PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ५१ ते ६२

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५१ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - जगती, त्रिष्टुप्, गायत्री


च॒र्ष॒णी॒धृतं॑ म॒घवा॑नमु॒क्थ्य१मिन्द्रं॒ गिरो॑ बृह॒तीर॒भ्यनूषत ।
वा॒वृ॒धा॒नं पु॑रुहू॒तं सु॑वृ॒क्तिभि॒रम॑र्त्यं॒ जर॑माणं दि॒वेदि॑वे ॥ १ ॥

चर्षणीधृतं मघऽवानमुक्थ्य१मिंद्रं गिरः बृहतीरभ्यनूषत ।
वावृधानं पुरुहूतं सुवृक्तिभिरमर्त्यं जरमाणं दिवेदिवे ॥ १ ॥

मनुष्यांचे पोषण करणारा, उदार, स्तुत्य, वृद्धि पावणारा, अनेकांनी स्वरक्षणार्थ बोलाविलेला, मृत्युरहित आणि प्रत्येक दिवशीं ज्याचें स्तवन चाललेलें असतें असा जो इंद्र, त्याचें पूजनांत अनेक दीर्घ स्तोत्रें मग्न झालेली आहेत. ॥ १ ॥


श॒तक्र॑तुमर्ण॒वं शा॒किनं॒ नरं॒ गिरो॑ म॒ इन्द्र॒मुप॑ यन्ति वि॒श्वतः॑ ।
वा॒ज॒सनिं॑ पू॒र्भिदं॒ तूर्णि॑म॒प्तुरं॑ धाम॒साच॑मभि॒षाचं॑ स्व॒र्विद॑म् ॥ २ ॥

शतक्रतुमर्णवं शाकिनं नरं गिरः म इंद्रमुप यंति विश्वतः ।
वाजसनिं पूर्भिदं तूर्णिमप्तुरं धामसाचमभिषाचं स्वर्विदम् ॥ २ ॥

अत्यंत प्रज्ञावान, सर्वांचे आश्रयस्थान, प्रबळ, पराक्रमी, धन अर्पण करणारा, आपल्या निवासस्थानांत राहणारा, शत्रूंचा पराभव करणारा आणि स्वर्गाची प्राप्ति करून देणारा जो इंद्र, त्याचेकडे माझीं सर्व स्तोत्रें सर्व दिशांकडून जात आहेत. ॥ २ ॥


आ॒क॒रे वसो॑र्जरि॒ता प॑नस्यतेऽने॒हसः॒ स्तुभ॒ इन्द्रो॑ दुवस्यति ।
वि॒वस्व॑तः॒ सद॑न॒ आ हि पि॑प्रि॒ये स॑त्रा॒साह॑मभिमाति॒हनं॑ स्तुहि ॥ ३ ॥

आकरे वसोर्जरिता पनस्यतेऽनेहसः स्तुभ इंद्रः दुवस्यति ।
विवस्वतः सदन आ हि पिप्रिये सत्रासाहमभिमातिहनं स्तुहि ॥ ३ ॥

वैभवाचा जणूं संचयच अशा ह्या इंद्रामुळें स्तोत्याची प्रशंसा होते. पातकाचा ज्यांत अंशही नाहीं अशा स्तुतीचा इंद्र स्वीकार करतो व भक्ताचे घरीं तो संतोष पावतो. ह्यासाठीं सर्व शत्रूंचा पराभव करणार्‍या आणि गर्विष्ठ वैर्‍यांचा वध करणार्‍या इंद्राची तूं स्तुति गात जा. ॥ ३ ॥


नृ॒णामु॑ त्वा॒ नृत॑मं गी॒र्भिरु॒क्थैर॒भि प्र वी॒रम॑र्चता स॒बाधः॑ ।
सं सह॑से पुरुमा॒यो जि॑हीते॒ नमो॑ अस्य प्र॒दिव॒ एक॑ ईशे ॥ ४ ॥

नृणामु त्वा नृतमं गीर्भिरुक्थैरभि प्र वीरमर्चता सबाधः ।
सं सहसे पुरुमायः जिहीते नमः अस्य प्रदिव एक ईशे ॥ ४ ॥

तूं शूरांत अत्यंत श्रेष्ठ असा वीर असल्यामुळें तुला अनेक स्तुतिस्तोत्रांनी भक्तांनी आळविले आहे. अनेक चमत्कारांत प्रवीण असलेला हा इंद्र आपलें सामर्थ्य प्रकट करण्याकरितां येत असतो, त्यास नमन असो. पुरातन कालापासून तो एकटाच ह्या जगावर सत्ता चालवीत आहे. ॥ ४ ॥


पू॒र्वीर॑स्य नि॒ष्षिधो॒ मर्त्ये॑षु पु॒रू वसू॑नि पृथि॒वी बि॑भर्ति ।
इन्द्रा॑य॒ द्याव॒ ओष॑धीरु॒तापो॑ र॒यिं र॑क्षन्ति जी॒रयो॒ वना॑नि ॥ ५ ॥

पूर्वीरस्य निष्षिधः मर्त्येषु पुरू वसूनि पृथिवी बिभर्ति ।
इंद्रय द्याव ओषधीरुतापः रयिं रक्षंति जीरयः वनानि ॥ ५ ॥

मानवांपुढे त्याचे अनेक पराक्रम झालेले आहेत. त्याच्या कृपेचीं अनेक फळें पृथिवी धारण करते. द्युलोक, ओषधी, उदकें, मनुष्यें आणि अरण्यें त्याच्याच संपत्तिचें रक्षण करीत असतात. ॥ ५ ॥


तुभ्यं॒ ब्रह्मा॑णि॒ गिर॑ इन्द्र॒ तुभ्यं॑ स॒त्रा द॑धिरे हरिवो जु॒षस्व॑ ।
बो॒ध्या१पिरव॑सो॒ नूत॑नस्य॒ सखे॑ वसो जरि॒तृभ्यो॒ वयो॑ धाः ॥ ६ ॥

तुभ्यं ब्रह्माणि गिर इंद्र तुभ्यं सत्रा दधिरे हरिवः जुषस्व ।
बोध्या१पिरवसः नूतनस्य सखे वसः जरितृभ्यः वयः धाः ॥ ६ ॥

हे पीतवर्ण अश्वांवर आरूढ होणार्‍या इंद्रा, तुला नेहमीं स्तुतिस्तोत्रें अर्पण होत असतात त्यांचा तूं स्वीकार कर. तूं नूतन अनुग्रह आप्त हो. हे आमचेविषयीं स्नेहबुद्धी बाळगणार्‍या देदेप्यमान देवा, तुझ्या उपासकांचे तूं आयुष्य वर्धन कर. ॥ ६ ॥


इन्द्र॑ मरुत्व इ॒ह पा॑हि॒ सोमं॒ यथा॑ शार्या॒ते अपि॑बः सु॒तस्य॑ ।
तव॒ प्रणी॑ती॒ तव॑ शूर॒ शर्म॒न्ना वि॑वासन्ति क॒वयः॑ सुय॒ज्ञाः ॥ ७ ॥

इंद्र मरुत्व इह पाहि सोमं यथा शार्याते अपिबः सुतस्य ।
तव प्रणीती तव शूर शर्मन्ना विवासंति कवयः सुयज्ञाः ॥ ७ ॥

मरुतांसहवर्तमान येणार्‍या हे इंद्रा, तूं ज्यप्रमाणें पूर्वीं शार्याताच्या घरी सोम प्राशन केलेंस त्याप्रमाणें येथेंही सोम पी. हे शूरा, तुझ्या नेतृत्वाखालीं व तुझ्या आश्रयास उत्तम यज्ञ करणारे विद्वान लोक येऊन राहात असतात. ॥ ७ ॥


स वा॑वशा॒न इ॒ह पा॑हि॒ सोमं॑ म॒रुद्‌भि॑रिन्द्र॒ सखि॑भिः सु॒तं नः॑ ।
जा॒तं यत्त्वा॒ परि॑ दे॒वा अभू॑षन्म॒हे भरा॑य पुरुहूत॒ विश्वे॑ ॥ ८ ॥

स वावशान इह पाहि सोमं मरुद्‌भिरिंद्र सखिभिः सुतं नः ।
जातं यत्त्वा परि देवा अभूषन्महे भराय पुरुहूत विश्वे ॥ ८ ॥

हे इंद्र, तुझे मित्र जे मरुत् त्यांसह प्रेमानें हा आमचा सोम येथें ये आणि पी. अनेक भक्तांकडून ज्यास हांक मारण्यांत येते अशा हे इंद्रा, तुझा जन्म झाल्याबरोबर सर्व देवांनी तुला मोठें युद्ध करण्यासाठीं सज्ज केलें. ॥ ८ ॥


अ॒प्तूर्ये॑ मरुत आ॒पिरे॒षोऽ॑मन्द॒न्निन्द्र॒मनु॒ दाति॑वाराः ।
तेभिः॑ सा॒कं पि॑बतु वृत्रखा॒दः सु॒तं सोमं॑ दा॒शुषः॒ स्वे स॒धस्थे॑ ॥ ९ ॥

अप्तूर्ये मरुत आपिरेषोऽमंदन्निंद्रमनु दातिवाराः ।
तेभिः साकं पिबतु वृत्रखादः सुतं सोमं दाशुषः स्वे सधस्थे ॥ ९ ॥

हे मरुतांनो, शत्रुहिंसेच्या कामीं इंद्र तुमचा मित्र होय. हे उदार मरुत् इंद्रास पाहून आनंदित झाले. हा वृत्रनाशक इंद्र त्याचे करितां तयार करून ठेवलेल्या सोमरसाचें भक्तांच्या स्वतःच्या यज्ञमंडपांत प्राशन करो. ॥ ९ ॥


इ॒दं ह्यन्वोज॑सा सु॒तं रा॑धानां पते । पिबा॒ त्व१स्य गि॑र्वणः ॥ १० ॥

इदं ह्यन्वोजसा सुतं राधानां पते । पिबा त्व१स्य गिर्वणः ॥ १० ॥

हे वैभवांचे अधिपति, तुझ्या सामर्थ्यास शोभेल असा हा सोमरस आम्ही तयार करून ठेवला आहे. हे स्तुतिप्रिय इंद्रा त्याचें तूं सत्वर प्राशन कर. ॥ १० ॥


यस्ते॒ अनु॑ स्व॒धामस॑त्सु॒ते नि य॑च्छ त॒न्वम् । स त्वा॑ ममत्तु सो॒म्यम् ॥ ११ ॥

यस्ते अनु स्वधामसत्सुते नि यच्छ तन्वम् । स त्वा ममत्तु सोम्यम् ॥ ११ ॥

हा सोमरस तुझ्या सामर्थ्यास शोभणारा आहे. ह्या रसांत तूं आपलें मुख बुडव. तूं सोमप्रिय असल्यामुळें तो तुला आनंद देवो. ॥ ११ ॥


प्र ते॑ अश्नोतु कु॒क्ष्योः प्रेन्द्र॒ ब्रह्म॑णा॒ शिरः॑ । प्र बा॒हू शू॑र॒ राध॑से ॥ १२ ॥

प्र ते अश्नोतु कुक्ष्योः प्रेंद्र ब्रह्मणा शिरः । प्र बाहू शूर राधसे ॥ १२ ॥

तो तुझें उदर भरो. हे इंद्रा, ह्या स्तोत्राच्या योगानें तो तुझ्या मस्तकापर्यंत जाऊन पोहोंचो. तुझी आम्हांवर कृपा व्हावी म्हणून तो तुझ्या बाहूंपर्यंत उचंबळून येवो. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५२ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - जगती, त्रिष्टुप्, गायत्री


धा॒नाव॑न्तं कर॒म्भिण॑मपू॒पव॑न्तम् उ॒क्थिन॑म् । इन्द्र॑ प्रा॒तर्जु॑षस्व नः ॥ १ ॥

धानावंतं करम्भिणमपूपवंतम् उक्थिनम् । इंद्र प्रातर्जुषस्व नः ॥ १ ॥

लाह्या, करंभ आणि अपूप ह्यांनी मिश्रित व स्तोत्रांसह अर्पण केलेल्या ह्या आमच्या सोमरसाचें प्रातःकालीं सेवन कर. ॥ १ ॥


पु॒रो॒ळाशं॑ पच॒त्यं जु॒षस्वे॒न्द्रा गु॑रस्व च । तुभ्यं॑ ह॒व्यानि॑ सिस्रते ॥ २ ॥

पुरोळाशं पचत्यं जुषस्वेंद्रा गुरस्व च । तुभ्यं हव्यानि सिस्रते ॥ २ ॥

हे इंद्रा, उत्तम तऱ्हेने शिजवून तयार केलेल्या ह्या पुरोडाशाचा स्वीकार कर आणि त्याची प्रशंसा कर. हे कवि तुझेकडे चालले आहेत. ॥ २ ॥


पु॒रो॒ळाशं॑ च नो॒ घसो॑ जो॒षया॑से॒ गिर॑श्च नः । व॒धू॒युरि॑व॒ योष॑णाम् ॥ ३ ॥

पुरोळाशं च नः घसः जोषयासे गिरश्च नः । वधूयुरिव योषणाम् ॥ ३ ॥

ह्या आमच्या पुरोडाशाचें भक्षण कर आणि ज्यांप्रमाणे स्त्रीसहवासाची इच्छा धरणारा पुरुष स्त्रीची सेवा घेतो त्याप्रमाणे आमच्या स्तुतींची सेवा घे. ॥ ३ ॥


पु॒रो॒ळाशं॑ सनश्रुत प्रातःसा॒वे जु॑षस्व नः । इन्द्र॒ क्रतु॒र्हि ते॑ बृ॒हन् ॥ ४ ॥

पुरोळाशं सनश्रुत प्रातःसावे जुषस्व नः । इंद्र क्रतुर्हि ते बृहन् ॥ ४ ॥

सनातन कालापासून प्रख्यात असलेल्या हे इंद्रदेवा, प्रातःकालचे यागसमयीं आमच्या पुरोडाशाचा स्वीकार कर. खरोखर, तुझें सामर्थ्य मोठें आहे. ॥ ४ ॥


माध्यं॑दिनस्य॒ सव॑नस्य धा॒नाः पु॑रो॒ळाश॑मिन्द्र कृष्वे॒ह चारु॑म् ।
प्र यत्स्तो॒ता ज॑रि॒ता तूर्ण्य॑र्थो वृषा॒यमा॑ण॒ उप॑ गी॒र्भिरीट्टे॑ ॥ ५ ॥

माध्यंदिनस्य सवनस्य धानाः पुरोळाशमिंद्र कृष्वेह चारुम् ।
प्र यत्स्तोता जरिता तूर्ण्यर्थः वृषायमाण उप गीर्भिरीट्टे ॥ ५ ॥

मध्यान्हकालच्या ज्या यागाचे वेळीं लगबगींत असलेला व उत्सुक झालेला उपासक अनेक स्तोत्रांनी तुझें स्तवन करतो त्या यागसमयीं आमच्या लाह्या आणि पुरोडाश चांगले होतील असें कर. ॥ ५ ॥


तृ॒तीये॑ धा॒नाः सव॑ने पुरुष्टुत पुरो॒ळाश॒माहु॑तं मामहस्व नः ।
ऋ॒भु॒मन्तं॒ वाज॑वन्तं त्वा कवे॒ प्रय॑स्वन्त॒ उप॑ शिक्षेम धी॒तिभिः॑ ॥ ६ ॥

तृतीये धानाः सवने पुरुष्टुत पुरोळाशमाहुतं मामहस्व नः ।
ऋभुमंतं वाजवंतं त्वा कवे प्रयस्वंत उप शिक्षेम धीतिभिः ॥ ६ ॥

अनेकांच्या स्तुतीस पात्र झालेल्या हे इंद्रा, तिसर्‍या यागप्रसंगी अर्पण केलेल्या आमच्या लाह्यांचा व पुरोडाशाचा सन्मानानें स्वीकार कर. हवि अर्पण करणारे आम्ही भक्तजन ऋभु आणि वाज ह्यांचेसह तुझी अनेक स्तोत्रें गाऊन सेवा करूं. ॥ ६ ॥


पू॒ष॒ण्वते॑ ते चकृमा कर॒म्भं हरि॑वते॒ हर्य॑श्वाय धा॒नाः ।
अ॒पू॒पम॑द्धि॒ सग॑णो म॒रुद्‌भिः॒ सोमं॑ पिब वृत्र॒हा शू॑र वि॒द्वान् ॥ ७ ॥

पूषण्वते ते चकृमा करम्भं हरिवते हर्यश्वाय धानाः ।
अपूपमद्धि सगणः मरुद्‌भिः सोमं पिब वृत्रहा शूर विद्वान् ॥ ७ ॥

पूषा देवासह येथे प्राप्त झालेला जो तूं त्या तुझ्याकरितां आम्ही करंभ केला आहे. पीतवर्ण अश्वांचा स्वामी व पीतवर्ण अश्वांवर आरूढ होऊन येणार्‍या तुझ्यासाठी आम्ही लाह्या तयार केल्या आहेत. मरुतांसह येथें येऊन अपूपाचें भक्षण कर. हे शूरा, तूं वृत्राचा वध करणारा व ज्ञानसंपन्न असल्यामुळें हा सोमरस पी. ॥ ७ ॥


प्रति॑ धा॒ना भ॑रत॒ तूय॑मस्मै पुरो॒ळाशं॑ वी॒रत॑माय नृ॒णाम् ।
दि॒वेदि॑वे स॒दृशी॑रिन्द्र॒ तुभ्यं॒ वर्ध॑न्तु त्वा सोम॒पेया॑य धृष्णो ॥ ८ ॥

प्रति धाना भरत तूयमस्मै पुरोळाशं वीरतमाय नृणाम् ।
दिवेदिवे सदृशीरिंद्र तुभ्यं वर्धंतु त्वा सोमपेयाय धृष्णः ॥ ८ ॥

शूरांमध्यें अत्यंत श्रेष्ठ अशा ह्या देवास लवकर लाह्या व पुरोडाश अर्पण करा. शत्रूचें दाणादाण उडविणार्‍या हे इंद्रा, रोजरोज अशाच लाह्या तुला अर्पण करण्यांत येतात त्या तुला सोमप्राशनाकरितां उत्साह उत्पन्न करोत. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५३ (अनेक देवता सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - जगती, त्रिष्टुप्, गायत्री, अनुष्टुप्, बृहती


इन्द्रा॑पर्वता बृह॒ता रथे॑न वा॒मीरिष॒ आ व॑हतं सु॒वीराः॑ ।
वी॒तं ह॒व्यान्य॑ध्व॒रेषु॑ देवा॒ वर्धे॑थां गी॒र्भिरिळ॑या॒ मद॑न्ता ॥ १ ॥

इंद्रपर्वता बृहता रथेन वामीरिष आ वहतं सुवीराः ।
वीतं हव्यान्यध्वरेषु देवा वर्धेथां गीर्भिरिळया मदंता ॥ १ ॥

हे इंद्र आणि पर्वतहो, तुम्ही आपले रथांत बसून येऊन, रमणीय व शूर सैनिकांचा उत्तम लाभ घडविणारी अशी वैभवें घेऊन या. हे देदीप्यमान देवांनो, तुम्ही यज्ञांत हवि भक्षण करा; स्तुतींच्या योगानें सामर्थ्यवान व्हा व आमच्या आहुतींत आनंद माना. ॥ १ ॥


तिष्ठा॒ सु कं॑ मघव॒न्मा परा॑ गाः॒ सोम॑स्य॒ नु त्वा॒ सुषु॑तस्य यक्षि ।
पि॒तुर्न पु॒त्रः सिच॒मा र॑भे त॒ इन्द्र॒ स्वादि॑ष्ठया गि॒रा श॑चीवः ॥ २ ॥

तिष्ठा सु कं मघऽवन्मा परा गाः सोमस्य नु त्वा सुषुतस्य यक्षि ।
पितुर्न पुत्रः सिचमा रभे त इंद्र स्वादिष्ठया गिरा शचीवः ॥ २ ॥

हे उदार देवा, तूं येथें रहा. जाऊं नको. उत्तम तऱ्हेने पिळून काढलेला सोमरस मी आत्तांच तुला अर्पण करीन. हे सामर्थ्यवान इंद्रा, पुत्र पित्याचा पदर धरितो त्याप्रमाणें अत्यंत मधुर स्तोत्राचें गायन करीत मी तुझा पदर धरतो. ॥ २ ॥


शंसा॑वाध्वर्यो॒ प्रति॑ मे गृणी॒हीन्द्रा॑य॒ वाहः॑ कृणवाव॒ जुष्ट॑म् ।
एदम् ब॒र्हिर्यज॑मानस्य सी॒दाथा॑ च भूदु॒क्थमिन्द्रा॑य श॒स्तम् ॥ ३ ॥

शंसावाध्वर्यः प्रति मे गृणीहींद्रय वाहः कृणवाव जुष्टम् ।
एदम् बर्हिर्यजमानस्य सीदाथा च भूदुक्थमिंद्रय शस्तम् ॥ ३ ॥

हे अध्वर्यु, आपण दोघे स्तुति करूं या. तूं मला शाबासकी दे. इंद्राला आवडेल असें स्तोत्र आपण म्हणूं या. यजमानाच्या ह्या दर्भावर तूं येऊन बैस. इंद्राप्रित्यर्थ उत्तम स्तोत्र झालें पाहिजे. ॥ ३ ॥


जा॒येदस्तं॑ मघव॒न्सेदु॒ योनि॒स्तदित्त्वा॑ यु॒क्ता हर॑यो वहन्तु ।
य॒दा क॒दा च॑ सु॒नवा॑म॒ सोम॑म॒ग्निष्ट्वा॑ दू॒तो ध॑न्वा॒त्यच्छ॑ ॥ ४ ॥

जायेदस्तं मघऽवन्सेदु योनिस्तदित्त्वा युक्ता हरयः वहंतु ।
यदा कदा च सुनवाम सोममग्निष्ट्वा दूतः धन्वात्यच्छ ॥ ४ ॥

हे उदार देवा, पत्‍नी म्हणजे प्रत्यक्ष घरच. तेच मनुष्याचे विश्रांतीस्थान. ह्यासाठी तुझ्या रथास जोडलेले तुझे घोडे तुला तेथेंच घेऊन जावोत. आम्ही जेव्हां जेव्हां सोमरस तयार करूं त्या वेळीं अग्नि दूत होऊन तुझ्याकडे धांवत जावो. ॥ ४ ॥


परा॑ याहि मघव॒न्ना च॑ या॒हीन्द्र॑ भ्रातरुभ॒यत्रा॑ ते॒ अर्थ॑म् ।
यत्रा॒ रथ॑स्य बृह॒तो नि॒धानं॑ वि॒मोच॑नं वा॒जिनो॒ रास॑भस्य ॥ ५ ॥

परा याहि मघऽवन्ना च याहींद्र भ्रातरुभयत्रा ते अर्थम् ।
यत्रा रथस्य बृहतः निधानं विमोचनं वाजिनः रासभस्य ॥ ५ ॥

हे उदार देवा, तूं जा आणि पुन्हा ये. हे प्रिय भ्रात्या , हे इंद्रा, दोन्ही ठिकाणीं तुझें काम आहे. दोन्ही ठिकाणें तुझा भव्य रथ धांवत असतो व दोन्ही ठिकाणीं तुझा खिंकाळणारा घोडा सुटत असतो. ॥ ५ ॥


अपाः॒ सोम॒मस्त॑मिन्द्र॒ प्र या॑हि कल्या॒णीर्जा॒या सु॒रणं॑ गृ॒हे ते॑ ।
यत्रा॒ रथ॑स्य बृह॒तो नि॒धानं॑ वि॒मोच॑नं वा॒जिनो॒ दक्षि॑णावत् ॥ ६ ॥

अपाः सोममस्तं इंद्र प्र याहि कल्याणीर्जाया सुरणं गृहे ते ।
यत्रा रथस्य बृहतः निधानं विमोचनं वाजिनः दक्षिणावत् ॥ ६ ॥

इंद्रा, सोमरस पी व घरी जा. तुझे घरीं तुझे गृहसौख्य - तुझी चांगली स्त्री - आहे. तुझा भव्य रथ तेथेंच थांबत असतो आणि तेथेंच तुझा घोडा सुटुन त्याची सुरेख व्यवस्था लागत असते. ॥ ६ ॥


इ॒मे भो॒जा अङ्गि॑रसो॒ विरू॑पा दि॒वस्पु॒त्रासो॒ असु॑रस्य वी॒राः ।
वि॒श्वामि॑त्राय॒ दद॑तो म॒घानि॑ सहस्रसा॒वे प्र ति॑रन्त॒ आयुः॑ ॥ ७ ॥

इमे भोजा अङ्गिरसः विरूपा दिवस्पुत्रासः असुरस्य वीराः ।
विश्वामित्राय ददतः मघानि सहस्रसावे प्र तिरंत आयुः ॥ ७ ॥

हे भोज, अंगिरस, विरूप, हे द्युलोकाचे पुत्र व हे असुराचे वीर सैनिक विश्वामित्राला हजारों यज्ञांत वैभवें अर्पण करून त्याचें आयुष्य वाढवोत. ॥ ७ ॥


रू॒पंरू॑पं म॒घवा॑ बोभवीति मा॒याः कृ॑ण्वा॒नस्त॒न्वं१परि॒ स्वाम् ।
त्रिर्यद्दि॒वः परि॑ मुहू॒र्तमागा॒त्स्वैर्मन्त्रै॒रनृ॑तुपा ऋ॒तावा॑ ॥ ८ ॥

रूपंरूपं मघऽवा बोभवीति मायाः कृण्वानस्तन्वं१परि स्वाम् ।
त्रिर्यद्दिवः परि मुहूर्तमागात्स्वैर्मंत्रैरनृतुपा ऋतावा ॥ ८ ॥

हा उदार देव स्वतःच्या शरीरसमर्थ्याच्या योगानें, अनेक निरनिराळीं रूपें धारण करतो. योग्य समय नसतांनासुद्धां आपल्याच इच्छेनें सोमाचें पान करणारा हा सत्यनिष्ठ देव रोज द्युलोकाहून तीन वेळां एका क्षणांत येऊं शकतो. ॥ ८ ॥


म॒हाँ ऋषि॑र्देव॒जा दे॒वजू॒तोऽ॑स्तभ्ना॒त्सिन्धु॑मर्ण॒वं नृ॒चक्षाः॑ ।
वि॒श्वामि॑त्रो॒ यदव॑हत्सु॒दास॒मप्रि॑यायत कुशि॒केभि॒रिन्द्रः॑ ॥ ९ ॥

महान् ऋषिर्देवजा देवजूतोऽस्तभ्नात्सिंधुमर्णवं नृचक्षाः ।
विश्वामित्रः यदवहत्सुदासमप्रियायत कुशिकेभिरिंद्रः ॥ ९ ॥

नदी पाण्यानें तुडुंब भरली असतां, देवांपासून जन्म पावलेल्या, देवांपासूनच प्रेरणा प्राप्त झालेल्या व सर्व मानवसृष्टीचें अवलोकन करण्यास समर्थ अशा विश्वामित्र ऋषीनें त्या नदीस थोपवून धरलें. तेव्हां विश्वामित्रानें सुदासाकडून हवि अर्पण करविले व तेव्हां इंद्रानें तो सर्व कुशिकांस आवडता होईल असें केलें. ॥ ९ ॥


हं॒सा इ॑व कृणुथ॒ श्लोक॒मद्रि॑भि॒र्मद॑न्तो गी॒र्भिर॑ध्व॒रे सु॒ते सचा॑ ।
दे॒वेभि॑र्विप्रा ऋषयो नृचक्षसो॒ वि पि॑बध्वं कुशिकाः सो॒म्यम् मधु॑ ॥ १० ॥

हंसा इव कृणुथ श्लोकमद्रिभिर्मदंतः गीर्भिरध्वरे सुते सचा ।
देवेभिर्विप्रा ऋषयः नृचक्षसः वि पिबध्वं कुशिकाः सोम्यम् मधु ॥ १० ॥

तुम्ही यज्ञपाषाणांच्या योगानें हंसासारखा ध्वनि उत्पन्न करा व यज्ञांत सोम तयार होतांच स्तुतींनी देवांस आनंदित करा. हे प्रज्ञावान व सर्व मानवसृष्टीचें अवलोकन करण्यास समर्थ अशा कुशिक ऋषींनो, तुम्ही देवांसह मधुर सोमरसाचें प्राशन करा. ॥ १० ॥


उप॒ प्रेत॑ कुशिकाश्चे॒तय॑ध्व॒मश्वं॑ रा॒ये प्र मु॑ञ्चता सु॒दासः॑ ।
राजा॑ वृ॒त्रं ज॑ङ्घन॒त्प्रागपा॒गुद॒गथा॑ यजाते॒ वर॒ आ पृ॑थि॒व्याः ॥ ११ ॥

उप प्रेत कुशिकाश्चेतयध्वमश्वं राये प्र मुञ्चता सुदासः ।
राजा वृत्रं जङ्घनत्प्रागपागुदगथा यजाते वर आ पृथिव्याः ॥ ११ ॥

हे कुशिकांनो, चला, हुशार व्हा. धनप्राप्ति होण्याकरितां सुदासाच्या अश्वास मोकळें सोडून द्या. पूर्वेस, पश्चिमेस अथवा उत्तरेस असलेल्या शत्रूंस आपला राजा इंद्र ह्यानें मारून टाकले आहे व म्हणून पृथिवीवरील उत्तम प्रदेशांत त्याचे सन्मानार्थ यज्ञ चालले आहेत. ॥ ११ ॥


य इ॒मे रोद॑सी उ॒भे अ॒हमिन्द्र॒मतु॑ष्टवम् ।
वि॒श्वामि॑त्रस्य रक्षति॒ ब्रह्मे॒दं भार॑तं॒ जन॑म् ॥ १२ ॥

य इमे रोदसी उभे अहमिंद्रमतुष्टवम् ।
विश्वामित्रस्य रक्षति ब्रह्मेदं भारतं जनम् ॥ १२ ॥

ज्या अर्थीं उभयतां द्यावापृथिवींचे व इंद्राचें मी स्तवन केलें आहे त्या अर्थीं विश्वामित्राचें हे स्तोत्र भारत कुलांतील मनुष्यांचे खचित रक्षण करील. ॥ १२ ॥


वि॒श्वामि॑त्रा अरासत॒ ब्रह्मेन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ ।
कर॒दिन्नः॑ सु॒राध॑सः ॥ १३ ॥

विश्वामित्रा अरासत ब्रह्मेंद्राय वज्रिणे ।
करदिन्नः सुराधसः ॥ १३ ॥

वज्रधारी इंद्रा प्रित्यर्थ विश्वामित्रांनी हे स्तोत्र रचलें आहे. तो आम्हांस वैभवयुक्त करो. ॥ १३ ॥


किं ते॑ कृण्वन्ति॒ कीक॑टेषु॒ गावो॒ नाशिरं॑ दु॒ह्रे न त॑पन्ति घ॒र्मम् ।
आ नो॑ भर॒ प्रम॑गन्दस्य॒ वेदो॑ नैचाशा॒खं म॑घवन्रन्धया नः ॥ १४ ॥

किं ते कृण्वंति कीकटेषु गावः नाशिरं दुह्रे न तपंति घर्मम् ।
आ नः भर प्रमगंदस्य वेदः नैचाशाखं मघऽवन्रंधया नः ॥ १४ ॥

कीकट देशांतील गाई तुझ्यासाठी काय करीत असतात ? सोमांत घालण्यासठीं त्या दूधही देत नाहींत व ऊनऊन हवि शिजवितील म्हणावें तर हविही शिजवीत नाहींत. प्रमंगदाचे धन तूं आम्हांस आणून दे. हे उदार देवा, तूं नैचाशाखाला आम्हांस शरण आण. ॥ १४ ॥


स॒स॒र्प॒रीरम॑तिं॒ बाध॑माना बृ॒हन्मि॑माय ज॒मद॑ग्निदत्ता ।
आ सूर्य॑स्य दुहि॒ता त॑तान॒ श्रवो॑ दे॒वेष्व॒मृत॑मजु॒र्यम् ॥ १५ ॥

ससर्परीरमतिं बाधमाना बृहन्मिमाय जमदग्निदत्ता ।
आ सूर्यस्य दुहिता ततान श्रवः देवेष्वमृतमजुर्यम् ॥ १५ ॥

जमदग्नींनी दिलेली व अज्ञान नाहीसें करणारी जी ससर्परी नांवाची धेनु ती मोठ्यानें हंबरली. ती सूर्याची कन्या होय. देव जरारहित व मृत्युपासून मुक्त आहेत अशी देवाविषयींची कीर्ति तिनेंच प्रसृत केली. ॥ १५ ॥


स॒स॒र्प॒रीर॑भर॒त्तूय॑मे॒भ्योऽ॑धि॒ श्रवः॒ पाञ्च॑जन्यासु कृ॒ष्टिषु॑ ।
सा प॒क्ष्या३नव्य॒मायु॒र्दधा॑ना॒ यां मे॑ पलस्तिजमद॒ग्नयो॑ द॒दुः ॥ १६ ॥

ससर्परीरभरत्तूयमेभ्योऽधि श्रवः पाञ्चजन्यासु कृष्टिषु ।
सा पक्ष्या३नव्यमायुर्दधाना यां मे पलस्तिजमदग्नयः ददुः ॥ १६ ॥

पांचही वर्गांतील लोकांचे जें धन असेल तें त्यांपासून आणून ससर्परी आम्हांस सत्वर देवो. जी मला पलस्ति जमदग्नींनी दिली ती ही ससर्परी प्रत्येक पंधरा दिवसांनी माझी पुनः पुनः आयुष्य वृद्धि करते. ॥ १६ ॥


स्थि॒रौ गावौ॑ भवतां वी॒ळुरक्षो॒ मेषा वि व॑र्हि॒ मा यु॒गं वि शा॑रि ।
इन्द्रः॑ पात॒ल्ये ददतां॒ शरी॑तो॒ररि॑ष्टनेमे अ॒भि नः॑ सचस्व ॥ १७ ॥

स्थिरौ गावौ भवतां वीळुरक्षः मेषा वि वर्हि मा युगं वि शारि ।
इंद्रः पातल्ये ददतां शरीतोररिष्टनेमे अभि नः सचस्व ॥ १७ ॥

बैल स्तब्ध उभे आहेत. गाडीचा आंस घट्ट राहो, तिच्या दांड्या न तुटोत व जूं न मोडो. तिचे खिळे मोडावयाचे अगोदर इंद्र त्यांस दुरुस्त राखो. हे रथा, तुझ्या कुण्या शाबूत राहून तूं आम्हांस वाहून ने. ॥ १७ ॥


बलं॑ धेहि त॒नूषु॑ नो॒ बल॑मिन्द्रान॒ळुत्सु॑ नः ।
बलं॑ तो॒काय॒ तन॑याय जी॒वसे॒ त्वं हि ब॑ल॒दा असि॑ ॥ १८ ॥

बलं धेहि तनूषु नः बलमिंद्रनळुत्सु नः ।
बलं तोकाय तनयाय जीवसे त्वं हि बलदा असि ॥ १८ ॥

हे इंद्रा, तुं आमचे अंगी व आमच्या बैलांच्या अंगी समर्थ्य उत्पन्न कर. आमच्या पुत्रपौत्रांनी दीर्घ काल जगावे म्हणून तूं त्यांनाही सामर्थ्य दे. खरोखर सामर्थ्य देणारा तूंच आहेस. ॥ १८ ॥


अ॒भि व्य॑यस्व खदि॒रस्य॒ सार॒मोजो॑ धेहि स्पन्द॒ने शिं॒शपा॑याम् ।
अक्ष॑ वीळो वीळित वी॒ळय॑स्व॒ मा यामा॑द॒स्मादव॑ जीहिपो नः ॥ १९ ॥

अभि व्ययस्व खदिरस्य सारमोजः धेहि स्पंदने शिंशपायाम् ।
अक्ष वीळः वीळित वीळयस्व मा यामादस्मादव जीहिपः नः ॥ १९ ॥

खदिर वृक्षाचे अंगीं तूं बळकटी उत्पन्न कर. शिंशपा पासून बनविलेल्या गडींत टिकाऊपणा घाल. हे अतिशय दृढ बसविलेल्या अक्षा (गाडीचा आंस) तूं असाच दृढ ऐस. ह्या रथांतून आम्हांस पडुं देऊं नको. ॥ १९ ॥


अ॒यम॒स्मान्वन॒स्पति॒र्मा च॒ हा मा च॑ रीरिषत् ।
स्व॒स्त्या गृ॒हेभ्य॒ आव॒सा आ वि॒मोच॑नात् ॥ २० ॥

अयमस्मान्वनस्पतिर्मा च हा मा च रीरिषत् ।
स्वस्त्या गृहेभ्य आवसा आ विमोचनात् ॥ २० ॥

हा वृक्षराज आम्हांस न टाको व आम्हांस दुखापत न होऊं देवो. आम्ही घरीं पोहोंचेपर्यंत, आमची गाडी जाऊन थांबेपर्यंत व आमचे बैल सुटेपर्यंत आम्ही खुशाल असो. ॥ २० ॥


इन्द्रो॒तिभि॑र्बहु॒लाभि॑र्नो अ॒द्य या॑च्छ्रे॒ष्ठाभि॑र्मघवञ्छूर जिन्व ।
यो नो॒ द्वेष्ट्यध॑रः॒ सस्प॑दीष्ट॒ यमु॑ द्वि॒ष्मस्तमु॑ प्रा॒णो ज॑हातु ॥ २१ ॥

इंद्रोतिभिर्बहुलाभिर्नः अद्य याच्छ्रेष्ठाभिर्मघऽवञ्छूर जिन्व ।
यः नः द्वेष्ट्यधरः सस्पदीष्ट यमु द्विष्मस्तमु प्राणः जहातु ॥ २१ ॥

हे उदार व शूर इंद्रा, अनेक सामर्थ्यवान शस्त्रास्त्रांनी आज आमचे संरक्षण कर. जो कोणी आमचा द्वेष करीत असेल तो हीन स्थितीला जावो आणि ज्याचा आम्ही द्वेष करीत असूं त्याचा जीव जावो. ॥ २१ ॥


प॒र॒शुं चि॒द्वि त॑पति शिम्ब॒लं चि॒द्वि वृ॑श्चति ।
उ॒खा चि॑दिन्द्र॒ येष॑न्ती॒ प्रय॑स्ता॒ फेन॑मस्यति ॥ २२ ॥

परशुं चिद्वि तपति शिम्बलं चिद्वि वृश्चति ।
उखा चिदिंद्र येषंती प्रयस्ता फेनमस्यति ॥ २२ ॥

परशूप्रमाणें तो शत्रूंना तापवीत असतो. शिंबल फुलाप्रमाणें तो शत्रूचे तुकडे तुकडे करतो. हे इंद्रा, फुटक्या व तडे गेलेल्या भांड्याप्रमाणें तो शत्रूच्या ठिकर्‍या उडवितो. ॥ २२ ॥


न साय॑कस्य चिकिते जनासो लो॒धं न॑यन्ति॒ पशु॒ मन्य॑मानाः ।
नावा॑जिनं वा॒जिना॑ हासयन्ति॒ न ग॑र्द॒भं पु॒रो अश्वा॑न्नयन्ति ॥ २३ ॥

न सायकस्य चिकिते जनासः लोधं नयंति पशु मन्यमानाः ।
नावाजिनं वाजिना हासयंति न गर्दभं पुरः अश्वान्नयंति ॥ २३ ॥

लोकहो, मनुष्यांना त्यांचा घात कोण करतो हें कळत नाही, व म्हणून लाल लांडग्यालाच ते माणसाळलेले जनावर असें समजून घेऊन जातात. पण कोणीही शहाणी माणसें घोड्याची दुसर्‍या जनावराशीं शर्यत लावीत नाहींत व घोड्याच्या पुढे गाढवाला घेऊन जात नाहींत. ॥ २३ ॥


इ॒म इ॑न्द्र भर॒तस्य॑ पु॒त्रा अ॑पपि॒त्वं चि॑कितु॒र्न प्र॑पि॒त्वम् ।
हि॒न्वन्त्यश्व॒मर॑णं॒ न नित्यं॒ ज्यावाजं॒ परि॑ णयन्त्या॒जौ ॥ २४ ॥

इम इंद्र भरतस्य पुत्रा अपपित्वं चिकितुर्न प्रपित्वम् ।
हिन्वंत्यश्वमरणं न नित्यं ज्यावाजं परि णयंत्याजौ ॥ २४ ॥

हे इंद्रा, ह्या भरताचे वंशज आपले " हा आपला नातलग व हा परका " असा भाव मुळींच बाळगीत नाहींत. ते आपल्या स्वतःच्या घोड्याप्रमाणें परक्यांच्या घोड्याचीही निगा राखतात व त्यांना धनुष्याच्या दोरीप्रमाणे रणांगणावर फेंकीत नेतात. ॥ २४ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५४ (विश्वेदेव सूक्त)

ऋषी - प्रजापतिः वैश्वामित्रः, प्रजापतिः वाच्यः वा : देवता - विश्वेदेवा : छंद - त्रिष्टुप्


इ॒मं म॒हे वि॑द॒थ्याय शू॒षं शश्व॒त्कृत्व॒ ईड्या॑य॒ प्र ज॑भ्रुः ।
शृ॒णोतु॑ नो॒ दम्ये॑भि॒रनी॑कैः शृ॒णोत्व॒ग्निर्दि॒व्यैरज॑स्रः ॥ १ ॥

इमं महे विदथ्याय शूषं शश्वत्कृत्व ईड्याय प्र जभ्रुः ।
शृणोतु नः दम्येभिरनीकैः शृणोत्वग्निर्दिव्यैरजस्रः ॥ १ ॥

यज्ञ करण्यास योग्य, स्तुतीस पात्र व श्रेष्ठ अशा अग्निदेवा प्रित्यर्थ हें स्तोत्र अनेक वेळां अर्पण करण्यांत आहें आहे. हा अविनाशी अग्निदेव गृहांतील व द्युलोकांतील आपल्या अनुचरांसह येथें येऊन आमची प्रार्थना श्रवण करो. ॥ १ ॥


महि॑ म॒हे दि॒वे अ॑र्चा पृथि॒व्यै कामो॑ म इ॒च्छञ्च॑रति प्रजा॒नन् ।
ययो॑र्ह॒ स्तोमे॑ वि॒दथे॑षु दे॒वाः स॑प॒र्यवो॑ मा॒दय॑न्ते॒ सचा॒योः ॥ २ ॥

महि महे दिवे अर्चा पृथिव्यै कामः म इच्छञ्चरति प्रजानन् ।
ययोर्ह स्तोमे विदथेषु देवाः सपर्यवः मादयंते सचायोः ॥ २ ॥

श्रेष्ठ द्युलोक आणि पृथिवी ह्यासं उद्देशून एक मोठें स्तोत्र गा. माझ्या मनःकामना मला काय हवें हे ओळखून व तें मिळविण्याची इच्छा धारण करून संचार करीत आहेत. ह्या द्यावापृथिवींच्या स्तोत्राच्या योगानें स्तोतृजनांकडून सेवा घेणारे देव मानवांसहवर्तमान यज्ञांत संतुष्ट होत असतात. ॥ २ ॥


यु॒वोर्‌ऋ॒तं रो॑दसी स॒त्यम॑स्तु म॒हे षु णः॑ सुवि॒ताय॒ प्र भू॑तम् ।
इ॒दं दि॒वे नमो॑ अग्ने पृथि॒व्यै स॑प॒र्यामि॒ प्रय॑सा॒ यामि॒ रत्न॑म् ॥ ३ ॥

युवोर्‌ऋतं रोदसी सत्यमस्तु महे षु णः सुविताय प्र भूतम् ।
इदं दिवे नमः अग्ने पृथिव्यै सपर्यामि प्रयसा यामि रत्नम् ॥ ३ ॥

हे द्यावापृथिवींनो, तुमची आज्ञा सत्यपूर्ण असो. तुम्ही आमचें अतिशय हित करणार्‍या व्हा. हे अग्निदेवा, हा नमस्कार द्युलोकास व पृथिवीस अर्पण असो. हवि अर्पण करून मी त्यांचे पूजन करतों आणि वैभवाची प्राप्ति करून घेतो. ॥ ३ ॥


उ॒तो हि वां॑ पू॒र्व्या आ॑विवि॒द्र ऋता॑वरी रोदसी सत्य॒वाचः॑ ।
नर॑श्चिद्वां समि॒थे शूर॑सातौ ववन्दि॒रे पृ॑थिवि॒ वेवि॑दानाः ॥ ४ ॥

उतः हि वां पूर्व्या आविविद्र ऋतावरी रोदसी सत्यवाचः ।
नरश्चिद्वां समिथे शूरसातौ ववंदिरे पृथिवि वेविदानाः ॥ ४ ॥

हे सत्यपरिपूर्ण द्यावापृथिवींनो, पूर्वकालीन सत्यवचनी उपासकांना तुमचें दर्शन घडलें. हे पृथिवी, शूर लोकांना तुमचा अनुग्रह प्राप्त झाल्यामुळें युद्धांत व शौर्याच्या योगानें प्राप्त होणार्‍या लाभांचे समयीं तुम्हांस वंदन केलें. ॥ ४ ॥


को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑चद्दे॒वाँ अच्छा॑ प॒थ्या३ का समे॑ति ।
ददृ॑श्र एषामव॒मा सदां॑सि॒ परे॑षु॒ या गुह्ये॑षु व्र॒तेषु॑ ॥ ५ ॥

कः अद्धा वेद क इह प्र वोचद्देवान् अच्छा पथ्या३ का समेति ।
ददृश्र एषामवमा सदांसि परेषु या गुह्येषु व्रतेषु ॥ ५ ॥

देवांच्याकडे कोणता मार्ग जातो हें खरोखर कोणास माहित आहे काय ? व तो कोणीतरी सांगितला आहे काय ? त्यांच्या गूढ व श्रेष्ठ कृत्यांवरून ओळखूं येणारी त्यांची अगदी स्थूल निवासस्थानें मात्र लोकांचे नजरेस पडलीं आहेत. ॥ ५ ॥


क॒विर्नृ॒चक्षा॑ अ॒भि षी॑मचष्ट ऋ॒तस्य॒ योना॒ विघृ॑ते॒ मद॑न्ती ।
नाना॑ चक्राते॒ सद॑नं॒ यथा॒ वेः स॑मा॒नेन॒ क्रतु॑ना संविदा॒ने ॥ ६ ॥

कविर्नृचक्षा अभि षीमचष्ट ऋतस्य योना विघृते मदंती ।
नाना चक्राते सदनं यथा वेः समानेन क्रतुना संविदाने ॥ ६ ॥

रसपरिपूर्ण व आनंदप्रद द्यावापृथिवींचे दर्शन मानवसृष्टीचें अवलोकन करणार्‍या ज्ञात्या पुरुषास अंतरिक्षांत घेतां येतें. एकाच सामर्थ्यामुळें एकमतानें वागणार्‍या ह्या द्यावापृथिवींनी पक्ष्याच्या घरट्याप्रमाणें आपलीं निवासस्थानें निरनिराळीं बनविलीं आहेत. ॥ ६ ॥


स॒मा॒न्या वियु॑ते दू॒रेअ॑न्ते ध्रु॒वे प॒दे त॑स्थतुर्जाग॒रूके॑ ।
उ॒त स्वसा॑रा युव॒ती भव॑न्ती॒ आदु॑ ब्रुवाते मिथु॒नानि॒ नाम॑ ॥ ७ ॥

समान्या वियुते दूरेअंते ध्रुवे पदे तस्थतुर्जागरूके ।
उत स्वसारा युवती भवंती आदु ब्रुवाते मिथुनानि नाम ॥ ७ ॥

एकमेकींशी समानरूप असतांही निरनिराळ्या राहणार्‍या व सदैव जागृत असणर्‍या ह्या द्यावापृथिवी दूर प्रदेशांत अचलपदीं स्थिर झाल्या व बहिणी बहिणी बनल्या. ह्याच कारणानें लोक ह्यांचा एकदम नामनिर्देश करूं लागले. ॥ ७ ॥


विश्वेदे॒ते जनि॑मा॒ सं वि॑विक्तो म॒हो दे॒वान्बिभ्र॑ती॒ न व्य॑थेते ।
एज॑द्ध्रु॒वं प॑त्यते॒ विश्व॒मेकं॒ चर॑त्पत॒त्रि विषु॑णं॒ वि जा॒तम् ॥ ८ ॥

विश्वेदेते जनिमा सं विविक्तः महः देवान्बिभ्रती न व्यथेते ।
एजद्ध्रुवं पत्यते विश्वमेकं चरत्पतत्रि विषुणं वि जातम् ॥ ८ ॥

ह्या द्यावापृथिवी सर्व मानवांचे धारण करतात. श्रेष्ठ अशा देवांचे धारण करीत असतांही त्या थकत नाहींत. ह्यांपैकीं एक सर्व चराचर विश्वाचें व संचार करणारे अथवा हवेंत उडणारे जे जे प्राणी आहेत त्यांचे परिपालन करीत असते. ॥ ८ ॥


सना॑ पुरा॒णमध्ये॑म्या॒रान्म॒हः पि॒तुर्ज॑नि॒तुर्जा॒मि तन्नः॑ ।
दे॒वासो॒ यत्र॑ पनि॒तार॒ एवै॑रु॒रौ प॒थि व्युते त॒स्थुर॒न्तः ॥ ९ ॥

सना पुराणमध्येम्यारान्महः पितुर्जनितुर्जामि तन्नः ।
देवासः यत्र पनितार एवैरुरौ पथि व्युते तस्थुरंतः ॥ ९ ॥

अम्हांस जन्म देणारा जो श्रेष्ठ पिता त्याचा व आमचा सनातन कालापासून चालत आलेला जो पुरातन अपत्य संबंध आहे तो मला अवगत आहे. सर्वांच्या स्तुतीस पात्र झालेले देव ह्या पित्याचेच योगानें विस्तीर्ण परंतु दूरच्या मार्गावर जाऊन तेथें स्थिरता पावलें. ॥ ९ ॥


इ॒मं स्तोमं॑ रोदसी॒ प्र ब्र॑वीम्यृदू॒दराः॑ शृणवन्नग्निजि॒ह्वाः ।
मि॒त्रः स॒म्राजो॒ वरु॑णो॒ युवा॑न आदि॒त्यासः॑ क॒वयः॑ पप्रथा॒नाः ॥ १० ॥

इमं स्तोमं रोदसी प्र ब्रवीम्यृदूदराः शृणवन्नग्निजिह्वाः ।
मित्रः सम्राजः वरुणः युवान आदित्यासः कवयः पप्रथानाः ॥ १० ॥

हे द्यावापृथिवीहो, हे स्तोत्र मी म्हणत आहे. तें सर्व विश्वाचे अधिपति जे मित्र व वरुण आणि तारुण्ययुक्त, प्रज्ञाशील व स्तवनीय असे जे आदित्य ते श्रवण करोत. त्यांचे अंतःकरण मृदु आहे व अग्नि हीच त्यांची जिव्हा आहे. ॥ १० ॥


हिर॑ण्यपाणिः सवि॒ता सु॑जि॒ह्वस्त्रिरा दि॒वो वि॒दथे॒ पत्य॑मानः ।
दे॒वेषु॑ च सवितः॒ श्लोक॒मश्रे॒राद॒स्मभ्य॒मा सु॑व स॒र्वता॑तिम् ॥ ११ ॥

हिरण्यपाणिः सविता सुजिह्वस्त्रिरा दिवः विदथे पत्यमानः ।
देवेषु च सवितः श्लोकमश्रेरादस्मभ्यमा सुव सर्वतातिम् ॥ ११ ॥

हे सवितादेवा, तुझे हात सुवर्णाप्रमाणे आहेत, तूं सर्वांस चेतना देणारा आहेस व तुझी जिव्हा सुंदर आहे. तूं उड्डाण करीत द्युलोकापासून तीन वेळां यज्ञमंडपापाशीं येतोस. देवांमध्येही तूं सन्मान पाव आणि आमचे सर्व यज्ञ यथासांग चालण्याकरितां उदयास ये. ॥ ११ ॥


सु॒कृत्सु॑पा॒णिः स्ववाँ॑ ऋ॒तावा॑ दे॒वस्त्वष्टाव॑से॒ तानि॑ नो धात् ।
पू॒ष॒ण्वन्त॑ ऋभवो मादयध्वमू॒र्ध्वग्रा॑वाणो अध्व॒रम॑तष्ट ॥ १२ ॥

सुऽकृत्सुपाणिः स्ववान् ऋतावा देवस्त्वष्टावसे तानि नः धात् ।
पूषण्वंत ऋभवः मादयध्वमूर्ध्वग्रावाणः अध्वरमतष्ट ॥ १२ ॥

ज्याचीं कृत्यें सुंदर आहेत, ज्याचे हात सुरेख आहेत, जो उत्तम तऱ्हेनें संरक्षण करतो व जो सत्यमय आहे असा त्वष्टा देव आमचे रक्षणासाठी जें जें अवश्य असेल तें तें सर्व देवो. हे ऋभूंनो, तुम्ही पूषादेवासह आनंदांत असा. तुमचेकरितां यज्ञपाषाणाचें काम चालले असल्यामुळें तुम्ही हा यज्ञ सिद्धीस नेला आहे. ॥ १२ ॥


वि॒द्युद्र॑था म॒रुत॑ ऋष्टि॒मन्तो॑ दि॒वो मर्या॑ ऋ॒तजा॑ता अ॒यासः॑ ।
सर॑स्वती शृणवन्य॒ज्ञिया॑सो॒ धाता॑ र॒यिं स॒हवी॑रं तुरासः ॥ १३ ॥

विद्युद्रथा मरुत ऋष्टिमंतः दिवः मर्या ऋतजाता अयासः ।
सरस्वती शृणवन्यज्ञियासः धाता रयिं सहवीरं तुरासः ॥ १३ ॥

विद्युत् हा ज्यांचा रथ आहे, ज्यांनी भाले धारण केलेले आहेत, ज्यांचा जन्म सत्यापासून आहे, जे सर्वत्र संचार करणारे आहेत व जे द्युलोकांतील रहिवाशी आहेत असे जे यज्ञार्ह मरुत् देव ते व सरस्वती आमचें स्तोत्र श्रवण करो. हे वेगवान देवांनो, तुम्ही आम्हांस वीर सैनिक व संपत्ति ह्यांची प्राप्ति करून द्या. ॥ १३ ॥


विष्णुं॒ स्तोमा॑सः पुरुद॒स्मम॒र्का भग॑स्येव का॒रिणो॒ याम॑नि ग्मन् ।
उ॒रु॒क्र॒मः क॑कु॒हो यस्य॑ पू॒र्वीर्न म॑र्धन्ति युव॒तयो॒ जनि॑त्रीः ॥ १४ ॥

विष्णुं स्तोमासः पुरुदस्ममर्का भगस्येव कारिणः यामनि ग्मन् ।
उरुक्रमः ककुहः यस्य पूर्वीर्न मर्धंति युवतयः जनित्रीः ॥ १४ ॥

महद्‌भाग्याची जणूं उत्पादकच अशी आमचीं स्तोत्रें व स्तवनें ह्या यज्ञांत अनेक आश्चर्यकारक कृत्यें करणार्‍या विष्णुप्रत जाऊन पोहोंचली आहेत. सर्व विश्वास जन्म देणार्‍या, पुरातन व तथापि सदैव तरुण असणार्‍या ज्या दिशा त्याही ज्याला प्रतिबंध करण्यास असमर्थ आहेत अशा ह्या विष्णूचा संचार फारच विस्तीर्ण प्रदेशावर आहे. ॥ १४ ॥


इन्द्रो॒ विश्वै॑र्वीर्यैः॒३ पत्य॑मान उ॒भे आ प॑प्रौ॒ रोद॑सी महि॒त्वा ।
पु॒रं॒द॒रो वृ॑त्र॒हा धृ॒ष्णुषे॑णः सं॒गृभ्या॑ न॒ आ भ॑रा॒ भूरि॑ प॒श्वः ॥ १५ ॥

इंद्रः विश्वैर्वीर्यैः३ पत्यमान उभे आ पप्रौ रोदसी महित्वा ।
पुरंदरः वृत्रहा धृष्णुषेणः संगृभ्या न आ भरा भूरि पश्वः ॥ १५ ॥

सकल सामर्थ्यांनी युक्त असलेल्या इंद्रानें आपल्या माहात्म्यानें उभयता द्यावापृथिवीस व्याप्त करून टाकले. इंद्रा, तूं शत्रूंच्या नगरांचा नाश करणारा, वृत्राचा वध करणारा व पराक्रमी सैन्याचा अधिपति आहेस. तूं आम्हांस एकदम अनेक पशु देऊन टाक. ॥ १५ ॥


नास॑त्या मे पि॒तरा॑ बन्धु॒पृच्छा॑ सजा॒त्यम॒श्विनो॒श्चारु॒ नाम॑ ।
यु॒वं हि स्थो र॑यि॒दौ नो॑ रयी॒णां दा॒त्रं र॑क्षेथे॒ अक॑वै॒रद॑ब्धा ॥ १६ ॥

नासत्या मे पितरा बंधुपृच्छा सजात्यमश्विनोश्चारु नाम ।
युवं हि स्थः रयिदौ नः रयीणां दात्रं रक्षेथे अकवैरदब्धा ॥ १६ ॥

हे सत्यपूर्ण देवांनो, तुम्ही आप्तांची काळजी वाहणारे असे माझे मायबाप आहांत. तुमचें प्रेम व तुमचें नाम मंगलकारक असते. खरोखर तुम्हीच धन अर्पण करणारे आहां आणि तुम्ही अविनाशी असून हवि देणार्‍या उपासकाचें उत्कृष्ट रीतीनें रक्षण करीत असतां. ॥ १६ ॥


म॒हत्तद्वः॑ कवय॒श्चारु॒ नाम॒ यद्ध॑ देवा॒ भव॑थ॒ विश्व॒ इन्द्रे॑ ।
सख॑ ऋ॒भुभिः॑ पुरुहूत प्रि॒येभि॑रि॒मां धियं॑ सा॒तये॑ तक्षता नः ॥ १७ ॥

महत्तद्वः कवयश्चारु नाम यद्ध देवा भवथ विश्व इंद्रे ।
सख ऋभुभिः पुरुहूत प्रियेभिरिमां धियं सातये तक्षता नः ॥ १७ ॥

हे बुद्धिवान देवांनो, आपण सर्व इंद्राचे ठिकाणी आहांच व म्हणूनच आपलें नाम फार मंगल आहे. अनेक भक्त ज्याचा धांवा करतात असे हे इंद्रदेवा, तूं आमच सखा आहेस. तूं आपल्या आवडत्या ऋभूंसहवर्तमान येऊन ह्या स्तोत्राच्या योगानें आम्हांस अनेक लाभ घडतील असे कर. ॥ १७ ॥


अ॒र्य॒मा णो॒ अदि॑तिर्य॒ज्ञिया॒सोऽ॑दब्धानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ ।
यु॒योत॑ नो अनप॒त्यानि॒ गन्तोः॑ प्र॒जावा॑न्नः पशु॒माँ अ॑स्तु गा॒तुः ॥ १८ ॥

अर्यमा णः अदितिर्यज्ञियासोऽदब्धानि वरुणस्य व्रतानि ।
युयोत नः अनपत्यानि गंतोः प्रजावान्नः पशुमान् अस्तु गातुः ॥ १८ ॥

अदिती, अर्यमा व वरुण हे देव आम्ही यजन करण्यास योग्य आहेत. वरुणाच्या आज्ञा अनुल्लंघनीय आहेत. हे देवहो, आमच्या मार्गांतून संततिहीनतेचा कलंक नाहींस करा. आमचा मार्ग संतति व पशु ह्यांनी समृद्ध असो. ॥ १८ ॥


दे॒वानां॑ दू॒तः पु॑रु॒ध प्रसू॒तोऽ॑नागान्नो वोचतु स॒र्वता॑ता ।
शृ॒णोतु॑ नः पृथि॒वी द्यौरु॒तापः॒ सूर्यो॒ नक्ष॑त्रैरु॒र्व१न्तरि॑क्षम् ॥ १९ ॥

देवानां दूतः पुरुध प्रसूतोऽनागान्नः वोचतु सर्वताता ।
शृणोतु नः पृथिवी द्यौरुतापः सूर्यः नक्षत्रैरुर्व१ंतरिक्षम् ॥ १९ ॥

अनेक ठिकाणीं ज्यास पाठविण्यांत येते असा हा देवांचा दूत आहे. तो सर्वत्र आम्हांस ’निष्पाप’ ’निष्पाप’ असें म्हणो. पृथिवी, द्युलोक, सूर्य, नक्षत्रे व विशाल अंतरिक्ष ही आमचीं स्तोत्रें श्रवण करोत. ॥ १९ ॥


शृ॒ण्वन्तु॑ नो॒ वृष॑णः॒ पर्व॑तासो ध्रु॒वक्षे॑मास॒ इळ॑या॒ मद॑न्तः ।
आ॒दि॒त्यैर्नो॒ अदि॑तिः शृणोतु॒ यच्छ॑न्तु नो म॒रुतः॒ शर्म॑ भ॒द्रम् ॥ २० ॥

शृण्वंतु नः वृषणः पर्वतासः ध्रुवक्षेमास इळया मदंतः ।
आदित्यैर्नः अदितिः शृणोतु यच्छंतु नः मरुतः शर्म भद्रम् ॥ २० ॥

स्थीरपणानें स्थानापन्न झालेले पराक्रमी पर्वत आमच्या हवींनी संतुष्ट होऊन आमचें स्तोत्र ऐकोत. आदित्यांसह अदिती अमची स्तुति श्रवण करो व मरुत् देव आम्हांस कल्याणप्रद सौख्य अर्पण करोत. ॥ २० ॥


सदा॑ सु॒गः पि॑तु॒माँ अ॑स्तु॒ पन्था॒ मध्वा॑ देवा॒ ओष॑धीः॒ सं पि॑पृक्त ।
भगो॑ मे अग्ने स॒ख्ये न मृ॑ध्या॒ उद्रा॒यो अ॑श्यां॒ सद॑नं पुरु॒क्षोः ॥ २१ ॥

सदा सुगः पितुमान् अस्तु पंथा मध्वा देवा ओषधीः सं पिपृक्त ।
भगः मे अग्ने सख्ये न मृध्या उद्रायः अश्यां सदनं पुरुक्षोः ॥ २१ ॥

आमचा मार्ग सदोदित सुगम व सर्व सामग्रींनी परिपूर्ण असा असो. हे देवहो, तुम्हीं सर्व वृक्षलतांस माधुर्यानें भरून टाका. हे अग्नि, माझें महद्‌भाग्य काय ते तूंच आहेस. आपल्या कृपाछत्राखालीं मला घे व माझा घात करूं नकोस. विपुल धान्यानें समृद्ध असें घर व संपत्ति ह्यांचा उपभोग मला घ्यावयास सांपडो. ॥ २१ ॥


स्वद॑स्व ह॒व्या समिषो॑ दिदीह्यस्म॒द्र्य१क्सं मि॑मीहि॒ श्रवां॑सि ।
विश्वाँ॑ अग्ने पृ॒त्सु ताञ्जे॑षि॒ शत्रू॒नहा॒ विश्वा॑ सु॒मना॑ दीदिही नः ॥ २२ ॥

स्वदस्व हव्या समिषः दिदीह्यस्मद्र्य१क्सं मिमीहि श्रवांसि ।
विश्वान् अग्ने पृत्सु ताञ्जेषि शत्रूनहा विश्वा सुमना दीदिही नः ॥ २२ ॥

हे अग्नि, तूं हवींचें भक्षण कर. तूं प्रकाशित होऊन आम्हांस कीर्ति अर्पण कर. हे अग्ने, आमच्या सर्व शत्रूंस तूं लढाईंत जिंक व सर्व प्रकारें प्रसन्नचित्त होऊन तूं आपला प्रकाश पाड. ॥ २२ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५५ (विश्वेदेव सूक्त)

ऋषी - प्रजापतिः वैश्वामित्रः : देवता - विश्वेदेवा : छंद - त्रिष्टुप्


उ॒षसः॒ पूर्वा॒ अध॒ यद्व्यू॒षुर्म॒हद्वि ज॑ज्ञे अ॒क्षरं॑ प॒दे गोः ।
व्र॒ता दे॒वाना॒मुप॒ नु प्र॒भूष॑न्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १ ॥

उषसः पूर्वा अध यद्व्यूषुर्महद्वि जज्ञे अक्षरं पदे गोः ।
व्रता देवानामुप नु प्रभूषन्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १ ॥

पूर्वी ज्या वेळी उषा प्रकाशून गेल्या त्यावेळीं धेनूंच्या निवासस्थानामध्यें तें अविनाशी तत्त्व उदय पावलें, आणि त्यानें देवांच्या आज्ञांस भूषण आणले. तें अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करते. ॥ १ ॥


मो षू णो॒ अत्र॑ जुहुरन्त दे॒वा मा पूर्वे॑ अग्ने पि॒तरः॑ पद॒ज्ञाः ।
पु॒रा॒ण्योः सद्म॑नोः के॒तुर॒न्तर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ २ ॥

मः षू णः अत्र जुहुरंत देवा मा पूर्वे अग्ने पितरः पदज्ञाः ।
पुराण्योः सद्मनोः केतुरंतर्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ २ ॥

देव अथवा परमपदाचें ज्ञान असलेले आमचे पुरातन पितर आमचा येथें नाश न करोत. प्राचीन अशीं जीं दोन निवासस्थानें त्यांच्या अंतर्भागांतील जणुं ज्योतिच असें हें अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ २ ॥


वि मे॑ पुरु॒त्रा प॑तयन्ति॒ कामाः॒ शम्यच्छा॑ दीद्ये पू॒र्व्याणि॑ ।
समि॑द्धे अ॒ग्नावृ॒तमिद्व॑देम म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ३ ॥

वि मे पुरुत्रा पतयंति कामाः शम्यच्छा दीद्ये पूर्व्याणि ।
समिद्धे अग्नावृतमिद्वदेम महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ३ ॥

माझे मनोरथ अनेक ठिकाणी धांव घेत आहेत. ह्या यज्ञकर्मांत मी अनेक जुनींजुनीं स्तोत्रें प्रकाशांत आणीत आहें अग्नि प्रज्वलित झाला म्हणजे आपण सत्य तेंच बोलूं. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ३ ॥


स॒मा॒नो राजा॒ विभृ॑तः पुरु॒त्रा शये॑ श॒यासु॒ प्रयु॑तो॒ वनानु॑ ।
अ॒न्या व॒त्सं भर॑ति॒ क्षेति॑ मा॒ता म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ४ ॥

समानः राजा विभृतः पुरुत्रा शये शयासु प्रयुतः वनानु ।
अन्या वत्सं भरति क्षेति माता महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ४ ॥

सर्वांवर राज्य करणार्‍या ह्या राजास अनेक ठिकाणीं नेण्यांत येतें. समिधांची इच्छा धारण करून तो भिन्नभिन्न स्थलीं आपल्या काष्ठरूपी शय्यांवर शयन करतो. दोन मातांपैकीं एक ह्या वत्साला भरवितें व दुसरी त्यास निजविण्याचें काम करतें. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ४ ॥


आ॒क्षित्पूर्वा॒स्वप॑रा अनू॒रुत्स॒द्यो जा॒तासु॒ तरु॑णीष्व॒न्तः ।
अ॒न्तर्व॑तीः सुवते॒ अप्र॑वीता म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ५ ॥

आक्षित्पूर्वास्वपरा अनूरुत्सद्यः जातासु तरुणीष्वंतः ।
अंतर्वतीः सुवते अप्रवीता महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ५ ॥

तो आतां पूर्वींच्या काष्ठांत, तर आतां लगेच नवीन काष्ठांच्या अनुरोधानें वाढूं लागतो व इतक्यांत तो नवीनच उत्पन्न झालेल्या काष्ठांतही प्रज्वलित होतो. कुमारिका गरोदर होऊन त्यास जन्म देतात. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ५ ॥


श॒युः प॒रस्ता॒दध॒ नु द्वि॑मा॒ताब॑न्ध॒नश्च॑रति व॒त्स एकः॑ ।
मि॒त्रस्य॒ ता वरु॑णस्य व्र॒तानि॑ म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ६ ॥

शयुः परस्तादध नु द्विमाताबंधनश्चरति वत्स एकः ।
मित्रस्य ता वरुणस्य व्रतानि महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ६ ॥

दोन मातांचा हा एकटा पुत्र इतक्यांत दूर ठाणें देतो व निर्वेध रीतीनें संचार करूं लागतो. ह्या मित्राच्या व वरुणाच्या आज्ञा होत. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ६ ॥


द्वि॒मा॒ता होता॑ वि॒दथे॑षु स॒म्राळन्वग्रं॒ चर॑ति॒ क्षेति॑ बु॒ध्नः ।
प्र रण्या॑नि रण्य॒वाचो॑ भरन्ते म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ७ ॥

द्विमाता होता विदथेषु सम्राळन्वग्रं चरति क्षेति बुध्नः ।
प्र रण्यानि रण्यवाचः भरंते महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ७ ॥

दोन मातांपासून जन्म पावलेला हा हविर्दायक देव यज्ञांतला सम्राट असून एकदां उंच वरपर्यंत गमन करतो तर एकदां तळाशींच विश्रांति घेतो. आल्हाददायक स्तोत्रें म्हणणारे उपासक त्यास आल्हाददायक स्तोत्रें अर्पण करतात. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ७ ॥


शूर॑स्येव॒ युध्य॑तो अन्त॒मस्य॑ प्रती॒चीनं॑ ददृशे॒ विश्व॑मा॒यत् ।
अ॒न्तर्म॒तिश्च॑रति नि॒ष्षिधं॒ गोर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ८ ॥

शूरस्येव युध्यतः अंतमस्य प्रतीचीनं ददृशे विश्वमायत् ।
अंतर्मतिश्चरति निष्षिधं गोर्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ८ ॥

युद्ध करणार्‍या एकाद्या शूर पुरुषाप्रमाणें हा जवळ येत चालल्याबरोबर त्याच्या अभिमुख येणारे सर्व जगत् त्यास चुकविण्याकरितां उलट फिरवलेले आढळले. अशा वेळीं गाईंच्या चार्‍याजवळ त्याच्या बचावाकरितां प्रार्थनाही होऊं लगते. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ८ ॥


नि वे॑वेति पलि॒तो दू॒त आ॑स्व॒न्तर्म॒हांश्च॑रति रोच॒नेन॑ ।
वपूं॑षि॒ बिभ्र॑द॒भि नो॒ वि च॑ष्टे म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ९ ॥

नि वेवेति पलितः दूत आस्वंतर्महांश्चरति रोचनेन ।
वपूंषि बिभ्रदभि नः वि चष्टे महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ९ ॥

हा पिकलेल्या केसांचा श्रेष्ठ दूत ह्यांच्या समूहांत प्रवेश करतो व आपल्या ज्वालामय रूपानें तेथें संचार करूं लागतो. तो अनेक रूपें धारण करून आम्हांस पहात असतो. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ९ ॥


विष्णु॑र्गो॒पाः प॑र॒मं पा॑ति॒ पाथः॑ प्रि॒या धामा॑न्य॒मृता॒ दधा॑नः ।
अ॒ग्निष्टा विश्वा॒ भुव॑नानि वेद म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १० ॥

विष्णुर्गोपाः परमं पाति पाथः प्रिया धामान्यमृता दधानः ।
अग्निष्टा विश्वा भुवनानि वेद महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १० ॥

स्वतःस प्रिय असलेल्या अविनाशी निवासस्थानाचें संरक्षण करीत सर्वरक्षक विष्णु आपल्या परम श्रेष्ठ मार्गाचें परिपालन करतो. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १० ॥


नाना॑ चक्राते य॒म्या३वपूं॑षि॒ तयो॑र॒न्यद्रोच॑ते कृ॒ष्णम॒न्यत् ।
श्यावी॑ च॒ यदरु॑षी च॒ स्वसा॑रौ म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ ११ ॥

नाना चक्राते यम्या३वपूंषि तयोरन्यद्रोचते कृष्णमन्यत् ।
श्यावी च यदरुषी च स्वसारौ महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ ११ ॥

ह्या दोघी जुळ्या बहिणी नाना प्रकारचीं रूपें धारण करतात. त्यांचेपैकीं एक प्रकाशमान आहे व दुसरी काळीं आहे. जी काळी आहे व जी प्रकाशमान आहे त्या दोघीही बहिणी बहिणी होत. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ ११ ॥


मा॒ता च॒ यत्र॑ दुहि॒ता च॑ धे॒नू स॑ब॒र्दुघे॑ धा॒पये॑ते समी॒ची ।
ऋ॒तस्य॒ ते सद॑सीळे अ॒न्तर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १२ ॥

माता च यत्र दुहिता च धेनू सबर्दुघे धापयेते समीची ।
ऋतस्य ते सदसीळे अंतर्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १२ ॥

एक व्यालेली गाय व दुसरी तिची कालवड अशा दोन गाई जेथें आहेत तेथें त्या दोघी अमृताचा पान्हा सोडून विश्वास तृप्त करतात. सत्याचे मंदिरांत मी त्यांचे स्तवन करतो. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १२ ॥


अ॒न्यस्या॑ व॒त्सं रि॑ह॒ती मि॑माय॒ कया॑ भु॒वा नि द॑धे धे॒नुरूधः॑ ।
ऋ॒तस्य॒ सा पय॑सापिन्व॒तेळा॑ म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १३ ॥

अन्यस्या वत्सं रिहती मिमाय कया भुवा नि दधे धेनुरूधः ।
ऋतस्य सा पयसापिन्वतेळा महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १३ ॥

एकीच्या वत्साला दुसरी चाटून हंबरली. खरोखर कोणत्या स्थलीं धेनूनें आपली कांस प्रकट केली होती बरें ? सत्याच्या दुग्धानें ती इळा पुष्ट झाली. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १३ ॥


पद्या॑ वस्ते पुरु॒रूपा॒ वपूं॑ष्यू॒र्ध्वा त॑स्थौ॒ त्र्यविं॒ रेरि॑हाणा ।
ऋ॒तस्य॒ सद्म॒ वि च॑रामि वि॒द्वान्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १४ ॥

पद्या वस्ते पुरुरूपा वपूंष्यूर्ध्वा तस्थौ त्र्यविं रेरिहाणा ।
ऋतस्य सद्म वि चरामि विद्वान्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १४ ॥

पृथिवी अनेक तऱ्हेची रूपें धारण करते. आपल्या दीड वर्षाच्या वत्साला चाटीत ती उभी राहिली आहे. मी सुज्ञ असल्यामुळें सत्याच्या मंदिरांतून संचार करतो. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १४ ॥


प॒दे इ॑व॒ निहि॑ते द॒स्मे अ॒न्तस्तयो॑र॒न्यद्गुह्य॑मा॒विर॒न्यत् ।
स॒ध्री॒ची॒ना प॒थ्या३सा विषू॑ची म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १५ ॥

पदे इव निहिते दस्मे अंतस्तयोरन्यद्गुह्यमाविरन्यत् ।
सध्रीचीना पथ्या३सा विषूची महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १५ ॥

त्या दोघांस जणूं कांही सुंदर स्थलांत ठेवलेले आहे. त्यांपैकी एक गुप्त व एक प्रकट आहे. तो त्यांचा मार्ग एकच असून भिन्नत्वही पावलेला आहे. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १५ ॥


आ धे॒नवो॑ धुनयन्ता॒मशि॑श्वीः सब॒र्दुघाः॑ शश॒या अप्र॑दुग्धाः ।
नव्या॑नव्या युव॒तयो॒ भव॑न्तीर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १६ ॥

आ धेनवः धुनयंतामशिश्वीः सबर्दुघाः शशया अप्रदुग्धाः ।
नव्यानव्या युवतयः भवंतीर्महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १६ ॥

ज्यास वत्स नाही, ज्या अमृताचा पान्हा सोडणार्‍या आहेत, ज्या निद्रित आहेत, ज्यांचे दूध कोणीही काढलेलें नाही व ज्या अतिशय तारुण्ययुक्त आहेत अशा धेनु दुग्धाची वृष्टि करोत. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १६ ॥


यद॒न्यासु॑ वृष॒भो रोर॑वीति॒ सो अ॒न्यस्मि॑न्यू॒थे नि द॑धाति॒ रेतः॑ ।
स हि क्षपा॑वा॒न्त्स भगः॒ स राजा॑ म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १७ ॥

यदन्यासु वृषभः रोरवीति सः अन्यस्मिन्यूथे नि दधाति रेतः ।
स हि क्षपावांत्स भगः स राजा महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १७ ॥

तो वृषभ जरी दुसर्‍याच गाईंकडे पाहून डुरकण्या फोडतो तरी निराळ्याच कळपांत तो आपले रेत ठेवतो. तोच रात्रीचा पति, तोच भग व तोच राजा आहे. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १७ ॥


वी॒रस्य॒ नु स्वश्व्यं॑ जनासः॒ प्र नु वो॑चाम वि॒दुर॑स्य दे॒वाः ।
षो॒ळ्हा यु॒क्ताः पञ्च॑प॒ञ्चा व॑हन्ति म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १८ ॥

वीरस्य नु स्वश्व्यं जनासः प्र नु वोचाम विदुरस्य देवाः ।
षोळ्हा युक्ताः पञ्चपञ्चा वहंति महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १८ ॥

लोकहो, उत्तम उत्तम घोडे पदरीं असण्याचें जें भाग्य ह्या वीराला लाभलें आहे तें आपण वर्णन करूं या. देवांनाही तें विदितच आहे. सहा सहा अथवा पांच पांच घोडे ह्यांचे रथास जोडले जाऊन ह्यास वाहून नेत असतात. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १८ ॥


दे॒वस्त्वष्टा॑ सवि॒ता वि॒श्वरू॑पः पु॒पोष॑ प्र॒जाः पु॑रु॒धा ज॑जान ।
इ॒मा च॒ विश्वा॒ भुव॑नान्यस्य म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ १९ ॥

देवस्त्वष्टा सविता विश्वरूपः पुपोष प्रजाः पुरुधा जजान ।
इमा च विश्वा भुवनान्यस्य महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ १९ ॥

हा सविता देवच त्वष्टा असून सर्व प्रकारची रूपें धारण करणरा आहे. ह्यानें अनेक जीव उत्पन्न केले व त्यांचे पोषण केले. ही सर्व भुवनें त्याचीच आहेत. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ १९ ॥


म॒ही समै॑रच्च॒म्वा समी॒ची उ॒भे ते अ॑स्य॒ वसु॑ना॒ न्यृष्टे ।
शृ॒ण्वे वी॒रो वि॒न्दमा॑नो॒ वसू॑नि म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ २० ॥

मही समैरच्चम्वा समीची उभे ते अस्य वसुना न्यृष्टे ।
शृण्वे वीरः विंदमानः वसूनि महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ २० ॥

ह्या दोन मोठमोठ्या गोलकांस परस्परांशी जोडून त्यानें एकत्र केलें. ते दोन्ही ह्याच्याच संपत्तीनें व्याप्त होऊन गेले आहेत. हा अनेक प्रकारचीं वैभवें जेव्हां मिळवू लागला तेव्हां ह्याची कीर्ति सर्वत्र ऐकूं येऊं लागली. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ २० ॥


इ॒मां च॑ नः पृथि॒वीं वि॒श्वधा॑या॒ उप॑ क्षेति हि॒तमि॑त्रो॒ न राजा॑ ।
पु॒रः॒सदः॑ शर्म॒सदो॒ न वी॒रा म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ २१ ॥

इमां च नः पृथिवीं विश्वधाया उप क्षेति हितमित्रः न राजा ।
पुरःसदः शर्मसदः न वीरा महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ २१ ॥

प्रजेचे कल्याण करून त्यांच्याशी मित्रत्व राखणार्‍या एखाद्या राजाप्रमाणे विश्वाचें पोषण करणारा देव ह्या पृथिवीवर वास्तव्य करतो. युद्धासाठीं पुढें सरणारे व दुसर्‍यांचे कल्याण करण्याकितां पुढें येणारे हे जणूं कांही वीर आलेले आहेत. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ २१ ॥


नि॒ष्षिध्व॑रीस्त॒ ओष॑धीरु॒तापो॑ र॒यिं त॑ इन्द्र पृथि॒वी बि॑भर्ति ।
सखा॑यस्ते वाम॒भाजः॑ स्याम म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेक॑म् ॥ २२ ॥

निष्षिध्वरीस्त ओषधीरुतापः रयिं त इंद्र पृथिवी बिभर्ति ।
सखायस्ते वामभाजः स्याम महद्देवानामसुरत्वमेकम् ॥ २२ ॥

औषधी व उदकें हीं तुझें कार्य करणारी आहेत. पृथिवी तुझें वैभव अर्पण करते. आम्ही तुझे मित्र होऊन तुझ्या उत्कृष्ट संपत्तीचे वांटेकरी होऊं. हे अविनाशी तत्त्व श्रेष्ठ असून तेंच एकटें देवांस स्फूर्ति उत्पन्न करतें. ॥ २२ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५६ (विश्वेदेव सूक्त)

ऋषी - प्रजापतिः वैश्वामित्रः : देवता - विश्वेदेवाः : छंद - त्रिष्टुप्


न ता मि॑नन्ति मा॒यिनो॒ न धीरा॑ व्र॒ता दे॒वानां॑ प्रथ॒मा ध्रु॒वाणि॑ ।
न रोद॑सी अ॒द्रुहा॑ वे॒द्याभि॒र्न पर्व॑ता नि॒नमे॑ तस्थि॒वांसः॑ ॥ १ ॥

न ता मिनंति मायिनः न धीरा व्रता देवानां प्रथमा ध्रुवाणि ।
न रोदसी अद्रुहा वेद्याभिर्न पर्वता निनमे तस्थिवांसः ॥ १ ॥

कसाही मोठा युक्तिबाज मनुष्य असो अगर एखादा सूज्ञ सज्जन असो पुरातन कालापासून अगदी अबाधित ठरलेले असे देवांचे जे जे नियम आहेत त्यांना कोणींही पुरुष बाध आणूं शकत नाही. ह्या सर्व गोष्टी खरोखरच ध्यानीं आणून द्यावपृथिवी कोणाचाही द्वेष करीत नाहींत. परंतु त्या आपली मानही खाली वाकविणार नाहींत आणि अढळ पर्वत हेही आपण होऊन कधीं खाली वांकणार नाहींत. ॥ १ ॥


षड्भा॒राँ एको॒ अच॑रन्बिभर्त्यृ॒तं वर्षि॑ष्ठ॒मुप॒ गाव॒ आगुः॑ ।
ति॒स्रो म॒हीरुप॑रास्तस्थु॒रत्या॒ गुहा॒ द्वे निहि॑ते॒ दर्श्येका॑ ॥ २ ॥

षड्भारान् एकः अचरन्बिभर्त्यृतं वर्षिष्ठमुप गाव आगुः ।
तिस्रः महीरुपरास्तस्थुरत्या गुहा द्वे निहिते दर्श्येका ॥ २ ॥

निश्चल राहून सहाही लोकांचा भार ईश्वर हा एकटाच सहन करतो. तेव्हां अर्थातच अत्यंत उत्कृष्ट असा जो सनातन धर्म त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञानरूप धेनू त्या ईश्वराच्या इच्छेस अनुसरूनच आलेल्या असतात. मोठ्या वेगानें परिभ्रमण करणार्‍या त्याच्या त्या तिघी विशाल शक्तिही लोकांच्या अगदी जवळच असतात, परंतु त्यांच्यापैकीं दोघीजणी गुप्तच राहून तिसरी मात्र दृगोचर होते. ॥ २ ॥


त्रि॒पा॒ज॒स्यो वृ॑ष॒भो वि॒श्वरू॑प उ॒त त्र्यु॒धा पु॑रु॒ध प्र॒जावा॑न् ।
त्र्य॒नी॒कः प॑त्यते॒ माहि॑नावा॒न्त्स रे॑तो॒धा वृ॑ष॒भः शश्व॑तीनाम् ॥ ३ ॥

त्रिपाजस्यः वृषभः विश्वरूप उत त्र्युधा पुरुध प्रजावान् ।
त्र्यनीकः पत्यते माहिनावांत्स रेतोधा वृषभः शश्वतीनाम् ॥ ३ ॥

हा जो अनंत रूपें धारण करणारा कामवर्षक वीर्यशाली परमेश्वर आहे त्याची ऊर्जस्विता तीन प्रकारची, आणि त्याचीं वक्षस्थलेंही तीनच. त्याची प्रजा सर्व ठिकाणीं भरून राहिलेली आहे. त्याचीं प्रकाशमय स्वरूपें सुद्धां तीन प्रकारची असून तो सर्व श्रेष्ठ (अखिल जगाचा) प्रभू आहे. तोच कामवर्षक वीर शाश्वत अशा उषांच्या ठिकाणी आपलें तेजोमय वीर्य ठेवून देतो. ॥ ३ ॥


अ॒भीक॑ आसां पद॒वीर॑बोध्यादि॒त्याना॑मह्वे॒ चारु॒ नाम॑ ।
आप॑श्चिदस्मा अरमन्त दे॒वीः पृथ॒ग्व्रज॑न्तीः॒ परि॑ षीमवृञ्जन् ॥ ४ ॥

अभीक आसां पदवीरबोध्यादित्यानामह्वे चारु नाम ।
आपश्चिदस्मा अरमंत देवीः पृथग्व्रजंतीः परि षीमवृञ्जन् ॥ ४ ॥

तो सन्मार्गदर्शक प्रभू ह्या उषांच्या सन्निधच प्रकट झाला, व आदित्य हे त्याचींच स्वरूपें म्हणून आदित्यांच्या मनोहर नामांची त्यानें प्रसिद्धि केली. त्याच्यापुढें आपोदेवी (म्हणजे आकाशोदकें) स्तब्ध झाल्या आणि जरी त्यांचे प्रवाह प्रथम निराळे होते तरी शेवटीं त्या त्यालाच जाऊन मिळाल्या. ॥ ४ ॥


त्री ष॒धस्था॑ सिन्धव॒स्त्रिः क॑वी॒नामु॒त त्रि॑मा॒ता वि॒दथे॑षु स॒म्राट् ।
ऋ॒ताव॑री॒र्योष॑णास्ति॒स्रो अप्या॒स्त्रिरा दि॒वो वि॒दथे॒ पत्य॑मानाः ॥ ५ ॥

त्री षधस्था सिंधवस्त्रिः कवीनामुत त्रिमाता विदथेषु सम्राट् ।
ऋतावरीर्योषणास्तिस्रः अप्यास्त्रिरा दिवः विदथे पत्यमानाः ॥ ५ ॥

हे सिंधूनो ! प्रतिभासंपन्न जनांची वसतिस्थानें तिहीच्या तिप्पट म्हणजे नऊ आहेत. आणि ह्या त्रिभुवनाचा उत्पन्नकर्ता जो परमेश्वर तोच आमच्या धर्ममंडळाचाही राजाधिराज आहे. त्यामुळें सत्यधर्मप्रिय आणि आकाशोदकाच्या स्वामिनी अशा ज्या तिघी दिव्यांगना आहेत त्या स्वर्गलोकांतून तिन्ही त्रिकाळीं येऊन आमच्या यज्ञसमरंभांत मालकिणीप्रमाणें वावरत असतात. ॥ ५ ॥


त्रिरा दि॒वः स॑वित॒र्वार्या॑णि दि॒वेदि॑व॒ आ सु॑व॒ त्रिर्नो॒ अह्नः॑ ।
त्रि॒धातु॑ रा॒य आ सु॑वा॒ वसू॑नि॒ भग॑ त्रातर्धिषणे सा॒तये॑ धाः ॥ ६ ॥

त्रिरा दिवः सवितर्वार्याणि दिवेदिव आ सुव त्रिर्नः अह्नः ।
त्रिधातु राय आ सुवा वसूनि भग त्रातर्धिषणे सातये धाः ॥ ६ ॥

जगत्‌प्रेरक सवितृदेवा, अत्यंत स्पृहणीय असे जे जे तुझे वर लाभ आहेत ते ते प्रतिदिनीं तीन वेळां तूं द्युलोकांतून येऊन आम्हांस देत जा. भाग्यदात्या देवा, त्रिस्वरूपात्मक ऐश्वर्य व तिन्ही प्रकारची अभीष्ट संपत्ति आम्हांस दान कर. हे सद्‌बुद्धिदायका, हे दीन तारका, आमचें ध्येय आम्हांस लाभावें म्हणून ती दिव्य संपत्ति आम्हांस अर्पण कर. ॥ ६ ॥


त्रिरा दि॒वः स॑वि॒ता सो॑षवीति॒ राजा॑ना मि॒त्रावरु॑णा सुपा॒णी ।
आप॑श्चिदस्य॒ रोद॑सी चिदु॒र्वी रत्नं॑स भिक्षन्त सवि॒तुः स॒वाय॑ ॥ ७ ॥

त्रिरा दिवः सविता सोषवीति राजाना मित्रावरुणा सुपाणी ।
आपश्चिदस्य रोदसी चिदुर्वी रत्नंि भिक्षंत सवितुः सवाय ॥ ७ ॥

तो जत्‌प्रेरक भगवान द्युलोकांतून आविर्भूत होतो. विश्वाचे अत्यंत उदार अधिराजे जे मित्रावरुण त्यांच्या रूपानेंच तो प्रकट होतो, म्हणून आपोदेवी व विशाल अशा द्यावापृथिवी ह्यांनी सुद्धां सर्व विश्वाला अर्पण करण्यासाठीं जगत्‌प्रेरक भगवंतापाशी चैतन्यरूप रत्‍नाची याचना केलेली आहे. ॥ ७ ॥


त्रिरु॑त्त॒मा दू॒णशा॑ रोच॒नानि॒ त्रयो॑ राज॒न्त्यसु॑रस्य वी॒राः ।
ऋ॒तावा॑न इषि॒रा दू॒ळभा॑स॒स्त्रिरा दि॒वो वि॒दथे॑ सन्तु दे॒वाः ॥ ८ ॥

त्रिरुत्तमा दूणशा रोचनानि त्रयः राजंत्यसुरस्य वीराः ।
ऋतावान इषिरा दूळभासस्त्रिरा दिवः विदथे संतु देवाः ॥ ८ ॥

प्रकाशमय, अत्यंत श्रेष्ठ म्हणूनच अत्यंत दुर्लभ असे जे भगवंताचे लोक आहेत ते तीन आहेत आणि त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे वीर उज्वल कांतीनें तळपत आहेत तेही तीनच. देव हे नेहमी सद्धर्म प्रिय, आवेशप्रद, अजिंक्य असतात म्हणून ते द्युलोकांतून तिन्ही काळीं येऊन आमच्या उपासना समारंभांत विराजमान होवोत. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५७ (विश्वेदेव सूक्त)

ऋषी - विश्वामित्रः गाथिनः : देवता - विश्वेदेवा : छंद - त्रिष्टुप्


प्र मे॑ विवि॒क्वाँ अ॑विदन्मनी॒षां धे॒नुं चर॑न्तीं॒ प्रयु॑ता॒मगो॑पाम् ।
स॒द्यश्चि॒द्या दु॑दु॒हे भूरि॑ धा॒सेरिन्द्र॒स्तद॒ग्निः प॑नि॒तारो॑ अस्याः ॥ १ ॥

प्र मे विविक्वान् अविदन्मनीषां धेनुं चरंतीं प्रयुतामगोपाम् ।
सद्यश्चिद्या दुदुहे भूरि धासेरिंद्रस्तदग्निः पनितारः अस्याः ॥ १ ॥

कोणी दाव ठेवणारा नसल्यामुळे माझी बुद्धिरूप धेनू एकटीच इकडे तिकडे भटकत होती, परंतु बर्‍या वाईटाची बिनचूक निवड करणारा जो (परमेश्वर) इंद्र त्यानें तिला ताळ्यावर आणले. त्या बरोबर तिनें अंतःकरण तृप्तिचा विपुल पान्हा सोडला तेव्हां इंद्राने, अग्निनें व इतर देवतांनी तिची प्रशंसाच केली. ॥ १ ॥


इन्द्रः॒ सु पू॒षा वृष॑णा सु॒हस्ता॑ दि॒वो न प्री॒ताः श॑श॒यं दु॑दुह्रे ।
विश्वे॒ यद॑स्यां र॒णय॑न्त दे॒वाः प्र वोऽ॑त्र वसवः सु॒म्नम॑श्याम् ॥ २ ॥

इंद्रः सु पूषा वृषणा सुहस्ता दिवः न प्रीताः शशयं दुदुह्रे ।
विश्वे यदस्यां रणयंत देवाः प्र वोऽत्र वसवः सुम्नमश्याम् ॥ २ ॥

मनोरथ वर्षक वीर आणि उदार हस्त असे जे इंद्र आणि पूषा त्यांनी आमच्या स्तवनानें प्रसन्न होऊन द्युलोकाच्या अक्षय्य निधीचें दोहन केलें. माझ्या स्तवन माधुरींत अखिल देवांचे चित्त रममाण झालेलें आहे, तर हे दिव्य निधींनो, त्या तुमच्या सुखमयपदाची प्राप्ति मला होईल असें करा. ॥ २ ॥


या जा॒मयो॒ वृष्ण॑ इ॒च्छन्ति॑ श॒क्तिं न॑म॒स्यन्ती॑र्जानते॒ गर्भ॑मस्मिन् ।
अच्छा॑ पु॒त्रं धे॒नवो॑ वावशा॒ना म॒हश्च॑रन्ति॒ बिभ्र॑तं॒ वपूं॑षि ॥ ३ ॥

या जामयः वृष्ण इच्छंति शक्तिं नमस्यंतीर्जानते गर्भमस्मिन् ।
अच्छा पुत्रं धेनवः वावशाना महश्चरंति बिभ्रतं वपूंषि ॥ ३ ॥

आमच्या स्तवन वाणी जणों एकमेकींच्या अत्यंत निकट अशा आप्तच आहेत, आणि मनोरथपूरक वीरश्रेष्ठ जो ईश्वर त्याचे सामर्थ्य आतां प्रकट होईल अशी उत्कंठा त्यांना लागून राहिलेली आहे. देवापुढें त्या नम्र होतात आणि त्यामुळें त्यांच्या अंगातील सूक्ष्मरूपानें वास करणार्‍या सामर्थ्याचीही त्यांना सहज प्रचीति येते; व मोठी विलक्षण स्वरूपें धारण करणार्‍या दिव्य पुत्राकडे त्या धेनू प्रमाणे मोठ्यानें हंबरतच जातात. ॥ ३ ॥


अच्छा॑ विवक्मि॒ रोद॑सी सु॒मेके॒ ग्राव्णो॑ युजा॒नो अ॑ध्व॒रे म॑नी॒षा ।
इ॒मा उ॑ ते॒ मन॑वे॒ भूरि॑वारा ऊ॒र्ध्वा भ॑वन्ति दर्श॒ता यज॑त्राः ॥ ४ ॥

अच्छा विवक्मि रोदसी सुमेके ग्राव्णः युजानः अध्वरे मनीषा ।
इमा ऊं इति ते मनवे भूरिवारा ऊर्ध्वा भवंति दर्शता यजत्राः ॥ ४ ॥

सोमरस पिळून काढण्याचे पाषाण यागकाली अगदी भक्तिपूर्वक एकमेकांशी जोडून ठेऊन आणि ह्या मनोहर रोदसींची प्रशंसा करून मी त्यंना पाचारण करीत आहे. हे अग्निदेवा, ज्यांनी आपले स्पृहणीय वर मनुराजाला विपुल प्रमाणात अर्पण केलें त्या ह्या तुझ्या पवित्र आणि दर्शनीय ज्वाला पहा कशा नीट वर नभोमंडळाकडे चालल्या आहेत. ॥ ४ ॥


या ते॑ जि॒ह्वा मधु॑मती सुमे॒धा अग्ने॑ दे॒वेषू॒च्यत॑ उरू॒ची ।
तये॒ह विश्वाँ॒ अव॑से॒ यज॑त्रा॒ना सा॑दय पा॒यया॑ चा॒ मधू॑नि ॥ ५ ॥

या ते जिह्वा मधुमती सुमेधा अग्ने देवेषूच्यत उरूची ।
तयेह विश्वान् अवसे यजत्राना सादय पायया चा मधूनि ॥ ५ ॥

तुझी ज्वालारूप मधुरभाषिणी जिव्हा भक्तांना श्रेष्ठप्रतीची बुद्धिमत्ता देते, त्या तुझ्या सर्वव्यापक जिव्हेची स्तुति देवसमूहांत सर्वत्र होत असते. तेव्हां अशा आपल्या मधुरवाणीनें सर्व परमपूज्य दिव्य विभूतींना अशावर कृपा करण्याकरितां येथें आणून बसव आणि आमच्या मधुर सोमरसाचें पान करव. ॥ ५ ॥


या ते॑ अग्ने॒ पर्व॑तस्येव॒ धारास॑श्चन्ती पी॒पय॑द्देव चि॒त्रा ।
ताम॒स्मभ्यं॒ प्रम॑तिं जातवेदो॒ वसो॒ रास्व॑ सुम॒तिं वि॒श्वज॑न्याम् ॥ ६ ॥

या ते अग्ने पर्वतस्येव धारासश्चंती पीपयद्देव चित्रा ।
तामस्मभ्यं प्रमतिं जातऽवेदः वसः रास्व सुमतिं विश्वजन्याम् ॥ ६ ॥

हे अग्नि देवा, तुझी कृपा पर्वतावरून खाली कोसळणार्‍या अद्‍भुत प्रवाहाप्रमाणें निष्कलंक आणि अक्षय्य आहे. ती आमची उन्नति करो. हे दिव्यनिधीच्या प्रभो, हे अखिल ज्ञानसंपन्न देवा, जगत्‌कल्याण विषयक असें जें तुझें असामान्य धोरण आणि दयार्द्रबुद्धि ह्यांचा लाभ तूं आम्हांस कृपा करून दे. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५८ (अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - विश्वामित्रः गाथिनः : देवता - अश्विनौ : छंद - त्रिष्टुप्


धे॒नुः प्र॒त्न॒स्य॒ काम्यं॒ दुहा॑ना॒न्तः पु॒त्रश्च॑रति॒ दक्षि॑णायाः ।
आ द्यो॑त॒निं व॑हति शु॒भ्रया॑मो॒षसः॒ स्तोमो॑ अ॒श्विना॑वजीगः ॥ १ ॥

धेनुः प्रत्नवस्य काम्यं दुहानांतः पुत्रश्चरति दक्षिणायाः ।
आ द्योतनिं वहति शुभ्रयामोषसः स्तोमः अश्विनावजीगः ॥ १ ॥

जो सनातन परमेश्वर व त्याची धेनू उषा, ही भक्तांना मनमुराद मनोरथ दुग्ध देते व नंतर ह्या कनवाळू रोदसीचा पुत्र (सूर्य) आकाशांत फिरूं लागतो. जी आपल्या धवलकांतिमान रथावर आरूढ होऊन आपला निर्मल प्रकाश पृथ्वीवर आणून सोडते अशा त्या उषेच्या स्तोत्रानें पहा हे अश्वीदेव सहजच जागृत झाले आहेत. ॥ १ ॥


सु॒युग्व॑हन्ति॒ प्रति॑ वामृ॒तेनो॒र्ध्वा भ॑वन्ति पि॒तरे॑व॒ मेधाः॑ ।
जरे॑थाम॒स्मद्वि प॒णेर्म॑नी॒षां यु॒वोरव॑श्चकृ॒मा या॑तम॒र्वाक् ॥ २ ॥

सुयुग्वहंति प्रति वामृतेनोर्ध्वा भवंति पितरेव मेधाः ।
जरेथामस्मद्वि पणेर्मनीषां युवोरवश्चकृमा यातमर्वाक् ॥ २ ॥

तुमच्या रथाला घोडे मोठ्या ऐटींत जोडलेले आहेत, ते सनातन व सत्य अशा धर्ममार्गानेंच तुम्हांला येथें घेऊन येतात, त्यावेळीं भक्तांचे आई बाप जे तुम्हीं, ते ज्याप्रमाणें स्तुतींचा स्वीकार करण्याकरितां सिद्ध होतां, त्याप्रमाणेंच कवीच्या प्रतिभाही तुमचें स्तवन करण्यास उद्युक्त झालेल्या असतात. तर कृपणपणाची कोती बुद्धि आमच्यापासून दूर करून नाहींशी करा. तुम्हांला आम्हीं शरणागत झालो आहोंत तर आमच्याकडे भूलोकीं त्वरीत या. ॥ २ ॥


सु॒युग्भि॒रश्वैः॑ सु॒वृता॒ रथे॑न॒ दस्रा॑वि॒मं शृ॑णुतं॒ श्लोक॒मद्रेः॑ ।
किम॒ङ्ग वां॒ प्रत्यव॑र्तिं॒ गमि॑ष्ठा॒हुर्विप्रा॑सो अश्विना पुरा॒जाः ॥ ३ ॥

सुयुग्भिरश्वैः सुवृता रथेन दस्राविमं शृणुतं श्लोकमद्रेः ।
किमङ्ग वां प्रत्यवर्तिं गमिष्ठाहुर्विप्रासः अश्विना पुराजाः ॥ ३ ॥

तुमचे ऐटीनें चालणारे घोडे आणि मोठ्या वेगानें मजेशीर चालाणारा तुमचा रथ थाटानें येत असतांना हे अद्‍भुत सामर्थ्यशाली अश्वीहो, आमच्या सोम पाषाणांचा हा गंभीर निनाद तुम्हीं श्रवण करीत या. अश्वीदेवांनो, भक्तजन प्राणसंकटांत असतांना त्यांच्या सहाय्यार्थ तुम्हीं अतिशय त्वरेनें धांवून येतां असें पुरातनकाळचे ऋषिसुद्धां जें म्हणत ते तुम्हींच ना ? ॥ ३ ॥


आ म॑न्येथा॒मा ग॑तं॒ कच्चि॒देवै॒र्विश्वे॒ जना॑सो अ॒श्विना॑ हवन्ते ।
इ॒मा हि वां॒ गोऋ॑जीका॒ मधू॑नि॒ प्र मि॒त्रासो॒ न द॒दुरु॒स्रो अग्रे॑ ॥ ४ ॥

आ मन्येथामा गतं कच्चिदेवैर्विश्वे जनासः अश्विना हवंते ।
इमा हि वां गोऋजीका मधूनि प्र मित्रासः न ददुरुस्रः अग्रे ॥ ४ ॥

तर कृपा करून जरा इकडे लक्ष द्या, आणि आपले चपल अश्व सोडून आमच्याकडे आगमन करा. हे अश्वीदेवहो, सर्व जग तुम्हांला पाचारण करीत आहे. हे दुग्धमिश्रित मधुर रस तुमच्याकरितां सिद्ध आहेत. आणि आमच्या पेक्षां श्रेष्ठ असतांही जे आमच्याशीं मित्राप्रमाणें वागतात अशा ऋत्विजांनी, उषाकालची प्रभा दिसूं लागतांच ते मधुर रस तुम्हांला अर्पण केले आहेत. ॥ ४ ॥


ति॒रः पु॒रू चि॑दश्विना॒ रजां॑स्याङ्गू॒षो वां॑ मघवाना॒ जने॑षु ।
एह या॑तं प॒थिभि॑र्देव॒यानै॒र्दस्रा॑वि॒मे वां॑ नि॒धयो॒ मधू॑नाम् ॥ ५ ॥

तिरः पुरू चिदश्विना रजांस्याङ्गूषः वां मघऽवाना जनेषु ।
एह यातं पथिभिर्देवयानैर्दस्राविमे वां निधयः मधूनाम् ॥ ५ ॥

ऐश्वर्यसंपन्न देवांनो, सर्व लोकांमध्यें हा जो गंभीर स्तुतिघोष चाललेला आहे तो तुमच्या प्रित्यर्थच. तर हे अश्वीदेवांनो, वाटेंत शेंकडों रजोलोक असले तरी ते ओलांडून, तुमच्यासारख्या दिव्य विभूतींना योग्य अशाच मार्गांनी येथें भूलोकीं या. हे अद्‍भुत पराक्रमी वीरांनो, हे मधुर पेयाचे चषक तुमच्याच करितां ठेवलेले आहेत. ॥ ५ ॥


पु॒रा॒णमोकः॑ स॒ख्यं शि॒वं वां॑ यु॒वोर्न॑रा॒ द्रवि॑णं ज॒ह्नाव्या॑म् ।
पुनः॑ कृण्वा॒नाः स॒ख्या शि॒वानि॒ मध्वा॑ मदेम स॒ह नू स॑मा॒नाः ॥ ६ ॥

पुराणमोकः सख्यं शिवं वां युवोर्नरा द्रविणं जह्नाव्याम् ।
पुनः कृण्वानाः सख्या शिवानि मध्वा मदेम सह नू समानाः ॥ ६ ॥

आमचे यज्ञमंदिर हे तुमचे पुरातन गृह. तुमचें प्रेम मंगलकारक होय. हे वीरांनो, तुम्ही आपलें सामर्थ्यधन जन्हुकुलांतील पुरुषांत ठेऊन दिलें आहे. तर तुमचें तें शुभकारक प्रेम आतां आपण पुनः ताजें करून आणि समसमान एकत्र बसून सोमप्राशनानें आनंदांत तल्लीन होऊं. ॥ ६ ॥


अश्वि॑ना वा॒युना॑ यु॒वं सु॑दक्षा नि॒युद्भि॑ाष् च स॒जोष॑सा युवाना ।
नास॑त्या ति॒रोअ॑ह्न्यं जुषा॒णा सोमं॑ पिबतं अ॒स्रिधा॑ सुदानू ॥ ७ ॥

अश्विना वायुना युवं सुदक्षा नियुद्भिदष् च सजोषसा युवाना ।
नासत्या तिरोअह्न्यं जुषाणा सोमं पिबतं अस्रिधा सुदानू ॥ ७ ॥

चातुर्यबलमंडित अश्वीदेवांनो, तुम्ही वायूसह ’नियुत्’ नावाचे चलाख घोडे जोडून प्रेमळ अंतःकरणानें या. हे अक्षय्य तारुण्यशाली देवांनो, हे दानशूरांनो, तुम्ही सत्यस्वरूप आहांत. तुम्हाला कोणाकडूनही अपकार होणें शक्य नाहीं, तुम्ही तृप्त आहांत तर आमचा कालच तयार केलेला हा सोमरस गृहण करा. ॥ ७ ॥


अश्वि॑ना॒ परि॑ वा॒मिषः॑ पुरू॒चीरी॒युर्गी॒र्भिर्यत॑माना॒ अमृ॑ध्राः ।
रथो॑ ह वामृत॒जा अद्रि॑जूतः॒ परि॒ द्यावा॑पृथि॒वी या॑ति स॒द्यः ॥ ८ ॥

अश्विना परि वामिषः पुरूचीरीयुर्गीर्भिर्यतमाना अमृध्राः ।
रथः ह वामृतजा अद्रिजूतः परि द्यावापृथिवी याति सद्यः ॥ ८ ॥

अश्वीदेवांनो, भक्तांच्या स्तुतीबरोबरच जी मोठ्या ईर्ष्येनें पुढें सरसावते अशी ही अनेकविध व अखंड औत्सुक्य भक्ति तिनें तुम्हांला घेरून टाकले आहे. सत्यापासून निर्माण झालेला तुमचा रथ सोमपाषाणांचा गंभीर घोष ऐकून दौडतच निघतो व आकश आणि पृथिवी ह्यांना एका क्षणांत वळसा घालून भक्तांकडे जातो. ॥ ८ ॥


अश्वि॑ना मधु॒षुत्त॑मो यु॒वाकुः॒ सोम॒स्तं पा॑त॒मा ग॑तं दुरो॒णे ।
रथो॑ ह वां॒ भूरि॒ वर्पः॒ करि॑क्रत्सु॒ताव॑तो निष्कृ॒तमाग॑मिष्ठः ॥ ९ ॥

अश्विना मधुषुत्तमः युवाकुः सोमस्तं पातमा गतं दुरोणे ।
रथः ह वां भूरि वर्पः करिक्रत्सुतावतः निष्कृतमागमिष्ठः ॥ ९ ॥

अश्वीदेवांनो, तुमच्याकरितां पिळलेला हा सोमरस अतिशय मिष्ट बनला आहे, तेव्हां तो गृहण करण्यास आमच्या यज्ञमंदिरांत या. तुमचा रथ क्षणोक्षणीं पाहिजे तसे शेंकडो आकार धारण करतो तर तो सोम अर्पण करणार्‍या भक्ताच्या सोमरसरूप उत्कृष्ट कृतिकडे अगदीं तातडीनें दौडत येतो. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५९ (मित्रोपस्थान सूक्त)

ऋषी - विश्वामित्रः गाथिनः : देवता - मित्रः : छंद - त्रिष्टुप्, गायत्री


मि॒त्रो जना॑न्यातयति ब्रुवा॒णो मि॒त्रो दा॑धार पृथि॒वीमु॒त द्याम् ।
मि॒त्रः कृ॒ष्टीरनि॑मिषा॒भि च॑ष्टे मि॒त्राय॑ ह॒व्यं घृ॒तव॑ज्जुहोत ॥ १ ॥

मित्रः जनान्यातयति ब्रुवाणः मित्रः दाधार पृथिवीमुत द्याम् ।
मित्रः कृष्टीरनिमिषाभि चष्टे मित्राय हव्यं घृतवज्जुहोत ॥ १ ॥

मित्र हा दृगोचर झाल्याबरोबर स्वमुखानें आज्ञा करून सर्व लोकांना आपआपल्या उद्योगांत व्यापृत करतो. मित्रानेंच ही पृथिवी आणि हे आकाश सांवरून धरलेलें आहे. डोळ्यांचे पातेंही न लववितां मित्र ह्या सर्व लोकांवर आपली दृष्टि एकसारखी चोहोंबाजूनें ठेवीत असतो तर ह्या मित्ररूप देवाला तुम्हीं घृतयुक्त हवि अर्पण करा. ॥ १ ॥


प्र स मि॑त्र॒ मर्तो॑ अस्तु॒ प्रय॑स्वा॒न्यस्त॑ आदित्य॒ शिक्ष॑ति व्र॒तेन॑ ।
न ह॑न्यते॒ न जी॑यते॒ त्वोतो॒ नैन॒मंहो॑ अश्नो॒त्यन्ति॑तो॒ न दू॒रात् ॥ २ ॥

प्र स मित्र मर्तः अस्तु प्रयस्वान्यस्त आदित्य शिक्षति व्रतेन ।
न हन्यते न जीयते त्वोतः नैनमंहः अश्नोत्यंतितः न दूरात् ॥ २ ॥

हे मित्रा, हे आदित्या, जो भाविक भक्त तुझ्या आज्ञप्रमाणें वागून सन्मार्गाचे शिक्षण घेत असताना तो भक्त सुखी असो. तूं त्याचें संरक्षण करूं लागलास म्हणजे तो कोणाकडून मारला जात नाही वा जिंकलाही जात नाही आणि पातक किंवा दुःख त्याच्या जवळ येऊन त्याला स्पर्श करण्याची तर गोष्टच नको, परंतु लांबून सुद्धां ते त्याला बाध करूं शकणार नाही. ॥ २ ॥


अ॒न॒मी॒वास॒ इळ॑या॒ मद॑न्तो मि॒तज्ञ॑वो॒ वरि॑म॒न्ना पृ॑थि॒व्याः ।
आ॒दि॒त्यस्य॑ व्र॒तमु॑पक्षि॒यन्तो॑ व॒यं मि॒त्रस्य॑ सुम॒तौ स्या॑म ॥ ३ ॥

अनमीवास इळया मदंतः मितज्ञवः वरिमन्ना पृथिव्याः ।
आदित्यस्य व्रतमुपक्षियंतः वयं मित्रस्य सुमतौ स्याम ॥ ३ ॥

आम्ही रोगरहित आहोंत तेव्हं स्तुतिप्रेमाच्या आनंदांत गर्क होऊन ह्या विस्तीर्ण पृथ्वीतलावर गुडघे टेंकून आदित्याच्या आज्ञेनुसार उपासनातत्पर असतों तर त्या मित्राच्याच कृपाछत्राखालीं आम्हीं राहूं असें घडो. ॥ ३ ॥


अ॒यं मि॒त्रो न॑म॒स्यः सु॒शेवो॒ राजा॑ सुक्ष॒त्रो अ॑जनिष्ट वे॒धाः ।
तस्य॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिय॒स्यापि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ॥ ४ ॥

अयं मित्रः नमस्यः सुशेवः राजा सुक्षत्रः अजनिष्ट वेधाः ।
तस्य वयं सुमतौ यज्ञियस्यापि भद्रे सौमनसे स्याम ॥ ४ ॥

हा नमस्कारास योग्य आणि सुखकर असा मित्र, जगाचा राजा, व्यवस्थापक आणि महा बलवान प्रभु असाच आविर्भूत झाला आहे. तर त्या यज्ञार्ह मित्राच्या कृपाछत्राखालीं, त्याच्या मंगलमय सौजन्याच्या छायेखालीं आम्हीं राहूं असें घडो. ॥ ४ ॥


म॒हाँ आ॑दि॒त्यो नम॑सोप॒सद्यो॑ यात॒यज्ज॑नो गृण॒ते सु॒शेवः॑ ।
तस्मा॑ ए॒तत्पन्य॑तमाय॒ जुष्ट॑म॒ग्नौ मि॒त्राय॑ ह॒विरा जु॑होत ॥ ५ ॥

महान् आदित्यः नमसोपसद्यः यातयज्जनः गृणते सुशेवः ।
तस्मा एतत्पन्यतमाय जुष्टमग्नौ मित्राय हविरा जुहोत ॥ ५ ॥

हा आदित्य महा श्रेष्ठ आहे. त्याला प्रणिपात करून त्याची उपासना सर्वांनी करावी हेंच उचित. तो सर्व लोकांना आपआपल्या उद्योगास प्रवृत्त करतो आणि स्तोतृजनाला अत्युत्तम अशा सुखांत ठेवतो. त्याची महती कितीही वर्णन केली तरी ती थोडीच. तर अशा ह्या मित्रा प्रित्यर्थ हे उत्कृष्ट हवि अग्नीमध्यें तुम्हीं अर्पण करा. ॥ ५ ॥


मि॒त्रस्य॑ चर्षणी॒धृतोऽ॑वो दे॒वस्य॑ सान॒सि । द्यु॒म्नं चि॒त्रश्र॑वस्तमम् ॥ ६ ॥

मित्रस्य चर्षणीधृतोऽवः देवस्य सानसि । द्युम्नं चित्रश्रवस्तमम् ॥ ६ ॥

जो सर्व प्राणिमात्राचा आधार, त्या ह्या प्रकाशरूप मित्रदेवाचा कृपाप्रसाद खरोखरच यश मिळवून देणारा आहे. आणि त्याच्या दिव्य कांतीचें वैभव तर इतकें अद्‍भुत आहे कीं त्याची अतोनात प्रख्याती झालेली आहे. ॥ ६ ॥


अ॒भि यो म॑हि॒ना दिवं॑ मि॒त्रो ब॒भूव॑ स॒प्रथाः॑ । अ॒भि श्रवो॑भिः पृथि॒वीम् ॥ ७ ॥

अभि यः महिना दिवं मित्रः बभूव सप्रथाः । अभि श्रवोभिः पृथिवीम् ॥ ७ ॥

ज्याची कीर्ति सर्वत्र गाजत आहे असा जो हा मित्र त्यानें आपल्या यशोबलानें आकाशमंडलासही अगदीं संकुचित करून टाकलें आणि तसेंच त्याच्या कीर्तिनें पृथ्वीस सुद्धां सर्वतोपरी हतगर्व करून सोडलें. ॥ ७ ॥


मि॒त्राय॒ पञ्च॑ येमिरे॒ जना॑ अ॒भिष्टि॑शवसे । स दे॒वान्विश्वा॑न्बिभर्ति ॥ ८ ॥

मित्राय पञ्च येमिरे जना अभिष्टिशवसे । स देवान्विश्वान्बिभर्ति ॥ ८ ॥

जो आपल्या महासामर्थ्याचा उपयोग भक्त रक्षणाकडेच करीत असतो, अशा ह्या मित्रदेवाच्या हुकमांत पांचीच्या पांचही मानवजाती आहेत, आणि अखिल देवांचा सांभाळही तोच करतो. ॥ ८ ॥


मि॒त्रो दे॒वेष्वा॒युषु॒ जना॑य वृ॒क्तब॑र्हिषे । इष॑ इ॒ष्टव्र॑ता अकः ॥ ९ ॥

मित्रः देवेष्वायुषु जनाय वृक्तबर्हिषे । इष इष्टव्रता अकः ॥ ९ ॥

सोमरसांतील दर्भाग्रें काढून टाकून निःसीम भक्तीनें सोमरस अर्पण करणार्‍या भक्तासच सर्व देवांमध्यें आणि मानवांमध्यें तो अशा प्रकारचा मनोत्साह देतो कीं त्याच्या योगानें सर्व पुण्यदायक सत्कर्में आपल्या हातून सहज घडतात. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ६० (इंद्र-ऋभु सूक्त)

ऋषी - विश्वामित्रः गाथिनः : देवता - ऋभवः, इद्र ऋभवः : छंद - जगती


इ॒हेह॑ वो॒ मन॑सा ब॒न्धुता॑ नर उ॒शिजो॑ जग्मुर॒भि तानि॒ वेद॑सा ।
याभि॑र्मा॒याभिः॒ प्रति॑जूतिवर्पसः॒ सौध॑न्वना य॒ज्ञियं॑ भा॒गमा॑न॒श ॥ १ ॥

इहेह वः मनसा बंधुता नर उशिजः जग्मुरभि तानि वेदसा ।
याभिर्मायाभिः प्रतिजूतिवर्पसः सौधन्वना यज्ञियं भागमानश ॥ १ ॥

हे शूरांनो, ह्य ठिकाणी अत्युत्सुक अशा कित्येक भक्तजनांनी आपल्या सद्‍भावानें आणि ज्ञानानें तुमच्याशी असें कांही विलक्षण दैवीबंधुत्व संपादन केलेलें आहे, कीं त्याच्या योगानें, त्या अप्रतीम चातुर्याच्या योगानें, हे सुधन्व्याच्या पुत्रांनो, विलक्षण जोम अंगांत आहे असें तेजस्वी रूप तुम्हांला प्राप्त होऊन देवांबरोबरच तुम्हांलाही हविर्भाग प्राप्त झाला. ॥ १ ॥


याभिः॒ शची॑भिश्चम॒साँ अपिं॑शत॒ यया॑ धि॒या गामरि॑णीत॒ चर्म॑णः ।
येन॒ हरी॒ मन॑सा नि॒रत॑क्षत॒ तेन॑ देव॒त्वमृ॑भवः॒ समा॑नश ॥ २ ॥

याभिः शचीभिश्चमसान् अपिंशत यया धिया गामरिणीत चर्मणः ।
येन हरी मनसा निरतक्षत तेन देवत्वमृभवः समानश ॥ २ ॥

ज्या आपल्या अद्‍भुत शक्तीनें तुम्ही निरनिराळे चमस निर्माण केलेत, ज्या बुद्धिचातुर्यानें तुम्ही नुसतें चामडें घेऊन त्याच्यापासून जिवंत धेनू बनवून सोडून दिलीत, ज्या सामर्थ्यानें आपल्या केवळ संकल्पानें तुम्हीं अश्व निर्माण केलेत, त्याच आपल्या कर्तृत्वाच्या योगानें, हे ऋभूंनो, तुम्हाला देवत्व प्राप्त झालें आहे. ॥ २ ॥


इन्द्र॑स्य स॒ख्यमृ॒भवः॒ समा॑नशु॒र्मनो॒र्नपा॑तो अ॒पसो॑ दधन्विरे ।
सौ॒ध॒न्व॒नासो॑ अमृत॒त्वमेरि॑रे वि॒ष्ट्वी शमी॑भिः सु॒कृतः॑ सुकृ॒त्यया॑ ॥ ३ ॥

इंद्रस्य सख्यमृभवः समानशुर्मनोर्नपातः अपसः दधन्विरे ।
सौधन्वनासः अमृतत्वमेरिरे विष्ट्वी शमीभिः सुऽकृतः सुऽकृत्यया ॥ ३ ॥

ऋभूंची योग्यता एवढी झाली कीं, ते मानव असतांही प्रत्यक्ष इंद्राच्या कृपालोभास पात्र झाले. कारण त्यांनी सत्कर्माचरणच केलें. ते सुधन्व्याचे पुत्र पुण्यशील होते. त्यांना त्यांच्या सुकृताचरणानें आणि त्यांच्या अजब कॢप्तीनें व्यापक सामर्थ्य प्राप्त होऊन ते अमर झाले. ॥ ३ ॥


इन्द्रे॑ण याथ स॒रथं॑ सु॒ते सचाँ॒ अथो॒ वशा॑नां भवथा स॒ह श्रि॒या ।
न वः॑ प्रति॒मै सु॑कृ॒तानि॑ वाघतः॒ सौध॑न्वना ऋभवो वी॒र्याणि च ॥ ४ ॥

इंद्रेण याथ सरथं सुते सचान् अथः वशानां भवथा सह श्रिया ।
न वः प्रतिमै सुऽकृतानि वाघतः सौधन्वना ऋभवः वीर्याणि च ॥ ४ ॥

सोमरस पिळून सिद्ध होतांच तुम्ही इंद्राबरोबर त्याच्याच रथांत बसून भक्ताकडे येतां; म्हणजे अर्थातच तुमच्या इच्छेप्रमाणें तुम्ही दिव्य वैभवानें मंडित होतां. हे भगवद्‍भक्त ऋभूंनो, हे सुधन्व्याच्या पुत्रांनो, कोणा मनुष्याचे कितीही पुण्य असो, व कितीही मोठा प्रताप असो, त्याला तुमच्या सुकृताची किंवा तुमच्या पराक्रमांची सर कदापि येणार नाही. ॥ ४ ॥


इन्द्र॑ ऋ॒भुभि॒र्वाज॑वद्‌भिः॒ समु॑क्षितं सु॒तं सोम॒मा वृ॑षस्वा॒ गभ॑स्त्योः ।
धि॒येषि॒तो म॑घवन्दा॒शुषो॑ गृ॒हे सौ॑धन्व॒नेभिः॑ स॒ह म॑त्स्वा॒ नृभिः॑ ॥ ५ ॥

इंद्र ऋभुभिर्वाजवद्‌भिः समुक्षितं सुतं सोममा वृषस्वा गभस्त्योः ।
धियेषितः मघऽवंदाशुषः गृहे सौधन्वनेभिः सह मत्स्वा नृभिः ॥ ५ ॥

भगवंता इंद्रा, सत्त्वसामर्थ्यमंडित अशा ऋभूंना बरोबर घेऊन येऊन पात्रांत ओतलेला हा बलवर्धक सोमरस तूं आपल्या दोन्हीं हातांनी पात्र मुखास लावून प्राशन कर. आम्हीं खर्‍या प्रेमानें तुला ओळखून येथें आणलें आहे, तर हे दिव्यैश्वर्यदात्या, सुधन्व्याच्या शूर पुत्रांसह तूं हवि अर्पण करणार्‍या भक्ताच्या गृहीं येऊन हर्षनिर्भर हो. ॥ ५ ॥


इन्द्र॑ ऋभु॒मान्वाज॑वान्मत्स्वे॒ह नो॑ऽ॒स्मिन्सव॑ने॒ शच्या॑ पुरुष्टुत ।
इ॒मानि॒ तुभ्यं॒ स्वस॑राणि येमिरे व्र॒ता दे॒वानां॒ मनु॑षश्च॒ धर्म॑भिः ॥ ६ ॥

इंद्र ऋभुमान्वाजवान्मत्स्वेह नोऽस्मिन्सवने शच्या पुरुष्टुत ।
इमानि तुभ्यं स्वसराणि येमिरे व्रता देवानां मनुषश्च धर्मभिः ॥ ६ ॥

इंद्रा, तूं ऋभूंचा स्वामी आहेस; तूं सत्त्वाढ्य आहेस; हे सर्वजनस्तुत भगवंता, तूं आपल्या दिव्य शक्तींसह येथें येऊन ह्या सोमसेवन प्रसंगी सोमप्राशनानें प्रमुदित हो. हीं आकाशांतील दिव्य भुवनें तुझ्याच नियमांनी बद्ध झालेलीं आहेत. देवांचे आणि तसेच आम्हां मानवांचे वर्तननियम सुद्धां स्वभावतः तुझ्याच आज्ञेप्रमाणे चाललेले आहेत. ॥ ६ ॥


इन्द्र॑ ऋ॒भुभि॑र्वा॒जिभि॑र्वा॒जय॑न्नि॒ह स्तोमं॑ जरि॒तुरुप॑ याहि य॒ज्ञिय॑म् ।
श॒तं केते॑भिरिषि॒रेभि॑रा॒यवे॑ स॒हस्र॑णीथो अध्व॒रस्य॒ होम॑नि ॥ ७ ॥

इंद्र ऋभुभिर्वाजिभिर्वाजयन्निह स्तोमं जरितुरुप याहि यज्ञियम् ।
शतं केतेभिरिषिरेभिरायवे सहस्रणीथः अध्वरस्य होमनि ॥ ७ ॥

इंद्रा, सत्त्ववान अशा ऋभूंसहित प्रसन्न होऊन व स्तोतृजनांच्या माननीय स्तोत्राला सत्त्वशोभित करून येथें ये. अत्यंत उत्सुक अशा आमच्या शेंकडो मनोदयांनी तुला विनविलें आहे, तर अनंत विद्यानिपुण असा तूं ह्या दीन जनांकरितां त्यांच्या याग समारंभाकडे कृपा करून आगमन कर. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ६१ (उषा सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - उषाः : छंद - त्रिष्टुप्


उषो॒ वाजे॑न वाजिनि॒ प्रचे॑ताः॒ स्तोमं॑ जुषस्व गृण॒तो म॑घोनि ।
पु॒रा॒णी दे॑वि युव॒तिः पुरं॑धि॒रनु॑ व्र॒तं च॑रसि विश्ववारे ॥ १ ॥

उषः वाजेन वाजिनि प्रचेताः स्तोमं जुषस्व गृणतः मघोनि ।
पुराणी देवि युवतिः पुरंधिरनु व्रतं चरसि विश्ववारे ॥ १ ॥

हे उषे, तूं सत्त्वानेंच सत्त्वसामर्थ्यशील झलेली आहेस. तूं महा ज्ञानी आहेस, तर हे औदार्यशालिनी, मज स्तोतृजनाचें हे स्तोत्र तूं मान्य करून घे. हे देवी, तूं पुरातन असूनही यौवनाढ्य आहेस. हे सर्वजनप्रिय देवते, कवींची प्रतिभा जी तूं ती ईश्वराज्ञेप्रमाणें उदय पावत असतेस. ॥ १ ॥


उषो॑ दे॒व्यम॑र्त्या॒ वि भा॑हि च॒न्द्रर॑था सू॒नृता॑ ई॒रय॑न्ती ।
आ त्वा॑ वहन्तु सु॒यमा॑सो॒ अश्वा॒ हिर॑ण्यवर्णां पृथु॒पाज॑सो॒ ये ॥ २ ॥

उषः देव्यमर्त्या वि भाहि चंद्ररथा सूनृता ईरयंती ।
आ त्वा वहंतु सुयमासः अश्वा हिरण्यवर्णां पृथुपाजसः ये ॥ २ ॥

हे देवी उषे, तूं अमर आहेसच, पण तुझ्या रथाची कांतिसुद्धां आल्हादजनक आहे, तर भक्तांना सत्यार्थपूर्ण परंतु सुरस अशा कवनांची स्फूर्ति देऊन आपल्या प्रभेनें हा भूलोक प्रकाशित कर. तुझे अश्व सुयंत्र चालविणारे आणि महा ओजस्वी आहेत. ते सुवर्णाप्रमाणे अविनाशी अंगकांतीनें विभूषित अशा तुला क्षितिजाच्या वर घेऊन येवोत. ॥ २ ॥


उषः॑ प्रती॒ची भुव॑नानि॒ विश्वो॒र्ध्वा ति॑ष्ठस्य॒मृत॑स्य के॒तुः ।
स॒मा॒नमर्थं॑ चरणी॒यमा॑ना च॒क्रमि॑व नव्य॒स्या व॑वृत्स्व ॥ ३ ॥

उषः प्रतीची भुवनानि विश्वोर्ध्वा तिष्ठस्यमृतस्य केतुः ।
समानमर्थं चरणीयमाना चक्रमिव नव्यस्या ववृत्स्व ॥ ३ ॥

हे उषे, सर्व भुवनांच्या सन्मुख तूं सज्ज होऊन उभी राहतेस, तेव्हां अशी दिसतेस कीं जणों काय अमरत्वाची पताकाच फडकत आहे. एकाच उद्देशावर लक्ष ठेवुन तूं पुनः पुनः येतेस, तर हे अपूर्व लावण्यसंपन्न देवी, रथाच्या चक्राप्रमाणे आपले लक्षही इकडेच फिरव. ॥ ३ ॥


अव॒ स्यूमे॑व चिन्व॒ती म॒घोन्यु॒षा या॑ति॒ स्वस॑रस्य॒ पत्नी॑ ।
स्व१र्जन॑न्ती सु॒भगा॑ सु॒दंसा॒ आन्ता॑दि॒वः प॑प्रथ॒ आ पृ॑थि॒व्याः ॥ ४ ॥

अव स्यूमेव चिन्वती मघोन्युषा याति स्वसरस्य पत्नीे ।
स्व१र्जनंती सुभगा सुदंसा आंतादिवः पप्रथ आ पृथिव्याः ॥ ४ ॥

ही औदार्यशालिनी, सूर्याची रमणी उषा, पहा एखाद्या वस्त्राप्रमाणें प्रकाशाचा लोट खाली सोडून देत आहे. अशा रीतीनें ही भाग्यशालिनी, अद्‍भुतचरिता उषा, सूर्याच्या प्रकाशाला प्रकट करून द्युलोकाच्या सीमेपर्यंत, ह्या पृथ्वीपर्यंत एकसारखी भरून राहिली आहे. ॥ ४ ॥


अच्छा॑ वो दे॒वीमु॒षसं॑ विभा॒तीं प्र वो॑ भरध्वं॒ नम॑सा सुवृ॒क्तिम् ।
ऊ॒र्ध्वं म॑धु॒धा दि॒वि पाजो॑ अश्रे॒त्प्र रो॑च॒ना रु॑रुचे र॒ण्वसं॑दृक् ॥ ५ ॥

अच्छा वः देवीमुषसं विभातीं प्र वः भरध्वं नमसा सुवृक्तिम् ।
ऊर्ध्वं मधुधा दिवि पाजः अश्रेत्प्र रोचना रुरुचे रण्वसंदृक् ॥ ५ ॥

स्तोतृजनहो, तुमच्याकरितां प्रकट झालेली ही जी प्रकाशवती देवी उषा तिजपुढें प्रणिपात करून तिला शुद्धचित्त प्रेरीत असें स्तोत्र अर्पण करा. मधुर प्रेमाची ही खाणच आहे. आणि वर आकाशांत तिनें आपल्या तेजाचा भर सांठवून ठेवला असून पृथ्वीवरसुद्धां ह्या देदीप्यमान मनोहर रूपवती उषेनें आपला प्रकाश लकलकीत पाडला आहे. ॥ ५ ॥


ऋ॒ताव॑री दि॒वो अ॒र्कैर॑बो॒ध्या रे॒वती॒ रोद॑सी चि॒त्रम॑स्थात् ।
आ॒य॒तीम॑ग्न उ॒षसं॑ विभा॒तीं वा॒ममे॑षि॒ द्रवि॑णं॒ भिक्ष॑माणः ॥ ६ ॥

ऋतावरी दिवः अर्कैरबोध्या रेवती रोदसी चित्रमस्थात् ।
आयतीमग्न उषसं विभातीं वाममेषि द्रविणं भिक्षमाणः ॥ ६ ॥

ही सत्यधर्मप्रिय उषा, कवींच्या अर्क गायनांनी आकाशांत जागृत झाली आणि जागृत होऊन ती दिव्य ऐश्वर्यसंपन्न देवी क्षितिजावर अंतराळांत चित्रविचित्र प्रकाशानें भरून राहिली. म्हणून हे अग्नि, ती प्रकाशवती उषा येत असतांना तिनें अत्यंत उत्कृष्ट असें ’द्रविण’ नामक सामगायन ऐकवावें म्हणून विनंति करण्याकरितां तूंही तिकडे जात असतोस. ॥ ६ ॥


ऋ॒तस्य॑ बु॒ध्न उ॒षसा॑मिष॒ण्यन्वृषा॑ म॒ही रोद॑सी॒ आ वि॑वेश ।
म॒ही मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य मा॒या च॒न्द्रेव॑ भा॒नुं वि द॑धे पुरु॒त्रा ॥ ७ ॥

ऋतस्य बुध्न उषसामिषण्यन्वृषा मही रोदसी आ विवेश ।
मही मित्रस्य वरुणस्य माया चंद्रेव भानुं वि दधे पुरुत्रा ॥ ७ ॥

उषेच्या समागमाकरितां उत्सुक झालेल्या सूर्यानेंही ह्या चिरंतन आकाशाच्या तळाशीं क्षितिजाच्या वर अंतराळांत प्रवेश केला; तरी सुद्धां मित्र आणि वरुणरूप ईश्वराची अतर्क्य शक्ति अशी जी ही चंद्राप्रमाणें रमणीय उषा, तिनें आपलें किरणजाल अजूनही सर्वत्र पसरलेलें आहे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ६२ (अनेकदेवता सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः; जमदग्निः वा : छंद - त्रिष्टुप्, गायत्री
देवता - इंद्रावरुणौ, बृहस्पति, पूषा, सविता, सोमः, मित्रावरुणौ


इ॒मा उ॑ वां भृ॒मयो॒ मन्य॑माना यु॒वाव॑ते॒ न तुज्या॑ अभूवन् ।
क्व१त्यदि॑न्द्रावरुणा॒ यशो॑ वां॒ येन॑ स्मा॒ सिनं॒ भर॑थः॒ सखि॑भ्यः ॥ १ ॥

इमा ऊं इति वां भृमयः मन्यमाना युवावते न तुज्या अभूवन् ।
क्व१त्यदिंद्रवरुणा यशः वां येन स्मा सिनं भरथः सखिभ्यः ॥ १ ॥

जी आपल्या अभिमानाच्या भरांतच जोरानें गिरक्या घेत घेत शत्रूंवर जाऊन आदळतात तीं ही तुमचीं अस्त्रे, जो आपणास तुमचा दास म्हणवितो अशा भक्ताचा अंगावर तुमच्या हातून कदापि फेंकली जात नाहींस (असें तुमचे ब्रीद आहे). तर हे इंद्रावरुणहो, ’तुम्ही आपल्या भक्तांना धवलकीर्तिचा लाभ करून देतां’ असा जो तुमचा लोकोत्तर लौकिक आहे तो आजच कोठें गेला ? ॥ १ ॥


अ॒यमु॑ वां पुरु॒तमो॑ रयी॒यञ्छ॑श्वत्त॒ममव॑से जोहवीति ।
स॒जोषा॑विन्द्रावरुणा म॒रुद्‌भि॑र्दि॒वा पृ॑थि॒व्या शृ॑णुतं॒ हवं॑ मे ॥ २ ॥

अयमु वां पुरुतमः रयीयञ्छश्वत्तममवसे जोहवीति ।
सजोषाविंद्रवरुणा मरुद्‌भिर्दिवा पृथिव्या शृणुतं हवं मे ॥ २ ॥

हा मी तुमचा भक्त तुमची सेवा अत्यंत एकनिष्ठतेने करणारा आहे. मला दिव्य धनाच्या प्राप्तीची लालसा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी म्हणून मी एकसारखा तुमचा धांवा करीत असतो. इंद्रावरुणहो, तुम्हीं भक्तवत्सल आहांत, तर द्युलोक आणि मरुत् गण ह्या तुमच्या परिवारासह इकडे या आणि माझ्या प्रार्थनेकडे कृपा करून अवधान द्या. ॥ २ ॥


अ॒स्मे तदि॑न्द्रावरुणा॒ वसु॑ ष्याद॒स्मे र॒यिर्म॑रुतः॒ सर्व॑वीरः ।
अ॒स्मान्वरू॑त्रीः शर॒णैर॑वन्त्व॒स्मान्होत्रा॒ भार॑ती॒ दक्षि॑णाभिः ॥ ३ ॥

अस्मे तदिंद्रवरुणा वसु ष्यादस्मे रयिर्मरुतः सर्ववीरः ।
अस्मान्वरूत्रीः शरणैरवंत्वस्मान्होत्रा भारती दक्षिणाभिः ॥ ३ ॥

हे मरुतांनो, ज्यामध्यें सर्वच पुरुष शौर्य संपन्न असतात, असें ऐश्वर्य आम्हांस लाभेल असें करा. दिव्य स्वामिनी वरुत्री आपला आसरा आम्हांस देऊन आमचें रक्षण करोत; आणि होत्रा व भारती ह्याही सौजन्ययुक्त वरदानांनी आमचें संरक्षण करोत. ॥ ३ ॥


बृह॑स्पते जु॒षस्व॑ नो ह॒व्यानि॑ विश्वदेव्य । रास्व॒ रत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ ४ ॥

बृहस्पते जुषस्व नः हव्यानि विश्वदेव्य । रास्व रत्नानि दाशुषे ॥ ४ ॥

हे बृहस्पति, सकल दिव्य विभूति तुझी सेवा करतात, तर हे अखिल देव सेवित भगवंता, आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर आणि हवि अर्पण करणार्‍या ह्या भक्ताला तुझ्या कृपेच्या रत्‍नाचा लाभ दे. ॥ ४ ॥


शुचि॑म॒र्कैर्बृह॒स्पति॑मध्व॒रेषु॑ नमस्यत । अना॒म्योज॒ आ च॑के ॥ ५ ॥

शुचिमर्कैर्बृहस्पतिमध्वरेषु नमस्यत । अनाम्योज आ चके ॥ ५ ॥

हा बृहस्पति परम पवित्र आहे, तर यागकर्मांमध्ये अर्क गायनांनी त्याला संतोषित करून प्रणिपात करा. कारण, भिती इत्यादिकांमुळें जो कधींही वांकणार नाही अशा ओजस्वीपणाची मला अत्यंत आवड आहे आणि त्याकरितां मी त्याची प्रार्थना करीत असतो. ॥ ५ ॥


वृ॒ष॒भं च॑र्षणी॒नां वि॒श्वरू॑प॒मदा॑भ्यम् । बृह॒स्पतिं॒ वरे॑ण्यम् ॥ ६ ॥

वृषभं चर्षणीनां विश्वरूपमदाभ्यम् । बृहस्पतिं वरेण्यम् ॥ ६ ॥

भगवंत बृहस्पति सर्व लोकांचा धुरीण आहे आणि इच्छामात्रेंकरून हे सर्व आकार त्यानेंच धारण केले आहेत. तो अपराजित आहे आणी सर्वांत उत्कृष्ट असाही तोच आहे. ॥ ६ ॥


इ॒यं ते॑ पूषन्नाघृणे सुष्टु॒तिर्दे॑व॒ नव्य॑सी । अ॒स्माभि॒स्तुभ्यं॑ शस्यते ॥ ७ ॥

इयं ते पूषन्नाघृणे सुष्टुतिर्देव नव्यसी । अस्माभिस्तुभ्यं शस्यते ॥ ७ ॥

हे प्रखर दीप्तिमंता, हे सर्वतोषक देवा, तुझी जी अति मनोहर अपूर्व स्तुति आहे तीच आम्ही तुझ्या प्रित्यर्थ गात आहोंत. ॥ ७ ॥


तां जु॑षस्व॒ गिरं॒ मम॑ वाज॒यन्ती॑मवा॒ धिय॑म् । व॒धू॒युरि॑व॒ योष॑णाम् ॥ ८ ॥

तां जुषस्व गिरं मम वाजयंतीमवा धियम् । वधूयुरिव योषणाम् ॥ ८ ॥

तर मी अर्पण केलेली ही तुझी प्रार्थना/स्तुति तूं मान्य कर. माझी ध्यानबुद्धि तुझ्यास सत्त्व सामर्थ्याचें चिंतन करीत असतें, तर प्रियाविरहानें उत्सुक झालेला विलासी पुरुष जसा त्या आपल्या लावण्य लतिकेवरच आसक्त झालेला असतो त्याप्रमाणे, हे देवा, माझ्याही ध्यान भक्तीवर तूं आसक्त हो. ॥ ८ ॥


यो विश्वा॒भि वि॒पश्य॑ति॒ भुव॑ना॒ सं च॒ पश्य॑ति । स नः॑ पू॒षावि॒ता भु॑वत् ॥ ९ ॥

यः विश्वाभि विपश्यति भुवना सं च पश्यति । स नः पूषाविता भुवत् ॥ ९ ॥

जो ह्या विश्वांतील अखिल भुवनांना - त्यांपैकीं प्रत्येकाला - सर्व बाजूंनी निरखून पहात असतो, आणि जो त्या सर्वांना एकदमही पहात असतो, तो सर्वपोषक पूषा आमच्यावर कृपा करून आमचा संरक्षणकर्ता होवो. ॥ ९ ॥


तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि । धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥ १० ॥

तत्सवितुर्वरेण्यं भर्गः देवस्य धीमहि । धियः यः नः प्रचोदयात् ॥ १० ॥

अखिल चरचराला प्रेरणा करणारा जो भगवान, त्याचें सर्वांना अत्यंत प्रिय असें जे एक सर्वश्रेष्ठ अवर्णनीय उज्वल तेज आहे, त्याचे ध्यान करणें हें आमचें कर्तव्य होय. तोच भगवान आमच्या बुद्धीला आणि ध्यानभक्तीला उत्तम रीतीनें प्रेरणा करो. ॥ १० ॥


दे॒वस्य॑ सवि॒तुर्व॒यं वा॑ज॒यन्तः॒ पुरं॑ध्या । भग॑स्य रा॒तिमी॑महे ॥ ११ ॥

देवस्य सवितुर्वयं वाजयंतः पुरंध्या । भगस्य रातिमीमहे ॥ ११ ॥

सत्वसामर्थ्य प्राप्त करून घेण्याची आम्हांस इच्छा आहे; तेव्हां चराचराला प्रेरणा करणारा भाग्यदाता जो भगवान सविता, त्याचा उदार अनुग्रह आम्हांवर व्हावा म्हणून सद्‍भावनेनें आम्ही त्याची प्रार्थना करीत आहोंत. ॥ ११ ॥


दे॒वं नरः॑ सवि॒तारं॒ विप्रा॑ य॒ज्ञैः सु॑वृ॒क्तिभिः॑ । न॒म॒स्यन्ति॑ धि॒येषि॒ताः ॥ १२ ॥

देवं नरः सवितारं विप्रा यज्ञैः सुवृक्तिभिः । नमस्यंति धियेषिताः ॥ १२ ॥

वीर्यशाली ज्ञानी पुरुष हे ध्यान योगानें प्रेरीत होऊन व यज्ञानें आणि शुद्ध भक्तियुक्त स्तोत्रांनी सविता देवाची उपासना करून त्या चराचरप्रेरक भगवंताला प्रणिपात करीत असतात. ॥ १२ ॥


सोमो॑ जिगाति गातु॒विद्दे॒वाना॑मेति निष्कृ॒तम् । ऋ॒तस्य॒ योनि॑मा॒सद॑म् ॥ १३ ॥

सोमः जिगाति गातुविद्देवानामेति निष्कृतम् । ऋतस्य योनिमासदम् ॥ १३ ॥

हा पहा सन्मार्गदर्शक सोमराजा इकडे येण्यास निघाला. तो देवांच्या सभास्थानी म्हणजे सत्यधर्माच्या उद्‌गमस्थानी विराजमान होण्याकरितां येत आहे. ॥ १३ ॥


सोमो॑ अ॒स्मभ्यं॑ द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे च प॒शवे॑ । अ॒न॒मी॒वा इष॑स्करत् ॥ १४ ॥

सोमः अस्मभ्यं द्विपदे चतुष्पदे च पशवे । अनमीवा इषस्करत् ॥ १४ ॥

तो सोमराजा आम्हांला, आमच्या माणसांना व पशूंना रोगरहित ठेवून उत्साह संपन्न करो. ॥ १४ ॥


अ॒स्माक॒मायु॑र्व॒र्धय॑न्न॒भिमा॑तीः॒ सह॑मानः । सोमः॑ स॒धस्थ॒मास॑दत् ॥ १५ ॥

अस्माकमायुर्वर्धयन्नभिमातीः सहमानः । सोमः सधस्थमासदत् ॥ १५ ॥

आमचें आयुष्य वाढवून, आमच्या शत्रूंना रगडून टाकून, हा पहा सोमराजा, ह्या दिव्य सभास्थानी आरूढ झाला आहे. ॥ १५ ॥


आ नो॑ मित्रावरुणा घृ॒तैर्गव्यू॑तिमुक्षतम् । मध्वा॒ रजां॑सि सुक्रतू ॥ १६ ॥

आ नः मित्रावरुणा घृतैर्गव्यूतिमुक्षतम् । मध्वा रजांसि सुक्रतू ॥ १६ ॥

आमच्या धेनू जेथें विहार करतात त्या प्रदेशावर, हे मित्रावरुण हो, तुम्ही घृतवृष्टि करा; हे अगाधचरित्र देवांनो, आमचे सर्व प्रदेश तुमच्या कृपेच्या मधुर रसानें आर्द्र करा. ॥ १६ ॥


उ॒रु॒शंसा॑ नमो॒वृधा॑ म॒ह्ना दक्ष॑स्य राजथः । द्राघि॑ष्ठाभिः शुचिव्रता ॥ १७ ॥

उरुशंसा नमोवृधा मह्ना दक्षस्य राजथः । द्राघिष्ठाभिः शुचिव्रता ॥ १७ ॥

तुमची कीर्ति अपरंपार आहे. केवळ भक्तिपूर्वक केलेल्या प्रणिपातानें तुम्ही अत्यंत संतुष्ट होतां. हे शुद्धचारित्र्य देवांनो, आपल्या चातुर्यबळाच्या महिम्यानें आणि आपल्या अनंत शक्तींनी तुम्ही ह्या सर्व विश्वावर अधिपत्य चालवीत आहां. ॥ १७ ॥


गृ॒णा॒ना ज॒मद॑ग्निना॒ योना॑वृ॒तस्य॑ सीदतम् । पा॒तं सोम॑मृतावृधा ॥ १८ ॥

गृणाना जमदग्निना योनावृतस्य सीदतम् । पातं सोममृतावृधा ॥ १८ ॥

तर जमदग्नीच्या स्तवनानें प्रसन्न होऊन ह्या सत्यधर्माच्या आद्यस्थानी तुम्ही आज विराजमान व्हा आणि हे सत्यधर्माचा उत्कर्षच करणार्‍या देवांनो, मी अर्पण केलेल्या ह्या सोमरसाचा कृपा करून आस्वाद घ्या. ॥ १८ ॥


॥ तिसरे मण्डळ समाप्त ॥
ॐ तत् सत्


GO TOP