PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १११ ते १२०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १११ ( इंद्राग्नी सूक्त )

ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : ऋभवः - छन्द : जगती त्रिष्टुभ्


तक्ष॒न्‌रथं॑ सु॒वृतं॑ विद्म॒नाप॑स॒स्तक्ष॒न्हरी॑ इंद्र॒वाहा॒ वृष॑ण्वसू ॥
तक्ष॑न्पि॒तृभ्या॑मृ॒भवो॒ युव॒द्वय॒स्तक्ष॑न् व॒त्साय॑ मा॒तरं॑ सचा॒भुव॑म् ॥ १ ॥

तक्षन् रथं सुऽवृतं विद्मनाऽअपसः तक्षन् हरी इति इंद्रऽवाहा वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ॥
तक्षन् पितृभ्यां ऋभवः युवत् वयः तक्षन् वत्साय मातरं सचाऽभुवम् ॥ १ ॥

ज्ञानांनी ज्यांस कुशलता प्राप्त झाली आहे अशा हे ऋभूंनो, तुम्ही सुंदर रथ व इंद्रास वाहून नेणारे सामर्थ्यान अश्व निर्माण केले. तुम्ही आपल्या मातापितरांस तारुण्ययुक्त आयुष्य दिले व वत्सासाठी त्याचेजवळच सदोदित राहील अशी माता उत्पन्न केली. ॥ १ ॥


आ नो॑ य॒ज्ञाय॑ तक्षत ऋभु॒मद्वयः॒ क्रत्वे॒ दक्षा॑य सुप्र॒जाव॑ती॒मिष॑म् ॥
यथा॒ क्षया॑म॒ सर्व॑वीरया वि॒शा तन्नः॒ शर्धा॑य धासथा स्वैंद्रि॒यम् ॥ २ ॥

आ नः यज्ञाय तक्षत ऋभुऽमत् वयः क्रत्वे दक्षाय सुऽप्रजावतीं इषम् ॥
यथा क्षयाम सर्वऽवीरया विशा तत् नः शर्धाय धासथ सु इंद्रियम् ॥ २ ॥

हे ऋभूंनो, आपल्या सामर्थ्यानें आम्हांस यज्ञयाग करण्यासाठी आयुष्य द्या आणि आमचे अंगी पराक्रम व बल यावें म्हणून आम्हांस उत्तम संतति व पोटभर अन्न द्या. शिवाय आम्ही आपल्या पदरच्या सर्व शूर पुरुषांसह निर्विघ्नपणें ह्या जगांत वस्ती करावी म्हणून आमच्या सेनेच्या अंगी जोमदारपणा उत्पन्न करा. ॥ २ ॥


आ त॑क्षत सा॒तिम॒स्मभ्य॑मृभवः सा॒तिं रथा॑य सा॒तिमर्व॑ते नरः ॥
सा॒तिं नो॒ जैत्रीं॒ सं म॑हेत वि॒श्वहा॑ जा॒मिमजा॑मिं॒ पृत॑नासु स॒क्षणि॑म् ॥ ३ ॥

आ तक्षत सातिं अस्मभ्यं ऋभवः सातिं रथाय सातिं अर्वते नरः ॥
सातिं नः जैत्रीं सं महेत विश्वहा जामिं अजामिं पृतनासु सक्षणिम् ॥ ३ ॥

हे ऋभूंनो, आमची अभिवृद्धि करा, आमच्या रथांची अभिवृद्धि करा व आमच्या अश्वांची अभिवृद्धि करा. तुम्ही आमची सदोदित अशी विजयशाली अभिवृद्धि केली पाहिजे कीं जिच्यामुळें आमचे नतलग अथवा परके - कोणीही आमच्याशीं युद्ध करण्यास पुढें येवो - त्यांचा पराजयच होत जावा. ॥ ३ ॥


ऋ॒भु॒क्षण॒मिंद्र॒मा हु॑व ऊ॒तय॑ ऋ॒भून्वाजा॑न्म॒रुतः॒ सोम॑पीतये ॥
उ॒भा मि॒त्रावरु॑णा नू॒नम॒श्विना॒ ते नो॑ हिन्वन्तु सा॒तये॑ धि॒ये जि॒षे ॥ ४ ॥

ऋभुक्षणं इंद्रं आ हुव ऊतये ऋभून् वाजान् मरुतः सोमऽपीतये ॥
उभा मित्रावरुणा नूनं अश्विना ते नः हिन्वंतु सातये धिये जिषे ॥ ४ ॥

आमचे संरक्षणार्थ मी ऋभूंचा अधिपति इंद्र ह्यास व त्याचप्रमाणें ऋभु, वाज, मरुत्, उभयतां मित्र आणि वरुण, व दोघेही अश्विन ह्या देवांसही सोमपान करण्याकरितां बोलावतो. आम्हांस अनेक लाभ, बुद्धिशालित्व व विजयीपणा ही प्राप्त होतील अशा रीतीनें ते आमची अभिवृद्धि करोत. ॥ ४ ॥


ऋ॒भुर्भरा॑य॒ सं शि॑शातु सा॒तिं स॑मर्य॒जिद्वाजो॑ अ॒स्माँ अ॑विष्टु ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ५ ॥

ऋभुः भराय सं शिशातु सातिं समर्यऽजित् वाजः अस्मान् अविष्टु ॥
तत् नः मित्रः वरुणः ममहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ५ ॥

आम्हांस हवि अर्पण करण्याचे सामर्थ्य यावे म्हणून ऋभु आम्हांस अनेक लाभ घडवो आणि समरांगणांत विजयी होणारा वाज आमचें संरक्षण करो. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११२ ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : १ - अग्नि द्यावा पृथिवी,
शेष सर्व अश्विनीकुमार - छन्द : जगती त्रिष्टुभ्


ईळे॒ द्यावा॑पृथि॒वी पू॒र्वचि॑त्तयेऽ॒ग्निं घ॒र्मं सु॒रुचं॒ याम॑न्नि॒ष्टये॑ ॥
याभि॒र्भरे॑ का॒रमंशा॑य॒ जिन्व॑थ॒स्ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १ ॥

ईळे द्यावापृथिवी इति पूर्वऽचित्तये अग्निं घर्मं सुऽरुचं यामन् इष्टये ॥
याभिः भरे कारं अंशाय जिन्वथः ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १ ॥

द्युलोक आणि भूलोक ह्यांनी आमच्या प्रार्थनेकडे प्रथम लक्ष द्यावे म्हणून मी त्यांचे स्तवन करतो व त्या सुंदर कांतीनें युक्त असलेल्या देदीप्यमान अग्नीनें इकडे येत असतां आमच्या कामना परिपूर्ण कराव्या म्हणून मी त्याचेंही स्तवन करतो. हे अश्वीनहो तुमच्या स्तुतिकर्त्यानें तुम्हांस सोमरस अर्पण केला असतां ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यांनी तुम्ही त्यास आपल्या वैभवाचे वांटेकरी करतां तीं सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्हीं येथें आगमन करा. ॥ १ ॥


यु॒वोर्दा॒नाय॑ सु॒भरा॑ अस॒श्चतो॒ रथ॒मा त॑स्थुर्वच॒सं न मन्त॑वे ॥
याभि॒र्धियोऽ॑वथः॒ कर्म॑न्नि॒ष्टये॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ २ ॥

युवोः दानाय सुऽभराः असश्चतः रथं आ तस्थुः वचसं न मंतवे ॥
याभिः धियः अवथः कर्मन् इष्टये ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ २ ॥

भक्तजनांची तुम्हांला आठवण होऊन तुम्ही त्यांना आपलें औदार्य दाखविण्यास प्रवृत्त व्हावें म्हणून ते तुम्हांस सोमरस अर्पण करीत तुमच्या काय काय आज्ञा बाहेर पडतात त्याची जणूं काय वाटच पहात तुमच्या रथाभोंवती एकएकटे तिष्ठत बसलेले आहेत. हे अश्विनहो, भक्तजनांना त्याचें अभीष्ट प्राप्त व्हावें म्हणून त्यांची बुद्धि ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यांनी तुम्ही उचित कर्मांचे ठिकाणीं निमग्न करतां ती सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही येथें आगमन करा. ॥ २ ॥


यु॒वं तासां॑ दि॒व्यस्य॑ प्र॒शास॑ने वि॒शां क्ष॑यथो अ॒मृत॑स्य म॒ज्मना॑ ॥
याभि॑र्धे॒नुम॒स्वं१॑ पिन्व॑थो नरा॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ३ ॥

युवं तासां दिव्यस्य प्रऽशासने विशां क्षयथः अमृतस्य मज्मना ॥
याभिः धेनुं अस्वं पिन्वथः नरा ताभिः ऊं इति सु ऊतिऽ भिः अश्विना आ गतम् ॥ ३ ॥

त्या दिव्य अमृतामुळें तुम्हांस नवीन उत्साह येत असल्याकारणानेंच ह्या सर्व लोकांवर तुम्ही अधिकार चालवीत राहिला आहां. हे शूर अश्विनहो, ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यांनी तुम्ही कधीं न विणार्‍या अशा गाईलाही भरपूर दूध आणले तीं सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही येथें आगमन करा. ॥ ३ ॥


याभिः॒ परि॑ज्मा॒ तन॑यस्य म॒ज्मना॑ द्विमा॒ता तू॒र्षु त॒रणि॑र्वि॒भूष॑ति ॥
याभि॑स्त्रि॒मन्तु॒रभ॑वद्विचक्ष॒णस्ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ४ ॥

याभिः परिज्मा तनयस्य मज्मना द्विऽमाता तूर्षु तरणिः विऽभूषति ॥
याभिः त्रिमंतुः अभवत् विऽचक्षणः ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ४ ॥

चोहोंकडे परिभ्रमण करणारा व दोन मातांपासून जन्म पावलेला असा पुरुष ज्या तुमच्या भक्तजन रक्षक सामर्थ्यांमुळें स्वपुत्राच्या पराक्रमाच्या साहाय्यानें सर्व शीघ्रगामी लोकांत जास्त शीघ्रगामीं ठरून शोभा पावत आहे व ज्या सामर्थ्यांचे योगानें त्रिमन्तु प्रज्ञावान होण्यास समर्थ झाला ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन हे अश्विनहो तुम्ही येथें आगमन करा. ॥ ४ ॥


याभी॑ रे॒भं निवृ॑तं सि॒तम॒द्भ्य् उद्वन्द॑न॒मैर॑यतं॒ स्वर्दृ॒शे ॥
याभिः॒ कण्वं॒ प्र सिषा॑सन्त॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ५ ॥

याभी रेभं निऽवृतं सितं अत्ऽभ्य उत् वंदनं ऐरयतं स्वः दृशे ॥
याभिः कण्वं प्रः सिसासंतं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ५ ॥

ज्या तुमच्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही बंधनांत पडलेल्या व पाशांत सांपडेलेया रेभ व वंदन ह्यांच्या दृष्टीस पडावा ह्यास्तव त्यांना उदकांतून बाहेर काढलें व ज्यांच्या योगानें तुमच्या चिंतनांत सदैव निमग्न असणार्‍या कण्वाचें तुम्ही संरक्षण केलें ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विनहो, तुम्ही येथें आगमन करा. ॥ ५ ॥


याभि॒रन्त॑कं॒ जस॑मान॒मार॑णे भु॒ज्युं याभि॑रव्य॒थिभि॑र्जिजि॒न्वथुः॑ ॥
याभिः॑ क॒र्कन्धुं॑ व॒य्यं च॒ जिन्व॑थ॒स्ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ६ ॥

याभिः अंतकं जसमानं आऽरणे भुज्युं याभिः अव्यथिऽभिः जिजिन्वथुः ॥
याभिः कर्कन्धुं वय्यं च जिन्वथः ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ६ ॥

अन्तक चालतां चालतां थकून गेला असतां ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यांमुळें तुम्ही त्यास हुषारी आणली, दुःखितास दुःखविमुक्त करणार्‍या ज्या आपल्या सामर्थ्यामुळें तुम्ही भुज्यूचे अंगी नवीन उत्साह उत्पन्न केला व ज्याचे योगानें तुम्ही कर्कन्धु व वय्य ह्यांना तरतरी आणली ती सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विनहो, तुम्ही येथें आगमन करा. ॥ ६ ॥


याभिः॑ शुच॒न्तिं ध॑न॒सां सु॑षं॒सदं॑ त॒प्तं घ॒र्ममो॒म्याव॑न्त॒मत्र॑ये ॥
याभिः॒ पृश्नि॑गुं पुरु॒कुत्स॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ७ ॥

याभिः शुचंतिं धनऽसां सुऽसंसदं तप्तं घर्मं ओम्याऽवंतं अत्रये ॥
याभिः पृश्निऽगुं पुरुऽकुत्सं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिभिः अश्विना आ गतम् ॥ ७ ॥

ज्या तुमच्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही शुचंतीला द्रव्याने भरलेले असे गृह अर्पण केले, ज्यांचे योगाने तुम्ही दाहक तापही अत्रीला सोसता येईल इतका सौम्य केला व ज्यांचे योगानें तुम्ही पृश्निगु आणि पुरुकुत्सु यांचे रक्षण केले, ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विनहो, तुम्ही येथें आगमन करा. ॥ ७ ॥


याभिः॒ शची॑भिर्वृषणा परा॒वृजं॒ प्रान्धं श्रो॒णं चक्ष॑स॒ एत॑वे कृ॒थः ॥
याभि॒र्वर्ति॑कां ग्रसि॒ताममु॑ञ्चतं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ८ ॥

याभिः शचीभिर्वृषणा परावृजं प्रान्धं श्रोणं चक्षसः एतवे कृथः ॥
याभिः वर्तिकां ग्रसितां अमुञ्चतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ८ ॥

हे अश्विनहो, ज्या तुमच्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही अंध व पंगु असलेल्या अशा परावृजालापहाण्याची व चालण्याची शक्ति दिली व ज्यांचे योगाने तुम्ही हिंसक प्राण्याच्या भक्षस्थानी पडलेल्या लावी पक्षिणीस त्याच्यापासून सोडविले ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे आगमन करा. ॥ ८ ॥


याभिः॒ सिंधुं॒ मधु॑मन्त॒मस॑श्चतं॒ वसि॑ष्ठं॒ याभि॑रजरा॒वजि॑न्वतम् ॥
याभिः॒ कुत्सं॑ श्रु॒तर्यं॒ नर्य॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ९ ॥

याभिः सिंधुं मधुऽमंतं असश्चतं वसिष्ठं याभिः अजरौ अजिन्वतम् ॥
याभिः कुत्सं श्रुतर्यं नर्यं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ९ ॥

ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही माधुर्ययुक्त नद्यांस पूर आणला, ज्यांचे योगानें, हे जरारहित अश्विनी देवहो, तुम्ही वसिष्ठाची भरभराट केली व ज्यांचे योगाने तुम्ही कुत्स, श्रुतर्य व नर्य ह्यांचे संरक्षण केलें, ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे आगमन करा. ॥ ९ ॥


याभि॑र्वि॒श्पलां॑ धन॒साम॑थ॒र्व्यं स॒हस्र॑मीळ्ह आ॒जावजि॑न्वतम् ॥
याभि॒र्वश॑म॒श्व्यं प्रे॒णिमाव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १० ॥

याभिः विश्पलां धनऽसां अथर्व्यं सहस्रमीळ्हे आजौ अजिन्वतम् ॥
याभिः वशं अश्व्यं प्रेणिं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १० ॥

अथर्व्याच्या कुलांत उत्पन्न झलेल्या धनवान विश्पलेचा ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही युद्धांत हजारो माणसें लढत असतां त्यांतूनही बचाव केला आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍या ज्या अश्व कुलांतील वशाचे तुम्ही संरक्षण केलेंत ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे आगमन करा. ॥ १० ॥


याभिः॑ सुदानू औशि॒जाय॑ व॒णिजे॑ दी॒र्घश्र॑वसे॒ मधु॒ कोशो॒ अक्ष॑रत् ॥
क॒क्षीव॑न्तं स्तो॒तारं॒ याभि॒राव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ ११ ॥

याभिः सुदानू इति सुऽदानू औशिजाय वणिजे दीर्घऽश्रवसे मधु कोशः अक्षरत् ॥
कक्षीवंतं स्तोतारं याभिः आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ ११ ॥

हे अत्यंत उदार अश्विनहो, ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें उशिजा कुलांत जन्म पावलेल्या दीर्घश्रवा नांवाच्या व्यापार्‍यासाठी मेघाने मधुर जलाची वृष्टी केली व ज्यांचे योगाने तुमची स्तुति करणार्‍या कक्षीवानाचें तुम्ही रक्षण केलेंत ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे आगमन करा. ॥ ११ ॥


याभी॑ र॒सां क्षोद॑सो॒द्नः पि॑पि॒न्वथु॑रन॒श्वं याभी॒ रथ॒माव॑तं जि॒षे ॥
याभि॑स्त्रि॒शोक॑ उ॒स्रिया॑ उ॒दाज॑त॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १२ ॥

याभी रसां क्षोदसा नः पिपिन्वथुः अनश्वं याभीः रथं आवतं जिषे ॥
याभिः त्रिशोकः उस्रियाः उत्ऽआजत ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १२ ॥

हे अश्विनहो, ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही रसा नांवाच्या नदीला जलप्रवाह वाहवून पूर आणला, ज्यांच्यामुळें तुम्ही अश्व नसलेल्या रथासही विजयी करण्याकरितां त्याचा बचाव केला आणि ज्यांच्यामुळें त्रिशोक आपल्या घराकडे धेनु घेऊन जाण्यास समर्थ झाला, ती आपली सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १२ ॥


याभिः॒ सूर्यं॑ परिया॒थः प॑रा॒वति॑ मन्धा॒तारं॒ क्षैत्र॑पत्ये॒ष्वाव॑तम् ॥
याभि॒र्विप्रं॒ प्र भ॒रद्वा॑ज॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १३ ॥

याभिः सूर्यं परिऽयाथः पराऽवति मंधातारं क्षैत्रऽपत्येषु आवतम् ॥
याभिः विप्रं प्र भरत्ऽवाजं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १३ ॥

हे अश्विनहो, ज्या आपल्या भक्तजन रक्षक सामर्थ्यामुळें तुम्हांस फार दूरच्या प्रदेशांत सूर्याचे सभोंवती फिरतां येते, ज्यांच्यामुळें मंधाता भूमीचें स्वामित्व मिळविणार्‍या प्रयत्नात असतां त्याचें रक्षण केलें आणि ज्यांच्या योगाने विद्वान भरद्वाजाचेंही तुम्ही परिपालन केलें ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १३ ॥


याभि॑र्म॒हाम॑तिथि॒ग्वं क॑शो॒जुवं॒ दिवो॑दासं शम्बर॒हत्य॒ आव॑तम् ॥
याभिः॑ पू॒र्भिद्ये॑ त्र॒सद॑स्यु॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १४ ॥

याभिः महां अतिथिऽग्वं कशःऽजुवं दिवःऽदासं शम्बरऽहत्य आवतम् ॥
याभिः पूःऽभिद्ये त्रसदस्युं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १४ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यांमुळें तुम्ही शम्बराचा वध करण्याचे प्रसंगी त्या श्रेष्ठ अतिथिग्वाचे, कशोजूचे व दिवोदासाचें रक्षण केलें व ज्याच्या योगानें शत्रूंच्या पुरांचा भेद करीत असतां तुम्ही त्रसदस्यूचा बचाव केला, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १४ ॥


याभि॑र्व॒म्रं वि॑पिपा॒नमु॑पस्तु॒तं क॒लिं याभि॑र्वि॒त्तजा॑निं दुव॒स्यथः॑ ॥
याभि॒र्व्यश्वमु॒त पृथि॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १५ ॥

याभिः वम्रं विऽपिपानं उपऽस्तुतं कलिं याभिः वित्तऽजानिं दुवस्यथः ॥
याभिः विऽअश्वं उत पृथिं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १५ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें सोमरसाचें अतिशय पान करणार्‍या, वम्रास, उपस्तुतास व पत्नीला लाभ करून घेणार्‍या कलीस तुम्ही सन्मान प्राप्त करून देतां व ज्यांचे योगाने व्यश्व व पृथि ह्यांचे तुम्ही संरक्षण केले ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १५ ॥


याभि॑र्नरा श॒यवे॒ याभि॒रत्र॑ये॒ याभिः॑ पु॒रा मन॑वे गा॒तुमी॒षथुः॑ ॥
याभिः॒ शारी॒राज॑तं॒ स्यूम॑रश्मये॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १६ ॥

याभिः नरा शयवे याभिः अत्रये याभिः पुरा मनवे गातुं ईषथुः ॥
याभिः शारीः आजतं स्यूमऽरश्मये ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १६ ॥

हे शूर अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही प्राचीन काली, शयु, अत्रि व मनु ह्यांची भरभराट व्हावी अशी इच्छा धारण केली, आणि ज्यांचे योगानें तुम्ही स्यूमरश्मीकरितां बाण सोडले, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १६ ॥


याभिः॒ पठ॑र्वा॒ जठ॑रस्य म॒ज्मना॒ग्निर्नादी॑देच्चि॒त इ॒द्धो अज्म॒न्ना ॥
याभिः॒ शर्या॑त॒मव॑थो महाध॒ने ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १७ ॥

याभिः पठर्वा जठरस्य मज्मना अग्निः न अदीदेत् चितः इद्धः अज्मन् आ ॥
याभिः शर्यातं अवथः महाऽधने ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १७ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें अंगिरसाच्या स्तुतीनें संतोष पावलां व जेथें गाईंचा समुदाय कोंडून ठेवला होता अशा गुहेमध्यें सर्वांच्या पुढें होऊन शिरला आणि ज्यांच्या योगाने तुम्ही शूर मनूला अन्नसामग्री देऊन त्याचे संरक्षण केले, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे आगमन करा. ॥ १७ ॥


याभि॑रङ्गि्रो॒ मन॑सा निर॒ण्यथोऽ॑ग्रं॒ गच्छ॑थो विव॒रे गोअ॑र्णसः ॥
याभि॒र्मनुं॒ शूर॑मि॒षा स॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १८ ॥

याभिः अङ्‌गिरः मनसा निऽरण्यथः अग्रं गच्छथः विऽवरे गोऽअर्णसः ॥
याभिः मनुं शूरं इषा संऽआवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १८ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही विमदास भार्या मिळवून दिली, ज्यांच्यामुळें ताम्रवर्ण धेनूंस तुम्ही आपल्या आज्ञा मानावयास शिकविले व ज्याच्या योगानें तुम्ही सुदेव्याला सुदासाकडे घेऊन आला त्या तुमच्या सामर्थ्यासह तुम्ही इकडे या. ॥ १८ ॥


याभिः॒ पत्नी॑र्विम॒दाय॑ न्यू॒हथु॒रा घ॑ वा॒ याभि॑ररु॒णीरशि॑क्षतम् ॥
याभिः॑ सु॒दास॑ ऊ॒हथुः॑ सुदे॒व्यं१॑ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १९ ॥

याभिः पत्नीःा विऽमदाय निऽऊहथुः आ घ वा याभिः अरुणीः अशिक्षतम् ॥
याभिः सुऽदासः ऊहथुः सुऽदेव्यं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ १९ ॥

विमद नामक ऋषीला पत्‍नी आणि आरक्तवर्ण धेनू प्रदान करणार्‍या, तसेच सुदास राजाला दिव्य धन देणार्‍या हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही तुमची सर्व सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे या. ॥ १९ ॥


याभिः॒ शंता॑ती॒ भव॑थो ददा॒शुषे॑ भु॒ज्युं याभि॒रव॑थो॒ याभि॒रध्रि॑गुम् ॥
ओ॒म्याव॑तीं सु॒भरा॑मृत॒स्तुभं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ २० ॥

याभिः शंताती इति शंऽताती भवथः ददाशुषे भुज्युं याभिः अवथः याभिः अध्रिऽगुम् ॥
ओम्याऽवतीं सुऽभरां ऋतऽस्तुभं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ २० ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही हवी अर्पण करणार्‍या भक्तास कल्याणप्रद होतां, ज्यांच्या योगानें तुम्ही भुज्यु आणि अध्रिगु ह्यांचे संरक्षण करतां, आणि ज्यांच्यामुळें तुम्ही उत्तम हवि देणार्‍या ऋतस्तुभेला सौख्यामध्यें ठेवतां, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ॥ २० ॥


याभिः॑ कृ॒शानु॒मस॑ने दुव॒स्यथो॑ ज॒वे याभि॒र्यूनो॒ अर्व॑न्त॒माव॑तम् ॥
मधु॑ प्रि॒यं भ॑रथो॒ यत्स॒रड्भ्य॒स्ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ २१ ॥

याभिः कृशानुं असने दुवस्यथः जवे याभिः यूनः अर्वंतं आवतम् ॥
मधु प्रियं भरथः यत् सरद्ऽभ्यः ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ २१ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही शरसंधानप्रसंगी कृशानूची वाहवा करविली, ज्यांचे योगानें तुम्ही त्या तरुण पुरुषाचा अश्व वेगानें धांवत असतां त्याचे संरक्षण केलेंत व ज्यांचे योगाने तुम्ही भ्रमरांना त्यांचा आवडता मध आणून देतां ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ॥ २१ ॥


याभि॒र्नरं॑ गोषु॒युधं॑ नृ॒षाह्ये॒ क्षेत्र॑स्य सा॒ता तन॑यस्य॒ जिन्व॑थः ॥
याभी॒ रथाँ॒ अव॑थो॒ याभि॒रर्व॑त॒स्ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ २२ ॥

याभिः नरं गोषुऽयुधं नृसह्ये क्षेत्रस्य साता तनयस्य जिन्वथः ॥
याभी रथान् अवथः याभिः अर्वतः ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ २२ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही धेनूंच्या प्राप्तिकरितां युद्ध करणार्‍या त्या वीराचा, त्यास युद्धांत भूमि व संतति मिळवून देऊन उत्कर्ष करविला, आणि ज्यांचे योगानें तुम्ही रथ व अश्व ह्यांचे संरक्षण करतां, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ॥ २२ ॥


याभिः॒ कुत्स॑मार्जुने॒यं श॑तक्रतू॒ प्र तु॒र्वीतिं॒ प्र च॑ द॒भीति॒माव॑तम् ॥
याभि॑र्ध्व॒सन्तिं॑ पुरु॒षन्ति॒माव॑तं॒ ताभि॑रू॒ षु ऊ॒तिभि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ २३ ॥

याभिः कुत्सं आर्जुनेयं शतक्रतू इति शतऽक्रतू प्र तुर्वीतिं प्र च दभीतिं आवतम् ॥
याभिः ध्वसंतिं पुरुऽसंतिं आवतं ताभिः ऊं इति सु ऊतिऽभिः अश्विना आ गतम् ॥ २३ ॥

हे अश्विनहो, भक्तजन रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही अर्जुनीचा पुत्र कुत्स व त्याचप्रमाणे तुर्वीति व दभीति ह्यांचे संरक्षण केले व ज्यांचे योगानें तुम्ही ध्वसन्ति व पुरुषन्ति ह्यांचेही परिपालन केले, ती तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ॥ २३ ॥


अप्न॑स्वतीमश्विना॒ वाच॑म॒स्मेकृ॒तं नो॑ दस्रा॒ वृष॑णा मनी॒षाम् ॥
अ॒द्यू॒त्येऽ॑वसे॒ नि ह्व॑ये वां वृ॒धे च॑ नो भवतं॒ वाज॑सातौ ॥ २४ ॥

अप्नस्वतीं अश्विना वाचं अस्मे इति कृतं नः दस्रा वृषणा मनीषाम् ॥
अद्यूत्ये अवसे नि ह्वये वां वृधे च नः भवतं वाजऽसातौ ॥ २४ ॥

हे शत्रूंचा नाश करणार्‍या पराक्रमी अश्विनी देवांनो, आम्हांवर कृपाळू होऊन आमची स्तुति व प्रार्थना सफल करा. सूर्याची प्रभा फांकली नाहीं तोंच आमच्या संरक्षणासाठी मी तुमचा धांवा करीत आहे. ह्यासाठीं आम्हांस सामर्थ्य अर्पण करून आमची भरभराट करा. ॥ २४ ॥


द्युभि॑र॒क्तुभिः॒ परि॑ पातम॒स्मानरि॑ष्टेभिरश्विना॒ सौभ॑गेभिः ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ २५ ॥

द्युभिः अक्तुऽभिः परि पातं अस्मान् अरिष्टेभिः अश्विना सौभगेभिः ॥
तत् नः मित्रः वरुणः ममहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ २५ ॥

हे अश्विनहो, आमच्या सौख्यांत कधींही खंड पडूं न देता रात्रंदिवस आमचे संरक्षण करा. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ॥ २५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११३ ( उषा सूक्त )

ऋषि : अंगिरस कुत्स - देवता : १ - रात्रि, शेष उषा - छंद - त्रिष्टुभ्


इ॒दं श्रेष्ठं॒ ज्योति॑षां॒ ज्योति॒रागा॑च्चि॒त्रः प्र॑के॒तो अ॑जनिष्ट॒ विभ्वा॑ ॥
यथा॒ प्रसू॑ता सवि॒तुः स॒वायँ॑ ए॒वा रात्र्यु॒षसे॒ योनि॑मारैक् ॥ १ ॥

इदं श्रेष्ठं ज्योतिषां ज्योतिः आ अगात् चित्रः प्रऽकेतः अजनिष्ट विऽभ्वा ॥
यथा प्रऽसूता सवितुः सवाय एव रात्री उषसे योनिं आरैक् ॥ १ ॥

हे सर्व तेजांतील श्रेष्ठ तेज अवतीर्ण झाले आहे. हा आश्चर्यकारक व सर्वव्यापी प्रकाश उदय पावला आहे. सवित्र्यास जन्म देण्याकरितांच ही उषा प्रादुर्भूत झाली आहे व म्हणून रात्रीनें तिचेकरितां जागा केली. ॥ १ ॥


रुश॑द्वत्सा॒ रुश॑ती श्वे॒त्यागा॒दारै॑गु कृ॒ष्णा सद॑नान्यस्याः ॥
स॒मा॒नब॑न्धू अ॒मृते॑ अनू॒ची द्यावा॒ वर्णं॑ चरत आमिना॒ने ॥ २ ॥

रुशत्ऽवत्सा रुशती श्वेत्या आ अगात् अरैक् ऊं इति कृष्णा सदनानि अस्याः ॥
समानबंधू इति समानऽबंधू अमृते अनूची इति द्यावा वर्णं चरतः आमिनाने इत्याऽमिनाने ॥ २ ॥

आपले शुभ्रवर्ण बालक घेऊन ही शुभ्र व देदीप्यमान उषा प्राप्त झाली आहे. कृष्णवर्ण रात्रीनें आपलीं सर्व निवासस्थानें हिच्याकरितां मोकळी करून ठेवली आहेत. परस्परांशी समान नात्याच्या अशा ह्या एकमेकींस अनुसरणार्‍या दोघी अमर देवता, जगताचा वर्ण पालटीत, आकाशमार्गानें संचार करीत असतात. ॥ २ ॥


स॒मा॒नो अध्वा॒ स्वस्रो॑रन॒न्तस्तम॒न्यान्या॑ चरतो दे॒वशि॑ष्टे ॥
न मे॑थेते॒ न त॑स्थतुः सु॒मेके॒ नक्तो॒षासा॒ सम॑नसा॒ विरू॑पे ॥ ३ ॥

समानः अध्वा स्वस्रोः अनंतः तं अन्याऽअन्या चरतः देवशिष्टे इति देवऽशिष्टे ॥
न मेथेते इति न तस्थतुः सुमेके इति सुऽमेके नक्तोषसा सऽमनसा विरूपे इति विऽरूपे ॥ ३ ॥

ह्या दोघी भगिनींचा मार्ग अनंत आहे. देवांच्या आज्ञेस अनुसरून त्या पाळीपाळीनें त्या मार्गानें संचार करतात. एका विचारानें चालणार्‍या परंतु स्वरूपांत भिन्न अशा ह्या सुंदर दोघीजणी, रात्र व उषा, कोठेंच थांबत अथवा विश्रांती घेत नाहींत. ॥ ३ ॥


भास्व॑ती ने॒त्री सू॒नृता॑ना॒मचे॑ति चि॒त्रा वि दुरो॑ न आवः ॥
प्रार्प्या॒ जग॒द्व्यु नो रा॒यो अ॑ख्यदु॒षा अ॑जीग॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ ४ ॥

भास्वती नेत्री सूनृतानां अचेति चित्रा वि दुरः नः आवरित्यावः ॥
प्रऽअर्प्य जगत् वि ऊं इति नः रायः अख्यत् उषाः अजीगः भुवनानि विश्वा ॥ ४ ॥

देदीप्यमान, व माधुर्ययुक्त सत्याचा लाभ घडविणारी ही आश्चर्यकारक उषा दिसूं लागली आहे. हिनें आमच्या गृहांची द्वारें उघडली आहेत. सर्व जगतास आपापल्या उद्योगाकडे प्रवृत्त करून तिने आम्हांकरितां वैभवें खुली केलीं आहेत, व तिनें सर्व प्राणिमात्रास जागृत केलें आहे. ॥ ४ ॥


जि॒ह्म॒श्ये३॑ चरि॑तवे म॒घोन्या॑भो॒गय॑ इ॒ष्टये॑ रा॒य उ॑ त्वम् ॥
द॒भ्रं पश्य॑द्भ्यद उर्वि॒या वि॒चक्ष॑ उ॒षा अ॑जीग॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ ५ ॥

जिह्मऽश्ये चरितवे मघोनि आऽभोगय इष्टये राय ऊं इति त्वम् ॥
दभ्रं पश्यत्ऽभ्य उर्विया विऽचक्षे उषाः अजीगः भुवनानि विश्वा ॥ ५ ॥

ह्या उदार उषेनें सर्व प्राणिमात्रास जागृत केले आहे, ह्या हेतूनें कीं जो वाटसरूं रस्त्यांत आडवातिडवा निजला असेल त्यानें चालूं लागावे, त्याचप्रमाणें तुम्हांपैकी कोणी भोग्यवस्तूंकरितां प्रयत्न करावा, कोणी इष्टार्थ लाभासाठीं झटावें, कोणी धनप्राप्त्यर्थ खटपट करावी, व ज्यास अल्प दिसत असेल त्यास स्पष्ट रीतीने दिसूं लागावें. ॥ ५ ॥


क्ष॒त्राय॑ त्वं॒ श्रव॑से त्वम् मही॒या इ॒ष्टये॑ त्व॒मर्थ॑मिव त्वमि॒त्यै ॥
विस॑दृशा जीवि॒ताभि॑प्र॒चक्ष॑ उ॒षा अ॑जीग॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ ६ ॥

क्षत्राय त्वं श्रवसे त्वं महीयै इष्टये त्वं अर्थम्ऽइव त्वं इत्यै ॥
विऽसदृशा जीविता अभिऽप्रचक्षे उषाः अजीगः भुवनानि विश्वा ॥ ६ ॥

तुम्हींपैकीं कोणी सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करावा, कोणी कीर्तिकरितां खटपट करावी, कोणी आपला उच्च इष्ट हेतु तडीस जावा म्हणून झटावें, कोणी आपल्या आवडत्या योजनेच्या सिद्धीस जाऊन पोंचावे आणि प्रत्येकास आपआपल्या भिन्न भिन्न चरितार्थाचा मार्ग दिसावा म्हणून ह्या उषेनें सर्व प्राणिमात्रास जागृत केलें आहे. ॥ ६ ॥


ए॒षा दि॒वो दु॑हि॒ता प्रत्य॑दर्शि व्यु॒च्छन्ती॑ युव॒तिः शु॒क्रवा॑साः ॥
विश्व॒स्येशा॑ना॒ पार्थि॑वस्य॒ वस्व॒ उषो॑ अ॒द्येह सु॑भगे॒ व्युच्छ ॥ ७ ॥

एषा दिवः दुहिता प्रति अदर्शि विऽउच्छंती युवतिः शुक्रऽवासाः ॥
विश्वस्य ईशाना पार्थिवस्य वस्वः उषः अद्य इह सुऽभगे वि उच्छ ॥ ७ ॥

शुभ्र वस्त्रें परिधान केलेली व पृथिवीवरील सर्व वैभवाची स्वामिनी अशी ही देदीप्यमान द्युलोककन्या दृगोचर झाली आहे. हे मंगलप्रद उषे आज येथें आपला उज्ज्वल प्रकाश पाड. ॥ ७ ॥


प॒रा॒य॒ती॒नामन्वे॑ति॒ पाथ॑ आयती॒नां प्र॑थ॒मा शश्व॑तीनाम् ॥
व्यु॒च्छन्ती॑ जी॒वमु॑दी॒रय॑न्त्यु॒षा मृ॒तं कं च॒न बो॒धय॑न्ती ॥ ८ ॥

पराऽयतीनां अनु एति पाथः आऽयतीनां प्रथमा शश्वतीनाम् ॥
विऽउच्छंती जीवं उत्ऽईरयंति उषाः मृतं कं चन बोधयंती ॥ ८ ॥

आपला उज्ज्वल प्रकाश सर्वत्र पाडीत, सर्व प्राण्यांस आपआपल्या कार्यास प्रवृत्त करीत व कोणी मृतवत् शय्येवर पडले असतां त्यांस जागृत करीत ही शाश्वतपणें पुढें येणार्‍या सर्व उषातील पहिली उषा मागें गेलेल्या उषांच्या मार्गानें चालली आहे. ॥ ८ ॥


उषो॒ यद॒ग्निं स॒मिधे॑ च॒कर्थ॒ वि यदाव॒श्चक्ष॑सा॒ सूर्य॑स्य ॥
यन्मानु॑षान्य॒क्ष्यमा॑णाँ॒ अजी॑ग॒स्तद्दे॒वेषु॑ चकृषे भ॒द्रमप्नः॑ ॥ ९ ॥

उषः यत् अग्निं संऽइधे चकर्थ वि यत् आवः चक्षसा सूर्यस्य ॥
यत् मानुषान् यक्ष्यमाणान् अजीगरिति तत् देवेषु चकृषे भद्रं अप्नः ॥ ९ ॥

हे उषे, तूं अग्नीस प्रदीप्त होण्यास सिद्ध केलेंस, सूर्याच्या नेत्राच्या योगानें जगतास प्रकाशित केलेस, व यज्ञव्यापृत होण्यास इच्छिणार्‍या सर्व मानवांस तूं जागृत केलेंस, हे देवांच्यावर तुझें मोठेंच उपकाराचें कृत्य झालें. ॥ ९ ॥


किया॒त्या यत्स॒मया॒ भवा॑ति॒ या व्यू॒षुर्याश्च॑ नू॒नं व्यु॒च्छान् ॥
अनु॒ पूर्वाः॑ कृपते वावशा॒ना प्र॒दीध्या॑ना॒ जोष॑म॒न्याभि॑रेति ॥ १० ॥

कियाति आ यत् समया भवाति या विऽऊषुः याः च नूनं विऽउच्छान् ॥
अनु पूर्वाः कृपते वावशाना प्रऽदीध्याना जोषं अन्याभिः एति ॥ १० ॥

ज्या उषा पूर्वी प्रकाशून गेल्या आणि खरोखर ज्या पुढे प्रकाशणार आहेत, त्यांपैकीं प्रत्येक किती थोडा वेळ आपणांजवळ राहणारी आहे बरें ? जी उषा येते ती मोठ्या करुण रवानें तिच्या अगोदर येऊन गेलेल्या उषांविषयी शोक करते व आपला प्रकाश प्रकट करीत इतर उषांची सोबत भेटली कीं त्यांस मिळते. ॥ १० ॥


ई॒युष्टे ये पूर्व॑तरा॒मप॑श्यन्व्यु॒च्छन्ती॑मु॒षसं॒ मर्त्या॑सः ॥
अ॒स्माभि॑रू॒ नु प्र॑ति॒चक्ष्या॑भू॒दो ते य॑न्ति॒ ये अ॑प॒रीषु॒ पश्या॑न् ॥ ११ ॥

ईयुः ते ये पूर्वऽतरां अपश्यन् विऽउच्छंतीं उषसं मर्त्यासः ॥
अस्माभिः ऊं इति नु प्रतिऽचक्ष्या अभूत् ओ इति ते यंति ये अपरीषु पश्यान् ॥ ११ ॥

ज्या मानवांनी पूर्वकालीन उषेस प्रकाशतांना पाहिलें ते मानव गेले. ही उषा आतां आमचे दृष्टीस पडत आहे व जे पुढें येणार्‍या उषांना पाहतील ते लोकही मार्ग क्रमीत आहेत. ॥ ११ ॥


या॒व॒यद्द्वे॑षा ऋत॒पा ऋ॑ते॒जाः सु॑म्ना॒वरी॑ सू॒नृता॑ ई॒रय॑न्ती ॥
सु॒म॒ङ्ग॒रलीर्बिभ्र॑ती दे॒ववी॑तिमि॒हाद्योषः॒ श्रेष्ठ॑तमा॒ व्युच्छ ॥ १२ ॥

यावयत्ऽद्वेषाः ऋतऽपाः ऋतेऽजाः सुम्नऽवरी सूनृताः ईरयंती ॥
सुऽमङ्गउलीः बिभ्रती देवऽवीतिं इह अद्य उषः श्रेष्ठऽतमा वि उच्छ ॥ १२ ॥

हे उषे, द्वेष्ट्यांचा निःपात करणारी, सत्याचे परिपालन करणारी, सत्यासाठी जन्म घेणारी, उत्कृष्ट वैभवानें युक्त, माधुर्यपरिपूर्ण असें सत्य भाषण करणारी, अत्यंत मंगल, देवांचे हवि घेऊन येणारी व त्यांत श्रेष्ठ अशी तूं, आपला उज्ज्वल प्रकाश येथें पाड. ॥ १२ ॥


शश्व॑त्पु॒रोषा व्युवास दे॒व्यथो॑ अ॒द्येदं व्यावो म॒घोनी॑ ॥
अथो॒ व्युच्छा॒दुत्त॑राँ॒ अनु॒ द्यून॒जरा॒मृता॑ चरति स्व॒धाभिः॑ ॥ १३ ॥

शश्वत् पुरा उषाः वि उवास देवि अथो इति अद्य इदं वि आवः मघोनी ॥
अथो इति वि उच्छात् उत्ऽतरात् अनु द्यून् अजरा अमृता चरति स्वधाभिः ॥ १३ ॥

ही उषादेवी प्राचीन कालापासून एकसारखी प्रकाशत आहे, त्या उदार देवतेनें ह्याप्रमाणें आजही आपला प्रकाश पाडला आहे व तसेंच ती सतत प्रकाशित राहील. ही जरा व मृत्यु ह्यांच्या पीडेपासून मुक्त अशी उषा आपल्या मार्गांनी गमन करीत असतें. ॥ १३ ॥


व्य१॑ञ्जिभि॑र्दि॒व आता॑स्वद्यौ॒दप॑ कृ॒ष्णां नि॒र्णिजं॑ दे॒व्यावः ॥
प्र॒बो॒धय॑न्त्यरु॒णेभि॒रश्वै॒रोषा या॑ति सु॒युजा॒ रथे॑न ॥ १४ ॥

वि अञ्जिभिः दिवः आतासु अद्यौत् अप कृष्णां निःऽनिजं देवी आवरित्यावः ॥
प्रऽबोधयंति अरुणेभिः अश्वः आ उषाः याति सुऽयुजा रथेन ॥ १४ ॥

आपल्या आभरणांनी मंडित अशी ही उषा द्युलोकाच्या विस्तीर्ण प्रदेशांत प्रकाशली आहे. ह्या देवीनें जगताचा कृष्ण देह शुभ्र केला आहे. आपल्या रक्तवर्ण अश्वांच्या योगानें सर्वांस जागृत करीत ही उषा आपल्या उत्तम रीतीनें सिद्ध केलेल्या रथांत आरूढ होऊन येत आहे. ॥ १४ ॥


आ॒वह॑न्ती॒ पोष्या॒ वार्या॑णि चि॒त्रं के॒तुं कृ॑णुते॒ चेकि॑ताना ॥
ई॒युषी॑णामुप॒मा शश्व॑तीनां विभाती॒नां प्र॑थ॒मोषा व्यश्वैत् ॥ १५ ॥

आऽवहंती पोष्या वार्याणि चित्रं केतुं कृणुते चेकिताना ॥
ईयुषीणां उपऽमा शश्वतीनां विऽभातीनां प्रथमा उषाः वि अश्वैत् ॥ १५ ॥

सर्वांच्या आवडीचे पोषक पदार्थ आपले बरोबर आणून ही प्रज्ञावती उषा आपलें आश्चर्यकारक तेज प्रकट करीत आहे. ज्या अविनाशी उषा आतांपर्यंत प्रकाशून गेल्या त्यांपैकीं शेवटची व पुढें प्रकाशमान होणार्‍या उषांपैकीं पहिली अशा ह्या उषेनें येथें आपली प्रभा पसरली आहे. ॥ १५ ॥


उदी॑र्ध्वं जी॒वो असु॑र्न॒ आगा॒दप॒ प्रागा॒त्तम॒ आ ज्योति॑रेति ॥
आरै॒क्पन्थां॒ यात॑वे॒ सूर्या॒याग॑न्म॒ यत्र॑ प्रति॒रन्त॒ आयुः॑ ॥ १६ ॥

उत् ईर्ध्वं जीवः असुः नः आ अगात् अप प्र अगात् तमः आ ज्योतिः एति ॥
अरैक् पंथां यातवे सूर्याय अगन्म यत्र प्रऽतिरंते आयुः ॥ १६ ॥

चला उठा, आपला चैतन्यमय प्राण आला आहे. अंधकार पळून गेला आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. सूर्यास आपला प्रवास करतां यावा म्हणून उषेने त्याचेकरितां मार्ग मोकळा करून दिला आहे. जेथें सर्व लोक आपल्या आयुष्याची वृद्धि करून घेतात अशा स्थली आपण येऊन पोंचलों आहो. ॥ १६ ॥


स्यूम॑ना वा॒च उदि॑यर्ति॒ वह्निः॒ स्तवा॑नो रे॒भ उ॒षसो॑ विभा॒तीः ॥
अ॒द्या तदु॑च्छ गृण॒ते म॑घोन्य॒स्मे आयु॒र्नि दि॑दीहि प्र॒जाव॑त् ॥ १७ ॥

स्यूमना वाचः उत् इयर्ति वह्निः स्तवानः रेभः उषसः विऽभातीः ॥
अद्य तत् उच्छ गृणते मघोनि अस्मे इति आयु ह् नि दिदीहि प्रजाऽवत् ॥ १७ ॥

देदीप्यमान उषाची स्तुति करीत हा स्तोता त्यांच्या सन्मानार्थ उत्तम गाणी गुंफुन तीं गात असतो. ह्यास्तव हे उदार देवी, तूं ह्या स्तोत्याकरितां आज प्रकाशित हो व आम्हांवर संततीनें युक्त अशा दीर्घ आयुष्याची प्रभा पाड. ॥ १७ ॥


या गोम॑तीरु॒षसः॒ सर्व॑वीरा व्यु॒च्छन्ति॑ दा॒शुषे॒ मर्त्या॑य ॥
वा॒योरि॑व सू॒नृता॑नामुद॒र्के ता अ॑श्व॒दा अ॑श्नवत्सोम॒सुत्वा॑ ॥ १८ ॥

या गोऽमतीः उषसः सर्वऽवीरा विऽउच्छंति दाशुषे मर्त्याय ॥
वायोःऽइव सूनृतानां उत्ऽअर्के ताः अश्वदाः अश्नवत् सोमऽसुत्वा ॥ १८ ॥

गोधनाची व अश्वांची प्राप्ति करून देणार्‍या व सर्व वीरांना पूज्य अशा ज्या उषा, हवि अर्पण करणार्‍या मानवाकरितां सुप्रकाशित होतात, त्यांचेप्रत हा त्यांचा सोमयागीं उपासक, हीं उत्तम स्तोत्रें वायूप्रमाणें उच्चरवानें गाइल्याबरोबर, जाऊन प्राप्त होवो. ॥ १८ ॥


मा॒ता दे॒वाना॒मदि॑ते॒रनी॑कं य॒ज्ञस्य॑ के॒तुर्बृ॑ह॒ती विभा॑हि ॥
प्र॒श॒स्ति॒कृद्ब्रह्म॑णे नो॒ व्यु१॑च्छा नो॒ जने॑ जनय विश्ववारे ॥ १९ ॥

माता देवानां अदितेः अनीकं यज्ञस्य केतुः बृहती वि भाहि ॥
प्रशस्तिऽकृत् ब्रह्मणे नः वि उच्छ आ नः जने जनय विश्ववारे ॥ १९ ॥

देवांची माता, अदितीचे बल, यज्ञाचा ध्वज व श्रेष्ठ अशी जी ती तूं आम्हांकरितां प्रकाश पाड. आमच्या यज्ञाची प्रशंसा करीत आमचें स्तोत्र श्रवण करून उज्ज्वल कांतीनें युक्त हो. हे सर्वांस प्रिय असणारे उषे, ह्या लोकांत आम्ही रहात असतां आम्हांस नवीन जीवन अर्पण कर. ॥ १९ ॥


यच्चि॒त्रमप्न॑ उ॒षसो॒ वह॑न्तीजा॒नाय॑ शशमा॒नाय॑ भ॒द्रम् ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ २० ॥

यत् चित्रं अप्नः उषसः वहंति ईजानाय शशमानाय भद्रम् ॥
तत् नः मित्रः वरुणः ममहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ २० ॥

पूजन व स्तवन करणार्‍या उपासकासाठीं जे मंगल व आश्चर्यकारक बल उषा घेऊन येत असतील त्यास मित्र, वरुण, अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्या सर्वांचे अनुमोदन असो. ॥ २० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११४ ( रुद्र सूक्त )

ऋषि : अंगिरस कुत्स - देवता : रुद्र - छंद - जगती, त्रिष्टुभ्


इ॒मा रु॒द्राय॑ त॒वसे॑ कप॒र्दिने॑ क्ष॒यद्वी॑राय॒ प्र भ॑रामहे म॒तीः ॥
यथा॒ शमस॑द्द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे॒ विश्वं॑ पु॒ष्टं ग्रामे॑ अ॒स्मिन्न॑नातु॒रम् ॥ १ ॥

इमाः रुद्राय तवसे कपर्दिने क्षयत्ऽवीराय प्र भरामहे मतीः ॥
यथा शं असत् द्विऽपदे चतुःऽपदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन् अनातुरम् ॥ १ ॥

जो प्रत्यक्ष पराक्रमच आहे, जो जटाभारानें मंडित आहे व ज्याचा आश्रय अखिल वीर करीत असतात अशा रुद्रदेवास आम्ही ह्या स्तुति अर्पण करीत आहोंत. ह्या योगानें आमच्या सर्व द्विपाद व चतुष्पाद प्राण्यांचे कल्याण होईल व ह्या ग्रामांतील सर्व जन अभिवृद्धि पावून सर्व त्रासांतून मुक्त होतील. ॥ १ ॥


मृ॒ळा नो॑ रुद्रो॒त नो॒ मय॑स्कृधि क्ष॒यद्वी॑राय॒ नम॑सा विधेम ते ॥
यच्छं च॒ योश्च॒ मनु॑राये॒जे पि॒ता तद॑श्याम॒ तव॑ रुद्र॒ प्रणी॑तिषु ॥ २ ॥

मृळ नः रुद्र उत नः मयः कृधि क्षयत्ऽवीराय नमसा विधेम ते ॥
यच् शं च योः च मनुः आऽयेजे पिता तत् अश्याम तव रुद्र प्रऽनीतिषु ॥ २ ॥

हे रुद्रा, आम्हांस सौख्य दे व आम्हांस आनंद होईल असें कर. ज्या तुझा सर्व शूर पुरुष आश्रय करतात त्या तुला वंदन करून आम्ही तुझी सेवा करूं. तुझा आश्रय करणार्‍या भक्तासच प्राप्त होण्यास योग्य अशा ज्या कल्याणाची आमचा मनु ह्यानें इच्छा केली तें, हे रुद्रा, तुझ्या मार्गदर्शकत्वाखालींच आम्हांस प्राप्त होईल. ॥ २ ॥


अ॒श्याम॑ ते सुम॒तिं दे॑वय॒ज्यया॑ क्ष॒यद्वी॑रस्य॒ तव॑ रुद्र मीढ्वः ॥
सु॒म्ना॒यन्निद्विशो॑ अ॒स्माक॒मा च॒रारि॑ष्टवीरा जुहवाम ते ह॒विः ॥ ३ ॥

अश्याम ते सुऽमतिं देवऽयज्यया क्षयत्ऽवीरस्य तव रुद्र मीढ्वः ॥
सुम्नऽयन् इत् विशः अस्माकं आ चर अरिष्टऽवीराः जुहवाम ते हविः ॥ ३ ॥

हे उदार रुद्रा, ज्याचा आश्रय सर्व वीर पुरुष शोधतात अशा तुझ्या कृपेचा लाभ आम्हांस देवांची उपासना केल्यामुळेंच प्राप्त होईल. आमच्या कुटुंबांतील सर्व माणसांकरितां उत्तम उत्तम वैभवें घेऊन तूं इकडे ये. आमच्या पदरचे सर्व शूर लोक खुशाल राहून आम्ही तुला हवि अर्पण करूं. ॥ ३ ॥


त्वे॒षं व॒यं रु॒द्रं य॑ज्ञ॒साधं॑ व॒ङ्कुंव क॒विमव॑से॒ नि ह्व॑यामहे ॥
आ॒रे अ॒स्मद्दैव्यं॒ हेळो॑ अस्यतु सुम॒तिमिद्व॒यम॒स्या वृ॑णीमहे ॥ ४ ॥

त्वेषं वयं रुद्रं यज्ञऽसाधं वङ्कुंष कविं अवसे नि ह्वयामहे ॥
आरे अस्मत् दैव्यं हेळः अस्यतु सुऽमतिं इत् वयं अस्य आ वृणीमहे ॥ ४ ॥

अतिशय त्वेषयुक्त, यज्ञ सिद्धिस नेणारा, वक्रगतीनें मंडित व प्रज्ञाशील अशा रुद्रास आम्ही आपल्या संरक्षणाकरितां निमंत्रण करतो. तो देवांचा कोप आम्हांपासून दूर घालवो. त्याच्या कृपेचीच आम्ही इच्छा करीत आहोंत. ॥ ४ ॥


दि॒वो व॑रा॒हम॑रु॒षं क॑प॒र्दिनं॑ त्वे॒षं रू॒पं नम॑सा॒ नि ह्व॑यामहे ॥
हस्ते॒ बिभ्र॑द्भेष॒जा वार्या॑णि॒ शर्म॒ वर्म॑ छ॒र्दिर॒स्मभ्यं॑ यंसत् ॥ ५ ॥

दिवः वराहं अरुषं कपर्दिनं त्वेषं रूपं नमसा नि ह्वयामहे ॥
हस्ते बिभ्रत् भेषजा वार्याणि शर्म वर्म छर्दिः अस्मभ्यं यंसत् ॥ ५ ॥

देदीप्यमान, जटाधारी व त्वेषयुक्त रूप धारण करणारा अशा त्या स्वर्गलोकांतील वराहास वंदन करून आम्ही बोलावीत आहोंत. तो आपले हातांत सर्वांना हवींशी वाटणारी औषधें धारण करून आम्हांस सौख्य, अभय व सुरक्षितपणा अर्पण करो. ॥ ५ ॥


इ॒दं पि॒त्रे म॒रुता॑मुच्यते॒ वचः॑ स्वा॒दोः स्वादी॑यो रु॒द्राय॒ वर्ध॑नम् ॥
रास्वा॑ च नो अमृत मर्त॒भोज॑नं॒ त्मने॑ तो॒काय॒ तन॑याय मृळ ॥ ६ ॥

इदं पित्रे मरुतां उच्यते वचः स्वादोः स्वादीयः रुद्राय वर्धनम् ॥
रास्व च नः अमृत मर्तऽभोजनं त्मने तोकाय तनयाय मृळ ॥ ६ ॥

मधुराहून मधुर व संतोषदायक असें हे स्तोत्र आम्ही मरुतांचा पिता जो रुद्र त्याचेकरितां गात आहोंत. म्हणून हे अमर देवा, तूं आम्हां मानवांस अशा भोग्य व पोषणाच्या वस्तु अर्पण कर व आम्हांस व आमच्या मुळाबाळांना सौख्य दे. ॥ ६ ॥


मा नो॑ म॒हान्त॑मु॒त मा नो॑ अर्भ॒कं मा न॒ उक्ष॑न्तमु॒त मा न॑ उक्षि॒तम् ॥
मा नो॑ वधीः पि॒तरं॒ मोत मा॒तरं॒ मा नः॑ प्रि॒यास्त॒न्वो रुद्र रीरिषः ॥ ७ ॥

मा नः महांतं उत मा नः अर्भकं मा न उक्षंतं उत मा नः उक्षितम् ॥
मा नः वधीः पितरं मा उत मातरं मा नः प्रियाः तन्वः रुद्र रीरिषः ॥ ७ ॥

हे रुद्रा, आमच्यांतील जे थोर असतील अथवा जे लहान असतील, जे मोठे होत असतील अथवा जे मोठे झाले असतील, त्यापैकीं कोणासही इजा पोंचू देऊं नकोस. आमचा पिता आणि आमची माता ह्यांना मारूं नकोस व आम्हांस प्रिय जो आमची शरीरें त्यांनाही इजा पोंचू देऊं नकोस. ॥ ७ ॥


मा न॑स्तो॒के तन॑ये॒ मा न॑ आ॒यौ मा नो॒ गोषु॒ मा नो॒ अश्वे॑षु रीरिषः ॥
वी॒रान्मा नो॑ रुद्र भामि॒तो व॑धीर्ह॒विष्म॑न्तः॒ सद॒मित्त्वा॑ हवामहे ॥ ८ ॥

मा नः तोके तनये मा नः आयौ मा नः गोषु मा नः अश्वेषु रीरिषः ॥
वीरान् मा नः रुद्र भामितः वधीः हविष्मंतः सदं इत् त्वा हवामहे ॥ ८ ॥

आपल्या मुलाबाळांस, आमच्या नोकरांस, आमच्या धेनूंस आणि आमच्या अश्वांस इजा पोंचू देऊं नकोस. हे रुद्रा, तूं क्रुद्ध होऊन आमच्या पदरच्या शूर पुरुषांस मारूं नकोस. आम्ही हवि अर्पण करून सदैव तुझे पूजन करीत असतो. ॥ ८ ॥


उप॑ ते॒ स्तोमा॑न्पशु॒पा इ॒वाक॑रं॒ रास्वा॑ पितर्मरुतां सु॒म्नम॒स्मे ॥
भ॒द्रा हि ते॑ सुम॒तिर्मृ॑ळ॒यत्त॒माथा॑ व॒यमव॒ इत्ते॑ वृणीमहे ॥ ९ ॥

उप ते स्तोमान् पशुपाःऽइव आ अकरं रास्व पितः मरुतां सुम्नं अस्मे इति ॥
भद्रा हि ते सुऽमतिः मृळयत्ऽतमा अथ वयं अवः इत् ते वृणीमहे ॥ ९ ॥

ज्याप्रमाणें गुराखी गुरें जमा करतो त्याप्रमाणें मी तुझ्या सन्मानार्थ अनेक स्तोत्रें एकत्र करीत आहे. हे मरुतांच्या पित्या, तूं आम्हांस उत्कृष्ट वैभव अर्पण कर. तुझी कृपा मंगलप्रद व अत्यंत सुखदायक आहे व ह्याचेमुळें मी तुझ्या कृपाप्रसादाचीच केवळ याचना करतो. ॥ ९ ॥


आ॒रे ते॑ गो॒घ्नमु॒त पू॑रुष॒घ्नं क्षय॑द्वीर सु॒म्नम॒स्मे ते॑ अस्तु ॥
मृ॒ळा च॑ नो॒ अधि॑ च ब्रूहि दे॒वाधा॑ च नः॒ शर्म॑ यच्छ द्वि॒बर्हाः॑ ॥ १० ॥

आरे ते गोघ्नं उत पूरुषऽघ्नं क्षयत्ऽवीर सुम्नं अस्मे इति ते अस्तु ॥
मृळ च नः अधि च ब्रूहि देव अध च नः शर्म यच्छ द्विऽबर्हाः ॥ १० ॥

धेनु व पुरुष ह्यांचा वध करणारे तुझें शस्त्र दूर राहो, व हे सर्व वीर पुरुषांना आश्रयभूत असलेल्या देवा, तुझ्याजवळील उत्कृष्ट वैभव मात्र आम्हांकरितां असो. हे देवा, तूं आम्हांस सौख्य दे आणि आमचा कैवार घेऊन बोल, आणि तूं द्विगुणित समर्थ्यवान असल्यामुळें आम्हांस सुरक्षितपणा अर्पण कर. ॥ १० ॥


अवो॑चाम॒ नमो॑ अस्मा अव॒स्यवः॑ शृ॒णोतु॑ नो॒ हवं॑ रु॒द्रो म॒रुत्वा॑न् ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ११ ॥

अवोचाम नमः अस्मै अवस्यवः शृणोतु नः हवं रुद्रः मरुत्वान् ॥
तत् नः मित्रः वरुणः ममहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ११ ॥

त्या रुद्रानें आमचे रक्षण करावे अशी इच्छा बाळगून नमस्कृतिपूर्ण हे स्तोत्र आम्ही गाइले आहे, व म्हणून तो रुद्र, मरुतांसहवर्तमान, आमची हांक श्रवण करो. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११५ ( सौर सूक्त )

ऋषि : अंगिरस कुत्स - देवता : सूर्य - छंद - त्रिष्टुभ्


चि॒त्रं दे॒वाना॒मुद॑गा॒दनी॑कं॒ चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्या॒ग्नेः ॥
आप्रा॒ द्यावा॑पृथि॒वी अ॒न्तरि॑क्षं॒ सूर्य॑ आ॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च ॥ १ ॥

चित्रं देवानां उत् अगात् अनीकं चक्षुः मित्रस्य वरुणस्य अग्नेः ॥
आ अप्राः द्यावापृथिवी इति अंतरिक्षं सूर्यः आत्मा जगतः तस्थुषः च ॥ १ ॥

मित्र, वरुण व अग्नि ह्यांचे जणूं कांही नेत्रच असे हे देवांचे आश्चर्यकारक बल उदय पावले आहे. स्थाव जंगम वस्तूंचा जणूं कांही प्राणच अशा ह्या सूर्याने द्युलोक, भूलोक व अंतरिक्ष ह्यांना व्यापून टाकलें आहे. ॥ १ ॥


सूर्यो॑ दे॒वीमु॒षसं॒ रोच॑मानां॒ मर्यो॒ न योषा॑म॒भ्येति प॒श्चात् ॥
यत्रा॒ नरो॑ देव॒यन्तो॑ यु॒गानि॑ वितन्व॒ते प्रति॑ भ॒द्राय॑ भ॒द्रम् ॥ २ ॥

सूर्यः देवीं उषसं रोचमानां मर्यः नं योषां अभि एति पश्चात् ॥
यत्र नरः देवऽयंतः युगानि विऽतन्वते प्रति भद्राय भद्रम् ॥ २ ॥

जसा एखादा मनुष्य आपणास प्रिय अशा एखाद्या तरुणीच्या मागोमाग जाऊं लागतो त्याप्रमाणे हा सूर्य देदीप्यमान अशा ह्या उषादेवीच्या पाठीमागे चालत असून, ज्या ठिकाणी भक्तिमान लोक आपले आयुष्यक्रमण करीत असतात अशा मंगल स्थानी त्यांचे मंगल करण्याकरितां जात आहे. ॥ २ ॥


भ॒द्रा अश्वा॑ ह॒रितः॒ सूर्य॑स्य चि॒त्रा एत॑ग्वा अनु॒माद्या॑सः ॥
न॒म॒स्यन्तो॑ दि॒व आ पृ॒ष्ठम॑स्थुः॒ परि॒ द्यावा॑पृथि॒वी य॑न्ति स॒द्यः ॥ ३ ॥

भद्राः अश्वाः हरितः सूर्यस्य चित्राः एतऽग्वाः अनुऽमाद्यासः ॥
नमस्यंतः दिवः आ पृष्ठं अस्थुः परि द्यावापृथिवी इति यंति सद्यः ॥ ३ ॥

सूर्याचे अश्व मंगलप्रद, आश्चर्यकारक, अनेक प्रकारच्या रंगांचे व आनंददायक आहेत. सूर्यास नमन करून त्यांनी द्युलोकाचा पृष्ठभाग व्यापून टाकला आहे. ते द्युलोक व भूलोक ह्यांचेभोंवती निमिषमात्रांत जाऊं शक्तात. ॥ ३ ॥


तत्सूर्य॑स्य देव॒त्वं तन्म॑हि॒त्वंम् म॒ध्या कर्तो॒र्वित॑तं॒ सं ज॑भार ॥
य॒देदयु॑क्त ह॒रितः॑ स॒धस्था॒दाद्रात्री॒ वास॑स्तनुते सि॒मस्मै॑ ॥ ४ ॥

तत् सूर्यस्य देवऽत्वं तत् महिऽत्वं मध्या कर्तोः विऽततं सं जभार ॥
यदा इत् अयुक्त हरितः सधऽस्थात् आत् रात्री वासः तनुते सिमस्मै ॥ ४ ॥

सूर्याची तीन दिव्य शक्ति, तेंच त्याचें श्रेष्ठत्व होय कीं मनुष्याचें काम चाललें असतां त्यानें मध्येंच आपलें सर्वत्र पसरलेले किरणजाल काढून घेतलें. रात्र व सूर्य ह्यांचे एकत्र निवासस्थान जें हें जग त्याचेपासून गमन करण्याकरितां जेव्हां ह्यानें आपले अश्व जोडलेले असतात तेव्हां रात्र आपले आच्छादन सर्व विश्वावर पसरते. ॥ ४ ॥


तन्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्याभि॒चक्षे॒ सूर्यो॑ रू॒पं कृ॑णुते॒ द्योरु॒पस्थे॑ ॥
अ॒न॒न्तम॒न्यद्रुश॑दस्य॒ पाजः॑ कृ॒ष्णम॒न्यद्ध॒रितः॒ सं भ॑रन्ति ॥ ५ ॥

तत् मित्रस्य वरुणस्य अभिऽचक्षे सूर्यः रूपं कृणुते द्योः उपऽस्थे ॥
अनंतं अन्यत् रुशत् अस्य पाजः कृष्णं अन्यत् हरितः सं भरंति ॥ ५ ॥

मित्र आणि वरुण, ह्यांचे दृष्टीस आपलें रूप पडावें म्हणून सूर्य तें स्वर्गलोकाच्या सीमांत प्रदेशावर प्रकट करतो. त्याचे अश्व एकेवेळी त्याचें देदीप्यमान अनंत तेज, तर दुसरे वेळी त्याची कृष्ण कांति ह्यांचे प्रदर्शन करण्याकरितां त्यांस जगासमोर आणतात. ॥ ५ ॥


अ॒द्या दे॑वा॒ उदि॑ता॒ सूर्य॑स्य॒ निरंह॑सः पिपृ॒ता निर॑व॒द्यात् ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ६ ॥

अद्य देवाः उत्ऽइता सूर्यस्य निः अंहसः पिपृत निः अवद्यात् ॥
तत् नः मित्रः वरुणः ममहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ६ ॥

हे देवहो, आज सूर्योदय झाल्याबरोबर तुम्ही आम्हांस पातकापासून व निंदेपासून मुक्त करा. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११६ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : अश्विनी कुमार - छंद - त्रिष्टुभ्


नास॑त्याभ्यां ब॒र्हिरि॑व॒ प्र वृ॑ञ्जे॒ स्तोमाँ॑ इयर्म्य॒भ्रिये॑व॒ वातः॑ ॥
यावर्भ॑गाय विम॒दाय॑ जा॒यां से॑ना॒जुवा॑ न्यू॒हतू॒ रथे॑न ॥ १ ॥

नासत्याभ्यां बर्हिःऽइव प्र वृञ्जे स्तोमान् इयर्मि अभ्रियाऽइव वातः ॥
यौ अर्भगाय विऽमदाय जायां सेनाऽजुवा निऽऊहतूः रथेन ॥ १ ॥

त्या सत्यस्वरूप देवांनी बालवयाच्या विमदाकडे त्याच्या पत्नीस सैन्याप्रमाणें वेगवान अशा रथात घालून आणले, त्या देवांच्या सन्मानार्थ मी जणूं कांही कुशासनच तयार करीत आहे. कारण पहा ज्याप्रमाणें वायु हा मेघोदकांची प्रेरणा करतो त्याचप्रमाणें मीही त्यास अनेक स्तोत्रें अर्पण करीत आहे. ॥ १ ॥


वी॒ळु॒पत्म॑भिराशु॒हेम॑भिर्वा दे॒वानां॑ वा जू॒तिभिः॒ शाश॑दाना ॥
तद्रास॑भो नासत्या स॒हस्र॑मा॒जा य॒मस्य॑ प्र॒धने॑ जिगाय ॥ २ ॥

वीळुपत्मऽभिः आशुहेमऽभिः वा देवानां वा जूतिऽभिः शाशदाना ॥
तत् रासभः नासत्या सहस्रं आजा यमस्य प्रऽधने जिगाय ॥ २ ॥

ज्यांचे उड्डाण अतिशय जोराचे असते आणि ज्यांचा वेग अतिशय तीव्र असतो असे तुमचे अश्व अथवा देवांचे प्रोत्साहनपर शब्द हेंच काय ते तुम्हांस ह्या यज्ञांत आणीत असतात. परंतु हे सत्यस्वरूप देवांनो, तुमचा रासभसुद्धां इतका सामर्थ्यवान आहे कीं स्वतः यम ज्या ठिकाणी जातीनें लढत होता अशा युद्धांत त्यानें हजारो शत्रूंना जिंकले होते. ॥ २ ॥


तुग्रो॑ ह भु॒ज्युम॑श्विनोदमे॒घे र॒यिं न कश्चि॑न्ममृ॒वाँ अवा॑हाः ॥
तं ऊ॑हथुर्नौ॒भिरा॑त्म॒न्वती॑भिरन्तरिक्ष॒प्रुद्भि॒ारपो॑दकाभिः ॥ ३ ॥

तुग्रः ह भुज्युं अश्विना उदऽमेघे रयिं न कः चित् ममृऽवान् अव अहाः ॥
तं ऊहथुः नौभिः आत्मन्ऽवतीभिः अंतरिक्षप्रुत्ऽभिः अपऽउदकाभिः ॥ ३ ॥

हे अश्विनहो, जसा एखादा मृत मनुष्य हे ऐहिक वैभव सोडून देऊन निघून जातो त्याप्रमाणे खरोखर त्या तुग्रानें भुज्यूला उदकाच्या प्रवाहांत टाकून दिले होते. पण अंतरिक्षांतून उड्डाण करणार्‍या व उदकाच्या स्पर्शापासून अलिप्त राहणार्‍या अशा नौकांत बसवून त्यास तुम्ही सुरक्षितपणें घेऊन आलां. ॥ ३ ॥


ति॒स्रः क्षप॒स्त्रिरहा॑ति॒व्रज॑द्भि॒ र्नास॑त्या भु॒ज्युमू॑हथुः पतं॒गैः ॥
स॒मु॒द्रस्य॒ धन्व॑न्ना॒र्द्रस्य॑ पा॒रे त्रि॒भी रथैः॑ श॒तप॑द्‌भिः॒ षळ॑श्वैः ॥ ४ ॥

तिस्रः क्षपः त्रिः अहा अतिव्रजत्ऽभिः नासत्या भुज्युं ऊहथुः पतंगैः ॥
समुद्रस्य धन्वन् आर्द्रस्य पारे त्रिऽभी रथैः शतपत्ऽभिः षट्ऽअश्वैः ॥ ४ ॥

हे सत्यस्वरूप देवहो, तीन दिवस व तीन रात्रीं ह्याहूनही जास्त वेळपर्यंत एकसारके धांवणार्‍या व पक्ष्यांप्रमाणें चपल अशा अश्वांच्या साहाय्यानें भुज्यूला शंभर खूर व सहा घोडे जोडलेल्या अशा तीन रथांत बसवून तुम्ही त्यास उदकानें भरलेल्या अशा समुद्राच्या पलीकडे कोरड्या जमीनीवर घेऊन आलां. ॥ ४ ॥


अ॒ना॒र॒म्भ॒णे तद॑वीरयेथामनास्था॒ने अ॑ग्रभ॒णे स॑मु॒द्रे ॥
यद॑श्विना ऊ॒हथु॑र्भु॒ज्युमस्तं॑ श॒तारि॑त्रां॒ नाव॑मातस्थि॒वांस॑म् ॥ ५ ॥

अनारंभणे तत् अवीरयेथां अनास्थाने अग्रभणे समुद्रे ॥
यत् अश्विनौ ऊहथुः भुज्युं अस्तं शतऽअरित्रां नावं आ तस्थिवांसम् ॥ ५ ॥

हे अश्विनहो, जिला शंभर वल्हीं लागत होती अशा नौकेंत भुज्यूला तुम्ही त्याच्या घरी सुखरूप पोंचता केला हा तुमचा समुद्रावरचा मोठाच पराक्रम होय. कारण त्या समुद्राचा आरंभ कोठें झाला, त्याला टेंका कशाचा असतो व त्याला ताब्यांत आणावे कसें हे कांहींच समजत नव्हते. ॥ ५ ॥


यम॑श्विना द॒दथुः॑ श्वे॒तमश्व॑म॒घाश्वा॑य॒ शश्व॒दित्स्व॒स्ति ॥
तद्वां॑ दा॒त्रं महि॑ की॒र्तेन्यं॑ भूत्पै॒द्वो वा॒जी सद॒मिद्धव्यो॑ अ॒र्यः ॥ ६ ॥

यं अश्विना ददथुः श्वेतं अश्वं अघऽअश्वाय शश्वत् इत् स्वस्ति ॥
तत् वां दात्रं महि कीर्तेन्यं भूत् पैद्वः वाजी सदं इत् हव्यः अर्यः ॥ ६ ॥

हे अश्विनहो, सदोदित समाधान उत्पन्न करणारा असा जो शुभ्रवर्ण अश्व तुम्ही अधाश्वाला दिला तें तुमचे श्रेष्ठ दातृत्व खरोखर वर्णन करण्याजोगें होते. पेदूचा उत्कृष्ट अश्व सन्मान करण्यास सदैव पात्र असा झाला. ॥ ६ ॥


यु॒वं न॑रा स्तुव॒ते प॑ज्रि॒याय॑ क॒क्षीव॑ते अरदतं॒ पुरं॑धिम् ॥
का॒रो॒त॒राच्छ॒फादश्व॑स्य॒ वृष्णः॑ श॒तं कु॒म्भाँ अ॑सिञ्चतं॒ सुरा॑याः ॥ ७ ॥

युवं नरा स्तुवते पज्रियाय कक्षीवते अरदतं पुरंऽधिम् ॥
कारोतरात् शफात् अश्वस्य वृष्णः शतं कुम्भान् असिञ्चतं सुरायाः ॥ ७ ॥

पज्राच्या कुलांत उत्पन्न झालेल्या कक्षीवानानें तुमची स्तुति केल्याबरोबर तुम्ही त्याला अतिशय कुशाग्र बुद्धि अर्पण केली आणि भांड्याप्रमाणें आकार असलेल्या एका सामर्थ्यवान अश्वाच्या खुरापासून तुम्ही सुरेचे शंभर कुंभ निर्माण केले. ॥ ७ ॥


हि॒मेना॒ग्निं घ्रं॒सम॑वारयेथां पितु॒मती॒मूर्ज॑मस्मा अधत्तम् ॥
ऋ॒बीसे॒ अत्रि॑मश्वि॒नाव॑नीत॒मुन्नि॑न्यथुः॒ सर्व॑गणं स्व॒स्ति ॥ ८ ॥

हिमेन अग्निं घ्रंसं अवारयेथां पितुऽमतीं ऊर्जं अस्मै अधत्तम् ॥
ऋबीसे अत्रिं अश्विना अवऽनीतं उन् निन्यथुः सर्वऽगणं स्वस्ति ॥ ८ ॥

तुम्ही गारवा उत्पन्न करून तापदायक अग्निचें निवारण केले आणि त्या अत्रीस उत्तम पेयांच्या योगानें तकवा उत्पन्न करणारे असें नवीन बल त्याचे अंगी उत्पन्न केलें. अत्रीला खाली खळग्यांत फेंकून दिले असतां तुम्ही त्याला त्याच्या सर्व माणसांसह सुखरूप ठेवून त्यांतून वर काढलें. ॥ ८ ॥


परा॑व॒तं ना॑सत्यानुदेथामु॒च्चाबु॑ध्नं चक्रथुर्जि॒ह्मबा॑रम् ॥
क्षर॒न्नापो॒ न पा॒यना॑य रा॒ये स॒हस्रा॑य॒ तृष्य॑ते॒ गोत॑मस्य ॥ ९ ॥

परा अवतं नासत्या अनुदेथां उच्चाऽबुध्नं चक्रथुः जिह्मऽबारम् ॥
क्षरन् आपः न पायनाय राये सहस्राय तृष्यते गोतमस्य ॥ ९ ॥

हे नासत्यानो, तृषार्त गोतम ऋषींसाठी दूर अंतरावर असणारी विहीर तुम्ही जवळ आणलीत, आणि त्या विहीरीचा तळ वर आणून तिचे तोंड मोठे केलेंत. तुमच्या या कृत्याने गोतमाला विपुल जल आणि धन प्राप्त झाले. ॥ ९ ॥


जु॒जु॒रुषो॑ नासत्यो॒त व॒व्रिं प्रामु॑ञ्चतं द्रा॒पिमि॑व॒ च्यवा॑नात् ॥
प्राति॑रतं जहि॒तस्यायु॑र्द॒स्रादित्पति॑मकृणुतं क॒नीना॑म् ॥ १० ॥

जुजुरुषः नासत्या उत वव्रिं प्र अमुञ्चतं द्रापिंऽइव च्यवानात् ॥
प्र अतिरतं जहितस्य आयुः दस्रा आत् इत् पतिं अकृणुतं कनीनाम् ॥ १० ॥

हे सत्यस्वरूप अश्विनहो, जसें एखाद्याच्या अंगावरचें चिलखत काढून टाकावे त्याप्रमाणे तुम्ही वृद्ध च्यवनावरची वार्धक्याची कळा काढून टाकली. त्या बिचार्‍यास सर्वांनी सोडून दिले असतां तुम्ही त्याचे आयुष्य वाढविलें व त्यास तरुण वयाच्या कुमारिकांचा पति केलें. ॥ १० ॥


तद्वां॑ नरा॒ शंस्यं॒ राध्यं॑ चाभिष्टि॒मन्ना॑सत्या॒ वरू॑थम् ॥
यद्वि॒द्वांसा॑ नि॒धिमि॒वाप॑गूळ्ह॒मुद्द॑र्श॒तादू॒पथु॒र्वन्द॑नाय ॥ ११ ॥

तत् वां नरा शंस्यं राध्यं च अभिष्टिऽमन् नासत्या वरूथम् ॥
यत् विद्वांसा निधिंऽइव अपऽगूळ्हं उत् दर्शतात् ऊपथुः वंदनाय ॥ ११ ॥

हे सत्यस्वरूप व शूर अश्विनहो, हे ज्ञानवान देवांनो, ती तुमची कृपा खरोखर प्रशंसनीय, सौख्यप्प्रद व हितकारक होय कीं जिच्या योगानें तुम्ही दृष्टिआड झालेला धनाचा ठेवाच जणूं कांही, वन्दनासाठीं शोधून बाहेर काढला. ॥ ११ ॥


तद्वां॑ नरा स॒नये॒ दंस॑ उ॒ग्रमा॒विष्कृ॑णोमि तन्य॒तुर्न वृ॒ष्टिम् ॥
द॒ध्यङ्‍ ह॒ यन्मध्वा॑थर्व॒णो वा॒मश्व॑स्य शी॒र्ष्णा प्र यदी॑मु॒वाच॑ ॥ १२ ॥

तत् वां नरा सनये दंसः उग्रं आविः कृणोमि तन्यतुः न वृष्टिम् ॥
दध्यङ्‍ ह यत् मधु आथर्वणः वा अश्वस्य शीर्ष्णा प्र यत् ईं उवाच ॥ १२ ॥

हे शूरहो, ज्याप्रमाणे मेघगर्जना पर्जन्यवृष्टि होणार असें प्रसिद्ध करतें त्याप्रमाणे, मला वैभवाची प्राप्ति व्हावी म्हणून मी तुमच्या शौर्याच्या त्या कृत्याची सर्वत्र प्रसिद्धि करतो कीं ज्याच्या योगानें अथर्वाच्या वंशांतील दध्यंचानें अश्वाचे शिर धारण करून तुमचे बरोबर मधुर संभाषण केलें. ॥ १२ ॥


अजो॑हवीन्नासत्या क॒रा वां॑ म॒हे याम॑न्पुरुभुजा॒ पुरं॑धिः ॥
श्रु॒तं तच्छासु॑रिव वध्रिम॒त्या हिर॑ण्यहस्तमश्विनावदत्तम् ॥ १३ ॥

अजोहवीत् नासत्या करा वां महे यामन् पुरुऽभुजा पुरंऽधिः ॥
श्रुतं तत् शासुःऽइव वध्रिऽमत्या हिरण्यऽहस्तं अश्विनौ अदत्तम् ॥ १३ ॥

हे सत्यस्वरूप अश्विनहो, आपण आपले दीर्घ मार्ग क्रमण करीत असतां वृध्रिमतीनें अनेक स्तोत्रें गाऊन, कर्तृत्ववान व अनेकांचे पोषण करणारे जे तुम्हीं त्या तुम्हांस हवि अर्पण केले. आपणही तीं कांही वृध्रिमतीची आज्ञाच असें समजून तिचीं स्तोत्रें ऐकलीं व तिला हिरण्यहस्त नांवाचा पुत्र दिला. ॥ १३ ॥


आ॒स्नो वृक॑स्य॒ वर्ति॑काम॒भीके॑ यु॒वं न॑रा नासत्यामुमुक्तम् ॥
उ॒तो क॒विं पु॑रुभुजा यु॒वं ह॒ कृप॑माणमकृणुतं वि॒चक्षे॑ ॥ १४ ॥

आस्नः वृकस्य वर्तिका अभीके युवं नरा नासत्या अमुमुक्तम् ॥
उतो इति कविं पुरुऽभुजा युवं ह कृपमाणं अकृणुतं विऽचक्षे ॥ १४ ॥

हे सत्यस्वरूप देवांनो, ती लावीपक्षीण लांडग्याच्या अगदीं मुखाजवळ गेली असतांना तुम्ही तिला सोडविली व हे अनेक भक्तांचे पोषण करणार्‍या अश्विनहो, कवीनें तुमची कृपा भाकल्याबरोबर तुम्हीं त्यास पाहण्याचे सामर्थ्य दिलें. ॥ १४ ॥


च॒रित्रं॒ हि वेरि॒वाच्छे॑दि प॒र्णमा॒जा खे॒लस्य॒ परि॑तक्म्यायाम् ॥
स॒द्यो जङ्घा॒ुमाय॑सीं वि॒श्पला॑यै॒ धने॑ हि॒ते सर्त॑वे॒ प्रत्य॑धत्तम् ॥ १५ ॥

चरित्रं हि वेःऽइव अच्छेदि पर्णं आजा खेलस्य परिऽतक्म्यायाम् ॥
सद्यः जङ्घांि आयसीं विश्पलायै धने हिते सर्तवे प्रति अधत्तम् ॥ १५ ॥

एकाद्या पक्ष्याचा ज्याप्रमाणें पंख तुटावा त्याप्रमाणें खेलाच्या युद्धांत रात्रीचे वेळेस विश्पलेचा पाय तुटला. पण लढाई सुरू झालाबरोबर तिला समरांगणावर वाटेल तेथें जातां यावें म्हणून तुम्ही तिला लगेच लोखंडाचा पाय बसविला. ॥ १५ ॥


श॒तं मे॒षान्वृ॒क्ये चक्षदा॒नमृ॒ज्राश्वं॒ तं पि॒तान्धं च॑कार ॥
तस्मा॑ अ॒क्षी ना॑सत्या वि॒चक्ष॒ आध॑त्तं दस्रा भिषजावन॒र्वन् ॥ १६ ॥

शतं मेषान् वृक्ये चक्षदानं ऋज्रऽअश्वं तं पिता अंधं चकार ॥
तस्मै अक्षी इति नासत्या विऽचक्ष आ अधत्तं दस्रा भिषजौ अनर्वन् ॥ १६ ॥

ऋज्राश्वानें एका लांडगीला खाऊं घालण्यासाठी शंभर मेंढे कापले असतां त्याच्या पित्यानें त्याला आंधळे केले. परंतु शत्रुंचा संहार करणार्‍या हे सत्यस्वरूप वैद्यराजांनो, तुम्ही त्याला पुन्हां दिसूं लागावे म्हणून, कोणताही अडथळा येऊं न देतां, त्याचे नेत्र पुन्हां जसेच्या तसे करून ठेवले. ॥ १६ ॥


आ वां॒ रथं॑ दुहि॒ता सूर्य॑स्य॒ कार्ष्मे॑वातिष्ठ॒दर्व॑ता॒ जय॑न्ती ॥
विश्वे॑ दे॒वा अन्व॑मन्यन्त हृ॒द्‌भिः समु॑ श्रि॒या ना॑सत्या सचेथे ॥ १७ ॥

आ वां रथं दुहिता सूर्यस्य कार्ष्मऽइव अतिष्ठत् अर्वता जयंती ॥
विश्वे देवाः अनु अमन्यंत हृत्ऽभिः सं ऊं इति श्रिया नासत्या सचेथे इति ॥ १७ ॥

आपल्या चपल अश्वाच्या योगानें शर्यत जिंकणारी सूर्याची दुहिता, तुमचा रथ हेंच जणूं कांही पैजेचें ठिकाण असें समजून, तुमच्या रथावर चढली. सर्व देवांनीही त्यास अंतःकरण पूर्वक मान्यता दर्शविली व हे सत्यस्वरूप देवांनो, आपण अशा रीतीनें मोठ्या वैभवानें मंडित दिसूं लागलां. ॥ १७ ॥


यदया॑तं॒ दिवो॑दासाय व॒र्तिर्भ॒रद्वा॑जायाश्विना॒ हय॑न्ता ॥
रे॒वदु॑वाह सच॒नो रथो॑ वां वृष॒भश्च॑ शिंशु॒मार॑श्च यु॒क्ता ॥ १८ ॥

यत् अयातं दिवःऽदासाय वर्तिः भरत्ऽवाजाय अश्विना हयंता ॥
रेवत् उवाह सचनः रथः वां वृषभः च शिंशुमारः च युक्ता ॥ १८ ॥

ज्यावेळीं, हे अश्विनहो, दिवोदास आणि भरद्वाज ह्यांचेसाठी तुम्ही त्वरेनें त्यांचे गृहाकडे गेलां, त्यावेळी जो रथ तुमचे बरोबर होता त्यानें पुष्कळ धन आणलें. त्यास एक वृषभ व एक नक्र असे जोडलेले होते. ॥ १८ ॥


र॒यिं सु॑क्ष॒त्रं स्व॑प॒त्यमायुः॑ सु॒वीर्यं॑ नासत्या॒ वह॑न्ता ॥
आ ज॒ह्नावीं॒ सम॑न॒सोप॒ वाजै॒स्त्रिरह्नो॑ भा॒गं दध॑तीमयातम् ॥ १९ ॥

रयिं सुऽक्षत्रं सुऽअपत्यं आयुः सुऽवीर्यं नासत्या वहंता ॥
आ जह्नावीं सऽमनसा उप वाजैः स्त्रिः अह्नः भागं दधतीं अयातम् ॥ १९ ॥

दिवसातून तीन वेळा तुम्हांस हविर्भाग अर्पण करणार्‍या जन्हूच्या वंशजाकडे, हे सत्यस्वरूप देवहो, तुम्हीं जमीन जुमला, मुळेंबाळें वगैरे वैभव व ज्यांत उत्तम पराक्रम गाजविण्याची शक्ति आहे असे आयुष्य घेऊन अतिशय सामर्थ्यासह, दोघेही एका विचारानें गेलां होतां. ॥ १९ ॥


परि॑विष्टं जाहु॒षं वि॒श्वतः॑ सीं सु॒गेभि॒र्नक्त॑मूहथू॒ रजो॑भिः ॥
वि॒भि॒न्दुना॑ नासत्या॒ रथे॑न॒ वि पर्व॑ताँ अजर॒यू अ॑यातम् ॥ २० ॥

परिऽविष्टं जाहुषं विश्वतः सीं सुऽगेभिः नक्तं ऊहथूः रजःऽभिः ॥
विऽभिंदुना नासत्या रथेन वि पर्वतान् अजरयू अयातम् ॥ २० ॥

हे जरारहित व सत्यस्वरूप देवांनो, जाहुषाला चोहोंकडोन शत्रूंचा वेढा पडला असतांना तुम्ही त्यास आक्रमण करण्यास सुलभ अशा रजोलोकांतून रात्रीं घेऊन गेलां. पाषाणाचा भेद करणार्‍या रथांत बसून तुम्ही पर्वतांतून सुद्धां मार्ग काढला. ॥ २० ॥


एक॑स्या॒ वस्तो॑रावतं॒ रणा॑य॒ वश॑मश्विना स॒नये॑ स॒हस्रा॑ ॥
निर॑हतं दु॒च्छुना॒ इंद्र॑वन्ता पृथु॒श्रव॑सो वृषणा॒वरा॑तीः ॥ २१ ॥

एकस्या वस्तोः आवतं रणाय वशं अश्विना सनये सहस्रा ॥
निः अहतं दुच्छुनाः इंद्रऽवंता पृथुऽश्रवसः वृषणौ अरातीः ॥ २१ ॥

हे अश्विनहो, वशाला हजारों प्रकारच्या संपत्तीचा लाभ व्हावा म्हणून तुम्हीं एका दिवसात त्यास युद्ध करण्याची शक्ति आणली. हे सामर्थ्यवान देवांनो, तुम्हीं इंद्राचे साहाय्य घेऊन पृथुश्रवाच्या दुष्ट शत्रूंचे हनन केलें. ॥ २१ ॥


श॒रस्य॑ चिदार्च॒त्कस्या॑व॒तादा नी॒चादु॒च्चा च॑क्रथुः॒ पात॑वे॒ वाः ॥
श॒यवे॑ चिन्नासत्या॒ शची॑भि॒र्जसु॑रये स्त॒र्यं पिप्यथु॒र्गाम् ॥ २२ ॥

शरस्य चित् आर्चत्ऽकस्य अवतात् आ नीचात् उच्चा चक्रथुः पातवे वारिति वा ॥
शयवे चित् नासत्या शचीभिः जसुरये स्तर्यं पिप्यथुः गाम् ॥ २२ ॥

ऋचत्काचा पुत्र जो शर त्याची तृषा शांत करण्याकरितां तुम्ही खोल विहिरींतून पाणी बाहेर काढलें. थकलेल्या शयूकरितांही तुम्ही न विणार्‍या धेनूचे अंगी भरपूर दूध उत्पन्न केलें. ॥ २२ ॥


अ॒व॒स्य॒ते स्तु॑व॒ते कृ॑ष्णि॒याय॑ ऋजूय॒ते ना॑सत्या॒ शची॑भिः ॥
प॒शुं न न॒ष्टमि॑व॒ दर्श॑नाय विष्णा॒प्वं ददथु॒र्विश्व॑काय ॥ २३ ॥

अवस्यते स्तुवते कृष्णियाय ऋजूऽयते नासत्या शचीभिः ॥
पशुं न नष्टंऽइव दर्शनाय विष्णाप्वं ददथुः विश्वकाय ॥ २३ ॥

हे सत्यस्वरूप देवांनो, कृष्णाच्या कुलांत उत्पन्न झालेल्या व सरळ वर्तनाच्या विश्वकानें तुमचें स्तवन करून तुमच्या साहाय्याची याचना केली. त्यामुळें ज्याप्रमाणें हरवलेले गुरु आपल्या धन्यास सांपडावें त्याप्रमाणें तुम्ही त्याचा पुत्र विष्णापू ह्याची व विश्वकाची भेट करवून विष्णापूस त्याचे स्वाधीन केलें. ॥ २३ ॥


दश॒ रात्री॒रशि॑वेना॒ नव॒ द्यूनव॑नद्धं श्नथि॒तम् अ॒प्स्व१॑न्तः ॥
विप्रु॑तं रे॒भमु॒दनि॒ प्रवृ॑क्त॒मुन्नि॑न्यथुः॒ सोम॑मिव स्रु॒वेण॑ ॥ २४ ॥

दश रात्रीः अशिवेन नव द्यून् अवऽनद्धं श्नथितं अप्ऽसु अंतरिति ॥
विऽप्रुतं रेभं उदनि प्रऽवृक्तं उत् निन्यथुः सोमंऽइव स्रुवेण ॥ २४ ॥

दहा रात्री व नऊ दिवसपर्यंत अमंगळ रीतीनें पाण्याच्या खालीं बद्ध करून ठेवलेला व त्यामुळें पीडा पावत असलेला आणि सर्वांग चिंब होऊन क्लेश भोगीत असलेला जो रेभ त्याला तुम्हीं, ज्याप्रमाणें पात्रांतून सोमरस वर काढून घ्यावा त्याप्रमाणें, पाण्यांतून बाहेर काढलें. ॥ २४ ॥


प्र वां॒ दंसां॑स्यश्विनाववोचम॒स्य पतिः॑ स्यां सु॒गवः॑ सु॒वीरः॑ ॥
उ॒त पश्य॑न्नश्नु॒वन्दी॒र्घमायु॒रस्त॑मि॒वेज्ज॑रि॒माणं॑ जगम्याम् ॥ २५ ॥

प्र वां दंसांसि अश्विनौ अवोचं अस्य पतिः स्यां सुऽगवः सुऽवीरः ॥
उत पश्यन् अश्नुवन् दीर्घं आयुः अस्तंइव इत् जरिमाणं जगम्याम् ॥ २५ ॥

हे अश्विनहो, मी तुमची महत्कृत्यें येथें वर्णन केली आहेत. ह्याकरितां तुमच्या कृपेनें मला उत्तम धेनु व शूर मनुष्यें ह्यांची प्राप्ति होऊन मी ह्या गृहाचा वैभवशाली यजमान होईन. माझी दृष्टि शाबूत राहून आणि मला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊन, हे अश्विनहो, ज्याप्रमाणें एखादा मनुष्य आपल्या सदनांत आनंदानें प्रवेश करतो त्याप्रमाणे माझा वार्धक्यदशेंत आनंदानें प्रवेश होवो. ॥ २५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११७ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : अश्विनी कुमार - छंद - त्रिष्टुभ्


मध्वः॒ सोम॑स्याश्विना॒ मदा॑य प्र॒त्नो होता वि॑वासते वाम् ॥
ब॒र्हिष्म॑ती रा॒तिर्विश्रि॑ता॒ गीरि॒षा या॑तं नास॒त्योप॒ वाजैः॑ ॥ १ ॥

मध्वः सोमस्य अश्विना मदाय प्रत्नःव होता आ विवासते वाम् ॥
बर्हिष्मती रातिः विऽश्रिता गीः इषा यातं नासत्या उप वाजैः ॥ १ ॥

हे अश्विनहो, मधुर सोमरसानें तुम्हांस आनंद व्हावा म्हणून हा तुमचा पुरातन सेवक तुमची उपासना करीत आहे. आम्ही आपला हवि पवित्र दर्भांवर ठेवला आहे व आमची स्तुतिही तुमचेप्रत जाऊन पोंचली आहे. ह्याकरितां आम्हांस पुरेल इतके अन्नसाहित्य व अनेक प्रकारचें सामर्थ्य बरोबर घेऊन या. ॥ १ ॥


यो वा॑मश्विना॒ मन॑सो॒ जवी॑या॒न्रथः॒ स्वश्वो॒ विश॑ आ॒जिगा॑ति ॥
येन॒ गच्छ॑थः सु॒कृतो॑ दुरो॒णं तेन॑ नरा व॒र्तिर॒स्मभ्यं॑ यातम् ॥ २ ॥

यः वा अश्विना मनसः जवीयान् रथः सुऽअश्वः विश आऽजिगाति ॥
येन गच्छथः सुकृतः दुरोणं तेन नरा वर्तिः अस्मभ्यं यातम् ॥ २ ॥

हे अश्विनहो, मनापेक्षांही चपळ असा तुमचा रथ सुंदर अश्वांनी युक्त होऊन सर्व लोकांचेकडे येत आहे. ज्या रथांत बसून तुम्ही सदाचारी पुरुषांच्या गृहांकडे जात असता त्यांत विराजमान होऊन, हे शूरहो, आमचेसाठी आमच्या गृहाकडे या. ॥ २ ॥


ऋषिं॑ नरा॒वंह॑सः॒ पाञ्च॑जन्यमृ॒बीसा॒दत्रिं॑ मुञ्चथो ग॒णेन॑ ॥
मि॒नन्ता॒ दस्यो॒रशि॑वस्य मा॒या अ॑नुपू॒र्वं वृ॑षणा चो॒दय॑न्ता ॥ ३ ॥

ऋषिं नराउ अंहसः पाञ्चजन्यं ऋबीसात् अत्रिं मुञ्चथः गणेन ॥
मिनंता दस्योः अशिवस्य मायाः अनुऽपूर्वं वृषणा चोदयंता ॥ ३ ॥

हे सामर्थ्यवान वीरहो, पहिल्याप्रमाणें आमची उत्कर्षाकडॆ प्रेरणा करून आणि त्या अभद्र दानवाच्या सर्व युक्त्यांची मोड करून तुम्ही त्या पांचही प्रकारच्या लोकांस प्रिय अशा अत्रि ऋषीस, त्याच्या सर्व माणसांसहवर्तमान, अतिशय भयंकर गुहेमधून बाहेर काढले. ॥ ३ ॥


अश्वं॒ न गू॒ळ्हम॑श्विना दु॒रेवै॒रृषिं॑ नरा वृषणा रे॒भम॒प्सु ॥
सं तं रि॑णीथो॒ विप्रु॑तं॒ दंसो॑भि॒र्न वां॑ जूर्यन्ति पू॒र्व्या कृ॒तानि॑ ॥ ४ ॥

अश्वं न गूळ्हं अश्विना दुःऽएवैः ऋषिं नरा वृषणा रेभं अप्ऽसु ॥
सं तं रिणीथः विऽप्रुतं दंसःऽभिः न वा जूर्यंति पूर्व्या कृतानि ॥ ४ ॥

रेभ ऋषि पाण्यांत बुडून जाऊन, दुष्ट लोकांच्या कृतिमुळे, एखाद्या घोड्याप्रमाणें जलांत अदृश्य होऊन गेला होता. तरी पण, हे समर्थ्यवान वीरांनो, तुम्ही अद्‍भुत कृति करून त्याचा बचाव केला. तुमची कृत्यें कितीही पुरातन असलीं तरी तीं कधींही जुनीं होत नाहींत. ॥ ४ ॥


सु॒षु॒प्वांसं॒ न निर्‌ऋ॑तेरु॒पस्थे॒ सूर्यं॒ न द॑स्रा॒ तम॑सि क्षि॒यन्त॑म् ॥
शु॒भे रु॒क्मं न द॑र्श॒तं निखा॑त॒मुदू॑पथुरश्विना॒ वन्द॑नाय ॥ ५ ॥

सुसुप्वासं न निःऽऋतेः उपऽस्थे सूर्यं न दस्रा तमसि क्षियंतम् ॥
शुभे रुक्मं न दर्शतं निऽखातं उत् ऊपथुः अश्विना वंदनाय ॥ ५ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे अश्विनी देवांनो, विनाशाच्या जणूं पायथ्याशी लोंबत पडलेला व तसेंच सूर्याप्रमाणें अंधकारांत असलेला सुंदर द्रव्यसंचय, सुवर्ण ज्याप्रमाणें उकरून बाहेर काढतात त्याप्रमाणे, वंदनाच्या कल्याणार्थ तुम्ही बाहेर काढला. ॥ ५ ॥


तद्वां॑ नरा॒ शंस्यं॑ पज्रि॒येण॑ क॒क्षीव॑ता नासत्या॒ परि॑ज्मन् ॥
श॒फादश्व॑स्य वा॒जिनो॒ जना॑य श॒तं कु॒म्भाँ अ॑सिञ्चतं॒ मधू॑नाम् ॥ ६ ॥

तत् वां नरा शंस्यं पज्रियेण कक्षीवता नासत्या परिऽज्मन् ॥
शफात् अश्वस्य वाजिनः जनाय शतं कुंभान् असिञ्चतं मधूनाम् ॥ ६ ॥

हे शूर व सत्यस्वरूप देवांनो, पज्रकुळांत जन्मलेल्या कक्षीवानाकडून स्तुति व्हावी असेंच तें तुमचे कृत्य होते. कारण परिभ्रमण करीत असतां तुम्हीं एका सामर्थ्यवान अश्वाच्या खुरापासून लोकांचे हिताकरितां मधुर रसाचे शंभर घट उत्पन्न केले. ॥ ६ ॥


यु॒वं न॑रा स्तुव॒ते कृ॑ष्णि॒याय॑ विष्णा॒प्वं ददथु॒र्विश्व॑काय ॥
घोषा॑यै चित्पितृ॒षदे॑ दुरो॒णे पतिं॒ जूर्य॑न्त्या अश्विनावदत्तम् ॥ ७ ॥

युवं नरा स्तुवते कृष्णियाय विष्णाप्वं ददथुः विश्वकाय ॥
घोषायै चित् पितृऽसदे दुरोणे पतिं जूर्यंत्यै अश्विनौ अदत्तम् ॥ ७ ॥

हे वीरांनो, कृष्णवंशोत्पन्न विश्वकानें तुमचे स्तवन केले म्हणून तुम्ही त्यास त्याचा पुत्र विष्णापू शोधून दिला आणि पित्याच्या घरी राहून राहून वृद्ध होत चाललेल्या घोषेलाही तुम्ही पति पाहून दिला. ॥ ७ ॥


यु॒वं श्यावा॑य॒ रुश॑तीमदत्तं म॒हः क्षो॒णस्या॑श्विना॒ कण्वा॑य ॥
प्र॒वाच्यं॒ तद्वृ॑षणा कृ॒तं वां॒ यन्ना॑र्ष॒दाय॒ श्रवो॑ अ॒ध्यध॑त्तम् ॥ ८ ॥

युवं श्यावाय रुशतीं अदत्तं महः क्षोणस्य अश्विना कण्वाय ॥
प्रऽवाच्यं तत् वृषणा कृतं वा यत् नार्सदाय श्रवः अधिऽअधत्तम् ॥ ८ ॥

हे अश्विनहो, तुम्ही श्यावाला रुशती नांवाची भार्या दिली आणि कण्वास गृहसौख्य अर्पण केले. हे सामर्थ्यवान देवांनो, तें तुमचे कृत्य खरोखर वर्णन करण्याजोगें आहे कीं तुम्ही नृषदाच्या पुत्रास कान दिले. ॥ ८ ॥


पु॒रू वर्पां॑स्यश्विना॒ दधा॑ना॒ नि पे॒दव॑ ऊहथुरा॒शुमश्व॑म् ॥
स॒ह॒स्र॒सां वा॒जिन॒मप्र॑तीतमहि॒हनं॑ श्रव॒स्यं१॑तरु॑त्रम् ॥ ९ ॥

पुरू वर्पांसि अश्विना दधाना नि पेदव ऊहथुः आशुं अश्वम् ॥
सहस्रऽसां वाजिनं अप्रतिऽइतं अहिऽहनं श्रवस्यं तरुत्रम् ॥ ९ ॥

अनेक प्रकारची रूपें धारण करणार्‍या हे अश्विनहो, तुम्हीं पेदूकरितां असा अश्व आणला कीं जो सहस्रावधि वैभवें जिंकून आणण्याजोगा होता, ज्याचें सामर्थ्य मोठें होते, ज्याला कोठेंही जोड मिळण्याजोगी नव्हती, जो सर्पाचा वध करणारा होता, ज्याची कीर्ति फार पसरली होती आणि जो संकटांतून बचाव करण्याजोगा होता. ॥ ९ ॥


ए॒तानि॑ वां श्रव॒स्या सुदानू॒ ब्रह्मा॑ङ्गू॒वषं सद॑नं॒ रोद॑स्योः ॥
यद्वां॑ प॒ज्रासो॑ अश्विना॒ हव॑न्ते या॒तमि॒षा च॑ वि॒दुषे॑ च॒ वाज॑म् ॥ १० ॥

एतानि वां श्रवस्या सुदानू ब्रह्म आङ्गूसषं सदनं रोदस्योः ॥
यत् वा पज्रासः अश्विना हवंते यातं इषा च विदुषे च वाजम् ॥ १० ॥

हे अत्यंत उदार देवांनो, हेच तुमचे कीर्तिमान पराक्रम होत. द्युलोकांत अथवा भूलोकांत स्तुतिस्तोत्रें हेंच तुमचे निवासस्थान असतें. हे अश्विनहो, ज्या अर्थीं पज्र हे तुमचा धांवा करीत आहेत त्या अर्थीं विपुल अन्नसामग्री घेऊन इकडे या व ह्या विद्वान स्तुतिकर्त्याला सामर्थ्य अर्पण करा. ॥ १० ॥


सू॒नोर्माने॑नाश्विना गृणा॒ना वाजं॒ विप्रा॑य भुरणा॒ रद॑न्ता ॥
अ॒गस्त्ये॒ ब्रह्म॑णा वावृधा॒ना सं वि॒श्पलां॑ नासत्यारिणीतम् ॥ ११ ॥

सूनोः मानेन अश्विना गृणाना वाजं विप्राय भुरणा रदंता ॥
अगस्त्ये ब्रह्मणा ववृधाना सं विश्पलां नासत्या अरिणीतम् ॥ ११ ॥

सर्व विश्वाचे पोषण करणार्‍या व सत्यस्वरूप अशा हे अश्विनी देवांनो, जेव्हां मानानें तुमची पुत्रप्राप्त्यर्थ स्तुति केली त्यावेळी त्या विद्वान उपासकास सामर्थ्य अर्पण करून तुम्ही अगस्त्यानें केलेल्या स्तोत्रांत संतोष मानीत विश्पलेला तिच्या व्यथेपासून बरी केली. ॥ ११ ॥


कुह॒ यान्ता॑ सुष्टु॒तिं का॒व्यस्य॒ दिवो॑ नपाता वृषणा शयु॒त्रा ॥
हिर॑ण्यस्येव क॒लशं॒ निखा॑त॒मुदू॑पथुर्दश॒मे अ॑श्वि॒नाह॑न् ॥ १२ ॥

कुह यांता सुऽस्तुतिं काव्यस्य दिवः नपाता वृषणा शयुऽत्रा ॥
हिरण्यस्यऽइव कलशं निऽखातं उत् ऊपथुऽ दशमे अश्विना अहन् ॥ १२ ॥

हे अश्विनहो, हे सामर्थ्यवान द्युलोक पुत्रांनो, शयूचें संरक्षण करणारे असे तुम्ही काव्याची सुंदर स्तुति ग्रहण करण्याकरितां त्यावेळी कोठें निभाला होता कीं ज्यावेळी, जसा एखादा सोन्याचा हांडा उकरून बाहेर काढावा त्याप्रमाणें गुप्त ठेवलेला भांडार, तुम्ही दहाव्या दिवशी बाहेर काडलें ? ॥ १२ ॥


यु॒वं च्यवा॑नमश्विना॒ जर॑न्तं॒ पुन॒र्युवा॑नं चक्रथुः॒ शची॑भिः ॥
यु॒वो रथं॑ दुहि॒ता सूर्य॑स्य स॒ह श्रि॒या ना॑सत्यावृणीत ॥ १३ ॥

युवं च्यवानं अश्विना जरंतं पुनः युवानं चक्रथुः शचीभिः ॥
युवोः रथं दुहिता सूर्यस्य सह श्रिया नासत्या अवृणीत ॥ १३ ॥

हे अश्विनहो, वृद्धावस्था येत चाललेया च्यवनास तुम्ही आपल्या सामर्थ्यानें पुन्हां तरुण केलें. हे सत्यस्वरूप देवांनो, सूर्याच्या कन्येनेंही आपल्या सर्व वैभवासह आरूढ होण्यासाठी तुमच्याच रथाची निवड केली. ॥ १३ ॥


यु॒वं तुग्रा॑य पू॒र्व्येभि॒रेवैः॑ पुनर्म॒न्याव॑भवतं युवाना ॥
यु॒वं भु॒ज्युमर्ण॑सो॒ निः स॑मु॒द्राद्विभि॑रूहथुरृ॒ज्रेभि॒रश्वैः॑ ॥ १४ ॥

युवं तुग्राय पूर्व्येभिः एवैः पुनः मन्यौ अभवतं युवाना ॥
युवं भुज्युं अर्णसः निः समुद्रात् विऽभिः ऊहथुः ऋज्रेभिः अश्वैः ॥ १४ ॥

हे तारुण्ययुक्त देवांनो, आपल्या प्राचीन पद्धतीस अनुसरून तुम्हांस तुग्रासंबंधानें पुन्हा कळवळा आला. तुम्ही भुज्यूला, आपल्या पक्ष्यांप्रमाणे दिसणार्‍या चपल अश्वांचे साहाय्यानें, मोठमोठ्या लाटा चालत असतांही समुद्रांतून बाहेर काढले. ॥ १४ ॥


अजो॑हवीदश्विना तौ॒ग्र्यो वां॒ प्रोळ्हः॑ समु॒द्रम॑व्य॒थिर्ज॑ग॒न्वान् ॥
निष्टमू॑हथुः सु॒युजा॒ रथे॑न॒ मनो॑जवसा वृषणा स्व॒स्ति ॥ १५ ॥

अजोहवीत् अश्विना तौग्र्यः वा प्रऽऊळ्हः समुद्रं अव्यथिः जगन्वान् ॥
निः तं ऊहथुः सुऽयुजा रथेन मनःऽजवसा वृषणा स्वस्ति ॥ १५ ॥

हे अश्विनहो, तुग्राच्या पुत्रानें तुमचे पूजन केले. त्यास समुद्रावर कामगिरीवर पाठविले असतां तो बिलकुल न घाबरतां गेला. हे सामर्थ्यवान देवांनो, उत्तम रीतीनें सिद्ध केलेल्या व मनाप्रमाणें वेगवान असलेल्या अशा आपल्या रथांत घालून तुम्ही त्यास सुखरूप बाहेर काढले. ॥ १५ ॥


अजो॑हवीदश्विना॒ वर्ति॑का वामा॒स्नो यत्सी॒ममु॑ञ्चतं॒ वृक॑स्य ॥
वि ज॒युषा॑ ययथुः॒ सान्वद्रे॑र्जा॒तं वि॒ष्वाचो॑ अहतं वि॒षेण॑ ॥ १६ ॥

अजोहवीत् अश्विना वर्तिका वां आस्नः यत् सीं अमुञ्चतं वृकस्य ॥
वि जयुषा ययथुः सानु अद्रेः जातं विष्वाचः अहतं विषेण ॥ १६ ॥

हे अश्विनहो, ज्या वेळी तुम्ही लावी पक्षिणीस लांडग्याच्या मुखांतून सोडविली त्या वेळी तिने तुमचे पूजन केले. तुम्ही आपल्या विजयी रथांत बसून पर्वताच्या शिखराचा भेद करून गेलां आणि विष्णापूच्या पुत्रास विष घालून मारून टाकले. ॥ १६ ॥


श॒तं मे॒षान्वृ॒क्ये मामहा॒नं तमः॒ प्रणी॑त॒मशि॑वेन पि॒त्रा ॥
आक्षी ऋ॒ज्राश्वे॑ अश्विनावधत्तं॒ ज्योति॑र॒न्धाय॑ चक्रथुर्वि॒चक्षे॑ ॥ १७ ॥

शतं मेषान् वृक्ये ममहानं तमः प्रऽनीतं अशिवेन पित्रा ॥
आ अक्षी इति ऋज्रऽअश्वे अश्विनौ अधत्तं ज्योतिः अंधाय चक्रथुः विऽचक्षे ॥ १७ ॥

ऋज्राश्वानें लांडगीला खाऊं घालण्यासाठी तिला शंभर मेंढे आणून दिल्यामुळें त्याच्या दुष्ट बापानें त्यास आंधळे केले असतां तुम्ही त्यावर अनुग्रह करून त्यास डोळे दिले आणि त्या बिचार्‍यास दृष्टि यावी म्हणून त्याच्या नेत्रांत तुम्ही प्रकाश उत्पन्न केला. ॥ १७ ॥


शु॒नम॒न्धाय॒ भर॑मह्वय॒त्सा वृ॒कीर॑श्विना वृषणा॒ नरेति॑ ॥
जा॒रः क॒नीन॑ इव चक्षदा॒न ऋ॒ज्राश्वः॑ श॒तमेकं॑ च मे॒षान् ॥ १८ ॥

शुनं अंधाय भरं अह्वयत् सा वृकीः अश्विना वृषणा नरा इति ॥
जारः कनीनःऽइव चक्षदानः ऋज्रऽअश्वः शतं एकं च मेषान् ॥ १८ ॥

त्या लांडग्यानें त्या अंध ऋज्राश्वासाठी अतिशय कळवळ्याने प्रार्थना केली - " हे अश्विनहो, हे सामर्थ्यवान देवांनो, हे वीरहो, ऋज्राश्वानें माझेकरितां, एखाद्या तारुण्याच्या ऐन भरांत आलेल्या वल्लभाप्रमाणें, एकशे एक मेंढे मला कापून खावयास घातले". ॥ १८ ॥


म॒ही वा॑मू॒तिर॑श्विना मयो॒भूरु॒त स्रा॒मं धि॑ष्ण्या॒ सं रि॑णीथः ॥
अथा॑ यु॒वामिद॑ह्वय॒त्पुरं॑धि॒राग॑च्छतं सीं वृषणा॒ववो॑भिः ॥ १९ ॥

मही वां ऊतिः अश्विना मयःऽभूः उत स्रामं धिष्ण्या सं रिणीथः ॥
अथ युवां इत् अह्वयत् पुरंऽधिः आ अगच्छतं सीं वृषणौ अवःऽभिः ॥ १९ ॥

हे अश्विनहो, भक्तजन संरक्षक असें तुमचें सामर्थ्य विशाल व सौख्यप्रद आहे. हे धैर्यशाली देवांनो, तुम्ही पंगू मनुष्याससुद्धां पुन्हां बरे करतां; ह्याच कारणाकरितां पुरंदीनें सुद्धां तुम्हालाच आमंत्रण केले. हे शूरांनो, तुम्ही आपल्या सामर्थ्यासह तिचे रक्षणार्थ तिकडे गेलां. ॥ १९ ॥


अधे॑नुं दस्रा स्त॒र्यं१॑विष॑क्ता॒मपि॑न्वतं श॒यवे॑ अश्विना॒ गाम् ॥
यु॒वं शची॑भिर्विम॒दाय॑ जा॒यां न्यूहथुः पुरुमि॒त्रस्य॒ योषा॑म् ॥ २० ॥

अधेनुं दस्रा स्तर्यं विऽसक्तां अपिन्वतं शयवे अश्विना गाम् ॥
युवं शचीभिः विऽमदाय जाया नि ऊहथुः पुरुऽमित्रस्य योषाम् ॥ २० ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे अश्विनी देवांनो, तुम्ही शयूकरितां, कधी दूध न देणार्‍या, कधीं न विणार्‍या व अतिशय कृश झालेल्या गाईचें अंगी भरपूर दूध आणले. तुम्ही आपल्या सामर्थ्यानें पुरुमित्राची कन्या विमदास बायको करून दिली. ॥ २० ॥


यवं॒ वृके॑णाश्विना॒ वप॒न्तेषं॑ दु॒हन्ता॒ मनु॑षाय दस्रा ॥
अ॒भि दस्युं॒ बकु॑रेणा॒ धम॑न्तो॒रु ज्योति॑श्चक्रथु॒रार्या॑य ॥ २१ ॥

यवं वृकेण अश्विना वपंता इषं दुहंता मनुषाय दस्रा ॥
अभि दस्युं बकुरेण धमंता उरु ज्योतिः चक्रथुः आर्याय ॥ २१ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे अश्विनहो, नांगराच्या योगानें धान्य पेरीत, मानवांकरितां अन्नसामग्री निर्माण करीत, आणि आपल्या वज्राच्या योगानें दुष्टांचे निर्दालन करीत, तुम्ही भक्तिमान लोकांकरितां विपुल प्रकाश उत्पन्न केला. ॥ २१ ॥


आ॒थ॒र्व॒णाया॑श्विना दधी॒चेऽ॑श्व्यं॒ शिरः॒ प्रत्यै॑रयतम् ॥
स वां॒ मधु॒ प्र वो॑चदृता॒यन्त्वा॒ष्ट्रं यद्द॑स्रावपिक॒क्ष्यं वाम् ॥ २२ ॥

आथर्वणाय अश्विना दधीचे अश्व्यं शिरः प्रति ऐरयतम् ॥
सः वां मधु प्र वोचत् ऋतऽयन् त्वाष्ट्रं यत् दस्रौ अपिऽकक्ष्यं वाम् ॥ २२ ॥

हे अश्विनहो, अथर्वाचा पुत्र जो दध्यङ् त्यास तुम्ही अश्वाचें शिर लावलें. नंतर त्या सत्य वर्तनाच्या पुरुषानें तुम्हांस असें एक मधुर गुह्य सांगितले की जे केवल त्वष्टादेवास विदित होते व जे तुम्हांस मोठें रहस्य असें वाटलें. ॥ २२ ॥


सदा॑ कवी सुम॒तिमा च॑के वां॒ विश्वा॒ धियो॑ अश्विना॒ प्राव॑तम् मे ॥
अ॒स्मे र॒यिं ना॑सत्या बृ॒हन्त॑मपत्य॒साचं॒ श्रुत्यं॑ रराथाम् ॥ २३ ॥

सदा कवी इति सुऽमतिं आ चके वा विश्वाः धियः अश्विना प्र अवतं मे ॥
अस्मे इति रयिं नासत्या बृहंतं अपत्यऽसाचं श्रुत्यं रराथाम् ॥ २३ ॥

हे विज्ञानशाली देवांनो, तुमच्या कृपेचीच मी नेहमी याचना करतो. हे अश्विनहो, माझ्या सर्व स्तुतींचे प्रेमानें ग्रहण करा. हे सत्यस्वरूप देवांनो, आम्हांस अपत्यसहित व कीर्तियुक्त असे विपुल वैभव अर्पण करा. ॥ २३ ॥


हिर॑ण्यहस्तमश्विना॒ ररा॑णा पु॒त्रं न॑रा वध्रिम॒त्या अ॑दत्तम् ॥
त्रिधा॑ ह॒ श्याव॑मश्विना॒ विक॑स्त॒मुज्जी॒वस॑ ऐरयतं सुदानू ॥ २४ ॥

हिरण्यऽहस्तं अश्विना रराणा पुत्रं नरा वध्रिऽमत्याः अदत्तम् ॥
त्रिधा ह श्यावं अश्विना विऽकस्तं उत् जीवसे ऐरयतं सुदानू इति सुऽदानू ॥ २४ ॥

हे उदार व शूर अश्विनहो, तुम्ही वध्रिमतीला हिरण्यहस्त नांवाचा पुत्र दिला. हे अत्यन्त दातृत्वशील अश्विनी देवांनो, श्यावाचें शरीर तीन ठिकाणी विच्छिन्न झालें असतां तुम्ही त्यास पुन्हां चैतन्य दशेकडे घेऊन गेला. ॥ २४ ॥


ए॒तानि॑ वामश्विना वी॒र्याणि॒ प्र पू॒र्व्याण्या॒यवो॑ऽवोचन् ॥
ब्रह्म॑ कृ॒ण्वन्तो॑ वृषणा यु॒वभ्यां॑ सु॒वीरा॑सो वि॒दथ॒मा व॑देम ॥ २५ ॥

एतानि वां अश्विना वीर्याणि प्र पूर्व्याणि आयवः अवोचन् ॥
ब्रह्म कृण्वंतः वृषणा युवऽभ्यां सुऽवीरासः विदथं आ वदेम ॥ २५ ॥

हे अश्विनहो, ही तुमची पुरातन महत्कृत्यें अनेक मनुष्यांनी वर्णन केलेलीं आहेत. हे सामर्थ्यवान देवांनो, तुमचें स्तोत्र गात आम्ही आपल्या कुलांतील वीर पुरुषांसह आमच्या यज्ञाची कीर्ति वाढवूं. ॥ २५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११८ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : अश्विनी कुमार - छंद - त्रिष्टुभ्


आ वां॒ रथो॑ अश्विना श्ये॒नप॑त्वा सुमृळी॒कः स्ववाँ॑ यात्व॒र्वाङ्‍ ॥
यो मर्त्य॑स्य॒ मन॑सो॒ जवी॑यान्त्रिवन्धु॒रो वृ॑षणा॒ वात॑रंहाः ॥ १ ॥

आ वा रथः अश्विना श्येनऽपत्वा सुऽमृळीकः स्वऽवान् यातु अर्वाङ्‍ ॥
यः मर्त्यस्य मनसः जवीयान् त्रिऽवंधुरः वृषणा वातऽरंहाः ॥ १ ॥

हे बलशाली अश्विनहो, जो मानवांच्या मनापेक्षांही चपल आहे, ज्यास तीन वन्धुरा आहेत, व ज्याचा वेग वार्‍याप्रमाणें आहे असा तुमचा स्वकीय तेजानें शोभणारा व सुखावह रथ, त्यास जोडलेल्या शेनपक्ष्यांच्या योगानें उड्डाण करीत इकडे येवो. ॥ १ ॥


त्रि॒व॒न्धु॒रेण॑ त्रि॒वृता॒ रथे॑न त्रिच॒क्रेण॑ सु॒वृता या॑तम॒र्वाक् ॥
पिन्व॑तं॒ गा जिन्व॑त॒मर्व॑तो नो व॒र्धय॑तमश्विना वी॒रम॒स्मे ॥ २ ॥

त्रिऽवंधुरेण त्रिऽवृता रथेन त्रिऽचक्रेण सुऽवृता आ यातं अर्वाक् ॥
पिन्वतं गाः जिन्वतं अर्वतः नः वर्धयतं अश्विना वीरं अस्मे इति ॥ २ ॥

हे अश्विनहो, तीन वन्धुरांनी युक्त, त्रिकोणाकृति, व तीन चाकें असलेल्या अशा आपल्या सुंदर रथांत बसून इकडे या. आमच्या गाईंच्या अंगी भरपूर दूध उत्पन्न करा आणि आमच्या अश्वांस चपलता आणा. आमच्याकरितां आमच्या कुलांतील वीर पुरुषांची भरभराट करा. ॥ २ ॥


प्र॒वद्या॑मना सु॒वृता॒ रथे॑न॒ दस्रा॑वि॒मं शृ॑णुतं॒ श्लोक॒मद्रेः॑ ॥
किम॒ङ्गं वां॒ प्रत्यव॑र्तिं॒ गमि॑ष्ठा॒हुर्विप्रा॑सो अश्विना पुरा॒जाः ॥ ३ ॥

प्रवत्ऽयामना सुऽवृता रथेन दस्रौ इमं शृणुतं श्लोकं अद्रेः ॥
किं अङ्गग वां प्रति अवर्तिं गमिष्ठा आहुः विप्रासः अश्विना पुराऽजाः ॥ ३ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे देवांनो, आपल्या सरल गतीच्या सुंदर रथांत आरूढ होऊन सोमपाषाणाचा हा सुंदर ध्वनि श्रवण करा. हे अश्विनहो, प्राचीन विद्वान लोक आपणांस " क्लेशहरणार्थ सत्वर गमन करणारे " असे कां म्हणत होते बरें ? ॥ ३ ॥


आ वां॑ श्ये॒नासो॑ अश्विना वहन्तु॒ रथे॑ यु॒क्तास॑ आ॒शवः॑ पतं॒गाः ॥
ये अ॒प्तुरो॑ दि॒व्यासो॒ न गृध्रा॑ अ॒भि प्रयो॑ नासत्या॒ वह॑न्ति ॥ ४ ॥

आ वां श्येनासः अश्विना वहंतु रथे युक्तासः आशवः पतंगाः ॥
ये अप्ऽतुरः दिव्यासः न गृध्राः अभि प्रयः नासत्या वहंति ॥ ४ ॥

हे अश्विनहो, तुमच्या रथास जोडलेले, व उड्डाण करण्यांत प्रवीण असलेले असे तुमचे चपल श्येनपक्षी तुम्हांस इकडे घेऊन येवोत. हे सत्यस्वरूप देवांनो, द्युलोकांतील गृध्रांप्रमाणे ते आमचे परिपालन करणारे आहेत आणि आमचेसाठी ते आमच्या उपजीविकेची सामग्री घेऊन येत असतात. ॥ ४ ॥


आ वां॒ रथं॑ युव॒तिस्ति॑ष्ठ॒दत्र॑ जु॒ष्ट्वी न॑रा दुहि॒ता सूर्य॑स्य ॥
परि॑ वा॒मश्वा॒ वपु॑षः पतं॒गा वयो॑ वहन्त्वरु॒षा अ॒भीके॑ ॥ ५ ॥

आ वां रथं युवतिः तिष्ठत् अत्र जुष्ट्वी नरा दुहिता सूर्यस्य ॥
परि वां अश्वाः वपुषः पतंगाः वयः वहंतु अरुषाः अभीके ॥ ५ ॥

हे शूरहो, ती प्रेमळ युवति - सूर्याची कन्या - येथें तुमच्या रथावर आरूढ होत आहे. तुमचे सुंदर अश्व - तुमचे ते उड्डाण करणारे देदीप्यमान पक्षी - तुम्हास इकडे घेऊन येवोत. ॥ ५ ॥


उद्वन्द॑नमैरतं दं॒सना॑भि॒रुद्रे॒भं द॑स्रा वृषणा॒ शची॑भिः ॥
निष्टौ॒ग्र्यं पा॑रयथः समु॒द्रात्पुन॒श्च्यवा॑नं चक्रथु॒र्युवा॑नम् ॥ ६ ॥

उत् वंदनं ऐरतं दंसनाभिः उत् रेभं दस्रा वृषणा शचीभिः ॥
निः तौग्र्यं पारयथः समुद्रात् पुनरिति च्यवानं चक्रथुः युवानम् ॥ ६ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे सामर्थ्यवान देवांनो, तुम्ही आपल्या अद्‍भुत कृतींनी वंदनास वर आणले व आपल्या सामर्थ्यानें रेभासही वरती उचलून घेतलें. तुम्ही तुग्राच्या पुत्रास समुद्रांतून पलीकडे घेऊन गेलां व च्यवनास फिरून तरुण केलें. ॥ ६ ॥


यु॒वमत्र॒येऽ॑वनीताय त॒प्तमूर्ज॑मो॒मान॑मश्विनावधत्तम् ॥
यु॒वं कण्वा॒यापि॑रिप्ताय॒ चक्षुः॒ प्रत्य॑धत्तं सुष्टु॒तिं जु॑जुषा॒णा ॥ ७ ॥

युवं अत्रये अवऽनीताय तप्तं ऊर्जं ओमानं अश्विनौ अधत्तम् ॥
युवं कण्वाय अपिऽरिप्ताय चक्षुः प्रति अधत्तं सुऽस्तुतिं जुजुषाणा ॥ ७ ॥

हे अश्विनहो, खाली तप्त स्थली नेलेल्या अत्रीस तुम्ही सामर्थ्य व साह्य अर्पण केलें. आंधळा बनलेल्या अत्रीची सुंदर स्तुति ग्रहण करून तुम्ही त्यास डोळे दिले. ॥ ७ ॥


यु॒वं धे॒नुं श॒यवे॑ नाधि॒तायापि॑न्वतमश्विना पू॒र्व्याय॑ ॥
अमु॑ञ्चतं॒ वर्ति॑का॒मंह॑सो॒ निः प्रति॒ जङ्घां॑र वि॒श्पला॑या अधत्तम् ॥ ८ ॥

युवं धेनुं शयवे नाधिताय अपिन्वतं अश्विना पूर्व्याय ॥
अमुंचतं वर्तिकां अंहसः निः प्रति जङ्घांध विश्पलायाः अधत्तम् ॥ ८ ॥

हे अश्विनहो, त्या पूर्वकालीन शयूनें तुमची प्रार्थना केल्याबरोबर तुम्ही त्याच्या धेनूचे अंगी भरपूर दूध आणले. तुम्ही लावी पक्षिणीस संकटांतून सोडविले आणि विश्पलेला पुन्हां पाय बसविला. ॥ ८ ॥


यु॒वं श्वे॒तं पे॒दव॒ इंद्र॑जूतमहि॒हन॑मश्विनादत्त॒मश्व॑म् ॥
जो॒हूत्र॑म॒र्यो अ॒भिभू॑तिमु॒ग्रं स॑हस्र॒सां वृष॑णं वी॒ड्वङ्गाम् ॥ ९ ॥

युवं श्वेतं पेदवे इंद्रऽजूतं अहिऽहनं अश्विना अदत्तं अश्वम् ॥
जोहूत्रं अर्यः अभिऽभूतिं उग्रं सहस्रऽसां वृषणं वीळुऽअङ्गिम् ॥ ९ ॥

हे अश्विनहो, तुम्ही पेदूला एक अश्व दिला कीं ज्याचा रंग पांढरा होता, ज्यास इंद्र हांकीत असे, जो सर्पाचा वध करण्यास समर्थ होता, सदाचारी लोक दृष्टीस पडतांच जो शत्रूंचा पराभव करणारा होता, जो उग्र दिसत असे, जो हजारों प्रकारची संपत्ति जिंकून आणीत असे, जो सामर्थ्यवान होता व ज्याचें शरीरबळ फार फार मोठें होते. ॥ ९ ॥


ता वां॑ नरा॒ स्वव॑से सुजा॒ता हवा॑महे अश्विना॒ नाध॑मानाः ॥
आ न॒ उप॒ वसु॑मता॒ रथे॑न॒ गिरो॑ जुषा॒णा सु॑वि॒ताय॑ यातम् ॥ १० ॥

ता वां नरा सु अवसे सुऽजाता हवामहे अश्विना नाधमानाः ॥
आ नः उप वसुऽमता रथेन गिरः जुषाणा सुविताय यातम् ॥ १० ॥

उच्च वंशात जन्म घेणार्‍या हे शूर अश्विनहो, तुमची प्रार्थना करून आम्ही तुम्हांस आमचे संरक्षणार्थ बोलावीत आहोंत. आमच्या स्तोत्रांचा स्वीकार करून व आपल्या संपत्तीनें भरलेल्या रथांत विराजमान होऊन आमचे कल्याणार्थ तुम्ही इकडे या. ॥ १० ॥


आ श्ये॒नस्य॒ जव॑सा॒ नूत॑नेना॒स्मे या॑तं नासत्या स॒जोषाः॑ ॥
हवे॒ हि वा॑मश्विना रा॒तह॑व्यः शश्वत्त॒माया॑ उ॒षसो॒ व्युष्टौ ॥ ११ ॥

आ श्येनस्य जवसा नूतनेन अस्मे इति यातं नासत्या सऽजोषाः ॥
हवे हि वा अश्विना रातऽहव्यः शश्वत्ऽतमायाः उषसः विऽउष्टौ ॥ ११ ॥

हे सत्यस्वरूप देवहो, आपल्या श्येनास नूतन वेग देऊन तुम्ही दोघे एक विचारानें इकडे या. हे अश्विनहो, ह्या सनातन उषेचा प्रकाश दिसूं लागल्या बरोबर मी तुम्हांस हवि अर्पण करून तुमचें पूजन करतो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११९ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : अश्विनी कुमार - छंद - जगती


आ वां॒ रथं॑ पुरुमा॒यं म॑नो॒जुवं॑ जी॒राश्वं॑ य॒ज्ञियं॑ जी॒वसे॑ हुवे ॥
स॒हस्र॑केतुं व॒निनं॑ श॒तद्व॑सुं श्रुष्टी॒वानं॑ वरिवो॒धाम॒भि प्रयः॑ ॥ १ ॥

आ वां रथं पुरुऽमायं मनःऽजुवं जीरऽअश्वं यज्ञियं जीवसे हुवे ॥
सहस्रऽकेतुं वनिनं शतत्ऽवसुं श्रुष्टीऽवानं वरिवःऽधां अभि प्रयः ॥ १ ॥

आमचे आयुष्य वाढावे म्हणून ह्या हवीकडे मी तुमच्या रथास पाचारण करतो. ह्या रथावर नाना प्रकारच्या योजना केलेल्या आहेत, त्याचा वेग मनाएवढा आहे, त्याचे अश्व चपल आहेत, तो यजनार्ह आहे, त्याच्यावर हजारों निशाणें फडकत आहेत, तो उत्तम लांकडाचा केलेला आहे, त्याच्यावर शेंकडो प्रकारचें धन भरलेले आहे, त्याची प्रसिद्धि सर्वत्र झालेली आहे व त्याचेपासून भक्तांचे उत्तम रीतीने संरक्षण होतें. ॥ १ ॥


ऊ॒र्ध्वा धी॒तिः प्रत्य॑स्य॒ प्रया॑म॒न्यधा॑यि॒ शस्म॒न्सम॑यन्त॒ आ दिशः॑ ॥
स्वदा॑मि घ॒र्मं प्रति॑ यन्त्यू॒तय॒ आ वा॑मू॒र्जानी॒ रथ॑मश्विनारुहत् ॥ २ ॥

ऊर्ध्वा धीतिः प्रति अस्य प्रऽयामनि अधायि शस्मन् सं अयंते आ दिशः ॥
स्वदामि घर्मं प्रति यंति ऊतयः आ वां ऊर्जानी रथं अश्विना अरुहत् ॥ २ ॥

हा तुमचा रथ चालू लागल्याबरोबर माझी मति खडबडून जागी झाली, एवढेंच काय पण तुमचें स्तवन करण्याकरितां जणूं कांही दाही दिशा एकत्र झाल्या आहेत. माझा ऊनऊन हवीही मी जितका होईल तितका मधुर करीत आहे. भक्तजन संरक्षक अशी तुमचीं सामर्थ्यें माझेकडे येऊं लागली आहेत, व हे अश्विनहो, ऊर्जानी तुमच्या रथावर आरूढ झालेली आहे. ॥ २ ॥


सं यन्मि॒थः प॑स्पृधा॒नासो॒ अग्म॑त शु॒भे म॒खा अमि॑ता जा॒यवो॒ रणे॑ ॥
यु॒वोरह॑ प्रव॒णे चे॑किते॒ रथो॒ यद॑श्विना॒ वह॑थः सू॒रिम् आवर॑म् ॥ ३ ॥

सं यत् मिथः पस्पृधानासः अग्मत शुभे मखाः अमिताः जायवः रणे ॥
युवोः अह प्रवणे चेकिते रथः यत् अश्विना वहथः सूरिं आ वरम् ॥ ३ ॥

ज्या वेळी विजयेच्छु असे अगणित महान योद्धे आपणांस जयश्री प्राप्त व्हावी म्हणून ईर्ष्येनें एकमेकांशी रणांगणांत भिडलेले असतात, त्यावेळी तुमचा रथ वरून उतरत येत असतां दृष्टीस पडतो व त्या वेळी, हे अश्विनहो, तुम्ही आपल्या चतुर भक्तास उत्कृष्ट वैभव अर्पण करतां. ॥ ३ ॥


यु॒वं भु॒ज्युं भु॒रमा॑णं॒ विभि॑र्ग॒तं स्वयु॑क्तिभिर्नि॒वह॑न्ता पि॒तृभ्य॒ आ ॥
या॒सि॒ष्टं व॒र्तिर्वृ॑षणा विजे॒न्यं१॑दिवो॑दासाय॒ महि॑ चेति वा॒मवः॑ ॥ ४ ॥

युवं भुज्युं भुरमाणं विऽभिः गतं स्वयुक्तिऽभिः निऽवहंता पितृऽभ्यः आ ॥
यासिष्टं वर्तिः वृषणा विऽजेन्यं दिवःऽदासाय महि चेति वां अवः ॥ ४ ॥

पक्ष्यांप्रमाणे चपल अशा आपल्या अश्वांवर आरूढ होऊन तुम्ही बुडत असलेल्या भुज्यूकडे गेलां व त्याच अश्वाच्या योगानें - जे स्वतःच रथास नियुक्त होतात - तुम्ही त्यास आपल्या मातापितरांकडे पोंचविले. हे सामर्थ्यवान देवांनो, त्या भुज्यूचें सदन फार दूर होतें तरी तेथपर्यंत तुम्ही गमन केले. दिवोदासाचें तुम्ही किती उत्कृष्ट तऱ्हेने संरक्षण केलें हें तर सर्व प्रसिद्धच आहे. ॥ ४ ॥


यु॒वोर॑श्विना॒ वपु॑षे युवा॒युजं॒ रथं॒ वाणी॑ येमतुरस्य॒ शर्ध्य॑म् ॥
आ वां॑ पति॒त्वं स॒ख्याय॑ ज॒ग्मुषी॒ योषा॑वृणीत॒ जेन्या॑ यु॒वां पती॑ ॥ ५ ॥

युवोः अश्विना वपुषे युवाऽयुजं रथं वाणी इति येमतुः अस्य शर्ध्यम् ॥
आ वां पतिऽत्वं सख्याय जग्मुषी योषा अवृणीत जेन्या युवां पती ॥ ५ ॥

हे अश्विनहो, जो तुमचा रथ तुम्ही स्वतः मौजेने जोडला होता त्यास केवळ तुमचा हुकूमच त्याच्या सीमेपर्यंत घेऊन गेला. तुम्ही पति व्हावे अशी इच्छा करणारी जी सुंदर युवति तुमच्याकडे तुमच्याशी मित्रत्व जोडण्याकरितां आली होती तिनें शेवटीं तुम्हांसच पति म्हणून पसंत केलें. ॥ ५ ॥


यु॒वं रे॒भं परि॑षूतेरुरुष्यथो हि॒मेन॑ घ॒र्मं परि॑तप्त॒मत्र॑ये ॥
यु॒वं श॒योर॑व॒सं पि॑प्यथु॒र्गवि॒ प्र दी॒र्घेण॒ वन्द॑नस्ता॒र्यायु॑षा ॥ ६ ॥

युवं रेभं परिऽसूतेः उरुष्यथः हिमेन घर्मं परिऽतप्तं अत्रये ॥
युवं शयोः अवसं पिप्यथुः गवि प्र दीर्घेण वंदनः तारि आयुषा ॥ ६ ॥

तुम्ही रेभाचे संकटापासून संरक्षण केले आणि तुम्ही थंडी उत्पन्न करून अत्रीचा तप्त दाह शांत केला. तुम्ही शयूच्या धेनूचे अंगी कसदार असे दूध उत्पन्न केले व वंदनास तुमचेकडून दीर्घ आयुष्याचा लाभ झाला. ॥ ६ ॥


यु॒वं वन्द॑नं॒ निर्‌ऋ॑तं जर॒ण्यया॒ रथं॒ न द॑स्रा कर॒णा समि॑न्वथः ॥
क्षेत्रा॒दा विप्रं॑ जनथो विप॒न्यया॒ प्र वा॒मत्र॑ विध॒ते दं॒सना॑ भुवत् ॥ ७ ॥

युवं वंदनं निःऽऋतं जरण्यया रथं न दस्रा करणा सं इन्वथः ॥
क्षेत्रात् आ विप्रं जनथः विपन्यया प्र वां अत्र विधते दंसना भुवत् ॥ ७ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे कर्तृत्वशाली देवांनो, एखाद्या जुन्या गाडीची दुरुस्ती करावी त्याप्रमाणे जरेनें जर्जर झालेल्या वंदनास तुम्ही पुन्हां तारुण्याचा तजेला दिला. तुम्ही स्तुतींनी संतुष्ट होऊन त्या विद्वान उपासकास जमीनींतून जिवंत उत्पन्न केले. तुमची येथें स्तुति करणार्‍या ह्या भक्ताकरितांही आश्चर्यकारक कृत्यें घडोत. ॥ ७ ॥


अग॑च्छतं॒ कृप॑माणं परा॒वति॑ पि॒तुः स्वस्य॒ त्यज॑सा॒ निबा॑धितम् ॥
स्वर्वतीरि॒त ऊ॒तीर्यु॒वोरह॑ चि॒त्रा अ॒भीके॑ अभवन्न॒भिष्ट॑यः ॥ ८ ॥

अगच्छतं कृपमाणं पराऽवति पितुः स्वस्य त्यजसा निऽबाधितम् ॥
स्वःऽवतीः इतः ऊतीः युवोः अह चित्राः अभीके अभवन् अभिष्टयः ॥ ८ ॥

पित्यानें टाकल्यामुळें कष्ट भोगीत असलेल्या व म्हणून दूरच्या प्रदेशांत तुमची करुणा भाकणार्‍या भुज्यूकरितां तुम्ही धांवत गेला. जेव्हां तुम्ही त्याचे समीप होता तेव्हां तुमचे भक्त संरक्षक सामर्थ्य फार उज्ज्वल व तुमचें साहाय्य मोठें आश्चर्यकारक दिसलें. ॥ ८ ॥


उ॒त स्या वां॒ मधु॑म॒न्मक्षि॑कारप॒न्मदे॒ सोम॑स्यौशि॒जो हु॑वन्यति ॥
यु॒वं द॑धी॒चो मन॒ आ वि॑वास॒थोऽ॑था॒ शिरः॒ प्रति॑ वा॒मश्व्यं॑ वदत् ॥ ९ ॥

उत स्या वां मधुऽमत् मक्षिका अरपत् मदे सोमस्य औशिजः हुवन्यति ॥
युवं दधीचः मनः आ विवासथः अथ शिरः प्रति वां अश्व्यं वदत् ॥ ९ ॥

त्या मधुमक्षिकेनें तुमची फार मधुर स्तोत्रांनी स्तुति केली आणि सोमपान करून तुम्ही संतुष्ट व्हावे म्हणून उशिजाचा पुत्रही तुम्हांस पाचारण करीत आहे. तुम्ही दध्यचाचेंही मन संतुष्ट करीत आहां. अश्वाच्या शिरानें तुमच्याशी संभाषण केले होते. ॥ ९ ॥


यु॒वं पे॒दवे॑ पुरु॒वार॑मश्विना स्पृ॒धां श्वे॒तं त॑रु॒तारं॑ दुवस्यथः ॥
शर्यै॑र॒भिद्युं॒ पृत॑नासु दु॒ष्टरं॑ च॒र्कृत्य॒मिंद्र॑मिव चर्षणी॒सह॑म् ॥ १० ॥

युवं पेदवे पुरुऽवारं अश्विना स्पृधां श्वेतं तरुतारं दुवस्यथः ॥
शर्यैः अभिऽद्युं पृतनासु दुस्तरं चर्कृत्यं इंद्रंऽइव चर्षणीऽसहम् ॥ १० ॥

हे अश्विनहो, तुम्ही पेदूला जो पांढरा अश्व दिला, तो सर्वांस हवासा वाटण्याजोगा, शत्रूंचा पराभव करण्याजोगा, तेजस्वी, युद्धांत शत्रूंस अजिंक्य, सर्वत्र वाहवा होण्याजोगा व इंद्राप्रमाणें सर्व मानवांस भारी असा होता. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२० ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : अश्विनी कुमार - छंद - अनेक


का रा॑ध॒द्धोत्रा॑श्विना वां॒ को वां॒ जोष॑ उ॒भयोः॑ ।
क॒था वि॑धा॒त्यप्र॑चेताः ॥ १ ॥

का राधत् धोत्रा अश्विना वा कः वा जोषे उभयोः ।
कथा विधाति अप्रऽचेताः ॥ १ ॥

हे अश्विनहो, तुम्हांस कोणता यज्ञ संतोष देतो ? तुम्हां दोघांचा आनंद कशांत आहे ? अज्ञानी मनुष्य तुमच्या कृपेवांचून कसें करील ? ॥ १ ॥


वि॒द्वांसा॒विद्दुरः॑ पृच्छे॒दवि॑द्वानि॒त्थाप॑रो अचे॒ताः ।
नू चि॒न्नु मर्ते॒ अक्रौ॑ ॥ २ ॥

विद्वांसौ इत् दुरः पृच्छेत् अविद्वान् इत्था अपरः अचेताः ।
नू चित् नु मर्ते अक्रौ ॥ २ ॥

अविद्वान असो कीं अज्ञानी असा कोणी अन्य मनुष्य असो, त्यानें विद्वान अशा अश्विनी देवांचाच मार्ग विचारावा. कारण खरोखर मर्त्य मानवां संबंधाने अमुक एक गोष्ट त्यांना करता येणार नाहीं असे काय आहे ? ॥ २ ॥


ता वि॒द्वांसा॑ हवामहे वां॒ ता नो॑ वि॒द्वांसा॒ मन्म॑ वोचेतम॒द्य ।
प्रार्च॒द्दय॑मानो यु॒वाकुः॑ ॥ ३ ॥

ता विद्वांसा हवामहे वां ता नः विद्वांसा मन्म वोचेतं अद्य ।
प्र आर्चत् दयमानः युवाकुः ॥ ३ ॥

ज्ञानवान अश्विनीकुमारांना आम्ही आवाहन करतो. हे विद्वान आणि सर्वज्ञ अश्विनीकुमारांनो, तुमचा भक्त तुमची हविपूर्वकन प्रार्थना करीत आहे. तुम्हीच आज आम्हास स्तोत्र शिकवा. ॥ ३ ॥


वि पृ॑च्छामि पा॒क्या३॑न दे॒वान्वष॑ट्कृतस्याद्भु॒ तस्य॑ दस्रा ।
पा॒तं च॒ सह्य॑सो यु॒वं च॒ रभ्य॑सो नः ॥ ४ ॥

वि पृच्छामि पाक्या न देवान् वषट्ऽकृतस्य अत्ऽभुतस्य दस्रा ।
पातं च सह्यसः युवं च रभ्यसः नः ॥ ४ ॥

शत्रूंचा संहार करणार्‍या हे अश्विनहो, ’ वषट् ’ असा शब्दोच्चार करून अर्पण केलेला जो अद्‍भुत हवि त्याचेविषयी जणूं कांही लडिवाळपणानेंच मी देवांना विचारीत आहे. तुम्ही आमचें बलिष्ठ व हल्ला करणार्‍या शत्रूंपासून संरक्षण करा. ॥ ४ ॥


प्र या घोषे॒ भृग॑वाणे॒ न शोभे॒ यया॑ वा॒चा यज॑ति पज्रि॒यो वा॑म् ।
प्रैष॒युर्न वि॒द्वान् ॥ ५ ॥

प्र या घोषे भृगवाणे न शोभे यया वाचा यजति पज्रियः वाम् ।
प्र इषऽयुः न विद्वान् ॥ ५ ॥

भृगूप्रमाणे तुमची भक्ति करणार्‍या घोषाचे मुखात जी स्तुति जणूं अतिशय शोभा पावत आहे, व जिच्यायोगानें पज्राचा पुत्र विद्वान इषयूप्रमाणें तुमचे अर्चन करीत असतो, ती तुम्हांस प्रिय होवो. ॥ ५ ॥


श्रु॒तं गा॑य॒त्रं तक॑वानस्या॒हं चि॒द्धि रि॒रेभा॑श्विना वाम् ।
आक्षी शु॑भस्पती॒ दन् ॥ ६ ॥

श्रुतं गायत्रं तकवानस्य अहं चित् हि रिरेभ अश्विना वाम् ।
अक्षी इति शुभः पती इति दन् ॥ ६ ॥

तुमचे स्तवन करण्याकरितां अतिशय त्वरा करणार्‍या भक्ताचें स्तोत्र श्रवण करा. ज्याने तुमचे स्तवन केले तो, हे अश्विनहो, मीच होय. हे मांगल्याचे अधिकारी हो, तुम्ही इकडे दृष्टि द्या. ॥ ६ ॥


यु॒वं ह्यास्तं॑ म॒हो रन्यु॒वं वा॒ यन्नि॒रत॑तंसतम् ।
ता नो॑ वसू सुगो॒पा स्या॑तं पा॒तं नो॒ वृका॑दघा॒योः ॥ ७ ॥

युवं हि आस्तं महः रन् युवं वा यत् निः अततंसतम् ।
ता नः वसू इति सुऽगोपा स्यातं पातं नः वृकात् अघऽयोः ॥ ७ ॥

ज्या अर्थी विपुल संपत्ति देणारे तुम्ही व ती नेणारे ही तुम्हींच होतां, त्या अर्थीं, हे वैभवस्वरूप देवांनो, तुम्ही आमचे उत्तम संरक्षणकर्ते व्हा व दुष्ट लांडग्यापासून आमचे संरक्षण करा. ॥ ७ ॥


मा कस्मै॑ धातम॒भ्यमि॒त्रिणे॑ नो॒ माकुत्रा॑ नो गृ॒हेभ्यो॑ धे॒नवो॑ गुः ।
स्त॒ना॒भुजो॒ अशि॑श्वीः ॥ ८ ॥

मा कस्मै धातं अभि अमित्रिणे नः मा अकुत्र नः गृहेभ्यः धेनवः गुः ।
स्तनऽभुजः अशिश्वीः ॥ ८ ॥

जो आमचे मित्र नाही अशा कोणत्याही मनुष्याशी आमची गांठ घालूं नका आणि आमच्या घरच्या दूध देणार्‍या गाईंना कोठेंही त्यांच्या वासरांस सोडून घरापासून लांब जाऊं देऊं नका. ॥ ८ ॥


दु॒ही॒यन्मि॒त्रधि॑तये यु॒वाकु॑ रा॒ये च॑ नो मिमी॒तं वाज॑वत्यै ।
इ॒षे च॑ नो मिमीतं धेनु॒मत्यै॑ ॥ ९ ॥

दुहीयत् मित्रऽधितये युवाकु राये च नः मिमीतं वाजऽवत्यै ।
इषे च नः मिमीतं धेनुऽमत्यै ॥ ९ ॥

तुमच्यावर प्रेम असल्यामुळेंच ह्या भक्तजनांनी तुमचे मित्रत्व संपादन करण्याकरितां गाईचें दोहन केले आहे. ह्यासाठी सामर्थ्यपरिपूर्ण असें वैभव व धेनूंनी परिपूर्ण अशी धान्यसमृद्धि आम्हांस द्यावयासाठी काढा. ॥ ९ ॥


अ॒श्विनो॑रसनं॒ रथ॑मन॒श्वं वा॒जिनी॑वतोः ।
तेना॒हं भूरि॑ चाकन ॥ १० ॥

अश्विनोः आसनं रथं अनश्वं वाजिनीऽवतोः ।
तेन अहं भूरि चाकन ॥ १० ॥

सामर्थ्यवान अशा अश्विनीदेवाचा अश्वावांचून चालणारा रथ मला प्राप्त झाला आहे व त्याचे योगानें मी अतिशय आनंदात आहे. ॥ १० ॥


अ॒यं स॑मह मा तनू॒ह्याते॒ जनाँ॒ अनु॑ ।
सो॒म॒पेयं॑ सु॒खो रथः॑ ॥ ११ ॥

अयं समह मा तनु ऊह्याते जनान् अनु ।
सोमऽपेयं सुऽखः रथः ॥ ११ ॥

हा सुखकारक रथ ह्या लोकांच्या मागोमाग जाऊन जेथें सोमरस तयार करून ठेवला आहे तेथें मला नेहमी मंदगतीनें घेऊन जावो. ॥ ११ ॥


अध॒ स्वप्न॑स्य॒ निर्वि॒देऽ॑भुञ्जतश्च रे॒वतः॑ ।
उ॒भा ता बस्रि॑ नश्यतः ॥ १२ ॥

अध स्वप्नस्य निः विदे अभुंजतः च रेवतः ।
उभा ता बस्रि नश्यतः ॥ १२ ॥

निद्रा आणि श्रीमंती असून उपभोग न घेणारा पुरुष, ह्या दोहोंचाही त्या रथास फार तिटकारा आहे. दोन्ही लवकर नाशाप्रत जातात. ॥ १२ ॥


ॐ तत् सत्


GO TOP