|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २७ वा - अन्वयार्थ
श्रीकृष्णांना अभिषेक - गोवर्धने शैले धृते (सति) - गोवर्धनपर्वत धारण केला असता - आसारात् व्रजे रक्षिते (सति) - वृष्टीपासून गोकुळाचे संरक्षण केले असता - गोलोकात् - स्वर्गाहून - सुरभिः कृष्णं आव्रजत् - कामधेनु श्रीकृष्णाजवळ आली - शक्रः च एव (कृष्णं आव्रजत्) - आणि इंद्रही श्रीकृष्णाजवळ आला. ॥१॥ कृतहेलनः (अतः एव) - केला आहे अपमान ज्याने असा - व्रीडितः (सः) - म्हणून लाजलेला इंद्र - विविक्ते उपसङगम्य - एकांतात भेटून - अर्कवर्चसा किरीटेन - सूर्यासारख्या तेजस्वी अशा मुकुटाने - एनम् - ह्या कृष्णाला - पादयोः पस्पर्श - दोन्ही पायांना स्पर्श करिता झाला. ॥२॥ अमिततेजसः - अपरिमित आहे सामर्थ्य ज्याचे - अस्य कृष्णस्य - अशा या श्रीकृष्णाचा - दृष्टश्रुतानुभावः - पाहिला व ऐकला आहे पराक्रम ज्याने असा - नष्टत्रिलोकेशमदः - नाहीसा झाला आहे तिन्ही लोकांच्या राजेपणाचा गर्व ज्याचा असा - इंद्रः - इंद्र - कृताञ्जलिः (सन्) आह - हात जोडून म्हणाला. ॥३॥ तव धाम - तुझे स्थान - विशुद्ध सत्त्वं - शुद्धसत्त्वगुणाचे - शान्तं तपोमयं - विकाररहित व तप हेच आहे रूप ज्याचे असे - ध्वस्तरजस्तमस्कम् - नाहीसा झाला आहे रजोगुण व तमोगुण ज्यातील असे - अग्रहणानुबंधः - अज्ञानाला चिकटून असणारा - मायामय - माया हेच आहे रूप ज्याचे असा - अयं गुणसंप्रवाहः - हा गुणप्रवाहरूप संसार - ते न विद्यते - तुझ्या ठिकाणी नाही. ॥४॥ ईश - हे ईश्वरा - तत्कृताः तद्धेतवः - तिने उत्पन्न केलेले व त्याला कारण असे - ये अबुधलिङगभावाः - जे अज्ञानी मनुष्याची खूण - लोभादयः - असे लोभादिक विकार - ते त्वयि कुतः नु (विद्यन्ते) - ते तुझ्या ठिकाणी कोठून असणार - तथा अपि - तरीसुद्धा - धर्मस्य गुप्त्यै - धर्माच्या संरक्षणासाठी - खलनिग्रहाय - दुष्टांच्या नाशासाठी - भगवान् दण्डं बिभर्ति - भगवान दण्ड धारण करतो. ॥५॥ जगतां पिता - अखिल जगाचा परम पिता, - गुरुः अधीशः - गुरु, राजांचा अधिराज - दुरत्ययः कालः - व उल्लंघून जाण्यास कठीण असा काळस्वरूपी - उपात्तदण्डः - घेतलेला आहे दंड ज्याने असा - जगदीशमानिनां मानं - स्वतःला जगाचे राजे असे मानणार्यांचा - विधुन्वन् त्वम् - गर्व नाहीसा करणारा तू - स्वेच्छातनुभिः - आपल्याला इष्ट अशा शरीरांनी - (जगतः) हिताय समीहसे - जगाच्या हितासाठी झटत असतोस. ॥६॥ ये मद्विधाः अज्ञाः - जे माझ्यासारखे मूर्ख - जगदीशमानिनः (सन्ति) - स्वतःला जगाचे राजे मानणारे असतात - काले (अपि) - भयंकर प्रसंगीही - त्वां अभयं वीक्ष्य - तू निर्भय आहेस असे पाहून - आशु तन्मदं हित्वा - त्वरित तो गर्व टाकून - अपस्मयाः (सन्तः) - गर्वरहित होत्साते - आर्यंमार्गं प्रभजन्ति - श्रेष्ठ मार्गाचे अवलंबन करितात - ते ईहा अपि - तुझी लीलासुद्धा - खलानां अनुशासनं (भवति) - दुष्टांना सन्मार्गाला लावणारी होते. ॥७॥ सः त्वं - तो तू - ऐश्वर्यमदप्लुतस्य - सामर्थ्याच्या गर्वाने व्यापलेल्या - ते प्रभावं अविदुषः - तुझा पराक्रम न जाणणार्या - कृतागसः मे - केलेला आहे अपराध ज्याने अशा मला - क्षन्तुम् अर्हसि - क्षमा करण्यास योग्य आहेस - प्रभो ईश - हे प्रभो ईश्वरा - मूढचेतसः मे - मूढ झाले आहे मन ज्याचे अशा मला - पुनः - फिरून - एवं असती मतिः - अशी वाईट बुद्धि - मा अभूत् - न होवो. ॥८॥ देव अधोक्षज - हे देवा श्रीविष्णो - उरुभारजन्मनाम् - अत्यंत भारासारखा झाला आहे जन्म ज्यांचा अशा - स्वयंभराणां - स्वभावतःच बळकट अशा - चमूपतीनाम् - सेनापतीच्या - अभवाय - नाशासाठी - युष्मच्चरणानुवर्तिनां भवाय - तुझ्या चरणांना अनुसरणार्यांना उत्कर्षासाठी - इह तव अयम् अवतारः (अस्ति) - या जगात तुझा हा अवतार आहे. ॥९॥ महात्मने पुरुषाय - श्रेष्ठ पुरुष अशा - तुभ्यं भगवते नमः - तुला भगवंताला नमस्कार असो - वासुदेवाय कृष्णाय - वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण अशा - सात्वतां पतये - भक्तांचा संरक्षक अशा - (तुभ्यं) नमः - तुज विष्णूला नमस्कार असो. ॥१०॥ स्वच्छन्दोपात्तदेहाय - स्वतःच्या इच्छेने घेतला आहे देह ज्याने अशा - विशुद्धज्ञानमूर्तये - शुद्ध ज्ञान हे आहे स्वरूप ज्याचे अशा - सर्वबीजाय - सर्वांचे आदिकारण अशा - सर्वभूतात्मने - सर्व प्राण्यांचा आत्मा अशा - सर्वस्मै (तुभ्यं) नमः - सर्वव्यापी अशा तुला नमस्कार असो. ॥११॥ भगवन् - हे परमेश्वरा - यज्ञे विहते (सति) - यज्ञ बंद पाडिला असता - मानिना मया - गर्विष्ठ अशा मी - तीव्रमन्युना - अत्यंत रागाने - आसारवायुभिः - जोराची वृष्टि व वारा यांनी - गोष्ठनाशाय - गोकुळाच्या नाशासाठी - इदं चेष्टितम् - ही धडपड केली. ॥१२॥ ईश - हे ईश्वरा - त्वया अनुगृहीतः अस्मि - तुझ्या कृपेस पात्र झालो आहे - ध्वस्तस्तम्भः - नाहीसा झाला आहे ताठा ज्याचा असा - वृथोद्यमः अहम् - व्यर्थ आहे प्रयत्न ज्याचा असा मी - ईश्वरं गुरुम् आत्मानं त्वाम् - समर्थ, श्रेष्ठ व आत्मस्वरूपी अशा तुला - शरणं गतः - शरण आलो. ॥१३॥ मघोना एवं संकीर्तितः - इंद्राने याप्रमाणे स्तविलेला - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - प्रहसन् - हसत - मेघगंभीरया वाचा - मेघासारख्या गंभीर वाणीने - अमुं इदम् अब्रवीत् - त्याला असे म्हणाले. ॥१४॥ मघवन् - हे इंद्रा - इंद्रश्रिया भृशं - स्वर्गीय इंद्रपदाच्या ऐश्वर्याने - मत्तस्य ते - अत्यंत माजलेल्या तुला - नित्यं मदनुस्मृतये - नित्य माझे स्मरण व्हावे म्हणून - अनुगृहणता मया - कृपा करणार्या मजकडून - मखभङगः अकारि - यज्ञाला अडथळा केला गेला. ॥१५॥ (यः) ऐश्वर्यश्रीमदान्धः - जो सत्ता व संपत्ति यांच्या धुंदीने आंधळा झालेला असा - दण्डपाणिं - दंड आहे हातात ज्याच्या - मां न पश्यति - अशा मला पाहत नाही - च - आणि - यस्य अनुग्रहं (कर्तुं) इच्छामि - ज्याच्यावर मी अनुग्रह करू इच्छितो - तं संपद्भ्यः भ्रंशयामि - त्याला मी संपत्तीपासून खाली पाडतो. ॥१६॥ शक्र - हे इंद्रा - (त्वया) गम्यताम् - तू जावे - वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो - मे अनुशासनं क्रियताम् - माझ्या उपदेशाप्रमाणे कृति करावी - वः - तुम्हांकडून - स्तम्भवर्जितैः - गर्वरहित असे - स्वाधिकारेषु - आपापल्या अधिकाराच्या ठिकाणी - युक्तैः स्थीयताम् - दक्ष राहिले जावे. ॥१७॥ अथ - नंतर - मनस्विनी सुरभिः - चतुर अशी कामधेनु - स्वसन्तानैः (सह) - आपल्या संततीसह - गोपरूपिणं - गवळ्याचे रूप धारण केलेल्या - ईश्वरं कृष्णं अभिवंद्य - भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून - च - आणि - उपामन्त्र्य - प्रार्थनापूर्वक - आह - म्हणाली. ॥१८॥ महायोगिन् कृष्ण - हे महायोगी श्रीकृष्णा - विश्वात्मन् कृष्ण - हे जगद्व्यापी श्रीकृष्णा - विश्वसंभव अच्युत - हे जग उत्पन्न करणार्या श्रीकृष्णा - लोकनाथेन भवता - सर्व लोकांचे रक्षण करणार्या तुझ्यामुळे - वयं सनाथाः (जाताः) - आम्ही सनाथ झालो. ॥१९॥ जगत्पते - हे जगाच्या पालका - त्वं (एव) नः - तूच आमचे - परमकं दैवं (असि) - श्रेष्ठ असे दैवत आहेस - अतः - यास्तव - गोविप्रदेवानाम् - गाई, ब्राह्मण व देव यांच्या - च - आणि - ये साधवः (सन्ति तेषाम्) - जे सज्जन असतील त्यांच्या - भवाय - उत्कर्षासाठी - त्वं (एव) नः इन्द्रः भव - तूच आमचा स्वामी हो. ॥२०॥ ब्रह्मणा नोदिताः वयम् - ब्रह्मदेवाने प्रेरिलेले आम्ही - त्वाम् - तुला - नः इन्द्रम् - आमचा स्वामी म्हणून - अभिषेक्ष्यामः - अभिषेक करणार आहो - विश्वात्मन् - हे विश्वस्वरुपा - भूमेः भारानुपत्तये - पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी - अवतीर्णः असि - तू अवतरला आहेस. ॥२१॥ एवं उपामन्त्र्य - अशा रीतीने प्रार्थना करून - सुरभिः - कामधेनु - आत्मनः पयसा - आपल्या दुधाने - कृष्णं (अभ्यषिञ्चत) - श्रीकृष्णाला अभिषेक करिती झाली - देववमातृभि नोदितः इन्द्रः - देवांच्या मातांनी प्रेरिलेला इंद्र - सुरर्षिभिः साकं - देव व ऋषी यांसह - ऐरावतकरोद्धृतैः - ऐरावताने सोंडेने वर उचललेल्या - आकाशगङगायाः जलैः - स्वर्गातील गंगेच्या उदकांनी - दाशार्हम् अभ्यषिञ्चत - श्रीकृष्णाला अभिषेक करिता झाला - च - आणि - गोविन्दः - गोविंद - इति अभ्यधात् - असे नाव ठेविता झाला. ॥२२-२३॥ तत्र आगताः - तेथे आलेले - तुम्बुरुनारदादयः - तंबुरु व नारद आहेत प्रमुख ज्यांमध्ये असे - गन्धर्वविद्याधरसिद्धचारणाः - गंधर्व, विद्याधर, सिद्ध व देवांचे स्तुतिपाठक - लोकमलापहं - सर्व लोकांचे पाप नाहीसे करणारी - हरेः यशः जगुः - श्रीकृष्णाची कीर्ती गाते झाले - मुदा अन्विता - आनंदाने युक्त अशा - सुराङ्गनाः संननृतुः - देवांच्या स्त्रिया उत्तमप्रकारे नाचत्या झाल्या ॥२४॥ (ते) देवनिकायकेतवः - ते स्वर्गातील पुढारी - तं तुष्टुवुः - त्याला स्तविते झाले - च - आणि - अद्भुतपुष्पवृष्टिभिः (तं) - त्याजवर अपूर्व अशा फुलांचे वर्षाव - व्यवाकिरन् - करिते झाले - तदा - त्या वेळी - त्रयः लोकाः - तिन्ही लोक - परां निर्वृत्तिम आप्रुवन् - श्रेष्ठ अशा सुखाला मिळविते झाले - गावः - गाई - गां पयोद्रुताम् अनयन् - पृथ्वीला दुधाने भिजलेली अशी करत्या झाल्या ॥२५॥ सरितः - नद्या - नानारसौघाः - अनेकप्रकारच्या रसांचे आहेत प्रवाह ज्यात - (आसन्) - अशा झाल्या - वृक्षाः मधुस्त्रवाः आसन् - वृक्ष मधाच्या पाझरांनी युक्त असे झाले - ओषधयः - धान्यादि वनस्पति - अकृष्टपच्याः (जाताः) - न नांगरलेल्या भूमीत उत्पन्न होणार्या झाल्या - गिरयः - पर्वत - मणीन् उत् अबिभ्रत् - रत्नांना प्रगटरीतीने धारण करते झाले ॥२६॥ तात कुरुनन्दन - हे कुरुकुलाला आनंद देणार्या राजा - कृष्णे अभिषिक्ते (सति) - श्रीकृष्णाला अभिषेक झाला असता - निसर्गतः क्रूराणि - स्वभावतः दुष्ट - एतानि सत्वानि अपि - असे हे प्राणीसुद्धा - निर्वैराणि अभवन् - नाहीसा झाला आहे द्वेष ज्यांचा असे झाले ॥२७॥ इति - अशारीतीने - गोगोकुलपतिं - गाई व गोकुळ यांचा संरक्षक - गोविन्दं अभिषिच्य - अशा गोविंदाला अभिषेक करून - (तेन) अनुज्ञातः - त्याने निरोप दिलेला - देवादिभिः वृतः - देवादिकांनी वेष्टिलेला - सः शक्रः - तो इंद्र - दिवं ययौ - स्वर्गास गेला ॥२८॥ अध्याय सत्ताविसावा समाप्त |