भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -




सनत्सुजातीय

अध्याय ५ वा
शोकः क्रोधश्च लोभश्च कामो मानः परासुता ।
ईर्ष्या मोहो विधित्सा च कृपासूया जुगुप्सुता ॥ १ ॥
द्वादशैते महादोषा मनुष्यप्राणनाशनाः ।
एकैकमेते राजेन्द्र मनुष्यान् पर्युपासते ।
यैराविष्टो नरः पापं मूढसंज्ञो व्यवस्यति ॥ २ ॥
स्पृहयालुरुग्रः परुषो वावदान्यः
     क्रोधं बिभ्रन्मनसा वै विकत्थी ।
नृशंसधर्माः षडिमे जना वै
     प्राप्याप्यर्थं नोत सभाजयन्ते ॥ ३ ॥
संभोगसंविद् विषमोऽतिमानी
     दत्त्वा विकत्थी कृपणो दुर्बलश्च ।
बहुप्रशंसी वन्दितद्विट् सदैव
     सप्तैवोक्ताः पापशीला नृशंसा ॥ ४ ॥
धर्मश्च सत्यं च तपो दमश्च
     अमात्सर्यं ह्रीस्तितिक्षानसूया ।
दानं श्रुतं चैव धृतिः क्षमा च
     महाव्रता द्वादश ब्राह्मणस्य ॥ ५ ॥
यो नैतेभ्यः प्रच्यवेद्‍ द्वादशभ्यः
     सर्वामपीमां पृथिवीं स शिष्यात् ।
त्रिभिर्द्वाभ्यामेकतो वान्वितो यो
     नास्य स्वमस्तीति च वेदितव्यम् ॥ ६ ॥
दमस्त्यागोऽथाप्रमाद इत्येतेष्वमृतं स्थितम् ।
एतानि ब्रह्ममुख्यानां ब्राह्मणानां मनीषिणाम् ॥ ७ ॥
सद् वासद् वा परीवादो ब्राह्मणस्य न शस्यते ।
नरकप्रतिष्ठास्ते स्युर्य एवं कुरुते जनाः ॥ ८ ॥
मदोऽष्टादशदोषः स स्यात्पुरा योऽप्रकीर्तितः ।
लोकद्वेष्यं प्रातिकूल्यमभ्यसूया मृषावचः ॥ ९ ॥
कामक्रोधौ पारतत्र्यं परिवादोऽथ पैशुनम् ।
अर्थहानिर्विवादश्च मात्सर्यं प्राणिपीडनम् ॥ १० ॥
ईर्ष्या मोदोऽतिवादश्च संज्ञानाशोऽभ्यसूयिता ।
तस्मात् प्राज्ञो न माद्येत सदा ह्येतद् विगर्हितम् ॥ ११ ॥
सौहृदे वै षड्‍ गुणा वेदितव्याः
     प्रिये हृष्यन्त्यप्रिये च व्यथन्ते ।
स्यादात्मनः सुचिरं याचते यो
     ददात्ययाच्यमपि देयं खलु स्यात् ॥ १२ ॥
इष्टान् पुत्रान् विभवान् स्वाश्च दारा-
     नभ्यर्थितश्चार्हति शुद्धभावः ।
त्यक्तद्रव्यः संवसेन्नेह कामात्
     भुङ्क्ते कर्म स्वाशिषं बाधते च ॥ १३ ॥
द्रव्यवान् गुणवानेवं त्यागी भवति सात्विकः ।
पञ्च भूतानि पञ्चभ्यो निवर्तयति तादृशः ॥ १४ ॥
एतत् समृद्धमप्यूर्द्धं तपो भवति केवलम् ।
सत्वात् प्रच्यवमानानां संकल्पेन समाहितम् ॥ १५ ॥
यतो यज्ञाः प्रवर्धन्ते सत्यस्यैवावरोधनात् ।
मनसान्यस्य भवति वाचान्यस्याथ कर्मणा ॥ १६ ॥
संकल्पसिद्धं पुरुषमसंकल्पोऽधितिष्ठति ।
ब्राह्मणस्य विशेषेण किञ्चान्यदपि मे श्रुणु ॥ १७ ॥
अध्यापयेन्महदेतद् यशस्यं
     वाचो विकाराः कवयो वदन्ति ।
अस्मिन्योगे सर्वमिदं प्रतिष्ठितं
     ये तद् विरमृतास्ते भवन्ति ॥ १८ ॥
न कर्मणा सुकृतेनैव राजन्
     सत्यं जयेज्जुहुयाद् वा यजेद् वा ।
नैतेन बालोऽमृत्युमभ्येति राजन्
     रतिं चासौ न लभत्यन्तकाले ॥ १९ ॥
तूष्णीमेक उपासीत चेष्टेत मनसापि न
तथा संस्तुतिनिंदाभ्यां प्रीतिरोषौ विवर्जयेत् ॥ २० ॥
अत्रैव तिष्ठन् क्षत्रिय ब्रह्माविशति पश्यति ।
वेदेषु चानुपूर्व्येण एतद्विद्वन् ब्रवीमि ते ॥ २१ ॥
॥ इति श्रीमहाभारते उद्योगपर्वणि सनत्सुजातपर्वणि
सनत्सुजातवाक्ये पञ्चचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४५ ॥


सनत्सुजात योगप्रधान ब्रह्मविद्या उपदेशितात.

सनत्सुजात- राजा, शोक, क्रोध, लोभ, काम, मान, परासुतानिद्रापरत्व, ईर्ष्या, मोह, विधित्सा, कृपा-स्नेह, असूया व जिगुप्सुता, हे पूर्वोक्त बारा महादोष मनुष्यांच्या प्राणांचा नाश करणारे आहेत. हे राजेंद्रा, हे दोष मनुष्यांचे पृथक् पृथक् सेवन करतात आणि ज्या पुरुषामध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे त्याची बुद्धि मूढ- विवेकशून्य होते. तो दुखःरूप पापफलाला कारण होणारे कर्म आचरतो. स्पृहावान् पुरुष निर्दय होतो व दाता रूक्षवाक् होतो. तो याचकांना उद्देशून वृथा कठोर भाषण करतो. मनाने क्रोध धारण करणारा पुरुष आत्मश्लाघा करूंलागतो. हे सहा जन नृशंसधर्मांनीं युक्त असतात. ते अर्थाला प्राप्त झाले असतांनाहि कोणाचा संमान करीत नाहींत. १ संभोगसंविद्, २ विषमदृष्टि ठेवणारा, ३ अतिमानी, ४ दान देऊन आत्मश्लाघा करणारा, ५ कृपण, ६ दुर्बल, व ७ सर्वदा स्त्रीद्वेष करणारा, हे सात पापशील पुरुष नृशंस म्हटले आहेत.

धर्म, सत्य, तप, दम, अमात्सर्य, ह्री, तितिक्षा, अनसूया, दान, श्रुत, धैर्य व क्षमा हीं ब्राह्मणांची बारा व्रते आहेत. जो ब्राह्मण या बारा व्रतांपासून कधींहि च्युत होत नाहीं, तो या सर्व पृथ्वीचे अनुशासन करतो. १ चित्तवृत्तिनिरोधाने अगोदर ' त्व- पदार्थाला जाणून मागून वेदान्त- श्रवणादि उपायांनीं त्या ' त्वं - पदार्थालाच महत्व. आहे, असा निश्चय केला जातो. ही पहिली ब्रह्मविद्या होय. पण पूर्वी श्रवणादि- उपायानीं प्रत्यगाल्याचें ब्रह्मत्व परोक्षवृत्तीनें निश्चित करून मागून निदिष्यासनानेंहि प्रत्यगात्म्याचा ब्रह्यभाव साक्षात् जाणला जातो. ती दुसरी ब्रह्मविद्या आहे. या दोन्ही क्रमांचे फल व साधने एकरूपच आहेत, हें सांगण्यासाठी भगवातू सनत्सुजात पूर्वोक्तच हेयदोष ष उपादेय गुण दाखवितात.

यांतील तीन, दोन, किंवा एका महाव्रतामध्येंहि ज्याचा पक्षपात असतो तो त्यासाठीं सर्वस्वाचा त्याग करतो. त्यामुळें त्याचें 'स्व' म्हणून कांहीं आहे, असे मानू नये.

हे राजा, दम, त्याग व अप्रमाद, यामध्ये अमृत स्थित आहे आणि ब्रह्म हेंच ज्यांचे मुख्य प्राप्य आहे, त्या विद्वान् ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणांच्या ठिकाणी ही बारा व्रते असतात. ब्राह्मणांच्या विद्यमान किंवा अविद्यमान - खर्‍या किंवा खोट्या दोषांचे संकीर्तन करणें केव्हांहि विहित नाहीं. यास्तव जे लोक त्यांच्या दोषांचे संकीर्तन करतात ते नरकांत पडतात.

पूर्वी सांगितलेला जो मद, त्याचे अठरा दोष आहेत व त्यांचें वर्णन पूर्वीं केलेंच आहे. दमाचे विरोधी म्हणून प्रातिकृल्यादि जे दोष सांगितले तेच मदाचे दोष आहेत, असें पूर्वी सुचविले आहे; पण हेच ते, असें म्हणून सांगितले नाहींत. यास्तव त्यांचेंच आतां संकीर्तन करतो.

१ परस्त्रीगमनादि, हें लोकांच्या द्वेषास पात्र होणारे कर्म, २ धर्मादिकांमध्ये विघ्न आणणें हें प्रातिकूल्य, ३ गुणिजनांमध्ये दोषांचा आरोप करणें ही अभ्यसूया, ४ असत्य भाषण, ५ स्त्रियांचा अभिलाष, एतद्‌रूप काम, ६ क्रोध, ७ पारतंत्र्य, ८ निंदा, ९ राजद्वारादिकांमध्यें परदोष कथन, एतद्‌रूप पैशुन, १० नटनर्तक - वेश्यादिकांच्या निमित्तानें किंवा दंडानें वित्तनाश, एतद्‌रूप अर्थहानि, ११ वैर, १२ मात्सर्य, १३ प्राणिपीडा, १४ ईर्ष्या, १५ मोद- दर्पाला कारण होणारा हर्ष, १६ अमर्याद वचन, एतद्‌रूप अतिवाद, १७ कार्याकार्यविवेकराहित्य हा संज्ञानाश व १८ सतत परद्रोहशीलता ही अभ्यसूयिता, हे मदाचे अठरा दोष आहेत. यास्तव बुद्धिमानाने केव्हांहि मत्त होऊं नये. आपत्कालींहि त्यानें त्या दोषांचा आश्रय करूं नये. कारण सज्जनांनी या मदवत्त्वाची निंदा केली आहे.

हे राजा, सौहृदांमध्यें सहा गुण आहेत, असें जाणावे. सुहृदाचें प्रिय झालें असतां हृष्ट होणें, त्यांचें अप्रिय झालें असतां व्यथित होणें, हे सुहृदांचे दोन मुख्य गुण आहेत. जो दात्यापाशीं अयाच्य असलेल्याहि पुत्रादिकांची याचना करतो, त्या दीर्घकाल याचना करणाराला या दात्याने अदेय असलेलेहि इष्टार्थ द्यावे. शुद्धचित्त पुरुष इष्ट पुत्र, वैभव व धन याचकाला देतो. ज्याला आपण आपले सर्वस्व दिलें असेल त्याच्या गृहांत राहू नये. मीं याच्यावर उपकार केले आहेत, अशा बुद्धीनें तर तेथें कधींहि वास करूं नये. कारण त्यानें कधीं अनादर केल्यास स्नेहाचा भंग होतो. हा स्नेहाचा चवथा गुण आहे.

आतां पांचवा गुण कोणता तें सांगतो. सुहृद् स्वकर्मानें संपादन केलेल्या धनाचाच उपभोग घेतो. मित्रादिकांनीं संपादन केलेल्या धनावर कधींहि उपजीविका करीत नाहीं. कारण परधनावर उपजीविका केल्यास कदाचित् अपमान होण्याचा संभव असतो व स्नेहाचा भंग होतो, तो होऊं नये म्हणून हा सुहृद् स्वकष्टार्जित धनावर उपजीविका करतो.

आतां सहावा सुहृद्‌गुण सांगतात - मित्राच्या हितासाठी सुहद् आपल्या हिताचाहि नाश करतो. जो द्रव्यवान् गृहस्थ अशा गुणांनींयुक्त, म्ह० त्यागी- दाता, सात्त्विक- सत्त्वप्रधान होतो, तो श्रोत्रादि इंद्रियांच्या आकारांनी परिणत झालेल्या पंचभूतांना शब्दादि भूतविषयांपासून निवृत्त करतो. स्वविषयापासून इंद्रियांना निवृत्त करणें हें समृद्ध व उत्कृष्ट केवल तप होय. तेंच ऊर्ध्वगति प्राप्त करून देते. तें ज्ञानाप्रमाणें याच लोकीं कृतकृत्यता प्राप्त करून देत नाहीं, हें खरें, तथापि तें केवलतप अतिशय समृद्ध झालें असलें तरी वैराग्याच्या अभावीं धैर्यापासून च्युत होणाऱ्या त्याला दिव्य भोग देते. त्यामुळें मी आतां दिव्य भोग भोगीन, अशा संकल्पाने समृद्ध झालेलें तें त्यांना ऊर्ध्वगति देते.

सत्याचा निश्चय केल्याने कांहीं साधकांचे यज्ञ मनानेंच सिद्ध होतात. कारण सत्यसंकल्पाचा निश्चय केल्याने त्यांना सत्यसंकल्पत्व प्राप्त झालेलें असतें. याविषयी वेदामध्ये 'त्रित' नावाच्या मुनीची कथा आलेली आहे.

चिताला त्याच्या भ्रात्याने एका मोठ्या कूपामध्ये ढकलून दिलें असतां त्यानें तेथेंच सावधान चित्ताने सर्व यज्ञ संपादन केला. त्याविषयी 'त्रित: कृपे अवहित: देवान् हवते ऊतये' असा मंत्र आहे व त्यांत- 'त्रित' या नांवाचा मुनि कूपामध्ये राहूनच मनाने ध्यान करीत यज्ञसंततीसाठीं- यज्ञाचा विच्छेद होऊं नये म्हणून देवांचे आव्हान करता झाला, असें सांगितलें आहे. हा उत्तम अधिकाऱ्यांचा पक्ष होय.

दुसऱ्या मध्यम अधिकाऱ्यांचा यज्ञ, ब्रह्मयज्ञ, जप, इत्यादिरूप वाणीनेंच सिद्ध होतो. अनेक प्राकृत लोकांचा यज्ञ कर्माने म्ह० आज्य, पशु, पुरोडाश इत्यादि- प्रधान क्रियेनेच सिद्ध होतो. सगुण ब्रह्मज्ञानानेंच ज्यांचा संकल्प सिद्ध झाला आहे, अशा पुरुषापाशीं संकल्पशून्य चिदात्मा उपस्थित होतो. ज्याप्रमाणें प्रसंगीं भृत्यापाशीं राजा उपस्थित होतो किंवा राजा त्याचा प्रेरक होतो, त्याप्रमाणें हा चिदात्मा सत्यसंकल्प पुरुषाचा अधिष्ठाता म्ह० प्रेरक होतो. शिवाय आणखी दुसरीहि गोष्ट मी तुला सांगतो ती ऐक. निर्गुण ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणाच्या विशेष प्रकारच्या संकल्पानेंच असंकल्प चिदात्मा अधिष्ठित होतो; कारण सगुणोपासकाच्या अपेक्षेनें निर्गुण ब्रह्मवेत्त्यामध्यें सत्यसंकल्पत्वादि अतिशय आविर्भूत होतात. हे राजा, हें योगशास्त्र शिष्यांना शिकवावे. त्यांच्याकडून त्याचें ग्रहण करवावें. कारण हे शास्त्र ब्रह्मप्राप्तीला हितकर आहे. याहून अन्य शास्त्रें हा केवल वाणीचा विकार आहे, असें विद्वान् लोक सांगतात.

या योगी पुरुषामध्यें हें सर्व जगत् प्रतिष्ठित आहे. हें सर्व त्याच्या अधीन आहे व हें जे जाणतात ते अमृत- मुक्त होतात. हे राजा, केवल पुण्यकर्माने सत्य ब्रह्माची प्राप्ति होत नाहीं. अविद्वान् पुरुष जो होम किंवा याग करतो, त्या होमयागात्मक कर्माने तो मोक्षाला प्राप्त होत नाहीं व त्याला मरणोत्तर सुखहि होत नाहीं. एकान्तामध्यें शरीराच्या सर्व चेष्टा सोडून मनाचाहि व्यापार थांबवून ब्रह्माची उपासना करावी. ब्रह्मचिंतन हीच ब्रह्मोपासना होय. कोणी स्तुति केली तर संतुष्ट होऊं नये व निंदा केली तर क्रुद्ध होऊं नये. हे क्षत्रिया, याप्रमाणे क्रमाने वेदामध्ये पूर्वोक्त दृष्टि ठेवून जो रहातो, त्याला या जीवदवस्थेंतच - येथल्या येथेंच ब्रह्मदर्शन होतें. घट फुटताच घटाकाश महाकाशांत जसे तादात्म्य पावते, त्याप्रमाणें उपाधीचा विलय झाला. असतां तत्त्ववेत्ता ब्रह्माशी तादात्म्य पावतो.


GO TOP