|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३२ वा - अन्वयार्थ
भगवंतांकडून गोपींचे सांत्वन - राजन् - हे राजा - कृष्णदर्शनलालसाः गोप्यः - श्रीकृष्णाच्या भेटीसाठी उत्सुक अशा गोपी - इति - याप्रमाणे - प्रगायन्त्यः - गात - च - आणि - चित्रधा प्रलपन्त्यः - अनेक प्रकारांनी विलाप करीत - सुस्वरं रुरुदुः - मधुर स्वराने रडल्या. ॥१॥ स्मयमानमुखाम्बुजः - हसणारे आहे मुखकमळ ज्याचे असा - पीताम्बरधरः - पिवळे वस्त्र धारण करणारा - स्रग्वी - माळ घातलेला - साक्षात् मन्मथमन्मथः - प्रत्यक्ष मदनाला मोह पाडणारा - शौरिः - श्रीकृष्ण - तासां (पुरः) - त्या गोपींच्या पुढे - आविः अभूत् - प्रकट झाला. ॥२॥ तं प्रेष्ठं आगतं विलोक्य - त्या अत्यंत प्रियकराला आलेला पाहून - प्रीत्युत्फुल्लदृशः - प्रेमाने फुलले आहेत नेत्र ज्यांचे - (ताः) सर्वाः अबलाः - अशा त्या सर्व स्त्रिया - प्राणं आगतं तन्वः इव - प्राण आला असता जशी शरीरे तशा - युगपत् उत्तस्थु - एकदम उभ्या राहिल्या. ॥३॥ काचित् - कोणीएक स्त्री - मुदा - आनंदाने - शौरेः कराम्बुजम् - श्रीकृष्णाचा कमळासारखा हात - अञ्जलिना जगृहे - दोन्ही हातांनी धरिती झाली - काचित् - कोणीएक स्त्री - चन्दनभूषितं तद्बाहुम् - चंदनाने भूषविलेला त्याचा दंड - अंसे - खांद्यावर - दधार - धारण करिती झाली. ॥४॥ काचित् तन्वी - कोणीएक स्त्री - ताम्बूलचर्वितम् - विडयाचा चोथा - अञ्जलिना अगृह्णात् - ओंजळीत घेती झाली - (कामेन) संतप्ता एका - कामसंतप्त अशी एक स्त्री - तदङ्घ्रिकमलम् - त्याचा कमळासारखा पाय - स्तनयोः अधात् - स्तनांवर ठेविती झाली. ॥५॥ प्रेमसंरम्भविह्वला - प्रेमाच्या तीव्रतेमुळे व्याकुळ झालेली - सन्दष्टदशनच्छदा - चावला आहे ओठ जिने अशी - एका - एक स्त्री - भ्रुकुटिं आबध्य - भुंवया वर चढवून - कटाक्षेपैः - वाकडया दृष्टीच्या - घ्नन्ती इव - प्रहारांनी जणु काय मारीतच - (तं) ऐक्षत् - त्याजकडे पाहती झाली. ॥६॥ अनिमिषदृग्भ्याम् - टक लावून पाहणार्या अशा डोळ्यांनी - आपीतं अपि - प्यालेल्या अशाहि - तन्मुखाम्बुजं - त्याच्या मुखरूपी कमळाचे - (पुनः) जुषाणा - फिरून सेवन करणारी - अपरा - दुसरी एक स्त्री - यथा तच्चरणं - ज्याप्रमाणे त्या श्रीकृष्णाच्या चरणाचे - (जुषाणाः) सन्तः (तथा) - सेवन करणारे सज्जन त्याप्रमाणे - न अतृप्यत् - तृप्त झाली नाही. ॥७॥ नेत्ररन्ध्रेण - नेत्ररूपी छिद्राच्या द्वाराने - तं हृदि कृत्य - त्याला हृदयात घेऊन, - निमील्य उपगुह्य च - डोळे मिटून व त्याला आलिंगून - पुलकाङगी काचित् - रोमांचानी युक्त अशी एक स्त्री - योगी इव - योग्याप्रमाणे - आनंदसम्प्लुता आस्ते - आनंदात बुडून राहिली. ॥८॥ यथा जनाः प्राज्ञं प्राप्य - ज्याप्रमाणे सामान्य लोक ज्ञान्याजवळ जाऊन - केशवालोकपरमोत्सवनिर्वृताः - श्रीकृष्णाच्या दर्शनाने झालेल्या मोठया आनंदामुळे सुखी झालेल्या - ताः सर्वाः - त्या सर्व स्त्रिया - विरहजं तापं जहुः - विरहामुळे उत्पन्न झालेल्या तापाला टाकित्या झाल्या. ॥९॥ तात - हे राजा - विधूतशोकाभिःताभिः वृतः - नष्ट झाला आहे शोक ज्यांचा अशा त्या स्त्रियांनी वेष्टिलेला - भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण - यथां शाक्तिभिः (वृतः) पुरुषः (तथा) - ज्याप्रमाणे राजससामर्थ्याने युक्त असलेला मनुष्य त्याप्रमाणे - अधिकं व्यरोचत - अधिक शोभला. ॥१०॥ ताः समादाय - त्या स्त्रियांना घेऊन - विकसत्कुन्दमन्दारसुरभ्यनिलषट्पदम् - उमलणार्या फुलांच्या योगाने सुगंधित झालेल्या वार्याबरोबर आलेले भुंगे ज्यामध्ये अशा - शरच्चन्द्रांशुसन्दोहध्वस्तदोषातमः - शरत्काळच्या चंद्रकिरणाच्या समूहाने नष्ट झाला आहे रात्रीचा अंधकार जेथील अशा - कृष्णायाः हस्ततरलाचित कोमलवालुकम् - यमुनेच्या तरंगरूपी हातांनी पसरली आहे मऊ अशी वाळू जेथे अशा - कालिन्द्याः पुलिनं निर्विश्य - यमुनेच्या वाळवंटात शिरून - विभुः (व्यरोचत) - श्रीकृष्ण शोभला. ॥११-१२॥ तद्दर्शनाह्लादविधूतहृद्रुजः (ताः) - त्याच्या दर्शनाच्या आनंदामुळे नष्ट झाला आहे हृद्रोग ज्यांचा अशा त्या स्त्रिया - यथा श्रुतयः (तथा) - जशा श्रुति अशा - मनोरथान्तं ययुः - सर्व इच्छांच्या पूर्ततेला गेल्या - कुचकुङ्कुमाङ्कितैः स्वैः उत्तरीयैः - स्तनांवरील केशराने चिन्हीत झालेल्या आपल्या पांघरण्याच्या वस्त्रांनी - आत्मबन्धवे (तस्मै) - आपला बांधव अशा त्या श्रीकृष्णासाठी - आसनं अचीक्लुपन् - आसन करित्या झाल्या. ॥१३॥ तत्र उपविष्टः - त्याठिकाणी बसलेला - योगेश्वरान्तर्हृदि कल्पितासनः - श्रेष्ठ योग्यांच्या हृदयात कल्पिलेले आहे आसन ज्याचे असा - त्रैलोक्यलक्षमयैकपदं वपुः दधत् - त्रैलोक्यातील शोभेचे एकटे एक स्थान असे शरीर धारण करणारा - सः भगवान् ईश्वरः - तो भगवान श्रीकृष्ण - गोपीपरिषद्गतः अर्चितः चकासे - गोपीच्या समुदायामध्ये बसलेला व त्यांनी पूजिलेला असा शोभला. ॥१४॥ सहासलीलेक्षणविभ्रमभ्रुवा - हास्याने युक्त अशा लीलेने पाहण्यामुळे चंचल आहेत भुवया ज्यांच्या अशा - अङककृताङ्घ्रिहस्तयोः संस्पर्शनेन - मांडीवर घेतलेले पाय व हात यांच्या उत्तम स्पर्शाने - अनङगदीपनं तं सभाजयित्वा - मदनाला उत्तेजित करणार्या त्याला सत्कारून - संस्तुत्य - चांगल्या रीतीने वाखाणून - ईषत्कुपिताः - थोडयाशा रागावलेल्या - बभाषिरे - म्हणाल्या. ॥१५॥ एके (स्वं) भजतः अनुभजन्ति - कित्येक जण स्वतःला अनुसरणार्यांना अनुसरतात - एके एतद्विपर्ययं (अपि अनुभजन्ति) - कित्येक याच्या उलटहि अनुसरतात - च - आणि - एके - कित्येक - उभयान् (अपि) न भजन्ति - दोघांनाहि अनुसरत नाहीत - भोः - हे श्रीकृष्णा - एतत् नः साधु ब्रूहि - हे आम्हाला तू नीट सांग. ॥१६॥ सख्य - हे सखींनो - ये मिथः भजन्ति - जे परस्परांची सेवा करितात - ते हि स्वार्थैकान्तोद्यमाः (सन्ति) - ते खरोखर एका स्वार्थासाठीच आहे उद्योग ज्यांचा असे होत - तत्र सौहृदं धर्मः (च) न (अस्ति) - त्याठिकाणी प्रेम किंवा धर्म नसतो - हि - कारण - तत् स्वार्थार्थं (एव अस्ति) - ते स्वतःच्या हितासाठीच असते - न अन्यथा - दुसर्यासाठी नसते. ॥१७॥ सुमध्यमाः - हे सुंदरींनो - ये वै करुणाः - जे दयाळू असे लोक - यथा पितरः (तथा) - ज्याप्रमाणे आईबाप त्याप्रमाणे - अभजतः भजन्ति - आपली सेवा न करणार्यांचीहि सेवा करितात - अत्र - ह्याठिकाणी - निरपवादः धर्मः सौहृदं च (भवति) - आक्षेपरहित असा धर्म आणि प्रेमहि असते. ॥१८॥ वै - खरोखर - केचित् - कित्येक - भजतः अपि न भजन्ति - आपली सेवा करणार्याचीहि सेवा करीत नाहीत - अभजतः कुतः (भजन्ति) - आपली सेवा न करणार्यांची कोठून सेवा करणार - (एते) हि - खरोखर हे - आत्मारामाः - स्वसंतुष्ट असे, - आप्तकामाः - मिळविली आहे इष्ट वस्तू ज्यांनी असे, - अकृतज्ञाः - केलेले उपकार न जाणणारे असे - गुरुद्रुहः (इति चतुर्विधाः सन्ति) - व गुरूशी द्रोह करणारे असे चार प्रकारचे असतात. ॥१९॥ तु - परंतु - सख्यः - हे सखींनो - भजतः जन्तून् अपि - माझी सेवा करणार्या प्राण्यांची सुद्धा - अमीषाम् अनुवृत्तिवृत्तये - त्यांच्या सेवेच्या वेतनासाठी - अहं न भजामि - मी सेवा करीत नाही - यथा - ज्याप्रमाणे - अधनः - ज्याच्याजवळ द्रव्य नाही असा मनुष्य - लब्धधने विनष्टे (सति) - मिळालेले द्रव्य नाहीसे झाले असता - तच्चिन्तया निभृतः - त्याच्या काळजीने व्यापिलेला - अन्यत् न वेद - दुसरे काही जाणत नाही - एवम् - याप्रमाणे - अबलाः - हे स्त्रियांनो - मदर्थोज्झित - माझ्यासाठी सोडले आहेत - लोकवेदस्वानां - लोकाचार, धर्माधर्म व भाऊबंद ज्यांनी अशा - वः - तुमचे - मयि अनुवृत्तये - माझ्यावरील भक्तीसाठी - परोक्षं भजता - अप्रत्यक्ष कल्याण करणारा - मया हि तिरोहितं - मी खरोखर गुप्त झालो होतो - प्रिया - हे प्रियकरिणींनो - प्रियं मा - प्रियकर अशा मजवर - असूयितं मा अर्हथ - रागावण्यास तुम्ही योग्य नाही. ॥२०-२१॥ निरवद्यसंयुजाम् वः - अनिंद्य आहे संबंध ज्यांचा अशा तुमच्या - स्वसाधुकृत्यं - उत्तम प्रत्युपकालाला - विबुधायुषा अपि - देवांच्या आयुष्याने देखील - अहं न पारये - मी समर्थ नाही - याः (भवत्यः) - ज्या तुम्ही - दुर्जरगेहशृंखलाः संवृश्च्य - जीर्ण होण्यास कठीण अशा गृहरूपी शृंखला पार तोडून - मा अभजन् - माझी सेवा करत्या झालात - तत् वः (साधुकृत्यम्) - ते तुमचे सत्कृत्य - (वः) साधुना (एव) - त्या तुमच्या सद्वर्तनानेच - प्रतियातु - फिटो. ॥२२॥ अध्याय बत्तीसावा समाप्त |