|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय १ ला - अन्वयार्थ
प्रियव्रत-चरित्र - मुने आत्मारामः भागवतः प्रियव्रतः गृहे कथं अरमत यन्मूलः कर्मबंधः पराभवः शुकाचार्य आत्मस्वरूपी रममाण होणारा भगवद्भक्त असा प्रियव्रत राजा गृहस्थाश्रमात कसा रमला ज्यामुळे कर्मांचे बंधन आत्मस्वरूपाची विस्मृति ॥१॥ द्विजर्षभ तादृशानां मुक्तसंगानां पुंसां अयं गृहेषु अभिनिवेशः नूनं भवितुं न अर्हति हे ब्राह्मणश्रेष्ठा त्यांच्यासारख्या सर्वसंगपरित्याग पुरुषांना हा गृहस्थाश्रमाविषयी आग्रह निश्चयेकरून होण्याला योग्य नाही. ॥२॥ विप्रर्षे खलु उत्तमश्लोकपादयोः छायानिर्वृतचित्तानां महतां कुटुंबे स्पृहामतिः न (भवति) हे ब्रह्मर्षे निश्चयेकरून परमेश्वराच्या चरणांच्या छायेने संतुष्टचित्त झालेल्या सत्पुरुषांना कुटुंबांविषयी अभिलाषबुद्धि होत नाही. ॥३॥ ब्रह्मन् दारागारसुतादिषु सक्तस्य सिद्धिः च कृष्णे अच्युता मतिः अभूत् (इति) यत् अयं महान् संशयः हे शुकाचार्य स्त्री, घर व पुत्र यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्याला मोक्षसिद्धि आणि कृष्णाच्या ठिकाणी अढळ बुद्धि झाली, असे जे आहे हा मोठा संशय ॥४॥ बाढम् उक्तम् भगवतः उत्तमश्लोकस्य श्रीमच्चरणारविंदमकरंदरसे आवेशितचेतसः भागवतपरमहंसदयितकथां किंचिदंतरायविहतां स्वां शिवतमां पदवीं प्रायेण न हिन्वंति ठीक बोललास ऐश्वर्यवान अशा परमेश्वराच्या श्रीयुक्त चरणकमलांच्या मकरंदाच्या रसाच्या ठिकाणी आसक्तचित्त झालेले पुरुष परमहंस भगवद्भक्तांना प्रिय असलेल्या परमेश्वराच्या कथेला थोडयाशा विघ्नाने खंडित झालेला स्वतःचा अत्यंत कल्याणकारक असा मार्ग समजून बहुतकरून सोडीत नाहीत. ॥५॥ राजन् वाव ह यर्हि सः परमभागवतः राजपुत्रः प्रियव्रतः नारदस्य चरणोपसेवया अंजसा अवगतपरमार्थसतत्त्वः ब्रह्मसत्रेण दीक्षिष्यमाणः आम्नातप्रवरगुणगणैकान्तभाजनतया अवनितलपरिपालनाय स्वपित्रा उपामंत्रितः भगवति वासुदेवे एव अव्यवधानसमाधियोगेन समावेशितसकलकारकक्रियाकलापः यद्यपि तत् अप्रत्याम्नातव्यं तदधिकरणे असतः अपि आत्मनः अन्यस्मात् पराभवं अन्वीक्षमाणः न एव अभ्यनंदत् हे परीक्षित राजा खरोखर जेव्हा तो अत्यंत भगवद्भक्त असा राजपुत्र प्रियव्रत नारदाच्या चरणसेवेने सहज आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाची प्राप्ति झालेला आध्यात्मिक ज्ञानरूप यज्ञाची दीक्षा घेण्याची इच्छा बाळगणारा शास्त्रोक्त श्रेष्ठ गुणसमूहाचे भांडारच असा असल्यामुळे पृथ्वीचे रक्षण करण्याकरिता आपल्या पित्याकडून नेमिला गेला. ऐश्वर्यवान अशा वासुदेवाच्या ठिकाणीच अखंड अशा एकाग्र चित्ताने ठेविला आहे संपूर्ण इंद्रियांचा क्रियासमूह ज्याने असा जरी ते पित्याचे वचन मोडण्याला अयोग्य होते त्या राज्याधिकाराच्या ठिकाणी वास्तविक अस्तित्व नसलेल्या अशाहि आत्म्याहून इतर संसारादिकांपासून पराजयाला पहाणारा मनापासून स्वीकारिता झाला नाहीच. ॥६॥ अथ ह एतस्य गुणसर्गस्य परिबृंहणानुध्यानसकलजगदभिप्रायः आत्मयोनिः अखिलनिगमनिजगणपरिवेष्टितः भगवान् आदिदेवः स्वभवनात् अवततार नंतर ह्या त्रिगुणात्मक सृष्टीची वाढ कशी होईल ह्या चिंतनाने सगळ्या जगाचा अभिप्राय जाणणारा स्वयंभू संपूर्ण वेदरूपी आपल्या गणाने वेष्टित असा ऐश्वर्यवान असा ब्रह्मदेव आपल्या सत्यलोकाहून खाली आला. ॥७॥ सः तत्रतत्र गगनतले उडुपतिः इव अनुपथं विमानावलिभिः अमरपरिवृढैः अभिपूज्यमानः च पथिपथि वरूथशः सिद्धगंधर्वसाध्यचारणमुनिगणैः उपगीयमानः गंधमादनद्रोणीं अवभासयन् उपससर्प तो त्या त्या आकाशात चंद्राप्रमाणे जागोजागी विमानपंक्तीनी युक्त अशा देवेंद्रादिकांनी पूजिलेला आणि रस्तोरस्ती थव्याथव्यांनी सिद्ध, गंधर्व, साध्य, चारण व मुनिगणांनी गाइलेला गंधमादन पर्वताच्या गुहेला प्रकाशित करीत असा प्राप्त झाला. ॥८॥ वा तत्र ह हंसयानेन एनं भगवंतं हिरण्यगर्भं पितरं उपलभमानः पितापुत्राभ्यां सह देवर्षिः सहसा एव अर्हणेन उत्थाय अवहितांजलिः उपतस्थे आणि तेथेच हंसरूप वाहनावरून आलेल्या ह्या ऐश्वर्यवान हिरण्यगर्भ पित्याला जाणणारा पिता मनु व पुत्र प्रियव्रत यांसह नारद ऋषि तत्काळच पूजासाहित्य घेऊन उठून हात जोडलेला असा स्तुति करिता झाला. ॥९॥ भारत तदुपनीतार्हणः सूक्तवाक्येन अतितरां उदितगुणगणावतारसुजयः आदिपुरुषः भगवान् अपि सदयहासावलोकः प्रियव्रतं इति ह आह हे भरतकुलोत्पन्न परीक्षित राजा त्या नारदाने अर्पिली आहे पूजा ज्याला असा मधुरपणे बोललेल्या शब्दाने अतिशयेकरून गुणसमूह, अवतार व सर्वोत्कर्षता यांचे वर्णन केलेला आद्यपुरुष ब्रह्मदेवसुद्धा सप्रेम हास्यपूर्वक अवलोकन करणारा असा प्रियव्रताला याप्रमाणे खरोखर म्हणाला. ॥१०॥ तात इदं ऋतं ब्रवीमि निबोध अप्रमेयं देवं असूयितुं मा अर्हसि भवः ते ततः एषः महर्षिः वयं सर्वे विवशाः यस्य दिष्टं वहाम बा प्रियव्रता हे खरे सांगतो ऐक ज्याचे मोजमाप करता येत नाही अशा देवाला दोषदृष्टीने पहाण्यास तू योग्य नाहीस. शंकर तुझा पिता हा नारद ऋषि आम्ही सगळे पराधीन असे ज्याच्या आज्ञेला धारण करितो. ॥११॥ कश्चित् तनुभृत् तस्य कृतं विहंतुं तपसा वा विद्यया न विभूयात् योगवीर्येण वा मनीषया न विभूयात् अर्थधर्मैः स्वतः वा परतः न एव (विभूयात्) कोणी देहधारी मनुष्य त्याच्या कृतीला नाश करण्याविषयी तपश्चर्येने अथवा विद्येने समर्थ होत नाही. योगरूप पराक्रमाने अथवा सामादि बुद्धिबलाने समर्थ होत नाही. अर्थ व धर्म यांच्या योगाने स्वतःकडून अथवा दुसर्याकडून समर्थ होतच नाही. ॥१२॥ अंग जनता भवाय नाशाय च कर्म कर्तुं शोकाय मोहाय सदा भयाय सुखाय च दुःखाय अव्यक्तदिष्टं देहयोगं धत्ते हे प्रियव्रता जनसमुदाय जन्मासाठी, मरणासाठी आणि कर्म करण्याकरिता, शोकाकरिता, मोहाकरिता निरंतर भयाकरिता, सुखाकरिता आणि दुःखाकरिता अव्यक्त अशा ईश्वराने दिलेल्या देहरूपी साधनाला धारण करितो. ॥१३॥ वत्स वयं यद्वाचि तन्त्यां सुदुस्तरैः गुणकर्मदामभिः सुयोजिताः सर्वे नसि प्रोताः चतुष्पदः द्विपदे इव ईश्वराय बलि वहामः हे वत्सा आम्ही ज्याच्या वेदवाणीरूप दावणीत अत्यंत दुस्तर अशा गुणरूपी व कर्मरूपी दाव्यांनी घट्ट बांधलेले असे सर्व नाकात वेसण घातलेले पशु मनुष्याला जसे तसे ईश्वराला बळी अर्पण करितो. ॥१४॥ हि अंग नाथः यत् अयुङ्क्त तत् तत् आस्थाय ईशाभिसृष्टं गुणकर्मसंगात् सुखं वा दुःखं चक्षुष्मता नीयमानाः अंधाः इव अवरुंध्महे कारण हे प्रियव्रता परमेश्वर ज्या योनीत योजना करितो त्या त्या योनीला स्वीकारून ईश्वराने दिलेले गुण व कर्म यांच्या संगाने सुख अथवा दुःख डोळसाने नेलेल्या आंधळ्याप्रमाणे स्वीकारितो. ॥१५॥ यथा अनुभूतं प्रतियातनिद्रः अभिमानशून्यः आरब्धं अश्नन् तावत् स्वदेहं बिभृयात् किंतु अन्यदेहाय गुणान् न वृंक्ते ज्याप्रमाणे स्वप्नात अनुभवलेले जागा झालेला निरभिमानी असा पुरुष प्रारब्धकर्म भोगीत आहे तोपर्यंत आपल्या देहाला धारण करितो परंतु दुसर्या जन्मीच्या देहाकरिता गुणांना स्वीकारीत नाही. ॥१६॥ प्रमत्तस्य वनेष्वपि भयं स्यात् यतः सः सहषट्सपत्नः आस्ते जितेंद्रियस्य आत्मरतेः बुधस्य गृहाश्रमः नु किं अवद्यं करोति अजितेंद्रियाला अरण्यातसुद्धा भय असते ज्याअर्थी तो षड्रिपूंनी युक्त असा असतो जितेंद्रिय अशा आत्मस्वरूपी रत झालेल्या ज्ञान्याचा गृहस्थाश्रम निश्चयेकरून काय वाईट करणार आहे ॥१७॥ यः षट्सपत्नान् विजिगीषमाणः पूर्वं गृहेषु निर्विश्य यतेत विपश्चित् दुर्गाश्रितः ऊर्जितारीन् अत्येति क्षीणेषु कामं विचरेत् जो षड्रिपूंना सर्वथा जिंकण्याची इच्छा करणारा आहे प्रथम गृहस्थाश्रमात प्रवेश करून प्रयत्न करितो. विद्वान् किल्ल्याचा आश्रय करून प्रबल शत्रूंना जिंकतो. ते शत्रु नष्ट झाले असता यथेच्छ हिंडतो. ॥१८॥ त्वं तु अब्जनाभांघ्रिसरोजकोशदुर्गाश्रितः निर्जितषट्सपत्नः इह पुरुषातिदिष्टान् भोगान् भुंक्ष्व विमुक्तसंगः प्रकृतिं भजस्व तूं तर पद्मनाभाच्या चरणकमलकोशरूपी किल्ल्याचा आश्रय करणारा षड्रिपूंना जिंकलेला असा येथे ईश्वराने दिलेल्या भोगांना भोग सर्वसंगपरित्याग केलेला असा स्वस्वरूपाला सेवन कर. ॥१९॥ इति समभिहितः महाभागवतः त्रिभुवनगुरोः भगवतः अनुशासनं आत्मनः लघुतया अवनतशिरोधरः बाढं इति सबहुमानं उवाह याप्रमाणे उपदेशिलेला मोठा भगवद्भक्त प्रियव्रतराजा त्रैलोक्याचा स्वामी अशा ब्रह्मदेवाच्या उपदेशाला स्वतःच्या लहानपणाने वाकविली आहे मान ज्याने असा ठीक आहे असे म्हणून मोठया आदराने स्वीकारिता झाला. ॥२०॥ मनुना यथावत् उपकल्पितापचितिः भगवान् अपि प्रियव्रतनारदयोः अविषमं अभिसमीक्षमाणयो अवाङ्मनसं अव्यवहृतं क्षयं प्रवर्तयन् आत्मसमवस्थानं अगमत् मनूने यथाविधि केली आहे पूजा ज्याची असा ब्रह्मदेवसुद्धा प्रियव्रत व नारद हे विषमभाव न धरता पहात असताना वाणी व मन ह्यांचा विषय नव्हे अशा सांसारिक व्यवहार जेथे कुंठित होतो अशा स्थानाला मनांत घोळवीत स्वतःच्या उत्तम निवासस्थानाला जाता झाला. ॥२१॥ एवं परेण प्रतिसंधितमनोरथः मनुः अपि सुरर्षिवरानुमतेन आत्मजं अखिलधरामंडलस्थितिगुप्तये आस्थाप्य स्वयं अतिविषमविषय विषजलाशयाशायाः उपरराम याप्रमाणे ब्रह्मदेवाने ज्याचे मनोरथ पूर्ण केले आहेत असा मनुसुद्धा नारदाच्या संमतीने मुलाला संपूर्ण पृथ्वीमंडलाच्या रचनेच्या रक्षणाकरिता स्थापन करून स्वतः अत्यंत कठीण अशा विषयरूपी विषाचा डोहच अशा आशेपासून विराम पावला. ॥२२॥ इति ह वाव सः जगतीपतिः ईश्वरेच्छया अधिनिवोशित कर्माधिकारः अखिलजगद्बंधध्वंसनपरानुभावस्य भगवतः आदिपुरुषस्यअङ्घ्रियुगलानवरतध्यानानुभावेन परिरंधितकषायाशयः अवदातः अपि महतां मानवर्धनः महीतलं अनुशशास याप्रमाणे खरोखर तो पृथ्वीपति प्रियव्रत ईश्वराच्या इच्छेने मिळाला आहे राज्य करण्याचा अधिकार ज्याला असा संपूर्ण जगाच्या बंधनाचा विच्छेद करणारे आहे श्रेष्ठ सामर्थ्य ज्याचे अशा ऐश्वर्यवान अशा परमेश्वराच्या चरणकमलांच्या सतत ध्यानाच्या सामर्थ्याने ज्याच्या अंतःकरणातील रागादि मल दग्ध झाले आहेत असा उदार असूनसुद्धा मोठयांचा मान वाढविणारा असा पृथ्वीला पाळिता झाला. ॥२३॥ अथ च बर्हिष्मती नाम विश्वकर्मणः प्रजापतेः दुहितरं उपयेमे तस्यां उ ह वाव आत्मसमानशीलगुणकर्मोदारान् दश आत्मजान् च यवीयसीं ऊर्जस्वतीं नाम कन्यां भावयांबभूव नंतर आणखी बर्हिष्मती नावाच्या विश्वकर्मा नामक प्रजापतीच्या मुलीला वरिता झाला. तिच्या ठिकाणी खरोखर आपल्यासारखे शील, गुण व पराक्रम याच्या योगाने उदार अशा दहा मुलांना आणि त्याहून लहान अशा ऊर्जस्वती ह्या नावाच्या मुलीला उत्पन्न करिता झाला. ॥२४॥ आग्नीध्रेध्मजिह्वयज्ञबाहुमहावीरहिरण्यरेतोघृतपृष्ठसवनमेधातिथिवीतिहोत्रकवयः इति सर्व एव अग्निनामानः आग्नीध्र, इध्मजिव्ह, यज्ञबाहु, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथि, वीतिहोत्र आणि कवि असे सगळेच अग्निवाचक आहेत नावे ज्यांची असे होते. ॥२५॥ एतेषां कविः महावीरः सवनः इति त्रयः ऊर्ध्वरेतसः आसन् ते अर्भभावात् आरभ्य आत्मविद्यायां कृतपरिचयाः पारमहंस्यं आश्रमम् एव अभजन् ह्यांमध्ये कवि, महावीर, सवन असे तीन ब्रह्मचारी होते, ते लहानपणापासून अध्यात्मविद्येच्या ठिकाणी केला आहे अभ्यास ज्यानी असे परमहंससंबंधी आश्रमालाच सेविते झाले. ॥२६॥ तस्मिन् उ ह वा उपशमशीलाः परमर्षयः सकलंजीवनिकायावासस्य भीतानां शरणभूतस्य भगवतः वासुदेवस्य श्रीमच्चरणारविंदाविरत स्मरणाविगलित परम भक्तियोगानुभावेन परिभावितांतर्हृदयाधिगते भगवति सर्वेषां भूतानां आत्मभूते प्रत्यगात्मनि एव अविशेषेण आत्मनः तादात्म्यं समीयुः त्या आश्रमामध्येच शांत स्वभावाचे असे श्रेष्ठ ऋषि संपूर्ण जीवसमूहाचा आधार अशा भीतिग्रस्त जनांना आश्रयभूत अशा ऐश्वर्यवान श्रीकृष्णाच्या श्रीमत् चरणकमलांच्या निरंतर चिंतनाने आणि अखंडित अशा श्रेष्ठ भक्तियोगाच्या प्रभावाने शुद्ध झालेल्या अंतःकरणांत अनुभवास आलेल्या ऐश्वर्यवान अशा संपूर्ण प्राण्यांच्या अंतर्यामी असलेल्या चित्स्वरूपी परमेश्वराच्या ठिकाणीच सर्वस्वी आत्म्याच्या एकत्वाला प्राप्त झाले. ॥२७॥ अन्यस्यां जायायां अपि उत्तमः तामसः रैवत इति मन्वंतराधिपतयः त्रयः पुत्राः आसन् दुसर्या स्त्रीच्या ठिकाणीसुद्धा उत्तम, तामस, रैवत असे मन्वंतराचे स्वामी असे तीन मुलगे त्या प्रियव्रताला झाले. ॥२८॥ अथ एवं स्वतनयेषु उपशमायनेषु महामनाः जगतीपतिः अव्याहताखिलपुरुषकारसारसंभृतदोर्दंडयुगलापीडितमौर्वीगुणस्तनितविरमितधर्मप्रतिपक्षः अनुदिनं बर्हिष्मत्याः एधमानप्रमोदप्रसरणयौषिण्यव्रीडाप्रमुदितहासावलोकरुचिरक्ष्वेल्यादिभिः पराभूयमानविवेकः इव च अनवबुध्यमानः इव जगतीं परिवत्सराणां एकादश अर्बुदानि बुभुजे नंतर याप्रमाणे आपणाला शांतीचे निवासस्थान असे पुत्र झाले असता थोरमनाचा असा पृथ्वीचा पालक प्रियव्रत राजा अकुंठित अशा संपूर्ण पुरुषार्थरूपी बलाने परिपूर्ण अशा दोन भुजदंडांनी ओढलेल्या धनुष्याच्या दोरीच्या ध्वनीने धर्माच्या शत्रूंना नष्ट करणारा असा दिवसानुदिवस बर्हिष्मतीच्या वाढणार्या हर्षाने उत्थापन देणे इत्यादि स्त्रियांना उचित असे शृंगारविलास, लज्जेने चोरून हास्ययुक्त अवलोकन व मनोहर थट्टेची भाषणे इत्यादिकांनी नष्ट झाला आहे विवेक ज्याचा असाच जणू आणि अज्ञानीच की काय असा पृथ्वीला एक अब्ज दहा कोटी वर्षे भोगिता झाला. ॥२९॥ भगवान् आदित्यः सुरगिरिं अनुपरिक्रमन् वसुधातलं यावत् अवभासयति तावत् अर्धेन एव प्रतपति अर्धेन अवच्छादयति तदा हि भगवदुपासनोपचितातिपुरुषप्रभावः तत् अनभिनंदन् समजवेन ज्योतिर्मयेन रथेन रजनीं अपि दिनं करिष्यामि इति द्वितीयः पतंगः इव सप्तकृत्वः तरणिं अनुपर्यक्रामत् भगवान सूर्य मेरु पर्वताला प्रदक्षिणा करणारा असा भूमंडलाला जो प्रकाशित करतो तो अर्ध्या बाजूनेच प्रकाशित करतो अर्ध्या भागाने झाकून टाकितो. त्यामुळे खरोखर परमेश्वराच्या उपासनेने ज्याच्या ठिकाणी अमानुष पराक्रम वाढला आहे असा तो राजा ती गोष्ट न आवडणारा असा सूर्यासारख्या वेगवान अशा तेजःपुंज रथाने रात्रीलासुद्धा दिवस करीन असा विचार मनात आणून दुसर्या सूर्याप्रमाणे सातवेळा पृथ्वीला प्रदक्षिणा करिता झाला. ॥३०॥ वा उ ह ये तद्रथचरणनेमिकृतपरिखाः ते सप्त सिंधवः आसन् यतः एव भुवः सप्त द्वीपाः कृताः खरोखर जे ते सात समुद्र झाले ज्यांच्यामुळेच भूमीचे सात द्वीप नावाचे भाग केले गेले. ॥३१॥ जंबूप्लक्षशाल्मलिकुशक्रौंचशाकपुष्करसंज्ञा तेषां परिमाणं पूर्वस्मात् पूर्वस्मात् उत्तरः उत्तरः यथासंख्यं बहिः द्विगुणमानेन समंततः उपक्लृप्ताः जंबू, प्लक्ष, शाल्मलि, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर या नावाची ती सात द्वीपे होत. त्यांचे प्रमाण पहिल्या पहिल्यापेक्षा दुसरा दुसरा अनुक्रमाने बाहेरील बाजूने दुपटीच्या मानाने सभोवार रचलेले आहेत. ॥३२॥ क्षारोदेक्षुरसोदसुरोदघृतोदक्षीरोदधिमंडोदशुद्धोदाः सप्त जलधयः सप्तद्वीपपरिखाः इव अभ्यंतरद्वीपसमानाः एकैकश्येन यथानुपूर्वं सप्तसु द्वीपेषु अपि बहिः पृथक् परितः उपकल्पिताः तेषु जंब्वादिषु बर्हिष्मतीपतिः अनुव्रतान् आग्नीध्रेध्मजिह्वयज्ञबाहुहिरण्यरेतोघृतपृष्ठमेधातिथिवीतिहोत्रसंज्ञान् आत्मजान् यथासंख्यं एकैकस्मिन् एकम् एव अधिपतिं विदधे क्षारसमुद्र, इक्षुरससमुद्र, मद्यसमुद्र, घृतसमुद्र, क्षीरसमुद्र, दधिमंडसमुद्र व शुद्धोदकसमुद्र असे सात समुद्र जणु काय सात द्वीपांचे खंदकच असे आंतील द्वीपांएवढे एक समुद्र एक द्वीप अशा क्रमाने पूर्वीप्रमाणे सात द्वीपांच्या देखील बाहेर निराळे सभोवार रचलेले आहेत त्या जंबूआदि द्वीपांच्या ठिकाणी प्रियव्रत राजा आज्ञाधारक अशा आग्नीध्र, इध्मजिह्व, यज्ञबाहु, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथि व वीतिहोत्र या नावाच्या मुलांना अनुक्रमाने एकेक द्वीपाच्या ठिकाणी एकालाच राजा करिता झाला. ॥३३॥ च ऊर्जस्वतीं नाम दुहितरं उशनसे प्रायच्छत् यस्यां देवयानी नाम काव्यसुता आसीत् आणि ऊर्जस्वती नावाच्या मुलीला शुक्राला देता झाला, जिच्या ठिकाणी देवयानी नावाची शुक्राचार्यांची मुलगी झाली. ॥३४॥ तदंघ्रिरजसा जितषङ्गुणानां पुंसां एवंविधः पुरुषकारः चित्रं न यत् विदूरविगतः उरुक्रमस्य नामधेयं सकृत् आददीत सः अधुना बंधं जहाति परमेश्वराच्या चरणरजाच्या योगाने षडिंद्रिये जिंकलेल्या अशा पुरुषांचा अशाप्रकारचा पराक्रम आश्चर्यकारक नाही कारण अंत्यजसुद्धा परमेश्वराचे नाव एकवार उच्चारण करील तो तत्काळ बंधनाला सोडून जातो. ॥३५॥ एवं अमितबलपराक्रमः सः एकदा तु देवर्षिचरणानुशयनानुपतितगुण-विसर्गसंसर्गेण आत्मानं अनिर्वृतं इव मन्यमानः आत्मनिर्वेदः इदं आह याप्रमाणे अगणित बल व पराक्रम ज्याचे आहेत असा तो प्रियव्रत राजा एका प्रसंगी तर नारदाच्या चरणाश्रयानंतर पडलेल्या राज्यादिप्रपंचाच्या संबंधाने स्वतःला सुखरहित असे मानणारा अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झालेला असा हे म्हणाला. ॥३६॥ अहो असाधु अनुष्ठितं यत् अहं इंद्रियैः अविद्यारचितविषमविषयांधकूपे अभिनिवेशितः तत् अलं अलं अमुष्याः वनितायाः विनोदमृगं मां धिक् धिक् इति गर्हयांचकार अहो वाईट झाले की मी विषयलंपट झालेल्या इंद्रियांनी अविद्येने रचलेल्या कठिण विषयरूपी अंधार्या विहिरीत ढकलिला गेलो. तरी पुरे पुरे ह्या स्त्रीचा क्रीडामृग अशा मला वारंवार धिक्कार असो याप्रमाणे निंदिता झाला. ॥३७॥ परदेवताप्रसादाधिगतात्मप्रत्यवमर्शेन स्वयं निहितनिर्वेदः हृदि गृहितहरिविहारानुभावः अनुप्रवृत्तेभ्यः पुत्रेभ्यः इमां यथादायं विभज्य च सहमहाविभूतिं भुक्तभोगां महिषीं मृतकं इव अपहाय भगवतः नारदस्य पदवीं एव पुनः अनुससार श्रेष्ठ दैवत जो विष्णु त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या आत्मानात्मविवेकामुळे स्वतः वैराग्य धारण केलेला हृदयामध्ये धारण केलेल्या भगवंताच्या पराक्रमविषयक कथांमुळे सर्वसंगपरित्यागाचे सामर्थ्य आहे ज्याला असा प्रियव्रतराजा आज्ञापालक अशा मुलांना ह्या पृथ्वीला वाटणीप्रमाणे विभागून देऊन आणि मोठया संपत्तीसह उपभोगिलेल्या स्त्रीला प्रेताप्रमाणे सोडून ऐश्वर्यवान अशा नारदाने सांगितलेल्या मार्गालाच पुनः अवलंबिता झाला. ॥३८॥ तस्य ह वा एते श्लोकाः ईश्वरं विना कः नु कुर्यात् यः छायां घ्नन् नेमिनिम्नैः सप्त वारिधीन् अकरोत् त्यासंबंधाचे खरोखर हे श्लोक परमेश्वराशिवाय कोण खरोखर करील जो अंधकाराला नाहीसा करीत रथचक्राच्या धावेने पाडिलेल्या खडड्यांनी सात समुद्रांना करिता झाला. ॥३९॥ येन सरिद्भिरिवनादिभिः भूसंस्थानं कृतं च भूतनिर्वृत्यै द्वीपेद्वीपे विभागशः सीमा ज्याने नद्या, पर्वत व अरण्ये इत्यादिकांनी पृथ्वीची रचना केली आणि प्राण्यांच्या सुखाकरिता प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळी मर्यादा ॥४०॥ यः पुरुषानुजनप्रियः भौमं दिव्यं मानुषं च कर्मयोगजं महित्वं निरयौपम्यं चक्रे जो ईश्वरभक्तांवर प्रेम करणारा असा भूमिसंबंधी स्वर्गसंबंधी मनुष्यसंबंधी आणि कर्मापासून उत्पन्न होणारे वैभव नरकतुल्य करिता झाला. ॥४१॥ पंचम स्कन्धः - अध्याय पहिला समाप्त |