॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ सप्तमोऽध्यायः - अध्याय सातवा ॥



श्रीदत्त उवाच -
रथ्याकर्पटविरचितकन्थः
     पुण्यापुण्यविवर्जितपन्थः ।
     शुद्धनिरंजनसमरसमग्नः ॥ १ ॥

श्रीदत्त म्हणाले, रस्त्यातील चिंध्यांची गोधडी ज्याने पांघरलेली आहे. पुण्य व पाप यांचा मार्ग सोडला आहे, जो शुद्ध निरंजन व समरसात मग्न आहे असा सिद्ध पुरुष शून्य गृहात नग्न रहातो. (१)

लक्षालक्षविवर्जितलक्ष्यो
     युक्तायुक्तविवर्जितदक्षः ।
केवलतत्त्वनिरंजनपूतो
     वादविवादः कथमवधूतः ॥ २ ॥

लक्ष्य व अलक्ष्य यांनी रहित पण लक्षणाला गोचर होणारा युक्त व अयुक्त पण दक्ष असा केवल निर्मल तत्त्वाचा साक्षात्कार झाल्याने पवित्र झालेला अवधूत वादविवाद कशाचा करणार ? (२)

आशापाशविबन्धनमुक्तः
     शोचाचारविवर्जितयुक्तः ।
एवं सर्वविवर्जितसंत-
     स्तत्त्वं शुद्धनिरञ्जनवन्तः ॥ ३ ॥

आशापाशामुळे प्राप्त बंधनापासून मुक्त पवित्रतादि आचारांनी रहित याप्रमाणे सर्व धर्मानी रहित असलेले निरंजन संत पुरुष ते तत्त्व जाणतात. (३)

कथमिह देहविदेहविचारः
     कथमिह रागविरागविचारः ।
निर्मलनिश्चलगगनाकारं
     स्वयमिह तत्त्वं सहजाकारम् ॥ ४ ॥

या ठिकाणी देह विदेह विचार कसा असेल ? राग विराग विचार तरी कसा ? कारण स्वतःसिद्ध सहजरूपाने, निर्मल निश्चल गगनासारखेच तत्त्व येथे आहे. (४)

कथमिह तत्त्वं विन्दति यत्र
     रूपमरूपं कथमिह तत्र ।
गगनाकारः परमो यत्र
    विषयीकरणं कथमिह तत्र ॥ ५ ॥

ज्या ठिकाणी तत्त्वज्ञानच भरलेले आहे तेथे रूप व अरूप कोठून आले ? ज्या ठिकाणी गगनासारखा श्रेष्ठ परमात्मा आहे तेथे विषयीकरण कोठचे ? (५)

गगनाकारनिरन्तरहंस-
     स्तत्त्वविशुद्धनिरंजनहंसः ।
एवं कथमिह भिन्नविभिन्नं
     बन्धविबन्धविकारविभिन्नम् ॥ ६ ॥

तो गगनासारख्या आकाराचा व निरंतर असा हंस व तत्त्वतः विशुद्ध व निरंजन असा हंस आहे. त्यामध्ये भिन्नता किंवा अभिन्नता कशी असणारे ? कारण बंध मोक्ष व विकारांनी रहित तो आहे. (६)

केवलतत्त्वनिरन्तरसर्वं
     योगवियोगौ कथमिह गर्वम् ।
एवं परमनिरन्तरसर्वं
     एवं कथमिह सारविसारम् ॥ ७ ॥

तत्त्व केवल निरंतर व सर्वत्र आहे. तर मग योग वियोग किंवा गर्व तेथे कसे ? त्याचप्रमाणे घनदाट व परिपूर्ण असे ते तत्त्व असताना सोर किंवा असार ते कसे ? (७)

केवलतत्त्वनिरञ्जनसर्वं
     गगनाकारनिरन्तरशुद्धम् ।
एवं कथमिह संगविसंगं
     सत्यं कथमिह रङ्‌गविरङ्‌गम् ॥ ८ ॥

ते तत्त्व केवल निरंजन व परिपूर्ण असे आहे. गगनाकार निरंतर व शुद्ध आहे. असे असता संग व विसंग हे कसे ? अथवी तेथे रंग वा बेरंग हे सत्य कसे ? (८)

योगवियोगै रहितो योगी
     भोगविभोगै रहितो भोगी ।
एवं चरति हि मन्दं मन्दं
     मनसा कल्पितसहजनन्दम् ॥ ९ ॥

योग आणि वियोग यांनी रहित असा योगी भोग आणि विभोग यांनी रहित असा भोगी, ह्याप्रमाणे मनाने सहज स्वरूपभूत आनंदाची कल्पना करीत सिद्ध पुरुष मन्द मन्द आपले आचरण जगात ठरवितो. (९)

बोधविबोधैः सततं युक्तो
     द्वैताद्वैतः कथमिह मुक्तः ।
सहजो विरजः कथमिह योगी
     शुद्धनिरञ्जनसमरभोगी ॥ १० ॥

ज्ञान आणि अज्ञान यांनी नेहमी मुक्त असणारा पुरुष द्वैत आणि अद्वैत यापासून युक्त कसा असणार ? रक्त व विरक्त असा योगी तरी तेथे कसा मिळणार ?(१०)

भग्नाभग्नविवर्जितभग्नो
     लग्नालग्नविवर्जितलग्नः ।
कथमिह सारविसारः
     समरसतत्त्वं गगनाकारः ॥ ११ ॥

भिन्नता व अभिन्नता यांनी रहित पण भग्न, लग्न व अलग्न यांनी रहित पण संबद्ध अशा प्रकारच्या तत्त्वामध्ये सार किंवा असार कसा ? कारण ते अंतर्बाह्य एकरसाने व्यापून राहणारे असे तत्त्व आहे व तो परमात्मा गगनाकार आहे. (११)

सततं सर्वविवर्जितयुक्तः
     सर्वं तत्त्वविवर्जितयुक्तः ।
एवं कथमिह जीवितमरणं
     ध्यानाध्यानैः कथमिह एणम् ॥ १२ ॥

सर्वदा सर्वाहून पृथक असून युक्त व सर्व तत्त्वानी रहित असून मुक्त असे असताना जीवित आणि मरण ते कसे ? ध्यान आणि ध्येय यांची कर्तव्य तरी काय ? (१२)

इन्द्रजालमिदं सर्वयथा मरुमरीचिका ।
अखण्डितमनाकारो वर्तते केवलः शिवः ॥ १३ ॥

ज्याप्रमाणे मारवाड देशामध्ये भासणारे मृगजल त्याप्रमाणे हे सर्वही इंद्रजाल आहे आणि अखंड निराकार वे केवल शिव असा परमात्मा पृथक आहे. (१३)

धर्मादौ मोक्षपर्यन्तं निरीहाः सर्वथा वयम् ।
कथं रागविरागैश्च कल्पयन्ति विपश्चितः ॥ १४ ॥

धर्मापासून मोक्षापर्यंत आम्ही सर्वही प्रकारांनी निरीच्छ झालो आहेत. असे असताना ज्ञानी लोक राग आणि विराग यांनी युक्त कसे होणार ? (१४)

विन्दति विन्दति न हि न यत्र
     छन्दोलक्षणं न न हि तत्र ।
समरसमग्नो भावितपूतः
     प्रलपति तत्त्वं परमवधूतः ॥ १५ ॥

ज्ञान ज्ञान असा शब्दच जेथे नाही तेथे छंदो लक्षणही नाहीच. समरसामध्ये मग्न झालेला असल्यामुळे ज्याचे अंतःकरण पवित्र झाले आहे, असा अवधूत परम तत्त्वाविषयी बोलतो. (१५)

इति अवधूत गीतायां सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥

सातवा अध्याय समाप्त





GO TOP