|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ
महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश - शर्यातिः मानवाः राजा (आसीत) - शर्यातिनामक मनूचा पुत्र राजा असून - सः ब्रह्मिष्ठः बभूव ह - तो ब्रह्मज्ञानी होता - अंगिरसां सत्रे - अंगिरा ऋषीच्या यज्ञामध्ये - -य वैः द्वितीयं अहः ऊचिवान - जो खरोखरच दुसर्या दिवशी करावयाचे कर्म सांगता झाला. ॥ १ ॥ तस्य सुकन्या नाम कमललोचना कन्या आसीत- - त्याला सुकन्या नावाची कमलासारख्या नेत्राची सुंदर कन्या होती - तया सार्ध वनगतः (सः) - तिला घेऊन अरण्यात गेलेला तो - च्यवनाश्रमं अगमत हि - च्यवन ऋषीच्या आश्रमाला खरोखर प्राप्त झाला. ॥ २ ॥ सखीभिः परिवृत्ता सा - मैत्रिणीनी वेष्टिलेली ती सुकन्या - -वने अडघ्रिपान विचिन्वती - अरण्यात झाडे शोधणारी - वल्मिकरन्ध्रे खद्योते इवज्योतिषी ददृशे - वारुळाच्या छिद्रात काजव्याप्रमाणे चकाकणार्या दोन ज्योति पाहती झाली. ॥ ३ ॥ दैवचोदिता बाला - दैवाने प्रेरित झालेली ती मुलगी - ते ज्योतिषि-- त्या ज्योतींना - कण्ट्केन - काटयाने - मुग्धभावेन वै अविध्यत - आज्ञानामुळेटोचिती झाली - ततः बहु असृक सुस्त्राव - तेथून पुष्कळ रक्त वाहू लागले. ॥ ४ ॥ तत्क्षणात सैनिकांना शकृन्मूत्रविरोधः अभूत- - लगेच सैन्यातील लोकांच्यामलमूत्राचा अवरोध झाला - च - आणि - तं उपालक्ष्य - त्याला पाहून - विस्मितःराजर्षिः पुरुषान अब्रवीत - आश्चर्यचकित झालेला राजा सेवकांना म्हणाला. ॥ ५ ॥ अपि युष्माभिः भार्गवस्य अभद्रं न विचेष्टितं - तुम्ही भृगपुत्र च्यवन ऋषीचा काही अपराध तर केला नाही ना - नःव्यक्तं (भवति) - आम्हाला स्पष्ट वाटते - केन अपितस्य आश्रमदूषणं कृतं - कोणीतरी त्या च्यवनाच्या आश्रमात वाईट कृत्य केले असावे. ॥ ६ ॥ भीता सुकन्या पितरं प्राह - भ्यालेली सुकन्या पित्याला म्हणाली - -मया किज्चित कृतं - माझ्या हातून काही गोष्ट घडून आली - अजानन्त्या (मया) द्वेज्योतिषी कन्टकेन वै निर्भिन्ने - न जाणता माझ्याकडून दोन चकाकणार्या ज्योती काटयानेखरोखर टोचिल्या गेल्या. ॥ ७ ॥ दुहितुः तद्वचः श्रुत्वा - सुकन्येचे ते भाषण ऐकुन - -जातसाध्वसः शर्यातिः - भीतीयुक्त झालेला शर्याति - वाल्मीकान्तर्हितं मुनिं शनैःप्रसादयामास - वारुळात आच्छादून गेलेल्या त्या च्यवन ऋषीला हळूहळू प्रसन्न करिताझाला. ॥ ८ ॥ तदभिप्रायं आज्ञाय - त्या ऋषीचा अभिप्राय जाणून - सः दुहितरं मुनेःप्रादात - तो आपली मुलगी ऋषीला देता झाला - कृच्छरात मुक्तः - संकटातून मुक्तझालेला - तम आमन्त्र्य - त्या ऋषीचा निरोप घेऊन - समाहितः पुरं प्रायात-- समाधान पावलेला तो नगराला गेला. ॥ ९ ॥ चित्तज्ञा सुकन्या- - दुसर्याच्या अंतःकरणातील अभिप्राय जाणणारी सुकन्या - परमकोपनं च्यवनं पतिं प्राप्य- - अत्यंतरागीट अशा च्यवनाला पति म्हणून मिळवून - अप्रमत्ता अनिवृत्तिभिः (तं)प्रीणयामास - सावधपणाने पतीच्या मनाप्रमाणे वागून त्याला प्रसन्न करिती झाली ॥ १० ॥ अथ कस्यचित तु कालस्य- - नंतर काही काळाने - नासत्यौ आश्रमागतौ-- अश्विनीकुमार त्याच्या आश्रमात आले - तौ पूजयित्वा सःप्रोवाच - त्यांची पूजा करुन तो म्हणाला - ईश्वरौ मे (नवं) वयः दत्तं - अहो समर्थ अश्विनीकुमार हो, मला तारुण्य द्या. ॥ ११ ॥ यज्ञे असोमपोः अपि वां - यज्ञात सोमपान न मिळणार्या तुम्हालाही - -सोमस्य ग्रहं गृहीष्ये - सोमपान देईन - प्रमदानां यत ईप्सितं वयः रुपं च (तत) मेक्रियतां - स्त्रिय़ांना आवडणारे असे जे तारुण्य व स्वरुप मला प्राप्त होवो. ॥ १२ ॥ भिषक्तमौ विप्रं बाढं इति अभिनन्दय - वैदयश्रेष्ठ अश्विनीकुमार च्यवन ऋषीला बरे आहेअसे म्हणून अभिनंदन करुन - भवान सिद्धविनिर्मिती अस्मिन ह्रदे निमज्जतां-- आपण सिद्धांनी निर्माण केलेल्या ह्या डोहात बुडी मारा - (इति) ऊचतुः - असेम्हणाले. ॥ १३ ॥ इति उक्त्वा - असे म्हणून - जरया ग्रस्तदेहः (सः) - वृद्धावस्थेनेग्रासिले आहे शरीर ज्यांचे असा तो - धमनिसंततः वलिपतितविप्रियः- - नाडयांनी व्यापिलेला व वळ्या व पिकलेले केस ह्यामुळे कुरुप दिसणारा - (सः) अश्विभ्यां ह्रदंप्रवेशितः - तो मुनि अशिनींकुमारांकडून डोहात नेला गेला. ॥ १४ ॥ अपीच्याः पद्मस्त्रजःकुण्डलिनः सुवाससं वनितप्रियाः तुल्यरुपाः त्रयः पुरुषाः उत्तस्थुः - सुंदर कमळांच्या माळा घातलेले, कुंडले धारण केलेले, चांगली वस्त्रे धारण केलेले, स्त्रियांस प्रिय व सारखी रुपे घेतलेले तीन पुरुष वर आले. ॥ १५ ॥ (सा) वरारोहा साध्वी - ती सुंदर पतिव्रता सुकन्या - सरुपान सूर्यवर्चसः तान निरीक्ष्य - सारखी स्वरुपे धारण करणार्याव सूर्यासारख्या तेजस्वी अशा त्या पुरुषांना पाहून - (तेषु) पतिं अजानती - त्यातीलकोणता पति हे न ओळखणारी - अश्विनौ शरणं ययौ - अश्विनीकुमारांना शरणगेली. ॥ १६ ॥ पतिव्रत्येन तोषितौ (तौ) - पतिव्रताधम्राने संतुष्ट झालेले तेअशिनीकुमार - तस्यै पतिं दर्शयित्वा - तिला पति कोणता ते दाखवून - ऋषिंआमनत्र्य - च्यवन ऋषीचा निरोप घेऊन - विमानेन त्रिवष्टपं ययतुः - विमानातूनस्वर्गाला गेले. ॥ १७ ॥ अथ यक्ष्यमाणः शर्यतिः - नंतर यज्ञ करु पहाणारा शर्याति - -च्यवनस्य आश्रमं गतः (सन) - च्यवनाच्या आश्रमाला गेला असता - दुहितुः पार्श्वेसूर्यवर्चसं पुरुषं ददर्श - कन्येजवळ सूर्याप्रमाणे तेजस्वी असा पुरुष पाहता झाला. ॥ १८ ॥ न अतिप्रीतमनाः इव राजा - फारसा प्रसन्न न झालेला शर्याति - कृतपादाभिवन्दनांदुहितरं - पाया पडणार्या त्या कन्येला - आशिषः च अप्रयुज्जानः - आशिर्वाद नदेता - प्राह - म्हणाला. ॥ १९ ॥ ते इदं किं चिकीर्षितं - हे काय करण्याचे तू योजिलेआहेस - त्वया लोकनमस्कृतः मुनिः पतिः प्रलम्भितः - लोकाला वंदय असा जो च्यवनमुनि पति त्याला तू फसविलेस - यत - कारण - असति - हे दुर्वर्तन करणार्या मुली - -जराग्रस्तं असंमतं विहाय - जरेने ग्रासलेल्या व न आवडणार्या पतीला टाकून - अमुंअध्वगं जारं त्वं भजसे - ह्या पांथस्य जाराला तू भजत आहेस. ॥ २० ॥ सतां कुलप्रसूते - सज्जनकुळात उत्पन्न झालेल्या हे सुकन्ये - ते मतिः कथं अन्यथा अवगता - तुझी बुद्धि विपरीत कशी झाली - इदं तु कुलदूषणं - हे तर कुळाला बट्टा लावणारे आहे - यत अपत्रपा त्वं जारं बिभर्षि - कारण निर्लज्ज अशी तू जाराला पोषीत आहेस - पितुः च भर्तुः च कुलं अधः तपः नयसि - पित्याचे व पतीचे कुळ अधोगतीला नरकात नेत्येस. ॥ २१ ॥ एव ब्रुवाणं पितरं - अशा रीतीने बोलणार्या पित्याला - स्मयमाना शुचिस्मिता (सा) उवाच - शुद्ध आहे हास्य जीचे अशी तीसुकन्या हंसत म्ह्णाली - तात एष तव जामाता भृगृनंदनः अस्ति- - अहो ताता, हातुमचा जावई च्यवनभार्गव ऋषी होय. ॥ २२ ॥ (सा) तत सर्व वयोरुपाभिलम्भनं पित्रेशशंस - ती सुकन्या च्यवनाला तारुण्यप्राप्ति व स्वरुपप्राप्ति झाल्याचे सर्व वृत पित्याला सांगती झाली - विस्मितः परमप्रीतः (सः) तनयां परिषस्वजे - आश्चर्यचकित झालेला तो शर्याति अत्यंत आनंदित होऊन मुलीला आलिंगिता झाला. ॥ २३ ॥ (ततः) च च्यवनः वीरं सोमेन याजयन - आणि पुढे च्यवनऋषि पराक्रमी राजाकडून सोमयाग करवित असता - स्वेन तेजसा - आपल्या तेजाने - असोमपोः अपि अश्विनोःसोमस्य ग्रहं अग्रहीत - सोमप्राशनाचा अधिकार नसलेल्याहि त्या अश्विनीकुमारांना सोमपानकरविता झाला. ॥ २४ ॥ सदयोमन्युः (इंद्रः) अमर्षितः - तात्काळ रागावणारा इंद्ररागावून - तं हन्तुं वज्रं आददे - त्याला मारण्याकरिता वज्र घेता झाला - भार्गवः इंद्रस्यसवज्रं भुजं स्तम्भयामास - च्यवनभार्गव इंद्राचा हात वज्रासह खिळविता झाला. ॥ २५ ॥ ततः सर्वे अश्विनोः सोमस्य ग्रहं अन्वजानन- - नंतर सर्व लोक अश्विनीकुमारांना सोमपात्र देण्याला अनुमोदन देते झाले - यत पूर्व भिषजौ इति सोमाहुत्याः बहिष्कृतौ- जे पूर्वी वैद्य म्हणून सोमपानातून वगळिले गेले होते. ॥ २६ ॥ शर्यातेः उत्तानबर्हिः आनर्तः भूरिषेणः इति त्रयः पुत्राः अभवन - शर्याति राजाला उत्तानबर्हि, आनर्त वभूरिषेण असे तीन मुलगे झाले - आनर्तात रेवतः अभवत - आनर्तापासून रेवतझाला ॥ २७ ॥ अरिदम - हे शुत्रुनाशका - अन्तःसमुद्रे कुशस्थलीं नगरीं निर्माय-- समुद्रात कुशस्थली नगरी निर्मून - (तां) आस्थितः आनर्तादीन विषयान सअभुड्क्त - त्या नगरीत राहिलेला तो आनर्तादि देशांचा उपभोग घेता झाला. ॥ २८ ॥ ककुदिनजेष्ठं उत्तमं पुत्रशतं तस्य जज्ञे - ककुदिन आहे वडील ज्यात असे शभंर पुत्रझाले - कुकुद्नी स्वां रेवतीं कन्यां आदाय - ककुदिन आपल्या रेवती नामक कन्येला घेऊन - विभुं कन्यावरं परिप्रष्टुं अपावृतं ब्रह्मलोकं गतः - कन्येला योग्य वर कोणताते ब्रह्मदेवाला विचारण्यासाठी उघडया असलेल्या सत्यलोकी गेला - (तत्र) गान्धर्वे आवर्तमाने अलब्धरक्षणः क्षणं स्थितः - तेथे गायन चालू असल्यामुळे अवसर न मिळालेला तो काही वेळ उभा राहिला. ॥ २९-३० ॥ तदन्ते आदयं आनम्य - गायनाच्याशेवटी ब्रह्मदेवाला नमस्कार करुन - स्वाभिप्रायं न्यवेदयत- - आपला अभिप्राय निवेदनकरिता झाला - भगवान ब्रह्मा तत श्रुत्वा प्रहस्य तं उवाच - भगवान ब्रह्मदेव ते ऐकूनत्याला म्हणाला. ॥ ३१ ॥ राजन - हे कुकुद्नि राजा - ये (मया)ह्रदि कृताः - ज्यांनामी मनात योजिलेले होते - ते कालेन निरुद्धाः - ते काळगतीने नष्ट झाले - -तत्पुत्रपौत्रनप्तृणां गोत्राणि च न शृण्महे- - आणि त्याची मुले, नातू व पणतू यांची गोत्रेसुद्धा ऐकु येत नाहीत - त्रिणवचतुर्युगविकल्पितः कालः अभियातः - चार युगांच्यासत्तावीस चौकडया इतका काळ निघून गेला आहे. ॥ ३२ ॥ भो राजन - हे कुकुद्नि राजा - -ततः गच्छ - ह्याकरिता तू जा - -देवदेवांशः महाबलः बलदेवः (अस्ति)-- देवाधिदेव परमेश्वराचा अंश असा महाबलाढय बलदेव नावाचा क्षत्रिय आहे - (तस्मै)नररत्नाय इदं कन्यारत्नं देहि - त्या पुरुषश्रेष्ठ बलदेवाला ही श्रेष्ठ कन्या दे. ॥ ३३ ॥ पुण्यश्रवणकीर्तनः भूतभावनः भगवान - पुण्यकारक ऐकण्याजोगी आहे कीर्ति ज्याची असा सर्व प्राण्यांचे रक्षण करणारा परमेश्वर - भुवः भारावताराय निजांशेन अवतीर्णः-- पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता स्वतःच्या अंशाने अवतरला आहे. ॥ ३४ ॥ इति आदिष्टःनृपः - याप्रमाणे आज्ञापिलेला राजा - अजं अभिवनदय- - ब्रह्मदेवाला वंदन करुन - -दिक्षु अवस्थितैः भ्रातृभिः - दशदिशांमध्ये राहणार्या भावानीं - पुण्यजनत्रासातत्यक्तं स्वपुरं आगतः- - यक्षाच्या भीतीने सोडून दिलेल्या आपल्या नगराला आला. ॥ ३५ ॥ राजा- - कुकुद्नी राजा - बलशालिने बलाय- - बलिष्ठ अशाबलरामाला - आवद्यांगीं सुतां दत्वा - दोषरहित अवयवांनी युक्त अशी आपली कन्या देऊन - तप्तुं बदर्याख्यं नारायणाश्रमं गतः - तपश्चर्या करण्याकरिता बदरीनामक नरायणाश्रमाला गेला. ॥ ३६ ॥ नवमः स्कन्धः - अध्याय तिसरा समाप्त |