श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १२ वा

इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - कुशाचा पुत्र झाला अतिथी. त्याचा निषध. निषधाचा नभ. नभाचा पुंडरीक आणि पुंडरीकाचा क्षेमधन्वा. क्षेमधन्वाचा देवानीक, देवानीकाचा अनीह, अनीहाचा पारियात्र. पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र वज्रनाभ. हा सूर्याचा अंश होता. (१-२)

वज्रनाभापासून खगण, खगणापासून विधृती, विधृतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला. हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता. कोसल-देशनिवासी याज्ञवल्क्य ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्मयोगाचे शिक्षण घेतले. तो योग हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता. (३-४)

हिरण्यनाभाचा पुष्य, पुष्याचा ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण, अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरू झाला. मरूने योगसाधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो. कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करील. (५-६)

मरूपासून प्रसुश्रुत, त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षणाचा जन्म झाला. अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाह्व. विश्वसाह्वाचा प्रसेनजित, प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्‌बल झाला. परीक्षिता ! या बृहद्बलाला तुझ्या पित्याने अभिमन्यूने मारले. (७-८)

इक्ष्वाकुवंशाचे इतके राजे होऊन गेले. आता येथून पुढे होणार्‍यां विषयी ऐक. बृहद्‌बलाचा पुत्र बृहद्रण. बृहद्ररणाचा उरुक्रिय, त्याचा वत्सवृद्ध, वत्सवृद्धाचा प्रतिव्योम, प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक. दिवाकाचा वीर सहदेव, सहदेवाचा बृहदश्व, बृहदश्वाचा भानुमान, भानुमालाचा प्रतीकाश्व आणि प्रतीकाश्वाचा पुत्र होईल सुप्रतीक. सुप्रतीकाचा मरुदेव, मरुदेवाचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा पुष्कर, पुष्कराचा अंतरिक्ष, अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजित होईल. अमित्रजितापासून बृहद्राज, बृहद्राजापासून बर्ही, बर्हीपासून कृतंजय, कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल. संजयाचा शाक्य, त्याचा शुद्धोद, शुद्धोदाचा लांगल, लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होईल. क्षुद्रकापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल. हे सर्वजण बृहद्‌बलाचे वंशज होतील. इक्ष्वाकूंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील. कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होऊन जाईल. (९-१६)

अध्याय बारावा समाप्त

GO TOP