श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३७ वा - अन्वयार्थ

केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती -

कंसप्रहितः केशी तु - कंसाने पाठविलेला असा केशी तर - खुरैः महीं निर्जरयन् - खुरांच्या योगाने पृथ्वीला जर्जर करीत - मनोजवः - मनाच्या वेगाप्रमाणे आहे वेग ज्याचा असा - नभः - आकाशाला - सटावधूताभ्र - आयाळीने हालविलेल्या ढगांनी - विमानसङ्‌कुलं कुर्वन् - व विमानांनी व्यापलेले असे करणारा - हेषितभीषिताखिलः - खिंकाळण्याने भिवविले आहेत सर्व प्राणी ज्याने असा - महाहयः (सन्) - एक मोठा घोडा होऊन - ॥१॥

विशालनेत्रो - भयंकर विशाल डोळे असलेला - विकटहास्यकोटरो - प्रचंड गर्ना करीत - बृहद्‌गलो नीलमहाम्बुदोपमः - अवाढव्य मान व झाडाच्या खोडासारखे तोंड असलेला - दुराशयः कंसहितं चिकीर्षु - दुष्ट कंसाचे प्रिय करण्यासाठी - नन्दस्य व्रजं आजगाम - नंदाच्या गौळवाडयात आला. ॥२॥

भगवान् अग्रणीः (सन्) - श्रीकृष्ण पुढारी होऊन - स्वगोकुलं - आपल्या गोकुळाला - तद्धेषितैः त्रासयन्तं - त्याच्या खिंकाळण्यानी त्रास देणार्‍या - वालविधूर्णिताम्बुदं - शेपटीने फिरविले आहेत मेघ ज्याने अशा - आत्मानं आजौ मृगयन्तं - आपल्याला युद्धासाठी शोधणार्‍या - तं - त्या केशीला - उपाह्वयत् - आव्हान करता झाला - सः - तो - मृगेन्द्रवत् - सिंहाप्रमाणे - व्यनदत् - गर्जना करता झाला. ॥३॥

चण्डजवः - तीव्र आहे वेग ज्याचा असा - दुरासदः - कष्टाने धरता येण्यासारखा - अत्यमर्षणः - अत्यंत रागीट असा - सः - तो केशी - अरविन्दलोचनं - ज्याचे कमळासारखे डोळे आहेत - तं निशाम्य - अशा त्या कृष्णाला पाहून - अभिमुखः (सन्) - समोर तोंड करणारा होऊन - मुखेन खं पिबन् इव - तोंडाने जणु काय आकाशाला पिऊन टाकीत - (तं) अभ्यद्रवत् - त्याच्यावर धावला - पभ्द्यां जघान - दोन्ही पायांनी मारिता झाला. ॥४॥

अधोक्षजः - श्रीकृष्ण - तत् वञ्चयित्वा - ते चुकवून - रुषा - रागाने - दोर्भ्यां - दोन्ही हातांनी - तं - त्याला - पादयोः प्रगृह्य - दोन्ही पायांच्या ठिकाणी पकडून - परिविध्य - सभोवार फिरवून - यथा - ज्याप्रमाणे - तार्क्ष्यसुतः - गरुड - उरगं - सापाला - सावज्ञं - तिरस्कारपूर्वक - धनुः शतान्तरे उत्सृज्य - चारशे हातांच्या अंतरावर फेकून - व्यवस्थितः - नीट उभा राहिला. ॥५॥

लब्धसंज्ञः सः केशी - प्राप्त झाली आहे शुद्धि ज्याला असा तो केशी - पुनःउत्थितः - पुनः उठून - रुषा (मुखं) व्यादाय - रागाने तोंड पसरून - तरसा - वेगाने - हरिं अपतत् - श्रीकृष्णावर उडी घालता झाला - सः अपि - तो श्रीकृष्ण देखील - स्मयन् (सन्) - हसत हसत - यथा बिले उरगं तथा - ज्याप्रमाणे बिळात सापाला त्याप्रमाणे - अस्य मुखे - त्याच्या तोंडात - उत्तरं भुजं - उजवा हात - प्रवेशयामास - शिरकविता झाला. ॥६॥

केशिनः - केशीचे - भगवद्भुजस्पृशः - श्रीकृष्णाच्या हाताला स्पर्श करणारे - ते दन्ताः - ते दात - यथा तप्तम् अयस्पृशः - तापलेल्या लोखंडाला स्पर्श केल्यासारखे - निपेतुः - पडले - च - आणि - तद्देहगतः - त्याच्या शरीरात गेलेला - महात्मनः बाहुः - महात्म्या श्रीकृष्णाचा हात - यथा उपेक्षितः आमयः तथा - ज्याप्रमाणे हयगय केलेला रोग त्याप्रमाणे - संववृधे - वाढला. ॥७॥

समेधमानेन - अत्यंत वाढलेल्या अशा - कृष्णबाहुना निरुद्धवायुः - श्रीकृष्णाच्या हातामुळे कोंडला आहे प्राणवायु ज्याचा असा - चरणान् विक्षिपन् - पाय झाडीत - प्रस्विन्नगात्रः - घामाघूम झाले आहे शरीर ज्याचे असे - परिवृत्तलोचनः - फिरत आहेत डोळे ज्याचे असा - सः - तो केशी - लेण्डं विसृजन् - लेंडके टाकीत - व्यसुः - गेले आहेत प्राण ज्याचे असा - क्षितौ पपात - भूमीवर पडला. ॥८॥

व्यसोः - गतप्राण झालेल्या - कर्कटिकाफलोपमात् - काकडीप्रमाणे असलेल्या - तद्देहतः - त्याच्या शरीरापासून - भुजं अपाकृष्य - हात काढून - अविस्मितः - गर्वरहित असा - अयत्नहतारिः - यत्नांवाचून मारिला आहे शत्रू ज्याने असा - महाभुजः - मोठे आहेत हात ज्याचे असा कृष्ण - उत्स्मयैः - मोठयाने हसणार्‍या - प्रसूनवर्षैः - फुलांचा वर्षाव करणार्‍या - दिविषद्भिः - देवांकडून - ईडितः - स्तविला गेला. ॥९॥

नृप - हे राजा - भागवतप्रवरः - भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठ असा - देवर्षिः - नारद - अक्लिष्टकर्माणं - क्लेशरहित आहेत कृत्ये ज्याची अशा - कृष्णं - श्रीकृष्णाला - रहसि उपसंगम्य - एकांतात भेटून - एतत् अभाषत् - हे म्हणाला. ॥११॥

कृष्ण कृष्ण - हे श्रीकृष्णा - अप्रमेयात्मन् - जाणण्यास कठीण आहे स्वरूप ज्याचे अशा - योगेश - हे श्रेष्ठ योग्या - जगदीश्वर - हे जगाच्या नियामका - वासुदेव - हे वासुदेवा - अखिलावास - हे सर्वत्र वास करणार्‍या - सात्वतां प्रवर - हे यादवांमध्ये श्रेष्ठ अशा - प्रभो - हे परमेश्वरा. ॥१०॥

त्वं - तू - एधसां (वर्तमानः) ज्योतिः इव - इंधनात असणार्‍या अग्नीप्रमाणे - सर्वभूतानां एकः आत्मा - सर्व प्राणिमात्रांचा एक असा आत्मा - गुहाशयः - अंतःकरणात राहणारा - साक्षी - पाहणारा - महापुरुषः - श्रेष्ठ पुरुष असा - गूढः - गुप्त असा - ईश्वरः (असि) - ईश्वर आहेस. ॥१२॥

आत्मना आत्माश्रयः - स्वतःच स्वतःचा आश्रय असलेला - सत्यसङ्‌कल्पः - खर्‍या आहेत इच्छा ज्याच्या असा - ईश्वरः - परमेश्वर - पूर्वं - पूर्वी - मायया - मायेच्या योगाने - गुणान् - सत्त्वादि गुण - ससृजे - उत्पन्न करिता झाला - तैः - त्यांच्या योगाने - इदं (जगत्) - हे जग - सृजसि - तू उत्पन्न करितोस - अवसि - रक्षण करितोस - अत्सि - खाऊन टाकितोस. ॥१३॥

सः त्वं - तो तू - भूधरभूतानां - राजे झालेल्या अशा - दैत्यप्रमथरक्षसां विनाशाय - दैत्य, प्रमथ व राक्षस यांच्या नाशासाठी - च - आणि - सेतूनां रक्षणाय - धर्ममर्यादांच्या रक्षणासाठी - अवतीर्णः (असि) - अवतरला आहेस. ॥१३४

यस्य हेषितसंत्रस्ताः - ज्याच्या खिंकाळण्याने भ्यालेले असे - अनिमिषाः दिवं त्यजन्ति - देव स्वर्गलोकाचा त्याग करतात - (सः) अयं हयाकृतिः दैत्यः - तो हा घोडयाचे आहे स्वरूप ज्याचे असा राक्षस - दिष्टया (एव) - सुदैवानेच - ते लीलया निहतः - तुझ्याकडून लीलेने मारिला गेला. ॥१५॥

विभो - हे श्रीकृष्णा - परश्वः अहनि - परवाच्या दिवशी - हस्तिनं - हत्तीला - चाणूरं - चाणूराला - मुष्टिकं - मुष्टिकाला - अन्यान् मल्लान् - दुसर्‍या मल्लांना - च - आणि - कंसं - कंसाला - ते निहतं - तुझ्याकडून मारलेले - द्रक्ष्ये - मी पाहीन. ॥१६॥

तस्य अनु - त्याच्या मागून - शङखयवनमुराणां - शंख, यवन व मुर या दैत्यांचा - च - आणि - नरकस्य - नरकासुराचा - वधं - वध - पारिजातापहरणं - पारिजातक वृक्षाचे हरण - च - आणि - इन्द्रस्य पराजयं - इंद्राचा पराजय. ॥१७॥

जगत्पते - हे जगाच्या पालका - द्वारकायां - द्वारकेमध्ये - वीरकन्यानां - वीरकन्यांचा - वीर्यशुल्कादिलक्षणं - पराक्रमरूपी मूल्य इत्यादि लक्षणांनी युक्त असा - उद्वाहं - विवाह - नृगस्य शापात् विमोक्षणं - नृगाची शापापासून सुटका. ॥१८॥

स्यमन्तकस्य मणेः भार्यया सह आदानं - स्यमंतक मण्याचा पत्नीसह केलेला स्वीकार - स्वधामतः ब्राह्मणस्य मृतपुत्रप्रदानं - स्वतःच्या स्थानापासून ब्राह्मणाचा मेलेला मुलगा परत देणे. ॥१९॥

पौण्ड्रकस्य वधं - पौंड्रकाचा वध - पश्चात् काशिपुर्याः दीपनं - नंतर काशिनगरीचे जाळणे - महाक्रतौ - मोठया यज्ञात - चैद्यस्य - शिशुपालाचे - च - आणि - दन्तवक्रस्य - दंतवक्राचे - निधनं - मरण. ॥२०॥

च - तसेच - द्वारकां आवसन् - द्वारकेत राहून - भवान् - तू - भुवि कविभिः गेयानि - पृथ्वीवर कवींना गाण्यास योग्य असे - यानि अन्यानि वीर्याणि कर्ता - जे दुसरे पराक्रम करशील - तानि (अपि) - तेहि - अहं द्रक्ष्यामि - मी पाहीन. ॥२१॥

अथ - नंतर - अर्जुनसारथेः - अर्जुनाचा सारथी अशा - वै - खरोखर - अमुष्य विश्वस्य क्षपयिष्णोः - ह्या विश्वाचा संहार करू इच्छिणार्‍या - कालरूपस्य - कालस्वरूपी - ते (कृतं) - तुझ्याकडून केले गेलेले - अक्षौहिणीनां निधनं द्रक्ष्यामि - अनेक अक्षौहिणी सैन्याचे मरण मी पाहीन. ॥२२॥

विशुद्धविज्ञानघनं - अत्यंत शुद्ध अशा अनुभविक ज्ञानाने भरलेल्या अशा - स्वसंस्थया समाप्तसर्वार्थं - आपल्या स्वरूपाच्या योगाने पूर्ण आहेत सर्व इच्छा ज्याच्या अशा - अमोघवाञ्छितं - फुकट न जाणारी आहे इच्छा ज्याची अशा - स्वतेजसा - स्वतःच्या सामर्थ्याने - नित्यनिवृत्तमायागुणप्रवाहं - माया गुणांचा पसारा ज्याने निरंतर दूर केला आहे अशा - भगवन्तं - भगवंताला - ईमहि - आम्ही शरण जातो. ॥२३॥

ईश्वरं - जगाचे नियंत्रण करणार्‍या - स्वाश्रयं - स्वतःचा आहे आश्रय ज्याला अशा - आत्ममायया विनिर्मिताशेषविशेषकल्पनं - स्वतःच्या मायेने निर्माण केल्या आहेत सर्व प्रकारच्या कल्पना ज्याने अशा - अद्य क्रीडार्थं आत्तमनुष्यविग्रहं - सांप्रत क्रीडेसाठी घेतले आहे मनुष्याचे शरीर ज्याने अशा - यदुवृष्णिसात्वतां धुर्यं - यादव, वृष्णि व सात्वत यांमध्ये श्रेष्ठ अशा - त्वां - तुला - नतः अस्मि - नम्र झालो आहे. ॥२४॥

तद्दर्शनोत्सवः - त्याच्या भेटीमुळे झाला आहे आनंद ज्याला असा - भागवतप्रवरः - भक्तांमध्ये श्रेष्ठ असा - मुनिः - नारद मुनि - यदुपतिं कृष्णं - यादवांचा स्वामी अशा श्रीकृष्णाला - एवं प्रणिपत्य - याप्रमाणे नमस्कार करून - (तेन च) अभ्यनुज्ञातः - आणि त्याने निरोप दिला गेलेला - ययौ - निघून गेला. ॥२५॥

व्रजसुखावहः - गोकुळाला सुख देणारा - भगवान् गोविन्दः अपि - भगवान श्रीकृष्णहि - आहवे केशिनं हत्वा - युद्धात केशीला मारून - प्रीतैः पालैः सह - संतुष्ट झालेल्या गोपांसह - पशून् अपालयत् - गाई राखिता झाला. ॥२६॥

एकदा - एके दिवशी - अद्रिसानुषु पशून् चारयन्तः ते पालाः - पर्वताच्या शिखरांवर गुरे चारणारे ते गोप - चोरपालापदेशतः - चोर व रक्षक यांच्या मिषाने - निलायनक्रीडाः चक्रुः - लपंडावाचे खेळ करते झाले. ॥२७॥

नृप - हे राजा - तत्र - त्यांपैकी - कतिचित् - काही - चौराः - चोर - च - आणि - कतिचित् - काही - पालाः - रक्षक - च - आणि - तत्र - तेथे - एके - काही - मेषायिताः - मेंढयांसारखे - आसन् - झाले - अकुतोभयाः - ज्यांना कोठूनही भीति नाही असे - विजह्लुः - खेळते झाले. ॥२८॥

महामायः - मोठे आहे कपट ज्यांचे असा - गोपालवेषधृक् - गोप वेष धारण करणारा - मयपुत्रः व्योमः - मयासुराचा मुलगा व्योम - प्रायः चोरायितः (सन्) - बहुत करून चोर झालेला असा - बहून् मेषायितान् - पुष्कळशा मेंढ्या झालेल्या गोपांना - अपोवाह - बाजूला नेता झाला. ॥२९॥

(सः) महासुरः - तो महाराक्षस - नीतं नीतं मेषायितं - नेलेल्या प्रत्येक मेंढी झालेल्या गोपाला - गिरिदर्यां विनिक्षिप्य - पर्वताच्या गुहेत फेकून - शिलया द्वारं पिदधे - शिळेने दार झाकिता झाला - चतुःपञ्च अवशेषिताः - चार पाच शिल्लक राहिले. ॥३०॥

सतां शरणदः कृष्णः - सज्जनांना आश्रय देणारा श्रीकृष्ण - तस्य तत् कर्म विज्ञाय - त्याचे ते कृत्य जाणून - गोपान् नयन्तं तं - गोपांना हरण करणार्‍या त्याला - हरिः वृकं इव - सिंह जसा लांडग्याला त्याप्रमाणे - ओजसा जग्राह - वेगाने पकडिता झाला. ॥३१॥

बली सः - बलवान असा तो केशी - गिरीन्द्रसदृशं निजं रूपं आस्थाय - हिमालयासारखे आपले स्वरूप धारण करून - आत्मानं मोक्तुं इच्छन् (अपि) - स्वतःला सोडवू इच्छित असताहि - ग्रहणातुरः - पकडण्याने व्याकुळ झालेला - न अशक्नोत् - समर्थ झाला नाही. ॥३२॥

अच्युतः - श्रीकृष्ण - दोर्भ्यां तं निगृह्य - दोन्ही हातांनी त्याला धरून - महीतले पातयित्वा - पृथ्वीवर पाडून - दिवि देवानां पश्यतां - स्वर्गात देव पहात असता - पशुमारं - पशूला मारावे तसे - अमारयत् - मारता झाला. ॥३३॥

अथ - नंतर - गुहापिधानं निर्भिद्य - गुहेचे झाकण फोडून - गोपान् कृच्छ्‌रतः निःसार्य - गोपांना संकटातून बाहेर काढून - सुरैः गोपैः च स्तूयमानः (कृष्णः) - देवांनी व गोपांनी स्तविलेला श्रीकृष्ण - स्वगोकुलं प्रविवेश - आपल्या गौळवाडयात शिरला. ॥३४॥

अध्याय सदतिसावा समाप्त

GO TOP