[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
मीलना व्याकुळे कुब्जा तिच्या तृप्त्यर्थ कृष्ण तो ।
सर्वात्मा भगवान् गेला तिच्याही घरि एकदा ॥ १ ॥
मूल्यवान् गेह ते होते शृंगारोचित वस्तु तै ।
आसने झालरी छत्त मोतीहार कुठे कुठे ।
सुगंधी धूप नी दीप गंध चंदन ठाइ त्या ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
कृष्णास येता बघता त्वरेने
सत्कारिले त्या सखिच्या सवे नी ।
देऊनि कृष्णा मग आसनो तै
सर्वोपचार पुजिले विधीने ॥ ३ ॥
नी उद्धवाही पुजिले रितीने
स्पर्शोनि त्यांनी मग आसनाला ।
ते उद्धवो भूमिसि बैसले की
नी उच्च सेजी बसला हरी तो ॥ ४ ॥
स्नानादि वस्त्रे तइ हार गंधे
तांबूल घेता सजली बहू स्त्री ।
लीलामयी लाजुनी हासली नी
कटाक्ष देता परिपाशि आली ॥ ५ ॥
नवीन संगा बहु लाजली ती
बोलावि कृष्णो धरि हात हाती ।
शय्याक्रिडा तो हरि साधि तेंव्हा
त्या अंगरागे फळ कृष्ण हे दे ॥ ६ ॥
श्रीकृष्णपाया स्तन नेत्रि घेता
सुगंध येता बहु तृप्त झाली ।
वक्षस्थलासी हरि आवळोनी
ती शांत झाली किति त्या दिनांची ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
अंगिरा अर्पिता कृष्ण कुब्जेस लाभला पहा ।
परी दुर्भागिता कैसी भक्तिना मागता म्हणे ॥ ८ ॥
रहावे दिन ते कांही क्रीडता या परी इथे ।
मला न सोडवे तुम्हा श्रीकृष्ण कमलाक्षजी ॥ ९ ॥
अभीष्ट वर देवोनी सन्मान करुनी तिचा ।
स्विकारून पुजा सर्व पातले आपुल्या घरा ॥ १० ॥
ब्रह्मादिका न पावे जो विष्णु सर्वेश्वरो असा ।
पावता मागणे त्याला दुर्बुद्धि मानणे पहा ॥ ११ ॥
एकदा भगवान् कृष्ण बळी उद्धव घेउनी ।
काम काढोनि गेले त्या अक्रूरा घरि हे तिघे ॥ १२ ॥
नरवीर असे येता अक्रूरे पाहिले तदा ।
आनंदे धावले त्यांना मिठीत घेतले असे ॥ १३ ॥
अक्रूरे वंदिले बंधु त्रये अक्रूर वंदिले ।
आसने देउनी त्यांना विधिवत् पूजिले असे ॥ १४ ॥
कृष्णाचे पाय धूवोनी घेतले शिरिं तीर्थ ते ।
पूजा सामग्रि गंधो नी वस्त्र मालाहि अर्पिल्या ॥ १५ ॥
नमिता धरिले पाय हाताने चेपु लागले ।
विनये कृष्ण रामाला अक्रूर बोलु लागला ॥ १६ ॥
आनंद जाहला देवा मारिला कंस पापि तो ।
यदुवंशा सुखी केले द्वयांनी उन्नतो असे ॥ १७ ॥
तुम्हीच सर्व वस्तूंचे कार्यकारण भावही ।
दोघेही आदि पुरुष न वस्तु ती तुम्हा विना ॥ १८ ॥
तुम्हीच निर्मिली सृष्टी काल मायादि शक्तिने ।
प्रवेश करिता तीत प्रतीत वस्तु होतसे ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
भूतात तैसेचि चराचरात
अनेक रूपातहि तूचि होशी ।
स्वेच्छेचि तू हे धरितोस रूपे
ही ही असे एक लीला तुझीच ॥ २० ॥
तू जन्मिशी पोषिशि मारिशी त्या
रजो नि सत्वो तम या गुणांनी ।
ज्ञानस्वरूपी अति शुद्ध तूं जो ।
ती बंधने कै तुज स्पर्शि देवा ॥ २१ ॥
उपाधि ना ती स्थुल सूक्ष्मतेची
ना जन्ममृत्यू तइ भेद तूं ते ।
ती बंध मोक्षो मनकल्पना की
अज्ञान सारे अमुचेच आहे ॥ २२ ॥
तू निर्मिले वेद हिता जगाच्या
सनातनी धर्म पथोचि श्रेष्ठ ।
पाखंडी जेंव्हा त्रसिती जनांना
तू शुद्ध रूपे अवतार घेशी ॥ २३ ॥
( वसंततिलका )
तू जन्मलास वसुदेवघरी कराया
हा भार दूर सगळा सह या बळीच्या ।
जे जन्मले असुर नी करितात राज्य
तू मारुनी सकल ते यश वाढवीसी ॥ २४ ॥
ते सर्वदेव पितरे जिव भूप सारे
ती सर्व रूप तवची, तव शुद्ध गंगा ।
तू एक शिक्षक जिवा कितरो नि देव
भाग्या सिमा न उरली घर धन्य झाले ॥ ५ ॥
भक्तास प्रीय प्रभू तू हितु नी कृतज्ञ
तो कोण त्यागि चतुरो अन पूजि अन्या ।
तू पूर्ण हेतु करिसी भजगा स्वताच्या
तू कांही ना ठिविशि नी स्वयची रहाशी ॥ ६ ॥
ते भक्त कष्ट हरिशी भवमुक्ति देशी
जाणू तुला न शकती तपि देवराजा !
स्त्री पुत्र गेह धन ययात बद्ध
साक्षात भेट करिशी भव तो तुटेल ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अक्रूरे पूजिता कृष्णा स्तविता भक्तिने असे ।
हासुनी गोड शब्दाने बोलला मोहिता असे ॥ २८ ॥
श्री भगवान् म्हणाले -
तुम्ही गुरू तसे काका वंशाचे हितकारक ।
कृपा पालन नी रक्षा पात्र बालक तो अम्ही ॥ २९ ॥
कल्याण इच्छि जो त्याने तुम्हा संतास पूजिणे ।
संत देवाहुनी श्रेष्ठ संतांना स्वार्थ तो नसे ॥ ३० ॥
मूर्ती ना देवता होय पाणी ना तीर्थ ते कधी ।
तयांना सेविणे नित्य क्षणात संत तारिती ॥ ३१२ ॥
हितैषी सुहृदां मध्ये काका श्रेष्ठ तुम्ही असा ।
म्हणौनी पांडवी हीत करण्या हस्तिनापुरी ।
जावुनी पुसणे सर्व कुशलो मंगलो तया ॥ ३२ ॥
ऐकता मरता पंडू कुंतीच्या सह पांडव ।
दुःखात राहती सारे आता ते हस्तिनापुरी ॥ ३३ ॥
धृतराष्ट्र तसा अंध मनाचे बळही कमी ।
पुत्र दुर्योधन दुष्ट पांडवा नित्य त्रासितो ॥ ३४ ॥
तेंव्हा तुम्ही तिथे जावे पुसावी स्थिति ती कशी ।
पुन्हा उपाय तो योजू सुहृदा सुख द्यावया ॥ ३५ ॥
शक्तिमान् भगवान् कृष्ण अक्रूरा सांगुनी असे ।
घरास पातले तेंव्हा बल नी उद्धवासह ॥ ३६ ॥