|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३५ वा - अन्वयार्थ
युगलगीत - कृष्णे वनं याते - श्रीकृष्ण वनात गेला असता - तं अनुद्रुचेतसः गोप्यः - त्याच्या मागून गेली आहेत मने ज्यांची अशा गोपी - कृष्णलीलाः प्रगायन्त्यः - श्रीकृष्णाच्या लीला मोठ्याने गात - दुःखेन वासरान् निन्युः - दुःखाने दिवस घालवित्या झाल्या ॥१॥ गोप्यः - गोपींनो - वामबाहुकृतवामकपोलः - डाव्या हातावर ठेविला आहे डावा गाल ज्याने असा - वल्गितभ्रुः - चंचल आहेत भुवया ज्याच्या असा - मुकुन्दः - श्रीकृष्ण - कोमलाङ्गुलिभिः - कोमल अशा अंगुलींनी - आश्रितमार्गं - आश्रय केलेला आहे छिद्रांचा जिच्या अशी - अधरार्पितवेणुं - खालच्या ओठाशी लाविलेली मुरली - यत्र ईरयति - जेव्हा वाजवितो - सिद्धैः सह - सिद्धांसह - व्योमयानवनिताः - आकाशात विमानांतून फिरणार्या देवस्त्रियाही - तत् उपधार्य - ते ऐकून - विस्मिताः - आश्चर्यचकित झालेल्या - काममार्गणसमर्पितचित्ताः - मदनाच्या बाणांना अर्पण केले आहे चित्त ज्यांनी अशा - अपस्मृतनीव्यः - विसरली गेली आहेत कमरेची वस्त्रे ज्यांच्याकडून अशा - सलज्जाः (भूत्वा) - लज्जेने युक्त होऊन - कश्मलं ययुः - मोहाला प्राप्त झाल्या ॥२-३॥ हन्त अबलाः - अहो स्त्रियांनो - इदं चित्रं शृणुत - हा चमत्कार ऐका - हारहासः - माळेप्रमाणे शुभ्र आहे हास्य ज्याचे असा - उरसि स्थिरविद्युत् - वक्ष स्थलाच्या ठिकाणी स्थिर आहे लक्ष्मी ज्याच्या असा - आर्तजनानां नर्मदः - दुःखी जनांना सुख देणारा - अयं नन्दसूनुः - हा नंदाचा पुत्र - यर्हि - जेव्हा - कूजितवेणुः (भवति) - वाजविली आहे मुरली ज्याने असा होतो ॥४॥ वेणुवाद्यहृतचेतसः - वेणुवाद्याने हरण केली आहेत मने ज्यांची अशा - वृन्दशः (स्थिताः) - कळपाकळपाने असलेल्या - दन्तदष्टकवलाः - दातांनी चावला आहे घास ज्यांनी अशा - धृतकर्णाः - उभारले आहेत कान ज्यांनी अशा - व्रजवृषाः मृगगावः (च) - गोकुळातील बैल, हरिण व गाई - आरात् - दुरून - लिखितचित्रं इव - काढलेल्या चित्राप्रमाणे - निद्रिताः (इव) आसन् - जणू निजलेल्या अशा राहिल्या ॥५॥ आलि - हे सखे - कर्हिचित् - एखादे वेळी - बर्हिणस्तबकधातुपलाशैः - मोराच्या पिसांचा गुच्छ, काव व पळसाची फुले यांनी - बद्धमल्लपरिबर्हविडम्बः - केले आहे मल्लाच्या सामग्रीचे अनुकरण ज्याने असा - सबलः - बळरामासह - गोपैः (सह) - गोपांसह - सः मुकुन्दः - तो श्रीकृष्ण - यत्र - जेव्हा - गाः समाह्वयति - गाईंना बोलवितो ॥६॥ तर्हि - त्या वेळी - वयं इव - आम्हाप्रमाणेच - अबहुपुण्याः सरितः - नाही आहे फारसे पुण्य ज्याचे अशा नद्या - अनिलनीतं - वार्याने नेलेल्या - तत्पदरजः स्पृहयतीः - त्याच्या पायधुळीची इच्छा करणार्या अशा - भग्नगतयः - थांबला आहे वेग ज्यांचा अशा - प्रेमवेपितभुजः - प्रेमाने कापत आहेत हात ज्यांचे अशा - स्तिमितापः - स्तब्ध आहे उदक ज्यांचे अशा ॥७॥ अनुचरैः - अनुचरांनी - समनुवर्णितवीर्यः - उत्तमप्रकारे वर्णन केले आहेत पराक्रम ज्याचे असा - आदिपूरूषः इव अचलभूतिः - आदिपुरुषाप्रमाणे अचल आहे ऐश्वर्य ज्याचे असा - वनचरः सः - वनात फिरणारा असा तो - यदा हि - जेव्हा खरोखर - गिरितटेषु चरन्तीः गाः - डोंगराच्या उतरणीवर चरणार्या गाईंना - आह्वयति - बोलवितो ॥८॥ प्रणतभारविटपाः - वाकलेल्या व भारावलेल्या आहेत शाखा ज्यांच्या अशा - प्रेमहृष्टतनवः - प्रेमाने आनंदित झाली आहेत शरीरे ज्यांची अशा - वनलताः - वनातील वेली - आत्मनि विष्णुं - आपल्या ठिकाणी श्रीविष्णुला - व्यञ्जयन्त्यः इव - जणु काय व्यक्त करीत - पुष्पफलाढ्याः - फुलांनी व फळांनी भरलेल्या - मधुधाराः ससृजुः स्म - मधाच्या धारा सोडित्या झाल्या - (तथा एव) तरवः (अपि) - त्याप्रमाणे वृक्षहि ॥९॥ दर्शनीयतिलकः - पहाण्यासारखा आहे टिळा ज्याचा असा - वनमालादिव्यगन्धतुलसीमधुमत्तैः - वनमाळेतील स्वर्गीय सुवासाच्या तुळशीच्या मधाने माजलेल्या - अलिकुलैः - भुंग्यांच्या समुदायांनी - अभीष्टं - अत्यंत प्रिय असे - अलघु - लहान नव्हे असे - गीतं आद्रियन् - गाणे आदराने ऐकत - श्रीकृष्णः - श्रीकॄष्ण - यर्हि - जेव्हा - (अधरे) संधितवेणुः (भवति) - ओठाला लाविली आहे मुरली ज्याने असा होतो - हन्त - अहो - चारुगीतहृतचेतसः - सुंदर गाण्याने हरण केली आहेत मने ज्यांची असे - सरसि - सरोवरातील - सारसहंसविहगाः - सारस, हंस व इतर पक्षी - (ततः) एत्य - तेथे येऊन - यतचित्ताः - स्वाधीन केले आहे मन ज्यांनी असे - मीलितदृशः - मिटले आहेत डोळे ज्यांनी असे - धृतमौनाः - धरिले आहे मौन ज्यांनी असे - हरिम् उपासते - श्रीकृष्णाची उपासना करतात ॥१०-११॥ व्रजदेव्यः - हे गोकुळवासी स्त्रियांनो - क्षितिभृतः सानुषु - पर्वताच्या शिखरावर - सहबलः - बळरामासह - स्रगवतंसविलासः - माळांचे तुरे हेच आहेत योग्य भूषण ज्याचे असा - जातहर्षः - झाला आहे आनंद ज्याला असा - हर्षयन् - आनंद देत - यर्हि - जेव्हा - वेणुरवेण विश्वं उपरम्भति - मुरलीच्या शब्दाने जग दुमदूमून टाकतो. ॥१२॥ महदतिक्रमणशङ्कितचेताः मेघः - थोर अशा कृष्णाच्या उल्लंघनाने भीतियुक्त झाले आहे मन ज्याचे असा मेघ - मन्दंमन्दं अनुगर्जति - हळूहळू प्रतिध्वनि करतो - च - आणि - छायया प्रतपत्रं विदधत् (सन्) - छायेच्या योगाने छत्र करीत - सुमनोभिः सुहृदं अभ्यवर्षत् - मित्र जो कृष्ण त्यावर फुलांचा वर्षाव करता झाला.॥१३॥ सति - हे साध्वी - विविधगोपचरणेषु विदग्धः - निरनिराळ्या गोपांच्या खेळांमध्ये चतुर असा - तव सुतः - तुझा मुलगा - यदा - जेव्हा - अधरबिम्बे दत्तवेणुः - अधरोष्ठावर ठेविली आहे मुरली ज्याने असा - वेणुवाद्ये उरुधा - वेणुवाद्यावर निरनिराळ्या प्रकारांनी - निजशिक्षाः स्वरजातीः अनयत् - स्वतःच अभ्यासिलेले असे स्वरांचे आलाप काढतो. ॥१४॥ शक्रशर्वपरमेष्ठिपुरोगाः - इंद्र, शंकर, ब्रह्मदेव हे आहेत प्रमुख ज्यांमध्ये असे - सवनशः (स्थिताः) - समूहासमूहाने असलेले - सुरेशाः - श्रेष्ठ देव - तत् उपाकर्ण्य - ते ऐकून - कवयः (अपि) - सर्वज्ञ असे असताहि - अनिश्चिततत्त्वाः (सन्तः) - निश्चित नाही तत्त्व ज्यांचे असे होत्साते - कश्मलं ययुः - मोहाला प्राप्त होतात. ॥१५॥ ध्वजवज्रनीरजांकुशविचित्रललामैः - ध्वज, वज्र, कमल व अंकुश यांच्या योगाने विचित्र आहे सौंदर्य ज्यांचे अशा - निजपदाब्जदलैः - आपल्या चरणरूपी कमळांच्या पाकळ्यांनी - व्रजभुवः खुरतोदं शमयन् - गोकुळातील भूमीचे खुरांपासून झालेले दुःख शांत करीत - वर्ष्मधुर्यगतिः - शरीराची हत्तीसारखी आहे चाल ज्याची असा - ईडितवेणुः - वाजविली आहे मुरली ज्याने असा - (यदा) व्रजति - जेव्हा जाऊ लागतो - तेन - त्यामुळे - सविलासवीक्षणार्पितमनोभववेगाः - विलासांनी युक्त अशा पाहण्याने उत्पन्न केला आहे मदनाचा वेग ज्यांच्या ठिकाणी अशा - वयं - आम्ही - कुजगतिं गमिताः - वृक्षाच्या अवस्थेला नेलेल्या अशा - कबरं वसनं वा - केशपाशाला किंवा वस्त्राला - न विदाम - जाणत नाही. ॥१६-१७॥ क्वचित् - एखादे वेळी - मणिधरः - रत्ने धारण करणारा असा - गाः आगणयन् - गाई मोजणारा असा - दयितगन्धतुलस्याः मालया (युक्तः) - आवडत्या सुवासिक तुळशीच्या माळेने युक्त असा - प्रणयिनः अनुचरस्य अंसे भुजंप्रक्षिपन् - प्रिय सोबत्याच्या खांद्यावर हात ठेवीत - यत्र कदा - जेव्हा केव्हा - अगायत - गातो - क्वणितवेणुरववञ्चितचित्ताः - वाजविलेल्या मुरलीच्या शब्दाने मोहून गेली आहेत मने ज्यांची अशा - कृष्णगृहिण्यः हरिण्यः - काळविटांच्या स्त्रिया हरिणी - गुणगणार्णं कृष्णं अनुगत्य - गुणसमुदायांचा समुद्र अशा श्रीकृष्णाच्या मागे जाऊन - (वयं) गोपिकाः इव - आम्हा गोपींप्रमाणेच - विमुक्तगृहाशाः - सोडिली आहे घराची आशा ज्यांनी अशा - (तम्) अन्वसत - त्याच्या जवळ राहत्या झाल्या. ॥१८-१९॥ अनघे - हे निष्पाप यशोदे - कुन्ददामकृतकौतुकवेषः - कुंदपुष्पांच्या माळांनी केला आहे आश्चर्यकारक वेष ज्याने असा - गोपगोधनवृतः - गोपांनी व गोधनांनी वेष्टिलेला - तव वत्सः - तुझा मुलगा - नन्दसूनुः - नंदपुत्र - प्रणयिनां नर्मदः (सन्) - स्नेह्यांची थट्टा करीत - यमुनायां विजहार - यमुनेवर क्रीडा करतो. ॥२०॥ मन्दवायुः - सौम्य असा वायु - मलयजस्पर्शे न (तं) मानयन् - मलय पर्वतावर उत्पन्न होणार्या चंदनाच्या स्पर्शाने त्याचा सन्मान करीत - अनुकूलं उपवाति - हितकारक अशा रीतीने वाहतो - ये उपदेवगणाः (आसन् ते) - जे गंधर्वादि गौण असे देव होते ते - बन्दिनः इव - स्तुतिपाठकांप्रमाणे - वाद्यगीतबलिभिः - वाद्यांनी, गाण्यांनी व पूजासाहित्यांनी - (तं) परिवव्रुः - त्याला चोहोकडून भजते झाले. ॥२१॥ यत् (सः) अगध्रः (जातः तत्) - ज्याअर्थी श्रीकृष्ण पर्वत धारण करणारा झाला त्याअर्थी - व्रजगवां वत्सलः - गोकुळातील गाईविषयी दयाळू असा - पथि वृद्धैः वंद्यमानचरणः - मार्गात वृद्धांनी वंदिले आहेत चरण ज्याचे असा - गीतवेणुः - वाजविली आहे मुरली ज्याने असा - अनुगेडितकीर्तिः - सोबत्यानी स्तविली आहे कीर्ति ज्याची असा - दिनान्ते - सायंकाळी - कृत्स्नगोधनम् उपोह्य - सगळ्या गाईंना गोळा करून. ॥२२॥ श्रमरुचा अपि दृशींना उत्सवं उन्नयन् - श्रमांनी युक्त अशा कांतीनेहि नेत्रांचा आनंद वाढविणारा - खुररजश्छुरितस्रक् - खुरांच्या धुळीने मलिन झाली आहे माळ ज्याची असा - सुहृदाशिषः - मित्रांच्या इच्छेला - दित्सया - पुरविण्याच्या इच्छेमुळे - देवकी जठरभूः - देवकीच्या उदरी उत्पन्न झालेला - एषः उडुराजः एति - हा चंद्र येत आहे. ॥२३॥ ईषत् मदविधूर्णितलोचनः - थोडेसे मदाने फिरत आहेत डोळे ज्याचे असा - स्वसुहृदांमानदः - आपल्या मित्रांना मान देणारा - वनमाली - वनमाला धारण करणारा - कनककुण्डललक्ष्म्या गण्डं मण्डयन् - सोन्याच्या कुंडलांच्या शोभेने गालाला भूषविणारा - चंदरपाण्डुवदनः - बोरासारखे पांढर्या वर्णाचे आहे मुख ज्याचे असा. ॥२४॥ द्विरदराजविहारः - हत्तींच्या राजाप्रमाणे आहे क्रीडा ज्याची असा - यामिनीपतिः इव मुदितवक्त्रः - चंद्राप्रमाणे आहे आनंदी मुख ज्याचे असा - एषः - हा - यदुपतिः - यादव श्रेष्ठ कृष्ण - व्रजगवांदुरन्तं - गोकुळातील गाईंना दिवसा झालेला - दिनतापं मोचयन् - जो अत्यंत ताप तो नाहीसा करीत - दिनान्ते उपयाति - सायंकाळी जवळ येत आहे. ॥२५॥ राजन् - हे राजा - एवं - याप्रमाणे - तच्चित्ताः - त्याच्याकडे लागले आहे चित्त ज्यांचे अशा - तन्मनस्काः - त्याच्याकडेच आहे मन ज्यांचे अशा - (ताः) महोदयाः व्रजस्त्रियः - त्या भाग्यशाली गोकुळवासी स्त्रिया - कृष्णलीलानुयतीः - श्रीकृष्णाच्या लीला सतत गात - अहःसु (अपि) रेमिरे - दिवसाही आनंद पावल्या. ॥२६॥ अध्याय पस्तीसावा समाप्त |