श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व प्रथमोऽध्यायः
आदिसर्गकथनम् -
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥ १ ॥
द्वैपायनोष्ठपुटनिःसृतमप्रमेयं
पुण्यं पवित्रमथ पापहरं शिवं च ।
यो भारतं समधिगच्छति वाच्यमानं
किं तस्य पुष्करजलैरभिषेचनेन ॥ २ ॥
जयति पराशरसूनुः
सत्यवतीहृदयनन्दनो व्यासः ।
यस्यास्यकमलगलितं
वाङ्मयममृतं जगत्पिबति ॥ ३ ॥
यो गोशतं कनकशृङ्गमयं ददाति
विप्राय वेदविदुषे बहुविश्रुताय ।
पुण्यां च भारतकथां शृणुयाच्च तद्वत्
तुल्यं फलं भवति तस्य च तस्य चैव ॥ ४ ॥
शताश्वमेधस्य यदत्र पुण्यं
चतुःसहस्रस्य शतक्रतोश्च ।
भवेदनन्तं हरिवंशदानात्
प्रकीर्तितं व्यासमहर्षिणा च ॥ ५ ॥
यद् वाजपेयेन तु राजसूयाद्
दृष्टं फलं हस्तिरथेन चान्यत् ।
तल्लभ्यते व्यासवचः प्रमाणं
गीतं च वाल्मीकिमहर्षिणा च ॥ ६ ॥
यो हरिवंशं लेखयति
यथाविधिना महातपाः सपदि ।
स जयति हरिपदकमलं
मधुपो हि यथा रसेन लुब्धः ॥ ७ ॥
पितामहाद्यं प्रवदन्ति षष्ठं
महर्षिमक्षय्यविभूतियुक्तम् ।
नारायणस्यांशजमेकपुत्रं
द्वैपायनं वेद महानिधानम् ॥ ८ ॥
आद्यं पुरुषमीशानं पुरुहूतं पुरुष्टुतम् ।
ऋतमेकाक्षरं ब्रह्म व्यक्ताव्यक्तं सनातनम् ॥ ९ ॥
असच्च सदसच्चैव यद्विश्वं सदसत्परम् ।
परावराणां स्रष्टारं पुराणं परमव्ययम् ॥ १०॥
मङ्गल्यं मङ्गलं विष्णुं वरेण्यमनघं शुचिम् ।
नमस्कृत्य हृषीकेशं चराचरगुरुं हरिम् ॥ ११॥
नैमिषारण्ये कुलपतिः शौनकस्तु महामुनिः ।
सौतिं पप्रच्छ धर्मात्मा सर्वशास्त्रविशारदः ॥ १२॥
शौनक उवाच
सौते सुमहदाख्यानं भवता परिकीर्तितम् ।
भारतानां च सर्वेषां पार्थिवानां तथैव च ॥ १३॥
देवानां दानवानां च गन्धर्वोरगरक्षसाम् ॥
दैत्यानामथ सिद्धानां गुह्यकानां तथैव च ॥ १४॥
अत्यद्भुतानि कर्माणि विक्रमा धर्मनिश्चयाः ॥
विचित्राश्च कथायोगा जन्म चाग्र्यमनुत्तमम् ॥ १५॥
कथितं भवता पुण्यं पुराणं श्लक्ष्णया गिरा ॥
मनःकर्णसुखं सौते प्रीणात्यमृतसंमितम् ॥ १६॥
तत्र जन्म कुरूणां वै त्वयोक्तं लौमहर्षणे ॥
न तु वृष्ण्यन्धकानां च तद्भवान् वक्तुमर्हति ॥ १७॥
सौतिरुवाच ॥
जनमेजयेन यत्पृष्टः शिष्यो व्यासस्य धर्मवित् ।
तत्तेऽहं सम्प्रवक्ष्यामि वृष्णीनां वंशमादितः ॥ १८ ॥
श्रुत्वेतिहासं कार्त्स्न्येन भारतानां स भारतः ।
जनमेजयो महाप्राज्ञो वैशम्पायनमब्रवीत् ॥ १९ ॥
जनमेजय उवाच
महाभारतमाख्यानं बह्वर्थं श्रुतिविस्तरम् ।
कथितं भवता पूर्वं विस्तरेण मया श्रुतम् ॥ २० ॥
तत्र शूराः समाख्याता बहवः पुरुषर्षभाः ।
नामभिः कर्मभिश्चैव वृष्ण्यन्धकमहारथाः ॥ २१ ॥
तेषां कर्मावदातानि त्वयोक्तानि द्विजोत्तम ।
तत्र तत्र समासेन विस्तरेणैव मे प्रभो ॥ २२ ॥
न च मे तृप्तिरस्तीह कथ्यमाने पुरातने ।
एकश्चैव मतो राशिर्वृष्णयः पाण्डवास्तथा ॥ २३ ॥
भवांश्च वंशकुशलस्तेषां प्रत्यक्षदर्शिवान् ।
कथयस्व कुलं तेषां विस्तरेण तपोधन ॥ २४ ॥
यस्य यस्यान्वये ये ये तांस्तानिच्छामि वेदितुम् ।
स त्वं सर्वमशेषेण कथयस्व महामुने ।
तेषां पूर्वविसृष्टिं च विचिन्त्येमां प्रजापतेः ॥ २५ ॥
सौतिरुवाच
सत्कृत्य परिपृष्टस्तु स महात्मा महातपाः ।
विस्तरेणानुपूर्व्यां च कथयामास तां कथाम् ॥ २६ ॥
वैशम्पायन उवाच
शृणु राजन् कथां दिव्यां पुण्यां पापप्रमोचनीम् ।
कथ्यमानां मया चित्रां बह्वर्थां श्रुतिसम्मिताम् ॥ २७ ॥
यश्चेमां धारयेद्वापि शृणुयाद् वाप्यभीक्ष्णशः ।
स्ववंशधारणं कृत्वा स्वर्गलोके महीयते ॥ २८ ॥
अव्यक्तं कारणं यत् तन्नित्यं सदसदात्मकम् ।
प्रधानं पुरुषं तस्मान्निर्ममे विश्वमीश्वरम् ॥ २९ ॥
तं वै विद्धि महाराज ब्रह्माणममितौजसम् ।
स्रष्टारं सर्वभूतानां नारायणपरायणम् ॥ ३० ॥
अहङ्कारस्तु महतस्तस्माद्भूतानि जज्ञिरे ।
भूतभेदाश्च भूतेभ्य इति सर्गः सनातनः ॥ ३१ ॥
विस्तारावयवं चैव यथाप्रज्ञं यथाश्रुतिः ।
कीर्त्यमानं शृणु मया पूर्वेषां कीर्तिवर्धनम् ॥ ३२ ॥
धन्यं यशस्यं शत्रुघ्नं स्वर्ग्यमायुःप्रवर्धनम् ।
कीर्तनं स्थिरकीर्तीनां सर्वेषां पुण्यकर्मणाम् ॥ ३३ ॥
तस्मात्कल्पाय ते कल्पः समग्रं शुचये शुचिः ।
आ वृष्णिवंशाद्वक्ष्यामि भूतसर्गमनुत्तमम् ॥ ३४ ॥
ततः स्वयम्भूर्भगवान् सिसृक्षुर्विविधाः प्रजाः ।
अप एव ससर्जादौ तासु वीर्यमवासृजत् ॥ ३५ ॥
आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसूनवः ।
अयनं तस्य ताः पूर्वं तेन नारायणः स्मृतः ॥ ३६ ॥
हिरण्यवर्णमभवत् तदण्डमुदकेशयम् ।
तत्र जज्ञे स्वयं ब्रह्मा स्वयम्भूरिति नः श्रुतम् ॥ ३७ ॥
हिरण्यगर्भो भगवानुषित्वा परिवत्सरम् ।
तदण्डमकरोद् द्वैधं दिवं भुवमथापि च ॥ ३८ ॥
तयोः शकलयोर्मध्ये आकाशमसृजत्प्रभुः ।
अप्सु पारिप्लवां पृथ्वीं दिशश्च दशधा दधे ॥ ३९ ॥
तत्र कालं मनो वाचं कामं क्रोधमथो रतिम् ।
ससर्ज सृष्टिं तद्रूपां स्रष्टुमिच्छन् प्रजापतीन् ॥ ४० ॥
मरीचिमत्र्यङ्गिरसं पुलस्त्यं पुलहं क्रतुम् ।
वसिष्ठं च महातेजाः सोऽसृजत् सप्त मानसान् ॥ ४१ ॥
सप्त ब्रह्माण इत्येते पुराणे निश्चयं गताः ।
नारायणात्मकानां वै सप्तानां ब्रह्मजन्मनाम् ॥ ४२ ॥
ततोऽसृजत् पुनर्ब्रह्मा रुद्रं रोषात्मसम्भवम् ।
सनत्कुमारं च विभुं पूर्वेषामपि पूर्वजम् ॥ ४३ ॥
सप्तैते जनयन्ति स्म प्रजा रुद्रश्च भारत ।
स्कन्दः सनत्कुमारश्च तेजः संक्षिप्य तिष्ठतः ॥ ४४ ॥
तेषां सप्त महावंशा दिव्या देवगणान्विताः ।
क्रियावन्तः प्रजावन्तो महर्षिभिरलंकृताः ॥ ४५ ॥
विद्युतोऽशनिमेघांश्च रोहितेन्द्रधनूंषि च ।
वयांसि च ससर्जादौ पर्जन्यं च ससर्ज ह ॥ ४६ ॥
ऋचो यजूंषि सामानि निर्ममे यज्ञसिद्धये ।
मुखाद् देवानजनयत् पितृंश्चेशोऽपि वक्षसः ॥ ४७ ॥
प्रजनाच्च मनुष्यान् वै जघनान्निर्ममेऽसुरान् ।
साध्यानजनयद् देवानित्येवमनुशुश्रुम ॥ ४८ ॥
उच्चावचानि भूतानि गात्रेभ्यस्तस्य जज्ञिरे ।
आपवस्य प्रजासर्गं सृजतो हि प्रजापतेः ॥ ४९ ॥
सृज्यमानाः प्रजा नैव विवर्धन्ते यदा तदा ।
द्विधा कृत्वाऽऽत्मनो देहमर्धेन पुरुषोऽभवत् ॥ ५० ॥
अर्धेन नारी तस्यां स ससृजे विविधाः प्रजाः ।
दिवं च पृथिवीं चैव महिम्ना व्याप्य तिष्ठतः ॥ ५१ ॥
विराजमसृजद् विष्णुः सोऽसृजत्पुरुषं विराट् ।
पुरुषं तं मनुं विद्धि तद्वै मन्वन्तरं स्मृतम् ॥ ५२ ॥
द्वितीयमापवस्यैतन्मनोरन्तरमुच्यते ।
स वैराजः प्रजासर्गं ससर्ज पुरुषः प्रभुः ।
नारायणविसर्गः स प्रजास्तस्याप्ययोनिजाः ॥ ५३ ॥
आयुष्मान् कीर्तिमान् धन्यः प्रजावाञ्छ्रुतवांस्तथा ।
आदिसर्गं विदित्वेमं यथेष्टां गतिमाप्नुयात् ॥ ५४ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
आदिसर्गकथने प्रथमोऽध्यायः
आदिसर्गकथन -
श्रीकृष्णद्वैपायन व्यास मुनींच्या ओष्ठपुटांतून निघालेले, अद्भुत, धर्मवृद्धिकर, पावन, पापनाशक व सुखक असें हें भारत जो श्रवण करील, त्याला पुष्करादि पवित्र तीर्थांच्या स्नानानें अधिक लाभ तो काय होणार ? ज्यांच्या मुखकमलांतून स्रवणारें अमृत सर्व जग पिऊन राहिलें आहे असे जे माता सत्यवतीच्या हृदयास आनंद देणारे पराशर पुत्र व्यास मुनि त्यांचा जयजयकार असो. बहुश्रुत व वेदवेत्त्या ब्राह्मणाला सुवर्णशृंगांनी युक्त अशा शंभर गाई देणार्याला जें फल मिळतें तेंच फल ही पवित्र भारतकथा श्रवण करणाराला मिळतें. व्यास महर्षींचें असें म्हणणें आहे कीं, शताश्वमेध किंवा इंद्रपदप्राप्त्यर्थ करावे लागणारे क्रतु किंवा अक्षय्य अन्नदान यांच्या योगानें जें फल प्राप्त होतें, त्याच्याही अनंतपट फल हरिवंशाचें पुस्तक दान करणाराला मिळतें. तसेंच वाजपेय किंवा राजसूय यज्ञ केल्यानें अथवा हत्तींचा रथ दान केल्यानें मिळणारे जें पारलौकिक फल, तें हरिवंशाचे योगानें मिळतें. याविषयीं व्यासमुनि व वाल्मीकि महर्षि या उभयतांचीं वचनें प्रमाण आहेत. जो कोणी तपस्वी यथाविधि हरिवंश ग्रंथाचें लेखन करील, तो रसलुब्ध भ्रमराप्रमाणें तत्काल श्रीहरीच्या चरणकमलाप्रत पावेल. पितामहापासून सहावा, अनंत योगैश्वर्यानें युक्त, साक्षात् नारायणाचा अंशभूत व शुक मुनि हा ज्यांचा एकच पुत्र आहे, अशा व्यास महर्षीला मी ब्रह्मभावानें वंदन करितों.
नैमिषारण्याचे ठायीं परम धार्मिक, सर्वशास्त्रनिपुण, महामुनी, कुलपति शौनक हे चराचरगुरु, सर्वांचा आदिपुरुष, सर्व-शक्तिमान् बहुनामयुक्त, अनेकांनी स्तवन केलेला, सत्यस्वरूप, ॐकारपदवाच्य, व्यक्ताव्यक्त, सनातन, अनिर्वचनीय, सदसताहून पलीकडे असणारा, जीवेश्वराचा कर्ता, पुराण, पर, अव्यय, मंगलकारक, मंगल, व्यापक, भक्तप्रिय, निर्मल, पवित्र, सर्वेंद्रियांचा प्रवर्तक व सर्व पापांचा नाश करणारा जो परमात्मा, त्याला वंदन करून सौतीला विचारतात - हे सौते, भरतकुलोत्पन्न व इतर राजे यांचा सविस्तर इतिहास तूं आम्हांस सांगितलास; तसेच देव, दानव, गंधर्व, सर्प, राक्षस, दैत्य, सिद्ध व गुह्यक यांची अत्यद्भुत र्मे, पराक्रम, धर्मनिष्ठा, नानाप्रकारच्या कथा, अयोनिसंभवजन्म, इत्यादि जुन्या पवित्र अमृततुल्य गोष्टी ज्यांच्या श्रवणानें मनाला व कर्णाला आल्हाद होतो, अशा मनोहर वाणीने सांगितल्यास, त्यांतच कुरूंचे जन्मही सविस्तर कथन केलेंस. परंतु सुप्रसिद्ध जे वृष्णि आणि अंधक, त्यांचा इतिहास सांगण्याचा राहून गेला आहे; तर तेवढा तूं कृपा करून आम्हांस सांग.
सौति म्हणाला : - शौनका, व्यासांचा धर्मज्ञ शिष्य वैशंपायन यानें भारतेतिहास सविस्तर श्रवण केल्यावर वैशंपायनाला वृष्णिकुलाविषयीं प्रश्न केला होता तीच हकीकत मी तुला सांगतों.
जनमेजय विचारतो : - हे सौते, आतांपर्यंत आपण वेदांचा मतलब विस्तारून सांगणारें व अनेक अर्थांनी युक्त असें महाभारत नांवाचे आख्यान मला सांगितले, व मींही तें सविस्तर ऐकिलें. त्या आख्यानांत आपण वृष्णि आणि अंधक या दोन कुलांतील नामकर्मानें प्रख्यात असे अनेक शूर महारथी यांचें वर्णन केलें. तशींच ठिकठिकाणी त्यांची पवित्र अशीं कर्मेंही थोड्याबहुतानें आपण सांगितलीं. परंतु काय असेल तें असो, या जुन्या गोष्टी ऐकू लागलें म्हणजे किती ऐकलें तरी माझी तृप्तीच होत नाहीं. माइया समजुतीनें वृष्णि आणि पांडव हे एकाच कुटुंबांतले वाटतात. आपण वंशांचे पुरे माहितगार असून विशेषतः या वृष्णि कुळाशीं आपला समक्षच परिचय आहे, याकरितां हे तपोघना, या कुलाची हकीकत मला विशेष विस्तारानें सांगा. या कुलांतील ज्या ज्या शाखेंत जे जे कोणी विशिष्ट पुरुष झाले असतील त्यांची हकीकत मला सविस्तर सांगा व तशीच प्रजापतीपासून त्यांच्यापर्यंत (वृष्णि कुलापर्यंत) सर्व पूर्वजांचीही उत्पत्ती कथन करा. सौति म्हणाला, याप्रमाणें मोठया आदरानें प्रश्न केल्यामुळें तो महातपस्वी महात्मा वैशंपायन यानें यथाक्रम व सविस्तर असें वंशवृत्त सांगण्यास आरंभ केला.
वैशंपायन म्हणतात:- हे राजा, पापापासून मुक्त करणारी, वेदालाही मान्य, अनेकार्थ युक्त, विचित्र, दिव्य व पुण्यकारक अशी कथा मी तुला सांगतो, ती श्रवण कर. या कथेचें सामर्थ्य असें आहे कीं, ही जो स्मरणरूपानें किंवा पुस्तक रूपानें आपल्यापाशीं ठेवील, किंवा वारंवार श्रवण करील त्याचा वंश इहलोकीं अखंड राहून स्वर्ग लोकांत त्याचा मोठा गौरव होईल. हे राजा, ज्याचा ''हें'' म्हणून अंगुली निर्देशानें किंवा शब्दांनी बोध करितां येत नाहीं अशा प्रकारचें नित्य, अव्यक्त व सदसदात्मक जें व मायाशबल ब्रह्म किंवा प्रकृतिसंवलित पुरुष, तें सृष्टीचें आदिकारण होय. त्यापासून हें ईश्वरात्मक जगत् उत्पन्न झालें. हा जो अव्यक्त संज्ञक अमित तेजस्वी पुरुष हाच ब्रह्मा होय; हाच सर्व भूतांचा उत्पत्तिकर्ता व नारायण जो विष्णु याचे तंत्रानें वागणारा असून महत्तत्वाचा (बुद्धीचा) अभिमानी होय. या महत्तत्वापासूनच अहंकार उत्पन्न झाला. अहंकारापासून आकाशादि महाभूतें व महाभूतांपासून जरायुज, स्वेदज, वगैरे सर्व भूतसृष्टि या क्रमानें हा सृष्टीचे उत्पत्तीचा ओघ अखंड चालू आहे. असो; तूं पवित्र व ऐकण्यास पात्र व मीही पवित्र असून वंशकीर्तनास समर्थ, असा योग जुळून आल्यामुळें वेदाज्ञेला न सोडतां माझे बुद्धिसामर्थ्यानुरूप सृष्टीच्या आदिपासून तों वृष्णिवंशाच्या आरंभापर्यंत अत्युत्तम जी भूतसृष्टि तिचें वर्णन अवयवशः विस्तरून मी तुला सांगतों. ह्या वर्णनांत ज्यांनीं ज्यांनीं पवित्र कर्में केलीं व अजरामर कीर्ति संपादिली अशा अनेक पुरुषांचे उल्लेख येणार आहेत व यामुळें हें वर्णन पूर्वजांची कीर्ति वाढविणारें, यशोदायक, शत्रूचा नि:पात करणारे, स्वर्ग देणारे, आयुष्य व संपत्ति वाढविणारें, असें आहे. याकरितां तें लक्ष देऊन ऐक.
भगवान् स्वयंभू यानें सूक्ष्मभूतांची अहंकारादि सृष्टि निर्माण केल्यावर नाना तर्हेची स्थूल प्राणिसृष्टि निर्माण करण्याचा संकल्प करून प्रथम उदक निर्माण केलें, व त्या उदकाचे ठिकाणीं आपलें वीर्य सोडले. आप म्हणजे उदक यालाच '' नारा '' अशी संज्ञा आहे. याचें कारण नर म्हणजे ईश्वर यापासून तें झाले; व ईश्वरालाच नारायण असें म्हणतात. याचें कारण नारा म्हणजे उदक हेंच त्याचें अयन म्हणजे आश्रयस्थान होय. असो, ईश्वरानें उदकांत वीर्य सोडल्यावर कांहीं कालानें तें सोन्याच्या वर्णाचें एक अंडें झालें. त्या अंड्यांतून ब्रह्मदेव आपण होऊनच उत्पन्न झाला; व म्हणूनच त्याला "स्वयंभू'' म्हणतात, असें आमचे ऐकिवांत आहे. असो; भगवान् ब्रह्मदेवानें त्या अंडांत अनेक वर्षें वसती करून नंतर त्या अंडाचीं दोन शकलें केलीं. त्यांपैकीं एका शकलानें स्वर्ग व एकानें पृथ्वी बनविली आणि उभय लोकांमधील जो अवकाश त्यालाच त्यानें आकाश अशी संज्ञा दिली. पृथ्वी ही पाण्यावर तरती ठेवून तिचें ठिकाणीं दहा दिशा निर्माण केल्या. नंतर सृष्टिकर्ते प्रजापति निर्माण करावे असा संकल्प करून त्यांच्यापूर्वी काल, मन, वाणी, काम, क्रोध, विषयप्रीति व ब्रह्मांडाच्या धर्तीवर पिण्ड-सृष्टि हीं निर्माण केलीं. एवढें झाल्यावर मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य पुलह, क्रतु व वसिष्ठ असे सात मानसपुत्र उत्पन्न केले. यांचे पूर्वीं केवळ नारायणपरच ज्यांची वृत्ति आहे असे सनक, सनंदनप्रभृति ब्रह्मदेवाचे सात पुत्र होते. त्यांनीं जरी संसार मिथ्या आहे अशी या मरीच्यादिकांची कानउघाडणी केली तरी तिला न जुमानतां त्यांनीं कर्ममार्गच श्रेष्ठ मानून गृहस्थाश्रम स्वीकारला. आतां जे सनकादिक सात मरीच्यादिकांच्या पूर्वींचे ब्रह्मपुत्र म्हणून सांगितले त्या सर्वांत सनत्कुमार हा ज्येष्ठ होता. शिवाय या सातांत रुद्र म्हणून एक होता, तो ब्रह्मदेवानें आपल्या रोषापासून निर्माण केला होता.
हें जनमेजया, रुद्र व मरीच्यादि सात यांनीं पुढें सृष्टि उत्पन्न केली आणि स्कंद व सनत्कुमार हे आपलें तेज सृष्टिनिर्माणाचे कामीं खर्चीं न घालतां तसेंच राखून राहिले. वरील सात प्रजापतींचे सात दिव्य महावंश निर्माण झाले. या वंशांत यक्ष पिशाच्चादि देवगण जन्मास आले, व हे मोठे कर्ते व संततियुक्त निपजले. शिवाय याच वंशाला आदित्यादिक देव व कश्यपादि महर्षि हे अलंकृत करिते झाले. नंतर त्यानें विजा, वज्र, मेघ, सरळ व वक्र अशीं इंद्रधनुष्यें, पक्षी व पर्जन्य हीं उत्पन्न केलीं. त्याचप्रमाणें यज्ञाचे सोईकरितां ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे निर्माण केले. नंतर आपल्या मुखापासून देव व वक्षस्थलापासून पितर उत्पन्न केले. उपस्थापासून मनुष्य व जघनापासून असुर, साध्य व इतर देव निर्माण केले. त्याच्या इतर गात्रांपासून लहानथोर भूतसृष्टि उत्पन्न झाली. वसिष्ठसंज्ञक प्रजापति याचे मनांत प्रजावृद्धि करावी असें आलें. म्हणून त्यानें प्रथम कांहीं मानसप्रजा उत्पन्न केली; परंतु तीपासून जेव्हां पुढें पिढी चालू होईना तेव्हां त्यानें आपल्या देहाचे दोन भाग केले. पैकीं एका भागाचा पुरुष केला व दुसर्याची स्त्री बनविली. नंतर तिचे ठायीं पुरुषानें नानाविध प्रजा निर्माण केली. याप्रमाणें त्या पुरुषानें आपल्या महिम्यानें स्वर्ग व पृथ्वी ही भरून टाकलीं. भगवान् विष्णु यानें विराट् पुरुष निर्माण केला; त्यानें मनुनामक पुरुष उत्पन्न केला. या मनूचा जो काल त्याला मन्वंतर म्हणतात. याप्रमाणें मन्वंतर म्हणजे वसिष्ठ प्रजापतीची द्वितीय सृष्टि होय. याप्रमाणें या समर्थ विराट पुरुषानें प्रजा उत्पन्न केली व स्वतः तो नारायणापासून उत्पन्न झाला असल्यामुळें त्याची सृष्टि तीही अयोनिसंभव झाली.
याप्रमाणें सांगितलेली जी ही आद्यसृष्टि हिजप्रत जो पुरुष जाणतो त्याला दीर्घायुष्य, कीर्ति, धन्यता, संतती, विद्या व यथेच्छ लोकप्राप्ति हीं लाभतात.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि आदिसर्गकथने प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अध्याय पहिला समाप्त
GO TOP
|