॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा ॥


॥ शमदृष्टीकथनम् ॥


श्रीदत्त उवाच -
ॐ इति गदितं गगनसमं तत्
     न परापरसारविचार इति ।
अविलासविलासनिराकरणं
     कथमक्षरबिन्दुसमुच्चरणम् ॥ १ ॥

श्री दत्त म्हणाले, ॐ असे पद गगनासारखे आहे असे असे सांगतात, पण परापराच्या सारभूत विचाराशी ते जुळत नाही. कधीही क्षय न पावणारा सबिंदु ॐकाराचा उच्चार अविलास व विलास या सृष्टिधर्माचे निराकरण कसे करणार ? (१)

इति तत्त्वमसिप्रभृतिश्रुतिभिः
     प्रतिपादितमात्मनि तत्त्वमसि ।
त्वमुपाधिविवर्जितसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २ ॥

अशा चिंतेने 'तत्त्वमसि' प्रभृति श्रुतीनी, ते तू आहेस असे आत्म्याचे प्रतिपादन केले असता तू उपाधिरहित व सर्व ठिकाणी सारखा असा होतोस. मग मन सर्वसम झाल्यानंतर व्यर्थ का शोक करीत आहेस. (२)

अध ऊर्ध्वविवर्जितसर्वसमं
     बहिरन्तरवर्जितसर्वसमम् ।
यदि चैकविवर्जितसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३ ॥

खाली किंवा वर नसून सर्वत्र सारखे अंतर्बाह्य नसून सर्व सारखे, तसेच जर एकत्वाने रहित असून सर्व सम असे ते तत्व आहे व त्याच्या सर्व साम्याविषयी मनाचा निश्चय झाला आहे तर मग का उगाच शोक करतोस ? (३)

न हि कल्पितकल्पविचार इति
     न हि कारणकार्यविचार इति ।
पदसन्धिविवर्जितसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ४ ॥

कल्पिलेले अनेक विचार व कार्यकारण वे कार्यकारण विचार नाही, त्या अर्थी सर्व सम ते आहे असा निश्चय झाला असता व्यर्थ का शोक करतोस. (४)

न हि बोधविबोधसमाधिरिति
     न हि देशविदेशसमाधिरिति ।
न हि कालविकालसमाधिरिति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ५ ॥

मन सर्वत्र सम असता ज्ञान अज्ञान प्रयुक्त समाधान नाही म्हणून देश विदेश प्रयुक्त काल अकाल प्रयुक्त समाधान नाही म्हणून का व्यर्थ शोक करतोस. (५)

न हि कुम्भनभो न हि कुम्भ इति
     न हि जीववपुर्न हि जीव इति ।
न हि कारणकार्यविभाग इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ६ ॥

घटाकाशही नाही व घटही नाही म्हणून जीवाचे शरीर व जीव आणि कार्यकारण विभाग नाही म्हणून का व्यर्थ शोक ? कारण मन स्वस्थ असता सर्व समत्वाचा अनुभव येतो. (६)

इह सर्वनिरन्तरमोक्षपदं
     लघुदीर्घविचारविहीन इति ।
न हि वर्तुलकोणविभाग इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ७ ॥

मन सर्वत्र सम झाले असता ते निर्वाण पद सर्वत्र अंतर रहित आहे. लघु, दीर्घ व वर्तुळ कोण असे त्याचे विभाग नसतात या विचारांनी रहित असे आहे व्यर्थ शोक का ? (७)

इह शून्यविशून्यविहीन इति
     इह शुद्धविशुद्धविहीन इति ।
इह सर्वविसर्वविहीन इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ८ ॥

सम मन झाले असता ते तत्त्व शून्य व अशून्य, शुद्ध व विशुद्ध, सर्व आणि पृथक यांनी रहित असे आहे म्हणून व्यर्थ शोक का करितोस ? (८)

न हि भिन्नविभिन्नविचार इति
     बहिरन्तरसन्धिविचार इति ।
अरिमित्रविवर्जितसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ९ ॥

भिन्न व अभिन्न बहिःसंधि व अंतःसंधि यांची विचार नाही म्हणून शत्रु मित्र या भावनेने रहित असे असता व्यर्थ शोक का ? (९)

न हि शिष्यविशिष्यस्वरूप इति
     न चराचरभेदविचार इति ।
इह सर्वनिरन्तरमोक्षपदं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १० ॥

मानस सर्व सारखे झाले असता शिष्य किंवा अशिष्य, चराचर भेद विचार नाही सर्वत्र अंतर रहित मोक्षपदच एक आहे म्हणून का व्यर्थ शोक करितोस. (१०)

ननु रूपविरूपविहीन इति
     ननु भिन्नविभिन्नविहीन इति ।
ननु सर्गविसर्गविहीन इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ११ ॥

रूपे आणि विरूप, पृथकरव व अपृथकरव, उत्पत्ति व प्रलय यांनीरहित आहे म्हणून मन सम झाल्यावर व्यर्थ शोक का ? (११)

न गुणागुणपाशनिबन्ध इति
     मृतजीवनकर्म करोमि कथम् ।
इति शुद्धनिरञ्जनसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १२ ॥

गुण व निर्गुण या पापानी बद्ध झालो नाही म्हणून ऐहिक व पारमार्थिक कर्म कसे करू. या विवंचनेने मन सर्वत्र सम झाले असता शुद्ध निरंजन सर्वत्र सम अशा तत्त्वाविषयी का शोक ? (१२)

इह भावविभावविहीन इति
     इह कामविकामविहीन इति ।
इह बोधतमं खलु मोक्षसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १३ ॥

मन सम झाले असता ते तत्त्व भाव व अभाव आशा व निराशा यांनी रहित आहे म्हणून ते तत्त्व बोधमय व मोक्षरूप असल्यामुळे व्यर्थ शोक का ? (१३)

इह तत्त्वनिरन्तरतत्त्वमिति
     न हि सन्धिविसन्धिविहीन इति ।
यदि सर्वविवर्जितसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १४ ॥

मानस एक झाले असता तत्त्व अंतर रहित, तसेच संधि व विसंधि यांनी रहित जरी सर्व रहित व सर्वत्र सम आहे तरी शोक का ? (१४)

अनिकेतकुटी परिवारसमं
     इह सङ्‌गविसङ्‌गविहीनपरम् ।
इह बोधविबोधविहीनपरं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १५ ॥

घर नसलेल्या, परिवार नसलेल्या, संग-असंग संबंध नसलेल्या, जाणतेनेणतेपणाचा विचार नसलेल्या एखाद्या सामान्याप्रमाणे तू येथे मनात का रडत आहेस ? (१५)

अविकारविकारमसत्यमिति
     अविलक्षविलक्षमसत्यमिति ।
यदि केवलमात्मनि सत्यमिति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १६ ॥

विकारांनी विकृत न होणारे, असत्य म्हणून कोणत्याही लक्षणानी लक्षित न होणारे व असत्य म्हणून जरी आत्मतत्त्व हेच एक केवळ सत्य आहे, तर सर्वत्र मन सम झाले असता शोक का ? (१६)

इह सर्वसमं खलु जीव इति
     इह सर्वनिरन्तरजीव इति ।
इह केवलनिश्चलजीव इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १७ ॥

सर्व सर्व म्हणून जो काय तो जीवच आहे. त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये अंतर रहित, केवल निश्चल असा एक जीवच आहे असे असता शोक का ? (१७)

अविवेकविवेकमबोध इति
     अविकल्पविकल्पमबोध इति ।
यदि चैकनिरन्तरबोध इति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १८ ॥

अविवेक, विवेक व अज्ञान, अविकल्प, विकल्प व अज्ञान जरी एक निरंतर ज्ञान असे ते आहे तर तू शोक का करितोस ? (१८)

न हि मोक्षपदं न हि बन्धपदं
     न हि पुण्यपदं न हि पापपदम् ।
न हि पूर्णपदं न हि रिक्तपदं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ १९ ॥

मन सर्वत्र सम असतो, मोक्षपद, बंध पद, पुण्यपद, पापपद, पूर्णपद, रिक्तद नाही असे असताना का शोक ? (१९)

यदि वर्णविवर्णविहीनसमं
     यदि कारणकार्यविहीन समम् ।
यदि भेदविभेदविहीनसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २० ॥

जर वर्ण विवर्ण, कार्य कारण, भेद अभेद यांनी रहित सम आहे तर शोक का ? (२०)

इह सर्वनिरन्तरसर्वचिते
     इह केवलनिश्चलसर्वचिते ।
द्विपदादिविवर्जितसर्वचिते
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २१ ॥

या ठिकाणी सर्व अंतर रहित सर्व ओतप्रेत भरलेले, केवल निश्चल व सर्व व्यापी, द्विपदादिकांनी रहित व सर्व व्यापी असे तत्त्व व मन साम्य पावले असता का रडतोस ? (२१)

अतिसर्वनिरन्तरसर्वगतं
     अतिनिर्मलनिश्चलसर्वगतम् ।
दिनरात्रिविवर्जितसर्वगतं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २२ ॥

मानस साम्यतेला पावले असता सर्वांचे अतिक्रमण करणारे निरंतर व सर्वगत, क्रीडेने निर्मल व निश्चय व सर्वगत, दिवस व रात्र यांनी रहित अशा सर्वगत तत्त्वाविषयी शोक का करतोस ? (२२)

न हि बन्धविबन्धसमागमनं
     न हि योगवियोगसमागमनम् ।
न हि तर्कवितर्कसमागमनं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २३ ॥

मानस सम झाले असता बंध मोक्ष, योग, वियोग, तर्क कुतर्क प्राप्ति नाही; मग का रडतोस ? (२३)

इह कालविकालनिराकरणं
     अणुमात्रकृशानुनिराकरणम् ।
न हि केवलसत्यनिराकरणं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २४ ॥

या ठिकाणी काल व अकाल यांचे निराकारण करणे म्हणजे थोड्याशा दीप्तीचे निराकरण करण्यासारखे आहे, पण ते केवल सत्य निराकरण नव्हे, त्या अर्थी मन समे झाले असता का व्यर्थ शोक करतोस ? (२४)

इह देहविदेहविहीन इति
     ननु स्वप्नसुषुप्तिविहीनपरम् ।
अभिधानविधानविहीनपरं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २५ ॥

या ठिकाणी देह आणि विदेह, स्वप्न आणि सुषुप्ति यांनी रहित असून, श्रेष्ठ नामनिर्देशानेही, ते रहित तर मग शोक का व्यर्थ करतोस ? (२५)

गगनोपमशुद्धविशालसमं
     अतिसर्वविवर्जितसर्वसमम् ।
गतसारविसारविकारसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २६ ॥

गगनाप्रमाणे शुद्ध विशाल व सारखे, सर्व सम, सार आणि असार विकारांनीरहित असून, मनःसाम्य झाल्यावर शोक का करतोस ? (२६)

इह धर्मविधर्मविरागतर-
     मिह वस्तुविवस्तुविरागतरम् ।
इह कामविकामविरागतरं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २७ ॥

मनःसाम्य झाले असता धर्म व अधर्म, वस्तु आणि अवस्तु काम आणि अकाम यांची अत्यंत विरक्ति हे असता व्यर्थ शोक का करतोस. (२७)

सुखदुःखविवर्जितसर्वसम-
     मिह शोकविशोकविहीनपरम् ।
गुरुशिष्यविवर्जिततत्त्वपरं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २८ ॥

सुख आणि दुःखे शोक आणि अशोक, श्रेष्ठ व गुरूशिष्य भाव रहित असे श्रेष्ठ तत्त्व असताना व मन सम झाले असता शोक का ? (२८)

न किलाङ्कुरसारविसार इति
     न चलाचलसाम्यविसाम्यमिति ।
अविचारविचारविहीनमिति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ २९ ॥

खरोखर सृष्टीमध्ये सार व असार, चल व अचल, साम्य किंवा असाम्य नाही व विचार व अविचार याने रहित तरी मनाचे साम्य झाले असता कां रडतोस ? (२९)

इह सारसमुच्चयसारमिति ।
     कथितं निजभावविभेद इति ।
विषये करणत्वमसत्यमिति
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३० ॥

आपल्या मनोभावांच्या भेदामुळे या ठिकाणी सर्व साराचेही सार सांगितले आहे. कारण विषयांचे ठिकाणी साधनत्व हे असत्य आहे. मनाचे साम्य असता तू का शोक करतोस. (३०)

बहुधा श्रुतयः प्रवदन्ति यतो
     वियदादिरिदं मृगतोयसमम् ।
यदि चैकनिरन्तरसर्वसमं
     किमु रोदिषि मानसि सर्वसमम् ॥ ३१ ॥

ज्या अर्थी बहुत प्रकारांनी श्रुति हे सर्व आकाशादिक जगत मृगजलाप्रमाणे असल्याचे सांगतात तथापि तत्त्व निरंतर व सर्व सम आहे, तर मनःसाम्य झाले असता का रडतोस ? (३१)

विन्दति विन्दति न हि न हि यत्र
     छन्दोलक्षणं न हि न हि तत्र ।
समरसमग्नो भावितपूतः
     प्रलपति तत्त्वं परमवधूतः ॥ ३२ ॥

ज्ञान हे ज्या ठिकाणी मुळीच नाही छंदोलक्षण ही जेथे नाही. साम्य रसामध्ये मग्न झाल्याने ज्याचे अंतःकरण परम पवित्र झाले आहे असा अवधूत श्रेष्ठ तत्त्व सांगतो. (३२)

इति अवधूतगीतायां शमदृष्टिकथनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥

ह्याप्रमाणे दत्तात्रेय विरचित अवधूत गीतेतील स्वामी कार्तिक संवादविषयक आत्मसंवित्युपदेशापैकी शमदृष्टीकथन नावाचा पांचवा अध्याय संपूर्ण झाला.

GO TOP