श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
चतुर्थोऽध्यायः


पृथूपाख्यानम् -

वैशम्पायन उवाच
अभिषिच्याधिराज्ये तु पृथुं वैन्यं पितामहः ।
ततः क्रमेण राज्यानि व्यादेष्टुमुपचक्रमे ॥ १ ॥
द्विजानां वीरुधां चैव नक्षत्रग्रहयोस्तथा ।
यज्ञानां तपसां चैव सोमं राज्येऽभ्यषेचयत् ॥ २ ॥
अपां तु वरुणं राज्ये राज्ञां वैश्रवणं प्रभुम् ।
बृहस्पतिं तु विश्वेषां ददावाङ्गिरसं पतिम् ॥ ३ ॥
भृगूणामधिपं चैव काव्यं राज्येऽभ्यषेहयत् ।
आदित्यानां तथा विष्णुं वसूनामथ पावकम् ॥ ४ ॥
प्रजापतीनां दक्षं तु मरुतामथ वासवम् ।
दैत्यानां दानवानां च प्रह्लादममितौजसम् ॥ ५ ॥
वैवस्वतं च पितॄणां यमं राज्येऽभ्यषेचयत् ।
मातॄणां च व्रतानां च मन्त्राणां च तथा गवाम् ॥ ६ ॥
यक्षाणां राक्षसानां च पार्थिवानां तथैव च ।
नारायणं तु साध्यानां रुद्राणां वृषभध्वजम् ॥ ७ ॥
विप्रचित्तिं तु राजानं दानवानामथादिशत् ।
सर्वभूतपिशाचानां गिरिशं शूलपाणिनम् ॥ ८ ॥
शैलानां हिमवन्तं च नदीनामथ सागरम् ।
गन्धानां मरुतां चैव भूतानामशरीरिणाम् ।
शब्दाकाशवतां चैव वायुं च बलिनां वरम् ॥ ९ ॥
गन्धर्वाणामधिपतिं चक्रे चित्ररथं प्रभुम् ।
नागानां वासुकिं चक्रे सर्पाणामथ तक्षकम् ॥ १० ॥
वारणानां च राजानमैरावतमथादिशत् ।
उच्चैःश्रवसमश्वानां गरुडं चैव पक्षिणाम् ॥ ११ ॥
मृगाणामथ शार्दूलं गोवृषं तु गवां पतिम् ।
वनस्पतीनां राजानं प्लक्षमेवादिशत् प्रभुम् ॥ १२ ॥
सागराणां नदीनां च मेघानां वर्षणस्य च ।
आदित्यानामधिपतिं पर्जन्यमभिषिक्तवान् ॥ १३ ॥
सर्वेषां दंष्ट्रिणां शेषं राजानमभ्यषेचयत् ।
सरीसृपानां सर्पाणां राजानं चैव तक्षकम् ॥ १४ ॥
गन्धर्वाप्सरसां चैव कामदेवं तथा प्रभुम् ।
ऋतूनामथ मासानां दिवसानां तथैव च ॥ १५ ॥
पक्षाणां च क्षपाणां च मुहूर्ततिथिपर्वणाम् ।
कलाकाष्ठाप्रमाणानां गतेरयनयोस्तथा ॥ १६ ॥
गणितस्याथ योगस्य चक्रे संवत्सरं प्रभुम् ।
एवं विभज्य राज्यानि क्रमेण स पितामहः ॥ १७ ॥
दिशापालानथ ततः स्थापयामास भारत ।
पूर्वस्यां दिशि पुत्रं तु वैराजस्य प्रजापतेः । १८ ॥
दिशापालं सुधन्वानं राजानं चाभ्यषेचयत् ।
दक्षिणस्यां महात्मानं कर्दमस्य प्रजापतेः ॥ १९ ॥
पुत्रं शङ्खपदं नाम राजानं सोऽभ्यषेचयत् ।
पश्चिमायां दिशि तथा रजसः पुत्रमच्युतम् ॥ २० ॥
केतुमन्तं महात्मानं राजानं सोऽभ्यषेचयत् ।
तथा हिरण्यरोमाणं पर्जन्यस्य प्रजापतेः ॥ २१ ॥
उदीच्यां दिशि दुर्धर्षं राजानं सोऽभ्यषेचयत् ।
तैरियं पृथिवी सर्वा सप्तद्वीपा सपर्वता ॥ २२ ॥
यथाप्रदेशमद्यापि धर्मेण प्रतिपाल्यते ।
राजसूयाभिषिक्तस्तु पृथुरेभिर्नराधिपैः ।
वेददृष्टेन विधिना राजाराज्ये नराधिप ॥ २३ ॥
ततो मन्वन्तरेऽतीते चाक्षुषेऽमिततेजसि ।
वैवस्वताय मनवे ब्रह्मा राज्यमथादिशत् ।
तस्य विस्तरमाख्यास्ये मनोर्वैवस्वतस्य ह ॥ २४ ॥
तवानुकूल्याद् राजेन्द्र यदि शुश्रूषसेऽनघ ।
महद्ध्येतदधिष्ठानं पुराणं परिकीर्तितम् ।
धन्यं यशस्यमायुष्यं स्वर्गवासकरं शुभम् ॥ २५ ॥
जनमेजय उवाच
विस्तरेण पृथोर्जन्म वैशम्पायन कीर्तय ।
यथा महात्मना तेन दुग्धा चेयं वसुन्धरा ॥ २६ ॥
यथा च पितृभिर्दुग्धा यथा देवैर्यथर्षिभिः ।
यथा दैत्यैश्च नागैश्च यथा यक्षैर्यथा द्रुमैः ॥ २७ ॥
यथा शैलैः पिशाचैश्च गन्धर्वैश्च द्विजोत्तमैः ।
राक्षसैश्च महासत्त्वैर्यथा दुग्धा वसुंधरा ॥ २८ ॥
तेषां पात्रविशेषांश्च वैशंपायन कीर्तय ।
वत्सान् क्षीरविशेषांश्च दोग्धारं चानुपूर्वशः ॥ २९ ॥
यस्माच्च कारणात् पाणिर्वेनस्य मथितः पुरा ।
क्रुद्धैर्महर्षिभिस्तात कारणं तच्च कीर्तय ॥ ३० ॥
वैशम्पायन उवाच
हन्त ते कथयिष्यामि पृथोर्वैन्यस्य विस्तरम् ।
एकाग्रः प्रयतश्चैव शृणुष्व जनमेजय ॥ ३१ ॥
नाशुचेः क्षुद्रमनसः कुशिष्यायाव्रताय च ।
कीर्तनीयमिदं राजन् कृतघ्नायाहिताय च ॥ ३२ ॥
स्वर्ग्यं यशस्यमायुष्यं धर्म्यं वेदेन संमितम् ।
रहस्यमृषिभिः प्रोक्तं शृणु राजन्यथातथम् ॥ ३३ ॥
यश्चैनं कीर्तयेन्नित्यं पृथोर्वैन्यस्य विस्तरम् ।
ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य न स शोचेत् कृताकृतैः ॥ ३४ ॥
इति श्रीमहाभारते खिल्लेषु हरिवंशपर्वणी
पृथूपाख्याने चतुर्थोऽध्यायः


पृथुचें उपाख्यान -

हे राजा, पितामह ब्रह्मदेव यानें मागें सांगितल्याप्रमाणें वेनपुत्र पृथु याला सर्वांत श्रेष्ठ अशा राज्यावर अभिषिक्त करून त्याजकडे पूर्ण मालकी सोंपविल्यावर उरलेल्या भिन्न भिन्न भूतसमूहांच्या राज्यांवर अधिपति नेमण्याचा क्रम चालविला. तो असा --पक्षि, लता, नक्षत्रें, ग्रह, यज्ञ व तप इतक्यांचे आधिपत्य सोमाकडे दिले. जलाचें आधिपत्य वरुणाकडे दिलें; यक्षांचें श्रेष्ठत्व कुबेराकडे दिलें; विश्वेदेवांचें स्वामित्व अंगिरस कुलोत्पन्न बृहस्पतीकडे दिलें व शुक्राचार्यांस भृगुकुलाचें आधिपत्य दिलें. द्वादशादित्यांत विष्णूला श्रेष्ठत्व दिलें, व अष्टवसूंत पावकाला, मुख्य केलें, सर्व प्रजापतींचा मुख्य दक्ष प्रजापति केला, मरुद्गणांचें नायकत्व इंद्राकडे दिलें; अमित तेजस्वी जो प्रर्‍हाद त्याला दैत्य व दानव या उभय कुलांचा अधिपति केलें. पितरांचे राज्यावर सूर्यपुत्र यमधर्म याला स्थापिलें. अष्टमातृका, व्रतें, मंत्र, गाई, यक्ष, राक्षस व पृथ्वीपाल यांचें आधिपत्य नारायणाकडे दिलें. साध्य व रुद्र यांचें स्वामित्व वृषभध्वज जो शंकर त्याजकडे दिलें. दानव समूहाचे नायकत्व विप्रचित्तीकडे दिलें. शूलपाणी शंकर यास भूतपिशाच्चांचा अधिपति नेमिलें. सर्व पर्वतांत हिमालयाला अग्रस्थान दिलें. नद्यांचे पतित्व सागराकडे ठेविलें. गंध, मरुद्गण, प्रेतादिक, ध्वनि, अंतरिक्ष व पृथ्वी यांवर बलिष्ठ वायूला अधीश नेमिलें. बलवान् चित्ररथाला गंधर्वांत वरिष्ठ केलें, नागांत वासुकीला व सर्पांत तक्षकाला स्वामित्व दिलें. हत्तींचे अग्रेसरत्व ऐरावताकडे, अश्वांचें उच्चैःश्रव्याकडे व पक्ष्यांचे गरुडाकडे प्रभुत्व दिले; श्वापदांचे स्वामित्व सिंहाकडे व गाईंचें प्रभुत्व सांडाकडे दिलें. वृक्षांत अश्वत्थाकडे वर्चस्व ठेविले; सागर, नद्या, वृष्टि आणि आदित्य यांच्या राज्यावर पर्जन्याला बसविलें. दंश करणार्‍या प्राण्यांची मालकी शेषाकडे दिली; सरपटणारे जे सर्पादि त्यांचा तक्षक स्वामी नेमला; गंधर्व आणि अप्सरा यांची नायकी बलाढय जो मदन त्याकडे दिली; ऋतु, महिने, दिवस, पक्ष, रात्री, तिथि, पर्व, कला, काष्ठा, वगैरे कालमानें, अयनांच्या गति व योग (ग्रहयुति वगैरे ), या सर्वांचे प्रभुत्व संवत्सराकडे दिलें.

याप्रमाणें राज्यांची वांटणी केल्यावर ब्रह्मदेवानें दिक्पाल नेमिले. वैराज प्रजापतीचा पुत्र जो सुधन्वा त्याला पूर्वेचा दिक्पाल केलें, दक्षिण दिशेचें पालकत्व कर्दमप्रजापतीचा पुत्र शंखपद याजकडे सोंपविलें, राजसपुत्र महात्मा केतुमान याला पश्चिम दिशेस नेमिलें; त्याचप्रमाणें पर्जन्य प्रजापतीचा अजिंक्य पुत्र जो हिरण्यरोमा त्याला उत्तर दिशा दिली. हे नेमिलेले दिक्पाल सतद्वीपांनीं व अनेक पर्वतांनीं युक्त जी ही विस्तीर्ण पृथ्वी तिचें आप- आपल्या ठिकाणीं राहून धर्मानें आजपर्यंत परिपालन करीत आहेत. वर जे भिन्न भिन्न राज्यांचे राजे सांगितले, त्या सर्वांनी मिळून एक राजसूय यज्ञ करून पृथूला वेदोक्त विधीनें आपणा सर्वांचा राजा म्हणजे चक्रवर्ती नेमिलें.

याप्रमाणे व्यवस्था होऊन अतितेजस्वी असें चाक्षुष मन्वंतर संपल्यावर पुढील मन्वंतराची मालकी ब्रह्मदेवानें वैवस्वत मनूकडे दिली. हे राजा, तुझी अनुकूलता असेल व तूं ऐकण्यास राजी असशील तर या मनूचें सविस्तर वर्णन सांगावें, असें माझ्या फार मनांत आहे. कारण पुराणांत याचें फल फार मोठें सांगितलेलें आहे. याचे श्रवणानें मान- प्रतिष्ठा, धनधान्य, कीर्ति, आयुष्य व अंतीं स्वर्गवास, ही सर्व प्राप्त होतात, असें सांगितलें आहे. जनमेजय राजा म्हणतो-- फार नामी गोष्ट; तर, वैशंपायना, आरंभीं त्या महात्म्या पृथु राजानें या वसुंधरेचें दोहन कसकसें केले; तसेंच त्यानंतर देव, पितर, ऋषि, दैत्य, नाग, यक्ष, वृक्ष, पर्वत, पिशाच्च, गंधर्व, द्विजश्रेष्ठ, इत्यादि महासत्वांनींही तिचें दोहन कसकसें केलें; त्यावेळीं पात्रें कसलीं घेतलीं होतीं; वत्स कोणकोणते होते; कसकसल्या प्रकारचें दूध निघालें व दूध काढणारे कोण कोण होते, हे सर्व क्रमाक्रमानें मला सांगा. त्याचप्रमाणे पूर्वींचे महर्षींनी वेन राजावर क्रुद्ध होऊन त्याचे हाताचें घुसळण कां केलें, तेंही मला सांगा.

वैशंपायन म्हणतात - शाबास जनमेजया, तुझी तत्परता पाहून मला मोठा आनंद झाला आहे. मी तुला वेनपुत्र जो पूथु याचें वृत्त सविस्तर सांगतों व तूंही एकाग्र चित्तानें व पवित्रपणानें असाच ऐक. हे राजा, हे पूथूचें चरित्र अमंगळ, क्षुद्र मनाचा, व्रतहीन, कृतघ्न, दुष्ट व कुशिष्य अशाला सांगूं नये; याची योग्यता फार मोठी आहे. हेँ वेदाला मान्य असून स्वर्ग, यश, आयुष्य व धर्मप्राति करून देणारें आहे; व ऋषींनीं ही मोठी एक गुप्त गोष्ट म्हणून सांगितलें आहे. तें मी तला जशाचें तसेंच सांगतो, श्रवण कर. हे राजा, प्रथम बाह्मणांना नमस्कार करून जो कोणी हें वैन्य चरित्र सविस्तरपणें नित्य लोकांस कथन करील त्याला कृत व अकृत कर्मामुळे घडलेल्या पापांबद्दल हाय हाय करीत बसण्याची वेळ येणार नाहीं.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पृथूपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
अध्याय चवथा समाप्त

GO TOP