श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ

हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती -

राजन् - हे धर्मराजा - हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - आत्मानं - स्वतःला - अजेयं - जिंकण्याला अशक्य - अजरामरं - जरामरणरहित - अप्रतिद्वंद्वं - ज्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही असा - एकराजं - सर्व जगाचा एकटाच राजा - व्यधित्सत - करण्याची इच्छा करिता झाला. ॥१॥

सः - तो - मंदरद्रोण्यां - मंदराचलाच्या दरीत - ऊर्ध्वबाहुः - वर केले आहेत हात ज्याने असा - नभोदृष्टिः - आकाशाकडे लाविली आहे दृष्टि ज्याने असा - पादांगुष्ठाश्रितावनिः - पायाच्या अंगठयाने आश्रय केला आहे भूमीचा ज्याने असा - परमदारुणं - अतिशय भयंकर - तपः - तपश्चर्या - तेपे - करिता झाला.॥२॥

अंशुभिः - किरणांनी - संवर्तार्कः इव - प्रलयकाळीचा सूर्य जसा तसा - जटादीघितिभिः - जटांच्या किरणांनी - रेजे - प्रकाशमान झाला - तस्मिन् तपः तप्यमाने - तो तप करीत असता - देवाः - देव - स्थानानि भेजिरे - आपापली स्थाने उपभोगिते झाले. ॥३॥

तस्य - त्याच्या - मुर्घ्नि - मस्तकापासून - समुद्‌भूतः - उत्पन्न झालेला - तपोमयः - तपश्चर्यास्वरूपी - सधूमः - धुरासहित - अग्निः - अग्नि - विष्वक् ईरितः - चोहोकडे पसरलेला असा - तिर्यगूर्ध्वमधोलोकान् - बाजूच्या, वरच्या व खालच्या अशा तिन्ही लोकांना - अतपत् - तापविता झाला. ॥४॥

नद्युदन्वतः - नद्या व समुद्र - चक्षुभुः - खवळले - सद्धीपाद्रिः भूः - द्वीप व पर्वत यांसह पृथ्वी - चचाल - कापू लागली - सग्रहाः - ग्रहांसहित - ताराः - नक्षत्रे - निपेतुः - पडू लागली - च - आणि - दश दिशः - दाही दिशा - जज्वलुः - जळू लागल्या.॥५॥

तेन तपसा - त्या तपश्चर्येने - तप्ताः - तापलेले - सुराः - देव - दिवं - स्वर्गाला - त्यक्त्वा - सोडून - ब्रह्मलोकं - ब्रह्मलोकाला - ययुः - गेले - धात्रे (च) विज्ञापयामासुः - व ब्रह्मदेवाला विनंती करिते झाले - जगत्पते - हे जगाच्या पालका - देवदेव - हे देवाधिदेवा.॥६॥

दैत्येंद्रतपसा - हिरण्यकशिपुच्या तपश्चर्येने - तप्ताः - तापलेले आम्ही - दिवि - स्वर्गात - स्थातुं - राहण्याला - न शक्नुमः - समर्थ नाही - च - आणि - भूमन् - हे ब्रह्मदेवा - यदि - जर - मन्यसे - वाटत असेल तर - अभिभूः - हे सर्वव्यापी - यावत् - जोपर्यंत - तव - तुला - बलिहाराः - पूजा अर्पण करणारे - लोकाः - लोक - न नंक्ष्यंति - नाश पावले नाहीत - तस्य - त्याच्या - उपशमं - मरणाचा उपाय - विघेहि - कर. ॥७॥

दुश्चरं तपः - दुर्घट तपश्चर्या - चरतःतस्य - आचरण करणार्‍या त्याचा - अयं संकल्पः - हा संकल्प - किल - खरोखर - तव - तुला - न विदितःकिं - माहीत नाही काय - अथ अपि - तरीपण - निवेदितः - सांगितलेला तो संकल्प - श्रूयतां - श्रवण केला जावो. ॥८॥

परमेष्ठी - जसा ब्रह्मदेव - तपोयोगसमाधिना - तपश्चर्या व योग ह्यांच्या उत्तम आचरणाने - इदं - हे - चराचरं - स्थावरजंगमात्मक विश्व - सृष्ट्‌वा - उत्पन्न करून - सर्वधिष्ण्येभ्यः - सर्व स्थानांहून श्रेष्ठ अशा - निजासनं अध्यास्ते - आपल्या सत्यलोकरुपस्थानी राहतो.॥९॥

तत् - त्याचप्रमाणे - तथा - म्हणून - अहं - मी - आत्मानं - स्वतःचे कार्य - वर्धमानेन - वाढणार्‍या - तपोयोगसमाधिना - तप व योग यांच्या आचरणाने - च - आणि - कालात्मनोः - काळ व आत्मा यांच्या - नित्यत्वात् - नित्यत्वामुळे - साधयिष्ये - साधीन.॥१०॥

अहं - मी - ओजसा - तेजाने - इदं - हे जग - अन्यथा - निराळ्या स्वरूपाचे - अयथापूर्वं - पूर्वी कधीही नव्हते असे - विधास्ये - करीन - कल्पांते - कल्पाच्या अंती - अन्यैः - दुसर्‍या - कालनिर्धूतैः - काळाने नष्ट केलेल्या - वैष्णवादिभिः - विष्णु इत्यादिकांच्या ध्रुवादि स्थानांशी - किं - काय प्रयोजन.॥११॥

त्रिभुवनेश्वर - हे त्रिभुवनाच्या स्वामीन् - इति - असा - निर्बंधं - निश्चय - शुश्रुम - आम्ही ऐकतो - अतः एव सः - म्हणूनच तो - परमं तपः आस्थितः - श्रेष्ठ तपश्चर्या करीत बसला आहे - अनंतरं - या उपर - युक्तं - योग्य असेल ते - स्वयं - स्वतः - विधत्स्व - कर.॥१२॥

जगत्पते - हे जगाच्या ईशा - तव - तुझे - पारमेष्ठयं - परमेष्ठीसंबंधी - आसनं - स्थान - द्विजगवां - ब्राह्मण व गाई यांच्या - भवाय - उत्पत्तीकरिता - श्रेयसे - सुखाकरिता - भूत्यै - ऐश्वर्याकरिता - क्षेमाय - मिळविलेल्याच्या रक्षणाकरिता - च - आणि - विजयाय अस्ति - उत्कर्षाकरिता होय. ॥१३॥

नृप - हे धर्मराजा - इति - याप्रमाणे - देवैः - देवांनी - विज्ञापितः - प्रार्थना केलेला - भृगुदक्षाद्यैः - भृगु, दक्ष इत्यादिकांनी - परीतः - वेष्टिलेला - भगवान् आत्मभूः - भगवान ब्रह्मदेव - दैत्येश्वराश्रमं - हिरण्यकशिपुच्या आश्रमाला - ययौ - गेला. ॥१४॥

वल्मीकतृणकीचकैः - वारूळ, गवत आणि वेळू यांनी - प्रतिच्छन्नं - आच्छादिलेल्या - च पिपीलिकाभिः - आणि मुंग्यांनी भक्षण केली आहेत - आचीर्णमेदत्वङ्‌मांसशोणितं तं - मज्जा, त्वचा, मांस व रक्त ज्याची अशा हिरण्यकशिपुला - सः न ददर्श - तो पाहता झाला नाही.॥१५॥

यथा - ज्याप्रमाणे - अभ्रापिहितं - मेघाने झाकलेल्या - रविं - सूर्याप्रमाणे - तपसा - तपश्चर्येने - लोकान् - लोकांना - तपंतं - ताप देणार्‍या हिरण्यकशिपुला - विलक्ष्य - पाहून - विस्मितः - आश्चर्ययुक्त झालेला - हंसवाहनः - हंसावर बसलेला ब्रह्मदेव - प्रहसन् - हंसतहंसत - प्राह - बोलला. ॥१६॥

काश्यप - हे हिरण्यकशिपो - उत्तिष्ठ उत्तिष्ठ - ऊठ ऊठ - ते भद्रं - तुझे कल्याण - तपःसिद्धः - तपश्चर्येने सिद्ध - असि - झाला आहेस - अहं - मी - वरदः - वर देणारा - अनुप्राप्तः - प्राप्त झालो - ईप्सितः - इच्छित - वरःव्रियतां - वर मागितला जावा. ॥१७॥

अहं - मी - एतत् - हे - ते - तुझे - महत् - मोठे - अद्‌भुतं - चमत्कारिक - हृत्सारं - धैर्य - अद्राक्षं - पाहिले - हि - खरोखर - दंशभक्षितदेहस्य - कीटकांनी खाल्लेल्या तुझ्या देहाचे - प्राणाः - प्राण - अस्थिषु - हाडांत - शेरते - राहिले आहेत. ॥१८॥

एतत् - हे - पूर्वर्षयः - पूर्वीचे ऋषि - न चक्रुः - करिते झाले नाहीत - च - आणि - अपरे अपि - दुसरेही - न करिष्यंति - करणार नाहीत - कः वै - कोणता प्राणी खरोखर - निरंबुः - उदकाशिवाय - दिव्यसमाः शतं - देवांच्या शंभर वर्षेपर्यंत - प्राणान् - प्राणांना - धारयेत् - धारण करील.॥१९॥

दितिनंदन - हे हिरण्यकशिपो - ते - तुझ्या - अनेन - ह्या - मनस्विनां - दृढ मनाच्या लोकांनाही - दुष्करेण व्यवसायेन - अत्यंत अवघड अशा निश्चयाने - तपोनिष्ठेन भवता - तपश्चर्येत दंग झालेल्या तुझ्याकडून - अहं - मी - जितः - जिंकलो गेलो.॥२०॥

असुरपुंगव - हे दैत्यश्रेष्ठा - ततः - त्या कारणास्तव - ते - तुला - सर्वाः आशिषः - सगळे भोग - ददामि - मी देतो - मर्त्यस्य ते - मृत्यूलोकांत राहणार्‍या तुला - अमर्त्यस्य मम दर्शनं - मर्त्यभिन्न अशा माझे दर्शन - अफलं न (भवेत्) - फुकट जाणार नाही. ॥२१॥

आदिभवः - सर्वांच्या आधी उत्पन्न झालेला - देवः - ब्रह्मदेव - इति उक्त्वा - याप्रमाणे बोलून - पिपीलिकैः भक्षितांगं - मुंग्यांनी सर्व शरीर खाल्ले आहे अशा त्या हिरण्यकशिपुला - अमोघराधसा दिव्येन - ज्याची सिद्धी फुकट जात नाही अशा स्वर्गीय - कमंडलुजलेन - कमंडलूतील पाण्याने - औक्षत् - सिंचन करिता झाला.॥२२॥

सः - तो - कीचकवल्मीकात् - वेळु व वारूळ यापासून - सहओजोबलान्वितः - वीर्यतेज व पराक्रम यांनी युक्त असा - सर्वावयवसंपन्नः - सर्व अवयवांनी पूर्ण असा - वज्रसंहननः - वज्राप्रमाणे बळकट - युवा - तरुण - तप्तहेमाभः - तापविलेल्या सुवर्णाप्रमाणे कांतिमान - एधसः विभावसुः इव - काष्ठातून अग्नि निघतो त्याप्रमाणे - उत्थितः - उठला.॥२३॥

तद्दर्शनमहोत्सवः - ज्याच्या दर्शनाने मोठा आनंद झाला आहे ज्याला असा - सः - तो हिरण्यकशिपु - अंबरे - आकाशात - अवस्थितं - उभा राहिलेल्या - हंसवाहं देवं - हंसावर बसलेल्या ब्रह्मदेवाला - निरीक्ष्य - पाहून - शिरसा - मस्तकाने - भूमौ - भूमीवर - ननाम - नमस्कार करिता झाला.॥२४॥

दृशा - दृष्टीने - विभुं - ब्रह्मदेवाला - ईक्षमाणः - पाहणारा - प्रांजलिः - हात जोडलेला - प्रह्वः - नम्र झालेला - हर्षाश्रुपुलकोद्‌भेदः - हर्षाने डोळ्यात आनंदाश्रु व अंगावर रोमांच आले आहेत ज्याच्या असा तो हिरण्यकशिपु - उत्थाय - उठून - गग्ददया - गग्दद अशा - गिरा - वाणीने - अगृणात् - बोलला. ॥२५॥

यः - जो - स्वयंज्योतिः - स्वतः प्रकाशमान असा - स्वरोचिषा - स्वतःच्या तेजाने - कल्पान्ते - कल्पाच्या शेवटी - कालसृष्टेन - काळाने उत्पन्न केलेल्या - अंधेन तमसा वृतं - निबिड अशा अंधकाराने आच्छादित - इदं जगत् - हे जग - अभिव्यनक् - प्रगट करिता झाला.॥२६॥

त्रिवृता - त्रिगुणात्मक अशा - आत्मना - आत्म्याने - इदं - हे जग - सृजति - उत्पन्न करितो - अवति - राखतो - लुंपति - लुप्त करितो - रजः सत्त्वतमोधाम्ने महते पराय - रज, सत्त्व व तम ह्यांना आश्रयीभूत अशा मोठया परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥२७॥

आद्याय - सर्वांचा आदिभूत अशा - बीजाय - कारणरूप अशा - ज्ञानविज्ञानमूर्तये - ब्रह्मज्ञान व विषयाकार ज्ञान ह्याची केवळ मूर्ति अशा - प्राणेंद्रियमनोबुद्धिविकारैः - प्राण, इंद्रिये, मन व बुद्धि यांच्या कार्यांनी - व्यक्तिं - स्पष्टपणाला - ईयुषे तुभ्यं - प्राप्त होणार्‍या अशा तुला - नमः - नमस्कार असो.॥२८॥

त्वं - तू - जगतः तस्थुषः च ईशिषे - जंगम व स्थावर याचे नियंत्रण करितोस - मुख्येन - मुख्य अशा - प्राणेन - प्राणाच्या योगे - प्रजानां - प्रजांचा - पतिः - स्वामी - चित्तस्य - चित्ताचा - चित्तेः - चैतन्याचा - मन‌इंद्रियाणां - मन व इंद्रिये यांचा - पतिः - स्वामी - भूतगुणाशयेशः - पंचमहाभूते, शब्दादि गुण व त्यांच्या वासना यांचा स्वामी असा - महान् - सर्वात श्रेष्ठ.॥२९॥

त्वं - तू - त्रय्या तन्वा - त्या वेदरूपी शरीराने - च - आणि - चातुर्होत्रकविद्यया - ज्यामध्ये चार जण हवन करणारे असतात अशा यज्ञविद्येने - सप्ततंतून् - अग्निष्टोम आदिकरून सात यज्ञ - तनोषि - विस्तारितोस - त्वं - तू - आत्मवतां - प्राणिमात्रांचा - एकः - अद्वितीय - आत्मा - अंतर्यामी - अनादिः - आदिरहित - अनंतपारः - अंत व पार ज्याला नाही असा - कविः - सर्वज्ञ - अंतरात्मा - अंतर्यामी.॥३०॥

त्वम् एव - तूच - अनिमिषः - नित्य जागृत असता - कालः - काळ - जनानां - लोकांच्या - आयुः - आयुष्याला - लवाद्यावयवैः - लव आदिकरून काळाच्या अवयवांनी - क्षिणोषि - क्षीण करितोस - त्वं - तू - कूटस्थः - अविकारी - आत्मा - ज्ञानरूप - परमेष्ठी - परमेश्वर - अजः - जन्मादिरहित - महान् - श्रेष्ठ - च - आणि - जीवलोकस्य - सर्व प्राण्यांचा - जीवः - जीवनरूप - आत्मा - नियंता आहेस.॥३१॥

त्वत्तः (अन्यत्) - तुझ्याहून भिन्न - परं - कारण - अपरं - कार्य - न - नाही - अपि - शिवाय - च - आणि - एजत् - जंगम - अनेजत् - स्थावर - किंचित् - काहीही - (त्वया) व्यतिरिक्तं - तुझ्याशिवाय दुसरे - न अस्ति - नाही - च - आणि - सर्वाः - संपूर्ण - विद्याः - वेदोपवेदादि विद्या - कलाः - चौसष्ट कला - ते - तुझी - तनवः (सन्ति) - अंगे आहेत - बृहत् - ब्रह्मरूप - त्रिपृष्ठः - त्रिगुणात्मक जे प्रधान तत्त्व त्याच्या पाठीवर आरूढ झालेला - हिरण्यगर्भः - हिरण्यरूप ब्रह्मांड ज्याच्या गर्भात आहे असा - असि - आहेस.॥३२॥

विभो - हे ब्रह्मदेवा - इदं - हे - व्यक्तं स्थूलं - व्यक्तरूपास आलेले स्थूल विश्व - तव शरीरं - तुझे शरीर - येन - ज्या शरीराने - अव्यक्तः - इंद्रियांना अगोचर - आत्मा - सर्वांचा अंतर्यामी - पुराणः - अनादि - पुरुषः - पुरुष असा - त्वं - तू - इंद्रियप्राणमनोगुणान् - इंद्रिये, प्राण, मन व विषय यांना - पारमेष्ठये धामनि - परमेश्वराच्या स्वरूपात - स्थितः - राहणारा - भुंक्षे - भोगतोस.॥३३॥

अनंत - हे अंतरहिता - अव्यक्तरूपेण येन - इंद्रियादिकांना अगोचर अशा - इदं अखिलं विश्वं ततं - हे संपूर्ण जग पसरिले आहेस - तस्मैचिदचिच्छक्तिरूपाय - त्या चैतन्यरूपी व मायाशक्तिरूपी अशा - भगवते नमः - भगवंताला नमस्कार असो.॥३४॥

वरदोत्तम - वर देण्यात श्रेष्ठ अशा हे ब्रह्मदेवा - यदि - जर - मे अभिमतान् - मला इष्ट असे - वरान् - वर - दास्यसि - देणार असलास - प्रभो - हे समर्था - मम - मला - त्वद्विसृष्टेभ्यः - तू उत्पन्न केलेल्या - भूतेभ्यः - प्राण्यांपासून - मृत्यूः - मृत्यू - मा भूत् - येऊ नये. ॥३५॥

अन्यस्मात् अपि - दुसर्‍या कोणापासूनही - च - आणि - आयुधैः - आयुधांनी - अंतः - आत - बहिः - बाहेर - दिवा - दिवसा - नक्तं - रात्री - न - मृत्यू येऊ नये - भूमौ - पृथ्वीवर - न - येऊ नये - अंबरे - आकाशात - नरैः अपि मृगैःअपि च - मनुष्यांच्या हातूनही व पशूंकडूनही - मृत्यूः - मृत्यू - न (भवेत्) - येऊ नये. ॥३६॥

व्यसुभिः - निर्जीव वस्तूंपासून - वा - अथवा - असुमद्‌भिः - जिवंत प्राण्यांपासून - वा - तसेच - सुरासुरमहोरगैः - देव, दैत्य व मोठे सर्प इत्यादिकांकडून मृत्यू येऊ नये - च - आणि - युद्धे अप्रतिद्वंद्वता - माझ्य़ाशी बरोबरी करणारा कोणी असू नये - देहिनां ऐकपत्यं - सर्व प्राणिमात्रावर पूर्ण स्वामित्व.॥३७॥

तपोयोगप्रभावाणां - तपश्चर्या व योग यांच्या योगाने ज्यांचा पराक्रम आहे अशा - सर्वेषां लोकपालाना - सर्व लोकपालांची - महिमानं - मोठी पदवी - यथा आत्मनः - जसे तुला स्वतःला आहे - यत् - आणि - कर्हिचित् - कधीही - न रिष्यति - नाश पावत नाही. ॥३८॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP