श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ

प्रल्हादाचा असूर-बालकांना उपदेश -

प्राज्ञः - समंजस मनुष्याने - इह - ह्या मनुष्यजन्मी - कौ‌मारे - बालपणी - भागवतान् - भगवंताला प्रिय असे - धर्मान् - धर्म - आचरेत् - आचरावे - मानुषं जन्म - मनुष्याचा जन्म - दुर्लभः - दुर्लभ - तत् अपि अर्थदं - पुरुषार्थ प्राप्त करून देणारा मनुष्यजन्म तर - अध्रुवं - अनिश्चित ॥ १ ॥

यथा हि - जेणे करून खरोखर - इह - ह्या लोकी - पुरुषस्य विष्णोः - भगवान विष्णूची - पादोपसर्पणं - चरणसेवा - यत् - कारण - एषः - हा - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांचा - प्रियः - आवडता - आत्मा - आत्मा - सुहृद् - मित्र - ईश्वरः (अस्ति) - ईश्वर होय. ॥ २ ॥

दैत्याः - हे दैत्य हो - देहिनां - प्राण्यांना - ऐंद्रियकं - इंद्रियासंबंधी - सुखं - सुख - देहयोगेन - देहाच्या योगाने - अयत्नतः - यत्नावाचून - दैवात् - दैवयोगाने - सर्वत्र - सर्व ठिकाणी - लभ्यते - प्राप्त होते - यथा - जसे - दुःखम् - दुःख. ॥ ३ ॥

तत्प्रयासः - त्या सुखासाठी प्रयत्न - न कर्तव्यः - करू नये - यतः - ज्या प्रयत्नांमुळे - परं - केवळ - आयुर्व्ययः - आयुष्याचा व्यय - तथा - तशा प्रकारचे - क्षेमं - कल्याण - न विन्दते - प्राप्त होत नाही - (यथा) मुकुंदचरणांबुजं भजन् विन्दते - ज्या प्रकारचे परमेश्वराच्या चरणकमळाचे भजन करणार्‍याला मिळते. ॥ ४ ॥

ततः - त्याकरिता - भयं आश्रितः - भयरूप संसारात सापडलेल्या - कुशलः - विचारी पुरुषाने - यावत् - जोपर्यंत - पौरूषं - पुरुषरूप - शरीरं - शरीर - पुष्कलं (अस्ति) - पुष्ट आहे - न विपद्येत (तावत्) - विपत्तींनी ग्रासले नाही तोपर्यंत - यतेत - यत्न करावा. ॥ ५ ॥

हि - खरोखर - अजितात्मनः च पुंसः आयुः - आणि ज्याने मन जिंकिले नाही अशा पुरुषाचे आयुष्य - वर्षशतं (अस्ति) - शंभर वर्षे होय - तदर्धं - त्यातील अर्धे - निष्फलं (अस्ति) - फुकट जाते - यत् - कारण - असौ - हा - अंधं - भयंकर - तमः - अज्ञानात - प्रापितः - पडलेला - रात्र्यां - रात्री - शेते - निजतो. ॥ ६ ॥

बाल्ये - बाल्यावस्थेत - कौ‌मारे - आड वयात - क्रीडतः - खेळणार्‍या - मुग्धस्य - अविवेकी मनुष्याची - विंशतिः - विशी - याति - निघून जाते - जरया - म्हातारपणाने - ग्रस्त देहस्य अकल्पस्य - शरीर ग्रासले आहे अशा असमर्थ स्थितीत त्याची - विंशतिः - विशी - याति - निघून जाते. ॥ ७ ॥

गृहेषु - गृहकृत्यात - सक्तस्य - आसक्त झालेल्या - प्रमत्तस्य - उन्मत्त अशा - पुरुषस्य - पुरुषाचे - शेषं - बाकीचे आयुष्य - दूरापूरेण - दुःखाने पूर्ण होणार्‍या - कामेन - कामवासनेने - च - आणि - बलीयसा - अत्यंत बलिष्ठ अशा - मोहेन - मोहबंधनाने - अपयाति हि - खरोखर संपून जाते. ॥ ८ ॥

कः - कोणता - अजितेंद्रियः - इंद्रिये न जिंकलेला - पुमान् - पुरुष - गृहेषु सक्तं - गृहकृत्यात आसक्त झालेल्या - दृढैः स्नेहपाशैः बद्धं - बळकट स्नेहपाशांनी जखडून गेलेल्या - आत्मानं - स्वतःला - विमोचितुं - सोडविण्यास - उत्सहेत - समर्थ होईल. ॥ ९ ॥

कः - कोणता मनुष्य - नु - निश्चयेकरून - अर्थतृष्णां - द्रव्याच्या इच्छेला - विसृजेत् - सोडील - यः - जो अर्थ - प्राणेभ्यः अपिः - प्राणांहून सुद्धा - ईप्सितः (अस्ति) - इष्ट आहे - यं (च) - आणि ज्या द्रव्याला - तस्कर - चोर - सेवकः - चाकर - वणिक् च - आणि व्यापारी - प्रेष्ठैः असुभिः - अत्यंत प्रिय अशा प्राणांनी - क्रीणाति - विकत घेतो. ॥ १० ॥

सुहृत्सु - मित्रांच्या ठिकाणी - स्नेहसितः - स्नेहाने बद्ध झालेला - च - आणि - कलाक्षरांणा - बोबडे भाषण करणार्‍या - शिशूनां - बालकावर - अनुरक्तचित्तः - ज्यांचे मन आसक्त झाले आहे असा - पुत्रान् - पुत्रांना - ताः हृदय्याः दुहितृः - त्या हृदयंगम कन्यांना - भ्रातृन् - भावांना - वा - किंवा - स्वसृन् - बहिणींना - च - आणि - दीनौ पितरौ - दीन आईबापांना - च - आणि - मनोज्ञोरुपरिच्छदान् - आवडती पुष्कळ साहित्ये ज्यात आहेत अशा - गृहान् - घरांना - कुल्याः - कुलपरंपरागत अशा - वृत्तीः - वृत्तींना - च - आणि - पशुभृत्यवर्गान् - पशु व सेवकवर्ग यांना - स्मरन् - स्मरण करणारा - कोशस्कृत् इव - कोश करणार्‍या किडयाप्रमाणे - कर्माणि - अनेक कर्मे - ईहमानः - करणारा - लोभात् - लोभाने - अवितृप्तकामः - ज्याची इच्छा तृप्त झाली नाही असा - औपस्थ्यजैह्‌व्यं - उपस्थ व जिव्हा यापासून होणार्‍या सुखांना - बहु - उत्तम - मन्यमानः - मानणारा असा - दुरंतमोहः - ज्याचा मोह जाण्यास कठीण आहे असा मनुष्य - अनुकंपितायाः - जिने आपल्यावर प्रेम केले आहे अशा - प्रियायाः - पत्नीच्या - रहस्यं - एकांतांतील - संगं - संगाला - च - आणि - रुचिरान् - गोड गोड अशा - मंत्रान् - एकांतातील भाषणांना - कथं - कसा - त्यजेत - सोडील - कथं - कसा - विरज्येत - विरक्त होईल. ॥ ११-१३ ॥

प्रमत्तः - उन्मत्त पुरुष - कुटुंबपोषाय - कुटुंबाचे पोषण करण्याकरिता - वियत् - क्षीण होणार्‍या - निजायुः - स्वतःच्या आयुष्याला - विहतं - नष्ट होत असलेल्या - अर्थं - पुरुषार्थाला - न बुद्‌ध्यते - जाणत नाही - स्वकुटुंबरामः - आपल्या कुटुंबात रममाण झालेला - सर्वत्र - सर्वस्वी - तापत्रयदुःखितात्मा - त्रिविध तापाच्यायोगे ज्याचे मन दुःखित झाले आहे असा - न विरज्यते - विरक्त होत नाही. ॥ १४ ॥

वित्तेषु - द्रव्याच्या ठिकाणी - नित्याभिनिविष्टचेताः - ज्याचे चित्त नित्य गुंतले आहे असा मनुष्य - परवित्तहर्तुः - दुसर्‍याचे द्रव्य हरण करणार्‍याचा - इह - येथील - च - आणि - प्रेत्य - परलोकीचा - दोषं - अपराध - विद्वान् (अस्ति) - जाणत असतो - अथ अपि - तरी सुद्धा - अजितेंद्रियः - इंद्रिये न जिंकलेला - च - आणि - अशान्तकामः - इच्छा तृप्त न झालेला - कुटुंबी - कुटुंबवान पुरुष - तत् - ते दुसर्‍याचे द्रव्य - हरते - हरण करितो. ॥ १५ ॥

दनुजाः - दैत्यहो - इत्थं - याप्रमाणे - विद्वान् अपि - ज्ञानी पुरुष सुद्धा - कुटुंबं - कुटुंबाला - पुष्णन् - पोषणारा - स्वलोकाय - आत्मविचाराकरिता - न कल्पते - समर्थ होत नाही - यथा - तसा - विमूढः - अत्यंत अज्ञानी - यः - जो अज्ञानी - स्वीयपारक्यविभिन्नभावः - आपले व दुसर्‍यांचे असा भेदभाव उत्पन्न झाला आहे ज्यामध्ये असा - तमः - अंधनरकाला प्राप्त होतो. ॥ १६ ॥

यतः - कारण - अलं - सर्व बाजूंनी - दीनः - दीन झालेला पुरुष - यन्निगडः - जिच्या बंधनात सापडल्यामुळे - विसर्गः - पुत्रपौत्रादि संतति होते अशा - कामदृशां - कामवासना आहे डोळ्यांत ज्यांच्या अशा त्या स्त्रियांचा - विहारक्रीडामृगः - खेळण्यासाठी पाळलेला पशु असा - कश्चित् - कोणीही - क्वच - कोठेही - वा - अथवा - कुत्रचित् - कधीही - स्वं - स्वतः - आत्मानं - आपल्याला - विमोचितुं - मुक्त करण्यास - न समर्थः - समर्थ होत नाही. ॥ १७ ॥

ततः - याकरिता - दैत्याः - हे दैत्य हो - विषयात्मकेषु - विषयलंपट अशा - दैत्येषु - दैत्यांच्या - संगं - संगतीला - विदुरात् - अगदी दुरून - परिहृत्य - टाळून - आदिदेवं - सर्वांचा आदिभूत अशा - नारायणं - नारायणाला - उपेत - शरण जा - सः - तोच - मुक्तसंगैः - सर्वसंग सोडिलेल्या पुरुषांनी - अपवर्गः - मोक्ष - ईषितः - मानिला आहे. ॥ १८ ॥

हि - म्हणून - असुरात्मजाः - दैत्यबालकहो - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांचा - आत्मत्वात् - आत्मा असल्यामुळे - इह - येथे - सर्वतः - सर्वत्र - सिद्धत्वात् - सिद्ध असल्याकारणाने - अच्युतं - परमेश्वराला - प्रीणयतः - संतुष्ट करण्याला - बव्ह यासः - मोठा श्रम - न अस्ति - पडत नाही. ॥ १९ ॥

परावरेषु - लहानमोठया - ब्रह्मान्तस्थावरादिषु - स्थावरांपासून ब्रह्मदेवापर्यंत - भूतेषु - जीवांमध्ये - अथ - तसेच - भौतिकेषु विकारेषु - पृथ्वीसंबंधी घटादि विकारांमध्ये - च - आणि - महत्सु - मोठया अशा - भूतेषु - आकाशादि पंचमहाभूतांच्या ठिकाणी. ॥ २० ॥

गुणेषु - गुणांमध्ये - गुणसाम्ये - गुणांच्या साम्यावस्थेत - तथा - त्याप्रमाणेच - गुणव्यतिकरे - गुणांच्या विषमावस्थांचे परिणाम जे महत्तत्त्वादि त्यामध्ये - एकः एव हि - एकच खरोखर - परः - श्रेष्ठ - आत्मा - आत्मा - अव्ययः - नाशरहित - च - आणि - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - ईश्वरः (अस्ति) - ईश्वर वसत आहे. ॥ २१ ॥

स्वयं - स्वतः - प्रत्यगात्मस्वरूपेण - अंतर्यामीस्वरूपाने - च - आणि - दृश्यरूपेण - दृश्य जे भोग्य शरीर त्या रूपाने - व्याप्यव्यापकनिर्देश्यः हि - व्याप्य व व्यापक या नावांनी दाखविला जाणारा असताहि - अनिर्देश्यः - अमुक असा न दाखविला जाणारा - अविकल्पितः - ज्याची कल्पना करता येत नाही असा. ॥ २२ ॥

केवलानुभावानंदस्वरूपः - केवळ अनुभवात्मक आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा - परमेश्वरः - परमेश्वर - गुणसर्गया - जिचे गुणात्मक सृष्टि हे कार्य आहे अशा - मायया - मायेने - अंतर्हितैश्वर्यः - ज्याचे स्वरूप आच्छादिले आहे असा - ईयते - जाणिला जातो. ॥ २३ ॥

तस्मात् - याकरिता - आसुरं भावं - राक्षसी स्वभाव - उन्मुच्य - सोडून - सर्वेषु भूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - दयां - दया - सौहृदं - प्रेम - कुरुत - करा - यया - ज्या दयेच्या योगाने - अधोक्षजः - परमेश्वर - तुष्यति - संतुष्ट होतो. ॥ २४ ॥

तत्र आद्ये अनंते तुष्टे - तो आदि पुरुष परमेश्वर संतुष्ट झाला असता - अलभ्यं - मिळण्यास अशक्य असे - किं (अस्ति) - काय आहे - (ततः) च - आणि मग - गुणव्यतिकरात् - गुणांचा परिणाम करणारे जे दैव त्याच्या योगे - इह - ह्या लोकी - ये - जे - स्वसिद्धाः - आपोआप सिद्ध होणारे - धर्मादयः - धर्म, अर्थ व काम - तैः - त्यांच्याशी - किं (कर्तव्य अस्ति) - काय करावयाचे आहे - च - आणि - चरणयोः - परमेश्वराच्या चरणकमलांच्या - उपगायतां - गायन करणार्‍या - सारं जुषां - त्यातील सार ग्रहण करणार्‍या - नः - आम्हाला - अगुणेन कांक्षितेन - मोक्षाची इच्छा धरून - किं (प्रयोजनम्) - काय करावयाचे आहे. ॥ २५ ॥

धर्मार्थकामः - धर्म, अर्थ व काम - इति - असा - यः - जो - त्रिवर्गः - तीन प्रकारचा पुरुषार्थ - अभिहितः - वर्णिला आहे - ईक्षा - आत्मविद्या - त्रयी - कर्मविद्या - नयदमौ - तर्क व दंडनिती - विविधा - अनेक प्रकारच्या - वार्ता - उपजीविकेची साधने - तत् - ते - एतत् - हे - अखिलं - सर्व - निगमस्य (प्रतिपाद्यं) मन्ये - वेदांचा प्रतिपादण्याचा विषय असे मी मानतो - सत्यं (तु) - पण खरा प्रकार - स्वसुहृदः - अंतर्यामी अशा - परमस्य - श्रेष्ठ - पुंसः - पुरुष जो परमेश्वर त्यास - स्वात्मार्पणं एव - स्वतःचा आत्मा अर्पण करणे हेच होय. ॥ २६ ॥

नरसखः - नराचा सखा असा - नारायणः - नारायण - नारदाय - नारदाला - तत् - ते - एतत् - हे - दुरवापं - दुर्मिळ - अमलं - निर्मळ - ज्ञानं - ज्ञान - आह - सांगता झाला - तत् - ते ज्ञान - भगवतः - परमेश्वराच्या - पादारविंदरजसा - चरणकमलाच्या धुळीने - आप्लुतदेहिनां - ज्यांची शरीरे व्यापिली आहेत अशा - एकान्तिनां - एकनिष्ठ भक्ति करणार्‍या - अकिंचनानां - सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरुषांना - किल - निश्चयेकरून - स्यात् - प्राप्त होईल. ॥ २७ ॥

मया - माझ्याकडून - पूर्वं - पूर्वी - देवदर्शनात् - ज्याला निरंतर परमेश्वराचे दर्शन होते अशा - नारदात् - नारदापासून - एतत् - हे - भागवतं - परमेश्वरासंबंधी - धर्म - ज्यात धर्म सांगितले आहेत असे - शुद्धं - पवित्र - विज्ञानसंयुतं - अनुभाविक ज्ञानासह - ज्ञानं - ज्ञान - श्रुतं - ऐकिले गेले. ॥ २८ ॥

प्रल्हाद - बा प्रल्हादा - त्वं - तू - च - आणि - वयं - आम्ही - अपि - सुद्धा - एताभ्यां - ह्या - गुरुपुत्राभ्यां - गुरुपुत्र शंड व अमर्क ह्यांच्या - ऋते - शिवाय - अन्यं - दुसर्‍या - गुरुं - गुरुला - न विद्महे - जाणीत नाही - हि - कारण - बालानां अपि - अगदी आपल्या लहानपणापासूनचे सुद्धा - (एतौ एव) ईश्वरौ - हेच दोघे गुरु होत. ॥ २९ ॥

सौ‌म्य - बा मित्रा - अंतःपुरस्थस्य - अंतःपुरात राहणार्‍या - बालस्य - बालकाला - महत्संगः - सत्पुरुषांचा संग - दुरन्वयः (अस्ति) - दुर्घट होय - (नः) विश्रंभकारणं - आम्हाला विश्वास ठेवण्यासारखे कारण - स्यात् चेत् - जर असेल तर - नः - आमच्या - संशयं - संशयाला - छिंधि - दूर कर. ॥ ३० ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय सहावा समाप्त

GO TOP