|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८१ वा - अन्वयार्थ
सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती - द्विजमुख्येन सह - त्या श्रेष्ठ ब्राह्मणासह - इत्थं संकथयन् - याप्रमाणे गोष्टी सांगत - सर्वभूतमनोभिज्ञः - सर्व प्राण्यांच्या मनातील अभिप्राय जाणणारा - सः हरिः - तो श्रीकृष्ण - स्मयमानः - किंचित हास्य करीत - तम् उवाच - त्याला म्हणाला ॥१॥ ब्रह्मण्यः - ब्राह्मणांचे हित करणारा - सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण - प्रेम्णा निरीक्षणेन एव खलु प्रेक्षन् - प्रेमपूर्वक निरीक्षणानेच खरोखर पहात - भगवान कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - प्रहसन् प्रियं (ब्राह्मणं आह) - हसत हसत त्या प्रिय ब्राह्मणाला म्हणाला ॥२॥ ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - भवता गृहात् मे किम् उपायनं आनीतं - तू घराहून माझ्यासाठी काय भेट आणिली आहेस - भक्तः प्रेम्णा उपाहृतं अणु अपि - भक्तांनी प्रेमाने आणिलेले थोडेही - मे भूरि एव भवेत् - मला पुष्कळ होते - अभक्तोपाहृतं भूरि अपि मे तोषाय न कल्पते - जो माझा भक्त नाही त्याने आणिलेले पुष्कळहि मला संतोष देत नाही ॥३॥ यः - जो कोणी - भक्त्या - भक्तीने - पत्रं पुष्पं फलं तोयं - पानं, फूल, फळ किंवा पाणी - मे प्रयच्छति - मला देतो - अहं प्रयतात्मनः भक्त्युपहृतं तत् अश्नामि - मी पवित्रान्तःकरणाच्या त्या भक्ताचे भक्तीने आणिलेले ते सेवितो. ॥४॥ राजन् - हे राजा - इति उक्तः द्विजः अपि - असे बोललेला तो ब्राह्मणहि - व्रीडितः अवाङ्मुखः (सन्) - लज्जेने खाली मुख करून - श्रियः पतये तस्मै - लक्ष्मीपती अशा त्या श्रीकृष्णाला - पृथुकप्रसृतिं न प्रायच्छत् - पोह्यांचा पसा देता झाला नाही. ॥५॥ सर्वभूतात्मदृक् - सर्व प्राण्यांच्या मनातील अभिप्राय जाणणारा - तस्य आगमनकारणं साक्षात् विज्ञाय - त्याच्या येण्याचे कारण प्रत्यक्ष जाणून - पुरा अयं श्रीकामः मा न अभजत् - पूर्वी हा द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने मला भजला नाही - (इति) अचिंतयन् - असे मनात आणिता झाला. ॥६॥ तु - पण - पतिव्रतायाः पत्न्याः प्रियचिकीर्षया - पतिव्रता अशा पत्नीचे प्रिय करण्याच्या इच्छेने - सखा - माझा मित्र - मां प्राप्तः - माझ्याकडे आला आहे - अस्य मर्त्यदुर्लभाः संपदः दास्यामि - ह्याला मी मनुष्यांना मिळण्यास कठीण अशी संपत्ती देईन. ॥७॥ इत्थं विचिन्त्य - असा विचार करून - द्विजन्मनः चीरबद्धान् पृथुकतण्डुलान् - ब्राह्मणाच्या जीर्ण वस्त्रात बांधलेले पोहे - किम् इदम् इति (उक्त्वा) - हे काय आहे असे म्हणून - वसनात् - वस्त्रातून - स्वयं जहार - स्वतः घेता झाला. ॥८॥ सखे - हे मित्रा - ननु - खरोखर - एतत् उपनीतं - ही भेट - मे परमप्रीणनं - मला फार आनंद देणारी आहे - अंग - हे मित्रा - एते पृथुकतण्डुलाः - हे पोहे - विश्वं मां तर्पयन्ति - विश्वस्वरूपी मला तृप्त करीत आहेत. ॥९॥ एते सकृत् मुष्टिं जग्ध्वा - असे म्हणून एकदा पोह्यांची एक मूठ भक्षण करून - द्वितीयां जग्धुं आददे - दुसरी मूठ खाण्याकरिता घेता झाला - तावत् - इतक्यात - तत्पराः श्रीः - भगवान आहे परम दैवत जीचे अशी रुक्मिणी देवी - परमेष्ठिनः हस्तं जगृहे - श्रीकृष्णाचा हात धरती झाली. ॥१०॥ विश्वात्मन् - हे जगद्रूपा श्रीकृष्णा - पुंसः - पुरुषाला - अस्मिन् अथवा अमुष्मिन् लोके - ह्या किंवा दुसर्या लोकांमध्ये - एतावता - एवढे - सर्वसंपत्समृद्धये त्वत्तोषकारणं अलं - सर्व संपत्ती मिळविण्यासाठी तुला संतुष्ट करण्यास पुरेसे आहे. ॥११॥ ब्राह्मणः तु - ब्राह्मण तर - अच्युतमन्दिरे - श्रीकृष्णाच्या मंदिरात - तां रजनी उषित्वा - ती रात्र राहून - भुक्त्वा पीत्वा - खाऊन पिऊन - यथा स्वर्गतं (तथा) आत्मानं सुखं मेने - जसे स्वर्गात सुखी असावे तसे आपण सुखी आहो असे मानिता झाला. ॥१२॥ तात - बा परीक्षिता - श्वोभूते - दुसर्या दिवशी - विश्वभावेन स्वसुखेन अभिवन्दितः - जगाचे कल्याण करणार्या व आत्मस्वरूपात रममाण होणार्या श्रीकृष्णाने वंदिलेला - पथि अनुव्रज्य - मार्गात त्याच्या मागोमाग जाऊन - (मधुरोक्तिभिः) नंदितः - गोड शब्दांनी आनंद दिलेला - (सः) स्वालयं जगाम - तो ब्राह्मण आपल्या घरी जाण्यास निघाला. ॥१३॥ तु - पण - महद्दर्शननिर्वृतः सः - थोर अशा श्रीकृष्णाच्या दर्शनाने सुखी झालेला तो ब्राह्मण - कृष्णात् धनं अलब्ध्वा - श्रीकृष्णाकडून द्रव्य न मिळविताहि - स्वयं न याचितवान् - स्वतः मागता झाला नाही - व्रीडितः (च) स्वगृहान् अगच्छत् - आणि लज्जित होऊन आपल्या घरी गेला. ॥१४॥ अहो - कितीहो - मया - मला - ब्रह्मण्यदेवस्य ब्रह्मण्यता दृष्टा - ब्राह्मणांचे हित करणार्या श्रीकृष्णाची ब्राह्मणावरील प्रीति दिसून आली - यत् - की - लक्ष्मी उरसि बिभ्रता (तेन) - लक्ष्मीला वक्षस्थलावर धारण करणार्या त्या श्रीकृष्णाने - दरिद्रतमः (अहं) आश्लिष्टः - अत्यंत दरिद्री असा मी आलिंगिला गेलो. ॥१५॥ दरिद्रः पापीयन् अहं क्व - दरिद्री व पापी असा मी कोठे - श्रीनिकेतनः कृष्णः (च) क्व - व लक्ष्मीचे निवासस्थान असा श्रीकृष्ण कोठे - अहं ब्रह्मबंधुः इति - मी ब्राह्मण मित्र असे म्हणून - बाहुभ्यां परिरम्भितः स्म - दोन बाहूंनी आलिंगिला गेलो. ॥१६॥ यथा भ्रातरः - जसे भाऊ - तथा - तसा - श्रान्तः अहं - थकलेला असा मी - प्रिया जुष्टे पर्यंके - पत्नीने सेविलेल्या पलंगावर - निवासितः - बसविला गेलो - वालव्यजनहस्तया महिष्या वीजितः - चवरीचा पंखा आहे हातात जीच्या अशा त्याच्या पटटराणीकडून वारा घातला गेलो. ॥१७॥ देवदेवेन विप्रदेवेन - देवांचाहि देव व ब्राह्मण ज्याला देव आहेत अशा श्रीकृष्णाने - पादसंवाहनादिभिः परमया शुश्रूषया - पाय चेपणे इत्यादि उत्तम सेवेच्या योगे - देववत् पूजितः - देवाप्रमाणे पूजिला गेलो. ॥१८॥ रसायां भुवि (च) - पाताळात व भूलोकी - तच्चरणार्चनं - त्या श्रीकृष्णाच्या पायांचे पूजन - पुंसां - पुरुषास - स्वर्गापवर्गयोः - स्वर्ग व मोक्ष यांच्या प्राप्तीचे - संपदां (च) - व संपत्तीचे - सर्वासां सिद्धीनाम् (च) अपि - आणि सर्व अणिमादी सिद्धींचेहि - मूलम् (अस्ति) - मूळ कारण होय. ॥१९॥ अधनः अयं - दरिद्री असा हा ब्राह्मण - धनं प्राप्य - द्रव्य मिळाल्यावर - उच्चैः माद्यात् - अत्यंत उन्मत्त होईल - मां (च) न स्मरेत् - आणि मला स्मरणार नाही - इति (विचार्य) कारुणिकः (सः) - असा विचार करून दयाळू असा श्रीकृष्ण - नूनं - खरोखर - मे अभूरि (अपि) धनं न अददात् - मला थोडेहि द्रव्य देता झाला नाही. ॥२०॥ इति तत् अन्तः चिन्तयन् - अशा प्रकारचा मनात विचार करीत - सूर्यानलेन्दुसंकाशैः विमानैः सर्वतः वृतं - सूर्य, अग्नि व चंद्र ह्यांसारख्या तेजस्वी विमानांनी सर्व बाजूंनी वेष्ठिलेल्या - निजगृहान्तिकं प्राप्तः - आपल्या घराच्या जवळ आला. ॥२१॥ कूजद्द्विजकुलाकुलैः - शब्द करणार्या पक्षिसंघांनी गजबजून गेलेल्या - प्रोत्फुल्लकुमुदा म्भोजकह्लारोत्पलवारिभिः - फुललेली आहेत कुमुदे, अंभोजे, कल्हारे व उत्पले उदकात ज्यांच्या अशा - विचित्रोपवनोद्यानैः - आश्चर्यकारक बागांनी व क्रीडास्थानांनी. ॥२२॥ च - आणि - स्वलङ्कृतैः पुम्भिः - अलंकार घातलेल्या पुरुषांनी - हरिणाक्षिभिः स्त्रीभिः (च) - आणि हरिणाप्रमाणे चंचल नेत्र असणार्या स्त्रियांनी - जुष्टं - सेविलेले - इदं स्थानं - हे स्थान - किम् कस्य वा - काय आहे व कोणाचे आहे - तत् इदं (मम स्थानं) - तेच हे माझे स्थान - इति कथम् अभूत् - असे कसे झाले ? ॥२३॥ अमरप्रभाः नराः नार्यः (च) - देवासारख्या कांतीचे पुरुष व स्त्रिया - भूयसा गीतवाद्येन - मोठया गायन वादनाने - एवं मीमांसमानं तं महाभागं - याप्रमाणे विचार करीत असलेल्या त्या भाग्यवानाला - प्रत्यगृह्णन - आदरिते झाले. ॥२४॥ आलयात् रूपिणी श्रीः इव पत्नी - कमलवनातून मूर्तिमंत लक्ष्मीप्रमाणे ती ब्राह्मणपत्नी - पतिम् आगतं आकर्ण्य - पति आलेला ऐकून - उद्धर्षा अतिसंभ्रमा - उचंबळला आहे आनंद जीचा व फारच झाली आहे धांदल जीची अशी - गृहात् तूर्णं निश्चक्राम - घरातून तत्काळ बाहेर पडली. ॥२५॥ (सा) पतिव्रता - ती पतिव्रता - पतिं दृष्टवा - पतीला पाहून - प्रेमोत्कण्ठाश्रुलोचना - प्रेम व औत्सुक्य यांमुळे अश्रूंनी भरले आहेत नेत्र जीचे अशी - मीलिताक्षी - मिटले आहेत डोळे जीने अशी - बुद्ध्या (तं) अनमत् - विचारपूर्वक त्याला नमस्कार करिती झाली - मनसा (च) परिषस्वजे - आणि मनाने आलिंगिती झाली. ॥२६॥ निष्ककण्ठीनां दासीनां मध्ये भान्तीं - सुवर्णाचे अलंकार कंठात घातलेल्या दासीच्या मध्यभागी शोभणार्या - वैमानिकीम् इव विस्फुरन्तीं - स्वर्गीय अप्सरेप्रमाणे चमकणार्या - देवी पत्नीं वीक्ष्य - तेजस्वी पत्नीला पाहून - सः विस्मितः (अभवत्) - तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. ॥२७॥ प्रीतः - प्रसन्न झालेला तो - तया युक्तः - त्या पत्नीसहित - स्वयं - स्वतः - यथा महेन्द्रभवनं - जसे इंद्राचे गृह - मणिस्तंभशतोपेतं - रत्नांच्या शंभर खांबांनी युक्त अशा - निजमन्दिरं प्रविष्टः - आपल्या वाडयात शिरला. ॥२८॥ पयःफेननिभाः शय्याः - दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र अशा शय्या - दान्ताः - हस्तिदंती - रुक्मपरिच्छदाः - सुवर्णाने भूषविलेले - पर्यंकाः - पलंग - हेमदंडानि चामरव्यजनानि च - आणि सोन्याचे दांडे असलेले पंखे व चवर्या. ॥२९॥ मृदूपस्तरणानि हैमानि आसनानि - मऊ आच्छादने घातलेली सोन्याची आसने - मुक्तादामविलम्बीनि द्युमन्ति वितानानि च - आणि मोत्यांच्या माळा ज्यांवर टांगल्या आहेत अशी चकाकणारी छते - च - आणि - महामारकतेषु स्वच्छस्फटिककुडयेषु - मोठे पाचूचे मणि जडविले आहेत ज्यांत अशा निर्मळ स्फटिकांच्या भिंतीवर - ललनारत्नसंयुतान् भ्राजमानान् रत्नदीपान् - सुंदर बाहुल्यांच्या हातांत लटकाविलेले तेजस्वी रत्नांचे दिवे. ॥३०-३१॥ तत्र - तेथे - सर्वसंपदां समृद्धीः विलोक्य - सर्व संपत्तीची विपुलता पाहून - ब्राह्मणः निर्व्यग्र - ब्राह्मण अव्यग्रपणे - अहैतुकीं स्वसमृद्धिं तर्कयामास - कारणाशिवाय मिळालेल्या आपल्या वैभवाविषयी विचार करू लागला. ॥३२॥ बत - अहो - नूनं - खरोखर - शश्वद्दरिद्रस्य दुर्भगस्य एतन्मम - नित्य दरिद्री व दुर्दैवी अशा या मला - समृद्धिहेतुः - ऐश्वर्य प्राप्त होण्याचे कारण - महाविभूतेः यदूत्तमस्य अवलोकतः अन्यः न एव उपपद्येत - मोठया प्रभावाच्या यदुश्रेष्ठ श्रीकृष्णाच्या दर्शनावाचून दुसरे असूच शकणार नाही. ॥३३॥ ननु - खरोखर - दाशार्हकाणां ऋषभः मे सखा - यादवांमध्ये श्रेष्ठ असा तो माझा मित्र कृष्ण - भूरिभोजः (सन्) - मोठा दाता असल्यामुळे - भूरि अपि (देयं) - ते पुष्कळ असेही आपले दान - स्वयं पर्जन्यवत् (अल्पं) ईक्षमाणः - स्वतः पावसाप्रमाणे थोडे मानणारा - तत् - ते - याचिष्णवे समक्षं अब्रुवाणः दिशते - याचकाला समक्ष न सांगता देतो. ॥३४॥ यत् स्वदत्तं (तत्) उरु अपि - जे स्वतः दिलेले ते पुष्कळ असताहि - किंचित् करोती - थोडे मानितो - सुहृत्कृतं फल्गु अपि भूरिकारी - मित्रांनी थोडेहि केले असले तरी पुष्कळ मानितो - (सः) प्रीतियुतः महात्मा - प्रेमाने युक्त असा तो महात्मा श्रीकृष्ण - मया उपनीतं पृथुकैकमुष्टिं प्रत्यग्रहीत् - मी भेट म्हणून नेलेल्या पोह्यांची एकच एक अशी मूठ स्वीकारिता झाला. ॥३५॥ जन्मनि जन्मनि - प्रत्येक जन्मामध्ये - तस्य एव - त्या श्रीकृष्णाचेच - मे - मला - सौहृदसख्यमैत्री दास्यं (च) - प्रेम, सख्य, मैत्री, मित्रता व दास्य - स्यात् - प्राप्त होवो - पुनः - आणखी - गुणालयेन महानुभावेन विषज्जतः (मे) - गुणांचे निवासस्थान अशा मोठया पराक्रमी श्रीकृष्णाशी आसक्ती ठेवणार्या मला - तत्पुरुषप्रसंगः (स्यात्) - त्याच्या भक्तांची संगति प्राप्त होवो. ॥३६॥ हि - कारण - विचक्षणः भगवान् अजः - सूज्ञ असा भगवान परमेश्वर - स्वयं - स्वतः - धनिनां मदोद्भवं निपातं पश्यन् - श्रीमंताना द्रव्यमदाने होणारी अधोगति पाहून - चित्राः संपदः - आश्चर्यजनक संपत्ति - राज्यं विभूतीः (च) - राज्य व ऐश्वर्ये - भक्ताय न समर्थयति - भक्ताला देत नाही - अदीर्घबोधाय - अविवेकी अशा पुरुषाला. ॥३७॥ इत्थं बुद्ध्या व्यवसितः - असे विचारपूर्वक ठरवून - जनार्दने अतीव भक्तः (सः) - भगवंताची अत्यंत भक्ति करणारा तो ब्राह्मण - नातिलंपटः (सन्) - अत्यंत विषयलोलुप न होता - विषयान् त्यक्ष्यन् - हळूहळू विषयत्याग करीत - जायया (तान्) बुभुजे - स्त्रीसह ते विषय सेवू लागला. ॥३८॥ ब्राह्मणाः - ब्राह्मण - तस्य वै देवदेवस्य यज्ञपतेः प्रभोः हरेः - त्याच देवाधिदेव यज्ञाधिपति व सर्वसमर्थ अशा श्रीकृष्णाचे - प्रभवः (सन्ति) - दैवत होत - तेभ्यः परं (तस्य) दैवतं न विद्यते - त्या ब्राह्मणाहून दुसरे त्याचे दैवत नाही. ॥३९॥ एवं भगवत्सुहृत् सः विप्रः - याप्रमाणे भगवंताचा मित्र असा तो ब्राह्मण - तदा - त्यावेळी - अजितं स्वभृत्यैः पराजितं दृष्टवा - अजिंक्य अशा श्रीकृष्णाला भगवद्भक्तांनी जिंकिलेला पाहुन - तद्ध्यानवेगोद्ग्रथितात्मबन्धनः - भगवंताच्या तीव्र ध्यानाने तुटली आहेत आत्म्याची बंधने ज्याच्या असा - सतां गतिं तद्धाम अचिरतः लेभे - सज्जनांचा आश्रय असे भगवंताचे स्थान लवकर मिळविता झाला. ॥४०॥ नरः - मनुष्य - एतत् (आख्यानम्) ब्रह्मण्यदेवस्य ब्रह्मण्यतां श्रुत्वा - हे आख्यान म्हणजे ब्राह्मणरक्षक अशा श्रीकृष्णाचे ब्राह्मणांवरील प्रेम वर्णन करणारे कथानक ऐकून - भगवति लब्धभावः - भगवंताच्या ठिकाणी उत्पन्न झाली आहे भक्ति ज्याला असा - कर्मबन्धात् विमुच्यते - कर्मबंधापासून मुक्त होतो. ॥४१॥ एक्याऐंशीवा अध्याय समाप्त |