श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ

श्रीकृष्णाला उखळाला बांधणे -

एकदा - एके दिवशी - गृहदासीषु - घरातील सर्व दासींना - कर्मान्तरनियुक्तासु (सत्सु) - दुसर्‍या कामावर नेमले असता - नन्दगेहिनी यशोदा - नंदाची पत्नी यशोदा - स्वयं (एव) - स्वतःच - दधि निर्ममन्थ - दही घुसळीत होती. ॥१॥

दधिनिर्मन्थने च काले - आणि दही घुसळताना - यानि यानि तद्‌बालचरितानि - जी जी त्या श्रीकृष्णाची बाळपणीची कृत्ये - इह गीतानि (आसन्) - गोकुळात गायिली जात असत - तानि स्मरन्ती - ती आठवून - अगायत - गात होती. ॥२॥

पृथुकटितटे - विशाल कमरेवर - सूत्रनद्धं क्षौ‌मं वासः - नाडीने बांधलेले रेशमी वस्त्र - जातकम्पं - आणि ज्यांना कंप उत्पन्न झाला आहे, - च पुत्रस्नेह - व पुत्रस्नेहामुळे - स्नुतकुचयुगम् - ज्यांना पान्हा फुटला आहे असे दोन स्तन - रज्ज्वाकर्षश्रमभुज - रवीची दोरी ओढण्याचे श्रम होत आहेत अशा - चलत्कङकणौ - हातांतील हलणारी दोन कंकणे - कुण्डले च - व (कानांतील) दोन कुंडले - स्विन्नं च वक्रं बिभ्रती - आणि घामाने भिजलेले मुख धारण करणारी - कबरविगलन्मालती - जिच्या भुवया सुंदर आहेत व जिच्या वेणीतून चमेलीची फुले गळत आहेत - (सा) सुभ्रूः - अशी ती यशोदा - निर्ममन्थ - घुसळीत होती. ॥३॥

स्तन्यकामः हरिः - स्तनपान करण्याची इच्छा करणारा श्रीकृष्ण - मथ्नतीं जननीं आसाद्य - मंथन करीत असणार्‍या आईला गाठून - दधिमन्थानं (च) गृहीत्वा - आणि दही घुसळण्याची रवी धरून - प्रीतिं आवहन् - प्रेम आणीत - तां न्यषेधयत् - तिला थांबविता झाला. ॥४॥

अंकं आरूढं च - आणि तो मांडीवर बसला असता - सा (तस्य) सस्मितं मुखं ईक्षती - ती त्याचे हसरे मुख पाहत - तं - त्याला - स्नेहस्नुतं स्तनं अपाययत् - पान्हा फुटलेला स्तन पाजिती झाली - अधिश्रिते पयसि - परंतु चुलीवर ठेविलेले दूध - उत्सिच्यमाने तु - उतास येऊ लागले असता - (तं) अतृप्तं एव उत्सृज्य - त्याला तसाच असंतुष्ट सोडून - जवेन ययौ - लगबगीने निघून गेली. ॥५॥

संजातकोपः (सः) - ज्याला राग आला आहे असा तो श्रीकृष्ण - स्फुरितारुणाधरं - कापणारे तांबडे ओठ - दद्भिः संदश्य - दातांनी चावून - दषदश्मना च - आणि वरवंटयाने - दधिमन्थभाजनं भित्वा - दही घुसळण्याचे भांडे फोडून - मृषाश्रुः (सन्) - डोळ्यांत खोटी आसवे आणून - अन्तरं गतः - घरात गेला - रहः (च) - आणि एकांतात - हैयङगवं जघास - लोणी खाऊ लागला. ॥६॥

पयः सुशृतं - दूध चांगले तापल्यावर - (सत्) उत्तार्य - खाली उतरून - पुनः (तत्र) प्रविश्य - पुनः तेथे येऊन - दध्यमत्रकं च - आणि दह्याचे भांडे - भग्नं विलोक्य - फुटलेले पाहून - तं च अपि तत्र - आणि त्यालाही तेथे - न पश्यंती (सा) गोपी - न पाहणारी ती यशोदा - स्वसुतस्य (एव) - आपल्या पुत्राचेच - तत् कर्म (इति) संदृश्य - ते कृत्य असे जाणून - जहास - हसली. ॥७॥

पुत्रम् - मुलाला - उलूखलाङ्‌घ्रेः - पालथ्या उखळीवर - उपरि व्यवस्थितं - उभा राहिलेला - शिचिस्थिं हैयङगवं - शिंक्यावरील लोणी - मर्काय कामं ददतम् - माकडाला मोकळेपणाने देत असलेला - चौर्यकर्म - चोरीच्या कृत्यामुळे - विशङ्‌‍कितेक्षणम् - ज्याचे डोळे कावरेबावरे झाले आहेत असा - वीक्ष्य - पाहून - शनैः पश्चात् अगमत् - हळूच पाठीमागून गेली. ॥८॥

आत्तयष्टिं तां प्रसमीक्ष्य - काठी घेतलेल्या तिला पाहून - सत्वरः ततः अवरुह्य - लगबगीने तेथून खाली उतरून - भीतवत् अपससार - भ्याल्यासारखा पळून गेला - (सा) गोपी - ती यशोदा - तपसा ईरितं - तपश्चर्येने प्रेरिलेले - योगिनां मनः यं - - प्रवेष्टुं न क्षमम् - प्रवेश करण्यास समर्थ होत नाही - (तं) अन्वधावत् - त्या श्रीकृष्णाच्या मागून धावली - (परं) न आप - परंतु पकडती झाली नाही. ॥९॥

अन्वञ्चमाना - मागून धावणारी - बृहच्चलच्छ्‌रोणी - हालणार्‍या विशाल कमरेच्या - भराक्रांतगतिः - भारामुळे, जिचे चालणे दबले आहे अशी - जवेन विस्रंसित - धावण्याच्या वेगामुळे विसकटलेल्या - केशबंधनच्युत - वेणीतून गळलेली फुले - प्रसूनानुगतिः - जिच्या मागोमाग पडत आहेत अशी - (सा) सुमध्यमा जननी - ती सुंदर यशोदा माता - तं परामृशत् - त्याला पकडती झाली. ॥१०॥

कृतागसं - केला आहे अपराध ज्याने अशा - प्ररुदंतं - रडणार्‍या - अञ्जन्मषिणी अक्षिणी - काजळ घातलेले डोळे - स्वपाणिना कषन्तम् - आपल्या हाताने चोळणार्‍या - उद्वीक्षमाणं - वर पाहणार्‍या - भयविह्वलेक्षणम् - भीतीने ज्याची मुद्रा कावरीबावरी झाली आहे अशा - तं - त्या श्रीकृष्णाला - हस्ते गृहीत्वा - हाताने धरून - भीषयन्ती - धाक दाखवीत - अवागुरत - रागावली. ॥११॥

अर्भकवत्सला - मुलावर अत्यंत प्रेम करणारी, - (किन्तु) अतद्वीर्यकोविदा (सा) - परंतु त्याचा पराक्रम न जाणणारी ती यशोदा - सुतं भीतं (इति) विज्ञाय - मुलगा भ्याला असे जाणून - यष्टिं त्यक्त्वा - काठी टाकून - तं किल - खरोखरच त्याला - दाम्ना बद्धुं इयेष - दाव्याने बांधावयास गेली. ॥१२॥

यस्य अन्तः न बहिः - ज्याला आत नाही, बाहेर नाही, - न पूर्वं न अपरं अपि च न - अलीकडे नाही व पलीकडे नाही - यः जगतः पूर्वापरं - जो जगाच्या बाहेर अलीकडे, - अन्तः बहिः च (अस्ति) - पलीकडे व आतबाहेरही आहे - यःच (एतत्) जगत् (अस्ति) - आणि जो म्हणजेच हे जग आहे - तं मर्त्यलिङ्‌गम् अव्यक्तं - त्या मनुष्यरूप धारण करणार्‍या अव्यक्तरूपी - अधोक्षजं आत्मजं मत्वा - इंद्रियातीत अशा श्रीकृष्णाला आपला मुलगा मानून - गोपिका - यशोदा - यथा प्राकृतम् - सामान्य मनुष्याप्रमाणे - उलूखले दाम्ना बबन्ध - उखळाशी दाव्याने बांधती झाली. ॥१३-१४॥

कृतागसः - ज्याने अपराध केला आहे - बध्यमानस्य स्वार्भकस्य - व जो बांधला जात आहे अशा आपल्या मुलाला - तत् दाम - ते दावे - द्‌व्‌यङ्‌गुलोनम् अभवत् - दोन अंगुळे कमी झाले - गोपिका - यशोदा - तेन च अन्यत् संदधे - त्याला दुसरे दावे जोडिती झाली. ॥१५॥

यदा तत् अपि न्यूनं आसीत् - जेव्हा तेही कमी झाले - तेन अन्यत् अपि संदधे - त्याला आणखीही एक जोडिती झाली - यत् यत् बन्धनं आदत्त - जे जे दावे घेई - तत् द्‌व्‌यङ्‌गुलं न्यूनं (अभवत्) - ते ते दोन अंगुळे कमी पडे. ॥१६॥

एवं स्वगेहदामानि - याप्रमाणे आपल्या घरातील सर्व दावे - संदधती यशोदा अपि - जोडीत असता ती यशोदाही - सुस्मयन्तीनां गोपीनाम् - गोपी हसत असता - स्मयन्ती विस्मिता अभवत् - स्वतः हसत आश्चर्यचकित झाली. ॥१७॥

स्विन्नगात्रायाः - जिचे शरीर घामाने ओले झाले आहे - विस्रस्तकबरस्रजः - व जिच्या वेणीतील गजरा अस्ताव्यस्त झाला आहे - स्वमातुः - अशा आपल्या मातेचा - (तं) परिश्रमं दृष्ट्वा - तो मोठा खटाटोप पाहून - कृष्णः - कृष्ण - कृपया स्वबन्धनं आसीत् - कृपेने आपण होऊनच आपले बंधन करिता झाला. ॥१८॥

अङग - हे परीक्षित राजा - एवम् - अशा रीतीने - इदं सेश्वरं (जगत्) - ईश्वरासह हे सर्व जग - यस्य वशे (तिष्ठति) - ज्याच्या आधीन आहे - (तेन) स्ववशेन - त्या स्वतंत्र अशा - श्रीकृष्णेन हरिणा अपि - श्रीकृष्णरूपी श्रीहरीने सुद्धा - भृत्यवश्यता - आपण भक्तांच्या स्वाधीन आहोत - संदर्शिता - असे दाखविले. ॥१९॥

गोपी - यशोदा - विमुक्तिदात् - मुक्ति देणार्‍या परमेश्वरापासून - यं इमं प्रसादं प्रापं - हा जो प्रसाद मिळविती झाली - तं (प्रसादं) - तो प्रसाद - विरिञ्चःन भवः - ब्रह्मदेव नाही, शंकर नाही - अङ्‌गसंश्रया - व परमेश्वराच्या शरीराचा आश्रय करणारी - श्रीः अपि न (प्राप) - लक्ष्मीसुद्धा मिळविती झाली नाही. ॥२०॥

अयं भगवान् गोपिकासुतः - हा यशोदेचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - यथा इह आत्मभूतानां - जसा ह्या लोकी ह्याच्या स्वरूपी लीन होणार्‍या - भक्तिमतां सुखापः (अस्ति) - भक्तिमान लोकांना अनायासाने प्राप्त होणारा आहे - तथा - तसा - देहिनांज्ञानिनां - देहाचा अभिमान बाळगणार्‍यांना व ज्ञानी लोकांनाही - च न - प्राप्त होत नाही. ॥२१॥

प्रभुः कृष्णः तु - समर्थ असा श्रीकृष्ण तर - मातरि गृहकृत्येषु - माता यशोदा गृहकृत्यात - व्यग्रायाम् - गढून गेली असता - पूर्वं धनदात्मजौ - पूर्वी कुबेराचे पुत्र असलेले दोन यक्ष - गुह्यकौ अर्जुनौ - सांप्रत अर्जुननामक दोन वृक्ष - (भूतौ) अद्राक्षीत् - झालेले पाहता झाला.॥२२॥

पुरा - पूर्वी - श्रिया अन्वितौ - संपत्तीने युक्त असलेले - नलकूबरमणिग्रीवौ - नलकूबर आणि मणिग्रीव - इति ख्यातौ - या नावांनी प्रसिद्ध असलेले ते दोघे - मदात् - गर्वामुळे - नारदशापेन - नारदाच्या शापाने - वृक्षतां प्रापितौ - वृक्षाच्या जन्मास घातले गेले होते. ॥२३॥

अध्याय नववा समाप्त

GO TOP