|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १७ वा - अन्वयार्थ
भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे - राजन् - हे परीक्षित राजा - स्वभर्त्रा कश्यपेन - आपला पति जो कश्यप त्याने - इति उक्ता सा अदितिः - ह्याप्रमाणे उपदेशिलेली ती अदिती - द्वादशाहं - बारा दिवस - अतन्द्रिताः - दक्ष अशी - इदं व्रतम् वै अन्वतिष्ठत् - या पयोव्रताचे उत्तमरीतीने अनुष्ठान करिती झाली. ॥१॥ बुद्धिसारथिः - बुद्धि आहे मार्गदर्शक जिची अशी - मनसा इन्द्रियदुष्टाश्वान् प्रगृह्य - मनाच्या योगे इंद्रियरूपी दुष्ट घोडयांना आवरून - एकाग्रया बुद्धया - एकाग्र केलेल्या बुद्धीने - अखिलात्मनि भगवति - सर्वांचा आत्मा अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न - वासुदेवे मनः समाधाय - परमेश्वराच्या ठिकाणी मन लावून - च - आणि - एकया बुद्धया - एकाग्र बुद्धीने - महापुरुषम् ईश्वरं चिन्तयन्ती - पुरुषोत्तम परमेश्वराचे चिंतन करणारी - पयोव्रतं ह चचार - पयोव्रत खरोखर करिती झाली. ॥२-३॥ तात - बा परीक्षित राजा - पीतवासाः - पीतांबर परिधान केलेला, चार हातात - चतुर्बाहुः शङ्खचक्रगदाधरः - चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणारा - भगवान् आदिपुरुषः - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर - तस्याः (पुरः) प्रादुरभूत् - तिच्या समोर उभा राहिला. ॥४॥ - तं नेत्रगोचरं वीक्ष्य - तो परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहे असे पाहून - प्रीतीविह्वला - प्रेमाने विव्हल झालेली ती आदिती - सहसा उत्थाय - एकाएकी उठून - सादरं कायेन दंडवत् भुवि ननाम - शरीराने पृथ्वीवर आदरपूर्वक नमस्कार घालती झाली. ॥५॥ उत्थाय बद्धाञ्जलिः ईडितुं स्थिता - उठून व हात जोडून स्तुति करावयास लागलेली - सा आनन्दजलाकुलेक्षणा - आनन्दाश्रूंनी जिचे डोळे भरून आले आहेत, - पुलकाकुलाकृतिः - जिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत - तद्दर्शनात्युत्सवगात्रवेपथुः - व भगवंत दर्शनाने होणार्या आनंदाने जिच्या शरीराला कंप सुटला आहे - (ईडितुं) न उत्सेहे - अशी ती अदिती भगवंताची स्तुति करण्यास समर्थ झाली नाही - तूष्णीं बभूव - स्तब्ध राहिली. ॥६॥ कुरूद्वह - हे कुरूकुलश्रेष्ठा परीक्षिता - सा - ती - चक्षुषा रमापतिं यज्ञपतिं - नेत्राने लक्ष्मीपति व यज्ञमूर्ति अशा - जगत्पतिं पिबती इव - परमेश्वराला जणू काय पीतच आहे अशी - उद्वीक्षती (आसीत्) - त्याच्याकडे सारखी बघत राहिली - सा देवी अदितिः - ती अदिति देवी - प्रीत्या शनैः गद्गद्या गिरा - प्रेमाने हळूहळू अडखळणार्या वाणीने - हरिं तुष्टाव - परमेश्वराची स्तुति करिती झाली. ॥७॥ यज्ञेश यज्ञपुरुष अच्युत - हे यज्ञपते, हे यज्ञपुरुषा, हे अच्युता, - तीर्थपाद तीर्थश्रवः - हे पवित्रचरणकमला, हे पवित्रकीर्ते, - श्रवणमङगलनामधेय - हे कर्णाला गोड लागणार्या चांगल्या नावाच्या परमेश्वरा - आपन्नलोकवृजिनोपशमोदय - पीडित लोकांच्या पापाचे क्षालन करण्याकरिताच उदय पावणार्या - आद्य ईश भगवन् - हे अनादि व सर्वैश्वर्यसंपन्न परमेश्वरा - (त्वं) दीननाथः असि - तू दीनांचा रक्षक आहेस - नः शं कृघि - आमचे कल्याण कर. ॥८॥ विश्वाय - सर्वस्वरूपी - विश्वभवनस्थितिसंयमाय - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार करणार्या - स्वैरं - स्वच्छंदाने - गृहीतपुरुशक्तिगुणाय - मायेच्या अनेक गुणांना स्वीकारणार्या - भूम्ने - सर्वव्यापी - शश्वत् उपबृंहितपूर्णबोध - नित्य वृद्धिंगत होणार्या पूर्ण ज्ञानाने नाहिसे केले आहे - व्यापादितात्मतमसे - आत्म्याचे अज्ञान ज्याने अशा - स्वस्थाय हरये ते नमः - शांतचित्ताच्या तुला नमस्कार असो. ॥९॥ अनन्त - हे अनन्ता - तुष्टात् त्वत्तः - संतुष्ट झालेल्या तुझ्यापासून - नृणां - मनुष्यांना - परम् आयुः - ब्रह्मदेवाप्रमाणे दीर्घ आयुष्य - अभीष्टं वपुः - मनाजोगे शरीर - अतुल्यलक्ष्मीः - अपरंपार संपत्ति - द्यौर्भूरसाः - स्वर्ग, भूमि व रसातळ - सकलयोगगुणाः - सर्वयोगसिद्धी - त्रिवर्गः - धर्म, अर्थ व काम - केवलं ज्ञानं च - व शुद्ध ब्रह्मज्ञान - (एतानि) भवन्ति - ही प्राप्त होतात - सपत्नजयादिः आशीः किमु - शत्रूंवरील विजयादिकांची मग काय गोष्ट. ॥१०॥ राजन् भारत - हे राजा परीक्षिता - अदित्या एवं स्तुतः - अदितीने ह्याप्रमाणे स्तविलेला - पुष्करेक्षणः - कमळाप्रमाणे नेत्र असलेला - सर्वभूतानां क्षेत्रज्ञः भगवान् - सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा आत्माच असा श्रीविष्णु - इति ह उवाच - याप्रमाणे खरोखर म्हणाला. ॥११॥ देवमातः - हे अदिते - सपत्नैः हृतश्रीणां - शत्रूंनी ज्यांची संपत्ति हरण केली आहे अशा - स्वधामतः च्यावितानां पुत्राणां - स्वस्थानापासून भ्रष्ट केलेल्या पुत्रांचे - यत् भवत्याः चिरकाङ्क्षितं - जे तुझे फार दिवसापासूनचे इच्छित - (तत्) मे विज्ञातं - ते मला समजले आहे. ॥१२॥ समरे - युद्धात - दुर्मदान् तान् असुरर्षभान् विनिर्जित्य - उन्मत्त अशा त्या मोठमोठया दैत्यांना जिंकून - प्रतिलब्धजयश्रीभिः पुत्रैः - विजयश्री प्राप्त झालेल्या पुत्रांकडून - उपासितुं - सेवा केली जाण्यास - इच्छसि - तू इच्छितेस. ॥१३॥ इन्द्रज्येष्ठैः स्वतनयैः युधि आसाद्य - इंद्रप्रमुख आपल्या पुत्रांनी युद्धात गाठल्यामुळे - हतानां विद्विषां दुःखिताः रुदन्तीः स्त्रियः - मारिलेल्या शत्रूंच्या दुःखाने रडणार्या स्त्रियांना - द्रष्टुम् इच्छसि - पाहाण्यास इच्छितेस. ॥१४॥ त्वं - तू - प्रत्याहृतयशःश्रियः - परत मिळविली आहे कीर्ति व संपत्ति ज्यांनी अशा - सुसमृद्धान् - मोठया उत्कर्षाने युक्त अशा - नाकपृष्ठं अधिष्ठाय क्रीडतः आत्मजान् - स्वर्गात राहून खेळणार्या पुत्रांना - द्रष्टुम् इच्छसि - पाहाण्यास इच्छितेस. ॥१५॥ देवि - हे अदिति - प्रायः अधुना - बहुत करून हल्ली - ते असुरयूथनाथाः अपारणीयाः (सन्ति) - ते दैत्यसेनाधिपति जिंकिले जाण्यास फारच कठीण आहेत - इति मे मतिः - असे माझे मत आहे - यत् - कारण - ते अनुकूलेश्वरविप्रगुप्ताः (सन्ति) - ते दैत्य अनुकूल सामर्थ्यवान अशा ब्राह्मणांनी रक्षिलेले आहेत - तत्र (केवलः) विक्रमः सुखं न ददाति - त्या बाबतीत केवळ पराक्रम सुख देत नाही. ॥१६॥ देवि - हे अदिति - अथापि - तरीसुद्धा - ते व्रतचर्यया संतोषितस्य मम - तुझ्या व्रताचरणाने संतुष्ट झालेल्या मला - उपायः चिन्त्यः - उपाय शोधून काढला पाहिजे - मम अर्चनं - माझे पूजन - श्रद्धानुरूपं फलहेतुकत्वात् - श्रद्धेनुरूप फल देण्यास कारणीभूत असल्यामुळे - अन्यथा गन्तुं न अर्हति - फुकट जाण्यास योग्य नाही. ॥१७॥ त्वया - तू - अपत्यगुप्तये पयोव्रतेन अर्चितः - पुत्रांच्या रक्षणार्थ पयोव्रतनामक व्रताने पूजिलेला - च - आणि - अनुगुणं समेधितः - गुणानुरूप संतोषविलेला - अहं - मी - स्वांशेन ते पुत्रत्वम् उपेत्य - स्वतःच्या अंशाने तुझ्या पुत्रपणाला प्राप्त होऊन - मारीचतपसि अधिष्ठितः - कश्यपमुनीच्या तपश्चर्येच्या आधाराने राहिलेला - सुतान् गोप्तास्मि - पुत्रांचे रक्षण करीन. ॥१८॥ भद्रे - हे कल्याणि - पत्यौ एवंरूपं अवस्थितं - पतीच्या ठिकाणी अशा स्वरूपानेच - मां च भावयति - राहिलेल्या माझी कल्पना करून - अकल्मषं प्रजापतिं पतिम् उपधाव - निष्पाप असा जो पति कश्यपप्रजापति त्याची सेवा कर. ॥१९॥ देवि - हे अदिते - पृष्टया अपि (त्वया) - विचारिली गेलेल्याहि तुजकडून - कथंचन एतत् परस्मै न आख्येयम् - कोणत्याही कारणास्तव हे दुसर्याला सांगितले जाऊ नये - देवगुह्यं सर्वं सुसंवृतं संपद्यते - देवांचे रहस्य नीट गुप्त ठेवले असता सिद्धीस जाते. ॥२०॥ भगवान् - श्रीविष्णु - एतावत् उक्त्वा - इतके सांगून - तत्रैव अंतरधीयत - तेथेच गुप्त झाला - अदितिः आत्मनि प्रभोः हरेः - अदिती आपल्या उदरी समर्थ विष्णूच्या - दुर्लभं जन्म लब्ध्वा - दुर्लभ जन्माला मिळवून - परया भक्त्या - मोठया भक्तीने - कृतकृत्यवत् पतिं वै उपाधावत् - कृतार्थ झाल्याप्रमाणे पतीची सेवा करिती झाली. ॥२१॥ तत् - नंतर - अवितथेक्षणः सः कश्यपः - सत्यदृष्टीने पाहाणारा तो कश्यप - आत्मनि प्रविष्टं हरेः अंशं हि - आपल्या ठिकाणी परमेश्वराचा अंश शिरला आहे असे - समाधियोगेन अबुध्यत - समाधीच्या योगे जाणता झाला. ॥२२॥ राजन् - हे राजा - सः समाहितमनाः - तो स्वस्थ अंतःकरणाने - यथा अनिलः दारुणि अग्निं (तथा) - जसा वायु लाकडातील अग्नीला तसा - तपसा चिरसंभृतं वीर्यम् - तपश्चर्येने पुष्कळ स्तंभित केलेले वीर्य - अदित्यां आघत्त - अदितीच्या ठिकाणी स्थापिता झाला. ॥२३॥ हिरण्यगर्भः - ब्रह्मदेव - सनातनं - अनादि - भगवन्तं - ईश्वराला - अदितेः गर्भं धिष्ठितं - अदितीच्या गर्भात शिरलेला - विज्ञाय - जाणून - गुह्यनामभिः समीडे - गुप्त नावांनी स्तुति करिता झाला. ॥२४॥ उरुगाय भगवन् जय - अनेक लोकांनी गायिलेल्या हे ईश्वरा, तुझा जयजयकार असो - उरुक्रम ते नमः अस्तु - हे त्रिविक्रमा भगवंता, तुला नमस्कार असो - त्रिगुणाय - सत्त्वादि तीन गुणांनी युक्त - नमोनमः - अशा श्रीविष्णूला नमस्कार असो. ॥२५॥ पृश्निगर्भाय - पृथ्वीच्या गर्भात राहिलेल्या, - वेदगर्भाय वेधसे - वेद ज्याच्या गर्भी आहेत अशा, - त्रिनाभाय - प्रकाशमान, ज्याच्या नाभिस्थानी तिन्ही लोक राहतात, - त्रिपृष्ठाय - अशा त्रैलोक्याच्या वर राहणार्या, - शिपिविष्टाय - पशुरूपी जीवांमध्ये अन्तर्यामिरूपाने राहिलेल्या - ते विष्णवे नमः - व्यापक अशा तुला नमस्कार असो. ॥२६॥ त्वं भुवनस्य आदिः (असि) - तू जगाचा आदि आहेस - मध्यं अन्तः च (असि) - मध्य व शेवटहि तूच आहेस - यम् अनन्तशक्तिं पुरुषम् आहुः - ज्याला अनन्तशक्तियुक्त पुरुष म्हणतात - ईश - हे ईश्वरा - यथा गंभीरं स्रोतः - जसा उदकाचा गंभीर प्रवाह - अन्तः पतितं (पदार्थं तथा) - आत पडलेल्या पदार्थांना ओढितो तसा - कालः भवान् विश्वं आक्षिपति - कालस्वरूपी तू जगाला आकर्षितोस. ॥२७॥ देव - हे ईश्वरा - त्वं - तू - स्थिरजङगमानां - स्थावर व जंगम लोकांचा - प्रजानां प्रजापतीनां (च) संभविष्णुः वै असि - व प्रजापतीचा उत्पादक असा खरोखर आहेस - अप्सु मज्जतः नौ इव - उदकात बुडणार्या नौकेप्रमाणे - दिवः च्युतानां - स्वर्गातून भ्रष्ट झालेल्या - दिवौकसां परायणं (असि) - देवांना श्रेष्ठ आश्रय देणारा आहेस. ॥२८॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय सतरावा समाप्त |