॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ६ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥


श्लोक : वह्नितप्तं जलं तापयुक्त देहस्य तापकम् ।
चिद्‌भास्या धीस्तदाभासयुक्तान्यं भासयेत्तथा ॥ ६ ॥

श्लोकार्थ : अग्नीवर तापवलेले पाणी उष्ण होते आणि ते देहालाही उष्णता देते. त्याप्रमाणे कूटस्थ चैतन्याने प्रकाशित झालेली बुद्धी जेव्हा त्या चैतन्याचा आभास जो जीव त्याच्याशी संयोग पावते आणि जीवसंयुक्त होऊन घटादी पदार्थांना प्रकाशित करते. । । ६ । ।

वन्हीने जें जळ तापले । तें उष्णयुक्त देहा तापक जाहले ।
तैसें चिद्धास्थाबुद्धीने भासविले । आनान आभासयुक्ते ॥ ७७ ॥
अग्नीने जे पाणी तापवले, त्या उष्ण पाण्याने देहाला उष्णता दिली. त्याप्रमाणे शुद्ध चैतन्याने बुद्धीला प्रकाशित केले, त्या चैतन्याने प्रकाशित झालेल्या बुद्धीने अन्य सामान्य प्रकाशित पदार्थांना आपल्या विशेष प्रकाशाने प्रकाशित केले. (१०७७)

चिडूप सामान्य ज्ञानेंकडून । सर्व पदार्थ होती प्रकाशमान ।
परी अन्यथा अमुक अमुक ह्मणून । कल्पनेविण न दिसती ॥ ७८ ॥
चिद्‌रूपाच्या सामान्य ज्ञानाने सर्व पदार्थ प्रकाशित झालेले असतात. परंतु कल्पनेवाचून ते अमुक अमुक म्हणून निरनिराळे असे ओळखता येत नाहीत, दिसत नाहीत. (१०७८)

जैसा अग्निसत्रिधीं देह पोळे । परी ओला नोव्हे विना जळ ।
तेवीं प्रकाशिलें परी न निवळे । आनान कत्यनेविण ॥ ७९ ॥
ज्याप्रमाणे अग्नीच्या सान्निध्यात देह तापतो, परंतु पाण्याशिवाय तो ओला होऊ शकत नाही. त्याप्रमाणे सर्व पदार्थ प्रकाशित झाले, परंतु वेगवेगळ्या कल्पनांवाचून ते स्पष्ट होत नाहीत. (१०७९)

म्हणून कल्पनारूप जे वृत्ती । मन बुद्धि नाम जयेप्रती ।
संशयात्मक मन निश्चिती । निश्चयात्मक बुद्धि ॥ ८० ॥
तेव्हा कल्पनारूप जी वृत्ती आहे, तिचे मनबुद्धी असे नाव आहे. त्यापैकी मन हे संशयात्मक असून बुद्धी ही निश्चयात्मक असते. (१०८०)

हे उभयरूपें येक कल्पना । अमुक अमुक कल्पी नाना ।
अन्यथा विपरीतपणें जानाना । नामरूपा कल्पी ॥ ८१ ॥
ही दोन्ही मिळून एकच कल्पना 'हा अमुक आहे, ते अमुक आहे' अशा प्रकारे निरनिराळ्या कल्पना करते. किंवा उलट निरनिराळ्या नामरूपांची कल्पना करते. (१०८१)

परी ते जड प्रकाशरहित । प्रकाशीना कवणा किंचित ।
जळ जैसे शीतळ अत्यंत । कवणा पोळवीना ॥ ८२ ॥
परंतु ती कल्पना जड आणि प्रकाशरहित असते. ती कोणालाही प्रकाशित करत नाही. जसे अतिशय थंड पाणी कोणालाही कधी पोळवत नाही तशी ही कल्पना कोणालाही प्रकाशित करत नाही. (१०८२)

स्वतां चंचळ परी प्रकाशहीन । ते कल्पना जेव्हां ज्ञानसंपन्न ।
तेचि जाणिजे भासमान । परप्रकाशे ॥ ८३ ॥
ती स्वत: चंचल असली तरी प्रकाशहीन असते. ती कल्पना जेव्हा ज्ञानसंपन्न होते, तेव्हा मात्र ती परप्रकाशाने प्रकाशित होते. (१०८३)

जैसें शीतळ जळ पोळूं लागे । तरी तें तप्त जालें अग्निसंगें ।
तैशी बुद्धि नानात्वा प्रसंगें । तरी हे चिद्‌रूपें भासविली ॥ ८४ ॥
जसे शीतल पाणी जेव्हा पोळू लागते, तेव्हा ते अग्नीच्या सान्निध्यामुळे तापलेले असते. त्याप्रमाणे बुद्धी बहुविध पदार्थांना जाणू शकते, पण त्यावेळी ती चिद्र्रपामुळे प्रकाशित झालेली असते. (१०८४)

ऐसी बुद्धि चिद्‌रूपेंकडून भासले तें चिद्‌भास्या लक्षण ।
ते कल्पना आभासयुक्त होऊन । नानात्व कल्पीं ॥ ८५ ॥
अशी बुद्धी चिद्र्रपाकडून प्रकाशित होते तेव्हा तिला ' चिद्धास्था' असे म्हटले जाते. ती कल्पना जीवाशी संयुक्त होऊन मग नाना पदार्थांची कल्पना करू लागते. (१०८५)

बुद्धिमाजीं ज्ञानासमान । ज्ञान उमटलें भासमान ।
तयासींच कल्पित नामाभिधान । बोधाभास जीव ॥ ८६ ॥
त्यावेळी बुद्धीमध्ये ज्ञानतत्त्वाप्रमाणे अगदी सारखे असे आभासित ज्ञान उमटते, त्यालाच कल्पनेने दिलेले जीव अथवा बोधाभास हे नाव प्राप्त होते. (१०८६)

तापरूप अग्नि जैसा । जळही पोळवीत असे सहसा ।
तो उष्णाभास जल सहवासा । तेवी जीव कल्पने औत ॥ ८७ ॥
अग्नी उष्णस्वरूपच असतो. तो (थंड) पाण्याला सुद्धा तापवतो. तेव्हा ते जल उष्णाच्या सहवासाने उष्णाभास होते. त्याप्रमाणे कल्पनेमध्ये जीव चिदाभास होतो. (१०८७)

असो ऐसिया चिदाभासासहित । युक्त होऊन बुद्धि विख्यात ।
नामरूपाल्पक वस्तू समस्त । अन्यथा भासवी ॥ ८८ ॥
तेव्हा अशा चिदाभास जीवाशी संयुक्त होऊन बुद्धी सर्व नामरूपात्मक वस्तूंना वेगवेगळेपणे प्रकाशित करते. (१०८८)

जल तस पोळवी देहासी । फोड येती जाळी अवयवांसी ।
आभासयुक्त बुद्धिहि तैशी । नामरूपें कल्पी ॥ ८९ ॥
तापलेले पाणी देहाला पोळविते अंगाला फोड येतात, अवयव जळतात. आभासयुक्त बुद्धी त्याप्रमाणे नामरूपांची कल्पना करते. (१०८९)

अग्नि तैसा प्रकाशक आल्या । पाणियापरी बुद्धि या नामा ।
उष्णाभास तैसा आभास जीवाल्या । हे तिन्ही स्पष्ट जाले ॥ ९० ॥
अग्नीप्रमाणे आत्मा हा येथे प्रकाशक आहे. बुद्धी पाण्याच्या जागी आहे. पाण्याच्या ठिकाणची परावर्तित उष्णता म्हणजे येथील आभासरूप जीवात्मा आहे. आत्मा, बुद्धी आणि जीवात्मा हे तीनही आता स्पष्ट झाले. (१०९०)

परप्रकाशबुद्धि कळली । चित्यभा स्वप्रकाशे संचली ।
आभास मिथ्या हे प्रतीति आली । या दृष्टांते ॥ ९१ ॥
या दृष्टान्ताने बुद्धी परप्रकाशक आहे हे कळले. चित्यभा (आत्मा) ही स्वप्रकाशाने सर्वत्र भरली आहे हे कळले. आभास खोटा आहे याचा अनुभव आला. (१०९१)

परी येथें कल्पना करिसी । कीं अन्यथा भासवणे शक्ति जीवासी ।
तापल्या जळी प्रभा तैशी । कोठे अन्या प्रकाशक ॥ ९२ ॥
पण आता येथे तू कल्पना करशील की, वेगळेपणाने दाखवण्याची शक्ती जशी जीवाच्या ठिकाणी आहे, त्याप्रमाणे तापलेल्या पाण्यात पदार्थ वेगळेपणाने दाखवण्याचा प्रकाश कोठे आहे ? (१०९२)

तरी याचें उत्तर ऐकावे । सूर्यकिरणे जळ तस व्हावें ।
आणि जळी प्रतिबिंबही पडावे । तेणें झळझळिती भिंती ॥ ९३ ॥
तरी आता याचे उत्तर ऐक. सूर्यकिरणांनी पाणी तापते आणि पाण्यात सूर्याचे प्रतिबिंबही पडते. त्या प्रतिबिंबामुळे भिंतीवर कवडशांची झळझळ उमटते. (१०९३)

अग्नि सूर्य तो येकरूप । तया भेद न कीजे अल्प ।
तैसा आल्या स्वप्रकाश चिडूप । असावादित्यो ब्रह्म ॥ ९४ ॥
अग्नी आणि सूर्य एकरूपच आहेत. या दोहोत थोडासुद्धा भेद मामू नये. त्याप्रमाणे आत्मा चिद्रुप असून स्वप्रकाश आहे. हा सूर्य म्हणजे ब्रह्मच आहे, असे धुती सांगतेच आहे. (१०९४)

या आत्यसूर्याचे प्रकाशी । ठेविलें स्थूलदेहघटासी ।
बुद्धि पाणी आभासता जीवासी । प्रतिबिंबत्वे आली ॥ ९५ ॥
या आत्मारूप सूर्याच्या प्रकाशात स्थूल देहरूपी घट ठेवला. बुद्धीरूप पाणी असून त्यामुळे जीवाला प्रतिबिंबरूप आभासाचे रूप प्राप्त झाले. (१०९५)

तया प्रतिबिंबरूप जीवानें । नानात्व अन्यथा भासवणे ।
जळी उमटले जें मित्यापणे । तेणें भिंती झळझळिती ॥ ९६ ॥
त्या प्रतिबिंबरूप जीवाने खोटे असे नानात्व प्रतिभासित केले. पाण्यात जे मिथ्या प्रतिबिंब उमटले त्यामुळे भिंतीवर कवडशांची झळझळ दिसते. (१०९६)

सूर्य तैसा आत्या प्रकाशक । सामान्यत्वे भासवी सकळिक ।
आभासमुक्त बुद्धि हे अनेक । भासवी जळ प्रभा जेवीं ॥ ९७ ॥
आत्मा सूर्याप्रमाणे प्रकाशक असून सर्व पदार्थांना सामान्य प्रकाशाने तो प्रकाशित करतो. चिदाभासा (जीव ने युक्त अशी बुद्धी जळाच्या प्रतिभासित प्रकाशाप्रमाणे हे अनेकत्व प्रकाशित करते. (१०९७)

एव आल्या सच्चिद्धन । बुद्धि आभास हे मिथ्या दोन ।
हे तिन्हीही स्थष्टत्वे भिन्नभिन्न । दृष्टांतयुक्त सांगितले ॥ ९८ ॥
अशा प्रकारे सच्चिरून आत्मा, बुद्धी आणि चिदाभास असलेला जीव हे दोन मिथ्या पदार्थ, या तिन्हींचे या दृष्टान्ताच्या साहाय्याने वेगवेगळे स्पष्ट निरूपण केले. (१०९८)

आतां बुद्धीनें कोणती कल्पना । करून दाखविली असे नाना ।
आणि त्या विकल्यी आल्या देखणा । असे तेंही बोल- ॥ ९९ ॥
यात बुद्धीने कोणती कल्पना करून नानात्व दाखविले आणि त्या विकल्पात आत्मा कसा देखणा आहे, तेही सांगतो. (१०९९)

GO TOP