॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक सातवा : चौदा ब्रह्मांचा

समास पहिला : मंगलाचरण

॥ श्रीराम ॥

विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू ।
त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥
मदोन्मत्त हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे, जो एकदंत, तीन नेत्र असलेला आहे व जो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशू धारण केला आहे, तो प्रसन्नवदन गजमुख हा सर्व विद्यावंतांचा पूर्वज म्हणजेच मूळ पुरुष आहे. (१)

कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ ।
लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासी आले ॥ २॥
कुबेरापासून धन प्रास होते, वेदापासून परमार्थ लाभतो, तर लक्ष्मीमुळे ऐश्वर्यसंपन्न झालेले लोक भाग्यवान होतात. (२)

तैशी मंगळमूर्ती आद्या । तियेपासून झाल्या सकळ विद्या ।
तेणें कवि लाघवगद्या । सत्पात्रें जाहलीं ॥ ३॥
त्याप्रमाणे मंगलमूर्ती हा सर्व विद्यांचा जनक असून त्याच्या-पासूनच सर्व विद्या झाल्या आहेत. त्याच्या कृपेने प्रास झालेल्या विद्येमुळे कवी गद्य-पद्य रचना निर्माण करून मान्यवंत ठरले. (३)

जैशीं समर्थाचीं लेकुरें । नाना अलंकारीं सुंदरें ।
मूळपुरुषाचेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४॥
जशी श्रीमंतांची मुले नाना सुंदर अलंकारांनी शोभतात, तसे मूळ पुरुषाच्या कृपेने कवी फार शोभून दिसतात. (४)

नमूं ऐशिया गणेंद्रा । विद्याप्रकाशपूर्णचंद्रा ।
जयाचेनि बोधसमुद्रा । भरतें दाटे बळें ॥ ५॥
अशा त्या गणेंद्राला मी नमन करतो. पूर्णचंद्राला पाहून सागराला भरती यावी, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे. (५)

जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मूळारंभ ।
जो परात्पर स्वयंभ । आदि अंतीं ॥ ६॥
जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष, आदिपुरुष असून ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे, पण जो या सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे, जो आधीही आहे व अंतीही आहे; (६)

तयापासून प्रमदा । इच्छाकुमारी शारदा ।
आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७॥
त्याच्याचपासून ' बहु स्थाघू' ही इच्छा, ही क्कणरूपी शारदाकुमारी उत्पन्न झाली आहे. आदित्यापासून मृगजळाची गोदावरी वाहावी, तशी या मूळपुरुषापासून शारदा म्हणजे मूळमाया झाली आहे. (७)

जे मिथ्या म्हणतांच गोंवी । मायिकपणें लाघवी ।
वक्तयास वेढा लावी । वेगळेपणें ॥ ८॥
तिला मिथ्या म्हणावे तर ती लाघवी आहे, तसेच मायिक असे म्हणणाऱ्यालाच ती मोहात गुंतविते. मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असतानाच मीपणाच्या जाणिवेमुळे नकळत वेगळा पडतो. (८)

जे द्वैताची जननी । कीं ते अद्वैताची खाणी ।
मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडांची ॥ ९॥
ती द्वैताची जननी आहे की अद्वैताची खाण आहे ! माया दोन प्रकारची आहे असे म्हणतात. अविद्या माया द्वैताची जननी, त्यास उत्पन्न करणारी आहे, तर विद्या माया ही अद्वैताची खाण आहे, म्हणजे तिच्या योगेच अद्वैतानुभव येतो. ती मूळमाया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून यकते. (९)

कीं ते अवडंबरी वल्ली । अनंत ब्रह्मांडें लगडली ।
मूळपुरुषाची माउली । दुहितारूपें ॥ १० ।
ती मूळमाया म्हणजे विनासायास उगवणारी वेली आहे. ती अनंत ब्रह्मांडेरूपी फळांनी लगडलेली आहे. ती मूळपुरुषाची आई आणि कन्याही आहे. (परब्रह्मापासून मूव्याया व तिच्यापासून मूळपुरूष झाले.) (१०)

वंदूं ऐशी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता ।
आतां आठवीन समर्था । सद्‌गुरूसी ॥ ११॥
अशी जी वेदमाता आहे आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे तिला मी वंदन करतो. आता यानंतर मी समर्थ अशा सदुरूंचे स्मरण करतो. (११)

जयाचेनि कृपादृष्टी । होय आनंदाची वृष्टी ।
तेणें गुणें सर्व सृष्टी । आनंदमय ॥ १२॥
त्यांच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते, एवढेच नव्हे, तर त्या सुखाने सर्व वृष्टीच आनंदमय बनते. (१२)

कीं तो आनंदाचा जनक । सायुज्यमुक्तीचा नायक ।
कैवल्यपददायक । अनाथबन्धू ॥ १३॥
सदुरू हे आनंदाचे जनक असतात, सायुज्यमुक्तीचे नायक असतात, सायुज्यमुक्तीने त्यांना वरले असते. ते अनाथांचे बंधू म्हणजे आश्रयदाते असतात व कैवल्यपदाची प्राप्ती करून देतात. (१३)

मुमुक्षचातकीं सुस्वर । करुणां पाहिजे अंबर ।
वोळे कृपेचा जलधर । साधकांवरी ॥ १४॥
मुमुक्षू हे जणू चातकपक्षी असतात आणि ते सुस्वराने सदुरूरूपी जलधराची त्याने कृपावृष्टी करावी म्हणून आळणी करीत असतात. तेव्हा सदुरूंच्या कृपारूपी आकाशात सदुरुरूपी कृपामेघ प्रगटहोतात व कृपावृष्टी करून मुमुधुरूपी चातकाची तहान शमवतात. (१४)

कीं तें भवार्णवींचें तारूं । बोधें पाववी पैलपारू ।
महाआवर्तीं आधारू । भाविकांसी ॥ १५॥
किंवा सदुरू हे या भवसागरातील जहाजच आहेत व आत्मबोध करून भाविकांना या सागराच्या पैलतीरास पोहोचवितात. (१५)

कीं तो काळाचा नियंता । नाना संकटीं सोडविता ।
कीं ते भाविकाची माता । परम स्नेहाळ ॥ १६॥
सदुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात, नाना संकसंतून भाविकांना सोडवतात आणि भाविकांची ते अति स्नेहाळू अशी माताच आहेत. (१६)

कीं तो परत्रींचा आधारू । कीं तो विश्रांतीचा थारू ।
नातरी सुखाचें माहेरू । सुखरूप ॥ १७॥
सदुरू हे परमार्थात मार्गदर्शन करीत असल्याने मुमुधूंना त्यांचा मोठा आधार वाटतो. त्यांच्या सान्निध्यातच खरी विश्रांती भाविकांना मिळते, म्हणून ते म्हणजे साधकांचे जणू हक्काचे, विश्रांतीचे स्थळ असते. म्हणूनच सदुरूंना सुखाचे माहेर असे म्हटले जाते. त्यांच्याजवळ सुखालाही सुख प्रास होते. (१७)

ऐसा सद्‌गुरु पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी ।
देहेंविण लोटांगणीं । तया प्रभूसी ॥ १८॥
असे हे सदुरू साक्षात परब्रह्माप्रमाणेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात. त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसर तुटतो. अशा त्या सदुरूंना माझ्या प्रभूंना, स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे मीपणाविरहित लोयगण घालतो. (१८)

साधु संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९॥
याप्रमाणे श्रीसदुरुवंदन केल्यानंतर इतर सर्व साधू संत आणि सजन श्रोते यांनाही वंदन करून वक्ता म्हणतो आहे की, आता पुढील कथानुसंधानही आपण सावधपणे ऐका. (१९)

संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन ।
माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २०॥
संसार हेच दीर्घ काळ चालणारे स्वप्न असून त्यात लोभामुळे माझी कांता, माझे धन, माझे कन्या-पुत्र असे लोक नाना प्रकारे बरळतात (२०)

ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्रकाश लोपला ।
अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१॥
आत्यज्ञानरूपी सूर्य मावळल्याने आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा होतो आणि अवघा ब्रह्मांडगोल अंधाराने पूर्ण व्यापला जातो. (२१)

नाहीं सत्वाचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें ।
सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२॥
ज्यायोगे मार्ग सापडला असता त्या सत्त्वगुणरूपी चांदण्याचाही अभाव असल्याने मार्ग दिसत नाही. सर्व प्रकारच्या प्रांतीच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने वेढून टकल्याने आपण स्वतःलाही पाहू शकत नाही, अशी स्थिती होते. (२२)

देहबुद्धि‍अहंकारे । निजले घोरती घोरे ।
दुःखें आक्रंदती थोरे । विषयसुखाकारणें ॥ २३॥
अज्ञानरूपी निद्रेत झोपलेले असताना देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात आणि विषयसुख मिळावे म्हणून मोठ्याने आक्रोश करीत असतात. (२३)

निजले असतांचि मेले । पुनः उपजतांच निजले ।
ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४॥
अज्ञानरूपी निद्रेत असतानाच ते मरतात आणि परत जन्माला आले की, परत अज्ञानरूपी निद्रेत झोपी जातात. याप्रकारे अनेक लोक असेच आले आणि गेले. (२४)

निदसुरेपणेंचि सैरावैरा । बहुतीं केल्या येरझारा ।
नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥ २५॥
अज्ञानरूपी निद्रेच्या भराने असंख्य जीव स्वैरपणे जन्ममृत्यूच्या येरझारा करीत राहतात. परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात. (२५)

त्या कष्टांचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान ।
म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६॥
हे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच ते ज्ञान करून देण्यासाठीच अध्यात्म ग्रंथाची आवश्यकता असते. (२६)

सकळ विद्यामध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार ।
दशमाध्यायीं शार्ङ्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७॥
जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या हीच सर्वश्रेष्ठ आहे, असे श्रीमद् भगवद्‌गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. (२७)

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥
अर्थ-सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ती मीच होय. प्रवक्त्यांचा वाद तोही मीच होय. (असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात.)

याकारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्मविद्येचा परमार्थ ।
पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८॥
या कारणानेच अध्यात्मविद्येचा परमार्थ ज्यांत प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत-ग्रंथ- श्रवण जो श्रोता जीवाचे कान करून ऐकतो, सर्व लक्ष श्रवणात एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील अर्थ ग्रहण करू शकतो. (२८)

जयाचें चंचळ हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये ।
सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९॥
ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल त्यानेही काहीही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये, वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करावे. जर असे केले नाही, तर त्या अध्यात्मग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने जो अलभ्य लाभ होतो तो होणार नाही, तो अलभ्यच राहील (२९)

जयास जोडला परमार्थ । तेणें पहावा हा ग्रंथ ।
अर्थ शोधितां परमार्थ । निश्चयो बाणे ॥ ३०॥
ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल मनापासून आवड असेल त्याने हा अध्यात्मग्रंथ जरूर वाचावा. वारंवार वाचून अर्थासंबंधी शोध घेऊ लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी बाणेल (३०)

जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ ।
नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१॥
ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही, त्याला या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. आंधळ्या माणसाला डोळ्यांच्या अभावी द्रव्यसाठा दिसत नाही. (३१)

एक म्हणती मराठें काये । हें तों भल्यानें ऐकों नये ।
तीं मूर्खें नेणती सोयें । अर्थान्वयांची ॥ ३२॥
कुणी एक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठीतील अध्यात्मग्रंथ ऐकू नये, असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. ग्रंथांतील शब्दांचा अन्वयार्थ लावून त्यांतील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. (३२)

लोहाची मांदूस केली । नाना रत्नेंच सांठविलीं ।
तीं अभाग्यानें त्यागिलीं । लोखंड म्हणोनि ॥ ३३॥
लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रसांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग करावा, (३३)

तैशी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत ।
नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥
त्याप्रमाणेच भाषा मराठी म्हणून च्या ग्रंथांत वेदांत आणि सिद्धांताचा अर्थ, स्पष्टीकरण मराठीत केलेले असते, त्यांचा भ्रमिष्ट लोक त्यांची बुद्धी मंद असल्याने त्या ग्रंथाचे महत्त्व न जाणून त्याग करतात. (३४)

अहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण ।
द्रव्य घ्यावें सांठवण । पाहोंचि नये ॥ ३५॥
सहजगत्या, काही श्रम न पडता जर द्रव्य सापडले, तर त्याचा त्याग करणे हा मूर्खपणा आहे. द्रव्य कशात साठवले आहे ह्याचा विचार न करता द्रव्य घ्यावे. (३५)

परिस देखिला अंगणीं । मार्गीं सांपडला चिंतामणी ।
अव्हा वेल महागुणी । कूपामध्यें ॥ ३६॥
समजा, परीस अंगणात सापडला, वाटेने जात असता वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ, उजव्या बाजूने वाढणारी वेल घराच्या विहिरीत आढळून आली तर परीस, चिंतामणी किंवा कल्पलता अयोग्य ठिकाणी आढळली, म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. (३६)

तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि सप्रचीत ।
अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७॥
त्याप्रमाणे मराठीत जर सोप्पा शब्दात अनुभवसिद्ध असे अद्वैत तत्त्वज्ञान प्रास होत असेल, तर अचानक लाभणाऱ्या त्या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. (३७)

न करितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम ।
सत्समागमाचें वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८॥
विद्याप्रासीसाठी स्तुत्यत्तीचे जगही श्रम करावे न लागता केवळ सत्समागमामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होतो. सत्समागमाचे हेच तर वर्म-रहस्य आहे. (३८)

जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे ।
सकळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९॥
जो शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही, तो सर्व शास्त्रार्थ सत्समागमामुळे स्वानुभव येऊन कळतो. (३९)

म्हणोनि कारण सत्समागम । तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम ।
जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंचि असे ॥ ४०॥
म्हणून शास्त्रार्थ कळण्यास विद्याप्रासीसाठी करावे लागतात तसे श्रम करण्याची आवश्यकता नाही, तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्यायोगे मनुष्यजन्माचे सार्थक होते, ते वर्म वेगळेच आहे. (४०)

भाषाभेदाश्च वर्तन्ते अर्थ एको न संशयः ।
पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १॥
श्लोक अर्थ - भाषांमध्ये भेद असतो, पण त्यात अर्थ एकच असतो. खाण्याची वस्तू वेगवेगळ्या दोन भांड्यांत ठेवली, तरी त्यांच्या रुचीमध्ये फरक पडत नाही.

भाषापालटें कांहीं । अर्थ वाया जात नाहीं ।
कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपासीं ॥ ४१॥
भाषा जरी बदली तरी अर्थात काही फरक पडत नाही. सर्व कार्यसिद्धी अर्थावरच अवलंबून असते. (४१)

तथापि प्राकृताकरितां । संस्कृताची सार्थकता ।
येर्ह व्हीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२॥
तथापि खरी गोष्ट अशी आहे, अध्यात्मग्रंथ प्राकृतात झाल्यामुळेच संस्कृतमधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येत आहे. नाहीतर संस्कृत ग्रंथात जो गुप्त अर्थ भरलेला आहे, त्याला कोण जाणू शकले असते ? (४२)

आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें ।
उत्तम घेऊन त्याग करणें । सालीटरफलांचा ॥ ४३॥
आता हे बोलणे पुरे झाले. उत्तम सारभाग ग्रहण करून साली, टरफलांचा त्याग करावा, त्याप्रमाणे भाषा कुठलीही का असेना तिचा विचार न करता त्यातील अर्थावर लक्ष केंद्रित करावे. त्याचे ग्रहण करावे. (४३)

अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करवी खटपट ।
नाना अहंतेनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४॥
अध्यात्मग्रंथातील अर्थ हे सार आहे त्याचे खरे महत्त्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्त्व नाही. पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालीत बसतात त्या नाना प्रकारच्या अहेतेमुळे ते स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. (४४)

शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा ।
अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५॥
वाच्यांश म्हणजे शब्द व लक्ष्मांश म्हणजे अर्थ. ज्या वेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो, अर्थावरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तर इतका अगाध आहे की तो शब्द व अर्थ यांच्याही पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही हे आपल्याला कळायला हवे. (४५)

मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणें ।
स्वानुभवाचिये खुणें । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६॥
मुक्या माणसांची एक भाषा असते. ती ज्याची त्यालाच कळते, म्हणजे दुसऱ्या मुक्याला कल्ले किंवा ती भाषा जो जाणत असेल त्यालाच ती कळते. त्याचप्रमाणे स्वानुभवाच्या च्या खुणा, त्या स्वानुभवीच जाणू शकतो. (४६)

अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा ।
जयासि बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥ ४७॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता भेयवा असे वक्याला वाटत असते. तसा श्रोता भेटला की वक्याला बोलण्यात हौस वाटते. (४७)

परीक्षावंतापुढें रत्नस । ठेवितां होय समाधान ।
तैसें ज्ञानियापुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८॥
रत्नपारखी मनुष्य असेल तर त्याच्यापुढे रत्ने ठेवताना समाधान वाटते. कारण तो त्याचे मूल्य बरोबर जाणतो. त्याप्रमाणेच ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीपुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. (४८)

मायाजाळें दुश्चित होय । तें निरूपणें कामा नये ।
संसारिका कळे काय । अर्थ येथींचा ॥ ४९॥
मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले असते त्याला अध्यात्माचे निरूपणही उपयोगी पडत नाही. जो सांसारिक आहे, त्याला आध्यात्मिक ग्रंथांचा अर्थ कसा कळणार ? (४९)

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन ।
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो । अव्यवसायिनाम् ॥ १॥
श्लोक अर्थ-हे कुरुनंदना स्वरूपनिश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात त्यांना स्वरूपनिश्चय करता येत नाही. (१)

व्यवसायी जो मळिण । त्यासि न कळे निरूपण ।
येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसीं ॥ ५०॥
जो अनेक धंदे करणारा असतो, ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नसते, त्याला अध्यात्मनिरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ कळण्यास अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता यांची आवश्यकता असते. (५०)

नाना रत्नें नाना नाणीं । दुश्चितपणें घेतां हानी ।
परीक्षा नेणतां प्राणी । ठकला तेथें ॥ ५१॥
एखाद्या माणसापुढे नाना रत्ने, अनेक प्रकारची नाणी पडलेली आहेत किंवा कुणी आणून टकली तरी त्याला रत्नांची अथवा नाण्यांची पारख करता येत नसेल आणि त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलली तरी त्याची फसगत होते. (५१)

तैसें निरूपणीं जाणा । आहाच पाहतां कळेना ।
मराठेंचि उमजेना । कांहीं केल्या ॥ ५२॥
तसे अध्यात्माचे विवेचन अगदी मराठीत जरी असले तरी वरवर ऐकले, तर ते काही केल्या उमजत नाही. (५२)

जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची ओल ।
ते संस्कृतापरी सखोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३॥
जे अध्यात्म-निरूपण वक्याच्या अनुभवाच्या बोक्ये युक्त असते, ते जरी प्राकृतात असले तरी संस्कृतापरू- अधिक सखोल असते. (५३)

माया ब्रह्म वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें ।
तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४॥
च्या निरूपणाने माया व ब्रह्म यांचे स्वरूप कडू येते, त्याला अध्यात्म म्हणतात. तरी आता प्रथम मायेचें स्वरूप जाणून घ्या. (५४)

माया सगुण साकार । माया सर्व विकार ।
माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५॥
माया ही सगुण-साकार असते. सर्व विकार मायेच्छ ठिकाणीच असतात. हा पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच माया. (५५)

माया दृश्य दृष्टीस दिसे । मायाभास मनास भासे ।
माया क्षणभंगुर नासे । विवेकें पाहतां ॥ ५६॥
मायेच्या योगेच ही दृश्य वृष्टी आपल्या डोळयत्न दिसत असते. मायेच्यामुळे मनाला नाना भास होतात माया ही क्षणभंगुर असून साससारविवेक केला की त्र्यं नाश पावते. (५६)

माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप ।
मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७॥
अनेक ब्रह्मांडे, हे सर्व विश्व हे मायेचेच स्वस्क आहे. माया ही विष्णूचे स्वरूप आहे, म्हणजे निर्गुण ब्रह मायेच्या योगेच सगुण- साकार बनते. मायेची सीमा अस्त म्हणजे अवर्णनीय आहे; तिच्याबद्दल जितके बोत्सv तेवढे थोडेच आहे. (५७)

माया बहुरूप बहुरंग । माया ईश्वराचा संग ।
माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८॥
माया बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंगे घेते. तै बहुरंगी म्हणजेच बहुढंगीही आहे. ईश्वराच्या ठिकाणीह मायेचे अस्तित्व असते. कारण मायेशिवाय सगुण, निराकार व साकार प्रगटू शकतच नाही. प्रथमदर्शनी असे वाक्य की ती अखिल अभंग आहे. (५८)

माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना ।
माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९॥
' मायेमुळे दृश्य सृष्टीची रचना झाली. आपली कल्पना हे मायेचेच रूप आहे. मात्र आत्मज्ञान झाल्याखेरीज अष्ट उपायांनी ती नष्ट होत नाही. (५९)

ऐशी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६०॥
याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचे वर्णन केले आहे. आता श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. (६०)

पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान ।
जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१॥
कारण आता पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगे मायेचे भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सांगितले जाईल, असे समर्थ म्हणतात. (६१)

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'मंगलाचरणनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : ब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निराकार ।
ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधू ॥ १॥
श्रीसमर्थ सांगतात की, ब्रह्म हे गुणरहित, आकारहित, संगरहित आणि विकाररहित असून त्याला पारावार नाही, असे साधू लोक म्हणतात. (१)

ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं एक ।
ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २॥
ब्रह्म हे सर्व चराचराला व्यापून आहे, अनेकांत असून एक आहे व ते शाश्वत आहे असे सर्व शास्त्रे सांगतात. (२)

ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत ।
ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३॥
ब्रह्म अढळ आहे, त्याला अंत नाही, ते सदोदित असणारे असून कल्पनेरहित निर्विकल्प असे आहे. (३)

ब्रह्म दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वानिराळें ।
ब्रह्म इन्द्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४॥
या दृश्य वृष्टीहून ते वेगळे आहे, शून्यत्वाहूनही निराळे आहे. ते मनबुद्धीअगोचर असल्याने इंद्रियांच्या योगे त्याला जाणता येत नाही. (४)

ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना ।
ब्रह्म सद्‌गुरुविण येइना । अनुभवासी ॥ ५॥
ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे मूर्ख लोक ब्रह्म नाही असेच म्हणतात. साधूची कृपा झाल्याखेरीज ब्रह्माचा अनुभव येत नाही. (५)

ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्मा ऐसें नाहीं सार ।
ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६॥
ब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखे दुसरे सार नाही. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्मादिकांनाही ते इंद्रियांनी जाणता येत नाही. (६)

ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहूनि अनारिसें ।
परी तें श्रवणअैभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७॥
ब्रह्माचे वर्णन शब्दांनी कशाही प्रकारे केले तरी ते त्या वर्णनाहून विलक्षण आहे. पण अध्यात्म- श्रवण, आणि ध्यानाभ्यास इत्यादींच्या योगे त्याची प्राप्ती होऊ शकते. (७)

ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत ।
ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥ ८॥
ब्रह्माला अनंत नामे असली तरी वास्तविक ते नामातीत आहे. ब्रह्माला समजावून सांगण्याच्या दृष्टीने जो दृष्टांत दिला जातो, तो त्यास शोभतच नाही. (८)

ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें ।
ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें । कदा न साहती ॥ ९॥
ब्रह्मासारखे दुसरे काही नाहीच, हेच खरे असल्याने त्याला दृष्टान्त देऊन त्याचे वर्णन करण्यात काही अर्थ नसतो. (९)

यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥
अर्थ-वाणी व मन ते अप्राप्य आहे असे म्हणून तेथून परत येतात.

जेथें वाचा निवर्तती । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती ।
ऐसें बोलिती श्रुती । सिद्धांतवचन ॥ १०॥
वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नाही, ती माघारी फिरते. मनाच्या योगेही ब्रह्मप्रासी होऊ शकत नाही, असे सिद्धान्तवचन सुती- माउली सांगते. (१०)

कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं ।
म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११॥
मन हे कल्पनामय असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर कल्पनाच नाही, म्हणून हे वाक्य काही खोटेनाही. (११)

आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त ।
ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्‌गुरुविण नाहीं ॥ १२॥
आता जे मनाला प्रास होऊ शकत नाही त्याची प्राप्ती कशी होईल, असे जर म्हणाल, तर त्याचे उत्तर असे आहे की, सदुरूशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. (१२)

भांडारगृहें भरलीं । परी असती आडकलीं ।
हातास न येतां किल्ली । सर्वही अप्राप्त ॥ १३॥
भांडारगृहात सामान भरलेले असते पण आपल्या हातात जर किल्ली नसेल, तर ते कुलुपबंद खोलीत ठेवले असल्याने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. (१३)

तरी ते किल्ली कवण । मज करावी निरूपण ।
ऐसी श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४॥
हे ऐकून श्रोता वक्ताला विचारू लागला की, तर मग ती किल्ली कोणती, हे आपण मला सांगावे. (१४)

सद्‌गुरुकृपा तेचि किल्ली । जेणें बुद्धी प्रकाशली ।
द्वैतकपाटें उघडलीं । एकसरां ॥ १५॥
सदुरुकृपा हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञान प्रकाशते आणि त्यामुळे एकाएकी द्वैताची दारे उघडतात म्हणजेच द्वैत नाहीसे होऊन तो आत्मरूपाशी ऐक्य पावतो. (१५)

तेथें सुख असे वाड । नाहीं मनासी पवाड ।
मनेंविण कैवाड । साधनांचा ॥ १६॥
तेथे अमर्याद सुख असते, पण मनाला तेथे प्रवेश नसतो. मनाशिवायच साधन चालू राहते. (१६)

त्याची मनाविण प्राप्ती । कीं वासनेविण तृप्ती ।
तेथें न चले व्युत्पत्ती । कल्पनेची ॥ १७॥
आक्याची प्राप्ती मनाशिवाय होते, कारण मन तेथे पोहोचूच शकत नाही. वासना नसतानाच तृप्ती लाभते, त्या सहजावस्थेत कल्पनेची शक्तीही कुंठित होते. (१७)

तें परेहुनी पर । मनबुद्धि‍अगोचर ।
संग सोडितां सत्वर । पाविजे तें ॥ १८॥
परब्रह्म हे परावाणीच्या स्कृरणाच्याही पलीकडले असते. ते मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादींनी जाणता येत नाही. आणि मीपणाचा संग सोडताच तात्काळ त्याची प्राप्ती होते. (१८)

संग सोडावा आपुला । मग पहावें तयाला ।
अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९॥
आपण आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावे असे मी म्हणताच अनुभवी जे असतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित सुखावतील. (१९)

आपण म्हणजे मीपण । मीपण म्हणजे जीवपण ।
जीवपण म्हणजे अज्ञान । संग जडला ॥ २०॥
आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जे मीपण असते ते होय. मीपण म्हणजेच जीवपण, आणि जीवपण म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा संग जडतो. (२०)

सोडितां तया संगासी । ऐक्य होय निःसंगासी ।
कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१॥
या संगाचा त्याग केला की निःसंगाशी ऐक्य होते म्हणजे जीव-ब्रह्मैक्य होते. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. (२१)

मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२॥
मी कोण हे माहीत नसणे यालच अज्ञान म्हणतात. ते अज्ञान नाहीसे झाले की, सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. (२२)

देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण ।
तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३॥
देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो. परब्रह्माच्या ठिकाणी अहंभावाचा पूर्णपणे नाश होतो. (२३)

ऊंच नीच नाहीं परी । रायारंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ॥ २४॥
परब्रह्माच्या ठिकाणी उच्च-नीच अथवा गवरक किंवा पुरुष-स्वी अशी विषमता नाही. ते एकच पद आहे. (२४)

ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे व शूद्राचे ब्रह्म ते ओवळे असा भेद तेथे असतच नाही. (२५)

ऊंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापाशीं । मुळींच नाहीं ॥ २६॥
राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेद ब्रह्मापाशी नसतो. (२६)

सकळांस मिळोन ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७॥
सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे. त्या ठिकाणी अनेकता नाही. रंक असो वा ब्रह्मादिक असोत, त्या एका ब्रह्माच्या ठिकाणीच जातात. (२७)

स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८॥
स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकातील आत्मज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून परब्रह्म हे एकच विश्रांतीचे स्थळ आहे. (२८)

गुरुशिष्यां एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९॥
गुरूला व शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. तेथे भेदभाव नाही. पण देहबुद्धी पूर्णपणे सोडावी लागते. (२९)

देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३०॥
देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की, अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते. ' एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति ' असे सुतिवचन आहे. (ब्रह्म एकच एक आहे, दुसरे नाही.) (३०)

साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले ।
अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ३१ ।
साधू-संत हे देहाने वेगवेगळे दिसतात, पण अंतर्यामी ते एकाच परब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. सर्व मिळून एकच देहातीत वस्तू म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहातात. (३१)

ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अधिक उणें ।
उणें भावील तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२॥
ब्रह्म कधी नवे नसते किंवा कधी जुनेही होत नाही. ते कमी- अधिकही होत नाही. नेहमी एकसारखेच अधुण्ण असते. जो कोणी त्यास उणे ठरवील तो देहबुद्धीचा कुत्रा असतो. (३२)

देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चुके समाधानसमयो । देहबुद्धियोगें ॥ ३३॥
ज्यांची देहबुद्धी दृढ असते त्यांच्या मनात आत्म्याविषयी अनेक संशय असतात. त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही. या नरदेहात असतानाच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते, पण देहबुद्धी दृढ झाल्याने ही संधीही चुकते. (३३)

देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण ।
मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देह ॥ ३४॥
देहाला महत्त्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. जे चतुर अथवा विवेकी लोक असतात ते देह मिथ्या आहे, हे जाणूनच देहाची निंदा करतात. (३४)

देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान ।
पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५॥
देहास मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाव्यात असतो. त्याची दृढ असलेली देहबुद्धी परत त्याला जन्म घेण्यास भाग पाडते. (३५)

देहाचेनि थोरपणें । समाधानासि आणिलें उणें ।
देह पडेल कोण्या गुणें । हेंही कळेना ॥ ३६॥
देहास अवास्तव महत्त्व दिल्यामुळे समाधान घटते. शिवाय ज्याला इतके महत्त्व दिले जाते, तो देह कोठल्या कारणाने केव्हा, कुठे पडेल हेही कळत नाही. (३६)

हित आहे देहातीत । म्हणोनि निरूपिती संत ।
देहबुद्धीनें अनहित । हो)ऊंचि लागे ॥ ३७॥
सर्व संत असे सांगतात की, देहातीत होण्यातच जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी धारण केल्याने अहितच होत असते. (३७)

सामर्थ्यबळें देहबुद्धि । योगियांस तेही बाधी ।
देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८॥
सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्यायोगे योग्याच्या मनातही मी श्रेष्ठ, अशी मीपणाची जाणीव वाढू लागते (आणि ते त्याला कळतही नाही.) (३८)

म्हणोनि देहबुद्धि झडे । तरीच परमार्थ घडे ।
देहबुद्धीनें बिघडे । ऐक्यता ब्रह्मींची ॥ ३९॥
म्हणून देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमार्थाची प्राप्ती होऊ शकते. देहबुद्धी जोपर्यंत असते, तोपर्यंत जीवब्रह्मैक्य अनुभवास येत नाही. (३९)

विवेक वस्तूकडे ओढी । देहबुद्धि तेथूनि पाडी ।
अहंता लावूनि निवडी । वेगळेपणें ॥ ४०॥
आत्मानात्मविवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे मन ओढ घेऊ लागते, तिची प्राप्ती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते, पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते, आणि देहासंबंधी अहंता उत्पन्न झाली की, ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते. (४०)

विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।
सत्य ब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१॥
म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या साहाय्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे. (४१)

सत्य ब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।
प्रत्युत्तर दे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२॥
हे ऐकून श्रोत्याने ' सत्य ब्रह्म कोणते ' असा प्रश्न केला. तेव्हा वक्याने श्रोत्यास जे प्रत्युत्तरदिलेते ऐका. (४२)

म्हणे ब्रह्म एकचि असे । परी तें बहुविध भासे ।
अनुभव देहीं अनारिसे । नाना मतीं ॥ ४३॥
वास्तविक ब्रह्म एकच आहे, पण ते अनेक प्रकारे भासते. कारण लोकांची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकारे अनुभवास येते. (४३)

जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासी मानलें ।
तेथेंचि त्याचें विश्वासलें । अंतःकरण ॥ ४४॥
ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो, त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो व त्याच्या अंतःकरणात त्याबद्दलच विश्वास उत्पन्न होतो. (४४)

ब्रह्म नामरूपातीत । असोनि नामें बहुत ।
निर्मळ निश्चळ निवांत । निजानन्द ॥ ४५॥
खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे. तरी त्याला अनेक नावे दिली जातात. उदाहरणार्थ : निर्मळ, निश्चळ, निवांत, निजानंद, (४५)

अरूप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरंपार ।
अदृश्य अतर्क्य अपार । ऐशीं नामें ॥ ४६॥
अरूप, अलक्ष्म, अगोचर अच्युत, अनंत, अपरपर अदृश्य, अतर्क्य, अपार अशी अनेक नावे आहेत. (४६)

नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप ।
स्वस्वरूप साक्षरूप । ऐशीं नामें ॥ ४७॥
नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप स्वस्वरूप अशीही अनेक नावे आहेत. (४७)

शून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ ।
सर्वात्मा जगज्जीवन । ऐशीं नामें ॥ ४८॥
कुणी शून्य म्हणतात, तर कुणी सनातन, कुणी सर्वेश्वर तर कुणी सर्वज्ञ, सर्वाला, जगजीवन अशी विविध नामे देतात. (४८)

सहज आणि सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत ।
शाश्वत आणि शब्दातीत । ऐशीं नामें ॥ ४९॥
सहज, सदोदित, शुद्ध, बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत अशी अनेक नामे आहेत. (४९)

विशाळ विस्तीर्ण विश्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार ।
आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐशीं नामें ॥ ५०॥
विशाल, विस्तीर्ण, विश्वंभर विमल वस्तू व्योमाकार आत्या, परमात्मा, परमेश्वर अशीही नामे आहेत. (५०)

परमात्मा ज्ञानघन । एकरूप पुरातन ।
चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१॥
परमात्मा, ज्ञानघन, एकरूप, पुरातन, चिदूप, चिन्मात्र अशी अनाम्याची अनेक नामे आहेत. (५१)

ऐशीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत ।
त्याचा करावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२॥
अशी असंख्य नावे असली तरी तो परेश नामातीतच आहे. पण त्याच्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नामे ठेवली आहेत. (५२)

तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम ।
तें एकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३॥
ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे. तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहे. ते एकच एक आहे, तेथे दुसरे काहीही नाही. (५३)

तेंचि कळावयाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चयो बाणे ॥ ५४॥
ते एकले एकच आहे, हा निश्चय बाणावा म्हणून ते समजण्यासाठी येथे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगत आहे, ती श्रवण करावीत. (५४)

खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें ।
चौदा ब्रह्में शास्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५॥
जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यावर जे उरते ते खरे असे जाणावे. आता शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे येथे चौदा ब्रह्मांचे वर्णन केले जाईल असे समर्थ म्हणतात. (५५)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे 'ब्रह्मनिरूपणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : चतुर्दशब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।
जेणें होये समाधान । साधकांचें ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता ज्यायोगे साधकांचे समाधान होईल ते ब्रह्मज्ञान मी सांगतो. तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे. (१)

रत्नें साधाया कारणें । मृत्तिका लागे एकवटणें ।
चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २॥
खे मिळविण्यासाठी खाणीतून खणून आधी माती गोळा करावी लागते. मग त्यातून रखे निवडावी लागतात. त्याप्रमाणे येथे प्रथम चौदा ब्रह्माची लक्षणे जाणावीत. (२)

पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत ।
पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३॥
एखादी गोष्ट संकेताने दाखवून द्यायची असली तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो. कुठलाही दृष्टांत द्वैताशिवाय देता येत नाही. त्याप्रमाणे आधी पूर्वपक्ष व्यवस्थित मांडून त्याचे खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधी बोलताच येत नाही. (३)

आधीं मिथ्या उभारावें । मग तें ओळखोन सांडावें ।
पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४॥
आधी जे मिथ्या आहे, ते डोळ्यांसमोर उभे राहील अशा प्रकारे त्याचे वर्णन करावे लागते व त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो. म्हणजे नंतर जे सत्य असेल ते अंतःकरणात बाणते. (४)

म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सिद्धांत ।
येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५॥
म्हणून प्रथम चौदा ब्रह्मांच्या खुणा सांगतो म्हणजेच पूर्वपक्ष मांडतो. तो श्रोत्यांनी क्षणभर चित्त अत्यंत एकाग्र करून सावधपणे श्रवण करावा, म्हणजे नंतर त्यांना सिद्धांत व्यवस्थित कळेल. (५)

पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरं ब्रह्म ।
तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६॥
पहिले शब्दब्रह्म, दुसरे ३५ हे एकाक्षर ब्रह्म, सुती ज्याचे वर्णन करते ते खं ब्रह्म हे तिसरे होय. (६)

चौथें जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म ।
सहावें सत्ताब्रह्म । साक्षिब्रह्म सातवें ॥ ७॥
चौथे सर्वब्रह्म, पाचवे चैतन्यब्रह्म, सहावे सत्ताब्रह्म, सातवे साक्षब्रह्म. (७)

आठवें सगुणब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म ।
दहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८॥
आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, वाच्यब्रह्म हे दहावे जाणावे. (८)

अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें ।
तदाकार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्य ॥ ९॥
अनुभवब्रह्म हे अकरावे, आनंदब्रह्म हे बारावे, तदाकार ब्रह्म हे तेरावे आणि अनिर्वाच्य ब्रह्म हे चौदावे ब्रह्म आहे. (९)

ऐशीं हीं चौदा ब्रह्में । यांचीं निरूपिलीं नामें ।
आतां स्वरूपांचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १०॥
अशी ही चौदा ब्रह्मे आहेत. येथे प्रथम त्यांची नावे सांगितली. आता त्यांच्या स्वरूपाची वर्मे खुणेने थोडक्यात दाखवू (१०)

अनुभवेंविण भ्रम । या नां शब्दब्रह्म ।
आतां ओमित्येकाक्षरं ब्रह्म । तें एकाक्षर ॥ ११॥
स्वस्वरूपाचा साक्षात् अनुभव नसताना अनुमानाने जे ब्रह्माचे वर्णन केले जाते, त्याला शब्दब्रह्म म्हणतात. श्रीसमर्थ म्हणतात, की, तो केवळ भ्रमच होय. यानंतर मीतिकाक्षर ब्रह्म म्हणजे ३२ हे एकाक्षर होय. (११)

खं शब्दें आकाशब्रह्म । महदाकाश व्यापक ब्रह्म ।
आतां बोलिजेल सूक्ष्म ब्रह्म । सर्वब्रह्म ॥ १२॥
खं ब्रह्म म्हणजे आकाशब्रह्म. महदाकाशाप्रमाणे ते सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्यापून असते. यानंतर त्याहूनही सूक्ष्म असे सर्वब्रह्म हे चौथे आहे. (१२)

पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टीस पडे ।
तें तें ब्रह्मचि रोकडें । बोलिजेत आहे ॥ १३॥
पंचमहाभूतांच्या कोड्यात जे जे तत्त्व दृष्टीला पडते ते ते चोखडेम्हणजे निर्मलब्रह्मच आहे असे म्हटलेजाते. (१३)

या नांव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म ।
आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४॥
'सर्व खल्यिदं ब्रह्म ' या सुतीच्या आधारे यालाच सर्वब्रह्म म्हटले जाते. आता चैतन्यब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. (१४)

पंचभूतादि मायेतें । चैतन्यचि चेतवितें ।
म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्यब्रह्म बोलिजे ॥ १५॥
पंचमहाभूतादी मायेला चैतन्यच चेतविते, नाहीतर ती तत्त्वे जडच आहेत. जे चैतन्य त्यांना चेतविते, ते चैतन्य ब्रह्म होय. (१५)

चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्त्वतां ।
तये सत्तेस जाणता । या नांव साक्षिब्रह्म ॥ १६॥
ज्या सत्तेने हे चैतन्य पंचमहाभूतादिकांना चेतविते, ती सत्ता म्हणजेच सत्ताब्रह्म होय व त्या सत्तेला जे जाणते त्यास साक्षब्रह्म म्हणतात. (१६)

साक्षित्व जयापासूनी । तेंहीं आकळिलें गुणीं ।
सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७॥
साक्षित्व ज्यापासून प्रास होते, ते ब्रह्म गुणांनी युक्त असते म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. (१७)

जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्त्वतां ।
वाच्यब्रह्म तेंही आतां । बोलिजेल ॥ १८॥
जेथे गुणांचा मागमूसही नसतो त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात. आता वाच्यब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. (१८)

जे वाचें बोलतां आलें | तें वाच्यब्रह्म बोलिलें ॥
अनुभवासि कथिलें | नवचे सर्वथा ॥ १९ ॥
वाणीने ज्याचे वर्णन करता येते, त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. पण अनुभव असतो त्याचे वर्णन कधीच करता येत नाही. (१९)

या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म ।
परंतु याचेंही वर्म । बोलवेना ॥ २०॥
त्यालाच अनुभव ब्रह्म म्हणतात. आनंद हीही एक वृत्तीच असते. परंतु याचेही रहस्य सांगितले जाईल. (२०)

ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद ।
अनिर्वाच्य संवाद । तुटोनि गेला ॥ २१॥
अशा ब्रह्माला आनंदब्रह्म म्हणतात. ब्रह्माशी तदाकारता होऊन अभेद होतो ते तदाकार ब्रह्म होय. अनिर्वाच्य म्हणजे वर्णनातीत. मग तेथे संवाद कसा होणार ? त्याचे वर्णन होऊच शकत नाही. म्हणूनच त्याला अनिर्वाच्य ब्रह्म म्हणतात. (२१)

ऐशीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें ।
साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२॥
याप्रमाणे अनुक्रमाने ही चौदा ब्रह्मे येथे सांगितली आहेत. त्यासंबंधीचे निरूपण साधकाने नीट ध्यानात घेतले तर त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. (२२)

ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३॥
ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे, हे नीट ध्यानात धरून पुढे येणारे चौदा ब्रह्मांचे निरसन ऐकावे. (२३)

शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण मायिक ।
शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४॥
शब्दब्रह्म हे केवळ शाब्दिक असते. तेथे साक्षात अनुभव नसल्याने ते मायिकच असते. आणि माया तर अशाश्वत. म्हणून त्यास शाश्वत म्हणता येत नाही. (२४)

जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंचें ओमित्येकाक्षर ।
शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५॥
ब्रह्म हे क्षर नाही आणि अक्षरही नाही. ते एकच एक नित्य असल्याने तेथे विनाशी (क्षर) आणि अविनाशी (अक्षर) या द्वैतमूलक कल्पनाच संभवत नाहीत. - कासच्या ठिकाणीही शाश्वताचा विचारकरता येत नाही. (२५)

खंब्रह्म ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान ।
शाश्वताचें अधिष्ठान । तेथें न दिसे ॥ २६॥
खं ब्रह्म असे वचन आहे. खं म्हणजे आकाश म्हणजेच अवकाश म्हणजेच शून्य. शून्याचा नाश ज्ञानाने होतो म्हणून तेही शाश्वत ठरत नाही. (२६)

सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत ।
प्रळय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७॥
वेदांत शास्त्रात प्रलयकाळी सर्वांचा नाश होतो, असे सांगितले आहे. म्हणजे जे काही सर्व आहे ते नाशिवंत असल्याने सर्व-ब्रह्मासही शाश्वत म्हणता येत नाही. (२७)

ब्रह्मप्रळय मांडेल जेथें । भूतान्वय कैंचा तेथें ।
म्हणोनियां सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८॥
ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकापासून सर्व सृष्टी नाश पावते. मग तेथे पंचमहाभूतांचा समुदाय तरी कसा टिकून राहणार ! म्हणून सर्वब्रह्मालाही नाश आहे. (२८)

अचळासी आणी चळण । निर्गुणास लावितां गुण ।
आकारास विचक्षण । मानीतना ॥ २९॥
ब्रह्म हे अचळ निर्गुण, निराकार असताना चल, गुणसंभूत आणि विविध आकार असलेल्या सर्व दृश्य वृष्टीला ब्रह्म म्हणणे हे विचारवंत मान्य करीत नाहीत. (२९)

जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत ।
सर्वब्रह्म हे मात । घडे केंवीं ॥ ३०॥
पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते, ते नाशिवंत आहे हे प्रत्यक्ष दिसून येते, तेथे सर्वब्रह्म ही गोष्ट मान्य कशी व्हावी ? (३०)

असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नाशवंत ।
वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१॥
असो. आता हे किती वर्णन करावे ! थोडक्यात म्हणजे सर्वब्रह्म नाशिवंत आहे. ' सर्व ' या शब्दात जी वेगळेपणाची भावना असते तिचा जीवब्रह्मैक्यात नाश होत असतो. मग पाहणे कुठले ? (३१)

आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें ।
तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२॥
आता ज्याला चेतविले जाते तोच स्वाभाविकपणे मिथ्या आहे, तर त्याला चेतविणारे चैतन्य असे म्हणताच येत नाही. जे झालेच नाही, त्याला चेतविणार कसे आणि कोण ? (३२)

परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्त्वतां ।
पदार्थेंविण साक्षता । तेही मिथ्या ॥ ३३॥
सत्ता ही परिवाराशिवाय असत नाही म्हणजे ज्यांच्यावर सत्ता गाजवायची ते व जो सत्ता गाजवतो तो दोघांची जरूर असते. परब्रह्म हे केवळ एकले एकच असते, म्हणून त्यास सत्ताब्रह्म म्हणता येत नाही. काही पदार्थ असेल तर त्याला साक्षित्वाने पाहिले जाते. जेथे पदार्थच मिथ्या असतो तेथे साक्षित्वही मिथ्याच असते, म्हणून परब्रह्माला साक्षब्रह्मही म्हणता येत नाही. (३३)

सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये ।
सगुणब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४॥
सगुणाला नाश आहे, ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्याने त्याला प्रमाण देण्याची जरुरी नाही. म्हणून सगुणब्रह्म हे निश्चितपणे नाशिवंत आहे. (३४)

निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव ।
गुणेंवीण गौरव । येईल कैंचें ॥ ३५॥
निर्गुण असे जे म्हटले जाते त्या (नामाला) शब्दाला वावच नाही. काहीतरी वैशिष्ट्य असेल तर गौरव केला जातो. गुणच जिथे मिथ्या तेथे निर्गुणत्वाचे वैशिष्ट्य तरी कसे असणार? (३५)

माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ ।
कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥ ३६॥
माया म्हणजे मृगजळ आहे किंवा कल्पनेचे नसलेलेच आभाळ आहे, असे सर्व म्हणतात. ( ३६)

ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा ।
अद्वैतासी उपमा । द्वैताची असे ॥ ३७॥
जेथे गावच अस्तित्वात नसेल तेथे गावाची सीमा कशी दाखवणार? जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा देतो, पण आत्या हा अजन्मा आहे. तो अद्वैत आहे, तर त्याला द्वैताची उपमा कशी देणार? (३७)

मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता ।
अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८॥
मायाच मिथ्या आहे तर सत्तेला अस्तित्वच कुठे आहे? पदार्थ मिथ्या असल्याने त्यांना जाणारा कोण असणार? अविद्याही मिथ्या म्हणून चैतन्यता ही मिथ्याच! ( ३८)

सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वही गुणांचिये पाशीं ।
ठायींचें निर्गुण त्यासीं । गुण कैंचें ॥ ३९॥
सत्ता, चैतन्यता, साक्षित्व हे सर्व गुणांमुळे भासते. ब्रह्म गुणरहित असल्याने तेथे गुण कसे असणार? (३९)

ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत ।
तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसीं ॥ ४०॥
असे जे गुणरहित ब्रह्म त्याला निर्गुण हे नाव देणे हेच मुळी नामेरूपे अशाश्वत असल्याने निश्चयानेच अशाश्वत ठरते. (४०)

निर्गुण ब्रह्मासी संकेतें । नामें ठेविलीं बहुतें ।
तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१॥
गुणरहित ब्रह्माला ओळखता यावे म्हणून अनेक नावे ठेवली जातात, त्यास वाच्यब्रह्म म्हणतात. ते नाशिवंतच आहे. (४१)

आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाच भाव ।
तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२॥
आनंदाचा अनुभव ही पण एक वृत्तीच आहे. तो वृत्तीचाच भाव आहे. पण जीवब्रह्मैक्यात वृत्तीला वावच नसतो. म्हणून आनंदब्रह्म हेही खरे नाही. (४२)

अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें ।
तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३॥
अनिर्वाच्य असे जेव्हा म्हटले जाते ते केवळ संकेत, नामनिर्देश करण्यासाठी म्हटलेले असते. अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दांत सांगता येत नाही ते. शब्द जेथे पोहोचू शकत नाही, त्या परब्रह्मास अनिर्वाच्य म्हणणे हे खरे म्हणजे योग्य नव्हे. कारण शब्दाचा संबंध गुणांशी वृत्तीशी असतो आणि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीच नाही, निवृत्तीच असते. म्हणून अनिर्वाच्य म्हणण्यामुळे संकेतास उणेपणा येतो, असे म्हटले आहे. (४३)

अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती ।
निरुपाधि विश्रांती । योगियांची ॥ ४४॥
मनातच निरनिराळ्या वृत्ती उठत असतात, त्या मनाचा जेव्हा आत्मस्वरूपात लय होतो, तेव्हा त्या स्थितीला उन्मनी म्हटले जाते. मनच नाहीसे झाल्यावर वृत्ती उठतच नाहीत आणि निवृत्ती होते. ही स्थिती अनिर्वाच्य असते. सर्व योगी या निरुपाधिक स्थितीतच विश्रांती पावतात. (४४)

वस्तु जे कां निरुपाधी । तेचि सहज समाधी ।
जेणें तुटे आधिव्याधी । भवदुःखाची ॥ ४५॥
निरुपाधिक परब्रह्माशी एकरूपता हीच सहज समाधी होय. हिची प्राप्ती झाल्यावर संसारातील दुःखदायक आधी-व्याधी सर्व नाहीशा होतात. (४५)

जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत ।
सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६॥
विद्या व अविद्या या दोन उपाधी सांगितल्या जातात. या उपाधींचा अंत होतो तेव्हाच ब्रह्मसाक्षात्कार होतो. सर्व साधुसंत, वेदान्ताचे ग्रंथ यांचा हाच अभिप्राय आहे की आत्मा हा अपरोक्ष आहे. (४६)

असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।
अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७॥
असे जे शाश्वत ब्रह्म आहे, तेथे मायाश्रम जगही नसतो. ते स्वसंवेद्य असल्याने त्याचे वर्म सांगता येत नाही, पण अनुभवी संत स्वानुभवाने ते वर्म जाणतात. (४७)

आपुलेनि अनुभवें । कल्पनेसि मोडावें ।
मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८॥
आपल्या स्वस्वरूपानुभवाने ' मी देह ' ही कल्पना मोडून यकावी. मग आपोआपच सर्वत्र ब्रह्मसाक्षात्काराच्या अनुभवाचा सुकाळ होईल. (४८)

निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९॥
निर्विकल्प वस्तूची कल्पना करू लागले की आपोआप कल्पनाच नष्ट होते. मग कल्पकोटी वर्षे, मीपणाविरहित आत्मस्वरूपाने राहावे. (४९)

कल्पनेचें एक बरें । मोहरितांच मोहरे ।
स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५०॥
कल्पनेचा एक गुण चांगला आहे की जिकडे तिचा मोहरा वळवावा तिकडे ती वळते. म्हणून तिला आत्म- स्वरूपाकडेवव्यलेकी ती निर्विकल्पाने व्यापून जाते. (५०)

निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेचि नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१॥
निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अभ्यास केला की कल्पनेचा मागमूसही उरत नाही. ती पूर्णपणे नाहीशी होते. निःसंगाची भेट घ्यायला गेले की भेट घेणाराही निःसंग होतो. (५१)

पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हातीं धरूनि द्यावें ।
असो हें अनुभवावें । सद्‌गुरुमुखें ॥ ५२॥
ब्रह्म म्हणजे काही एखादा पदार्थ नाही की हातात घेऊन दाखवता येईल. सदुरुमुखाने त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. (५२)

पुढें कथेच्या अन्वयें । केलाचि करूं निश्चये ।
जेणें अनुभवास ये । केवळ ब्रह्म ॥ ५३॥
पुढील समासात केवळब्रह्माचेच अधिक निश्चयपूर्वक निरूपण केले आहे. त्याचे श्रवण, मनन केल्याने केवळ ब्रह्माचा साक्षात अनुभव येईल असे श्रीसमर्थ सांगतात. (५३)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'चतुर्दशबडनिरूपणनाम' समास तिसरा समाप्त

GO TOP

समास चौथा : विमलब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्म नभाहूनि निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ ।
अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १॥
श्रीसमर्थ सांगतात की, ब्रह्म हे नभाहूनही निर्मळ आहे आणि तसेच पोकळही आहे. त्याला रूप नाही आणि ते अमर्याद असे विशाल आहे. (१)

एकवीस स्वर्गें सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ ।
ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥
एकवीस स्वर्ग आणि स पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो असे म्हणतात. अशा अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टकले आहे. (२)

अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें ।
तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३॥
अनंत ब्रह्मांडांच्या खाली आणि अनंत ब्रह्मांडांच्या वरही ते ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय अणुमात्र जागा रिकामी नाही. (३)

जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐशी वदे लोकवाणी ।
तेणेंविण रिता प्राणी । एकही नाहीं ॥ ४॥
लोक म्हणतात, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय एकही प्राणी रिता नाही. सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेले आहे. (४)

जळचरां जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ ।
तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रासी ॥ ५॥
जलचरांना जसे अंतर्बाह्य जलच असते, त्याप्रमाणे निखळ ब्रह्माने जीवमात्रास अंतर्बाह्य व्यापलेले आहे. (५)

जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां न ये ।
म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६॥
जळाची उपमाही खरे तर योग्य नाही, कारण जेथे जल नाही अशी जागा असू शकते. पण ब्रह्माच्या बाहेर मुळी कुणी जाऊच शकत नाही. ते नाही अशी जागाच नाही. (६)

आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्त्वतां ।
तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७॥
आकाशाच्या बाहेर पळून जावे असे कुणी म्हणेल तर ते शक्यच होणार नाही. कारण जेथे जावे तेथे आकाश आधीच आहे अशी स्थिती होते. तसाच त्या अनंत अशा परब्रह्माला अंतच नाही. (७)

परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगडिलें ।
अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८॥
याप्रमाणे च्या परब्रह्माची आणि आपली अखंड भेट झालेली आहे, जे आपल्या सर्वांगाला अगदी चिकटून राहत असते इतके ते आपल्या सतत अत्यंत जवळ असूनही ते सर्वांपासून लपून राहिले आहे. (८)

तयामध्येंचि असिजे । परी तयासी नेणिजे ।
उपजे भास नुपजे । परब्रह्म तें ॥ ९॥
त्या ब्रह्मामध्येच आपण असतो, पण तरी आपणांस याची जाणीव नसते आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास होतो तो मात्र आपल्याला उमजतो, पण परब्रह्म उमजत नाही. (९)

आकाशामध्यें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ ।
परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १०॥
आकाशात ढग येऊन ते आकाश मलीन झाल्यासारखे वाटते, पण तो केवळ मिथ्या भासच असतो. अश्व किंवा ढग आले किंवा गेले, त्याचा आकाशावर काहीच परिणाम होत नाही. ते जसेच्या तसे मअहितच असते. (१०)

नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी ।
तैसें दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारूप ॥ ११॥
आकाशाकडे अगदी टक लावून पाहिले तर डोळ्यांना चक्रेदिसतात ती खरेतरमिथ्या असतात. तसेच ज्ञानी लोकांना हेदृश्य जगतू दिसते, पण ते मिथ्या आहेते जाणतात. (११)

मिथ्याचि परी आभासे । निद्रितांसी स्वप्न जैसें ।
जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२॥
हे दृश्य जगतू मिथ्या असले, तरी आपल्याला ते जाणवतच असते. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते व त्या वेळी त्याला त्या स्वप्नातील घटना, अगदी खऱ्याही वाटतात; तो जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला उमजू लागते की, ते सर्व स्वप्न होते. (१२)

तैसें आपुलेनि अनुभवें । ज्ञानें जागृतीस यावें ।
मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥
तसे आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आला की, जो ज्ञानी असतो, तो अज्ञानरूपी निद्रेतून ज्ञानाच्या योगे जागा होतो व मग त्याला स्वाभाविकच हे दृश्य जगत मायिक आहे, हे कळू लागते. (१३)

आतां असो हें कुवाडें । जें ब्रह्मांडापैलीकडे ।
तेंचि आतां निवाडें । उमजोन दावूं ॥ १४॥
बरे आता हे असू दे. ब्रह्मांडापलीकडे असणारे हे कोडे आता उलगडून दाखवू या. (१४)

ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थमात्रासि व्यापून ठेलें ।
सर्वांमध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५॥
ब्रह्म हे अनंत कोटी ब्रह्मांडांत कालवले असते. त्याने सर्व पदार्थांना व्यापून टकले आहे. आणि सर्वांमध्ये ते पसरलेले आहे. पण तो त्याचा अंशमात्र आहे. (१५)

ब्रह्मामध्यें सृष्टी भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे ।
अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६॥
ब्रह्माच्या ठिकाणीच वृष्टीचा भास होत असतो. वृष्टीमध्ये ते ओतप्रोत भरलेले असते. अनुभव घेऊ जाता कळून येते की, सर्व दृश्य जगत म्हणजे त्या अनंत ब्रह्माचा लहानसा अंश आहे. (१६)

अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी ।
सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । मा‍ईल कैसें ॥ १७॥
त्याच्या अगदी लहानशा अंशात दृश्य वृष्टी भासते, तर बाहेर किती व्यापून उरलेले आहे, ही मर्यादा कोण करू शकणार ? आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म मावूच कसे शकेल ? (१७)

अमृतीमध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास ।
म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८॥
छोटी तीर्थाची झारी असते, त्यात सगळे आकाश साठविण्याचा प्रयत्न करावा तसेच हे आहे. म्हणून त्याच्या एका अंशात वृष्टी आहे असे म्हणतात. (१८)

ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें ।
सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९॥
ब्रह्म ब्रह्मांडात काड्यक्कैजरी असलेतरी ते वास्तविक जसेच्या तसे अचल अढळच असते. ते सर्वांत व्यास असले तरी ते जसेच्या तसे घनदाटच असते. (१९)

पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत ।
पंकीं आकाशीं अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥
पंचमहाभूतांतही ते असते, पण तरीही ते पंचमहाभूतांपासून अलिप्त असते. जसे चिखलात आकाश दिसते, पण वास्तविकते चिखलापासून अलिस असते. (२०)

ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे ।
परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१॥
खरेतरब्रह्मात्यदृछनचदेतायेतनाही. पणत्याचे स्वरूप समजावूनदेण्यासाठीदृष्टानदेणे भागपडते. ब्रह्मालाजर दृष्टान्त द्यावयाचाचझात्य, तरदृछनवस्तूम्हणजे आकाशहोय. (२१)

खंब्रह्म ऐशी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती ।
म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२॥
सुती खं ब्रह्म असे म्हणते. स्मृतीत त्याला गगनसदृश म्हटले आहे. म्हणून ब्रह्माला आकाशाचाच दृष्टान्त द्यावा लागतो. (२२)

काळिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ ।
शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३॥
सोने व पितळ दोन्ही धातू पिवळेच असतात. पितळेत जरा काळसरपणा असतो. तो नसेल तर त्याला सोनेच म्हणावे लागेल. तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे. ते नसेल तर त्यास ब्रह्म म्हणता येईल. (२३)

म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन ।
आढळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४॥
म्हणून ब्रह्माला गगनासारखे म्हणतात आणि मायेला वायूसारखी म्हणतात. पण वायू काही डोळ्यांना दिसत नाही. (२४)

शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणां ।
परंतु ते स्थिरावेना । वायूच ऐसी ॥ २५॥
आपण सारखे बोलत असतो, तेव्हा शब्दसृष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि जाते. म्हणजेच ती क्षणभंगुर अशाश्वत असते. वायूही तसाच अत्यंत चंचल असतो. जराही स्थिर वहात नाही. वायूसारखीच शब्दसृष्टीला स्थिरता नसते. (२५)

असो ऐशी माया मायिक । शाश्वत तें ब्रह्म एक ।
पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६॥
असो. याप्रमाणे ही माया अशी मायिक, अशाश्वत आहे, तर अनेकांना व्यापून शिवाय शिल्लक असणारे ब्रह्म हे शाश्वत आहे. (२६)

पृथ्वीसि भेदूनि आहे । परी तें ब्रह्म कठिण नव्हे ।
दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७॥
ते पृथ्वीला भेदूनही आहे, पण ते कठीण नाही. त्याच्या खुद्दाला म्हणजे कोमलपणाला द्यायला उपमाच नाही. (२७)

पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ ।
अनळाहूनि कोमळ । वायु जाणावा ॥ २८॥
पृथ्वीहून जळ मृदू सूक्ष्म आहे. जळाहून अनलम्हणजे अग्नी कोमल, सूक्ष्म आहे. त्या अनलाहून वायू अधिक कोमल आहे. (२८)

वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण ।
गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥
वायूपेक्षा गगन म्हणजे आकाश हे तर अत्यंतच उडू म्हणजे सूक्ष्म आहे. पण त्या गगनाहूनही मृदू सूक्ष्म पूर्णब्रह्म आहे, हे जाणून घ्यावे. (२९)

वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें ।
उपमेरहित संचलें । कठिण ना मृदु ॥ ३०॥
ते ब्रह्म वजालाही भेदून जाणारे आहे आणि तरी त्याचे मृदुत्व नष्ट होत नाही, असे ते निरुपम आहे. त्याला कठीणही म्हणता येत नाही अथवा मृदूही म्हणता येत नाही, असे ते विलक्षण आहे. (३०)

पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे ।
जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१॥
पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे. परंतु पृथ्वी नाश पावली तरी ते नाश पावत नाही. ते जळातही असते, पण जळ शोषले जाते, ते शोषले जात नाही. (३१)

तेजीं असे परी जळेना । पवनीं असे तरी चळेना ।
गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२॥
तेजाला व्यापून ब्रह्म असते, परंतु ते जळत नाही. वाल व्यापून ते असते, पण ते वायू चळला तरी अचलच असते. गानालाही ते ब्रह्म व्यापून असते, पण कळून येत नाही. (३२)

शरीरीं अवघें व्यापलें । परी तें नाहीं आढळलें ।
जवळीच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३॥
सर्व शरीरास व्यापून ते असते, पण ते दिसत नाही. अत्यंत जवळ असून त्याचे ज्ञान नसल्याने ते दुसवल्यासारखे वाटते, हे खरोखरच मोठे नवल आहे. (३३)

सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें पाहणें घडे ।
बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥
ते चहूकडे सम्युखच असते, एवढेच नव्हे, तर त्याच्यामुळेच आपण पाहूशकतो, ते आपल्या सबाह्य अभ्यंतत साक्षात सिद्धच आहे. (३४)

तयांमध्येंचि आपण । आपणां सबाह्य तें जाण ।
दृश्या वेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५॥
त्याच्यामध्येच आपण आहोत आणि आपल्याला ते अंतर्बाह्य व्यापून आहे. कसे म्हणाल तर ते दिसत नाही पण आकाश जसे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्याप्रमाणेच ते आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापकपणे सर्वत्र कोंदाटले आहे. (३५)

कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें ।
जैसें न दिसें आपुलें । आपणासि धन ॥ ३६॥
जेथे काही नाही असे वाटते तेथे सुद्धा ते ब्रह्म कोंदाटले असते. पण आपणच ठेवलेले आपले धन एकेक वेळा आपल्याला सापडत नाही. तशी अवस्था होते. (३६)

जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे ।
अनुभवे हें कुवाडें । उकलावें ॥ ३७॥
जो जो पदार्थ दृष्टीला पडतो, त्या पदार्थाच्या अलीकडे ते ब्रह्मच असते. हे काय कोडे आहे, हे अनुभवानेच उलगडेल. (३७)

मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस ।
पृथ्वीविण भकाश । एकरूप ॥ ३८॥
सर्व पदार्थांच्या मागे-पुढे, खाली-वर सर्वत्र आकाश असते. पदार्थ नसतील तरी आकाशाची केवळ पोकळी सर्वत्र असतेच. समजा पृथ्वीही नाहीशी झाली तर आकाश सर्वत्र व्यापून जसेच्या तसेच एकरूप असते. (३८)

जें जें रूप आणि नाम । तो तो नाथिलाचि भ्रम ।
नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९॥
जे जे रूप आणि नाम दिसून येते, ते सर्व मिथ्याच आहे. खरे तर नामरूपातीत परब्रह्माखेरीज दुसरी वस्तूच नाही, हे रहस्य आत्मानुभवीच जाणतात. (३९)

नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर ।
तैसें दावी वोडंबर । मायादेवी ॥ ४०॥
आकाशात मोठमोठे धुराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात. तसेच अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी जणू गारुडीविद्येच्या योगे ह्या दृश्य वृष्टीचा आभास उत्पन्न करते. (४०)

ऐशी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत ।
सर्वांठायीं सदोदित । भरलें असे ॥ ४१॥
अशी ही माया अशाश्वत, क्षणभंगुर नाशिवंत आहे. आणि ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे, हे जाणून घ्यावे. (४१)

पोथी वाचूं जातां पाहे । मातृकामध्यें भरलें आहे ।
नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२॥
आपण ज्या वेळी पोथी वाचू लागतो त्या वेळी त्या पोथीतील अक्षसतही ते असतेच. तसेच च्या डोळ्यांनी आपण पाहतो, त्यापेक्षाही ते अत्यंत सूक्ष्म असल्याने, मृदू असल्याने त्यातून ते ब्रह्मच निघाल्यासारखे वाटते. (४२)

श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां ।
मना सबाह्य तत्त्वतां । परब्रह्म तें ॥ ४३॥
कानाने च्या वेळी आपण शब्द ऐकतो किंवा मनाने संकल्प- विकल्प करतो ते परब्रह्मच सर्व इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींना अंतर्बाह्य व्यापून राहिले असते. (४३)

चरणीं चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं ।
करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४॥
पायांनी मार्ग चालत असताना ते आपल्या सर्वांगी भरून आहे हे आपल्याला जाणवते. हातांनी वस्तू घेतानाही ते हातांना व्यापून आहे, हे आपल्याला कळ्ये. (स्त)

असो इंद्रियसमुदाव । तयामध्यें वर्ते सर्व ।
जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५॥
याप्रमाणे ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये यांच्यामध्ये ब्रह्मच आहे, हे लक्षात आले की, त्या इंद्रियांची विषयाकडील धाव, नाहीशी होते. (४५)

जें जवळीच असे । पांहों जातां न दिसे ।
न दिसोन वसे । कांहीं एक ॥ ४६॥
ते ब्रह्म जवळच असून बाह्य दृष्टीला मात्र प्रयत्न केला तरीही दिसू शकत नाही. पण दिसले जरी नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र होते. (४६)

जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें ।
आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥
त्याला जाणावयाचे असेलतरही सर्व दृश्य वृष्टी मिथ्या आहे, हे अनुभवाने जाणून या वृष्टीत गुंतलेले आपले लक्ष काढून घेऊन आपले खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की, स्वानुभवाने ब्रह्माशी ऐक्य हाते. (अ)

ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे ।
अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८॥
ज्ञानदृष्टीनेच्यागोष्टीजाणतायेतात, त्याचर्मदृष्टील दिसत नाहीत. अंतरवृत्तीच्या खुणांना अंतरवृत्तीच साक्ष असते. (४८)

जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया ।
ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९॥
ही जी स्थिती असते तिला माया, ब्रह्म व आत्मानुभव या सर्वांना साक्षीरूपाने जाणणारी सर्वसाक्षिणी तुर्यावस्था असे म्हटले जाते. तिची ओळख पटवून घ्यावी. (४९)

साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण ।
जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५०॥
साक्षित्व ही पण एक वृत्तीच आहे. जेथे साक्षित्वाची जाणीवही पूर्णपणे विरून पूर्ण निवृत्ती होते, तिला उन्मनी म्हणतात. मनाचाही लय होऊन पूर्ण जीव-ब्रह्मैक्य होते, त्यास विज्ञान म्हणतात. (५०)

जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंही नुरे ।
विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१॥
जेथे अज्ञान व ज्ञान दोन्ही नसते तेथे परब्रह्माच्या ठिकाणी विज्ञानवृत्ती एकरूप होते. (५१)

ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।
योगिजना एकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२॥
असे जे शाश्वत ब्रह्म, तेथे कल्पनेचा लवलेशही नसतो. त्या ठिकाणी योगी लोक स्वरूपानुभवाने परब्रह्माशी ऐक्य पावून एकांत प्रास करतात. (५२)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके विमलब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'विमलबह्यनिरूपणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : द्वैतकल्पनानिरसन

॥ श्रीराम ॥

केवळब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें ।
आणि मायेचेंहि लागलें । अनुसंधान ॥ १॥
श्रोता म्हणतो की, आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितलेत, त्याचा अनुभवही आला आणि त्याच वेळी मायेचेही अनुसंधान लागले. (१)

ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मायाही प्रत्यक्ष दिसे ।
आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २॥
अंतरंगात ब्रह्म प्रकाशत आहे आणि बाहेर मायाही प्रत्यक्ष दिसत आहे. तरी आता द्वैत कसे निरसन होईल, ते आपण सांगा. (२)

तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन ।
मायाब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३॥
यावर वक्ता म्हणाला की, आता मन अत्यंत एकाग्र करून माया कोठली, ब्रह्म कोणते हे नीट जाणून घे. (३)

सत्य ब्रह्माचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प ।
ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४॥
मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्यसंकल्प करते आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागते. (४)

जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।
सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५॥
जी ब्रह्मालाही जाणते व जी मायेलाही जाणते. तिला सर्व जाणणारी म्हणूनच सर्वसाक्षिणी अशी तुर्यावस्था म्हणतात. (५)

ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाणपण ।
सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६॥
आता तुर्येचे लक्षण सांगतो ते ऐक. जी सर्व जाणते ती तुर्यावस्था होय. पण जेथे ' सर्व ' च नाही, म्हणजे जेथे सर्व हा केवळ आभासच आहे, तेथे त्याला कसे जाणावे ? (६)

संकल्पविकल्पाची सृष्टी । जाली मनाचियें पोटीं ।
तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवणु ॥ ७॥
ज्या मनाच्या योगे संकल्प-विकल्प उठतात, ते मनच मुळात मिथ्या आहे, तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण ? (७)

साक्षत्व चैतन्यत्वसत्ता । हे गुण ब्रह्माचिया माथां ।
आरोपले जाण वृथा । मायागुणें ॥ ८॥
मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षित्व, चैतन्यत्व, सत्ता इत्यादी गुणांचा आरोप उगीचच केला जातो. (८)

घटामठाचेनि गुणें । त्रिविधा आकाश हें बोलणें ।
मायेचेनि खरेंपणें । गुण ब्रह्मीं ॥ ९॥
घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणांमुळे आकाश जे निर्गुण-नियकार आहे, त्याची त्रिविध रूपे घटाकाश, मठाकाश व महदाकाश वर्णिली जातात, त्याप्रमाणेच मायेच्या खरेपणामुळेपरब्रह्मावर या गुणांचा वृथा आरोप केला जातो. (९)

जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रह्मासी ।
माये‍अविद्येचे निरासीं । द्वैत कैंचें ॥ १०॥
जोपर्यंत माया खरी वाटते, तोपर्यंतच ब्रह्मास साक्षित्व बहाल केले जाते. ज्यावेळी अविद्येचा-मायेचा निरस होतो, तेव्हा द्वैत कसे राहणार ? (१०)

म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।
मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११॥
म्हणूनच सर्वसाक्षी असणारे मन हे ज्या वेळी उन्मन होते, तेव्हा तुर्यारूपी ज्ञानही मावळून जाते. (११)

जयास द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें ।
द्वैता‍अद्वैतांचें तुटलें । अनुसंधान ॥ १२॥
ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मन झाले की द्वैताद्वैताचे अनुसंधानच तुटून जाते. (१२)

एवं द्वैत आणि अद्वैत । होये वृत्तीचा संकेत ।
वृत्ति झालिया निर्वृत्त । द्वैत कैंचें ॥ १३॥
याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही वृत्तीचेच संकेत असतात. वृत्तीच निवृत्त झाली की द्वैत कसे राहणार ? (१३)

वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान ।
जेथें तुटे अनुसंधान । मायाब्रह्मींचें ॥ १४॥
वृत्तिरहित जे ज्ञान म्हणजेच आत्मानुभव, तेच पूर्ण समाधान होय. तेथे मायाब्रह्माचे अनुसंधान पूर्णपणे नष्ट होते. (१४)

मायाब्रह्म ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत ।
ब्रह्म कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५॥
साधक ज्यावेळी सारासारविचार करू लागतो, तेव्हा माया मिथ्या, ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पिलेला असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पनेरहित आहे, हे जाणतात. (१५)

जें मनबुद्धि‍अगोचर । जें कल्पनेहून पर ।
तें अनुभवितां साचार । द्वैत कैंचें ॥ १६॥
जे मन, बुद्धी, इंद्रिये यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडले असते, त्याचा खरोखर जेव्हा ऐक्यरूपाने अनुभव येतो, तेव्हा द्वैत कसे उरणार ? (१६)

द्वैत पाहतां ब्रह्म नसे । ब्रह्म पाहतां द्वैत नासे ।
द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥ १७॥
जोपर्यंत द्वैत असते, तोपर्यंत ब्रह्मानुभव नसतो. तो येतो तेव्हा द्वैत राहात नाही. द्वैत- अद्वैत हे केवळ मनाच्या कल्पनेने भासते. (१७)

कल्पना माया निवारी । कल्पना ब्रह्म थावरी ।
संशय धरी आणि वारी । तेही कल्पना ॥ १८॥
कल्पना जर योग्य दिशेने केली गेली तर ती मायेचे निवारण करते व ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. कल्पनाच संशय निर्माण करते आणि त्याचे निवारणही करते. (१८)

कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान ।
ब्रह्मीं लावी अनुसंधान । तेही कल्पना ॥ १९॥
कल्पनाच बंधन निर्माण करते. कल्पनाच समाधान मिळवून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचे अनुसंधान लागते. (१९)

कल्पना द्वैताची माता । कल्पनाचि ज्ञप्ति तत्त्वता ।
बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २०॥
द्वैताची माता कल्पनाच आहे, खरे पाहिले तर ज्ञान हेही कल्पनारूपच आहे. माणूस मी बद्ध आहे अथवा मी मुक्त आहे, हे कल्पनेच्या योगेच म्हणत असतो. (२०)

कल्पना अंतरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ ।
क्षण एक ते निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१॥
आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्याचा भास निर्माण करते. तीच कल्पना निर्मल झाली, तर स्वस्वरूपाची कल्पना करू लागते. (२१)

क्षण एक धोका वाहे । क्षण एक स्थिर राहे ।
क्षण एक पाहे । विस्मित हौनी ॥ २२॥
कल्पना ही अशी विलक्षण आहे की, तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातुर करते, तर कधी एकदम शांतीचा अनुभव आणून देते, तर कधी आश्चर्यचकित करते. (२२)

क्षण एकांत उमजे । क्षण एक निर्बुजे ।
नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३॥
कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो, तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. याप्रकारे नाना विकार जिच्यायोगे उत्पन्न होतात, ती कल्पना हे जाणून घ्यावे. (२३)

कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ ।
कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४॥
कल्पना हीच जन्माचे मूळ कारण ठरते. कल्पना भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्रास होऊन मुक्तीस कारण ठरते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारीही आहे. (२४)

असो ऐशी हे कल्पना । साधनें दे समाधाना ।
येर्हaवीं हे पतना । मूळच कीं ॥ २५॥
असो. याप्रकारे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून केला, तर तिच्यायोगे शाश्वत समाधानही लाभू शकते. पण तसे जर केले नाही, तर तीच जीवाच्या अधःपतनाचे मूळ ठरते. (२५)

म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ ।
इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६॥
म्हणून सर्वांचे मूळ कारण केवळ कल्पनाच आहे. ह्या कल्पनेला समूळ नष्ट केले. म्हणजेच परब्रह्मप्रासी होते. (२६)

श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान ।
मिथ्या कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७॥
यासाठी निरंतर श्रवण, मनन, निदिध्यासन करावे लागते. म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. (२७)

शुद्ध ब्रह्माचा निश्चय । करी कल्पनेचा जय ।
निश्चितार्थें संशय । तुटोनि जाय ॥ २८॥
स्वस्वरूपानुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळविता येतो. आणि या निश्चयामुळे संशयही नष्ट होतो. (२८)

मिथ्या कल्पनेचें कोडें । कैसें राहे साचापुढें ।
जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९॥
सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सत्य अशा परब्रह्मव- च्छढे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे कसे शिल्लक राहणार ? (२९)

तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे ।
मग हें तुटे आपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३०॥
तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते, नष्ट होते. (३०)

कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे ।
कां शरें शर आतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१॥
जसे जनावराच्या योगे जनावसस पकडता येते अथवा आकाशमर्णाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश करता येतो. (३१)

शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे शबल ।
हेंचि वचन प्रंजळ । सावध ऐका ॥ ३२॥
शुद्ध कल्पनेचे बळ वाढले की शबल कल्पना नाश पावते. ह्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐकावा. (३२)

शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण ।
स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३॥
स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सतू स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे, ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. (३३)

सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन ।
अद्वैतनिश्चयाचें ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४॥
द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूपानुसधानाने परब्रह्माच्या अद्वय स्वरूपासंबंधी दृढ निश्चय करणे हीच शुद्ध कल्पना जाणावी. (३४)

अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध ।
अशुद्ध तेंचि प्रसिद्ध । शबल जाणावें ॥ ३५॥
अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना होय. जी द्वैत कल्पिते ती अशुद्ध कल्पना जाणावी. या अशुद्ध कल्पनेलाच ' शबल ' म्हटले जाते. (३५)

शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ ।
आणि शबल ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६॥
अद्वैतासंबंधी निश्चितार्थ हेच शुद्ध कल्पनेचे स्वरूप लक्षण आहे. उगीचच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना म्हणतात. (३६)

अद्वैतकल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे ।
द्वैतासरिसी निरसे । शबलकल्पना ॥ ३७॥
अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्याच क्षणी ' शबल ' कल्पनाही नष्ट होते. (३७)

कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें ।
शबल गेलियानंतरें । उरली ती शुद्ध ॥ ३८॥
याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैतकल्पना आपोआप नष्ट होते, हे चतुर लोकांनी जाणून ध्यावे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच उरते. (३८)

शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप ।
स्वरूप कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९॥
स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचे रूप आहे. याप्रमाणे स्वरूपास कल्पिता कल्पिता ती स्वतः तदूप होऊन जाते. (३९)

कल्पनेसी मिथ्यत्व आलें । सहजचि तद्रूप झालें ।
आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४०॥
याप्रमाणे सहज ज्या वेळी तक्ता प्रास होते, तेव्हा शुद्ध कल्पनाही नाहीशीच होते. म्हणजे तिला मिथ्यात्व प्रास होते. आत्मानुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. (४०)

जेचि क्षणीं निश्चय चळे । तेचि क्षणीं द्वैत उफाळे ।
जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१॥
ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो, त्या क्षणी द्वैत उफाळून येते. ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो. (४१)

तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण ।
याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२॥
त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. असे होऊ नये याकरिता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत असावे. (४२)

आतां असो हें बोलणें जालें । आशंका फेडूं येका बोलें ।
जयास द्वैत भासलें । तें तूं नव्हेसी सर्वथा ॥ ४३॥
असो. आता हे बोलणे राहू दे. तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते, ते मन हे तुझे स्वरूप नव्हे, हे लक्षात ठेवावे. (४३)

मागील आशंका फिटली । इतुकेन ही कथा संपली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४॥
याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा येथेच संपली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध करावी. (४४)

हरिॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ' द्वैतकल्पनानिरसननाम ' समास पाचवा समाप्त.

GO TOP

समास सहावा : बद्धमुक्त निरूपण

॥ श्रीराम ॥

अद्वैतब्रह्म निरूपिलें । जें कल्पनेरहित संचलें ।
क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १॥
श्रोता म्हणू लागला की, आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केलेत, ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार केले. (१)

परी म्यां तदाकार व्हावें । ब्रह्मचि होऊन असावें ।
पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २॥
परंतु त्यामुळे मला आता असे वाटू लागले आहे की, आपण ब्रह्माशी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे. पुन्हा चंचलपणाने या संसारात सर्वथा येऊच नये. (२)

कल्पनारहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख ।
म्हणोनि तेंचि एक । होऊन असावें ॥ ३॥
कल्पनारहित असे जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यावर संसारदुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते, म्हणून तेच एक होऊन राहावे, असे मला वाटत आहे. (३)

ब्रह्मचि होइजे श्रवणें । पुन्हां वृत्तिवरी लागे येणें ।
ऐसें सदा येणें जाणें । चुकेना कीं ॥ ४॥
अध्यात्मनिरूपणाचे श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, पण नंतर परत वृत्तीवर यावे लागते. हे वृत्तीचे येणे- जाणे तर कधी चुकत नाही. (४)

मनें अंतरिक्षीं जावें । क्षणएक ब्रह्मचि व्हावें ।
पुन्हां तेथून कोसळावें । वृत्तिवरी मागुती ॥ ५॥
मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादात्म्य पावावे व लगेच वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. (५)

प्रत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरज़ारा ।
पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६॥
याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे. अशा येरझारा किती काळ चालणार ? एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून सारखे खाली-वर फिरवावे तशी माझी अवस्था होत आहे. (६)

उपदेशकाळीं तदाकार । होतां पडे हें शरीर ।
अथवा नेणें आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७॥
उपदेशकाळी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एकतर शरीर पडले तरी पाहिजे किंवा राहिली तरी द्वैत भावनाच उरलेली नाही, असे तरी झाले पाहिजे. (७)

ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें ।
ब्रह्म होऊन संसार करणें । हेंही विपरीत दिसे ॥ ८॥
असे जर झाले नाही, तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणेसुद्धा लाजिरवाणे वाटेल. ब्रह्माशी तादात्म्य अनुभवून परत संसार करणे हे सुद्धा विपरीतच वाटते आहे. (८)

जो स्वयें ब्रह्मचि झाला । तो मागुता कैसा आला ।
ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९॥
जो स्वतः ब्रह्मच झाला, तो परत संसासत कसा आला ? हे कसले माझे ज्ञान ? मला तर हे योग्य वाटत नाही. (९)

ब्रह्मचि होऊन जावें । कां तें संसारीच असावें ।
दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनि ॥ १०॥
एकतर ब्रह्मरूपच होऊन जावे किंवा संसारी तरी सहावे. पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत सहावे याला काही अर्थ नाही. (१०)

निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे ।
मागुता काम क्रोध खवळे । ब्रह्मरूपासी ॥ ११॥
निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो. तेधून उडून गेले की ते ज्ञान मावळते आणि त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत कामक्रोधादी विकारबळवतात. (११)

ऐसा कैसा ब्रह्म झाला । दोहींकडे अंतरला ।
वोडगस्तपणेंचि गेला । संसार त्याचा ॥ १२॥
असा कसा हा ब्रह्म झाला आणि दोन्हीलाही दुरावला. धड ना ब्रह्मप्रासी, धड ना प्रपंच, अशा ओढाताणीने संसारही हातातून जायची वेळ आली. (१२)

घेतां ब्रह्मसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी ।
संसार करितां आवडी । ब्रह्मीं उपजे मागुती ॥ १३॥
ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा, तर सांसारिक सुखाची आवड मागे ओढते ! म्हणून संसार करू या म्हणावे, तर परत ब्रह्मसुखाकडे मन ओढ घेते. (१३)

ब्रह्मसुख नेलें संसारें । संसार गेला ज्ञानद्वारें ।
दोहीं अपुरीं पुरें । एकही नाहीं ॥ १४॥
संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटेना. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्हीही अपुरीच राहिली. एकही पूर्ण होईना. (१४)

याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित ।
काय करणें निश्चितार्थ । एकही नाहीं ॥ १५॥
असे माझे चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे. काय करावे ? परमार्थ करावा की प्रपंच करावा, यांविषयी ठाम निश्चय होत नाहीसा झाला आहे. (१५)

ऐसा श्रोता करी विनंती । आतां रहावें कोणे रीतीं ।
म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६॥
असे म्हणून श्रोत्याने विनंती केली की, माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, तरी मी आता कोण्या प्रकारे सहावे हे सांगा. (१६)

आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर ।
श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षण एक आतां ॥ १७॥
आता याला वक्ता जे सुंदर प्रत्युत्तर देईल ते ऐकून क्षणभर श्रोता निरुत्तरच होईल. (१७)

ब्रह्मचि होऊन जे पडले । तेचि मुक्तिपदास गेले ।
येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८॥
वक्ता म्हणाला की, जे ब्रह्म होऊन निपचित पडले, तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासादिक बुडाले की काय ? (१८)

श्रोता विनंती करी पुढती । शुक मुक्तो वामदेवो वा हे श्रुती ।
दोघेचि मुक्त आदिअंतीं । बोलत असे ॥ १९॥
तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली की, सुती सांगते की, ' शुको ज्यो वामदेवो वा ' म्हणजे आदी व अंती हे दोघेच मुक्त झाले. (१९)

वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव ।
वेदवचनीं अभाव । कैसा धरावा ॥ २०॥
वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटले आहे. फक्त शुक व वामदेवच मुक्त झाले, या वेदवचनांवर अश्रद्धा कशी ठेवावी ? (२०)

ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें ।
दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१॥
असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिले व दोघेच मुक्त असे प्रतिपादन केले. (२१)

वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृष्टीवरी ।
ऐसें बोलतां उरी । कोणास आहे ॥ २२॥
तेव्हा वक्ता म्हणाला की, या वृष्टीत हे दोघेच फक्त मुक्त असे म्हटले, तर इतरांची स्थिती काय आहे, म्हणून म्हणावे ? (२२)

बहु ऋषि बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी ।
झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३॥
अनेक ऋषी, अनेक मुनी, कित्येक सिद्ध, कित्येक योगी व आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले ज्यांना शाश्वत समाधान प्रास झाले होते, असे असंख्य लोक होऊन गेले आहेत. (२३)

प्रर्‍हादनारदपराशरपुंडरीक-
व्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ।
रुक्मांगदार्जुनवसिष्ठविभीषणादीन्
पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १॥
श्लोक अर्थ १ - प्रह्लाद, नारद, पुंडरीक, व्यास, अंबरीष, शुक, शौनक,भीष्म, दाल्भ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, बिभीषण या पुण्यवान परम भावतांचे मी स्मरण करतो.

कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ।
आविर्होत्रो । अथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २॥
श्लोक अर्थ २ - कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन -

यांहीवेगळे थोर थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
आदिकरून दिगंबर । विदेहादिक ॥ २४॥
वर जे वर्णन केले आहे त्यांच्याखेरीज ब्रह्मा, विष्णू, महेश्वर दत्तात्रेय, विदेही जनकसज आदी अनेकजण मुक्त होऊन गेले आहेत. (२४)

शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले ।
या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५॥
फक्त शुक व वामदेव मुक्त झाले आणि हे इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत, या वचनावर जे कुणी विश्वास ठेवतात, ते पढतमूर्ख जाणावेत. (२५)

तरी वेद कैसा बोलिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला ।
ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६॥
हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की, मग वेदात असे कसे काय म्हटले आहे ? तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय ? हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्याने त्यास प्रत्युत्तर दिले (२६)

वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष ।
साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यांस हें न माने ॥ २७॥
वेदांनी केवळ पूर्वपक्ष मांडला. मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात, पण साधू स्तुत्यन्न आणि दक्ष माणसे त्यांना हे पटत नाही. (२७)

तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें ।
वेदाचेनि उद्धरिलें । न वचे कोणा ॥ २८॥
पण समजा, जर हे खरे मानले, तर मग वेदांमध्ये लोकांना उद्धरण्याचे सामर्थ्यच नाही, असा त्याचा अभिप्राय होईल व त्याची थोरवी नष्ट होईल. (२८)

वेदाअंगीं सामर्थ्य नसे । तरी या वेदासि कोण पुसे ।
म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९॥
वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी ।
म्हणोनि वेदीं सामर्थ्यासी । काय उणें ॥ ३०॥
वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसते, तर वेदांना कुणी विचारले असते? म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये निश्चितच आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो. म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काय तोय आहे? (२९-३०)

वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण ।
तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१॥
वेद, शास्त्रे, पुरणे यांचे श्रवण भाग्यानेच घडते. आणि ज्यांना घडते ते पवित्र होतात, असे साधू लोक सांगतात. (३१)

श्लोक अथवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपाद ।
श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२॥
एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे, श्लोकाच्या एका चरणाचे श्रवण घडले तरी अनेक दोष नाहीसे होतात. (३२)

वेद शास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या आयणी ।
अगाध महिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३॥
वेद, शास्त्रे व पुराणे यात अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासांनी आपल्या ग्रंथांतून वेदांचा अगाध महिमा वर्णन केला आहे. (३३)

एकाक्षर होतां श्रवण । तात्काळचि होइजे पावन ।
ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४॥
वेदांच्या एका अक्षराचे श्रवण जरी घडले तरी तो श्रोता तत्काळ पावन होतो, असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथांतून जागोजागी वर्णन केलेला आहे. (३४)

दोहींवेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे ।
असो हें जाणिजे चतुरें । येरां गाथागोवी ॥ ३५॥
शुक, वामदेव यांच्याशिवाय तिसरा कुणी उद्धरून गेला नाही, असे जर मानले, तर वेदांचा महिमा कसा उरेल ? असो. आता हे बोलणे राहू दे. पण चतुर असतात तेच या वचनातील खरा अभिप्राय (मर्म) जाणतात. इतर लोक गोंधळून जातात. (३५)

वेद शास्त्रें पुराणें । कैशीं होती अप्रमाणें ।
दोघावांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६॥
त्यावर श्रोता म्हणतो की, वेदशास्त्रे, पुराणे अप्रमाण कशी मानावीत ? पण शुक, वामदेवाखेरीज आणखी कुणाकुणाचा उद्धार झाला आहे ? (३६)

म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला ।
शुक तोही अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७॥
यावर वक्ता म्हणतो की, तुला असे वाटत आहे का की, जो लाकडासारखा निश्चेष्टित होऊन पडला असेल तोच मुक्त होतो ? पण हेवाटणे बरोबरनाही. कारण शुकदेवही काही तसे निपचित पडून राहिले नव्हते. त्यांनी अनेकदा अध्यात्मावर निरूपण केले होते. (३७)

शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण ।
परी तो नव्हता अचेतन । ब्रह्माकार ॥ ३८॥
शुक मुक्त हे वेदवचन प्रमाणच आहे. पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पावून अचेतनासारखे निपचित पडून राहिलेले नव्हते. (३८)

अचेतन ब्रह्माकार । असता शुक योगीश्वर ।
तरी सारासार विचार । बोलणें न घडे ॥ ३९॥
शुकदेव जर अचेतनासारखे निपचित पडून राहिलेले असते, तर त्यांना सारासारविचार बोलून दाखविताच आला नसता. (३९)

जो ब्रह्माकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला ।
शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४०॥
जो ब्रह्माकार होतो, तो लाकडासारखा अचेतन होऊन निपचित पडून राहतो, असे मानणे चूक आहे. शुकदेव मुक्त होते, तरी त्यांनी परीक्षितापुढे भागवत सांगितले. (४०)

निरूपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार ।
धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१॥
अध्यात्माचे निरूपण करताना साससारविचार लोकांना समजेल अशा रीतीने स्पष्ट करून समजावून द्यावा लागतो. त्यासाठी निरूपणात दृष्टान्त द्यावे लागतात. चराचर धुंडाळून योग्य दृष्टान्ताची निवड करावी लागते. (४१)

क्षण एक ब्रह्मचि व्हावें । क्षण एक दृश्य धांडोळावें ।
नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वासी ॥ ४२॥
सर्वांचे सार असे जे ब्रह्म त्याचे निरूपण करताना कधी कधी एक क्षणभर वक्ता जणू ब्रह्मच होतो, तर असार अशा या दृश्य वृष्टीचे वर्णन करीत असता त्याला वत्रत्वात अनेक दृष्टांतांचा उपयोग करून विषयप्रतिपादन करावे लागते. (४२)

असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण ।
तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३॥
असो. शुकदेवांनी स्वत: संपूर्ण भागवतावर निरूपण केले म्हणून त्यांना बद्ध समजू नये. (४३)

म्हणोनि बोलतां चालतां । निचेष्टित पडिलें नसतां ।
मुक्ति लाभे सायुज्यता । सद्‌गुरुबोधें ॥ ४४॥
थोडक्यात म्हणजे लाकडासारखे अचेतन होऊन न पडता, आणि चालणे, बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया करीत असताही सदुरूंनी केलेला बोध, हृदयात पूर्णपणे ठसला असेल, तरसायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. (४४)

येक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त ।
येक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५॥
काही मुक्त असतात, काही नित्यमुक्त असतात, काही जीवमुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेहमुक्त असतात. असे प्रकार त्यात आहेत ते जाणून घ्यावे. (४५)

सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।
दोहीवेगळे नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ॥ ४६॥
जे मुक्त होऊनही जिवंतपणी या जगात वावरतात, त्यांना जीवमुक्त म्हटले जाते. ज्यांनी मुवत्ती लाभल्यावर देहत्याग केलेला असतो त्यांना विदेहमुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्त संबोधले जाते. ते योगेश्वर जाणावेत. (४६)

स्वरूपबोधें स्तब्धता । ते जाणावी तटस्थता ।
तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७॥
स्वरूपबोधाने जी स्तब्धता येते, तिला तटस्थता म्हणतात. स्तब्धता किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटले जाते. (४७)

येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण ।
तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८॥
येथे या देहाच्या अवस्थांचे महत्त्व नाही. स्वस्वरूपानुभव महत्त्वाचा आहे. बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्वानुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवावे. (४८)

कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला ।
तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९॥
आकंठ भोजन करून आलेल्या माणसाला कुणी हा भुकेला आहे असे म्हटले तरी ते शब्द ऐकून तो त्रासल्या असे कधी घडत नाही. (४९)

स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह ।
बद्ध मुक्त ऐसा भाव । विदेहाचकडे ॥ ५०॥
स्वरूपी जीवब्रह्यैक्य होते, तेथे देहाचा काही संबंधच नसतो आणि बद्ध अथवा मुका यांचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वरूपानुभव हा निःसंदेहच असतो. (५०)

देहबुद्धी धरून चिंतीं । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती ।
तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१॥
मी देह हा अहंकार मनात बाळगून ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देवसुद्धा मुका होऊ शकणार नाहीत, तेथे शुकदेवांची कथा ती काय ? (५१)

मुक्तपण हेंचि बद्ध । मुक्त बद्ध हें अबद्ध ।
स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२॥
मुक्तपण हेच बंधन आहे. स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणे हेच अयोग्य आहे. (५२)

मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा ।
देहबुद्धीची अर्गळा । स्वरूपीं न संटे ॥ ५३॥
जर कुणी म्हणेल की, ' मी ' मुक्त आहे तर तेथे मीपणा येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोयशी बांधून कुणी भवसागर तरून जाण्याचा जर प्रयत्न करील, तर त्या शिळेमुळे तो बुडून पार पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही, तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. (५३)

मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला ।
मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४॥
मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोक्या असो, तोच मुक्त झाला असे जाणावे. (५४)

जयास बांधावें तें वाव । तेथें कैंचा मुक्तभाव ।
पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५॥
ज्यायोगे बंधन झाले असे वाटते तेच मुळी मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या, तर मुक्ती तरी खरी कशी असणार ? म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की, बंधन आणि मुक्ती त्रिगुणांमुळे भासत असतात, म्हणून सर्व काही मिथ्याच असते. (५५)

बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न मे वस्तुतः ।
गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १॥
श्लोक अर्थ-बद्ध, मुक्त हे वर्णन गुणांच्या क्षेत्रात येते, आत्मावरच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणांचे मूळ माया आहे आणि ती तर खरी नाही. म्हणून आत्य्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही.

तत्त्वज्ञाता परमशुद्ध । तयासि नाहीं मुक्त बद्ध ।
मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६॥
परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्ध, मुक्त हा खेळ असतो. (५६)

जेथें नाम रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे ।
मुक्त बद्ध हें विसरे । विसरपणेंशीं ॥ ५७॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही, तर मुक्तपणा कसा उरेल ? खस शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे तर विसरतोच, पण आपण ते विसरलो ही जाणीवही तो विसरतो. (५७)

बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।
बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८॥
म्हणजे बद्ध कोण होता, मुक्त कोण झाला, तो कोणी का असेना, तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कुणाला मी मुक्त झालो असे वाटते, त्याला ते ' मीपण ' च बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो. (५८)

एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम ।
मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९॥
थोडक्यात म्हणजे मी बद्ध, मी मुक्त हा अवघा श्रमच आहे. देहाहंतेमुळेच हे श्रम होतात. कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुभवरूप विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. (५९)

असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां ।
ते कल्पना तरी तत्त्वतां । साच आहे ॥ ६०॥
कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण च्या कल्पनेमुळे त्या भासतात ती कल्पना तरी कोठे खरी आहे ? (६०)

म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ ।
स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१॥
म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अश्वाप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नदृश्य खरे वाटते, पण जागती आली की स्वप्न व त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. (६१)

स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला ।
कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२॥
स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वायवे व स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असे खात्री- पूर्वक वाटवे. पण जागे होताच ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. मग कोण बद्ध झाला आणि कोण आणि कसा मुक्त झाला म्हणावे, हे त्याला कळतच नाही. (६२)

म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान ।
शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३॥
म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते, ते सर्व लोक मुक्त म्हणावेत. पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की, मग मुक्तपणाही मायिकच ठरतो. (६३)

बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह ।
साधु सदा निःसंदेह । देहातीत वस्तु ॥ ६४॥
देहाहंता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते, तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तु ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पावून जो देहातीत होतो, तो साधू कायमचा निःसंदेह होतो. (६४)

आतां असो हें पुढती । पुढें रहावें कोणें रीतीं ।
तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५॥
आता हा विषय पुरे आता पुढील समासात आत्मज्ञान प्रास झाल्यावर साधकाने कशा प्रकारे सहावे याचे निरूपण केले जाईल ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे, असे समर्थ म्हणतात. (६५)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'बद्धमुक्तनिरूपणनाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : साधनप्रतिष्ठानिरूपण

॥ श्रीराम ॥

वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें ।
तेथें कल्पनेच्या नावें । शून्याकार ॥ १॥
श्रोते म्हणतात की, आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर मग तेथे कल्पनेचा शिरकाव कसा होणार ? म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो म्हणजे तिचे अस्तित्वच राहात नाही, असे श्रोता म्हणतो. (१)

तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हाता ।
ओळखी ठायीं न पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २॥
तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना करू लागलो, तर काहीच हाती ललत नाही. मनाला वस्तूची ओळखच होत नाही. उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. (२)

कांहीं दृष्टीस न दिसे । मनास तेही न भासे ।
न भासे न दिसे । कैंसें ओळखावें ॥ ३॥
जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्या न दिसणाऱ्या, न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावे तरी कसे ? (३)

पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार ।
कल्पूं जातां अंधकार । भरला वाटे ॥ ४॥
त्याला पाहावयाचा प्रयत्न करावा तर, त्याला कुठलाही आकारच नाही. मनाने अनुमान करायला जावे तर मन शून्याकार होऊन जाते. तरीही अंतश्चधूपुढे त्याची कल्पना करावी म्हटले तर सर्वत्र अंधकार भरला आहे, असेच वाटते. (४)

कल्पूं जातां वाटे काळें । परी ते काळें ना पिंवळें ।
आरक्त निळें ना ढवळें । वर्णरहित ॥ ५॥
तरीही कल्पना करू लागल्यास ते काळे आहे असे वाटते. पण संत सांगतात की परब्रह्म, काळे नाही, पिवळे नाही, लालही नाही, निळे वा पांढरेही नाही. त्याला कुठलाही रंगच नाही. (५)

जयास वर्णव्यक्ति नसे । भासाहूनि अनारिसें ।
रूपचि नाहीं कैसें । ओळखावें ॥ ६॥
ज्याला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे आणि ज्याला रूपही नाही, असे भासाहूनही विलक्षण असलेले ब्रह्म ओळखावे तरी कसे ? (६)

न दिसतां ओळखण । किती धरावी आपण ।
हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७॥
जे दिसतही नाही त्याची ओळख आपण कशी आणि किती धरावी ? त्यामुळे श्रम मात्र होतात. (७)

जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ।
जो अचिंत्य चिंतनातीत । परमपुरुष ॥ ८॥
जो निर्गुण असून गुणातीत आहे, जो अदृश्य व अव्यक्त आहे आणि अचिंत्य असून चिंतनातीत आहे तोच परम पुरुष होय. (८)

अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने ।
समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १॥
श्लोक अर्थ- अचिंत्य, अव्यक्तरूप, निर्गुण, गुणाला, सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो.

अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें ।
निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९॥
जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसे आठवावे आणि जे गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे ? (९)

जें दृष्टीसचि न पडे । जें मनासही नातुडे ।
तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०॥
जे डोळ्यांनी दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोहोचू शकत नाही, त्या निर्गुणाला पाहणे कसे बरे शक्य होईल ? (१०)

असंगाचा संग धरणें । निरवलंबीं वास करणें ।
निःशब्दासी अनुवादणें । कोणेपरी ॥ ११॥
असंगाशी संगती कशी करायची ? आधायशिवायच आकाशात अधांतरी कसे राहावे ? ज्याच्यापर्यंत शब्द पोहोचू शकत नाही, त्याचे वर्णन कसे करावे ? (११)

अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां ।
अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२॥
अचिंत्याचे चिंतन करायचा प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचे ध्यान धरावे म्हटले तर द्वैताचाच जोर होतो. (१२)

आतां ध्यानचि सांडावें । अनुसंधान तें मोडावें ।
तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३॥
आता असे होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचे ध्यानच करणे सोडून द्यावे. अनुसंधानही सोडून द्यावे म्हटले तर परत महासंशय उत्पन्न होतात. (१३)

द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी ।
तेणें समाधाना उरी । कदा असेचिना ॥ १४॥
ध्यान वा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तु कशी प्रास होणार ? आणि अंतःकरणात शाश्वत समाधान तरी कसे लाभणार ?(१४)

सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे ।
नित्यानित्यविचारें घडे । समाधान ॥ १५॥
आता येधून पुढे वक्ता उत्तर देत आहे की, आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान वा अनुसंधान करण्याची सवय लावली की कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान लाभते. (१५)

वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहींच नुमजे ।
शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६॥
आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते म्हणून ते चिंतन करणे जर सोडून दिले, तर मग काहीच कळणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडेल (१६)

म्हणोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सारावा ।
अहंभाव ओसरावा । परी तो ओसरेना ॥ १७॥
म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूस सारावा व अहंभावाचा त्याग करावा तर तो अहंभाव काही केल्या ओसरत नाही. (१७)

परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत ।
तेथें हेतु आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८॥
अद्वैत परब्रह्माचे चिंतन करू जावे, तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टान्ताने केलेले मनन काहीच कामास येत नाही. (१८)

तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोन आठविजे ।
जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९॥
परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मास जाणले असता जाणारा मी शिल्लक उरता कामा नये. (१९)

त्यास न भेटतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी ।
ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २०॥
मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही आणि ' मी भेट घेतो ' असा जो ' मी ' पणा तो सोडून दिला की अचानक भेटघडते. अशी ही फारनवलाईची गोष्ट आहे ! तिचे वर्णन शब्दात करताच येत नाही. तेथे मौनच पडते. (२०)

तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना ।
लागला संबंध तुटेना । निरंतर ॥ २१॥
त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता ते सदैव प्रासच आहे. त्यास सोडावे म्हटले तरी ते सुटत नाही. आपण सोडूही शकत नाही. एखादा संबंध पाठीस लागला की तो जसा सुटता सुटत नाही, तसे परब्रह्म निरंतर आपल्या बरोबरच राहते. (२१)

तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दुराशे ।
न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥
ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैतभावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी सर्वत्र तेच प्रकाशत असते. (२२)

जेथें अपाय तेथें उपाय । आणि उपाय तोचि अपाय ।
हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३॥
त्याला पाहण्याचा उपाय करू जावे, तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ते दिसत नाही म्हणजेच अपाय होतो. हे अपाय करणारे कर्तेपण सुटले तर मात्र तोच खस उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे काय उलगडणार ? (२३)

तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे ।
तें वृत्तिविण पाविजे । निवृत्तिपद ॥ २४॥
ज्यावेळी आपणास वाटते की मला ते उमजले, मी त्याला जाणले त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेले नसते आणि ज्यावेळी खरे ते उमजते तेव्हा जाणून घेणाराच कुणी वेगळा तेथे नसतो. त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते, तेव्हा निवृत्तिपदाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. (२४)

तें ध्यानीं धरितां नये । चिंतनीं चिंतावें तें काये ।
मनामध्यें न समाये । परब्रह्म तें ॥ २५॥
परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही व ते मनात मावत नाही. (२५)

त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें निर्मळ निश्चळ ।
विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंचि असे ॥ २६॥
त्याला जलाची उपमा देता येत नाही. कारण ते निर्मळ, निश्चल असते आणि प्रलयकाळी सर्व विश्व, दृश्यवृष्टी जलमय झाली, तरी ते जसेच्या तसे कोरडेच असते. (२६)

नव्हे प्रकाशासारिखें । अथवा नव्हे काळोखें ।
आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७॥
ते उजेडासारखेही नाही अथवा ते काळोखासारखेही नाही तर आता ते कशासारखे म्हणून सांगावे हो ! (२७)

ऐसें ब्रह्म निरंजन । कदा नव्हे दृश्यमान ।
लावावें तें अनुसंधान । कोणे परी ॥ २८॥
ते निरंजन (निर्मल) ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होतच नाही, मग जे दिसत नाही, तेथे अनुसंधान कशाप्रकारे लावावे ? (२८)

अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां ।
नेणे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९॥
अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून वृत्ती शून्याकार होते आणि मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. (२९)

लटिकेंचि काय पहावें । कोठें जाऊन रहावें ।
अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३०॥
जे नाही ते उगीच पाहण्याचा खोल आव कशाला आणावा ? ते निश्चित कोठे आहे हे माहीत नाही तर त्याला शोधण्यासाठी कोठे जाऊन राहावे ? म्हणून परब्रह्म हे आपले सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली. (३०)

अभावचि म्हणों सत्य । तरी वेद शास्त्रें कैसें मिथ्य ।
आणि व्यासादिकांचें कृत्य । वाउगें नव्हे ॥ ३१॥
परब्रह्म आपले सत्य स्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्रालाही मिथ्या म्हणावे लागेल आणि व्यासादिकांचे कार्य हेही व्यर्थच म्हणावे लागेल. (३१)

म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । बहुत ज्ञानाचे उपाय ।
बहुतीं निर्मिलीं तें काय । मिथ्या म्हणावें ॥ ३२॥
म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून जे अनेक उपाय सांगितले आहेत त्यांनाही मिथ्या म्हणावे काय ? (३२)

अद्वैतज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश ।
सांगतां होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३॥
अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीस केला, तीच गुरुगीता होय. (३३)

अवधूत गीता केली । गोरक्षास निरूपिली ।
ते अवधूतगीता बोलिली । ज्ञानमार्ग ॥ ३४॥
अवधूतांनी अवधूतगीता गोरखनाथास सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानोपदेश केला. (३४)

विष्णु होऊन राजहंस । विधीस केला उपदेश ।
ते हंसगीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५॥
विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवास जो उपदेश केला तो हंसगीता नावाने प्रसिद्ध आहे. (३५)

ब्रह्मा नारदातें उपदेशित । चतुःश्लोकी भागवत ।
पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६॥
ब्रह्मदेवाने नारदास चार श्लोकांत जो ज्ञानोपदेश केला, त्यास चतुःश्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. (३६)

वासिष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी ।
कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्लोकी गीता ॥ ३७॥
वसिष्ठ ऋषींनी रघुनाथास जो उपदेश केला, तो योगवासिष्ठ म्हणून ओळखला जातो, तर कृष्णांनी अर्जुनाला सातश्लोकी गीता सांगितली. (३७)

ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले बहुतीं ।
अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८॥
अशा किती ग्रंथांची नावे घ्यावीत ? अनेक ऋषींनी अनेक ग्रंथांत ज्या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला, ते आदि- अंती सत्यच आहे. (३८)

म्हणोन मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन ।
प्रज्ञेरहित ते जन । तयांस हें कळेना ॥ ३९॥
म्हणून आत्मज्ञान हे मिथ्या आहे असे जे म्हणतात, ते पतन पावतात. पण मंद बुद्धीच्या लोकांना हेकळत नाही. (३९)

जेथें शेषाची प्रज्ञा मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली ।
जाणपणें न वचे वदली । स्वरूपस्थिती ॥ ४०॥
स्वरूपस्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धीली काम करीनाशी झाली. सुतींनाही ते जमले नाही, म्हणून त्यांनी मौन धारण केले. 'मी जाणतो ' या अभिमानाने स्वरूपस्थिती सांगितली जाणे अशक्यच आहे. (४०)

आपणास नुमजे बरवें । म्हणोनि मिथ्या कैसें करावें ।
नातरी सुदृढ धरावें । सद्‌गुरुमुखें ॥ ४१॥
आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे ? सद्‌गुरुमुखाने श्रवण करून मनन, निदिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. (४१)

मिथ्या तेंचि सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें ।
संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२॥
ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. ही पांचभौतिक वृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व ते एकाएकी संशयसमुद्रात बुडाले. (४२)

मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे ।
तेणें गुणें संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३॥
मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तु तर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. (४३)

तरी तो पंथचि मोडावा । मग परमात्मा जोडावा ।
समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४॥
म्हणून मीपणाचा मार्गच सोडून द्यावा व साधूंच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थप्रासी करून घ्यावी. (४४)

मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना ।
मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्या ॥ ४५॥
मीपण हे शस्त्राने तुटत नाही. त्याला फोडावे म्हटले तर ते फुटत नाही. त्याला सोडून झटकून यकावे म्हटले तरी ते काही केल्या सुटत नाही. (४५)

मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे ।
मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६॥
मीपण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते. मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. (४६)

मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे ।
मीपणें सकळही उडे । यश कीर्ति प्रताप ॥ ४७॥
एवढेच काय, मीपणामुळे प्रपंचसुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर साफच बुडतो. मीपणामुळे माणसाचे यश, कीर्ती, प्रताप सर्व नष्ट होते. (४७)

मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे ।
मीपणें लिगटे । अभिमान अंगीं ॥ ४८॥
मीपणाने मैत्री तुटते. प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो. (४८)

मीपणें विकल्प उठे । मीपणें कलह सुटे ।
मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९॥
मीपणाने मनात संशय निर्माण होतो, मीपणाने कलह मोकळा सुटतो म्हणजे सर्वांशी भांडण होऊ लागते आणि देह-तादाल्याचा श्रम उत्पन्न होतो व ऐक्य भंग पावते. (४९)

मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे ।
म्हणून मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५०॥
मीपणा कुणालाच सहन होत नाही. मग भगवंताला कसा सहन होईल ? म्हणून जो मीपणा सोडून निरभिमान वृत्तीने सहतो, तोच समाधानी असतो. (५०)

मीपण कैसे । त्यागावें । ब्रह्म कैसें अनुभवावें ।
समाधान कैसें पावावें । निःसंगपणें ॥ ५१॥
यावर श्रोता प्रश्न करीत आहे की, मीपणाचा त्याग कसा करावा ? ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा ? व कोणत्या प्रकारे समाधान प्रास करून घ्यावे ? (५१)

मीपण जाणोनि त्यागावे । ब्रह्म होऊन अनुभवावे ।
समाधान ते पावावे । निःसंगपणे ॥ ५२॥
तो म्हणतो की, मीपण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा. तसेच निःसंग होऊन समाधान मिळवावे. (५२)

आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन ।
करूं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५३॥
याखेरीजही एक प्रकारचे समाधान आहे. जो कर्तृत्वाहंकासवाचून साधन करण्याची कुशलता प्रास करतो, असा जो समाधानी तो खरोखरच धन्य जाणावा. (५३)

मी ब्रह्मचि झालों स्वतां । साधन करील कोण आतां ।
ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४॥
जर मी आता ब्रह्मच झालो आहे, तर आता साधना कोण करील ? असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून यकते. (५४)

ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे ।
तयेसी शोधूनि पाहे । तोचि साधु ॥ ५५॥
ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजेच द्वैत टिकू शकत नाही. असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला तर जो खरोखरच साधू असतो, तो कल्पनेचे मूळ शोधून काढून तिचा समूळ नाश करतो. (५५)

निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें ।
मीपणास त्यागावें । येणें रीतीं ॥ ५६॥
समर्थ सांगतात की, निर्विकल्पाची कल्पना आपण करावी पण कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्मवस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. (५६)

ब्रह्मविद्येच्या लपणीं । कांहींच न व्हावें असोनी ।
दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणें ॥ ५७॥
या ब्रह्मविद्येतीलरहस्य हे आहे की, ज्यास तिची प्राप्ती होते, तो देहात असून नसल्यासारखाच होतो. हे कसे होते ते जो दक्ष म्हणजे सावधही असतो, तोच खगेखरजाणतो. (५७)

जयास आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें ।
येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें ॥ ५८॥
निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते, तेव्हा कल्पनाच शिल्लक उरत नाही. (५८)

पदींहून चळों नये । करावे साधनउपाये ।
तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९॥
याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की, आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये. साधन करीतच राहावे म्हणजे त्यायोगे ते करूनही त्यापासून अत्सि कसे वहावे, ते कळून येते. (५९)

राजा राजपदीं असतां । उगीच चाले सर्व सत्ता ।
साध्यचि होऊन तत्त्वतां । साधन करावें ॥ ६०॥
राजा आपल्या राजपदी आरूढ झालेला असतो. तो स्वतः काहीच करीत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन वहावे आणि कर्तृत्वाहंकारन धरता साधन करीत वहावे. (६०)

साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा ।
ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे ॥ ६१॥
साधन ही क्रिया आहे. ती देहाच्या द्वारेच घडत असते आणि आपण तर सर्वथा देह नाहीच. त्यामुळेच साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ताच राहतो. (६१)

देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें ।
देहातीत असतां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२॥
साधन त्यागावे, असा संकल्प देहबुद्धीशिवाय उडू शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत तर मग देहाचा संबंध येतोच कुठे ? (६२)

ना तें साधन ना तें देह । आपण आपला निःसंदेह ।
देहींच असोन विदेह । स्थिति ऐशी ॥ ६३॥
देहाकडून होणारे साधन किंवा देह हे आपल्याशी संबंधित नाही असा निःसंदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत. देहात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. (६३)

साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता ।
आळस प्रबळे तत्त्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥
साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे, असे वाटून त्यानिमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. (६४)

परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे ।
मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥ ६५॥
परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागत होतो, ध्यानाच्या मिषाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छदपणाने तो विषयभोग सेवन करू लागतो व दोषी होतो. (६५)

निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद पडे ।
उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६॥
निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते, संवादाच्या मिषाने वितंडवाद घालू लागतो आणि उपाधीच्यायोगे अभिमान अंगी जडतो. (६६)

तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे ।
म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७॥
याप्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिषाने अंतरात आळस प्रवेशला की, मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू ? असे तो म्हणू लागतो. (६७)

किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् ।
आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १॥
श्लोक अर्थ-महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते, त्याचप्रमाणे आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कोठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू ?

वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिरविलें ।
स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८॥
या वचनासारखी वचने तो आपले वागण्याचे समर्थन करण्यास आधार म्हणून देतो. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. (६८)

तैसा उपायाचा अपाय । विपरीतपणें स्वहित जाय ।
साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९॥
अशा उपायानेच जो स्वतःस अपाय करून घेतो, तो या विपरीत आचरणाने स्वहितास मुकतो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने तो वास्तविक बद्ध होतो. (६९)

साधन करितांच सिद्धपण । हातींचें जाईल निघोन ।
तेणेंगुणें साधन । करूंच नावडे ॥ ७०॥
त्याला वाटत असते की, आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्धपण हातातून निघून जाईल या विचाराने त्याला साधन करावेसेच वाटत नाही; ते आवडत नाहीसे होते. (७०)

लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक ।
साधन करिती ब्रह्मादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१॥
त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो, तर लोक आपल्याला साधकच समजतील सिद्ध मानणार नाहीत. याचीच त्याला फार लाज वाटत असते; पण ब्रह्मादिकही साधन करीतच असतात हे त्याला कळत नाही. (७१)

आतां असो हे अविद्या । अभ्याससारिणी विद्या ।
अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रह्म ॥ ७२॥
हा सर्व अविद्येचा प्रभाव होय. सदविद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असे जे पूर्ण ब्रह्म त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. (७२)

अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।
परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३॥
यावर श्रोत्याने प्रश्न विचारल की, परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ते आपण सांगावे. (७३)

याचें उत्तर श्रोतयासी । दिधलें पुढियलें समासीं ।
निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४॥
याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपण केले जाईल. (७४)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'साधनप्रतिष्ठानाम' समास सातवा समाप्त.

GO TOP

समास आठवा : श्रवणनिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान ।
तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता परमार्थाचे साधन सांगतो, ते ऐका. च्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्रास होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे. (१)

श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवे विरक्ती ।
श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २॥
श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते. अंतरात वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. (२)

श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणें होय दृढ बुद्धी ।
श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३॥
श्रवणामुळे चित्तशुद्धी होते. निश्चयात्मक बुद्धी प्रास होते आणि अभिमानाची उपाधी तुटते. (३)

श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे ।
श्रवणें अंतरीं जोडे । समाधान ॥ ४॥
श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो. देहासंबंधी ममता नाहीशी होते आणि अंतर्गत समाधान टिकून राहाते. (४)

श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशयो तुटे ।
श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥ ५॥
श्रवणाने शंकांचे निरसन होते, संशय नाहीसे होतात आणि मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. (५)

श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान ।
श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥ ६॥
श्रवणाने मनोनिग्रह साधू लागतो, समाधान लाभते आणि देहबुद्धीचे बंधन तुटून जाते. (६)

श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये ।
श्रवणें नाना अपाय । भस्म होती ॥ ७॥
श्रवणाने मीपण नाश पावते, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो व नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात. (७)

श्रवणें होय कार्यसिद्धि । श्रवणें लागे समाधी ।
श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८॥
श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते आणि शाश्वत समाधानरूपी सिद्धीची प्राप्ती होते. (८)

सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरूपण ।
श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९॥
संतांच्या सान्निध्यात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. (९)

श्रवणें प्रबोध वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे ।
श्रवणें विषयांचे ओढे । तुटोन जाती ॥ १०॥
श्रवणाने ज्ञान वाढते, प्रज्ञा जागत होते आणि मनाची विषयाकडे जी ओढ असते, ती कमी होते. (१०)

श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे ।
श्रवणें वस्तु निवळे । साधकांसी ॥ ११॥
श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळते, त्यामुळे ज्ञानाची वृद्धी होते व अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती होते. (११)

श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे ।
श्रवणें मन हें मागे । भगवंतासी ॥ १२॥
श्रवणाने सद्‌बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागते. (१२)

श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम ओहटे ।
श्रवणें धोका आटे । एकसरां ॥ १३॥
श्रवणाने कुसंगती सुटते, कामविकार कमी होऊ लागतो आणि त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात. (१३)

श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे ।
श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४॥
श्रवणाने मोहाचा नाश होतो, प्रतिभा किंवा काव्यष्यी प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते. (१४)

श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें आतुडे शांती ।
श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळपद ॥ १५॥
श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते, शांतीचा लाभ होतो आणि वृत्तिरहित परब्रह्माची प्राप्ती होते. (१५)

श्रवणा-ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व कांहीं ।
भवनदीच्या प्रवाहीं । तरणोपाय श्रवणें ॥ १६॥
श्रवणासारखे सार नाही. श्रवणाने सर्व काही प्रास होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरून जाण्यास श्रवण हाच उपाय आहे. (१६)

श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वीं सर्वारंभ ।
श्रवणें होय स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥
नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. सर्व विद्या, कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणाने आपोआपच सर्व काही घडत असते. (१७)

प्रवृत्ति अथवा निवृत्ति । श्रवणेंविण न घडे प्राप्ती ।
हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८॥
प्रपंच असो वा परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच प्रास होत नाही, या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्ष येतच असतो. (१८)

ऐकिल्याविण कळेना । हें ठाउकें आहे जनां ।
त्याकारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥
कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही, हे सर्व लोकांना माहीतच आहे. त्यामुळे कशासाठीही जे प्रयत्न केले जातात त्यांच्या मुळाशी श्रवण असते. आधी श्रवण घडते मग प्रयत्न केले जातात. (१९)

जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं ।
म्हणोनिया दुजें कांहीं । साम्यता न घडे ॥ २०॥
ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलेच नसते, त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो, म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधर्ण्य असणारे दुसरे काहीच नाही. (२०)

बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता ।
श्रवणेंविण तत्त्वता । कार्य न चले ॥ २१॥
अनेक साधनांसंबंधी विचार केला असता श्रवणासारखे सर्वोकृष्ट साधन दुसरे नाही हे कळून येते. खरोखरच श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडूच शकत नाही. (२१)

न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार ।
श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२॥
जसा सूर्य उगवला नाही, तर सर्वत्र अंधाराचेच साम्राज्य असते. तसाच प्रकार श्रवणाचा जाणावा. (२२)

कैशी नवविधा भक्ती । कैशी चतुर्विधा मुक्ती ।
कैशी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३॥
नवविधा भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्ती कुठल्या आहेत, सहजस्थिती कशाला म्हणतात, हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. (२३)

न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण ।
न कळे कैसें उपासन । विधियुक्त ॥ २४॥
षडूविध कर्माचरण म्हणजेच खान, संध्या, जप, होम, पठण-पाठण, देवतार्चन व वैश्वदेव कसे करावे, पुरश्चरण म्हणजे काय, तसेच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाहीत. (२४)

नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें ।
नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५॥
नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना प्रकारचे योग, नाना तीर्थाने यांचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही. (२५)

नाना विद्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन ।
नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६॥
नाना विद्या, पिढ्यान, नाना तत्त्वांचे शोधन, नाना कल, ब्रह्मज्ञान यांपैकी काहीही श्रवणाशिवाय कळत नाही. (२६)

अठरा भार वनस्पती । एक्या जळें प्रबळती ।
एक्या रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७॥
ज्याप्रमाणे अठसभार वनस्पतींची वाढ एका जलमुळेच होते, सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते. (२७)

सकळ जीवांस एक पृथ्वी । सकळ जीवांस एक रवी ।
सकळ जीवांस वर्तवी । एक वायु ॥ २८॥
सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा असतो, सर्वांना प्रकाश देणारा सूर्यही एकच असतो आणि सर्व प्राण्यांचे चलनवलन करविणारा वायूही एकच असतो. (२८)

सकळ जीवांस एक पैस । जयास बोलिजे आकाश ।
सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं ॥ २९॥
सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो व सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. (२९)

तैसें सकळ जीवांस मिळोन । सार एकचि साधन ।
तें हें जाण श्रवण । प्राणिमात्रांसीं ॥ ३०॥
त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असे एकच साधन म्हणजे श्रवण हेच सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करणारे आहे. (३०)

नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें ।
सर्वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥३१॥
पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मते आहेत पण सर्वोपयोगी असे श्रवणासारखे दुसरे साधनच नाही. (३१)

श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्षु होती ।
मुमुक्षूचे साधक अती । नेमेंसिं चालती ॥ ३२॥
श्रवणाने उपरती होते व बद्ध असतात ते मुमुक्षू होतात. मुमुक्षू असतात ते अत्यंत नेमनिष्ठ साधक बनतात. (३२)

साधकांचे होति सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोध ।
हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३॥
जे साधक असतात, त्यांच्याठिकाणी प्रबोध बाणतो म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होतात. हे तर सर्व लोकांत प्रसिद्धच आहे. (३३)

ठायींचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यशीळ ।
ऐसा गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥
अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात, असा हा श्रवणाचा शीध फलदायी गुण आहे. (३४)

जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पुण्यात्मा ।
अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५॥
जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो, तोच श्रवणाने पुण्याच्या होतो. असा हा श्रवणाचा अगाध महिमा आहे. त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही. (३५)

तीर्थव्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती ।
तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्रचीत श्रवणें ॥ ३६॥
तीर्थयात्रा, व्रते वगैरेंची फलश्रुती भविष्यकाळात फल देणारी असते पण श्रवणाचे तसे नाही, त्याचे फळ हातोहात मिल्ले. ही अनुभवाची गोष्ट आहे. (३६)

नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधी ।
तैशी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥
नाना रोग, नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधे अशी असतात की त्या रोगांचा व्याधींचा तत्काळ नाश होतो. श्रवणाची कार्यसिद्धीसुद्धा अशीच तत्काळ फल देणारी आहे हे अनुभवी लोक जाणतात. (३७)

श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे ।
मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥
श्रवणातील विचारांचे नीट आकलन झाले तरच तत्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्माच स्वानुभवाच्या योगे प्रास होतो. (३८)

या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान ।
निदिध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥
श्रवणाचा विचार कळणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे यास मनन म्हणतात. त्याचेच सतत अनुसंधान ठेवणे यास निदिध्यास म्हणतात व त्यायोगेच समाधान लाभते. (३९)

बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे ।
अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४०॥
वक्ता जे बोलतो, त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळते व सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्व-स्वरूपानुभव येऊन निःसंदेहता प्रास होते. (४०)

संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होय निर्मूळ ।
पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१॥
संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो. तो संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होतो आणि त्यामुळे पुढे अगदी सहजच प्रांजळ समाधान लाभते. (४१)

जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान ।
मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं ॥ ४२॥
जेथे श्रवण, मनन नसते तेथे समाधान कसे टिकून राहणार ?' मी मुक्त झालो ' या अभिमानामुळे श्रवण, मनन केले नाही, तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो बद्ध होतो. (४२)

मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध ।
श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३॥
मुमुक्षू असो, साधक असो वा सिद्ध असो, श्रवण, मननाशिवाय तो अबद्धच जाणावा. श्रवण, मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होते. (४३)

जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विलक्षण ।
तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४॥
ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरही थांबू नये. (४४)

जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ ।
मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय ॥ ४५॥
जेथे श्रवणरूपी स्वार्थ साधला जात नाही तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार ? पूर्वी जे काही साधन केले असेल तेही श्रवणाशिवाय व्यर्थ होते. (४५)

तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें ।
नित्य नेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६॥
म्हणून नित्यनेमाने श्रवणरूपी साधन मनापासून करीत वहावे म्हणजे सहजपणे ससारसागस्तून तरून जाता येते. (४६)

सेविलेंचि सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावें जीवन ।
तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ४७॥
ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावेच लागते, किंवा पाणी वरचेवर ध्यावेच लागते, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण-मनन सोडूच नये. (४७)

श्रवणाचा अनादर । आळस करी जो नर ।
त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८॥
जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितास मुकतो. (४८)

आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण ।
याकारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९॥
त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असे होऊ नये, यासाठी श्रवण केलेच पाहिजे. (४९)

आतां श्रवण कैसें करावें । कोण्या ग्रंथास पाहावें ।
पुढिलिये समासीं आघवें । सांगिजेल ॥ ५०॥
आता पुढील समासात श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ पाहावेत, हे सर्व सांगितले जाईल. (५०)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८॥
इति श्रीदासबोथे गुरूशिष्यसंवादे 'श्रवणनिरूपणनाम' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : श्रवणनिरूपण

॥ श्रीराम ॥

आतां श्रवण कैसें करावें । तेंही सांगिजेल स्वभावें ।
श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून अवधान द्यावे. (१)

एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें झालें समाधान मोडे ।
केला निश्चयो विघडे । अकस्मात ॥ २॥
एखाद्याचे वस्तूत्व असे असते की, ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते. अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो. (२)

तें वक्तृत्व त्यागावें । जें मायिक स्वभावें ।
तेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३॥
जे वस्तूत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व स्वाभाविकपणे मायिक असते ते ऐकूच नये. (३)

एक्या ग्रंथें निश्चयो केला । तो दुजयानें उडविला ।
तेणें संशयचि वाढला । जन्मवरी ॥ ४॥
एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता. तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. (४)

जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती ।
अद्वैतग्रंथ परमार्थीं । श्रवण करावे ॥ ५॥
जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात, मनातील शंकांचे निरसन होते ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत. (५)

जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी ।
प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६॥
ज्याने परमार्थाची वाट धरली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत. तेच त्याला आवडतात. (६)

जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक ।
तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७॥
ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्रास व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. (७)

जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत ।
तेणें क्षोभलें उठे चित्त । तया श्रोतयांचें ॥ ८॥
ज्याला अद्वैतमत रुचत असेल त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त क्षोभते. (८)

आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे ।
नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९॥
ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की, त्याचे मन कंयळते. (९)

ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी ।
तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १०॥
ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाट्ये. तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले, तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. (१०)

प्रीतीचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें ।
पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ॥ ११॥
पाणी उताराकडे सहज धावते, तसे ज्याचे ज्याच्यावर ' स्वाभाविक प्रेम असते, त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते. त्याचे मन तिकडे आपोआप धावते. (११)

तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर ।
तेथें पाहिजे सारासार- । विचारणा ते ॥ १२॥
त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात. दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. (१२)

जेथें कुळदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती ।
इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३॥
ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी. तेथे इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत , नाहीत. (१३)

घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता ।
साधुजनांसि वार्ता । फळाशेचि नाहीं ॥ १४॥
जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्‌गीता सांगून काय उपयोग ? ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्‌गीतेचे महत्त्व कळणार (१४)

वीरकंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं ।
जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५॥
वीरककण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार ? वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य असते, तेथेच ती शोभून दिसते. (१५)

नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं ।
विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६॥
अनेक देव-देवतांची स्तुतिस्तोत्रे गाणारी अनेक माहाक्ये आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे तेथे त्या देवतेचे गुणवर्णन करणात ग्रंथ वंद्य ठरतो. याठलट केले तर ते अयोग्य ठरते. (१६)

मल्हारीमाहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी ।
काशीमाहात्म्य व्यंकटेशीं । शोभा न पावे ॥ १७॥
जसे मल्हारी माहात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका माहात्म्य काशीला नेले आणि काशी माहात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. (१७)

ऐसें सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड ।
तैसी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८॥
असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येईल पण जेथले तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथांचे महत्त्व वाटते. (१८)

योगियांपुढे राहाण । परीक्षावंतापुढें पाषाण ।
पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९॥
समजा, एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले, तर ते शोभून दिसत नाही. (१९)

वेदज्ञापुढें जती । निस्पृहापुढें फळश्रुति ।
ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राच्ची ॥ २०॥
वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निःस्मृहांपुढे सकाम ग्रंथांची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. (२०)

ब्रह्मचर्यापुढें नाचणी । रासक्रीडा निरूपणीं ।
राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१॥
ब्रह्मचल्यपुढे नर्तकी, अध्यात्मग्रंथांचे निरूपण चालले असता तेथे रासक्रीडेचे वर्णन अथवा गजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. (२१)

तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारी टीपडें ।
तेणें त्याचें कैसें घडे । समाधान । २२॥
तसे जो अंतर्निष्ठ आहे, त्याच्यापुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होईल ? (२२)

रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा ।
संन्याशास वोवसा । उच्छिष्टचांडाळीचा ॥ २३॥
एखाद्या रंकाला च्या वस्तूची आशा असते, त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्छिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. (२३)

कर्मनिष्ठा वशीकरण । पंचाक्षरीया निरूपण ।
तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४॥
जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्यापुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. (२४)

तैसे पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान ।
ग्रंथ वाचितां समाधान । होणार नाहीं ॥ २५॥
त्याप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारेलोक आहेत, त्यांच्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही, असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान होणार नाही. (२५)

आतां असो हें बोलणें । जयास स्वहित करणें ।
तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६॥
असो. आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून घ्यावयाचे असेल, त्याने नेहमी अद्वैत ग्रंथांचाच अभ्यास करावा. (२६)

आत्मज्ञानी एकचित्त । तेणें पाहणें अद्वैत ।
एकांत स्थळीं निवांत । समाधान ॥ २७॥
जो आत्मज्ञानाचा इच्छक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथांचे वाचन, मनन आदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्रास होईल. (२७)

बहुत प्रकारें पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता ।
परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८॥
याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता, अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही, असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. (२८)

इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक ।
हित नव्हे तें पुस्तक । परमार्थासी ॥ २९॥
इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत, ज्यात हास्यविनोद वगैरे आहेत, तसेच रुंगासदी नवरसांनी जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. (२९)

जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे ।
भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३०॥
च्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतःकरणात पश्चात्ताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते, त्याला ग्रंथ म्हणावे. (३०)

जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे ।
नातरी एकसरी वोळे । मन भगवंतीं ॥ ३१॥
जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते अथवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. (३१)

जेणें होय उपरती । अवगुण अवघे पालटती ।
जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२॥
ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते त्याला ग्रंथ म्हणावे. (३२)

जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।
जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३॥
च्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषयवासना नष्ट होते, तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. (३३)

जेणें ग्रंथ परत्र साधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान ।
जेणें होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ॥ ३४॥
ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो, त्यास ग्रंथ म्हणतात. (३४)

ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुती ।
जेथें नुपजे विरक्ती भक्ति । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५॥
तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधिविधाने सांगून ल्यतींचे वर्णनही केले असते. पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही, तो ग्रंथच नव्हे. (३५)

मोक्षेंविण फळश्रुती । ते दुराशेची पोथी ।
ऐकतां ऐकतां पुढती । दुराशाच वाढे ॥ ३६॥
ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात, त्या पोथ्या म्हणजे दुगशेच्याच पोथ्या समजाव्यात. जसजसे त्यांचे श्रवण घडत जाते, तसतशी मनात दुशशाच वाढू लागते. (३६)

श्रवणीं लोभ उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें ।
बैसलीं दुराशेचीं भूतें । तयां अधोगती ॥ ३७॥
च्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासारविवेक कसा उत्पन्न होणार ? ते ग्रंथ ऐकून दुसशेची धुते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र होते. (३७)

ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती ।
तयां जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८॥
फलश्रुती ऐकून या जन्मी नाहीतर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे जे म्हणतात, त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. (३८)

नाना फळें पक्षी खाती । तेणेंचि तयां होय तृप्ती ।
परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९॥
निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात व त्यामुळे त्यांची तृप्ती होते, पण एक चकोर पक्षी असा आहे की, तो इतर कशाची आशाच करीत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. (३९)

तैसें संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास ।
परी जे भगवंताचे अंश । ते भगवंत इच्छिती ॥ ४०॥
त्याप्रमाणे संसारी माणसे संसाराचीच सोय पाहतात, तो सुखाचा कसा होईल, याचीच त्यांना उत्कंठा असते, पण जे भगवंताचे अंश म्हणजेच भक्त असतात, ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल, हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. (४०)

ज्ञानियास पाहिजे ज्ञन । भजकास पाहिजे भजन ।
साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१॥
ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. (४१)

परमार्थ्यास पाहिजे परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ ।
कृपणास पाहिजे अर्थ । मनापासूनी ॥ ४२॥
ज्यास परमार्थाची आवड असते, म्हणजेच जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते, तर जो कंजूष मनुष्य असेल, त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. (४२)

योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग ।
रोगियास पाहिजे रोग- । हरती मात्रा ॥ ४३॥
योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. (४३)

कवीस पाहिजे प्रबंध । तार्किकास पाहिजे तर्कवाद ।
भाविकास संवाद । गोड वाटे ॥ ४४॥
जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसास तर्कवाद करावयास हवा असतो. भाविकांना भगवतू चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. (४४)

पंडितास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती ।
कलावंतास आवडती । नाना कळा ॥ ४५॥
पंडित लोकांना स्तुत्यत्तीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. (४५)

हरिदासांस आवडे कीर्तन । शुचिर्भूतांस संध्यास्नान ।
कर्मनिष्ठांस विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६॥
हरिदासांना कीर्तन आवडते. धार्मिक लोकांना संध्याखान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. (४६)

प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा ।
चातुर्य पाहे शहाणा । आदरेंसीं ॥ ४७॥
प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. (४७)

भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीत पाहे तालज्ञान ।
रागज्ञानी तानमान । मूर्च्छना पाहे ॥ ४८॥
भक्ताला मूर्तिध्यान आवडते. संगीतज्ञ असेल तो तालज्ञानाकडे लक्ष देतो, तर सगज्ञानी असेल तो तानमान, मूर्छना आदीकडे लक्ष देतो. (४८)

योगाभ्यासी पिंडज्ञान । तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञान ।
नाडीज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९॥
योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात, तत्त्वज्ञ तत्त्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडीज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. (४९)

कामिक पाहे कोकशास्त्र । चेटकी पाहे चेटकीमंत्र ।
यंत्री पाहे नाना यंत्र । आदरेंसी ॥ ५०॥
जो कामी मनुष्य असेल, तो कामशास्त्र पाहतो. जो चेटूक करणारा असेल तो चेटकमंत्राकडे लक्ष देतो, तर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. (५०)

टवाळासि आवडे विनोद । उन्मतास नाना छंद ।
तामसास प्रमाद । गोड वाटे ॥ ५१॥
टवाळखोर लोकांना विनोद आवडतो. उन्मत्त असेल तो नाना छंद करतो, तर तामस माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. (५१)

मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी ।
पापी पाहे पापबुद्धी । लावून अंगीं ॥ ५२॥
मूर्ख असेल तो नादावर लुव्य होतो, जो निंदक असतो तो लोकांचे उणे काढण्याची संधी शोधत असतो व पापी असेल तो अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. (५२)

एकां पाहिजे रसाळ । एकां पाहिजे पाल्हाळ ।
एकां पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३॥
एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पाल्हाळ पाहिजे असतो तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. (५३)

आगमी पाहे आगम । शूर पाहे संग्राम ।
एक पाहती नाना धर्म । इच्छेसारिखे ॥ ५४॥
तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात. शूर असतात त्यांना युद्ध हवे असते तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. (५४)

मुक्त पाहे मुक्तलीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा ।
ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णूं पाहे ॥ ५५॥
मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते. सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो, तर ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्ष्याच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. (५५)

ऐसें सांगावें तें किती । आवडीसारिखें ऐकती ।
नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६॥
असे किती म्हणून वर्णन करावे ? ज्याला जे आवडते, ते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. (५६)

परी परत्रसाधनेंविण । म्हणों नये तें श्रवण ।
जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नांव करमणूक ॥ ५७॥
पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. ती केवळ करमणूकच होय. (५७)

गोडीविण गोडपण । नाकेंविण सुलक्षण ।
ज्ञानेंविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८॥
ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे ? ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल ? तसे ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणूच नये. (५८)

आतां असो हें बहुत । ऐकावा परमार्थ ग्रंथ ।
परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥ ५९॥
आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की, परमार्थ ग्रंथाचेच श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायचे इतर ग्रंथ निरुपयोगीच होत. (५९)

म्हणोनि नित्यानित्यविचार । जेथें बोलिला सारासार ।
तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६०॥
म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्यविचार साससारविवेक यांचे निरूपण आहे, तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्रास होऊन पैलपार जाता येते. (६०)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'श्रवणनिरूपणनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : देहान्तनिरूपण

॥ श्रीराम ॥

मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें असत्य ।
मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहतां ॥ १॥
जी दृश्य वृष्टी वास्तविक मिथ्या आहे, ती आपल्याला सत्य वाटते, जे परब्रह्म सत्य आहे ते आपल्याला असत्य वाटते हे सर्व मायेमुळे जो विशेष श्रम उत्पन्न होतो, त्यामुळे घडून येते. (१)

सत्य कळावयाकारणें । बोलिलीं नाना निरूपणें ।
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २॥
सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे, निरनिराळे उपाय सांगतात तरीही असत्य मायेचे धरणे काही उठत नाही. (२)

असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें ।
सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३॥
असत्य असून ' मी देह ' ही देहाहंता आणि दृश्य वृष्टीच सत्य आहे हा निश्चय अंतरात दृढ ठसलेला आहे. तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्मांच्या संस्कासंमुळे उत्पन्न झालेला असतो आणि परब्रह्म मात्र सत्य व सर्वत्र असून तिचे ज्ञान आपल्याला नसते. (३)

वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चयो करिती ।
तरि न ये आत्मप्रचीती । सत्य स्वरूप ॥ ४॥
वेद, शास्त्रे, पुराणे नाना प्रकारे सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात, पण याप्रमाणे शास्त्रांनी सांगूनही त्या सत्य स्वरूपाची आत्मप्रचीती येत नाही. (४)

सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें ।
ऐसें विपरीत वर्तलें । देखतदेखतां ॥ ५॥
परब्रह्म सत्य असून ते मायेच्या योगे आच्छादिले जाते व माया मिथ्या असून ती सत्य वाटत असते. असे सगळे आपल्या समक्षच विपरीत घडून येते. (५)

ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं ।
संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६॥
पण ज्यावेळी संतसमागम घडतो व अध्यात्मनिरूपणाच्या श्रवणाने साससारविवेक उत्पन्न होतो तेव्हा या मायेची करणी समजून येते. (६)

मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि आपण ।
तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७॥
याचे निरूपण पूर्वी आले आहे. आपणच आपला शोध घेऊन स्वस्वरूपानुभवाने आपले खरे रूप जाणून घेतले आहे. त्यामुळे परमार्थाची खूण अंतरात बाणली आहे. (७)

तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें ।
निजस्वरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८॥
त्यामुळे समाधान लाभले असून चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहोत अशी आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटली आहे. (८)

प्रारब्धें टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो ।
आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवर ॥ ९॥
आत्मबोध झाल्याने संदेह नाहीसे झालेले असून आता देह प्रारब्धाच्या हवाली केला आहे. आता हे मिथ्या कलेवर म्हणजेच देह लगेच पडला अथवा राहिला तरी त्याच्याशी आपला संबंधच उरलेला नाही, अशी ज्ञानी लोकांची भूमिका असते. (९)

ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार ।
जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ॥ १०॥
ज्ञानी लोकांना ' शरीर मिथ्या ' आहे या विचाराने जिवंतपणीच ते असून नसल्यासारखेच वाटत असते. थोडक्यात, ज्ञानी ममत्वरहित असतानाच त्याचे शरीर जेथे कुठे पडते, ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय. (१०)

साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ ।
साधू न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥ ११॥
साधुसंतांच्या दर्शनानेच तीर्थांना पावित्र्य येते व त्यांचे माहात्म्य वाढते. साधुसंत जर आले नाहीत तर त्या तीर्थक्षेत्रांचे जिणे व्यर्थ ठरते. (११)

पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर ।
हा इतर जनांचा विचार । साधु तोंचि नित्यमुक्त ॥ १२॥
सामान्य लोकांची अशी इच्छा असते की, गंगेसारख्या पुण्यनदीच्या तीरावर आपले शरीर पडावे म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल. पण साधू हे नित्यमुक्तच असतात. (१२)

उत्तरायण तें उत्तम । दक्षिणायन तें अधम ।
हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३॥
उत्तरायणात देह पडला तर उत्तम, दक्षिणायनात पडला तर अधम ह्या संदेहाने सामान्य लोकांच्या मनांत भ्रम उत्पन्न होतो पण साधू हे निःसंदेह झालेले असतात. (१३)

शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण ।
अंतीं रहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४॥
उत्तरायण असावे, शुक्लपक्ष असावा, घरात दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यातही अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे उत्तम गती मिठ्ये, असे लोकांना वाटत असते. (१४)

इतुकें नलगे योगियासी । तो जितचि मुक्त पुण्यराशी ।
तिलांजली पापपुण्यासी । दिधली तेणें ॥ १५॥
योग्यांना या गोष्टींची आवश्यकता नसते. तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो. त्याने पापपुण्यांना कधीच तिलांजली दिलेली असते. (१५)

देहाचा अंत बरा झाला । देह सुखरूप गेला ।
त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६॥
अज्ञानी लोक ज्याच्या देहाचा अंत बरा झाला असेल जो सुखात असता मेला असेल, तो धन्य झाला असे म्हणतात. (१६)

जनांचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत ।
ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७॥
काही अज्ञानी लोकांची तर अशी विपरीत समजूत असते की, अंतकाळी भगवंताचे दर्शन होते, याप्रकारे कल्पना जे करतात, ते आपला घात करून घेतात. (१७)

जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें ।
मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८॥
जिवंत असताना त्यांनी मनुष्यजन्माचे सार्थक केलेले नसते. सर्व आयुष्य व्यर्थच घालवलेले असते. मुळात धान्य पेरलेलेच नसते, तर ते उगवून येणार तरी कसे ? (१८)

जरी केलें ईश्वरभजन । तरी तो होइजे पावन ।
जैसें वेव्हारितां धन । राशी माथां लाभे ॥ १९॥
जर ईश्वरभजन केले असेल तरच मनुष्य पावन होतो. जसे जवळ असलेल्या धनाने व्यवहार केला असेल, तरच मुद्दलाबरोबर व्याजही मिळून द्रव्ययस उपलब्ध होते. (१९)

दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना ।
ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥
दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही हे वाक्य सर्व लोक जाणतातच. (२०)

न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा ।
तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥
एखाद्या नोकराने सेवा न करताच धन्याला म्हणावे की, ' माझा पगार द्या ' तर त्याला पगार कसा मिळेल ? त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नसेल अंती त्याचे स्वहित कसे साधेल ? (२१)

जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती ।
असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥
जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही, तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल ? असो. जे जे जसे करतात त्यांना त्या त्या- प्रमाणे फल प्रास होते. (२२)

एवं न करितां भगवद्भजन । अंतीं न होइजे पावन ।
जरी आलें बरवें मरण । तरी भक्तिविण अधोगती ॥ २३॥
थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवद् भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकांच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले, तरी भक्ती ! न केल्याने अधोगती प्रास होते. (२३)

म्हणोन साअधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें ।
शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥
म्हणून जे साधुसंत असतात, त्यांनी जिवंत असतानाच मनुष्यजन्माचे सार्थक केलेले असते. भगवद्‌भक्ती अथवा ज्ञानप्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्यांनी केलेला असतो. त्यामुळे ते धन्य होत. (२४)

जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।
अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥ २५॥
जे जिवंत असतानाच मुक्त झालेले असतात, अशा ज्ञानी जीवमुक्ताचे शरीर वनात पडो अथवा स्मशानात पडो, तरी ते धन्यच असतात. (२५)

साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला ।
हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ २६॥
साधूचा देह खितपत पडला किंवा कोल्हा- कुत्र्यांनी खाल्ला, तर सामान्य लोकांना त्यांच्या मंदबुद्धीमुळे ते प्रशस्त वाटत नाही. (२६)

अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन ।
परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७॥
सामान्य लोक त्याचा अंत बरा झाला नाही, या विचाराने दुःखी होतात, पण ते बिचारे अज्ञानी लोक रहस्य जाणत नाहीत. (२७)

जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा ।
विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ॥ २८॥
पण मुळात जो जन्मलाच नाही, त्याला मृत्यू कसा येईल ? जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्म-मृत्यूच्या भावनेलाच गिळून यकलेले असते. (२८)

स्वरूपानुसंधानबळें । सगळीच माया नाडळे ।
तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९॥
त्याने स्वस्वरूपानुसधानाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते. त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. (२९)

तो जित असतांचि मेला । मरणास मारून जियाला ।
जन्म मृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३०॥
तो जिवंत असतानाच मेलेला असतो आणि मरणाला मारून जगत असतो. त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्म-मृत्यूचे भानच राहिलेले नसते. (३०)

तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा ।
दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१॥
तो सामान्य लोकांमध्येच वावरतो, तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे, हे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूपच झालेला असतो. त्यामुळे दृश्य पदार्थादी मायिक असल्याने त्याला स्पर्शच करू शकत नाहीत. (३१)

असो ऐसे साधु जन । त्यांचें घडलिया भजन ।
तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२॥
असो. अशा साधुसंतांचे भजन घडले तर त्यायोगे इतर लोकही पावन होतात. (३२)

सद्‌गुरूचा जो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक ।
विवेक केलिया तर्क । फुटे निरूपणीं ॥ ३३॥
जो साधक सद्‌गुरूच्या अंकित असेल त्याने पुन्हापुन्हा सारासारविवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्यावेळी नवीन विचार स्कृरू लागतात. (३३)

हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें ।
तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४॥
श्रीसमर्थ म्हणतात की, जे खरे साधक आहेत, त्यांना अगत्याने हेच सांगावयाचे आहे की, अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधुसंतांच्याप्रमाणे तुमच्या ठिकाणीही निःसंदेह असे समाधान जरूर बाणेल (३४)

जो संतांसी शरण गेला । तो संतचि होऊन ठेला ।
इतर जनां उपयोगा आला । कृपाळुपणें ॥ ३५॥
जो संतांना शरण जातो, तो स्वतः संतच होतो आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनांच्या उपयोगी पडतो. (३५)

ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान ।
सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥ ३६॥
असा संतांचा महिमा आहे ! संतसमागमानेच आत्मज्ञान होते. म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. (३६)

गुरुभजनाचेनि आधारें । निरूपणाचेनि विचारें ।
क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७॥
गुरूभजनाच्या आधाराने, अध्यात्मनिरूपणातील विचाराने श्रवण-मनन, करून ते आत्मसात करावेत आणि आचरणही अत्यंत शुद्ध असावे. म्हणजे निश्चितपणे परमपदाची प्राप्ती होते. (३७)

परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्‌गुरूचें भजन ।
सद्‌गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८॥
सद्‌गुरूचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे. आणि सद्‌गुरुभजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता, आत्मानुभव प्रास होऊन अकस्मात शाश्वत समाधान बाणते. (३८)

देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें ।
भजनभावें तोषवावें । चित्त सद्‌गुरूचें ॥ ३९॥
देह मिथ्या आहे हे जाणून घेऊन जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्‌गुरूचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. (३९)

शरणागताची वाहे चिंता । तो एक सद्‌गुरु दाता ।
जैसें बाळका वाढवी माता । नाना यत्नेंमकरूनी ॥ ४०॥
आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढविते, त्याप्रमाणे सद्यरू हे मातेप्रमाणेच शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात. त्यांच्यासारखा दाता अन्य कुणी नसतो. (४०)

म्हणोनि सद्‌गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।
सद्‌गुरुवीण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१॥
म्हणूनच ज्याला सद्‌गुरूचे भजन घडते, तो शिष्य धन्यच होय. सद्‌गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. (४१)

सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
येथें सांगितलें स्पष्ट । सद्‌गुरुभजन ॥ ४२॥
शब्दांत जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केला आहे. आता ग्रंथाचा शेवट आला आहे म्हणून परत एकदा सद्‌गुरुभजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. (४२)

सद्‌गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।
जयांस न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३॥
खरोखर सद्‌गुरुभजनासारखे मोक्षदायक दुसरे काहीही नाही. ज्याला हे म्हणणे पटत नसेल, त्याने 'गुरुगीता पाहावी. (४३)

तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।
याकारणें सद्भावें । सद्‌गुरुचरण सेवावे ॥ ४४॥
तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्‌गुरुचरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरोपिले आहे म्हणून सद्‌भावाने सद्‌गुरुचरणच सेवावे. (४४)

जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक ।
तयास सांपडे एक । निश्चयो ज्ञानाचा ॥ ४५॥
या ग्रंथात जे विचार मांडलेले आहेत त्यांचे जो साधक मनन करील, त्याचा आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. (४५)

ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत ।
सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६॥
ज्या ग्रंथांत अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत, मराठीतला म्हणून कमी प्रतीचा मामू नये. कारण त्याचा अर्थ खरोखर वेदांतपरच असतो. (४६)

प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे ।
आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७॥
वेदान्त अनायासे मराठीत सुलभरीत्या प्रास होईल. शिवाय अनेक वेदानपर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदान्त प्रतिपादिला, तोच या ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात समाधान प्रास होईल. (४७)

तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचा उपाय ।
मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८॥
ज्यांत आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये. पण माकडाला नारळाचे मूल्य-काय कळणार ? त्याप्रमाणे मूर्खाला या ग्रंथाचे महत्त्व काय कळणार आहे ? (४८)

आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।
शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९॥
असो. आता हे बोलणे पुरे ज्याने-त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे, या ग्रंथांतील ज्ञान ग्रहण करावे. बंद शिंपीतील मोती प्रत्यक्ष दिसत नाही, पण म्हणून तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. (४९)

जेथें नेति नेति म्हणती श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती ।
परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥ ५०॥
ज्या परब्रह्माचे वर्णन श्रुतींनाही नेति नेति म्हणून करावे लागते, तेथे भाषेतील स्तुत्यनता, विद्वत्ता उपयोगी पडत नाही. ते परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य, शब्दांत न सांगता येण्यासारखेच असते. (५०)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'देहान्तनिरूपणनाम' समास दहावा समाप्त दशक सातवा समाप्त

॥ दशक सातवा समाप्त ॥



GO TOP