श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३४ वा - अन्वयार्थ

सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार -

एकदा - एके दिवशी - देवयात्रायां जातकौतुकाः - देवाच्या यात्रेविषयी झाली आहे इच्छा ज्यांना असे - ते गोपालाः - ते गोप - अनडुद्युक्तैः अनोभिः - बैल जुंपिलेल्या गाडयांनी - अम्बिकावनं प्रययुः - अंबिकेच्या वनात गेले. ॥१॥

नृप - हे राजा - ते - ते - तत्र - त्याठिकाणी - सरस्वत्यां स्नात्वा - सरस्वती नदीत स्नान करून - देवं विभुं पशुपतिम् - तेजस्वी व सर्वशक्तिमान अशा शंकराला - च - आणि - देवीं आम्बिकां - देवी अंबिकेला - अर्हणैः - पूजासाहित्यांनी - भक्त्या आनर्चुः - भक्तीने पूजिते झाले. ॥२॥

आदृताः (ते) सर्वे - आदरयुक्त झालेले ते सर्व लोक - देवः नः प्रीयतां - देव आपल्यावर संतुष्ट व्हावा - इति - म्हणून - ब्राह्मणेभ्यः - ब्राह्मणांना - गावः हिरण्यवासांसि - गाई, सुवर्ण, वस्त्रे - मधु मध्वन्नं च - आणि गोड असे मधमिश्रित अन्न - ददुः - देते झाले. ॥३॥

धृतव्रताः - धरिले आहे व्रत ज्यांनी - महाभागाः - असे महाभाग्यवान - नन्दसुनन्दकादयः (गोपालाः) - नंद, सुनंद इत्यादि गोप - जलं प्राश्य - पाणी पिऊन - तां रजनीं - त्या रात्री - सरस्वतीतीरे - सरस्वती नदीच्या तीरावर - ऊषुः - राहिले. ॥४॥

तस्मिन् विपिने - त्या अरण्यात - अतिबुभुक्षितः - अत्यंत भुकेलेला - यदृच्छया आगतः उरगः - सहजी आलेला उराने सरपटत जाणारा - कश्चित् महान् अहिः - कोणी एक मोठा सर्प - शयानं नन्दं अग्रसीत् - निजलेल्या नंदाला गिळता झाला. ॥५॥

अहिना ग्रस्तः सः - सर्पाने गिळलेला तो - कृष्णकृष्ण - हे कृष्णा हे कृष्णा - अयं महान् अहिः मां ग्रसते - हा मोठा सर्प मला गिळीत आहे - तात - हे बाळा - (त्वां) प्रपन्नं (मां) परिमोचय - तुला शरण आलेल्या मला सोडव - (इति) चुक्रोश - असे ओरडला. ॥६॥

तस्य आक्रन्दितं श्रुत्वा सहसा उत्थिताः - त्याचे ओरडणे ऐकून एकाएकी उठलेले - च - आणि - (तं) ग्रस्तं दृष्ट्वा बिभ्रान्ताः - त्याला गिळलेला पाहून घाबरलेले असे - (ते) गोपालाः - ते गोप - उल्मुकैः (तं) सर्पं विव्यधुः - कोलितांनी त्या सर्पाला टोचिते झाले. ॥७॥

उरङगमः - सर्प - अलातैः दह्यमानः अपि - कोलितांनी पोळला जात असतांहि - तं न अमुञ्चत् - त्याला सोडता झाला नाही - भगवान सात्वतां पतिः - भगवान श्रीकृष्ण - अभ्येत्य - जवळ जाऊन - तं पदा अस्पृशत् - त्याला पायाने स्पर्श करिता झाला. ॥८॥

भगवतः - श्रीकृष्णाच्या सुंदर अशा - श्रीमत्पादस्पर्शाहताशुभः - पायाच्या स्पर्शाने नष्ट झाली आहेत पातके ज्याची असा - सः - तो - सर्पवपुः हित्वा - सर्प शरीर टाकून - विद्याधरार्चितं रूपं भेजे - विद्याधरांनी पूजिलेले असे रूप धरिता झाला. ॥९॥

हृषीकेशः - श्रीकृष्ण - दीप्यमानेन वपुषा समुपस्थितम् - तेजस्वी अशा शरीराने पुढे उभा राहिलेल्या - प्रणतम् - अत्यंत नम्र झालेल्या - हेममालिनं - सोन्याच्या माळा धारण करणार्‍या - तं पुरुषं - त्या पुरुषाला - अपृच्छत् - विचारिता झाला. ॥१०॥

(यः) परया लक्ष्‌म्‌या रोचते - जो श्रेष्ठ अशा सौंदर्याने शोभत आहे - अद्‌भुतदर्शनः - आश्चर्यकारक आहे स्वरूप ज्याचे असा - भवान् कः (अस्ति) - तू कोण आहेस - वा - आणि - अवशः (सन्) - पराधीन होऊन - जुगुप्सितां एतां गतिम् - निंद्य अशा या स्थितीला - कथं प्रापितः - कसा नेला गेलास. ॥११॥

अहं - मी - सुदर्शनः इति विश्रुतः - सुदर्शन या नावाने प्रसिद्ध असलेला - कश्चित् विद्याधरः (अस्मि) - कोणी एक विद्याधर आहे - श्रिया स्वरूपसम्पत्या (उपलक्षितः) - धनाने व स्वरूपाच्या सौंदर्याने युक्त असा - विमानेन दिशः आचरन् - विमानाने सर्व दिशांनी फिरणारा - रूपदर्पितः (सन्) - रूपाने गर्वयुक्त होत्साता - विरूपान् अङगिरसः ऋषीन् - रूपहीन अशा अंगिरस ऋषींना - प्राहसम् - हसलो - प्रलब्धैः तैः - निंदिलेल्या त्याजकडून - स्वेन पाप्मना - स्वतःच्या पापामुळे - इमां योनिं प्रापितः (अस्मि) - ह्या योनीला आणिला गेलो. ॥१२-१३॥

करुणात्मभिः तैः - दयाळू आहे अंतःकरण ज्यांचे अशा त्यांनी - (मम) अनुग्रहाय एव - माझ्यावर कृपा करण्यासाठीच - मे शापः कृतः - मला शाप दिला - यत् - कारण - लोकगुरुणा (त्वया) - सर्व लोकांचा गुरु अशा तुझ्याकडून - पदा स्पृष्टः अहं - पायाने स्पर्शिला गेलेला मी - हताशुभः (अभवम्) - नाहीशी झाली आहेत पातके ज्याची असा झालो. ॥१४॥

अमीवहन् - हे पापनाशका श्रीकृष्णा - (तव) पादस्पर्शात् - तुझ्या पायाच्या स्पर्शामुळे - शापानिर्मुक्तः अहम् - शापातून मुक्त झालेला मी - भवभीतानां प्रपन्नानाम् (भूतानां) - संसाराला भिऊन शरण आलेल्या प्राण्यांचे - भयापहं त्वा - भय नाहीसे करणार्‍या तुला - आपृच्छ - अनुज्ञा विचारितो. ॥१५॥

महायोगिन् - हे महायोग्या - महापुरुष - महापुरुषा - सत्पते - हे सज्जनांच्या पालका - अहं प्रपन्नः अस्मि - मी शरण आलो आहे - देवः - हे देवा - सर्वलोकेश्वरेश्वर - हे सर्व लोकांतील ईश्वरांच्याहि ईश्वरा - मां अनुजानीहि - मला अनुज्ञा दे. ॥१६॥

अच्युत - हे श्रीकृष्णा - अहं - मी - ते दर्शनात् - तुझ्या दर्शनामुळे - सद्यः - तत्काळ - ब्रह्मदण्डात् विमुक्तः (अस्मि) - ब्राह्मणाच्या शापापासून मुक्त झालो आहे - यन्नाम गृण्हन् (मनुष्यः) - ज्याचे नाव घेणारा मनुष्य - आत्मानं - स्वतःला - च - आणि - अखिलान् श्रोतृन् एव - सर्व श्रोत्यांनाही - सद्यः पुनाति - तत्काळ पवित्र करतो - तस्य ते पदा स्पृष्टः हि (अहं) - त्या तुझ्या पायाने खरोखर स्पर्शिलेला मी - किं भूयः (वक्तव्यम्) - काय पुनः सांगावयास पाहिजे. ॥१७॥

इति - याप्रमाणे - दाशार्हं अनुज्ञाप्य - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन - (तं) परिक्रम्य - त्याला प्रदक्षिणा घालून - च - आणि - अभिवंद्य - नमस्कार करून - सुदर्शनः दिवं यातः - सुदर्शन स्वर्गास गेला - च - आणि - नन्दः कृच्छ्‌रात् मोचितः - नंद संकटापासून सोडविला गेला. ॥१८॥

नृप - हे राजा - ततः - मग - कृष्णस्य तत् आत्मवैभवं निशाम्य - श्रीकृष्णाचे ते स्वतःचे सामर्थ्य पाहून - विस्मितचेतसः - आश्चर्याने युक्त आहेत मने ज्यांची - व्रजौकसः - असे झालेले गोकुळवासी लोक - नियमं समाप्य - व्रत संपवून - तस्मिन् आदृताः - त्याच्या ठिकाणी आदरयुक्त झालेले - तत् कथयन्तः - ते वर्णन करीत - पुनः व्रजं आययुः - पुनः गोकुळास आले. ॥१९॥

अथ - नंतर - कदाचित् - एकदा - अद्‌भुतविक्रमः - आश्चर्यकारक आहे पराक्रम ज्यांचा - रामः गोविन्दः च - असे बळराम व श्रीकृष्ण - व्रजयोषितां मध्यगौ (भूत्वा) - गोकुळवासी स्त्रियांमध्ये जाऊन - रात्र्यां - रात्रीच्या वेळी - वने विजह्रतुः - वनात विहार करते झाले. ॥२०॥

बद्धसौहृदैः स्त्रीजनैः - बांधिले आहे प्रेम ज्यांनी अशा स्त्रियांकडून - ललितं उपगीयमानौ - मनोहर रीतीने गायिले जाणारे - स्वलङ्‌कृतानुलिप्ताङगौ - अलंकार धारण केलेली व उटयांनी माखलेली आहेत शरीरे ज्यांची असे - स्रग्विणौ - माळा धारण केलेले - विरजाऽम्बरौ - निर्मळ आहेत वस्त्रे ज्यांची असे. ॥२१॥

उदितोडुपतारकं - उदय पावला आहे नक्षत्र नायक चंद्र आणि तारे ज्यामध्ये अशा - मल्लिकागन्धमतालिजुष्टं - मोगर्‍यांच्या सुवासाने माजलेल्या भुंग्यांनी सेविलेल्या - कुमुदवायुना (युक्तं) - कमळांवरील वार्‍याने युक्त असलेल्या - निशामुखं मानयन्तौ - संध्याकालचे गौरवयुक्त वर्णन करीत. ॥२२॥

युगपत्स्वरमण्डलमूर्छितम् कल्पयन्तौ - एकाच वेळी स्वरसमूहांचा आरोहावरोह योजणारे - तौः - ते दोघे - सर्व भूतानां मनःश्रवणमङगलं - सर्व प्राण्यांच्या मनाला व कानांना मंगलकारक असे - जगतुः - गाते झाले. ॥२३॥

नृप - हे राजा - गोप्यः - गोपी - तत् गीतं आकर्ण्य - ते गाणे ऐकून - मूर्छिताः - मोहित झाल्या - ततः - त्यामुळे - स्रंसद्दुकूलं - गळत आहे रेशमी वस्त्र ज्यांचे अशा - स्रस्तकेशस्रजं - गळून पडला आहे केसावरील गजरा ज्यांच्या अशा - आत्मानं - स्वतःला - न अविन्दन् - जाणत्या झाल्या नाहीत. ॥२४॥

एवं तयोः विक्रीडतोः - याप्रमाणे ते दोघे क्रीडा करीत असता - संप्रमत्तवत् स्वैरं गायतोः - उन्मत्तासारखे स्वैरपणे गात असता - शंखचूडः इति ख्यातः - शंखचूड नावाने प्रसिद्ध असलेला - धनदानुचरः - कु्बेराचा सेवक - अभ्यगात् - जवळ आला. ॥२५॥

राजन् - हे राजा - अशङ्कितः (सः) - भीतिरहित असा तो - तयोः निरीक्षतोः - ते दोघे रामकृष्ण निरखून पाहत असता - तन्नाथं - तेच आहेत रक्षणकर्ते ज्याचे - क्रोशन्तं प्रमदाजनं - अशा आक्रोश करणार्‍या स्त्रीसमूहाला - उत्तरांदिशि - उत्तर दिशेकडे - कालयामास - पळविता झाला. ॥२६॥

कृष्णराम - हे कृष्णा, हे बळरामा - इतिक्रोशन्तं स्वपरिग्रहं - असा आक्रोश करणार्‍या आपल्या स्त्रियांना - यथा दस्युना ग्रस्ताः गाः (तथा) - जशा वाघाने पीडिलेल्या गाई तशा - विलोक्य - पाहून - भ्रातरौ अन्वधावताम् - दोघे भाऊ धावले. ॥२७॥

मा भैष्टइति - भिऊ नका असा - अभयारावौ - अभयाचा आहे शब्द ज्यांचा असे - शालहस्तौ - शालवृक्ष आहेत हातात ज्यांच्या असे - तरस्विनौ (तौ) - वेगाने जाणारे ते दोघे - तं त्वरितं गुह्यकाधमं - त्या पळणार्‍या दुष्ट यक्षाला - तरसा आसेदतुः - त्वरेने गाठते झाले. ॥२८॥

कालमृत्यू इव - काळ व मृत्यू यांप्रमाणे - अनुप्राप्तौ तौ वीक्ष्य - मागून आलेल्या त्या दोघांना पाहून - (सः) मूढः - तो मूर्ख - उद्विजन् - भीतीने - स्त्रीजनं विसृज्य - स्त्रीसमूहाला सोडून - जीवितेच्छया प्राद्रवत् - प्राण वचविण्याच्या इच्छेने पळून गेला ॥२९॥

तच्छिरोरत्‍नं - त्याच्या मस्तकावरील रत्‍न - जिहीर्षुः गोविन्दः - घेऊ इच्छिणारा श्रीकृष्ण - सः यत्र यत्र धावति - तो यक्ष ज्या ज्या ठिकाणी धावे - तं अन्वधावत् - त्याचा पाठलाग करीत धावला - बलः स्त्रियः रक्षन् तस्थौ - बळराम स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी राहिला ॥३०॥

अङ्ग - हे राजा - विभुः - श्रीकृष्ण - अविदूरे इव अभ्येत्य - त्याला जवळच गाठून - मुष्टिना एव - एका मुटक्यानेच - तस्य दुरात्मनः - त्या दुष्टाचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - (तेन) सह चूडामणिं च - आणि मस्तकासह त्यावरील रत्‍नहि ॥३१॥

कृष्णः - श्रीकृष्ण - योषितां पश्यन्तीनां - स्त्रिया पहात असता - शङ्खचूडं एवं निहत्य - शंखचूडाला अशा रीतीने ठार मारून - भास्वरं मणिं आदाय - तेजस्वी मणि घेऊन - प्रीत्या (तं) अग्रजाय अददत् - प्रेमाने तो वडील भावाला देता झाला ॥३२॥

अध्याय चवतीसावा समाप्त

GO TOP