्य - कोणत्या - अनादृत्य - तिरस्कृत करून - गङगायां - गंङ्गेवर - प्रायोपविष्टः - मृत्यूकरिता बसला. ॥१०॥ शत्रवः - शत्रू - आत्मनः - स्वतःच्या - शिवाय - कल्याणाकरिता - यत्पादनिकेतं - ज्याच्या पादपीठाजवळ म्हणजे सिंहासनाजवळ - धनानि - द्रव्य - आनीय - आणून - ह - स्पष्ट रीतीने - नमन्ति - नमस्कार करीत असत. - अंग - अहो - अहो - किती आश्चर्य ! ! - सः - तो - युवा - तरुण - वीरः - पराक्रमी - दुस्त्यजां - टाकण्यास कठीण अशा - श्रियं - संपत्तीला - असुभिः - प्राणांशी - सह - सहवर्तमान - उत्स्नष्टुं - सोडण्याला - कथं - कसा - ऐषत - इच्छिता झाला. ॥११॥ ये - जे - जनाः - लोक - उत्तमश्लोकपरायणाः - श्रेष्ठ आहे कीर्ति ज्याची अशा परमेश्वराची एकनिष्ठपणाने भक्ति करणारे - लोकस्य - लोकांच्या - शिवाय - कल्याणाकरिता - भवाय - समृद्धीकरिता - भूतये - व ऐश्वर्याकरिता - जीवन्ति - जगतात - आत्मार्थं - स्वतःकरिता - न - नाही - असौ - हा - निर्विद्य - विरक्त होऊन - पराश्रयं - दुसर्याच्या उपयोगी पडणारे - कलेवरं - शरीर - कुतः - का - मुमोच - सोडिता झाला. ॥१२॥ इह - येथे - यत् - जे - किंचन - काही - पृष्टः - विचारलेला - तत् - ते - सर्वं - सगळे - नः - आम्हाला - समाचक्ष्व - सांगा. - त्वां - तुला - छान्दसात् - वेदाहून - अन्यत्र - दुसर्या - वाचां - वाणीच्या - विषये - विषयात - स्नातं - निष्णात - मन्ये - मानतो. ॥१३॥ सूतः - सूत - उवाच - म्हणाले; - तृतीये - तिसरे - युगपर्यये - युगांच्या क्रमाने प्राप्त - व्दापरे - व्दापर - समनुप्राप्ते - सुरू झाले असता - हरेः - विष्णूच्या - कलया - अंशाने - पराशरात् - पराशरापासून - वासव्यां - वसूच्या मुलीच्या ठिकाणी - योगी - योगसंपन्न असा - जातः - उत्पन्न झाला. ॥१४॥ कदाचित् - एकेवेळी - सः - तो - रविमण्डले - सूर्यमंडल - उदिते - उदय पावले असता - सरस्वत्याः - सरस्वतीच्या - शुचि - शुद्ध अशा - जलं - जलाला - उपस्पृश्य - आचमनादिकाने स्पर्श करून - विविक्तदेशे - एकांत प्रदेशात - आसीनः - बसला. ॥१५॥ परावरज्ञः - भूत व भविष्य जाणणारा - सः - तो - ऋषिः - मुनी - अव्यक्तरंहसा - ज्याचा वेग अस्पष्ट आहे अशा - कालेन - कालाने - भुवि - पृथ्वीवर - युगे युगे - प्रत्येक युगात - प्राप्तं - प्राप्त झालेल्या - युगधर्मव्यतिकरं - युगधर्माच्या संकराला ॥१६॥ च - आणि - भौतिकानां - महाभूतांपासून उत्पन्न झालेल्या - भावानां - पदार्थाच्या - तत्कृतं - त्याने केलेल्या - शक्तिल्हासं - शक्तिच्या क्षौणत्वाला - च - आणि - अश्रद्दधानान् - श्रद्धारहित - निःसत्वान् - निर्बल - दुर्मेधान् - मंदबुद्धी - ल्हसितायुषः - व अल्पायू अशा ॥१७॥ च - आणि - दुर्भगान् - दुर्दैवी अशा - जनान् - लोकांना - वीक्ष्य - पाहून - अमोघदृक् - ज्याची दृष्टि म्हणजे अवलोकन व्यर्थ होणारे नाही असा - मुनिः - ऋषि - दिव्येन - प्रकाशमान म्हणजे ज्ञानसंपन्न अशा - चक्षुषा - दृष्टीने - सर्ववर्णाश्रमाणां - संपूर्ण वर्ण व आश्रम यांचे - यत् - जे - हितं - कल्याण - दध्यौ - चिंतिता झाला. ॥१८॥ चातुर्होत्रं - चार ऋत्विजांकडून केले जाणारे - वैदिकं - वेदोक्त असे - प्रजानां - लोकांचे - कर्म - कर्म - शुद्धं - शुद्ध करणारे असे - वीक्ष्य - पाहून - यज्ञसंतत्यै - निरंतर यज्ञ चालू राहण्याकरिता - एकं - एक - वेदं - वेदाला - चतुर्विधं - चार प्रकाराने - व्यदधात् - करिता झाला. ॥१९॥ ऋग्यजुःसामाथर्वाख्याः - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ह्या नावांनी प्रसिद्ध असे - चत्वारः - चार - वेदाः - वेद - उद्धृताः - विभागले - च - आणि - इतिहासपुराणं - इतिहास व पुराण - पंचमः - पाचवा - वेदः - वेद - उच्यते - बोलला जातो. ॥२०॥ तत्र - त्यात - ऋग्वेदधरः - ऋग्वेदाला धारण करणारा - पैलः - पैल - सामगः - सामवेदाचे गायन करणारा - कविः - विव्दान - जैमिनिः - जैमिनि - उत - आणि - यजुषां - यजुर्वेदामध्ये - निष्णातः - नैपुण्य मिळविलेला - एकः - एकटा - वैशंपायनः - वैशंपायन - एव - च. ॥२१॥ दारुणः - उग्र - मुनिः - ऋषि - सुमंतुः - सुमंतु - अथर्वाङिगरसां - अथर्ववेदामध्ये - आसीत् - झाला - मे - माझा - पिता - बाप - रोमहर्षणः - रोमहर्षण - इतिहासपुराणानां - इतिहास व पुराणे ह्यांत ॥२२॥ ते - ते - एते - हे - ऋषयः - ऋषि - स्वंस्वं - आपापल्या - वेदं - वेदाला - अनेकधा - पुष्कळप्रकारे - व्यस्यन् - विभागते झाले - ते - ते - वेदाः - वेद - शिष्यैः - शिष्यांकडून - प्रशिष्यैः - शिष्यांच्या शिष्यांकडून - तच्छिष्यैः - त्यांच्या म्हणजे प्रशिष्यांच्या शिष्यांकडून - शाखिनः - शाखायुक्त - अभवन् - झाले. ॥२३॥ ते - ते - एव - च - वेदाः - वेद - यथा - ज्या रीतीने - दुर्मेधैः - मंदबुद्धि अशा - पुरुषैः - पुरुषांनी - धार्यन्ते - धारण केले जातात - एवं - अशा रीतीने - कृपणवत्सलः - दीनांवर दया करणारा - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न असा - व्यासः - व्यास - चकार - करता झाला. ॥२४॥ त्रयी - तीन वेद - स्त्रीशूद्रव्दिजबन्धूनां - स्त्रिया, शूद्र व अधम व्दिज ह्यांच्या - श्रुतिगोचरा - श्रवणास योग्य - न - नाहीत - कर्म श्रेयसि - कल्याणकारक कर्माविषयी - मूढानां - अज्ञान्यांचे - श्रेयः - कल्याण - इह - यात - एवं - ह्याप्रमाणे - भवेत् - होईल - इति - असे - मुनिना - मुनीने - कृपया - दयेने - भारतं - भारत - आख्यानं - कथानक - कृतं - केले. ॥२५॥ व्दिजाः - अहो व्दिज हो ! - एवं - याप्रमाणे - सदा - नेहमी - सर्वात्मकेन - सर्वतोपरी - अपि - सुद्धा - भूतानां - प्राण्यांच्या - श्रेयसि - कल्याणाविषयी - प्रवृत्तस्य - झटणार्याचे - हृदयं - अंतःकरण - यदा - जेव्हा - ततः - त्यापासून - न अतुष्यत् - संतुष्ट झाले नाही ॥२६॥ नातिप्रसीदद्धृदयः - ज्यांचे अंतःकरण अत्यंत प्रसन्न नाही असा - विविक्तस्थः - एकांतात बसलेला - धर्मवित् - धर्म जाणणारा - शुचौ - शुद्ध अशा - सरस्वत्यः - सरस्वतीच्या - तटे - काठी - वितर्कयन् - अनेक कल्पना करणारा असा होत्साता - इदं - हे - प्रोवाच - म्हणाला. ॥२७॥ हि - खरोखर - धृतव्रतेन - व्रतांचे धारण करणार्या अशा - मया - माझ्याकडून - छंदांसि - वेद - गुरवः - गुरू - अग्नयः - अग्नि - निर्व्यलीकेन - निष्कपटपणाने - मानिताः - पूजिले गेले - च - आणि - अनुशासनं - आज्ञा - गृहीतं - स्वीकारली गेली. ॥२८॥ च - आणि - भारतव्यपदेशेन - भारताच्या मिषाने - आम्नायार्थः - वेदांचा अर्थ - दर्शितः - दाखविला - उत - आणि - हि - खरोखर - यत्र - ज्यांत - स्त्रीशूद्रादिभिः - स्त्रिया व शूद्र इत्यादिकांकडून - अपि - सुद्धा - धर्मादि - धर्म वगैरे - दृश्यते - जाणला जातो. ॥२९॥ अथापि - तरीसुद्धा - वत - अरेरे ! ! ! - मे - माझा - ब्रह्मवर्चस्यसत्तमः - ब्रह्मतेजाने युक्त अशा लोकांमध्ये श्रेष्ठ असा - दैह्यः - देहात राहणारा - विभुः - व्यापक म्हणजे पूर्ण - चैव - आणखीही - आत्मा - जीव - आत्मना - स्वस्वरूपाने - असंपन्नः - अपूर्ण - इव - सारखा - हि - निःसंशय - आभाति - भासतो. ॥३०॥ किंवा - अथवा - परमहंसानां - निष्काम भक्ति करणार्यांस - प्रियाः - आवडते - भागवताः - भगवंतासंबंधी किंवा भगवद्भक्ति करणार्या वैष्णवासंबंधी - धर्माः - धर्म - प्रायेण - विशेषतः - न निरूपिताः - वर्णिले नाहीत - ते - ते - एव - च - हि - खरोखर - अच्युतप्रिया - भगवंताला आवडणारे ॥३१॥ एवं - याप्रमाणे - आत्मानं - स्वतःला - खिलं - अपूर्ण - मन्यमानस्य - मानणार्या - खिद्यतः - खिन्न झालेल्या - तस्य - त्या - कृष्णस्य - व्यासाच्या - प्राक् - पूर्वी - उदाहृतं - सांगितलेल्या - आश्रमं - आश्रमाला - नारदः - नारद - अभ्यागात् - आला. ॥३२॥ मुनिः - ऋषी - सुरपूजितं - देवांनी पूजिलेल्या - तं - त्या - नारदं - नारदाला - आगतं - आलेला - अभिज्ञाय - जाणून - सहसा - एकाएकी - प्रत्युत्थाय - उठून व सामोरे जाऊन - विधिवत् - यथाविधी - पूजयामास - पूजिता झाला. ॥३३॥ अध्याय चवथा समाप्त |