PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ११ ते २०

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ११ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - तिष्टुप्


भ॒द्रं ते॑ अग्ने सहसि॒न्ननी॑कमुपा॒क आ रो॑चते॒ सूर्य॑स्य ।
रुश॑द्दृ॒शे द॑दृशे नक्त॒या चि॒दरू॑क्षितं दृ॒श आ रू॒पे अन्न॑म् ॥ १ ॥

भद्रं ते अग्ने सहसिन् अनीकं उपाक आ रोचते सूर्यस्य ।
रुशत् दृशे ददृशे नक्तऽया चित् अरूक्षितं दृश आ रूपे अन्नं ॥ १ ॥

विजयशाली अग्निदेवा, सूर्याच्या सन्निध, तुझेंही मंगलकारक तेजःपुंज स्वरूप अत्यंत शोभायमान दिसतें. आणि रात्रींच्या वेळीं तर त्याची आरक्त कांति नेत्रांना विशेषच मनोहर वाटते इतकेंच नव्हे तर तुला अर्पण केलेला हविर्भागसुद्धां तुझ्या प्रकाशांत डोळ्यांना फारच मोहक दिसतो. ॥ १ ॥


वि षा॑ह्यग्ने गृण॒ते म॑नी॒षां खं वेप॑सा तुविजात॒ स्तवा॑नः ।
विश्वे॑भि॒र्यद्वा॒वनः॑ शुक्र दे॒वैस्तन्नो॑ रास्व सुमहो॒ भूरि॒ मन्म॑ ॥ २ ॥

वि साहि अग्ने गृणते मनीषां खं वेपसा तुविऽजात स्तवानः ।
विश्वेभिः यत् ववनः शुक्र देवैः तत् नः रास्व सुऽमहः भूरि मन्म ॥ २ ॥

हे स्वतः-सिद्ध बलशाली अग्नि, मोठ्या उत्कट भावनेने तुझें मी स्तवन केलें आहे, तर तूं आतां ह्या तुझ्या स्तोत्यापुढें आपलें अंतःकरण खुलें कर, आणि आनंदाचें धाम उघडून दे. शुभ्रतेजस्क देवा, सर्व विबुधगणांसह तुझें ज्या मननीय स्तोत्रांवर प्रेम जडलें आहे, त्याचेच प्रतिभा, हे तेजोमूर्ते, आमच्यामध्यें अलोट उत्पन्न कर. ॥ २ ॥


त्वद॑ग्ने॒ काव्या॒ त्वन्म॑नी॒षास्त्वदु॒क्था जा॑यन्ते॒ राध्या॑नि ।
त्वदे॑ति॒ द्रवि॑णं वी॒रपे॑शा इ॒त्थाधि॑ये दा॒शुषे॒ मर्त्या॑य ॥ ३ ॥

त्वत् अग्ने काव्या त्वत् मनीषाः त्वत् उक्था जायंते राध्यानि ।
त्वत् एति द्रविणं वीरऽपेशा इत्थाऽधिये दाशुषे मर्त्याय ॥ ३ ॥

अग्निदेवा, काव्यशक्ति तुझ्या कृपेमुळे प्राप्त होते, विचारशक्ति तुझ्यापासून आणि श्रुतिमनोहर अशी सामगायनेंही तुझ्या प्रसादानें प्राप्त होतात व त्याचप्रमाणें वीर पुरुषांच्या रूपानें दृग्गोचर होणारी सामर्थ्यसंपत्ति ही सुद्धां सत्यनिष्ठ दानशूर भक्ताला तुझ्यामुळें लाभते. ॥ ३ ॥


त्वद्वा॒जी वा॑जम्भ॒रो विहा॑या अभिष्टि॒कृज्जा॑यते स॒त्यशु॑ष्मः ।
त्वद्र॒॑यिर्दे॒वजू॑तो मयो॒भुस्त्वदा॒शुर्जू॑जु॒वाँ अ॑ग्ने॒ अर्वा॑ ॥ ४ ॥

त्वत् वाजी वाजंऽभरः विऽहाया अभिष्टिऽकृज् जायते सत्यऽशुष्मः ।
त्वत् रयिः देवऽजूतः मयःऽभुः त्वत् आशुः जूजुऽवान् अग्ने अर्वा ॥ ४ ॥

सत्वाढ्य, मनोहर आणि सहायार्थ चांवणारा असा शूर योद्धा तुझ्या कृपेनेंच जन्मास येतो. सत्य हेंच त्याचें ब्रीद असतें, आणि देवाकडून प्राप्त होणारें कल्याणप्रद ऐश्वर्य, व वेगवान आणि चलाख अश्वारूढ वीर ह्याही गोष्टी, हे अग्नि, तुझ्यापासूनच मिळतात. ॥ ४ ॥


त्वाम॑ग्ने प्रथ॒मं दे॑व॒यन्तो॑ दे॒वं मर्ता॑ अमृत म॒न्द्रजि॑ह्वम् ।
द्वे॒षो॒युत॒मा वि॑वासन्ति धी॒भिर्दमू॑नसं गृ॒हप॑ति॒ममू॑रम् ॥ ५ ॥

त्वां अग्ने प्रथमं देवऽयंतः देवं मर्ताः अमृत मंद्रऽजिह्वं ।
द्वेषःऽयुतं आ विवासंति धीभिः दमूनसं गृहऽपतिं अमूरं ॥ ५ ॥

हे अजरामर अग्नि, तूं सर्वांत प्रमुख, मधुरभाषी, द्वेषबुद्धिनाशक आणि आत्मवश आहेस, तर अशा तुज ज्ञानघन देवाची उपासना भगवद्‍भक्त ध्यानयोगानेंच करीत असतात. ॥ ५ ॥


आ॒रे अ॒स्मदम॑तिमा॒रे अंह॑ आ॒रे विश्वां॑ दुर्म॒तिं यन्नि॒पासि॑ ।
दो॒षा शि॒वः स॑हसः सूनो अग्ने॒ यं दे॒व आ चि॒त्सच॑से स्व॒स्ति ॥ ६ ॥

आरे अस्मत् अमतिं आरे अंह आरे विश्वां दुःऽमतिं यन् निऽपासि ।
दोषा शिवः सहसः सूनो इति अग्ने यं देवः आ चित् सचसे स्वस्ति ॥ ६ ॥

आमच्यापासून सर्व अविचार, यच्चावत् पातकें, एकंदर कुविचार दूर कर. सर्वतोपरी आमचें संरक्षण तूंच करतोस, आणि हे सामर्थ्यप्रभवा, अग्नि, तूं मंगलरूप देव आमच्या कल्याणार्थ रात्रं-दिवस आमच्या अगदी सन्निध रहात असतोस. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १२ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


यस्त्वाम॑ग्न इ॒नध॑ते य॒तस्रु॒क्त्रिस्ते॒ अन्नं॑ कृ॒णव॒त्सस्मि॒न्नह॑न् ।
स सु द्यु॒म्नैर॒भ्यस्तु प्र॒सक्ष॒त्तव॒ क्रत्वा॑ जातवेदश्चिकि॒त्वान् ॥ १ ॥

यः त्वां अग्न इनधते यतऽस्रुक् त्रिः ते अन्नं कृणवत् सस्मिन् अहन् ।
सः सु द्युम्नैः अभि अस्तु प्रऽसक्षत् तव क्रत्वा जातऽवेदः चिकित्वान् ॥ १ ॥

अग्निदेवा, जो भक्त स्रुचा वर उचलून (आहुति देऊन) तुला प्रज्वलित करतो, आणि प्रतिदिवशी त्रिकाळ हविर्भाग अर्पण करतो, तो भक्त हे सर्वज्ञा जातवेदा, तुझ्या अगाध कर्तृत्वाच्या बळाने, तुझ्या ओजस्वितेने, सूक्ष्मदृष्टी होऊन मोठ्या निकराने हल्ला करून शत्रूंचा पार धुव्वा उडवून देवो. ॥ १ ॥


इ॒ध्मं यस्ते॑ ज॒भर॑च्छश्रमा॒णो म॒हो अ॑ग्ने॒ अनी॑क॒मा स॑प॒र्यन् ।
स इ॑धा॒नः प्रति॑ दो॒षामु॒षासं॒ पुष्य॑न्र॒यिं स॑चते॒ घ्नन्न॒मित्रा॑न् ॥ २ ॥

इध्मं यः ते जभरत् शश्रमाणः महः अग्ने अनीकं आ सपर्यन् ।
स इधानः प्रति दोषां उषसं पुष्यन् रयिं सचते घ्नन् अमित्रान् ॥ २ ॥

त्याचप्रमाणे, हे अग्नि, तुझ्या तेजोमय स्वरूपाचे अर्चन करण्याच्या उद्देशाने मोठ्या श्रमानें जो समिधा गोळा करून आणतो, आणि सायंकाळी व प्रातःकाळी तुला प्रज्वलित करून उपासना करतो, तो शत्रूंचा नाश करून उत्कर्ष पावतो आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतो. ॥ २ ॥


अ॒ग्निरी॑शे बृह॒तः क्ष॒त्रिय॑स्या॒ग्निर्वाज॑स्य पर॒मस्य॑ रा॒यः ।
दधा॑ति॒ रत्नं॑व विध॒ते यवि॑ष्ठो॒ व्यानु॒षङ् मर्त्या॑य स्व॒धावा॑न् ॥ ३ ॥

अग्निः ईशे बृहतः क्षत्रियस्य अग्निः वाजस्य परमस्य रायः ।
दधाति रत्नंव विधते यविष्ठः वि आनुषक् मर्त्याय स्वधाऽवान् ॥ ३ ॥

सार्वभौम राजसत्तेचा प्रभु अग्नि हा होय. उत्तमोत्तम अशा सत्वबलाचा आणि दिव्य ऐश्वर्याचा स्वामीही तोच आहे. आणि तोच यौननाढ्य आणि स्वतंत्र भगवान, दीन भक्ताला रत्‍नसंपत्तीचें पारितोषिक देतो. ॥ ३ ॥


यच्चि॒द्धि ते॑ पुरुष॒त्रा य॑वि॒ष्ठाचि॑त्तिभिश्चकृ॒मा कच्चि॒दागः॑ ।
कृ॒धी ष्व१स्माँ अदि॑ते॒रना॑गा॒न्व्येनां॑सि शिश्रथो॒ विष्व॑गग्ने ॥ ४ ॥

यत्च् चित् हि ते पुरुषऽरा यविष्ठ अचित्तिऽभिः चकृम कत् चित् आगः ।
कृधि सु अस्मान् अदितेः अनागान् वि एनांसि शिश्रथः विष्वक् अग्ने ॥ ४ ॥

तारुण्यमूर्ते देवा, आम्ही मानवच पडलो, तेव्हां अविचारामुळे जो कांही तुझा अपराध आम्ही केला असेल त्याची क्षमा करून त्या अनाद्यनंता पुढे आम्हांस दोष मुक्त कर. ॥ ४ ॥


म॒हश्चि॑दग्न॒ एन॑सो अ॒भीक॑ ऊ॒र्वाद्दे॒वाना॑मु॒त मर्त्या॑नाम् ।
मा ते॒ सखा॑यः॒ सद॒मिद्रि॑षाम॒ यच्छा॑ तो॒काय॒ तन॑याय॒ शं योः ॥ ५ ॥

महः चित् अग्ने एनसः अभीके ऊर्वात् देवानां उत मर्त्यानां ।
मा ते सखायः सदं इत् रिषाम यच्छ तोकाय तनयाय शं योः ॥ ५ ॥

हे अग्नि, देवांसंबंधाने किंवा मनुष्यसंबंधानें आम्ही केलेलें पातक किती जरी जबर असले तरी त्या पापरूप कारागृहांत आम्ही तुझ्या प्रिय सेवकांनी निरंतर खितपत पडून क्लेश भोगावें असें होऊं देऊं नको. ह्या तुझ्या अज्ञान बालकाला सुखशांतीचा लाभ दे. ॥ ५ ॥


यथा॑ ह॒ त्यद्व॑सवो गौ॒र्यं चित्प॒दि षि॒ताममु॑~न्चता यजत्राः ।
ए॒वो ष्व१स्मन्मु॑~न्चता॒ व्यंहः॒ प्र ता॑र्यग्ने प्रत॒रं न॒ आयुः॑ ॥ ६ ॥

यथा ह त्यत् वसवः गौर्यं चित् पदि सितां अमुंचत यजत्राः ।
एवो इति सु अस्मत् मुंचत वि अंहः प्र तारि अग्ने प्रऽतरं न आयुः ॥ ६ ॥

परमपूज्य निधींनो, गाईचे पाय बांधून टाकले असतांना तुम्ही तिला जशी मुक्त केलीत त्याप्रमाणे आमचें पातक आम्हापासून निखालस काढून टाका. हे अग्निदेवा, आमचें आयुष्य दीर्घकालपर्यंत वाढव. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १३ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


प्रत्य॒ग्निरु॒षसा॒मग्र॑मख्यद्विभाती॒नां सु॒मना॑ रत्न॒ धेय॑म् ।
या॒तम॑श्विना सु॒कृतो॑ दुरो॒णमुत्सूर्यो॒ ज्योति॑षा दे॒व ए॑ति ॥ १ ॥

प्रति अग्निः उषसां अग्रं अख्यत् विऽभातीनां सुऽमना रत्न्ऽधेयं ।
यातं अश्विना सुऽकृतः दुरोणं उत् सूर्यः ज्योतिषा देवः एति ॥ १ ॥

उज्जवल कांतीने अलंकृत अशा उषादेवीच्या रत्‍नप्रद प्रकाशाचा आरंभ अग्नीने मोठ्या सौजन्यानें अवलोकन केला आहे अशा वेळीं, हे अश्विदेवांनो, तुम्ही आमच्या पुण्यशील यजमानाच्या घरी या. हा पह भगवान आपल्या रश्मिसमूहानिशी उदय पावत आहे. ॥ १ ॥


ऊ॒र्ध्वं भा॒नुं स॑वि॒ता दे॒वो अ॑श्रेद्द्र॒प्सं दवि॑ध्वद्गवि॒षो न सत्वा॑ ।
अनु॑ व्र॒तं वरु॑णो यन्ति मि॒त्रो यत्सूर्यं॑ दि॒व्यारो॒हय॑न्ति ॥ २ ॥

ऊर्ध्वं भानुं सविता देवः अश्रेत् द्रप्सं दविध्वत् गोऽइषः न सत्वा ।
अनु व्रतं वरुणः यंति मित्रः यत् सूर्यं दिवि आऽरोहयंति ॥ २ ॥

एखाद्या विजयकांक्षी विराप्रमाणे जगत्प्रेरक सविता देवानें आपला ध्वज आकाशांत फडकावून, आपले किरण दूरवर पसरून दिले आहेत. जगन्मित्र भगवान वरुण आणि इतर दिव्य विभूति असे मिळून सूर्याची स्थापना आकाशांत करतात, त्या अर्थी ते सुद्धां आपल्या नियमानुसारच वर्तन करीत असतात असे म्हटले पाहिजे. ॥ २ ॥


यं सी॒मकृ॑ण्व॒न्तम॑से वि॒पृचे॑ ध्रु॒वक्षे॑मा॒ अन॑वस्यन्तो॒ अर्थ॑म् ।
तं सूर्यं॑ ह॒रितः॑ स॒प्त य॒ह्वी स्पशं॒ विश्व॑स्य॒ जग॑तो वहन्ति ॥ ३ ॥

यं सीं अकृण्वन् तमसे विऽपृचे ध्रुवऽक्षेमाः अनवऽस्यंतः अर्थं ।
तं सूर्यं हरितः सप्त यह्वीः स्पशं विश्वस्य जगतः वहंति ॥ ३ ॥

ज्याचें निवासस्थान अक्षय व अढळ आणि जे आपल्या उद्देशाला यत्किंचितसुद्धां कधीं विसंबत नाही अशा देवांनीच ज्या ह्या सूर्याची अंधकाराला छानून टाकून, सर्व जगताकडे न्याहाळून पाहण्याकरितां योजना केली, त्या सूर्याला सात जोरदार घोड्या घेऊन येत असतात. ॥ ३ ॥


वहि॑ष्ठेभिर्वि॒हर॑न्यासि॒ तन्तु॑मव॒व्यय॒न्नसि॑तं देव॒ वस्म॑ ।
दवि॑ध्वतो र॒श्मयः॒ सूर्य॑स्य॒ चर्मे॒वावा॑धु॒स्तमो॑ अ॒प्स्व१न्तः ॥ ४ ॥

वहिष्ठेभिः विहरन् यासि तंतुं अवऽव्ययन् असितं देव वस्म ।
दविध्वतः रश्मयः सूर्यस्य चर्मऽइव अव अधुः तमः अप्ऽसु अंतरिति ॥ ४ ॥

हे भगवंता, आपल्या मजबूत घोड्यांवर बसून जातांना, विश्वावरील काळें आवरण दूर करून त्याला प्रकाशरूप वस्त्र नेसवीत तूं आकाशांत संचार करीत जातोस. पहा ह्या सूर्याच्या झळाळणार्‍या किरणांनी अंधकाराला दूर फेंकून देऊन एखाद्या फाटक्या चामड्याप्रमाणे उदकांत पार बुडवून टाकले आहे. ॥ ४ ॥


अना॑यतो॒ अनि॑बद्धः क॒थायं न्यङ्ङ्उधत्ता॒नोऽ॑व पद्यते॒ न ।
कया॑ याति स्व॒धया॒ को द॑दर्श दि॒व स्क॒म्भः समृ॑तः पाति॒ नाक॑म् ॥ ५ ॥

अनायतः अनिऽबद्धः कथा अयं न्यङ् उत्तानः अव पद्यते न ।
कया याति स्वधया कः ददर्श दिवः स्कंभः संऽऋतः पाति नाकं ॥ ५ ॥

ना त्याला आधार, ना कांही बंधन, असें असूनही हा सूर्य क्षितिजाकडे उतरतांना किंवा वर चढतांना खालीं कसा पडत नाही ? तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का ? आकाशाचा एक धिराच बनून व त्याला रेटून धरून त्या घुमटाला त्यानेंच सावरून धरलेलें आहे. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १४ ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


प्रत्य॒ग्निरु॒षसो॑ जा॒तवे॑दा॒ अख्य॑द्दे॒वो रोच॑माना॒ महो॑भिः ।
आ ना॑सत्योरुगा॒या रथे॑ने॒मं य॒ज्ञमुप॑ नो यात॒मच्छ॑ ॥ १ ॥

प्रति अग्निः उषसः जातऽवेदा अख्यत् देवः रोचमानाः महःऽभिः ।
आ नासत्या उरुऽगाया रथेन इमं यज्ञं उप नः यातं अच्छ ॥ १ ॥

आपल्या कांतिच्या भरांत प्रकाशणार्‍या उषादेवीकडे सर्वज्ञ अग्नीने अवलोकन केलें आहे. हे सत्यस्वरूप अश्विदेवहो, तुम्ही सर्व जगाचें आक्रमण करतां तर ह्या वेळी तुम्ही आपल्या रथांत बसून आमच्याकडे या. ॥ १ ॥


ऊ॒र्ध्वं के॒तुं स॑वि॒ता दे॒वो अ॑श्रे॒ज्ज्योति॒र्विश्व॑स्मै॒ भुव॑नाय कृ॒ण्वन् ।
आप्रा॒ द्यावा॑पृथि॒वी अ॒न्तरि॑क्षं॒ वि सूर्यो॑ र॒श्मिभि॒श्चेकि॑तानः ॥ २ ॥

ऊर्ध्वं केतुं सविता देवः अश्रेत् ज्योतिः विश्वस्मै भुवनाय कृण्वन् ।
आ अप्रा द्यावापृथिवी इति अंतरिक्षं वि सूर्यः रश्मिऽभिः चेकितानः ॥ २ ॥

अखिल भुवनाच्या उपयोगाकरितां आपला प्रकाश प्रकट करून जगत्प्रेरक सविता देवानें पहा आपला तेजोमय ध्वज उंच उभारून दिला आहे. विश्वाला निरखून पाहणार्‍या ह्या सूर्यानें आकाश, पृथिवी आणि अंतिरिक्ष ह्यांना पहा कसें अगदी व्यापून टाकले आहे. ॥ २ ॥


आ॒वह॑न्त्यरु॒णीर्ज्योति॒षागा॑न्म॒ही चि॒त्रा र॒श्मिभि॒श्चेकि॑ताना ।
प्र॒बो॒धय॑न्ती सुवि॒ताय॑ दे॒व्यु१षा ई॑यते सु॒युजा॒ रथे॑न ॥ ३ ॥

आऽवहंति अरुणीः ज्योतिषा आ अगात् मही चित्रा रश्मिऽभिः चेकिताना ।
प्रऽबोधयंती सुविताय देवी उषाः ईयते सुऽयुजा रथेन ॥ ३ ॥

आपल्या तेजानें आल्हाद उत्पन्न करणारी ही आरक्तवर्ण उषा पहा उदय पावली आहे. सर्व वस्तूंचे यथार्थ ज्ञान जिला आहे अशी ती उषादेवी आपल्या कांतीनें फारच अद्‍भुत दिसते. जगाला सुखप्राप्ति व्हावी म्हणून त्याला जागृत करून ही उषा उत्तम अश्व जोडलेल्या आपल्या रथांत बसून इकडेच येत आहे. ॥ ३ ॥


आ वां॒ वहि॑ष्ठा इ॒ह ते व॑हन्तु॒ रथा॒ अश्वा॑स उ॒षसो॒ व्युष्टौ ।
इ॒मे हि वां॑ मधु॒पेया॑य॒ सोमा॑ अ॒स्मिन्य॒ज्ञे वृ॑षणा मादयेथाम् ॥ ४ ॥

आ वां वहिष्ठाः इह ते वहंतु रथाः अश्वासः उषसः विऽउष्टौ ।
इमे हि वां मधुऽपेयाय सोमाः अस्मिन् यज्ञे वृषणा मादयेथां ॥ ४ ॥

अश्विदेवांनो, रथास जोडलेले तुमचे मजबूत घोडे ह्या उषःकाली तुम्हांस इकडे घेऊन येवोत. तुम्हाला कांहीतरी मधुर खावयास हवे म्हणून हे सोमरस तुमच्यापुढे ठेवलें आहेत, तर ह्या आमच्या यज्ञांत हविरन्नानें तुम्ही हर्षनिर्भर व्हा. ॥ ४ ॥


अना॑यतो॒ अनि॑बद्धः क॒थायं न्यङ्ङ्उ त्ता॒नोऽ॑व पद्यते॒ न ।
कया॑ याति स्व॒धया॒ को द॑दर्श दि॒व स्क॒म्भः समृ॑तः पाति॒ नाक॑म् ॥ ५ ॥

अनायतः अनिऽबद्धः कथा अयं न्यङ् उत्तानः अव पद्यते न ।
कया याति स्वधसा कः ददर्श दिवः स्कंभः संऽऋतः पाति नाकं ॥ ५ ॥

ना त्याला आधार, ना कांही बंधन, असें असूनही हा सूर्य क्षितिजाकडे उतरतांना किंवा वर चढतांना खालीं कसा पडत नाही ? तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का ? आकाशाचा एक घिराच बनून व त्याला रेटून धरून त्या घुमटाला त्यानेंच सावरून धरलेलें आहे. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १५ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अश्विनीकुमार : छंद - गायत्री


अ॒ग्निर्होता॑ नो अध्व॒रे वा॒जी सन्परि॑ णीयते । दे॒वो दे॒वेषु॑ य॒ज्ञियः॑ ॥ १ ॥

अग्निः होता नः अध्वरे वाजी सन् परि नीयते । देवः देवेषु यज्ञियः ॥ १ ॥

अग्नि हा आमच्या यागांतील होता होय. तो महावीर आहे म्हणून त्याला यज्ञशालेत सभोंवती फिरवितात. तोच देव, दिव्य विभूतींमध्ये पूज्य होय. ॥ १ ॥


परि॑ त्रिवि॒ष्ट्यध्व॒रं यात्य॒ग्नी र॒थीर् इ॑व । आ दे॒वेषु॒ प्रयो॒ दध॑त् ॥ २ ॥

परि त्रिऽविष्टि अध्वरं याति अग्निः रथीःऽइव । आ देवेषु प्रयः दधत् ॥ २ ॥

एखाद्या महारथी वीराप्रमाणे, विबुधगणांकरितां सुखमय हविर्भाग धारण करून आमच्या स्थंडिलाच्या भोंवती तो परिभ्रमण करतो. ॥ २ ॥


परि॒ वाज॑पतिः क॒विर॒ग्निर्ह॒व्यान्य॑क्रमीत् । दध॒द्रवत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ ३ ॥

परि वाजऽपतिः कविः अग्निः हव्यानि अक्रमीत् । दधत् रत्नाुनि दाशुषे ॥ ३ ॥

आणि यजमानास देण्याकरितां रत्‍नसंपत्ति हातीं घेऊन तो सत्त्वसामर्त्य प्रभु प्रतिभावान अग्नि हविरन्नाच्या सभोंवती तीन फेरे करतो. ॥ ३ ॥


अ॒यं यः सृञ्ज॑ये पु॒रो दै॑ववा॒ते स॑मि॒ध्यते॑ । द्यु॒माँ अ॑मित्र॒दम्भ॑नः ॥ ४ ॥

अयं यः सृंजये पुरः दैवऽवाते संऽइध्यते । द्युमान् अमित्रऽदम्भनः ॥ ४ ॥

देववाताचा पुत्र सृंजय ह्याच्या घरी उत्तरवेदीवर पूर्वेकडे ज्याला प्रज्वलित करतात तोच हा देदीप्यमान व शत्रुविध्वंसक अग्नि होय. ॥ ४ ॥


अस्य॑ घा वी॒र ईव॑तोऽग्नेरी॑शीत॒ मर्त्यः॑ । ति॒ग्मज॑म्भस्य मी॒ळ्हुषः॑ ॥ ५ ॥

अस्य घ वीरः ईवतः अग्नेः ईशीत मर्त्यः । तिग्मऽजंभस्य मीळ्हुषः ॥ ५ ॥

ह्याच्या दाढा अतिशय तीव्र आहेत. सकल कामवर्षक आणि भक्तांच्या हृदय-मंदिरांत वेगाने प्रवेश करणारा अशा प्रकारचा वीर हा अग्नि असूनही त्याच्यावर भक्तजन केवळ निष्ठेमुळेंच सत्ता चालवूं शकेल. ॥ ५ ॥


तमर्व॑न्तं॒ न सा॑न॒सिम॑रु॒षं न दि॒वः शिशु॑म् । म॒र्मृ॒ज्यन्ते॑ दि॒वेदि॑वे ॥ ६ ॥

तं अर्वंतं न सानसिं अरुषं न दिवः शिशुं । मर्मृज्यंते दिवेऽदिवे ॥ ६ ॥

एखाद्या विजयशाली अश्वारूढ वीराची बरदास्त ठेवावी, किंवा आकाशाच्या बालकाचे लालन करावें त्याप्रमाणे भक्तगण ह्या आरक्तवर्ण ईश्वरस्वरूपाची सेवा करीत अस्तात. ॥ ६ ॥


बोध॒द्यन् मा॒ हरि॑भ्यां कुमा॒रः सा॑हदे॒व्यः । अच्छा॒ न हू॒त उद॑रम् ॥ ७ ॥

बोधत् यन् मा हरिऽभ्यां कुमारः साहऽदेव्यः । अच्छ न हूतः उत् अरं ॥ ७ ॥

जेव्हां सहदेव राजाच्या कुमारानें दोन हरिद्‍वर्ण अश्वांसंबंधानें मला निरोप पाठविला, त्याबरोबर निमंत्रणाप्रमाणें मी त्याच्याकडे निघालोंच. ॥ ७ ॥


उ॒त त्या य॑ज॒ता हरी॑ कुमा॒रात्सा॑हदे॒व्यात् । प्रय॑ता स॒द्य आ द॑दे ॥ ८ ॥

उत त्या यजता हरी इति कुमारात् साहऽदेव्यात् । प्रऽयता सद्यः आ ददे ॥ ८ ॥

आणि त्या सहदेवराजाच्या कुमारापासून मी त्याने दिलेल्या त्या उत्कृष्ट घोड्याच्या जोडीचा तात्काळ स्वीकार केला. ॥ ८ ॥


ए॒ष वां॑ देवावश्विना कुमा॒रः सा॑हदे॒व्यः । दी॒र्घायु॑रस्तु॒ सोम॑कः ॥ ९ ॥

एषः वां देवौ अश्विना कुमारः साहऽदेव्यः । दीर्घऽआयुः अस्तु सोमकः ॥ ९ ॥

हे अश्विदेवांनो, हा सहदेवराजाचा कुमार सोमक दीर्घायु होवो. ॥ ९ ॥


तं यु॒वं दे॑वावश्विना कुमा॒रं सा॑हदे॒व्यम् । दी॒र्घायु॑षं कृणोतन ॥ १० ॥

तं युवं देवौ अश्विना कुमारं साहऽदेव्यं । दीर्घऽआयुषं कृणोतन ॥ १० ॥

हे तेजस्वी अश्विदेवहो, ह्या सहदेवराजाच्या कुमाराला दीर्घायुषी कराच. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १६ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


आ स॒त्यो या॑तु म॒घवाँ॑ ऋजी॒षी द्रव॑न्त्वस्य॒ हर॑य॒ उप॑ नः ।
तस्मा॒ इदन्धः॑ सुषुमा सु॒दक्ष॑मि॒हाभि॑पि॒त्वं क॑रते गृणा॒नः ॥ १ ॥

आ सत्यः यातु मघऽवान् ऋजीषी द्रवंतु अस्य हरयः उप नः ।
तस्मै इत् अंधः सुसुम सुऽदक्षं इह अभिऽपित्वं करते गृणानः ॥ १ ॥

सत्यस्वरूप, षडैश्वरसंपन्न, प्रचंडवेग असा इंद्र इकडे येवो; त्याचे हरिद्‌वर्ण अश्वसुद्धां आमच्याकडे येण्याकरितां दौडत निघोत. त्याच्याचकरितां हा कार्यक्षम सोमरस आम्ही पिळून सिद्ध केलेला आहे, तर त्याची कीर्ति सर्वत्र गातात असा तो भगवान आमच्याकडे आगमन करो. ॥ १ ॥


अव॑ स्य शू॒राध्व॑नो॒ नान्ते॑ऽ॒स्मिन्नो॑ अ॒द्य सव॑ने म॒न्दध्यै॑ ।
शंसा॑त्यु॒क्थमु॒शने॑व वे॒धाश्चि॑कि॒तुषे॑ असु॒र्याय॒ मन्म॑ ॥ २ ॥

अव स्य शूर अध्वनः न अंते अस्मिन् नः अद्य सवने मंदध्यै ।
शंसाति उक्थं उशनाऽइव वेधाः चिकितुषे असुर्याय मन्म ॥ २ ॥

हे जगद्‍वीरा, मजल गांठली असतां शेवटी मुक्कामावर घोडे सोडतात त्याप्रमाणे आज आमच्या सोमसवनप्रसंगी उल्लसित होण्याकरितां तूं आपले अश्व मोकळे सोड. उशना कवीप्रमाणेंच हा आमचा प्रतिभाशाली उद्‌गाता, तूं जो महाप्रज्ञ आणि परमसमर्थ भगवान त्या तुझ्या प्रित्यर्थ सामगायन करील आणि मननीय असें स्तोत्रही म्हणेल. ॥ २ ॥


क॒विर्न नि॒ण्यं वि॒दथा॑नि॒ साध॒न् वृषा॒ यत्सेकं॑ विपिपा॒नो अर्चा॑त् ।
दि॒व इ॒त्था जी॑जनत्स॒प्त का॒रूनह्ना॑ चिच्चक्रुर्व॒युना॑ गृ॒णन्तः॑ ॥ ३ ॥

कविः न निण्यं विदथानि साधन् वृषा यत् सेकं विऽपिपानः अर्चात् ।
दिवः इत्था जीजनत् सप्त कारून् अह्ना चिच् चक्रुः वयुना गृणंतः ॥ ३ ॥

वीरश्रेष्ठ इंद्राने तृप्ति होईपर्यंत सोमरस प्राशन करून आणि आमचे यज्ञसमारंभ सिद्धीस नेऊन आमच्या यज्ञाची मोठ्याने प्रशंसा केली. त्या वेळेस, एखादा कवि गूढ भाव प्रचुर कवनें रचतो त्याप्रमाणें त्या भगवंताने खरोखरच आकाशांतून सप्तकवि अंगिरस निर्माणे केले. तेव्हां त्यांनी त्याची स्तुति करून त्याच दिवशी धर्माचरणाचे मार्ग प्रसिद्ध केले. ॥ ३ ॥


स्व१र्यद्वेदि॑ सु॒दृशी॑कम॒र्कैर्महि॒ ज्योती॑ रुरुचु॒र्यद्ध॒ वस्तोः॑ ।
अ॒न्धा तमां॑सि॒ दुधि॑ता वि॒चक्षे॒ नृभ्य॑श्चकार॒ नृत॑मो अ॒भिष्टौ॑ ॥ ४ ॥

स्वः यत् वेदि सुऽदृशीकं अर्कैः महि ज्योतिः रुरुचुः यत् ह वस्तोः ।
अंधा तमांसि दुधिता विचक्षे नृभ्यः चकार नृऽतमः अभिष्टौ ॥ ४ ॥

अर्क स्तोत्रांच्या योगानें स्वर्गलोकांतील नयनाल्हादक तेज त्यांना उपलब्ध होऊन ज्यावेळेस त्यांनी प्रातःकाळीं ते महातेज सर्वत्र सुप्रकाशित होईल असे केलें त्या वेळेस, परमशूर इंद्रानें आपले भक्त अभीष्टप्राप्तीच्या प्रयत्‍नांत असतां, त्या वीर्यशाली भक्तांना स्वच्छ दिसावें ह्याकरितां जगाला आंधळे करणार्‍या अंधकाराची दुर्दशा करून टाकली. ॥ ४ ॥


व॒व॒क्ष इन्द्रो॒ अमि॑तमृजी॒ष्यु१भे आ प॑प्रौ॒ रोद॑सी महि॒त्वा ।
अत॑श्चिदस्य महि॒मा वि रे॑च्य॒भि यो विश्वा॒ भुव॑ना ब॒भूव॑ ॥ ५ ॥

ववक्ष इंद्रः अमितं ऋजीषी उभे इति आ पप्रौ रोदसी इति महिऽत्वा ।
अतः चित् अस्य महिमा वि रेचि अभि यः विश्वा भुवना बभूव ॥ ५ ॥

तेव्हां प्रचंडवेग इंद्र अपरिमित वाढला. तो इतका वाढला कीं, आपल्या मोठेपणाच्या योगानें त्यानें पृथ्वी व आकाश ह्या दोन्ही लोकांना भरगच्च भरून सोडले. तरीसुद्धां त्याचा महिमा सर्व व्यापून शिल्लक उरलाच, कारण त्यानें दोन्ही लोकच काय पण एकंदर सर्व भुवनेंसुद्धां आक्रमण केलीं. ॥ ५ ॥


विश्वा॑नि श॒क्रो नर्या॑णि वि॒द्वान॒पो रि॑रेच॒ सखि॑भि॒र्निका॑मैः ।
अश्मा॑नं चि॒द्ये बि॑भि॒दुर्वचो॑भिर्व्र॒जं गोम॑न्तमु॒शिजो॒ वि व॑व्रुः ॥ ६ ॥

विश्वानि शक्रः नर्याणि विद्वान् अपः रिरेच सखिऽभिः निऽकामैः ।
अश्मानं चित् ये बिभिदुः वचःऽभिः व्रजं गोऽमंतं उशिजः वि वव्रुः ॥ ६ ॥

मनुष्यांना हितकर काय आहे तें तो सर्वसमर्थ प्रभु उत्तम तऱ्हेनें जाणतो; म्हणूनच आपल्या ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणारे जे प्रिय मित्र अंगिरस त्यांच्यासह त्यानें दिव्य उदकप्रवाह पृथ्वीवर रिचवून टाकले; तेव्हां त्या उत्सुक अंगिरसांनी आपल्या स्तोत्रवाणीनें त्यांना दुभंग करून प्रकाशधेनूंना बंधमुक्त केलें. ॥ ६ ॥


अ॒पो वृ॒त्रं व॑व्रि॒वांसं॒ परा॑ह॒न्प्राव॑त्ते॒ वज्रं॑ पृथि॒वी सचे॑ताः ।
प्रार्णां॑सि समु॒द्रिया॑ण्यैनोः॒ पति॒र्भव॒~न्छव॑सा शूर धृष्णो ॥ ७ ॥

अपः वृत्रं वव्रिऽवांसं परा अहन् प्र आवत् ते वज्रं पृथिवी सऽचेताः ।
प्र अर्णांसि समुद्रियाणि ऐनोः पतिः भवन् छवसा शूर धृष्णो इति ॥ ७ ॥

दिव्य उदकांना घेरून टाकणार्‍या वृत्रास तूं फेंकून देऊन ठार केलेंस तेव्हां खुद्द पृथ्वीसुद्धां सचेतन होऊन तिचें तुझ्या वज्रावर पराकाष्ठेचें प्रेम जडले. सागराच्या जलकल्लोळांमध्ये तूंच खळबळ उत्पन्न केलीस, आणि हे अत्यंत धाडसी वीरा, तूं आपल्य उत्कट सामर्थ्यानें जगाचा मालक होऊन बसलास. ॥ ७ ॥


अ॒पो यदद्रिं॑ पुरुहूत॒ दर्द॑रा॒विर्भु॑वत्स॒रमा॑ पू॒र्व्यं ते॑ ।
स नो॑ ने॒ता वाज॒मा द॑र्षि॒ भूरिं॑ गो॒त्रा रु॒जन्नङ्गि॑रोभिर्गृणा॒नः ॥ ८ ॥

अपः यत् अद्रिं पुरुऽहूत दर्दः आविः भुवत् सरमा पूर्व्यं ते ।
सः नः नेता वाजं आ दर्षि भूरिं गोत्रा रुजन् अङ्गिःरःऽभिः गृणानः ॥ ८ ॥

असंख्य भक्त तुझा धांवा करीत असतात अशा हे पुरुहूता इंद्रा,जेव्हां उदकसंचय असलेला पर्वत तूं दुभंग केलास तेव्हां सरमा तुझ्यापुढे प्रकट झाली. तूं आमचा धुरीण. अंगिरसांनी तुझी कीर्ति गाइलेली आहे; तर ज्ञानधेनूंचे बंधनपटल फोडून शुद्धसत्त्वाचा आम्हांस भरपूर लाभ करून दे. ॥ ८ ॥


अच्छा॑ क॒विं नृ॑मणो गा अ॒भिष्टौ॒ स्वर्षाता मघव॒न्नाध॑मानम् ।
ऊ॒तिभि॒स्तमि॑षणो द्यु॒म्नहू॑तौ॒ नि मा॒यावा॒नब्र॑ह्मा॒ दस्यु॑रर्त ॥ ९ ॥

अच्छ कविं नृऽमणः गाः अभिष्टौ स्वःऽसाता मघऽवन् नाधमानं ।
ऊतिऽभिः तं इषणः द्युम्नऽहूतौ नि मायाऽवान् अब्रह्मा दस्युः अर्त ॥ ९ ॥

हे धीरोदात्ता, हे मघवन् (षड्‍गुणैश्वर्यसंपन्ना), स्वर्गीय प्रकाश जिंकून आपलासा करून घेण्याकरितां ज्ञानी कवीनें तुझी फारच काकळूत केली, तेव्हां त्याच्या सहायाकरितां तूं तात्काळ आलास. अंतःस्फूर्तीनें त्यांनी हांक मारतांच सर्व सामग्रीनीशी तूं धांवून गेलास, तोंच त्या कपटचरणी धर्महीन दस्यूचा उच्छेद होऊन गेला. ॥ ९ ॥


आ द॑स्यु॒घ्ना मन॑सा या॒ह्यस्तं॒ भुव॑त्ते॒ कुत्सः॑ स॒ख्ये निका॑मः ।
स्वे योनौ॒ नि ष॑दतं॒ सरू॑पा॒ वि वां॑ चिकित्सदृत॒चिद्ध॒ नारी॑ ॥ १० ॥

आ दस्युऽघ्ना मनसा याहि अस्तं भुवत् ते कुत्सः सख्ये निऽकामः ।
स्वे योनौ नि सदतं सऽरूपा वि वां चिकित्सत् ऋतऽचित् ह नारी ॥ १० ॥

तर आतांही सज्जनांचे शत्रु जे दस्यु त्यांचा नायनाट करण्याचा हेतु धरूनच तूं आमच्या वसतिस्थानाकडे ये. कुत्स नांवाचा भक्त तुझ्या सहवासाविषयीं अत्यंत आसक्त; तेव्हां तुम्हीं दोघेही अगदी एकसारख्या स्वरूपाचे होऊन आपल्या मंदिरांत सुखासीन झाला असतांना कुत्साची महासाध्वी पत्नी तुम्हं दोघांकडेही निरखून पाहून बुचकळ्यात पडली. ॥ १० ॥


यासि॒ कुत्से॑न स॒रथ॑मव॒स्युस्तो॒दो वात॑स्य॒ हर्यो॒रीशा॑नः ।
ऋ॒ज्रा वाजं॒ न गध्यं॒ युयू॑षन्क॒विर्यदह॒न्पार्या॑य॒ भूषा॑त् ॥ ११ ॥

यासि कुत्सेन सऽरथं अवस्युः तोदः वातस्य हर्योः ईशानः ।
ऋज्रा वाजं न गध्यं युयूषन् कविः यत् अहन् पार्याय भूषात् ॥ ११ ॥

कुत्साचें सहाय्य करण्याच्या इच्छेनें त्याला आपल्याच तथांत बसवून घेऊन तूं जातोस. वायूच्या हरिद्‍वर्ण अश्वांचाही तूं जगदीशच प्रेरक आहेस. तेव्हां तो ज्ञानी भक्त (कुत्स) त्याला त्या दिवशीं अखेर साधावी म्हणून, अभिलषणीय धन जपून ठेवावें त्याप्रमाणें, आपलें मजबूत घोडेही तूं जय्यत ठेऊन दिलेस. ॥ ११ ॥


कुत्सा॑य॒ शुष्ण॑म॒शुषं॒ नि ब॑र्हीः प्रपि॒त्वे अह्नः॒ कुय॑वं स॒हस्रा॑ ।
स॒द्यो दस्यू॒न्प्र मृ॑ण कु॒त्स्येन॒ प्र सूर॑श्च॒क्रं वृ॑हताद॒भीके॑ ॥ १२ ॥

कुत्साय शुष्णं अशुषं नि बर्हीः प्रऽपित्वे अह्नः कुयवं सहस्रा ।
सद्यः दस्यून् प्र मृण कुत्स्येन प्र सूरः चक्रं वृहतात् अभीके ॥ १२ ॥

इंद्रा, खादाड आणि धान्यादिकांचा नाश करणार्‍या अवर्षणरूपी शुष्ण राक्षसाला आणि त्याच्या हजारो साथीदारांना, तुझा भक्त जो कुत्स त्याच्याकरितां, तूं उजाडलें नाहीं तोंच पार निपटून टाकलेंस. तसेंच आपल्या वज्रानें दस्यूंचा ताबडतोब फडशा उडव, आणि सूर्याच्या रथाचें चक्र गढून बसलें आहे तें वर उफळून आमच्या बाजूस चालू करून दे. ॥ १२ ॥


त्वं पिप्रुं॒ मृग॑यं शूशु॒वांस॑मृ॒जिश्व॑ने वैदथि॒नाय॑ रन्धीः ।
प॒~न्चा॒शत्कृ॒ष्णा नि व॑पः स॒हस्रात्कं॒ न पुरो॑ जरि॒मा वि द॑र्दः ॥ १३ ॥

त्वं पिप्रुं मृगयं शूशुऽवांसं ऋजिश्वने वैदथिनाय रंधीः ।
पंचाशत् कृष्णा नि वपः सहस्रा अत्कं न पुरः जरिमा वि दर्दरिति दर्दः ॥ १३ ॥

अतिशय माजलेल्या पिप्रुला, आणि मृगयाला तूं जेरीस आणून विदथीचा पुत्र ऋजिश्वा ह्याच्या आधीन करून दिलेंस. तूं काळ्या भिन्न वर्णाच्या पन्नास हजार श्त्रूंनाही ठार मारून जमिनीवर लोळविलेंस, आणि, वार्धक्य जसें तारुण्याच्या बहराचा नाश करतें त्याप्रमाणें त्यांची भक्कम तटबंदीचीं नगरेंही उध्वस्त करून टाकलींस. ॥ १३ ॥


सूर॑ उपा॒के त॒न्व१ंदधा॑नो॒ वि यत्ते॒ चेत्य॒मृत॑स्य॒ वर्पः॑ ।
मृ॒गो न ह॒स्ती तवि॑षीमुषा॒णः सिं॒हो न भी॒म आयु॑धानि॒ बिभ्र॑त् ॥ १४ ॥

सूरः उपाके तन्वं दधानः वि यत् ते चेति अमृतस्य वर्पः ।
मृगः न हस्ती तविषीं उषाणः सिंहः न भीमः आयुधानि बिभ्रत् ॥ १४ ॥

सूर्याच्या जवळ तुझ्यासारखा मोहरा उभा असतांना, तुज अमर भगवंताचे तेजस्वी स्वरूप दृगोच्चर होतें. तुझी हिम्मत जबर म्हणून तूं राजेंद्राप्रमाणें वाटतोस; परंतु तूं हातांत धरलेली आयुधें जलाल म्हणून भयंकर मृगेंद्राप्रमाणेंही दिसतोस. ॥ १४ ॥


इन्द्रं॒ कामा॑ वसू॒यन्तो॑ अग्म॒न्स्वर्मीळ्हे॒ न सव॑ने चका॒नाः ।
श्र॒व॒स्यवः॑ शशमा॒नास॑ उ॒क्थैरोको॒ न र॒ण्वा सु॒दृशी॑व पु॒ष्टिः ॥ १५ ॥

इंद्रं कामा वसूऽयंतः अग्मन् स्वःऽमीळ्हे न सवने चकानाः ।
श्रवस्यवः शशमानासः उक्थैः ओकः न रण्वा सुदृशीऽइव पुष्टिः ॥ १५ ॥

स्वर्गीय प्रकाशाचा लाभ व्हावा म्हणून, युद्ध होतें त्यावेळेप्रमाणेंच, ह्या सोमसवनप्रसंगीं सुद्धां दिव्यनिधीच्या प्राप्तीसाठी आतुर होऊन आमच्या प्रेमळ वासना इंद्राकडे गेल्या आहेत. आम्हांला सत्कृत्यांची लालसा आहे. आम्ही सामगायनांनी ईशास्तवन करीत असतों, तेव्हां स्वताःचें घर जसें आम्हांस मनोहर दिसतें, नयनानंददायिका लक्ष्मी जशी रमणीय वाटतें, त्याप्रमाणें भगवद्‍भक्तीही आम्हांस रम्यच वाटतें. ॥ १५ ॥


तमिद्व॒ इन्द्रं॑ सु॒हवं॑ हुवेम॒ यस् ता च॒कार॒ नर्या॑ पु॒रूणि॑ ।
यो माव॑ते जरि॒त्रे गध्यं॑ चिन्म॒क्षू वाजं॒ भर॑ति स्पा॒र्हरा॑धाः ॥ १६ ॥

तं इत् वः इंद्रं सुऽहवं हुवेम यः ता चकार नर्या पुरूणि ।
यः माऽवते जरित्रे गध्यं चित् मक्षू वाजं भरति स्पार्हऽराधाः ॥ १६ ॥

ज्याचा धांवा करणें फारच सुखावह असतें अशा त्या भगवान इंद्राला आम्ही तुमच्याकरितां हांक मारूं. मानवजातीचें ज्यायोगें कल्याण होईल असे असंख्य प्रसिद्ध महत्पराक्रम त्यानें केलेले आहेत. मजसारख्या दीन भक्ताला अभिलषणीय असें जें शुद्ध सत्त्वरूप धन, तें तोच तत्काळ आणून देतो. कारण स्पृहणीय अशी जी संपत्ति आहे ती त्याच्यापाशीं असते. ॥ १६ ॥


ति॒ग्मा यद॒न्तर॒शनिः॒ पता॑ति॒ कस्मि॑ञ्चिच्छूर मुहु॒के जना॑नाम् ।
घो॒रा यद॑र्य॒ समृ॑ति॒र्भवा॒त्यध॑ स्मा नस्त॒न्वो बोधि गो॒पाः ॥ १७ ॥

तिग्मा यत् अंतः अशनिः पताति कस्मिन् चित् शूर मुहुके जनानां ।
घोरा यत् अर्य संऽऋतिः भवाति अध स्म नः तन्वः बोधि गोपाः ॥ १७ ॥

शौर्यशाली देवा, एखादा ज्वलत् अशनि लोकांच्या गर्दींत पडेल अश वेळीं किंवा, हे प्रभो, एखादें तुमुल युद्ध माजेल तेव्हां, त्या युद्धांत तूं आमचा रक्षणकर्ता हो म्हणजे झालें. ॥ १७ ॥


भुवो॑ऽवि॒ता वा॒मदे॑वस्य धी॒नां भुवः॒ सखा॑वृ॒को वाज॑सातौ ।
त्वामनु॒ प्रम॑ति॒मा ज॑गन्मोरु॒शंसो॑ जरि॒त्रे वि॒श्वध॑ स्याः ॥ १८ ॥

भुवः अविता वामऽदेवस्य धीनां भुवः सखा अवृकः वाजऽसातौ ।
त्वां अनु प्रऽमतिं आ जगन्म उरुऽशंसः जरित्रे विश्वध स्याः ॥ १८ ॥

वामदेवाच्या ध्यानोपासनांचा आवडता नाथ तूं हो आणि पवित्र सामर्थ्य प्राप्त करून घेण्याच्या आमच्या प्रयत्‍नांत आमचा कनवाळू सहायकारी मित्रही तूंच हो. आमच्या कल्याणाची काळजी वाहणारा आमचा धुरीण तूं, म्हणून तुझ्याच मागोमाग आम्ही जाणार, तर तुझ्या स्तोत्रकर्त्याशीं तूं असा वाग कीं तुझें स्तवन किती करूं आणि किती न करूं असें व्हावें. ॥ १८ ॥


ए॒भिर्नृभि॑रिन्द्र त्वा॒युभि॑ष्ट्वा म॒घव॑द्भििर्मघव॒न्विश्व॑ आ॒जौ ।
द्यावो॒ न द्यु॒म्नैर॒भि सन्तो॑ अ॒र्यः क्ष॒पो म॑देम श॒रद॑श्च पू॒र्वीः ॥ १९ ॥

एभिः नृऽभिः इंद्र त्वायुऽभिः त्वा मघवत्ऽभिः मघऽवन् विश्व आजौ ।
द्यावः न द्युम्नैः अभि संतः अर्यः क्षपः मदेम शरदः च पूर्वीः ॥ १९ ॥

हे षडैश्वर्यसंपन्ना, तुझ्या ठिकाणीं चित्त जडलेले जे शूर वीर तुझ्या कृपाप्रसादानें संपन्न झालेले आहेत अशा ह्या वीरांसह आम्ही एकंदर लढायांत विजयी होऊन आकाश जसें तारकापुंजानीं शोभिवंत दिसते त्याप्रमाणें आम्ही बलाढ्य होऊन शोभत आहों. तर ह्या शरदऋतूंतील रात्री जरी पुष्कळ असल्या तरी त्या सर्व रात्रीभर आम्हीं उल्लसित राहूं असें कर. ॥ १९ ॥


ए॒वेदिन्द्रा॑य वृष॒भाय॒ वृष्णे॒ ब्रह्मा॑कर्म॒ भृग॑वो॒ न रथ॑म् ।
नू चि॒द्यथा॑ नः स॒ख्या वि॒योष॒दस॑न्न उ॒ग्रोऽवि॒ता त॑नू॒पाः ॥ २० ॥

एव इत् इंद्राय वृषभाय वृष्णे ब्रह्म अकर्म भृगवः न रथं ।
नु चित् यथा नः सख्या विऽयोषत् असन् न उग्रः अविता तनूऽपाः ॥ २० ॥

वीरपुंगव वीर्यशाली आणि कामनाकर्षक जो भगवान इंद्र त्याच्या प्रित्यर्थ पूर्वी भृगूंनी रथ सज्ज केल्याप्रमाणें आम्हींही हें अशा रीतीनें त्याचें प्रार्थनास्तोत्र केलें आहे, अशाकरितां कीं त्याचें आमच्यावर जे प्रेम आहे त्यांत त्यानें कदापि अंतर करूं नये. आणि तो उग्र आहे तरी तोच आमचा त्राता व रक्षणकर्ता असावा. ॥ २० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ २१ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ २१ ॥

हे इंद्रा, तुझें स्तवन आमच्याकडून झालें नाही काय, तुझी कीर्ति सर्वत्र नाहीं काय ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें तुडुंब भरून जातात त्याप्रमाणें तुझ्या स्तोतृजनाकरितां तूं उत्साहभरानें परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पबुद्धी प्रमाणें हे तुझें अपूर्व प्रार्थनास्तोत्र म्हटलें आहे, तर आम्हीं उदार व महारथी वीर होऊं असें कर. ॥ २१ ॥


मण्डल ४ सूक्त १७ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


त्वं म॒हाँ इ॑न्द्र॒ तुभ्यं॑ ह॒ क्षा अनु॑ क्ष॒त्रं मं॒हना॑ मन्यत॒ द्यौः ।
त्वं वृ॒त्रं शव॑सा जघ॒न्वान्सृ॒जः सिन्धूँ॒रहि॑ना जग्रसा॒नान् ॥ १ ॥

त्वं महान् इंद्र तुभ्यं ह क्षाः अनु क्षत्रं मंहना मन्यत द्यौः ।
त्वं वृत्रं शवसा जघन्वान् सृजः सिंधून् अहिना जग्रसानान् ॥ १ ॥

इंद्रा तूं परमश्रेष्ठ आहेस. पृथ्वी आणि आकाश ह्यांनी तुझ्या औदार्यामुळे अंकित होऊन तुझी सत्ता मान्य केली आहे. तूं आपल्या उत्कट बलाने वृत्राला ठार मारून त्या प्रचंड महाभुजंगानें सर्वस्वी ग्रासून टाकलेल्या दिव्य महानद्यांच्या प्रवाहाला खुलें करून दिलेंस. ॥ १ ॥


तव॑ त्वि॒षो जनि॑मन्रेजत॒ द्यौ रेज॒द्भूमि॑र्भि॒यसा॒ स्वस्य॑ म॒न्योः ।
ऋ॒घा॒यन्त॑ सु॒भ्वः१पर्व॑तास॒ आर्द॒न्धन्वा॑नि स॒रय॑न्त॒ आपः॑ ॥ २ ॥

तव त्विषः जनिमन् रेजत द्यौः रेजत् भूमिः भियसा स्वस्य मन्योः ।
ऋघायंत सुऽभ्वः पर्वतास आर्दन् धन्वानि सरयंते आपः ॥ २ ॥

तूं दीप्तिमान देव आविर्भूत झालास त्या वेळेस तुझ्या क्रोधाला भिऊन आकाश चळचळ कांपू लागले, पृथ्वी कंपित झाली, मोठमोठ्या नामांकित पर्वतांची गाळण उडाली, शुष्क रेताड प्रदेशसुद्धां उदकरूप धर्मानें डबडबून गेले आणि जलप्रवाहांनी तर वाट फुटेल तिकडे धूम ठोकली. ॥ २ ॥


भि॒नद्गि॒रिं शव॑सा॒ वज्र॑मि॒ष्णन्ना॑विष्कृण्वा॒नः स॑हसा॒न ओजः॑ ।
वधी॑द्वृ॒त्रं वज्रे॑ण मन्दसा॒नः सर॒न्नापो॒ जव॑सा ह॒तवृ॑ष्णीः ॥ ३ ॥

भिनत् गिरिं शवसा वज्रं इष्णन् आविऽष्कृण्वानः सहसानः ओजः ।
वधीत् वृत्रं वज्रेण मंदसानः सरन् आपः जवसा हतऽवृष्णीः ॥ ३ ॥

रणधुरंधर इंद्रानें आपल्या तेजस्वितेची चुणुक दाखवून व वज्र फेंकून पर्वत फोडून टाकला. विजयानंदाच्या भरांत वज्रानेंच त्यानें वृत्राचा वध केला, तेव्हां जुलमी शत्रूचा अडथळा नष्ट झालेला पाहतांच दिव्य जलप्रवाह झपाट्यानें वाहूं लागले. ॥ ३ ॥


सु॒वीर॑स्ते जनि॒ता म॑न्यत॒ द्यौरिन्द्र॑स्य क॒र्ता स्वप॑स्तमो भूत् ।
य ईं॑ ज॒जान॑ स्व॒र्यं सु॒वज्र॒मन॑पच्युतं॒ सद॑सो॒ न भूम॑ ॥ ४ ॥

सुऽवीरः ते जनिता मन्यत द्यौः इंद्रस्य कर्ता स्वपःऽतमः भूत् ।
यः ईं जजान स्वर्यं सुऽवज्रं अनपऽच्युतं सदसः न भूम ॥ ४ ॥

इंद्रा, आकाशा असेंच वाटले कीं तुझा पिता कोणी सर्वोत्कृष्ट वीर असावा. त्याच्या मतानें असे ठरले कीं इंद्राचा उत्पन्नकर्ता अत्यंत कुशल असला पाहिजे. कारण हा असा लोकोत्तर, वज्रधारी वीर, ह्या भुवनाप्रमाणे आपल्या उच्चपदापासून कधींही न ढळणारा, असा त्यानें उत्पन्न केला. ॥ ४ ॥


य एक॑ इच्च्या॒वय॑ति॒ प्र भूमा॒ राजा॑ कृष्टी॒नां पु॑रुहू॒त इन्द्रः॑ ।
स॒त्यमे॑न॒मनु॒ विश्वे॑ मदन्ति रा॒तिं दे॒वस्य॑ गृण॒तो म॒घोनः॑ ॥ ५ ॥

यः एकः इत् च्यवयति प्र भूमा राजा कृष्टीनां पुरुऽहूतः इंद्रः ।
सत्यं एनं अनु विश्वे मदंति रातिं देवस्य गृणतः मघोनः ॥ ५ ॥

जो एकटाच ह्या सर्व भुवनांना हालवून सोडतो, ज्याचा सर्व जग धांवा करीत असतें तोच हा इंद्र प्राणिमात्रांचा राजा होय. ह्याच सत्यस्वरूप भगवंताच्या अनुरोधानें, ह्याच षडैश्वर्यसंपन्न देवाच्या कृपाप्रसादाची महती गाणार्‍या भक्तांच्या धोरणानें सर्वजण आनंदानें नांदत असतात. ॥ ५ ॥


स॒त्रा सोमा॑ अभवन्नस्य॒ विश्वे॑ स॒त्रा मदा॑सो बृह॒तो मदि॑ष्ठाः ।
स॒त्राभ॑वो॒ वसु॑पति॒र्वसू॑नां॒ दत्रे॒ विश्वा॑ अधिथा इन्द्र कृ॒ष्टीः ॥ ६ ॥

सत्रा सोमाः अभवन् अस्य विश्वे सत्रा मदासः बृहतः मदिष्ठाः ।
सत्रा अभवः वसुऽपतिः वसूनां दत्रे विश्वाः अधिथाः इंद्र कृष्टीः ॥ ६ ॥

खरोखर सर्व सोमरस त्याचेच ठरले. अत्यंत हर्षकर जीं जीं मधुर पेयें असतील तींही ह्याच परमश्रेष्ठ भवगंताचीं झाली. कारण हे इंद्रा, सर्व दिव्यनिधींचा भाण्डारी तूंच आहेस आणि संपूर्ण प्राणिमात्रांना आपल्या कृपेच्या औदार्यांत तूंच वागवीत आला आहेस. ॥ ६ ॥


त्वमध॑ प्रथ॒मं जाय॑मा॒नोऽ॑मे॒ विश्वा॑ अधिथा इन्द्र कृ॒ष्टीः ।
त्वं प्रति॑ प्र॒वत॑ आ॒शया॑न॒महिं॒ वज्रे॑ण मघव॒न्वि वृ॑श्चः ॥ ७ ॥

त्वं अध प्रथमं जायमानः अमे विश्वाः अधिथाः इंद्र कृष्टीः ।
त्वं प्रति प्रऽवत आऽशयानं अहिं वज्रेण मघऽवन् वि वृश्चः ॥ ७ ॥

तूं प्रथम प्रकट झालास तेव्हां लागलीच सर्व प्राणिमात्रांना सामर्थ्यांत आणून सोडलेंस. कारण हे षडैश्वर्यसंपन्ना, सामर्थ्य प्रवाहाच्या आड आडवा पडलेला जो अहि भुजंग त्याच्या, तूं वज्रानें, ठिकर्‍या उडवून दिल्यास. ॥ ७ ॥


स॒त्रा॒हणं॒ दाधृ॑षिं॒ तुम्र॒मिन्द्रं॑ म॒हाम॑पा॒रं वृ॑ष॒भं सु॒वज्र॑म् ।
हन्ता॒ यो वृ॒त्रं सनि॑तो॒त वाजं॒ दाता॑ म॒घानि॑ म॒घवा॑ सु॒राधाः॑ ॥ ८ ॥

सत्राऽहनं दाधृषिं तुम्रं इंद्रं महां अपारं वृषभं सुऽवज्रं ।
हंता यः वृत्रं सनिता उत वाजं दाता मघानि मघऽवा सुऽराधाः ॥ ८ ॥

जो जबर धेंडांनाही मारून टाकणारा, व मोठा धारिष्टवान आहे, जो तीव्र, श्रेष्ठ, अपारशक्ति, वीराग्रणि, आणि वज्रधर आहे, अशा इंद्राचे आम्ही गुणगान गातो. त्यानेंच वृत्रास मारलें, सत्त्वसामर्थ्य देणारा तोच आणि वैभवदाता, दिव्यैर्श्वर्यसंपन्न व कृपापात्रानें आढ्य असाही तोच. ॥ ८ ॥


अ॒यं वृत॑श्चातयते समी॒चीर्य आ॒जिषु॑ म॒घवा॑ शृ॒ण्व एकः॑ ।
अ॒यं वाजं॑ भरति॒ यं स॒नोत्य॒स्य प्रि॒यासः॑ स॒ख्ये स्या॑म ॥ ९ ॥

अयं वृतः चातयते संऽईचीः य आजिषु मघऽवा शृण्वे एकः ।
अयं वाजं भरति यं सनोति अस्य प्रियासः सख्ये स्याम ॥ ९ ॥

युद्धामध्यें ज्या षडैश्वर्यसंपन्न देवाचेंच नांव काय तें ऐकूं येते तोच हा इंद्र एकत्र जुळलेल्या सर्व शत्रुसेनेची तो वाताहत करून टाकतो. तो जें जें सत्त्वसामर्थ्य प्रेमाने आणतो, ते सर्व भक्तासच देऊन टाकतो. तर आम्ही त्याच्या प्रेमसहवासांत राहून त्याला प्रिय होऊं असे घडो. ॥ ९ ॥


अ॒यं शृ॑ण्वे॒ अध॒ जय॑न्नु॒त घ्नन्न॒यमु॒त प्र कृ॑णुते यु॒धा गाः ।
य॒दा स॒त्यं कृ॑णु॒ते म॒न्युमिन्द्रो॒ विश्वं॑ दृ॒ळ्हं भ॑यत॒ एज॑दस्मात् ॥ १० ॥

अयं शृण्वे अध जयन् उत घ्नन् अयं उत प्र कृणुते युधा गाः ।
यदा सत्यं कृणुते मन्युं इंद्रः विश्वं दृळ्हं भयते एजत् अस्मात् ॥ १० ॥

शत्रूंवर विजय मिळवीत असो अगर त्यांचा संहार करीत असो, ह्या भगवंताची प्रख्याति एकसारखीच आहे. युद्ध करून प्रकाशधेनु हाच प्रकट करतो. परंतु एकदां हा इंद्र खरोखरच क्रोधायमान झाला म्हणजे सर्व पदार्थ, मग ते अचल असोत कीं चल असोत, याच्यापुढें भयाने गांगरून जातात. ॥ १० ॥


समिन्द्रो॒ गा अ॑जय॒त्सं हिर॑ण्या॒ सम॑श्वि॒या म॒घवा॒ यो ह॑ पू॒र्वीः ।
ए॒भिर्नृभि॒र्नृत॑मो अस्य शा॒कै रा॒यो वि॑भ॒क्ता स॑म्भ॒रश्च॒ वस्वः॑ ॥ ११ ॥

सं इंद्रः गा अजयत् सं हिरण्या सं अश्विया मघऽवा यः ह पूर्वीः ।
एभिः नृऽभिः नृऽतमः अस्य शाकैः रायः विऽभक्ता संऽभरः च वस्वः ॥ ११ ॥

सुवर्ण म्हणजे अविनाशी धन आणि अश्व म्हणजे आवेश धन हीं अपार धनें षडैश्वर्यसंपन्न देवानें स्वाधीन ठेविलीं आहेत, त्या इंद्राने प्रकाशधेनुही जिंकून घेतल्या आहेत. वीरांमध्ये श्रेष्टतम असा इंद्र, ह्या त्याच्या प्रबल व शूर सैनिकांच्या द्वारें भक्तांमध्ये ऐश्वर्याची यथार्थ विभागवाटणी करणारा आहे आणि अभीष्ट धन देणाराही तोच आहे. ॥ ११ ॥


किय॑त्स्वि॒दिन्द्रो॒ अध्ये॑ति मा॒तुः किय॑त्पि॒तुर्ज॑नि॒तुर्यो ज॒जान॑ ।
यो अ॑स्य॒ शुष्मं॑ मुहु॒कैरिय॑र्ति॒ वातो॒ न जू॒त स्त॒नय॑द्भि्र॒भ्रैः ॥ १२ ॥

कियत् स्वित् इंद्रः अधि एति मातुः कियत् पितुः जनितुः यः जजान ।
यः अस्य शुष्मं मुहुकैः इयर्ति वातः न जूतः स्तनयत्ऽभिः अभ्रैः ॥ १२ ॥

ज्याने हे सर्व उत्पन्न केलें तो इंद्रच प्राण्यांच्या ह्या पृथिवी मातेची किती काळजी वाहतो, आणि आकाश पित्याची तरी किती वाहतो ? पहा, गर्जना करणार्‍या मेघामुळें क्षुब्ध झालेल्या वायूप्रमाणे तो इंद्र ह्या आकाशाचा दरारा वरचेवर एकसारखा वाढवीतच असतो. ॥ १२ ॥


क्षि॒यन्तं॑ त्व॒मक्षि॑यन्तं कृणो॒तीय॑र्ति रे॒णुं म॒घवा॑ स॒मोह॑म् ।
वि॒भ॒~न्ज॒नुर॒शनि॑माँ इव॒ द्यौरु॒त स्तो॒तारं॑ म॒घवा॒ वसौ॑ धात् ॥ १३ ॥

क्षियंतं त्वं अक्षियंतं कृणोति इयर्ति रेणुं मघऽवा संऽओहं ।
विऽभंजनुः अशनिमान्ऽइव द्यौः उत स्तोतारं मघऽवा वसौ धात् ॥ १३ ॥

तोच षडैश्वर्यसंपन्न देव स्थायिकाला उपरी, आणि उपर्‍याला स्थायिक करतो. तुमुल युद्धाचा धुरळाही तो देवच उडवितो. उल्का किंवा अशनि ह्यांच्यामुळें आकाश जसें सशस्त्र त्याप्रमाणें इंद्रही वज्राच्या योगाने सशस्त्र आणि सर्वभंजक आहे; तरी तो षडैश्वर्यसंपन्न देव स्तोतृजनांना वैभ्वांतच ठेवील. ॥ १३ ॥


अ॒यं च॒क्रमि॑षण॒त्सूर्य॑स्य॒ न्येत॑शं रीरमत्ससृमा॒णम् ।
आ कृ॒ष्ण ईं॑ जुहुरा॒णो जि॑घर्ति त्व॒चो बु॒ध्ने रज॑सो अ॒स्य योनौ॑ ॥ १४ ॥

अयं चक्रं इषणत् सूर्यस्य नि एतशं रीरमत् ससृमाणं ।
आ कृष्णः ईं जुहुराणः जिघर्ति त्वचः बुध्ने रजसः अस्य योनौ ॥ १४ ॥

त्यानें सूर्याच्या चाकाला जोरानें गति दिली, आणि चाल करून जाणार्‍या एतशाला शांत केले. त्यावेळेस त्याच्या स्वस्थानी अर्थात तेजस्वी रजोलोकाच्या मूलप्रदेशी चंचलगति अशा कृष्णमेघानें इंद्रावर आपल्या शीतल तुषारांचे सिंचन केलें. ॥ १४ ॥


असि॑क्न्यां॒ यज॑मानो॒ न होता॑ ॥ १५ ॥

असिक्न्यां यजमानः न होता ॥ १५ ॥

यजमान हाच स्वतः होता होऊन कृष्ण्पक्षांतील रात्रीच्या समयीं इंद्राप्रित्यर्थ असेच घृतसिंचन करतो. ॥ १५ ॥


ग॒व्यन्त॒ इन्द्रं॑ स॒ख्याय॒ विप्रा॑ अश्वा॒यन्तो॒ वृष॑णं वा॒जय॑न्तः ।
ज॒नी॒यन्तो॑ जनि॒दामक्षि॑तोति॒मा च्या॑वयामोऽव॒ते न कोश॑म् ॥ १६ ॥

गव्यंतः इंद्रं सख्याय विप्राः अश्वऽयंतः वृषणं वाजयंतः ।
जनिऽयंतः जनिऽदां अक्षित्ऽऊतिं आ च्यवयामः अवते न कोशं ॥ १६ ॥

आम्ही स्तोतृजन ज्ञान गोधनाचीही, तितिक्षारूप अश्वसंपत्तीची आणि सत्त्वसामर्थ्याची इच्छा धरून आहोंत. आम्हाला स्त्रीविषयक वासनाही आहे, तेव्हां स्त्रीचाही लाभ करून देणारा, सकलकामवर्षक वीर असा जो इंद्र, त्याच्या चित्ताला आम्ही आपल्याकडे खेंचून घेतो. तलावांत सोडून दिलेला उस्वास अखंड चालतो त्याप्रमाणें ह्या संरक्षण सामर्थ्यांतही कधीं खंड पडत नाहीं ॥ १६ ॥


त्रा॒ता नो॑ बोधि॒ ददृ॑शान आ॒पिर॑भिख्या॒ता म॑र्डि॒ता सो॒म्याना॑म् ।
सखा॑ पि॒ता पि॒तृत॑मः पितॄ॒णां कर्ते॑मु लो॒कमु॑श॒ते व॑यो॒धाः ॥ १७ ॥

त्राता नः बोधि ददृशानः आपिः अभिऽख्याता मर्डिता सोम्यानां ।
सखा पिता पितृऽतमः पितॄणां कर्ता ईं ऊं इति लोकं उशते वयोऽधाः ॥ १७ ॥

तूं आम्हांस दृष्टिगोचर आहेस तेव्हां तूं आमचा संरक्षणकर्ता हो, आमचा आप्तबंधु हो. सोम अर्पण करणार्‍या भक्ताकडे कृपावलोकन करणारा व त्याला सुख देणारा तूं आहेस. तूं आमचा सखा, तूं पिता, इतकेंच काय पण पित्यापेक्षांही अत्यंत श्रेष्ठ असा पिता आहेस. भक्ताला उत्तम लोकदाता आणि उत्कंठित जनाला तारुण्यदाता तूंच आहेस. ॥ १७ ॥


स॒खी॒य॒ताम॑वि॒ता बो॑धि॒ सखा॑ गृणा॒न इ॑न्द्र स्तुव॒ते वयो॑ धाः ।
व॒यं ह्या ते॑ चकृ॒मा स॒बाध॑ आ॒भिः शमी॑भिर्म॒हय॑न्त इन्द्र ॥ १८ ॥

सखिऽयतां अविता बोधि सखा गृणानः इंद्र स्तुवते वयः धाः ।
वयं हि आ ते चकृम सऽबाध आभिः शमीभिः महयंतः इंद्र ॥ १८ ॥

तुझा प्रेमसहवास, इच्छिणार्‍या भक्तांचा तूं प्रेमळ सखा हो. तुझे गुण सर्व गातात, तर तुझ्या स्तोतृजनाला तारुण्याचा जोम दे. आम्ही आतुर होऊन, आणि हे इंद्रा, ह्या आमच्या अपूर्व उपासनाविधीनें तुला गौरवून तुला हांक मारली आहे. ॥ १८ ॥


स्तु॒त इन्द्रो॑ म॒घवा॒ यद्ध॑ वृ॒त्रा भूरी॒ण्येको॑ अप्र॒तीनि॑ हन्ति ।
अ॒स्य प्रि॒यो ज॑रि॒ता यस्य॒ शर्म॒न्नकि॑र्दे॒वा वा॒रय॑न्ते॒ न मर्ताः॑ ॥ १९ ॥

स्तुतः इंद्रः मघऽवा यत् ध वृत्रा भूरीणि एकः अप्रतीनि हंति ।
अस्य प्रियः जरिता यस्य शर्मन् नकिः देवाः वारयंते न मर्ताः ॥ १९ ॥

भगवान इंद्र स्तुतींनी प्रसन्न होऊन अंधकार माजविणार्‍या असंख्य शत्रूंचे कंदन एकटाच करून टाकतो. भक्तजन त्याला अत्यंत प्रिय वाटतो. म्हणून त्याच्या कल्याणप्रद छत्राखाली असल्यावर देव काय आणि मनुष्य काय कोणी कांही एक विपरीत करूं शकणार नाही. ॥ १९ ॥


ए॒वा न॒ इन्द्रो॑ म॒घवा॑ विर॒प्शी कर॑त्स॒त्या च॑र्षणी॒धृद॑न॒र्वा ।
त्वं राजा॑ ज॒नुषां॑ धेह्य॒स्मे अधि॒ श्रवो॒ माहि॑नं॒ यज्ज॑रि॒त्रे ॥ २० ॥

एव न इंद्रः मघऽवा विऽरप्शी करत् सत्या चर्षणीऽधृत् अनर्वा ।
त्वं राजा जनुषां धेहि अस्मे इति अधि श्रवः माहिनं यज् जरित्रे ॥ २० ॥

तो विकसित प्रभाव, चराचरधारक आणि अप्रतिहत असा भगवान इंद्र आमची ही अशी वेडीवांकडी प्रार्थना खरोखर सफल करो. इंद्रा, तूं प्राणिमात्रांचा राजा आहेस, तेव्हां तुझ्या स्तोतृजनाला प्राप्त होणारे जे महद्यश आहे ते तूं आमच्यामध्यें ठेव. ॥ २० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ २१ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यो न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ २१ ॥

हे इंद्रा, तुझें स्तवन आमच्या हातून झाले कीं नाही ? तुझी कीर्ति सर्वत्र नाहीं काय ? मग नद्या ज्याप्रमाणे जलानें तुडुंब भरून जातात त्याप्रमाणे तुझ्या स्तोतृजनाकरितां तूं उत्साहभरानें परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा आम्ही आपल्या अल्प बुद्धिप्रमाणे हे तुझें अपूर्व प्रार्थनास्तोत्र म्हटले आहे, तर आम्ही उदार व महारथी वीर होऊं असें कर. ॥ २१ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १८ ( इंद्र-अदिती-वामदेव संवाद सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


अ॒यं पन्था॒ अनु॑वित्तः पुरा॒णो यतो॑ दे॒वा उ॒दजा॑यन्त॒ विश्वे॑ ।
अत॑श्चि॒दा ज॑निषीष्ट॒ प्रवृ॑द्धो॒ मा मा॒तर॑ममु॒या पत्त॑वे कः ॥ १ ॥

अयं पंथा अनुऽवित्तः पुराणः यतः देवाः उत्ऽअजायंत विश्वे ।
अतः चित् आ जनिषीष्ट प्रऽवृद्धः मा मातरं अमुया पत्तवे करिति कः ॥ १ ॥

हाच तो पुरातन आणि सर्वांना उपलब्ध असा मार्ग कीं सर्व देवसुद्धां त्याच मार्गानें जन्मास आले. हा बराच वृद्धिंगत झाला आहे, तेव्हां ह्या मार्गानेंच त्यानें जन्मास यावें आणि अशा रीतीनें मातेला मरूं देऊं नये हें उत्तम. ॥ १ ॥


नाहमतो॒ निर॑या दु॒र्गहै॒तत्ति॑र॒श्चता॑ पा॒र्श्वान्निर्ग॑माणि ।
ब॒हूनि॑ मे॒ अकृ॑ता॒ कर्त्वा॑नि॒ युध्यै॑ त्वेन॒ सं त्वे॑न पृच्छै ॥ २ ॥

न अहं अतः निः अया दुःऽगहा एतत् तिरश्चता पार्श्वात् निः गमानि ।
बहूनि मे अकृता कर्त्वानि युध्यै त्वेन सं त्वेन पृच्छै ॥ २ ॥

इकडून मी बाहेर येणार नाही. ही वाट फार कठिण आहे. हा असा बाजूनें आडवा बाहेर येईन. अजून राहिलेली पुष्कळ कृत्यें मला करावयाचीं आहेत आणि त्याकरितां मी एकाशी लढेन, दुसर्‍याशी हितगुज करीन. ॥ २ ॥


प॒रा॒य॒तीं मा॒तर॒मन्व॑चष्ट॒ न नानु॑ गा॒न्यनु॒ नू ग॑मानि ।
त्वष्टु॑र्गृ॒हे अ॑पिब॒त्सोम॒मिन्द्रः॑ शतध॒न्यं च॒म्वोः सु॒तस्य॑ ॥ ३ ॥

पराऽयतीं मातरं अनु अचष्ट न न अनु गानि अनु नु गमानि ।
त्वष्टुः गृहे अपिबत् सोमं इंद्रः शतऽधन्यं चम्वोः सुतस्य ॥ ३ ॥

मग आसन्न झालेल्या मातेकडे त्यानें टक लावून पाहून म्हटले, बरे तर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणें वागत नाहीं असे नाही. हा पहा तसाच वागतो. कारण त्वष्ट्याच्या घरीं गाळून तयार करून ठेवलेला शेंकडो पटीनें मोलवान असा सोमरस चमसांतूनच इंद्राने प्राशन केला नाहीं काय ? ॥ ३ ॥


किं स ऋध॑क् कृणव॒द्यं स॒हस्रं॑ मा॒सो ज॒भार॑ श॒रद॑श्च पू॒र्वीः ।
न॒ही न्वस्य प्रति॒मान॒मस्त्य॒न्तर्जा॒तेषू॒त ये जनि॑त्वाः ॥ ४ ॥

किं स ऋधक् कृणवत् यं सहस्रं मासः जभार शरदः च पूर्वीः ।
नही नु अस्य प्रतिऽमानं अस्ति अंतः जातेषु उत ये जनित्वाः ॥ ४ ॥

ज्याला मातेनें हजारों महिनेच काय पण असंख्य वर्षे धारण केले, त्या इंद्रानें आणखी अलौकिक तें काय करावयाचे ? पहा आजपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहेत किंवा ह्यापुढे होणार आहेत त्यांस ह्या इंद्राच्या तोडीचा एकही सांपडणार नाहीं. ॥ ४ ॥


अ॒व॒द्यमि॑व॒ मन्य॑माना॒ गुहा॑क॒रिन्द्रं॑ मा॒ता वी॒र्येणा॒ न्यृष्टम् ।
अथोद॑स्थात्स्व॒यमत्कं॒ वसा॑न॒ आ रोद॑सी अपृणा॒ज्जाय॑मानः ॥ ५ ॥

अवद्यंऽइव मन्यमाना गुहा अकः इंद्रं माता वीर्येण निऽऋष्टं ।
अथ उत् अस्थात् स्वयं अत्कं वसानः आ रोदसी इति अपृणात् जायमानः ॥ ५ ॥

वीर्यभरानें ओजलेल्या अशा इंद्राला कोणीतरी भलताच समजून अदिति मातेनें अगदी गुप्तस्थळीं ठेऊन दिलें. परंतु तेथून सुद्धां चिलखत चढवून तो उठला आणि आपल्या आपण प्रकट होऊन त्यानें पृथ्वी आणि आकाश असे दोन्ही लोक तेजानें ओतप्रोत भरून टाकलें. ॥ ५ ॥


ए॒ता अ॑र्षन्त्यलला॒भव॑न्तीरृ॒ताव॑रीरिवसं॒क्रोश॑मानाः ।
ए॒ता वि पृ॑च्छ॒ किमि॒दं भ॑नन्ति॒ कमापो॒ अद्रिं॑ परि॒धिं रु॑जन्ति ॥ ६ ॥

एताः अर्षंति अललाऽभवंतीः ऋतवरीःऽइव संऽक्रोशमानाः ।
एता वि पृच्छ किं इदं भनंति कं आपः अद्रिं परिऽधिं रुजंति ॥ ६ ॥

सद्धर्मपोषक स्तुतीप्रमाणे वंद्य अशा ह्या नद्या गर्क होऊन मोठ्यानें घोष करीत समुद्राकडे लोटत चालल्या आहेत. त्यांना विचारा कीं, हा मुलगा कसला चालविला आहे. सर्व जगाला वेढून टाकणारा कोणता पर्वत त्या आतां स्वतः फोडून टाकीत आहेत ? ॥ ६ ॥


किमु॑ ष्विदस्मै नि॒विदो॑ भन॒न्तेन्द्र॑स्याव॒द्यं दि॑धिषन्त॒ आपः॑ ।
ममै॒तान्पु॒त्रो म॑ह॒ता व॒धेन॑ वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑सृज॒द्वि सिन्धू॑न् ॥ ७ ॥

किं ऊं इति स्वित् अस्मै निऽविदः भनंत इंद्रस्य अवद्यं दिधिषंते आपः ।
मम एतान् पुत्रः महता वधेन वृत्रं जघन्वान् असृजत् वि सिंधून् ॥ ७ ॥

काय ? त्या इंद्रा प्रित्यर्थ त्या ’निविद्’ स्तोत्रें म्हणत आहेत. पण इंद्राला दूषण ठेवण्याचें त्यांनीच प्रथम मनांत आणलें होते व माझा पुत्र म्हणतात. त्यानेंच तर मारकशस्त्र हातीं घेऊन वृत्रास मारून ह्याच नद्यांना बंधमुक्त केलें. ॥ ७ ॥


मम॑च्च॒न त्वा॑ युव॒तिः प॒रास॒ मम॑च्च॒न त्वा॑ कु॒षवा॑ ज॒गार॑ ।
मम॑च्चि॒दापः॒ शिश॑वे ममृड्यु॒र्मम॑च्चि॒दिन्द्रः॒ सह॒सोद॑तिष्ठत् ॥ ८ ॥

ममत् चन त्वा युवतिः पराऽआस ममत् चन त्वा कुषवा जगार ।
ममत् चित् आपः शिशवे ममृड्युः ममच् चित् इंद्रः सहसा उत् अतिष्ठत् ॥ ८ ॥

त्या तरुणीनें तुज बालकाला टाकून दिले हा प्रमाद; कुषवेने तुला गिळले हाही प्रमादच. दिव्य उदकांनी त्या बालरूप इंद्राचें संगोपन केलें हें म्हणणे हा प्रमादच आणि त्यामुळें इंद्र हा शौर्यावेशानें एकदम उठून उभा राहिला हेंही म्हणणे प्रमादच. ॥ ८ ॥


मम॑च्च॒न ते॑ मघव॒न्व्यंसो निविवि॒ध्वाँ अप॒ हनू॑ ज॒घान॑ ।
अधा॒ निवि॑द्ध॒ उत्त॑रो बभू॒वा~न्छिरो॑ दा॒सस्य॒ सं पि॑णक्व॒धेन॑ ॥ ९ ॥

ममत् चन ते मघऽवन् विऽअंसः निऽविविध्वान् अप हनू इति जघान ।
अध निऽविद्ध उत्ऽतरः बभूवान् शिरः दासस्य सं पिणक् वधेन ॥ ९ ॥

ऐश्वर्यसंपना भगवंता, व्यंस राक्षसानें एकसारखे प्रहर करून तुझी हनुवटी फोडली ही उन्मत्तपणाचीच बडबड होय, कारण इतकी इजा झाली तरी अखेर तुझाच वरचष्मा होऊन तूं त्या अधमराक्षसाचें डोकें हत्यारानें चेंचून त्याचा चुराडा करून टाकलास. ॥ ९ ॥


गृ॒ष्टिः स॑सूव॒ स्थवि॑रं तवा॒गाम॑नाधृ॒ष्यं वृ॑ष॒भं तुम्र॒मिन्द्र॑म् ।
अरी॑ळ्हं व॒त्सं च॒रथा॑य मा॒ता स्व॒यं गा॒तुं त॒न्व इ॒च्छमा॑नम् ॥ १० ॥

गृष्टिः ससूव स्थविरं तवागां अनाधृष्यं वृषभं तुम्रं इंद्रं ।
अरीळ्हं वत्सं चरथाय माता स्वयं गातुं तन्व इच्छमानं ॥ १० ॥

जो सर्वांत ज्येष्ठ, ज्याच्यावर हल्ला करण्याची कोणाची प्राज्ञा नाही, जो वीरश्रेष्ठ व बलाढ्य आहे त्या इंद्ररूप प्रबल पुंगवाला अदिति धेनु प्रसवली. त्या वत्साला त्याच्या आईनें चाटले सुद्धां नाही, कारण त्यापूर्वींच स्वतःच पाहिजे तिकडे संचार करण्याची त्याला इच्छा होऊन त्याला मातेनें यथेच्छ विहार करण्यास सोडून दिले. ॥ १० ॥


उ॒त मा॒ता म॑हि॒षमन्व॑वेनद॒मी त्वा॑ जहति पुत्र दे॒वाः ।
अथा॑ब्रवीद्वृ॒त्रमिन्द्रो॑ हनि॒ष्यन्सखे॑ विष्णो वित॒रं वि क्र॑मस्व ॥ ११ ॥

उत माता महिषं अनु अवेनत् अमी इति त्वा जहति पुत्र देवाः ।
अथ अब्रवीत् वृत्रं इंद्रः हनिष्यन् सखे विष्णो इति विऽतरं वि क्रमस्व ॥ ११ ॥

नंतर माता त्या परमथोर देवाला विनवून म्हणाली, पुत्रा, हे विबुधगण थकून जाऊन तुला सोडून देतील काय ? तेव्हां वृत्राला मारण्यास निघालेला इंद्र बोलला कीं, प्रिय मित्रा विष्णू, तूं जरा पुढें होऊन दूरवर प्रदेश व्यापून टाक. ॥ ११ ॥


कस्ते॑ मा॒तरं॑ वि॒धवा॑मचक्रच्छ॒युं कस्त्वाम॑जिघांस॒च्चर॑न्तम् ।
कस्ते॑ दे॒वो अधि॑ मार्डी॒क आ॑सी॒द्यत्प्राक्षि॑णाः पि॒तरं॑ पाद॒गृह्य॑ ॥ १२ ॥

कः ते मातरं विधवां अचक्रत् शयुं कः त्वां अजिघांसत् चरंतं ।
कः ते देवः अधि मार्डीके आसीत् यत् प्र अक्षिणाः पितरं पादऽगृह्य ॥ १२ ॥

तुझ्या व्यतिरिक्त वृत्राच्या मातेला विधवा कोणी केले ? स्वेच्छेनें स्वस्थ पडून राहणारा किंवा संचार करणारा अशा तुला मारण्याकरितां वृत्रपित्यांवाचून दुसरा कोण धांवून आला ? तूं या वृत्राच्या पित्याचे पट पकडून त्याला आपटून मारलेंस, त्याअर्थी तुझ्यापेक्षां दुसरा कोणता देव आम्हां मानवांस सुख देण्यामध्यें अधिक ठरला आहे ? ॥ १२ ॥


अव॑र्त्या॒ शुन॑ आ॒न्त्राणि॑ पेचे॒ न दे॒वेषु॑ विविदे मर्डि॒तार॑म् ।
अप॑श्यं जा॒यामम॑हीयमाना॒मधा॑ मे श्ये॒नो मध्वा ज॑भार ॥ १३ ॥

अवर्त्या शुनः आंत्राणि पेचे न देवेषु विविदे मर्डितारं ।
अपश्यं जायां अमहीयमानां अध मे श्येनः मधु आ जभार ॥ १३ ॥

श्वानाच्या तोडीच्या हीनस्थितीनें मी आपले पोट जाळलें तरी इतक्या देवांमध्ये दयाळु असा दुसरा कोणीही मला आढळला नाही. माझ्या बायकोचा अपमान झालेला सुद्धां मी पाहिला, परंतु इतक्यांत त्या इंद्ररूपी श्येनपक्ष्यानें आपल्या कृपेचें मधुर अमृत मला आणून दिलें. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १९ ( संपात सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


ए॒वा त्वामि॑न्द्र वज्रि॒न्नत्र॒ विश्वे॑ दे॒वासः॑ सु॒हवा॑स॒ ऊमाः॑ ।
म॒हामु॒भे रोद॑सी वृ॒द्धमृ॒ष्वं निरेक॒मिद्वृ॑णते वृत्र॒हत्ये॑ ॥ १ ॥

एवा त्वां इंद्र वज्रिन् अत्र विश्वे देवासः सुऊहवासः ऊमाः ।
महां उभे इति रोदसी इति वृद्धं ऋष्वं निः एकं इत् वृणते वृत्रऽहत्ये ॥ १ ॥

देवांना केव्हांही हांक मारा ते नेहमी अगदी तयार असतात. परंतु हे वज्रधर इंद्रा, असे सर्व भक्तानुग्रहकारी देव आणि द्यावापृथिवी ह्यांनीं तूं जो परमथोर पुरातन आणि उदात्तचरित्र देव आहेस त्या तुला एकट्याला वृत्राचा वध करण्याकरितां येथें अश रीतीनें सर्वस्वी पसंत केले. ॥ १ ॥


अवा॑सृजन्त॒ जिव्र॑यो॒ न दे॒वा भुवः॑ स॒म्राळि॑न्द्र स॒त्ययो॑निः ।
अह॒न्नहिं॑ परि॒शया॑न॒मर्णः॒ प्र व॑र्त॒नीर॑रदो वि॒श्वधे॑नाः ॥ २ ॥

अव असृजंत जिव्रयः न देवाः भुवः संऽम्राट् इंद्र सत्यऽयोनिः ।
अहन् अहिं परिऽशयानं अर्णः प्र वर्तनीः अरदः विश्वऽधेनाः ॥ २ ॥

वृद्ध झालेल्या मनुष्यांप्रमाणे देवांनी जयाची आशा सोडली. तथापि हे इंद्रा तूं ह्या जगताचा अधिराज व सत्याचा उगमही तुझ्याच पासून; तेव्हां उदक कल्लोळांमध्ये आडवा पडून त्यांना थोंपवून धरणार्‍या त्या दुष्ट अहि भुजंगाचे निर्दलन तूंच केलेंस आणि सर्व दुनियेचें पोषण करणार्‍या नद्यांचे प्रवाहमार्ग पृथिवीवर तूंच खोदून टेवलेस. ॥ २ ॥


अतृ॑प्णुवन्तं॒ विय॑तमबु॒ध्यमबु॑ध्यमानं सुषुपा॒णमि॑न्द्र ।
स॒प्त प्रति॑ प्र॒वत॑ आ॒शया॑न॒महिं॒ वज्रे॑ण॒ वि रि॑णा अप॒र्वन् ॥ ३ ॥

अतृप्णुवंतं विऽयतं अबुध्यं अबुध्यमानं सुसुपानं इंद्र ।
सप्त प्रति प्रऽवतः आऽशयानं अहिं वज्रेण वि रिणाः अपर्वन् ॥ ३ ॥

तो नेहमी वखवखलेला भुजंग अस्ताव्यस्त पडलेला असून कोण्याच्या दृष्टोत्पत्तिस येण्यासारखा नव्हता, व इतका गाढ निद्रावश झाला होता कीं तो कांही केल्यानें जागा झाला नसता. असा तो भयंकर भुजंग भूलोकीं येणार्‍या सात दिव्य प्रवाहांच्या मार्गांत आडवा पडून राहिला असतां, हे इंद्रा तूं आपल्या वज्रानें त्याच्या तुस्त शरीरावर प्रहार करून त्याचें विदारण करून टाकलेंस. ॥ ३ ॥


अक्षो॑दय॒च्छव॑सा॒ क्षाम॑ बु॒ध्नं वार्ण वात॒स्तवि॑षीभि॒रिन्द्रः॑ ।
दृ॒ळ्हा न्यौ॑भ्नादु॒शमा॑न॒ ओजोऽ॑वाभिनत्क॒कुभः॒ पर्व॑तानाम् ॥ ४ ॥

अक्षोदयत् शवसा क्षाम बुध्नं वाः न वातः तविषीभिः इंद्रः ।
दृळ्हानि औभ्नात् उशमानः ओजः अव अभिनत् ककुभः पर्वतानां ॥ ४ ॥

झंझावात समुद्राच्या उदकांना आपल्या धुमाळीनें खळबळून सोडतो त्याप्रमाणें इंद्रानेंही आपल्या दणक्यानें पृथ्वीचें सुद्धां तळ हादरून टाकले. आपली अलौकिक तेजस्विता निदर्शनास आणण्याच्या इच्छेनें त्यानें अभेद्य पदार्थ छिन्न भिन्न करून मोठमोठ्या पर्वतांचीही शेखी अगदी जिरवून टाकली. ॥ ४ ॥


अ॒भि प्र द॑द्रु॒र्जन॑यो॒ न गर्भं॒ रथा॑ इव॒ प्र य॑युः सा॒कमद्र॑यः ।
अत॑र्पयो वि॒सृत॑ उ॒ब्ज ऊ॒र्मीन्त्वं वृ॒ताँ अ॑रिणा इन्द्र॒ सिन्धू॑न् ॥ ५ ॥

अभि प्र दद्रुः जनयः न गर्भं रथाऽइव प्र ययुः साकं अद्रयः ।
अतर्पयः विऽसृत उब्ज ऊर्मीन् त्वं वृतान् अरिणाः इंद्र सिंधून् ॥ ५ ॥

स्त्रिया जशा आपल्या तान्हुल्याकडे धांवत जातात तसे मरुत् हे नद्यांच्या मुक्ततेकरितां त्वरेनें धांवून गेले, तेव्हां सुद्धां रथाप्रमाणे मोठ्या वेगानें मागोमाग एकदम तिकडेंच प्रयाण केले. तूं त्या दिव्य जलौघांना आनंदी आनंद करून सोडलेंस, त्यांच्या तरंगलहरींना व्यवस्थित लावून दिलेंस, आणि त्या महानद्या कोंडल्या गेल्या असतां तूं त्यांची मुक्तता केलीस. ॥ ५ ॥


त्वं म॒हीम॒वनिं॑ वि॒श्वधे॑नां तु॒र्वीत॑ये व॒य्याय॒ क्षर॑न्तीम् ।
अर॑मयो॒ नम॒सैज॒दर्णः॑ सुतर॒णाँ अ॑कृणोरिन्द्र॒ सिन्धू॑न् ॥ ६ ॥

त्वं महीं अवनिं विश्वऽधेनां तुर्वीतये वय्याय क्षरंतीं ।
अरमयः नमसा एजत् अर्णः सुऽतरणान् अकृणोः इंद्र सिंधून् ॥ ६ ॥

सर्व जगाचा आधार असा जो एक प्रचंड जलनिर्झर जोरानें वहात आहे त्याच्या खळाळून चाललेल्या धारेला, तुर्वीति आणि वय्य ह्यां भक्तांना तरून जातां यावे म्हणून त्यांच्या विनंतिवरून जागच्याजागीं स्तब्ध केलेंस, आणि हे इंद्रा, दुस्तर महानद्याही सहज उतरून जातां येतील अशा सुगम केल्यास. ॥ ६ ॥


प्राग्रुवो॑ नभ॒न्वो३॑न वक्वा॑ ध्व॒स्रा अ॑पिन्वद्युव॒तीरृ॑त॒ज्ञाः ।
धन्वा॒न्यज्राँ॑ अपृणक्तृषा॒णाँ अधो॒गिन्द्र॑ स्त॒र्यो३॑दंसु॑पत्नीः ॥ ७ ॥

प्र अग्रुवः नभन्वः न वक्वाः ध्वस्राः अपिन्वत् युवतीः ऋतऽज्ञाः ।
धन्वानि अज्रान् अपृणक् तृषाणान् अधोक् इंद्र स्तर्यः दंऽसुपत्नीःत ॥ ७ ॥

वाद्यांप्रमाणे मंजुळ निनाद करणार्‍या परोपकारी सरितांना (उदकांची रेलचेल करून) त्यानें तुडुंब भरून टाकलें व सदाचार प्रवण तरुण कुमारिकांनाही भावी सुखाशेनें त्यानें आनंदपूर्ण केले. पाण्याकरितां हपापलेल्या निर्जल भूमिभागांना त्यानें पर्जन्यवृष्टिकरून तर्र करून सोडले, आणि ज्यांचा नाथ अद्‍भुत कांतिनें अलंकृत आहे अशा दिव्य धेनू व्याला नसतांही त्यांचे दोहन केले. ॥ ७ ॥


पू॒र्वीरु॒षसः॑ श॒रद॑श्च गू॒र्ता वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑सृज॒द्वि सिन्धू॑न् ।
परि॑ष्ठिता अतृणद्बद्ब॒धा॒नाः सी॒रा इन्द्रः॒ स्रवि॑तवे पृथि॒व्या ॥ ८ ॥

पूर्वीः उषसः शरदः च गूर्ताः वृत्रं जघन्वान् असृजत् वि सिंधून् ।
परिऽस्थिताः अतृणत् बद्बतधानाः सीराः इंद्रः स्रवितवे पृथिव्या ॥ ८ ॥

वृत्रास ठार मारून इंद्रने, असंख्य उषा, अनेक मनोरम शरत्काल जे अगदी ग्रस्त होऊन गेले होते त्यांना आणि स्वर्गीय नद्यांनाही बंधमुक्त केले. त्या चोंहोकडून घेरल्या जाऊन अगदीं गांजून गेल्या होत्या, तेव्हां त्या नद्यांनी पृथ्वीवर यथेच्छ विहार करावा म्हणून इंद्रानें त्यांना मार्गास लावून दिलें. ॥ ८ ॥


व॒म्रीभिः॑ पु॒त्रम॒ग्रुवो॑ अदा॒नं नि॒वेश॑नाद्धरिव॒ आ ज॑भर्थ ।
व्य१न्धो अ॑ख्य॒दहि॑माददा॒नो निर्भू॑दुख॒च्छित्सम॑रन्त॒ पर्व॑ ॥ ९ ॥

वम्रीभिः पुत्रं अग्रुवः अदानं निऽवेशनात् हरिऽवः आ जभर्थ ।
वि अंधः अख्यत् अहिं आऽददानः निः भूत् उखऽच्छित् सं अरंत पर्व ॥ ९ ॥

अग्र नामक एका पुत्रास मुंग्यांनी तोड तोडून घेतलें असतां, हे हरिदश्व प्रभो, त्याला तूंच वारुळातून सुखरूप बाहेर काढलेस. बाहेर आणतांच तो आंधळा असतांही त्याला दृष्टि येऊन त्यानें भुजंगास पाहिलें. नंतर ते भांड्यासारखें वारुळ फोडून तो उभा राहिला तोंच त्याचे सर्व सांधे जुळले गेले. ॥ ९ ॥


प्र ते॒ पूर्वा॑णि॒ कर॑णानि विप्रावि॒द्वाँ आ॑ह वि॒दुषे॒ करां॑सि ।
यथा॑यथा॒ वृष्ण्या॑नि॒ स्वगू॒र्तापां॑सि राज॒न्नर्यावि॑वेषीः ॥ १० ॥

प्र ते पूर्वाणि करणानि विप्र आऽविद्वान् आह विदुषे करांसि ।
यथाऽयथा वृष्ण्यानि स्वऽगूर्ता अपांसि राजन् नर्या अविवेषीः ॥ १० ॥

हे बुद्धिमंता, तुझी ती पुरातन चातुर्ययुक्त महत्कृत्यें, आणि हे विश्वाधिपा तूं स्वतःच्याच प्रेरणेने केलेली पराक्रमपूर्ण लोकहितकर सत्कृत्यें हीं तूं जसजशी निदर्शनास आणलीस तसतशींच ती मी माहिती करून घेऊन विद्वज्जनांपुढे वर्णन करीत आहे. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २० ( इंद्र सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


आ न॒ इन्द्रो॑ दू॒रादा न॑ आ॒साद॑भिष्टि॒कृदव॑से यासदु॒ग्रः ।
ओजि॑ष्ठेभिर्नृ॒पति॒र्वज्र॑बाहुः सं॒गे स॒मत्सु॑ तु॒र्वणिः॑ पृत॒न्यून् ॥ १ ॥

आ नः इंद्रः दूरात् आ नः आसात् अभिष्टिऽकृत् अवसे यासत् उग्रः ।
ओजिष्ठेभिः नृऽपतिः वज्रऽबाहुः संऽगे समत्ऽसु तुर्वणिः पृतन्यून् ॥ १ ॥

आम्हांस सर्वतोपरी सहाय्य करणारा परंतु उग्ररूप इंद्र त्या दूरच्या स्वर्ग लोकापासून किंवा ह्या जवळच्या भूलोकापासून आमच्या संरक्षणार्थ आम्हांकडे येवो. तो सर्व जगताचा राजा आहे, त्याचे भुजदंड वज्राप्रमाणे दणकट असून द्वंद्वयुद्धांत अथवा घोर संग्रामांत आंगावर चाल करून येणार्‍या शत्रूंचा तो अत्यंत प्रखर तेजांनी हां हां म्हणतां नाश करून टाकतो. ॥ १ ॥


आ न॒ इन्द्रो॒ हरि॑भिर्या॒त्वच्छा॑र्वाची॒नोऽ॑वसे॒ राध॑से च ।
तिष्ठा॑ति व॒ज्री म॒घवा॑ विर॒प्शीमं य॒ज्ञमनु॑ नो॒ वाज॑सातौ ॥ २ ॥

आ नः इंद्रः हरिऽभिः यातु अच्छ अर्वाचीनः अवसे राधसे च ।
तिष्ठाति वज्री मघऽवा विऽरप्शी इमं यज्ञं अनु नः वाजऽसातौ ॥ २ ॥

आम्हाला अभिमुख झालेला इंद्र आमचें संरक्षण करण्याकरितां आणि आम्हांवर आपला कृपाप्रसाद करण्याकरितां आपले हरिद्वर्ण अश्व जोडून आमच्याकडे येवो. तो वज्रधर, षडैश्वर्यसंपन्न जगड्व्याल भगवान सर्व सामर्थ्य प्राप्तिच्या ह्या प्रसंगी आमचा यज्ञ आपण स्वतः जवळ राहून सिद्धिस नेवो. ॥ २ ॥


इ॒मं य॒ज्ञं त्वम॒स्माक॑मिन्द्र पु॒रो दध॑त्सनिष्यसि॒ क्रतुं॑ नः ।
श्व॒घ्नीव॑ वज्रिन् स॒नये॒ धना॑नां॒ त्वया॑ व॒यम् अ॒र्य आ॒जिं ज॑येम ॥ ३ ॥

इमं यज्ञं त्वं अस्माकं इंद्र पुरः दधत् सनिष्यसि क्रतुं नः ।
श्वघ्नीऽइव वज्रिन् सनये धनानां त्वया वयं अर्य आजिं जयेम ॥ ३ ॥

इंद्रा, ह्या आमच्या यज्ञाचा तूं पुरस्कर्ता होऊन आम्हाला कर्तृत्वशक्ति प्राप्त करून देशीलच ह्यांत संशय नाही, परंतु हे वज्रधरा, अभीष्ट प्राप्तिसाठी तुझ्या सहायानें, आम्ही पारध्याप्रमाणे टपून राहून व ऐनवेळीं शत्रूंवर बाण मारून जय मिळवूं असें कर. ॥ ३ ॥


उ॒शन्नु॒ षु णः॑ सु॒मना॑ उपा॒के सोम॑स्य॒ नु सुषु॑तस्य स्वधावः ।
पा इ॑न्द्र॒ प्रति॑भृतस्य॒ मध्वः॒ समन्ध॑सा ममदः पृ॒ष्ठ्येन ॥ ४ ॥

उशन् ऊं इति सु णः सुऽमना उपाके सोमस्य नु सुऽसुतस्य स्वधाऽवः ।
पाः इंद्र प्रतिऽभृतस्य मध्वः सं अंधसा ममदः पृष्ठ्येन ॥ ४ ॥

औत्सुक्याने आणि प्रसन्न चित्तानें आम्ही जवळ बसून ह्या उत्तम रीतीनें पिळून तयार करून तुला सादर अर्पण केलेल्या मधुर सोमरसाचा तूं आस्वाद घे. हे स्वतंत्र शक्ते देवा, पर्वताच्या शिखरावरून आणलेल्या वल्लीच्या ह्या उत्कृष्ट पेयापासून आनंद भरित हो. ॥ ४ ॥


वि यो र॑र॒प्श ऋषि॑भि॒र्नवे॑भिर्वृ॒क्षो न प॒क्वः सृण्यो॒ न जेता॑ ।
मर्यो॒ न योषा॑म॒भि मन्य॑मा॒नोऽ॑च्छा विवक्मि पुरुहू॒तमिन्द्र॑म् ॥ ५ ॥

वि यः ररप्शे ऋषिऽभिः नवेभिः वृक्षः न पक्वः सृण्यः न जेता ।
मर्यः न योषां अभि मन्यमानः अच्छ विवक्मि पुरुऽहूतं इंद्रं ॥ ५ ॥

नऊ ऋषिंच्या स्तवनानें ज्याचें गौरव पल्लवित झाले आहे, पक्वफलादिकांनी डबरलेल्या वृक्षाप्रमाणें किंवा आयुधांनिशी सज्ज होऊन बसलेल्या कुशल योद्ध्याप्रमाणें जो आदरणीय आहे, मुग्ध रमणींच्या अभिनंदनाचा स्वीकार करणार्‍या वीराप्रमाणे जो शोभतो अशा त्या सर्वजन पूज्य इंद्राला मीं परोपरीनें आळवीत असतो. ॥ ५ ॥


गि॒रिर्न यः स्वत॑वाँ ऋ॒ष्व इन्द्रः॑ स॒नादे॒व सह॑से जा॒त उ॒ग्रः ।
आद॑र्ता॒ वज्रं॒ स्थवि॑रं॒ न भी॒म उ॒द्नेव॒ कोशं॒ वसु॑ना॒ न्यृष्टम् ॥ ६ ॥

गिरिः न यः स्वऽतवान् ऋष्वः इंद्रः सनात् एव सहसे जातः उग्रः ।
आऽदर्ता वज्रं स्थविरं न भीमः उद्नाऽइव कोशं वसुना निऽऋष्टं ॥ ६ ॥

पर्वताप्रमाणें स्वतःच्याच बलानें विभूषित असा हा उदात्त चारित्र्य परंतु उग्ररूप इंद्र, अनादिकालापासूनच दुष्टांचे दमन करण्याकरितां प्रकट झाला आहे. ह्या भयानक इंद्र देवानें आपले पुरातन वज्र हातीं घेऊन त्याचा अंगिकार केला असून, एखादा जलाशय पाण्यानें तुडुंब भरलेला असावा त्याप्रमाणें हा भगवंत दिव्यधनानें ओतप्रोत भरून राहिला आहे. ॥ ६ ॥


न यस्य॑ व॒र्ता ज॒नुषा॒ न्वस्ति॒ न राध॑स आमरी॒ता म॒घस्य॑ ।
उ॒द्वा॒वृ॒षा॒णस्त॑विषीव उग्रा॒स्मभ्यं॑ दद्धि पुरुहूत रा॒यः ॥ ७ ॥

न यस्य वर्ता जनुषा नु अस्ति न राधस आऽमरीता मघस्य ।
उत्ऽववृषाणः तविषीऽवः उग्र अस्मभ्यं दद्धि पुरुऽहूत रायः ॥ ७ ॥

तुझें निवारण करणारा असा कोणी जन्मलाच नाही. तुझ्या कृपाधनाला आणि अपार औदार्याला विघात करणारा असाही कोणी असूं शकणार नाही. तूं भक्तांवर मनोरथांची अपरिमित वृष्टि करणारा आहेस तर हे उग्रा, हे उत्कृष्ट शौर्यशाली वीरा, पुरूहूता आम्हाला तुझे ते ऐश्वर्य अर्पण कर. ॥ ७ ॥


ईक्षे॑ रा॒यः क्षय॑स्य चर्षणी॒नामु॒त व्र॒जम॑पव॒र्तासि॒ गोना॑म् ।
शि॒क्षा॒न॒रः स॑मि॒थेषु॑ प्र॒हावा॒न्वस्वो॑ रा॒शिम॑भिने॒तासि॒ भूरि॑म् ॥ ८ ॥

ईक्षे रायः क्षयस्य चर्षणीनां उत व्रजं अपऽवर्ता असि गोनां ।
शिक्षाऽनरः संऽइथेषु प्रहाऽवान् वस्वः राशिं अभिऽनेता असि भूरिं ॥ ८ ॥

दिव्य ऐश्वर्याचा, व चराचरजीवांच्या ह्या अधिष्ठानाचा मालक तूं आहेस, आणि प्रकाश धेनूंचा समूह मुक्त करणाराही तूंच आहेस. औदार्यशाली जनांत श्रेष्ठ तूं, संग्रामामध्यें युद्ध करून यश संपादन करणारा तूंच आणि उत्कृष्ट संपत्तिच्या अपार राशिकडे भक्तांना घेऊन जाणाराही तूंच. ॥ ८ ॥


कया॒ तच्छृ॑ण्वे॒ शच्या॒ शचि॑ष्ठो॒ यया॑ कृ॒णोति॒ मुहु॒ का चि॑द् ऋ॒ष्वः ।
पु॒रु दा॒शुषे॒ विच॑यिष्ठो॒ अंहोऽ॑था दधाति॒ द्रवि॑णं जरि॒त्रे ॥ ९ ॥

कया तत् शृण्वे शच्या शचिष्ठः यया कृणोति मुहु का चित् ऋष्वः ।
पुरु दाशुषे विऽचयिष्ठः अंहः अथा दधाति द्रविणं जरित्रे ॥ ९ ॥

जिच्या योगाने हा उदात्त चारित्र्य भगवान वारंवार असेच पराक्रम करतो अशा कोणत्या दिव्यशक्तिमुळें हा पराकाष्टेचा सामर्थ्यवान अशी ह्याची प्रख्याति झाली आहे ? हवि अर्पण करणार्‍या भक्ताचे पातक पुष्कळ असले तरी तो त्या पातकांचा सर्वस्वी क्षय करतो आणि भगवत्स्तवन करणार्‍या पुरुषाला सामर्थ्य संपत्ति देतो. ॥ ९ ॥


मा नो॑ मर्धी॒रा भ॑रा द॒द्धि तन्नः॒ प्र दा॒शुषे॒ दात॑वे॒ भूरि॒ यत्ते॑ ।
नव्ये॑ दे॒ष्णे श॒स्ते अ॒स्मिन्त॑ उ॒क्थे प्र ब्र॑वाम व॒यमि॑न्द्र स्तु॒वन्तः॑ ॥ १० ॥

मा नः मर्धीः आ भर दद्धि तन् नः प्र दाशुषे दातवे भूरि यत् ते ।
नव्ये देष्णे शस्ते अस्मिन् ते उक्थे प्र ब्रवाम वयं इंद्र स्तुवंतः ॥ १० ॥

आमचा वध करूं नको; हविर्दान तत्पर यजमानाला देण्याकरितां जे दिव्यधन तुजपाशी विपुल आहे तें घेऊन ये आणि आम्हांस अर्पण कर. हा अपरूप हविर्भाग आम्ही अर्पण केल्यावर आणि हें सामसूक्त तुझ्या प्रित्यर्थ गायिल्यावर, हे इंद्रा, आम्ही तुझे स्तवन व प्रार्थना करूं. ॥ १० ॥


नू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः ।
अका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥

नु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः ।
अकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना ? तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥


ॐ तत् सत्


GO TOP