॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक सहावा : देवशोधन

समास पहिला : देवशोधन

॥ श्रीराम ॥

चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून ते हृदयात धरून ठेवा. एक क्षणभर सावध होऊन बसा व सांगतो ते ऐका. (१)

कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी ।
न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥
आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा देशात राहावयाचे असेल आणि आपण त्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला म्हणजे जो अधिपती किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्याला जर भेटलो नाही, तर आपल्याला सुख कसे लाभेल ? (२)

म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें ।
म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३॥
म्हणून ज्याला जेथे वहावयाचे असेल, त्याने तेथल्या मुख्याधिकाऱ्याची भेट घ्यावी, म्हणजे सर्व काही सुरळीत होते. (३)

प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४॥
मुख्याधिकल्याची भेटघेतली नाही, तरतेथे आपल्याली कोणी मानणार नाही आणि मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही. (४)

म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी एक तरी नायक ।
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५॥
म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेयवे यातच शहाणपणा असतो, असे विचारी लोक जाणतात. (५)

त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी ।
तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६॥
त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर धरून नेऊन वेठबिगारीला लावतील किंवा चोरी केली नसताही चोरीचा आरोप करतील. (६)

याकारणें जो शहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा ।
ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७॥
म्हणून जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावे. नाहीतर त्याला नाना संकयंना तोंडद्यावे लागेल. (७)

ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती ।
देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८॥
एखाद्या गावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो. त्याच्यापेक्षा देशाधिपती अधिक श्रेष्ठ असतो व त्याच्यापेक्षाही सजा हा वरिष्ठ असतो. (८)

राष्ट्राचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा ।
महाराजांचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९॥
राष्ट्राचा जो प्रभू त्यास सजा म्हणतात. अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात. महाराजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात. (९)

एक नरपती एक गजपती । एक हयपती एक भूपती ।
सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजा ॥ १०॥
एक नरपती असतो, तर एक गजपती असतो, तर दुसरा कुणी हयपती असतो, तर कुणी भूपती असतो. या सगळ्यांपेक्षा चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो. (१०)

असो ऐशिया समस्तां । एक ब्रह्मा निर्माणकर्ता ।
त्या ब्रह्म्यासही निर्मिता । कोण आहे ॥ ११॥
असो. अशा सर्वांचा निर्माणकर्ता एक ब्रह्मदेव असतो. त्या बहयाचाही निर्माता कोण आहे ? (११)

ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर ।
तो ओळखावा परमेश्वर । नाना यत्‍नें ॥ १२॥
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो, तो त्यांच्यापेक्षा थोर असतो. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी ओळख करून घ्यावी. (१२)

तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना ।
ब्रह्माण्डनायका चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३॥
त्याची प्राप्ती झाली नाही, तर यमयातना चुकत नाहीत. जर ब्रह्मांड-नायकाला ओळखता आले नाही, तर ते बरे नव्हे. (१३)

जेणें संसारीं घातलें । अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें ।
त्यासी नाहीं ओळखिलें । तोचि पतित ॥ १४॥
ज्याने आपल्याला या संसारात घातले, ज्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्या परमात्म्यास जो ओळखत नाही, तो पतित समजावा. (१४)

म्हणोनि देव ओळखावा । जन्म सार्थकचि करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा । म्हणजे कळे ॥ १५॥
म्हणून देव कोणता ते ओळखून आपल्या नरदेहाचे सार्थक करावे. जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे ते कळून येईल. (१५)

जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६॥
जो भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणतात. संत हे शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतात. (१६)

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।
तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधू ॥ १७॥
खरा देव कधी पालटत नाही, आपल्या स्थानावरून हलत नाही, असा ज्याचा अंतःकरणापासून भाव असतो, तोच महानुभाव संत, साधू आहे असे जाणावे. (१७)

जो जनांमध्ये वागे । परी जनांवेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधू ॥ १८॥
जो लोकांत वावरतो, पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो. ज्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागत असते, तोच साधू होय. (१८)

जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासींच म्हणावें ज्ञान ।
त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९॥
निर्गुण परमात्म्यास तदूप होऊन जाणणे, त्याच्याशी ऐक्य होणे यालाच ज्ञान म्हणावे. याखेरीज जे सर्व काही आहे ते अज्ञानच होय. (१९)

पोट भरावयाकारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।
त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २०॥
पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास करणे यालाही ज्ञान म्हणतात, पण त्याने मनुष्यजन्माचे सार्थक होत नाही. (२०)

देव ओळखावा एक । तेंचि ज्ञान तें सार्थक ।
येर अवघेंचि निरर्थक । पोटविद्या ॥ २१॥
ज्यायोगे एका देवाचा साक्षात्कार होतो, तेच खरे ज्ञान असते व त्यानेच सार्थक होते. बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात. (२१)

जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२॥
जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले, देहाचे संरक्षण केले, पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच गेले. (२२)

एवं पोट भरावयाची विद्या । तियेसी म्हणों नये सद्विद्या ।
सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३॥
म्हणून पोट भरावयाची जी विद्या तिला सद्‌विद्या म्हणू नये. ज्यायोगे सर्वव्यापक वस्तूची तत्काळ प्राप्ती होते, तेच खरे ज्ञान होय. (२३)

ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन ।
तयापासीं समाधान । पुशिलें पाहिजे ॥ २४॥
असे ज्ञान ज्याच्याजवळ असते तोच संत असे जाणावे व त्यालाच समाधान मिळविण्याचा मार्ग विचारावा. (२४)

अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांपडेल ज्ञान ।
करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचें ॥ २५॥
एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला, तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार ? एका दैवहीन माणसाला दुसऱ्या करंड्याचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य कसे उदयाला येणार ? (२५)

रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला ।
निर्बळापाशीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६॥
एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला, तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल ? किंवा निर्बलाकडून निर्बलाला मदत कशी मिळणार ? (२६)

पिशाच्यापाशीं पिशाच गेलें । तेथें कोण सार्थक झालें ।
उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणू ॥ २७॥
पिशाच्यापाशी पिशाच्च गेले तर ते पिशाच्चयोनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल ? दारू पिऊन उन्मत्त झालेल्याला तसाच उन्मत्त भेटला तर त्यांची समजूत कोण घालणार ? (२७)

भिकायापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा ।
उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८॥
भिकल्यापाशी भिक्षा मागितली तर काय लाभ होणार ? दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्रास होणार ? आणि कृष्णपक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार ? (२८)

अबद्धापाशीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबद्ध ।
बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९॥
एका गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार ? बद्धाला बद्ध भेटून तो सिद्ध होऊ शकत नाही. (२९)

देह्यापाशीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही ।
म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३०॥
एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषांवाचून ज्ञानमार्ग सापडत नाही. (३०)

याकारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासारविचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१॥
म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे मग सातसारविचासने मोक्ष प्रास होतो. (३१)

हरि ॐ तत्सत् । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'देवशोथननाम' समास पहिला समाप्त

GO TOP

समास दुसरा : ब्रह्मपावननिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें ।
नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता ज्या उपदेशाने सायुज्यप्राक्षी होते त्या उपदेशाची लक्षणे ऐका. नाना मतांचा काथ्याकूट उपयोगी पडणार नाही. (१)

ब्रह्मज्ञानावीण उपदेश । तो म्हणों नये विशेष ।
धान्येविण जैसें भूस । खातां नये ॥ २॥
ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य होत नाही. जसे धान्याशिवाय असलेले फ खाता येत नाही. (२)

नाना काबाड बडविलें । नातरी तक्रचि घुसळिलें ।
अथवा धुवणचि सेविलें । सावकाश ॥ ३॥
नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या ।
खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैशा ॥ ४॥
तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना उपदेशांचा शीण ।
सार सांडून असार कोण । शहाणा सेवी ॥ ५॥
रसरहित कडबा कुटला किंवा लोणी काढलेले ताक घुसळले किंवा तांदळाचे धुवणच सावकाश प्राशन केले किंवा अनेक फळांच्या सालीच खाल्या, अथवा रसहीन चोयट्या चोखल्या, किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्या, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवायचे नाना उपदेश म्हणजे केवळ श्रमच असतात. ब्रह्मज्ञान हेच सार आहे. ते सोडून कुठला शहाणा असाराचे सेवन करील ? (३ -५)

आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण ।
सुचित करावें अंतःकरण । श्रोतेजनीं ॥ ६॥
आता गुणातीत जे ब्रह्म त्याचे वर्णन करतो. श्रोत्यांनी एकाग्र मन करून ते ऐकावे. (६)

सकळ सृष्टीची रचना । तें हें पंचभौतिक जाणा ।
परंतु हें तगेना । सर्वकाळ ॥ ७॥
ही सर्व वृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झाली असून ती सर्वकाळ टिकणारी नाही, म्हणजेच अशाश्वत आहे. (७)

आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
येर पंचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८॥
या वृष्टीची रचना होण्याआधी व तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्म असते, हीच खरी शाश्वताची खूण आहे. इतर जे जे पांचभौतिक असते, ते नाशिवंत असते. (८)

येरवीं हीं पाहतां भूतें । देव कैसें म्हणावें त्यांतें ।
भूत म्हणतां मनुष्यांतें । विषाद वाटे ॥ ९॥
एरवी ही वृष्टी पाहिली म्हणजे ती पंचमहाभूतांची आहे असे दिसून येते. भूतांना देव कसे म्हणावे ? भूत म्हणून कुणी संबोधले तरी मनुष्याला भीती वाटते. (९)

मा तो जगन्नाथ परमात्मा । त्यासि आणि भूतउतपमा ।
ज्याचा कळेना महिमा । ब्रह्मादिकांसी ॥ १०॥
मग ज्याने हे जग निर्माण केले त्या जगजनक परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी ? ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही. (१०)

भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष ।
याकारणें महापुरुष । सर्व जाणती ॥ ११॥
त्या जगदीशाला भूतासारखा म्हणावे तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. (११)

पृथ्वी आप तेज वायु आकाश । यां सबाह्य जगदीश ।
पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी ॥ १२॥
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत भरलेला आहे. पंचमहाभूतांचा नाश होतो, पण आत्मा अविनाशरूप आहे. (१२)

जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम ।
नामरूपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥ १३॥
जे जे रूप आणि नाम आहे तो तो सर्व भ्रमच आहे. नामरूपातीत जे परमात्मतत्त्व त्याचे रहस्य अनुभवानेच जाणावे लागते. (१३)

पंचभूतें आणि त्रिगुण । ऐशी अष्टधा प्रकृति जाण ।
अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥ १४॥
पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आहे. या अष्टधा प्रकृतीला ' दृश्य ' असे नामाभिधान आहे. (१४)

तें हें दृश्य नाशिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत ।
निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५॥
ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद व सुती सांगतात. निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे, हे ज्ञानी लोक जाणतात. (१५)

जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें जाळितां जळेना ।
जें कालवितां कालवेना । आपेंकरूनी ॥ १६॥
ते ब्रह्म शस्त्राने तोडू जाता तुटत नाही, अग्रीने जाळावे म्हटले तर जळत नाही, पाण्याने कालवावे तर ते कालवले जात नाही. (१६)

जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना झडेना ।
जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥ १७॥
ते परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, ते घडविता येत नाही, दडवता म्हणजे लपवताही येत नाही. (१७)

ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वांहूनि अनारिसें ।
परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८॥
त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही, ते सर्वांहून विलक्षण आहे, पण सर्वकाळ असते. (१८)

दिसेना तरी काय झालें । परंतु सर्वत्र संचलें ।
सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९॥
ते जरी दिसत नसले तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले आहे. जेथे तेथे सर्वत्र व्यापलेले आहे. (१९)

दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पहावें ।
परंतु गुज तें जाणावें । गौप्य आहे ॥ २०॥
आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की जे दिसेल तेच पाहावे आणि खरे मानावे. परंतु जे रहस्य असते ते गुप्त असते हे जाणून घ्यावे. (२०)

प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार ।
सद्गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥ २१॥
जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे व जे गुप्त आहे ते सार जाणावे. गुरूच्या उपदेशाने हे रहस्य उमजू लागते. (२१)

उमजेना तें उमजावें । दिसेना तें पहावें ।
जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२॥
विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घ्यावे, जे दिसत नसेल ते पाहावे, जे कळत नसेल ते जाणून घ्यावे. (२२)

गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें ।
कानडेंचि अभ्यासावें । सावकाश ॥ २३॥
जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, जे असाध्य आहे ते साधावे. अवघड असेल त्याचा चिकयिने अभ्यास करावा. (२३)

वेद विरंचि आणि शेष । जेथें शिणले निःशेष ।
तेंचि साधावें विशेष । परब्रह्म तें ॥ २४॥
वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्याचे वर्णन करता करता पार थकून गेले, त्या परब्रह्माची विशेषे करून प्राप्ती करून घ्यावी. (२४)

तरी तें कवणें परी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें ।
अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५॥
तरी ते कसे साधावे असा प्रश्न केला असता त्याचे स्वाभाविक साधन सांगतात की, अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्रास करून ध्यावे. (२५)

पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।
वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६॥
ते परब्रह्म पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायु नव्हे कोणत्या एका रंगाचेही ते नाही. ते अव्यक्त आहे. (२६)

तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव ।
जितुके गांव तितुके देव । जनांकारणें ॥ २७॥
त्या परब्रह्मालाच देव म्हणावे. इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे. म्हणून त्यांना जितके गाव तितके देव असतात. (२७)

ऐसा देवाचा निश्चयो झाला । देव निर्गुण प्रत्यया आला ।
आतां आपणचि आपला । शोध घ्यावा ॥ २८॥
याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजेच देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आले. आता आपण आपलाच शोध घ्यावा. (२८)

माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो ।
मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनही नव्हे ॥ २९॥
आपण ' माझे शरीर ' असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहावेगळे आहोत हे कळ्ये. माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे. मन म्हणजे मी नव्हे हे उघड होते. (२९)

पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार ।
तत्त्वें तत्त्व झाडितां सार । आत्माचि उरे ॥ ३०॥
देहासंबंधी विचार केला की देहम्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे कळून येते. तत्त्वाने तत्त्व झाडले म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूते नाहीशी होऊन सार म्हणजे आत्माच शिल्लक सहतो. (३०)

आपणासि ठावचि नाहीं । तेथें पाहणें नलगे कांहीं ।
तत्त्वें ठायींच्या ठायीं । विभागूनि गेलीं ॥ ३१॥
ज्याला आपण मी म्हणत होतो, त्याला स्थानच नाही असे कळून येते, मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. च्या पंचमहाभूतांचा देह बनलेला असतो, ती भूते ठायीच्या ठायी विभागून जातात. (३१)

बांधली आहे तों गांठोडी । जो कोणी विचारें सोडी ।
विचार पाहतां गांठोडी । आढळेना ॥ ३२॥
देह म्हणजे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. ते जो कोणी विचाराने सोडतो, त्याला असे कळून येते की गाठोडेच नाही. (३२)

तत्त्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार ।
एक आत्मा निरंतर । आपण नाहीं ॥ ३३॥
शरीर हे तत्त्वांचे गाठोडे आहे. त्यासंबंधी विचार केला असता कळून येते की, आपण नाहीच. फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. (३३)

आपणासि ठावचि नाहीं । जन्म मृत्यु कैंचे काई ।
पाहतां वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४॥
आपण असा आज्याहून वेगळा कुणी नाहीच हे कळले की मग जन्ममृत्यू कोठले ? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप-पुण्य नसते. (३४)

पाप पुण्य यमयातना । हें निर्गुणीं तों असेना ।
आपण तोचि तरी जन्ममरणा । ठावो कैंचा ॥ ३५॥
निर्गुणाच्या ठिकाणी पाप-पुण्य, यमयातना इत्यादी काही नसते, आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत, तर मग जन्म-मरणाला ठाव कोठे आहे ? (३५)

देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला ।
देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६॥
मी म्हणजे देह या देहबुद्धीने जो बांधला गेला होता, त्याला विवेकाने आपण देह नाही, हे कळले, म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले. याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. (३६)

झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक ।
परंतु हा विवेक । पाहिलाचि पहावा ॥ ३७॥
त्याच्या जन्माचे सार्थक झाले. पण आपण निर्गुण आत्मा हा विवेक सतत करीत राहिले पाहिजे. (३७)

जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां दृश्य ओसरे ।
स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८॥
जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे ही पंचभौतिक वृष्टी नष्ट होते व स्वस्वरूपानुसधानाने मनुष्य तरतो. (३८)

आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें ।
आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९॥
आपणास निवेदावे, आपण विवेकाने उरूच नये, याचे नाव आत्मनिवेदन आहे. (३९)

आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन ।
पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥
आधी अध्यात्मश्रवण करावे, नंतर गुरुभक्ती करावी, म्हणजे सदुरूंच्या कृपेने-प्रसादाने आत्मनिवेदन घडते. (४०)

आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरी ।
आपण आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१॥
आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजेच परिपूर्ण वस्तू आत्मावरच निरंतर आहोत, असा बोध अंत्यत होतो. (४१)

त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला । संसारखेद तो उडाला ।
देह प्रारब्धीं टाकिला । सावकाश ॥ ४२॥
त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असे झाल्यावर त्याचे संसार ख नाहीसे होते. मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वत : स्वरूपी स्वस्थ सहतो. (४२)

यासि म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।
परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाहला ॥ ४३॥
यालाच आत्मज्ञान म्हणतात. याच्यायोगेच शाश्वत समाधान मिल्ले. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो, म्हणजेच भक्त होतो. (४३)

आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां ।
तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥
आता जे होणार असेल ते होईना का, जे जाणार असेल ते जाईना का, अशी त्याची वृत्ती बनते आणि मनातली जन्ममृत्यूसंबंधीची आशंका नष्ट होते. (अ)

संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य झालें ।
मुख्य देवासि ओळखिलें । सत्संगेंकरूनी ॥ ४५॥
संसारातील कष्ट, येरझारा चुकल्या, देवभक्तांचे ऐक्य झाले आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणता ही ओळखही पटली. (४५)

हरिः ऒं तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके
ब्रह्मपावननिरूपण नाम द्वितीयः समासः ॥ २॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंबादे 'ब्रह्मपावननिरूपण नाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : मायोद्भवनिरूपण

॥ श्रीराम ॥

निर्गुण आत्मा तो निश्चळ । जैसें आकाश अंतराळ ।
घन दाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १॥
आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो. तो आकाश वा अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो. (१)

जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदंडाहूनि उदंड ।
जें गगनाहूनि वाड । अति सूक्ष्म ॥ २॥
आत्मा हा अखंड, उदंडाहून उदंड, गगनाहूनही व्यापक आणि सूक्ष्म आहे. (२)

जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना ।
जें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ ३॥
जो दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, कुठे येत नाही, जात नाही, असे ते परब्रह्म असते. (३)

जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना ।
जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४॥
परब्रह्म चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, रचले जात नाही अथवा खचतही नाही. (४)

जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निष्कलंक आणि निखळ ।
सर्वांतर आकाश पाताळ । व्यापूनि असे ॥ ५॥
ते सर्वकाळ समृखच असते. निष्कलंक आणि निश्चळ असून आकाश, पाताळादी सर्वांच्या अंतरी व्यापून असते. (५)

अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे तें माया सगुण ।
सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६॥
ते परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असते, तर माया ही सगुण असून नाश पावते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवले असते. (६)

या कर्दमाचा विचार । करूं जाणती योगीश्वर ।
जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७॥
पाणी मिसळलेले दूध असेल तर राजहंस जसे त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो, त्याप्रमाणे सगुण-निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात. (७)

जड सकळ पंचभौतिक । त्यामध्यें आत्मा व्यापक ।
तो नित्यानित्यविवेक । पाहतां कळे ॥ ८॥
अचेतन आणि शबल असलेल्या पांचभौतिक वृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापक असतो. तो नित्यानित्यविवेकाच्या योगे कळतो. (८)

उंसामधील घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस ।
तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें ओळखावा ॥ ९॥
उसामधला रस ग्रहण करून उरलेल्या चोयट्याचा त्याग करावा, त्याप्रमाणे या पंचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश विवेकाने ओळखावा. (९)

रस नाशवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्चळ ।
रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १०॥
उसाचा रस पातळ असून नाशिवंत असतो, पण आत्मा शाश्वत व निश्चळ असतो. रस अपूर्ण असतो, तर आत्या केवळ परिपूर्ण असतो. (१०)

आत्म्यासारिखें एक असावें । मग तें दृष्टांतासि द्यावें ।
दृष्टांतमिसे समजावें । कैसें तरी ॥ ११॥
आल्यासारखे दुसरे एखादे असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता, पण त्याच्यासारखे दुसरे काही नाहीच. तरीही दृष्टांतामुळे विषय जस तरी समजतो, म्हणून दृष्टांत दिला आहे. (११)

ऐशी आत्मस्थिति संचली । तेथें माया कैशी झाली ।
जैशी आकाशीं वाहिली । झुळूक वायूची ॥ १२॥
आकाशात वायूची झुळुक यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली. (१२)

वायूपासून तेज झालें । तेजापासून आप निपजलें ।
आपापासून आकारलें । भूमंडळ ॥ १३॥
वायूपासून तेज झाले, तेजापासून जल उत्पन्न झाले जलापासून पृथ्वी आकारास आली. (१३)

भूमंडळापासून उत्पत्ती । जीव नेणों झाले किती ।
परंतु ब्रह्म आदि अंतीं । व्यापून आहे ॥ १४॥
भूमंडळापासून किती जीव उत्पन्न झाले, हे सांगतासुद्धा येत नाही. परंतु त्या सर्वांच्या आदि- अंती ब्रह्म व्यापून आहे. (१४)

जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें अवघेंचि नासलें ।
परी मुळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५॥
जे जे काही निर्माण होते, ते ते सर्व नाश पावते, पण मुळात ब्रह्म सर्वत्र सचलेले असते. ते जसेच्या तसेच असते. त्यात बदल होत नाही. (१५)

घटापूर्वीं आकाश असे । घटामध्येंही आकाश भासे ।
घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६॥
घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतेच. घट निर्माण झाल्यावर त्या घयमध्येही आकाश भासू लागते, पण नंतर घट फुटला तरी आकाश जसेच्या तसेच असते. त्याचा नाश होत नाही. (१६)

तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणि अढळ ।
मध्यें होत जात सकळ । सचराचर ॥ १७॥
तसेच परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ असते. सर्व चराचर त्यात होत-जात असते. (१७)

जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें ।
सर्व नासतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८॥
जे जे काही निर्माण होते, ते आधीच ब्रह्माने व्यापलेले असते. त्या निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसेच्या तसेच राहते. (१८)

ऐसें ब्रह्म अविनाश । तें सेविती ज्ञाते पुरुष ।
तत्त्वनिरसनें आपणास । आपण लाभे ॥ १९॥
असे अविनाशी जे ब्रह्म त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय घेतात. विवेकाने सर्व तत्त्वांचे निरसन करीत गेले की, आपल्याला स्वस्वरूपानुभव प्रास होतो. (१९)

तत्त्वें तत्त्व मेळविलें । त्यासि देह ऐसें नाम ठेविलें ।
तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्त्वें तत्त्व ॥ २०॥
तत्त्वांत तत्त्व मिळून तत्त्वांचे गाठोडे असा देह निर्माण होतो. जाणते पुरुष असतात ते एका तत्त्वाचा दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्रास करून घेतात. (२०)

तत्त्वझाडा निःशेष होतां । तेथें निमाली देहाहंता ।
निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाहली ॥ २१॥
देह हे तत्त्वांचे गाठोडे आहे आणि आपण त्याहून वेगळे आहोत हे कळून आल्यावर देहाची अहंता नष्ट होते आणि विवेकाच्या योगे निर्गुण ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे हे कळले की, त्याच्याशी एकरूपता प्रास होते. (२१)

विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्त्वें तत्त्व ओसरलें ।
आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२॥
विवेकाने देहाकडे पाहिले की तत्त्वात तत्त्व लय पावते व आपण काही नाहीच याचा माणसाला प्रत्यय येतो. (२२)

आपला आपण शोध घेतां । आपुली तों मायिक वार्ता ।
तत्त्वांतीं उरलें तत्त्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३॥
आपला आपण शोध घेऊ लागल्यावर आपले अस्तित्व ही मायिक गोष्ट आहे हे कळते. सर्व तत्त्वांचे निरसन झाल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढे राहते. आपण ज्याला मी म्हणतो, तो राहातच नाही. (२३)

आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म ।
तत्त्वासरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४॥
मीपणाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. तत्त्वांचे संपूर्ण निरसन झाले की मी-तू पणाचा श्रम नाहीसा होतो. (२४)

मीपण पाहतां आढळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना ।
आपण तेंचि परी कळेना । सद्गुरूविण ॥ २५॥
शोध घेऊ लागल्यावर मी कुठे आढळतच नाही. निर्गुण ब्रह्म चळत नाही. पण आपण म्हणजे ते निर्गुण ब्रह्मच आहोत, हे सदुरूशिवाय कळत नाही. (२५)

सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें ।
पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६॥
सारासारविचाराने मी कोण याचा शोध घेऊ लागल्यावर असार होते ते सर्व निघून गेले आणि सार उरले ते म्हणजेच निर्गुण ब्रह्म. (२६)

आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळामध्यें व्यापिलें ।
सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥
आधी ब्रह्माचे जे वर्णन केले आहे, तेच सर्वामध्ये व्यापून राहिले आहे आणि सर्व जे निर्माण झाले होते, ते नाश पावले आणि जे उरले ते केवळ ब्रह्मच होय. (२७)

होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार ।
आपला आपणासि विचार । ठायीं पडे ॥ २८॥
विवेकाने पांचभौतिक सुष्टीसंबंधी सायसारविचार केला की आपण कोण याची जाणीव आपल्याला होऊ लागते. (२८)

आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९॥
आपण देह म्हणजे मी अशी कल्पना केली होती. पण आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण म्हणजे देह नव्हे हे कळते. याप्रमाणे शोध करता करता मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे, असे करता करता मी च शिल्लक राहत नाही, मी जाऊन फक्त निर्गुण आत्मा तेवढा उरतो व तोच आपण असा अनुभव येतो. (२९)

झालिया तत्त्वांचें निरसन । निर्गुण आत्माचि आपण ।
कां दाखवावें मीपण । तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥
तत्त्वांचे निरसन झाले की निर्गुण आत्या तोच आपण असा अनुभव येतो. म्हणून तत्त्वनिरसनानंतर मीपणा दाखविणार तरी कसा ? (३०)

तत्त्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें ।
सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१॥
तत्त्वांमध्ये मी पण म्हणजे मी देह हे नाहीसे होऊन केवळ निर्गुण ब्रह्म तेवढेच साहजिक शिल्लक उरते. तोच मी म्हणजे सोहंभावाने तसा अनुभव आल्याने सहजच आत्मनिवेदन घडते. (३१)

आत्मनिवेदन होतां । देवभक्तांस ऐक्यता ।
साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२॥
आत्मनिवेदन होताच देवाची- भक्ताची ऐक्यता झाली आणि विभक्तता जाऊन तो खराखुरा भक्त बनला. (३२)

निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पाप पुण्य ।
निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३॥
निर्गुणाला जन्ममरण नाही, निर्गुणाला पाप-पुण्य नाही. त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच तो मुक्त होतो. (३३)

तत्त्वीं वेंटाळूनि घेतला । प्राणी संशयें गुंडाळला ।
आपणास आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४॥
जीव विनाशी तत्त्वांनी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयात गुरफटून जातो आणि म्हणून त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडून तो को म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो. (३४)

तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं ।
अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥
तत्त्वांत ज्या वेळी गुंतलेला असतो तेव्हा ' कोऽह' म्हणजे ' मी कोण ' असे म्हणतो व विवेक उत्पन्न झाला की ' सोऽह ' म्हणजे ' मी तोच ' असे म्हणू लागतो आणि स्वस्वरूपानुभवाने जीव-ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की ' अहम् ' आणि ' सोऽह' दोन्ही मावळ्यात. (३५)

याउपरि उर्वरित । तेंचि स्वरूप संत ।
देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६॥
यानंतर जे शेष राहते तेच नित्य त्रिकाला- बाधित आत्म-स्वरूप होय. देही असून मग तो याप्रकारे देहातीत होतो. (३६)

संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥
आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥
संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही. म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते, म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी. (३७)

हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥
इति श्रीवासबोधे गुरुशिष्यसवादे 'मायोद्‌भवनाम' समास तिसरा समाप्त.

GO TOP

समास चौथा : ब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र । त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।
द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र । आतां कलियुग ऐका ॥ १॥
कृतयुग सतरा लक्ष अठ्ठावीस हजार वर्षांचे, त्रेतायुग बारा लक्ष शहल्याव हजार वर्षांचे, हापरयुग आठ लक्ष चौसष्ट हजार वर्षांचे असते. आता कलियुगासंबंधी ऐका. (१)

कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र । चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र ।
ऐशीं चतुर्युगें सहस्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥
कलियुग चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे असते. चारी युगे मिळून कालगणना त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षे होते. अशी चार युगे हजार वेळा झाली की, ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. (२)

ऐसे ब्रह्मे सहस्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका ।
विष्णू सहस्र होतां ऐका । पळ एक ईश्वराचें ॥ ३॥
अशी ब्रह्मदेवाची हजार वर्षे म्हणजे विष्णूची एक घटका होते. विष्णूची हजार वर्षे म्हणजे ईश्वराचे एक पळ होते. (३)

ईश्वर जाय सहस्र वेळ । तैं शक्तीचें अर्ध पळ ।
ऐशी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४॥
ईश्वराची हजार वर्षे म्हणजे शक्तीचे अर्ध पळ होते. शास्त्रांमध्ये याप्रकारे कालगणना सांगितली आहे. (४)

चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् ।
पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥


विष्णोरेकः सहस्राणि पलमेकं महेश्वरम् ।
महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धं पलं भवेत् ॥


ऐशा अनन्त शक्ती होती । अनंत रचना होती जाती ।
तरी अखंड खंडेना स्थिति । परब्रह्माची ॥ ५॥
अशा अनंत शक्ती असतात आणि अनंत ब्रह्मांडरचना होतात आणि जातात. पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही. (५)

परब्रह्मासि कैंची स्थिती । परी ही बोलावयाची रीती ।
वेदश्रुती नेति नेति म्हणती । परब्रह्मीं ॥ ६॥
परब्रह्माची कसली आली आहे स्थिती ? पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि सुतीही नेति नेति म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. (६)

चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी ।
उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७॥
चार हजार सातशे साठ वर्षे इतका काळ चालू कलियुगातील गेला आहे. (म्हणजे शके १५८१ मध्ये श्रीदासबोधरचना झाली असावी.) उरलेल्या कलियुगाच्या काळासंबंधीचा विचार आता ऐका. (७)

चार लक्ष सत्तावीस सहस्र । दोनशें चाळीस संवत्सर ।
पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८॥
कलियुगाची चार लक्ष सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्षे अद्यापि शिल्लक आहेत. यापुढे येणाऱ्या काळात एकमेकांत वर्णसंकर होणार आहे. (८)

ऐसें रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर ।
पाहतां येथींचा विचार । अंत न लगे ॥ ९॥
याप्रमाणे सर्व चराचराची रचना झाली आहे. येथे एकाहून एक श्रेष्ठ आहेत. येथला विचार हा असा पाहू लागले असता त्याचा अंत लागत नाही. (९)

एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर ।
एक म्हणती शक्ति थोर । सकळांमध्यें ॥ १०॥
एक म्हणतात, विष्णू थोर आहे. कुणी म्हणतात रुद्र थोर आहे, तर कुणी म्हणतात, सगळ्यांच्या मध्ये शक्ती थोर आहे. (१०)

ऐसे आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं ।
यद्दृष्टं तन्नष्टं हें श्रुति । बोलतसे ॥ ११॥
असे आपापल्या परीने म्हणतात. परंतु कल्पानी सर्वच नाश पावते. यद् इष्ट तर नाम असे धुती सांगते. (११)

आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां ।
याचा निश्चयो निवडेना । साधुविण ॥ १२॥
सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. साधूशिवाय या विषयींचा निर्णय होऊ शकत नाही. (१२)

साधु निश्चयो करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक ।
येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३॥
अवघे चराचर हे मायिक आहे. आत्माच एक सर्वव्यापक आहे, असा निश्चय साधू करतात. (१३)

चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना ।
हें कां तुम्ही विचाराना । आपुलें ठायीं ॥ १४॥
सैन्याचे चित्र रेखाटलेले आहे, तर त्यात कोण थोर आणि कोण लहान याचा तुम्ही आपल्याशीच विचार करावा. (१४)

स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरही कल्पिलें ।
परंतु जागें झालिया झालें । कैसें पहा ॥ १५॥
स्वप्नात अनेक दृश्ये पाहिली. त्यात कुणी लहान, कुणी थोर अशी कल्पनाही केली. पण जागे झाल्यावर काय होते, याचा जस विचार कस. (१५)

पाहतां जागृतीचा विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।
झाला अवघाचि विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६॥
जागृत झाल्यावर विचार केला की, कळून येते की, तेथे कुणी लहान नसतो किंवा कुणी थोरही नसतो. स्वतःच्या कल्पनेमुळे सगळा स्वप्नविस्तार दिसत असतो. (१६)

अवघाचि मायिक विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।
लहानथोराचा हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७॥
कुणाला थोर ठरवायचे किंवा लहान म्हणायचे हा सगळा मायेचा प्रभाव असतो. ज्ञानी लोक असतात तेच लहानथोराचा निर्णय करू शकतात. (१७)

जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतचि मेला ।
परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८॥
जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखाच समजावा. श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केला पाहिजे. (१८)

जयां झालें आत्मज्ञान । तेचि थोर महाजन ।
वेद शास्त्रें पुराण । साधु संत बोलिले ॥ १९॥
ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खस थोर महात्मा होय. वेद, शास्त्रे, पुसणे व साधू-संतांचे असे मत आहे. (१९)

एवं सकळांमध्यें थोर । तो एकचि परमेश्वर ।
तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २०॥
थोडक्यात असे म्हणता येईल की, एक परमेश्वरच सर्वांत थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्याच ठिकाणी उत्पन्न होतात आणि लय पावतात. (२०)

तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार ।
स्थानमानांचा विचार । ऐलिकडे ॥ २१॥
तो परमेश्वर खरे तर निर्गुण-निसकार आहे. त्याचे ठिकाणी उत्पत्ती, विस्तार वगैरे काहीच नाही. स्थलकालाचा, आकाराचा विचार अगदी अलीकडचा आहे. (२१)

नांव रूप स्थान मान । हा तों अवघाचि अनुमान ।
तथापि होईल निदान । ब्रह्मप्रळयीं ॥ २२॥
नाम, रूप, स्थल आकार काल ह्या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्मप्रलयाच्या वेळी याचा निश्चित निर्णय होईल. (२२)

ब्रह्म प्रळयावेगळें । ब्रह्म नामरूपावेगळें ।
ब्रह्म कोणा एक्या काळें । जैसें तैसें ॥ २३॥
ब्रह्म हे नामरूपाहून निराळे, प्रलयावेगळे असते. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसेच असते. (२३)

करिती ब्रह्मनिरूपण । जाणती ब्रह्म संपूर्ण ।
तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४॥
जे ब्रह्मनिरूपण करतात, संपूर्ण ब्रह्माला ऐक्यरूपे, अनुभवरूपाने जाणतात, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण समजावे. (२४)

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥
इति श्रीदासवोधे गुरूशिन्यसंवादे 'ब्रह्मनिरूपणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : मायाब्रह्मनिरूपण

॥ श्रीराम ॥

श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें ।
श्रोत्या वक्त्या चे मिषें । निरूपण ऐका ॥ १॥
श्रोते विचारतात की, माया कशी असते ? ब्रह्म कसे असते ? श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोते-वक्यांच्या संवादाच्या निमित्ताने निरूपण ऐकावे. (१)

ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार ।
ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥ २॥
ब्रह्म हेनिर्गुण निराकार आहे, तरमाया ही सगुण साकार आहे. ब्रह्माला मर्यादा, अंत नाही. मायेला अंत आहे. (२)

ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ।
ब्रह्म निरुपाधि केवळ । माया उपाधिरूप ॥ ३॥
ब्रह्म निर्मळ निश्चळ आहे, तर माया चंचळ असून चपळ आहे. ब्रह्म केवळ निरुपाधिक आहे, तर माया उपाधिरूप आहे. (३)

माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना ।
माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४॥
माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया भासते, ब्रह्म भासत नाही. माया नाश पावते, ब्रह्म कल्पान्ताचे वेळीही नाश पावत नाही. (४)

माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना ।
माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५॥
माया रचली जाते, ब्रह्म रचले जाऊ शकत नाही. माया नष्ट होते. ब्रह्म नाश पावत नाही. अज्ञानी माणसाला माया गोड वाटते, त्याला ब्रह्म रुचत नाही. (५)

माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना ।
माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६॥
माया उपजते, ब्रह्म उपजत नाही. माया मरते, ब्रह्म मरत नाही. मायेची धारणा करता येते, ब्रह्माची धारणा करता येत नाही. (६)

माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना ।
माया विटे ब्रह्म विटेना । अविट तें ॥ ७॥
माया फुटते. ब्रह्म फुटत नाही. माया तुटते, ब्रह्म तुटत नाही. माया विटते, ब्रह्म अविनाशी असल्याने ते विटत नाही. (७)

माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म कांहींच न करी ।
माया नाना रूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८॥
माया विकारी आहे, तर ब्रह्म निर्विकारी आहे. मायाच सर्व काही करते. ब्रह्म काहीच करत नाही. माया नाना रूपे धारण करते, तर ब्रह्म हे अरूप आहे. (८)

माया पंचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक ।
मायाब्रह्माचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९॥
माया पांचभौतिक असून अनेक रूपे धारण करते व अशाश्वत असते. तर ब्रह्म एकच असून ते शाश्वत असते. विवेकी लोकच मायाब्रह्माचा विवेक जाणतात. (९)

माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।
माया अर्ति पारावार । ब्रह्मासि नाहीं ॥ १०॥
माया लहान आहे, तर ब्रह्म थोर आहे. माया असार तर ब्रह्म सार आहे. माया अलीकडे आहे, तर ब्रह्माला शेवटच नाही. (१०)

सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिति आच्छादिली ।
परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११॥
माया विस्तार पावल्यामुळे तिने ब्रह्माला झाकून टकले आहे. संत असतात, ते त्या झाकल्या गेलेल्या ब्रह्मस्थितीला निवडून घेतात. (११)

गोंडाळ सांडून नीर घेइजे । नीर सांडून क्षीर सेविजे ।
माया सांडून अनुभविजे । परब्रह्म तैसें ॥ १२॥
शेवाळदूर सारून पाणी घ्यावे किंवा नीरक्षीरमिश्रणातून नीरसांडून दूध सेवन करावे. तसे माया सांडून ब्रह्म अनुभवावे लागते. (१२)

ब्रह्म आकाशा ऐसें निवळ । माया वसुंधरा डहुळ ।
ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३॥
ब्रह्म आकाशासारखे निर्मळ आहे. माया वसुंधरेसारखी गढूळ असते. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म, तर माया स्थूलरूप असते. (१३)

ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे । माया ते प्रत्यक्ष दिसे ।
ब्रह्म तें समचि असे । माया ते विषमरूप ॥ १४॥
ब्रह्म अप्रत्यक्ष असते, माया प्रत्यक्ष दिसून येते. ब्रह्म समच असते, तर माया विषमरूपी असते. (१४)

माया लक्ष्य ब्रह्म अलक्ष्य । माया साक्ष ब्रह्म असाक्ष ।
मायेमध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं ॥ १५॥
माया लक्ष्य आहे, तर ब्रह्म अलक्ष्म आहे. माया साध्य आहे, तर ब्रह्म असाध्य आहे. मायेमध्ये मी व तू असे दोन पक्ष आहेत, तर ब्रह्म हे अपक्ष आहे. (१५)

माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत । माया असत् ब्रह्म सत् ।
ब्रह्मासि नाहीं करणें हित । मायेसि आहे ॥ १६॥
माया पूर्वपक्ष म्हणजे मिथ्या आहे, तर ब्रह्म सिद्धांत आहे. माया अनित्य आहे, तर ब्रह्म नित्य आहे. ब्रह्माला हेतू नाही, कर्म नाही, तर माया हेतुयुक्त व कर्ममय आहे. (१६)

ब्रह्म अखंड घनदाट । माया पंचभौतिक पोंचट ।
ब्रह्म तें निरंतर निघोट । माया ते जुनी जर्जरी ॥ १७॥
ब्रह्म अखंड ओतप्रोत आहे, तर माया पांचभौतिक आणि पोकळ आहे. ब्रह्म हे निरंतर परिपूर्ण आहे तर माया जुनी, जर्जर आहे. (१७)

माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना ।
माया विघडे ब्रह्म विघडेना । जैसें तैसें ॥ १८॥
माया घडवली जाते, ते घडवले जात नाही. माया पडते, ब्रह्म पडत नाही. माया बाधित होते, ब्रह्म बाधित होत नाही. ते जसेच्या तसेच असते. (१८)

ब्रह्म असतचि असे । माया निरसितांच निरसे ।
ब्रह्मास कल्पांत नसे । मायेसि असे ॥ १९॥
ब्रह्म नेहमीच असते. मायेचे निरसन केले असता ती नाहीशी होते. ब्रह्माला कल्पान नाही, मायेला कल्पानं आहे. (१९)

माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ ।
माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २०॥
माया कठीण तर ब्रह्म अत्यंत कोमल, माया अल्प तर ब्रह्म विशाल आहे. माया नाशिवंत आहे, तर ब्रह्म सर्वकाळ असते. (२०)

वस्तु नव्हे बोलिजे ऐशी । माया जैशी बोलिजे तैशी ।
काळ पावेना वस्तूसी । मायेसी झडपी ॥ २१॥
ब्रह्म हे वाणीने वर्णन करता येण्याजोगे नाही, तर मायेचे जसे वर्णन करावे तशी ती असते. काळ मायेवर झडप घालतो, तर तो ब्रह्मास स्पर्शही करू शकत नाही. (२१)

नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ।
माया भंगे ब्रह्म अभंग । जैसें तैसें ॥ २२॥
नाना रूपे, नाना रंग हा सर्व मायेचा विलास आहे. माया नष्ट होते, ब्रह्म हे जसेच्या तसे अभंग राहते. (२२)

आतां असो हा विस्तार । चालत जातें सचराचर ।
तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३॥
असो. आता हा विस्तार पुरे झाला. या जगात जे काही चराचर निर्माण होते व नष्ट होते तितकी सर्व माया आहे. परमेश्वर हा सबाह्य अभ्यंतरी व्यापून असतो. (२३)

सकळ उपाधींवेगळा । तो परमात्मा निराळा ।
जळीं असोन नातळे जळा । आकाश जैसें ॥ २४॥
जळात असूनही आकाश जसे जळाला स्पर्शतही नाही, तसे सबाह्य अभ्यतरी असूनही परमात्मा हा सर्व उपाधीपासून निराळा असतो. (२४)

मायाब्रह्मांचें विवरण । करितां चुके जन्ममरण ।
संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५॥
मायाब्रह्माचे विवरण केल्याने जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. संतांना शरण गेले की, मोक्ष लाभतो. (२५)

अरे या संतांचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।
जयांचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६॥
ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष जगदात्मा हृदयीच प्रकट होतो, त्या संतांचा महिमा अपार आणि अवर्णनीय आहे. (२६)

हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'मायाब्रह्मनिरूपणनाम' समास पाचवा समाप्त.

GO TOP

समास सहावा : सृष्टीकथन

॥ श्रीराम ॥

सृष्टीपूर्वींच ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे ।
आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य कीं मिथ्या ॥ १॥
वृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म असते. त्यावेळी वृष्टीचा मागमूसही नसतो. आता वृष्टी दिसते आहे, मग ती सत्य आहे की मिथ्या आहे. (१)

तुम्ही सर्वज्ञ गोसावी । माझी आशंका फेडावी ।
ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २॥
आपण सर्वज्ञ आहात, स्वामी आहात, तेव्हा माझ्या या शंकेचे निरसन करावे, अशी श्रोत्याने वक्याला विनंती केली. (२)

आतां ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर ।
वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला ॥ ३॥
त्यावर सर्वज्ञ आणि उदार वक्ता म्हणाला की, कथेला तत्यर होऊन, सावध होऊन या प्रश्नाचे उत्तर आता ऐका. (३)

जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन ।
येणें वाक्यें सत्यपण । सृष्टीस आलें ॥ ४॥
'जीवभूतः सनातनः' असे गीतेचे वचन आहे. या वाक्यामुळे वृष्टीला सत्यत्व प्रास झाले आहे. (४)

यद्दृष्टं तन्नष्टं येणें- । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें ।
सत्य मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५॥
'यद् दृष्टं तन्नष्टं' असेही शास्त्रवचन आहे. त्यायोगे वृष्टी मिथ्या आहे असे ठरते. तेव्हा वृष्टी सत्य आहे की मिथ्या आहे याचा निवाडा कोणी करावा ? (५)

सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों तरी दिसे ।
आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६॥
सृष्टीला सत्य म्हणावे तर तिचा नाश होतो आणि मिथ्या आहे असे म्हणावे तर ती दिसते. म्हणून आता ती जशी आहे तशी सांगतो. (६)

सृष्टीमध्यें बहु जन । अज्ञान आणि सज्ञान ।
म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७॥
या वृष्टीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांतील काही सज्ञान आहेत, तर काही अज्ञान आहेत. म्हणून त्यांच्या मतांमध्ये भेद असतो व त्यामुळे समाधान होत नाही. (७)

ऐका अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत ।
देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ ८॥
अज्ञानी लोकांचे काय मत आहे ते ऐका. ते म्हणतात की, वृष्टी शाश्वत आहे. देव, धर्म, तीर्थ, व्रत इत्यादी सर्व सत्यच आहे. (८)

बोले सर्वज्ञांचा राजा । मूर्खस्य प्रतिमापूजा ।
ब्रह्मप्रळयाच्या पैजा । घालूं पाहे ॥ ९॥
त्यावर सर्वज्ञांचा बजा म्हणतो की, ' मूर्खस्य प्रतिमापूजा ' म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी असतात त्यांच्यासाठी मूर्तिपूजा असते. वृष्टीचा प्रलय झाला तरी जे उरते ते ब्रह्म होय, असे स्वानुभवाने तो पैजेवर म्हणू लागतो. (९)

तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी संध्या स्नान ।
गुरुभजन तीर्थाटन । कासया करावें ॥ १०॥
मग त्यावर अज्ञानी मनुष्य म्हणतो की, असे जर आहे, तर तू संध्याखान, गुरुभजन, तीर्थाटन करीत कशाला फिरतोस ? (१०)

तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दम् । वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः ।
वादे वादे जायते तत्त्वबोधः । बोधे बोधे भासते चन्द्रचूडः ॥ १॥
श्लोक अर्थ-निरनिराळ्या तीर्थांमध्ये पवित्र ब्राह्मणांचे समुदाय असतात. त्यांत तत्त्वज्ञानाची चर्चा चालते. त्या चर्चेतून तत्त्वबोध होतो, ज्ञानाचा निश्चय होतो. त्या निश्चयातून शंकरांचे ज्ञान प्राप्त होते.

ऐसें चन्द्रचूडाचें वचन । सद्गुरूचें उपासन ।
गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११॥
ज्ञानी उत्तर देत आहे की, गुरुगीतेच्या निरूपणात शंकराचे वचन आहे की, सदुरूची उपासना करावी. (११)

गुरूसि कैसें भजावें । आधीं तयासि ओळखावें ।
त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें ॥ १२॥
सदुरूची उपासना, भजन कसे करावे ? तर प्रथम सदुरूला ओळखावे व मग त्यांनी स्वात्मानुभवाने जे समाधान प्राप्त केलेले असते ते आपण स्वतःही विवेकाच्या योगे प्रास करून घ्यावे. (१२)

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम्
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १॥
श्लोक अर्थ - सद्‌गुरू ब्रह्मानंदस्वरूपच असतात. ते परम सुख देतात. ते केवळ ज्ञानमूर्तीच असतात. ते द्वंद्वातीत असतात. ते आकाशासारखे असतात. ते ' तत्त्वमसि ' याचा साक्षात् अनुभव घेतलेले असतात. ते एकरूप, नित्य, निर्मल, पवित्र आणि अचल असतात. सर्वांच्या हृदयात साक्षीरूपाने राहतात व भावातीत, त्रिगुणरहित असतात. अशा सदुरूंना मी नमस्कार करतो.

गुरुगीतेचें वचन । ऐसें सद्गुरूचें ध्यान ।
तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३॥
हे गुरुगीतेतील वचन असून त्यात याप्रमाणे सदुरूचे ध्यान वर्णिले आहे. अशा प्रकारे सदुरूंचे ध्यान केले असता वृष्टी मिथ्या आहे हे भान तरी कसे उरणार ? (१३)

ऐसें सज्ञान बोलिला । सद्गुरु तो ओळखिला ।
सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चितार्थ ॥ १४॥
सज्ञानाने याप्रमाणे उत्तर दिले. त्याने सदुरूचे स्वरूप जाणले आणि वृष्टी मिथ्या आहे असा निश्चित अर्थ केला. (१४)

श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवादा ।
म्हणे कैसा रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५॥
श्रोत्याला हे वचन मान्य होईना. तो वादविवादास अधिकच प्रवृत्त झाला आणि म्हणू लागला की, श्रीकृष्णाला तू अज्ञानी कसा रे म्हणतोस ? (१५)

जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन ।
तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६॥
'जीवभूतः सनातन: ' असे गीतेचे वचन आणि गीता भगवातू श्रीकृष्णांनी सांगितली आहे, त्यांना तू अज्ञानी कसा म्हणतोस ? (१६)

ऐसा श्रोता आक्षेप करी । विषाद मानिला अंतरीं ।
याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें ॥ १७॥
श्रोत्याने असा आक्षेप घेतला व तो मनामध्ये दुःख करू लागला. आता चतुर श्रोत्यांनी या आक्षेपाचे उत्तर सावध होऊन ऐकावे. (१७)

गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद ।
म्हणोनियां व्यर्थ खेद । वाहतोसि ॥ १८॥
गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितले, त्याचा अर्थ तुला कळला नाही, म्हणून तू उगीचच दुःख करीत आहेस. (१८)

अश्वत्थः सर्ववृक्षाणां ।
माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ ।
वृक्ष तोडितां तत्काळ । तुटत आहे ॥ १९॥
गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे की, ' सर्व वृक्षांत पिंपळ' ही माझी विभूती आहे. पण पिंपळ तोडला तर तो तत्काळ तुटतो. (१९)

नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ १॥
श्लोकार्थ - याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवू शकत नाही, आणि वायू याला सुकवू शकत नाही. (१)

शस्त्रांचेनि तुटेना । अग्नीचेनि जळेना ।
उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २०॥
श्रीकृष्ण सांगतात की, माझे स्वरूप असे आहे की, ते शस्त्राने तुटत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. पाण्याने ते कालवता येत नाही. (२०)

पिंपळ तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें ।
पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत ॥ २१॥
पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो, पिंपळ पाण्याने कालवता येतो, तो नाशिवंत असतो. (२१)

तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे ।
म्हणोनि हें उजेडे । सद्गुरुमुखें ॥ २२॥
पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, उडतो. आता या दोन वाक्यांचा समन्वय कसा घालायचा ? सदुरूंच्या मुखाने श्रवण घडले की, मगच यावर प्रकाश पडतो. (२२)

इन्द्रियाणां मनश्चास्मि' । कृष्ण म्हणे मन तो मी ।
तरी कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥ २३॥
कृष्ण सांगतात की, ' इंद्रियाणां मनश्चास्मि ' म्हणजे मन म्हणजे मी आहे, तर मग चंचळ मनाच्या ऊर्मीला आवर कशाला घालायचा ? (२३)

ऐसें कृष्ण कां बोलिला । साधनमार्ग दाखविला ।
खडे मांडूनि शिकविला । ओनामा जेवीं ॥ २४॥
लोकांना साधनामार्ग दाखवावा म्हणून श्रीकृष्ण असे बोलले आहेत. जसे लहान मुलांना खडे मांडून ओनामा शिकवावा तसे हे आहे. (२४)

ऐसा आहे वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद ।
देहबुद्धीचा विवाद । कामा नये ॥ २५॥
त्या वाक्याचा अर्थ असा आहे. श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, तेथे देहबुद्धीचा विवाद उपयोगी पडत नाही. (२५)

वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती ।
ते सर्वही निवडती । सद्गुरूचेनि वचनें ॥ २६॥
वेद, शास्त्र, सुती, स्मृती यांतील वचनांमध्ये विरोधाभास वाटतो, पण श्रीसदुरूच्या वचनाने सर्वांचा समन्वय कसा करावा हे कळते. (२६)

वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रें तोडी ऐसा कोण ।
हें निवडेना साधुविण । कदा कल्पांतीं ॥ २७॥
वेद आणि शास्त्रे यांच्यातील भांडण, मतभेद शस्त्राने तोडता येत नाहीत. साधुपुरुषांशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतापर्यंत होऊ शकत नाही. (२७)

पूर्वपक्ष आणि सिद्धांत । शास्त्रीं बोलिला संकेत ।
याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८॥
पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचे संकेत आहेत. त्यांचा निश्चित अर्थ साधुपुरुषांच्या वचनानेच कळतो. (२८)

येर्हशवीं वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें ।
बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रें ॥ २९॥
वादामध्ये एकाहून एक वरचढ अशा शंका निघत असतात आणि त्यांची एकापेक्षा एक वरचढ अशी उत्तरेही दिली जातात. वेदशास्त्रात असे पूर्वपक्ष व उत्तरपक्ष इतके भरलेले आहेत की सांगणे कठीण. (२९)

म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद ।
तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें ॥ ३०॥
म्हणून वादविवाद सोडून संवाद साधावा. म्हणजे त्यायोगे स्वानुभवाने ब्रह्मानंद प्रास होतो. (३०)

एके कल्पनेचे पोटीं । होती जाती अनंत सृष्टी ।
तया सृष्टीची गोष्टी । साच केवीं ॥ ३१॥
एका कल्पनेच्या योगाने अनंत वृष्टी उत्पन्न होतात व नाश पावतात. अशा सुष्टींना सत्य कसे म्हणावे ? (३१)

कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढ भाव ।
देवालागीं येतां खेव । भक्त दुःखें दुखवला ॥ ३२॥
कल्पनेने देव मानला आणि तेथे दृढभाव झाला की त्या देवाला अपाय होताच भक्त अत्यंत दुःखी होतो. (३२)

पाषाणाचा देव केला । एके दिवशीं भंगोनि गेला ।
तेणें भक्त दुखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३॥
पाषाणाचा देव केला आणि एके दिवशी तो भंगल्या. त्यामुळे त्या भक्ताला दुःख झाले व तो रडू लागला. जमिनीवर पडून दुःखाने गडबडा लोळू लागला. मोठ्याने आक्रोश करू लागला. (३३)

देव हारपला घरीं । एक देव नेला चोरीं ।
एक देव दुराचारीं । फोडिला बळें ॥ ३४॥
एक देव घरातच हरवला. एक देव कोणी चोरून नेला. एक देव कुणी दुराचारी माणसाने जबरदस्तीने फोडूनच यकला. (३४)

एक देव जापाणिला । एक देव उदकीं टाकिला ।
एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५॥
एक देव भ्रष्ट केला गेला, एक देव कुणी पाण्यात बुडवला तर एक देव कुणी पायदळी तुडवला. (३५)

काय सांगों तीर्थमहिमा । मोडोनि गेला दुरात्मा ।
थोर सत्व होतें तें मा । काय जाहलें कळेना ॥ ३६॥
लोक म्हणू लागले की खरोखर या तीर्थाचा किती महिमा होता ! दुराक्यांनी तो नाहीसा करून टाकला आहे ! खरोखर स्थान किती जागृत होते, पण आता ते सत्त्व कोठे गेले कळत नाही ! (३६)

देव घडिला सोनारीं । देव ओतिला ओतारीं ।
एक देव घडिला पाथरीं । पाषाणाचा ॥ ३७॥
एक देव सोनाराने घडवला, एक देव ओतह्यत ओतला. पाषाणाचा पाथरवटाने घडविला. (३७)

नर्मदा गंडिकातीरीं । देव पडिले लक्षवरी ।
त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८॥
चक्रतीर्थीं चक्रांकित । देव असती असंख्यात ।
नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९॥
नर्मदेच्या, गंडकीच्या तीरावर लक्षावधी देव पडले असतात. या प्रकारे अज्ञानी लोकांची स्थिती असते. देव एकच आहे, असा दृढ निश्चय त्यांच्या ठिकाणी नसतो. (३८ - ३९)

बाण तांदळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें ।
ऐसे देव कोण जाणे । खरे कीं खोटे ॥ ४०॥
शंकराचे बाण, शेंदूर फासलेले दगड तांब्याची नाणी, स्फटिक इत्यादी नाना प्रकारचे देव देव्हाऱ्यात पूजिले जातात. ते खरे की खोटे हे कोण जाणार ? (४०)

देव रेशिमाचा केला । तोही तुटोनियां गेला ।
आतां नवा नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१॥
रेशमाचा देव केला. तोही तुटून गेला, तेव्हा आता नवीन नेम धरला आणि मृत्तिकेच्या देवाची पूजा सुरू केली. (४१)

आमचा देव बहु सत्य । आम्हांस आकांतीं पावत ।
पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२॥
त्या त्या देवाचे भक्त म्हणतात की, आमचा देवच खस आहे. आम्हांला संकयच्या वेळी पावत असे. आणि सर्वकाळ आमचे मनोरथ तो पूर्ण करीत असे. (४२)

आतां याचें सत्त्व गेलें । प्राप्त होतें तें झालें ।
प्राक्तन नवचे पालटिलें । ईश्वराचेनि ॥ ४३॥
आता याचे सत्त्व गेले आहे. त्यामुळे जे प्रारब्धात होते ते भोग आता प्रास होत आहेत. प्रारब्ध चुकविता येत नाही. ईश्वरसुद्धा काही करू शकत नाही. (४३)

धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा ।
तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४॥
याप्रमाणे लोक धातू पाषाण, मृत्तिका, चित्रे, लाकूड इत्यादींच्या मूर्ती करून त्यांची पूजा करतात. श्रीसमर्थ म्हणतात की, मूर्खा, तुला भूल पडली आहे. या सर्वांत देव कुठे आहे ? (४४)

हे आपुलाली कल्पना । प्राक्तना-ऐशीं फळें जाणा ।
परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याचि ॥ ४५॥
म्हणोनि हें माया भ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें ।
वेद शास्त्रें पुराणें । ऐशींच बोलती ॥ ४६॥
ही सगळी आपली कल्पना आहे. आपल्या प्रारव्यानुसार आपल्याला सुखदुःखे भोगावी लागतात. खऱ्या देवाच्या खुणा काही वेगळ्याच असतात. म्हणून ही सर्व मायेची करणी आहे. ही वृष्टी कोटिगुणांनी मिथ्या आहे असे वेद, शास्त्रे, पुराणे सर्व एकमताने सांगतात. ४५-४६)

साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाचि अनुभव ।
पंचभूतातीत देव । सृष्टि मिथ्या ॥ ४७॥
साधुसंत, महानुभाव या सर्वांचा अनुभव असाच आहे की, पांचभौतिक वृष्टी ही मिथ्या आहे. खस देव या सर्वांच्या अतीत आहे. (४७)

सृष्टीपूर्वीं सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां ।
शाश्वत देव तत्त्वतां । आदि अंतीं ॥ ४८॥
वृष्टी होण्यापूर्वी, वृष्टी असताना आणि सर्व वृष्टीचा संहार झाल्यावर आधी आणि अंती देव तत्त्वतः शाश्वत असल्याने जसाच्या तसाच असतो. (४८)

ऐसा सर्वांचा निश्चयो । यदर्थीं नाहीं संशयो ।
व्यतिरेक आणि अन्वयो । कल्पनारूप ॥ ४९॥
वरील सर्वांचा हा स्वानुभवाचा निश्चय आहे. येथे संशयाला जागा नाही. वृष्टीचा संहार आणि उभारणी सर्व कल्पनारूप आहे. (४९)

एके कल्पनेचे पोटीं । बोलिजेती अष्ट सृष्टि ।
तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५०॥
एका कल्पनेमुळे आठ प्रकारची वृष्टी निर्माण होते. ते सर्व सांगतो. सावधपणे ऐका. (५०)

एक कल्पनेची सृष्टी । दुसरी शाब्दिक सृष्टी ।
तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१॥
एक कल्पनेची वृष्टी, दुसरी शाब्दिक वृष्टी, तिसरी आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणारी वृष्टी, हिला सर्वच जाणतात. (५१)

चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वप्नसृष्टी ।
साहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ॥ ५२॥
आठवी दृष्टिबंधन । ऐशा अष्ट सृष्टि जाण ।
यांमध्ये श्रेष्ठ कोण । सत्य मानावी ॥ ५३॥
चौथी चित्रलेप वृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्वषष्टी, सातवी ज्वरसूष्टी, आठवी वृष्टी दृष्टिबंधन, अशा एकूण आठ वृष्टीमध्ये श्रेष्ठ कोणती आणि सत्य कोणती मानावी ? (५२ -५३)

म्हणोन सृष्टी नाशवंत । जाणती संत महंत ।
सगुण भजावा निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४॥
म्हणून सर्व वृष्टी नाशिवंत आहेत, हे सर्व संतमहंत जाणतात. पण हा सर्व निश्चय दृढ होण्यासाठी सगुणास भजावे लागते. (५४)

सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें ।
सारासारविचारें । संतसंगें ॥ ५५॥
सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती निर्धारपूर्वक करून घ्यावी. त्यासाठी संतसंगती व सारासारविचार यांची आवश्यकता असते. (५५)

आतां असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त ।
येरवीं चित्त दुश्चित । संशयीं पडे ॥ ५६॥
असो. आता हे खूप झाले. संतसंगतीनेच हे सर्व निश्चितपणे कळून येते. संतसंग व सारासारविचार नसेल तर चित्त चलबिचल होऊन संशयात पडते. (५६)

तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टी मिथ्या ऐसें कळलें ।
परी हें दृश्य अवघें नाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७॥
तेव्हा शिष्यांनी आक्षेप घेतला की, वृष्टी मिथ्या हे कळले. परंतु हे अवघे जर मिथ्या आहे तर मग दृष्टीला कसे दिसते ? (५७)

दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि सत्यचि वाटतें ।
यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८॥
दृश्य प्रत्यक्ष दिसत असल्याने ते सत्यच वाट्ये. तरी हे स्वामी, याला काय करावे, ते कृपा करून सांगा. (५८)

याचें प्रत्युत्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें ।
श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥
याचे प्रत्युत्तर पुढील समासात सांगितले आहे. श्रोत्यांनी ते पुढे श्रवण केले पाहिजे. (५९)

एवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोनि रक्षावें सगुण ।
ऐशी हे अनुभवाची खूण । अनुभवी जाणती ॥ ६०॥
म्हणून वृष्टी मिथ्या आहे, हे जाणूनच सगुणाचे रक्षण करावे. अशी ही अनुभवाची खूण अनुभवीच जाणतात. (६०)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सृष्टिकथानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सृष्टिकथननाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : सगुणभजन

॥ श्रीराम ॥

ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन केलें ।
तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १॥
श्रोता येथे प्रश्न विचारीत आहे की, ज्ञान झाले की दृश्य मिथ्या हे कळून येते, तर मग भजन कशासाठी करायचे ? भजन केल्याने काय प्रास होते, हे आपण मला वर्णन करून सागा. (१)

ज्ञानाहून थोर असेना । तरी कां पाहिजे उपासना ।
उपासनेनें जनां । काय प्राप्त ॥ २॥
आपण म्हणता की, ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरे काही नाही. मग उपासना कशाला करायला हवी ? उपासना केल्याने लोकांना काय प्रास होते ? (२)

मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेचिना सगुण ।
भजन केलियाचा गुण । मज निरूपावा ॥ ३॥
निर्गुण हे जर मुख्य सार आहे आणि तेथे सगुणाचा मागमूसही नसतो, तर मग भजन केल्याने काय विशेष गुण प्रास होतो हे मला समजावून सांगा. (३)

जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त ।
सत्य सांडून असत्य । कोणें भजावें ॥ ४॥
जर सर्व काही नाशिवंत आहे, तर त्याला कशासाठी भजायचे ? सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सगुणाचे भजन कोणी करावे ? (४)

असत्याचा प्रत्ययो आला । तरी मग नेम कां लागला ।
सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५॥
सगुण असत्य आहे असा प्रत्यय आला असताही सगुण उपासनेचा नेम कशाला पाळायचा ? सत्य सोडून गलबला कशाला करायचा ? (५)

निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो ।
सगुण काय देऊं पाहतो । सांगा स्वामी ॥ ६॥
निर्गुणाने मोक्ष लाभतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. सगुणाने काय लाभ होतो हे स्वामी, आपण कृपा करून सांगावे. (६)

सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें म्हणतां ।
तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७॥
आपणच सगुण नाशिवंत आहे असे सांगता आणि सगुणाचे भजन करावे असेही म्हणता. तरी आता सगुणाचे भजन मी कशासाठी करू ? (७)

स्वामीचे भिडेनें बोलवेना । येर्ह्हवीं हें कांहींच मानेना ।
साध्यचि झालिया साधना । कां प्रवर्तावें ॥ ८॥
स्वामींच्या भिडेमुळे बोलता येत नाही. पण मनाला हे काहीच पटत नाही. साध्याची प्राप्ती झाल्यावर साधन करण्याची आवश्यकताच काय ? (८)

ऐसें श्रोतयाचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें ।
याचें उत्तर ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९॥
याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्याने स्वामींना प्रश्न केले. वक्ता म्हणतो की, या प्रश्नाचे उत्तर आता ऐका. (९)

सद्गुरु वचन प्रतिपालन । हेंचि मुख्य परमार्थाचें लक्षण ।
वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १०॥
गुरूचे वचन प्रतिपाळणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. गुरूंच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येते. (१०)

म्हणोनि आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें ।
श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें ॥ ११॥
म्हणून त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानावी आणि त्यास अनुसरून सगुण भजन करावे. श्रोता विचारतो आहे की, हे देवा, सगुण भजनाचे प्रयोजन काय ? (११)

काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार ।
किंवा प्रारब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२॥
सगुण भजनाने काही उपकार घडतो का ? किंवा काही साक्षात्कार होतो का ? किंवा प्रारव्यातील वाईट अक्षरे देव पुसून यकतो का ? (१२)

होणार हें तों पालटेना । भजनें काय करावें जना ।
हें तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३॥
प्रारब्धात जसे लिहिलेले असते त्याप्रमाणे सर्व काही होत असते, त्यात बदल होऊ शकत नाही, असे म्हणतात. मग लोकांनी भजन कशासाठी करायचे ? असा विचार करू लागले की, सगुण भजन कशासाठी करायचे याबद्दल काहीच अनुमान करता येत नाही. (१३)

स्वामीची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण ।
परंतु याचा काय गुण । मज निरूपावा ॥ १४॥
स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे. तिला अप्रमाण कोण म्हणेल ? पण या सगुण भजनाचे काय वैशिष्ट्य आहे, ते आपण मला समजावून सांगावे. (१४)

वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाची लक्षणें ।
तुज कांहीं लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५॥
यावर वक्ता म्हणतो की, तुला ज्ञानाची लक्षणे माहीत असतील, तर मला असे सांग की, ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावे लागते की नाही ? (१५)

करणें लागे भोजन । करणें लागे उदकप्राशन ।
मळमूत्रत्यागलक्षण । तेंही सुटेना ॥ १६॥
तुला भोजन करावे लागते, पाणी घ्यावे लागते, मळमूत्र त्याग करावा लागतो. यातील काहीसुद्धा सुटत नाही. (१६)

जनाचें समाधान राखावें । आपुलें पारिखें ओळखावें ।
आणि भजनचि मोडावें । हें कोण ज्ञान ॥ १७॥
आपल्याशी संबंधित व्यक्तीचे समाधान टिकावे याप्रकारे तुला वागावे लागते, आपले व परके हे तुला ओळखावे लागते, मग हे सर्व जर सोडून चालत नाही, तर मग सगुण भजनाचा त्याग करणे हे कुठल्या प्रकारचे ज्ञान ? (१७)

ज्ञान विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें ।
तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८॥
ज्ञानाच्या विवेकामुळे सर्व दृश्य वृष्टी मिथ्या हे जाणले, तरी देह जोपर्यंत असतो, तोपर्यंत जीवननिर्वाहासाठी आवश्यक ते सर्व करावेच लागते. सर्वांचा त्याग करता येत नाही. मग सगुण भजनानेच काय पाप केले आहे ? अरे बाबा, ते तरी सांग. (१८)

साहेबास लोटांगणीं जावें । नीचासारिखें व्हावें ।
आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९॥
धन्याच्या पुढे लाचारीने लोयंगणे घालावीत, अत्यंत दीनवाणे व्हावे आणि सगुण देवास तेवढे मानू नये हे कुठले ज्ञान ? (१९)

हरि हर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक ।
तूं एक मानवी रंक । भजसि ना तरी काय गेलें ॥ २०॥
प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू महेश ज्याची आज्ञा पाठ्यात, त्याला तुझ्यासारख्या शुल्लक मानवी प्राण्याने, रंकाने भजले नाही, तरी त्या परमेश्वराचे काय बिघडणार आहे ? (२०)

आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ ।
जो समर्थाचाही समर्थ । देवां सोडविता ॥ २१॥
आमच्या कुळात रघुनाथ हे आमचे कुलदैवत आहे. रघुनाथ हाच आमचा परमार्थ आहे. सर्व देवांना बंदीखान्यातून ज्याने सोडविले तो रघुनाथ समर्थांचाही समर्थ आहे. (२१)

त्याचे आम्ही सेवकजन । सेवा करितां झालें ज्ञान ।
तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२॥
आम्ही त्या रघुनाथाचे सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यामुळेच आम्हांला निर्गुणाचेही ज्ञान झाले आहे. त्या रघुनाथाच्या ठिकाणी श्रद्धा, भाव जर ठेवला नाही, तर निश्चितच अधःपतन होईल ! (२२)

सद्गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावें असार ।
तुज काय सांगणें विचार । शाहाणे जाणती ॥ २३॥
गुरू सारासारविचार करण्यास शिकवितात आणि तेच सगुणभजन करण्यास सांगतात, तर त्याला असार कसे म्हणावे ? पण हा विचार शहाणे लोक जाणतात. तू अज्ञानी असल्याने तुला हा विचारसांगितला तरी कसा पटणार २२३)

समर्थाचे मनींचें तुटे । तेंचि जाणावें अदृष्ट खोटें ।
राज्यपदापासून करंटें । चेवलें जैसें ॥ २४॥
ज्ञानी समर्थ पुरुषांच्या मनातून उतरणे यालाच दुर्देव जाणावे. राज्यापासून चत झालेल्या अभागी माणसासारखी त्याची स्थिती होते. (२४)

मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी ।
विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५॥
ज्याला मी फार मोठा ब्रह्मज्ञानी असे वाटू लागते, त्याच्यासंबंधी विचार केला असता तो तर देहाभिमानी आहे असेच प्रत्यक्ष दिसून येते. (२५)

वस्तु भजन करीना । न करीं ऐसेंही म्हणेना ।
तरी जाणावी ती कल्पना । दडोन राहिली ॥ २६॥
एखादामाणूस आत्मस्वरूपाचे अनुसधानहीठ्येत नाही. मी ठेवत नाही असेही म्हणत नाही. अशा माणसाच्या मनात देहाभिमान दडून राहिलेला असतो, हे जाणून घ्यावे. (२६)

ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान ।
तेथें नाहीं कीं अनुमान । प्रत्ययो तुझा ॥ २७॥
अशा माणसाच्या ठिकाणी आत्मज्ञानही नसते अथवा सगुणाचे भजनही नसते. व्यर्थ देहाभिमान मात्र असतो. येथे अनुमान करण्याची आवश्यकता नाही. हा तर तुझा प्रत्यक्ष अनुभवच आहे. (२७)

तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें ।
तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥ २८॥
तरी आता यापुढे असे वागू नये. रघुनाथाचे भजन करण्यास आरंभ करावा. त्यायोगे जे कधी अधिक-उणे होत नाही, असे अत्यंत निश्चल असे आत्मज्ञान प्राप्त होते. (२८)

करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार ।
ऐसा हा चमत्कार । रोकडा चाले ॥ २९॥
रघुनाथ दुर्जनांचा संहार करतो, भक्तांना आधार देतो, त्यांचे सर्वप्रकारे रक्षण करीत असतो. हा चमत्कार तर प्रत्यक्ष दिसून येतो. (२९)

मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि जातें ।
कृपा केलिया रघुनाथें । प्रचीति येते ॥ ३०॥
आपण मनात जो जो संकल्प करावा, तो तो पूर्ण होतो, त्यात येणारी सर्व विष्टे नाहीशी होतात. रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा अनुभव येतो. (३०)

रघुनाथभजनें ज्ञान झालें । रघुनाथभजनें महत्व वाढलें ।
म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१॥
रघुनाथभजनामुळेच मला आत्मज्ञान झाले आहे. रघुनाथभजनामुळेच माझे महत्त्व वाढले आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तूसुद्धा प्रथम रघुनाथाचे- सगुणाचे भजन केले पाहिजेस. (३१)

हें तों आहे सप्रचीत । आणि तुज वाटेना प्रचित ।
साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ ३२॥
हे सर्व स्वानुभवावरून मी सांगत आहे. पण ते तुला खरे वाटत नाही असे वाटते. तरी तूही स्वतः रघुनाथभजनाने आत्मसाक्षात्कार करून घे. म्हणजे तुला माझे म्हणणे पटेल (३२)

रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धि पावे ।
कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३॥
रघुनाथस्मरण करून कुठलेली कार्य करावे म्हणजे ते तत्काळ सिद्धीस जाते. मनात नेहमी स्मरण ठेवावे की, रामच कर्ता आहे. (३३)

कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुण निवेदन ।
निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४॥
राम कर्ता आहे, मी स्वत: कर्ता नाही, असा दृढ निश्चय करणे हेच सगुणनिवेदन होय. निर्गुणोपासनेत साधक निर्गुणाशी अनन्य होऊन जातो. (३४)

मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा ।
प्रतीत पाहसी तरी आतां । शीघ्रचि आहे ॥ ३५॥
मी कर्ता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते सिद्धीस जात नाही. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही, याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो लगेचही येऊ शकतो. (३५)

मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६॥
मी कर्ता असे म्हणू लागलास की, कार्यसिद्धी तर होत नाहीच, उलट असे म्हणणारा कार्य कसे होईल वगैरे चिंतेमुळे कष्टी मात्र होतो. याउलट राम कर्ता असा दृढ निश्चय केल्याने कार्य तर सिद्धीस जाते. शिवाय यश, कीर्ती, प्रताप यांची प्राप्ती होते. (३६)

एके भावनेसाठीं । देवासि पडे तुटी ।
कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ताभावितां ॥ ३७॥
'मी कर्ता ' या एका भावनेमुळे देव दुरावतो. देवात व आपल्यात अंतर पडते. याउलट देव कर्ता अशी भावना केली की, देवाची कृपादृष्टी होते. (३७)

आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुतां काळांचा ।
आपण थोडे ओळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८॥
आपण दोन दिवसांचे असतो, तर देव फार प्राचीन आहे. आपण अत्यंत क्षुद्र आहोत. आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात. देवाला त्रैलोक्य जाणते. (३८)

याकारणें रघुनाथ भजन । त्यासि मानिती बहुत जन ।
ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं तत्पर ॥ ३९॥
म्हणून ब्रह्मादी देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर असतात, ज्याला अनेक लोक मानतात, त्या रघुनाथाचे भजन करावे. (३९)

ज्ञानबळें उपासना । अम्ही भक्त जरी मानूं ना ।
तरी या दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४०॥
श्रीसमर्थ सांगतात की, आम्ही भक्त आहोत. आम्हांला रघुनाथकृपेने आत्मज्ञान झालेले आहे. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो, तर अभक्तपणामुळे आम्हांला दोष लागेल व आमचे पतन होईल. (४०)

देव उपेक्षी थोरपणें । तरी मग त्याचें तोचि जाणे ।
अप्रमाण तें श्लाघ्यवाणें । नव्हेचि कीं श्रेष्ठा ॥ ४१॥
ज्ञानाच्या अहंकाराने जर कुणी देवाची उपेक्षा करू लागले तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अप्रमाण आहे, ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही प्रशंसनीय वाटत नाही. (४१)

देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना ।
ऐशी स्थिति सज्जना । अंतरींची ॥ ४२॥
देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने देहाहंता त्यागून स्वानंदसुखात मग्न असायचे अशी संतांची अंतरातील स्थिती असते. (४२)

सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें कळों येतें ।
दृश्य ज्ञानियांचें मतें । स्वप्न जैसें ॥ ४३॥
रुमभजनाने म्हणजे सगुणभजनानेच सर्व दृश्य वृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. ज्ञानी पुरुषांच्या मते हे सर्व दृश्य जगत स्वप्नासारखेच आहे. (४३)

मिथ्या स्वप्नविवंचना । तैशी हे सृष्टिरचना ।
दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४॥
स्वप्न मिथ्या असते म्हणून त्यातील काळजीही मिथ्याच असते. त्याप्रमाणे वृष्टीची रचना, सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे हे साधुजनांना कळून येते. (४४)

आक्षेप झाला श्रोतयांसी । मिथ्या तरी दिसतें कां आम्हासीं ।
याचें उत्तर पुढिलें समासीं । बोलिलें असे ॥ ४५॥
हे सर्व ऐकल्यावर श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की, हे सर्व मिथ्या आहे, तर ते आम्हांला का दिसते ? याचे उत्तरपुढल्या समासात दिले आहे, असे समर्थ म्हणतात. (४५)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्टसंवादे 'सगुणभजननाम' समास सातवा समाप्त.

GO TOP

समास आठवा : दृश्यनिरूपण

॥ श्रीराम ॥

मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें ।
त्याचें उत्तर बोलिजेल तें । सावधान ऐका ॥ १॥
पूर्वी श्रोत्यांनी विचारले होते की, दृश्य जर मिथ्या आहे, तर ते का दिसते ? याचे उत्तर आता सांगतो. ते सावध होऊन ऐका. (१)

देखिलें तें सत्यचि मानावें । हें ज्ञात्याचें देखणें नव्हे ।
जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २॥
डोळ्यांना जे जे काही दिसते ते खरे मानायचे, हे ज्ञानी पुरुषांचे पाहणे नव्हे. जड छ, अज्ञानी जीव त्याला सत्य मानतात. (२)

एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी ।
संतमहंतांच्या गोष्टी । त्याही मिथ्या मानाव्या ॥ ३॥
केवळ डोळ्यांना जे दिसते तेच खरे असा आग्रह धरला, तर कोट्यवधी ग्रंथांना खोटे ठरवावे लागेल. एवढेच नव्हे, तर संतमहंत जे सांगतात त्या वचनांनाही मिथ्या मानावे लागेल. (३)

माझें दिसतें हेंचि खरें । तेथें चालेना दुसरें ।
ऐशिया संशयाच्या भरें । भरोंचि नये ॥ ४॥
मला जे दिसते तेच खरे, दुसरे सर्व खोटे अशा संशयाच्या भरीस पडून दुसग्रह धरू नये. (४)

मृगें देखिलें मृगजळ । तेथें धांवे तें बरळ ।
जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूसि कोणें म्हणावें ॥ ५॥
एखाद्या हरिणाने मृगजळ पाहिले व त्या वेड्याला तेथे पाणीच आहे असे वाटून ते त्याकडे धावत सुटले तर तेथे पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्या भास आहे, हे त्या पशूला कोण समजावून सांगणार ? (५)

रात्रौ स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांपडलें ।
बहुत जनांसि वेव्हारिलें । तें खरें कैसेनि मानावें ॥ ६॥
एका माणसाला रात्री स्वप्नात खूप द्रव्य सापडले. त्याने त्या द्रव्याने अनेकजणांशी व्यवहारही केले तर ते खरे कसे मानावे ? (६)

कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।
देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७॥
एखाद्या कुशल चिताऱ्याने मोठे सुंदर चित्र निर्माण केले. ते इतके सुंदर होते की, पाहताच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे. परंतु अखेर ती मृत्तिकाच असते. (७)

नाना वनिता हस्ती घोडे । रात्रौ देखतां मन बुडे ।
दिवसा पाहतां कातडें । कंटाळवाणें ॥ ८॥
रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे वगैरे पाहून मन अगदी लुब्ध होते. पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या की, कातडे दृष्टीस पडून तिटकारा येतो. (८)

काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या ।
परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९॥
लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या ठेवणीच्या मूर्ती किंवा पुतळे एखाद्याने बनविले, तर बघताना ते अत्यंत सुंदर वाटतात, परंतु तेथे असतो पाषाणच. (९)

नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहती ।
लाघव देखता भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १०॥
मंदिरच्या द्वारावर अनेक मजले किंवा गोपुरे असतात. त्यावर अनेक मूर्ती कोरलेल्या असतात. त्या मूर्तीचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामुक वृत्ती उत्पन्न होते. परंतु तेथे चुना, वाळू ताग यांचे मिश्रणच फक्त असते. (१०)

खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी ते अवघे धटिंगण ॥ ११॥
दशावतारी खेळ करून दाखविणारी पात्रे असतात, त्यांत काही सुंदर स्त्रियाही असतात. त्या पुरुषांकडे पाहून मोठ्या नखरेलपणाने डोळ्यांनी खुणाही करतात. पण त्या स्त्रिया वास्तविक स्त्रिया नसून सारे धटिंगण पुरुषच असतात. (११)

सृष्टि बहुरंगी असत्य । बहुरूपाचें हें कृत्य ।
तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥ १२॥
बहुरूपी ज्याप्रमाणे एकय एक असून नाना सोंगे घेतो, त्याप्रमाणे परब्रह्म एकले एक असून त्याच्या ठिकाणी ही बहुरंगी वृष्टी असत्य भासत असते. पण तुला हे सर्व दृश्य सत्य वाटते. हा सर्व अविद्येचा परिणाम आहे हे तू जाणून घे. (१२)

मिथ्या साचासारिखें देखिलें । परी तें पाहिजे विचारिलें ।
दृष्टि तरळतां भासलें । तें साच कैसें मानावें ॥ १३॥
मिथ्या असून ते खऱ्यासारखे दिसते, त्या वेळी ते खरेमानण्यापूर्वी विचारकरणे आवश्यक आहे. दृष्टी भांबावली असताना, जे दिसते ते खरे कसे मानावे ? (१३)

वरी पाहतां पालथें आकाश । उदकीं पाहतां उताणें आकाश ।
मध्यें चांदण्याचाही प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४॥
आकाशाकडे वर मान करून पाहिले असता ते पालथे दिसते व तेच एखाद्या जलाशयात पाहिले तर उताणे दिसते. त्यात चांदण्याही दिसतात, प्रकाशही दिसतो, पण ते अवघे मिथ्याच असते. (१४)

नृपतीनें चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।
पाहतां तेचि ऐसे गमले । परी ते अवघे मायिक ॥ १५॥
एका रुजाने चितत्यांना बोलावून अनेक पुतळे केले ते अगदी ज्या माणसांचे होते त्यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसत होते. जणू ती माणसेच तेथे आहेत. पण ते सर्व शेवटी पुतळेच होते. (१५)

नेत्रीं कांहीं बाहुली नसे । जेव्हां जें पहावें तेव्हां तें भासे ।
डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६॥
डोळ्यातकाहीबाहुल्यईनसते ? पण आपणजेव्हाडोळ्यांनी पाहूलागतो तेव्हा ती डोळ्यात दिसते. आपण जे पाहतो त्याचे प्रतिबिंब डोळ्यात दिसते, ते खरे कसे म्हणावे ? (१६)

जितुके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्यें रूपें दिसती ।
क्षणामध्यें फुटोनि जाती । रूपें मिथ्या ॥ १७॥
पाण्यात जितके बुडबुडे उठतात तितकी रूपे दिसतात, क्षणात ते बुडबुडे फुटून जातात व ती रूपेही फुटून जातात. म्हणून ती मिथ्या जाणावीत. (१७)

लघुदर्पणें दोनी चारी होतीं । तितुकीं मुखें प्रतिबिंबती ।
परी तीं मिथ्या आदिअंतीं । एकचि मुख ॥ १८॥
हातात दोन चार छोटे छोटे आरसे घेतले तर जितके आरसे असतील तितकी तोंडे त्यांत प्रतिबिंबित होतात. पण आधी व अंती एकच मुख खरे असते. (१८)

नदीतीरीं भार जातां । दुसरा भार दिसे पालथा ।
कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ॥ १९॥
नदीतीसवरून कुणी ओझे घेऊन जात असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा ते (प्रतिबिंबातील) ओझे पालथे दिसते. किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी उठतो. (१९)

वापी सरोवरांचें नीर । तेथें पशु पक्षी नर वानर ।
नाना पत्रें वृक्ष विस्तार । दिसे दोहीं सवां ॥ २०॥
विहिरी, सरोवरे यांच्या तीरावर पशुपक्षी, माणसे, वानरे नाना वस्तू व मोठी झाडे असतात. पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पडते व त्यामुळे त्या वस्तू पाण्यात व पाण्याबाहेर दोन्ही ठिकाणी दिसतात. (२०)

एक शस्त्र झाडूं जातां । दोन दिसती तत्त्वतां ।
नाना तंतु टणत्कारितां । द्विधा भासती ॥ २१॥
एक शस्त्र जोराने फिरवू लागले तर दोन शस्त्रे दिसतात. तंतू ताणून वाजवू लागले की, दोन भासू लागतात. (२१)

कां ते दर्पणाचे मंदिरीं । बैसली सभा दिसे दुसरी ।
बहुत दीपांचिये हारीं । बहुत छाया दिसती ॥ २२॥
किंवा एखाद्या आरसेमहालात एक सभा भरली असली तर तेथे आरशात आणखी एक सभा भरलेली दिसते. त्याचप्रमाणे अनेक दिवे पेटविले की एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात. (२२)

ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे ।
परी हें सत्य म्हणोन कैसें । विश्वासावें ॥ २३॥
अशा रीतीने हे अनेक प्रकार खरे नसून खऱ्यासारखे दिसतात. पण त्यांच्यावर खरे समजून कसा विश्वास ठेवता येईल ? (२३)

माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचिये परी ।
परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४॥
त्याप्रमाणे माया हीपण गारुडी विद्येप्रमाणेच मिथ्या आहे. म्हणून ती जरी खऱ्यासारखी दिसली तरी जाणत्याने तिला कधीही खरी मागू नये. (२४)

लटिकें साचा ऐसे भावावें । तरी मग पारखी कासया असावें ।
एवं ये अविद्येचे गोवें । ऐसेचि असती ॥ २५॥
जे खरे नाही ते खरे असे मानले, तर मग ख्याखोट्याची परीक्षा करणाऱ्या पारखी माणसाची गरजच काय ? परंतु अविद्येचे पराक्रम असेच असतात. (२५)

मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी ।
शेवट पाहतां निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६॥
मनुष्याची गारुडी विद्यासुद्धा अनेक लोकांना खरी वाटते. पण शेवटी विचार केला असता ती निश्चितपणे मिथ्या ठरते. (२६)

तैशीच माव राक्षसांची । देवांसही वाटे साची ।
पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७॥
त्याचप्रकारे राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते. म्हणूनच पंचवटीमध्ये रामांनी कांचनमृगाचा पाठलाग केला. (२७)

पूर्वकाया पालटिती । एकाचेचि बहुत होती ।
रक्तबिंदीं जन्मती । रजनीचर ॥ २८॥
राक्षस पूर्वीचे रूप बदलतात. एकाचेच अनेक होतात, किंवा सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून नवीन राक्षस उत्पन्न होतात. (२८)

नाना पदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले ।
कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरूपी ॥ २९॥
अनेक पदार्थ व फळे यांची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केला, तेव्हा कपटाने अशी विविध रूपे घेतलेल्या कितीतरी दैत्यांचा कृष्णाने वध केला. (२९)

कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें ।
काळनेमीच्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३०॥
रावणाने कसे कपट केले पहा बरे ! राक्षसी मायेने त्याने रामाचे शिर निर्माण करून ते सीतेला दाखविले ! काळनेमीने मायेने अपूर्व असा आश्रम निर्माण करून द्रोणागिरी आणण्यास निघालेल्या मारुतीला फसविण्याचा प्रयत्न केला. (३०)

नाना दैत्य कपटमती । जे देवांसही नाटोपती ।
मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१॥
कपटविद्या जाणणारे मायावी राक्षस देवांनाही आवरत नसत. म्हणून शेवटी भगवंताच्या शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. (३१)

ऐसी राक्षसांची माव । जाणों न शकती देव ।
कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें ॥ ३२॥
अशी ही राक्षसांची माया देवसुद्धा जाणू शकत नसत. राक्षसांचे कपटविद्येतील लाघव अघटित होते. (३२)

मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी ।
भगवंताची नानापरी । विचित्र माया ॥ ३३॥
मनुष्यांची जी कपटविद्या ते इंद्रजाल, राक्षसांची कपटविद्या ती वोडंबरी तर भगवंताची जी विचित्र अद्‌भुत करणी, तिला माया असे म्हणतात. (३३)

हे साचासारिखीच देइसे । विचारितांचि निरसे ।
मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४॥
ही भगवंताची मायाही खऱ्यासारखीच दिसते. तिचा शोध घेऊ लागले, तिच्यासंबंधी विचार करू लागले की, ती नाहीशीच होते. पण ती सारखी दृश्यरूपाने भासमान होत असल्याने मिथ्या असून खरी वाटते. (३४)

साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे ।
दोहीं पदार्थीं अविश्वासे । सांगतां मन ॥ ३५॥
तिला खरी म्हणावे तर ती नाश पावते. मिथ्या म्हणावे तर ती दिसते, म्हणून मनाला निश्चय करता येत नाही की तिला खरी म्हणावे की मिथ्या म्हणावे, त्यामुळे ते गोंधळून जातात. (३५)

परंतु हें नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार ।
दिसतें हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६॥
परंतु हे काही खरे नाही. मायेचा विचार करणे म्हणजे खोड्याचा विचार करण्यासारखे आहे. ही दृश्य वृष्टी स्वप्नासारखी आहे, हे तू जाणून घे. (३६)

तथापि असो तुजला । भासचि सत्य वाटला ।
तरी तेथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७॥
एवढे सर्व सांगितल्यावरही जर तुला भासच सत्य वाटत असेल तर अरे बाबा, तू चुकतो आहेस. ही चूक का होत आहे हे ऐक. (३७)

दृश्यभास अविद्यात्मक । तुझाही देह तदात्मक ।
म्हणोनि हा विवेक । तेथें संचरला ॥ ३८॥
दृश्याचा भास हा अविद्यात्मक पांचभौतिक पसारा आहे. त्याचप्रमाणे तुझा देही पांचभौतिकच अविद्यात्मक आहे. म्हणूनच तेथे हा अविवेक उत्पन्न झाला आहे. (३८)

दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावरी बैसलें ।
परी तें लिंगदेह झालें । अविद्यात्मक ॥ ३९॥
डोळ्यांनी दृश्य पाहिले आणि मन त्या भासात्मक दृश्याकडे आकर्षित झाले की सूक्ष्म देहात त्या दृश्याची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणात सूक्ष्मदेह लिगदेहही अविद्यात्मकच असतो. (३९)

अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वासली ।
तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४०॥
अविद्येने अविद्येला पाहिले की दृश्य सत्यच आहे, असा विश्वास उत्पन्न होतो. तुझा देही अवघा अविद्यामयच आहे. (४०)

तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण ।
येणेंकरितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥ ४१॥
ती अविद्यात्मक काया तोच मी स्वतः असे वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे. ही देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच हे सर्व दृश्य जगत खरे वाटू लागते. (४१)

इकडे सत्य मानिला देह । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह ।
दोंहींमध्यें हा संदेह । पैसावला बळें ॥ ४२॥
इकडे आपण म्हणजे देह असून तो सत्य आहे, अशी दृढ बुद्धी झाली, तर तिकडे दृश्य जगत सत्यच आहे हाही दृढनिश्चय निवाडा झाला. म्हणजे आपण द्रष्टा व हे जग दृश्य असे द्वैत निर्माण झाले व मनात अत्यंत संशय निर्माण झाला व तो बळेच वाढू लागला. (४२)

देहबुद्धी केली बळकट । आणि ब्रह्म पाहों गेला धीट ।
तों दृश्यानें रोधिली वाट । परब्रह्माची ॥ ४३॥
या प्रकारे देहबुद्धी अगदी बळकट करून धीटपणे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा दृश्याने त्याची वाट अडविली. म्हणजे पांचभौतिक सर्वांचा त्याग केल्याखेरीज मन, बुद्धीला अगोचरपरब्रह्मापर्यंत पोहोचताच येत नाही. (४३)

तेथें साच मानिलें दृश्याला । निश्चयचि बाणोनि गेला ।
पहा हो केवढा चुका पडिला । अकस्मात ॥ ४४॥
परब्रह्मप्रासीची इच्छा तर आहे, पण दृश्य वृष्टी हीच सत्य असा अंतःकरणात ठाम निश्चय झालेला आहे. त्यामुळेच एकाएकी घोळा उत्पन्न झाला आहे. (४४)

आतां असो हें बोलणें । ब्रह्म न पाविजे मीपणें ।
देहबुद्धीची लक्षणें । दृश्य भाविती ॥ ४५॥
आता हे बोलणे गहू दे. मी म्हणजे देह ही देहाहंता, हा ' मीपणा ' जोपर्यंत आहे, तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणे शक्य नाही. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की दृश्य जगत सत्यच वाटते. (४५)

अस्थींच्या देहीं मांसाचा गोळा । पाहेन म्हणे ब्रह्मींचा सोहळा ।
तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥ ४६॥
आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्यात डोळ म्हणजेमांसाचा गोळा आहे. या स्थूलडोळ्याने परब्रह्माचा गोल मी पाहीन असे म्हणतो, तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून आंधळा, केवळ मूर्ख समजावा. (४६)

दृष्टीस दिसे मनास भासे । तितुकें काळांतरीं नासे ।
म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म तें ॥ ४७॥
जे काही दृष्टीस दिसते, जे जे मनाला भासते, ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृश्यापलीकडे असते. (४७)

परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
ऐसा बोलिला निश्चितार्थ । नानाशास्त्रीं ॥ ४८॥
परब्रह्म हे शाश्वत, तर माया ही अशाश्वत आहे असे निश्चित मत नाना शास्त्रग्रंथांत सांगितले गेले आहे. (४८)

आतां पुढें निरूपण । देहबुद्धीचें लक्षण ।
चुका पडिला तो कोण । बोलिलें असे ॥ ४९॥
आता पुढील समासात देहबुद्धीचे लक्षण सांगितले असून ज्याच्याबद्दल श्रम होऊन सर्व गोंधळ निर्माण झाला आहे, तो मी कोण हे सांगितले आहे. (४९)

मी कोण हें जाणावें । मीपण त्यागून अनन्य व्हावें ।
मग समाधान तें स्वभावें । अंगीं बाणे ॥ ५०॥
श्रीसमर्थ म्हणतात की, म्हणून मी कोण हे नीट जाणून घ्यावे आणि मग देहाच्या मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य व्हावे. मग स्वाभाविकच शाश्वत समाधान अंगी बाणते. (५०)

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दृश्यनिरसनं नाम अष्टमः समासः ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ' दृश्यनिर्शननाम ' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : सारशोधन

॥ श्रीराम ॥

गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवकजन ।
तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥ १॥
श्रीसमर्थ सांगतात की, एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्त धन असते, पण त्याच्या सेवकवर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसते, तेवढ्याचेच ज्ञान असते. (१)

गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणि प्रगट दिसती पदार्थ ।
शहाणे शोधिति स्वार्थ । अंतरीं असे ॥ २॥
त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपवून ठेवलेले असते. त्या मानाने थोड्याच वस्तू प्रकट दिसतात. त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे, त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात. (२)

तैसें दृश्य हें मायिक । पाहत असती सकळ लोक ।
परी जयांस ठाउका विवेक । ते अंतर जाणती ॥ ३॥
तसे दृश्य जगत हे मायिक असून ते सगळेच लोक पाहत असतात. पण जे विवेकी असतात, ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म जाणतात. (३)

द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें ।
तयाचें अभ्यंतर कळलें । समर्थ जनांसी ॥ ४॥
एका माणसाने मोठा खड्डा खणून त्यात द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला. लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले आहे. पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले आहे, हे गुपित कळ्ये. (४)

तैसे ज्ञाते जे समर्थ । तिहीं ओळखिला परमार्थ ।
इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थांचा ॥ ५॥
तसे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणतात तेच समर्थ ज्ञाते असतात. इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात. (५)

काबाडी वाहती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्‍नें जाड ।
हें जयांचें त्यांस गोड । कर्मयोगें ॥ ६॥
गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तमोत्तम रब्रांचा उपभोग घेतात. ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट गोड वाटते. (६)

एक काष्ठस्वार्थ करिती । एक शुभा एकवटिती ।
तैसे नव्हेत कीं नृपती । सारभोक्ते ॥ ७॥
कुणी लाकडे गोळा करून विकतो. तर कुणी गोवऱ्या वेचीत असतो. पण किमती वस्तूंचे उपभोक्ते जे सजे ते असे नसतात. (७)

जयांस आहे विचार । ते सुखासनीं झाले स्वार ।
इतर ते जवळील भार । वाहतचि मेले ॥ ८॥
जे विचारी असतात ते सुखासनी, पालखीत स्वार होतात म्हणजे आत्मसुख त्यांना प्रास होते. इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात. (८)

एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती ।
आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥ ९॥
आत्मज्ञानी पुरुष जणू काही दिव्याले सेवन करतात, तर अज्ञानी लोक विषयरूपी विष्ठा चिवडत असतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत, त्याचा अभिमान बाळगतात. (९)

सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापुष्टीं ।
सारासाराची गोष्टी । सज्ञान जाणती ॥ १०॥
श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, निरुद्योगी असार सेवन करतात. जे आत्मज्ञानी लोक असतात तेच सारासार यथार्थ जाणतात. (१०)

गुप्त परिस चिंतामणी । प्रगट खडे काचमणी ।
गुप्त हेम रत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ ११॥
परीस अथवा चिंतामणी हे नेहमी गुप्तच असतात. खडे काचमणी नेहमी प्रकट असतात. सोन्याच्या, रत्नाच्या खाणी गुप्त असतात. पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेले असतात. (११)

अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पती अमूल्य ।
एरंड धोत्रे बहुसाल । प्रगट शिंपी ॥ १२॥
उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असते. एरंड, धोत्रा व शिंपले ही हवी तेथे मुबलक सापडतात. (१२)

कोठें दिसेना कल्पतरू । उदंड शेरांचा विस्तारू ।
पाहतां नाहीं मैलागरू । बोरी बाभळी उदंड ॥ १३॥
कल्पतरू कोठेच दिसत नाहीत, शेराची झाडे उदंड आढळ्यात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही, पण बोरी-बाभळी उदंड असतात. (१३)

कामधेनु जाणिजे इंद्रें । सृष्टींत उदंड खिल्लारें ।
महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतरां कर्मानुसार ॥ १४॥
वृष्टीत हवी तेवढी गाईंची खिल्लारे दिसून येतात. कामधेनू फक्त इंद्राजवळच असते. राजा असतो तो थोर भाग्याचा उपभोग घेतो, इतर लोकांना त्यांच्या कर्मानुसार कमी-अधिक भाग्य लाभते. (१४)

नाना व्यापार करिती जन । अवघेच म्हणती सकांचन ।
परंतु कुबेराचें महिमान । कोणासीच न ये ॥ १५॥
लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात की, आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्रास होत नाही. (१५)

तैसा ज्ञानी योगीश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर ।
इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६॥
त्याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तोच गुप्त असलेले जे खरे धन, त्याच्या लाभाचा म्हणजेच स्वात्मानुभवप्राक्षीचा मालक असतो. इतर अज्ञानी लोक हे पोयचे दास असतात आणि नाना मते धुंडाळत बसतात. (१६)

तस्मात् सार तें दिसेना । आणि असार तें दिसे जनां ।
सारासारविवंचना । साधु जाणती ॥ १७॥
थोडक्यात, जे सार असते ते लोकांना दिसत नाही आणि असार असते तेच तेवढे दिसते. असार सोडून सार कसे ग्रहण करावे हे साधूच जाणतात. (१७)

इतरांस हें काये सांगणे |खरें खोटें कोण जाणे ।
साधुसंतांचिये खुणे |साधुसंत जाणती ॥ १८ ॥
सामान्य लोकांना हे सांगून काय उपयोग ? ते खरे- खोटे जाणूच शकत नाहीत. साधू-संतांच्या खुणा फक्त साधूसंतच जाणतात. (१८)

दिसेना जें गुप्त धन । तयास करणें लागे अंजन ।
गुप्त परमात्मा सज्जन । संगतीं शोधावा ॥ १९॥
जे गुप्त धन असते, ते साध्या डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्त धनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा असेल तर संतसंगतीच्या योगे तो घ्यावा लागतो. (१९)

रायाचें सान्निध्य होतां । सहजचि लाभे श्रीमंतता ।
तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २०॥
राजाचे सान्निध्य प्रास झाले की श्रीमंती सहजच लाभते. त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्‌वस्तु प्रास होते. (२०)

सद्वस्तूस लाभे सद्वस्तु । अव्यवस्थासि अव्यवस्थु ।
पाहतां प्रशस्तासि प्रशस्तु । विचार लाभे ॥ २१॥
सख्ख्यी तळमळ ज्याला लागते, त्याला सद्‌वस्तूच प्रास होते. जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अस्ताव्यस्त असते. प्रशस्त असेल, थोर असेल त्याचे विचारही तसेच थोर असतात. (२१)

म्हणोनि हें दृश्यजात । अवघें आहे अशाश्वत ।
परमात्मा अच्युत अनंत । तो या दृष्यावेगळा ॥ २२॥
म्हणून ही सर्व दृश्य वृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे. तो अच्युत कधीही न ढळणारा व अनंत आहे. (२२)

दृश्यावेगळा दृश्याअन्तरीं । सर्वात्मा तो चराचरीं ।
विचार पाहतां अंतरीं । निश्चयो बाणे ॥ २३॥
दृश्यावेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरून वहिला आहे. सर्व चराचरात तोच सर्वांचा आत्मा आहे. अंतरांत विचार करून पाहिला की यासंबंधीचा निश्चय अंतरात बाणतो. (२३)

संसारत्याग न करितां । प्रपंचौपाधि न सांडितां ।
जनांमध्ये सार्थकता । विचारेंचि होय ॥ २४॥
संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचारानेच जीवन सार्थक होते. (२४)

हें प्रचीतीचें बोलणें । विवेकें प्रचीत बाणे ।
प्रचीत पाहतील ते शहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५॥
हे माझे बोलणे प्रचीतीचे आहे. लोकांनीही सारासारविवेक करून याची प्रचीती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही, तो शहाणा नव्हे. (२५)

प्रचीत आणि अनुमान । उधार आणि रोकडें धन ।
मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदंतर ॥ २६॥
श्रीसमर्थ म्हणतात की, अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उधार धनासारखा फरक आहे. तसेच मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन यांतही महद् अंतर आहे. (२६)

पुढें जन्मांतरीं होणार । हा तो अवघाच उधार ।
तैसें नव्हे सारासार । तत्काळ लभे ॥ २७॥
पुढेजन्मतिZ केव्हातरी आत्मानुभव होईल, हा उधारीचा विचार आहे. सासससिवचार असा उधारीचा नाही, तरत्याच्या योगे तात्काळ स्वस्वरूपानुभवाची प्राप्ती होते. (२७)

तत्काळचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो ।
संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणांचा ॥ २८॥
तत्काळ आत्मज्ञान होऊन माणूस जन्ममरणपरंपरेतून सुटतो आणि जन्ममरण येईल की काय, असा संशयही समूळ नष्ट होतो. ( २८)

याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें ।
मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारें ॥ २९॥
याच जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पावून त्यास मोक्ष मिळतो. ( २९)

ये गोष्टीस करी अनुमान । तो शीघ्रचि पावेल पतन ।
मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥
आता मी हे जे सांगत आहे त्याबद्दल जर कुणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच- आत्मारामच असूनही संशयामुळे वेगळा पडेल, पतन पावेल. हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे. ( ३०)

हें यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्रचि मुक्त होणें ।
असोनि कांहींच नसणें । जनांमध्यें ॥ ३१॥
मी हे जे सांगत आहे ते माझे बोलणे अगदी यथार्थच आहे. सारासारविवेकाने मनुष्य अत्यंत लवकर मुक्त होतो व जनामध्ये वागत असताही अंतरी मीपणाविशहत असतो, म्हणजेच तो लोकांत असून नसल्यासारखा असतो. ( ३१)

देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।
हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२॥
देवपद हे निर्गुण आहे. देवपदी अनन्यपण म्हणजेच तक्ता किंवा ऐक्य याचा अनुभव घेणे होय. ह्याप्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान बाणते. ( ३२)

देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥
देहात असून विदेही होणे म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारव्याचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे, करून काही न करणे म्हणजे मी कर्ता ही भावना समूळ नष्ट झाली तरी कर्म होत राहणे ही जीवन्यूक्तांची लक्षणे आहेत आणि जे जीवन्यूक्त असतील, तेच ती लक्षणे जाणू शकतात. ( ३३)

येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे ।
संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरुवचनें ॥ ३४॥
एरवी हे खरेच वाटत नाही. अनुभव नसेलतर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो, परंतु सहलेचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसे होतात. ( ३४)

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सारशोधननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'सारशोधननाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : अनुर्वाच्यनिरूपण

॥ श्रीराम ॥

समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं ।
तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १॥
श्रोत्याने प्रश्न केला की, आपण समाधानाबद्दल सांगितलेत ते समाधान असते तरी कसे, असे जर विचारले, तर सर्व सांगतात की, ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. तरी स्वामी, ते आहे तरी कसे हे आपण मला सर्व काही समजावून सांगा. (१)

मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला ।
याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥ २॥
सर्व म्हणतात की मुक्याने गूळ खाल्ला तरी तो त्याच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही, तसेच हे आहे. तरी याचा अभिप्राय काय ते मला स्पष्ट करून सांगा. (२)

अनुभवही पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां ।
तरी कोणापाशीं पुसों आतां । समाधान ॥ ३॥
एखाद्याला त्याचा अनुभव सांग असे म्हटले तरी तोही म्हणतो की, अनुभव शब्दात सांगता येत नाही. तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे ? (३)

जे ते अगम्य सांगती । न ये माझिया प्रचीती ।
विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४॥
प्रत्येक जण ते अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तरी समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे आपण ते मला सांगावे. (४)

ऐसें श्रोतयाचें उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर ।
निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५॥
श्रोत्याने असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता येथे दिले जाईल. तरी तत्पर होऊन ते ऐकावे. (५)

जें समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ ।
तेंचि स्वरूप प्रांजळ । बोलून दाऊं ॥ ६॥
स्वात्मानुभव म्हणजेच समाधान. त्याचेच स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवू या. (६)

जें बोलास आकळेना । बोलिल्याविणही कळेना ।
जयास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७॥
तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम ।
धरितां संत समागम । सर्वही कळे ॥ ८॥
जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. जे वेदांचेही परम रहस्य आहे, ते परब्रह्म संतसमागम केल्यानेच पूर्णपणे कळते. (७-८)

तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल ।
ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तु ॥ ९॥
खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. पण तरी तू आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो, ते नीट ऐक. (९)

सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळावया गूळ देणें ।
ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १०॥
जे सांगता येत नाही ते सांगायचे आहे. गुळाची गोडी कळावी म्हणून गूळच खायला द्यावा, तसे हे आहे. पण सदुरूशिवाय हे होऊ शकत नाही. (१०)

सद्गुरुकृपा कळे त्यासी । जो शोधील आपणासी ।
पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११॥
जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर सदुरुकृपा होते आणि पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. (११)

दृढ करूनियां बुद्धि । आधीं घ्यावी आपुली शुद्धी ।
तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२॥
बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण याचा शोध घ्यावा. असाशोधघेत असता अकस्मातसमाधीलागते. (१२)

आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली तों मायिक वार्ता ।
पुढें वस्तूच तत्त्वतां । समाधान ॥ १३॥
आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावरच्याला आपण पूर्वी मी असे मानत होतो, तो देह तर पांचभौतिक, मायिक आहे व आपण त्यापासून अलग आहोत. किंबहुना आपण तत्त्वतः आत्मवस्तूच आहोत, हा अनुभव साक्षात येतो. ही स्थिती व समाधान भिन्न नाही. (१३)

आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं ।
जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४॥
आत्मा हा सर्वसाक्षी आहेहा पूर्वपक्ष आहे. हेसाक्षित्वही पुढे राहात नाही व जो सिद्धान्ताशी एकरूप होतो तोच सिद्ध होय. (१४)

सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसाक्षिणी ते अवस्था ।
आत्मा त्याहून परता । अवस्थातीत ॥ १५॥
आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे, असे या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैतभाव शेष असतोच. पण आत्या हा अवस्थातीत असल्याने ही अवस्थाही ज्या वेळी राहत नाही, त्या वेळी स्वानुभवरूपाने जीवब्रह्मैक्य होते. (१५)

पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे ।
ते समयीं फुंज उतरे । मीपणाचा ॥ १६॥
ज्या वेळी पदार्थज्ञान संपूर्ण नष्ट होते, एवढेच नव्हे, तर द्रष्ट्याचे द्रष्टेपणही उरत नाही, त्या वेळी मीपणाचा डौली नष्ट होतो. (१६)

जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण ।
अनिर्वाच्य समाधान । याकारणें बोलिजे ॥ १७॥
मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खूण आहे, म्हणूनच समाधान हे अनिर्वाच्य आहे असे म्हटले जाते. (१७)

अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि फोल ।
शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८॥
अत्यंत विचारपूर्वक बोलले शब्द जरी असले तरी ते दृश्याच्या अंतर्भूत असल्याने मायिकच असतात. म्हणून नाशिवंतच असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो, अदृश्य असतो. (१८)

शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ ।
शब्द सांगें तें यथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९॥
शब्दाच्या माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. (१९)

शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे ।
शब्द फोल अर्थ असे । घनदाटपणें ॥ २०॥
शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान होते, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे फोलकयसारखे असतात, पण अर्थ हे त्यातील भरीव सार असते. (२०)

भूसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊन भूस टाकिजे ।
तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१॥
धान्य हे नेहमी घुसाचे आवरण घेऊनच उगवते. आपण धान्य घेऊन फ टकून देतो, त्याप्रमाणे शब्द हे भूस आहेत, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य असतो, हे जाणून घ्यावे. (२१)

पोंचटामध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट ।
तैसा शब्द हा फलकट । परब्रह्मीं ॥ २२॥
फोलकयंत सारधान्य भरलेले असते. धान्य ग्रहण केल्यावर फोलकट उडून जाते. तसे परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे फोलकटासारखे त्याज्य आहेत. (२२)

शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वींच आहे ।
याकारणें न साहे । उपमा तया अर्थासी ॥ २३॥
बोस्त्याबरोबरशब्द नष्टहोतो, पण अर्थहा शब्दापूर्वीही असतोच. शब्दउच्चारतानाही तो असतोच नंतरही तो असतोच, म्हणून अर्थाला कशाचीही उपमा देता येत नाही. (२३)

भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा ।
कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४॥
घुसाचा त्याग करून कण म्हणजे धान्य घ्यावे, त्याप्रमाणे शब्दाचा वाच्यांश टाकून सारभूत असा लक्ष्यांश ग्रहण करावा. उदाहरणार्थ, ब्रह्म दृश्यावेगळे आहे या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ तो वाच्यांश होय, आणि याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो लक्ष्मांश होय. (२४)

दृश्यावेगळें बोलिजे । त्यास वाच्यांश म्हणिजे ।
त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५॥
दृश्यावेगळा शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात. तो ध्यनिरूप असतो, पण त्यात जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्ष्मांश म्हणतात. (२५)

ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष ।
स्वानुभव तो अलक्ष्य । लक्षिला न वचे ॥ २६॥
हा जो शुद्ध लक्ष्मांश तोच पूर्वपक्ष जाणावा. त्यालाही ओलांडले पाहिजे. स्वानुभव हा मनबुद्धीअगोचर असल्याने त्यास अलक्ष म्हटले आहे. वरीलपैकी कशानेही तो जाणता येत नाही. (२६)

जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभवाचा गाभा ।
ऐसा तोही उभा । कल्पित केला ॥ २७॥
पंचमहाभूतांपैकी सर्वांत सूक्ष्म तत्त्व आकाश हे आहे. जेथे आकाश तत्त्वाचाही मागमूस उरत नाही अशी अतींद्रिय अवस्था असते, तेथेही अनुभव व तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते, तोपर्यंत तेथे मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागते. (२७)

मिथ्या कल्पनेपासून झाला । खरेंपण कैसें असेल त्याला ।
म्हणोनि तेथें अनुभवाला । ठावचि नाहीं ॥ २८॥
जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय. त्याला खरेपणा येईलच कसा ? म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. (२८)

दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव ।
याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९॥
जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो, तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. द्वैताशिवाय अनुभव आला असे बोलणेही व्यर्थच होय. म्हणून स्वरूपी अनुभवास जागाच नाही. (२९)

अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे ।
म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३०॥
जेथे अनुभव असतो तेथे अनुभाव्य, अनुभविता व अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असते. म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणेच योग्य ठरते. (३०)

दिवसरजनीचें परिमित । करावया मूळ आदित्य ।
तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि काय म्हणावें ॥ ३१॥
दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते. तो सूर्यच जर नाहीसा झाला, तर शिल्लक उरलेल्यास काय म्हणावे ? कारण मग दिवस, रात्र हा भेदच राहणार नाही. (३१)

शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार ।
तो ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२॥
शब्द आणि मौन ह्याचेसंबंधी विचार केला असता त्याचे मूळ ओंकार आहे हे कळून येते. ते मूळ स्कृरण असून नादाची, ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. तो ओंकारच जर नष्ट झाला, तर ध्वनी, नाद उत्पन्न होऊच शकत नाही. मग शब्दांचा उच्चार होणार तरी कसा ? (३२)

अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचि करितां ।
ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥
अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते. ती मायाच जर नष्ट झाली, तर हे द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला, त्याला वावच राहत नाही. (३३)

वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळीक ।
तरी अनुभवाचा विवेक । बोलों येता मुखें ॥ ३४॥
आत्मवस्तु वेगळी आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे, अशी वेगळीक जर असती तर मग त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता. (३४)

वेगळेपणाची माता । ते लटिकी वंध्येची सुता ।
म्हणूनियां अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५॥
माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळीक-भिन्नता आहे, असे म्हणणे म्हणजे वंध्येला मुलगी झाली म्हणण्या- सारखेच आहे. म्हणून आत्मावरच्या ठिकाणी अभिन्नता, अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. (३५)

अजन्मा होता निजला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला ।
सद्गुरूसी शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६॥
अजन्मा म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला होता, म्हणजेच त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला, त्या वेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे देह आहे आणि ही दृढ समजूत झाल्यामुळे तो संसारदुखाने दुःखी झाला होता. तोच त्याला त्या स्वप्नात स्वप्न पडले की तो त्या संसारदुःखामुळे त्रस्त होऊन तो सदुरूंना शरण गेला आहे. (३६)

सद्गुरुकृपेस्तव । झाला संसार वाव ।
ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७॥
सदुरुकृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले व आपण देह आहोत हे अज्ञानही नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. (३७)

आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें ।
आहे नाहीं जाऊन उरलें । नसोन कांहीं ॥ ३८॥
दृश्य वृष्टी आहे अशी वाटत होती ती विवेकाने मिथ्या ठरली, आणि नाही म्हणून जे वाटत होते तेही विरून गेले. याप्रमाणे जे आहे वाटत होते व जे नाही म्हणजे नव्हतेच, ती दोन्ही म्हणजे दृश्यभाव व शून्यत्व जाऊन, जे उरले ते परब्रह्म होय. (३८)

शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समाधान ।
ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिति ॥ ३९॥
शून्यत्वाचेही ज्ञान ज्याला होते तो शुद्ध ज्ञानस्वरूप आत्या तेवढा उरला. त्याच्याशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्रास झाले व भिन्नत्व जाऊन अभिन्न अशी सहजस्थिती ऐक्यरूपाने प्रास झाली. (३९)

अद्वैतनिरूपण होतां । निमाली द्वैताची वार्ता ।
ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४०॥
अद्वैतासंबंधीचे निरूपण ऐकले की, द्वैत हे मिथ्या आहे हे कळून येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली, की आपण देह नाही ह्याची जाणीव होते. मी म्हणजे देह ह्या अज्ञाननिद्रेतून स्वस्वरूप- ज्ञानरूपी जागती येते. (४०)

श्रोतीं व्हावें सावधान । अर्थीं घालावें मन ।
खुणे पावतां समाधान । अंतरीं कळे ॥ ४१॥
श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी आता सावध व्हावे व जे बोलले जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करावे म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते, हे अंतर्यामी कळेल. (४१)

तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावारीं गेलें ।
अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२॥
अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात, त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असते म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केले असेल, तर मग शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वस्वरूपानुभव येतो. (४२)

तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता ।
ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३॥
त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते, अनुभव व अनुभविता हे द्वैतही राहत नाही. तो निश्चल, निवांत आत्मरूपी ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. (४३)

तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला ।
तेथें तर्क कुंठित जाहला । अंत न लगे ॥ ४४॥
जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. नंतर त्याच स्वप्नात ससारदुःखाने दुःखी होऊन सदुरूंना शरण गेल्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यामुळे त्याची अज्ञाननिद्रा सरून तो स्वरूपाविषयी जागृत झाला, म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण जागा होऊन जागतीला आला म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाचे चिंतन करता करता तो अर्थाशी एकरूप झाला. त्या वेळी शब्दज्ञान कुंठित झाले व तो अनंताशी एकरूप झाला. (४४)

या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ ।
तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५॥
या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो म्हणजे मग तुला समाधान म्हणजे काय ते अंतर्यामी कळेल. (४५)

तंव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरूपिलें ।
तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६॥
तेव्हा शिष्याने विनंती केली की हे स्वामी, आता आपण जे निरूपण केलेत तेच सर्व परत मला समजावून सांगावे. (४६)

मज कळाया कारण । केलेंच करावें निरूपण ।
तेथील जे का निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७॥
हा विषय अवघड आहे तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे. त्यातील आत्मानुभवाची जी निजखूण, रहस्य आहे, त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. (४७)

अजन्मा तो सांगा कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न ।
येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८॥
आपण अजन्मा म्हणून म्हणालात तो कोण आहे, त्याने कुठले स्वप्न पाहिले, त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले गेले, ते सर्व आपण मला सांगा. (४८)

जाणोनि शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्युत्तर ।
तेंचि आतां अति तत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥
शिष्याची जिज्ञासा जाणून स्वामींनी त्याच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिली, ती आता येथे श्रोत्यांनी अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. (४९)

ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जण ।
तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोही आतां सांगतों ॥ ५०॥
श्रीगुरू म्हणतात की, शिष्या, सावध होऊन ऐक. येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठले पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो ते ऐक. (५०)

स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार ।
तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१॥
हा संसार हेच तू पाहिलेले स्वप्न होय आणि स्वप्नातील विचार म्हणजे येथे तू जो सारासारविचार केलास तो होय. (५१)

रिघोनि सद्गुरूसी शरण । काढून शुद्ध निरूपण ।
याची करिसी उणखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥
नंतर तू सदुरूंना शरण गेलास. त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण ऐकलेस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरत आहोत याची खरी खूण पटली. (५२)

याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव ।
निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३॥
आता तू त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घेत आहेस. जेव्हा तुला स्वस्वरूपानुभव येईल तेव्हा शाब्दिक ज्ञान हेही मिथ्याच असते, हे तुला कळेल व तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन तीच विश्रांतीची जागा होय हे तुला स्वानुभवाने कळेल. हीच मीपणरहित जी स्थिती तीच खरी जागृती होय, हे तू जाणून घे. (५३)

ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला ।
याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४॥
प्रथम प्रास झालेल्या शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ संपून ज्या वेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल, त्या वेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतर्यामी त्याचा अनुभव येईल. (५४)

तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती ।
या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥
तुला त्या वेळी वाटेल की मला अनुभवाची प्राप्ती झाली हीच खरी जागृती असावी. पण हेबोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही हेच कळून येते. (५५)

अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला ।
हाही स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६॥
अनुभव अनुभवांत विरला, म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा, मी द्रष्टा, साक्षी असा अनुभव आला, म्हणजे अनुभवाशिवाय अनुभव आला तरी हा तुझा अनुभवही स्वप्नमयच आहे. अरे बाबा, तू अजून खरा जागा झालेला नाहीस. (५६)

जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी ।
जागेपणीं स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७॥
तू जागा झालास असे तुला वाटते आहे, पण अजून तू स्वप्नातच आहेस. स्वप्नातच अजन्मा तो मीच असे तू म्हणत आहेस, जागेपणीही तुझी स्वप्नऊर्मी अद्याप गेलेली नाही. (५७)

स्वप्नीं वाटे जागेपण । तैशी अनुभवाची खूण ।
आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८॥
स्वप्नातच एखाद्याला वाटते की, तो जागा झाल आहे. तशा प्रकारे अनुभवप्राप्तीमुळे तुला वाटते आहे की आपण जागे झालो. पण तो अनुभव सत्य असला तरी धमरूप स्वप्नातून तू अद्याप पूर्ण जागा झाला नाहीस. (५८)

जागृति यापैलीकडे । तें सांगणें केवीं घडे ।
जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥५९॥
च्या अनुभवाच्या पलीकडे जागृती असते, जेथे विवेकाची धारणाच मोडते. त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल ? (५९)

म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण ।
निःशब्दाची ऐशी खूण । ओळखावी ॥ ६०॥
म्हणूनच ते समाधान अनिर्वचनीय, बोक्या न येण्यासारखेच आहे. शब्दांच्या पलीकडील अनिर्वाच्य आहे, हीच त्याची खूण ओळखावी. (६०)

ऐसें आहे समाधान । बोलतांच न ये जाण ।
इतुकेनें बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१॥
ते समाधान शब्दात सांगताच येत नाही. यावरूनच ते निःशब्द, अनुर्वाच्य आहेयाचा अर्थ तुझ्या लक्षात यावा. (६१)

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'अनुर्वाच्यनाम' समास दहावा समाप्त. दशक सहावा समाप्त

॥ दशक सहावा समाप्त ॥



GO TOP