श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व पञ्चाशत्तमोऽध्यायः
नारायणाश्रमवर्णनम्
वैशंपायन उवाच
ऋषिभिः पूजितस्तैस्तु विवेश हरिरीश्वरः ।
पौराणं ब्रह्मसदनं दिव्यं नारायणाश्रमम् ॥ २ ॥
स तद् विवेश हृष्टात्मा तानामन्त्र्य सदोगतान् ।
प्रणम्य चादिदेवाय ब्रह्मणे पद्मयोनये ॥ २ ॥
स्वेन नाम्ना परिज्ञातं स तं नारायणाश्रमम् ।
प्रविशन्नेव भगवानायुधानि व्यसर्जयत् ॥ ३ ॥
स तत्रांबुपतिप्रख्यं ददर्शालयमात्मनः ।
स्वधिष्ठितं देवगणैः शाश्वतैश्च महर्षिभिः ॥ ४ ॥
संवर्तकाम्बुदोपेतं नक्षत्रस्थानसंकुलं ।
तिमिरौघपरिक्षिप्तमप्रधृष्यं सुरासुरैः ॥ ५ ॥
न तत्र विषयो वायोर्नेन्दोर्न च विवस्वतः ।
वपुषः पद्मनाभस्य स देशस्तेजसाऽऽवृतः ॥ ६ ॥
स तत्र प्रविशन्नेव जटाभारं समुद्वहन् ।
सहस्रशीर्षो भूत्वा तु शयनायोपचक्रमे ॥ ७ ॥
लोकानामन्तकालज्ञा काली नयनशालिनी ।
उपतस्थे महात्मानं निद्रा तं कालरूपिणी ॥ ८ ॥
स शिश्ये शयने दिव्ये समुद्राम्भोदशीतले ।
हरिरेकार्णवोक्तेन व्रतेन व्रतिनां वरः ॥ ९ ॥
तं शयानं महात्मानं भवाय जगतः प्रभुम् ।
उपासाञ्चक्रिरे विष्णुं देवाः सर्षिगणास्तथा ॥ १० ॥
तस्य सुप्तस्य शुशुभे नाभिमध्यात् समुत्थितम् ।
आद्यं तस्यासनं पद्मं ब्रह्मणः सूर्यवर्चसम् ।
सहस्रपत्रं वर्णाढ्यं सुकुमारं विभूषितम् ॥ ११ ॥
ब्रह्मसूत्रोद्यतकरः स्वपन्नेव महामुनिः ।
आवर्तयति लोकानां सर्वेषां कालपर्ययम् ॥ १२ ॥
विवृतात् तस्य वदनान्निःश्वासपवनेरिताः ।
प्रजानां पञ्क्तयो ह्युच्चैर्निष्पतन्त्युत्पतन्ति च ॥ १३ ॥
ते सृष्टाः प्राणिनो मेध्या विभक्ता ब्रह्मणा स्वयं ।
चतुर्धा स्वां गतिं जग्मुः कृतान्तोक्तेन कर्मणा ॥ १४ ॥
न तं वेद स्वयं ब्रह्मा नापि ब्रह्मर्षयोऽव्ययाः ।
विष्णोर्निद्रामयं योगं प्रविष्टं तमसावृतम् ॥ १५ ॥
ते तु ब्रह्मर्षयः सर्वे पितामहपुरोगमाः ।
न विदुस्तं क्वचित् सुप्तं क्वचिदासीनमासने ॥ १६ ॥
जागर्ति कोऽत्र कः शेते कश्च शक्तश्च नेङ्गते ।
को भोगवान् को द्युतिमान् कृष्णात् कृष्णतरश्च कः ॥ १७ ॥
विमृशन्ति स्म तं देवा दिव्याभिरुपपत्तिभिः ।
न चैनं शेकुरन्वेष्टुं कर्मतो जन्मतोऽपि वा ॥ १८ ॥
गाथाभिस्तत्प्रदिष्टाभिर्ये तस्य चरितं विदुः ।
पुराणास्तं पुराणेषु ऋषयः सम्प्रचक्षते ॥ १९ ॥
श्रूयते चास्य चरितं देवेष्वपि पुरातनम् ।
महापुराणात् प्रभृति परं तस्य न विद्यते ॥ २० ॥
यच्चास्य देवदेवस्य चरितं स्वप्रभावजम् ।
तेनेमाः श्रुतयो व्याप्ता वैदिक्यो लौकिकाश्च याः ॥ २१ ॥
भवकाले भवत्येष लोकानां लोकभावनः ।
दानवानामभावाय जागर्ति मधुसूदनः ॥ २२ ॥
यत्रैनं वीक्षितुं देवा न शेकुः सुप्तमव्ययम् ।
ततः स्वपिति घर्मान्ते जागर्ति जलदक्षये ॥ २३ ॥
स हि वेदाश्च यज्ञाश्च यज्ञाङ्गानि च सर्वशः ।
या तु यज्ञगतिः प्रोक्ता स एष पुरुषोत्तमः ॥ २४ ॥
तस्मिन्सुप्ते न वर्तन्ते मन्त्रपूताः क्रतुक्रियाः ।
शरत्प्रवृत्तयज्ञोऽयं जागर्ति मधुसूदनः ॥ २५ ॥
तदिदं वार्षिकं चक्रं कारयत्यम्बुदेश्वरः ।
वैष्णवं कर्म कुर्वणः सुप्ते विष्णौ पुरंदरः ॥ २६ ॥
या ह्येषा गह्वरा माया निद्रेति जगति स्थिता ।
साकस्माद् द्वेषिणी घोरा कालरात्रिर्महीक्षिताम् ॥ २७ ॥
तस्यास्तनुस्तमोद्वारा निशा दिवसनाशिनी ।
जीवितार्धहरा घोरा सर्वप्राणभृतां भुवि ॥ २८ ॥
नैतया कश्चिदाविष्टो जृंभमाणो मुहुर्मुहुः ।
शक्तः प्रसहितुं वेगं मज्जन्निव महार्णवे ॥ २९ ॥
अन्नजा भुवि मर्त्यानां श्रमजा वा कथंचन ।
सैषा भवति लोकस्य निद्रा सर्वस्य लौकिकी ॥ ३० ॥
स्वप्नान्ते क्षीयते ह्येषा प्रायशो भुवि देहिनम् ॥ ॥
मृत्युकाले च भूतानां प्राणान्नाशयते भृशम् ॥ ३१ ॥
देवेष्वपि दधारैनां नान्यो नारायणादृते ।
सखी सर्वहरस्यैषा माया विष्णुशरीरजा ॥ ३२ ॥
सैषा नारायणमुखे दृष्टा कमललोचना ।
लोकानल्पेन कालेन ग्रसते लोकमोहिनी ॥ ३३ ॥
एवमेषा हितार्थाय लोकानां कृष्णवर्त्मना ।
ध्रियते सेवनीया हि पत्येव च पतिव्रता ॥ ३४ ॥
स तया निद्रया च्छन्नस्तस्मिन् नारायणाश्रमे ।
स्वपिति स्म तदा विष्णुर्मोहयञ्जगदव्ययम् ॥ ३५ ॥
तस्य वर्षसहस्राणि शयानस्य महात्मनः ।
जग्मुः कृतयुगं चैव त्रेता चैव युगोत्तमम् ॥ ३६ ॥
स तु द्वापरपर्यन्ते ज्ञात्वा लोकान् सुदुःखितान् ।
प्राबुध्यत महातेजाः स्तूयमानो महर्षिभिः ॥ ३७ ॥
ऋषयः ऊचुः
जहीहि निद्रां सहजां भुक्तपूर्वामिव स्रजम् ।
इमे ते ब्रह्मणा सार्धं देवा दर्शनकाङ्क्षिणः ॥ ३८ ॥
इमे त्वां ब्रह्मविद्वांसो ब्रह्मसंस्तववादिनः ।
वर्धयन्ति हृषीकेश ऋषयः संशितव्रताः ॥ ३९ ॥
एतेषामात्मभूतानां भूतानामात्मभावनः ।
शृणु विष्णो शुभा वाचो भूव्योमाग्न्यनिलाम्भसाम् ॥ ४० ॥
इमे त्वां सप्त मुनयः सहिता मुनिमण्डलैः ।
स्तुवन्ति देवा दिव्याभिर्गेयाभिर्गीर्भिरञ्जसा । ४१ ॥
उत्तिष्ठ शतपत्राक्ष पद्मनाभ महाद्युते ।
कारणं किंचिदुत्पन्नं देवानां कार्यगौरवात् ॥ ४२ ॥
वैशंपायन उवाच
स संक्षिप्य जलं सर्वं तिमिरौघं विदारयन् ।
उदतिष्ठद्धृषीकेशः श्रिया परमया ज्वलन् ॥ ४३ ॥
स ददर्श सुरान् सर्वान् समेतान् सपितामहान् ।
विवक्षतः प्रक्षुभिताञ्जगदर्थे समागतान् ॥ ४४ ॥
तानुवाच हरिर्देवो निद्राविश्रान्तलोचनः ।
तत्त्वदृष्टार्थया वाचा धर्महेत्वर्थयुक्तया ॥ ४५ ॥
श्रीभगवानुवाच
कुतो वो विग्रहो देवाः कुतो वो भयमागतम् ।
कस्य वा केन वा कार्यं किं वा मयि न वर्तते ॥ ४६ ॥
किं खल्वकुशलं लोके वर्तते दानवोत्थितम् ।
नृणामायासजननं शीघ्रमिच्छामि वेदितुं ॥ ४७ ॥
एष ब्रह्मविदां मध्ये विहाय शयनोत्तमम् ।
शिवाय भवतामर्थे स्थितः किं करवाणी वः ॥ ४८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
विष्णोर्योगशयनोत्थाने पञ्चाशत्तमोऽध्यायः
नारायणाश्रमवर्णन -
वैशंपायन सांगतात :- या प्रकारे त्या ऋषींनी पूजा केल्यावर तो ईश्वर श्रीहरी आपल्या ब्रह्मलोकान्तर्गत महापुरातन अशा दिव्य नारायणा-श्रमांत शिरला. मग स्वत:च्याच नांवानें प्रख्यात असलेल्या त्या आश्रमांत शिरताच भगवान् नारायणाने युद्धार्थ इतका वेळ हातीं घेतलेली सर्व आयुधे एकीकडे ठेवून दिली. आणि नंतर सभासदांना व आदिदेव जो ब्रह्मदेव त्यालाही तेथें बोलाविले. आणि त्याला वंदन करून नंतर आपल्या त्या समुद्रतुल्य आलयाकडे दृष्टि फेकिली. तें देवगणांनी व सनातन महर्षींनी अधिष्ठित असून प्रलयकालीन मेघाच्या अभिमानिनी देवताही तेथे होत्या. शिवाय तेथें नक्षत्रचक्र असून गडद अंधारही होता. व त्या आलयावर देव किंवा असुर यांपैकी कोणाचाही पराक्रम चालत नव्हता; इतकेंच नव्हे, तर तेथें वायुचा रिघाव नव्हता; तसाच चंद्राचा न सूर्याचा. तो सर्व देश पद्यनाभाच्या केवळ अंगकान्तीनेच लख-लखत होता. असो; अशा त्या आलयांत शिरताच परमात्मा सहस्त्र मस्तकें व त्या सर्वांवर जटा-भार ( लोककर्मवासनाजालरूपी) धारण करून शयनावर पडला. पडताच जिला लोकांच्या अंतसमयाचें पूर्ण ज्ञान असून जी नयनप्रदेशीं फार खुलते अशी कालरूपिणी निद्रा त्या परमात्म्याजवळ तत्काल आली. तेव्हां निर्विकल्प समाधीची तयारी करून तो नियमशील श्रीहरी निस्ताप अशा दिव्य शयनावर निद्रा करिता झाला. तो निद्रिस्त होतांच ऋषिगणांसह देव जगाची पुनरुत्पत्ति व्हावी, हा हेतु मनांत धरून त्या महात्म्या प्रभूची उपासना करूं लागले. तो भगवान् निजला असतां सूर्याप्रमाणें तेजस्वी व ब्रह्मदेवाचे आद्यवसतीस्थान असें एक सुंदर कमल त्याच्या नाभीमध्यातून उठून आलें. या कमलाला सहस्त्र पाकळ्या असून त्याचा वर्ण फारच उंची होता. शिवाय, तें सुकुमार असून फारच शोभिवंत दिसत होतें. तो महामुनि परमात्मा निजल्या निजल्याच आखिल लोकांचे युगादि' कालचक्र फिरवीत असतो. तें असें कीं, त्या त्या कल्पांतील जो ब्रह्मदेव असेल त्याचे स्वाधीन जीवांचे वासनामय तंतु करून त्याला कामांत साह्य करितो. तो निद्रिस्त असतां त्याच्या उघड्या मुखांतून चालणाऱ्या निःश्वासाबरोबर वाऱ्याने प्रजांच्या मालिकाच्या मालिका बाहेर येऊन खालींवर पडतात. मग ह्या रीतीनें निर्माण झालेल्या प्राण्याची ब्रह्मदेव स्वत: वेदात घालून दिलेल्या रीतीप्रमाणे ब्राह्मणक्षत्रियादि चार वर्णरूपानें व्यवस्था लावितो. नंतर ते प्राणी आपआपल्या मार्गास लागतात. असा हा अविद्याशबलित जो श्रीविष्णूचा निद्रामय योग आहे, याच्या देखील सत्यस्वरूपाची कल्पना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला किंवा सनातन ब्रह्मऋषींनाही येत नाहीं. हे पितामह- पुर:सर जे ब्रह्मर्षि यांना खरें बोलू जातां हा परमात्मा कोणत्या स्थलीं किंवा कोणत्या काली निजतो किंवा न निजतां मध्येंच उठून आसनावर बसून व्यवहार करितो, याचा कांहींच पत्ता लागत नाहीं. त्याचप्रमाणे या देहांत तरी जागतो कोण, निजतो कोण ? अंगीं शक्ति असूनही कधीं कधीं अक्रिय असा राहतो कोण, हे भोग भोगतो कोण, देहाचे ठिकाणी जें तेज खेळते तें कोणाचे व अणोरणीयान इत्यादि वाक्यांनी सुक्ष्माहून सुक्ष्मतरत्व जें वर्णन केलें आहे तें कोणाचें, हें तरी कोणाला कळतें आहे? देवमंडळी श्रुतिसंमत युक्तीनी त्याचा पत्ता लावण्याविषयीं रात्रंदिवस खल करीत असतात; तथापि, त्याच्या जन्माचा किंवा कर्माचाही थांग लागत नाहीं. अशा स्थितींत त्या परमात्म्याने आपण होऊनच आपल्या नि:श्वसित रूपाने समजविलेल्या वेदाचा आधार घेऊन मोठमोठाल्या पुराण ऋषींनी पुराण ग्रंथांत त्याचें चरित गाइले आहे. देवमंडळी मानवी सृष्टीपेक्षां फार फार जुनी; पण त्या मंडळीच्या कानींही या परमात्म्याचें जें चरित्र म्हणून आहे, तें किती किती तरी जुने म्हणूनच आहे. हे जनमेजया्, या परमात्म्याच्या स्वत: सामर्थ्याचा जो इतिहास आहे, त्या इतिहासानेंच वैदिक व लौकिक गाथा भरलेल्या आहेत. हा लोकनिर्माणकर्ता सृष्टीच्या निर्माणकाली प्रकट होतो व हा मधुसूदन दानवांना मारण्यासाठीं टपत बसतो, आणि प्रलयकाली पुन्हा निद्रित होतो. या सुप्तस्थितीत प्रत्यक्ष देवांनाही त्याचेकडे पाहावत नाहीं. ह्या जागृती-सुषुप्तीचा सांवत्सरिक पर्याय म्हणजे दरवर्षी उष्णकाल संपून आषाढी एकादशी आली म्हणजे निघणे व वर्षाकाल संपून कार्तिकी एकादशी येतांच उठणे, असा आहे. वेद, यज्ञ, यज्ञाची सर्वागें आणि यज्ञापासून प्राप्त होणारी गति ही सर्वही परमात्मरूपच आहेत असे म्हणतात. आषाढामध्यें तो निजला म्हणजे मंत्राने होणाऱ्या यज्ञ- क्रिया बंद पडतात, त्या तो पुनः शरदृतूत कार्तिकांत जागृत झाला म्हणजे सुरू होतात. श्रीविष्णू वर्षाकालांत चतुर्मास जेव्हां निद्रिस्त असतो तेव्हां त्याच्या गैरहजेरीत मेघाधिपति जो पुरंदर इंद्र तो हें वर्षाचक्र चालवितो. हा जो विष्णूचा योगमायाबलाने अकस्मात् प्राप्त होणारा तमोमय निद्रेच्या काल तो राजेलोकांना फारच घातक आहे; या कालांत ते परस्पर युद्धादि करून नाश पावतात. ही जी परमात्म्याची योगनिद्रा हिचीच छोटीशी प्रत म्हणजे ह्या पृथ्वीवरील प्राणिमात्राला प्राप्त होणारी व आपल्या बरोबर प्राण्यांच्या आयुष्याचे अर्ध चोरून नेणारी व दिवसाचा नाश करणारी अशी निशा ही होय. या निशेचेंच विशिष्ट स्वरूप निद्रा हें होय. या निद्रेचे सामर्थ्य असें विलक्षण आहे कीं, तिने एकदां ज्याचे देहांत प्रवेश केला तो किती जरी सशक्त असला तरी त्याला वारंवार जांभया येऊं लागतात, व तिचा वेग अनावर होऊन त्याला एखाद्या महासमुद्रांत बुडल्यासारखें होतें. या भूतलावर लोकांना जी निद्रा येते तिला हेतु दोन. एक तर ती अन्नाच्या कैफानें येते किंवा श्रमामुळें येते. बहुधा पृथ्वी वरील प्राण्यांना उठतां उठतां स्वप्ने पडून या निद्रेचा अंत होतो. व प्राणिमात्राच्या मृत्यु् समयीं ही निद्रा हजर राहून त्यांचे प्राण हरण करिते. या बयाचा तडाका इतका विलक्षण आहे कीं, देवमंडळींत देखील एका नारायणाशिवाय इतर कोणालाही तो सहन होत नाहीं. आतां नारायणाला तरी तो सहन होतो याचें कारण असें आहे कीं, सर्वांतक जो हा परमात्मा जनार्दन त्याची ही पक्की मैत्रीणच; कारण, ही त्याच्याच शरीरापासून उत्पन्न झालेली आहे. ही दिसण्यांत मोठी मनोहर आहे, हिचे नेत्र कमलासारखे आहेत आणि ही सर्व लोकांना मोहिनी घालणारी आहे. ही प्रथम नारायणाचे मुद्रेवर दृष्टीस येते आणि नंतर थोड्याच कालांत सर्व जगताला व्यापून टाकिते. परमात्म्यानें तरी लोक हितार्थच स्वत: हिचे सेवन केलें आहे. हिचे सेवन करण्यांत परमात्म्याला कांहीं कमीपणा नाहीं. कारण, खऱ्या साध्वी स्त्रीची सुखार्थी पतीनें देखील सेवा करणें योग्यच आहे. असो; अशा या निद्रेचें स्वत: पांघरूण घेऊन व निखिल सृष्टीला मोह घालून परमात्मा श्रीविष्णू शयन करितात. या निद्रेमध्यें त्या महात्म्याची सहस्त्रावधि वर्षें जातात. या चालू पर्यायांतीलही भगवंताच्या निद्रास्थितींतच सर्व कृतयुग लोटलें, त्रेतायुगही लोटलें आणि द्वापराचीही बहुतेक अखेर आली. परंतु, इतक्यांत प्रजेला बहुत दु्:ख झालें आहे असें ध्यानीं आणून ऋषिमंडळींनीं स्तुति आरंभिल्यामुळें तो महातेजस्वी परमात्मा जागा झाला.
ऋषि म्हणाले: - हे भगवन्, ब्रह्मदेवा सहित सर्व देव आपले दर्शनाची इच्छा करीत आहेत; तर वास घेऊन उपभोगिलेल्या पुष्प- मालेप्रमाणें या आपल्या सहज निद्रेचा त्याग करावा. हे ह्र्षीकेशा, हे सर्वही वेदपरायण आणि तपोनिष्ठ ब्रह्मवेत्ते ऋषि तुझी स्तुति करून तुझें स्वागत करीत आहेत. हे स्वयंभो, हे भूतमया विष्णो, या पृथिव्यादि सर्व भूतांच्या अधिदेवता तुजपुढें आल्या आहेत, यांची मंगलवाणी ऐकून घे. हे देवा, हे सप्तर्षि इतर मंडळी बरोबर घेऊन दिव्य आणि योग्य शब्दांनीं तुझी स्तुति गात आहेत. हे कमलाक्षा, हे पद्यनाभा, हे महादेवा, देवांना तसेंच कांहीं महत्वाचें कार्य असल्यामुळें तुझी जरूरी लागली आहे, तर ऊठ.
वैशंपायन सांगतात : - याप्रमाणे स्तुति कानी येतांच त्या हषीकेशानें भोंवतीं पसरलेंलें सर्व जल आवरून घेऊन व आपल्या भोवतींचें तमाचें दाट आवरण फोडून तो मोठ्या तेजांत उठून बसला. पहातो तो पितामहासह सर्व देवमंडळी क्षुब्ध होऊन जगत्कल्याणाकरितां आपणास कांहीं विनंति करावी म्हणून आलेली दृष्टीस पडली. त्यांना पाहून तो श्रीहरि डोळ्यांवरून निद्रा साफ गेल्यावर धर्मयुक्त व सहेतुक अशा तात्विक भाषेनें म्हणाला कीं, हे देवहो, तुमची कलागत कोठें उपजली आहे, तुम्हांला कोणाचे भय वाटतें, तुम्हांला कोणाचे साह्याची व कोणाकरितां जरूरी आहे. बरें, या प्रसंगीं माझे हातून होण्याजोगें काय आहे? दानवांकडून तर लोकांना त्रास पोंचत नाहींना? तसें असेल तर मला झटपट सांगा. मी माझी असली गोड झोंप व शय्या सोडून तुमच्या कल्याणासाठीं उठून या ब्रह्मवेत्त्या मंडळींत बसलों आहें, तरी मी तुमच्याकरितां कोणती कामगिरी करूं तें सांगा.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि नारायणाश्रमवर्णनं नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५० ॥
अध्याय पन्नासावा समाप्त
GO TOP
|