![]() |
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २३ वा - अन्वयार्थ
कर्दम आणि देवहूती यांचा विहार - पितृभ्याम् - मातापितरांनी प्रस्थिते - प्रस्थान केले असता इङ्गितकोविदा - हृद्गत जाणणारी अशी साध्वी - पतिव्रता देवहूती पतिम् - पतीला भवानी - पार्वती प्रभुम् भवम् - भगवान शंकराला इव - जशी तथा - तशी नित्यम् - नेहमी प्रीत्या - प्रीतीने पर्यचरत् - सेविती झाली ॥१॥ भोः - हे विदुरा अप्रमत्ता - असावध न राहणारी अशी नित्यम् - नेहमी उद्यता - कार्यतत्पर अशी सा - ती देवहूती विश्रम्भेण - विश्वासाने आत्मशौचेन - शारीरिक व मानसिक शुद्धतेने गौरवेण - आदराने दमेन - इन्द्रियनिग्रहाने शुश्रूषया - सेवेने च - आणि सौहृदेन - प्रेमाने च - आणि मधुरया - मधुर अशा वाचा - वाणीने कामम् - विषयभोगांच्या इच्छेला दम्भम् - कपटाला द्वेषम् - द्वेषाला लोभम् - लोभाला अघम् - निषिद्धाचरणाला च - आणि मदम् - उन्मत्तपणाला विसृज्य - टाकून तेजीयांसम् - अत्यंत तेजस्वी तम् - त्या कर्दमाला अतोषयत् - संतुष्ट करती झाली ॥२-३॥ सः - तो देवर्षिवर्यः - देवर्षिश्रेष्ठ कर्दम वै - खरोखर कृपया - दयेच्या योगाने पीडितः - पीडित झालेला असा समनुव्रताम् - उत्तमप्रकारे सेवा करणार्या अशा मानवीम् - मनुकन्या अशा दैवात् - प्रारब्धापेक्षा गरीयसः - अत्यंत श्रेष्ठ अशा पत्युः - पतीपासून महाशिषः - मोठ्या मनोरथांना आशासानाम् - इच्छिणार्या अशा भूयसा - पुष्कळ कालेन - काळाने क्षामाम् - क्षीण झालेल्या अशा व्रतचर्यया - व्रतांच्या आचरणाने कर्शिताम् - कृश झालेल्या अशा ताम् - त्या देवहूतीला प्रेमगद्गदया - अस्पष्ट अशा वाचा - वाणीने अब्रवीत - बोलता झाला ॥४-५॥ मानवि - हे मनुकन्ये अहम् - मी अद्य - आज मानदायाः - मान देणार्या अशा तव - तुझ्या परमया - उत्तम शुश्रूषया - सेवेने च - आणि परया - उत्कृष्ट भक्त्या - भक्तीने तुष्टः - संतुष्ट झालेला अस्मि - आहे देहिनाम् - प्राण्यांना अतीव - अतिशय सुहृत् - प्रिय असा यः - जो स्वदेहः - आपला देह अयम् - हा समुचितः अपि - स्तुत्य असूनही मदर्थे - माझ्याकरिता क्षपितुम् - झिजविण्यास न अवेक्षितः - गणिलेला नाही ॥६॥ स्वधर्मनिरतस्य - स्वधर्मात अनुरक्त अशा मे - माझी तपःसमाधिविद्या - तपश्चर्या, समाधि व उपासना यांमध्ये आत्मयोगविजिताः - जी चित्ताची एकाग्रता तिच्या योगाने प्राप्त झालेले ये - जे भगवत्प्रसादाः - श्रीहरीचे प्रसाद सन्ति - आहेत अभयान् - ज्यांमध्ये भय नाही अशा अशोकान् - व ज्यामध्ये शोक नाही अशा मदनुसेवया - माझ्या नित्य सेवेने ते - तुजकडून अवरुद्धान् - मिळविलेल्या अशा तान् एव - त्या दिव्य भोगांनाच प्रपश्य - अवलोकन कर ते - तुला दृष्टिम् - दृष्टि वितरामि - देतो ॥७॥ उरुक्रमस्य - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा श्रीहरीच्या भ्रुवः - भ्रुकुटीच्या उद्विजृम्भविभ्रंशितार्थरचनाः - वक्रतेने नष्ट केले आहेत मनोरथ ज्यातील असे अन्ये - दुसरे भोग पुनः - पुनः किम् - काय त्वम् - तू सिद्धा - सिद्ध असि - आहेस अतः - यास्तव नरैः - मनुष्यांनी नृपविक्रियाभिः - राजांच्या भोग्य संपत्तीने दुरधिगान् - मिळविण्यास अशक्य अशा निजधर्मदोहान् - स्वतःच्या पातिव्रत्यधर्माने प्राप्त झालेल्या अशा दिव्यान् - दिव्य भोगान् भुङ्व - भोगांचा उपभोग घे ॥८॥ अबला - अबला अशी देवहूती अखिलयोगमायाविद्याविचक्षणम् - संपूर्ण योगमाया व त्यांच्या उपासना यांमध्ये निपुण अशा एवम् - याप्रमाणे ब्रुवाणम् - बोलणार्या अशा पतिम् - पतीला अवेक्ष्य - पाहून गताधिः - गेली आहे चिंता जिची अशी आसीत् - झाली ईषद्व्रीडावलोकविलसद्धसितानना - लज्जायुक्त पाहण्याने जिचे हास्ययुक्त मुख शोभत आहे सा - अशी ती देवहूती संप्रश्रयप्रणयविह्वलया - विनय व प्रेम यांनी अस्पष्ट अशा वाचा - वाणीने आह - म्हणाली ॥९॥ विभो - प्रभो द्विजवृष - हे ब्राह्मणश्रेष्ठा भर्तः - हे स्वामिन् एतत् - हे आमोघयोगमायाधिपे - अमोघ अशा योगमायेचा अधिपति अशा त्वयि - तुझ्या ठिकाणी राद्धम् - सिद्ध अस्ति - आहे तत् - ते अहम् - मी बत - खरोखर अवैमि - जाणत आहे यः - जो समयः - संकेत ते - तुजकडून अभ्यधायि - सांगितला गेला सः - तो अङगसङग - समागम सकृत - एकवार भूयात - व्हावा गरियसि - अतिशय श्रेष्ठ अशा पतीपासून प्रसवः - अपत्यप्राप्ति सतीनाम् - परिव्रता स्त्रियांचा गुणः - गुण अस्ति - आहे ॥१०॥ ईश - हे स्वामिन् यथोपदेशम् - शास्त्राला अनुसरून तत्र - त्या समागमाविषयी इतिकृत्यम् - सामग्री उपशिक्ष - तयार करा येन - ज्या सामग्रीच्या योगाने अतिरिरंसया - भोगाच्या मोठ्या इच्छेमुळे कर्शितः - कृश झालेला ते - तुझ्याकडून कृतमनोभवधर्षितायाः - उत्पन्न केलेल्या कामाने पीडिलेल्या अशा मे - माझा एषः - हा दीनः - दीन आत्मा - देह सिद्धयेत - उपभोग घेण्यास समर्थ होईल तत् - यास्तव सदृशम् - योग्य अशा भवनम् विचक्ष्व - गृहाचा विचार करा ॥११॥ क्षत्तः - हे विदुरा प्रियायाः - पत्नीच्या प्रियम् - मनोरथाला अन्विच्छन् - पूर्ण करू इच्छिणारा कर्दमः - कर्दम ऋषि योगम् आश्रितः - योगाचा आश्रय केलेला असा तर्हि एव - त्या क्षणीच कामगम् - इच्छेने जाणार्या अशा विमानम् - विमानाला आविरचीकरत् - प्रगट करता झाला ॥१२॥ सर्वकामदुघम् - सर्व मनोरथ पूर्ण करणार्या अशा दिव्यम् - दिव्य सर्वरत्नसमन्वित् - सर्व रत्नांनी युक्त अशा सर्वद्धर्युपचयोदर्कम् - सर्व संपत्तीच्या वृद्धीचा आहे उत्कर्ष ज्यामध्ये अशा मणिस्तम्भैः - रत्नांच्या स्तंभांनी उपस्कृतम् - शोभित अशा ॥१३॥ दिव्योपकरणोपेतम् - दिव्य साहित्याने युक्त अशा सर्वकालसुखावहं - सर्वकाळी सुखकारक अशा विचित्राभिः - विविध रंगाच्या पट्टिकाभिः - लहान पताकांनी च - आणि पताकाभिः - मोठ्या पताकांनी अलङ्कृतम् - सुशोभित अशा ॥१४॥ विचित्रमाल्याभिः - अनेक रंगांची आहेत पुष्पे ज्यामध्ये अशा मञ्जुसिञ्जत्षडङ्घ्रिभिः - मञ्जुळ शब्द करणारे भ्रमर आहेत ज्यात अशा स्त्रग्भिः - माळांनी दुकूलक्षौमकौशयैः - कापूस, लोकर आणि रेशीम यांच्या नानावस्त्रैः - विविध वस्त्रांनी विराजितम् - सुशोभित ॥१५॥ उपरि उपरि - एकावर एक विन्यस्तनिलयेषु - रचलेल्या गृहांमध्ये पृथक् पृथक् - निरनिराळ्या क्षिप्तैः - रचिलेल्या कशिपुभिः - शय्यांनी पर्यङ्कव्यजनासनैः - मञ्चक, पंखे व आसने यांनी कान्तम् - सुन्दर ॥१६॥ तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी विनिक्षिप्तनानाशिल्पोपशोभितम् - अनेक प्रकारच्या कलायुक्त कस्तुरीच्या कामांनी सुशोभित असलेल्या महामरकतस्थल्या - मौल्यवान् पाचूच्या मण्यांच्या पटांगणाने विद्रुमवेदिभिः - पोवळ्यांच्या चौरंगांनी जुष्टम् - युक्त अशा ॥१७॥ द्रासुः - दरवाज्यांतील विद्रुमदेहल्या - पोवळ्यांच्या उंबरठ्यांनी भातम् - प्रकाशमान झालेले वज्रकपाटवत् - रत्नखचित दारांच्या फळ्यांनी युक्त इन्द्रनीलेषु - इन्द्रनीळ मण्यांच्या शिखरेषु - शिखरांवरील हेमकुम्भैः - सुवर्णकुम्भांनी अधिश्रितम् - आश्रय केलेले ॥१८॥ वज्रभित्तिषु - रत्नांच्या भिंतीमध्ये निर्मितैः - बसविलेल्या पद्मरागाग्रैः - उत्कृष्ट अशा पद्मरागनामक रत्नांनी चक्षुष्मत् - नेत्रयुक्त दिसणारे महार्हैः - मोठ्या किंमतीच्या विचित्रवैतानेः - चित्रविचित्र छतांनी हेमतोरणैः - सुवर्णाच्या तोरणांनी जुष्टम् - युक्त ॥१९॥ च - आणि तत्र तत्र - जागोजाग कृत्रिमान् - कृत्रिम पक्ष्यांना स्वान् - सजातीय मन्यमानैः - मानणार्या हंसपारावतव्रातैः - हंस व पारवे यांच्या समूहांनी अधिरुह्य अधिरुह्य - चढून चढून निकूजितम् - दुमदुमविलेले ॥२०॥ यथोपजोषम् - सुखाला अनुरूप अशा रचितैः - रचिलेल्या विहारस्थानविश्राम - क्रीडास्थाने, शयनस्थाने, उपभोगाची स्थाने, संवेशप्राङ्गणाजिरैः - घराच्या बाहेरील चौक व तटाच्या बाहेरील मैदान यांनी आत्मनः - स्वतः कर्दमाला विस्मापनम् इव - जणू काय आश्चर्य उत्पन्न करणारे असे ॥२१॥ सर्वभूताशयाभिज्ञः - सर्व प्राण्यांचे हृद्गत जाणणारा असा कर्दमः - कर्दम ऋषि तत् - त्या ईदृक् - अशा प्रकारच्या गृहम् - गृहाला नातिप्रीतेन - अत्यन्त संतुष्ट न झालेल्या अशा चेतसा - अन्तःकरणाने पश्यन्तीम् - पाहणार्या अशा देवहूतिम् - देवहूतीला स्वयम् - स्वतः प्रावोचत् - म्हणाला ॥२२॥ भीरु - हे भित्र्ये अस्मिन् - ह्या हृदे - बिन्दु सरोवरात निमज्ज्य - स्नान करून इदम् - ह्या विमानम् - विमानात आरुह - चढून बैस इदम् - हे शुक्लकृतम् - शुक्लस्वरूपी श्रीहरीने निर्माण केलेले तीर्थम् - तीर्थ नृणाम् - मनुष्यांच्या आशिषाम् - मनोरथांना यापकम् - प्राप्त करून देणारे अस्ति - आहे ॥२३॥ कुवलयेक्षणा - कमलाप्रमाणे आहेत नेत्र जिचे अशी सरजम् - मलीन अशा वासः - वस्त्राला वेणीभूतान् - जटा पडलेल्या केशान् - केसांना च - आणि मलपंकेन - मळरूपी चिखलाने संच्छिन्नम् - व्यापलेल्या शबलस्तनम् - व निस्तेज आहेत स्तन ज्यामध्ये अशा अङ्गम् - शरीराला बिभ्रतीम् - धारण करणारी अशी सा - ती देवहूती भर्तुः - पतीच्या तत् - त्या वचः - भाषणाला समादाय - ग्रहण करून सरस्वत्याः - सरस्वती नदीच्या शिवजलाशयम् - निर्मळ जळाचे आश्रयस्थान अशा सरः - बिन्दु सरोवरात आविवेश - प्रवेश करती झाली ॥२४-२५॥ अन्तःसरसि - सरोवरामध्ये सा - ती देवहूती सर्वाः - सर्व किशोरवयसः - तरुण आहे वय ज्यांचे अशा वेश्मस्थाः - घरात बसलेल्या अशा दशशतानि - दहाशे उत्पलगन्धीः - कमलाप्रमाणे आहे सुगन्ध ज्यांचा अशा कन्यकाः - दासींना ददर्श - पहाती झाली ॥२६॥ स्त्रियाः - स्त्रिया ताम् - त्या देवहूतीला दृष्ट्वा - पाहून सहसा - एकदम उत्थाय - उभ्या राहून प्राञ्जलयः - हात जोडलेल्या अशा प्रोचुः - म्हणाल्या वयम् - आम्ही तुभ्यम् - तुझ्या कर्मकरीः - दासी स्मः - आहो किम् - काय नः - आम्हाला शाधि - आज्ञा कर ॥२७॥ मानदाः - मान देणार्या अशा ताः - त्या दासी च - तर मनस्विनीम् - मानी अशा ताम् - त्या देवहूतीला महार्हेण - फार मूल्यवान अशा स्नानेन - स्नानाला योग्य अशा तैलादिकांनी स्नापयित्वा - स्नान घालून असौ - ह्या देवहूतीला नूत्ने - नूतन निर्मले - स्वच्छ दुकूले - दोन रेशमी वस्त्रे ददुः - देत्या झाल्या ॥२८॥ वरीयांसि - अत्यन्त सुंदर परार्ध्यानि - अत्यन्त मूल्यवान् द्युमन्ति - तेजस्वी भूषणानि - अलंकार च - आणि सर्वगुणोपेतम् - संपूर्ण गुणांनी युक्त असे अन्नम् - अन्न च - आणि अमृतासवम् - अमृतासारखी रुचि असलेले पानम् - पेय ददुः - देत्या झाल्या ॥२९॥ अथ - नंतर सा - ती देवहूती आदर्शे - आरशात स्वम् - आपल्या आत्मानम् - शरीराला स्नातम् - स्नान केलेल्या अशा कृतशिरःस्नानम् - घातले आहे मस्तकावरून स्नान जिला अशा विरजम् - निर्मल अशा स्त्रग्विणम् - माळायुक्त अशा विरजाम्बरम् - निर्मळ आहे वस्त्र ज्यांचे अशा कृतस्वस्त्ययनम् - केले आहे मंगल ज्यांचे अशा कन्याभिः - कन्यांनी बहुमानितम् - बहुमान दिलेल्या अशा सर्वाभरणभूषितम् - सर्व अलंकारांनी अलंकृत अशा निष्कग्रीवम् - सुवर्णाची भूषणे आहेत कण्ठामध्ये जिच्या अशा वलयिनम् - कंकणांनी युक्त अशा कूजत्काञ्चननूपुरम् - खुळखुळणारी सुवर्णाची नूपुरे आहेत ज्यामध्ये अशा ॥३०-३१॥ श्रोण्योः - कमरेत अध्यस्तया - घातलेल्या काञ्चन्या - सुवर्णाच्या बहुरत्नया - पुष्कळ आहेत रत्ने ज्यामध्ये अशा काञ्च्या - कमरपट्ट्याने च - आणि महार्हेण - मोठ्या किंमतीच्या हारेण - हाराने च - आणि रुचकेन - मंगलकारक अलंकाराने भूषितम् - सुशोभित अशा ॥३२॥ सुदता - सुंदर दातांनी सुभ्रुवा - सुंदर भुवयांनी श्लक्ष्णस्निग्धापाङ्गेन - मनोहर व सप्रेम आहे कटाक्ष ज्यांचे अशा पद्मकोशस्पृधा - कमलाच्या कळ्यांशी स्पर्धा करणार्या अशा चक्षुषा - नेत्रांनी च - आणि नीलैः - काळ्या अलकैः - केसांनी लसन्मुखम् - शोभत आहे मुख ज्यांचे असे ॥३३॥ सा - ती देवहूती ऋषीणाम् - ऋषींमध्ये ऋषभम् - श्रेष्ठ अशा दयितम् - प्रिय अशा पतिम् - पतीला यदा - ज्या वेळी सस्मार - स्मरती झाली तदा - त्या वेळी यत्र - जेथे सः - तो कर्दम प्रजापतिः - प्रजापति आस्ते - आहे तत्र - त्या ठिकाणी स्त्रीभिःसह - स्त्रियांसह सा - ती देवहूती च - पण आस्ते - आहे ॥३४॥ तदा - त्या वेळी भर्तुः - पतीच्या पुरस्तात् - पुढे स्त्रीसहस्त्रवृत्तम् - हजार स्त्रियांनी वेष्टिलेल्या अशा आत्मानम् - स्वतःला च - आणि तद्योगगतिम् - त्या कर्दमाच्या योगसामर्थ्याला निशाम्य - पाहून संशयम् - आश्चर्याप्रत प्रत्यपद्यत - प्राप्त झाली ॥३५॥ अमित्रहन् - शत्रूंचा नाश करणार्या अशा विदुरा सः - तो कर्दम ऋषि जातभावः - उत्पन्न झाले आहे प्रेम ज्याला असा कृतमलस्नानाम् - केले आहे मलनाशक स्नान जिने अशा विभ्राजन्तीम् - शोभणार्या अशा अपूर्ववत् - जणू काय पूर्वीपेक्षाही उत्तम अशा आत्मनः - आपल्या रूपम् - रूपाला विभ्रतीम् - धारण करणार्या अशा संवीतरुचिरस्तनीम - चोळीने झाकलेले आहेत सुन्दर स्तन जिचे अशा सुवाससम् - सुंदर आहे वस्त्र जिचे अशा विद्याधरीसहस्त्रेण - हजार गन्धर्व स्त्रियांकडून सेव्यमानाम् - सेविली जाणार्या अशा ताम् - त्या देवहूतीला तत् - त्या विमानात आरोहयत् - बसविता झाला ॥३६-३७॥ तस्मिन् - त्या विमाने - विमानात अनुरक्तः अपि - अनुरक्त असूनसुद्धा अलुप्तमहिमा - लुप्त झालेले नाही माहात्म्य ज्यांचे असा विद्याधरीभिः - गन्धर्व स्त्रियांनी उपचीर्णवपुः - सेविलेले आहे शरीर ज्याचे असा प्रिययासह - पत्नीसह मुनिः - कर्दम ऋषि उत्कचकुमुद्गणवान् - फुललेल्या कमलसमूहाने युक्त असा नभस्थः - आकाशात असलेला असा अपीच्यः - अत्यंत सुंदर असा ताराभिः - नक्षत्रांनी आवृतः - वेष्टिलेला असा उडुपतिः इव - चन्द्राप्रमाणे बभ्राजे - शोभता झाला ॥३८॥ सिद्धैः - सिद्धांनी नुतः - स्तविलेला असा ललनावरुथी - स्त्रियांच्या समुदायाने युक्त असा सः - तो कर्दम मुनि तेन - त्या विमानाच्या योगाने अनङ्गसखमारुतसौभगासु - मदनाचा मित्र असा जो वायु त्याच्या योगाने मनोहर अशा द्युधुनिपातशिवस्वनासु - गंगेच्या धबधब्याचा मनोहर ध्वनि आहे ज्यामध्ये अशा अष्टलोकप - आठ लोकपालांचे विहारकुलाचलेन्द्रद्रोणीषु - विहार करण्याचे जे कुलपर्वत त्यातील श्रेष्ठ अशा मेरूच्या गुहांमध्ये धनदवत् - कुबेराप्रमाणे रेमे - क्रीडा करता झाला ॥३९॥ रतः - संतुष्ट असा सः - तो कर्दम ऋषि रामया - स्त्रीसह वैश्रम्भके - वैश्रम्भक नावाच्या देवांच्या उद्यानात सुरसने - सुरसन उद्यानात नन्दने - नन्दन उद्यानात पुष्पभद्रके - पुष्पभद्रक उद्यानात जैत्ररथ्ये - जैत्ररथ्य उद्यानात च - आणि मानसे - मानस सरोवरात रेमे - क्रीडा करिता झाला ॥४०॥ महीयसा - अतिशय विस्तीर्ण अशा भ्राजिष्णुना - तेजस्वी अशा कामगेन - इच्छेप्रमाणे जाणार्या अशा विमानेन - विमानाने यथा - जसा अनिलः - वायु तथा - तसा लोकान् - लोकात चरन् - संचार करणारा असा सः - तो कर्दम मुनि वैमानिकान् - विमानात बसणार्या देवांना अत्यशेत - मागे टाकिता झाला ॥४१॥ यैः - ज्या पुरुषांनी व्यसनात्ययः - संसाराचा नाश आहे ज्यापासून अशा तीर्थपदः - श्रीहरीच्या चरणः आश्रितः - चरणाचा आश्रय केला तेषाम् - त्या उद्दामचेतसाम् - उदात्त आहे अन्तःकरण ज्यांचे अशा पुंसाम् - पुरुषांना दुरापादनम् - प्राप्त करण्यास अशक्य किम् - काय ॥४२॥ महायोगी - मोठा योगी असा सः - तो कर्दम ऋषि स्वसंस्थया - आपल्या द्वीपे खंडे इत्यादिक रचनेने पावान् - जेवढा आसीत् - होता तावन्तम् - तेवढ्या ब्रह्वाश्चर्यम् - पुष्कळ आहेत आश्चर्ये ज्यामध्ये अशा भुवः - पृथ्वीच्या गोलम् - मण्डलाला पत्न्यै - पत्नीला प्रेक्षयित्वा - दाखवून स्वाश्रमाय - आपल्या आश्रमाला न्यवर्तत - परतला ॥४३॥ सः - तो आत्मानम् - स्वतःला नवधा - नऊ प्रकारे विभज्य - विभागून सुरतोत्सुकाम् - सुरतक्रीडेविषयी उत्सुक असलेल्या अशा मानवीम् - मनूची कन्या अशा रामाम् - स्त्रीला निरमयन् - रमविणारा असा वर्षपूगान - वर्षांच्या समूहांपर्यंत मुहूर्तवत् - दोन घटिका समजून रेमे - क्रीडा करिता झाला ॥४४॥ तस्मिन् - ह्या विमाने - विमानात रतिकरीम् - प्रेमाला उत्तेजन देणार्या उत्कृष्टाम् - उत्तम अशा शय्याम् श्रिता - शय्येचा आश्रय केलेली अशी च - आणि अपीच्येन - सुंदर अशा पत्या - पतीने सङ्गता - युक्त अशी सा - ती देवहूती तम् - त्या कालम् - कालाला न अबुध्यत - न जाणती झाली ॥४५॥ कामलालसयोः - विषयभोगाची आहे इच्छा ज्यांना अशा एवम् - याप्रमाणे योगानुभावेन - योगाच्या सामर्थ्याने रममाणयोः - क्रीडा करणार्या अशा दम्पत्योः - पतिपत्नींचे शतम् - शंभर शरदः - वर्षे मनाक् - थोड्या कालाप्रमाणे व्यतीयुः - गेली ॥४६॥ सर्वसंकल्पवित् - सर्व संकल्पांना जाणणारा असा विभुः - समर्थ असा आत्मवित् - आत्मज्ञानी असा सः - कर्दम ताम् - त्या देवहूतीला आत्मना - आपल्या अर्धाङ्गरूपाने भावयन् - भावना करणारा असा स्वम् - आपल्या रूपम् - स्वरूपाला नोधा - नऊ प्रकाराने विधाय - करून तस्याम् - त्या देवहूतीच्या ठिकाणी रेतः - वीर्याला आधत्त - स्थापिता झाला ॥४७॥ अतः - यास्तव सद्यः - तत्काल सा - ती देवहूतिः - देवहूती स्त्रियः - स्त्रीरूप प्रजाः - संततीला सुषुवे - प्रसवती झाली ताः - त्या सर्वाः - सर्व चारुसर्वाङ्ग्यः - सुंदर आहेत सर्व अवयव ज्यांचे अशा लोहितोत्पलगंधयः - तांबड्या कमळाप्रमाणे आहे सुवास ज्यांचा अशा आसन् - होत्या ॥४८॥ सती - पतिव्रता उशती - सुंदर सा - ती देवहूती तदा - त्या वेळी प्रव्रजिष्यन्तम् - संन्यास घेणार्या अशा पतिम् - पतीला आलक्ष्य - पाहून विस्मयाना - आश्चर्यचकित झालेली विक्लवेन - व्याकुळ विदूयता - खिन्न हृदयेन - अंतःकरणाने उपलक्षिता - युक्त अशी ॥४९॥ अधोमुखी - खाली मान घातलेली अशी नखमणिश्रिया - नखरूप मण्यांची आहे शोभा ज्याला अशा पदा - चरणाने भुवम् लिखन्ती - पृथ्वीवर रेघा काढणारी अश्रुकलाम् - अश्रुबिंदूंना निरुध्य - आवरून शनैः - हळू हळू ललिताम् - मनोहर अशा वाचम् - वाणीला उवाच - बोलली ॥५०॥ भगवान् - ऐश्वर्यसंपन्न असे आपण मह्यम् - माझ्याकरिता प्रतिश्रुतम् - प्रतिज्ञा केलेल्या अशा तत् - त्या सर्वम् - सर्व वस्तूंना उपोवाह - संपादन करिते झाला अथ अपि - तरी सुद्धाही प्रपन्नायाः - शरण आलेल्या अशा मे - मला अभयम् - अभय दातुम् - देण्यास अर्हसि - योग्य आहेस ॥५१॥ ब्रह्मन् - हे ब्राह्मणा तुभ्यम् - तुझ्या दुहितृभिः - कन्यानी समाः - योग्य पतयः - पति विमृग्याः - शोधावयाचे आहेत त्वयि वनं प्रवजिते - तू वनात गेला असता मे - माझ्या विशोकाय - शोकनाशार्थ ज्ञानोपदेश करण्याकरिता कश्चित् - कोणी तरी स्यात् - पाहिजेच ॥५२॥ प्रभो - हे नाथा ! परित्यक्तपरात्मनः - सोडलेला आहे परमात्मा जिने अशा मे - माझा इंद्रियार्थप्रसङ्गेन - इंद्रियांच्या विषयांच्या संबंधाने व्यतिक्रांतेन - गेलेल्या एतावता - एवढ्या कालेन - कालाने अलम् - पुरे झाले ॥५३॥ इंद्रियार्थेषु - इंद्रियांच्या विषयांमध्ये सज्जन्त्या - आसक्त झालेल्या अशा परम् - सत्य अशा भावम् - स्वरूपाला अजानन्त्या - न जाणणार्या मे - माझ्याकडून त्वयि - तुझ्या ठिकाणी प्रसङ्गः - सङ्गति कृतः - केली गेली तथा अपि - तरीसुद्धा सः - तो प्रसङ्ग मे - मला अभयाय - मोक्षाकरिता अस्तु - होवो ॥५४॥ अधिया - अज्ञानाने असत्सु - दुर्जनांच्या ठिकाणी विहितः - केलेली यः - जी सङ्गः - सङ्गति संसृतेः - संसाराची हेतुः - कारण अस्ति - आहे सः एव - तीच संङ्गति साधुषु - सज्जनांच्या ठिकाणी कृतः - केलेली निःसंगत्वाय - मोक्षाकरिता कल्पते - समर्थ होते ॥५५॥ इह - ह्या सृष्टीमध्ये यत्कर्म - ज्या प्राण्याचे कर्म धर्माय - धर्मप्राप्तीकरिता न कल्पते - समर्थ होत नाही विरागाय - वैराग्याकरिता न - नाही वा - किंवा तीर्थपदसेवायै - श्रीहरीच्या सेवेकरिता न - नाही हि - कारण सः - तो जीवन् अपि - जिवंत असूनही मृतः - मेलेला अस्ति - आहे ॥५६॥ यत् - जर विमुक्तिदम् - मुक्ती देणार्या अशा त्वाम् - तुला प्राप्य - प्राप्त होऊन बन्धनात् - संसारबंधनापासून न मुमुक्षेय - मी मुक्त होण्याची इच्छा करणार नाही तत् - तर सा अहम् - ती मी भगवतः - श्रीहरीच्या मायया - मायेने नूनम् - निश्चयाने दृढम् - पक्की वञ्चिता - फसविलेली होईन ॥५७॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय तेविसावा समाप्त |