समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ७ वा
भगवंताच्या लीलावतारांच्या कथा -
ब्रह्मदेव म्हणाले -
(वसंततिलका)
जेंव्हा धरा प्रलयकालि बुडोनि गेली
तेंव्हा तिला उचलण्यास वराह रूपा ।
घेऊनि दैत्य वधिला तुकडे करोनी
कापीयले शचिवरे गिरिपंख जैसे ॥ १ ॥
आकूति आणि रुचिच्या उदरी पुन्हा तो
सूयज्ञ नाम धरूनी स्वय जन्मला नी ।
ती दक्षिणा वरियली सुयमा म्हणुनी हरी तो ॥ २ ॥
पोटास कर्दममुनी अन देवहूती
जन्मून ते कपिल नाम धरी हरी तो ।
झाल्या नऊ बहिणि त्या,अन बोधिली त्या
मातेस उद्धरियले निजरूपि नेले ॥ ३ ॥
तो पुत्ररूप असणे भगवान् असेचि
अत्री मनात स्मरता अवधूत झाला ।
बाहू सहस्र ययि अर्जुन उद्धरीला
नी भोग मोक्ष असल्या वरिल्याहि सिद्धी ॥ ४ ॥
पाहूनि घोर तप ते मजला प्रसन्न
होऊनि तो सनकपुत्र सनंदनो नी ।
सनत् कुमार नि तसाचि सनतनोहि
ते बोधिले ऋषि मुनी प्रलयोत्तरे की ॥ ५ ॥
ती धर्मपत्नि अन दक्ष सुताचि मूर्ती
नारायणो नर तिच्या उदरासि आले ।
त्यांच्या तपास बघुनी तयि अप्सराही
भानास त्या हरपल्या मग विघ्न कैसे ॥ ६ ॥
क्रोधासि जाळिती शिवापरि थोर संत
पै क्रोध जाळि तनु त्यां नच कोणि जाळी ।
नारायणो नर ययां हृदयात जाता
क्रोधास भीती गमली मग काम काय ॥ ७ ॥
उत्तनपाद पितया जवळी नि अंकी
बैसू न दे सुरुचि ती ध्रुव बाळकाला ।
तो बाळ घोर तप आचरुनी पदाला
गेला तयास ऋषि ते करितात फेर्या ॥ ८ ॥
वेनास शाप मिळता धन पौरूषो हे
नष्टोनि जाय, तदि देह मथून त्या ।
जन्मास ये पृथु तये पृथिवीस धेनू
देवूनि रूप मथिल्या सगळ्याहि वल्ली ॥ ९ ॥
नाभी सुदेवि उदरी ऋषभावतारी
असक्ति सर्व त्यजुनी स्वरूप्र्र् निमाले ।
वेड्यापरीच हरि योग करून राही
संबोधिती ऋषि तया अवधूत नामे ॥ १० ॥
माझ्याचि यज्ञि पुरुषी हयग्रीव रूप
घेवूनि दिव्य तनु स्वर्ण प्रकाशदिव्य ।
तो छंद यज्ञ अन देव अशा रूपाचा
उच्छवास सोडित तयीं तिच वेदवाणी ॥ ११ ॥
मत्स्यस्वरूप धरिले, मनुसत्यव्रतो
आराधिता, पृथिविते तरण्यास नौका ।
झाला समस्त जिव सृष्टिसी रक्षिण्याला
वेदास रक्षुनि तदा फिरला जळात ॥ १२ ॥
जेंव्हा सुधा मिळविण्यास सुरासुसांनी
मंद्राचळां घुसळिले क्षिरसागरात ।
होऊनि कुर्म, धरिला गिरि पाठ भागी
खाजें तयास मिळली सुख शांति निद्रा ॥ १३ ॥
जेंव्हा भयात बुडल्या सुर देवता त्या
तेंव्हा नृसिंह स्वरुपा धरिले भयान ।
दाढा प्रचंड जबडा बघणे तसेचि
हिरण्यकश्यपु वधी नखिं पोट फाडी ॥ १४ ॥
मोठ्या तळ्यात धरि नक्र जधी गजेंद्रा
तेंव्हा थकूनि सुमना वरि फेकि हत्ती ।
हे आदि तू पुरूष स्वामी तुला नमी मी
कल्याण तूचि करिसी वदला असा तो ॥ १५ ॥
ऐकोनि हाक हरि तो गरुडासवे ये
ते चक्र सोडुनि तये वधिलाही नक्र ।
ऐसा कृपावश तये धरियेलि सोंड
आणीक मोक्ष दिधला गजराज याला ॥ १६ ॥
अदीति पुत्र लघुही गुणि तो विशेष
त्या वामने बळिचिया हरिलेहि गर्वा ।
तीन्ही पदात मिळता जग दक्षिणा ती
"भिक्षू विना न हटती धनवान" दावी ॥ १७ ॥
राजा बळी धरिपदा अपुल्या शिरासी
तेणे तयास मिळले मग इंद्रस्थान ।
शुके स्वयेंहि-गुरुने अडवोनि त्यासी
नाही परी बदलला बळि देहार्पी ॥ १८ ॥
तो प्रेमभाव बघुनी तुज पावला तो
घेऊनि हंस रुप ते तुज बोध केला ।
तो हाचि भागवतधर्म पुढे निघाला
तो पावतोचि शरणागत त्यास नित्य ॥ १९ ॥
स्वायंभुवादि मनुच्याहि रुपात तेणे
रक्षीयला मनुजवंश सुदर्शनाने ।
ती कीर्तिही पसरली नि त्रिलोक गाजे
होताचि भार पृथिवीस पुन्हाहि जन्मे ॥ २० ॥
स्वनाम धन्य भगवान् धनवंतरी ने
तेंव्हा बहू कठिण रोग निवारिले ते ।
देवां सुधा पिववुनी अमरत्व देई
तो आयुवेद पुढती जगतास लाभे ॥ २१ ॥
जेंव्हा जगात द्विजद्वेष घडे स्वकर्मे ।
काटे असे परशुन् मग छेदितो तो
तो होतसे परशुराम सक्रोधरूपी ॥ २२ ॥
आम्हा प्रबोध करण्या अवतार घेई
इक्ष्वाकुळी भरत लक्ष्मणाच्या सहीत ।
आज्ञा म्हणोनि रिघला वनि राहण्याला
त्यासी विरोध करिता वधि राक्षसांना ॥ २३ ॥
सीतावियोग घडता फिरला वनात
जै शंकरे त्रिपुर जळियले विमान ।
तैसे तदा नयनिलाल दिसेहि राम
ती तप्त दृष्टि बघता जळि जीव मेले ॥ २४ ॥
तो इंद्रवाह टकरे जधि रावणाच्या
वक्षस्थलास तयि भग्नचि दात झाले ।
तो गर्व त्यास भवला समरांगणात
एका शरेचि हरितो हरि प्राण गर्व ॥ २५ ॥
झुंडी जधी पृथिविते छळिती असूरी
तै श्वेत-कृष्णकच तो अवतार घेई ।
लीला तदा घडवितो अतिरम्य ऐशा
कोणा कळे न कधिही महिमा तयाची ॥ २६ ॥
तो बालरूप पुतना वधिली तयाने
गाडा पदे उचलिला दुर फेकिलाही
भारी तरु उखडिले नवलाव केला
तो-तोचि हे करु शके इतरा न शक्य ॥ २७ ॥
ते वीष मिश्रित जलो पिउनी नदीते
मले स्थळीच सखये-शिशु-गोपबाळ ।
त्यांना सुधामयिकृपे जिवदान केले
सापास हाकलुनिया जळ शुद्ध केले ॥ २८ ॥
लागे तृणास वनवा जधि तो महान
गोपाळ नेत्र मिटता गिळिलाहि अग्नि ।
रक्षीयलेचि हरिने सगळ्या जिवांना
ऐशा अतर्क्य घडवी नवलाव लीला ॥ २९ ॥
बांधी तयास जननी जधि दोरखंडे
जोडास जोड करुनी नपुरे हरीला ।
कृष्णांमुखीं बघितले जधि येश्वदेने
पाहूनि विश्व सगळे भयभीत झाली ॥ ३० ॥
सर्पो तसेचि वरुणासह देवतांच्या
पाशातुनी निजपित्या करि मुक्त कृष्ण ।
गुफेत बंद करिता जधि गोपबाळे
व्योमासुरे तयिहि श्रीहरि सोदवी तो ।
गोकूळवासि जन ते श्रमती दिनासी
रात्रीस ते थकुनिया मग झोप घेती ।
त्यांना कुठे समय साधन योग घेण्या
त्यांनाहि मोक्ष दिधला नवलाव पाही ॥ ३१ ॥
निष्पाप नारद पहा जधि कृष्णबोधे
केले न इंद्रवना वज्रि गोप यांनी ।
क्रोधे करी शतमखो दगडीच वृष्टी
संरक्षणा हरि धरी नखि गोगिरीला ॥ ३२ ॥
वृंदावनी विहरता मग चांदण्यात
वंशीत गीत मधुरो करिता तयाने ।
प्रेमे विबद्ध बनुनी मग गोपि येती
शंखाचुडे सतविता वधिले तयाला ॥ ३३ ॥
चाणूर धेनुक बको अन तो प्रलंब
केशी नि कालयवनादिक कंस मामा ।
भौमासुरो द्विविदवानर दंतवक्त्र
शाल्वो नि रुक्मि कुरु कैकय सृजयादी ॥ ३४ ॥
येती जधी धनुष घेउनिया लढाया
भीमार्जुना सहमते वधिही तयांना ।
लीला करोनि असल्या हरि तो निघेही
वैकुठधामी निज जे स्वयमेव एक ॥ ३५ ॥
हे कालचक्र कलिचे समजूत गेली
आयू कमीच अन वेद नजाणि कोणी ।
प्रत्येक कल्प सरता उदरी सतीच्या
येऊनि वेद कथितो मग व्यास रूपे ॥ ३६ ॥
देवास जे असुनि शत्रु नि वेद मार्गी
राहूनिही नगर ग्राम करीत भ्रष्ट ।
बुद्धावतार धरुनी शिकवेल त्यांना
तो वेष कांहि अगळा विलसेल लोकी ॥ ३७ ॥
पाखंडि ते तिन्हिहि वर्णि कलीस अंती
होऊनि शुद्र करतील जगात राज्य ।
स्वाहा स्वधा हि नच ये स्वर कोठुनीही
तैं कल्कि होऊनि पुढे करतील राज्य ॥ ३८ ॥
सर्गी तपी नि नऊ जन्म् प्रजापतींचे
मी आणि त्या मरिचिसी हरि तोच रक्षी ।
तो धर्म विष्णु मनुदेव तसेचि राजे
तो रुद्र क्रोध वश शेष लयासि होतो ॥ ३९ ॥
जैसे धुळीस कण ते न गणीच कोनी
तैशा विभूति अवतार लिला कितेक ।
जेंव्हा त्रिविक्रमरुपा धरिले तयाने
कंपीत विश्व गमले,मग शांत झाला ॥ ४० ॥
ही सृष्टि तो रचियतो अन संहरेही
सामर्थ्य मी नि सनाकादिक जाणिती ना ।
गातो हजार मुखिचा गुण ते सदैव
ना तो तयाहि उमगे भगवंत रूप ॥ ४१ ॥
जे भार ठेवूनि मनीं भगवंत रूपा
सर्वस्व त्या पदि तया मग अर्पितात ।
जो श्वान पुत्र असला विसरूनि भाव
भक्ती करी सतत त्यासचि देव पावे ॥ ४२ ॥
त्याची अशीच सगळी नवलाव माया
जाणी अगोदरचि मी नि पुन्हा तुम्ही ती ।
पश्चात शंकर मनू ध्रुव दैत्यबाळ
प्राचीनबर्हि ऋभु ते सगळे पुन्हा की ॥ ४३ ॥
इक्ष्वाकु नी पुरुरवा मुचकुंद गाधी
मांधात नी जनक सौभरि अंबरीष ।
अलर्क नी सगर आदि दिलीप भीष्म
तै तो शिबी रघु अनू बलि रंतिदेव ॥ ४४ ॥
अर्जून नी विदुर श्रूत पराशारादी
सारस्वतादि शतधन्व बिभीषणादी ।
उत्तंक धन्व हनुमान नि उद्धवाते
ते थोर रूप प्रभुचे कळले महंता ॥ ४५ ॥
ज्यांना मिळे गुरुकृपा भगवंत दीक्षा
ते शूद्र भिल्ल अन हूण तशा स्त्रियाही ।
पापी असोत पशुपक्षिहि पार झाले
ते संत साधु तरती तई काय शंका ॥ ४६ ॥
तो शांत नी अभयसा अन ज्ञानरूपी
नाही तयास मळ तो मग भेद कैचा ।
तो सत्य नी असत पार शब्दांपरा तो
माया तयास बघुनी तशि लाजते की ॥ ४७ ॥
ते रूपची परम शांत अनंत मोदी
जे ब्रह्मरूप गमते तयि शोक नाही ।
तेथे समाहित मना करितात योगी
तो इंद्र काय उकरी जळ प्राशिण्याला ॥ ४८ ॥
कर्मास तो फलहि देइ स्वभाव जैसा
आणिक कर्म रचना करितो तसाचि ।
तत्वे निघोनि जधि जात तदाच मृत्यु
आत्मा निघोनि जरि जाय न होत नष्ट ॥ ४९ ॥
( अनुष्टुप् )
संकल्पे निर्मितो विश्व षडैश्वर्य असा हरी ।
सर्व भाव तयाचे ते परी तो भिन्न त्याहुनी ॥ ५० ॥
बोधिले भगवंताने भगवंतचि नाम हे ।
विभूती थोडक्या ऐशा पुढे तू वाढवी तया ॥ ५१ ॥
जेथे लोकास लाभेल भक्तिचे रस अमृत ।
श्रीहरीए पावतो जेणे सांगावा बोध तो जगा ॥ ५२ ॥
भगवत् शक्तिमायेचे करिती गुण गान जे ।
अथवा ऐकती कानीं तया ना मोह ही कधी ॥ ५३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ २ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|