श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय २ रा - अन्वयार्थ

भगवत्कथा आणि भगवद्‌भक्तीचे माहात्म्य -

इति - याप्रमाणे - संप्रश्नसंहृष्टः - उत्तम प्रश्नांनी संतुष्ट झालेला - रौ‌महर्षणिः - रोमहर्षणाचा पुत्र - म्ह. सूत - तेषां - त्या - विप्राणां - ऋषींच्या - वचः - भाषणाचे - प्रतिपूज्य - अभिनंदन करून - प्रवक्तुं - उत्तर देण्यास - उपचक्रमे - आरंभ करिता झाला. ॥१॥

अनुपेतं - व्रतबंध न झालेल्या - अपेतकृत्यं - कर्माचा त्याग केलेल्या - प्रव्रजन्तं - अरण्यात जावयाला निघाल्यामुळे - यं - ज्याच्या - विरहकातरः - वियोगाला भ्यालेला - द्वैपायनः - व्यास ऋषी - पुत्रा - हे बाळा ! - इति - अशी - आजुहाव - हाक मारिता झाला. - तन्मयतया - त्याचेच स्वरूप असल्यामुळे - तरवः - वृक्षांनी - अभिनेदुः - उत्तर दिले - सर्वभूतहृदयं - सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात योगबलाने प्रवेश करणार्‍या - तं - त्या - मुनिं - मुनीला - आनतः - नम्र - अस्मि - आहे. ॥२॥

यः - जो - अंधं - घोर - तमः - अंधःकाराला - संसाराला - अतितितीर्षतां - तरून जाण्यास इच्छिणार्‍या - संसारिणां - संसारी लोकांच्या - करुणया - दयेने - एकं - केवळ - अध्यात्मदीपं - आत्मविद्येचे प्रकाशक - स्वानुभावं - ज्याचा प्रभाव विलक्षण आहे असे - अखिलश्रुतिसारं - सर्व वेदांचे सार - पुराणगुह्यं - पुराणात गुप्त असलेले - आह - सांगता झाला - तं - त्या - मुनीनां - ऋषींच्या - गुरुं - गुरूला - व्याससूनुं - व्यासपुत्राला - उपयामि - शरण जातो. ॥३॥

नारायणं - नारायणाला - चैव - आणि - नरोत्तमं - सर्व पुरुषांत श्रेष्ठ अशा - नरं - नराला - चैव - आणखीही - सरस्वतीं देवीं - देवी सरस्वतीला - नमस्कृत्य - नमस्कार करून - ततः - नंतर - जयं - ग्रंथाला - उदीरयेत् - आरंभ करावा. ॥४॥

हे मुनयः - हे ऋषी हो ! - भवभ्दिः - आपण - अहं - मी - साधु - चांगल्या प्रकारे - लोकमंगलं - लोकांचे कल्याण ज्यायोगे होईल असा - पृष्टः - विचारलेला - यत् - ज्याअर्थी - कृष्णसंप्रश्नः - कृष्णचरिताविषयींचा प्रश्न - कृतः - केलात - येन - तेणेकरून - आत्मा - अंतःकरण - सुप्रसीदति - समाधान पावले. ॥५॥

यतः - ज्याच्या योगाने - अधोक्षजे - परमेश्वराच्या ठिकाणी - अहैतुकी - निष्काम - अप्रतिहता - निर्विघ्न - यया - जिच्या योगाने - आत्मा - अंतःकरण - संप्रसीदति - सुप्रसन्न होते - एतादृशी - अशा प्रकारची - भक्तिः - भावना - भवति - उत्पन्न होते - सः - तो - वै - च - पुंसां - पुरुषांचा - परः - श्रेष्ठ - धर्मः - धर्म होय. ॥६॥

भगवति - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीकृष्णाविषयी - प्रयोजितः - दाखवून दिलेला - भक्तियोगः - भक्तियोग - आशु - लौकर - वैराग्यं - वैराग्य - जनयति - उत्पन्न करतो - यत् - ज्यामुळे - अहैतुकं - शुष्क तर्कांनी अगोचर - तत् - ते - ज्ञानं - ज्ञान - जनयति - उत्पन्न होते. ॥७॥

पुंसां - पुरुषांनी - यः - जो - धर्मः - धर्म - स्वनुष्ठितः - चांगल्या रीतीने आचरण केलेला तो - विष्वक्सेनकथासु - परमात्म्याच्या कथेविषयी - यदि - जर - रतिं - प्रेमा - न उत्पादयेत् - उत्पन्न करणार नाही - हि - तर - केवलं - निखालस - श्रमः - कष्ट - एव - मात्र होत. ॥८॥

आपवर्ग्यस्य - ज्याचे पर्यवसान मोक्ष आहे अशा - धर्मस्य - धर्मांचे - अर्थाय - फलाकरिता - अर्थः - द्रव्य - न उपकल्पते - योग्य होत नाही - धर्मैकांतस्य - धर्म हेच ज्याचे मुख्य फल अशा - अर्थस्य - द्रव्याच्या - लाभाय - लाभाकरिता - कामः - इच्छा - नहि स्मृतः - सांगितलेली नाही. ॥९॥

यावता - जेवढयाने - जीवेत - शरीर धारण होईल - तावान् - तेवढेच - कामस्य - उपभोग्य वस्तूचे - लाभः - फळ - इंद्रियप्रीतिः - इंद्रियांनाच संतुष्ट करणे - न युज्यते - योग्य नव्हे - जीवस्य - मनुष्याला - तत्त्वजिज्ञासा - रहस्य जाणण्याची इच्छा - अर्थः - हाच काय तो उपयोग - इह - ह्या लोकामध्ये - यः - जो - च कर्मभिः - यज्ञादि कर्मे करून स्वर्गादि इच्छा करणे - सः न - तो काही खरा उपयोग नव्हे. ॥१०॥

यत् - जे - अद्वयं - अद्वितीय - ज्ञानं - ज्ञान त्यालाच - तत्त्वविदः - ज्ञाते लोक - तत् - तेच खरे - तत्त्वं - तत्त्व - वदन्ति - असे म्हणतात - ब्रह्मा - ब्रह्मदेव - परमात्मा - परमेश्वर - भगवान् - भगवंत - इति - इत्यादि - शब्‌द्‌यते - निरनिराळे शब्द लावतात. ॥११॥

तत् - ते - श्रद्दधानाः - भक्तिमान - मुनयः - ऋषी - ज्ञानवैराग्ययुक्तया - ज्ञानवैराग्यसंपन्न असल्यामुळे - श्रुतगृहीतया - वेदांतादि श्रवणाने प्राप्त झालेल्या - भक्त्या - भक्तीने - आत्मनि - अंतःकरणातच - आत्मानं - आत्मस्वरूप - पश्यन्ति - पाहतात. ॥१२॥

अतः - ह्याकरिता - व्दिजश्रेष्ठाः - ऋषिश्रेष्ठ हो ! - पुम्भिः - पुरुषांनी - वर्णाश्रमविभागशः - वर्णाश्रमविभागाप्रमाणे - स्वनुष्ठितस्य - चांगल्या रीतीने आचरण केलेल्या - धर्मस्य संसिद्धिः - धर्माचे उक्त फल - हरितोषणं - ईश्वराचे हेच आराधन ॥१३॥

तस्मात् - ह्याकरिता - एकेन - एकाग्र - मनसा - चित्ताने - सात्वतां पतिः - भक्तांचा संरक्षक - भगवान् - असा जो भगवान - नित्यदा - निरंतर - श्रोतव्यः - श्रवण करण्यास योग्य आहे - च - त्याचप्रमाणे - कीर्तितव्यः - कीर्तन करण्यासही योग्य आहे - ध्येयः - ध्यान करण्यासही योग्य तोच व - पूज्यः - पूजन करण्यासही योग्य तोच. ॥१४॥

कोविदाः - विद्वान लोक - यदनुध्यासिना - ज्याच्या ध्यानरूप खड्‌गाने - युक्तः - परिपूर्णतेस पोचलेले - ग्रंथिनिबंधनं कर्म - अहंकारग्रंथी उत्पन्न करणारे कर्म - छिन्दन्ति - तोडून टाकतात - तस्य - त्यांच्या - कथारतिं - कथांची आवड - कः - कोण - न कुर्यात् - करणार नाही ? ॥१५॥

हे विप्राः - हे व्दिजश्रेष्ठ हो ! - शुश्रूषोः - सेवेत तत्पर अशा पुरुषांची - श्रद्दधानस्य - जे भक्तिमान आहेत त्यांची - वासुदेवकथारुचिः - परमेश्वराच्या कथांविषयी अभिरुची - पुण्यतीर्थनिषेवणात् - पुण्यकारक तीर्थांच्या सेवेने - महत्सेवया - साधुसंताच्या सेवेनेच - स्यात् - उत्पन्न होते. ॥१६॥

हि - कारण - पुण्यश्रवणकीर्तनः - ज्याच्या कथाचे श्रवण व कीर्तन पुण्यदायक आहे असा - सतां - साधूंचा - सुहृत् - हितकर्ता - कृष्णः - जो श्रीकृष्ण - स्वकथां - स्वतःच्या कथा - श्रृण्वतां - ऐकणार्‍याच्या - हृदि - अंतःकरणामध्ये - अन्तस्थः - हृदयात वास्तव्य करणारा - सत् - असून - अभद्राणि - पातकांचा - विधुनोति - नाश करतो. ॥१७॥

नित्यं - निरंतर - भागवतसेवया - भगवद्भक्तांची सेवा केली म्हणजे - अभद्रेषु - दुर्वासनारूप पातके - नष्टप्रायेषु - बहुधा नष्टप्राय होतात - सत्सु - ती नष्ट झाली असता - उत्तमश्लोके - पुण्यकारक कीर्ती आहे ज्याची अशा - भगवति - भगवंताची - नैष्ठिकी - एकनिष्ठ - भक्ती - भक्ति - भवति - उत्पन्न होते. ॥१८॥

तदा - तेव्हा - भक्ति उत्पन्न झाली म्हणजे - रजः - रजोगुण - तमः तमोगुण - कामलोभादयः - कामलोभादि - ये - जे - भावाः - विकार होतात - च - आणि - एतैः - ह्या विकारांनी - अनाविद्धं - विकृति न पावलेले - चेतः - अंतःकरण - सत्वे - सात्त्विक भावामध्ये - स्थितं - स्थिर होऊन - प्रसीदति - समाधान पावते. ॥१९॥

एवं - अशा रीतीने - प्रसन्नमनसः - प्रसन्न झालेल्या पुरुषास - मुक्तसंगस्य - ज्याची आसक्ती सुटली आहे त्याला - भगवद्भक्तियोगतः - ईश्वरभक्तीच्या योगाने - भगवतत्त्वविज्ञानं - भगवत्स्वरुपाचे ज्ञान - जायते - प्राप्त होते. ॥२०॥

आत्मनि - अंतःकरणामध्ये - ईश्वरे - ईश्वराचे - दृष्टे - साक्षाद्दर्शन झाले असता - एव - अशा प्रकारची - अस्य - त्याची - हृदयग्रंथीः - अहंकाररूपी गाठ - भिद्यते - उकलते - सर्वसंशयाः - सारे संशय - छिद्यन्ते - नष्ट होतात. - च - आणि - कर्माणि - सारी कर्मे - क्षीयन्ते - लयास जातात. ॥२१॥

अतः - म्हणून - कवयः - बुद्धिमान मनुष्य - नित्यं - निरंतर - परमया - अत्यंत - मुदा - आनंदाने - भगवति - भगवान - वासुदेवे - वासुदेव ह्यांची - आत्मप्रसादनीं - अंतःकरण शुद्ध करणारी - भक्तिं - भक्ती - कुर्वंति - करतात. - वै - निश्चयेकरून ॥२२॥

सत्त्वं - सत्त्वगुण - रजः - रजोगुण - तमः - तमोगुण - इति - असे हे - प्रकृतेः - प्रकृतीचे - मायेचे - गुणाः - गुण - स्युः - आहेत. - तैः - त्यांनी - युक्तः - युक्त - एकः - असा काय तो एकच - परः - श्रेष्ठ - पुरुषः - पुरुष - परमात्मा - इह - या लोकी - अस्य - ह्या जगाचे - स्थित्यादये - उत्पत्ति, पालन इत्यादी करण्याकरिता - हरिविरिञ्चिहरेति - विष्णु, ब्रह्मदेव, महेश्वर इत्यादी - संज्ञाः - नावे - धत्ते - धारण करतो. - तत्र - त्यातही - नृणां - मनुष्यांचे - श्रेयांसि - कल्याण - खलु - निश्चयेकरून - सत्त्वतनोः - ज्याची मूर्ति सात्त्विक आहे त्यापासूनच म्ह विष्णूपासूनच - स्युः - होते. ॥२३॥

पार्थिवात् - जड अशा - दारुणः - लाकडापेक्षा - धूमः - धूर हा श्रेष्ठ - तस्मात् - त्यापेक्षा - त्रयीमयः - तिन्ही वेदांत सांगितलेल्या कर्मांचा प्रवर्तक - अग्निः - अग्नि श्रेष्ठ - तमसः - तमोगुणापेक्षा - रजः - रजोगुण श्रेष्ठ - तस्मात् - त्यापेक्षा - यत् - जो - सत्त्वं - सत्त्वगुण हा श्रेष्ठ होय. - तत् - त्यामध्येच - ब्रह्मदर्शनम् - परब्रह्माचा साक्षात्कार घडतो. ॥२४॥

अथ - ह्याकरिता - अग्रे - पूर्वी - मुनयः - ऋषी - भगवन्तं - भगवान - विशुद्धं - अत्यंत शुद्ध - सत्त्वं - सत्त्वाची मूर्ती जो - अधोक्षजं - श्रीकृष्ण त्याची - भेजिरे - भक्ती करू लागले. - इह - ह्या मृत्यूलोकावर - ये - जे - तान् - त्यांचे - अनु - अनुकरण करतात ते - क्षेमाय - कल्याणाला - कल्पन्ते - पात्र होतात. ॥२५॥

अथ - तसेच - मुमुक्षवः - मोक्षाची इच्छा करणारे - घोररूपान् - अक्राळविक्राळ पिशाच्चे किंवा - भूतपतीन् - वेताळ इत्यादिकांना - हित्वा - सोडून - अनसूयवः - कोणाची कधीच निंदा न करणारे असे - संतः - असणारे - शान्ताः - शांतस्वरूपी - नारायणकलाः - नारायणस्वरूपालाच - हि - खरोखर - भजन्ति - भजतात. ॥२६॥

श्रीयैश्वर्यप्रजेप्सवः - द्रव्ये, ऐश्वर्य, व संतती यांची इच्छा करणारे - समशीलाः - समानशील असे - रजस्तमःप्रकृतयः - रजोगुण व तमोगुण ह्यांच्या अंकित असलेले - पितृभूतप्रजेशादीन् - पितर, भूत, प्रजापति इत्यादिकांची - वै - खरोखर - भजन्ति - आराधना करतात. ॥२७॥

वेदाः - वेद झाले तरी ते - वासुदेवपराः - परमेश्वराप्रीत्यर्थच असतात - मखाः - यज्ञ झाले तरी ते - वासुदेवपराः - परमेश्वराप्रीत्यर्थच असतात - योगाः - योग केले तरी ते - वासुदेवपराः - ईश्वराप्रीत्यर्थच - क्रियाः - किंवा कोणतेही कर्म घेतले तरी ते - वासुदेवपराः - ईश्वराप्रीत्यर्थच - सन्ति - असते. ॥२८॥

ज्ञानं - ज्ञान झाले तरी ते - वासुदेवपरं - परमेश्वराप्रीत्यर्थच - तपः - तप झाले तरी ते - वासुदेवपरं - परमेश्वराप्रीत्यर्थच - धर्मः - धर्म झाला तरी तो वासुदेवपरः - परमेश्वराप्रीत्यर्थच - गतीः - स्वर्गादि उत्तम गती झाल्या तरी त्या - वासुदेवपरा - ईश्वराप्रीत्यर्थच होत. ॥२९॥

अगुणः - निर्गुण असा - विभुः - परमेश्वर जो - सः - तो - एव - अशा प्रकारचा - असौ - असलेला - भगवान् - परमेश्वर - गुणमय्या - त्रिगुणरूपी - सदसद्रूपया - कार्यकारणात्मक - आत्ममायया - आपल्या मायेच्या योगाने - अग्रे - पूर्वीच - इदं - हे जग - ससर्ज - निर्माण करिता झाला. ॥३०॥

विज्ञानेन - मायेच्या योगाने - विजृम्भितः - गुरफटलेला तया - त्याच मायेच्या योगाने - विलसितेषु - उत्पन्न झालेल्या - एषु गुणेषु - ह्या गुणांमध्ये - अंतः - आत - प्रविष्टः - प्रवेश केलेला - गुणवान् - जणो काय त्रिगुणात्मक - अभिमानी - इव - असा - आभाति - भास होतो. ॥३१॥

यथा - ज्याप्रमाणे - एकः - एकच - वन्हिः - अग्नि - स्वयोनिषु - आपणास प्रगट करणार्‍या - दारुषु - काष्ठांमध्ये - अवहितः - प्रविष्ट झालेला - नाना इव - अनेक प्रकारचा - भाति - भासतो - तथा - त्याप्रमाणे - विश्वात्मा पुमान् - जगाला व्यापून राहिलेला परमेश्वर - भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - भाति - भासतो. ॥३२॥

असौ - हा - भूतसूक्ष्मेन्द्रियात्मभिः - सूक्ष्म भूते, इंद्रिये आणि मन यांहीकरून - गुणमयैः - त्रिगुणांच्या - भावैः - कार्यांनी - स्वनिर्मितेषु - स्वतःच निर्माण केलेल्या - भूतेषु - प्राणिमात्रांमध्ये - निर्विष्टः - प्रवेश केलेला - तद्‌गुणान् - त्या भूतांच्या गुणांस - भुङ्क्ते - भोगतो. ॥३३॥

देवतिर्यङ्नरादिषु - देव, पशुपक्षी व मनुष्य इत्यादिकांमध्ये - लीलावतारानुरतः - लीलेने घेतलेल्या अवतारांचे ठिकाणी अनुरक्त असा - लोकभावनः - जगत्कर्ता - एषः वै - हा निश्चयेकरून - सत्त्वेन - सत्त्वगुणाने - लोकान् - लोकांना - भावयति - पालन करतो. ॥३४॥

अध्याय दुसरा समाप्त

GO TOP