समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय २२ वा

भिन्न भिन्न ग्रहांची स्थिति नी गतिचे वर्णन -

राजा परीक्षिताने विचारिले -
(भृंगनाद)
भगवन् ! जे वदले आपण की जरी सूर्यभगवान्
राशींच्या वर चालती त्या समयी ध्रुवाला नी
मेरुला ठेवुनी उजवीकडे चालता दिसे, वस्तुतः
तयांची गति दक्षिणवर्ति नसे या विषयी
समजाविणे अम्हा ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन् ! ज्या परी कुंभकाराच्या चाकावरी मुंगी
आदी बसता आपुली तीच गती भिन्न असे,
ती तो भिन्न भिन्न समयी या चाकाच्या भिन्न
स्थानी दिसे, त्यापरी नक्षत्र नी राशिंच्या
उपलक्षित कालचक्रीं पडुनी ध्रुव नी मेरुला
उजवीकडे ठेवुनी फिरणार्‍या सूर्यादिंची
ग्रहगति वस्तुतः न भिन्न, कां की ते कालभेदे
राशी नी नक्षत्रीं दिसती ॥ २ ॥
वेद नी विद्वान् लोकही जयांची गति जाणण्या
इच्छिती ते साक्षात् आदी पुरुष भगवान्
नारायणही लोककल्याणा नी कर्मशुद्धी
करिता आपुले वेदमय विग्रह कालाच्या बारा
मासात विभक्त करुनी वसंतादी सहा ऋतूत
तयांच्या यथा योग्य गुणा प्रगटिती ॥ ३ ॥
या लोकीचे वर्णानुसार अनुसरण करणारे पुरुष
वेदत्रयी द्वारा प्रतिपादित थोर-सान कर्में इंद्रादी
देवतांच्या रुपाने नी योगाच्या साधनें अंतर्यामी
रुपात तयाची श्रद्धा पूर्वक आराधना करिती नी
सहजची परमपद प्राप्त करु शकती ॥ ४ ॥
भगवान् सूर्य सर्व जीवांचे जीव । ते पृथिवी नी
द्युलोक मध्ये स्थित आकाश मंडलात कालचक्रीं
स्थित राहुनी बाराही मासां भोगिती जे संवत्सराचे
अवयव नी मेषादी राशींच्या नामे परिचित ।
याच्यात प्रत्येक मास चंद्रमानाने शुक्ल नी कृष्ण
या दोन पक्षांच्या, पितृमानाने एकरात्र नी एक दिन
तथा सौर मानाने सव्वादोन नक्षत्राचे गहित ।
जेवढया कालीं सूर्यदेव या संवत्सराचा सहावा
भाग भोगिती, तयासी ऋतु वदती ॥ ५ ॥
आकाशी भगवान् सूर्याचा मार्ग जेवढा,
तयाचा अर्धा ते जेवढया समयात पार करिती
तयास एक अयन वदती ॥ ६ ॥
जेवढया समयी ते आपुल्या मंद नी तीव्र नी
समान गतिने स्वर्ग नी पृथिवी भूमंडलांसह पूर्ण
आकाशी घेती फेरी तया आवांतर भेदे
संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर वा
वत्सर वदती ॥ ७ ॥
या परी सूर्याच्या किरणाहुनी एकलक्ष योजने
वरी चंद्रमा । तयाची गति बहु चपळ तयाने ते
सर्व नक्षत्रांच्या पुढे राहती । ते सूर्याच्या एक
वर्षाच्या मार्गा एक मासीं, एक मास मार्गा
सव्वादोन दिनी नी एकपक्ष मार्गा एकचि दिनी
पार करिती ॥ ८ ॥
हे कृष्णपक्षीं क्षीण होता कलांनी देवतांच्या
दिनरात्रीचा विभाग करीती नी तीस तीस मुहूर्ती
एकेक नक्षत्रा पार करिती । अन्नमय नी अमृतमय
कारणे हे जीवा समस्त प्राण नी जीवनही ॥ ९ ॥
हे ज्या सोळा कलांनी युक्त मनोमय, अन्नमय,
पुरुष भगवान् चंद्रमा-हेचि देवता पितर मनुष्य
भूत पशू पक्षी सरीसृप नी वृक्षादी समस्त
प्राणियांच्या प्राणा पोषिती, या साठी यांना
सर्वमय वदती ॥ १० ॥
चंद्रमेघा पासुनी तीन लक्ष योजने, अभिजित्
सहित नक्षत्रे अठठाविस । भगवंते तया केले
नियुक्त म्हणुनी ते मेरुला डावीकडे ठेवुनी
फिरती ॥ ११ ॥
तयांच्याहुनी दोनलक्ष योजने वरी शुक्र दिसे ।
हा सूर्याच्या शीघ्र मंद नी समान गतिच्या
अनुसारे तयाचे समान कधी पुढे, मागे नी कधी
चाले बरोबरही । हा पावसाचा ग्रह म्हणुनी तो
लोकांना सर्वदा अनुकुल । याच्या गतिने ऐसा
अंदाज की हा वर्षा थांबविणार्‍या ग्रहा करितसे
शांत ॥ १२ ॥
शुक्राची गती बोलता ये बुधाची व्याख्याही
शुक्रापरी बुधाचीही गति जाणणे । हा चंद्रपुत्र
शुक्रापासुनी दोन लक्ष योजने वरी, परी जधी
सूर्याची गती ओलांडिता तव बहुत वादळे,ढग
नी उन्हाची भय सूचना देतसे ॥ १३ ॥
याहुनी दोन लक्ष योजने वरी मंगळ । तो जधी
चाले न वक्र गति एकेक राशिसी भोगी तीन-
तीन पक्ष नी बारा राशीसी ओलांडी । हा अशुभ
ग्रह नी तसा अमंगल सूचकही ॥ १४ ॥
या वरी दोन लक्ष योजने भगवान् बृहस्पती । ते
जधी वक्र गतिने न चालती, तो एकेका राशीसी
एकेक वर्ष भोगिती । ते तसे ब्राह्मणकुळां
अनुकूल ॥ १५ ॥
बृहस्पतीच्या वरी दोन लक्ष योजने शनैश्वर
दिसे । हे तीस-तीस महिने एकेका राशीसी
भोगिती । तसे यांना सर्व राशी पार करण्या
लागती तीस वर्षे । तसे हे सर्व राशी करिता
त्रासदायक ॥ १६ ॥
तयांच्या वरी बारालक्ष योजने दूर कश्यपादी
सप्तर्षी दिसती । हे सर्व लोकांची मंगल कामना
करिती नी विष्णुचे परमपाद ध्रुवलोका
प्रदक्षिणा करिती ॥ १७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ ५ ॥ २२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP