PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १८१ ते १९१

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८१ ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - त्रिष्टुभ्


कदु॒ प्रेष्टा॑वि॒षां र॑यी॒णाम॑ध्व॒र्यन्ता॒ यदु॑न्निनी॒थो अ॒पाम् ॥
अ॒यं वां॑ य॒ज्ञो अ॑कृत॒ प्रश॑स्तिं॒ वसु॑धिती॒ अवि॑तारा जनानाम् ॥ १ ॥

कत् ऊं इति प्रेष्ठौ इषां रयीणां अध्वर्यन्ता यत् उत्ऽनिनीथः अपाम् ।
अयं वां यज्ञो अकृत प्रऽशस्तिं वसुधिती इति वसुऽधिती अवितारा जनानाम् ॥ १ ॥

हे अश्वीहो, तुम्ही अत्यंत प्रेमळ, व सात्विक आवेश आणि संपत्ति ह्यांची प्राप्ति देण्यांत अग्रगण्य आहांत, तर स्वर्गीय उदकांचा अंश म्हणून तुम्ही जें कांही घेऊन येणार आहांत तें केव्हां ? हे दिव्य संपत्तीच्या निधींनो, हे लोकपालांनो, पहा ह्या यज्ञाच्या द्वारानें तुमचें गुण संकीर्तन आम्हीं यथामति केलेलें आहे. ॥ १ ॥


आ वा॒मश्वा॑सः॒ शुच॑यः पय॒स्पा वात॑रंहसो दि॒व्यासो॒ अत्याः॑ ॥
म॒नो॒जुवो॒ वृष॑णो वी॒तपृ॑ष्ठा॒ एह स्व॒राजो॑ अ॒श्विना॑ वहन्तु ॥ २ ॥

आ वां अश्वासः शुचयः पयःऽपाः वातऽरंहसः दिव्यासः अत्याः ।
मनःऽजुवः वृषणः वीतऽपृष्ठाः आ इह स्वऽराजः अश्विना वहन्तु ॥ २ ॥

तुमच्या रथाचे पवित्र व दिव्य अश्व, आवेशी अमृत प्राशन करणारे, वार्‍याप्रमाणें प्रबल, मनाप्रमाणें वेगवान्, वीर्यवान, पुष्ट आणि आपल्याच तेजानें प्रकाशणारे असे आहेत; ते तुम्हांस त्वरित इकडे घेऊन येवोत. ॥ २ ॥


आ वां॒ रथो॑ऽ॒वनि॒र्न प्र॒वत्वा॑न्सृ॒प्रव॑न्धुरः सुवि॒ताय॑ गम्याः ॥
वृष्ण॑ स्थातारा॒ मन॑सो॒ जवी॑यानहम्पू॒र्वो य॑ज॒तो धि॑ष्ण्या॒ यः ॥ ३ ॥

आ वां रथः अवनिः न प्रवत्वान् सृप्रऽवन्धुरः सुविताय गम्याः ।
वृष्णः स्थातारा मनसः जवीयान् अहंऽपूर्वः यजतः धिष्ण्या यः ॥ ३ ॥

उतार जमीनीवरून वाहणार्‍या प्रचंड जलाच्या लोंढ्याप्रमणे तुमचा रथ भरधांव जात असतो. त्याच्या वरील सारथ्याकरितां केलेली बसण्याची जागाही प्रशस्त असते. तो रथ आमचे कल्याणांकरितां इकडे वळो. ध्यानयोग्य व चिरंतन अश्वीहो, मन हें एवढें जबरदस्त चपल, पण त्यापेक्षांही तो तुमचा पवित्र रथ वेगवान् असून सर्वांच्या पूर्वीं अहमहमिकेनें पुढें जात असतो. ॥ ३ ॥


इ॒हेह॑ जा॒ता सम॑वावशीतामरे॒पसा॑ त॒न्वा३॑नाम॑भिः॒ स्वैः ॥
जि॒ष्णुर्वा॑म॒न्यः सुम॑खस्य सू॒रिर्दि॒वो अ॒न्यः सु॒भगः॑ पु॒त्र ऊ॑हे ॥ ४ ॥

इहऽइह जाता सं अवावशीतां अरेपसा तन्वा नामऽभिः स्वैः ।
जिष्णुः वा अन्यः सुऽमखस्य सूरिः दिवः अन्यः सुऽभगः पुत्र ऊहे ॥ ४ ॥

येथें (यज्ञांत) प्रकट होणार्‍या अश्वीदेवांचे गुणानुवाद वारंवार गात असतात ते त्यांची मूर्ति निष्कलंक व कीर्ति पवित्र म्हणूनच गात असतात. अश्वीहो तुम्हांपैकी एकजण आमच्या ह्या उत्तम यज्ञाचा यशस्वी असा पुरस्कर्ता व दुसरा द्युलोकाचा दैवशाली पुत्रच कीं काय असें वाटतें. ॥ ४ ॥


प्र वां॑ निचे॒रुः क॑कु॒हो वशाँ॒ अनु॑ पि॒शङ्ग॑ रूपः॒ सद॑नानि गम्याः ॥
हरी॑ अ॒न्यस्य॑ पी॒पय॑न्त॒ वाजै॑र्म॒थ्नार रजां॑स्यश्विना॒ वि घोषैः॑ ॥ ५ ॥

प्र वां निऽचेरुः ककुहः वशान् अनु पिशङ्गऽरूपः सदनानि गम्याः ।
हरी इति अन्यस्य पीपयन्त वाजैः मथ्नाः रजांसि अश्विना वि घोषैः ॥ ५ ॥

मोठ्या वेगानें खाली धांवणारा, उंच उंच शिरांचा सुवर्णमय असा तुमचा रथ तुमच्या इच्छेनेंच आम्हां भक्तांच्या घरांकडे येवो. अश्वीदेवहो, तुम्हांपैकीं कोणाचीही स्तुति केली तरी त्या स्तोत्र सामर्थ्यानें तुमच्या रथाचे घोडे तुंद होऊन जातात व आपल्या खिंकाळण्यानें सर्व अंतरिक्ष दणाणून टाकतात. ॥ ५ ॥


प्र वाँ॑ श॒रद्वा॑न्वृष॒भो न नि॒ष्षाट् पू॒र्वीरिष॑श्चरति॒ मध्व॑ इ॒ष्णन् ॥
एवै॑र॒न्यस्य॑ पी॒पय॑न्त॒ वाजै॒र्वेष॑न्तीरू॒र्ध्वा न॒द्यो न॒ आगुः॑ ॥ ६ ॥

प्र वां शरत्ऽवान् वृषभः न निष्षाट् पूर्वीः इषः चरति मध्वः इष्णन् ।
एवैः अन्यस्य पीपयन्त वाजैः वेषन्तीः ऊर्ध्वाः नद्यः नः आ अगुः ॥ ६ ॥

शरद ऋतूंतील धान्य संपत्तिप्रमाणें समृद्ध व प्रतापी असा तुमचा हा रथ अमृताचे असंख्य उत्साह-प्रद प्रवाह सोडीत सोडीत सर्वत्र संचार करीत असतो. तुम्हांपैकी कोणाचीही स्तुति केली तरी त्या सद्यः फलदायी स्तोत्र सामर्थ्यानी सर्वत्र पसरणार्‍या विशाल नद्या तुडुंब भरून वहात आमच्याकडे येतात. ॥ ६ ॥


अस॑र्जि वां॒ स्थवि॑रा वेधसा॒ गीर्बा॒ळ्हे अ॑श्विना त्रे॒धा क्षर॑न्ती ॥
उप॑स्तुताववतं॒ नाध॑मानं॒ याम॒न्नया॑मञ्छृणुतं॒ हवं॑ मे ॥ ७ ॥

असर्जि वां स्थविरा वेधसा गीः बाळ्हे अश्विना त्रेधा क्षन्ती ।
उपऽस्तुतौ अवतं नाधमानं यामन् अया मन् श्रृणुतं हवं मे ॥ ७ ॥

सर्व नियामक अश्वीहो, तीन प्रकारांनी उफाड्यानें वहाणारा तुमचा पुरातन व प्रसिद्ध अशा स्तुतीचा ओघच माझ्या मुखावाटे बाहेर पडत आहे, तर त्या स्तुतीनें प्रसन्न होऊन तुमच्या कृपेची याचना करणार्‍या मज भक्तावर दया करा आणि संचार करीत असतांना किंवा स्वस्थ विश्रांति घेत असतांनाही माझ्या प्रार्थनेकडे कृपा करून लक्ष असूं द्या. ॥ ७ ॥


उ॒त स्या वां॒ रुश॑तो॒ वप्स॑सो॒ गीस्त्रि॑ब॒र्हिषि॒ सद॑सि पिन्वते॒ नॄन् ॥
वृषा॑ वां मे॒घो वृ॑षणा पीपाय॒ गोर्न सेके॒ मनु॑षो दश॒स्यन् ॥ ८ ॥

उत स्या वां रुशतः वप्ससः गीः त्रिऽबर्हिषि सदसि पिन्वते नॄन् ।
वृषा वां मेघः वृषणा पीपाय गोः न सेके मनुषः दशस्यन् ॥ ८ ॥

तसेंच, जेथें तीन ठिकाणीं दर्भासनें घातलेली असतात अशा यज्ञ गृहीं तुमच्या त्या अति उज्वल तेजःस्वरूपाचें स्तवन, भक्तांची अंतःकरणें उचंबळून टाकते. हे वीरांनो, मनोरथांची वृष्टि करणारा असा तुमचा कृपा मेघ ज्ञानरसाचीही वृष्टि करून मनुष्यांना अभीष्ट साधून देऊन समृद्ध करतो. ॥ ८ ॥


यु॒वां पू॒षेवा॑श्विना॒ पुरं॑धिर॒ग्निमु॒षां न ज॑रते ह॒विष्मा॑न् ॥
हु॒वे यद्वां॑ वरिव॒स्या गृ॑णा॒नो वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ९ ॥

युवां पूषाऽइव अश्विना पुरंऽधिः अग्निं उषां न जरते हविष्मान् ।
हुवे यत् वां वरिवस्या गृणानः विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ९ ॥

अश्वी देव हो, पूषा देवा प्रमाणेंच तुम्हीं आहांत. ज्ञानी भक्त अर्पण करून, अश्वि व उषा ह्यांच्या प्रमाणें तुमचेंही स्तवन करीत असतो. व खर्‍या निष्ठेनें तुमची स्तुती करून जर मी तुमचा धांवा करीत आहें तर तात्काळ फलद्रुप होणारा व उत्साहप्रद असा तुमचा आश्रय आम्हांस लाभेल असें करा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८२ ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - जगती, त्रिष्टुभ्


अभू॑दि॒दं व॒युन॒मो षु भू॑षता॒ रथो॒ वृष॑ण्वा॒न्मद॑ता मनीषिणः ॥
धि॒यं॒जि॒न्वा धिष्ण्या॑ वि॒श्पला॑वसू दि॒वो नपा॑ता सु॒कृते॒ शुचि॑व्रता ॥ १ ॥

अभूत् इदं वयुनं ओ इति सु भूषत रथः वृषण्ऽवान् मदत मनीषिणः ।
धियंऽजिन्वा धिष्ण्या विश्पलावसू इति दिवः नपाता सुऽकृते शुचिऽव्रता ॥ १ ॥

पहा ही अश्वीदेवांच्या आगमनाची खूण पटत चालली. चला, पुढें सरसावा, हा पहा त्या वीरांचा रथ. ज्ञानी भक्तांनो, त्यांना प्रसन्न करा. ते सद्‍बुद्धीला प्रेरणा करणारे आणि ध्यानगम्य असून मनुष्य मात्रांविषयींच्या दयेची संपत्ति त्यांच्यापाशीं मुबलक आहे. ते द्युलोकांतून प्रकट होतात व पुण्यवंतांना त्यांच्या सत्तेच्या पवित्रपणाची प्रचीति येते. ॥ १ ॥


इंद्र॑तमा॒ हि धिष्ण्या॑ म॒रुत्त॑मा द॒स्रा दंसि॑ष्ठा र॒थ्या र॒थीत॑मा ॥
पू॒र्णं रथं॑ वहेथे॒ मध्व॒ आचि॑तं॒ तेन॑ दा॒श्वांस॒मुप॑ याथो अश्विना ॥ २ ॥

इंद्रऽतमा हि धिष्ण्या मरुत्ऽतमा दस्रा दंसिष्ठा रथ्या रथीऽतमा ।
पूर्णं रथं वहेथे इति मध्वः आऽचितं तेन दाश्वांसं उप याथः अश्विना ॥ २ ॥

खरोखर तुम्हीं इंद्राशी एकरूप असून निदिध्यास योग्य आहांत. तुम्हीं अगदीं मरुतांप्रमाणेंच शत्रुनाशक, व अद्‍भुत कर्मकारी, अतिरथी असून रथावर आरूढ झालां आहांत, तेव्हां हे अश्वी हो, अमृतरसानें ओतप्रोत भरलेल्या आपल्या रथांत बसून तुम्हींही हविर्दान अर्पण करणार्‍या भक्तांकडे जात असतां. ॥ २ ॥


किमत्र॑ दस्रा कृणुथः॒ किमा॑साथे॒ जनो॒ यः कश्चि॒दह॑विर्मही॒यते॑ ॥
अति॑ क्रमिष्टं जु॒रतं॑ प॒णेरसुं॒ ज्योति॒र्विप्रा॑य कृणुतं वच॒स्यवे॑ ॥ ३ ॥

किं अत्र दस्रा कृणुथः किं आसाथे इति जनः यः कः चित् अहविः महीयते ।
अति क्रमिष्टं जुरतं पणेः असुं ज्योतिः विप्राय कृणुतं वचस्यवे ॥ ३ ॥

समर्थ देवांनो, येथें हें काय करतां व काय म्हणून थांबलां आहांत ? येथील मंडळी पहावी तों, ती देवाला हवि अर्पण न करतां आपल्याच तोर्‍यांत गर्क आहेत. तर ह्यांना द्या सोडून, आणि अधार्मिक दुष्टांच्या आयुष्याची मर्यादा कमी करून, देवांचे गुणकीर्तन करणार्‍या भक्तजनांना ज्ञानजोतीचा प्रकाश प्राप्त करून द्या. ॥ ३ ॥


ज॒म्भय॑तम॒भितो॒ राय॑तः॒ शुनो॑ ह॒तं मृधो॑ वि॒दथु॒स्तान्य॑श्विना ॥
वाचं॑वाचं जरि॒तू र॒त्नितनीं॑ कृतमु॒भा शंसं॑ नासत्यावतं॒ मम॑ ॥ ४ ॥

जम्भयतं अभितः रायतः शुनः हतं मृधः विदथुः तानि अश्विना ।
वाचंऽवाचं जरितुः रत्‍निनीं कृतं उभा शंसं नासत्या अवतं मम ॥ ४ ॥

सज्जनांवर दोहोंकडून तोंड टाकणार्‍या कुत्र्यांना आपल्या दाढेखाली चिरडून टाका व सज्जनांच्या शत्रूंचा नाश करा. अश्वीदेवहो, हें सर्व तुम्हाला कळतच आहे, आम्ही विनंति केली पाहिजेच असें नाही. स्तवन कर्त्याचा प्रत्येक शब्द रत्नमय करा आणि हे सत्यस्वरूप देवांनो, आपण उभयतां माझेंही स्तोत्र असेंच सफल करा. ॥ ४ ॥


यु॒वमे॒तं च॑क्रथुः॒ सिंधु॑षु प्ल॒वमा॑त्म॒न्वन्तं॑ प॒क्षिणं॑ तौ॒ग्र्याय॒ कम् ॥
येन॑ देव॒त्रा मन॑सा निरू॒हथुः॑ सुपप्त॒नी पे॑तथुः॒ क्षोद॑सो म॒हः ॥ ५ ॥

युवं एतं चक्रथुः सिंधुषु प्लवं आत्मन्ऽवन्तं पक्षिणं तौग्र्याय कम् ।
येन देवऽत्रा मनसा निःऽऊहथुः सुऽपप्तनि पेतथुः क्षोदसः महः ॥ ५ ॥

तुम्हीं तुग्रपुत्रांकरितां महासमुद्रांत सचेतन व पंख असलेली आणि सुखकर अशी एक नौका तयार केलीत. तुम्हीं उड्डाण कुशल, तेव्हां त्या नावेच्या योगानें उदक कल्लोळांतून वर उडून ईश्वराकडे लक्ष ठेवणार्‍या त्या भक्तासह तुम्हीं निघून गेलांत. ॥ ५ ॥


अव॑विद्धं तौ॒ग्र्यम॒प्स्व१॑न्तर॑नारम्भ॒णे तम॑सि॒ प्रवि॑द्धम् ॥
चत॑स्रो॒ नावो॒ जठ॑लस्य॒ जुष्टा॒ उद॒श्विभ्या॑मिषि॒ताः पा॑रयन्ति ॥ ६ ॥

अवऽविद्धं तौग्र्यं अप्ऽसु अंन्तः अनारम्भणे तमसि प्रऽविद्धम् ।
चतस्रः नावः जठलस्य जुष्टाः उत् अश्विऽभ्यां इषिताः पारयन्ति ॥ ६ ॥

तुग्रपुत्राला महा सागरांत फेंकून दिलें होते तेथें "आरंभ ना शेवट" अशा दाट काळोखांत तो गटांगळ्या खात असतांना, अश्वीदेवहो, स्वप्रेरणेनें चालविलेल्या व समुद्रांत ज्यांचा आश्रय फारच प्रिय वाटतो, अशा त्या पहा चार नावा त्याला सागराच्या अगदीं पार नेत आहेत. ॥ ६ ॥


कः स्वि॑द्वृ्॒क्षो निष्ठि॑तो॒ मध्ये॒ अर्ण॑सो॒ यं तौ॒ग्र्यो ना॑धि॒तः प॒र्यष॑स्वजत् ॥
प॒र्णा मृ॒गस्य॑ प॒तरो॑रिवा॒रभ॒ उद॑श्विना ऊहथुः॒ श्रोम॑ताय॒ कम् ॥ ७ ॥

कः स्वित् वृक्षः निःऽस्थितः मध्ये अर्णसः यं तौग्र्यः नाधितः परिऽअसस्वजत् ।
पर्णा मृगस्य पतरोऽइव आऽरभे उत् अश्विनौ ऊहथुः श्रोमताय कम् ॥ ७ ॥

आतुर झालेल्या तुग्रपुत्रानें वृक्षाप्रमाणे निश्चल अशा समुद्रातील व्यक्तीला कवटाळले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाहीं. शेवटी अचानकपणें पंख फुटलेल्या आसन्नमरण मृगाप्रमाणे तुम्ही तुग्रपुत्राच्या साहाय्यार्थ धांवलात आणि त्याची मुक्तता केलीत. ॥ ७ ॥


तद् वां॑ नरा नासत्या॒वनु॑ ष्या॒द्यद्वां॒ माना॑स उ॒चथ॒मवो॑चन् ॥
अ॒स्माद॒द्य सद॑सः सो॒म्यादा वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ८ ॥

तत् वां नरा नासत्यौ अनु स्यात् यत् वां मानासः उचथं अवोचन् ।
अस्मात् अद्य सदसः सोम्यात् आ विद्याम एषं वृजनं जीरदाऽनुम् ॥ ८ ॥

वीर्यशाली सत्यस्वरूप अश्वीहो, आम्हीं मान-पुत्रांनी जें स्तवन केलें आहे तें तुम्हाला प्रिय होवो. जेथें सोम अर्पण होत असतो अशाच ठिकाणीं, तात्काळ फलद्रुप होणारा तुमचा उत्साह-प्रद आसरा आम्हांस लाभो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८३ ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - त्रिष्टुभ्


तं यु॑ञ्जाथां॒ मन॑सो॒ यो जवी॑यान् त्रिवन्धु॒रो वृ॑षणा॒ यस्त्रि॑च॒क्रः ॥
येनो॑पया॒थः सु॒कृतो॑ दुरो॒णं त्रि॒धातु॑ना पतथो॒ विर्न प॒र्णैः ॥ १ ॥

तं युञ्जाथां मनसः यः जवीयान् त्रिःवन्धुरः वृषणा यः त्रिऽचक्रः ।
येनऽउपयाथः सुऽकृतः दुरोणं त्रिऽधातुना पतथः विः न पर्णैः ॥ १ ॥

वीर्यसंपन्न अश्वीदेवहो, मनापेक्षांही ज्याचा वेग जास्त, ज्याला बैठकी तीन व चाकेंही तीनच आहेत असा तो तुमचा रथ जोडून सिद्ध करा. पक्षी आपल्या पंखांनी भरार्‍या मारतो, त्याप्रमाणें तीन तत्त्वांनी युक्त अशा त्या रथावर बसून सदाचाररत भक्ताच्या घरीं तुम्हीं वेगानें जात असतां. ॥ १ ॥


सु॒वृद्र थो॑ वर्तते॒ यन्न॒भि क्षां यत्तिष्ठ॑थः॒ क्रतु॑म॒न्तानु॑ पृ॒क्षे ॥
वपु॑र्वपु॒ष्या स॑चतामि॒यं गीर्दि॒वो दु॑हि॒त्रोषसा॑ सचेथे ॥ २ ॥

सुऽवृत् रथः वर्तते यन् अभि क्षां यत् तिष्ठथः क्रतुऽमन्ता अनु पृक्षे ।
वपुः वपुष्या सचतां इयं गीः दिवः दुहित्रा उषसा सचेथे इति ॥ २ ॥

आपल्या दयेचें सामर्थ्य दाखविण्याची मनीषा धरून जेव्हां तुम्हीं आपल्या रथांत बसतां, तोही पृथ्वीकडे फारच जलदीनें परंतु सुरळीतपणें येतो. तर ज्याप्रमाणें तुम्हीं आकाश-कन्या उषा हिच्याबरोबर जातां त्याप्रमाणें आम्हीं गाइलेली ही तुमची मनोहर स्तुतीही तुमच्या स्वतःबरोबर जावो. ॥ २ ॥


आ ति॑ष्ठतं सु॒वृतं॒ यो रथो॑ वा॒मनु॑ व्र॒तानि॒ वर्त॑ते ह॒विष्मा॑न् ॥
येन॑ नरा नासत्येष॒यध्यै॑ व॒र्तिर्या॒थस्तन॑याय॒ त्मने॑ च ॥ ३ ॥

आ तिष्ठतं सुऽवृतं यः रथः वां अनु व्रतानि वर्तते हविष्मान् ।
येन नरा नासत्या इषयध्यै वर्तिः याथः तनयाय त्मने च ॥ ३ ॥

हे शूर नासत्यांनो, हविर्द्रव्यांनी परिपूर्ण अशा तुमच्या नियत मार्गस्थ रथावर तुम्ही आरूढ व्हा, आणि हविर्दात्या भक्ताचे, आणि त्याच्या पुत्रपौत्रांचे कल्याण करण्यासाठी तुम्हीं आमच्या निवासस्थानी या. ॥ ३ ॥


मा वां॒ वृको॒ मा वृ॒कीरा द॑धर्षी॒न्मा परि॑ वर्क्तमु॒त माति॑ धक्तम् ॥
अ॒यं वां॑ भा॒गो निहि॑त इ॒यं गीर्दस्रा॑वि॒मे वां॑ नि॒धयो॒ मधू॑नाम् ॥ ४ ॥

मा वां वृकः मा वृकीः आ दधर्षीत् मा परि वर्क्तं उत मा अति धक्तम् ।
अयं वां भागः निऽहितः इयं गीः दस्रौ इमे वां निऽधयः मधूनाम् ॥ ४ ॥

हे पराक्रमी अश्वी देवहो, माझी ही स्तोत्रें, हविर्द्रव्ये आणि मधुरसाचे कुंभ मी तुमच्यासाठीं सिद्ध केलें आहेत. तुम्ही आम्हांस त्यजू नका अथवा वगळू नका. क्रोधरूपी लांडगा व अवकृपारूपी लांडगीचे रूप धारण केलेले तुमचे रथवाहक गर्दभ आम्हांस पीडा न देवोत. ॥ ४ ॥


यु॒वां गोत॑मः पुरुमी॒ळ्हो अत्रि॒र्दस्रा॒ हव॒तेऽ॑वसे ह॒विष्मा॑न् ॥
दिशं॒ न दि॒ष्टामृ॑जू॒येव॒ यन्ता मे॒ हवं॑ नास॒त्योप॑ यातम् ॥ ५ ॥

युवां गोतमः पुरुऽमीळ्हः अत्रिः दस्रा हवते अवसे हविष्मान् ।
दिशं न दिष्टां ऋजुयाऽइव यन्ता मे हवं नासत्या उप यातम् ॥ ५ ॥

अद्‍भुत पराक्रमी अश्वीदेवहो, गोतमऋषि, पुरुमिळ्ह आणि अत्रिऋषि हेही तुमचा प्रसाद व्हावा म्हणून हवि अर्पण करून तुमचा धावा करीत असतात तर हे नासत्यहो, नेमिष्ठ मनुष्य अगदी सरळ धोरणानेंच उद्दिष्ट प्राप्तिच्या मार्गास लागतो, त्याप्रमाणें माझ्या हांकेसरशी तुम्ही नीट मजकडॆ या. ॥ ५ ॥


अता॑रिष्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्य प्रति॑ वां॒ स्तोमो॑ अश्विनावधायि ॥
एह या॑तं प॒थिभि॑र्देव॒यानै॑र्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥

अतारिष्म तमसः पारं अस्य प्रति वां स्तोमः अश्विनौ अधायि ।
आ इह यातं पथिऽभिः देवऽयानैः विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ६ ॥

आम्हीं आतां अज्ञान अंधःकाराच्या पलिकडे जाऊन पोहोंचलो. तेव्हां हे अश्वीदेवांनो, यथामति केलेलें हें तुमचे गुणवर्णन तुम्हांलाच अर्पण असो. दिव्य जनांना प्रिय अशा मार्गांनी इकडे आमच्याकडे या म्हणजे तात्काळ फलद्रुप होणारा असा तुमचा आश्रय आम्हांस लाभो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८४ ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - त्रिष्टुभ्


ता वा॑म॒द्य ताव॑प॒रं हु॑वेमो॒च्छन्त्या॑मु॒षसि॒ वह्नि॑रु॒क्थैः ॥
नास॑त्या॒ कुह॑ चि॒त्सन्ता॑व॒र्यो दि॒वो नपा॑ता सु॒दास्त॑राय ॥ १ ॥

ता वां अद्य तौ अपरं हुवेम उच्छन्त्यां उषसि वह्निः उक्थैः ।
नासत्या कुह चित् सन्तौ अर्यः दिवः नपाता सुदाःऽतराय ॥ १ ॥

सत्य स्वरूप अश्वीदेव हो, हा येथें हवि अर्पण करणारा ऋत्विज् उभा आहे. तुम्हीं परम विख्यात, तेव्हां आम्हीं भक्तजन उषःकाल होतांच तुमचे स्वागत स्तोत्रांनीं, आज काय आणि उद्यां काय, नेहमींच करूं. हे आकाशांत प्रकट होणार्‍या देवांनो, तुम्हीं कोठेंहि असलात तरी आम्हीं उपासनानिष्ठ होऊन दानशील यजमानासाठीं तुम्हांस हवि अर्पण करतों. ॥ १ ॥


अ॒स्मे ऊ॒ षु वृ॑षणा मादयेथा॒मुत्प॒णीँर्ह॑तमू॒र्म्या मद॑न्ता ॥
श्रु॒तं मे॒ अच्छो॑क्तिभिर्मती॒नामेष्टा॑ नरा॒ निचे॑तारा च॒ कर्णैः॑ ॥ २ ॥

अस्मे इति ऊं इति सु वृषणा मादयेथां उत् पणीन् हतं ऊर्म्या मदन्ता ।
श्रुतं मे अच्छोक्तिऽभिः मतीनां एष्टा नरा निऽचेतारा च कर्णैः ॥ २ ॥

वीर्यशाली अश्वी देवांनों, तुम्हीं आमच्या यज्ञांत आनंद-भरीत व्हा आणि भक्त प्रेमाच्या उमाळ्यानें हर्ष निर्भर होऊन दानधर्म न करणार्‍या कवडी चुंबक दुष्टाचा निःपात करा. हे शूरांनों, उत्कृष्ट स्तवनांनीं युक्त अशा उपासनेचा स्वीकार करणारे आणि त्यांचा भाव उत्तम तऱ्हेने जाणणारे असे तुम्हीं आपल्या कानांनीं माझा धांवा ऐकून घ्या. ॥ २ ॥


श्रि॒ये पू॑षन्निषु॒कृते॑व दे॒वा नास॑त्या वह॒तुं सू॒र्यायाः॑ ॥
व॒च्यन्ते॑ वां ककु॒हा अ॒प्सु जा॒ता यु॒गा जू॒र्णेव॒ वरु॑णस्य॒ भूरेः॑ ॥ ३ ॥

श्रिये पूषन् इषुकृताऽइव देवा नासत्या वहतुं सूर्यायाः ।
वच्यन्ते वां ककुहाः अप्ऽसु जाताः युगा जूर्णाऽइव वरुणस्य भूरेः ॥ ३ ॥

हे सर्व पोषक देवा, बाणा प्रमाणें वेगानें जाणार्‍या अश्वी देवांनां सूर्यादेवीच्या विवाहाला घेऊन जाण्यासाठीं त्यांचे स्तवन भक्तजन गात आहेत. हे अश्विदेवांनों अंतरिक्षांत प्रकट झालेले हे तुमचे नामांकित विशाल अश्व त्या सर्व समर्थ वरुणाच्या अश्वांच्या पुरातन जोडी प्रमाणेंच अगदीं वाखाणण्या योग्य आहेत. ॥ ३ ॥


अ॒स्मे सा वां॑ माध्वी रा॒तिर॑स्तु॒ स्तोमं॑ हिनोतं मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
अनु॒ यद् वां॑ श्रव॒स्या सुदानू सु॒वीर्या॑य चर्ष॒णयो॒ मद॑न्ति ॥ ४ ॥

अस्मे इति सा वां माध्वी इति रातिः अस्तु स्तोमं हिनोतं मान्यस्य कारोः ।
अनुं यत् वां श्रवस्या सुदानू इति सुऽदानू सुऽवीर्याय चर्षणयः मदन्ति ॥ ४ ॥

मधुर रस-प्रिय देवांनों, तो तुमचा अवर्णनीय प्रसाद आम्हांवर होवो; सन्मान्य अशा ह्या तुमच्या कवीच्या स्तोत्रांचा प्रभाव गाजवा. हे अत्युदार देवांनों, उत्कृष्ट प्रतीचें शौर्य बल लाभावें म्हणून सर्व उपासक जन तुमच्याच कीर्तन श्रवणांत तल्लीन होत असतात. ॥ ४ ॥


ए॒ष वां॒ स्तोमो॑ अश्विनावकारि॒ माने॑भिर्मघवाना सुवृ॒क्ति ॥
या॒तं व॒र्तिस्तन॑याय॒ त्मने॑ चा॒गस्त्ये॑ नासत्या॒ मद॑न्ता ॥ ५ ॥

एषः वां स्तोमः अश्विनौ अकारि मानेभिः मघऽवाना सुऽवृक्ति ।
यातं वर्तिः तनयाय त्मने च अगस्त्ये नासत्या मदन्ता ॥ ५ ॥

औदार्यशाली अश्वी देवहो, मानपुत्रांनीं तुमचें हें स्तुतीगान तुमच्या प्रीत्यर्थ शुद्धान्तःकरणानें गायिलेले आहे. नासत्यहो, आमच्या आणि आमच्या पुत्रपौत्रांच्या कल्याणार्थ घरीं या आणि ह्या अगस्त्य ऋषीवर आपली मर्जी सुप्रसन्न ठेवा. ॥ ५ ॥


अता॑रिष्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्य प्रति॑ वां॒ स्तोमो॑ अश्विनावधायि ॥
एह या॑तम् प॒थिभि॑र्देव॒यानै॑र्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥

अतारिष्म तमसः पारं अस्य प्रति वां स्तोमः अश्विनौ अधायि ।
आ इह यातं पथिऽभिः देवऽयानैः विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ६ ॥

आम्हीं आतां ह्या अज्ञान अंधःकाराच्या तर पार पडलोंच. कारण, हे अश्विदेवांनो आमच्या मुखानें तुमच्या प्रीत्यर्थ स्तोत्रगायन केलेलें आहे. तुम्हां देवांना जे उचित दिसतात, त्या मार्गानें आमच्याकडे या, म्हणजे तात्काळ फलद्रूप होणारा असा तुमचा उत्साहवर्धक आश्रय आम्हांस प्राप्त होईल. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८५ ( द्यावापृथिवी सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : द्यावापृथिव्यौ - छंद - त्रिष्टुभ्


क॒त॒रा पूर्वा॑ कत॒राप॑रा॒योः क॒था जा॒ते क॑वयः॒ को वि वे॑द ॥
विश्वं॒ त्मना॑ बिभृतो॒ यद्ध॒ नाम॒ वि व॑र्तेते॒ अह॑नी च॒क्रिये॑व ॥ १ ॥

कतरा पूर्वा कतरा अपरा अयोः कथा जाते इति कवयः कः वि वेद ।
विश्वं त्मना बिभृतः यत् ह नाम वि वर्तेते इति अहनी चक्रियाऽइव ॥ १ ॥

ज्ञानीजन हो ! ह्या दोघीजणींतून आधींची कोण आणि नंतरची कोण, व ह्या कशा उत्पन्न झाल्या हें कोणालातरी माहीत असेल काय ? ह्यांनीं स्वतः सर्व विश्वाला धारण केलें असून, दिवस व रात्र ही जोडी चक्राप्रमाणें फिरत असते. ॥ १ ॥


भूरिं॒ द्वे अच॑रन्ती॒ चर॑न्तं प॒द्वन्तं॒ गर्भ॑म॒पदी॑ दधाते ॥
नित्यं॒ न सू॒नुं पि॒त्रोरु॒पस्थे॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ २ ॥

भूरिं द्वे इति अचरन्ती इति चरन्तं पत्ऽवंतं गर्भं अपदी इति दधाते इति ।
नित्यं न सूनुं पित्रोः उपऽस्थे द्यावा रक्षतं पृथिवी नः अभ्वात् ॥ २ ॥

जरी ह्या आपणा मनुष्यांप्रमाणें पायांनीं चालत नाहींत, कारण ह्यांस पाय नाहींत, तरी पायांनी चालणारे हजारों प्राणी ह्या दोघीजणी धारण करीत आहेत. तर औरस पुत्र जसा आई बापांच्या मांडीवर लडिवाळ पणानें लोळतो, त्याप्रमाणें हे द्यावापृथिवी हो, आम्हांस मांडीवर घेऊन भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ २ ॥


अ॒ने॒हो दा॒त्रमदि॑तेरन॒र्वं हु॒वे स्वर्वदव॒धं नम॑स्वत् ॥
तद्रो॑दसी जनयतं जरि॒त्रे द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ३ ॥

अनेहः दात्रं अदितेः अनर्वं हुवे स्वःवत् अवधं नमस्वत् ।
तत् रोदसी इति जनयतं जरित्रे द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ३ ॥

अदितीचें, म्हणजे ईश्वराच्या अनंत शक्तिचें, दातृत्व त्याच्या आयुधाप्रमाणेंच निष्कलंक अप्रतिहत, अक्षय्य आणि दिव्य-तेजोमय आहे. त्याच्या प्राप्ती करितां नम्रपणानें हवि अर्पण करून प्रार्थना करीत आहे. तर हे अंतरालस्थ देवतांनों, हे द्यावापृथिवीनों, मज भक्ताला तें ईश्वराचें कृपाछत्र प्राप्त करून द्या आणि भयंकर संकटापासून रक्षण करा. ॥ ३ ॥


अत॑प्यमाने॒ अव॒साव॑न्ती॒ अनु॑ ष्याम॒ रोद॑सी दे॒वपु॑त्रे ॥
उ॒भे दे॒वाना॑मु॒भये॑भि॒रह्नां॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ४ ॥

अतप्यमाने इति अवसा अवन्ती इति अनु स्याम रोदसी इति देवपुत्रे इति देवऽपुत्रे ।
उभे इति देवानां उभयेभिः अह्नां द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ४ ॥

ह्यांना कोणतीहि पिडा होऊं शकत नाहीं, ह्या सर्व देवतांच्या जननी व आपल्या कृपेनें भक्तांचे पालन करीत असतात. तर अशा देवींच्या अनुरोधानें आम्हीं चालावें हेंच योग्य आहे. तुम्हीं दोघीही आलटून पालटून रात्रंदिवस देवामध्येंच असतां तर हे द्यावापृथिवीहो, भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ ४ ॥


सङ्॒गच्छ॑माने युव॒ती सम॑न्ते॒ स्वसा॑रा जा॒मी पि॒त्रोरु॒पस्थे॑ ॥
अ॒भि॒जिघ्र॑न्ती॒ भुव॑नस्य॒ नाभिं॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ५ ॥

सङ्गच्छमाने इति सऽगच्छमाने युवती समन्ते इति संऽअंते स्वसारा जामी इति पित्रोः उपऽस्थे ।
अभिजिघ्रन्ती इत्यभिऽजिघ्रंती भुवनस्य नाभिं द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ५ ॥

तुम्हीं एकमेकी नेहमीं अगदी बरोबर असता. तुम्ही तरुण असून दोघींच्या सीमा इतक्या एकत्र आहेत, कीं तुम्हीं जणों परस्पर बहिणी किंवा आप्त आहात. त्यामुळें आईबापांच्या मांडीवर खेळणारा असा जो सर्व भुवनांचा मध्यवर्ती धुरीण आहे त्याचें प्रेमानें चुंबन घेतां तर हे द्यावापृथिवीहो, भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ ५ ॥


उ॒र्वी सद्म॑नी बृह॒ती ऋ॒तेन॑ हु॒वे दे॒वाना॒मव॑सा॒ जनि॑त्री ॥
द॒धाते॒ ये अ॒मृतं॑ सु॒प्रती॑के॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ६ ॥

उर्वी इति सद्मनी इति बृहती इति ऋतेन हुवे देवानां अवसा जनित्री इति ।
दधाते इति ये इति अमृतं सुप्रतीके इति सुऽप्रतीके द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ६ ॥

ज्या अत्यंत विस्तीर्ण, सर्वांचे अधिष्ठान अवाढव्य आणि देवांवरील प्रेमामुळें ज्या देवांच्या जननी म्हणून प्रख्यात आहेत, त्या द्यावापृथिवींची ह्या यज्ञरूपी सत्यमार्गानें मी प्रार्थना करतों. त्या अत्यंत मोहक असून भक्तांकरितां, आपल्या जवळ अमृत ठेवतात. तर द्यावापृथिवीहो, भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ ६ ॥


उ॒र्वी पृ॒थ्वी ब॑हु॒ले दू॒रेअ॑न्ते॒ उप॑ ब्रुवे॒ नम॑सा य॒ज्ञे अ॒स्मिन् ॥
द॒धाते॒ ये सु॒भगे॑ सु॒प्रतू॑र्ती॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ७ ॥

उर्वी इति पृथ्वी इति बहुले इति दूरेअन्ते इति दूरेऽअंते उप ब्रुवे नमसा यज्ञे अस्मिन् ।
दधाते इति ये इति सुभगे इति सुऽभगे सुप्रतूर्ती इति सुऽप्रतूर्ती द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ७ ॥

ज्या अति विस्तीर्ण, अत्यंत विशाल आणि अमर्याद आहेत, त्या ह्या देवतांनां ह्या यज्ञांत मी अतिशय नम्रपणानें प्रार्थना करतों; कीं तुम्ही भाग्यदायक आणि सहजगत्या यश मिळवून देणार्‍या अशा हे द्यावापृथिवीहो, भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ ७ ॥


दे॒वान्वा॒ यच्च॑कृ॒मा कच्चि॒दागः॒ सखा॑यं वा॒ सद॒मिज्जास्प॑तिं वा ॥
इ॒यं धीर्भू॑या अव॒यान॑मेषां॒ द्यावा॒ रक्ष॑तं पृथिवी नो॒ अभ्वा॑त् ॥ ८ ॥

देवान् वा यत् चकृम कत् चित् आगः सखायं वा सदं इत् जाःऽपतिं वा ।
इयं धीः भूयाः अवऽयानं एषां द्यावा रक्षतं पृथिवी इति नः अभ्वात् ॥ ८ ॥

आम्ही देवांचे जे जे कांहीं अपराध केले असतील, अथवा मित्रद्रोह अगर स्वामीद्रोह केला असेल तर आम्हीं एकाग्रतेनें म्हटलेलें हें स्तोत्र त्या सर्व पातकांची निष्कृति करो आणि हे द्यावापृथिवीहो, तुम्हींही भयंकर संकटापासून आमचें रक्षण करा. ॥ ८ ॥


उ॒भा शंसा॒ नर्या॒ माम॑विष्टामु॒भे मामू॒ती अव॑सा सचेताम् ॥
भूरि॑ चिद् अ॒र्यः सु॒दास्त॑राये॒षा मद॑न्त इषयेम देवाः ॥ ९ ॥

उभा शंसा नर्या मां अविष्टां उभे इति मां ऊती इति अवसा सचेताम् ।
भूरि चित् अर्यः सुदाःतराय इषा मदन्त इषयेम देवाः ॥ ९ ॥

परम स्तुत्य आणि मनुष्यहितकर अशा ह्या दोघीही माझें रक्षण करोत, आपल्या सहाय्य तत्परतेनें व कृपाळूपणानें माझ्या पाठीशी निरंतर राहोत, आणि हे देवांनों आम्हीं भक्तजन तत्वाढ्यतेनें हर्षभरीत होऊन आमच्या दानशूर यजमानंकरितां आमच्या प्रार्थनेनें तुमचीं मनें आकर्षण करूं शकूं असें करा. ॥ ९ ॥


ऋ॒तं दि॒वे तद॑वोचम् पृथि॒व्या अ॑भिश्रा॒वाय॑ प्रथ॒मं सु॑मे॒धाः ॥
पा॒ताम॑व॒द्याद्दु॑रि॒ताद् अ॒भीके॑ पि॒ता मा॒ता च॑ रक्षता॒म् अवो॑भिः ॥ १० ॥

ऋतं दिवे तत् अवोचं पृथिव्यै अभिऽश्रावाय प्रथमं सुऽमेधाः ।
पातां अवद्यात् दुःइतात् अभीके पिता माता च रक्षतांम् अवःऽभिः ॥ १० ॥

त्यांच्याच कृपेनें मी अत्यंत बुद्धिमान होऊन हें सत्यार्थपूर्ण स्तोत्र द्यावापृथिवीनीं सर्वांच्या अगोदर स्वस्थपणें ऐकून घ्यावें म्हणूनच म्हटलें. तरी सर्व पातका पासून आणि दुःखापासून त्या आमचें रक्षण करोत व ते आईबापाप्रमाणे आपल्या कृपाकटाक्षानें आमचा सांभाळ करोत. ॥ १० ॥


इ॒दं द्या॑वापृथिवी स॒त्यम॑स्तु॒ पित॒र्मात॒र्यदि॒होप॑ब्रु॒वे वा॑म् ॥
भू॒तं दे॒वाना॑मव॒मे अवो॑भिर्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ११ ॥

इदं द्यावापृथिवी इति सत्यं अस्तु पितः मातः यत् इह उपऽब्रुवे वाम् ।
भूतं देवानां अवमे इति अवःऽभिः र्विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ११ ॥

हे द्यावापृथिवीहो, ही जी तुमची मी प्रार्थना केली आहे त्या प्रमाणें, हे माझ्या आई बापांनों, खरोखर घडून येवो. देवांपेक्षांहि आम्हांलाच प्रेमानें अगदी जवळ घ्या म्हणजे तात्काळ फलद्रूप होणारा असा तुमचा तो उत्साहप्रद आश्रय आम्हांला प्राप्त होईल. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८६ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : विश्वेदेवाः - छंद - त्रिष्टुभ्


आ न॒ इळा॑भिर्वि॒दथे॑ सुश॒स्ति वि॒श्वान॑रः सवि॒ता दे॒व ए॑तु ॥
अपि॒ यथा॑ युवानो॒ मत्स॑था नो॒ विश्वं॒ जग॑दभिपि॒त्वे म॑नी॒षा ॥ १ ॥

आ न इळाभिः विदथे सुऽशस्ति विश्वानरः सविता देव एतु ।
अपि यथा युवानः मत्सथ नः विश्वं जगत् अभिऽपित्वे मनीषा ॥ १ ॥

सकल लोक प्रभु आणि दैदिप्यमान असा सर्व प्रेरक सविता हा त्याच्या प्रीत्यर्थ केलेल्या उत्कृष्ट स्तवनानें व यशोवर्धक आहुतींनी संतुष्ट होऊन ह्या आमच्या यज्ञमंडपांत येवो म्हणजे मग हे नित्यतरुण देवांनो, तुम्ही येतांच ज्ञानदानानें आम्हांला आणि सर्व जगताला आनंदितच कराल. ॥ १ ॥


आ नो॒ विश्व॒ आस्क्रा॑ गमन्तु दे॒वा मि॒त्रो अ॑र्य॒मा वरु॑णः स॒जोषाः॑ ॥
भुव॒न्यथा॑ नो॒ विश्वे॑ वृ॒धासः॒ कर॑न्त्सु॒षाहा॑ विथु॒रं न शवः॑ ॥ २ ॥

आ नः विश्वे आस्क्राः गमन्तु देवाः मित्रः अर्यमा वरुणः सऽजोषाः ।
भुवन् यथा नः विश्वे वृधासः करन् सुऽसहा विथुरं न शवः ॥ २ ॥

एकरूप झलेले सर्व देव आणि मित्र अर्यमारूप व दयाघन असा वरुण हे आमच्याकडे येवोत; म्हणजे हे आमचा सर्व प्रकारे उत्कर्ष होईल असें करतील, आणि आपल्या प्रभावानें आमचे सामर्थ्य लटपटीत होऊं देणार नाहींत. ॥ २ ॥


प्रेष्ठं॑ वो॒ अति॑थिं गृणीषेऽ॒ग्निं श॒स्तिभि॑स्तु॒र्वणिः॑ स॒जोषाः॑ ॥
अस॒द्यथा॑ नो॒ वरु॑णः सुकी॒र्तिरिष॑श्च पर्षदरिगू॒र्तः सू॒रिः ॥ ३ ॥

प्रेष्ठं वः अतिथिं गृणीषे अग्निं शस्तिऽभिः तुर्वणिः सऽजोषाः ।
असत् यथा नः वरुणः सुऽकीर्तिः इषः च पर्षत् अरिऽगूर्तः सूरिः ॥ ३ ॥

तुमचा पाहुणा आणि आम्हांस अत्यंत प्रिय अशा अग्निचें यशोवर्णन करून मी स्तवन करतों. तो भक्त संकट निवारणार्थ त्वरेनें धांव घेणारा व दयाघन आहे. त्याचें स्तवन केलें असतां पुण्यलोक देवाधिदेव वरुणरूप ईश्वर हा आपलासा होईल आणि तो भक्तजन-स्तुत देव आम्हांला उत्साह व सामर्थ्य प्राप्त करून देईल. ॥ ३ ॥


उप॑ व एषे॒ नम॑सा जिगी॒षोषासा॒नक्ता॑ सु॒दुघे॑व धे॒नुः ॥
स॒मा॒ने अह॑न्वि॒मिमा॑नो अ॒र्कं विषु॑रूपे॒ पय॑सि॒ सस्मि॒न्नूध॑न् ॥ ४ ॥

उप वः आ ईषे नमसा जिगीषा उषसानक्ता सुदुघाऽइव धेनुः ।
समाने अहन् विऽमिमानः अर्कं विषुऽरूपे पयसि सस्मिन् ऊधन् ॥ ४ ॥

रात्र व उषा देवीनों, भक्तांना अभीष्ट अशा भरपूर दुग्ध देणार्‍या तुम्ही धेनूंच आहांत, तर आमचा इष्ट हेतु पराक्रमानें साध्य करून घेण्याच्या इच्छेनें मी तुमच्या चरणीं वंदन करीत तुम्हांकडे आलों आहे. तुम्हीं आपल्या पयोधरांत एकाच वेळीं निरनिराळ्या प्रकारचें इच्छित लाभरूप दुग्ध उत्पन्न करूं शकतां, परंतु मला मात्र एकाच वेळीं एकाच प्रकारचें स्तोत्र करतां येतें. ॥ ४ ॥


उ॒त नोऽ॑हिर्बु॒ध्न्यो३॑मय॑स्कः॒ शिशुं॒ न पि॒प्युषी॑व वेति॒ सिन्धुः॑ ॥
येन॒ नपा॑तम॒पां जु॒नाम॑ मनो॒जुवो॒ वृष॑णो॒ यं वह॑न्ति ॥ ५ ॥

उत नोः अहिः बुध्न्यः मयः करिति कः शिशुं न पिप्युषीऽइव वेति सिन्धुः ।
येन नपातं अपां जुनाम मनःऽजुवः वृषणः यं वहन्ति ॥ ५ ॥

तसेंच अहिर्बुध्न्य हें महदाकाश आमचें कल्याण करो म्हणजे वासरास स्तन पान करविण्याकरितां गाय धांव घेते त्याप्रमाणें ही आकाश गंगा आमच्याकडे येईल म्हणजे मग आकाशोदकांत प्रादुर्भूत होणार्‍या अग्निचे आम्हीं स्तवन करूं. उमदे आणि मनाप्रमाणें वेगवान असे घोडे ह्या अग्नीचा रथ ओढीत असतात. ॥ ५ ॥


उ॒त न॑ ईं॒ त्वष्टा ग॒न्त्वच्छा॒ स्मत्सू॒रिभि॑रभिपि॒त्वे स॒जोषाः॑ ॥
आ वृ॑त्र॒हेन्द्र॑श्चर्षणि॒प्रास्तु॒विष्ट॑मो न॒रां न॑ इ॒ह ग॑म्याः ॥ ६ ॥

उत नः ईं त्वष्टा गन्तु अच्छ स्मत् सूरिऽभिः अभिऽपित्वे सऽजोषाः ।
आ वृत्रऽहा इन्द्रः चर्षणिऽप्राः तुविःऽतमः नरां नः इह गम्याः ॥ ६ ॥

तसेंच आपल्या बरोबर ज्ञानी विभूतींस घेऊन हा दयाळु त्वष्टा आमच्याकडे येवो, आणि वृत्रहंता, जगद्‍व्यापक, आणि वीरांमध्यें अत्यंत पराक्रमी असा वीर इंद्रही आम्हांकडे येवो. ॥ ६ ॥


उ॒त न॑ ईम् म॒तयोऽ॑श्वयोगाः॒ शिशुं॒ न गाव॒स्तरु॑णं रिहन्ति ॥
तमीं॒ गिरो॒ जन॑यो॒ न पत्नीः॑ सुर॒भिष्ट॑मं न॒रां न॑सन्त ॥ ७ ॥

उत नः ईं मतयः अश्वऽयोगाः शिशुं न गावः तरुणं रिहन्ति ।
तं ईं गिरः जनयः न पत्‍नीः सुरभिःऽतमं नरां नसन्त ॥ ७ ॥

मनोरूप अश्वाला लगामीं लावणार्‍या ह्या इंद्राची दयार्द्रबुद्धि, गाई जशा आपल्या लहान बालकास चाटतात, त्याप्रमाणें आम्हांला प्रमुदित करोत. कारण नववधूं प्रमाणें आमची वाणीहि सर्व वीरांत जो अत्यंत प्रशंसनीय आहे अशा त्या इंद्रालाच आलिंगन देणार ह्यांत संशय नाहीं. ॥ ७ ॥


उ॒त न॑ ईम् म॒रुतो॑ वृ॒द्धसे॑नाः॒ स्मद्रोद॑सी॒ सम॑नसः सदन्तु ॥
पृष॑दश्वासोऽ॒वन॑यो॒ न रथा॑ रि॒शाद॑सो मित्र॒युजो॒ न दे॒वाः ॥ ८ ॥

उत नः ईं मरुतः वृद्धऽसेनाः स्मत् रोदसी इति सऽमनसः सदन्तु ।
पृषत्ऽअश्वासः अवनयः न रथाः रिशादसः मित्रऽयुजः न देवाः ॥ ८ ॥

तसेंच ज्यांची सेना मोठी प्रचंड आहे आणि जे आपल्या रोदसी स्त्रीसह अगदी एक विचारानें चालतात असे मरुत् आमच्या जवळ येऊन बसोत. ह्याच्या रथाला पाण्याच्या झोताप्रमाणें (वेगानें धांवणारे) ठिपक्या ठिपक्यांचे घोडे जोडले आहेत. हे देव शत्रुनाशक आणि त्या मित्ररूप इंद्राशीं जणूं एकरूप झालेले आहेत. ॥ ८ ॥


प्र नु यदे॑षाम् महि॒ना चि॑कि॒त्रे प्र यु॑ञ्जते प्र॒युज॒स्ते सु॑वृ॒क्ति ॥
अध॒ यदे॑षां सु॒दिने॒ न शरु॒र्विश्व॒मेरि॑णं प्रुषा॒यन्त॒ सेनाः॑ ॥ ९ ॥

प्र नु यत् एषां महिना चिकित्रे प्र युञ्जते प्रऽयुजः ते सुऽवृक्ति ।
अध यत् एषां सुऽदिने न शरुः विश्वं आ इरिणं प्रुषायन्त सेनाः ॥ ९ ॥

पवित्र अंतःकरणांनी केलेल्या प्रार्थनांस मान देऊन त्यांनी आपले अश्व जोडल्याबरोबर ते आपल्या सामर्थ्याने विभूषित होतात आणि सूर्याचा उज्ज्वल प्रकाश पडला असेल अशा दिवशीं त्यांची सेना विद्युल्लते सहवर्तमान झपाट्यानें खालीं येऊन जमीन व ओढे ह्यांना पाण्यानें भरून टाकतात. ॥ ९ ॥


प्रो अ॒श्विना॒वव॑से कृणुध्वं॒ प्र पू॒षणं॒ स्वत॑वसो॒ हि सन्ति॑ ॥
अ॒द्वे॒षो विष्णु॒र्वात॑ ऋभु॒क्षा अच्छा॑ सु॒म्नाय॑ ववृतीय दे॒वान् ॥ १० ॥

प्रो इति अश्विनौ अवसे कृणुध्वं प्र पूषणं स्वऽतवसः हि सन्ति ।
अद्वेषः विष्णुः वातः ऋभुक्षाः अच्छ सुम्नाय ववृतीय देवान् ॥ १० ॥

ऋत्विजांनो, देवांची कृपा व्हावी म्हणून अश्वी देवांस प्रसन्न करा. पूषादेव ह्यालाहि प्रसन्न करा. कारण हे सर्व स्वतःच्याच बलानें मंडित आहेत. तसेंच विष्णु, वायुदेव आणि ऋभूंचा नायक इंद्र हे ही अजात शत्रु होत. तेव्हां आमच्या आत्यंतिक हितासाठीं सर्व देवांना इकडे घेऊन येईल असें घडो. ॥ १० ॥


इ॒यं सा वो॑ अ॒स्मे दीधि॑तिर्यजत्रा अपि॒प्राणी॑ च॒ सद॑नी च भूयाः ॥
नि या दे॒वेषु॒ यत॑ते वसू॒युर्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ११ ॥

इयं सा वः अस्मे इति दीधितिः यजत्राः अपिऽप्राणी च सदनी च भूयाः ।
नि या देवेषु यतते वसुऽयुः विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ११ ॥

हे सर्ववंद्य देवांनो, ही तुमची आम्हीं एकाग्रतेनें प्रार्थना केली आहे तींत तुमच्या कृपेने खरे चैतन्य उत्पन्न होऊन ती तुमचे अधिष्ठान होवो. कारण ही प्रार्थना परम वस्तूची लालसा धरून तुम्हां देवांकडे जाण्याचाच प्रयत्न करीत असते. तर आम्हांला तात्काळ फलद्रूप होणारा असा तुमचा उत्साहप्रद आश्रय प्राप्त होवो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८७ ( अन्नस्तुति सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अन्न - छंद - अनुष्टुप्, गायत्री


पि॒तुं नु स्तो॑षं म॒हो ध॒र्माणं॒ तवि॑षीम् । यस्य॑ त्रि॒तो व्योज॑सा वृ॒त्रं विप॑र्वम॒र्दय॑त् ॥ १ ॥

पितुं नु स्तोषं महः धर्माणं तविषीम् ।
यस्य त्रितः वि ओजसा वृत्रं विऽपर्वं अर्दयत् ॥ १ ॥

सोमाच्या पोषक तत्त्वाचें मी आतां स्तवन केलें पाहिजे. सामर्थ्यवान् पुरुषांच्या शक्तीससुद्धां हें पुष्ट करतें, आणि त्याच्या प्रबल शक्तीच्या योगानें त्रितास आपल्या शत्रूचें ताडन व वध करतां आला. ॥ १ ॥


स्वादो॑ पितो॒ मधो॑ पितो व॒यं त्वा॑ ववृमहे । अ॒स्माक॑मवि॒ता भ॑व ॥ २ ॥

स्वादो इति पितो इति मधो इति पितो इति वयं त्वा ववृमहे ।
अस्माकं अविता भव ॥ २ ॥

हे सुखदायक पेया, हे मधुर रसा, आम्हीं तुझीच इच्छा करीत आहोंत, तर तूं आमचा दयाळू रक्षणकर्ता हो. ॥ २ ॥


उप॑ नः पित॒वा च॑र शि॒वः शि॒वाभि॑रू॒तिभिः॑ । म॒यो॒भुर॑द्विषे॒ण्यः सखा॑ सु॒शेवो॒ अद्व॑याः ॥ ३ ॥

उप नः पितो इति आ चर शिवः शिवभिः ऊतिऽभिः ।
मयःऽभुः अद्विषेण्यः सखा सुऽशेवः अद्वयाः ॥ ३ ॥

हे उत्कृष्ट रसा, तूं आपल्या उत्कृष्ट चमसांसह आमचे समीप ये. तूं हितकारकर, मित्रत्वास योग्य आणि मत्सररहित आहेस. तुला दुटप्पी वर्तन माहित नाहीं. ॥ ३ ॥


तव॒ त्ये पि॑तो॒ रसा॒ रजां॒स्यनु॒ विष्ठि॑ताः । दि॒वि वाता॑ इव श्रि॒ताः ॥ ४ ॥

तव त्ये पितो इति रसा रजांसि अनु विऽस्थिताः ।
दिवि वाताःऽइव श्रिताः ॥ ४ ॥

हे पेया, आकाशांत संचार करणार्‍या वायूप्रमाणें तुझा अर्क रजोलोकांत सर्वत्र व्याप्त झालेला आहे. ॥ ४ ॥


तव॒ त्ये पि॑तो॒ दद॑त॒स्तव॑ स्वादिष्ठ॒ ते पि॑तो । प्र स्वा॒द्मानो॒ रसा॑नां तुवि॒ग्रीवा॑ इवेरते ॥ ५ ॥

तव त्ये पितो इति ददतः तव स्वादिष्ठ ते पितो इति ।
प्र स्वाद्मानः रसानां तुविग्रीवाःऽइव ईरते ॥ ५ ॥

हे उदार पेया, हे अतिमधुर रसा, तुझ्या रुचकर अर्काचें जे प्राशन करतात ते, चालत असतांना ज्यांची गर्दन भरलेली आहे अशा, मल्लांप्रमाणें दिसतात. ॥ ५ ॥


त्वे पि॑तो म॒हानां॑ दे॒वाना॒म् मनो॑ हि॒तम् । अका॑रि॒ चारु॑ के॒तुना॒ तवाहि॒मव॑सावधीत् ॥ ६ ॥

त्वे इति पितो इति महानां देवानां मनः हितम् ।
अकारि चारु केतुना तव अहिं अवसा अवधीत् ॥ ६ ॥

हे रसा, त्या श्रेष्ठ देवाचें मन तुझ्यावर बसलेले आहे. तुझ्या सहाय्यानें त्यानें अहिचा जो वध केला त्यासारखें सत्कृत्य तुझ्या स्फुरणामुळें घडून येत असतें. ॥ ६ ॥


यद॒दो पि॑तो॒ अज॑गन्वि॒वस्व॒ पर्व॑तानाम् । अत्रा॑ चिन्नो मधो पि॒तोऽ॑रम् भ॒क्षाय॑ गम्याः ॥ ७ ॥

यत् अदः पितो इति अजगत् विवस्व पर्वतानाम् ।
अत्र चित् नः मधो इति पितो इति अरं भक्षाय गम्याः ॥ ७ ॥

हे रसा, जरी मेघांच्या चकाकणार्‍या पाण्याशीं तुझें एकीकरण केलें तथापि, हे मधुर पेया तेथूनही आम्हांकडे भरपूर वहात ये. ॥ ७ ॥


यद॒पामोष॑धीनां परिं॒शमा॑रि॒शाम॑हे । वाता॑पे॒ पीव॒ इद्भ॑व ॥ ८ ॥

यत् अपा ओषधीनां परिंशं आऽरिशामहे ।
वातापे पीवः इत् भव ॥ ८ ॥

हे सर्वव्यापी पेया, आम्ही उदकें अथवा वनस्पती यांचे कितीही सेवन केलें तथापि त्यांतील पोषक तत्त्व तूंच हो. ॥ ८ ॥


यत्ते॑ सोम॒ गवा॑शिरो॒ यवा॑शिरो॒ भजा॑महे । वाता॑पे॒ पीव॒ इद्भ॑व ॥ ९ ॥

यत् ते सोम गोऽआशिरः यवऽआशिरः भजामहे ।
वातापे पीवः इत् भव ॥ ९ ॥

हे सोमा, दहिदूध अगर धान्य ह्यांचे जे जे कांही पदार्थ आम्हीं खातों त्याचें हि पोषक-सार हे रसा, तूंच हो ॥ ९ ॥


क॒र॒म्भ ओ॑षधे भव॒ पीवो॑ वृ॒क्क उ॑दार॒थिः । वाता॑पे॒ पीव॒ इद्भ॑व ॥ १० ॥

करम्भः ओषधे भव पीवः वृक्कः उदारथिः ।
वातापे पीवः इत् भव ॥ १० ॥

करंभ (लाडु इत्यादि पक्वान्नें हीं) सुद्धां, हे ओषधिरूप रसा, तूंच हो. आमच्या हृदयांतील जीवनरस तूंच आणि बुद्धिला उज्ज्वलता आणणाराही तूंच, तर हे सोमा, आमचें पोषक-सार तूंच हो. ॥ १० ॥


तं त्वा॑ व॒यं पि॑तो॒ वचो॑भि॒र्गावो॒ न ह॒व्या सु॑षूदिम । दे॒वेभ्य॑स्त्वा सध॒माद॑म॒स्मभ्यं॑ त्वा सध॒माद॑म् ॥ ११ ॥

तं त्वा वयं पितो इति वचःऽभिः गावः न हव्या सुसूदिम ।
देवेभ्यः त्वास्त्वा सधऽमादं अस्मभ्यं त्वा सधऽमादम् ॥ ११ ॥

ह्याप्रमणें हे पोषक रसा, गाईं पासून दूध मिळवावे त्याप्रमाणें आम्हीं स्तुति-स्तोत्रांनीं तुझ्यापासून सर्व प्रकारचीं होमद्रव्यें संपादन केलीं आहेत. तूं असा आहेस कीं, हवि ग्रहण करून तूं हर्षभरीत होतोस. त्याचप्रमाणे आम्हां भक्तांकरितांही आम्हांमध्यें मिळून मिसळून हर्षभरीत होत असतोस. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८८ ( अग्निः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : आप्रियः - छंद - गायत्री


समि॑द्धो अ॒द्य रा॑जसि दे॒वो दे॒वैः स॑हस्रजित् । दू॒तो ह॒व्या क॒विर्व॑ह ॥ १ ॥

संऽइद्धः अद्य राजसि देवः देवैः सहस्रऽजित् ।
दूतः हव्या कविः वह ॥ १ ॥

हे हजारों वीरांना पादाक्रांत करणार्‍या अग्ने, देदिप्यमान असा तूं प्रज्वलित होऊन देवांसह राजाप्रमाणें शोभत आहेस, तर महाज्ञानी असा तूं आमचा प्रतिनिधी होऊन हा हविर्भाग देवांना पोंचव. ॥ १ ॥


तनू॑नपादृ॒तं य॒ते मध्वा॑ य॒ज्ञः सम॑ज्यते । दध॑त्सह॒स्रिणी॒रिषः॑ ॥ २ ॥

तनूऽनपात् ऋतं यते मध्वा यज्ञः सं अज्यते ।
दधत् सहस्रिणीः इषः ॥ २ ॥

स्वयंभु अग्ने, सत्याचेंच आचरण करणार्‍या आमच्या यजमानांसाठीं, ज्यापासून हजारों उत्साहप्रद लाभ प्राप्त होतात असा हा यज्ञ मधुर आहुतींनी यथासांग होत असतो. ॥ २ ॥


आ॒जुह्वा॑नो न॒ ईड्यो॑ दे॒वाँ आ व॑क्षि य॒ज्ञिया॑न् । अग्ने॑ सहस्र॒सा अ॑सि ॥ ३ ॥

आऽजुह्वानः नः ईड्यः देवान् आ वक्षि यज्ञियान् ।
अग्ने सहस्रऽसाः असि ॥ ३ ॥

तुझ्यामध्यें हवन केलें आहें. परम स्तुत्य असा तूं पूज्य देवांना अमच्याकडे घेऊन येतोस हें योग्यच आहे, कारण हे अग्ने, हजारों वरदानें देणारा तूंच आहेस. ॥ ३ ॥


प्रा॒चीनं॑ ब॒र्हिरोज॑सा स॒हस्र॑वीरमस्तृणन् । यत्रा॑दित्या वि॒राज॑थ ॥ ४ ॥

प्राचीनं बर्हिः ओजसा सहस्रऽवीरं अस्तृणन् ।
यत्र आदित्या विऽराजथ ॥ ४ ॥

हजारों शूरांत जो शूर आहे, त्यालाच बसण्यायोग्य असें हें कुशासन पूर्वेकडे दशाकरून आंथरलें आहे आणि तशाच आसनावर हे आदित्यानों, तुम्हीं आपल्या तेजानें शोभत आहां. ॥ ४ ॥


वि॒राट् स॒म्राड्वि॒भ्वीः प्र॒भ्वीर्ब॒ह्वीश्च॒ भूय॑सीश्च॒ याः । दुरो॑ घृ॒तान्य॑क्षरन् ॥ ५ ॥

विऽराट् संऽराट् विऽभ्वीः प्रऽभ्वीः बह्वीः च भूयसीः च याः ।
दुरः घृतानि अक्षरन् ॥ ५ ॥

महाराज्ञी चक्रवर्तिनी, विभाव युक्ता, प्रभाव शालिनी, बहु-संख्यांका, असंख्यांका अशा प्रकारच्या नांवाची यज्ञमंडपांचीं द्वारें घृताप्रमाणें स्निग्ध रसाचा वर्षाव करीत असतात. ॥ ५ ॥


सु॒रु॒क्मे हि सु॒पेश॒साधि॑ श्रि॒या वि॒राज॑तः । उ॒षासा॒वेह सी॑दताम् ॥ ६ ॥

सुरुक्मे इति सूऽरुक्मे हि सुऽपेशसा अधि श्रिया विऽराजतः ।
उषसौ आ इह सीदताम् ॥ ६ ॥

सुंदर अलंकार घातलेल्या रूपवती उषा आपल्या लावण्यानें फारच सुशोभित दिसत आहेत, त्या येथें येऊन आसनावर बसोत. ॥ ६ ॥


प्र॒थ॒मा हि सु॒वाच॑सा॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी । य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ७ ॥

प्रथमा हि सुऽवाचसा होतारा दैव्या कवी इति ।
यज्ञं नः यक्षतां इमम् ॥ ७ ॥

ज्यांची वाणी उत्कृष्ट आहे, ते प्रज्ञावान् आणि सर्वांत पुरातन असे ते दोन दिव्य होते हा आमचा यज्ञ सांग करोत. ॥ ७ ॥


भार॒तीळे॒ सर॑स्वति॒ या वः॒ सर्वा॑ उपब्रु॒वे । ता न॑श्चोदयत श्रि॒ये ॥ ८ ॥

भारती इळे सरस्वति याः वः सर्वाः उपऽब्रुवे ।
ताः नः चोदयत श्रिये ॥ ८ ॥

हे भारती इळे, सरस्वती तुम्हां सर्वांचीच प्रार्थना मी करीत आहें तर ऐश्वर्याकडे आमची प्रेरणा करा. ॥ ८ ॥


त्वष्टा॑ रू॒पाणि॒ हि प्र॒भुः प॒शून्विश्वा॑न् समान॒जे । तेषां॑ न स्फा॒तिमा य॑ज ॥ ९ ॥

त्वष्टा रूपाणि हि प्रऽभुः पशून् विश्वान् संऽआनजे ।
तेषां नः स्फातिं आ यज ॥ ९ ॥

प्राणिमात्राचा आकार घडविणारा त्वष्टा प्रभु हा पशुंनाही उत्पन्न करतो. त्यांची अभिवृद्धि व्हावी म्हणून त्या त्वष्टा प्रीत्यर्थ यजन करा. ॥ ९ ॥


उप॒ त्मन्या॑ वनस्पते॒ पाथो॑ दे॒वेभ्यः॑ सृज । अ॒ग्निर्ह॒व्यानि॑ सिष्वदत् ॥ १० ॥

उप त्मन्या वनस्पते पाथः देवेभ्यः सृज ।
अग्निः हव्यानि सिस्वदत् ॥ १० ॥

हे वृक्षराजा, तूं आपण स्वतः देवांकरितां हविरन्न उत्पन्न कर म्हणजे अग्नि त्या हविरन्नांत माधुर्य उत्पन्न करील. ॥ १० ॥


पु॒रो॒गा अ॒ग्निर्दे॒वानां॑ गाय॒त्रेण॒ सम॑ज्यते । स्वाहा॑कृतीषु रोचते ॥ ११ ॥

पुरःऽगाः अग्निः देवानां गायत्रेण सं अज्यते ।
स्वाहाऽकृतीषु रोचते ॥ ११ ॥

देवांमध्यें अग्रेसर असा हा अग्नि गायत्र गायनानें सत्कार पावत आहे. स्वाहा शब्दानें आहुति होतांच त्याचा प्रकाश अतिशयच उज्ज्वल होतो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८९ ( अग्निः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अग्निः - छंद - त्रिष्टुभ्


अग्ने॒ नय॑ सु॒पथा॑ रा॒ये अ॒स्मान् विश्वा॑नि देव व॒युना॑नि वि॒द्वान् ॥
यु॒यो॒ध्य१॑स्मज्जु॑हुरा॒णमेनो॒ भूयि॑ष्ठां ते॒ नम॑उक्तिं विधेम ॥ १ ॥

अग्ने नय सुऽपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोधि अस्मत् जुहुराणं एनः भूयिष्ठां ते नमःऽउक्तिं विधेम ॥ १ ॥

हे अग्निदेवा, सर्व प्रकारचे धर्म तूं जाणतोस, तर आम्हांस सन्मार्गानें श्रेष्ठ संपत्तिकडे ने. पातक हें मनुष्यास सन्मार्गापासून भ्रष्ट करतें; म्हणून तें आमच्यापासून दूर कर. आम्हीं नम्रपणानें तुझें अत्यंत उत्तम स्तवन करूं. ॥ १ ॥


अग्ने॒ त्वम् पा॑रया॒ नव्यो॑ अ॒स्मान्स्व॒स्तिभि॒रति॑ दु॒र्गाणि॒ विश्वा॑ ॥
पूश्च॑ पृ॒थ्वी ब॑हु॒ला न॑ उ॒र्वी भवा॑ तो॒काय॒ तन॑याय॒ शं योः ॥ २ ॥

अग्ने त्वं पारय नव्यः अस्मान् स्वस्तिऽभिः अति दुःऽगानि विश्वा ।
पूः च पृथ्वी बहुला नः उर्वी भव तोकाय तनयाय शं योः ॥ २ ॥

हे अग्नि, स्तवन करण्याला योग्य असा तूंच आहेस. मंगलकारक साधनांनीं आम्हांस सर्व संकटांच्या पार पाड आणि आमच्या पुत्रपौत्रादिकांचें दैव उघडून कल्याण व्हावें म्हणून तूं आम्हांस एखाद्या प्रचंड, अवाढव्य आणि अफाट प्राकाराप्रमाणें संरक्षक हो. ॥ २ ॥


अग्ने॒ त्वम॒स्मद्यु॑यो॒ध्यमी॑वा॒ अन॑ग्नित्रा अ॒भ्यम॑न्त कृ॒ष्टीः ॥
पुन॑र॒स्मभ्यं॑ सुवि॒ताय॑ देव॒ क्षां विश्वे॑भिर॒मृते॑भिर्यजत्र ॥ ३ ॥

अग्ने त्वं अस्मत् युयोधि अमीवाः अनग्निऽत्राः अभिऽअमन्त कृष्टीः ।
पुनः अस्मभ्यं सुविताय देव क्षां विश्वेभिः अमृतेभिः यजत्र ॥ ३ ॥

तसेंच हेअग्निदेवा सर्व व्याधि आमच्यापासून पार दूर पळवून लाव. हे अग्ने, तूं ज्यांचें रक्षण करीत नाहींस अशा मनुष्यांस त्या (व्याधि) बाधा करणार हे ठरलेलेंच आहे. परंतु हे परम पूज्य देवा, आमचें खरेंखरें कल्याण व्हावें म्हणून यच्चयावत् अमरविभूतींसह ह्या भूलोकीं ये ॥ ३ ॥


पा॒हि नो॑ अग्ने पा॒युभि॒रज॑स्रैरु॒त प्रि॒ये सद॑न॒ आ शु॑शु॒क्वान् ॥
मा ते॑ भ॒यं ज॑रि॒तारं॑ यविष्ठ नू॒नं वि॑द॒न्माप॒रं स॑हस्वः ॥ ४ ॥

पाहि नः अग्ने पायुऽभिः अजस्रैः उत प्रिये सदने आ शुशुक्वान् ।
मा ते भयं जरितारं यविष्ठ नूनं विदत् मा अपरं सहस्वः ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, आपल्या प्रिय यज्ञ वेदीवर विराजमान होऊन अविछिन्न संरक्षणांनीं आमचा सांभाळ कर. इतकेंच नाहीं तर हे महापराक्रमी अग्निदेवा, ज्या तुझें तारुण्य कालत्रयीही नाहिसें होत नाहीं असा तूं, असें कर कीं, आपल्या भक्ताला आतां आणि पुढें केव्हांहि भय प्राप्त होऊं नये. ॥ ४ ॥


मा नो॑ अ॒ग्नेऽ॑व सृजो अ॒घाया॑वि॒ष्यवे॑ रि॒पवे॑ दु॒च्छुना॑यै ॥
मा द॒त्वते॒ दश॑ते॒ मादते॑ नो॒ मा रीष॑ते सहसाव॒न्परा॑ दाः ॥ ५ ॥

मा नः अग्ने अव सृजः अघाय अविष्यवे रिपवे दुच्छुनायै ।
मा दत्वते दशते मा अदते नः मा रीषते सहसाऽवन् परा दाः ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, आम्हांला पातक्यांच्या, शत्रूंच्या किंवा घोर आपत्तिंच्या हातीं देऊं मको. तसेंच हे बलिष्ठा, आम्हांला क्रूरपशूच्या दंश करणार्‍या सर्पादिकांच्या, अगर दांत नसूनही हिंस्र आहे अशांच्या सपाट्यांत सांपडूं देऊं नको. ॥ ५ ॥


वि घ॒ त्वावाँ॑ ऋतजात यंसद्गृणा॒नो अ॑ग्ने त॒न्वे३॑ वरू॑थम् ॥
विश्वा॑द्रिरि॒क्षोरु॒त वा॑ निनि॒त्सोर॑भि॒ह्रुता॒मसि॒ हि दे॑व वि॒ष्पट् ॥ ६ ॥

वि घ त्वाऽवान् ऋतऽजात यंसत् गृणानः अग्ने तन्वे वरूथम् ।
विश्वात् रिरिक्षोः उत वा निनित्सोः अभिऽह्रुतां असि हि देव विष्पट् ॥ ६ ॥

हे समर्थपालका अग्ने, तुझे स्तवन केल्यामुळें तुझ्या भक्ताला आपल्या स्वतःच्या बचावासाठीं एक कवचच जणों मिळावें, म्हणजे त्याच्या योगानें दुष्ट आणि निंदक ह्यांच्या पासून त्याचा बचाव होईल. कारण हे देवा, सर्व कुटील अधमांना बांधून टाकून त्यांचा निःपात करणारा तूंच आहेस. ॥ ६ ॥


त्वं ताँ अ॑ग्न उ॒भया॒न्वि वि॒द्वान्वेषि॑ प्रपि॒त्वे मनु॑षो यजत्र ॥
अ॒भि॒पि॒त्वे मन॑वे॒ शास्यो॑ भूर्मर्मृ॒जेन्य॑ उ॒शिग्भि॒र्नाक्रः ॥ ७ ॥

त्वं तान् अग्ने उभयान् वि विद्वान् वेषि प्रऽपित्वे मनुषः यजत्र ।
अभिऽपित्वे मनवे शास्यः भूः मर्मृजेन्यः उशिक्ऽभिः न अक्रः ॥ ७ ॥

हे परमपूज्य अग्निदेवा, देवलोक आणि मृत्युलोक अशा दोन्हीं लोकांचें यथातथ्य ज्ञान तुला आहें तुझी थोरवी येवढी असतांहि तूं प्रातःकाळीं मनुष्यलोकांतील आपल्या भक्तांकडे प्रेमानें येतोस, सायंकाळींहि मानवी भक्तांच्याच आधीन होऊन राहतोस. आणि तूं एवढा जलाल, परंतु कविजनांनीं तुला वाटेल तसा सजवावा इतका तूं भक्तांना वश असतोस. ॥ ७ ॥


अवो॑चाम नि॒वच॑नान्यस्मि॒न्मान॑स्य सू॒नुः स॑हसा॒ने अ॒ग्नौ ॥
व॒यं स॒हस्र॒मृषि॑भिः सनेम वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ८ ॥

अवोचाम निऽवचनानि अस्मिन् मानस्य सूनुः सहसाने अग्नौ ।
वयं सहस्रं ऋषिऽभिः सनेम विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ८ ॥

आम्हीं आपलीं स्तुतिस्तोत्रें त्याच्या प्रीत्यर्थच केलीं आहेत. मी मानपुत्रानेंही ह्या महाबलाढ्य अग्निच्याच ठिकाणिं निष्ठा ठेविली आहे. ह्या ऋषिमंडळींच्या योगानें आम्हांला हजारों लाभ होवोत; म्हणजे त्यांतच तात्काळ फलद्रूप होणारा उत्साहप्रद असा आश्रय आम्हांस प्राप्त होईल. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १९० ( बृहस्पतिः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : बृहस्पतिः - छंद - त्रिष्टुभ्


अ॒न॒र्वाणं॑ वृष॒भं म॒न्द्रजि॑ह्वं॒ बृह॒स्पतिं॑ वर्धया॒ नव्य॑म॒र्कैः ॥
गा॒था॒न्यः सु॒रुचो॒ यस्य॑ दे॒वा आ॑शृ॒ण्वन्ति॒ नव॑मानस्य॒ मर्ताः॑ ॥ १ ॥

अनर्वाणं वृषभं मन्द्रऽजिह्वं बृहस्पतिं वर्धया नव्यं अर्कैः ।
गाथान्यः सुऽरुचः यस्य देवाः आऽशृण्वन्ति नवमानस्य मर्ताः ॥ १ ॥

सर्व विद्यांचा स्वामी बृहस्पति हा अजिंक्य आहे. तो वीर्यशाली मधुर भाषणी व अत्यंत स्तुत्य आहे. त्याला अर्क-स्तोत्रांनी तूं प्रसन्न कर. सकल स्तुतींचा प्रभु आणि परम देदिप्यमान अशा ह्या बृहस्पतीचें स्तवन चालू झालें म्हणजे सर्व देव आणि मनुष्यें ते एकाग्र मनानें ऐकत असतात. ॥ १ ॥


तम् ऋ॒त्विया॒ उप॒ वाचः॑ सचन्ते॒ सर्गो॒ न यो दे॑वय॒तामस॑र्जि ॥
बृह॒स्पतिः॒ स ह्यञ्जो॒ वरां॑सि॒ विभ्वाभ॑व॒त्समृ॒ते मा॑त॒रिश्वा॑ ॥ २ ॥

तं ऋत्वियाः उप वाचः सचन्ते सर्गः न यः देवऽयतां असर्जि ।
बृहस्पतिः स हि अञ्जः वरांसि विऽभ्वा अभवत् सं ऋते मातरिश्वा ॥ २ ॥

वेळोवेळीं म्हटल्या जाणार्‍या स्तुति त्याचीच सेवा करतात. कारण भक्तजनाच्या प्रेमजीवनाचा हा जणोकाय झराच म्हणून प्रकट झाला आहें. ज्यानें ह्या विश्वांतील सर्व स्पृहणीय वस्तू निदर्शनास आणल्या तो बृहस्पति हाच. अंतरिक्षांतील प्राणतत्त्व जो मातरिश्वा त्याच्या रूपानें प्रत्येक धर्मकृत्याच्या वेळीं प्रकट होतो. ॥ २ ॥


उप॑स्तुतिं॒ नम॑स॒ उद्य॑तिं च॒ श्लोकं॑ यंसत्सवि॒तेव॒ प्र बा॒हू ॥
अ॒स्य क्रत्वा॑ह॒न्यो३॑ यो अस्ति॑ मृ॒गो न भी॒मो अ॑र॒क्षस॒स्तुवि॑ष्मान् ॥ ३ ॥

उपऽस्तुतिं नमसः उत्ऽयतिं च श्लोकं यंसत् सविताऽइव प्र बाहू इति ।
अस्य क्रत्वा अहन्यः यः अस्ति मृगः न भीमः अरक्षसः तुविष्मान् ॥ ३ ॥

सूर्य आपल्या बाहूरूप रश्मींचा प्रत्येक पदार्थांत शिरकाव करतो त्याप्रमाणें बृहस्पति हा भक्तांच्या अंतःकरणांत स्तवनेच्छा, उपासना बुद्धि, उद्यमप्रवृत्ति आणि सुयश लालसा ह्यांची प्रेरणा करतो. हेंच काय पण खुद्द दिनमणी सूर्य देखील ह्याच परम सात्त्विक बृहस्पतीच्या प्रतापानेंच सिंहाप्रमाणें भयंकर आणि पराक्रमी झालेला आहे. ॥ ३ ॥


अ॒स्य श्लोको॑ दि॒वीय॑ते पृथि॒व्यामत्यो॒ न यं॑सद्यक्ष॒भृद्विचे॑ताः ॥
मृ॒गाणां॒ न हे॒तयो॒ यन्ति॑ चे॒मा बृह॒स्पते॒रहि॑मायाँ अ॒भि द्यून् ॥ ४ ॥

अस्य श्लोकः दिवि ईयते पृथिव्यां अत्यः न यंसत् यक्षऽभृत् विऽचेताः ।
मृगाणां न हेतयः यन्ति च इमाः बृहस्पतेः अहिऽमायान् अभि द्यून् ॥ ४ ॥

हा बृहस्पति महाप्राज्ञ आणि सर्व माननीय वस्तूंचे भांडार आहे, अशी ह्याची कीर्ति एखाद्या वेगवान् शक्तिप्रमाणें आकाशांत आणि पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. व्याधाचे बाण हरिणावर पडतात, त्याप्रमाणें हीं बृहस्पतीची अस्त्रेंही द्युलोक व्यापून टाकतात. ॥ ४ ॥


ये त्वा॑ देवोस्रि॒कं मन्य॑मानाः पा॒पा भ॒द्रमु॑प॒जीव॑न्ति प॒ज्राः ॥
न दू॒ढ्ये३॑अनु॑ ददासि वा॒मम् बृह॑स्पते॒ चय॑स॒ इत्पिया॑रुम् ॥ ५ ॥

ये त्वा देव उस्रिकं मन्यमानाः पापाः भद्रं उपऽजीवन्ति पज्राः ।
न दूःध्ये अनु ददासि वामं बृहस्पते चयसे इत् पियारुम् ॥ ५ ॥

हे भगवंता, जे प्रबल परंतु पातकी लोक तुला निःसत्व मानून, पुनः तुज मंगल मूर्तिच्याच आश्रयानें आपला निर्वाह करतात, अशा अधमांना हे बृहस्पते अत्यंत श्रेष्ठ जी वस्तू आहे ती तूं कधीं देत नाहीसच, परंतु अशा दुर्जनांना तूं शासन मात्र खचित करतोस. ॥ ५ ॥


सु॒प्रैतुः॑ सू॒यव॑सो॒ न पन्था॑ दुर्नि॒यन्तुः॒ परि॑प्रीतो॒ न मि॒त्रः ॥
अ॒न॒र्वाणो॑ अ॒भि ये चक्ष॑ते॒ नोऽ॑पीवृता अपोर्णु॒वन्तो॑ अस्थुः ॥ ६ ॥

सुऽप्रैतुः सुऽयवसः नः पन्थाः दुःऽनियन्तुः परिऽप्रीतः नः मित्रः ।
अनर्वाणः अभि ये चक्षते नः अपिऽवृताः अपऽऊर्णुवन्तः अस्थुः ॥ ६ ॥

तृणाच्छादित मार्गाप्रमाणें हा सुगम आणि अनिवार्य परंतु खर्‍या मित्राप्रमाणें प्रसनांतःकरण होय. ह्याच्या कृपेनें अजिंक्य झालेले जे जे लोक आम्हांकडे आज कृपा दृष्टीनें पहात आहेत ते जरी पहिल्यानें गर्क होऊन गेले होते तरी मागाहून आपणास मोकळे करते झालें. ॥ ६ ॥


सं यं स्तुभो॑ऽ॒वन॑यो॒ न यन्ति॑ समु॒द्रं न स्र॒वतो॒ रोध॑चक्राः ॥
स वि॒द्वाँ उ॒भयं॑ चष्टे अ॒न्तर्बृह॒स्पति॒स्तर॒ आप॑श्च॒ गृध्रः॑ ॥ ७ ॥

सं यं स्तुभः अवनयः न यन्ति समुद्रं न स्रवतः रोधऽचक्राः ।
सः विद्वान् उभयं चष्टे अन्तः बृहस्पतिः तरः आपः च गृध्रः ॥ ७ ॥

आमच्या प्रार्थना, ज्याप्रमाणें वारा झपाट्यानें वहातो किंवा नदीच्या पाण्याचे लोंढेच्या लोंढे समुद्राला जाऊन मिळतात, त्यप्रमाणें जावोत. तो सर्वसाक्षी बृहस्पती आपल्या दिव्य दृष्टीनें, तारूं व पाणि , (म्हणजेच श्रद्धा आणि विधि), या दोहोंकडे लक्ष्यपूर्वक पहात असतो. ॥ ७ ॥


ए॒वा म॒हस्तु॑विजा॒तस्तुवि॑ष्मा॒न्बृह॒स्पति॑र्वृष॒भो धा॑यि दे॒वः ॥
स न॑ स्तु॒तो वी॒रव॑द्धातु॒ गोम॑द्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ८ ॥

एव महः तुविऽजातः तुविष्मान् बृहस्पतिः वृषभः धायि देवः ।
सः नः स्तुतः वीरऽवत् धातु गोऽमत् विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ ८ ॥

भक्तांस सुगम, बलाढ्य आणि उदार अशा हा थोर देव बृहस्पती आमच्या हृदयीं वास करून आहे. तो देव आमच्या प्रार्थनांनीं आनंदीत होऊन आमच्यावर शौर्याचा आणि ज्ञानाचा वर्षाव करो, म्हणजे आम्ही त्वरीत फलदायक अशी उत्साहवर्धक शक्ति भोगूं ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १९१ ( सुर्यः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : सुर्यः - छंद - अनुष्टुप्


कङ्क॑रतो॒ न कङ्क॒तोऽथो॑ सती॒नक॑ङ्क तः ॥
द्वाविति॒ प्लुषी॒ इति॒ न्य॑१दृष्टा॑ अलिप्सत ॥ १ ॥

कङ्कतः न कंकतः अथो इति सतीनऽकङ्कतः ।
द्वौ इति प्लुषी इति इति नि अदृष्टाः अलिप्सत ॥ १ ॥

जमीनीवरचे साधारण विषारी किंवा महाविषारी प्राणि आणि पाण्यांत राहणारे विखार व जलाल किंवा अदृश्य विषार ह्यापैकीं कोणाचें तरी विष माझ्या आंगांत पुरें भिनलें आहें हे खास. ॥ १ ॥


अ॒दृष्टा॑न्हन्त्याय॒त्यथो॑ हन्ति पराय॒ती ॥
अथो॑ अवघ्न॒ती ह॒न्त्यथो॑ पिनष्टि पिंष॒ती ॥ २ ॥

अदृष्टान् हन्ति आऽयति अथो इति हन्ति पराऽयती ।
अथो इति अवऽघ्नती हन्ति अथो इति पिनष्टि पिंषती ॥ २ ॥

ही औषधी अदृश्य विषारांच्या जवळ आपल्या बरोबर त्यांना मारून टाकते, ही दुसरी एकदां उतरून दूर नेल्याबरोबर त्यांचा नाश करतें. ही औषधी अशी आहे कीं, विष बाधलेल्या जागेवर आपटतां क्षणींच विषार नाहींसा करते, आणि ही तर अशी आहे कीं ती ठेंचल्याबरोबर विषारही ठेंचला जातो. ॥ २ ॥


श॒रासः॒ कुश॑रासो द॒र्भासः॑ सै॒र्या उ॒त ॥
मौ॒ञ्जा अ॒दृष्टा॑ वैरि॒णाः सर्वे॑ सा॒कं न्यलिप्सत ॥ ३ ॥

शरासः कुशरासः दर्भासः सैर्याः उत ।
मौञ्जाः अदृष्टाः वैरिणाः सर्वे साकं नि अलिप्सत ॥ ३ ॥

शर (बारीक कळक) कुशर (बोरू), दर्भ, सैर्य, मुंज, बैरीण इत्यदि जातीच्या गवतांत राहणार्‍या प्राण्यांचे सर्व अदृश्य विखार माझ्या आंगांत एकदम भिनले आहेत असें वाटतें. ॥ ३ ॥


नि गावो॑ गो॒ष्ठे अ॑सद॒न्नि मृ॒गासो॑ अविक्षत ॥
नि के॒तवो॒ जना॑नां॒ न्य॑१दृष्टा॑ अलिप्सत ॥ ४ ॥

नि गावः गोऽस्थे असदन् नि मृगासः अविक्षत ।
नि केतवः जनानां नि अदृष्टाः अलिप्सत ॥ ४ ॥

गाई आपल्या गोठ्यांत स्वस्थ पडून होत्या, हरिणें आपापल्या निवार्‍याच्या जागीं शिरून निजलीं, आणि मानवी प्राण्याच्या चैतन्याची पताका निश्चल झाली अशा वेळीं अदृश्य विखार माझ्या आंगांत भिनला. ॥ ४ ॥


ए॒त उ॒ त्ये प्रत्य॑दृश्रन्प्रदो॒षं तस्क॑रा इव ॥
अदृ॑ष्टा॒ विश्व॑दृष्टाः॒ प्रति॑बुद्धा अभूतन ॥ ५ ॥

एत ऊं इति त्ये प्रति अदृश्रन् प्रऽदोषं तस्कराःऽइव ।
अदृष्टा विश्वऽदृष्टाः प्रतिऽबुद्धा अभूतन ॥ ५ ॥

हे विखारी प्राणी, चोराप्रमाणें रात्रीच्या वेळीं छपून फिरतांना दृष्टीस पडतात. स्वतः लपून राहून सर्वांस पहाणार्‍या विषारांनो, आतां मात्र हुशार राहा. ॥ ५ ॥


द्यौर्वः॑ पि॒ता पृ॑थि॒वी मा॒ता सोमो॒ भ्रातादि॑तिः॒ स्वसा॑ ॥
अदृ॑ष्टा॒ विश्व॑दृष्टा॒स्तिष्ठ॑ते॒लय॑ता॒ सु क॑म् ॥ ६ ॥

द्यौः वः पिता पृथिवी माता सोमः भ्राता अदितिः स्वसा ।
अदृष्टाः विश्वऽदृष्टाः तिष्ठत इळयत सु कम् ॥ ६ ॥

आमच्याप्रमाणेंच तुमचाही द्यू हा पिता आणि पृथिवी ही माता व सोम बंधु आणि अदिती ही बहीण होय. तर स्वतः लपून राहून सर्वांस पहाणार्‍या विषारांनो, एकदम थांबा आणि मुकाट्यानें येथून पळ काढा. ॥ ६ ॥


ये अंस्या॒ ये अङ्ग्याः॑ सू॒चीका॒ ये प्र॑कङ्क॒rताः ॥
अदृ॑ष्टाः॒ किं च॒नेह वः॒ सर्वे॑ सा॒कं नि ज॑स्यत ॥ ७ ॥

ये अंस्याः ये अङ्ग्याः सूचीकाः ये प्रकङ्कर्ताः ।
अदृष्टाः किं चन इह वः सर्वे साकं नि जस्यत ॥ ७ ॥

जे पालीप्रमाणें चालणारे व जे सर्पा प्रमाणे नुसत्या आंगानें सरपटणारे आहेत, जे नांगी मारून दंश करणारे किंवा त्याहूनही जलाल विखार आहेत ते आणि जे इतर कोणत्याहि प्रकारचे अदृश्य विषारी जंतु असतील, अशा सर्व विषारांनो तुम्हां सर्वांची एकदम गठडी वळो. ॥ ७ ॥


उत्पु॒रस्ता॒त्सूर्य॑ एति वि॒श्वदृ॑ष्टो अदृष्ट॒हा ॥
अ॒दृष्टा॒न्सर्वा॑ञ्ज॒म्भय॒न् सर्वा॑श्च यातुधा॒न्यः ॥ ८ ॥

उत् पुरस्तात् सूर्य एति विश्वऽदृष्टः अदृष्टऽहा ।
अदृष्टान् सर्वान् जम्भयन् सर्वाः च यातुऽधान्यः ॥ ८ ॥

पहा, सर्व विश्वाला पहाणारा आणि सर्व अदृश्य विषारांचा नाश करणारा सूर्य पूर्व दिशेकडे उदय पावत आहे. तो अदृश्य विखार आणि दुष्ट चेटक्या ह्या सर्वांचा पार फडशा पाडून टाकतो. ॥ ८ ॥


उद॑पप्तद॒सौ सूर्यः॑ पु॒रु विश्वा॑नि॒ जूर्व॑न् ॥
आ॒दि॒त्यः पर्व॑तेभ्यो वि॒श्वदृ॑ष्टो अदृष्ट॒हा ॥ ९ ॥

उत् अपप्तत् असौ सूर्यः पुरु विश्वानि जूर्वन् ।
आदित्यः पर्वतेभ्यः विश्वऽदृष्टः अदृष्टऽहा ॥ ९ ॥

सर्व विश्वाला पाहणारा, सर्व दुष्टांस सडकून भाजून काढणारा, आणि अदृश्य विषारांचा नाश करणारा हा आदित्य सूर्य ह्या उदयापासून वर चढत चालला. ॥ ९ ॥


सूर्ये॑ वि॒षमा स॑जामि॒ दृतिं॒ सुरा॑वतो गृ॒हे ॥
सो चि॒न्नु न म॑राति॒ नो व॒यं म॑रामा॒रे अ॑स्य
योज॑नं हरि॒ष्ठा मधु॑ त्वा मधु॒ला च॑कार ॥ १० ॥

सूर्ये विषं आ सजामि दृतिं सुराऽवतः गृहे ।
सः चित् नु न मराति नो इति वयं मराम आरे अस्य योजनं हरिऽस्थाः मधु त्वा मधुला चकार ॥ १० ॥

मद्याची बाधा न होणार्‍या मनुष्याच्या घरीं ज्याप्रमाणें मद्यरूप विषाचा बुधला नेऊन टाकावा, त्याप्रमाणे मीं सूर्यमंडलाच्या ठिकाणीं हें विष दांबून ठेवितों, म्हणजे सूर्य जसा कधीं मरत नाहीं, तसे आम्हींही मरणार नाहीं. सुवर्ण रश्मिरूप अश्वावर आरूढ झालेल्या सूर्यानें त्या विषाला दूर नेऊन मधुविद्येच्या योगानें त्याचें अमृत करून सोडिलें. ॥ १० ॥


इ॒य॒त्ति॒का श॑कुन्ति॒का स॒का ज॑घास ते वि॒षम् ॥
सो चि॒न्नु न म॑राति॒ नो व॒यं म॑रामा॒रे अ॑स्य
योज॑नं हरि॒ष्ठा मधु॑ त्वा मधु॒ला च॑कार ॥ ११ ॥

इयत्तिका शकुन्तिका सका जघास ते विषम् ।
सो इति चित् नु न मराति नो इति वयं मराम आरे अस्य योजनं हरिऽस्थाः मधु त्वा मधुला चकार ॥ ११ ॥

कपिंजली हें पांखरू येवढेंसे असते खरें पण तिनें तुझ्या आंगांत भिनलेलें विष पार खाऊन टाकलें तरी ती जशी कधीं मरत नाहीं, तसे आम्हीही मरणार नाहीं. कारण सुवर्ण रश्मिरूप अश्वावर आरूढ झालेल्या सूर्यानें त्या विषाला दूर नेऊन मधुविद्येच्या योगानें त्याचें मधुर अमृत बनवून सोडलें. ॥ ११ ॥


त्रिः स॒प्त वि॑ष्पुलिङ्ग॒िका वि॒षस्य॒ पुष्य॑मक्षन् ॥
ताश्चि॒न्नु न म॑रन्ति॒ नो व॒यं म॑रामा॒रे अ॑स्य
योज॑नं हरि॒ष्ठा मधु॑ त्वा मधु॒ला च॑कार ॥ १२ ॥

त्रिः सप्त विष्पुलिङ्गकाः विषस्य पुष्यं अक्षन् ।
ताः चित् नु न मरन्ति नो इति वयं मराम आरे अस्य योजनं हरिऽस्थाः मधु त्वा मधुला चकार ॥ १२ ॥

एकविस विष्पुलिंग (एक जात) चिमण्यांनी विषाच्या वाढत्या लहरींना पार शोषून घेतलें तरी त्या जशा कधीं मरत नाहींत तसे आम्ही ही मरणार नाहीं, कारण सुवर्ण रश्मिरूप अश्वावर आरूढ झालेल्या सूर्यानें त्या विषाला दूर नेऊन मधुविद्येच्या योगानें मधुर अमृत करून टाकलें. ॥ १२ ॥


न॒वा॒नां न॑वती॒नां वि॒षस्य॒ रोपु॑षीणाम् ॥
सर्वा॑सामग्रभं॒ नामा॒रे अ॑स्य
योज॑नं हरि॒ष्ठा मधु॑ त्वा मधु॒ला च॑कार ॥ १३ ॥

नवानां नवतीनां विषस्य रोपुषीणाम् ।
सर्वासां अग्रभं नाम आरे अस्य योजनं हरिऽस्थाः मधु त्वा मधुला चकार ॥ १३ ॥

विषाचा परिहार करणार्‍या ज्या नव्याण्णव नद्या आहेत, त्या सर्वांचे नांव मी घेतलें, त्यामुळें सुवर्ण रश्मिरूप अश्वावर आरूढ झालेल्या सूर्यानें त्या विषाला दूर नेऊन मधुविद्येच्या योगानें त्याचें मधुर अमृत करून टाकलें. ॥ १३ ॥


त्रिः स॒प्त म॑यू॒र्यः स॒प्त स्वसा॑रो अ॒ग्रुवः॑ ॥
तास्ते॑ वि॒षं वि ज॑भ्रिर उद॒कं कु॒म्भिनी॑रिव ॥ १४ ॥

त्रिः सप्त मयूर्यः सप्त स्वसारह् अग्रुवः ।
ताः ते विषं वि जभ्रिर उदकं कुम्भिनीःऽइव ॥ १४ ॥

एकवीस मयूरी आणि लग्न न झालेल्या सात बहिणी, ह्या सर्वांनी तुझ्या आंगांतील विषार घागरींनी पाणी भरून नेल्याप्रमाणें तुझ्या आंगांतून काढून टाकला आहे. ॥ १४ ॥


इ॒य॒त्त॒कः कु॑षुम्भ॒कस्त॒कं भि॑न॒द्म्यश्म॑ना ॥
ततो॑ वि॒षम् प्र वा॑वृते॒ परा॑ची॒रनु॑ सं॒वतः॑ ॥ १५ ॥

इयत्तकः कुषुम्भकः तकं भिनद्मि अश्मना ।
ततः विषंम् प्र ववृते पराचीः अनु संऽवतः ॥ १५ ॥

हा एव्हढासा मुंगूस आहे, पण माझें विष न उतरेल तर त्या बेट्याला मीं दगडाखालीं ठेंचून टाकीन, हें पहा तेथून विष उतरत चाललें, गेलें, कोणीकडच्या कोणीकडे निघून गेलें. ॥ १५ ॥


कु॒षु॒म्भ॒कस्तद॑ब्रवीद् गि॒रेः प्र॑वर्तमान॒कः ॥
वृश्चि॑कस्यार॒सं वि॒षम॑र॒सं वृ॑श्चिक ते वि॒षम् ॥ १६ ॥

कुषुम्भकः तत् अब्रवीत् गिरेः प्रवर्तमानकः ।
वृश्चिकस्य अरसं विषं अरसं वृश्चिक ते विषम् ॥ १६ ॥

मग पर्वतांच्या कपारींतून मुंगूस बाहेर येऊन बोलला कीं अरे हें विष विंचवाचें त्यांत कसचा जीव आहे. विंचवा चल जा, तुझें विष तर अगदींच नरम. ॥ १६ ॥


॥ प्रथमं मण्डलं समाप्तं ॥
ॐ तत् सत्


GO TOP