PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ११ ते २०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११ (अग्निसूक्त)

ऋषी - हविर्धान आंगिरस : देवता - अग्नि : छंद - १-६ - जगती; ७-९ - त्रिष्टुभ्


वृषा॒ वृष्णे॑ दुदुहे॒ दोह॑सा दि॒वः पयां॑सि य॒ह्वो अदि॑ते॒रदा॑भ्यः ।
विश्वं॒ स वे॑द॒ वरु॑णो॒ यथा॑ धि॒या स य॒ज्ञियो॑ यजतु य॒ज्ञियाँ॑ ऋ॒तून् ॥ १॥

वृषा वृष्णे दुदुहे दोहसा दिवः पयांसि यह्वः अदितेः अदाभ्यः
विश्वं सः वेद वरुणः यथा धिया सः यजियः यजतु यजियान् ऋतून् ॥ १ ॥

दोहन केल्याप्रमाणेच तो वीर्यशाली देव वीर्यशाली भक्तासाठीं द्युलोकांतून उदकाची वृष्टी करतो. (अदितीचा) अनिर्बंध ईश्वराचा प्रभाव असा आहे कीं त्याचा प्रतिकार करणे कोणासहि शक्य नाही. तो वरुणाप्रमाणेच आहे आणि तोहि आपल्या बुद्धिबलाने अखिल विश्व जाणतो. तर तो यजनीय देव यज्ञाला योग्य अशा वेळी यजन करो. १


रप॑द्गन्ध॒र्वीरप्या॑ च॒ योष॑णा न॒दस्य॑ ना॒दे परि॑ पातु मे॒ मनः॑ ।
इ॒ष्टस्य॒ मध्ये॒ अदि॑ति॒र्नि धा॑तु नो॒ भ्राता॑ नो ज्ये॒ष्ठः प्र॑थ॒मो वि वो॑चति ॥ २ ॥

रपत् गन्धर्वीः अप्या च योषणा नदस्य नादे परि पातु मे मनः
इष्टस्य मध्ये अदितिः नि धातु नः भ्राता नः ज्येष्ठः प्रथमः व् इ वोचति ॥ २ ॥

देवांगना अप्सरा गायनाचे आलाप घेवो; उदकाची स्वामिनी हीहि कर्णमधुर शब्द उच्चारो. परंतु ह्या सर्व नादाच्या कोलाहलांत अग्निदेवच माझं मन मात्र निश्चल ठेवो. आमचे जे अभीष्ट आहे, त्या ठिकाणी अदिति आम्हांला नेऊन सोडो. याप्रमाणे आमचा वडिल बंधु या यज्ञात प्रमुख आहे तो अग्नीची प्रार्थना करीत असतो. २


सो चि॒न् नु भ॒द्रा क्षु॒मती॒ यश॑स्वत्यु॒षा उ॑वास॒ मन॑वे॒ स्वर्वती ।
यदीं॑ उ॒शन्तं॑ उश॒तां अनु॒ क्रतुं॑ अ॒ग्निं होता॑रं वि॒दथा॑य॒ जीज॑नन् ॥ ३ ॥

सो इति चित् नु भद्रा क्षु-मती यशस्वती उषाः उवास मनवे स्वः-वती
यत् ईं उशन्तं उशतां अनु ऋतुं अग्निं होतारं विदथाय जीजनन् ॥ ३ ॥

हीच ती कल्याणी, उत्साहपूर्ण, यशोमती उषा. पहा, मानवांसाठी ती दिव्यतेजोमय देवी प्रकाशित झाली. म्हणूनच देवोत्सुक भक्तांच्या परिपाठाप्रमाणे ऋत्विजांनी भक्तवत्सल यज्ञहोता जो अग्नि त्याला यज्ञासाठी प्रकट केलें. ३.


अध॒ त्यं द्र॒प्सं वि॒भ्वं विचक्ष॒णं विराभ॑रदिषि॒तः श्ये॒नो अ॑ध्व॒रे ।
यदी॒ विशो॑ वृ॒णते॑ द॒स्मं आर्या॑ अ॒ग्निं होता॑रं॒ अध॒ धीर॑जायत ॥ ४ ॥

अध त्यं द्रप्सं विभ्वं वि-चक्षणं विः आ अभरत् इषितः श्येनः अध्वरे
यदि विशः वृणते दस्मं आर्याः अग्निं होतारं अध धीः अजायत ॥ ४ ॥

इत्यक्यांत त्या सर्वव्यापी, सर्वदर्शी बिंदूला (सोमवल्लीला) मुद्दाम पाठविलेल्या श्येन पक्ष्यानें जाऊन अध्वरयाग प्रसंगाकरितां भूलोकीं आणले, म्हणून जेव्हां जेव्हां आर्यभक्तगण त्या दर्शनीय अग्नीला आपला यज्ञ संपादन करतात, त्या त्या वेळी त्यांना स्तवन करण्याची स्फूर्ति उत्पन्न झालेलीच असते. ४


सदा॑सि र॒ण्वो यव॑सेव॒ पुष्य॑ते॒ होत्रा॑भिरग्ने॒ मनु॑षः स्वध्व॒रः ।
विप्र॑स्य वा॒ यच् छ॑शमा॒न उ॒क्थ्य१ं वाजं॑ सस॒वाँ उ॑प॒यासि॒ भूरि॑भिः ॥ ५ ॥

सदा असि रण्वः यवसाइव पुष्यते होत्राभिः अग्ने मनुषः सु-अध्वरः
विप्रस्य वा यत् शशमानः उक्थ्यं वाजं सस-वान् उप-यासि भूरि-भिः ॥ ५ ॥

तूं सर्वकाल रमणीयच आहेस. सकस धान्यानें शरीर पुष्ट करावें, त्याप्रमाणे अग्नि, हविर्भागानें दिव्यविभूतींना पुष्ट करतो. तो मानव हितकारी, आणि यज्ञयाग उत्तम रीतीनें सिद्धिस नेणारा आहे; म्हणूनच हे देवा, ज्ञानीस्तोत्याच्या उक्थस्तोत्राची तूं वाखाणणी करतोस, त्यावेळी त्याला सत्त्व सामर्थ्य प्राप्त करून देऊन देखील विपुल संपत्तीसह त्याच्याकडे गमन करतोस. ५


उदी॑रय पि॒तरा॑ जा॒र आ भगं॒ इय॑क्षति हर्य॒तो हृ॒त्त इ॑ष्यति ।
विव॑क्ति॒ वह्निः॑ स्वप॒स्यते॑ म॒खस्त॑वि॒ष्यते॒ असु॑रो॒ वेप॑ते म॒ती ॥ ६ ॥

उत् ईरय पितरा जारः आ भगं इयक्षति हर्यतः हृत्तः इष्यति
विवक्ति वह्निः सु-अपस्यते मखः तविष्यते असुरः वेपते मती ॥ ६ ॥

हे ऋत्विजा, मानवांचे आईबाप जे जे द्यावापृथिवी त्यांना मोठ्याने हांक मारून सांग कीं हा प्रेमाची मूर्ति जो अग्नि,, तो भाग्यधिपाप्रित्यर्थ यजन करण्याची इच्छा धरीत आहे, आणि प्रेमळ देवांच्या आगमनाची अंतःकरणपूर्वक अपेक्षा करीत आहे. सर्व पुरोहित मनापासून स्तोत्र म्हणत आहेत, यज्ञ व्यवस्थितपणें चालू आहे. आत्मा प्रसन्न आहे; इतका की, मननीय स्तुतीमुळें तो थरारून गेला आहे. ६


यस्ते॑ अग्ने सुम॒तिं मर्तो॒ अक्ष॒त् सह॑सः सूनो॒ अति॒ स प्र शृ॑ण्वे ।
इषं॒ दधा॑नो॒ वह॑मानो॒ अश्वै॒रा स द्यु॒माँ अम॑वान् भूषति॒ द्यून् ॥ ७ ॥

यः ते अग्ने सु-मतिं मर्तः अक्षत् सहसः सूनो इति अति सः प्र शृण्वे
इषं दधानः वहमानः अश्वैः आ सः द्यु-मान् अम-वान् भूषति द्यून् ॥ ७ ॥

हे अग्ने, जो मर्त्यमानव तुझ्या कृपेला पात्र होतो, हे सामर्थ्यप्रभवा, त्याचीच अतिशय प्रख्याति होते. त्याच्या अंगी उत्साह बाणतो. तो अश्वावर आरूढ होतो, आणि तेजःपुंज तसाच प्रबळ होऊन पुष्कळ दिवस पृथ्वीचें भूषण होऊन राहतो. ७


यद॑ग्न ए॒षा समि॑ति॒र्भवा॑ति दे॒वी दे॒वेषु॑ यज॒ता य॑जत्र ।
रत्ना॑ च॒ यद्वि॒भजा॑सि स्वधावो भा॒गं नो॒ अत्र॒ वसु॑मन्तं वीतात् ॥ ८ ॥

यत् अग्ने एषा सम्-इतिः भवाति देवी देवेषु यजता यजत्र
रत्ना च यत् वि-भजासि स्वधावः भागं नः अत्र वसु-मन्तं वीतात् ॥ ८ ॥

हे अग्नि, हे पूज्य देवा, यजनीय असे जे दिव्यविबुध त्यांचे दिव्यलोकांत एकत्र संमेलन होईल त्या वेळीं हे स्वतंत्रा, तूं ज्याचा भाग त्याला देशीलच, पण त्याचवेळीं, आमचा अमोल संपत्तीचा वांटाही आम्हांस अर्पण कर. ८


श्रु॒धी नो॑ अग्ने॒ सद॑ने स॒धस्थे॑ यु॒क्ष्वा रथं॑ अ॒मृत॑स्य द्रवि॒त्नुम् ।
आ नो॑ वह॒ रोद॑सी दे॒वपु॑त्रे॒ माकि॑र्दे॒वानां॒ अप॑ भूरि॒ह स्याः॑ ॥ ९ ॥

श्रुधि नः अग्ने सदने सध-स्थे युक्ष्व रथं अमृतस्य द्रवित्नुं
आ नः वह रोदसी इति देवपुत्रेइतिदेव-पुत्रे माकिः देवानां अप भूः इह स्याः ॥ ९ ॥

अग्निदेवा, आमची हांक ऐक. ह्या सार्वत्रिक सदनांत आपला अमृतस्रावी रथ जोडून ठेव आणि दिव्यविबुध ज्यांचे पुत्र त्या द्यावापृथिवींना आमच्या यज्ञाकडे घेऊन ये. दिव्य विभूतींपासून दूर जाऊं नको.येथेंच वास्तव्य कर. ९


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२ (अग्निसूक्त)

ऋषी - हविर्धान आंगिरस : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


द्यावा॑ ह॒ क्षामा॑ प्रथ॒मे ऋ॒तेना॑भिश्रा॒वे भ॑वतः सत्य॒वाचा॑ ।
दे॒वो यन् मर्ता॑न् य॒जथा॑य कृ॒ण्वन् सीद॒द्धोता॑ प्र॒त्यङ् स्वं असुं॒ यन् ॥ १॥

द्यावा ह क्षामा प्रथमे इति ऋतेन अभि-श्रावे भवतः सत्य-वाचा
देवः यत् मर्तान् यजथाय कृण्वन् सीदत् होता प्रत्यङ् स्वं असुं यन् ॥ १ ॥

सर्वांमध्ये ज्या आधीं उत्पन्न झाल्या आणि ज्या सत्यच भाषण करतात, त्या द्यावापृथिवी सनातन धर्माला अनुसरून आमच्या हांकेला “ओ” देवोत. आम्हां मानवांची प्रवृत्ति यज्ञाकडे करणारा हा यज्ञपुरोहित अग्नि आपलें बल एकवटून आमच्या सन्मुख अधिष्ठित आहे. १


दे॒वो दे॒वान् प॑रि॒भूरृ॒तेन॒ वहा॑ नो ह॒व्यं प्र॑थ॒मश्चि॑कि॒त्वान् ।
धू॒मके॑तुः स॒मिधा॒ भाऋ॑जीको म॒न्द्रो होता॒ नित्यो॑ वा॒चा यजी॑यान् ॥ २ ॥

देवः देवान् परि-भूः ऋतेन वह नः हव्यं प्रथमः चिकित्वान्
धूम-केतुः सम्-इधा भाः-ऋजीकः मन्द्रः होता नित्यः वाचा यजीयान् ॥ २ ॥

तूं अग्निदेव, दिव्यविभूतींना सनातन धर्मानेच आपल्या सत्तेखाली वागवीत असतोस, तर तूं आमचे हविर्भाग त्या दिव्यविभूतींकडे पोहोंचवून दे. तूं सर्वांच्या आधींचा, सर्वज्ञ, धूम्रध्वज, समिधांच्या योगानें अत्यंत प्रज्वलित, आनंदयुक्त, देवांचा यज्ञसंपादक, अविनाशी आणि वाणीनें स्तुत्य असा आहेस. २


स्वावृ॑ग् दे॒वस्या॒मृतं॒ यदी॒ गोरतो॑ जा॒तासो॑ धारयन्त उ॒र्वी ।
विश्वे॑ दे॒वा अनु॒ तत् ते॒ यजु॑र्गुर्दु॒हे यदेनी॑ दि॒व्यं घृ॒तं वाः ॥ ३ ॥

स्वावृक् देवस्य अमृतं यदि गोः अतः जातासः धारयन्ते उर्वी इति
विश्वे देवाः अनु तत् ते यजुः गुः दुहे यत् एनी दिव्यं घृतं वारित् इवाः ॥ ३ ॥

ऋक्‌स्तोत्र आणि अमृत हीं अग्निदेवाच्या प्रकाशरूप धेनूपासून मिळतात. म्हणूनच त्या अमृतापासून उत्पन्न झालेले दिव्यविबुध ह्या पृथिवीचें धारण करूं शकतात. सर्व दिव्यविभूति तुझ्या आज्ञेनें तुझ्या यजुर्मंत्राला महत्त्व देतात. तेव्हांच ती विचित्रपूर्ण धेनू दिव्यघृताचा आणि दिव्य दुग्धाचा पान्हा सोडते. ३


अर्चा॑मि वां॒ वर्धा॒यापो॑ घृतस्नू॒ द्यावा॑भूमी शृणु॒तं रो॑दसी मे ।
अहा॒ यद्द्यावोऽ॑सुनीतिं॒ अय॒न् मध्वा॑ नो॒ अत्र॑ पि॒तरा॑ शिशीताम् ॥ ४ ॥

अर्चामि वां वर्धाय अपः घृतस्नूइतिघृत-स्नू द्यावाभूमी इति शृणुतं रोदसी इति मे
अहा यत् द्यावः असु-नीतिं अयन् मध्वा नः अत्र पितरा शिशीताम् ॥ ४ ॥

सत्कर्माची अभिवृद्धी व्हावी म्हणून मी तुम्हां उभयतांचे अर्चन करतो. घृस्रावी द्यावापृथिवी हो. हे रोदसी हो, तुम्हीं माझी हांक ऐका. हे यज्ञसंपादक रात्रंदिवस आत्मनीतीप्रमाणें वागत आहेत; तर हे पितरांनो आम्हांला तुमच्या मधुर रसानें उल्लसित करा. ४


किं स्वि॑न् नो॒ राजा॑ जगृहे॒ कद॒स्याति॑ व्र॒तं च॑कृमा॒ को वि वे॑द ।
मि॒त्रश्चि॒द्धि ष्मा॑ जुहुरा॒णो दे॒वाञ् छ्लोको॒ न या॒तां अपि॒ वाजो॒ अस्ति॑ ॥ ५ ॥

किं स्वित् नः राजा जगृहे कत् अस्य अति व्रतं चकृम कः वि वेद
मि त्रः चित् हि स्म जुहुराणः देवान् श्लोकः न यातां अपि वाजः अस्ति ॥ ५ ॥

देवांच्या राजानें आम्हांला पेंचांत कां बरें धरले आहे ? आमच्या हातून त्याची कोणती आज्ञा मोडली गेली हें कोणाला कळत असेल ? मित्रच खरोखरच दिव्यजनांना प्रसन्न करूं शकेल. पण जे देवाला शरण जात नाहींत, त्यांना कीर्ति कसली असणार आणि सत्त्वसामर्थ्य तरी कसलें असणार ? ५


दु॒र्मन्त्वत्रा॒मृत॑स्य॒ नाम॒ सल॑क्ष्मा॒ यद्विषु॑रूपा॒ भवा॑ति ।
य॒मस्य॒ यो म॒नव॑ते सु॒मन्त्वग्ने॒ तं ऋ॑ष्व पा॒ह्यप्र॑युच्छन् ॥ ६ ॥

दुः-मन्तु अत्र अमृतस्य नाम स-लक्ष्मा यत् विषु-रूपा भवाति
यमस्य यः मनवते सु-मन्तु अग्ने तं ऋष्व पाहि अप्र-युच्चन् ॥ ६ ॥

अमृतमय जो ईश्वर त्याचें नांव आकलन करण्याला सुद्धां अत्यंत कठिण आहे. आणि विचार करूं लागतांच जें एकरूप दिसत असतें तें नानाविध स्वरूपाचें दिसूं लागतें; म्हणून तुज जगत्‌नियामकाच्या सुबोध नामांचे जो मनन करतो, त्याचें हे अग्नीदेवा तूं न विसंबतां रक्षण कर. ६


यस्मि॑न् दे॒वा वि॒दथे॑ मा॒दय॑न्ते वि॒वस्व॑तः॒ सद॑ने धा॒रय॑न्ते ।
सूर्ये॒ ज्योति॒रद॑धुर्मा॒स्य१क्तून् परि॑ द्योत॒निं च॑रतो॒ अज॑स्रा ॥ ७ ॥

यस्मिन् देवाः विदथे मादयन्ते विवस्वतः सदने धारयन्ते
सूर्ये ज्योतिः अदधुः मासि अक्तून् परि द्योतनिं चरतः अजस्रा ॥ ७ ॥

ज्या यज्ञसमारंभांत दिव्यविबुध हर्षनिर्भर होतात, आणि जे विवस्वानाच्या मंदिरांत वास करतात, त्यांनीच सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आणि चंद्राच्या ठिकाणी चांदणे अशी योजना करून ठेवली आहे. त्या प्रमाणे ते उभयतांहि आपाअपल्या तेजोबलाने संचार करीत असतात. ७


यस्मि॑न् दे॒वा मन्म॑नि सं॒चर॑न्त्यपी॒च्येख्प् न व॒यं अ॑स्य विद्म ।
मि॒त्रो नो॒ अत्रादि॑ति॒रना॑गान् सवि॒ता दे॒वो वरु॑णाय वोचत् ॥ ८ ॥

यस्मिन् देवाः मन्मनि सम्-चरन्ति अपीच्ये न वयं अस्य विद्म
मित्रः नः अत्र अदितिः अनागान् सविता देवः वरुणाय वोचत् ॥ ८ ॥

ज्या आपल्या गूढ विचारांत दिव्यविबुध विमग्न असतात, त्यांच्या त्या गूढांमध्ये आम्ही शिरलो नाही, या गूढाचा थांग आम्हांला लागत नाहीं. आतां ह्या ठिकाणी मित्र, अदिति, किंवा सविता देव आहेत; तर आम्हीं निरपराध आहोंत असें पापनिवारक देवाला निवेदन करा. ८


श्रु॒धी नो॑ अग्ने॒ सद॑ने स॒धस्थे॑ यु॒क्ष्वा रथं॑ अ॒मृत॑स्य द्रवि॒त्नुम् ।
आ नो॑ वह॒ रोद॑सी दे॒वपु॑त्रे॒ माकि॑र्दे॒वानां॒ अप॑ भूरि॒ह स्याः॑ ॥ ९ ॥

श्रुधि नः अग्ने सदने सध-स्थे युक्ष्व रथं अमृतस्य द्रवित्नुं
आ नः वह रोदसी इति देवपुत्रेइतिदेव-पुत्रे माकिः देवानां अप भूः इह स्याः ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, तुझ्या सार्वत्रिक यज्ञमंदिरांत तूं आमचा धांवा ऐकून घे. आणि आपला अमृतस्रावी रथ जोडून ठेव. दिव्यगण ज्यांचे पुत्र, त्या द्यावापृथिवींना आमच्याकडे घेऊन ये. तूं दिव्यजनांपासून दूर जाऊं नको. येथेंच वास्तव्य कर. ९


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३ (हविर्धान, यम-आत्मयज्ञसूक्त)

ऋषी - हविर्धान आंगिरस अथवा विवस्वत् आदित्य :
देवता - हविर्धान : छंद - १-४ - त्रिष्टुभ्; ५ - जगती


जे वां॒ ब्रह्म॑ पू॒र्व्यं नमो॑भि॒र्वि श्लोक॑ एतु प॒थ्येव सू॒रेः ।
शृ॒ण्वन्तु॒ विश्वे॑ अ॒मृत॑स्य पु॒त्रा आ ये धामा॑नि दि॒व्यानि॑ त॒स्थुः ॥ १॥

युजे वां ब्रह्म पूर्व्यं नमः-भिः वि श्लोकः एतु पथ्याइव सूरेः
शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आ ये धामानि दिव्यानि तस्थुः ॥ १ ॥

देवाला वंदन करून, हे हविर्धानानो, तुम्हांलाच मी आपल्या प्रार्थना स्तोत्रांशी संलग्न करीत आहे. यज्ञकर्त्या यजमानाच्या प्रशस्त मार्गाप्रमाणें तुमचीहि कीर्ति सर्वत्र पसरो. जे आपल्या दिव्य अशा निजधामी राहतात ते विबुधजन अमृतरूप ईश्वराचे पुत्र- ते सर्व आमचा धांवा ऐकून येवोत. १


य॒मे इ॑व॒ यत॑माने॒ यदैतं॒ प्र वां॑ भर॒न् मानु॑षा देव॒यन्तः॑ ।
आ सी॑दतं॒ स्वं उ॑लो॒कं विदा॑ने स्वास॒स्थे भ॑वतं॒ इन्द॑वे नः ॥ २ ॥

यमे इवेतियमे--इव यतमानेइति यत् ऐतं प्र वां भरन् मानुषाः देव-यन्तः
आ सीदतं स्वं ओं इति लोकं विदानेइति स्वासस्थे इतिसु-आसस्थे भवतं इन्दवे नः ॥ २ ॥

प्रयत्‍नांत गुंतलेल्या दोन जुळ्या बंधूंप्रमाणे तुम्ही यज्ञाकडे यावयास निघालां, तेव्हां ऋत्विजांनी तुम्हांला हातीं धरून इकडे आणले आहे, तर हे यज्ञगृह आपलें विस्तीर्ण निवासस्थान समजून येथेंच थांबा आणि आमच्या सोमयागासाठी उत्तम आसनावर अधिष्टित व्हा २


पञ्च॑ प॒दानि॑ रु॒पो अन्व् अ॑रोहं॒ चतु॑ष्पदीं॒ अन्व् ए॑मि व्र॒तेन॑ ।
अ॒क्षरे॑ण॒ प्रति॑ मिम ए॒तां ऋ॒तस्य॒ नाभा॒व् अधि॒ सं पु॑नामि ॥ ३ ॥

पच पदानि रुपः अनु अरोहं चतुः-पदीं अनु एमि व्रतेन
अक्षरेण प्रति मिमे एतां ऋतस्य नाभौ अधि सं पुनामि ॥ ३ ॥

उन्नतीला नेणार्‍या मार्गाच्या पांच पायर्‍या तर मी चढलो आहे आणि चार पदें किंवा विभाग असणारी जी प्रक्रिया ती मी धर्मविहित नियमाप्रमाणें करीतच आहे; तर तिलाच अक्षराने अथवा सत् वस्तूने मी मापून टाकतो. आणि सनातन सद्धर्माच्या ह्या मुख्य जागी मी स्वतःला पुनीत करतो. ३


दे॒वेभ्यः॒ कं अ॑वृणीत मृ॒त्युं प्र॒जायै॒ कं अ॒मृतं॒ नावृ॑णीत ।
बृह॒स्पतिं॑ य॒ज्ञं अ॑कृण्वत॒ ऋषिं॑ प्रि॒यां य॒मस्त॒न्व१ं प्रारि॑रेचीत् ॥ ४ ॥

देवेभ्यः कं अवृणीत मृत्युं प्र-जायै कं अमृतं न अवृणीत
बृहस्पतिं यजं अकृण्वत ऋषिं प्रियां यमः तन्वं प्र अरिरेचीत् ॥ ४ ॥

खरोखरद्च दिव्यगणासाठीं आनंदाने मृत्यु पत्करावा. पण आपल्याच पोराबाळांसाठी अमर होण्याची इच्छा करूं नये. म्हणूनच भक्तांनी प्रार्थनांचा प्रभु जो बृहस्पति त्यालाच ऋषि करून यज्ञ केला, तेव्हां यमानेंहि आपली प्रिय काया मृत्युपासून मुक्त केली. ४


स॒प्त क्ष॑रन्ति॒ शिश॑वे म॒रुत्व॑ते पि॒त्रे पु॒त्रासो॒ अप्य॑वीवतन्न् ऋ॒तम् ।
उ॒भे इद॑स्यो॒भय॑स्य राजत उ॒भे य॑तेते उ॒भय॑स्य पुष्यतः ॥ ५ ॥

सप्त क्षरन्ति शिशवे मरुत्वते पित्रे पुत्रासः अपि अवीवतन् ऋतं
उभे इति इत् अस्य उभयस्य राजतः उभे इति यतेतेइति उभयस्य पुष्यतः ॥ ५ ॥

मरुतांसह येथे आलेला जो सोमरूप बालक त्याच्यासाठी सात नद्या वाहात राहतात. त्याचप्रमाणे पित्यासाठी पुत्र सद्धर्माला चिकटून राहतात. तर हे हविर्धानानो, तुम्ही या उभयलोकांना सुशोभित करा. तुम्ही उभयतां कर्मव्यापृत असतां आणि त्या योगानें दोन्ही लोकांचे पोषण करतां. ५


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४ (यम अंत्येष्टिसूक्त)

ऋषी - यम वैवस्वत : देवता - १-५, ८, १३-१६ - यम; ६ अंगिरस पिता अथर्वन् भृगु; ७-८ - लिंगोक्तदेवता अथवा पितृ; १०-१२ - श्वान;
छंद - १३, १४, १६ - अनुष्टुभ्, १५ - बृहती, अवशिष्ट - त्रिष्टुभ्


प॒रे॒यि॒वांसं॑ प्र॒वतो॑ म॒हीरनु॑ ब॒हुभ्यः॒ पन्थां॑ अनुपस्पशा॒नम् ।
वै॒व॒स्व॒तं सं॒गम॑नं॒ जना॑नां य॒मं राजा॑नं ह॒विषा॑ दुवस्य ॥ १॥

परेयि-वांसं प्र-वतः महीः अनु बहु-भ्यः पन्थां अनु-पस्पशानं
वैवस्वतं सम्-गमनं जनानां यमं राजानं हविषा दुवस्य ॥ १ ॥

सत्कर्मप्रवणांचे जे उत्तम लोक तिकडे सुखरूप घेऊन जाणारा, अनेक पुण्यवंतांना मार्ग दाखविणारा, आणि सर्व जगाचें एकत्र होण्याचे ठिकाण असा जो विवस्वताचा प्रभु यमराजा त्याला हवि अर्पण करून उपासना कर. १


य॒मो नो॑ गा॒तुं प्र॑थ॒मो वि॑वेद॒ नैषा गव्यू॑ति॒रप॑भर्त॒वा उ॑ ।
यत्रा॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ परे॒युरे॒ना ज॑ज्ञा॒नाः प॒थ्याख्प् अनु॒ स्वाः ॥ २ ॥

यमः नः गातुं प्रथमः विवेद न एषा गव्यूतिर् अप-भर्तवै ओं इति
यत्र नः पूर्वे पितरः पराईयुः एना जजानाः पथ्याः अनु स्वाः ॥ २ ॥

सर्वांत प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहित आहे. ज्या ठिकाणीं आमचे पूर्वज वाडवडील परलोकी गेले, ज्या मार्गानुसार ते उत्पन्न झाले आणि जो आपला मार्ग ते अनुसरले व ज्या मार्गाने परलोकी गेले, तो मार्ग, ती आमची जागा कोणी हिरावून घेऊं शकणार नाही. २


मात॑ली क॒व्यैर्य॒मो अङ्गि॑रोभि॒र्बृह॒स्पति॒रृक्व॑भिर्वावृधा॒नः ।
यांश्च॑ दे॒वा वा॑वृ॒धुर्ये च॑ दे॒वान् स्वाहा॒न्ये स्व॒धया॒न्ये म॑दन्ति ॥ ३ ॥

मातली कव्यैः यमः अङ्गिरः-भिः बृहस्पतिः ऋक्व-भिः ववृधानः
यान् च देवाः ववृधुः ये च देवान् स्वाहा अन्ये स्वधया अन्ये मदन्ति ॥ ३ ॥

कव्यांबरोबर मातली, अंगिरसांबरोबर यम आणि ऋक् स्तोत्र प्रिय पितराबरोबर बृहस्पति जेथें आनंदनिर्भर होतो; तसेच ज्यांची अभिवृद्धि विबुधगण करतात आणि जे विबुधगणांना संतुष्ट करतात, त्यांच्यामध्यें पहिले म्हणजे दिव्यविबुध हे स्वाहाकाराने आणि दुसरे म्हणजे पितृगण हे स्वधेने तल्लीन होतात. ३


इ॒मं य॑म प्रस्त॒रं आ हि सीदाङ्गि॑रोभिः पि॒तृभिः॑ संविदा॒नः ।
आ त्वा॒ मन्त्राः॑ कविश॒स्ता व॑हन्त्व् ए॒ना रा॑जन् ह॒विषा॑ मादयस्व ॥ ४ ॥

इमं यम प्र-स्तरं आ हि सीद अङ्गिरः-भिः पितृ-भिः सम्-विदानः
आ त्वा मन्त्राः कवि-शस्ताः वहन्तु एना राजन् हविषा मादयस्व ॥ ४ ॥

यमराजा या कुशासनाकडे ये आणि त्यावर आरोहण कर. अंगिरांच्या समवेत असणार्‍य़ा कवींनी म्हटलेले प्रशंसा-मंत्र तुजला येथें घेऊन येवोत. हे राजा, या हविर्भागाने तूं आनंदित हो. ४


अङ्गि॑रोभि॒रा ग॑हि य॒ज्ञिये॑भि॒र्यम॑ वैरू॒पैरि॒ह मा॑दयस्व ।
विव॑स्वन्तं हुवे॒ यः पि॒ता ते॑ऽ॒स्मिन् य॒ज्ञे ब॒र्हिष्या नि॒षद्य॑ ॥ ५ ॥

अङ्गिरः-भिः आ गहि यजियेभिः यम वैरूपैः इह मादयस्व
विवस्वन्तं हुवे यः पिता ते अस्मिन् यजे बर्हिषि आ नि-सद्य ॥ ५ ॥

पूज्य आणि नाना प्रकारचीं रूपें धारण करणार्‍या अशा अंगिराऋषीसह, हे यमराजा, येथें आगमन कर आणि आनंदित हो. तुझ्यासह तुझा पिता जो विवस्वान् त्यालाहि या यज्ञांत कुशासनावर आरोहण करवून मी आहुति अर्पण करीत आहे. ५


अङ्गि॑रसो नः पि॒तरो॒ नव॑ग्वा॒ अथ॑र्वाणो॒ भृग॑वः सो॒म्यासः॑ ।
तेषां॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिया॑नां॒ अपि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ॥ ६ ॥

अङ्गिरसः नः पितरः नव-ग्वाः अथर्वाणः भृगवः सोम्यासः
तेषां वयं सु-मतौ यजियानां अपि भद्रे सौमनसे स्याम ॥ ६ ॥

अंगिरा ऋषि, आमचे पूर्वज नवग्व आणि अथर्वभृगु हे सोमप्रियच आहेत; तर अशा पूज्य पितरांना मान्य होऊन आम्हीं त्यांच्या कल्याणकारक अनुग्रहबुद्धीच्या आश्रयाखालीं राहूं असे कर. ६


प्रेहि॒ प्रेहि॑ प॒थिभिः॑ पू॒र्व्येभि॒र्यत्रा॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ परे॒युः ।
उ॒भा राजा॑ना स्व॒धया॒ मद॑न्ता य॒मं प॑श्यासि॒ वरु॑णं च दे॒वम् ॥ ७ ॥

प्र इहि प्र इहि पथि-भिः पूर्व्येभिः यत्र नः पूर्वे पितरः पराईयुः
उभा राजाना स्वधया मदन्ता यमं पश्यासि वरुणं च देवम् ॥ ७ ॥

मृताच्या जीवात्म्या तूं पुढें जा, ज्या मार्गानी आमचे वाडवडील परलोकी गेले, त्या आमच्या पूर्वजांच्या मार्गानीं तूं खुशाल जा. म्हणजे ज्या ठिकाणी दोघे प्रभुराज स्वधेनें आनंदित होऊन वास करीत आहेत, तेथें त्यांना म्हणजे यम आणि वरुण अशा दोघांनाही पाहशील. ७


सं ग॑च्छस्व पि॒तृभिः॒ सं य॒मेने॑ष्टापू॒र्तेन॑ पर॒मे व्योमन् ।
हि॒त्वाया॑व॒द्यं पुन॒रस्तं॒ एहि॒ सं ग॑च्छस्व त॒न्वा सु॒वर्चाः॑ ॥ ८ ॥

सं गच्चस्व पितृ-भिः सं यमेन इष्टापूर्तेन परमे वि-ओमन्
ह् इत्वाय अवद्यं पुनः अस्तं आ इहि सं गच्चस्व तन्वा सु-वर्चाः ॥ ८ ॥

तूं केलेल्या इष्टापूर्त पुण्यकर्माच्या योगाने तूं पितरांसह आणि यमासह अत्युच्च आकाशांतील लोकांत एकत्र वास कर आणि आपलें सर्व दुष्कर्म मागें टाकून वाटल्यास पुनः आपल्या स्वतःच्या घरीं ये आणि उत्तम तेजानें मंडित होऊन तेथें नव्या शरीराशीं संयुक्त हो. ८


अपे॑त॒ वीत॒ वि च॑ सर्प॒तातो॑ऽ॒स्मा ए॒तं पि॒तरो॑ लो॒कं अ॑क्रन् ।
अहो॑भिर॒द्‌भिर॒क्तुभि॒र्व्यक्तं य॒मो द॑दात्यव॒सानं॑ अस्मै ॥ ९ ॥

अप इत वि इत वि च सर्पत अतः अस्मै एतं पितरः लोकं अक्रन्
अहः-भिः अत्-भिः अक्तु-भिः वि-अक्तं यमः ददाति अव-सानं अस्मै ॥ ९ ॥

इतर सर्व दृश्यादृश्य समूहांनो चला, हटा, येथून एकदम चालते व्हा. ह्या जीवाला पितरांनीच हा लोक अर्पण केला आहे. आणि दिवसा तसेंच रात्रींहि सर्वकाळ जलांनी परिपूर्ण अशा प्रकारचें हे अंतिम स्थान यमराजा त्याला देत आहे. ९


अति॑ द्रव सारमे॒यौ श्वानौ॑ चतुर॒क्षौ श॒बलौ॑ सा॒धुना॑ प॒था ।
अथा॑ पि॒तॄन् सु॑वि॒दत्राँ॒ उपे॑हि य॒मेन॒ ये स॑ध॒मादं॒ मद॑न्ति ॥ १० ॥

अति द्रव सारमेयौ श्वानौ चतुः-अक्षौ शबलौ साधुना पथा
अथ पितॄन् सु-विदत्रान् उप इहि यमेन ये सध-मादं मदन्ति ॥ १० ॥

ते चार चार डोळ्यांचे पिंगट रंगाचे सरमेचे जे दोन श्वान आहेत, त्यांना मागें टाकून सन्मार्गानेंच तसाच पुढें धांवत जा; आणि यमासह जे एकाच ठिकाणी स्वधेनें आनंदित होत असतात, त्या अत्यंत ज्ञानी विचक्षण पितरांच्या अगदी जवळ जाऊन उभा रहा. १०


यौ ते॒ श्वानौ॑ यम रक्षि॒तारौ॑ चतुर॒क्षौ प॑थि॒रक्षी॑ नृ॒चक्ष॑सौ ।
ताभ्यां॑ एनं॒ परि॑ देहि राजन् स्व॒स्ति चा॑स्मा अनमी॒वं च॑ धेहि ॥ ११॥

यौ ते श्वानौ यम रक्षितारौ चतुः-अक्षौ पथिरक्षी इतिपथि-रक्षी नृ-चक्षसौ
ताभ्यां एनं परि देहि राजन् स्वस्ति च अस्मै अनमीवं च धेहि ॥ ११ ॥

हे यमराजा, जीवात्म्याचें संरक्षण करणारे चार चार डोळ्यांचे, वाटेत पहारा करणारे आणि मानवांवर आपली दृष्टि सतत सारखी ठेवणारे जे तुझे दोन श्वान आहेत ते या मृताच्या बरोबर दे; आणि त्याला स्वस्ति क्षेम अर्पण कर. ११


उ॒रू॒ण॒साव् अ॑सु॒तृपा॑ उदुम्ब॒लौ य॒मस्य॑ दू॒तौ च॑रतो॒ जनाँ॒ अनु॑ ।
ताव् अ॒स्मभ्यं॑ दृ॒शये॒ सूर्या॑य॒ पुन॑र्दातां॒ असुं॑ अ॒द्येह भ॒द्रम् ॥ १२ ॥

उरु-नसौ असु-तृपौ उदुम्बलौ यमस्य दूतौ चरतः जनान् अनु
तौ अस्मभ्यं दृशये सूर्याय पुनः दातां असुं अद्य इह भद्रम् ॥ १२ ॥

ते फेंदारलेल्या लांब रूंद नाकाचे, आणि प्राण्याचा जीव हरण करण्यानेंच तृप्त होणारे, त्याचप्रमाणें फार धिप्पाड असे जे यमाचे दोन दूत या मानवलोकीं अदृश्यपणे संचार करीत असतात, तेहि आम्हांला सूर्याचे दर्शन घडावे म्हणून आमचे आरोग्य बल आणि आमचे कुशल हीं आम्हांस पुनः पुनः अर्पण करोत. १२


य॒माय॒ सोमं॑ सुनुत य॒माय॑ जुहुता ह॒विः ।
य॒मं ह॑ य॒ज्ञो ग॑च्छत्य॒ग्निदू॑तो॒ अरं॑कृतः ॥ १३ ॥

यमाय सोमं सुनुत यमाय जुहुत हविः
यमं ह यजः गच्चत् इ अग्नि-दूतः अरम्-कृतः ॥ १३ ॥

ऋत्विजांनो, यमाप्रीत्यर्थ सोमरस पिळून ठेवा, यमाप्रीत्यर्थ आहुति द्या. ज्यामध्यें अग्नि हा हविर्भाग प्रापक आहे, असा आमचा सोशोभित यज्ञ यमालाच पोहोंचतो. १३


य॒माय॑ घृ॒तव॑द्ध॒विर्जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत ।
स नो॑ दे॒वेष्व् आ य॑मद्दी॒र्घं आयुः॒ प्र जी॒वसे॑ ॥ १४ ॥

यमाय घृत-वत् हविः जुहोत प्र च तिष्ठत
सः नः देवेषु आ यमत् दीर्घं आयुः प्र जीवसे ॥ १४ ॥

यमाप्रीत्यर्थ घृतयुक्त आहुति अर्पण करा. आणि नंतर मग यज्ञ समाप्त करा. सर्व दिव्यविबुधांमध्यें यमराज आम्हांला व्यवस्थितपणें वागवून घेवो आणि त्यासाठीं दीर्घायुष्य अर्पण करो. १४


य॒माय॒ मधु॑मत्तमं॒ राज्ञे॑ ह॒व्यं जु॑होतन ।
इ॒दं नम॒ ऋषि॑भ्यः पूर्व॒जेभ्यः॒ पूर्वे॑भ्यः पथि॒कृद्‌भ्यः॑ ॥ १५ ॥

यमाय मधुमत्-तमं राजे हव्यं जुहोतन
इदं नमः ऋषि-भ्यः पूर्व-जेभ्यः पूर्वेभ्यः पथिकृत्-भ्यः ॥ १५ ॥

अत्यंत मधुर असा हविर्भाग यमराजाप्रीत्यर्थ अग्नीच्या ठिकाणीं अर्पण करा. तसेंच आमचे पूर्वज ऋषि की ज्यांनी मूळ हा यज्ञमार्ग आंखून ठेवला- त्या ऋषीनांहि आमचा प्रणिपात असो. १५


त्रिक॑द्रुकेभिः पतति॒ षळ् उ॒र्वीरेकं॒ इद्बृ॒हत् ।
त्रि॒ष्टुब् गा॑य॒त्री छन्दां॑सि॒ सर्वा॒ ता य॒म आहि॑ता ॥ १६ ॥

त्रि-कद्रुकेभिः पतति षट् उर्वीः एकं इत् बृहत्
त्रि-स्तुप् गायत्री चन्दांसि सर्वा ता यमे आहिता ॥ १६ ॥

महत्कृत्य एकच जरी असलें, तरी तें त्रिकद्रुकयागाच्या योगानें सहाहि विस्तीर्ण लोक ओलांडून पलीकडे जातें. म्हणून त्रिष्टुप्, गायत्री, इत्यादि जे छंद आहेत, ते सर्व यमाच्याच ठिकाणीहि अर्पण होत असतात. १६


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५ (यम अंत्येष्टिसूक्त)

ऋषी - शंख यामायन : देवता - पितृ : छंद - १-१०, १२-१४ - त्रिष्टुभ्; ११ - जगती


उदी॑रतां॒ अव॑र॒ उत् परा॑स॒ उन् म॑ध्य॒माः पि॒तरः॑ सो॒म्यासः॑ ।
असुं॒ य ई॒युर॑वृ॒का ऋ॑त॒ज्ञास्ते नो॑ऽवन्तु पि॒तरो॒ हवे॑षु ॥ १॥

उत् ईरतां अवरे उत् परासः उत् मध्यमाः पितरः सोम्यासः
असुं ये ईयुः अवृकाः ऋत-जाः ते नः अवन्तु पितरः हवेषु ॥ १ ॥

मुक्तकंठानें देवाचे स्तवन चालूं द्या. सोमप्रिय असे जे पितृगण आहेत, त्यांपैकीं जे कांही खालच्या लोकांत, कांही उच्च लोकांत आणि कांही मध्यम लोकांत वास करीत असतात; ज्यांना आत्मसामर्थ्य प्राप्त झालेले असतें, परंतु अगदी सौम्य सात्त्विक वृत्तिचे आणि सनातन धर्म जाणणारे असतात, तर असे ते पितर आम्हीं हांक मारतांच येऊन आमचें रक्षण करोत. १


इ॒दं पि॒तृभ्यो॒ नमो॑ अस्त्व॒द्य ये पूर्वा॑सो॒ य उप॑रास ई॒युः ।
ये पार्थि॑वे॒ रज॒स्या निष॑त्ता॒ ये वा॑ नू॒नं सु॑वृ॒जना॑सु वि॒क्षु ॥ २ ॥

इदं पितृ-भ्यः नमः अस्तु अद्य ये पूर्वासः ये उपरासः ईयुः
ये पार्थिवे रजसि आ नि-सत्ताः ये वा नूनं सु-वृजनासु विक्षु ॥ २ ॥

हा प्रणिपात पितरांना असो. त्यांच्यापैकीं जे कांही पूर्वीच स्वलोकी गेलेले आहेत, अथवा ज्यांनी या रजोमय लोकांत वास केला आहे, किंवा ज्यांनी सर्वसमृद्ध दिव्यजनांमध्यें स्थान मिळविले आहे त्या सर्वांना नमस्कार असो. २


आहं पि॒तॄन् सु॑वि॒दत्रा॑ँ अवित्सि॒ नपा॑तं च वि॒क्रम॑णं च॒ विष्णोः॑ ।
ब॒र्हि॒षदो॒ ये स्व॒धया॑ सु॒तस्य॒ भज॑न्त पि॒त्वस्त इ॒हाग॑मिष्ठाः ॥ ३ ॥

आ अहं पितॄन् सु-विदत्रान् अवित्सि नपातं च वि-क्रमणं च विष्णोः
बर्हि-सदः ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वः ते इह आगमिष्ठाः ॥ ३ ॥

अत्यंत ज्ञानी विचक्षण असे जे पितर त्यांच्या सहवासाचा मी लाभ घेतला आहे; कारण मला संततीचा लाभ झाला आहे आणि विष्णूचें आक्रमण जेथें होते, त्याहि स्थानाचा लाभ झाल्यासारखाच आहे. तर स्वधेच्या योगानें कुशासनावर अधिष्ठित होऊन सोमरसाचा आणि हविरन्नाचा जे लाभ घेतात ते पितर वारंवार येथें येवोत. ३


बर्हि॑षदः पितर ऊ॒त्य१र्वाग् इ॒मा वो॑ ह॒व्या च॑कृमा जु॒षध्व॑म् ।
त आ ग॒ताव॑सा॒ शंत॑मे॒नाथा॑ नः॒ शं योर॑र॒पो द॑धात ॥ ४ ॥

बर्हि-सदः पितरः ऊती अर्वाक् इमा वः हव्या चकृम जुषध्वं
ते आ गत अवसा शम्-तमेन अथ नः शं योः अरपः दधात ॥ ४ ॥

कुशासनावर अधिष्ठित झालेल्या पितरांनो, तुम्ही आपल्या सहायक शक्तिसह इकडे या. हे जे हविर्भाग आम्हीं तुमच्याकरिता सिद्ध केले आहेत, त्यांचा स्वीकार करा; तुम्हीं आपल्या अत्यंत कल्याणप्रद कृपाछत्रासह आगमन करा, आणि आमचे हित, क्षेम आणि आम्ही इच्छितो ते पापरहितत्व आम्हाला साध्य करून द्या. ४


उप॑हूताः पि॒तरः॑ सो॒म्यासो॑ बर्हि॒ष्येषु नि॒धिषु॑ प्रि॒येषु॑ ।
त आ ग॑मन्तु॒ त इ॒ह श्रु॑व॒न्त्वधि॑ ब्रुवन्तु॒ तेऽवन्त्व॒स्मान् ॥ ५ ॥

उप-हूताः पितरः सोम्यासः बर्हिष्येषु नि-धिषु प्रियेषु
ते आ गमन्तु ते इह श्रिवन्तु अधि ब्रुवन्तु ते अवन्तु अस्मान् ॥ ५ ॥

सोमरसप्रिय पितरांना, त्यांच्या आवडत्या वस्तू कुशास्तरणावर मांडून ठेवून त्यांना येथें येण्याविषयी विनविले आहे, तर ते येथें आगमन करोत. आमच्या प्रार्थना ऐकून घेवोत, आमची वाखाणणी करोत आणि आम्हांवर कृपा करोत. ५


आच्या॒ जानु॑ दक्षिण॒तो नि॒षद्ये॒मं य॒ज्ञं अ॒भि गृ॑णीत॒ विश्वे॑ ।
मा हिं॑सिष्ट पितरः॒ केन॑ चिन् नो॒ यद्व॒ आगः॑ पुरु॒षता॒ करा॑म ॥ ६ ॥

आच्य जानु दक्षिणतः नि-सद्य इमं यजं अभि गृणीत विश्वे
मा हि ंसिष्ट पितरः केन चित् नः यत् वः आगः पुरुषता कराम ॥ ६ ॥

तुमची आपल्या उजव्या पायाची खुरमांडी घालून आसनावर बसून, हे अखिल पितरांनो, ह्या आमच्या पितृयज्ञाची प्रशंसा करा, आणि आम्ही मानवी अज्ञानामुळे जरी कांही अपराध केला असेल, तरी त्या कोणत्याही अपराधाबदल आमचा नाश करू नका. ६


आसी॑नासो अरु॒णीनां॑ उ॒पस्थे॑ र॒यिं ध॑त्त दा॒शुषे॒ मर्त्या॑य ।
पु॒त्रेभ्यः॑ पितर॒स्तस्य॒ वस्वः॒ प्र य॑च्छत॒ त इ॒होर्जं॑ दधात ॥ ७ ॥

आसीनासः अरुणीनां उप-स्थे रयिं धत्त दाशुषे मर्त्याय
पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्र यच्चत ते इह ऊर्जं दधात ॥ ७ ॥

अरुण वर्णाच्या प्रभेनें शोभणार्‍या उषादेवीच्या तुम्हीं अगदी समीप अधिष्ठित होता; तर हवि अर्पण करणार्‍या तुमच्या मर्त्य भक्ताला सर्वोत्कृष्ट वरदान अर्पण करा.. हे पितरांनो, त्यांच्या पुत्रपौत्रांनाही तशीच अभिलषणीय संपत्ति प्राप्त होईल असें करा; आणि इहलोकी त्याच्या अंगीं ओजस्विता राहील असें करा. ७


ये नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ सो॒म्यासो॑ऽनूहि॒रे सो॑मपी॒थं वसि॑ष्ठाः ।
तेभि॑र्य॒मः सं॑ररा॒णो ह॒वींष्यु॒शन्न् उ॒शद्‌भिः॑ प्रतिका॒मं अ॑त्तु ॥ ८ ॥

ये नः पूर्वे पितरः सोम्यासः अनु-ऊहिरे सोम-पीथं वसिष्ठाः त
ेभिः यमः सम्-रराणः हवींषि उशन् एशत्-भिः प्रति-कामं अत्तु ॥ ८ ॥

जे सोमरस प्रिय आणि सर्वोत्कृष्ट असे आमचे पूर्वज पितर आमच्या सोमयागाला त्यांच्या परिपाठाप्रमाणे वहिवाटीप्रमाणे प्राप्त झाले, त्या उत्सुक पितरांसह हविर्ग्रहणोत्सुक यमराज देखील हृष्टचित्त होऊन आमच्या आहुति यथेच्छ सेवन करो. ८


ये ता॑तृ॒षुर्दे॑व॒त्रा जेह॑माना होत्रा॒विद॒ स्तोम॑तष्टासो अ॒र्कैः ।
आग्ने॑ याहि सुवि॒दत्रे॑भिर॒र्वाङ् स॒त्यैः क॒व्यैः पि॒तृभि॑र्घर्म॒सद्‌भिः॑ ॥ ९ ॥

ये ततृषुः देवत्रा जेहमानाः होत्राविदः स्तोम-तष्टासः अर्कैः
आ अग्ने याहि सु-विदत्रेभिः अर्वाङ् सत्यैः कव्यैः पितृ-भिः घर्मसत्-भिः ॥ ९ ॥

देवलोकांत परिभ्रमण करणारे, हवनपद्धति जाणणारे आणि प्रार्थनास्तोत्रांत प्रवीण असे जे पितर आमच्या अर्कस्तोत्रांनी सोमरसासाठी तृषीत झाले आहेत. त्या सुजाण पितरांसह हे अग्ने, यज्ञाच्या झगझगीत प्रकाशात सुखासीन होणार्‍या सत्यपूर्ण आणि कव्यप्रियपितरांना बरोबर घेऊन आगमन कर. ९


ये स॒त्यासो॑ हवि॒रदो॑ हवि॒ष्पा इन्द्रे॑ण दे॒वैः स॒रथं॒ दधा॑नाः ।
आग्ने॑ याहि स॒हस्रं॑ देवव॒न्दैः परैः॒ पूर्वैः॑ पि॒तृभि॑र्घर्म॒सद्‌भिः॑ ॥ १० ॥

ये सत्यासः हविः-अदः हविः-पाः इन्द्रेण देवैः स-रथं दधानाः
आ अग्ने याहि सहस्रं देव-वन्दैः परैः पूर्वैः पितृ-भिः घर्मसत्-भिः ॥ १० ॥

जे सत्यप्रिय आहेत, हविर्भाग ग्रहण करणारे, सोमरूप हवि प्राशन करणारे आणि इंद्रासह दिव्यविभूति बरोबर रथातून फिरणारे आहेत त्या देववंदनरत, उदात्त, आणि धर्मपात्राच्या जवळ आसनस्थ झालेल्या सहस्रावधि पूर्वकालीन पितरांसह, हे अग्ने, तूं येथें आगमन कर. १०


अग्नि॑ष्वात्ताः पितर॒ एह ग॑च्छत॒ सदः॑-सदः सदत सुप्रणीतयः ।
अ॒त्ता ह॒वींषि॒ प्रय॑तानि ब॒र्हिष्यथा॑ र॒यिं सर्व॑वीरं दधातन ॥ ११॥

अग्नि-स्वात्ताः पितरः आ इह गच्चत सदः-सदः सदत सु-प्रनीतयः
अत्त हवींषि प्र-यतानि बर्हिषि अथ रयिं सर्व-वीरं दधातन ॥ ११ ॥

अग्निष्वात्त प्रमुख पितरांनो, येथें आगमन करा. प्रशंसनीय मार्गाने परंतु प्रेमळपणाने वागणार्‍या पितरांनो, आपापल्या आसनावर अधिष्ठित व्हा. ह्या कुशास्तरणावर ठेवलेले हविर्भाग सेवन करा; आणि वीरपुरुषांनी परिपूर्ण असे वैभव आम्हांस प्राप्त होईल असे करा. ११


त्वं अ॑ग्न ईळि॒तो जा॑तवे॒दोऽ॑वाड् ढ॒व्यानि॑ सुर॒भीणि॑ कृ॒त्वी ।
प्रादाः॑ पि॒तृभ्यः॑ स्व॒धया॒ ते अ॑क्षन्न् अ॒द्धि त्वं दे॑व॒ प्रय॑ता ह॒वींषि॑ ॥ १२ ॥

त्वं अग्ने ईळितः जात-वेदः अवाट् हव्यानि सुरभीणि कृत्वी
प्र अदाः प् इतृ-भ्यः स्वधया ते अक्षन् अद्धि त्वं देव प्र-यता हवींषि ॥ १२ ॥

हे सकल वस्तुज्ञा अग्निदेवा, भक्तांनी स्तविलेला तूं आमचे हविर्भाग सुगंधित करून ते दिव्यविबुधांकडे पोहोंचवून देतोस, तसे ते तूं पितरांकडेही दिले आहेस, आणि तुझ्या दैवी सामर्थ्याने ते त्यांना प्राप्त झाले देखील. तर हे देवा, आम्ही भक्तिनें अर्पण केलेले हविर्भाग तुम्ही गृहण करा. १२


ये चे॒ह पि॒तरो॒ ये च॒ नेह यांश्च॑ वि॒द्म याँ उ॑ च॒ न प्र॑वि॒द्म ।
त्वं वे॑त्थ॒ यति॒ ते जा॑तवेदः स्व॒धाभि॑र्य॒ज्ञं सुकृ॑तं जुषस्व ॥ १३ ॥

ये च इह पितरः ये च न इह यान् च विद्म यान् ओं इति च न प्र-विद्म
त्वं वेत्थ यति ते जात-वेदः स्वधाभिः यजं सु-कृतं जुषस्व ॥ १३ ॥

जे पितृगण येथें आहेत आणि जे आज नाहींत, जे पूर्वज आम्हांस माहित आहेत, आणि तसेंच जे पूर्वज आम्हांस मुळीच माहित नाहीत, त्या सकलांना, हे अखिल वस्तुज्ञा देवा, तूंच ओळखतोस; तर यथायोग्य पद्धतीने उत्तम रीतीने केलेल्या यज्ञाचा तूं संतोषाने स्वीकार कर. १३


ये अ॑ग्निद॒ग्धा ये अन॑ग्निदग्धा॒ मध्ये॑ दि॒वः स्व॒धया॑ मा॒दय॑न्ते ।
तेभिः॑ स्व॒राळ् असु॑नीतिं ए॒तां य॑थाव॒शं त॒न्वं कल्पयस्व ॥ १४ ॥

ये अग्नि-दग्धाः ये अनग्नि-दग्धाः मध्ये दिवः स्वधया मादयन्ते
तेभिः स्व-राट् असु-नीतिं एतां यथावशं तन्वं कल्पयस्व ॥ १४ ॥

ज्यांचे अग्निमध्यें दहन झालेले आहे, तसेच ज्यांचे दहन झालेले नाही असे जे जे पितर स्वर्लोकांत सत्कर्माने आनंदमग्न असतात, त्यांना तूं स्वयंप्रकाशदेव, तुझ्या इच्छेनुरूप आत्मबलाच्या नीतीला योग्य असे शरीर अर्पण कर. १४


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६ (यम अंत्येष्टिसूक्त, स्मशानसूक्त)

ऋषी - दमन यामायन : देवता - अग्नि : छंद - १-१० - त्रिष्टुभ्; ११-१४ - अनुष्टुभ्


मैनं॑ अग्ने॒ वि द॑हो॒ माभि शो॑चो॒ मास्य॒ त्वचं॑ चिक्षिपो॒ मा शरी॑रम् ।
य॒दा शृ॒तं कृ॒णवो॑ जातवे॒दोऽ॑थें एनं॒ प्र हि॑णुतात् पि॒तृभ्यः॑ ॥ १॥

मा एनं अग्ने वि दहः मा अभि शोचः मा अस्य त्वचं चिक्षिपः मा शरीरं
यदा शृतं कृणवः जात-वेदः अथ ईं एनं प्र हिणुतात् पितृ-भ्यः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, ह्या मृत झालेल्या आमच्या आप्ताला कसातरी होरपळून टाकू नको. ह्याला शोक होईल असेही करूं नको; ह्याची कातडी फाडून इकडे तिकडे फेकून देऊं नको. याचे शरीरही भलतीकडे टाकू नको. तर याला तूं व्यवस्थित रीतीने दग्ध केलेंस म्हणजे हे सर्वज्ञा, पितरांमध्ये नेऊन ठेव. १


शृ॒तं य॒दा कर॑सि जातवे॒दोऽ॑थें एनं॒ परि॑ दत्तात् पि॒तृभ्यः॑ ।
य॒दा गच्छा॒त्यसु॑नीतिं ए॒तां अथा॑ दे॒वानां॑ वश॒नीर्भ॑वाति ॥ २ ॥

शृतं यदा करसि जात-वेदः अथ ईं एनं परि दत्तात् पितृ-भ्यः
यदा गच्चाति असु-नीतिं एतां अथ देवानां वश-नीः भवाति ॥ २ ॥

सर्वज्ञ अग्ने, याला तू व्यवस्थित रीतीने दग्ध केलेंस म्हणजे मग त्याला पितरांकडे नेऊन सोड. कारण जेव्हां त्याला आत्मबलाची योग्यता प्राप्त होईल, तेव्हांच तो दिव्यविबुधांना वश करूं शकेल. २


सूर्यं॒ चक्षु॑र्गच्छतु॒ वातं॑ आ॒त्मा द्यां च॑ गच्छ पृथि॒वीं च॒ धर्म॑णा ।
अ॒पो वा॑ गच्छ॒ यदि॒ तत्र॑ ते हि॒तं ओष॑धीषु॒ प्रति॑ तिष्ठा॒ शरी॑रैः ॥ ३ ॥

सूर्यं चक्षुः गच्चतु वातं आत्मा द्यां च गच्च पृथिवीं च धर्मणा
अपः वा गच्च यदि तत्र ते हितं ओषधीषु प्रति तिष्ठ शरीरैः ॥ ३ ॥

हे मृतजीवा, तुझें नेत्रतेज सूर्यामध्यें जाऊन मिळो. तुझा प्राण वायूत जाऊन मिसळो. तुझ्या धर्मकर्मानुरूप तूं आकाशांत जा, पृथिवींत जा, उदकांत जा, किंवा तुला आवडत असेल तर नूतन शरीरासह वनस्पतींतही वास्तव्य कर. ३


अ॒जो भा॒गस्तप॑सा॒ तं त॑पस्व॒ तं ते॑ शो॒चिस्त॑पतु॒ तं ते॑ अ॒र्चिः ।
यास्ते॑ शि॒वास्त॒न्वो जातवेद॒स्ताभि॑र्वहैनं सु॒कृतां॑ उलो॒कम् ॥ ४ ॥

अजः भागः तपसा तं तपस्व तं ते शोचिः तपतु तं ते अर्चिः
याः ते शिवाः तन्वः जात-वेदः ताभिः वह एनं सु-कृतां ओं इति लोकम् ॥ ४ ॥

अग्निदेवा, हा मृत मनुष्य आज तुझा भाग आहे; आता आपल्या तप्ततेनें त्याला तप्त कर. तुझ्या प्रकाशमय तप्ततेने तो तप्त होवो, तुझी ज्वाला त्याला तप्त करो. हे सकल वस्तुज्ञा देवा, तुझ्या मंगल ज्वालांच्या योगानें तूं या जीवाला घेऊन जा, आणि त्याला उत्कृष्ट लोकांची प्राप्ति करून दे. ४


अव॑ सृज॒ पुन॑रग्ने पि॒तृभ्यो॒ यस्त॒ आहु॑त॒श्चर॑ति स्व॒धाभिः॑ ।
आयु॒र्वसा॑न॒ उप॑ वेतु॒ शेषः॒ सं ग॑च्छतां त॒न्वा जातवेदः ॥ ५ ॥

अव सृज पुनः अग्ने पितृ-भ्यः यः ते आहुतः चरति स्वधाभिः
आयुः वसानः उप वेतु शेषः सं गच्चतां तन्वा जात-वेदः ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, हा मृत मनुष्य ज्याची तुझ्यामध्यें आम्ही आहुति दिली आहे, आणि जो तुझ्या स्वाभाविक सामर्थ्यानें आतां संचार करूं लागला आहे; त्याला तूं येथून पुनः हलवून पितरांकडे पाठवून दे. तो आता नूतन आयुष्याचे वस्त्र परिधान करो, त्याचें जे कांही इच्छित राहिलें असेल तेहि त्याला प्राप्त होवो. सकलवस्तुज्ञा देवा, त्याला दिव्य शरीराची जोड मिळो. ५


यत् ते॑ कृ॒ष्णः श॑कु॒न आ॑तु॒तोद॑ पिपी॒लः स॒र्प उ॒त वा॒ श्वाप॑दः ।
अ॒ग्निष् टद्वि॒श्वाद॑ग॒दं कृ॑णोतु॒ सोम॑श्च॒ यो ब्रा॑ह्म॒णाँ आ॑वि॒वेश॑ ॥ ६ ॥

यत् ते कृष्णः शकुनः आतुतोद पिपीलः सर्पः उत वा श्वापदः
अग्निः तत् विश्व-अत् अगदं कृणोतु सोमः च यः ब्राह्मणान् आविवेश ॥ ६ ॥

मृत मानवा, जरी तुला कावळ्याने चोच मारली असेल, किंवा मुंगळा, सर्प अथवा एखादें श्वापद यांनी इजा केली असेल, तरी हा सर्वभक्ष अग्नि ती तुझी इजा नाहीशी करील, आणि ब्रह्मसूक्त जाणणार्‍या ब्राह्मणाच्या ठिकाणी जो सोमरस अर्पण झाला असेल, तोही तुझी इजा नाहिशी करील. ६


अ॒ग्नेर्वर्म॒ परि॒ गोभि॑र्व्ययस्व॒ सं प्रोर्णु॑ष्व॒ पीव॑सा॒ मेद॑सा च ।
नेत् त्वा॑ धृ॒ष्णुर्हर॑सा॒ जर्हृ॑षाणो द॒धृग् वि॑ध॒क्ष्यन् प॑र्य॒ङ्खया॑ते ॥ ७ ॥

अग्नेः वर्म परि गोभिः व्ययस्व सं प्र ऊणुष्व पीवसा मेदसा च
न इत् त्वा धृष्णुः हरसा जर्हृषाणः दधृक् वि-धक्ष्यन् परि-अङ्खयाते ॥ ७ ॥

अग्नीच्या ज्वालारूप कवचावर गव्याच्या चर्माचे किंवा गोदुग्धाचे आवरण घाल. मोठमोठ्या मेद पिंडांनी त्यांना चोहोंकडून झांकून टाक, म्हणजे आपल्या धडाडीने शत्रूचे धुडके उडवून देणारा, आणि ज्वालेच्या लोळाने फुशारून धडाडणारा अग्नि धगधगीत जळत असला तरी तो दुसरीकडे पसरणार नही. ७


इ॒मं अ॑ग्ने चम॒सं मा वि जि॑ह्वरः प्रि॒यो दे॒वानां॑ उ॒त सो॒म्याना॑म् ।
ए॒ष यश्च॑म॒सो दे॑व॒पान॒स्तस्मि॑न् दे॒वा अ॒मृता॑ मादयन्ते ॥ ८ ॥

इमं अग्ने चमसं मा वि जिह्वरः प्रियः देवानां उत सोम्यानां
एषः यः चमसः देव-पानः तस्मिन् देवाः अमृताः मादयन्ते ॥ ८ ॥

हे अग्ने, हा चमस तुं उघडा करूं नको. हा चमस सोमप्रिय दिव्यविबुधांना आवडला आहे. ज्यातून ते दिव्यविबुध सोमरस प्राशन करतात, तो हा चमस होय. म्हणून त्याला पाहतांच अमर देवांना हर्ष होतो. ८


क्र॒व्यादं॑ अ॒ग्निं प्र हि॑णोमि दू॒रं य॒मरा॑ज्ञो गच्छतु रिप्रवा॒हः ।
इ॒हैवायं इत॑रो जा॒तवे॑दा दे॒वेभ्यो॑ ह॒व्यं व॑हतु प्रजा॒नन् ॥ ९ ॥

क्रव्य-अदं अग्निं प्र हिणोमि दूरं यम-राजः गच्चतु रिप्र-वाहः
इह एव अयं इतरः जात-वेदाः देवेभ्यः हव्यं वहतु प्र-जानन् ॥ ९ ॥

मृताचे मांस भक्षण करणार्‍या ह्या क्रव्याद अग्नीला मी आतां दूर पाठवून देतो; तो क्रव्याद अग्नि पापनाशन जो यमराज त्याच्याकडे जावो, आणि ह्या ठिकाणी हा जो दुसरा अग्नि प्रज्वलित केला आहे, तो आमचा हेतु जाणून दिव्य जनाकडे आमचा हविर्भाग पोहोंचवून देवो. ९


यो अ॒ग्निः क्र॒व्यात् प्र॑वि॒वेश॑ वो गृ॒हं इ॒मं पश्य॒न्न् इत॑रं जा॒तवे॑दसम् ।
तं ह॑रामि पितृय॒ज्ञाय॑ दे॒वं स घ॒र्मं इ॑न्वात् पर॒मे स॒धस्थे॑ ॥ १० ॥

यः अग्निः क्रव्य-अत् प्र-विवेश वः गृहं इमं पश्यन् इतरं जात-वेदसं
तं हरामि पितृ-यजाय देवं सः घर्मं इन्वात् परमे सध-स्थे ॥ १० ॥

हा जो क्रव्याद अग्नि, दुसर्‍या इतर अग्नीला पाहून हे पितरांनो, तुमच्या गृहांत शिरला आहे, त्याला तेथून पितृयज्ञासाठी मी बाहेर घेऊन येतो. पण त्यालाही पितरांच्या श्रेष्ठ लोकीं धर्म पात्रांतील हव्य प्राप्त होवो. १०


यो अ॒ग्निः क्र॑व्य॒वाह॑नः पि॒तॄन् यक्ष॑दृता॒वृधः॑ ।
प्रेदु॑ ह॒व्यानि॑ वोचति दे॒वेभ्य॑श्च पि॒तृभ्य॒ आ ॥ ११॥

यः अग्निः क्रव्य-वाहनः पितॄन् यक्षत् ऋत-वृधः
प्र इत् ओं इति हव्यानि वोचति देवेभ्यः च पितृ-भ्यः आ ॥ ११ ॥

जो क्रव्याद अग्नि सनातन धर्माची अभिवृद्धि करणार्‍या पितरांसाठी यजन करणारा आहे तोच हा अग्नि तुमचे हविर्भाग सिद्ध आहेत असे दिव्यविभूतिंना आणि पितरांना सांगो. ११


उ॒शन्त॑स्त्वा॒ नि धी॑मह्यु॒शन्तः॒ सं इ॑धीमहि ।
उ॒शन्न् उ॑श॒त आ व॑ह पि॒तॄन् ह॒विषे॒ अत्त॑वे ॥ १२ ॥

उशन्तः त्वा नि धीमहि उशन्तः सं इधीमहि
उशन् उशतः आ वह पितॄन् हविषे अत्तवे ॥ १२ ॥

तुझ्यासाठी उत्सुक झालेले आम्ही वेदीवर तुझी स्थापना करतो. आणि उत्सुकतेनेंच तुला प्रज्वलित करतो. तर तूंही औत्सुक्याने उत्कंठित झालेल्या पितरांना हविर्भाग सेवन करण्यासाठी येथें घेऊन ये. १२


यं त्वं अ॑ग्ने स॒मद॑ह॒स्तं उ॒ निर्वा॑पया॒ पुनः॑ ।
कि॒याम्ब्व् अत्र॑ रोहतु पाकदू॒र्वा व्यल्कशा ॥ १३ ॥

यं त्वं अग्ने सम्-अदहः तं ओं इति निः वापय पुनरिति
कियाम्बु अत्र रोहतु पाक-दूर्वा वि-अल्कशा ॥ १३ ॥

हे अग्निदेवा, ज्या मृताला तूं आत्तांच दग्ध केलेस, त्याला तूं आश्वासन दे. ह्या दहनभूमीवर उदकांतील वनस्पति पुनः उगवोत, आणि टवटवीत दुर्वांची बेटेंही येथें पुनः उत्पन्न होवोत. १३


शीति॑के॒ शीति॑कावति॒ ह्लादि॑के॒ ह्लादि॑कावति ।
म॒ण्डू॒क्याख्प् सु सं ग॑म इ॒मं स्व् अ१ग्निं ह॑र्षय ॥ १४ ॥

शीतिके शीतिकावति ह्रादिके ह्रादिकावति
मण्डूक्या सु सं गमः इमं सु अग्निं हर्षय ॥ १४ ॥

शीतलता उत्पन्न करणार्‍या शीतिके वल्ली, हे आल्हाद उत्पन्न करणार्‍या ह्रादिके वल्ली, तूं मंडूकपर्णीसह येथें उगवून अग्नीला हर्षित कर. १४


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७ (यम अंत्येष्टिसूक्त, सरण्यूसूक्त)

ऋषी - देवश्रवस् यामायन : देवता - १-२ - सरण्यू; ३-६ - पूषन्; ७-९ - सरस्वती;
१०, १४ - अप्; ११-१३ - अप् अथवा सोम छंद - १-१२ - त्रिष्टुभ्; १३-१४ - अनुष्टुभ्


त्वष्टा॑ दुहि॒त्रे व॑ह॒तुं कृ॑णो॒तीती॒दं विश्वं॒ भुव॑नं॒ सं ए॑ति ।
य॒मस्य॑ मा॒ता प॑र्यु॒ह्यमा॑ना म॒हो जा॒या विव॑स्वतो ननाश ॥ १॥

त्वष्टा दुहित्रे वहतुं कृणोति इति इदं विश्वं भुवनं सं एति
यमस्य माता परि-उह्यमाना महः जाया विववस्वतः ननाश ॥ १ ॥

त्वष्ट्याने आपल्या कन्येच्या विवाहासाठी सिद्धता केली, म्हणून हे सर्व जग त्या ठिकाणीं गोळा झालें; परंतु वधू म्हणजे यमाची माता अथवा श्रेष्ठ अशा विवस्वानाची भावी भार्या ही एकदम नाहीशीच झाली. १


अपा॑गूहन्न् अ॒मृतां॒ मर्त्ये॑भ्यः कृ॒त्वी सव॑र्णां अददु॒र्विव॑स्वते ।
उ॒ताश्विना॑व् अभर॒द्यत् तदासी॒दज॑हादु॒ द्वा मि॑थु॒ना स॑र॒ण्यूः ॥ २ ॥

अप अगूहन् अमृतां मर्त्येभ्यः कृत्वी स-वर्णां अददुः विवस्वते
उत अश्विनौ अभरत् यत् तत् आसीत् अजहात् ओं इति द्वा मिथुना सरण्यूः ॥ २ ॥

कारण दिव्यविभूतींनी तिला अमरत्व देऊन मानवांपासून दडवून ठेवली, आणि तिच्यासारखीच दुसरी रूपवती तरुणी उत्पन्न करुन ती विवस्वानाला अर्पण केली, तिच्यापासून अश्वीदेव झाले; आणि हे सर्व झाल्यावर सरण्यूनें त्या जुळ्या बालकांना सोडून दिले. २


पू॒षा त्वे॒तश्च्या॑वयतु॒ प्र वि॒द्वान् अन॑ष्टपशु॒र्भुव॑नस्य गो॒पाः ।
स त्वै॒तेभ्यः॒ परि॑ ददत् पि॒तृभ्यो॑ऽ॒ग्निर्दे॒वेभ्यः॑ सुविद॒त्रिये॑भ्यः ॥ ३ ॥

पूषा त्वा इतः च्यवयतु प्र विद्वान् अनष्ट-पशुः भुवनस्य गोपाः
सः त्वा एतेभ्यः परि ददत् पितृ-भ्यः अग्निः देवेभ्यः सु-विदत्र् इयेभ्यः ॥ ३ ॥

या दोन ऋचांचा पुढील ऋचांशी कांही संबंध दिसत नाही. असे असूनही त्या एकाच सूक्तांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत. विश्वपोषक पूषा तुला येथून हलवून घेऊन जावो; तो सर्वज्ञ आहे, त्याचे गोधन कधींही नष्ट होत नाही. आणि तो जगताचे पालन करतो. तर तो तुजला पितरांच्या स्वाधीन करील, आणि अग्नि देखील अत्यंत सुज्ञ जे देव त्यांच्या स्वाधीन करील. ३


आयु॑र्वि॒श्वायुः॒ परि॑ पासति त्वा पू॒षा त्वा॑ पातु॒ प्रप॑थे पु॒रस्ता॑त् ।
यत्रास॑ते सु॒कृतो॒ यत्र॒ ते य॒युस्तत्र॑ त्वा दे॒वः स॑वि॒ता द॑धातु ॥ ४ ॥

आयुः विश्व-आयुः परि पासति त्वा पूषा त्वा पातु प्र-पथे पुरस्तात्
यत्र आसते सु-कृतः यत्र ते ययुः तत्र त्वा देवः सविता दधातु ॥ ४ ॥

विश्वाचे आयुष्य, किंवा विश्वाचा आत्मा ईश्वर हा सर्व प्रकारें तुझे रक्षण करो. ज्या ठिकाणी पुण्यशील जीवात्मे राहतात, ज्या ठिकाणी तुझेही पूर्वज गेले आहेत, त्या ठिकाणी सृष्टिकर्ता (सविता) तुजला स्थान देवो. ४


पू॒षेमा आशा॒ अनु॑ वेद॒ सर्वाः॒ सो अ॒स्माँ अभ॑यतमेन नेषत् ।
स्व॒स्ति॒दा आघृ॑णिः॒ सर्व॑वी॒रोऽ॑प्रयुच्छन् पु॒र ए॑तु प्रजा॒नन् ॥ ५ ॥

पूषा इमाः आशाः अनु वेद सर्वाः सः अस्मान् अभय-तमेन नेषत्
स्वस्ति-दाः आघृणिः सर्व-वीरः अप्र-युच्चन् पुरः एतु प्र-जानन् ॥ ५ ॥

हे सकल दिग्भाग त्यांच्या अनुक्रमाप्रमाणे पूषाला आहित आहेत; म्हणून ज्या मार्गानें मुळीच धोका नाही अशा मार्गानेंच तो पूषा तुला त्या ठिकाणीं नेवो; तो कल्याणकारी, उज्ज्वल प्रकाशवान्, वीरोत्तम आणि सर्व कांही उत्तम प्रकारें जाणणारा पूषा अगदीं न विसंबता तुझ्या पुढें चालो. ५


प्रप॑थे प॒थां अ॑जनिष्ट पू॒षा प्रप॑थे दि॒वः प्रप॑थे पृथि॒व्याः ।
उ॒भे अ॒भि प्रि॒यत॑मे स॒धस्थे॒ आ च॒ परा॑ च चरति प्रजा॒नन् ॥ ६ ॥

प्र-पथे पथां अजनिष्ट पूषा प्र-पथे दिवः प्र-पथे पृथिव्याः
उभे इति अभि प्रिय-तमे सध-स्थे आ च परा च चरति प्र-जानन् ॥ ६ ॥

सर्व मार्गांमध्ये जो उत्कृष्ट मार्ग तेथेंच पूषा प्रकट झालेला आहे. म्हणून तो महाज्ञानी पूषा, त्याला अत्यंत प्रिय आणि सर्व लोकांना निवास योग्य अशा त्या दोन्ही स्थानांकडे वारंवार जाऊन येऊन संचार करतो. ६


सर॑स्वतीं देव॒यन्तो॑ हवन्ते॒ सर॑स्वतीं अध्व॒रे ता॒यमा॑ने ।
सर॑स्वतीं सु॒कृतो॑ अह्वयन्त॒ सर॑स्वती दा॒शुषे॒ वार्यं॑ दात् ॥ ७ ॥

सरस्वतीं देव-यन्तः हवन्ते सरस्वतीं अध्वरे तायमाने
सरस्वतीं सु-कृतः अह्वयन्त सरस्वती दाशुषे वार्यं दात् ॥ ७ ॥

देवोत्सुक भक्तजनसरस्वती प्रीत्यर्थ हवन करतात. अध्वरयाग चालू असतांही सरस्वतीला हविर्भाग अर्पण करतात. आणि सरस्वतीही त्या देवोपासकांना उत्कृष्ट प्रतीचे धन अर्पण करते. ७


सर॑स्वति॒ या स॒रथं॑ य॒याथ॑ स्व॒धाभि॑र्देवि पि॒तृभि॒र्मद॑न्ती ।
आ॒सद्या॒स्मिन् ब॒र्हिषि॑ मादयस्वानमी॒वा इष॒ आ धे॑ह्य॒स्मे ॥ ८ ॥

सरस्वति या स-रथं ययाथ स्वधाभिः देवि पितृ-भिः मदन्ती
आसद्य अस्मिन् बर्हिषि मादयस्व अनमीवाः इषः आ धेहि अस्मे इति ॥ ८ ॥

हे देवी सरस्वती, जी तूं स्वधाप्रयुक्त हवीनें आनंदमग्न होऊन पितरांसह एकाच रथांतून जात असतेस, ती तूं ह्या आमच्या यज्ञसमारंभांत येऊन तशीच हर्षमग्न हो. आणि आरोग्यपूर्ण उत्साह आमच्या ठायीं सदैव राहूं दे. ८


सर॑स्वतीं॒ यां पि॒तरो॒ हव॑न्ते दक्षि॒णा य॒ज्ञं अ॑भि॒नक्ष॑माणाः ।
स॒ह॒स्रा॒र्घं इ॒ळो अत्र॑ भा॒गं रा॒यस्पोषं॒ यज॑मानेषु धेहि ॥ ९ ॥

सरस्वतीं यां पितरः हवन्ते दक्षिणा यजं अभि-नक्षमाणाः
सहस्र-अर्घं इळः अत्र भागं रायः पोषं यजमानेषु धेहि ॥ ९ ॥

आमच्या यज्ञाकडे मनमोकळेपणाने येणारे पितृगण ज्या सरस्वती प्रीत्यर्थ हवन करतात ती सरस्वती या ठिकाणी उत्साहाचा सहस्र प्रकारांनी मौल्यवान् असा भाग म्हणजे अक्षय संपत्तीच्या उत्कर्षाची देणगी यजमानाला देवो. ९


आपो॑ अ॒स्मान् मा॒तरः॑ शुन्धयन्तु घृ॒तेन॑ नो घृत॒प्वः पुनन्तु ।
विश्वं॒ हि रि॒प्रं प्र॒वह॑न्ति दे॒वीरुदिदा॑भ्यः॒ शुचि॒रा पू॒त ए॑मि ॥ १० ॥

आपः अस्मान् मातरः शुन्धयन्तु घृतेन नः घृत-प्वः पुनन्तु
विश्वं हि रिप्रं प्र-वहन्ति देवीः उत् इत् आभ्यः शुचिः आ पूतः एमि ॥ १० ॥

जगज्जननी आपोदेवी आम्हांला शुद्ध करोत. आम्हांला घृत वर्षावाने पावन करोत. यच्चयावत् पातकें त्या धुवून टाकतात; आणि अशा रीतीनें ह्यांनी शुद्ध केलेला मी पवित्र भक्त उच्च स्थितींला जाऊन पोहोंचतो. १०


द्र॒प्सश्च॑स्कन्द प्रथ॒माँ अनु॒ द्यून् इ॒मं च॒ योनिं॒ अनु॒ यश्च॒ पूर्वः॑ ।
स॒मा॒नं योनिं॒ अनु॑ सं॒चर॑न्तं द्र॒प्सं जु॑हो॒म्यनु॑ स॒प्त होत्राः॑ ॥ ११॥

द्रप्सः चस्कन्द प्रथमां अनु द्यून् इमं च योनिं अनु यः च पूर्वः
समानं योनिं अनु सम्-चरन्तं द्रप्सं जुहोमि अनु सप्त होत्राः ॥ ११ ॥

हा टिबकणारा सोमरस बिंदु पहिल्या दिवसापासून याच स्थानी पात्रांत गाळलेला आहे. आणि हा जो त्याच्या अगोदर गाळलेला रस आहे तो आणि हा असे एकाच पात्रांत ओतून त्या रसबिंदुनें सात होत्यांनी हवन केल्यानंतर मी हवन करतो. ११


यस्ते॑ द्र॒प्स स्कन्द॑ति॒ यस्ते॑ अं॒शुर्बा॒हुच्यु॑तो धि॒षणा॑या उ॒पस्था॑त् ।
अ॒ध्व॒र्योर्वा॒ परि॑ वा॒ यः प॒वित्रा॒त् तं ते॑ जुहोमि॒ मन॑सा॒ वष॑ट्कृतम् ॥ १२ ॥

यः ते द्रप्सः स्कन्दति यः ते अंशुः बाहु-च्युतः धिषणायाः उप-स्थात्
अध्वर्योः वा परि वा यः पवित्रात् तं ते जुहोमि मनसा वषट्-कृतम् ॥ १२ ॥

हे सोमा, तुझा जो रसबिंदु खाली सांडला असेल, तुझा जो डहाळा या अधिषवण फलकाजवळ हातांतून पडला असेल; किंवा जो कांही भाग उभय अध्वर्यूंच्या गाळण्यातून खाली किंवा इकडे तिकडे पडला असेल; त्याचेंही मी अभियुक्त अंतःकरणानें वषट्‌कारपूर्वक अग्नीमध्यें हवन करतो. १२


यस्ते॑ द्र॒प्स स्क॒न्नो यस्ते॑ अं॒शुर॒वश्च॒ यः प॒रः स्रु॒चा ।
अ॒यं दे॒वो बृह॒स्पतिः॒ सं तं सि॑ञ्चतु॒ राध॑से ॥ १३ ॥

यः ते द्रप्सः स्कन्नः यः ते अंशुः अवः च यः परः स्रुचा
अयं देवः बृहस्पतिः सं तं सिचतु राधसे ॥ १३ ॥

तुझा जो थेंब सांडला असेल, तुझा जो डहाळा स्रुवेच्या खाली किंवा वर चिकटला असेल, त्यावर हा बृहस्पति देव आम्हांवर कृपाप्रसाद करावा म्हणून उत्तम रीतीनें सिंचन करो. १३


पय॑स्वती॒रोष॑धयः॒ पय॑स्वन् माम॒कं वचः॑ ।
अ॒पां पय॑स्व॒दित् पय॒स्तेन॑ मा स॒ह शु॑न्धत ॥ १४ ॥

पयस्वतीः ओषधयः पयस्वत् मामकं वचः
अपां पयस्वत् इत् पयः तेन मा सह शुन्धत ॥ १४ ॥

सर्व वनलता रसपूर्ण आहेत; माझें भाषण सुरस, आणि आपोदेवींचें उदकहि सरसच आहे, तर त्या उदकसारानें आपोदेवी मला शुद्ध करोत. १४


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८ (यम अंत्येष्टिसूक्त, स्मशानसूक्त)

ऋषी - संकुसुक यामायन : देवता - १-४ - मृत्यु; ५ - धातृ; ६ - त्वष्ट्ट; ७-१३ - पितृमेध;
१४ - पितृमेध अथवा प्रजापति इ. छंद - १-१०, १२ - त्रिष्टुभ्; ११ - प्रस्तारपंक्ति; १३ - जगती; १४ - अनुष्टुभ्


परं॑ मृत्यो॒ अनु॒ परे॑हि॒ पन्थां॒ यस्ते॒ स्व इत॑रो देव॒याना॑त् ।
चक्षु॑ष्मते शृण्व॒ते ते॑ ब्रवीमि॒ मा नः॑ प्र॒जां री॑रिषो॒ मोत वी॒रान् ॥ १ ॥

परं मृत्यो इति अनु परा इहि पन्थां यः ते स्वः इतरः देव-यानात्
चक्षुष्मते शृण्वते ते ब्रवीमि मा नः प्र-जां रिरिषः मा उत वीरान् ॥ १ ॥

हे मृत्यो, दिव्यजनांच्या मार्गाव्यतिरिक्त जो तुझा मार्ग आहे त्या मार्गाने तूं दूर निघून जा. तुला नेत्र आहेत आणि कानहि आहेत. म्हणूनच मी तुला असे सांगतो कीं आमच्या मुलालेकरांचा किंवा आमच्या वीर्यशाली सैनिकांचा नाश करूं नको. १


मृ॒त्योः प॒दं यो॒पय॑न्तो॒ यदैत॒ द्राघी॑य॒ आयुः॑ प्रत॒रं दधा॑नाः ।
आ॒प्याय॑मानाः प्र॒जया॒ धने॑न शु॒द्धाः पू॒ता भ॑वत यज्ञियासः ॥ २ ॥

मृत्योः पदं योपयन्तः यत् ऐत द्राघीयः आयुः प्र-तरं दधानाः
आप्यायमानाः प्र-जया धनेन शुद्धाः पूताः भवत यजियासः ॥ २ ॥

मित्रांनो, मृत्युच्या पावलाना फेटाळून देऊन आमले दीर्घ आयुष्य उत्तम रीतीने उपभोगीत राहात आहां, आणि पुत्रपौत्र आणि वैभव यांनी समृद्ध होऊन कालक्रमण करतां आहां त्याचे कारण हे आहे कीं हे यज्ञकर्मरत मित्रांनो, तुम्ही शुद्ध आणि पवित्रच आहांत. २


इ॒मे जी॒वा वि मृ॒तैराव॑वृत्र॒न्न् अभू॑द्‌भ॒द्रा दे॒वहू॑तिर्नो अ॒द्य ।
प्राञ्चो॑ अगाम नृ॒तये॒ हसा॑य॒ द्राघी॑य॒ आयुः॑ प्रत॒रं दधा॑नाः ॥ ३ ॥

इमे जीवाः वि मृतैः आ अववृत्रन् अभूत् भद्रा देव-हूतिः नः अद्य
प्राचः अगाम नृतये हसाय द्राघीयः आयुः प्र-तरं दधानाः ॥ ३ ॥

आजची हीं जिवंत मनुष्यें पूर्वी मृत झालेल्या मनुष्यांनीच धडधडीत ह्या जगामध्यें आणलेली आहेत. म्हणूनच आमचा यज्ञ मंगलकारक झाला आणि आनंदाने हंसण्या खेळण्यासाठी उत्कृष्ट दीर्घायुष्य प्राप्त करून घेऊन आम्ही आपल्या गृहाकडे परतही फिरलो. ३


इ॒मं जी॒वेभ्यः॑ परि॒धिं द॑धामि॒ मैषां॒ नु गा॒दप॑रो॒ अर्थं॑ ए॒तम् ।
श॒तं जी॑वन्तु श॒रदः॑ पुरू॒चीर॒न्तर्मृ॒त्युं द॑धतां॒ पर्व॑तेन ॥ ४ ॥

इमं जीवेभ्यः परि-धिं दाधामि मा एषां नु गात् अपरः अर्थं एतं
शतं जीवन्तु शरदः पुरूचीः अन्तः मृत्युं दधतां पर्वतेन ॥ ४ ॥

जिवंत मनुष्यांसाठी हा मी त्याच्या सभोवार एक प्राकार बांधतो. हेतू हा कीं आमच्यापैकीं किंवा इतरांपैकीं कोणीही अपमृत्युच्या स्थितीला पोहोचूं नये. आतां हे जीव पुष्कळ म्हणजे शंभर वर्षे वांचोत आणि तो पर्यंत मृत्युला पर्वताखाली दडपून ठेवोत. ४


यथाहा॑न्यनुपू॒र्वं भव॑न्ति॒ यथ॑ ऋ॒तव॑ ऋ॒तुभि॒र्यन्ति॑ सा॒धु ।
यथा॒ न पूर्वं॒ अप॑रो॒ जहा॑त्ये॒वा धा॑त॒रायूं॑षि कल्पयैषाम् ॥ ५ ॥

यथा अहानि अनु-पूर्वं भवन्ति यथा ऋतवः ऋतु-भिः यन्ति साधु
यथा न पूर्वं अपरः जहाति एव धातः आयूंषि कल्पय एषाम् ॥ ५ ॥

ज्याप्रमाणे दिवसांमागून दिवस जातात, ऋतूमागून ऋतू जातात,ज्याप्रमाणे पुढल्याला पाठीमागून येणारा मनुष्य एकाएकी सोडून देत नाही – अशा सांखळीप्रमाणे, हे जगन्नियन्त्या आमच्या ह्या लोकींच्या आयुष्याची व्यवस्था लाव. ५


आ रो॑ह॒तायु॑र्ज॒रसं॑ वृणा॒ना अ॑नुपू॒र्वं यत॑माना॒ यति॒ ष्ठ ।
इ॒ह त्वष्टा॑ सु॒जनि॑मा स॒जोषा॑ दी॒र्घं आयुः॑ करति जी॒वसे॑ वः ॥ ६ ॥

आ रहत आयुः जरसं वृणानाः अनु-पूर्वं यतमानाः यति स्थ
इह त्वष्टा सु-जनिमा स-जोषाः दीर्घं आयुः करति जीवसे वः ॥ ६ ॥

म्हातारपणाचा अनुभव घेण्यापूर्वी आयुष्यसोपानाच्या पायर्या चढ; मग वार्धक्याचा अनुभव घे. आणि पूर्वजांप्रमाणे तुम्हालाही वार्धक्य प्राप्त झाले तरी प्रयत्न करीत राहून तुम्ही आपला आयुष्यक्रम चालवा. म्हणजे हे सुंदर जगत् निर्माण करणारा जो प्रेमळ ईश्वर (त्वष्टा) तुमचे आयुष्य आणखी वृद्धिंगत करील. ६


इ॒मा नारी॑रविध॒वाः सु॒पत्नी॒राञ्ज॑नेन स॒र्पिषा॒ सं वि॑शन्तु ।
अ॒न॒श्रवो॑ऽनमी॒वाः सु॒रत्ना॒ आ रो॑हन्तु॒ जन॑यो॒ योनिं॒ अग्रे॑ ॥ ७ ॥

इमाः नारीः अविधवाः सु-पत्नीः आजनेन सर्पिषा सं विशन्तु
अनश्रवः अनमीवाः सु-रत्नाः आ रोहन्तु जनयः योनिं अग्रे ॥ ७ ॥

अनुरूप पतींना अनुरूप असणार्या, तसेंच अंगाला उटणे लावून, डोळ्यांत अंजन घातलेल्या आनंदमग्न आणि आरोग्ययुक्त अशा सुवासिनी स्त्रिया रत्नालंकारांनी विभूषित होऊन सर्वांच्या अगोदर आसनावर बसोत. ७


उदी॑र्ष्व नार्य॒भि जी॑वलो॒कं ग॒तासुं॑ ए॒तं उप॑ शेष॒ एहि॑ ।
ह॒स्त॒ग्रा॒भस्य॑ दिधि॒षोस्तवे॒दं पत्यु॑र्जनि॒त्वं अ॒भि सं ब॑भूथ ॥ ८ ॥

उत् ईर्ष्व नारि अभि जीव-लोकं गत-असुं एतं उप शेषे आ इहि
हस्त-ग्राभस्य दिधिषोः तव इदं पत्युः जनि-त्वं अभि सं बभूथ ॥ ८ ॥

हे स्त्रिये, ह्या जिवंत मनुष्यांनी भरलेल्या जगाकडे पाहून तरी येऊन ऊठ. तूं या मृताच्या शेजारीं निजून राहिली आहेस; पण आतां इकडे ये. ज्या प्रियकरानें तुझें पाणिग्रहण केले, त्या तुझ्या पतिसंबंधाचे स्त्री या नात्यानें तुझे कर्तव्य तूं उत्कृष्टपणें केलेले आहेस. ८


धनु॒र्हस्ता॑दा॒ददा॑नो मृ॒तस्या॒स्मे क्ष॒त्राय॒ वर्च॑से॒ बला॑य ।
अत्रै॒व त्वं इ॒ह व॒यं सु॒वीरा॒ विश्वा॒ स्पृधो॑ अ॒भिमा॑तीर्जयेम ॥ ९ ॥

धनुः हस्तात् आददानः मृतस्य अस्मे इति क्षत्राय वर्चसे बलाय
अत्र एव त्वं इह वयं सु-वीराः विश्वाः स्पृधः अभि-मातीः जयेम ॥ ९ ॥

आता आमची सत्ता चालावी म्हणून, आमचे वर्चस्व व्हावें म्हणून, आणि आम्हीं बलाढ्य व्हावें म्हणून मृताच्या हातांतील हे धनुष्य मी काढून आपल्याजवळ ठेवतो. हे मृता, तुझ्याप्रमाणेंच आम्हींही वीर पुत्रांनी युक्त होऊन आमचे सर्व प्रतिस्पर्धी आणि शत्रू यांच्यावर जय मिळवूं. ९


उप॑ सर्प मा॒तरं॒ भूमिं॑ ए॒तां उ॑रु॒व्यच॑सं पृथि॒वीं सु॒शेवा॑म् ।
ऊर्ण॑म्रदा युव॒तिर्दक्षि॑णावत ए॒षा त्वा॑ पातु॒ निरृ॑तेरु॒पस्था॑त् ॥ १० ॥

उप सर्प मातरं भूमिं एतां उरु-व्यचसं पृथिवीं सु-शेवां
ऊर्ण-म्रदाः युवतिः दक्षिणावते एषा त्वा पातु निः-ऋतेः उप-स्थात् ॥ १० ॥

तूं आता या भूमातेकडे या विस्तीर्ण आणि सुमंगल पृथिवीकडे जा. दानशाली पुरुषाला ही जी मखमलीप्रमाणे मृदु लागते, ती ही यौवन संपन्न पृथिवीच दुर्गतीपासून तुझें रक्षण करील. १०


उच् छ्व॑ञ्चस्व पृथिवि॒ मा नि बा॑धथाः सूपाय॒नास्मै॑ भव सूपवञ्च॒ना ।
मा॒ता पु॒त्रं यथा॑ सि॒चाभ्येनं भूम ऊर्णुहि ॥ ११॥

उत् श्वचस्व पृथिवि मा नि बाधथाः सु-उपायना अस्मै भव सु-उपवचना
माता पुत्रं यथा सिचा अभि एनं भूमे ऊर्णुहि ॥ ११ ॥

हे धरित्री, वरच्यावरती सांवरून रहा. ह्या मृताला इजा करूं नको. याचे लाड पुरव, त्याची समजूत घाल. आणि कोमल मनाची आई जशी लेकराला पदराखाली झांकून घेते त्याप्रमाणे, हे भूमि याच्यावर तूं आपले पांघरूण घाल. ११


उ॒च्छ्वञ्च॑माना पृथि॒वी सु ति॑ष्ठतु स॒हस्रं॒ मित॒ उप॒ हि श्रय॑न्ताम् ।
ते गृ॒हासो॑ घृत॒श्चुतो॑ भवन्तु वि॒श्वाहा॑स्मै शर॒णाः स॒न्त्वत्र॑ ॥ १२ ॥

उत्-श्वचमाना पृथिवी सु तिष्ठतु सहस्रं मितः उप हि श्रयन्तां
ते गृहासः घृत-श्चुतः भवन्तु विश्वाहा अस्मै शरणाः सन्तु अत्र ॥ १२ ॥

ही उफाळणारी पृथिवी आता स्थिर राहों आणि या मृताला सहस्रावधि आश्रय प्राप्त होवोत. हे मृता, तुझी गृहें घृतपूर्ण होवोत आणि पुढे येणारा यच्चयावत् दिवस येथें तुजला निवारा देवोत. १२


उत् ते॑ स्तभ्नामि पृथि॒वीं त्वत् परी॒मं लो॒गं नि॒दध॒न् मो अ॒हं रि॑षम् ।
ए॒तां स्थूणां॑ पि॒तरो॑ धारयन्तु॒ तेऽ॑त्रा य॒मः साद॑ना ते मिनोतु ॥ १३ ॥

उत् ते स्तभ्नामि पृथिवीं त्वत् परि इमं लोगं नि-दधत् मो इति अहं रिषं
एतां स्थूणां पितरः धारयन्तु ते अत्र यमः सदना ते मिनोतु ॥ १३ ॥

ही तुझ्यावरील माती ठोकून घट्ट बसविली; आतां तुझ्यावर हा मातीचा ओटा करतो; तुला कोणीही इजा करणार नाही. या प्रस्ताराला पितर जतन करोत, आणि येथेंच यमराज तुला मंदिरें बांधून देवो. १३


प्र॒ती॒चीने॒ मां अह॒नीष्वाः॑ प॒र्णं इ॒वा द॑धुः ।
प्र॒तीचीं॑ जग्रभा॒ वाचं॒ अश्वं॑ रश॒नया॑ यथा ॥ १४ ॥

प्रतीचीने मां अहनि इष्वाः पर्णम्-इव आ दधुः
प्रतीचीं जग्रभ वाचं अश्वं रशनया यथा ॥ १४ ॥

बाणाला जसा पिसारा बसवावा, त्याप्रमाणे योग्य दिवशी त्यांनी माझी योजना केली, आणि लगामानें जसा घोडा ताब्यांत ठेवावा त्याप्रमाणे मीही मनोनुकूल भाषेला आपल्या ताब्यांत ठेवलें आहे. १४


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १९ (गोसूक्त)

ऋषी - मथित यामायन अथावा भृगु वारुणि अथवा च्यवन भार्गव
देवता - अप् अथवा गो; १ चा उत्तरार्ध - अग्निषोम : छंद - ६ - गायत्री; अवशिष्ट - अनुष्टुभ्


नि व॑र्तध्वं॒ मानु॑ गाता॒स्मान् सि॑षक्त रेवतीः ।
अग्नी॑षोमा पुनर्वसू अ॒स्मे धा॑रयतं र॒यिम् ॥ १॥

नि वर्तध्वं मा अनु गात अस्मान् सिसक्त रेवतीः
अग्नीषोमा पुनर्वसूइतिपुनः-वसू अस्मे इति धारयतं रयिम् ॥ १ ॥

हे अक्षय धनवतींनो, तुम्ही परत फिरा. आमच्या मागोमाग या. आमच्याबरोबर रहा. वारंवार प्रकाशधन देणार्या हे पुनर्वसु अग्निसोमहो ! आम्हांला ते अक्षय धन अर्पण करा. १


पुन॑रेना॒ नि व॑र्तय॒ पुन॑रेना॒ न्या कु॑रु ।
इन्द्र॑ एणा॒ नि य॑च्छत्व॒ग्निरे॑ना उ॒पाज॑तु ॥ २ ॥

पुनः एनाः नि वर्तय पुनः एनाः नि आ कुरु
इन्द्र एनाः नि यच्चतु अग्निः एनाः उप-आजतु ॥ २ ॥

हे पूषा, त्यांना पुनः वळवून परत आण. त्यांना पुनः आमच्याजवळ आण.त्या (धेनू) इंद्र आम्हांला प्राप्त करून देवो; अग्नि त्यांना वळवून आम्हाकडे आणो. २


पुन॑रे॒ता नि व॑र्तन्तां अ॒स्मिन् पु॑ष्यन्तु॒ गोप॑तौ ।
इ॒हैवाग्ने॒ नि धा॑रये॒ह ति॑ष्ठतु॒ या र॒यिः ॥ ३ ॥

पुनः एताः नि वर्तन्तां अस्मिन् पुष्यन्तु गो--पतौ
इह एव अग्ने नि धारय इह तिष्ठतु या रयिः ॥ ३ ॥

त्या पुन्हा घराकडे परत फिरोत. हा पूषा त्या धेनूंचा रक्षक आहे म्हणून त्या पुष्ट होवोत. अग्निदेवा, त्यांना येथेंच आणून ठेव. हें जें धेनूरूप धन आहे ते आमच्याकडे राहो. ३


यन् नि॒यानं॒ न्यय॑नं सं॒ज्ञानं॒ यत् प॒राय॑णम् ।
आ॒वर्त॑नं नि॒वर्त॑नं॒ यो गो॒पा अपि॒ तं हु॑वे ॥ ४ ॥

यत् नि-यानं नि-अयनं सम्-जानं यत् परायनं
आवर्तनन् नि-वर्तनं यः गोपाः अपि तं हुवे ॥ ४ ॥

ह्यांचे आपल्या जागेकडे जाणें, इकडे तिकडे हिंडणे एकमेकीशीं संकेत करणे, बाहेर रानांत जाणे, तेथून माघारी फिरणे, आणि परत घरीं येणे या सर्व गोष्टी ज्याच्यामुळे होतात, तो त्यांचा पालक जो पूषा त्याचा मी धांवा करतो. ४


य उ॒दान॒ड् व्यय॑नं॒ य उ॒दान॑ट् प॒राय॑णम् ।
आ॒वर्त॑नं नि॒वर्त॑नं॒ अपि॑ गो॒पा नि व॑र्तताम् ॥ ५ ॥

यः उत्-आनट् वि-अयनं यः उत्-आनट् परायनं
आवर्तनं न् इ-वर्तनं अपि गोपाः नि वर्तताम् ॥ ५ ॥

धेनूंचे इकडे तिकडे बागडणे जो पाहतो, त्यांचे बाहेर फिरणें, मागे वळणे, आणि घराकडे प्रत येणें हेंही जो पाहतो, तो गोपाळ आता धेनूसह परत येवो. ५


आ नि॑वर्त॒ नि व॑र्तय॒ पुन॑र्न इन्द्र॒ गा दे॑हि ।
जी॒वाभि॑र्भुनजामहै ॥ ६ ॥

आ नि-वर्त नि वर्तय पुनः नः इन्द्र गाः देहि
जीवाभिः भुनजामहै ॥ ६ ॥

तूं परत फिर आणि त्यांनाही घराकडे वळव. हे इंद्रा, आमच्या धेनू आम्हांला परत दे. त्या जिवंत असल्या म्हणजे त्यांच्यासह आम्ही आनंद उपभोगू. ६


परि॑ वो वि॒श्वतो॑ दध ऊ॒र्जा घृ॒तेन॒ पय॑सा ।
ये दे॒वाः के च॑ य॒ज्ञिया॒स्ते र॒य्या सं सृ॑जन्तु नः ॥ ७ ॥

परि वः विश्वतः दधे ऊर्जा घृतेन पयसा
ये देवाः के च यजियाः ते रय्या सं सृजन्तु नः ॥ ७ ॥

ऊर्जस्वितेनें, घृताने, दुग्धाने सर्वतोपरी मी तुम्हांला पूर्ण संतुष्ट ठेवलें आहे; तर यज्ञार्ह असे जे कोणी दिव्यविबुध आहेत, ते आम्हांला दिव्य धनाची जोड देवोत. ७


आ नि॑वर्तन वर्तय॒ नि नि॑वर्तन वर्तय ।
भूम्या॒श्चत॑स्रः प्र॒दिश॒स्ताभ्य॑ एना॒ नि व॑र्तय ॥ ८ ॥

आ नि-वर्तन वर्तय नि नि-वर्तन वर्तय
भूम्याः चतस्रः प्र-दिशः ताभ्यः एनाः नि वर्तय ॥ ८ ॥

तूं परत फिर, त्यांनाही माघारी फिरव; तूं फिर आणि त्यांनाही परत फिरव. या पृथिवीच्या ज्या चार दिशा आहेत, तेथून देखील ह्या धेनूंना परत घेऊन ये. ८


ऋग्वेद - मंडल १० सूक्त २० (अग्निसूक्त - शांतिपाठमंत्र)

ऋषी - विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र : देवता - अग्नि
छंद - १ - एकपदा विराज्; २ - अनुष्टुभ्; ३-८ - गायत्री; ९ - विराज्; १० - त्रिष्टुभ्


भ॒द्रं नो॒ अपि॑ वातय॒ मनः॑ ॥ १॥

भद्रं नः अपि वातय मनः ॥ १ ॥

कल्यालाणकारी असें आपलें मन आमच्याकडे वळवून आण. १


अ॒ग्निं ई॑ळे भु॒जां यवि॑ष्ठं शा॒सा मि॒त्रं दु॒र्धरी॑तुम् ।
यस्य॒ धर्म॒न् स्व१रेनीः॑ सप॒र्यन्ति॑ मा॒तुरूधः॑ ॥ २ ॥

अग्निं ईळे भुजां यविष्ठं शासा मित्रं दुः-धरीतुं
यस्य धर्मन् स्वः एनीः सपर्यन्ति मातुः ऊधः ॥ २ ॥

हवीचा स्वीकार करणार्या विभूतींमध्ये जो अत्यंत तरुण, आणि आपल्याच अनुशासनांविषयीं दुविर्वार आहे, तथापि जो भक्ताचा मित्र होतो असा अग्नि त्याचें मी स्तवन करतो; कारण अग्नीच्या धर्मराज्यांत स्वर्गीय धेनू भूमातेच्या कासेचें अवघ्राण करतात. २


यं आ॒सा कृ॒पनी॑ळं भा॒साके॑तुं व॒र्धय॑न्ति ।
भ्राज॑ते॒ श्रेणि॑दन् ॥ ३ ॥

यं आसाः कृप-नीळं भासाकेतुं वर्धयन्ति
भ्राजते श्रेणि-दन् ॥ ३ ॥

कृपेचें निवासस्थान, प्रकाशाचा ध्वज अशा अग्नीला स्तुतींनी वृद्धिंगत करतात; तेव्हां तो अग्निही आपल्या ज्वालारूप दंतपंक्तीनें देदीप्यमान दिसतो. ३


अ॒र्यो वि॒शां गा॒तुरे॑ति॒ प्र यदान॑ड् दि॒वो अन्ता॑न् ।
क॒विर॒भ्रं दीद्या॑नः ॥ ४ ॥

अर्यः विशां गातुः एति प्र यत् आनट् दिवः अन्तान्
कविः अभ्रं दीद्यानः ॥ ४ ॥

मानवांचा प्रभु अग्नि जेव्हां मार्गक्रमण करतो, तेव्हां काव्यस्फूर्ति देणारा आणि आकाशप्रकाशक अग्नि द्युलोकाच्या सीमेला देखील जाऊन भिडतो. ४


जु॒षद्ध॒व्या मानु॑षस्यो॒र्ध्वस्त॑स्था॒व् ऋभ्वा॑ य॒ज्ञे ।
मि॒न्वन् सद्म॑ पु॒र ए॑ति ॥ ५ ॥

जुषत् हव्या मानुषस्य ऊर्ध्वः तस्थौ ऋभ्वा यजे
मिन्वन् सद्म पुरः एति ॥ ५ ॥

मानवी भक्तांच्या आहुतीचा स्वीकार करून धीरोद्धत अग्नि यज्ञांमध्ये भक्तकार्याकरितां अगदी सज्ज होऊन उभा राहिला, आणि आपलें स्थान निश्चित करून पुढें सरला. ५


स हि क्षेमो॑ ह॒विर्य॒ज्ञः श्रु॒ष्टीद॑स्य गा॒तुरे॑ति ।
अ॒ग्निं दे॒वा वाशी॑मन्तम् ॥ ६ ॥

सः हि क्षेमः हविः यजः श्रुष्टी इत् अस्य गातुः एति
अग्निं देवाः वाशी-मन्तम् ॥ ६ ॥

तोच भक्ताचें कल्याण होय, तोच भक्ताची आहुति, आणि तोच यज्ञ होय. सर्व गोष्टी या अग्नीच्या मार्गामध्ये बोलता बोलता प्राप्त होतात. म्हणून अशा या ज्वालमाली अग्नीकडे दिव्यविबुध देखील प्राप्त होतात. ६


य॒ज्ञा॒साहं॒ दुव॑ इषेऽ॒ग्निं पूर्व॑स्य॒ शेव॑स्य ।
अद्रेः॑ सू॒नुं आ॒युं आ॑हुः ॥ ७ ॥

यज-सहं दुवः इषे अग्निं पूर्वस्य शेवस्य
अद्रेः सूनुं आयुं आहुः ॥ ७ ॥

यज्ञाचा नियंता जो अग्नि, त्याच्या सेवेची इच्छा निःश्रेयसाच्या प्राप्तीसाठी मी धरिली आहे. पाषाणांतून आविर्भूत होणार्या या अग्नीला प्रत्यक्ष आयुष्यच असें म्हणतात. ७


नरो॒ ये के चा॒स्मदा विश्वेत् ते वा॒म आ स्युः॑ ।
अ॒ग्निं ह॒विषा॒ वर्ध॑न्तः ॥ ८ ॥

नरः ये के च अस्मत् आ विश्वा इत् ते वामे आ स्युरितिस्युः
अग्निं हविषा वर्धन्तः ॥ ८ ॥

अग्नीला आहुतींनी वृद्धिंगत करणारे असे जे कोणी आमच्यासारखे भक्त आहेत, ते सर्व प्रकारच्या अभिलषणीय सुखामध्यें राहोत. ८


कृ॒ष्णः श्वे॒तोऽरु॒षो यामो॑ अस्य ब्र॒ध्न ऋ॒ज्र उ॒त शोणो॒ यश॑स्वान् ।
हिर॑ण्यरूपं॒ जनि॑ता जजान ॥ ९ ॥

कृष्णः श्वेतः अरुषः यामः अस्य ब्रध्नः ऋज्रः उत शोणः यशस्वान्
हिरण्य-रूपं जनिता जजान ॥ ९ ॥

या अग्नीचा मार्ग पाहिला तर तो कधी काळा, कधी पांढरा, कधी गुलाबी, पिंगट सरल-रेखांकित किंवा लाल परंतु यशोदायक असतो. कारण ईश्वराने त्याला सुवर्णाप्रमाणे अविनाशी तेजोयुक्त असा निर्माण केला आहे. ९


ए॒वा ते॑ अग्ने विम॒दो म॑नी॒षां ऊर्जो॑ नपाद॒मृते॑भिः स॒जोषाः॑ ।
गिर॒ आ व॑क्षत् सुम॒तीरि॑या॒न इषं॒ ऊर्जं॑ सुक्षि॒तिं विश्वं॒ आभाः॑ ॥ १० ॥

एव ते अग्ने वि-मदः मनीषां ऊर्जः नपात् अमृतेभिः स-जोषाः
गिरः आ वक्षत् सु-मतीः इयानः इषं ऊर्जं सु-क्षितिं विश्वं आ अभार् इति अभाः ॥ १० ॥

याप्रमाणे हे अग्नि, हे ऊर्जस्वितेच्या प्रभवा, अमर विभूतीच्या ठिकाणी आदर ठेवून विमदाने आपली ध्यानप्रवृत्ति आणि आपलीं स्तवनें तुजला अर्पण केली आहेत. तुझ्या अनुग्रहाचीच तो इच्छा धरून आहे. तर उत्साह ऊर्जस्विता, उत्तम प्रकारचा आसरा इत्यादि सर्व कांही त्याच्यासाठीं घेऊन ये. १०


ॐ तत् सत्


GO TOP