|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय ३१ वा - अन्वयार्थ
श्रीभगवंतांचे स्वधामगमन - अथ - नंतर - तत्र - जेथे कृष्ण बसला होता, तेथे - ब्रह्मा, भवान्या समं भवः च, अगमत् - ब्रह्मदेव व उमेसहित शंकर प्राप्त झाला - महेंद्रप्रमुखाः देवाः - महेंद्रादि मुख्य मुख्य देव - मुनयः सप्रजेश्वराः - सनक सनंदनादि मुनि, मरीचिप्रभृति प्रजापति - पितरः सिद्धगंधर्वाः, - पितर, सिद्ध, गंधर्व, - विद्याधरमहोरगाः, - विद्याधर, शेष-तक्षकादि महानाग, - चारणाः, यक्षरक्षांसि, - चारण, यक्ष, राक्षस, - किन्नराः, अप्सरसः, द्विजाः - किन्नर, अप्सरा, गरुडादि पक्षी अथवा मैत्रेयादि ब्राह्मण - ॥१-२॥ राजन् - परीक्षिते - भगवतः - श्रीकृष्णाचे - निर्याणं द्रष्टुकामाः - निर्याण पाहण्याची लालसा धरून - परमोत्सुकाः - मोठया उत्साहाने - शौरेः जन्म कर्माणि च - श्रीकृष्णाचे अवतार व त्याच्या लीला - भक्त्या परमया युताः - अत्युत्कट भक्तिमान् होऊन - गायंतः च गृणंतः च - गात व संकीर्तन करीत आले - पुष्पवर्षाणि ववृषुः - वारंवार श्रीकृष्णावर पुष्पवृष्टि केली - विमानावलिभिः नभः संकुलं कुर्वंतः - त्यांच्या विमानांनी आकाश व्यापले होते - ॥३-४॥ विभुः भगवान् - स्वयंप्रकाश श्रीकृष्ण भगवंताने - पितामहं, आत्मनः विभूतीः (च) वीक्ष्य - ब्रह्मदेव आणि आपल्या इंद्रादि विभूति पाहिल्या - आत्मनि च आत्मानं संयोज्य - आत्मस्वरूपामध्ये आपल्या आत्म्याचा योग करून, समाधि लावून - पद्मनेत्रे न्यमीलयत् - आपले कमलनेत्र मिटले - लोकाभिरामा - सर्वांच्या नेत्रांना आनंद देणारा - धारणा-ध्यान-मंगलं - ध्यान धारणास मंगल असा - स्वतनुं - आपला देह - आग्नेय्या योगधारणया अदग्ध्वा - ‘आग्नेयी ’ नामक योगधारणेने न जाळता - स्वकं धाम - आपल्या धामाला - आविशत् - गेला - ॥५-६॥ दिवि दुंदुभयः नेदुः - देवलोकात दुंदुभि झडल्या - खात् सुमनसः पेतुः च - व आकाशातून पुष्पवृष्टि झाली - सत्यं धर्मः धृतिः कीर्तिः - आणि सत्य, धर्म, धैर्य, कीर्ति - श्रीः च तं अनु भूमेः ययुः - आणि लक्ष्मी ही सर्व पृथ्वीला सोडून कृष्णाच्या मागोमाग गेली - ॥७॥ स्वधामनि विशंतं - निजधामी प्रवेश करित असता - अविज्ञातगतिं कृष्णं न ददृशुः - अविज्ञातगति असा श्रीकृष्ण मुळीच दिसला नाही - च ब्रह्ममुख्याः देवादयः - व म्हणून सर्वज्ञ अशा ब्रह्मप्रमुख देवांना - अतिविस्मिताः - अतिशय विस्मय वाटला - ॥८॥ अभ्रमंडलं हित्वा आकाशे - अभ्रांचे मंडल सोडून आकाशामध्ये - यांत्याः सौदामन्याः गतिः - भ्रमण करणार्या विद्युल्लतेचा मार्ग - यथा मर्त्यैः न लक्ष्यते - जसा मानवास आकळिता येत नाही - तथा - त्याचप्रमाणे - कृष्णस्य दैवतैः - दैवतांसही भूलोक सोडून वैकुंठाला जाणार्या कृष्णाचा मार्ग कळला नाही - ॥९॥ तदा - नंतर - हरेः योगगतिं दृष्ट्वा विस्मिताः - श्रीहरीची योगनिपुणता पाहून विस्मय पावलेले - ते ब्रह्मरुद्रादयः तु - ते ब्रह्मरुद्रादि देव - तां प्रशंसंतः - त्या हरिनैपुण्याची कौतुकपूर्ण स्तुति करीत करीत - स्वं स्वं लोकं - आपआपल्या कैलासादि भुवनांस - ययुः - गेले - ॥१०॥ राजन - हे राजा - परस्य तनुभृत्-जनन-अप्यय-ईहाः - शरीर धारण करणार्या जीवांच्या लोकात ईश्वराच्या जन्ममरणात्मक चेष्टा - मायाविडंबनं अवेहि - म्हणजे मायामय लीला होत - यथा नटस्य - जशा नटाच्या - ना इदं सृष्ट्वा - आपण हे सर्व ब्रह्मांड उत्पन्न करून - आत्ममहिना - स्वमहिम्याने - अनुविश्य, च विहृत्य - उत्पन्न केल्यानंतर आत शिरून व तेथे विहार करून - च - आणि - अंते संहृत्य - शेवटी आपण केलेल्या विश्वाचा संहार करून - सः - तो परमात्मा - उपरतः आस्ते - स्वरूपात स्वस्थ असतो - ॥११॥ शरणदः यः मर्त्येन - शरणरक्षक अशा ज्या कृष्णाने आपल्या मर्त्यशरीरानेच - यमलोकनीतं गुरुसुतं - यमलोकी गेलेल्या गुरुपुत्राला - आनयत् - परत आणिले - त्वां च परमास्त्रदग्धं - अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रासारख्या परम अस्त्राने दग्ध झालेल्या राजा तुलाही - अंतकांतकं - अंतकाचा जो अंतक म्हणजे यम - अपि ईशं जिग्ये - त्या ईश्वरालाही बाणासुराच्या युद्धसमयी ज्याने जिंकले - मृगयुं सदेहं स्वः अनयत् - लुब्धकाला सदेह स्वर्गास पाठविले - असौ - तो हा - स्वावने अनीशः किं - स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता काय ? - ॥१२॥ अशेषस्थितिसंभवाप्ययेषु - अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ति, स्थिति आणि संहार यांचा - अनन्यहेतुः - तोच एक कर्ता करविता आहे - यत् - कारण - अशेषशक्तिधृक् - तो सर्वशक्तिचे अधिष्ठान धर्ता आहे - तथापि - असे असताही - अत्र - यालोकी - वपुः शेषितं प्रणेतुं न ऐच्छत् - शरीर ठेवण्याची इच्छा त्याने केली नाही; ते निजलोकी नेले - मर्त्येन (देहेन) किं ? - मर्त्यदेहाचा येथे काय उपयोग ? - स्वस्थगतिं - स्व=आत्मा, स्थ=निष्ठ, स्वस्थ=आत्मनिष्ठ, - प्रदर्शयन - त्यांसही मर्त्यशरीरासह स्वर्लोकास जावे असे भगवंताने दाखविले - ॥१३॥ यः प्रातः उत्थाय प्रयतः - जो प्रातःकाळी उठून व शुचिर्भूत होऊन - एतां - ह्या - कृष्णयस्य परां पदवीं भक्त्या कीर्तयेत् - पवित्र कृष्णनिर्याणाचे भक्तीने संकीर्तन करतो - तां अनुत्तमां एव आप्नोति - त्याला ही सर्वोत्तम गति मिळते - ॥१४॥ कृष्णविच्यु तः दारुकः - कृष्णविरहाने व्याकुळ झालेला दारुक - द्वारकां एत्य - द्वारकेस आला - वसुदेवोग्रसेनयोः चरणौ पतित्वा - वसुदेव व उग्रसेनाच्या पायावर लोळण घेऊन ते पाय - अस्त्रैः न्यषिंचत् - अश्रूंनी ओले कले - ॥१५॥ नृप - हे राजा - वृष्णीनां कृत्स्नशः - त्या दारुकाने यादवांचा सर्वथा - निधनं कथयामास - नाश कसा झाला हे त्यांस सांगितले - तत् श्रुत्वा - ते ऐकून - जनाः उद्विग्नहृदयाः - तेथील वृद्ध, स्त्रिया व बालके यांची हृदये फाटून गेली, - शोकविमूर्च्छिताः - ते सर्व शोकाच्या तीव्र आवेगाने मूर्च्छित पडले - ॥१६॥ कृष्णविश्लेषविव्हलाः - कृष्णविरहाने विव्हल होऊन - यत्र ज्ञातयः व्यसवः शेरते - जेथे त्यांचे ज्ञातिबंधु गतप्राण होऊन पडले होते - तत्र - तेथे - आननं घ्नंतः - तोंडे बडवितच - त्वरिताः जग्मुः स्म - त्वरित प्राप्त झाले - ॥१७॥ देवकी, रोहिणी चैव तथा वसुदेवः - देवकी, रोहिणी व त्यांचा पति वसुदेव - कृष्णरामौ सुतौ अपश्यंतः - पुत्र राम-कृष्ण जिवंत दिसले नाहीत - शोकार्ताः - त्यांचा शोक अनावर झाला, - स्मृतिं विजहुः - इतका की त्यांची स्मरणशक्ति गेली, नारदाचा उपदेश व्यर्थ झाला - ॥१८॥ भगवद्विरहातुराः - त्यांना भगवंताचा विरह असह्य होऊन - तत्र प्राणान् च विजहुः - तेथेच त्यांनी प्राणत्याग केला - तात - राजा - पतीन् उपगुह्य स्त्रियः - त्यावेळी इतर स्त्रियांनी चितांवर आरुढ होऊन - चितां आरुरुहुः - पतींची शरीरे झाकूनच टाकली - ॥१९॥ रामपत्न्यः च तद्देहं - बलरामाच्या बायकांनी बलरामाच्या शरीराला - उपगुह्य - उपगुह्य म्हणजे आलिंगन देऊन - वसुदेवपत्न्यः तद्गात्रं - वसुदेवपत्नींनी वसुदेवाचे कलेवर - हरेः स्नुषाः प्रद्युम्नादीन् - कृष्णाच्या सुनांनी प्रद्युम्नादी कृष्णपुत्रांची शरीरे - अग्निं अविशन् - अग्नीत प्रवेश केला - तदात्मिकाः - कृष्णाचे अनन्य चिंतन करून - रुक्मिण्याद्याः - कृष्णमय झालेल्या रुक्मिणीप्रभृति - कृष्णपत्न्यः अग्निं अविशन् - कृष्णजायाही-कृष्णकलेवर नव्हते तरी अग्नीत प्रविष्ट झाल्या - ॥२०॥ प्रेयसः सख्युः - आपला अति प्रियकर आणि हितकर मित्र - कृष्णस्य विरहातुरः अर्जुनः - जो कृष्ण त्याच्या विरहाने व्याकुळ झालेला जो अर्जुन, त्या अर्जुनाने - कृष्णगीतैः - श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेतील - सदुक्तिभिः - उत्तमोत्तम श्लोकांच्या चिंतनाने - आत्मानं सांत्वयामास - आपल्या मनाचे सांत्वन करून घेतले - ॥२१॥ नष्टगोत्राणां हतानां बंधूनां - ज्यांची संतति नष्ट झाली होती, वंशच्छेद झाला होता त्यांचे - यथावत् सांपरायिकं - पिंडोकादि और्ध्वदेहिक म्हणजे सांपरायिक कर्म - अर्जुनः अनुपूर्वशः कारयामास - यथासांग आणि अनुपूर्व म्हणजे यथानुक्रम अर्जुनाने करविले - ॥२२॥ महाराज - राजा - हरिणा त्यक्तां द्वारकां - हरीने टाकून दिलेली द्वारका - समुद्रः क्षणात् अप्लावयत् - समुद्राने वेळ न लावता बुडविली - श्रीमद्भगवदालयं वर्जयित्वा - श्रीमद्भगवान श्रीकृष्ण याचे मंदिर मात्र बुडविले नाही - ॥२३॥ तत्र - त्या मंदिरात - भगवान मधुसूदनः नित्यं सन्निहितः - भगवान श्रीकृष्ण सदैव विद्यमान असतोच - सर्वमंगलमंगलं - सर्व मंगल वस्तूंस मांगल्य देणारे असून - स्मृत्या अशेष-अशुभहरं - स्मरणात आले की सर्व अमंगलांचे हरण करणारे आहे - ॥२४॥ हतशेषान् स्त्रीबालवृद्धान् आदाय - संहारांतून जी मुले, स्त्रिया व वृद्ध शिल्लक राहिली होती त्यांस बरोबर घेऊन - धनंजयः इंद्रप्रस्थं समावेश्य - अर्जुन इंद्रप्रस्थास आला - तत्र वज्रं - व नंतर तेथे त्याने त्या इंद्रप्रस्थाचे राज्य वज्रनामक - अभ्यषेचयत् - यादवाला देऊन राज्याभिषेकही केला - ॥२५॥ अर्जुनात् - अर्जुनकथित - सुहृद्वधं श्रुत्वा - पांडवमित्र जे यादव त्यांचा वध झाल्याचे वर्तमान ऐकल्यावर - राजन् ते पितामहाः - राजा ! तुझे जे आजे धर्मादि त्यांनी - त्वां तु वंशधरं कृत्वा - तुलाच राज्याचा वंशाधिकारी केला - सर्वे महापथं जग्मुः - सर्व हिमालयाकडे उत्तरपंथाकडे गेले - ॥२६॥ देवदेवस्य विष्णोः - देवदेवेश्वर जो श्रीविष्णु - एतत् जन्म, कर्माणि च - त्याचे हे अवतार व लीला ह्यांचे - यः मर्त्यः - जो मानव - श्रद्धया कीर्तयेत् - श्रद्धेने संकीर्तन करील - (सः) सर्वपापैः प्रमुच्यते - तो सर्व पापांपासून मुक्तच होतो - ॥२७॥ इत्थं - या प्रकारची - भगवतः हरेः - भगवान जो श्रीविष्णु त्याची - शंतमानि - परमकल्याणकारी, परममंगल आणि परमश्रेयस्कारी - रुधिरावतारवीर्याणि, बालचरितानि च - अशी सर्व अवतारांतील पराक्रमचरित्रे व बाललीला - अन्यत्र च - ज्यांचे श्रवण अन्य ग्रंथांच्या - इह च श्रुतानि - व या भागवताच्या आधारे झाले आहे ती - मनुष्यः गृणन् - जो मनुष्य प्रेमाने गाईल - परमहंसगतौ - परमहंसाचा जो आश्रय श्रीकृष्ण - परां भक्तिं लभेत - त्याचे ठायी श्रेष्ठतम भक्ति प्राप्त होईल - ॥२८॥ अध्याय एकतिसावा समाप्त |