![]() |
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ
भगीरथ चरित्र आणि गंगावतरण - (तत:) अंशुमान च - नंतर अंशुमानसुद्धा- गङ्गानयनकाम्यया - गंगा आणण्याच्या इच्छेने- महांतं कालं तप: तेपे - पुष्कळ वर्षॆ तप करिता झाला- (किंतु तां आनेतुं) न अशक्नोत - पण तिला आणण्यास समर्थ झाला नाही- तत: कालेन संस्थित: - नंतर कालगतीने मरण पावला ॥१॥ तत्सुत: दिलीप: - त्या अंशुमानाचा पुत्र दिलीप- तद्वत (गंगानयने) - त्याचप्रमाणे गंगा आणण्यास- अशक्त: कालं एयिवान - असमर्थ होऊन मृत्यू पावला- तस्य पुत्र: भगीरथ: - त्या दिलीपाचा पुत्र भगीरथ- सुमहत तप: तेपे - मोठी तपश्चर्या करिता झाला- देवी प्रसन्ना - गंगादेवी प्रसन्न होऊन- तं दर्शयामास - त्याला दर्शन देती झाली- ते वरदा अस्मि - तुला वर देणारी आहे,- इति उक्त: नृप: - असे बोलला गेलेला राजा- अवनत: (भूत्वा) - नम्र होऊन- स्वं अभिप्रायं - आपल्या मनातील हेतू- (तस्यै) शशंस - तिला सांगता झाला ॥२ ३॥ नृप - हे भगीरथा- महीतले पतन्त्या: मे - पृथ्वीवर पडणार्या माझा- क: अपि वेगं धारयिता (अस्ति किम) - वेग धारण करणारा कोणी आहे काय- अन्यथा - तसे नसेल तर मी- भूतलं भित्वा रसातलं यास्ये - पृथ्वी फोडून पाताळात जाईन ॥४॥ किं च राजन - आणखीही हे भगीरथ राजा- अहं न भुवं यास्ये - मी भुमीवर येणार नाही- नरा: मयि अघं आमृजन्ति - मनुष्ये माझ्यात आपले पाप धुतील- तत अघं कुत्र मृजामि - ते पाप मी कोठे धूवून काढू- तत्र विचिन्त्यतां - त्याविषयी विचार करावा ॥५॥ साधव: - सत्पुरुष सदाचारसंपन्न,- न्यासिन: शान्ता: - सर्वसंगपरित्याग केलेले शांतचित्ताचे,- ब्रह्मिष्ठा: लोकपावना: (सन्ति) - ब्रह्मज्ञानसंपन्न व त्रैलोक्याला पवित्र करणारे असतात- ते अङ्ग्सङ्गात् (तत्) - ते आपल्या शरीराच्या संपर्काने ते आपले- अघं हरन्ति - पाप नष्ट करतील- अघभित हरि: - पापनाशक श्रीविष्णू- तेषु आस्ते - त्यांच्या हृदयात वास करितो ॥६॥ तन्तुषु शाटी इव - जसे वत्र तंतुमध्ये- यस्मिन् इदं विश्वं - तसेच हे जग ज्याच्या ठिकाणी- ओतं प्रोतं (च) - आडवे उभे भरले आहे- (सः) शरीरिणां आत्मा रुद्र: तु - तो प्राण्यांच्या आत्मा शंकर तर- ते वेगं धारयिष्यति - तुझा वेग धारण करील ॥७॥ इति उक्त्वा स: नृप: - असे म्हणून तो भगीरथ राजा- देवं (शिवं) तपसा अतोषयत - शंकराला तपश्चर्येने संतुष्ट करिता झाला- राजन - हे परीक्षित राजा- अल्पीयसा कालेन - थोडक्याच अवधीत- ईश: तस्य समतुष्यत - शंकर त्यावर संतुष्ट झाला ॥८॥ सर्वलोकहित: शिव: - सर्व लोकांचे कल्याण करणारा शंकर- राज्ञा अभिहितं - राजाने संगितलेले- तथा इति (स्वीकृत्य) - ‘बरे आहे’ असे मान्य केल्यावर- अवहित: (सन) - सावधानपणे- हरे: पादपूतजलां - श्रीविष्णूच्या चरणस्पर्शाने जिचे उदक पवित्र झाले आहे,- गङ्गां दधार - शअशा गंगेला धारण क्रिता झाला ॥९॥ स: राजर्षि: भगीरथ: - तो राजर्षि भगीरथ- यत्र स्वपितृणां देहा: - जेथे आपल्या पितरांचे देह- भस्मीभूता: शेरते स्म - भस्म होऊन पडले होते- (तत्र) भुवनपावनीं - तेथे जगाला पवित्र करणार्या गंगेला- निन्ये - नेता झाला ॥१०॥ वायुवेगेन रथेन - वायुवेगाने धावणार्या रथातून चालणार्या- प्रयान्तं अनुघावती - भगीरथाच्या मागोमाग धावणारी गंगा- देशान पुनन्ती - देशांना पवित्र करीत- निर्दग्धान् - जळून भस्म झालेल्या- सगरात्मजान् आसिंचत - सगरपुत्रांना स्नान घालिती झाली ॥११॥ केवलं देहभस्माभि: - केवळ देहाच्या भस्माने- यज्जलस्पर्शमात्रेण - जिच्या उदकाला नुसता स्पर्श केल्यामुळे- ब्रह्मदंडहता: अपि - ्रह्मशापाने मृत्यू पावलेले असेही- सगरात्मजा: दिवं जग्मु: - बसगराचे पुत्र स्वर्गाला गेले ॥१२॥ सगरात्मजा: - सगरपुत्र स्वत:च्या- भस्मीभूताङ्गसङ्गेन - भस्म झालेल्या शरीराला गंगोदकाचा स्पर्श झाल्यामुळे- स्व: याता: - स्वर्गाला गेले- ये धृतव्रता: - जे व्रत धारण करणारे पुरुष- श्रद्धया देवीं सेव्यन्ते - श्रद्धेने गंगेची उपासना करितात- (ते) किं पुन: (न यान्ति) - ते मग कसे जाणार नाहीत ॥१३॥ अनन्तचरणाम्भोजप्रसूताया: - श्रीविष्णूच्या चरणकमलापासून उत्पन्न झालेल्या- भवच्छिद: स्वर्धुन्या: - संसारताप दूर करणार्या गंगेच्या संबंधाने- यत इह उदितं - जे येथे सांगितले- एतत परमश्चर्य न - हे मोठेसे आश्चर्य नाही ॥१४॥ अमला: मुनय: - निष्पाप ऋषी- यस्मिन श्रद्धया मन: संनिवेश्य - ज्याच्याठायी श्रद्धेने मन लावून- दुस्त्यजं त्रैगुण्यं हित्वा - सोडण्यास कठीण असा त्रिगुणांचा संबंध टाकून - सद्य: तदात्मतां याता: - तात्काळ त्याच्या स्वरुपाला प्राप्त झाले ॥१५ ॥ भगीरथात श्रुत: जज्ञे - भगीरथापासून श्रुत उत्पन्न झाला- तस्य अपर: नाभ: अभवत - त्याला दुसरा नाभ नामक पुत्र झाला- तत: सिंधुद्वीप: - त्यापासून सिंधुद्वीप- तस्मात अयुतायु: अभवत - त्यापासून अयुतायु झाला- तत: च नलसख: ऋतुपर्ण: - आणि त्यापासून नलराजाचा मित्र ऋतुपर्ण झाला- य: अस्मै अक्षहृदयं दत्वा - जो ह्या नलराजाला फाशांनी खेळण्याची विद्या देऊन- नलात् अश्वविद्यां अयात - स्वत: नलराजापासून अश्वविद्या शिकला- तत्सुत: तु सर्वकाम: - त्याचा पुत्र तर सर्वकाम होय ॥ १६ १७ ॥ नृप - हे परीक्षित राजा- तत: सुदास: (अभवत) - त्यापासून सुदास झाला- तत्पुत्र: मदयंतीपति: (आसीत) - त्याचा पुत्र मदयंतीचा पती होय- यं मित्रसहं - ज्याला मित्रासह असे- उत वै - किंवा- क्वचित कल्माषाङघ्रि - कधी कधी कल्माषपाद असे- आहु: - म्हणतात- (स:) वसिष्ठशापात् रक्ष: अभवत् - तो वसिष्ठाच्या शापाने राक्षस झाला- स्वकर्मणा (च) - आणि आपल्या कर्माने- अनपत्य: (अभवत्) - निपुत्रिक झाला ॥१८ ॥ महात्मन: सौदासस्य - महात्म्या सौदासाला- किंनिमित्त: गुरो: शाप: (अभवत्) - काय कारणामुळे शाप झाला- एतत वेदितुम इच्छाम: - हे आम्हाला जाणण्याची इच्छा आहे- यदि रह: न (तर्हि) कथ्यतां - जर गुप्त नसेल तर सांगा ॥१९॥ सौदास: मृगयां चरन् - सुदासपुत्र मृगया करीत असता- किंचित् रक्ष: जघान ह - कोण्या इका राक्षसाला मारिता झाला- भ्रातरं मुमोच - भावाला सोडून देता झाला- अथ स: - नंतर तो भाऊ त्याचा- प्रतिचिकीर्षया गत: - प्रतिकार करण्याच्या इच्छेने गेला ॥२०॥ अघं चिन्तयन स: - राजाच्या सूडाचा विचार करणारा तो- भोक्तुकामाय गुरवे - भोजनाची इच्छा करणार्या गुरु वसिष्ठाला- नरामिषं पक्त्वा निन्ये - मनुष्याचे मांस शिजवून वाढिता झाला ॥२१॥ परिवेक्ष्यमाणं - पानात वाढिलेले- अभक्ष्यं - भक्षण करण्यास अयोग्य मांस- अज्जसा विलोक्य - एकाएकी पाहून- कृद्ध: भगवान - रागावलेला भगवान वसिष्ठ- एवं रक्ष: हि भविष्यसि - यामुळे तू खरोखरच राक्षस होशील- (इति ) राजानं अशपत - असा राजाला शाप देता झाला ॥२२॥ तत रक्ष:कृतं विदित्वा - ते कृत्य राक्षसाकडून झाले असे जाणून- (वसिष्ठ: तं शापं ) - वसिष्ठ तो शाप- द्वादशवार्षिकं चक्रे - बारा वर्षाच्या अवधीचा करिता झाला- स: अपि अज्जलिना अप: आदाय - तो सुदासपुत्रहि ओंजळीत उदक घेऊन- गुरुं शप्तुं समुद्यत: - गुरु वसिष्ठाला शाप देण्यास उद्यक्क्त झाला ॥२३॥ मदयन्त्या वारित: नृप: - मदयंतीने निवारण केलेला राजा- दिश: खं अवनीं - दिशा, आकाश, पृथ्वी,- सर्वं जीवमयं पश्यन् - सर्व जीवरुपाने पाहणारा- रुशती: अप: - शापाने तीक्ष्ण झालेले उदक- पादयो: जहौ - आपल्या पायांवर टाकिता झाला ॥२४॥ राक्षसं भावं आपन्न: - राक्षसपणाला प्राप्त झालेला- पादे कल्माषतां गत: (स:) - पायावर काळेपण आलेला तो- वनौकोदम्पती द्विजौ (तयो:) - अरण्यात राहणार्या ब्राह्मणांच्या जोडप्याला- व्यवायकाले ददृशे - त्यांच्या मैथुनसमयी पाहता झाला ॥२५॥ क्षुधार्त: (स:) विप्रं जगृहे - क्षुधुने पीडिलेला तो मित्रासह ब्राह्मणाला पकडता झाला- तत्पत्नी अकृतार्थवत् (तं) आह - त्या ब्राह्मणाची स्त्री दीनपणे त्याला म्हणाली- भवान राक्षस: न - तू राक्षस नाहीस- साक्षात इक्ष्वाकूणां - प्रत्यक्ष इक्ष्वाकु राजांमध्ये- महारथ: (असि ) - मोठा पराक्रमी आहेस ॥२६॥ वीर - हे वीरा- मदयन्त्या: पति: (त्वं) - मदयंतीचा पती असा तू- अधर्म कर्तुं न अर्हसि - अधर्म करण्यास योग्य नाहीस- अपत्यकामाया: मे - पुत्राची इच्छा करणार्या मला- अकृतार्थ - ज्याची कामना पूर्ण झाली नाही असा- पतिं द्विजं देहि - ब्राह्मण पती देऊन टाक ॥२७ ॥ राजन - हे राजा- अयं मानुष: देह: - हा मनुष्य देह- पुरुषस्य अखिलार्थद: (अस्ति) - पुरुषाला सर्व पुरुषार्थ देणारा आहे- तस्मात - यास्तव- वीर - हे शूर राजा- अस्य वध: - ह्या देहाचा घात म्हणजे- सर्वार्थवध: उच्यते - सर्व पुरुषार्थाचा नाश असे सांगितले आहे ॥२८ ॥ एष: विद्वान तप:शील - हा विद्वान तपश्चर्या व शील इत्यादी- गुणान्वित: ब्राह्मण: - गुणांनी युक्त असा ब्राह्मण- महापुरुषसंज्ञितं - महापुरुष संज्ञा असलेले- सर्वभूतात्मभावेन - सर्व भूतांच्या अंतर्यामिरुपाने- भूतेषु गुणै: अन्नर्हितं ब्रह्म - प्राण्यांमध्ये गुणांनी झाकलेले ब्रह्म- आरिराधयिषु: (अस्ति) - आराध्यण्याची इच्छा करणारा आहे ॥२९ ॥ विभो धर्मज्ञ - हे समर्थ धर्मज्ञा- आत्मज: पितु: इव - पुत्र पित्याकडुन जसा तसा- स: यं ब्रह्मर्षिवर्य: - तो हा श्रेष्ठ ब्रह्मार्षि- राजर्षिप्रवरात ते - श्रेष्ठ राजर्षि अशा तुझ्यापासून- वधं कथं अर्हति - मारण्याला कसा योग्य आहे ॥३०॥ सन्मत: भवान - साधूना मान्य असा तू- यथा बभ्रो: - जसा गाईचा- (तथा) साधो: अपापस्य भ्रूणस्य - तसा साधु, निष्पाप, श्रोत्रिय- ब्रह्मवादिन: तस्य वधं - व ब्रह्मवेत्ता अशा त्या पुरुषाचा वध- कथं (साधु) मन्यते - कसा चांगला मानितोस ॥३१॥ यदि अयं भक्ष: क्रियते - जर हा भक्ष केला जात असेल- तर्हि पूर्वत: मां खाद - तर प्रथम मला खा- यथा मृतकं - जसे प्रेत- (तथा) येन विना - त्याप्रमाणे ज्याशिवाय मी- क्षणं (अपि) न जीविष्ये - क्षणभरसुद्धा जगणार नाही ॥३२॥ एवं करुणभाषिण्या: - याप्रमाणे करुणवाणीने बोलत- अनाथवत विलपन्त्या: - ती ब्राह्मण स्त्री दीनाप्रमाणे शोक करीत असता- व्याघ्र: पशुं इव - जसा वाघ पशूला तसा- शापमोहित: सौदास: - शापाने मोह पावलेला सौदास- (तं) अखादत - त्या ब्राह्मणाला खाता झाला ॥३३॥ दिधिषुं पुरुषादेन - गर्भ स्थापन करणार्या पतीला- भक्षितं वीक्ष्य - राक्षसाने भक्षिलेला पाहून- आत्मानं शोचंती - स्वत:बद्दल शोक करणारी- ब्राह्मणी कुपिता सती - ब्राह्मण स्त्री क्रुद्ध होऊन- उर्वीशं अशपत - राजाला शापिती झाली ॥३४॥ पाप अकृतप्रज्ञ - हे पाप्या निर्बुद्ध राजा- यस्मात त्वया कामार्ताया: - ज्या अर्थी तू कामपीडित अशा- मे पति: भक्षित: - माझा पति भक्षिलास- (तस्मात) तव अपि आधानात (एव) - त्यासाठी तुझाहि स्त्रीसंगानेच- मृत्यु: (मया:) दर्शित: - मृत्यु माझ्याकडून दाखविला गेला आहे ॥३५॥ एवं मित्रसहं शप्त्वा - याप्रमाणे मित्रसह राजाला शाप देऊन- पतिलोकपरायणा - पतिलोकाला जाण्यास उद्युक्त झालेली ती स्त्री- तदस्थीनि - पतीच्या अस्थि- समिद्धे अग्नौ प्रास्य - प्रज्वलित झालेल्या अग्नीत टाकून- भर्तु:गतिं गता - पतीच्या लोकाला गेली ॥३६॥ द्वादशाब्दान्ते - बारा वर्षाच्या शेवटी- विशाप: - शापमुक्त झालेला- मैथुनाय समुद्यत: स: - मैथुन करण्यास उद्युक्त झालेला तो- ब्राह्मणीशापं विज्ञाय - ब्राह्मण स्त्रीच्या शापाला जाणून- निवारित: - स्त्रीकडून निवारिला गेला ॥३७॥ तत: उर्ध्व - त्यानंतर- स: स्त्रीसुखं तत्याज - तो स्त्रीसुख सोडिता झाला- एवं (स:) कर्मणा अप्रजा: (अभवत्) - याप्रमाणे तो आपल्या कर्मामुळे निपुत्रिक झाला- तदनुज्ञात: वसिष्ठ: - त्याने अनुज्ञा दिलेला वसिष्ठ- मदयंत्या प्रजां अधात - मदयंतीच्या ठिकाणी प्रजा उत्पन्न करिता झाला ॥३८॥ सा सप्त समा: गर्भ अबिभ्रत - ती सात वर्षे गर्भधारणा करती झाली- (किन्तु) न व्यजायत - परंतु प्रसूत झाली नाही- (वसिष्ठ: ) अश्मना तस्या: उदरं जघ्ने - वसिष्ठाने तिचे उदर दगडाने फ़ोडिले- तेन स:अश्मक: कथ्यते - म्हणुन त्या मुलाला अशक म्हणतात ॥३९॥ अश्मकात मूलक: जज्ञे - अश्मकापासून मूलक झाला- य: स्त्रीभि: परिरक्षित: (इति) - यास्तव स्त्रियांनी क्षिला जो- नारीकवच: इति उक्त: - नारीकवच या नावाने प्रसिद्ध झाला- नि:क्षत्रे (अयं एव क्षत्रियाणां ) - पृथ्वी नि:क्षत्रिय झाली असता हाच राजा क्षत्रियांचा- मूलक: अभवत् - मूळ पुरुष झाला ॥४०॥ तत: दशरथ: (जात:) - त्यापासून दशरथ झाला- तस्मात ऐडविड: पुत्र: (अभवत्) - त्यापासून ऐडविड पुत्र झाला- तत: राजा विश्वसह: (अभवत्) - त्यापासून विश्वसह राजा झाला- यस्य (पुत्र:) खटवाङ्ग: - ज्याचा खट्वाङ्ग नामक पुत्र- चक्रवर्ती अभूत् - सौरभौम राजा झाला ॥४१॥ युधि दुर्जय: य: - युद्धात जिंकण्यास कठिण असा जो- देवै: अर्थित: दैत्यान अवधीत - देवांनी प्रार्थिलेला असा दैत्यांना मारिता झाला- मुहूर्त आयु: ज्ञात्वा - दोन घटका आयुष्य जाणून- स्वपुरं एत्य - आपल्या नगराला येऊन- (परमेश्वरे) मन: संदधे - परमेश्वराच्या ठिकाणी मन लविता झाला ॥४२॥ (स:) आह - तो म्हणाला- कुलदैवात ब्राह्मणकुलात - कुलांची देवताच अशा ब्राह्मणकुलापेक्षा- प्राणा: मे न अतिवल्लभा: - माझे प्राण मला अधिक प्रिय नाहीत- आत्मजा: न श्रिय: न मही न राज्यं - पुत्र, ऐश्वर्य, पृथ्वी, राज्य- न दारा: (मे अतिवल्ल भा:) अपि - व स्त्री सुद्धा मला अधिक प्रिय नाहीत ॥४३॥ मह्यं मति: बाल्ये अपि - माझी बुद्धि लहानपणी सुद्धा- क्वचित् अधर्मे न रमते - केव्हाहि अधर्माचे ठिकाणी आसक्त झाली नाही- अहं उत्तमश्लोकात् अन्यत् किंचन - मी श्रीविष्णूहून दुसरी कोणतीही- वस्तु न अपश्यं - वस्तु पाहिली नाही ॥४४॥ त्रिभुवनेश्वरै: देवै: - त्रैलोक्याधिपती देवांनी- मह्यं कामवर: दत्त: - मला इष्ट वर दिला- (तथापि) भूतभावनभावन: अहं - तथापि जगाचे रक्षण करणार्या श्रीविष्णूच्या ठिकाणी भक्ति करणारा मी- तं कामं न (एव) वृणे - त्या वराची इच्छाच करीत नाही ॥४५॥ ये विक्षिप्तेन्द्रियधिय: ते देवा: - ज्यांची इंद्रिये व बुद्धि चंचल झाली आहेत असे ते देव- शश्वत स्वहृदि स्थितं - नेहमी आपल्या हृदयात राहिलेल्या- प्रियं आत्मानं न विन्दन्ति - आवडत्या आत्म्याला जाणत नाहीत- किम उत अपरे - मग दुसरे कसे जाणतील ॥४६॥ अथ प्रकृत्या - आता मी प्रकृतीच्या योगे- आत्मनि रुढं अहं - आत्म्याच्या ठिकाणी वाढलेल्या अहंकाराला- ईशमायारचितेषु - परमेश्वराच्या मायेने रचिलेल्या- गंधर्वपुरोपमेषु - ्या गंधर्वनगरासारख्या- गुणेषु सङ्ग - तनाना विषयांवरील असलेल्या आसक्तीला- विश्वकर्तु: भावेन हित्वा - परमेश्वराच्या भक्तीने सोडून देऊन- तं प्रपद्ये - त्याला शरण जातो ॥४७॥ इति नारायण गृहीतया - याप्रमाणे श्रीविष्णूकडे लाविलेल्या- बुद्ध्या व्यवसित: (स:) - बुद्धीने निश्चय केलेला तो- अन्यभावं अज्ञानं हित्वा - नारायणाहून इतरांच्या आश्रयाने असणारे अज्ञान टाकून- तत: - नंतर- स्वभावं आश्रित: - आत्मस्वरुपाचा आश्रय करुन राहिला ॥४८॥ यत - जे आत्मस्वरुप- तत सूक्ष्मं अशून्यं (अपि) - ते सुक्ष्म, वस्तुत: शून्य नसूनहि- शून्यकल्पितं परं ब्रह्म - शून्यासारखे भासणारे श्रेष्ठ ब्रह्म होय- यं हि सात्वता: - ज्यालाच खरोखर भगगवद्भक्त- भगवान वासुदेव: इति गृणान्ति - ‘भगवान वासुदेव’ असे म्हणतात ॥४९॥ नवमः स्कन्धः - अध्याय नववा समाप्त |