PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४१ (अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - स्ुस्त्य घौषेय
देवता - अश्विनीकुमार
छं - जगती


स॒मा॒नं उ॒ त्यं पु॑रुहू॒तं उ॒क्थ्य१ं रथं॑ त्रिच॒क्रं सव॑ना॒ गनि॑ग्मतम् ।
परि॑ज्मानं विद॒थ्यं सुवृ॒क्तिभि॑र्व॒यं व्युष्टा उ॒षसो॑ हवामहे ॥ १॥

समानं ओं इति त्यं पुरु-हूतं उक्थ्यं रथं त्रि-चक्रं सवना गनिग्मतं
परि-ज्मानं विदथ्यं सुवृक्ति-भिः वयं वि-उष्टौ उषसः हवामहे ॥ १ ॥

असंख्य भक्तांनी पाचारण केलेला, तीन चाकांचा असा जो तुम्हां उभयतांचा एकच प्रशंसनीय रथ आहे तो आमच्या सोमसवनांच्या प्रसंगी येथें वारंवार आणा. तो रथ द्युलोकालाहि प्रदक्षिणा करतो आणि यज्ञसमारंभास जाण्याला तो अगदी योग्य आहे. आज उषा उजळल्या आहेत अशा वेळीं त्या रथाला आम्हीं आमच्या सुंदर सूक्तांनी पाचारण करितों १.


प्रा॒त॒र्युजं॑ नास॒त्याधि॑ तिष्ठथः प्रात॒र्यावा॑णं मधु॒वाह॑नं॒ रथ॑म् ।
विशो॒ येन॒ गच्छ॑थो॒ यज्व॑रीर्नरा की॒रेश्चि॑द्य॒ज्ञं होतृ॑मन्तं अश्विना ॥ २ ॥

प्रातः-युजं नासत्या अधि तिष्ठथः प्रातः-यावानं मधु-वाहनं रथं
विशः येन गच्चतः यज्वरीः नरा कीरेः चित् यजं होतृ-मन्तं अश्विना ॥ २ ॥

प्रभातींच जोडला जाणारा, प्रात:कालींच बाहेर निघणारा आणि मधुपूर्ण असा जो तुमचा रथ त्याच्यावर हे सत्यस्वरूप अश्वीहि, तुम्ही आरोहण करा. ज्या थांत आरूढ हो‍ऊन तुम्ही यज्ञकर्त्या भक्तजनांकडे जातां किंवा हे शूरानों अश्वीदेवांनो, स्तवन करणार्‍या भक्ताच्या हवनसूक्तांनी निनादित झालेल्या यज्ञाला तुम्हीं गमन करा २.


अ॒ध्व॒र्युं वा॒ मधु॑पाणिं सु॒हस्त्यं॑ अ॒ग्निधं॑ वा धृ॒तद॑क्षं॒ दमू॑नसम् ।
विप्र॑स्य वा॒ यत् सव॑नानि॒ गच्छ॒थोऽ॑त॒ आ या॑तं मधु॒पेयं॑ अश्विना ॥ ३ ॥

अध्वर्युं वा मधु-पाणिं सु-हस्त्यं अग्निधं वा धृत-दक्षं दमूनसं
विप्रस्य वा यत् सवनानि गच्चथः अतः आ यातं मधु-पेयं अश्विन्चा ॥ ३ ॥

किंवा मधुपात्र धारण करणार्‍या अध्वर्यूकडे किंवा हस्तकौशल्य दाखविणार्‍या अग्नीध्राकडे, किंवा चातुर्यबलाने विभूषित आणि शांतचित्त अशा ज्ञानी भक्ताच्या सोमसवनाकडे तुम्हीं ज्या रथांतून जातां, त्याच रथांतून हे अश्वीहो, माझे मधुर पेय प्राशन करण्याकरितां आगमन करा ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४२ (इंद्रसूक्त)

ऋषी - कृष्ण अंगिरस
देवता - इंद्र
छं - त्रिष्टुभ्


स्ते॑व॒ सु प्र॑त॒रं लायं॒ अस्य॒न् भूष॑न्न् इव॒ प्र भ॑रा॒ स्तोमं॑ अस्मै ।
वा॒चा वि॑प्रास्तरत॒ वाचं॑ अ॒र्यो नि रा॑मय जरितः॒ सोम॒ इन्द्र॑म् ॥ १ ॥

अस्ताइव सु प्र-तरं लायं अस्यन् भूषन्-इव प्र भर स्तोमं अस्मै
वाचा विप्राः तरत वाचं अर्यः नि रमय जरितरिति सोमे इन्द्रम् ॥ १ ॥

एखादा कुशल शरसन्धानी योद्धा पिसार्‍याने आपला बाण सुशोभित करून तो झटपट सोडतो, त्याप्रमाणें हे भक्ता, इंद्राकडे तूं आपले कवन सोड. ज्ञानी भक्तांनो, तुम्हीं आपल्या वाणीनें त्या महाभागाची वाणी समजावून घ्या. हे स्तोत्रकर्त्या, तूं इंद्राला सोमसवनामध्यें रममाण कर. १.


दोहे॑न॒ गां उप॑ शिक्षा॒ सखा॑यं॒ प्र बो॑धय जरितर्जा॒रं इन्द्र॑म् ।
कोशं॒ न पू॒र्णं वसु॑ना॒ न्यृष्टं॒ आ च्या॑वय मघ॒देया॑य॒ शूर॑म् ॥ २ ॥

दोहेन गां उप शिक्ष सखायं प्र बोधय जरितः जारं इन्द्रं
कोशं न पूर्णं वसुना नि-ऋष्टं आ च्यवय मघ-देयाय शूरम् ॥ २ ॥

दोहनकौशल्यानें धेनूला चुचकारून दोहनाची संवय कर. आणि हे स्तोत्रकर्त्या, भक्तसखा जो इंद्र त्या स्तुतिप्रिय इंद्राचे लक्ष वेधून घे. आभिलषणीय वस्तूंनी खचून भरलेल्या भाण्डाराप्रमाणें त्या शूराला वरदान देण्याला प्रवृत्त करण्यासाठीं गदगदां हलवून सोड. २.


किं अ॒ङ्ग त्वा॑ मघवन् भो॒जं आ॑हुः शिशी॒हि मा॑ शिश॒यं त्वा॑ शृणोमि ।
अप्न॑स्वती॒ मम॒ धीर॑स्तु शक्र वसु॒विदं॒ भगं॑ इ॒न्द्रा भ॑रा नः ॥ ३ ॥

किं अङ्ग त्वा मघ-वन् भोजं आहुः शिशीहि मा शिशयं त्वा शृणोमि
अप्नस्वती मम धीः अस्तु शक्र वसु-विदं भगं इन्द्र आ भर नः ॥ ३ ॥

हे भगवंता, लोक तुजला उदार म्हणतात तें उगीचच काय ? नाही तर माझ्या अंगी तीव्रपणा बाणूं दे. तूं भक्तांना तीव्रपणा देणारा आहेस असेंच मी ऐकले आहे. तर माझी बुद्धि सत्कर्मरत असूं दे; आणि हे समर्था इंद्रा, आम्हांकडे आमचें सद्‍भाग्य येऊं दे. ३.


त्वां जना॑ ममस॒त्येष्व् इ॑न्द्र संतस्था॒ना वि ह्व॑यन्ते समी॒के ।
अत्रा॒ युजं॑ कृणुते॒ यो ह॒विष्मा॒न् नासु॑न्वता स॒ख्यं व॑ष्टि॒ शूरः॑ ॥ ४ ॥

त्वां जनाः मम-सत्येषु इन्द्र सम्-तस्थानाः वि ह्वयन्ते सम्-ईके
अत्र युजं कृणुते यः हविष्मान् न असुन्वता सख्यं वष्टि शूरः ॥ ४ ॥

माझेंच म्हणणे खरें असा हट्ट धरून संग्रामांत उभे ठाकलेले सैनिक तुजला नाना प्रकारांनी आळवितात. परंतु त्यांच्यामध्यें जो कोणी हवि अर्पण करणारा असेल, त्यालाच तूं जवळ करतोस. शूर इंद्र सोम अर्पण न करणार्‍या मनुष्याच्या मित्रत्वाची अपेक्षा धरीत नाही ४.


धनं॒ न स्य॒न्द्रं ब॑हु॒लं यो अ॑स्मै ती॒व्रान् सोमा॑ँ आसु॒नोति॒ प्रय॑स्वान् ।
तस्मै॒ शत्रू॑न् सु॒तुका॑न् प्रा॒तरह्नो॒ नि स्वष्ट्रा॑न् यु॒वति॒ हन्ति॑ वृ॒त्रम् ॥ ५ ॥

धनं न स्पन्द्रं बहुलं यः अस्मै तीव्रान् सोमान् आसुनोति प्रयस्वान्
तस्मै शत्रून् सु-तुकान् प्रातः अह्नः नि सु-अष्ट्रान् युवति हन्ति वृत्रम् ॥ ५ ॥

जणों काय मनाला चटका लावणारें विपुल धन (एखाद्याला द्यावें) त्याप्रमानें जो भक्त ह्या इंद्राप्रीत्यर्थ भक्तियुक्त हो‍ऊन सोमरस अर्पण करतो, त्या भक्ताचे शत्रु उत्तम धोरणी, उत्तम हत्त्यारबंद जरी असले, तरी त्या भक्तांसाठीं त्या शत्रूंना उजाडले नाही तोंच तो इंद्र छाटून टाकतो आणि अंधकाराचे आवरण नष्ट करितो ५.


यस्मि॑न् व॒यं द॑धि॒मा शंसं॒ इन्द्रे॒ यः शि॒श्राय॑ म॒घवा॒ कामं॑ अ॒स्मे ।
आ॒राच्चि॒त् सन् भ॑यतां अस्य॒ शत्रु॒र्न्यस्मै द्यु॒म्ना जन्या॑ नमन्ताम् ॥ ६ ॥

यस्मिन् वयं दधिम शंसं इन्द्रे यः शिश्राय मघ-वा कामं अस्मे इति
आरात् चित् सन् भयतां अस्य शत्रुः नि अस्मै द्युम्ना जन्या नमन्ताम् ॥ ६ ॥

ज्या इंद्राच्या ठायीं आम्ही आपले स्तवन अर्पण करितों, जो भगवान आमच्या ठिकाणीं उत्कृष्ट आकांक्षा ठेवतो, त्या भगवंतापुढे शत्रु दूर अंतरावर असतांच भयविव्हल होवो आणि विजयाची सर्व देदीप्यमान वैभवें त्या (इंद्रा) पुढें नम्र होवोत ६.


आ॒राच् छत्रुं॒ अप॑ बाधस्व दू॒रं उ॒ग्रो यः शम्बः॑ पुरुहूत॒ तेन॑ ।
अ॒स्मे धे॑हि॒ यव॑म॒द्गोम॑दिन्द्र कृ॒धी धियं॑ जरि॒त्रे वाज॑रत्नाम् ॥ ७ ॥

आरात् शत्रुं अप बाधस्व दूरं उग्रः यः शम्बः पुरु-हूत तेन
अस्मे इति धेहि यव-मत् गो--मत् इन्द्र कृधि धियं जरित्रे वाज-रत्नाम् ॥ ७ ॥

तुझें जें अतिशय भयंकर वज्र आहे त्याच्या योगानें, शत्रु दूर असतांनाच तेथल्या तेथें त्याचा नि:पात कर. असंख्या भक्तांनी सेवित अशा इंद्रा, धान्यसमृद्ध आणि धेनुसमृद्ध असें जे वरदान तें आम्हांस दे. हे इंद्रा, सात्त्विक सामर्थ्याच्या रत्‍नाने अलंकृत अशी बुद्धि तूं स्तोत्रकर्त्या भक्ताला दे ७.


प्र यं अ॒न्तर्वृ॑षस॒वासो॒ अग्म॑न् ती॒व्राः सोमा॑ बहु॒लान्ता॑स॒ इन्द्र॑म् ।
नाह॑ दा॒मानं॑ म॒घवा॒ नि यं॑स॒न् नि सु॑न्व॒ते व॑हति॒ भूरि॑ वा॒मम् ॥ ८ ॥

प्र यं अन्तः वृष-सवासः अग्मन् तीव्राः सोमाः बहुल-अन्तासः इन्द्रं
न अह दामानं मघ-वा नि यंसत् नि सुन्वते वहति भूरि वामम् ॥ ८ ॥

वीर्यशाली पुरुषांनी पिळलेले आणि ज्यांच्यामध्यें विपुल मधुरता भरलेली आहे असे तीव्र सोमरस इंद्राच्या हदयांत प्रविष्ट झाले. तो भगवान्‌ इंद्र आपली देणगी कधीं परत घेत नाहींच; पण जें अत्युत्कृष्ट असेल तें मात्र सोम अर्पण करणार्‍या भक्ताला अतिशय देतो ८.


उ॒त प्र॒हां अ॑ति॒दीव्या॑ जयाति कृ॒तं यच् छ्व॒घ्नी वि॑चि॒नोति॑ का॒ले ।
यो दे॒वका॑मो॒ न धना॑ रुणद्धि॒ सं इत् तं रा॒या सृ॑जति स्व॒धावा॑न् ॥ ९ ॥

उत प्र-हां अति-दीव्य जयाति कृतं यत् श्व-घ्नी वि-चिनोति काले
यः देव-कामः न धना रुणद्धि सं इत् तं राया सृजति स्वधावान् ॥ ९ ॥

खेळांत सुद्धां मात करून तो झुंजार वीर प्रतिस्पर्ध्यावर जय मिळवितो, कारण कोणताहि शिकारी आपली शिकार केव्हांहि अचूक हुडकून काढणारच; जो देवावर निष्ठा ठेवणारा आहे तो दानधर्म बंद करीत नाहीं, (त्यामुळें) स्वयंजात इंद्र त्या भक्ताला (अखंड) धनानें युक्त करितो ९.


गोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् ।
व॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥

गोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां
वयं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥

अविचारामुळे ओढवणार्‍या आपत्तीतून गोधनाच्या योगानें आम्हीं पार पडूं. हे असंख्य भक्त सेवितादेवा, धान्यसंग्रहाच्या योगानें सर्व क्षुत्पीडेंतून आम्हीं निभावून जाऊं आणि आपल्या राजांसह सर्वांच्या आघाडीस हो‍ऊन स्वपराक्रमानें यशोधन संपादन करूं असे कर १०.


बृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः ।
इन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥

बृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः
इन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥

प्रार्थनेचा प्रभु जो (बृहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीवर, आमच्या वरच्या बाजूस तसेंच खालच्या बाजूस - याप्रमाणें सर्व बाजूंना राहून दुष्ट पातक्यापासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि मध्यभागीं देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मंगल होईल असें करो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४३ (इंद्रसूक्त)

ऋषी - कृष्ण अंगिरस
देवता - इंद्र
छं - १०-११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


अच्छा॑ म॒ इन्द्रं॑ म॒तयः॑ स्व॒र्विदः॑ स॒ध्रीची॒र्विश्वा॑ उश॒तीर॑नूषत ।
परि॑ ष्वजन्ते॒ जन॑यो॒ यथा॒ पतिं॒ मर्यं॒ न शु॒न्ध्युं म॒घवा॑नं ऊ॒तये॑ ॥ १ ॥

अच्च मे इन्द्रं मतयः स्वः-विदः सध्रीचीः विश्वाः उशतीः अनूषत
परि स्वजन्ते जनयः यथा पतिं मर्यं न शुन्ध्युं मघ-वानं ऊतये ॥ १ ॥

स्वर्गीय प्रकाश देणार्‍या, एकच ध्येय ठेवणार्‍या, सर्वरसात्मक, देवोत्सुक आणि मननीय अशा कवनांनी इंद्राचे स्तवन केलें; ज्याप्रमानें स्त्रिया आपल्या रक्षणासाठीं ऐश्वर्यवान्‌ परंतु पवित्र आणि दमदार अशा आपल्या पतीला आलिंगन देतात, त्याप्रमाणें माझ्या स्तुति देवापर्यंत जाऊन त्याला भिडतात १.


न घा॑ त्व॒द्रिग् अप॑ वेति मे॒ मन॒स्त्वे इत् कामं॑ पुरुहूत शिश्रय ।
राजे॑व दस्म॒ नि ष॒दोऽ॑धि ब॒र्हिष्य॒स्मिन् सु सोमे॑ऽव॒पानं॑ अस्तु ते ॥ २ ॥

न घ त्वद्रिक् अप वेति मे मनः त्वे इति इत् कामं पुरु-हूत शिश्रय
राजाइव दस्म नि सदः अधि बर्हि षि अस्मिन् सु सोमे अव-पानं अस्तु ते ॥ २ ॥

तुझ्या ठिकाणीं जडलेलें माझे मन दुसरीकडे जातच नाही. हे असंख्य जनस्तुता, माझ्या सर्व वासना मी तुझ्याच ठिकाणीं वाहतों. हे अद्‍भुतपराक्रमा, या कुशासनावर आरोहण कर; हे देवा, पहा, आमच्या ह्या सोमरसामध्यें तुझी प्राशनेच्छा जडून राहो २.


वि॒षू॒वृदिन्द्रो॒ अम॑तेरु॒त क्षु॒धः स इद्रा॒यो म॒घवा॒ वस्व॑ ईशते ।
तस्येदि॒मे प्र॑व॒णे स॒प्त सिन्ध॑वो॒ वयो॑ वर्धन्ति वृष॒भस्य॑ शु॒ष्मिणः॑ ॥ ३ ॥

विषु-वृत् इन्द्रः अमतेः उत् क्षुधः सः इत् रायः मघ-वा वस्वः ईशते
तस्य इमे प्रवणे सप्त सिन्धवः वयः वर्धन्ति वृषभस्य शुष्मिणः ॥ ३ ॥

अविचार आणि क्षुधार्तता यांचा चोहोंकडून कोण्डमारा इंद्र करतो. तोच भगवान्‌ इंद्र उत्कृष्ट धनाचा आणि (अक्षय) निधीचा अधिपति आहे. धोंधों वहाणार्‍या सप्तसिन्धु त्याच उत्कट प्रतापी आणि वीर्यशालि देवाच्या जोमाचे महात्म्य वृद्धिंगत करतात ३.


वयो॒ न वृ॒क्षं सु॑पला॒शं आस॑द॒न् सोमा॑स॒ इन्द्रं॑ म॒न्दिन॑श्चमू॒षदः॑ ।
प्रैषां॒ अनी॑कं॒ शव॑सा॒ दवि॑द्युतद्वि॒दत् स्व१र्मन॑वे॒ ज्योति॒रार्य॑म् ॥ ४ ॥

वयः न वृक्षं सु-पलाशं आ असदन् सोमासः इन्द्रं मन्दिनः चमू-सदः
प्र एषां अनीकं शवसा दविद्युतत् विदत् स्वः मनवे ज्योतिः आर्यम् ॥ ४ ॥

उत्तम पालवीनें डवरलेल्या वृक्षावर पक्षी जसे विश्रांति घेतात, त्याप्रमाणें चमूपात्रांतील आल्हादप्रद सोमरस इंद्राच्या ठिकाणीं विराम पावतात. हा पहा त्यांच्या कंतीचा लोल आपल्या झोतानें कसा चमकून राहिला आहे. आणि त्याने दिव्य लोक आणि आर्यत्वाचे तेज ह्या दोहोंचाहि लाभ मनुषाला करून दिला आहे ४.


कृ॒तं न श्व॒घ्नी वि चि॑नोति॒ देव॑ने सं॒वर्गं॒ यन् म॒घवा॒ सूर्यं॒ जय॑त् ।
न तत् ते॑ अ॒न्यो अनु॑ वी॒र्यं शक॒न् न पु॑रा॒णो म॑घव॒न् नोत नूत॑नः ॥ ५ ॥

कृतं न श्व-घ्नी वि चिनोति देवने सम्-वर्गं यत् मघ-वा सूर्यं जयत्
न तत् ते अन्यः अनु वीर्यं शकत् न पुराणः मघ-वन् न उत नूतनः ॥ ५ ॥

वस्ताद खेळाडू द्युतामध्यें सुद्धां आपल्याला हवें तें दान नेमकें पडेल असें करतो. त्याप्रमाणेने भगवान्‌ इंद्राने सर्वांचे आकर्षण करणार्‍या सूर्यालाहि आपलेंसें केलें आहे. देवा, तुझ्या त्या अपूर्व पराक्रमाचें अनुकरण दुसरा कोणीं करूं शकणार नाही. हे भगवंता, पूर्वींच्यापैकी कोणीं केलें नाही, आणि आतां नवीनापैकींहि कोणी करणार नाही ५.


विशं॑-विशं म॒घवा॒ पर्य॑शायत॒ जना॑नां॒ धेना॑ अव॒चाक॑श॒द्वृषा॑ ।
यस्याह॑ श॒क्रः सव॑नेषु॒ रण्य॑ति॒ स ती॒व्रैः सोमैः॑ सहते पृतन्य॒तः ॥ ६ ॥

विशम्-विशं मघ-वा परि अशायत जनानां धेनाः अव-चाकशत् वृषा
यस्य अह शक्रः सवनेषु रण्यति सः तीव्रैः सोमैः सहते पृतन्यतः ॥ ६ ॥

भगवान्‌ इंद्रानें प्रत्येक ज्ञातीमध्यें, प्रत्येक समाजांत वास्तव्य केलें आहे. त्या वीर्यशालि देवाने सर्वांच्या स्तुतीकडे लक्ष दिले आहे. तो सर्वसमर्थ देव ज्याच्या सोमसवनांत रममाण होतो, तो भक्त (अंगावर) चालून येणार्‍या शत्रुसैन्यावर तीव्र सोमाच्या प्रभावानें विजयी होतो ६.


आपो॒ न सिन्धुं॑ अ॒भि यत् स॒मक्ष॑र॒न् सोमा॑स॒ इन्द्रं॑ कु॒ल्या इ॑व ह्र॒दम् ।
वर्ध॑न्ति॒ विप्रा॒ महो॑ अस्य॒ साद॑ने॒ यवं॒ न वृ॒ष्टिर्दि॒व्येन॒ दानु॑ना ॥ ७ ॥

आपः न सिन्धुं अभि यत् सम्-अक्षरन् सोमासः इन्द्रं कुल्याः-इव ह्रदं
वर्धन्ति विप्राः महः अस्य सादने यवं न वृष्टिः दिव्येन दानुना ॥ ७ ॥

नद्या जशा समुद्राकडे, ओहोळ जसे तलावाकडे त्याप्रमाणें सोमरस इंद्राकडे वाहतात. दिव्यजलवर्षावानें पर्जन्य हा धान्याची अभिवृद्धि करतो, तसा स्तवनप्रवीण भक्तजन यज्ञगृहीं इंद्राचा महिमा वृद्धिंगत करतात ७.


वृषा॒ न क्रु॒द्धः प॑तय॒द्रज॒स्स्व् आ यो अ॒र्यप॑त्नी॒रकृ॑णोदि॒मा अ॒पः ।
स सु॑न्व॒ते म॒घवा॑ जी॒रदा॑न॒वेऽ॑विन्द॒ज् ज्योति॒र्मन॑वे ह॒विष्म॑ते ॥ ८ ॥

वृषा न क्रुद्धः पतयत् रजः-सु आ यः अर्य-पत्नीः अकृणोत् इमाः अपः
सः सुन्वते मघ-वा जीर-दानवे अविन्दत् ज्योतिः मनवे हविष्मते ॥ ८ ॥

एखाद्या रुष्ट झालेल्या वृषभाप्रमाणें जो रजोलोकांत घुसला, ज्याने ही उदकें (दुष्टांच्या तावडीतून सोडवून) आर्यजनांच्या स्वाधीन केलीं, त्याच भगवंतानें तात्काळ दान करणार्‍या मनुभक्ताला प्रकाशाचा लाभ दिला ८.


उज् जा॑यतां पर॒शुर्ज्योति॑षा स॒ह भू॒या ऋ॒तस्य॑ सु॒दुघा॑ पुराण॒वत् ।
वि रो॑चतां अरु॒षो भा॒नुना॒ शुचिः॒ स्व१र्ण शु॒क्रं शु॑शुचीत॒ सत्प॑तिः ॥ ९ ॥

उत् जायतां परशुः ज्योतिषा सह भूयाः ऋतस्य सु-दुघा पुराण-वत्
वि रोचतां अरुषः भानुना शुचिः स्वः ण शुक्रं शुशुचीत सत्-पतिः ॥ ९ ॥

फरशु झळाळतच (शत्रू) वर उगारला जावो. सत्यधर्मरूप (काम)धेनु पुरातन कालाप्रमाणें आतांहि भरपूर दुग्ध सहज देवो. तो पवित्र आरक्तवर्ण रवि आपल्या किरणांनी उज्ज्वलतेनें प्रकाशों, आणि त्याच्या दिव्य तेजाप्रमाणें हा सज्जनप्रतिपालक इंद्रहि वारंवार आपला प्रकाश दृग्गोचर करो ९.


गोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् ।
व॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥

गोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां व
यं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥

आम्हीं अविचारामुळें ओढवणार्‍या आपत्तीतून गोधनाच्या योगाने पार पडूं. हे असंख्य भक्तसेविता देवा, धान्यसंग्रहाच्या योगाने सर्व प्रकारच्या क्षुत्पीडेंतून आम्ही निभावून जाऊं, आणि आपल्या राजांसह सर्वांच्या आघाडीस राहून स्वपराक्रमानें यशोधन संपादन करूं १०.


बृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः ।
इन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥

बृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः
इन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥

प्रार्थनेचा प्रभु जो (बृहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीवर, वरच्या बाजूस, तसेंच खालच्या बाजूस, याप्रमाणें सर्व बाजूंस राहून दुष्ट पातक्यापासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि अधे मधें देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मङ्‌गल होईल असें करो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४४ (इंद्रसूक्त)

ऋषी - कृष्ण अंगिरस
देवता - इंद्र
छं - १-३, १०-११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


आ या॒त्व् इन्द्रः॒ स्वप॑ति॒र्मदा॑य॒ यो धर्म॑णा तूतुजा॒नस्तुवि॑ष्मान् ।
प्र॒त्व॒क्षा॒णो अति॒ विश्वा॒ सहां॑स्यपा॒रेण॑ मह॒ता वृष्ण्ये॑न ॥ १ ॥

आ यातु इन्द्रः स्व-पतिः मदाय यः धर्मणा तूतुजानः तुविष्मान्
प्र-त्वक्षाणः अति विश्वा सहांसि अपारेण महता वृष्ण्येन ॥ १ ॥

स्वत:सिद्ध (विश्वा)धिपति (इंद्र) हृष्टचित्त होण्यासाठीं येथें आगमन करो. जो इंद्र सत्यधर्मानेंच शासन करणारा, उत्कटप्रतापी आणि जाज्वल्य आहे, तो आपल्या अपार आणि उत्कृष्ट पौरुषानें शत्रूंची यच्चावत्‌ प्रबल सैन्यें पार गारद करून टाकतो १.


सु॒ष्ठामा॒ रथः॑ सु॒यमा॒ हरी॑ ते मि॒म्यक्ष॒ वज्रो॑ नृपते॒ गभ॑स्तौ ।
शीभं॑ राजन् सु॒पथा या॑ह्य॒र्वाङ् वर्धा॑म ते प॒पुषो॒ वृष्ण्या॑नि ॥ २ ॥

सु-स्थामा रथः सु-यमा हरी इति ते मिम्यक्ष वज्रः नृ-पते गभस्तौ
शीभं राजन् सु-पथा आ याहि अर्वाङ् वर्धाम ते पपुषः वृष्ण्यानि ॥ २ ॥

तुझ्या रथाची गति सुनिश्चित आहे. त्याचे हरिद्वर्ण अश्व देखील सुयंत्र चालणारे आहेत. हे शूरांच्या प्रभो, तुझ्या हातांतील वज्र सुद्धां फार खुलून दिसत आहे. हे (विश्वाच्या)राजा, आमच्याकडे तूं आपल्या ॠजु मार्गानें ये;(भक्तांना) समृद्ध करणारा तूं, त्या तुझे पराक्रम आम्हीहि वृद्धिंगत करू २.


एन्द्र॒वाहो॑ नृ॒पतिं॒ वज्र॑बाहुं उ॒ग्रं उ॒ग्रास॑स्तवि॒षास॑ एनम् ।
प्रत्व॑क्षसं वृष॒भं स॒त्यशु॑ष्मं॒ एं अ॑स्म॒त्रा स॑ध॒मादो॑ वहन्तु ॥ ३ ॥

आ इन्द्र-वाहः नृ-पतिं वज्र-बाहुं उग्रं उग्रासः तविषासः एनं
प्र-त्वक्षसं वृषभं सत्य-शुष्मं आ ईं अस्म-त्रा सध-मादः वहन्तु ॥ ३ ॥

इंद्राचे ते उग्र, दमदार आणि त्याच्याच बरोबर हर्षित होणारे अश्व, त्या शूराधिपाला, त्या वज्रधर, शत्रुभयंकर, जाज्वल्य, वीरपुंगव आणि सत्यपराक्रमी इंद्राला आमच्याकडे घेऊन येवोत ३.


ए॒वा पतिं॑ द्रोण॒साचं॒ सचे॑तसं ऊ॒र्ज स्क॒म्भं ध॒रुण॒ आ वृ॑षायसे ।
ओजः॑ कृष्व॒ सं गृ॑भाय॒ त्वे अप्यसो॒ यथा॑ केनि॒पानां॑ इ॒नो वृ॒धे ॥ ४ ॥

एव पतिं द्रोण-साचं स-चेतसं ऊर्जः स्कम्भं धरुणे आ वृष-यसे
ओजः कृष्व सं गृभाय त्वे इति अपि असः यथा के--निपानां इनः वृधे ॥ ४ ॥

तसेंच, तो (सज्जन) पालक, चैतन्यदायक आणि उर्जस्वितेचा आधार असा जो द्रोणकलशांत ओतलेला सोमरस त्याच्याविषयीं ( हे देवा) तूं आसोशी दाखवित आहेस, तर हे इंद्रा आपली ओजस्विता प्रकट कर आणि हा रस ग्रहण कर. सर्व बुद्धिमानांचा तूं प्रभु आहेस, त्यांचा उत्कर्ष करणारा आहेस ४.


गम॑न्न् अ॒स्मे वसू॒न्या हि शंसि॑षं स्वा॒शिषं॒ भरं॒ आ या॑हि सो॒मिनः॑ ।
त्वं ई॑शिषे॒ सास्मिन्न् आ स॑त्सि ब॒र्हिष्य॑नाधृ॒ष्या तव॒ पात्रा॑णि॒ धर्म॑णा ॥ ५ ॥

गमन् अस्मे इति वसूनि आ हि शंसिषं सु-आशिषं भरं आ याहि सोमिनः
त्वं ईशिषे सः अस्मिन् आ सत्सि बर्हिषि अनाधृष्या तव पात्राणि धर्मणा ॥ ५ ॥

अभिलषणीय धनें आमच्या हातीं आली असलीं, तरी तुझ्या उत्तम आशीर्वादाची आकांक्षा मी धरलीच पाहिजे. म्हणून सोम अर्पण करणार्‍या भक्ताचा हविर्भाग ग्रहण करण्याकरितां ये. तूं सर्वसत्ताधीश आहेस, पण या यज्ञांत कुशासनावर तूं आरोहण कर. तुझ्या धर्मानुज्ञेवरूनच ही सोमपात्रें कोणालाहि अनादरणीय होत नाहीत ५.


पृथ॒क् प्राय॑न् प्रथ॒मा दे॒वहू॑त॒योऽ॑कृण्वत श्रव॒स्यानि दु॒ष्टरा॑ ।
न ये शे॒कुर्य॒ज्ञियां॒ नावं॑ आ॒रुहं॑ ई॒र्मैव ते न्यविशन्त॒ केप॑यः ॥ ६ ॥

पृथक् प्र आयन् प्रथमाः देव-हूतयः अकृण्वत श्रवस्यानि दुस्तरा
न ये शेकुः यजियां नावं आरुहं ईर्मा एव ते नि अविशन्त केपयः ॥ ६ ॥

देवाचे धांवे आम्हीं प्रथम अगदीं स्वतंत्रपणें म्हटले, तेव्हां अलभ्य अशी सद्यशें आम्हांला लाभली; आणि जे या यज्ञरूप नौकेवर बसूं शकले नाहींत, ते अधम पार नरकांत पडले ६.


ए॒वैवापा॒ग् अप॑रे सन्तु दू॒ढ्योऽ॑श्वा॒ येषां॑ दु॒र्युज॑ आयुयु॒ज्रे ।
इ॒त्था ये प्राग् उप॑रे॒ सन्ति॑ दा॒वने॑ पु॒रूणि॒ यत्र॑ व॒युना॑नि॒ भोज॑ना ॥ ७ ॥

एव एव अपाक् अपरे सन्तु दुः-ध्यः अश्वाः येषां दुः-युजः आयुयुज्रे
इत्था ये प्राक् उपरे सन्ति दावने पुरूणि यत्र वयुनानि भोजना ॥ ७ ॥

दुसरेहि दुरात्मे अगदी असेच अधोगतीला जाणार. (ते कोण ? तर) ज्यांचे (मनोरूप) अश्व सहजासहजी जोडले जाणारे नव्हेत, तथापि तेहि जोडले गेले असे लोक; म्हणजे त्यांच्या ठिकाणीं विपुल ज्ञान आणि संपत्ति असूनहि जे दानकर्माच्या दृष्टीनें एक कपर्दिकहि धर्म करीत नाहींत ७.


गि॒रीँरज्रा॒न् रेज॑मानाँ अधारय॒द्द्यौः क्र॑न्दद॒न्तरि॑क्षाणि कोपयत् ।
स॒मी॒ची॒ने धि॒षणे॒ वि ष्क॑भायति॒ वृष्णः॑ पी॒त्वा मद॑ उ॒क्थानि॑ शंसति ॥ ८ ॥

गिरीन् अज्रान् रेजमानान् अधारयत् द्यौः क्रन्दत् अन्तरिक्षाणि कोपयत्
समीचीने इतिसम्-ईचीने धिषणेइति वि स्कभायति वृष्णः पीत्वा मदे उक्थानि शंसति ॥ ८ ॥

इंद्र हा असा आहे, कीं त्याने पर्वत आणि मैदाने थरथर कांपू लागली असतांना त्यांना स्थिर ठेवले; तेव्हां द्युलोक गर्जना करूं लागतो आणि तो अंतरीक्षाला सतावून सोडतो, परंतु इंद्र दोघांनाहि आवरून धरतो आणि वीर्यशालि सोमरसाचा आस्वाद घेऊन भक्ताच्या स्तवनांची प्रशंसा करतो ८.


इ॒मं बि॑भर्मि॒ सुकृ॑तं ते अङ्कु॒शं येना॑रु॒जासि॑ मघवञ् छफा॒रुजः॑ ।
अ॒स्मिन् सु ते॒ सव॑ने अस्त्व् ओ॒क्यं सु॒त इ॒ष्टौ म॑घवन् बो॒ध्याभ॑गः ॥ ९ ॥

इमं बिभर्मि सु-कृतं ते अङ्कुशं येन आरुजासि मघ-वन् शफ-आरुजः
अस्मिन् सु ते सवने अस्तु ओक्यं सुते इष्टौ मघ-वन् बोधि आभगः ॥ ९ ॥

हा तुझा पाजळलेला अंकुश, कीं ज्याच्या योगाने हे भगवंता, दुसर्‍यावर टापा झाडणार्‍या दुष्टांना तूं भोंसकतोस तोच हा अंकुश मी हातीं घेत आहे. तर ह्या यागप्रसंगी, हे ठिकाण आपलेंच घर आहे असें मान. आणि हे भगवंता, या यज्ञांत तूं आम्हांला भाग्यदाता हो ९.


गोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् ।
व॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥

गोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां
वयं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥

आम्ही अविचारामुळे ओढवणार्‍या आपत्तींतून गोधनाच्या योगाने पार पडूं. हे असंख्य भक्तस्तुता देवा, धान्यसंग्रहाच्या योगानें सर्व प्रकारच्या क्षुत्पीडेंतूनहि आम्हीं निभावून जाऊं, आणि आपल्या राजासह आघाडीस हो‍ऊन स्वपराक्रमाने यशोधन संपादन करूं असे कर १०.


बृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः ।
इन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥

बृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः
इन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥

प्रार्थनेचा प्रभु जो (बहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीकडून, तसेंच वरच्या बाजूने त्याचप्रमाणें खालच्या बाजूने, अर्थात्‌ सर्व दिशांकडे राहून दुष्ट पातक्यांपासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि अधेमधे देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मङ्‌गल होईल असें करो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४५ (अग्निसूक्त)

ऋषी - व्तसप्रि भालंदन
देवता - अग्नि
छं - त्रिष्टुभ्


दि॒वस्परि॑ प्रथ॒मं ज॑ज्ञे अ॒ग्निर॒स्मद्द्वि॒तीयं॒ परि॑ जा॒तवे॑दाः ।
तृ॒तीयं॑ अ॒प्सु नृ॒मणा॒ अज॑स्रं॒ इन्धा॑न एनं जरते स्वा॒धीः ॥ १॥

दिवः परि प्रथमं जजे अग्निः अस्मत् द्वितीयं परि जात-वेदाः
तृतीयं अप्-सु नृ-मनाः अजस्रं इन्धानः एनं जरते सु-आधीः ॥ १ ॥

अग्नि पहिल्यानें द्युलोकांत प्रदुर्भूत होतो. नंतर दुसर्‍याने तो सकल वस्तुज्ञाता अग्नि आमच्या यज्ञगृहांत प्रकट होतो; आणि तिसर्‍या खेपेस तो वीरवृत्ति देव उदकांत अवतीर्ण होतो म्हणून प्रज्वलित असलेल्या त्या अग्नीचे स्तवन ध्यानशील भक्त निरंतर करीत राहतो १.


वि॒द्मा ते॑ अग्ने त्रे॒धा त्र॒याणि॑ वि॒द्मा ते॒ धाम॒ विभृ॑ता पुरु॒त्रा ।
वि॒द्मा ते॒ नाम॑ पर॒मं गुहा॒ यद्वि॒द्मा तं उत्सं॒ यत॑ आज॒गन्थ॑ ॥ २ ॥

विद्म ते अग्ने त्रेधा त्रयाणि विद्म ते धाम वि-भृता पुरु-त्रा
विद्म ते नाम परमं गुहा यत् विद्म तं उत्सं यतः आजगन्थ ॥ २ ॥

हे अग्नि, तुझीं तीं तीन प्रकारची तीन स्वरूपें आम्हीं जाणतो; तूं अनेक ठिकाणी निरनिराळी धारण केलेली तेजोवैभवेंहि आम्ही ओळखतों. जें तुझे अत्त्युदात्त नांव गुप्त आहे तेंहि आम्हांला अवगत आहे; आणि तूं जेथून प्रकट होतोस तो (अमृताचा) निर्झर देखील आम्हांला विदित आहे २.


स॒मु॒द्रे त्वा॑ नृ॒मणा॑ अ॒प्स्व् अ१न्तर्नृ॒चक्षा॑ ईधे दि॒वो अ॑ग्न॒ ऊध॑न् ।
तृ॒तीये॑ त्वा॒ रज॑सि तस्थि॒वांसं॑ अ॒पां उ॒पस्थे॑ महि॒षा अ॑वर्धन् ॥ ३ ॥

समुद्रे त्वा नृ-मनाः अप्-सु अन्तः नृ-चक्षाः ईधे दिवः अग्ने ऊधन्
तृतीये त्वा रजसि तस्थि-वांसं अपां उप-स्थे महिषाः अवर्धन् ॥ ३ ॥

वीरवृत्ति इंद्राने तुजला समुद्रांत प्रदीप्त केले; हे अग्ने, त्या सर्वदर्शी देवाने तुजला द्युलोकाच्या वक्ष:स्थलावर प्रज्वलित केले आणि तूं तिसर्‍या रजोलोकांत राहत असतां विशाल मरुतांनी तुजला उदकाच्या ठिकाणी वृद्धिंगत केले ३.


अक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑न्न् इव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद्वी॒रुधः॑ सम॒ञ्जन् ।
स॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीं इ॒द्धो अख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भात्य॒न्तः ॥ ४ ॥

अक्रन्दत् अग्निः स्तनयन्-इव द्यौः क्षाम रेरिहत् वीरुधः सम्-अजन्
सद्यः जजानः वि हि ईं इद्धः अख्यत् आ रोदसी इति भानुना भाति अन्तरिति ॥ ४ ॥

पृथ्वीला आपल्या जिव्हेनें चाटून आणि लतादिकांना कवटाळून अग्नीनें असा सिंहनाद केला कीं जणो द्युलोकच गरजला. त्याने एकदम धगधगीतपणे प्रकट हो‍ऊन चोहोंकडे दृष्टि फेंकली आणि उभय लोकांच्यामधील, अंतरालांमध्ये आपल्या किरणांनी प्रकाशूं लागला. ४.


श्री॒णां उ॑दा॒रो ध॒रुणो॑ रयी॒णां म॑नी॒षाणां॒ प्रार्प॑णः॒ सोम॑गोपाः ।
वसुः॑ सू॒नुः सह॑सो अ॒प्सु राजा॒ वि भा॒त्यग्र॑ उ॒षसां॑ इधा॒नः ॥ ५ ॥

श्रीणां उत्-आरः धरुणः रयीणां मनीषाणां प्र-अर्पणः सोम-गोपाः
वसुः सूनुः सहसः अप्-सु राजा वि भाति अग्रे उषसां इधानः ॥ ५ ॥

हा पहा वैभवांचा उगम, हा अचल संपत्तीचा आधार, ज्ञानीजनांचा संतोष, सोमाचा रक्षक, दिव्यलोकींचा निधि, जोमदार सामर्थ्याचा उद्गम आणि उदकांचा राजा; (असा) हा अग्नि उष:कालच्या पूर्वीच प्रदिप्त हो‍ऊन प्रकाशित होत आहे ५.


विश्व॑स्य के॒तुर्भुव॑नस्य॒ गर्भ॒ आ रोद॑सी अपृणा॒ज् जाय॑मानः ।
वी॒ळुं चि॒दद्रिं॑ अभिनत् परा॒यञ् जना॒ यद॒ग्निं अय॑जन्त॒ पञ्च॑ ॥ ६ ॥

विश्वस्य केतुः भुवनस्य गर्भः आ रोदसी इति अपृणात् जायमानः
वीळुं चित् अद्रिं अभिनत् परायन् जनाः यत् अग्नि ं अयजन्त पच ॥ ६ ॥

विश्वाचा ध्वज, जगताचा गाभा, अशा अग्नीने प्रकट हो‍ऊन उभयलोक ओतप्रोत भरून टाकले. पर्वत किती तरी कठिण; परंतु जेव्हां पांचहि समाजांनी अग्नीचे यजन केलें, तेव्हा परत जातांना त्यांनी पर्वताचा चुराडा उडवून दिला ६.


उ॒शिक् पा॑व॒को अ॑र॒तिः सु॑मे॒धा मर्ते॑ष्व् अ॒ग्निर॒मृतो॒ नि धा॑यि ।
इय॑र्ति धू॒मं अ॑रु॒षं भरि॑भ्र॒दुच् छु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ द्यां इन॑क्षन् ॥ ७ ॥

उशिक् पावकः अरतिः सु-मेधाः मर्तेषु अग्निः अमृतः नि धायि
इयर्ति धूमं अरुषं भरिभ्रत् उत् शुक्रेण शोचिषा द्यां इनक्षन् ॥ ७ ॥

(जो) भक्तीचा भुकेला, (जो) पतितपावन जगत्‌प्रभु, जो परमप्रज्ञ आणि अमर आहे अशा अग्नीची स्थापना मर्त्यजनांमध्ये झालीच. तो आपल्या तेजस्वी रश्मिजालाने द्युलोकांत जाऊन भिडतो; तेव्हां आपल्या आरक्त धुराचे लोटच्या लोट तो गरगर फिरवून वर आकाशांत सोडतो ७.


दृ॒शा॒नो रु॒क्म उ॑र्वि॒या व्यद्यौद्दु॒र्मर्षं॒ आयुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः ।
अ॒ग्निर॒मृतो॑ अभव॒द्वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौर्ज॒नय॑त् सु॒रेताः॑ ॥ ८ ॥

दृशानः रुक्मः उर्विया वि अद्यौत् दुः-मर्षं आयुः श्रिये रुचानः
अग्निः अमृतः अभवत् वयः-भिः यत् एनं द्यौः जनयत् सु-रेताः ॥ ८ ॥

तो सुप्रकाशित आणि दृग्गोचर हो‍ऊन आपली प्रभा दूरवर पसरतो; दीनदुर्बलाला जें आयुष्य असह्य होते, त्याच्यावर त्या भक्ताच्या भाग्योदयासाठीं तो आपला प्रकाश पाडतो. जेव्हां वीर्यशाली आकाशपित्याने त्याला जन्म दिला तेव्हां अग्नि हा यौवनाढ्य आणि अमर असाच प्रकट झाला ८.


यस्ते॑ अ॒द्य कृ॒णव॑द्‌भद्रशोचेऽपू॒पं दे॑व घृ॒तव॑न्तं अग्ने ।
प्र तं न॑य प्रत॒रं वस्यो॒ अच्छा॒भि सु॒म्नं दे॒वभ॑क्तं यविष्ठ ॥ ९ ॥

यः ते अद्य कृणवत् भद्र-शोचे अपूपं देव घृत-वन्तं अग्ने
प्र तं नय प्र-तरं वस्यः अच्च अभि सुम्नं देव-भक्तं यविष्ठ ॥ ९ ॥

पवित्र दीप्तियुक्त अग्निदेवा, जो भक्त आज तुजसाठीं घृतयुक्त हवि सिद्ध करीत आहे, त्या देवभक्ताला, हे तारुण्यमूर्ते अग्ने, तूं तत्काळ यौवनोन्मुख कर, त्याला भाग्योन्मुख कर ९.


आ तं भ॑ज सौश्रव॒सेष्व् अ॑ग्न उ॒क्थ-उ॑क्थ॒ आ भ॑ज श॒स्यमा॑ने ।
प्रि॒यः सूर्ये॑ प्रि॒यो अ॒ग्ना भ॑वा॒त्युज् जा॒तेन॑ भि॒नद॒दुज् जनि॑त्वैः ॥ १० ॥

आ तं भज सौश्रवसेषु अग्ने उक्थे--उक्थे आ भज शस्यमाने
प्रियः सूर्ये प्रियः अग्ना भवाति उत् जातेन भिनदत् उत् जनि-त्वैः ॥ १० ॥

प्रख्यातिस पावणार्‍या सत्कृत्यांत, हे अग्निदेवा, त्या भक्ताचे मन प्रसन्न ठेव. प्रत्येक सूक्तगायनांतहि त्याचे मन प्रसन्न ठेव म्हणजे तो सूर्याला प्रिय होईल, तुज अग्निलाहि प्रिय होईल; आणि त्याचे विद्यमान पुत्र आणि वंशज यांच्यासह तो (भक्त) दुष्टांचा व्यूह ढांसळून दे‍ईल १०.


त्वां अ॑ग्ने॒ यज॑माना॒ अनु॒ द्यून् विश्वा॒ वसु॑ दधिरे॒ वार्या॑णि ।
त्वया॑ स॒ह द्रवि॑णं इ॒च्छमा॑ना व्र॒जं गोम॑न्तं उ॒शिजो॒ वि व॑व्रुः ॥ ११॥

त्वां अग्ने यजमानाः अनु द्यून् विश्वा वसु दधिरे वार्याणि
त्वया सह द्रविणं इच्चमानाः व्रजं गो--मन्तं उशिजः वि वव्रुः ॥ ११ ॥

अग्निदेवा, यजमानांनी प्रतिदिनी तुझ्या ठायी सर्व प्रकारे उत्तम वस्तूंचे हवन केलें आणि (निश्चल) धनाची इच्छा धरून तुझ्या सहायाने त्या देवोत्सुक भक्तांनी (प्रकाश) धेनूच्या समूहावरील आवरण दूर केलें ११.


अस्ता॑व्य॒ग्निर्न॒रां सु॒शेवो॑ वैश्वान॒र ऋषि॑भिः॒ सोम॑गोपाः ।
अ॒द्वे॒षे द्यावा॑पृथि॒वी हु॑वेम॒ देवा॑ ध॒त्त र॒यिं अ॒स्मे सु॒वीर॑म् ॥ १२ ॥

अस्तावि अग्निः नरां सु-शेवः वैश्वानरः ऋषि-भिः सोम-गोपाः
अद्वेषे द्यावापृथिवी इति हुवेम देवाः धत्त रयिं अस्मे इति सु-वीरम् ॥ १२ ॥

मानवांचा सौख्यदाता, सकल भक्तजनांचा कैवारी, सोम यागाचा संरक्षक असा जो अग्नि याचे स्तवन ऋषींनी केले आहेच. आणि आतां, द्वेषरहित अशा द्यावापृथिवीप्रीत्यर्थ आम्ही हवन करीत आहों; तर हे दिव्यविभूतींनो, शूर वीरांनी युक्त असें ऐश्वर्य आम्हाला अर्पण करा १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४६ (अग्निसूक्त)

ऋषी - व्तसप्रि भालंदन
देवता - अग्नि
छं - त्रिष्टुभ्


प्र होता॑ जा॒तो म॒हान् न॑भो॒विन् नृ॒षद्वा॑ सीदद॒पां उ॒पस्थे॑ ।
दधि॒र्यो धायि॒ स ते॒ वयां॑सि य॒न्ता वसू॑नि विध॒ते त॑नू॒पाः ॥ १॥

प्र होता जातः महान् नभः-वित् नृ-सद्वा सीदत् अपां उप-स्थेः
दधिः यः धायिः सः तेः वयांसि यन्ता वसूनि विधते तनू-पाः ॥ १ ॥

जो (अग्नि) यज्ञसंपादक म्हणून प्रकट झाला, जो श्रेष्ठ आणि मेघमंडलाचा ज्ञाता आहे, (जो) शूर समुदायांत अधिष्टित होणारा, उदकांच्या उद्गमस्थानी विराजमान झाला असा तो सर्वांचा धारक (अग्नि) तुजसाठी येथे स्थापन केला आहे; तो भक्ताचा रक्षणकर्ता आहे; तो तुजला उत्कृष्ट वरदानें अर्पण करील १.


इ॒मं वि॒धन्तो॑ अ॒पां स॒धस्थे॑ प॒शुं न न॒ष्टं प॒दैरनु॑ ग्मन् ।
गुहा॒ चत॑न्तं उ॒शिजो॒ नमो॑भिरि॒च्छन्तो॒ धीरा॒ भृग॑वोऽविन्दन् ॥ २ ॥

इमं विधन्तः अपां सध-स्थे पशुं न नष्टं पदैः अनु ग्मन्
गुहा चतन्तं उशिजः नमः-भिः इच्चन्तः धीराः भृगवः अविन्दन् ॥ २ ॥

ह्याची सेवा करण्याची इच्छा बाळगणार्‍या भक्तांनी (असें केले की) नाहीसा झालेल्या पशूचा माग त्याच्या पावलांच्या योगाने (काढावा) त्याप्रमाणे त्याचा शोध करीत उदकांच्या निवासस्थानी पोहोंचले आणि तेथें गुप्तरूपाने धगधगणार्‍या अग्नीची प्राप्ति प्रणिपातांनी करून घेण्याची इच्छा धरून त्या उत्कंठित आणि ज्ञानी भृगूंनी शेवटी त्याची प्राप्ति करून घेतलीच २.


इ॒मं त्रि॒तो भूर्य॑विन्ददि॒च्छन् वै॑भूव॒सो मू॒र्धन्यघ्न्या॑याः ।
स शेवृ॑धो जा॒त आ ह॒र्म्येषु॒ नाभि॒र्युवा॑ भवति रोच॒नस्य॑ ॥ ३ ॥

इमं त्रितः भूरि अविन्दत् इच्चन् वैभु-वसः मूर्धनि अघ्न्यायाः
सः शेवृधः जातः आ हर्म्येषु नाभिः युवा भवति रोचनस्य ॥ ३ ॥

तसेंच विभुवसाचा पुत्र जो त्रित त्यानेंहि ह्या अग्नि (च्या प्राप्ती) ची इच्छा धरली आणि जिचा घात कधीं कोणी करीत नाही अशा पवित्र भूमिच्या उच्च प्रदेशावर त्याची प्राप्ति करून घेतली. असा तो कल्याणवर्धक अग्नि आमच्या मंदिरांत प्रकट झाला. याप्रमाणे तो यौवनाढ्य अग्नि अखिल तेजस्वितेचा कंदच आहे ३.


म॒न्द्रं होता॑रं उ॒शिजो॒ नमो॑भिः॒ प्राञ्चं॑ य॒ज्ञं ने॒तारं॑ अध्व॒राणा॑म् ।
वि॒शां अ॑कृण्वन्न् अर॒तिं पा॑व॒कं ह॑व्य॒वाहं॒ दध॑तो॒ मानु॑षेषु ॥ ४ ॥

मन्द्रं होतारं उशिजः नमः-भिः प्राचं यजं नेतारं अध्वराणां
विशां अकृण्वन् अरतिं पावकं हव्य-वाहं दधतः मानुषेषु ॥ ४ ॥

उत्कंठित भक्तांनी प्रणिपात केला आणि त्या हर्षोत्फुल्ल यज्ञसंपादकाला, त्या यज्ञाभिमुख (अग्नीला) अध्वरयागांच्या त्या नायकाला, (देवतांना) हविर्भाग पोहोंचविणार्‍या त्या पतितपावनाला मानवलोकांत ठेवून घेवून सर्व प्रजाजनांचा अग्रेसर केलें ४.


प्र भू॒र्जय॑न्तं म॒हां वि॑पो॒धां मू॒रा अमू॑रं पु॒रां द॒र्माण॑म् ।
नय॑न्तो॒ गर्भं॑ व॒नां धियं॑ धु॒र्हिरि॑श्मश्रुं॒ नार्वा॑णं॒ धन॑र्चम् ॥ ५ ॥

प्र भूः जयन्तं महान् विपः-धां मूराः अमूरं पुरां दर्माणं
नयन्तः गर्भं वनां धियं धुः हिरि-श्मश्रुं न अर्वाणं धन-अर्चम् ॥ ५ ॥

भूलोक पादाक्रांत करणारा, श्रेष्ठ, काव्यस्फूर्ति देणारा आणि शत्रूंची तटबंदी नगरें उध्वस्त करणारा जो विचक्षण अग्नि त्याला अंत:करण व्यग्र झालेल्या भक्तांनी पुढे आणले; आणि अरण्यांत (किंवा उदकांत) बीजरूपाने वास करणारा सुवर्णवर्ण अयाळाच्या अश्वावरील वीराप्रमाणें उज्ज्वल आणि यशोधन अर्पण करणारा तो जो अग्नि त्याच्या ठिकाणी आपलें ध्यान लावले ५.


नि प॒स्त्यासु त्रि॒त स्त॑भू॒यन् परि॑वीतो॒ योनौ॑ सीदद॒न्तः ।
अतः॑ सं॒गृभ्या॑ वि॒शां दमू॑ना॒ विध॑र्मणाय॒न्त्रैरी॑यते॒ नॄन् ॥ ६ ॥

नि पस्त्यासु त्रितः स्तभु-यन् परि-वीतः योनौ सीदत् अन्तरिति
अतः सम्-गृभ्य विशां दमूना वि-धर्मणा अयन्त्रैः ईयते नॄन् ॥ ६ ॥

याप्रमाणें तो गृह्याग्नि स्थिर हो‍ऊन वेदीरूप मंदिरांत (भक्तजनांनी) वेढला गेला आणि आपल्या स्वस्थानाच्या आंत अधिष्ठित झाला आणि तेथूनच तो शांतदांत देव येथील प्रजाजनांना कह्यांत ठेवून नाना प्रकारच्या धर्ममार्गानें यंत्रनियंत्रणाशिवायच शूर भक्तांकडे गमन करूं लागला ६.


अ॒स्याजरा॑सो द॒मां अ॒रित्रा॑ अ॒र्चद्धू॑मासो अ॒ग्नयः॑ पाव॒काः ।
श्वि॒ती॒चयः॑ श्वा॒त्रासो॑ भुर॒ण्यवो॑ वन॒र्षदो॑ वा॒यवो॒ न सोमाः॑ ॥ ७ ॥

अस्य अजरासः दमां अरित्राः अर्चत्-धूमासः अग्नयः पावकाः
श्वितीचयः श्वात्रासः भुरण्यवः वन-सदः वायवः न सोमाः ॥ ७ ॥

कधीं क्षीण न होणारे आणि शांतदांत भक्तजनांचा उद्धार करणारे असे हे उज्ज्वल धूमाचे लोट ह्या अग्नीचे आहेत. हे गृह्याग्नीचे धूमाचे लोट-भक्तपावन, शुभ्र तेजस्क, प्रबल आणि प्रचंड वेगवान्‌ आहेत. ते वायूप्रमाणें आणि सोमवनस्पतीप्रमाणें अरण्यांत वास करणारे आहेत ७.


प्र जि॒ह्वया॑ भरते॒ वेपो॑ अ॒ग्निः प्र व॒युना॑नि॒ चेत॑सा पृथि॒व्याः ।
तं आ॒यवः॑ शु॒चय॑न्तं पाव॒कं म॒न्द्रं होता॑रं दधिरे॒ यजि॑ष्ठम् ॥ ८ ॥

प्र जिह्वया भरते वेपः अग्निः प्र वयुनानि चेतसा पृथिव्याः
तं आयवः शुचयन्तं पावकं मन्द्रं होतारं दधिरे यजिष्ठम् ॥ ८ ॥

अग्निदेव आपल्या ज्वालारूप जिव्हेने स्तुतिकवनांचा परिपोष करतो आणि आपल्याच सहृदयतेने पृथ्वीवरील ज्ञानवान्‌ प्राण्यांचेहि पोषण करतो. म्हणूनच भक्तजनांनी त्या दीप्तिमान्‌ पतितपावन, हृष्टचित्त आणि पूज्यतम अग्नीला यज्ञसंपादक म्हणून वेदीवर स्थापन केलें ८.


द्यावा॒ यं अ॒ग्निं पृ॑थि॒वी जनि॑ष्टां॒ आप॒स्त्वष्टा॒ भृग॑वो॒ यं सहो॑भिः ।
ई॒ळेन्यं॑ प्रथ॒मं मा॑त॒रिश्वा॑ दे॒वास्त॑तक्षु॒र्मन॑वे॒ यज॑त्रम् ॥ ९ ॥

द्यावा यं अग्निं पृथिवी इति जनिष्टां आपः त्वष्टा भृगवः यं सहः-भिः
ईळेन्यं प्रथमं मातरिश्वा देवाः ततक्षुः मनवे यजत्रम् ॥ ९ ॥

ज्याला द्यावापृथिवींनी प्रकट केलें, ज्याला उदकांनी, त्वष्ट्याने आणि भृगूंनी आपल्या दुर्दम्यबलांनी प्रकट केले; त्या स्तवनीय, आद्य आणि परमपूज्य अग्नीला मनुराजासाठीं मातरिश्वानें आणि दिव्यविबुधांनीही मंथन करून प्रकट केले आहे ९.


यं त्वा॑ दे॒वा द॑धि॒रे ह॑व्य॒वाहं॑ पुरु॒स्पृहो॒ मानु॑षासो॒ यज॑त्रम् ।
स याम॑न्न् अग्ने स्तुव॒ते वयो॑ धाः॒ प्र दे॑व॒यन् य॒शसः॒ सं हि पू॒र्वीः ॥ १० ॥

यं त्वा देवाः दधिरे हव्य-वाहं पुरु-स्पृहः मानुषासः यजत्रं
सः यामन् अग्ने स्तुवते वयः धाः प्र देव-यन् यशसः सं हि पूर्वीः ॥ १० ॥

हविर्भाग पोहोंचविणारा असा तूं परमपवित्र त्या तुजला दिव्यविबुधांनी आणि नानाविध आकांक्षांनी प्रेरित झालेल्या मानवांनीही वेदीवर स्थापन केले. तर हे अग्नि, तूं ह्या यज्ञमार्गानें तुझे स्तवन करणार्‍या भक्ताला तारुण्य अर्पण कर आणि देवाकडे त्याचे चित्त वळवून त्याला अपरिमित यशोलाभ हो‍ऊं दे १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४७ (सप्तगु-इंद्र संवाद, इंद्राचे पालुपदसूक्त)

ऋषी - सप्तगु अंगिरस
देवता - वैकुंठ इंद्र
छं - त्रिष्टुभ्


ज॒गृ॒भ्मा ते॒ दक्षि॑णं इन्द्र॒ हस्तं॑ वसू॒यवो॑ वसुपते॒ वसू॑नाम् ।
वि॒द्मा हि त्वा॒ गोप॑तिं शूर॒ गोनां॑ अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ १॥

जगृभ्म ते दक्षिणं इन्द्र हस्तं वसु-यवः वसु-पते वसूनां
विद्म हि त्वा गो--पतिं शूर गोनां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ १ ॥

हे इंद्रा, आम्हीं तुझा उजवा हातच धरून ठेवला आहे; कारण हे दिव्यनिधींच्या नाथा, आम्ही उत्कृष्ट संपत्तीची इच्छा धरलेली आहे. प्रकाशधेनूंचा प्रभु तूं आहेस. ही गोष्ट, हे इंद्रा, आम्ही जाणतो; तर पौरुषत्वाने युक्त असें जे अद्‌भुत ऐश्वर्य आहे तें आम्हांस अर्पण कर १.


स्वा॒यु॒धं स्वव॑सं सुनी॒थं चतुः॑समुद्रं ध॒रुणं॑ रयी॒णाम् ।
च॒र्कृत्यं॒ शंस्यं॒ भूरि॑वारं अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ २ ॥

सु-आयुधं सु-अवसं सु-नीथं चतुः-समुद्रं धरुणं रयीणां
चर्कृत्यं शंस्यं भूरि-वारं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ २ ॥

तुझीं आयुधें उत्कृष्ट, तुझा कृपाप्रसाद उत्कृष्ट आणि तुझे धुरीणत्वही उत्कृष्ट आहे; ऐश्वर्यांचे चारही समुद्र आणि त्यांचा आधार तूंच आहेस; तूं महापराक्रमी, स्तवनीय आणि अपारवरदानें देणारा आहेस. (हेंहि आम्हीं जाणतो, तर) पौरुषानें युक्त असें जे अद्‍भुत ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर २.


सु॒ब्रह्मा॑णं दे॒वव॑न्तं बृ॒हन्तं॑ उ॒रुं ग॑भी॒रं पृ॒थुबु॑ध्नं इन्द्र ।
श्रु॒तऋ॑षिं उ॒ग्रं अ॑भिमाति॒षाहं॑ अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ३ ॥

सु-ब्रह्माणं देव-वन्तं बृहन्तं उरुं गभीरं पृथु-बुध्नं इन्द्र
श्रुत-ऋषिं उग्रं अभिमाति-सहं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ३ ॥

तू ज्ञानमय, तसाच उत्कृष्ट स्तवनांचा विषय आहेस; इंद्रा, तूं देवाधिदेव कसा आहेस तर श्रेष्ठ, अपार सखोल, विशाल असा आधारस्तंब आहेस. तूं ऋषींना विख्यात करणारा, उग्र, आणि दुष्टांचे निर्दलन करणारा आहेस; तर पौरुषाने युक्त असें जें ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर ३.


स॒नद्वा॑जं॒ विप्र॑वीरं॒ तरु॑त्रं धन॒स्पृतं॑ शूशु॒वांसं॑ सु॒दक्ष॑म् ।
द॒स्यु॒हनं॑ पू॒र्भिदं॑ इन्द्र स॒त्यं अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ४ ॥

सनत्-वाजं विप्र-वीरं तरुत्रं धन-स्पृतं शूशु-वांसं सु-दक्षं
दस्युहनं पूः-भिदं इन्द्र सत्यं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ४ ॥

तूं सत्वसामर्थ्याचा दाता आहेस; स्तवन कराणारे भक्त वीर तुझे आहेत; आणि तूं भक्तोद्धारक, धनेच्छा परिपूर्ण करणारा, सामर्थ्याने सळसळणारा आणि अत्यंत कुशल आहेस; तूं पाखंड्यांचा उच्छेद करतोस; तूं शत्रूंची नगरे छिन्नभिन्न करतोस, आणि हे इंद्रा, तूं सत्यस्वरूप आहेस (हें आम्ही जाणतों) तर पौरुषयुक्त असें जें ऐश्वर्य आहे, ते आम्हांस अर्पण कर ४.


अश्वा॑वन्तं र॒थिनं॑ वी॒रव॑न्तं सह॒स्रिणं॑ श॒तिनं॒ वाजं॑ इन्द्र ।
भ॒द्रव्रा॑तं॒ विप्र॑वीरं स्व॒र्षां अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ५ ॥

अश्व-वन्तं रथिनं सहस्रिणं शतिनं वाजं इन्द्र
भद्र-व्रातं विप्र-वीरं स्वः-सां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ५ ॥

तुजजवळ (असंख्य) अश्व आहेत, तूं रथी आहेस, तूं वीरनायक आहेस. आणि हे इंद्रा, शेंकडोंच काय, पण हजारों सत्यसामर्थ्ये तुजपाशीं आहेत; तू कल्याणाने, बलाने परिपूर्ण, विप्र सैनिकांनी युक्त, आणि दिव्य लोकांचा दाता आहेस; तर पौरुषयुक्त असें जे ऐश्वर्य आहे, तें आम्हांस अर्पण कर ५.


प्र स॒प्तगुं॑ ऋ॒तधी॑तिं सुमे॒धां बृह॒स्पतिं॑ म॒तिरच्छा॑ जिगाति ।
य आ॑ङ्गिर॒सो नम॑सोप॒सद्यो॑ऽ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ६ ॥

प्र सप्त-गुं ऋत-धीतिं सु-मेधां बृहस्पतिं मतिः अच्च जिगाति
यः आङ्गिरसः नमसा उप-सद्यः अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ६ ॥

जो सात प्रकारच्या कवनांचा प्रभु आहे, सत्य न्यायाचरणी वागण्यानेंच ज्याचें ध्यान हो‍ऊं शकते, जो सद्‌बुद्धिदाता आणि जो बृहस्पतिरूप, त्याच्याकडे माझे चित्त वेधून गेले आहे; तो अंगिरसांचा प्रिय आहे. अशा तुज भगवंताची उपासना प्रणिपातानें करावयास पाहिजे; तथापि पौरुषयुक्त असें जे ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर ६.


वनी॑वानो॒ मम॑ दू॒तास॒ इन्द्रं॒ स्तोमा॑श्चरन्ति सुम॒तीरि॑या॒नाः ।
हृ॒दि॒स्पृशो॒ मन॑सा व॒च्यमा॑ना अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ७ ॥

वनीवानः मम दूतासः इन्द्रं सोमाः चरन्ति सु-मतीः इयानाः
हृदि-स्पृशः मनसा वच्यमानाः अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ७ ॥

माझे प्रेमळ दूत म्हणजे स्तवनें (होत); ते सद्‌बुद्धीनें युक्त हो‍ऊन इंद्राकडे जात आहेत. तीं स्तवनें हदयंगम आहेत, ती मनांतल्या मनांतहि म्हणता येतात; तर हे देवा, पौरुषयुक्त असें जें ऐश्वर्य तें आम्हांस अर्पण कर ७.


यत् त्वा॒ यामि॑ द॒द्धि तन् न॑ इन्द्र बृ॒हन्तं॒ क्षयं॒ अस॑मं॒ जना॑नाम् ।
अ॒भि तद्द्यावा॑पृथि॒वी गृ॑णीतां अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ८ ॥

यत् त्वा यामि दद्धि तत् नः इन्द्र बृहन्तं क्षयं असमं जनानां
अभि तत् द्यावापृथिवी इति गृणीतां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ८ ॥

म्हणूनच मी तुझी विनवणी करतों, तर असें ऐश्वर्य म्हणजे जगामध्यें अद्वितीय असा जो (तुझा) महान्‌ आश्रय तो आम्हांस अर्पण कर. द्यावा पृथिवी देखील त्याची प्रशंसा करतात. तर हें पौरुषयुक्त अद्‍भुत ऐश्वर्य आम्हांस अर्पण कर ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४८ (इंद्र आत्मस्तुतिसूक्त)

ऋषी - वैकुंठ इंद्र
देवता - इंद्र
छं - ७, १०-११ - त्रिष्टुभ्, अवशिष्ट - जगती


अ॒हं भु॑वं॒ वसु॑नः पू॒र्व्यस्पति॑र॒हं धना॑नि॒ सं ज॑यामि॒ शश्व॑तः ।
मां ह॑वन्ते पि॒तरं॒ न ज॒न्तवो॑ऽ॒हं दा॒शुषे॒ वि भ॑जामि॒ भोज॑नम् ॥ १॥

अहं भुवं वसुनः पूर्व्यः पतिः अहं धनानि सं जजामि शश्वतः
मां हवन्ते पितरं न जन्तवः अहं दाशुषे वि भजामि भोजनम् ॥ १ ॥

मी दिव्यनिधीचा मुख्य आणि आद्य अधिपति झालों आहे. शाश्वत अशीं जीं धनें तीं मीच पूर्णपणें जिंकून भक्तांना देतो. पित्याला हांक मारावी त्याप्रमाणें प्राणिमात्र मलाच हांक मारतात; आणि भक्ताला सुखाचा उपभोग मीच घडवितो १.


अ॒हं इन्द्रो॒ रोधो॒ वक्षो॒ अथ॑र्वणस्त्रि॒ताय॒ गा अ॑जनयं॒ अहे॒रधि॑ ।
अ॒हं दस्यु॑भ्यः॒ परि॑ नृ॒म्णं आ द॑दे गो॒त्रा शिक्ष॑न् दधी॒चे मा॑त॒रिश्व॑ने ॥ २ ॥

अहं इन्द्रः रोधः वक्षः अथर्वणः त्रितायः गाः अजनयं अहेः अधि
अहं दस्यु-भ्यः परि नृम्णं आ ददे गोत्रा शिक्षन् दधीचे मातरिश्वने ॥ २ ॥

मी इंद्रच अथर्वणाचा आधार आणि हृदय आहे; अहि (भुजंगा) च्या छातीवर प्रहार करून त्रित आप्त्यासाठीं मी प्रकाश-धेनू जिंकून आणल्या; दधीची भक्ताच्या आणि मातरिश्वाच्या हातांत प्रकाश-धेनूंचे आवार सुरक्षित ठेवण्याकरितां अधार्मिक दुष्टांपासून त्यांचे पौरुष म्हणजे प्राण मींच हिरावून घेतले २.


मह्यं॒ त्वष्टा॒ वज्रं॑ अतक्षदाय॒सं मयि॑ दे॒वासो॑ऽवृज॒न्न् अपि॒ क्रतु॑म् ।
ममानी॑कं॒ सूर्य॑स्येव दु॒ष्टरं॒ मां आर्य॑न्ति कृ॒तेन॒ कर्त्वे॑न च ॥ ३ ॥

मह्यं त्वष्टा वज्रं अतक्षत् आयसं मयि देवासः अवृजन् अपि क्रतुं
मम अनीकं सूर्यस्य-इव दुस्तरं मां आर्यन्ति कृतेन कर्त्वेन च ॥ ३ ॥

माझ्याकरितां त्वष्ट्यानें पोलादाचे वज्र बनविले आणि माझ्याच ठिकाणी दिव्यविभूतींनी आपला सर्व भरंवसा ठेवला. माझा तेजसमूह सूर्याप्रमाणें दु:सह आहे आणि मी पूर्वी केलेल्या व पुढेंहि माझ्या हातून होणार्‍या कर्तृत्वामुळें मलाच आर्य भक्तजनांचा धुरीण समजतात ३.


अ॒हं ए॒तं ग॒व्ययं॒ अश्व्यं॑ प॒शुं पु॑री॒षिणं॒ साय॑केना हिर॒ण्यय॑म् ।
पु॒रू स॒हस्रा॒ नि शि॑शामि दा॒शुषे॒ यन् मा॒ सोमा॑स उ॒क्थिनो॒ अम॑न्दिषुः ॥ ४ ॥

अहं एतं गव्ययं अश्व्यं पशुं पुरीषिणं सायकेन हिरण्ययं
पुरु सहस्रा नि शिशामि दाशुषे यत् मा सोमासः उक्थिनः अमन्दिषुः ॥ ४ ॥

हा धेनूंचा, अश्वांचा तसाच पशूंचा समूह आणि सुवर्णाचा तेज:पुंज संचय मी आपल्या बाणानें हस्तगत केला आणि सोमरसांनी व सामगायन करणार्‍या भक्तांनी मलाच हर्षनिर्भर केले, म्हणून (वरील संचयापैकी) सहस्त्रावधि (धेनू, अश्व आणि सुवर्ण) मी भक्ताला देऊन हर्षित करतो ४.


अ॒हं इन्द्रो॒ न परा॑ जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽ॑व तस्थे॒ कदा॑ च॒न ।
सोमं॒ इन् मा॑ सु॒न्वन्तो॑ याचता॒ वसु॒ न मे॑ पूरवः स॒ख्ये रि॑षाथन ॥ ५ ॥

अहं इन्द्रः न परा जिग्ये इत् धनं न मृत्यवे अव तस्थे कदा चन
सोमं इत् मा सुन्वन्तः याचत वसु न मे पूरवः सख्ये रि षाथन ॥ ५ ॥

मी इंद्र असा आहें कीं माझे वैभव कधीच र्‍हास पावत नाही. मी मृत्यूच्या आहारी कधींही जात नाही; म्हणून सोमरस पिळून तुम्ही मजपाशींच दिव्यधनाची याचना करतां. तर हे पुरुषांनो, माझ्या कृपाछत्राखाली असतांना तुमचा कदापि नाश होणार नाही ५.


अ॒हं ए॒ताञ् छाश्व॑सतो॒ द्वा-द्वेन्द्रं॒ ये वज्रं॑ यु॒धयेऽ॑कृण्वत ।
आ॒ह्वय॑मानाँ॒ अव॒ हन्म॑नाहनं दृ॒ळ्हा वद॒न्न् अन॑मस्युर्नम॒स्विनः॑ ॥ ६ ॥

अहं एतान् शाश्वसतः द्वाद्वा इन्द्रं ये वज्रं युधये अकृण्वत
आह्वयमानान् अव हन्मना अहनं दृळ्हा वदन् अनमस्युः नमस्विनः ॥ ६ ॥

ह्या फोंफों करीत धावून येणार्‍या दुष्टांपैकी दोघादोघांना-ज्यांनी मज इंद्राला युद्धामध्ये वज्र उगारण्याला लाविलें-ज्यांनी मला युद्धाला आव्हान केलें, त्यांना मी आपल्या घातक शस्त्रानें तात्काळ ठार केले आहे; आणि कोणापुढेंहि मान न वांकविणारा जो मी ईश्वर त्याने ’आपल्या जागीं ठाम उभे रहा (इकडे तिकडे जाऊं नका)’ अशी आरोळी भक्तांना दिली ६.


अ॒भीख्प् दं एकं॒ एको॑ अस्मि नि॒ष्षाळ् अ॒भी द्वा किं उ॒ त्रयः॑ करन्ति ।
खले॒ न प॒र्षान् प्रति॑ हन्मि॒ भूरि॒ किं मा॑ निन्दन्ति॒ शत्र॑वोऽनि॒न्द्राः ॥ ७ ॥

अभि इदं एकं एकः अस्मि निष्षाट् अभि द्वा किं ओं इति त्रयः करन्ति
खले न पर्षान् प्रति हन्मि भूरि किं मा निन्दन्तिशत्रवो--निन्द्राः ॥ ७ ॥

मी अद्वितीय-अगदीं एकटा आहे; पण मी आतांचे आतां एका दुष्टाला चेंचून टाकलें; दुसर्‍या दोघांनाही तसेंचे (ठेचून) टाकले; आतां तिघे आले तरी माझें काय करणार आहेत ? खळ्यावर जसे धान्य रगडावें, त्याप्रमाणें कितीही शत्रु असले तरी त्या सर्वांना मी चेंचून ठार करतों. मज इंद्राला न मानणारे दुष्ट शत्रु आतां माझी काय निंदा करणार ७ ?


अ॒हं गु॒ङ्गुभ्यो॑ अतिथि॒ग्वं इष्क॑रं॒ इषं॒ न वृ॑त्र॒तुरं॑ वि॒क्षु धा॑रयम् ।
यत् प॑र्णय॒घ्न उ॒त वा॑ करञ्ज॒हे प्राहं म॒हे वृ॑त्र॒हत्ये॒ अशु॑श्रवि ॥ ८ ॥

अहं गुङ्गु-भ्यः अतिथि-ग्वं इष्करं इषं न वृत्र-तुरं विक्षु धारयं
यत् पर्णय-घ्ने उत वा करज-हे प्र अहं महे वृत्र-हत्ये अशुश्रवि ॥ ८ ॥

मी अतिथिग्वाला प्रभावशाली केलें. शत्रुहनन करणार्‍या त्या भक्ताला लोकांच्या मनाच्या उत्साहाप्रमाणें जतन केलें. त्यामुळें पर्णय मारला गेला किंवा करज्ज ठार झाला; त्या घनघोर युद्धांत माझे नांव चोहोंकडे गाजले ८.


प्र मे॒ नमी॑ सा॒प्य इ॒षे भु॒जे भू॒द्गवां॒ एषे॑ स॒ख्या कृ॑णुत द्वि॒ता ।
दि॒द्युं यद॑स्य समि॒थेषु॑ मं॒हयं॒ आदिदे॑नं॒ शंस्यं॑ उ॒क्थ्यं करम् ॥ ९ ॥
प्र नेम॑स्मिन् ददृशे॒ सोमो॑ अ॒न्तर्गो॒पा नेमं॑ आ॒विर॒स्था कृ॑णोति ।
स ति॒ग्मशृ॑ङ्गं वृष॒भं युयु॑त्सन् द्रु॒हस्त॑स्थौ बहु॒ले ब॒द्धो अ॒न्तः ॥ १० ॥

प्र मे नमी साप्यः इषे भुजे भूत् गवां एषे सख्या कृणुत द्विता
दिद्युं यत् अस्य समिथेषु मंहयं आत् इत् एनं शंस्यं उक्थ्यं करम् ॥ ९ ॥
प्र नेमस्मिन् ददृशे सोमः अन्तः गोपाः नेमं आविः अस्था कृणोति
सः तिग्म-शृङ्गं वृषभं युयुत्सन् द्रुहः तस्थौ बहुले बद्धः अन्तरिति ॥ १० ॥

याचसाठी मी उत्कंठित होण्याला आणि त्याची सेवा मी स्वीकारण्याला हाच "साप्यनमी" भक्त कारण झाला, प्रकाशधेनूंच्या शोधामध्यें त्याने माझे सख्य दुप्पट जोडलें; म्हणून त्याला मी युद्धासाठीं एक झगझगीत शस्त्र दिले आणि त्यायोगाने सामगायनांत त्याची प्रशंसा होईल. तीक्ष्ण शिंगाच्या वृषभाशी (म्हणजे माझ्याशी) झुंजवण्याच्या इच्छेने तो दुरात्मा (पुढे सरसावला) पण स्वत: आपणच सैन्याच्या गराड्यांत अडकून पडला ९-१०.


आ॒दि॒त्यानां॒ वसू॑नां रु॒द्रिया॑णां दे॒वो दे॒वानां॒ न मि॑नामि॒ धाम॑ ।
ते मा॑ भ॒द्राय॒ शव॑से ततक्षु॒रप॑राजितं॒ अस्तृ॑तं॒ अषा॑ळ्हम् ॥ ११॥

आदित्यानां वसूनां रुद्रियाणां देवः देवानां न मिनामि धाम
ते मा भद्राय शवसे ततक्षुः अपराजितं अस्तृतं अषाळ्हम् ॥ ११ ॥

आदित्यांचा, वसूंचा, मरुतांचा, इतकेंच काय, पण सर्व दिव्य विभूतींचा मी देव आहे म्हणून त्यांच्या तेजस्वी सामर्थ्याचा भंग मी हो‍ऊं देत नाही, (जगताच्या) मंगलासाठीं, उत्कृष्ट बल प्रकट करण्यासाठीं अजिंक्य, अविनाशी आणि अनिवार्य असा जो मी त्या मजला त्यांनी विशिष्ट स्वरूप आणले आहे ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४९ (इंद्र आत्मस्तुतिसूक्त)

ऋषी - वैकुंठ इंद्र
देवता - इंद्र
छं - २, ११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


अ॒हं दां॑ गृण॒ते पूर्व्यं॒ वस्व् अ॒हं ब्रह्म॑ कृणवं॒ मह्यं॒ वर्ध॑नम् ।
अ॒हं भु॑वं॒ यज॑मानस्य चोदि॒ताय॑ज्वनः साक्षि॒ विश्व॑स्मि॒न् भरे॑ ॥ १॥

अहं दां गृणते पूर्व्यं वसु अहं ब्रह्म कृणवं मह्यं वधर्नं
अहं भुवं यजमानस्य चोदिता अयज्वनः साक्षि विश्वस्मिन् भरे ॥ १ ॥

स्तोतृजनाला अत्युत्कृष्ट (=दिव्य) निधि मीच दिला. ब्रह्मस्तोत्रानें मला हर्ष व्हावा अशी योजना मीच केली. यज्ञकर्त्याला यज्ञाची प्रेरणा मी केली आणि यज्ञपराङ्‍मुख दुष्टाला जिकडे तिकडे युद्धांत मीच पराभूत केले १.


मां धु॒रिन्द्रं॒ नाम॑ दे॒वता॑ दि॒वश्च॒ ग्मश्चा॒पां च॑ ज॒न्तवः॑ ।
अ॒हं हरी॒ वृष॑णा॒ विव्र॑ता र॒घू अ॒हं वज्रं॒ शव॑से धृ॒ष्ण्व् आ द॑दे ॥ २ ॥

मां धुः इन्द्रं नाम देवता दिवः च ग्मः च अपां च जन्तवः
अहं हरी इति वृषणा वि-व्रता रघू इति अहं वज्रं शवसे धृष्णु आ ददे ॥ २ ॥

द्युलोकांत, भूलोकांत जे उत्पन्न झाले, तसेच उदकांत जे जे प्राणी उत्पन्न झाले, ते सर्वजण मला इंद्र या नांवानें दिव्यविबुधांमध्ये भजूं लागले. नाना तर्‍हेच्या चालींवर चालणारे असे दोन शीघ्रगामी वीर्यवान्‌ हरिद्वर्ण अश्व आणि शत्रुभंजक वज्र याचा स्वीकार-पुरस्कार मी आपला प्रताप गाजविण्यासाठी करतो २.


अ॒हं अत्कं॑ क॒वये॑ शिश्नथं॒ हथै॑र॒हं कुत्सं॑ आवं आ॒भिरू॒तिभिः॑ ।
अ॒हं शुष्ण॑स्य॒ श्नथि॑ता॒ वध॑र्यमं॒ न यो र॒र आर्यं॒ नाम॒ दस्य॑वे ॥ ३ ॥

अहं अत्कं कवये शिश्नथं हथैः अहं कुत्सं आवं आभिः ऊति-भिः
अहं शुष्णस्य श्नथिता वधः यमं न यः ररे आर्यं नाम दस्यवे ॥ ३ ॥

उशना कवीच्या रक्षणासाठी मी आपल्या आयुधांनी अत्काला ठार केले, आणि तशाच सहाय्यांनी कुत्सावर अनुग्रह केला. ज्याच्या योगाने शुष्ण राक्षसाचा उच्छेद केला, ते घातक आयुध मींच (त्याच्यावर) अगदी नेमके फेंकले. अधार्मिक दुरात्म्यांना मी कधींही "आर्य" हे नांव देत नाही ३.


अ॒हं पि॒तेव॑ वेत॒सूँर॒भिष्ट॑ये॒ तुग्रं॒ कुत्सा॑य॒ स्मदि॑भं च रन्धयम् ।
अ॒हं भु॑वं॒ यज॑मानस्य रा॒जनि॒ प्र यद्‌भरे॒ तुज॑ये॒ न प्रि॒याधृषे॑ ॥ ४ ॥

अहं पिताइव वेतसून् अभिष्टये तुग्रं कुत्साय स्मत्-इभं च रन्धयं
अहं भुवं यजमानस्य राजनि प्र यत् भरे तुजये न प्रिया आधृषे ॥ ४ ॥

पिता (पुत्रासाठी वित्त संपादन करतो त्या) प्रमाणें कुत्साच्या उत्कर्षासाठीं वेतसूंना, आणि उत्तमोत्तम हत्ती बाळगणार्‍या तुग्राला मी कुत्साचे मांडलिक केले; आणि लहान मुलाला त्याची प्रिय वस्तु द्यावी त्याप्रमाणें युद्धामध्ये शत्रुसंहारासाठी भक्ताला मी सहाय्य केले त्यामुळे मी यज्ञकर्त्यांचा खरोखरच राजा झालो ४.


अ॒हं र॑न्धयं॒ मृग॑यं श्रु॒तर्व॑णे॒ यन् माजि॑हीत व॒युना॑ च॒नानु॒षक् ।
अ॒हं वे॒शं न॒म्रं आ॒यवे॑ऽकरं अ॒हं सव्या॑य॒ पड्गृ॑भिं अरन्धयम् ॥ ५ ॥

अहं रधयं मृगयं श्रुतर्वणे यत् मा अजिहीत वयुना चन आनुषक्
अहं वेशं नम्रं आयवे अकरं अहं सव्याय पट्-गृभिं अरन्धयम् ॥ ५ ॥

मी मृगयाला श्रुतवर्णाच्या स्वाधीन केले; कारण आपल्या ज्ञानकुशलतेने तो निरंतर मलाच अनुसरला, त्याचप्रमाणें मी आयुपुढे वेशाला नम्र केले आणि "पट्‌गृभि" याला "सव्य" भक्ताच्या अंकित करून दिले ५.


अ॒हं स यो नव॑वास्त्वं बृ॒हद्र॑थं॒ सं वृ॒त्रेव॒ दासं॑ वृत्र॒हारु॑जम् ।
यद्व॒र्धय॑न्तं प्र॒थय॑न्तं आनु॒षग् दू॒रे पा॒रे रज॑सो रोच॒नाक॑रम् ॥ ६ ॥

अहं सः यः नव-वास्त्वं बृहत्-रथं सं वृत्राइव दासं वृत्र-हा अरुजं
यत् वर्धयन्तं प्रथयन्तं आनुषक् दूरे पारे रजसः रोचना अकरम् ॥ ६ ॥

विशाल रथांतून जाणार्‍या नवास्त्व नामक अनार्याला पूर्वी वृत्राचा वध केला त्याप्रमाणेंच, ज्या ’वृत्रनाशन इंद्राने’ ठार केले तोच मी; कारण त्या नवास्त्वाचे स्तोम पूर्वीसारखे माजतच चालले होते; (म्हणून त्याला मारून) मी एकदम दूरच्या रजोलोकाच्या पलीकडे असणारी प्रकाशनक्षत्रें दृग्गोचर केली ६.


अ॒हं सूर्य॑स्य॒ परि॑ याम्या॒शुभिः॒ प्रैत॒शेभि॒र्वह॑मान॒ ओज॑सा ।
यन् मा॑ सा॒वो मनु॑ष॒ आह॑ नि॒र्णिज॒ ऋध॑क् कृषे॒ दासं॒ कृत्व्यं॒ हथैः॑ ॥ ७ ॥

अहं सूर्यस्य परि यामि आशु-भिः प्र एतशेभिः वहमानः ओजसा य
त् मा सावः मनुषः आह निः-निजे ऋधक् कृषे दासं कृत्व्यं हथैः ॥ ७ ॥

मी आपल्या ओजस्वितेने सूर्याच्या एतश नामक शीघ्रगामी अश्वाच्या रथांतून भूलोकाच्या भोंवती फिरतो आणि सोमरस पिळणारा भक्त मला जेव्हां (आत्म) शुध्यर्थ हांक मारतो, तेव्हां कर्तव्य म्हणूनच मी सर्व दुष्टांना आपल्या शस्त्राने ठार करतो ७.


अ॒हं स॑प्त॒हा नहु॑षो॒ नहु॑ष्टरः॒ प्राश्रा॑वयं॒ शव॑सा तु॒र्वशं॒ यदु॑म् ।
अ॒हं न्य१न्यं सह॑सा॒ सह॑स्करं॒ नव॒ व्राध॑तो नव॒तिं च॑ वक्षयम् ॥ ८ ॥

अहं सप्त-हा नहुषः नहुः-तरः प्र अश्रवयं शवसा तुर्वशं यदुं
अहं नि अन्यं सहसा सहः करं नव व्राधतः नवतिं च वक्षयम् ॥ ८ ॥

(वृत्र आदिकरून) मानवाच्या सात शत्रूंना मारणारा मी नहुषाचाहि श्रेष्ठ नहुष आहे मी आपल्या उत्कट प्रतापाने यदु आणि तुर्वश यांची कीर्ति वाढविली. मी आपल्या दर्पनाशन सामर्थ्याने शत्रूला पार रगडून टाकले आणि संख्येने बलाढ्य झालेल्या (रिपूंची) नव्वद नगरें उलथून दिली ८.


अ॒हं स॒प्त स्र॒वतो॑ धारयं॒ वृषा॑ द्रवि॒त्न्वः पृथि॒व्यां सी॒रा अधि॑ ।
अ॒हं अर्णां॑सि॒ वि ति॑रामि सु॒क्रतु॑र्यु॒धा वि॑दं॒ मन॑वे गा॒तुं इ॒ष्टये॑ ॥ ९ ॥

अहं सप्त स्रवतः धारयं वृषा द्रवित्न्वः पृथिव्यां सीराः अधि
अहं अर्णांसि वि तिरामि सु-क्रतुः युधा विदं मनवे गातुं इष्टये ॥ ९ ॥

म्यां वीरपुंगवाने सप्तसिंधूंचे धारण केलें तेव्हां त्या पृथ्वीवर सतत वेगाने खळखळ वहात सुटल्या. मी उत्कृष्ट, अलौकिक, पराक्रमी देव उदकाची वृष्टि करतो आणि मानवी भक्ताच्या इष्टसिद्धीसाठीं युद्धकरूनही त्याचा मार्ग मोकळा करतो ९.


अ॒हं तदा॑सु धारयं॒ यदा॑सु॒ न दे॒वश्च॒न त्वष्टाधा॑रय॒द्रुश॑त् ।
स्पा॒र्हं गवां॒ ऊध॑स्सु व॒क्षणा॒स्व् आ मधो॒र्मधु॒ श्वात्र्यं॒ सोमं॑ आ॒शिर॑म् ॥ १० ॥

अहं तत् आसु धारयं यत् आसु न देवः चन त्वष्टा अधारयत् रुशत्
स्पार्हं गवां ऊधः-सु वक्षणासु आ मधोः मधु श्वात्र्यं सोमं आशिरम् ॥ १० ॥

मी कोणाकोणांत असे कांही ठेवतों की जे त्यांच्यामध्ये दुसरा कोणी देव किंवा त्वष्टा देखील ठेऊं शकत नाही किंवा शकणार नाही. असे आहे ते काय तर, तकतकीत, मिष्ट असे दुग्ध धेनूमध्यें, रुचिकर उदक नद्यांमध्ये आणि स्वादिष्ट, जोमदार, घट्ट असा सोमरस मधुर सोमवल्लीमध्यें ठेविला १०.


ए॒वा दे॒वाँ इन्द्रो॑ विव्ये॒ नॄन् प्र च्यौ॒त्नेन॑ म॒घवा॑ स॒त्यरा॑धाः ।
विश्वेत् ता ते॑ हरिवः शचीवोऽ॒भि तु॒रासः॑ स्वयशो गृणन्ति ॥ ११ ॥

एव देवान् इन्द्रः विव्ये नॄन् प्र च्यौत्नेन मघ-वा सत्य-राधाः
विश्वा इत् ता ते हरि-वः शची-वः अभि तुरासः स्व-यशः गृणन्ति ॥ ११ ॥

याप्रमाणें (कृपा करून) दिव्यविभूतींना आणि तसेंच मानवांनाही भगवान्‌ सत्यकृपानुग्रही इंद्राने आपल्या पराक्रमानें आपआपल्या कार्याला प्रवृत्त केले; म्हणूनच ही तुझी सर्व महत्कृत्यें हे हरिदश्वा, हे समर्था, हे स्वाधीनयशा देवा, तुझे भक्तजन मोठ्या उत्कंठतेने (यज्ञामध्ये) गात असतात ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५० (इंद्रसूक्त)

ऋषी - वैकुंठ इंद्र
देवता - इंद्र
छं - ३-४ - अभिसरिणी; ५ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


प्र वो॑ म॒हे मन्द॑माना॒यान्ध॒सोऽ॑र्चा वि॒श्वान॑राय विश्वा॒भुवे॑ ।
इन्द्र॑स्य॒ यस्य॒ सुम॑खं॒ सहो॒ महि॒ श्रवो॑ नृ॒म्णं च॒ रोद॑सी सप॒र्यतः॑ ॥ १॥

प्र वः महे मन्दमानाय अन्धसः अर्च विश्वानराय विश्व-भुवे
इन्द्रस्य यस्य सु-मखं सहः महि श्रवः नृम्णं च रोदसी इति सपर्यतः ॥ १ ॥

सोमप्राशनासाठी (उत्कंठेने) आनंदित झालेला सर्वश्रेष्ठ सकलजनप्रिय आणि सकलांना उत्पन्न कराणारा जो भगवान (इंद्र) त्याच्या प्रीत्यर्थ अर्कस्तवन मोठ्याने म्हणा. ज्या ह्या इंद्राचा प्रभाव महनीय आहे, आणि ज्याच्या श्रेष्ठ यशाची आणि पौरुषाची महति स्वत: द्यावा पथिवी देखील आदराने वर्णन करीत असतात १.


सो चि॒न् नु सख्या॒ नर्य॑ इ॒न स्तु॒तश्च॒र्कृत्य॒ इन्द्रो॒ माव॑ते॒ नरे॑ ।
विश्वा॑सु धू॒र्षु वा॑ज॒कृत्ये॑षु सत्पते वृ॒त्रे वा॒प्स्व् अ१भि शू॑र मन्दसे ॥ २ ॥

सः चित् नु सख्या नर्यः इनः स्तुतः चर्कृत्यः इन्द्रः मावते नरे
विश्वासु धूः-सु वाज-कृत्येषु सत्-पते वृत्रे वा अप्-सु अभि शूर मन्दसे ॥ २ ॥

हाच तो आहे की ज्याचे सख्य जोडल्याने मानव-हितकारी, जगत्‌प्रभु, स्तुत्य, असा इंद्र मजसारख्या पामराला कर्तव्यतत्पर करतो. सत्वसामर्थ्याची जी जी कृत्यें करावयाची त्या सर्वांमध्ये हे सज्जन प्रतिपालक देवा, तूं अग्रभागीं असतोस; आणि हे शूरा ’वृत्र’ राक्षस उदकामध्यें लपून बसला (हें कळतें असतां) तुजला आनंदाने गुदगुदल्या होतात २.


के ते नर॑ इन्द्र॒ ये त॑ इ॒षे ये ते॑ सु॒म्नं स॑ध॒न्य१ं इय॑क्षान् ।
के ते॒ वाजा॑यासु॒र्याय हिन्विरे॒ के अ॒प्सु स्वासू॒र्वरा॑सु॒ पौंस्ये॑ ॥ ३ ॥

के ते नरः इन्द्र ये ते इषे ये ते सुम्नं स-धन्यं इयक्षान्
के ते वाजाय असुर्याय हिन्विरे के अप्-सु स्वासु उर्वरासु पैंस्ये ॥ ३ ॥

हे इंद्रा, ते भक्त कोणते कीं जे तुझ्या उत्साहाला भरते आणतात, जे तुझ्या अपूर्व शांतिसुखाचा अनुभव घेतात; असे कोण आहेत की जे तुझ्या सामर्थ्याच्या प्राप्तीकरितां आधी तुझ्या ईश्वरी बलाचे प्रदर्शन व्हावे या करिता उत्सुक होतात आणि आपल्या सुपीक भूमीवर उदकवृष्टि होण्यासाठी पराक्रमाची शर्थ करण्यांत गढून जातात ३.


भुव॒स्त्वं इ॑न्द्र॒ ब्रह्म॑णा म॒हान् भुवो॒ विश्वे॑षु॒ सव॑नेषु य॒ज्ञियः॑ ।
भुवो॒ नॄंश्च्यौ॒त्नो विश्व॑स्मि॒न् भरे॒ ज्येष्ठ॑श्च॒ मन्त्रो॑ विश्वचर्षणे ॥ ४ ॥

भुवः त्वं इन्द्र ब्रह्मणा महान् भुवः विश्वेषु सवनेषु यजियः
भुवः नॄन् च्यौत्नः विश्वस्मिन् भरे ज्येष्ठः च मन्त्रः विश्व-चर्षणे ॥ ४ ॥

इंद्रा, ब्रह्मसूक्ताच्या योगाने तू श्रेष्ठ म्हणून ठरलास; यच्चयावत्‌ सोम सेवनामध्ये तू माननीय गणला गेला; युद्धभरामध्ये तूं शूर पुरुषांचा प्रेरक झालास आणि हे सर्वदर्शी देवा, अतिश्रेष्ठ असा जो मंत्र त्याचा प्रभूही तूंच झालास ४.


अवा॒ नु कं॒ ज्याया॑न् य॒ज्ञव॑नसो म॒हीं त॒ ओमा॑त्रां कृ॒ष्टयो॑ विदुः ।
असो॒ नु कं॑ अ॒जरो॒ वर्धा॑श्च॒ विश्वेदे॒ता सव॑ना तूतु॒मा कृ॑षे ॥ ५ ॥

अव नु कं ज्यायान् यज-वनसः महीं ते ओमात्रां कृष्टयः विदुः
असः नु कं अजरः वर्धाः च विश्वा इत् एता सवना तूतुमा कृषे ॥ ५ ॥

तूं सर्वश्रेष्ठ म्हणून यज्ञद्वारा सेवा करणार्‍यांवर अनुग्रह कर. तुझी सहाय्यक शक्ति किती प्रचंड आहे हे प्रयत्‍नशील लोकांना माहीतच आहे. तुजला कधीं वार्धक्य येत नाही; इतकेच नाहीं, तर उलट तूं (उत्तरोत्तर) तारुण्याने वद्धिंगतच होतोस आणि आमची ही सकल सोमस्तवने देखील अत्यंत यशस्वी करतोस ५.


ए॒ता विश्वा॒ सव॑ना तूतु॒मा कृ॑षे स्व॒यं सू॑नो सहसो॒ यानि॑ दधि॒षे ।
वरा॑य ते॒ पात्रं॒ धर्म॑णे॒ तना॑ य॒ज्ञो मन्त्रो॒ ब्रह्मोद्य॑तं॒ वचः॑ ॥ ६ ॥

एता विश्वा सवना तूतुमा कृषे स्वयं सूनो इति सहसः यानि दधिषे
वराय ते पात्रं धर्मणे तना यजः मन्त्रः ब्रह्म उत्-यतं वचः ॥ ६ ॥

हीं सर्व सोमस्तवने तूं अत्यंत यशस्वी करतोस; कारण भक्तजन जी सोमस्तवने करतात, ती हे प्रभावप्रभवा देवा, तूंच (आपल्या ठिकाणी) धारण करतोस आणि म्हणूनच सोमपात्र, यज्ञ वेदमंत्र, आणि स्फूर्तीने भक्ताच्या तोंडावाटे निघालेले प्रार्थनावाक्य ही सर्व तुझ्याच धारक धर्माला आणि वरदानाला निश्चितपणे अनुरूप आहेत ६.


ये ते॑ विप्र ब्रह्म॒कृतः॑ सु॒ते सचा॒ वसू॑नां च॒ वसु॑नश्च दा॒वने॑ ।
प्र ते सु॒म्नस्य॒ मन॑सा प॒था भु॑व॒न् मदे॑ सु॒तस्य॑ सो॒म्यस्यान्ध॑सः ॥ ७ ॥

ये ते विप्र ब्रह्म-कृतः सुते सचा वसूनां च वसुनः च दावने
प्र ते सुम्नस्य मनसा पथा भुवन् मदे सुतस्य सोम्यस्य अन्धसः ॥ ७ ॥

हे ज्ञानस्तुतिप्रेरका, ज्या ज्या भक्तांनी सोम मिळतांच दिव्यनिधि आणि उत्कृष्ट वस्तू यांचे वरदान लाभावे म्हणून ब्रह्मसूक्ते म्हटली, ते भक्त तुझ्या आनंददायक मार्गाने, सोमरसपेयाच्या हर्षांत तल्लीन हो‍ऊन आपल्या मनानेच पुढें गेले ७.


ॐ तत् सत्


GO TOP