|
ब्रह्मसूत्रअध्याय चवथापाद दुसरासंबंध - पहिल्या पादात उपासनाविषयक निर्णय करून ज्या जीवमुक्त महापुरुषांचे ब्रह्मलोकादिमध्ये गमन होत नाही, त्यांना कुठल्या प्रकारे परमात्म्याची प्राप्ती होते, या विषयावर विचार केला गेला. आता या दुसर्या पादात, जे ब्रह्मविद्येचे उपासक ब्रह्मलोकात जातात त्यांची गति कशा प्रकारे होते हे सांगितले जात आहे. साधारण मनुष्य आणि ब्रह्मविद्येचे उपासक यांच्या गतिंमध्ये कुठपर्यंत समानता आहे हे स्पष्ट करण्यासाठी प्रथम साधारण गतिच्या वर्णनाने प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. वाङ्गमनसि दर्शनाच्छब्दाच्च ॥ ४.२.१ ॥ अर्थ - वाक् = वाणी; मनसि = मनांमध्ये स्थित होऊन जाते; दर्शनात् = प्रत्यक्ष पहाण्याने; च = आणि; शब्दात् = वेदवाणीने ही गोष्ट सिद्ध होत आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये असे सांगितले गेले आहे की, ‘अस्य सोम्य पुरुषस्य प्रयतो वाङ्मनसि सम्पद्यते मनः प्राणस्तेजसि तेजः परस्यां देवतायाम ।’ या मनुष्याचे मरून एका शारीरातून दुसर्या शरीरात जाते समयी वाणी मनाने स्थित होते, मन प्राणात आणि प्राण तेजात तथा तेज परदेवतामध्ये स्थित होते. (छां.उ.६.८.६) या वाक्यात जे वाणीचे मनात स्थित होणे सांगितले गेले आहे, ते वाक्-इंद्रियांचेच स्थित होणे आहे, केवळ त्याच्या वृत्तिमात्राचे नाही; कारण की, हे प्रत्यक्ष दिसून येते की मरणासन्न मनुष्यात मन विद्यमान रहात असूनही वाक्-इंद्रियाचे कार्य बंद होऊन जाते तथा श्रुतिमध्ये तर स्पष्ट शब्दात ही गोष्ट सांगितली गेली आहे. संबंध - ‘वाणी मनात स्थित होऊन जाते’ या कथनानंतर तेथे अन्य इंद्रियांचे विषयी काही सांगितले गेले नाही. केवळ मनाची प्राणात स्थिति सांगितली गेली म्हणून अन्य इन्द्रियांच्या विषयी काय समजावयास हवे ? यावर सांगतात - अत एव च सर्वाण्यनु ॥ ४.२.२ ॥ अर्थ - अत एव = यामुळे; च = हे ही (समजून घेतले पाहिजे की); अनु = त्यांच्या बरोबर; सर्वाणि = समस्त इन्द्रिये (मनांत स्थित होऊन जातात.) व्याख्या - प्रश्नोपनिषदात म्हटले आहे की, ‘तस्मादुपशान्ततेजाः पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पद्यमानैः ।’ अर्थात ज्याच्या शरीरातील गरमी (उष्णता) शांत होऊन चुकली आहे, असा जीवात्मा मनात स्थित झालेल्या इन्द्रियांसहित पुनर्जन्मास प्राप्त होतो. (प्र.उ.३.९) याप्रकारे श्रुतिमध्ये कुठल्या एका इन्द्रियाचे मनात स्थित होणे न सांगता समस्त इन्द्रियांची मनांत स्थिति सांगितली गेली आहे. तथा सर्व इन्द्रियांची कर्मे बंद होतात हे प्रत्यक्ष दिसून येते. म्हणून पूर्वोक्त दोन्ही प्रमाणांनी ही हेच सिद्ध होते की वाक्-इन्द्रियाबरोबर अन्य इन्द्रियेहि मनांत स्थित होऊन जातात. संबंध - त्याच्यानंतर काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात - तन्मनः प्राण उत्तरात् ॥ ४.२.३ ॥ अर्थ - उत्तरात् = त्याच्यानंतरच्या कथनाने (हे स्पष्ट आहे की); तत् = ते (इन्द्रियांसहित); मनः = मन; प्राणे = प्राणात (स्थित होऊन जाते.) व्याख्या - पूर्वोक्त श्रुतिमध्ये जे दुसरे वाक्य आहे, ‘मनः प्राणे’ (छां.उ.६.८.६) त्यावरून हे स्पष्ट आहे की ते मन इन्द्रियांसहच प्राणात स्थित होऊन जाते. संबंध - त्यानंतर काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात - सोऽध्यक्षे तदुपगमादिभ्यः ॥ ४.२.४ ॥ अर्थ - तदुपगमादिभ्यः = त्या जीवात्म्याच्या गमन आदिच्या वर्णनाने हे सिद्ध होत आहे की; सः = तो प्राण, मन आणि इन्द्रियांसहित; अध्यक्षे = आपला स्वामी जीवात्मा त्यात (स्थित होऊन जातो.) व्याख्या - बृहदारण्यकात म्हटले आहे की, ‘त्या समयी हा आत्मा नेत्रातून अथवा ब्रह्मरन्ध्रातून अथवा शरीराच्या अन्य कुठल्या मार्गद्वारा शरीरातून बाहेर पडतो आणि तो बाहेर पडल्यावर त्याच्याबरोबर प्राणही बाहेर पडतो आणि प्राण बाहेर पडल्यावर त्याच्याबरोबर सर्व इन्द्रियेही निघतात.’ (बृह.उ.४.४.२) श्रुतिच्या या गमनविषयक वाक्याने हे सिद्ध होते की, इन्द्रिये आणि मनासहित प्राण आपला स्वामी जीवात्म्यात स्थित होतात. यद्यपि पूर्व श्रुतिमध्ये प्राणाचे तेजात स्थित होणे सांगितले आहे, परंतु जीवात्म्याशिवाय केवळ प्राण आणि मनासहित इन्द्रियांचे गमन संभव नाही, म्हणून दुसर्या श्रुतिमध्ये सांगितलेल्या जीवात्म्यासही येथे सम्मिलित करून घेणे उचित आहे. संबंध - त्यानंतर काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात - भूतेषु तत्श्रुतेः ॥ ४.२.५ ॥ अर्थ - तच्छ्रुतेः = तद्विषयक श्रुति प्रमाणाने हे सिद्ध होत आहे की; भूतेषु = (प्राण आणि मन-इंद्रियासहित जीवात्मा) पाचही सूक्ष्म भूतामध्ये (स्थित होतो.) व्याख्या - पूर्वश्रुतिमध्ये जे असे म्हटले आहे की प्राण तेजात स्थित होतो यावरून हे सिद्ध होत आहे की, जीवात्मा, मन आणि समस्त इन्द्रिये ही सर्वच्या सर्व सूक्ष्मभूत-समुदायात स्थित होतात; कारण की, सर्व सूक्ष्मभूते तेजाशी मिळालेली आहेत. म्हणून तेजाच्या नामाने समस्त भूत-समुदायाचेच कथन आहे. संबंध - पूर्वश्रुतिमध्ये प्राणाचे केवळ तेजात स्थित होणे सांगितले गेले आहे. म्हणून जर सर्व भूतात स्थित होणे न मानता एक तेजस तत्त्वातच स्थित होणे मानले गेले तर काय हानि आहे ? या जिज्ञासेवर सांगतात. नैकस्मिन् दर्शयतो हि ॥ ४.२.६ ॥ अर्थ - एकस्मिन् = एक तेजस् तत्त्वात स्थित होणे; न = मानले जाऊ शकत नाही; हि = कारण की, दर्शयतः = श्रुति आणि स्मृति दोन्ही जीवात्म्यास पाचही भूताशी युक्त असल्याचे दाखवितात. व्याख्या - एका गोष्टीचा निर्णय पहिल्याने (ब्रह्मसूत्र ३.१.२) केला गेला आहे की एक जल अथवा एका तेजाच्या कथनाने पाचही तत्त्वांचे ग्रहण आहे; कारण की, त्या प्रकरणात पृथ्वी, जल आणि तेज या तीन तत्त्वांच्या उत्पत्तीचे वर्णन करून तीन्हीचे मिश्रण करण्याची गोष्ट सांगितली आहे. म्हणून ज्या तत्त्वाची प्रधानता आहे त्याच्याच नामाने तेथे ती तीन तत्त्वे उल्लेखिली गेली आहेत, यावरून शरीर पांच भौतिक आहे हे गोष्ट प्रत्यक्ष दिसून येत असल्याने तसेच श्रुतिमध्येही पृथ्वीमय, आपोमय, वायुमय, आकाशमय आणि तेजोमय (बृह.उ.४.४.५) या विशेषणांचा जीवात्म्याच्या बरोबर प्रयोग दिसून येत असल्याने हेच सिद्ध होत आहे की, प्राण आणि मन-इन्द्रिये आदिसहित जीवात्मा एकमात्र तेजस्तत्त्वात स्थित होत नाही; परंतु शरीराच्या बीजभूत पांचहि भूतांच्या सूक्ष्म स्वरूपात स्थित होतो. तेच याचे सूक्ष्म शरीर आहे, जे की कठोपनिषदात रथाच्या नामाने सांगितले गेले आहे. (क.उ.१.३.३) याशिवाय स्मृतिमध्ये म्हटले आहे की - ‘अण्व्यो मात्रा विनाशिन्यो दशार्धानां तु याः स्मृताः । ताभिः सार्धमिंद सर्वं सम्भवत्यनुपूर्वशः ॥’ पांच भूतांच्या ज्या विनाशशील पांच सूक्ष्म तन्मात्रा (रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द) सांगितल्या गेल्या आहेत, त्यांच्यासह हे संपूर्ण जगत् क्रमशः उत्पन्न होते. (मनु.१.२७) संबंध - येथे ही जिज्ञासा होते की, मरणकाळच्या गतिचे जे वर्णन केले गेले आहे ते साधारण मनुष्याविषयी आहे का ब्रह्मलोक प्राप्त होणार्या तत्त्ववेत्त्याच्या विषयी आहे ? यावर सांगतात - समाना चासृत्यपक्रमादमृतत्वं चानुपोष्य ॥ ४.२.७ ॥ अर्थ - आसृत्युपक्रमात् = देवयानमार्गद्वारा ब्रह्मलोकात जाण्याचा क्रम आरंभ होईपर्यंत; समाना = दोन्हीची गति समान; च = ही आहे; च = कारणकी; अनुपोष्य = सूक्ष्म शरीरास सुरक्षित ठेवूनच; अमृतत्वम् = ब्रह्मलोकात अमृततत्त्वाचा लाभ मिळविणे ब्रह्मविद्येचे फळ सांगितले गेले आहे. व्याख्या - वाणी मनात स्थित होते, येथपासून प्राण, मन आणि इंद्रियासहित जो जीवात्म्याचा सूक्ष्म भूतसमुदायात स्थित होण्यापर्यंतचा मार्ग दाखविला गेला आहे, येथपर्यंत साधारण मनुष्यांची आणि ब्रह्मलोकात जाणार्या ज्ञानी पुरुषाची गति एक समानच सांगितली गेली आहे, कारण की, सूक्ष्म शरीर सुरक्षित राहिले असतानाच या लोकातून ब्रह्मलोकात जाणे होत असते आणि तेथे जाऊन त्याला अमृतस्वरूपाची प्राप्ती होते. तथा अन्य लोकात आणि शरीरांतही सूक्ष्म शरीरद्वाराच गमन होते म्हणून वेगवेगळे वर्णन केले नाही. संबंध - त्या प्रकरणाच्या अन्ती जे असे सांगितले गेले आहे की, मन, इन्द्रिये आणि जीवात्म्यासहित ते तेज परमदेवतेत स्थित होते. तर ते स्थित होणे कसे आहे, कारण की, प्रकरण साधारण मनुष्यांचे आहे; सर्व समान भावाने परमदेव परमात्म्यास प्राप्त होतील हे सम्भव नाही. या जिज्ञासेवर सांगतात - तदापीतेः संसारव्यपदेषात् ॥ ४.२.८ ॥ अर्थ - संसारव्यपदेशात् = साधारण जीवांचे मरणानंतर वारंवार जन्म ग्रहण करण्याचे कथन झाले असल्याने (हेच सिद्ध होत आहे की); तत् = त्यांचे ते सूक्ष्म शरीर; आ अपीतेः = मुक्तावस्था प्राप्त होईपर्यंत राहते, म्हणून नूतन स्थूल शरीर प्राप्त होण्यापूर्वी त्यांचे परमात्म्यात स्थित राहणे प्रलयकालाप्रमाणे आहे. व्याख्या - त्या प्रकरणात जे एका शरीरातून दुसर्या शरीरात जाणार्यांचे परम देवतेमध्ये स्थित होणे सांगितले गेले आहे, ते प्रलयकालाप्रमाणे कर्म-संस्कार आणि सूक्ष्मशरीरासहित अज्ञानपूर्वक स्थित होणे आहे. म्हणून ती परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती नाही, परंतु समस्त जगत ज्याप्रकारे त्या परम कारण परमात्म्यांतच स्थित राहते, त्याचप्रकारे स्थित असणे आहे. ही स्थिति त्या जीवात्म्यास जोपर्यंत आपल्या कर्म-फल-उपभोगास उपयुक्त दुसरे कुठले शरीर मिळत नाही तोपर्यंत राहतो; कारण की, त्याच्या पुनर्जन्माचे श्रुतिमध्ये कथन आहे. (क.उ.२.२.७) म्हणून जोपर्यंत त्यास मुक्ति प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध राहतो; म्हणून तो मुक्त पुरुषाप्रमाणे परमात्म्यात विलीन होत नाही. संबंध - त्या प्रकरणात जे जीवात्म्याचे सर्वांसहित आकाशादि भूतात स्थित होणे सांगितले गेले आहे, तेथे असे सांगितले गेलेले नाही की तो सूक्ष्म-भूत समुदायात स्थित होतो; म्हणून ते स्पष्ट करतात. - सूक्ष्मं प्रमाणतश्च तथोपलब्धेः ॥ ४.२.९ ॥ अर्थ - प्रमाणतः = वेद-प्रमाणाने; च = आणि; तथोपलब्धेः = तशी उपलब्धि होण्याने ही (हेच सिद्ध होत आहे की; सूक्ष्मम् = ज्यात जीवात्मा स्थित होतो तो) भूतसमुदाय सूक्ष्म आहे. व्याख्या - मरणकाली ज्या आकाशादि भूतसमुदायात सर्वांसह जीवात्मा स्थित होतो असे सांगितले गेले आहे, तो भूतसमुदाय सूक्ष्म आहे, स्थूल नाही. ही गोष्ट श्रुतिच्या प्रमाणांनी तर सिद्ध आहेच, प्रत्यक्ष उपलब्धीने ही सिद्ध होत आहे; कारण की, श्रुतिमध्ये जेथे परलोक-गमनाचे वर्णन केले गेले आहे, तेथे म्हटले आहे - ‘शतं चैका हृदयस्य नाड्यतासां मूर्धानमभिनिः सृतैका । तयोर्ध्वमायन्नमृतत्वमेत्रि विष्वङ्कन्या उत्क्रमणे भवन्ति ॥’ ‘या जीवात्म्याच्या हृदयात एकशे एक नाडया आहेत; त्यातील एक कपाळाकडे निघालेली आहे, हिला सुषुम्ना म्हणतात, तिच्या द्वारा वर जाऊन मनुष्य अमृतभावास प्राप्त होतो. दुसर्या नाडया मरणकाली नाना योनीमध्ये घेऊन जाणार्या आहेत. (छां.उ.८.६.६) यात जी नाडीद्वारा निघून जाण्याची गोष्ट सांगितली आहे, ती सूक्ष्म भूतात स्थित जीवात्म्यासाठीच सम्भव आहे; तथा मरणकाली समीपवर्ती मनुष्यांना त्याचे निघून जाणे नेत्रेन्द्रिय आदिने दिसून येत नाही. यावरूनही त्या भूतांचे सूक्ष्म असणे प्रत्यक्ष आहे. याप्रकारे श्रुतिप्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाणाने ही त्या भूतसमुदायाचे सूक्ष्म असणे सिद्ध होत आहे. हा विषय सूत्र १.४.२ मध्येही पहावयास हवा. संबंध - प्रकारान्तराने ही गोष्ट सिद्ध करतात. - नोपमर्देनातः ॥ ४.२.१० ॥ अर्थ - अतः = तो भूतसमुदाय सूक्ष्म असतो म्हणून; उपमर्देन = या स्थूल शरीराचा दाह आदिच्या द्वारा नाश केल्याने; न = त्याचा नाश होत नाही. व्याख्या - मरणकाली जीवात्मा ज्या आकाशादि भूत-समुदाय रूपी शरीरात स्थित होतो, तो सूक्ष्म असतो, म्हणून त्या स्थूल शरीराचा दाह आदिच्या द्वारा नाश केल्याने ही त्या सूक्ष्म शरीराचे काहीही बिघडत नाही. जीवात्मा सूक्ष्म-शरीरासह त्या स्थूल शरीरातून निघून जातो, म्हणून या स्थूल शरीराचा दाह-संस्कार केल्यावरही जीवात्म्यास कुठल्याही प्रकारच्या कष्टाचा अनुभव येत नाही. संबंध - उपर्युक्त कथनाची पुष्टि करीत सांगतात - अस्यैव चोपपत्तेरेष ऊष्मा ॥ ४.२.११ ॥ अर्थ - एषः = हा; ऊष्मा = उष्णता जी जिवंत शरीरात अनुभवास येते; अस्य एव = या सूक्ष्म शरीराचीच आहे’ उपपत्तेः = युक्तिने; च = हीच गोष्ट सिद्ध होत आहे, कारण की सूक्ष्म शरीराच्या निघून जाण्यानंतर स्थूल शरीर गरम राहत नाही. व्याख्या - सूक्ष्म शरीरासहीत जीवात्मा जेव्हा या स्थूल शरीरातून निघून जातो, त्यानंतर त्यात उष्णता राहात नाही; स्थूल शरीराचे रूप आदि लक्षणे जशीच्या तशी राहूनही थंड होते. या युक्तिनेही ही गोष्ट समजली जाऊ शकते की जीवित शरीरात ज्या उष्णतेचा अनुभव येतो, ती या सूक्ष्म शरीराचीच असू शकते. अतएव ते निघून गेले की ती रहात नाही. संबंध - ज्यांचे समस्त संकल्प येथेच नष्ट होऊन चुकले आहेत, ज्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची वासना शेष राहिली नाही, ज्यांना या शरीरातच परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे त्यांचे ब्रह्मलोकी गमन होणे संभव नाही; कारण की श्रुतिमध्ये त्यांच्या गमनाचा निषेध आहे. ही गोष्ट दृढ करण्यासाठी पूर्वपक्ष उपस्थित करून त्याचे उत्तर दिले जात आहे. प्रतिषेधादिति चेन्न, शारीरात् ॥ ४.२.१२ ॥ अर्थ - चेत् = जर म्हणाल; प्रतिषेधात् = प्रतिषेध होण्यामुळे (त्याचे गमन होत नाही), इति न = तर हे ठीक नाही; शारीरात् = कारण की त्या प्रतिषेध वचनांच्या द्वारा जीवात्म्यापासून प्राणांच्या अलग होण्याचा निषेध केला गेला आहे. व्याख्या - पूर्वपक्षाच्या बाजूने सांगितले जाते की ‘जो कामनारहित, निष्काम, पूर्णकाम आणि केवळ परमात्म्याची इच्छा करणारा आहे, त्याचे प्राण उत्क्रमण करीत नाहीत.’ (बृह.उ.४.४.६) या श्रुतिमध्ये कामनारहित, महापुरुषांच्या गतिचा अभाव सांगितला जाण्य़ाने हे सिद्ध होत आहे की, त्याचे ब्रह्मलोकात गमन होत नाही, परंतु हे म्हणणे ठीक नाही; कारण की, उक्त श्रुतिमध्ये जीवात्म्याच्या प्राणांपासून वेगळे होण्याचा निषेध आहे, शरीरापासून म्हणून यामुळे गमनाचा निषेध सिद्ध होत नाही; तर जीवात्मा प्राणांसह ब्रह्मलोकात जातो या गोष्टीची पुष्टि होत आहे. संबंध - याच्या उत्तरात सिद्धान्ती सांगतात - स्पष्टो ह्येकेषाम् ॥ ४.२.१३ ॥ अर्थ - एकेषाम् = एक शाखेच्या श्रुतिमध्ये; स्पष्टः = स्पष्टच शरीरातून प्राणांचे उत्क्रमण न होण्याची गोष्ट सांगितली गेली आहे; हि = म्हणून (हेच सिद्ध होत आहे की त्याचे गमन होत नाही.) व्याख्या - एका शाखेच्या श्रुतिमध्ये स्पष्टच ही गोष्ट सांगितली गेली आहे की, ‘न तस्य प्राणा उत्क्रामन्ति’ - ‘त्या आप्तकाम महापुरुषाचे प्राण उत्क्रमण करत नाहीत; तेथेच विलीन होऊन जातात, तो ब्रह्म होऊनच ब्रह्मास प्राप्त होतो.’ (नृसिंहो.५) याशिवाय, बृहदारण्यकोपनिषदाच्या पुढील मंत्रात हेही सांगितले आहे की, ‘अत्र ब्रह्म समश्रुते’ - तो येथेच ब्रह्मास प्राप्त होऊन जातो. (बृह.उ.४.४.७) दुसर्या श्रुतिमध्ये असेही सांगितले आहे की, ‘विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणा भूतानि सम्प्रतिष्ठन्ति यत्र । तदक्षरं वेद्यते यस्तु सोम्य स सर्वज्ञः सर्वमेवाविवेशेति ॥ ‘हा जीवात्मा समस्त प्राण, पांच भूते तथा अन्तःकरण आणि इन्द्रियांच्या सहित ज्यात प्रतिष्ठित आहे, त्या परम अविनाशी परमात्म्यास जो जाणतो, हे सोम्य, तो सर्वज्ञ महापुरुष त्या सर्व रूप परमात्म्यामध्ये प्रविष्ट होऊन जातो. (प्र.उ.४.११) संबंध - स्मृति प्रमाणांनी ही गोष्ट दृढ करतात. स्मर्य्यते च ॥ ४.२.१४ ॥ अर्थ - च = तथा; स्मर्यते = स्मृतिने ही, (हेच सिद्ध होत आहे.) व्याख्या - ज्याचा मोह सर्वथा नष्ट झाला आहे, असा स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता ब्रह्मात स्थित राहून प्रियास पाहून हर्षित होत नाही आणि अप्रियास पाहून उद्विग्नही होत नाही. (गीता ५.२०) ‘ज्यांची पापे सर्वथा नष्ट होऊन चुकली आहेत, जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये संलग्न आहेत तथा ज्यांचे समस्त संशय नष्ट झाले आहेत, असे विजितात्मा महापुरुष शांत ब्रह्मास प्राप्त होतात.’ (गीता ५.२५) ‘त्यांच्या सर्व बाजूस ब्रह्मच वर्तत असते.’ (गीता ५.२६) याप्रकारे स्मृतिमध्ये ठिकठिकाणी त्या महापुरुषांचे जीवनकालातच परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होणे सांगितले गेले आहे तथा जेथे गमनाचे प्रकरण आले आहे. तेथे शरीरातून समस्त सूक्ष्म तत्त्वांना बरोबर घेऊन गमन करण्याची गोष्ट आली आहे.(१५.७) म्हणून हे सिद्ध होत आहे की ज्या महापुरुषांना जीवनकालातच परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होऊन जाते, त्यांचे कुठल्याही परलोकात गमन होत नाही. संबंध - जे महात्मे जीवनकालातच परमात्म्यास प्राप्त होऊन चुकले आहेत, ते जर परलोकात जात नाहीत तर शरीरनाशाच्या वेळी कोठे रहातात ? या जिज्ञासेवर सांगतात - तानि परे तथा ह्याह ॥ ४.२.१५ ॥ अर्थ - तानि = ते प्राण, अन्तःकरण, पांच सूक्ष्मभूते तथा इन्द्रिये सर्वच्या सर्व; परे = त्या परब्रह्मात (विलीन होऊन जातात); हि = कारण की; तथा = असेच; आह = श्रुति सांगते. व्याख्या - जे महापुरुष जीवनकालातच परमात्म्यास प्राप्त होऊन जातात, ते एक प्रकारे निरंतर त्या परब्रह्म परमात्म्यांतच स्थित राहतात; त्यापासून कधीहि अलग होत नाहीत तरीही लोकदृष्टीने शरीरात राहतो, म्हणून जेव्हा प्रारब्ध पूर्ण झाल्यावर शरीराचा नाश होऊन जातो, त्या समयी ते शरीर, अन्तःकरण आणि इन्द्रिये आदि सर्व कलांसहित त्या परमात्म्यातच विलीन होऊन जाते. श्रुतिमध्ये ही हेच सांगितले आहे की, ‘त्या महापुरुषाचा जेव्हा देहपात होतो त्या समयी पंधरा कला आणि मनासहित समस्त इन्द्रियांच्या देवताही आपापल्या अभिमानी देवतांमध्ये स्थित होऊन जातात, त्यांच्याबरोबर जीवन्मुक्तीचा काही संबंध राहत नाही; त्यानंतर विज्ञानमय जीवात्मा, त्याची समस्त कर्मे आणि उपर्युक्त सर्व देवता ही सर्वच्या सर्व परब्रह्मात विलीन होऊन जातात.’ (मु.उ.३.२.७) ‘न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ संबंध - शरीरसंबंधी सर्व तत्त्वासहित तो महापुरुष त्या (परमात्म्यात, परब्रह्मात) कशा प्रकारे स्थित होतो ? अशी जिज्ञासा झाल्यावर सांगतात. - अविभागो वचनात् ॥ ४.२.१६ ॥ अर्थ - वचनात् = श्रुतिच्या कथनाने (हे कळून येते की); अविभागः = विभाग रहात नाही. व्याख्या - मरणकालात साधारण मनुष्यांचे जीवात्म्यासहित त्या परमदेवात स्थित होणे सांगितले गेले आहे तथा आपल्या कर्मानुसार भिन्न-भिन्न योनिंमध्ये कर्मफलाचा उपभोग करण्यासाठी तेथून त्यांचे जाणेही सांगितले गेले आहे. (क.उ.२.५.७) म्हणून प्रलयाप्रमाणे परमात्म्यात स्थित होऊनही ते त्यापासून विभक्तच रहातात. परंतु हा ब्रह्मज्ञानी महापुरुष तर सर्व तत्त्वांसहित येथेच परमात्म्यात लीन होतो; म्हणून विभागरहित होऊन आपल्या परम कारणभूत ब्रह्मात मिळून जातो. श्रुतिही असेच वर्णन करते. ‘ज्याप्रकारे वाहणार्या नद्या आपले नामरूप सोडून समुद्रात विलीन होऊन जातात; त्याचप्रकारे ज्ञानी महात्मा नाम-रूपरहित होऊन उत्तमाहून उत्तम दिव्य परमपुरुष परमात्म्यास प्राप्त होऊन जातो.(मु.उ.३.२.८) हा मंत्र सूत्र १.४.२१ च्या व्याख्येत आला आहे. हा मंत्र सूत्र १.३.२ च्या व्याख्येत अर्थासहित आलेला आहे. संबंध - ब्रह्मलोकात जाणार्यांच्या गतिचा प्रकार सांगण्याच्या उद्देशाने प्रकरण आरंभ करून सातव्या सूत्रात हे सिद्ध केले गेले की, मृत्यूकाली प्राण, मन आणि इन्द्रियांसहित जीवात्मा स्थूल शरीरातून निघतेवेळी सूक्ष्म पांच भूतसमुदायरूप सूक्ष्म शरीरात स्थित होतो. येथपर्यंत तर सामान्य मनुष्यासमानच विद्वानाची ही गति आहे. त्यानंतर आठव्या सूत्रात हा निर्णय केला गेला की, साधारण मनुष्य तर सर्वांच्या कारणरूप परमेश्वरात प्रलयकालाप्रमाणे स्थित होऊन परमेश्वराच्या विधानानुसार कर्मफलाच्या भोगासाठी दुसर्या शरीरात निघून जातो परंतु ब्रह्मवेत्ता ब्रह्मलोकात जातो. नंतर प्रसंगवश नऊ ते अकराव्या सूत्रापर्यंत सूक्ष्म शरीराची सिद्धि केली गेली आणि बारावे ते सोळाव्या सूत्रापर्यंत ज्या महापुरुषांना जीवनकालातच ब्रह्माचा साक्षात्कार होऊन जातो, ते ब्रह्मलोकात न जाता येथेच ब्रह्मात लीन होऊन जातात, हा निर्णय केला गेला; आता या सतराव्या सूत्रापासून ब्रह्मलोकात जाणार्या विद्वानाच्या गतिविषयी पुन्हा विचार आरंभ करतात. सूक्ष्म शरीरात स्थित झाल्यानंतर तो विद्वान कशाप्रकारे ब्रह्मलोकात जातो हे सांगण्यासाठी पुढील प्रकरण प्रस्तुत केले जात आहे. तदोकोग्रज्वलनं तत्प्रकाशितद्वारो विद्यसामर्थ्यात्तच्छेषगत्यनुस्मृतियोगाच्च हार्दानुगृहीतः शताधिकया ॥ ४.२.१७ ॥ अर्थ - तदोकोऽग्रज्वलनम् = (स्थूल शरीरातून निघते वेळी) त्या जीवात्म्याचे निवासस्थान जे हृदय आहे, त्याच्या अग्रभागातून प्रकाश होऊन जातो; तत्प्रकाशित द्वारः = त्या प्रकाशाने ज्याचे निघून जाण्याचे द्वार प्रकाशित होऊन गेले आहे असा तो विद्वान; विद्या सामर्थ्यात् = ब्रह्मविद्येच्या प्रभावाने; च = तथा, तच्छेषगत्यनुस्मृतियोगात् = त्या विद्येचे शेष अंग जे ब्रह्मलोकात गमन आहे, त्या गमनविषयक संस्काराच्या स्मृतिच्या योगाने; हार्दानुगृहीतः = हृदयस्थ परमेश्वराच्या कृपेने अनुगृहीत झालेला; शताधिकया = एकशे नाडयांहून अधिक जी एक (सुषुम्णा) नाडी आहे, तिच्याद्वारा (ब्रह्मरन्ध्रातून निघतो.) व्याख्या - श्रुतिमध्ये मरणासन्न मनुष्याची समस्त इन्द्रिये, प्राण तथा अन्तःकरणाचे लिंगशरीरात एक होऊन जाण्याची गोष्ट सांगून हृदयाच्या अग्रभागामध्ये प्रकाश होण्याचे कथन आले आहे. (बृह.उ.४.४.२) तसेच साधारण मनुष्य आणि ब्रह्मवेत्ताचा (शरीरातून) निघून जाण्याचा मार्ग याप्रकारे भिन्न भिन्न सांगितला आहे की, ‘हृदयाशी संबंधित एकशे एक नाडया आहेत, त्या पैकी एक मस्तकाकडे निघते, तिच्याद्वारा वरील बाजूस जाणारा विद्वान अमृतत्त्वास प्राप्त होतो. शरीरातून जातेवेळी अन्य नाडया इकडच्या-तिकडच्या मार्गाने नाना योनित घेऊन जाणार्या असतात. (छां.उ.८.६.६) या श्रुतिप्रमाणांवरून हाच निश्चय होतो की, मरणकाली तो महापुरुष हृदयाच्या अग्रभागात होणार्या प्रकाशाने प्रकाशित ब्रह्मरन्ध्राच्या मार्गाने स्थूल शरीरांतून बाहेर निघतो आणि ब्रह्मविद्येच्या प्रभावाने तिच्या फलरूप ब्रह्मलोकाच्या प्राप्तीच्या संस्काराच्या स्मृतिने युक्त होऊन हृदयस्थित सर्वसुहृद परब्रह्म परमेश्वराकडून अनुगृहीत होऊन सूर्याच्या रश्मीमध्ये निघून जातो.’ ‘तस्य हैतस्य हृदयस्याग्रं प्रचोतते प्रद्योतेनैष आत्मा निष्क्रामति’। त्याचा त्या हृदयाचा अग्रभाग प्रकाशित होऊ लागतो, त्यातूनच हा आत्मा बाहेर निघतो. हा मंत्र ४.२.९ च्या व्याख्येत अर्थासहित आला आहे. संबंध - यानंतर काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात. - रश्म्यनुसारी ॥ ४.२.१८ ॥ अर्थ - रश्म्यनुसारी = सूर्याच्या रश्मींमध्ये स्थित होऊन त्यांचेच अवलंबन करून (तो सूर्यलोकाच्या द्वाराने ब्रह्मलोकात जातो.) व्याख्या - ‘या स्थूल शरीरातून बाहेर निघून तो जीवात्मा या सूर्याच्या रश्मीद्वारा वर चढतो, तेथे ॐ असे म्हणत जितक्या वेळात मन जाते, तितक्याच वेळात सूर्यलोकात पोहोचतो. हा सूर्य हेच विद्वानांसाठी ब्रह्मलोकास जाण्याचे द्वार आहे. हे अविद्वानासाठी बंद राहते, म्हणून ते (नीच) खालच्या लोकात जातात. (छां.उ.८.६.५) या श्रुतिच्या कथनावरून हे सिद्ध होत आहे की, ब्रह्मरन्ध्राच्या मार्गाद्वारा स्थूल शरीरातून बाहेर निघून ब्रह्मवेत्ता सूर्याच्या रश्मीमध्ये स्थित होऊन त्यांचा आश्रय घेऊन सूर्यलोकाच्या द्वाराने ब्रह्मलोकात निघून जातो, त्यासाठी त्याला विलंब होत नाही. ‘अथ यत्रैतदस्माच्छरीरादुत्क्रामत्यथैतैरेव रश्मिभिरूर्ध्वमाक्रमते स ओमोनि वा होद् वा मीयते स यावत् क्षिप्येन्मस्तावदादित्यं गच्छत्येतद् वै खलु लोकद्वारं विदुषां प्रपदनं निरोधोऽविदुषाम्’ । संबंध - रात्रीच्या समयी तर सूर्याचे किरण रहात नाहीत, म्हणून जर कुणा ज्ञान्याचा देहपात रात्रीच्या समयी झाला तर त्याचे काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात. - निशि नेति चेन्न, सम्बन्धात् यावद्देहभावित्वाद्दर्शयति च ॥ ४.२.१९ ॥ अर्थ - चेत् = जर म्हणाले की; निशि = रात्रीत; न = सूर्याच्या रश्मींच्या कडून नाडीद्वारा त्याचा संबंध होत नाही; इति न = तर हे म्हणणे ठीक नाही; (हि) = कारण की; संबंधस्य = नाडी आणि सूर्य रश्मींच्या संबंधांची; यावद्देहभावित्वात् = जोपर्यंत शरीर राहते, तोपर्यंत सत्ता टिकून राहते, म्हणून (दिवस असो वा रात्र केव्हाही नाडी आणि सूर्यरश्मींचा संबंध विच्छिन्न होत नाही.); दर्शयति च = ही गोष्ट श्रुतिही दाखविते. व्याख्या - जर कोणी असे म्हणेल की, रात्रीत देहपात झाल्यावर नाड्यांशी सूर्यकिरणांचा संबंध होणार नाही, म्हणून त्या समयी मृत्यू प्राप्त झालेला विद्वान सूर्यलोकाच्या मार्गाने गमन करू शकत नाही, तर त्याचे हे म्हणणे ठीक नाही आहे. कारण की, श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘या सूर्याची किरणे या लोकात आणि त्या सूर्यलोकात दोन्ही ठिकाणी गमन करतात, ती सूर्यमण्डलातून निघून शरीरांतील नाड्यात व्याप्त होऊन राहतात तथा नाड्यांतून निघून सूर्यामध्ये पसरतात.’ (छां.उ.८.६.२) म्हणून श्रुतिच्या या कथनानुसार जोपर्यंत शरीर राहते, तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी आणि सर्वसमयी सूर्याचे किरण त्याच्या नाडयांमध्ये व्याप्त रहात असतात; म्हणून कुठल्याही समयी देहपात झाला तरी सूक्ष्म शरीरासहित जीवात्म्याचा नाड्यांच्या द्वारे तत्काळ सूर्यांच्या रश्मिंशी संबंध येतो आणि तो विद्वान सूर्यलोकाच्या द्वाराने ब्रह्मलोकात निघून जातो. ‘एता आदित्यस्य रश्मय उभौ लोकौ गच्छन्तीमं चामुं चामुष्यादादिंत्यात् प्रतायन्ते ता आसु नाडीषु सृप्ता आभ्यो नाडीभ्यः प्रतायन्ते तेऽमुष्मिन्नादित्ये सूत्राः ॥ संबंध - काय दक्षिणायन कालात मेल्यावरही विद्वान ब्रह्मलोकात निघून जातो ? या जिज्ञासेवर सांगतात - अतश्चायनेऽपि ही दक्षिणे ॥ ४.२.२० ॥ अर्थ - अतः = या पूर्वी सांगितलेल्या कारणाने; च = ही; दक्षिणे = दक्षिण; अयने = अयनात; अपि = मरणार्याचेही ब्रह्मलोकात गमन होते. व्याख्या - पूर्वसूत्राच्या कथनानुसार ज्याप्रकारे रात्रीच्या समयी सूर्याच्या रश्मिशी संबंध होण्यात काही बाधा येत नाही, त्याचप्रकारे दक्षिणायन कालातही कोठलीही बाधा येत नसल्याने तो विद्वान सूर्यलोकाच्या मार्गाने जाऊ शकतो. म्हणून हेच समजले पाहिजे की, दक्षिणायन समयी शरीर सोडून जाणारा महापुरुष ब्रह्मविद्येच्या प्रभावाने सूर्यलोकाच्या द्वाराने तत्काळ ब्रह्मलोकात पोहोचतो. भीष्म आदि महापुरुषांच्या विषयी जे उत्तरायणकालाच्या प्रतीक्षेचे वर्णन आले आहे, त्याचा आशय असा होऊ शकतो की, भीष्म वसु देवता होते, त्यांना देवलोकात जायचे होते आणि दक्षिणायन समयी देवलोकात रात्र असते. म्हणून ते काही दिवस प्रतीक्षा करीत राहिले. संबंध - येथे ही जिज्ञासा होते की, ‘हे अर्जुना । ज्या काळी शरीर त्यागून गेलेले योगी लोक परत न येणार्या आणि परत येणार्या गतिला प्राप्त होतात, तो काळ मी तुला सांगतो.’ (गीता ८.२३) याप्रकारे प्रकरण आरंभ करून दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायण आदि कालास तर अपुनरावृत्तिकारक सांगितले गेले आहे. तथा रात्री आणि दक्षिणायन आदिला पुनरावृत्तिचा काल नियत केला गेला आहे, मग येथे कसे सांगितले गेले आहे की, रात्र आणि दक्षिणायनात ही देहत्याग करणारा विद्वान ब्रह्मलोकात जाऊ शकतो ? यावर सांगतात. योगिनः प्रति च स्मर्यते स्मार्त्ते चैते ॥ ४.२.२१ ॥ अर्थ - च = याशिवाय; योगिनः = योग्याचे; प्रति = साठी (हा कालविशेषाचा नियम), स्मर्यते = स्मृतिमध्ये सांगितले जाते; च = तथा; एते = (तेथे सांगितलेले) हे अपुनरावृत्ति आणि पुनरावृत्ति रूप दोन्ही मार्ग; स्मार्ते = स्मार्त आहेत. व्याख्या - गीतेमध्ये ज्या दोन गतींचे वर्णन आहे, ते स्मार्त अर्थात श्रुतिवर्णित मार्गाहून भिन्न आहे. याशिवाय ते योग्यासाठी सांगितले गेले आहे. याप्रकारे विषयाचा भेद असल्याकारणाने तेथे आवृत्ति आणि अनावृत्ति साठी नियत केलेल्या कालविशेषाने या श्रुतिनिरोपित गतिमध्ये काही विरोध येत नाही. जे लोक गीतेच्या श्लोकात काल शब्दाच्या प्रयोगाने दिन, रात, शुक्लपक्ष, कृष्णपक्ष, उत्तरायण, दक्षिणायन या शब्दांना कालवाचक मानून त्यांच्यापासून कालविशेषास ग्रहण करतात, त्यांच्यासाठी हे समाधान केले गेले आहे; परंतु जर त्या शब्दांचा अर्थ लोकान्तरात पोहोचविणार्या त्या त्या कालांच्या अभिमानी देवता असा मानला गेला तर श्रुतिच्या वर्णनाशी काही विरोध येत नाही. येथे चवथ्या अध्यायातील दुसरा पाद पूर्ण झाला. |