समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १३ वा
विविध पुराणांची श्लोकसंख्या नी श्रीमद्भागवताचा महिमा -
सूत सांगतात -
( शार्दूलविक्रीडत )
ज्या ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता गाती स्तवोनी गुणा ।
वेदो साम पदक्रमेचि श्रुति ते गाती ऋषी गान ज्यां ।
योगी ध्यान करोनि नित्य बघती लाभावया दर्शन ।
ज्याचा अर्थ सुरासुरा न कळला त्या दिव्य देवा नमो ॥ १ ॥
घेता पाठिसि मंदरा गिरि तदा ज्यां वाटली खाज ती ।
ज्याचा श्वास तसूभरेचि उठता वारा सुटोनी तदा ।
लाटा त्या उदधी मधोनि उठल्या त्या आजही दृश्यमान् ।
रक्षो श्वास प्रभावशालि सकळा विश्राम ना ते जया ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
श्लोकसंख्या पुराणांची तैसे याचे प्रयोजन ।
महिमा दान नी पाथ ऐका मी सांगतो पुढे ॥ ३ ॥
दहा हजार ब्रह्माचे नी पंचावन पद्मचे ।
विष्णुपुराणि तेवीस शैवी चोवीस ते पहा ॥ ४ ॥
अठरा श्रीभागवती नारदी पंचवीस की ।
मार्कंडी नऊ अग्नीचे पंधरा जास्त चारशे ॥ ५ ॥
चवदा ती हविष्याची अधीक पाचशे तसे ।
अठरा ब्रह्मवैवर्तीं लिंगी ते अकराचि की ॥ ६ ॥
वराहि चोविसो तैसे स्कंधि एक्यांशि नी शत ।
श्रीवान पुराणात दश सहस्र ते पहा ॥ ७ ॥
कूर्मात सतरा तैसे मत्स्यीं चौदाचि श्लोक ते ।
एकोणवीस गरूडात ब्रह्मांडी द्वादशो तसे ॥ ८ ॥
एकूण श्लोकसंख्या ती होते जी चारलक्ष की ।
अठरा वदलो तैसे श्रीमद् भागवतात ते ॥ ९ ॥
नाभिच्या स्थित पद्मात संसारभयि ब्रह्मजी ।
कृपेने विष्णुने त्याम्ना दिधली संहिताच ही ॥ १० ॥
आदी मध्ये नि अंतीही वैराग्यादायि त्या कथा ।
हरिलीला कथावार्ता सुधेने संत तृप्तती ॥ ११ ॥
वेदांतसार ते ऐसे ब्रह्म एकत्व सत्य ते ।
प्रतिपाद्य ययीं तेच कैवल्यचि प्रयोजन ॥ १२ ॥
भाद्रपदी पौर्णिमेला सुवर्णासनि ठेवुनी ।
श्रीमद्भागवतो देता गति उत्तम लाभते ॥ १३ ॥
संतांच्या त्या सभेमध्ये पुराण अन्य शोभती ।
श्रेष्ठ भागवतो येता अन्यांचे तेज संपते ॥ १४ ॥
सर्व वेदाम्त हे सारे श्रीमद् भागवतात की ।
सुधारस पियी त्याचे मन ना रमते कुठे ॥ १५ ॥
गंगा नध्यात ती जैसी विष्णु तो देवतात नी ।
शिव तो वैष्णवांमाजी पुराणात तसेचि हे ॥ १६ ॥
जेवढे क्षेत्र या विश्वींं त्यात काशीच श्रेष्ठ की ।
तसे भागवताचेही पुराणी स्थान श्रेष्ठची ॥ १७ ॥
( शार्दूलविक्रीडित )
श्रीमद्भागवतो पुराण विमलो जे वैष्णवांना प्रिय ।
जीवन्मुक्त अस्चि हंस करिती हे ज्ञानगानो तसे ॥
ते वैराग्य नि ज्ञान मिळते नैष्कर्मि जीवास की ।
नैष्कर्म्यो मिळते करोनिपठणा किंवाहि ऐकोनिया ॥ १८ ॥
नाही यास तुळाहि अन्य कुठली हा ज्ञानदीपो खरा ।
ब्रह्मासी वदले स्वयेंचि भगवान् ते नारदा बोलती ॥
व्यासांना कथिती मुनी नि पुढती श्रीशूकजी प्राशिती ।
त्यांनी ती विमला नृपास कथिले ते सत्य ध्यातो अम्ही ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
नमस्ते साक्षिमान् ईशा वासुदेवा नमो नमः ।
मोक्षाभिलाषि ब्रह्म्याला जेणे हे कथिले असे ॥ २० ॥
नमितो शुकदेवाला योगेंद्र ब्रह्मरूप जे ।
संसार सर्पदंशोनी नृपाला मुक्ति ती दिली ॥ २१ ॥
वारंवार मिळो जन्म पायाचे भक्ति ती घडो ।
कृपाही करणे ऐसी देवाधिदेवजी प्रभो ॥ २२ ॥
नामसंकीर्तने ज्याच्या सर्वथा पाप नष्टते ।
प्रणामे संपती दुःख मनी मी श्रीहरी परं ॥ २३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ १३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|