॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ द्वितीयोऽध्यायः - अध्याय दुसरा ॥

देव्युवाच -
मन्मायाशक्तिसंक्लृप्तंजगत्सर्वं चराचरम् ।
सापि मत्तः पृथङ् माया नास्त्येव परमार्थतः ॥ १ ॥
देवी म्हणाली---ज्या माझ्या मायारूपी शक्तीने हे सर्व जग कल्पिले ती माया सुद्धां वस्तुतः माझ्याहून पृथक नाहीच. १.

व्यवहारदृशा सेयं मायाऽविद्येति विश्रुता ।
तत्त्वदृष्ट्या तु नास्त्येव तत्त्वमेवास्ति केवलम् ॥ २ ॥
व्यवहारदृष्टीनेअविद्या, माया असे तिला म्हटलेलें आहे. पण तत्वदृष्टीने ती नाहीच. ती केवल तत्वच आहे. २.

साहं सर्वं जगत्सृष्ट्‍वा तदन्तः प्रविशाम्यहम् ।
माया कर्मादिसहिता गिरे प्राणपुरःसरा ॥ ३ ॥
लोकान्तरगतिर्नो चेत्कथं स्यादिति हेतुना ।
यथा यथा भवन्त्येव मायाभेदास्तथा तथा ॥ ४ ॥
अशा प्रकारची ती मी हें सर्व जग निर्माण करते व, हे गिरे, मी जर प्राणपुरःसर यांत प्रवेश न केला तर अन्यलोकीं गमन, जनन मरण इत्यादि मज व्यापकाचें कसे होईल ? असा विचार करून अविद्या, कर्में इत्यादिकांसहवर्तमान प्राणाला पुढे करून त्यांत प्रवेश करते. पण मी जरी व्यापक व एकच असले तरी जशी जशी उपाधि असेल तसे तसे जीव भिन्न होतात. सारांश, उपाधिभेदामुळे जसे आकाश घटाकाशादिरूपानें भिन्न होतें त्याप्रमाणे उपाधिभेदामुळे मी भिन्न झाले आहे.३-४.

उपाधिभेदाद्‌भिन्नाऽहं घटाकाशादयो यथा ।
उच्चनीचादि वस्तूनि भासयन्भास्करः सदा ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे सूर्य उत्तमाधम वस्तूंना प्रकाशित केल्यामुळे कधीं दूषित होत नाहीं त्याप्रमाणेच मी उत्तमाधम वस्तूत राहूनही त्यांच्या दोषांनी कधीं लिप्त होत नाहीं. ५.

न दुष्यति तथैवाहं दोषैर्लिप्ता कदापि न ।
मयि बुद्ध्यादिकर्तृत्वमध्यस्यैवापरे जनाः ॥ ६ ॥
मूढ पुरुष बुद्धि इत्यादिकांच्या ठिकाणीं रहाणारे कर्तृत्वादि धर्म माझ्या ठिकाणीं आरोपित करून ते प्राकृत 'आत्मा कर्ता' असें म्हणतात. पण विवेकी पंडित असें म्हणत नाहींत. ६.

वदन्ति चात्मा कर्तेति विमूढा न सुबुद्धयः ।
अज्ञानभेदतस्तद्वन्मायाया भेदतस्तथा ॥ ७ ॥
अज्ञानभेदामुळे व तसेच मायाभेदामुळे जीव ईश्वर असा चैतन्याचा अत्यंत भेद कल्पिला आहे. ७.

जीवेश्वरविभागश्च कल्पितो माययैव तु ।
घटाकाशमहाकाशविभागः कल्पितो यथा ॥ ८ ॥
आकाशाचा घटाकाश व महाकाश हा भेद जसा काल्पित आहे तसाच जीवात्मा व परमात्मा यांचा भेद कल्पित आहे.८.

तथैव कल्पितो भेदो जीवात्मपरमात्मनोः ।
यथा जीवबहुत्वं च माययैव न च स्वतः ॥ ९ ॥
ज्याप्रमाणें जीव अनेक आहेत ही कल्पना मायेमुळेच होत असून ती स्वतः नसते, त्याप्रमाणेंच ईश्वर (शंकर, विष्णु इत्यादि रूपानें ) अनेक आहेत ही कल्पना स्वभावतः नसून ती मायेमुळेच होणारी आहे. ९.

तथेश्वरबहुत्वं च मायया न स्वभावतः ।
देहेन्द्रियादिसङ्‌घातवासनाभेदभेदिता ॥ १० ॥
देह, इंद्रियें इत्यादिकांचा समूह व वासना यांच्या भेदामुळे भेद पावणारी अविद्या जीवांच्या भेदाला कारण आहे, याहून अन्य कांहीं एक कारण सांगितलेलें नाहीं. १०.

अविद्या जीवभेदस्य हेतुर्नान्यः प्रकीर्तितः ।
गुणानां वासनाभेदभेदिता या धराधर ॥ ११ ॥
हे पर्वता, सत्त्वादि गुणांच्या वासनाभेदानें भिन्न होणारी जी माया तेंच ईश्वरभेदाचे कारण आहे, अन्य कांहींही नाहीं. ११.

माया सा परभेदस्य हेतुर्नान्यः कदाचन ।
मयि सर्वमिदं प्रोतमोतं च धरणीधर ॥ १२ ॥
सारांश, हे हिमालया, माझ्याच ठिकाणी हे सर्व चराचर जग सूत्रांतील मण्याप्रमाणें ) ओत-प्रोत ( ग्रथित ) आहे. १२.

ईश्वरोऽहं च सूत्रात्मा विराडात्माऽहमस्मि च ।
ब्रह्माऽहं विष्णुरुद्रौ च गौरी ब्राह्मी च वैष्णवी ॥ १३ ॥
मी ईश्वर आहें, सूत्रात्मा व विराडात्माही मीच आहे, ब्रह्मदेव, विष्णु, रुद्र व त्याच क्रमानें ब्राह्मी, वैष्णवी व शिवा (या सरस्वती, लक्ष्मी व पावतीसंज्ञक शक्ति) मी आहे. १३.

सूर्योऽहं तारकाश्चाहं तारकेशस्तथास्म्यहम् ।
पशुपक्षिस्वरूपाऽहं चाण्डालोऽहं च तस्करः ॥ १४ ॥
सूर्य मी आहे, नक्षत्रें मी आहे व तसेच तारानायक चंद्रही मीच आहे. पशु व पक्षी हेंही माझंचे रूप असून चांडाल व चोर मी आहे. १४.

व्याधोऽहं क्रूरकर्माऽहं सत्कर्मोऽहं महाजनः ।
स्त्रीपुन्नपुंसकाकारोऽप्यहमेव न संशयः ॥ १५ ॥
पशुपक्ष्यांची मृगया करणारा व्याध मी आहे; क्रूर कमें करणारा मीच आहे व सत्कर्मे करणारा महाजनही मीच; स्त्री, पुरुष व नपुंसक इत्यादि आकार सुद्धा मीच आहे; यांत कांहीं संशय नाहीं. १५.

यच्च किञ्चित्क्वचिद्वस्तु दृश्यते श्रूयतेऽपि वा ।
अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्याहं सर्वदा स्थिता ॥ १६ ॥
सारांश, जी जी कोणतीही व कोठेही असणारी वस्तु दिसते किंवा आहे असे समजते, ती ती सर्व अंतर्बाह्य व्यापून मी सर्वकाल स्थित आहे. १६.

न तदस्ति मया त्यक्तं वस्तु किञ्चिच्चराचरम् ।
यद्यस्ति चेत्तच्छून्यं स्याद्वन्ध्यापुत्रोपमं हि तत् ॥ १७ ॥
या चराचर सृष्टीतील कोणतीही वस्तु मला सोडून नाही आणि जर असे कांहीं असले तर ते शून्यच होय. ते तर वंध्यापुत्रासारखे असते. १७.

रज्जुर्यथा सर्पमालाभेदैरेका विभाति हि ।
तथैवेशादिरूपेण भाम्यहं नात्र संशयः ॥ १८ ॥
ज्याप्रमाणे एकटी रज्जु सर्प, माला पुष्पांची माळ, दंड, उदकधारा इत्यादि भेदांनी प्रत्ययाला येते, त्याप्रमाणेंच मी ईश्वरादिरूपाने भासते यांत कांहीं संदेह नाहीं. १८.

अधिष्ठानातिरेकेण कल्पितं तन्न भासते ।
तस्मान्मत्सत्तयैवैतत्सत्तावन्नान्यथा भवेत् ॥ १९ ॥
पिशाच, रजत, सर्प इत्यादि जी कल्पित वस्तु असते ती स्थाणु, शक्ति, रज्जु इत्यादि अधिष्ठानावांचून कधीं भासत नाहीं. तस्मात्, माझ्या सत्तेनेच हे सत्तावान् झाले आहे. अन्य कोणत्याही प्रकारे नव्हे. १९.

हिमालय उवाच -
यथा वदसि देवेशि समष्ट्याऽऽत्मवपुस्त्विदम् ।
तथैव द्रष्टुमिच्छामि यदि देवि कृपा मयि ॥ २० ॥
हिमालय म्हणाला, हे देवि, माझ्यावर जर तुझी कृपा असेल तर, हे देवेश्वरि, हे तुझे समष्ट्यात्मक विराट् रूप जसे असेल तसेच पाहण्याची मला इच्छा आहे. २०.

व्यास उवाच -
इति तस्य वचः श्रुत्वा सर्वे देवाः सविष्णवः ।
ननन्दुर्मुदितात्मानः पूजयन्तश्च तद्वचः ॥ २१ ॥
व्यास म्हणाले, त्याचे भाषण श्रवण करून विष्णुसहवर्तमान सर्व देव आनंदित झाले व प्रसन्न अंतःकरणाच्या त्या देवांनीं त्याच्या भाषणाची स्तुति केली. २१.

अथ देवमतं ज्ञात्वा भक्तकामदुघा शिवा ।
अदर्शयन्निजं रूपं भक्तकामप्रपूरिणी ॥ २२ ॥
नंतर देवांची इच्छा जाणून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार्‍या कामधेनूसारख्या त्या देवीने स्वत:चे रूप दाखविले. २२.

अपश्यंस्ते महादेव्या विराडरूपं परात्परम् ।
द्यौर्मस्तकं भवेद्यस्य चन्द्रसूर्यौ च चक्षुषी ॥ २३ ॥
त्या देवांनी महादेवीचें जें सर्व श्रेष्ठांहून श्रेष्ठ असे विरारूप पाहिले ते असे होते---त्याचे सत्यलोक हे मस्तक, चंद्र व सूर्य हे नेत्र. २३.

दिशः श्रोत्रे वचो वेदाः प्राणो वायुः प्रकीर्तितः ।
विश्वं हृदयमित्याहुः पृथिवी जघनं स्मृतम् ॥ २४ ॥
दिशा हे कर्ण, भाषण हे वेद, वायु हा प्राण होता. सर्वात्मक अव्यक्त हें हृदय, पृथ्वी हा जघनप्रदेश २४,

नभस्तलं नाभिसरो ज्योतिश्चक्रमुरस्थलम् ।
महर्लोकस्तु ग्रीवा स्याज्जनो लोको मुखं स्मृतम् ॥ २५ ॥
नभस्थल भुवर्लोक हें नाभिकमल; ज्योतिश्चक्र हे वक्षःस्थल; महर्लोक ही ग्रीवा (गळा) व जनोलोक हे मुख होते. २५.

तपो लोको रराटिस्तु सत्यलोकादधः स्थितः ।
इन्द्रादयो बाहवः स्युः शब्दः श्रोत्रं महेशितुः ॥ २६ ॥
सत्यलोकाच्या खाली असलेला तपोलोक हें ललाट, इंद्रादि हे बाहु, आमच्या श्रोत्रेंद्रियाचा विषय जो शब्द तें त्या महेश्वरीचे श्रवणेंद्रिय होते. २६.

नासत्यदस्रौ नासे स्तौ गन्धो घ्राणं स्मृतो बुधैः ।
मुखमग्निः समाख्यातो दिवारात्री च पक्ष्मणी ॥ २७ ॥
अश्विनीकुमार हें नासापुट (नाकपुड्या) व गंध हे तिचे घ्राणेंद्रिय होते असे पंडित सांगतात. अग्नि हें तिचें मुख आणि दिवस व रात्र हे तिचे पंख (किंवा दोन बाजू) असे प्रसिद्ध आहे. २७.

ब्रह्मस्थानं भ्रूविजृंभोऽप्यापस्तालुः प्रकीर्तिताः ।
रसो जिह्वा समाख्याता यमो दंष्ट्राः प्रकीर्तिताः ॥ २८ ॥
जे प्रजापतीचें स्थान तो या स्वरूपाचा भ्रूविकास व उदक ही तालु असे प्रसिद्ध आहे. रस ही जिह्वा असे सांगतात, यम या दाढा असे वर्णन करतात. २८,

दन्ताः स्नेहकला यस्य हासो माया प्रकीर्तिता ।
सर्गस्त्वपाङ्‌गमोक्षः स्याद्‌व्रीडोर्ध्वोष्ठो महेशितुः ॥ २९ ॥
स्त्रीपुरुषादिकांचा स्नेहांश हेच तिचे दांत व हास्य हीच माया होय. सृष्टीची उत्पत्ति हेच तिचे कटाक्ष व लज्जा हाच त्या महेश्वरीचा वरचा ओंठ होय. २९.

लोभः स्यादधरोष्ठोऽस्या धर्ममार्गस्तु पृष्ठभूः ।
प्रजापतिश्च मेढ्रं स्याद्यः स्रष्टा जगतीतले ॥ ३० ॥
लोभ हा तिचा अधरोष्ठ व धर्म हो तिचा पृष्ठप्रदेश आहे. प्रजापति हेंच त्या विराट्स्वरूपाचे जननेंद्रिय असून तेच या पृथ्वींतील वस्तूंचे उत्पादक आहे. ३०.

कुक्षिः समुद्रा गिरयोऽस्थीनि देव्या महेशितुः ।
नद्यो नाड्यः समाख्याता वृक्षाः केशाः प्रकीर्तिताः ॥ ३१ ॥
समुद्र या कुशी व पर्वत ही त्या महेश्वरी देवीची हाडें होत. नद्या ह्याच तिच्या नाड्या व वृक्ष हे केंस होत, असे वर्णन आढळते. ३१.

कौमारयौवनजरावयोऽस्य गतिरुत्तमा ।
बलाहकास्तु केशाः स्युः सन्ध्ये ते वाससी विभोः ॥ ३२ ॥
बाळपण, तारुण्य व वृद्धावस्था ही तिच्या वयाची उत्तम गति आहे. मेघ हेच केंस व संध्याकाल हीच त्या विभुस्वरूपाची वस्त्रें होत. ३२.

राजञ्छ्रीजगदम्बायाश्चन्द्रमास्तु मनः स्मृतः ।
विज्ञानशक्तिस्तु हरी रुद्रोन्तःकरणं स्मृतम् ॥ ३३ ॥
चंद्रमा हेंच त्या श्रीजगदंबेचें मन असेही सांगितले आहे. तसेच हरि हीच तिची विज्ञानशक्ति ( बुद्धि ) व रुद्र हे तिचे अंतःकरण असे प्रसिद्ध आहे. ३३.

अश्वादिजातयः सर्वाः श्रोणिदेशे स्थिता विभोः ।
अतलादिमहालोकाः कट्यधोभागतां गताः ॥ ३४ ॥
अश्वादि सर्व पशुजात तिच्या श्रोणिप्रदेश स्थित आहेत; अतलादि महालोक हे त्या विभुदेवीच्या कटीच्या खालील होऊन राहिले आहेत. ३४.

एतादृशं महारूपं ददृशुः सुरपुङ्‌गवाः ।
ज्वालामालासहस्राढ्यं लेलिहानं च जिह्वया ॥ ३५ ॥
सारांश, त्या देवश्रेष्ठांनी अशा प्रकारचे महारूप पाहिले, ते हजारों ज्वालासमुदायांनी पूर्ण वे जिह्वेने जणूं काय सर्व जगाचे आस्वादन करीत असलेले असे होते. ३५.

दंष्ट्राकटकटारावं वमन्तं वह्निमक्षिभिः ।
नानायुधधरं वीरं ब्रह्मक्षत्रौदनं च यत् ॥ ३६ ॥
त्याच्या दाढांचा कट् कट् असा शब्द होत होता, नेत्र अग्नि ओकीत होते, त्यानें नाना प्रकारची आयुधे धारण केल होती व त्या वीरस्वरूपाचे ब्राह्मण व क्षत्रिय हे भक्ष्य होते. ३६.

सहस्रशीर्षनयनं सहस्रचरणं तथा ।
कोटिसूर्यप्रतीकाशं विद्युत्कोटिसमप्रभम् ॥ ३७ ॥
त्याला हजारों मस्तकें व नयन तसेच हजारों चरण होते. कोटिसूर्यासारखा त्याचा प्रकाश होता व ते एक कोटिविद्युल्लतांसारखे देदीप्यमान होते. ३७.

भयङ्‌करं महाघोरं हृदक्ष्णोस्त्रासकारकम् ।
ददृशुस्ते सुराः सर्वे हाहाकारं च चक्रिरे ॥ ३८ ॥
तात्पर्य, भयंकर, महाघोर आणि हृदय व नेत्र यांना त्रास देणारे असे ते स्वरूप दिसलें असता त्या सर्व देवानी हाहाकार केला, ३८.

विकम्पमानहृदया मूर्च्छामापुर्दुरत्ययाम् ।
स्मरणं च गतं तेषां जगदम्बेयमित्यपि ॥ ३९ ॥
त्यांचे हृदय थरथर कांपूं लागले, त्यांना अनिवार्य मूर्च्छा प्राप्त झाली व ही जगदंबा आहे हेंही त्यांना स्मरण राहिले नाहीं. ३९.

अथ ते ये स्थिता वेदाश्चतुर्दिक्षु महाविभोः ।
बोधयामासुरत्युग्रं मूर्च्छातो मूर्च्छितान्सुरान् ॥ ४० ॥
नंतर महादेवीच्या चार दिशांमध्ये जे वेद होते त्यांनी त्या मूर्च्छित झालेल्या देवांना मूर्च्छेपासून सावध केले. ४०.

अथ ते धैर्यमालम्ब्य लब्ध्वा च श्रुतिमुत्तमाम् ।
प्रेमाश्रुपूर्णनयना रुद्धकण्ठास्तु निर्जराः ॥ ४१ ॥
तदनंतर धैर्याचे अवलंबन करून व उत्तम श्रुतीला ( वेदाला ) प्राप्त करून घेऊन प्रेमाश्रूंनी ज्यांचे नेत्र भरून गेले आहेत व कंठ दाठला आहे असे ते देव ४१

बाष्पगद्गदया वाचा स्तोतुं समुपचक्रिरे ।
देवा ऊचुः -
अपराधं क्षमस्वाम्ब पाहि दीनांस्त्वदुद्‌भवान् ॥ ४२ ॥
सद्गदित वाणीने तिची स्तुति करू लागले. "हे मातोश्री, अपराधाबद्दल क्षमा कर. तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आम्हां दीनांचे रक्षण कर. ४२.

कोपं संहर देवेशि सभया रूपदर्शनात् ।
का ते स्तुतिः प्रकर्तव्या पामरैर्निजरैरिह ॥ ४३ ॥
हे देवेश्वरि, क्रोध टाक. कारण हे पाहून आम्ही भयभीत झालो आहों. या ठिकाणी पामर देवांनीं तुझी काय बरें स्तुति करावी ? ४३.

स्वस्याप्यज्ञेय एवासौ यावान्यश्च स्वविक्रमः ।
तदर्वाग्जायमानानां कथं स विषयो भवेत् ॥ ४४ ॥
केवढा व कोणत्या प्रकारचा तुझा पराक्रम आहे हे तुझें तुलाही जर समजत नाहीं तर अलीकडे उत्पन्न झालेल्याना आम्हांला तो कसा बरें समजेल ? ४४.

नमस्ते भुवनेशानि नमस्ते प्रणवात्मके ।
सर्व वेदान्तसंसिद्धे नमो ह्रीङ्‌कारमूर्तये ॥ ४५ ॥
हे भुवनेश्वरि, तुला नमस्कार असो. हे प्रणवरूपिणि, तुला आम्ही वंदन करतों. हे सर्व वेदान्तवाक्यांवरून सिद्ध होणार्‍या र्‍हींकारस्वरूपिणि, तुझ्या चरणी आह्मी मस्तक ठेवितों. ४५.

यस्मादग्निः समुत्पन्नो यस्मात्सूर्यश्च चन्द्रमाः ।
यस्मादोषधयः सर्वास्तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४६ ॥
ज्याच्यापासून अग्नीची उत्पत्ति झाली, जेथून सूर्य व चंद्रही निर्माण झाले व ज्या ठिकाणाहून सर्व औषधींचा उद्भव झाला, त्या सर्वात्म्याला आमचे वंदन असो. ४६.

यस्माच्च देवाः संभूताः साध्याः पक्षिण एव च ।
पशवश्च मनुष्याश्च तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४७ ॥
ज्याच्यापासून देव, साध्य, पक्षी, पशु व मनुष्ये उत्पन्न झाली, त्या सर्वव्यापी ईश्वराला आम्ही प्रणाम करतों. ४७.

प्राणापानौ व्रीहियवौ तपः श्रद्धा ऋतं तथा ।
ब्रह्मचर्यं विधिश्चैव यस्मात्तस्मै नमो नमः ॥ ४८ ॥
प्राण, अपान, तांदुळ, जव, तप, श्रद्धा, तसेच सत्य, ब्रह्मचर्य व नित्य, नैमित्तिक इत्यादि सहा कर्मांचे विधि ज्या सर्वशक्तीपासून उद्भवतात, त्याला आम्ही वारंवार वंदन करतों. ४८.

सप्त प्राणार्चिषो यस्मात्समिधः सप्त एव च ।
होमाः सप्त तथा लोकास्तस्मै सर्वात्मने नमः ॥ ४९ ॥
सात ( शीर्षगत ) प्राण [ दोन श्रोत्र, दोन नेत्र, दोन नासापुटे व मुख ], सात ज्योति ( त्यांच्या स्वस्वविषयद्योतक शक्ति ), सातः समिधा ( विषय ), सात होम (विषयांचे विज्ञान) व सात लोक ( इंद्रियस्थानें ) ज्याच्यापासून निर्माण झाले, त्या सर्वात्म्याला नमस्कार असो. ४९.

यस्मात्समुद्रा गिरयः सिन्धवः प्रचरन्ति च ।
यस्मादोषधयः सर्वा रसास्तस्मै नमो नमः ॥ ५० ॥
जेथून समुद्र, पर्वत व नद्या यांचा उगम होतो व ज्या परममूळापासून ओषधि व सर्व रस निघतात, त्याच्यापुढे आम्ही लोटांगण घालतों. ५०.

यस्माद्यज्ञः समुद्‌भूतो दीक्षायूपश्च दक्षिणाः ।
ऋचो यजूंषि सामानि तस्मै सर्वात्मने नमः ॥ ५१ ॥
ज्या सर्वकारणापासून यज्ञ, दीक्षा, यूप ( यज्ञस्तंभ ), दक्षिणा, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांची उत्पत्ति झाली, त्या सर्वस्वरूपभूत परमात्म्याला असकृत् वंदन कारितो. ५१.

नमः पुरस्तात्पृष्ठे च नमस्ते पार्श्वयोर्द्वयोः ।
अध ऊर्ध्वं चतुर्दिक्षु मातर्भूयो नमो नमः ॥ ५२ ॥
हे माते, पुढच्या बाजूस, मागच्या बाजूस, डाव्याउजव्या बाजूस, खालीं, वर, चारी दिशेत आम्ही तुझ्यापुढे पुनः पुनः नम्र होत. ५२.

उपसंहर देवेशि रूपमेतदलौकिकम् ।
तदेव दर्शयास्माकं रूपं सुन्दरसुन्दरम् ॥ ५३ ॥
हे देवेश्वरि, ह्या अलौकिक स्वरूपाचा तू उपसंहार कर; व आम्हांस तेंच ( पूर्वीचे ) अतिरमणीय स्वरूप दाखव. ५३.

व्यास उवाच
इति भीतान्सुरान्दृष्ट्‍वा जगदम्बा कृपार्णवा ।
संहृत्य रूपं घोरं तद्दर्शयामास सुन्दरम् ॥ ५४ ॥
पाशाङ्‌कुशवराभीतिधरं सर्वाङ्‌गकोमलम् ।
करुणापूर्णनयनं मन्दस्मितमुखाम्बुजम् ॥ ५५ ॥
व्यास म्हणाले, ह्याप्रमाणे देव भयभीत झाले आहेत असे पाहून कृपासागर जगदंबेनें आपले घोर स्वरूप टाकलें व पाश, अंकुश, वरमुद्रा इत्यादि धारण करणारे आणि ज्याचे सर्वांग कोमल, नेत्र करुणापूर्ण व मुखकमल थोडे विकसित आहे असे सुंदर रूप दाखविलें. ५४-५५.

दृष्ट्‍वा तत्सुन्दरं रूपं तदा भीतिविवर्जिताः ।
शान्तिचित्ता प्रणेमुस्ते हर्षगद्गदनिःस्वनाः ॥ ५६ ॥
ते सुंदर स्वरूप पाहतांच भीतिरहित व त्यामुळेच ज्यांचे चित्त शांत झाले आहे आणि हर्षामुळे ज्यांचा स्वर सद्गदित झाला आहे अशा देवांनी त्याला नमस्कार केला. ५६.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां द्वितीयोऽध्यायः ॥
॥ दुसरा अध्याय समाप्त ॥ २ ॥



GO TOP